Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

२७ एप्रिल, दिवस ११७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी ७६ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग १३९३ ते १४०४

27 APRIL NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

27 APRIL NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“२७ एप्रिल” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २७ Apirl
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २७ एप्रिल असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
२७ एप्रिल, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी ७६ ते १००,

76-10
तो पाषाणांमाजी परिसु । रसांमाजी सिद्धरसु । तैसा मनुष्याकृति अंशु । तो माझाचि जाण ॥76॥
जसा पाषाणात परिस श्रेष्ठ आहे किंवा रसांत सिध्दरस म्हणजे अमृत श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे तो सर्व मनुष्यात माझा अंश होय, हे जाण.
77-10
तो चालते ज्ञानाचे बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ । परि माणुसपणाची भांब । लोकाचि भागु ॥77॥
असा मनुष्य, अर्जुना ! ज्ञानाचे चालते बोलते बिंब होय, त्याचे जे अवयव दिसतात ते ब्रह्मसुखाला निघालेले कोंभ होत असे समज, बाकी वर वर जो मनुष्यपणाचा भाग दिसतो तो केवळ अज्ञानभ्रमाने दिसतो.
78-10
अगा अवचिता कापुरा । माजी सांपडला हिरा । वरी पडिलिया नीरा । न निगे केवी ॥78॥
बा अर्जुना ! कापुरामध्ये अकस्मात् हिरा मिसळला, तरी त्यावर पाणी पडले असता त्या पाण्याने जसा त्याचा हिरेपणा जात नाही.
79-10
तैसा मनुष्यलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु । तऱ्ही प्रकृतिदोषाची मातु । नेणिजे तेथ ॥79॥
त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाला जाणणारा पुरूष, जरी या मनुष्यलोकात सामान्य प्राकृतिक माणसासारखा दिसत असला, तरी त्याच्या ठिकाणी प्रकृतिरूप दोषांचा स्पर्शहि नसतो.
80-10
तो आपसयेचि सांडिजे पापी । जैसा जळत चंदनु सर्पी । तैसा माते जाणे तो संकल्पी । वर्जूनि घालिजे ॥80॥
भीतीने आपण होऊनच पापे त्यांच्यापाशी येत नाहीत. ज्याप्रमाणे सर्प जळत असलेल्या चंदनाच्या झाडाला सोडून देतात त्याप्रमाणे माझ्या श्रीकृष्णस्वरूपाचे पूर्णब्रह्मत्व जो जाणतो त्याचा सर्व संकल्प संबंध सोडतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


81-10
तेचि माते कैसे जाणिजे । ऐसे कल्पी जरी चित्त तुझे । तरी मी ऐसा हे माझे । भाव ऐके ॥81॥
तेच माझे जगात व्यापून असणे कसे जाणावे असे जर तुझ्या चित्तांत वाटत असेल, तर जगात मी असा आहे व हे माझे विकार आहेत, ते सांगतो ऐक.
82-10
जे वेगळाला भूती । सारिखे होऊनि प्रकृती । विखुरले आहेती त्रिजगती । आघविये ॥82॥
हे विकार, निरनिराळ्या प्राण्यामध्ये, त्यांच्या प्रकृतीसारखे होऊन संपूर्ण ब्रह्मांडांत पसरलेले आहेत.

बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥10. 4॥
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥10. 5॥

83-10
ते प्रथम जाण बुद्धी । मग ज्ञान जे निरवधी । असंमोह सहनसिद्धी । क्षमा सत्य ॥83॥
प्रथम भाव बुध्दि होय, हे लक्षात ठेव. त्यानंतर जे अमर्याद ज्ञान हा दुसरा भाव होय. मोह नसणे, सर्व सहन करणे, क्षमा म्हणजे कोणी उपकार केल्यास त्याला प्रत्यपकार न करण्याची बुध्दि, सत्य म्हणजे जसे ऐकिले किंवा पाहिले असेल तसेंच सांगणे.
84-10
मग शम दम दोन्ही । सुख दुःख वर्तत जनी । अर्जुना भावाभाव मानी । भावाचिमाजी ॥84॥
दम म्हणजे इंद्रियनिग्रह किंवा इंद्रियांचे शास्रानूसार नियमन, शम म्हणजे मनोनिग्रह किंवा मनातील विषयवासना क्षीण होणे हे दोन भाव, सुख म्हणजे मनाच्या अनुकुल असणे दुःख म्हणजे मनाच्या विरूध्द असणे हे जे जगात दिसून येते, त्याचप्रमाणे भावाभाव म्हणजे असणे व नसणे, हे दोन्ही भाव, भावामध्ये भावरूपच आहेत असे समज.
85-10
आता भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । हे मम रुपची पंडुसुता । ओळख तू ॥85॥
आणखी अर्जुना ! भय व निर्भयता, अहिंसा म्हणजे कायावाचा मनाने कोणत्याहि प्राण्याला दुःख न देता सुखच देण्याची प्रवृत्ति आणि समता म्हणजे सर्व प्राणिमात्रांना एकसारखे पाहणे, तुष्टि म्हणजे संतोष, तपादिक हे माझे रूप आहे असे जाण.


86-10
दान यश अपकीर्ती । ते जे भाव सर्वत्र वसती । ते मजचि पासूनि होती । भूतांचा ठायी ॥86॥
बा अर्जुना ! दान, यश, अपकीर्ति, हे जे सर्व भाव जगात दिसून येतात, ते सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझ्यापासूनच प्रगट झाले आहेत.
87-10
जैसी भूते आहाति सिनानी । तैसेचि हेही वेगळाले मानी । एक उपजती माझा ज्ञानी । एक नेणती माते ॥87॥
ज्याप्रमाणे निरनिराळे प्राणी आहेत, त्याप्रमाणेच हे निरनिराळे भाव आहेत असे जाण. काही भाव माझ्या स्वरूपाचे ज्ञान करून देणारे आहेत व काही माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करणारे आहेत.
88-10
अगा प्रकाश आणि कडवसे । हे सूर्याचिस्तव जैसे । प्रकाश उदयी दिसे । तम अस्तुसी ॥88॥
प्रकाश व अंधार हे दोन्ही सूर्यामुळेंच होत असतात. सूर्योदय झाला असता प्रकाश होतो व सूर्यास्त झाला असता अंधार होतो.
89-10
आणि माझे जे जाणणे नेणणे । ते तव भूताचिया दैवाचे करणे । म्हणौनि भूती भावाचे होणे । विषम पडे ॥89॥
आणि मला जाणणे किंवा न जाणणे हे जीवांच्या पूर्वजन्मांतील पापपुण्यरूप कर्माप्रमाणे होत असते, म्हणून भूतांचे ठिकाणी माझे हे कार्यरूपभावाने प्रगट होणे विषम म्हणजे माझ्या ज्ञानाला कोठे अनुकूल व कोठे प्रतिकूल असे झाले आहे.
90-10
यापरी माझा भावी । हे जीवसृष्टि आहे आघवी । गुंतली असे जाणावी । पंडुकुमरा ॥90॥
याप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या कार्यरूप भावाचे ठिकाणी सर्व जीव गुंतून पडले आहेत, असे अर्जुना ! जाण.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


91-10
आता इये सृष्टीचे पालक । तया आधीन वर्तती लोक । ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ॥91॥
आता या सृष्टीचे पालक म्हणून परमेश्वराने नेमलेले व ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व लोक वागतात, ते अकरा भाव आणखी तुला सांगतो.

महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥10. 6॥

92-10
तरी आघवाचि गुणी वृद्ध । जे महर्षींमाजी प्रबुद्ध । कश्यपादि प्रसिद्ध । सप्त ऋषी ॥92॥
तरी ज्ञानतपादी सर्व गुणांनी श्रेष्ठ व सर्व महर्षींमध्ये ज्ञाते असे जे कश्यपादी प्रसिध्द सप्तर्षी आहेत.
93-10
आणिकही सांगिजतील । जे चौदा आतील । स्वायंभू मुख्य मुद्दल । चारी मनु ॥93॥
आणखी सांगतो, ऐक. मुळात असलेल्या चौदा मनूंमध्ये पहिले स्वायंभुव वैगेरे जे चार मुख्य मनू आहेत.
94-10
ऐसे हे अकरा । माझा मनी जाहाले धनुर्धरा । सृष्टीचिया व्यापारा- । लागोनियां ॥94॥
अर्जुना ! असे हे अकराजण पुढील सृष्टीचा उत्पद्यादी व्यापार करण्याकरिता माझ्या मनापासून उत्पन्न झाले.
95-10
जै लोकांची व्यवस्था न पडे । जै या त्रिभुवनाचे काही न मांडे । तै महाभूतांचे दळवाडे । अचुंबित असे ॥95॥
जेव्हा त्रिभुवनाची मांडणी व लोकांची उत्पत्ती होत नाही आणि पंचभूतांचा समुदाय क्रियारहित असतो,


96-10
तैचि हे जाहाले । इही लोकपाळ केले । अध्यक्ष रचूनि ठेविले । इही जन ॥96॥
जेव्हा हे अकरा जण उत्पन्न झाले व त्यांनी मग हे स्वर्गादि लोक निर्माण केले व तेथे पूर्वपुण्यानुसार अधिकार प्राप्त झालेले अध्यक्ष नेमले व त्यांनी पुढे प्रजा निर्माण केली.
97-10
म्हणौनि अकरा हे राजा । मग येर लोक यांचिया प्रजा । ऐसा हा विस्तारु माझा । ओळख तू ॥97॥
म्हणून या अकराजनांचा समुदाय, राजा असून बाकींचे जग त्यांची प्रजा होय, याप्रमाणे हा संपूर्ण विश्वाचा विस्तार माझाच आहे, असे समज.
98-10
पाहे पा आरंभी बीज एकले । मग तेचि विरूढलिया बूड जाहाले । बुडी कोंभ निघाले । खांदियांचे ॥98॥
हे पहा, अर्जुना ! पहिले एक बीजच असते, मग तेच वाढले की बूड होते, पुढे त्या बुडाला कोंभ निघतात.
99-10
खांदियांपासूनि अनेका । पसरलिया शाखोपशाखा । शाखांस्तव देखा । पल्लवपाने ॥99॥
त्या फांद्यापासून अनेक शाखा फुटतात व त्या शाखांना कोवळी कोरडी पाने येतात.
100-10
पल्लवी फूल फळ । एवं वृक्षत्व जाहाले सकळ । ते निर्धारिता केवळ । बीजचि ते ॥100॥
पाना नंतर फुले, फळे येतात. याप्रमाणे संपूर्ण झाडाचा विस्तार होतो. या सर्वाचा विचार केला असता, ते सर्व एक बीजच होय.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ११६ वा, २७, एप्रिल
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १३९३ ते १४०४
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १३९३
काय करू जीव होतो कासावीस । कोंडिले दिस गमेचिना ॥१॥
पडिले हे दिसे ब्रम्हांडचि वोस । दाटोनि उछ्ववास राहातसे ॥२॥
तुका म्हणे अगा सर्वजाणतिया । विश्वंभरे काया निववावी ॥३॥
अर्थ
देवा मी आता काय करू मला फारच कासावीस झाल्यासारखे होत आहे मला कोंडल्यासारखे होत आहे आणि दिवस तर जाईन असे झाले आहे. सर्व ब्रह्मांड ओस पडल्यासारखे दिसत आहे आणि माझा दम कोंडल्यासारखा दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे विश्वंभरा तू सर्व जाणता आहेस त्यामुळे तू ये मला भेट दे आणि माझ्या शरीराला शांत कर.
अभंग क्र. १३९४
सुकलिया कोंभा अत्यंत जळधर । तेणीची प्रकार न्याय असे ॥१॥
न चले पाउली सांडी गरुडासन । मनाचे हो मनत्वरे लागी ॥२॥
तुका म्हणे भूक न साहावे बाळा । जीवनांची कळा ओढलीसे ॥३॥
अर्थ

ज्याप्रमाणे सुकलेल्या झाडाला कोंभाला पावसाच्या पाण्याची अत्यंत गरज असते त्याप्रमाणे देवा मला तुझ्या भेटीची अत्यंत गरज आहे. तेव्हा माझ्या भेटीला येण्याकरिता तू पायी येऊ नकोस, गरुडावर ही येऊ नकोस कारण त्याने विलंब होईल तू मनाचेही मन हो आणि लवकर ये. तुकाराम महाराज म्हणतात लहान मुलाला भूक सहन होत नाही अन्नासाठी त्याचा जीव कासावीस होतो त्याप्रमाणे माझा जीवही तुझ्या भेटीसाठी कासावीस होतो आहे देवा.
अभंग क्र. १३९५
शृगारिक माझी नव्हती उत्तरे । आळवितो खरे अवस्थेच्या ॥१॥
न घलावा मधी कामाचा विलंब । तुम्ही तो स्वयंभ करुणामूर्ती ॥२॥
तुका म्हणे केले सन्मुख वदन । देखता चरण पोटाळीन ॥३॥
अर्थ

देवा माझी बोलणे म्हणजे शुंगरिक नाही माझी अवस्था तशी झाली आहे त्यामुळे मी तुला आळवित आहे. देवा तुम्ही स्वयंभू करूणेची मूर्ती आहात. त्यामुळे माझ्या भेटीसाठी मध्ये कोणताही अडथळा करू नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमची वाट पाहत आहे तुमच्या भेटीच्या दिशेने बसलो, आता मला तुमची चरण दिसले की ते मी माझ्या हृदयाशी कवटीळीण.
अभंग क्र. १३९६
तू माझी माउली तू माझी साउली । पाहातो वाटुली पांडुरंगे ॥१॥
तू मज येकुला वडील धाकुला । तू मज आपुला सोयरा जीव ॥२॥
तुका म्हणे जीव तुजपाशी असे । तुझियाने ओस सर्व दिशा ॥३॥
अर्थ

हे पांडुरंगे तू माझी आई, सावली आहेस त्यामुळे मी तुझी वाट पाहत आहे. हे पांडुरंगा तूच मला वडील धाकटा जिवलगा सोयरा सज्जन सर्वकाही आहेस. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा जीव तुझ्या पायापाशी आहे आणि तुझ्या वाचून मला सर्व दिशा ओस वाटतात.
अभंग क्र. १३९७
कराल ते करा । हाते आपुल्या दातारा ॥१॥
बळियाची आम्ही बाळे । असो निर्भर या सळे ॥धृपद॥
आता कोठे काळ । मध्ये रिघेल ओंगळा ॥२॥
तुका म्हणे पंढरीराया । थापटितो ठोक बाह्या ॥३॥
अर्थ

हे पांडुरंग दातारा तुला माझे काय करायचे असेल ते तुझ्या हाताने कर. कारण आम्ही बलवंतांची लेकरे आहोत आणि त्याच्या आधाराने आम्ही राहतो त्यामुळे आम्ही कशाची आम्हाला कशाची भीती आहे, आता तो काळ आमचे काय करील व आमच्या मध्ये तो कशाला घुसेल ? तुकाराम महाराज म्हणतात काळाशी लढण्याकरता मी माझे दंड थोपटून उभा आहे.
अभंग क्र. १३९८
डोळा भरिले रूप । चित्ती पायापचा संकल्प ॥१॥
अवघी घातली वांटणी । प्रेम राहिले कीर्तनी ॥धृपद॥
जिव्हा केली माप । रासी हरीनाम अमुप ॥२॥
भरूनिया भाग । तुका बैसला पांडुरंग ॥३॥
अर्थ

डोळ्यांमध्ये देवाचे स्वरूप भरले आहे आणि चित्तात त्याच्या पायाचाच संकल्प केलेला आहे. मी माझ्या इंद्रियांची वाटणी देवा संबंधितच केलेली आहे आणि माझे हरिकीर्तन विषयी प्रेम जडलेले आहे. असंख्य हरिनाम राशी मोजण्याकरिता मी माझ्या जीवेचे माप तयार केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी पांडुरंग हा माझा विभाग आहे त्यानाच माझ्या मध्ये भरून हरिरूप झालो आहे.
अभंग क्र. १३९९
आता आहे नाही । न कळे आळीकरा काही ॥१॥
देसी पुरवुनी इच्छा । आता पंढरीनिवासा ॥धृपद॥
नेणे भाग सीण । दुजे कोणी तुम्हाविण ॥२॥
आता नव्हे दुरी । तुका पायी मिठी मारी ॥३॥
अर्थ

हट्टी मुलांना आपण जे मागत आहोत ते आपल्या आई-वडिलाकडे आहे किंवा नाही याच्याशी काहीच कर्तव्य नसते. तरीही त्या मुलांचा आई-वडील त्याचा हट्ट पूर्ण करतातच त्याप्रमाणे हे पंढरीनिवासा पांडुरंगा तु ही माझे हट्ट पूर्ण करशीलच कारण मी तुझा हट्टी मुलगा आहे तुझे छोटे बालक आहे. तुझ्या वाचून माझे शिण भाग हलके करण्याचे काम दुसरे कोणी करणार आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात देवा आता मी तुझ्या पासून दूर जाणार नाहीत कारण मी तुझ्या पायाला मिठी मारत आहे.
अभंग क्र. १४००
संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटे ॥१॥
अवघियांचे पुरे कोड । फिडे जड देहत्व ॥धृपद॥
उभय लोकी उत्तम कीर्ती । देव चित्ती राहिलिया ॥२॥
तुका म्हणे जीव धाय । नये हाय जवळी ॥३॥
अर्थ

संकल्प करायचा असेल तर नारायणाचाच करा आणि ते चांगले आहे. असे केल्याने सर्वाच्या इच्छा पूर्ण होतात आणि जड देहाशी असलेले देह तादात्म्य नाहीसे होते. देव जर आपल्या चित्तात कायमस्वरूपी राहिला तर उभय लोकात आपली उत्तम किर्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात नारायणाचा संकल्प केल्याने जीव तृप्त होतो आणि कोणत्याही प्रकारचा हाव मनामध्ये राहत नाही.


अभंग क्र. १४०१
भाग्यवंता हेची जोडी । परवडी संतांची ॥१॥
धन घरी पांडुरंग । अभंग जे सरेना ॥धृपद॥
जनाविरहित हा लाभ । टांचे नभ साठवणे ॥२॥
तुका म्हणे विष्णुदासा । नाही आशा दुसरी ॥३॥
अर्थ

जे खरच भाग्यवंत आहेत त्यांना संत संगती हाच मोठा लाभ आहे असे वाटते. त्या भक्तांना असे वाटते की, अभंग असणारे म्हणजे कधीही न संपणारे पांडुरंग रूपी धन आपल्या घरी असावे. हा लाभ इतर लोकापेक्षा ही वेगळा आहे हा लाभ साठविण्यासाठी आकाश देखील कमी पडते. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंग आणि संत यावाचून दुसरी कोणतीही अपेक्षा विष्णुदासांना नसते.
अभंग क्र. १४०२
जरी आले राज्य मोळविक्या हाती । तरी तो मागुता व्यवसायी ॥१॥
तृष्णेची मंजुरे नेणती विसावा । वाढे हाव हावा काम कामी ॥धृपद॥
वैभवाची सुखे नातळता अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥२॥
तुका म्हणे वाहे मरणाचे भय । रक्षणउपाय करूनि असे ॥३॥
अर्थ

एखाद्या मोळी विक्या माणसाच्या हाती राज्य जरी आले तरी त्याला आपला पूर्वीचाच धंदा चांगला आहे असेच वाटते. त्याप्रमाणे संसारी मनुष्याला सुंदर नरदेह जरी मिळाला तरी तो त्या नरदेहाच्या तृष्णेचा मजूर होऊन बसतो. त्याला विश्रांती काय आहे हे माहीत नसते त्यामुळे त्याच्या हवेने हाव व कामाने काम वाढतच जाते घरी कितीही सुख असले तरी श्रीमंती असली तरीही तो त्याचा भोग घेत नाही. उलट मिळालेल्या भोगाला काही विघ्ने येतील की काय म्हणून तो नेहमी चिंता करतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा मनुष्याला नेहमीच मरणाचे भय वाटते व तो त्याच्यावर कायम उपायही करत असतो.
अभंग क्र. १४०३
कोण होईल आता संसारपागिले । आहे उगवले सहजचि ॥१॥
केला तो चालवी आपुला प्रपंच । काय कोणा वेच आदा घे दे ॥धृपद॥
सहजचि घडे आता मोळ्याविण । येथे काय सीण आणि लाभ ॥२॥
तुका म्हणे जालो सहज देखणा । ज्याच्या तेणे खुणा दाखविल्या ॥३॥
अर्थ

माझे संसाराचे बंधन केंव्हाच चुकवलेले आहे त्यामुळे कोण या संसाराच्या आधीन होईल ? हा प्रपंच ज्या हरीने निर्माण केला आहे तोच हरी हा प्रपंच चालवेल. प्रपंचात काय मिळणार आहे आणि प्रपंचात कोणाशी देणे-घेणे होणार आहे हा प्रपंच सहज घडत आहे त्यामुळे काही लाभ आणि नुसकान झाले तरी काही दुःख मानण्याचे काय कारण आहे ? तुकाराम महाराज म्हणतात मी या प्रपंचाला सहज पाहत आहे आणि हा प्रपंच मिथ्य आहे हे हरीने मला दाखविले आहे.
अभंग क्र. १४०४
आम्हा शरणागता । एवढी काय करणे चिंता ॥१॥
परि हे कौतुकाचे खेळ । अवघे पाहातो सकळ ॥धृपद॥
अभयदान वदे । आम्हा कैची द्वंदे ॥२॥
तुका म्हणे आम्ही । हरीजन साधनाचे स्वामी ॥३॥
अर्थ

आम्ही या हरीला शरण गेलेलो आहोत त्यामुळे आम्हाला एवढी चिंता करण्याची काय गरज आहे ? त्यामुळे मी या प्रपंचातील सर्व खेळ कौतुकाने पाहात आहे. या हरीने आम्हाला अभयदान दिले आहे की तू भिऊ नकोस त्यामुळे आम्हाला लाभ आणि हानी या द्वंद्वाचे भय कसले ? तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही हरीचे सेवक आहोत आम्ही हरीजण आहोत त्यामुळे हरीभजन करणे या साधनेचे आम्ही पात्र आहोत. ”

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version