महर्षी अगस्त्यऋषी संपूर्ण चरित्र भाग ३, (११ ते १५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

Maharishi Agastya Rishi! !

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – ११.

          तिमिध्वज आणि त्याची सेना अतिशय अमानुष होती.रणांगणांवर जखमी सैनिकांच्या शरीराचे हे असुर रात्री येऊन लचके तोडत.सुशुश्रागृहातील सैनिकांना अचानक येऊन मारुन टाकत. असुरांशी युध्द करीत असतांना देवांच्या बाजूने लढतांना दशरथ राजा घायाळ झालेवर रथात कोसळला असतां,त्याची  वीरपत्नी शस्रनिपून कैकयी त्यावेळी त्याच्या रथात होती.असुर रथात उड्या मारुन बेशुध्द राजावर शस्रवार करीत असलेले बघून कैकयीने प्रतिकार करुन त्यांना भूमीवर लोळवले.तीने रथाच्या रश्मी हाती घेऊन रथ भरवेगात पळवला

तरी दैत्य पाठलाग करुन पुन्हा रथात उड्या मारुन राजावर वार करु लागलले पाहताच विद्यील्लतेप्रमाणे खड्ग घेऊन एकटीने त्या देत्यांचा संहार केला.

         राजा भानावर  आल्यावर आपल्या २० वर्षाच्या तरुण पत्नी विरांगणेचा पराक्रम समजल्यावर तिला दोन ‘वर’ दिले.”वर’ म्हणजे अलिखित करार!वसिष्ठ व विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली राजा दशरथाने अभेद्य,स्वयंशासित राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली.हा राजा दूरदर्शी,अतिरथी,महाप्रतापी,धर्मनिष्ठ, वेदवेत्ता असून यज्ञयाग करणारा व मनो निग्रही,जितेंद्रिय आहे.बलाढ्य एवढा की  शत्रू त्याच्यापुढे टिकू शकत नसे.देव राज्यातही असा पराक्रमी वीर झालेला नाही.इंद्रदेव अगस्त्यांना म्हणाले,ऋषीवर अर्बुद सागरातून असंख्य दैत्य व राक्षस दक्षिण किनार पट्टीच्या प्रदेशात राहत असल्याने,इथेही देवांना शांततेने राहू देणार नाही.त्यांचा निःपात करण्यास दंडकारण्यात केवळ सैन्य नेऊन भागणार नाही.त्यांचे स्थानिक वनचरां वर अधिपत्य असल्याने ते लपून राहत असल्यामुळे त्यांना शोधून मारणे कठीन होते.त्यासाठी ऋषींची यज्ञसंस्थाच कार्य करुं शकते.अगस्ती म्हणाले,देवराज! वसिष्ठ आणि विश्वामित्रांशी माझी चर्चा झालेली आहे.त्यानुसार त्यांनी केलेल्या योजनेनुसार विंध्याचल ओलांडून दंडकारण्यात मी जाणार आहे.इंद्र गंभीर होऊन म्हणाले,ऋषीवर,ज्या कारणा साठी इथे तपश्चर्या करायला आलात,ज्या साठी आजच्या बैठकीचे आजोजन केले तो महत्वाचा विषय…म्हणजे कालकेय दानव,ज्याने दोन तपापासून मांडलेल्या उच्छादनाचे समूळ निर्दालन केवळ आपल्यालाच शक्य आहे.तुमची शाप मुक्त होण्याची वेळ जवळ आली आहे. शांतपणे अगस्त्य म्हणाले,देवराज मी आपल्या शब्दाबाहेर नाही.या कार्याची पूर्तता करण्याचे दायित्व माझेवर आहे.ते पार पाडून मला लवकरात लवकर शाप मुक्त व्हायचं आहे.त्यानंतर आपले देव राज्यात स्वागत होईल.

        दोन दिवस अगस्त्यांचा मुक्काम राजगृहात होता.या दोन दिवसांत देवांशी पुष्कळ विचारमंथन होऊन मोहिमेचे नियोजन ठरले होते.सारे देव अप्सरांसह संध्यासमयी अयोध्येत प्रस्थान करणार. दुसरे दिवशी आपल्या शिष्यांसह अगस्त्यांनी निघायचे ठरविले.

         ते फिरत फिरत अंतःपुरातील एका विशाल बंदिस्त चौकाच्या मधे एक आयातकृत तलाव होता.त्या तलावात राण्या व अप्सरा विहार करीत होत्या.त्या कडे दुर्लक्ष करुन आपल्या दालनाकडे जात असतां,एक अप्सरा पाण्याबाहेर येऊन त्यांच्या पुढ्यात उभी राहिलेली बघून आचार्य जागीच थबकले.मला ओळखल का? मी आता देव नाही.पण माझ्यासाठी आताही देवच आहात.त्यांना म्हणाली,आपण जेव्हा देवराज्यात होता तेव्हा मी १५-१६ वर्षाची,त्या वेळी मी आपल्यावर अनुरक्त झाले होते.आपल्या शी विविहबध्द होण्याचा संकल्प सोडला होता.आपण इथे येणार हे कळल्यावर शिताफीने देवपथकात प्रवेश मिळवून आले.आपण माझे पाणीग्रहन कराल? तिचं अवचित येणं,विवाहाचा प्रस्ताव मांडणं,अगस्त्यांसाठी अनपेक्षित धक्का होता.पण ते विवेकी,निग्रही,परिपक्व होते.तिचे सौंदर्य त्यांचेवर प्रभाव पाडू शकला नाही.शांतपणे म्हणाले,तू उर्वशी कुळातिल कंकणा ना? कंकणा,मी गेली दोन तपं जे कार्य करीत आहे त्यात सध्या तरी विवाहाचा विचार करुं शकत नाही. शिवाय तुझं उर्वशी कुल मला मातेसमान त्या नात्याने तू  मला कन्येसमान…ती पुढचं बोलणे ऐकायला न थांबता रागाने जलाशयात उडी घेतली.

             क्रमशः

संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

           दि.  ९-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – १२.

      दोन दिवसांचा मुक्काम संपवून आपल्या सामानासह अगस्त्य बाहेर पडत असतांना राणी मंदाकिनीने त्यांचे पाय धरुन म्हणाली,मला आपल्याशी बोलायचय! बोल राणी..निःसंकोच मनातल सांग.ऋषीवर!पाणावल्या नेत्राने म्हणाली,राजप्रसादातील जीवन समृध्द आहे. एका स्रीला आवश्यक ते सारं कांही मिळते पण,मिळत नाही राजाचं सानिध्द!या सोनेरी पिंजर्‍यात राहण्या पेक्षा फक्त माझेवर प्रेम करणारा,सतत सानिध्यात राहणारा कुणीही…एखादा सेवक…काय बोलतेस मंदाकिनी?अग! राजधर्म पाळतांना राजाची दिवसरात्र किती कसरत होते?अनेक विषय त्याच्या मस्तकात असतात.जेवढा मोठा व्याप तेवढी व्यस्तता जास्त.बरं राजाचं वर्तन ?

अतिशय शुध्द…त्यांच आम्हा तिघींवर सारखच प्रेम..पण त्यांचा सहवासच मिळत नाही म्हणून…अग!जे जीवन आपल्या वाट्याला आलं त्यातच सुख समाधान मानून सर्वार्थान कसं सुंदर समृध्द होईल असाच प्रयत्न करायला हवय!तिला आपली चूक उमगुन खाली वाकून त्यांना नमस्कार केला.केवढा त्यांचा महान निग्रह! अप्सरा व राणी सारख्या सुंदर स्रीयाही त्यांना मोहपाशात गुंतवू शकल्या नाही.

      राजाने दिलेल्या रथात शिष्यांसह स्थानापन्न होऊन रथ काशीजवळच्या त्यांच्या आश्रमाकडे निघाला.आश्रमात पोहोचले तेव्हा वसिष्ठाश्रमातून आलेली भीषण वार्ता त्यांच्या प्रतिक्षेत होती.

         अगस्त्यांनी तातडीने सभा बोलावली .त्यात निवडक स्नातक व आचार्य होते.काशीराज्यातून परतलेल्या आचार्यांच्या स्वभावात फरक पडल्याचे सर्वांना जाणवले.नेहमी स्थीरचित असणारे आचार्य कांहिसे अस्थीर भासत होते…ते आपल्या आसनावर स्थानापन्न झाल्यावर बोलण्यास सुरुवात केली… देवराज्यात घडलेला साद्यंत इतिहास आज मी सांगणार आहे.त्या इतिहासाचा संबंध असलेला पश्चिम सागर आज फार मोठ्या संकटात सांपडला आहे.वेळीच उपाय केला नाही तर परिस्थीती आणखी उग्र बनेल.केवळ तो सागर परिसरच नव्हे तर,संपूर्ण भारतभूमीसाठी मोठे आव्हान आहे.त्यावर मात करण्यासाठी आपण बरेच वर्षापासून एकविचारी महासंघ निर्माण करण्याचा प्रयत्न करुन,सहस्रा वधी घीवर,कोळी समाज या कार्याशी जोडला आहे.दिवसेंदिवस तो परिसर असुरक्षित होतोय,एवढेच नाही तर त्यांच्या कार्यवाह्या उत्तरेतील वसिष्ठाश्रमा पर्यत जाऊन भिडल्या.त्यांंनी धौम्यऋषीं चा आश्रम उध्वस्त केला.च्यवन ऋषींच्या आश्रमातील कंदमुळ्यांवर जगणार्‍या शंभर मुनींना ठार केले.केवळ वायुभक्षण व जलसेवन करुन राहणार्‍या भरद्वाज ऋषींच्या आश्रमातील वीस ब्राम्हणांना जीवे मारले,एवढच नाही तर दोन दिवसां पूर्वी वसिष्ठाश्रमातील ऐंशी ब्राम्हण व नऊ तपस्यांना ठार करुन खाऊन टाकले.

        रात्री अपरात्री कालकेय दानव ब्राम्हण,तपस्वी,मुनींना लक्ष्य करुन भक्ष्य बनवतात.कारण हे सर्वजण निरपेक्ष भावनेने तप करतात.रानावनात यज्ञ संस्था नेऊन,आर्य,ऋषी आणि देवांची प्रगत संस्कृती मानवांपर्यत पोहचवतात. याच मानवसंस्कृतीचे कालकेय दानव कट्टर विरोधक व उच्छेदक आहे.त्यांच्या दहशतीने संपूर्ण सागरपरिसरातील यज्ञ थंडावले.तप साधनेवर मळभ आलय! या कालकेय दानवांचा विनाशाचा काळ जवळ आला.देव आणि आर्यवर्तातील कांही राजे एक विशाल योजना आखत आहे.आपलाही त्यात सहभाग असणार आहे.विशेषतः माझा!तत्पूर्वी कालकेय दानव कोण? देवांशी त्यांचा काय संबंध? याबद्दल सांगण्यासाठीच आजच्या या विशेष सभेचे आयोजन केलं आहे.

        हा इतिहास जाणण्यास सारेच उत्सुक होते.ती सारी पूर्वपाठीका आचार्य सांगू लागले….उत्तर दिशेला सुमारे आठ सहस्र हात उंच वृत्रपर्वत असून,पर्वतावर चं पठार व पलिकडे असणार्‍या विस्तिर्ण प्रदेशात वृत्र नावाच्या असुराचे राज्य होते.वृत्रपर्वताच्या पायथ्याशी ‘वन’ व ‘सेवन’ हि दोन महाजलाशय आहेत. पर्वताच्या डाव्या बाजूला काळा समुद्र तर उजव्या बाजूस कश्यप सागर आहे. कश्यप ऋषींच्या कार्यामुळे त्या सागराला त्यांचे नांव पडले.वृत्रपर्वताच्या दक्षिण पश्चिम दिशेला देवांचा “सूर्यदेश” आहे. सुर्यदेशाच्या पूर्वेला देवांचाच “उरु” देश आहे.सूर्यदेशाचा अधिपती इंद्रदेव,तर उरुदेशाचा अधिपती विष्णूदेव!उरुच्या दक्षिण पश्चिमला केमेत नावाचा देश आहे सूर्यदेशाच्या खाली लाल समुद्र आहे. केमेतच्या पश्चिमेकडे ऋभू तर ऋभूच्या पश्चिमेस माली नावाचा देश आहे.हा भूगोल समजल्याशिवाय इतिहास कळणार नाही म्हणून सविस्तर सांगीतले

              क्रमशः

संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

             दि.  ९-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – १३.

        अगस्त्यऋषींच्या मुखातून इतिहास ऐकून सारे आश्चर्यचकित झाले.वृत्रपर्वता वरुन उगम पावलेल्या दोन नद्या देवांच्या “सुर्य” राज्याच्या दोन्ही बाजूंनी वाहत सागराला मिळाल्या होत्या.या दोन नद्यां मुळे देवांना अतिशय सुपिक जमीन लाभल्याने मुबलक अन्नधान्य,व्यापार, भौतिक समृध्दी लाभल्यामुळे देवराज्य सुखाने नांदत होते.कालांतराने सुर्यराज्या च्या दक्षिण-पूर्वेला भोगवादी,देवांचे कट्टर असलेल्या लोकांचा असुर्यदेश निर्माण झाला.पुढे असुरवंश नावारुपाला आले. वृत्रासुर व केमेत देश देवांचे मित्र राज्य  ऋभू व देवराज्य केमेत राज्याशी वैर असल्यामुळे  देवांना त्रस्त करीत.केमेत मधल्या वाळवंटात सहस्रो वर्षापूर्वी देवांनी विशाल श्रीकोणशाल व दोन भव्य सिंहांची बैठी शिल्पे बांधली होती.हे बांधकाम म्हणजे विश्वातील महान आश्चर्य!पहिला जलप्रलय झाला तेव्हा ते बांधकाम बराच काळ बुडलेले होते. कालांतराने जल आटून सारा परिसर वालुकामय झाला.

         देवांचे सुखी,तृप्त जीवन,भव्य कलात्मक वास्तु,प्रशस्त रस्ते,सुंदर उद्याने विस्तिर्ण मैदानं शिवाय उंची रगीबेरंगी वस्रे,अनेकविध सुवर्णालंकार,अनेक सुदर रुपवती स्रीया यांना अप्सरा म्हणत. या अप्सरांची उर्वशी,मेनका,रंभा अशी घराणी,या अप्सरा २० वर्षापर्यंत अविवाहित राहणे अप्सरा कुळाचा नियम आहे.शरीरसंबंध आला तरी त्या मुल होऊ देत नसत.चुकुन झालेच तर त्याचा त्याग करीत.अश्या प्रगत देवांंचा वृत्रासुर नेहमीच द्वेष करीत.वृत्रासुर म्हणजे पराकोटीचा असुरीवृत्तीचं मूर्तीमंत रुप. देवांच्या प्रगतीत खीळ कशी घालायची हाच विचार तो रात्रंदिवस करीत असे. आणि सांपडला उपाय!त्याच्या पर्वता वरुन देवराज्यात जाणार्‍या पाण्याला अडवून दुसरीकडे वळवणे.त्याने दुष्ट योजनेनुसार देवराज्यात उतरणार्‍या त्या दोन नद्यांवर बांध घातल्यामुळे पर्वताच्या पायथ्याशी असलेले ‘वन’ व ‘सेवन’ दोन्ही जलाशय आटू लागले.देवांना पाणी मिळेनासे झाल्यावर,त्यांनी आपले शिष्ट मंडळाकरवी वृत्रासुराकडे समोपचार व सुसंवाद साधून पाण्याच्या प्रश्नाचा नेलेला प्रस्ताव अनेक वेळा झिडकारला.’जल’ही जीवनाश्यक गरज असल्यामुळे वृत्रासुर व देवांमधे संघर्ष सुरु झाला.देवांनी गुप्त सैन्य पाठवून वृत्रासराने बांधलेला बांधारा नष्ट केला की वृत्रासुर पुन्हा बांधत. पाण्याच्या प्रश्नाने उग्ररुप धारण झालं. सर्वत्र हाहाकार माजला.

        देवांपुढे दोनच पर्याय होते.एक म्हणजे दुसरीकडे वस्ती करणे किंवा वृत्रा सुराशी युध्द करणें.अनेक देवगण दुसरी कडे जाऊ लागले.आर्यवर्ताच्या उत्तर भागात हिमवान प्रदेशात दूर असलेल्या पश्चिम सागरकाठी असलेल्या उंचच उंच पर्वतरांगामधे बरेच देवगण जाऊन राहिले.कारण कांही शतकापूर्वी या ठीकाणी देवांची वस्ती होतीच!

          आर्य,देव आणि ऋषी ही एक विचारी वैदिक संस्कृती!पूर्वी या संस्कृती ची व्याप्ती भारतवर्षापासुन पृथ्वीच्या मध्यभागापर्यंत म्हणजेच वृत्रपर्वतापर्यत होती.” कृष्णवन्तो विश्वम् आर्यम् हा आर्यांचा उद् घोष आहे.”सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः।सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख माद् भवेतः ही आर्यांची वैश्चिक भावना आजही कायम आहे.ही वेदनिष्ठ आर्यांची सांस्कृतीक ओळख!देवांनाही ‘ऋग्वेद’ शिरोधार्य!ही सर्वांना सामावून घेणारी एकविचारी संस्कृती असल्यामुळे देवांना तिथे विस्थापित होणे कठीण गेले नाही.

          देवांना दुसरीकडे जाणे टाळायचे असेल तर,दुसरा मार्ग होता,तो म्हणजे अति संहारक अस्रांनी वृत्रपर्वतावरचे बंधारे पूर्ण उध्वस्त करुन वृत्रासुराला ठार मारणे,पर्यायाने त्याच्या राज्याचा विध्वंश

 करणे, दुसर्‍या मार्गाचा अवलंब केला तर युध्द अटळ होते.दीड दोनशे वर्षापूर्वी देवांनी हा उपाय केला होता पण त्याचे परिणाम दीर्घकाळ देवांना भोगावे लागले होते.पूर्वी घडवून आणलेल्या जलप्रलया चे वर्णन करुन म्हणाले,या प्रलयामुळे अनेक निष्पाप जीवांची हानी झाली होती वाईटाबरोबर चांगलेही वाहून गेले होते. वृत्रासुरानं बाधलेले सारे बंधारे कायमचे नष्ट केल्याने,मध्यभागी होणार्‍या जल प्रलयाने केमेत देशाचा खालचा प्रदेश नष्ट होऊन,देवांना सतावून सोडणारे असूर, दैत्य,दानव या सर्वानाच जलसमाधी मिळणार होती.ऋभू देशाला धोका नव्हता.पण विष्णूंच्या उरु देशाला होता. संभाव्य धोका ओळखून विष्णूंनी इंद्रदेवां शी विचारविनिमय करुन राज्याभोवती शंभर हात उंचीची तटबंदी बांधली.

             क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

         दि. १०-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – १४.

       अगस्त्यऋषी पुढे म्हणाले, एवढा पुर्वेतिहास सांगायचचे कारण म्हणजे,पुढे घडणार्‍या घटनांचा संदर्भ आणि तिव्रता तुमच्या लक्षात यावे.कालकेयाचं आव्हान आणि अगस्त सांगत असलेला विसृत इतिहास याची सांगड अजूनही कोणाच्या लक्षात येत नव्हतं.सर्वजण मुकपणे संदर्भ जुळवण्याचा प्रयत्न करीत होते.

 शेवटी धाडस करुन शंखाने विचारलेच, आचार्य!जलप्रलयामुळे कालकेय दानव किनार्‍याला लागले कां?

‌       याचं उत्तर होकारार्थी व नकारार्थी दोन्हीही आहेत. मी आज घडलेले प्रसंग  जसेच्या तसे सांगणार आहे.आणि अगस्तांच्या नजरेसमोर सारे घडलेले प्रसंग दिसू लागले.आणि कथनातून श्रोतृवर्गाला अनुभूती देऊ लागले.

        हिमवान प्रदेशात उभारलेल्या वसाहतीतील आपल्या मंत्रणाकक्षात आपले दोन सहकारी ‘वरुण’ आणि ‘अग्नी’ कडे रागाचा कटाक्ष टाकत इंद्रदेव कडाडले,तुम्ही केलेल्या घोडचुकीमुळे वृत्रासुराचा संपूर्ण निःपात करण्याची योजना बारगळली.अग्निदेव म्हणाले, देवराज!वृत्रासुराचे सहस्रो दानव मारले, उर्वरित कश्यप समुद्रात उतरले,मधेच वरुणदेव म्हणाले, आम्ही त्यांचा पाठलाग केला,पण कश्यप सागरात आधीच त्यांच्या विशाल नौका सज्ज होत्या.वरुण देव सागरात शिरुन युध्द करायची कला तुम्हाला अवगत नव्हती?तुम्ही जलाचे अधिपती ना?म्हणूनच सागरात  शिरुन दानवांचा उच्छेद करण्याचं दायित्व तुमच्यावर सोपवलं होत.लगेच अग्निदेव म्हणाले,मी आरमारासहित कालकेयांचा पाठलाग करत सतत अग्निवर्षाव करीत होतो,तरी ते निसटून दक्षिणेकडचं पारसिक राज्य ओलांडलं.दक्षिण सागर किनार्‍यावर परंगणारं पारसिकांचं आरमार दानवांना सहज उपलब्ध झालं. ते बळकावून पूर्वेकडे मेलुहा देशाकडे म्हणजेच भारतवर्षाकडे गेले.पण तुम्ही त्यांना उरुदेशातून पुढे जाऊच कसे दिले

देवराज!ते दक्षिणेकडे जातील अस वाटलं नव्हतं,शिवाय दक्षिण सागरांत आपलं आरमार पण नव्हतं.इंद्र पुन्हा कडाडले…शस्र,अस्र,प्रास शक्ती यांचे अधिपती म्हणून “अग्निदेव” पद भूषवता ना?संपूर्ण आरमार,नौदल तुमच्या अधिपत्याखाली म्हणून तुम्ही वरुणदेव!वायुदलाचे अधिपती मरुतदेव!आणि ब्रम्हशिरस अस्र,वज्र इत्यादी अस्रांचा मी स्वामी म्हणून इंद्रज!वृत्रासुराने बांधलेले सर्व बांधारे फोडण्याचे काम मी ब्रम्ह शिरस अस्राने केले.तसेच विविध अस्रे वापरुन त्याच्या पुष्कळ सैन्याचा संहार केला.निसटलेल्या दानवांचा पाठलाग करुन,निःपात करण्याचं कार्य तुम्हा तीन अधिपतींवर होती.या कार्यात सुसूत्रता कां नाही आली?एवढं योजनाबध्द नियोजन करुनही दानव निसटलेच कसे? मला उत्तर द्या.अद्याप मरुतांशी ते बोलले नव्हते.कांही दिवसांपासून अनेक कारणां नी त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. तो राग या दोन देवांवर निघत होता.

         इंद्र पुढे म्हणाले,दानव सागराकडे पळून गेल्यावर,आकाशमार्गे जाऊन त्यांचा संहार कां नाही केला?मरुतदेवांनी वास्तविक सर्वाधिक राग मरुतदेवार होता.रोष मात्र या दोन देवांवर निघत होता.केवढी विशाल योजना आखली होती.विष्णूदेवांनी बिनाशर्त केवढं सहाय्य केल? पाण्याची समस्या सुर्यदेशा प्रमाणेच उरुराज्यालाही भेडसावू लागली होती.त्यातून मार्ग काढण्यासाठी,वृत्रासूरा चा प्रश्न कायमचा मिटवणं,कोणत्याही सामान्य शस्र किंवा बांधार्‍यांना खिंडारे पाडून कायमचा प्रश्न मिटणार नव्हता,हे ओळखून दधिची ऋषींचे सहाय्य घेण्याचे ठरविल्यानुसार दधिचीं विविध सामरिक अस्रांचे संशोधक व निर्माते होतेच.इंद्राने त्यांना मदत मागीतल्यावर,प्रसंगाची तिव्रता ओळखून रात्रंदिवस अथक परिश्रम करुन अतिसंहारक अशा दोन अस्रांची निर्मिती केली.एक वज्र व दुसरं ब्रम्हशिरस अस्र.या दोन संहारकअस्रांची निर्मिती करतांना अति परिश्रमाने त्यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होऊन त्यांचा अंत झाला.

       एवढी सर्वी सिध्दता करुन उरुदेशा तून देवांची विमाने वृत्रपर्वतिकडे निघाली दधिचींकडून मिळालेल्या अस्रांनी इंद्राने  वृत्रपर्वतावरचे सर्व बांधारे,नगरे उध्वस्त केलीत.ब्रम्हशिरस अस्राने वृत्रासुराला मारले.दधिचींचं बलिदान,विष्णूंचे सहाय्य लक्षात घेऊन तरी उरलेल्या शत्रूंच संपूर्ण अस्तित्व नष्ट करायला हव होत.आम्ही प्रयत्न…प्रयत्न नाही,शत्रूचं समूळ उच्चाटन शत्रूला बदलवून नाही तर मारुन करायचं असतं.शत्रूचा उरलेला अंश  देखील भविष्यात किती त्रासदायक ठरतो हे तुम्हाला माहित नाही कां?

             क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

           दि. १०-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – १५.

       वरुणदेव आणि अग्निदेवांकडे संतापाने बघून इंद्रदेव कडाडले,आतां तुम्हा दोघांना देवलोकांत स्थान नाही.”अग्नि” व “वरुन” ही सामरिक पदं गमावून पदभ्रष्ट झालात. माझा शाप व आज्ञा आहे,तुम्ही मर्त्य लोकात जाऊन ऋषीय कार्य करणे हीच तुमची शिक्षा..

इंद्राला झुकुन अभिवादन करुन दोन्ही देव हताशपणे इंद्र कक्षातून बाहेर पडले. इंद्रदेवाने अन्यायपूर्वक केलेल्या शिक्षेने ते व्याकुळ व खिन्न झाले होते.मर्त्यलोकांत जाऊन ऋषीय कार्य करणे ही भयंकर शिक्षा होती.तीथे जीवनाला कांहीच किंमत नव्हती.दक्षिण महासागरापर्यंत पसरलेल्या विशाल पर्वतांनी वेढलेली घनदाट अरण्य,तिथे गेलेल्या असंख्य ऋषींना नरभक्षकांनी ठार मारल्याने जिकडे तिकडे ऋषींच्या हाडांचे ढीगारे साचले होते.वैदिक ऋषींसाठी हा विशाल प्रदेश म्हणजेच मर्त्यलोक,अर्थात मृत्युला कवटाळण्याचे ठीकाण!अशा ठीकाणी कार्य करणे म्हणजे घोर शिक्षाच!

         अगस्त्य पुढे म्हणाले,देवपद जाणं हे देवराज्यात मृत्यु ठरतो.ज्याला ही शिक्षा मिळते,त्याला ती पाळावीच लागते हा देवराज्यातील कडक नियम आहे. वरुणदेव व अग्निदेव यांचे देवपण संपुष्टात येऊन ते मनुष्य झाले.ऐन पंचवीशीत भारतवर्षात शिक्षा भोगण्यास आलेले हे दोन देव म्हणजे सध्याचे वसिष्ठाश्रमाचे कुलपती वसिष्ठऋषी वरुणदेव आणि अग्निदेव म्हणजे मी स्वतः अगस्त.

           हे ऐकून सार्‍या आश्रमीयांना आश्चर्याचा धक्काच बसला.त्यांनतर  अगस्त्त्यांनी पश्चिम किनार्‍यावर कोणी, केव्हा जायचं?निर्णायक युध्दात देवांना कशाप्रकारे सहाय्य करायच याच नियोजन त्यांना समजावून सांगीतलं. वास्तविक देवराज्यात आम्ही सुखी होतो. पण तोच तो पणाचा उबग आला होता. जेव्हा इंद्राने आम्हाला शाप देऊन अपमानित करुन देवराज्यातून हकाल पट्टी केली त्यावेळी आमच्यावर अन्याय केलासे वाटून अतिशय दुःख झाले,पण आज समजले,तो आमचा गैरसमज होता काळ उलटला,पूर्वीच्या चुकांचं आकलन होऊन,पुन्हा त्यांची पुनरावृत्ती होऊ नये हे समजलं.आज आम्ही दोघे स्वतः विकसित होऊन मन शांत व प्रगल्भ झालं.मिळालेल्या शिक्षेनंतर या भारत वर्षात आल्यावर मित्रावरुणाने पितृत्व आणि उर्वशीने मातृत्व स्विकारलं.आम्ही देव न राहिल्याने पूर्वीचे सारे पाश तुटले. एखाद्या आश्रमात राहून वेदाभ्यास व ऋषीय कार्य करण्यासाठी,स्वतःची  ओळख देण्यासाठी मातापित्यांच्या नांवा ची गरज होती.उर्वशी माता व मित्रावरुण पिता म्हणून त्यांच कवच आम्हाला लाभले.आश्रमीय जीवनांत आम्ही साकल्याने विचार करतां,या निर्णयाप्रत आलो की,त्यावेळचा अपमान निमुट ऐकल्याने आज स्वकर्तृत्व सिध्द करण्यास वाव मिळाला.

       देवराज्यात असतो तर आज जे ज्ञान प्राप्त झाले ते मिळाले नसते.ज्ञान मार्गावर वाटचाल झाली नसती.तप साधना घडली नसती.संस्कृतीपासून वंचित राहिलो असतो.अरण्यजीवनाचा अनुभव,मनुष्याच्या सर्वांगिण विकासा साठी,उन्नतीसाठी ऋषीविचारांची नितांत गरज आहे हे कळल नसतं.इंद्रदेवांनी शाप देऊन इथे पाठवलं हे आमच्यावर उपकारच झाले हे आज उमगलं.

     कालकेय दानवांनी घातलेल्या धुडगुसाने अनेक ब्राम्हण,मुनी,तपस्वींना प्राणाला मुकावं लागलं होतं.सावधगिरी म्हणून ५-५ स्नातकांना आश्रमपरिसरात गस्तीचे दायित्व सोपवलं होतं.अगस्त्यांचा  मती कुंठीत करणारा इतिहास ऐकल्या पासून सार्‍या शिष्यांना त्यांच्या प्राणांची चिंता वाटत असल्याने त्यांच्या कुटीवर विशेष लक्ष ठेवत होते.मध्यरात्र उलटून गेली होती.गस्त घालतांना अक्षय व शंख यांना अगस्तऋषींच्या दाराखालून प्रकाश येत असल्याचे दिसल्याने,आचार्य ठीक तर आहे ना, हे पाहण्यासाठी ते हलक्या पावलांनी कुटीजवळ जाऊन फटीतून आंत बघू लागले,तर आतले दृष्य बघून ते पराकोटीचे आश्चर्यचकित झाले.ध्यानस्थ अगस्त्य जमीनीपासून चार अंगुळं वर उचलले गेले होते.त्यांच्या सभोवती, विशेषतः मस्तकामागे अतिशय पवित्र, सुंदर असा फिकट निळसर शुभ्र प्रकाश पसरला असून मुद्रेवर दिव्य प्रभा पसरली होती.दिव्य पारलौकिक तरंगांनी कुटी भारित झाली होती.शिष्यांना तिथे थांबणे अशक्य झाले.त्या दिव्याबद्दल कुणाला सांगायचे नाही या निर्धाराने दोघेही माघारी वळले.

             क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

                

महर्षीं अगस्त्यऋषी सर्व भाग पहा

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading