महर्षी अगस्त्यऋषी संपूर्ण चरित्र भाग ७, (३१ ते ३५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

Maharishi Agastya Rishi! !

महर्षी अगस्त्य ऋषी ! !

!!! अगस्त्यऋषी !!!

भाग – ३१.

         दोन दिवसांनी परशुराम अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले.त्यांचे यथोचित स्वागत झाल्यावर दोघे एकांतात बोलत बसले.परशुराम आपल्या येण्याचा हेतू स्पष्ट करत म्हणाले,ऋषीवर मला काया कल्प करुन घ्यायचाय!आपण स्वयंसिध्द आहात.संपूर्ण विंध्याला वाकवले,सागरा ला नमवले.भविष्यवेत्ते असून कायाकल्पासह अनेक अतर्क्य विद्या आपल्याला अवगत आहेत.म्हणून मी आपल्याकडे आलोय!पण,भगवान्, आपण स्वयं शक्तीमान आहात.अनेक क्षत्रिय राजांना नमवलं.कार्तविर्य सहस्रार्जुनाने आपले पिताश्री जमदग्नींना ठार केल्यामुळे,अजिंक्य कार्तविर्याला मारुन प्रतिशोध घेतला.क्षत्रियांचा संहार

 करुन पुढील पिढ्यांचाही विनाश केला.

होय! हे सर्व खरय.त्यामुळेच अनेक क्षत्रियांशी लढल्यामुळे माझा शक्तीशय झाला.

       मी क्षत्रियसंहार केला,पण रामाला नाही हरवू शकलो.त्यांनी मिथिलेत शिव धनुष्य तोडल्यावर,त्यांची परिक्षा पाहण्या साठी माझं विराट व दिव्य ” वैष्णव” धनुष्य त्यांच्या पुढे केले, त्यावर त्यांनी लिलया प्रत्यंचा चढविली.आणि मी रामाचं श्रेष्ठत्व तेव्हाच मान्य केले.

        त्याच दरम्यान माझे गुरु कश्यपांनी आर्यवर्ताचं दान मागीतले,अर्थात मी आर्यवर्त सोडून दक्षिणेकडे जावे या त्यांच्या इच्छेने मी इथे आलोय.परशुरामां नी आपल्या येण्याचा हेतू स्पष्ट केला.

       अगस्त्यऋषी म्हणाले,सहस्रार्जुनाने आपले पिताश्री जमदग्नींना ठार केल्या मुळे संस्कृती प्रस्थापन कार्याची फार मोठी हानी झाली.त्यातच कांही महीन्या पूर्वी भृगुऋषींही इहलोक सोडून गेलेत.

हो ना, म्हणूनच गुरुआज्ञेने,पितांश्रींचे अपूरं राहीलेलं ऋषीय कार्य  पुढे चालू ठेवण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन घेण्याच्या हेतूने इथे आलोय!आणि तपःसाधनेकरितां शरिर उत्तम व निरोगी असणं आवश्यक आहे. ठीक! परंतु आपल्याला इथे तीन मास तरी वास्तव्य करावं लागेल.हे ऐकून परशुरामांना अतिशय आनंद झाला.

      ज्या वीस स्नातकांचे शिक्षण पूर्ण झाले, त्यांचा दिक्षांत समारंभ भगवान परशुरामांच्या उपस्थित पार पाडला. परशुरामांनी त्या प्रत्येक स्नातकाचे स्वतः गठबंधन केले.जवळजवळ ८-१० वर्षे एकत्रीत राहुन आतां ते परत जाणार, या ताटातुटीचे सर्वांनाच दुःख होत होते.ते स्नातक निघून गेल्यावर आश्रम सुनासुना होणार,पण कर्तव्य तर करणेच होते. अश्रूभरल्या नयनाने व जड अंतःकरणाने अगस्त्यऋषींनी सर्वांना निरोप दिला.

          तीन महिने निष्ठेने केलेल्या कायाकल्प विधिमुळे परशुरामांचे व्यक्ती मत्व खुलुन,आमुलाग्र परिवर्तन त्यांच्यात घडून आले.अगस्तींच्या मार्गदर्शनाखाली यौगिक क्रीया,तेलमर्दन,विविध औषधी आणि मनावर झालेले सकारात्मक संस्कार या सर्वांमुळे,जसे नागाने कात टाकल्यागत परशुराम दिसूं लागले.

     ऋषीवर,आपण काय चमत्कार केला मला  तर नवचैत्यनच  लाभले.गुरुदेव, आतां मला पुढील कार्यासाठी मार्गदर्शन करुन आज्ञा द्यावी.अगस्त्य म्हणाले, दंडकारण्यात माझे कार्य आकार घेत आहे.माझे अनेक स्नातक ठीकठीकाणी आश्रम स्थापित आहे.नर्मदा ते गोदावरी परिसरात अनेक ऋषी कार्यरत आहे. श्रीराम दंडकारण्यात आल्यावर,मी कांही शिष्यांसह दक्षिण-पूर्वेकडे जाईल.मग राहिलेला प्रांत म्हणजे,पश्चिम किनारपट्टी तिथे जाऊन आपण कार्य करावं…प्रथम मनुष्य परिवर्तन,नंतर भूमी! तिथल्या डोंगराळ प्रदेशात सागरापर्यंत भूमी तयार  करुन शेती रुजवावी.अशा तर्‍हेने त्यांना कार्याची दिशा व योग्य मार्गदर्शन मिळवून परशुराम कार्यतत्पर झाले. अगस्त्यांना वंदन करुन,सद्गदित स्वरात परशुराम म्हणाले, ऋषीवर आपण माझं जीवनच बदलवून टाकले.सदैव मी आपला ऋणी राहिल.निरोप घेऊन परशुराम कुटीबाहेर पडले.आणि त्याच वेळी पुष्कळ दिवसांपासून भेट झाली नाही म्हणून अगस्त्यांच्या भेटीला दोन दिवसांपूर्वी आलेल्या सुभद्रादेवींनी त्यांच्या कुटीत प्रवेश केला.

       मातेच्या अधिकाराने सुभद्रादेवींनी अगस्त्यांची कानउघाडणी करत म्हणाल्या,अरे तुझी साठी केव्हाच उलटली,नव्वदीत विवाह करणार आहेस का?इथे एक मास मुक्कामाला आहे,तो पर्यंत निर्णय घे…आणि त्या कुटीबाहेर निघून गेल्या.विवाह?त्यांचे विचारमंथन सुरु झाले.इतके वय झाल्यावर,अश्या वयस्क भणंग ऋषीला कोण आपली कन्या देईल?कोणताही निर्णय घेण्यापूर्वी इश्वरीय संकेत जाणण्याचा त्यांचा प्रघात होता.त्यानुसार,ते पूर्वाभिमुख होऊन ध्यानस्थ बसले.ध्यानात त्यांना तरंग स्वरुपात,त्यांचे पितर साकार होऊन म्हणाले,अरे! प्रगल्भ व सात्विक वृत्तीची पिढी  निर्माण होण्यासाठी शुध्द ऋषीबीज रुजायलाच हवय!आम्ही तुझ्या संतानाच्या प्रतिक्षेत आहोत.तुला संतानप्राप्ती झाल्याशिवाय आम्हाला सद्गती मिळणार नाही.हे पण संस्कृतीचच एक कार्य आहे.ऋषीय धर्माचं पालन करुन आम्हाला मुक्ती द्यायला हवी. अगस्त्यांनी अंतर्मनाने पितरांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आश्वास्त केले.

             क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

            दि.  २४-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग -३२.

       आणि त्याच ध्यानावस्थेतच अगस्त्य  आतां अंतर्मनाने वधूचा शोध घेऊ लागले  विदर्भ राज्यातील एका राजप्रसादातील अंतःपुरात एक उपवर कन्या त्यांच्या मनःचक्षूसमोर साकारली.आणि ते ध्याना वस्थेतून बाहेर आले.पितरांचे आणि त्यांच्या अंतर्मनाचे संदेश मिळाल्याने, दुसर्‍याच दिवशी विदर्भ राज्याकडे प्रस्थान करायचे ठरविले. सोबत शिष्यांना घेऊन अगस्त्यऋषी मजल दर मजल करत विदर्भातील राजाकडे पोहोचले.विदर्भ राजाने त्यांचं यथोचित स्वागत केल.भोजनोत्तर राजपरिवाराने अगस्त्यऋषींचे आशिर्वाद घेतले.नंतर सुस्वरुप राजकन्या कौशितकीने ऋषींना वाकून नमस्कार केला.तिच्यातील सौंदर्य आणि शालिनता बघून त्यांच्या अंतरंगात कांहीशी खळबळ माजली.ज्या हेतूने ते इतक्या दूरवर आले,ते कारण राजाला सांगण्याचा निश्चय केला.

        कोणतीही प्रस्तावना न करतां अगस्त्य थेट राजाला म्हणाले,राजन्, ज्या कारणासाठी मी जनस्थानावरुन इथवर आलो ते कारण म्हणजे,मला तुझी ही सुस्वरुप कन्या पत्नीरुपात हवीय! क्षण भर सारे स्तब्ध झालेत.काय ऐकले याचा अर्थबोधच झाला नाही कुणाला.पण राजकन्या कौशितकी मात्र धीरोदत्तपणे ऋषीकडे बघत होती…राजाच्या मनात दुविधा निर्माण झाली.एवढी लाडाकोडात सुखसुविधेत वाढलेली आपली कन्या या भणंग ऋषीला कशी द्यायची?राजाच्या मनी दुविधा निर्माण झाली या महान तपस्वी ऋषीला नकार कसा द्यायचा? राजन्! अनेक सुंदर जीवांच्या मुद्रा आणि अस्तित्व लोप पावुन त्यांच उर्वरित सौंदर्य  तुझ्या या कन्येच्या रुपात साकारलेल आहे म्हणून तुझी ही कन्या लोपमुद्रा मला पत्नी म्हणून पसंत आहे.राजाच्या डोळ्यात पाणी तरळले.पित्याची संदिग्ध अवस्था बघून,लोपमुद्रा निःसंकोचपणे  म्हणाली,पिताश्री मला हे ऋषीवर पती म्हणून पसंत आहेत.आपण मुळीच खंत करु नका.माझं परमभाग्य व नियतीची इच्छा म्हणूनच मला हे महान ऋषी पतीच्या रुपात लाभत आहेत.

        यथावकाश विवाह सोहळा संपन्न झाला.कांही दिवसांनी ऋषी व ऋषीपत्नी लोपमुद्रा जनस्थानातील आश्रमाकडे निघाले.

         कालचक्र कधीच थांबत नसते. घडामोडी घडतच असतात.अयोध्येतील  अंतःपुरात अशाच घडामोडी घडत होत्या. त्या घडविण्यात इंद्रांची भूमिका प्रमुख होती.कुमार वयातील राम-लक्ष्मणाला विश्वामित्रांबरोबर पाठवण्यास राजा दशरथ मुळीच अनुकुल नव्हते.पण ऋषी मंडळी व राजगुरु वसिष्ठमुनींनी त्यांच्या वर दडपण आणल्यामुळे तेव्हा ते कसेतरी तयार झाले होते.आतां देवांना आणि ऋषींना रामतावराचे प्रयोजन साध्य करायचे होते.दिवसेंदिवस रावण प्रबळ होत चालला होता.नुकत्याच झालेल्या घनघोर युध्दात देवांना रावणा कडून पराभव पत्करावा लागला होता. रावणपुत्र मेघनादने तर प्रत्यक्ष इंद्रालाच नमवलं होत.त्यामुळे त्याला प्राप्त झालेले  “इंद्रजित” हे नामामिधान तो सन्मानाने मिरवू लागला होता.रावणसंस्कृतीनं उभा भारतवर्ष व्यापला असतां तर,आर्य संस्कृती,वैदिक संस्कृती हद्दपार होऊन, देवानांच वास्तव्यासाठी ठीकाण उरलं नसतं.भारतवर्षातील एकाही राजाचा टिकाव,रामाखेरीज  रावणापुढे लागला नसतां,रावणाचं परिपात्य करणं अत्यंत आवश्यक होत.देवांची व ऋषींची ही इच्छा दशरथ राजाला कळल्यावर,कांही झाले तरी,रामाला राक्षस समुहात पाठवायचे नाही या मिश्चयाने तातडीने रामाचा युवराज्यभिषेक करण्याचे ठरविले.अखेर डाव प्रतिडावामधे देव आणि ऋषी वरचढ ठरले.अयोध्येत राम राज्यभिषकाची तयारी जोरात सुरु असतांनाच,इंद्रदेवांच्या प्रेरणेने दासी मंथरेकरवी कैकयीचे कान फुंकुन मनात विष ओतल्या गेले.वास्तविक कैकयी राजकारणपटू,अतिशय हुशार,स्वपुत्र भरतापेक्षाही राम प्रिय असतांना, भारतवर्षाच्या कल्याणासाठी,आतांच नव्हे तर नेहमीसाठी तिला दुष्ट ठरवून अवहेलना करतील,दूषणं दिल्या जातील हे जाणूनही,असिम त्याग करायला सिध्द झाली.आणि पूर्वी देवांच्या बाजूने दैत्यांशी लढतांना जखमी दशरथ राजाचे कैकीयीने प्राण वाचवले म्हणून राजाने तिला दोन “वर” दिले होते,त्याच “वरांच्या  पूर्ततेची तिने राजाकडे मागणी केली.

“अभिषेकसमारंभो राघवस्योपकल्पितः

अनेक वमिषेकेण भरतो मडामीषिच्यता

यो द्वितीयो वरो देव दतः प्रितेन मे त्वया

नव पंचच वर्षाणि दंडकारण्यमाश्रितः।।

       रामाने वल्कलं परिधान करुन चौदा वर्षासाठी दंडकारण्यात जावं,भरताने राज्य करावं, यावरुन देव व ऋषींच्या सु- षडयंत्राची कल्पना येते.त्यांची योजना सफल झाली.रामाबरोबर सावलीसारखा असणारा लक्ष्मण आणि अर्धांगी सीता वनात निघाले.सीतेने वनात जाणं देवांना अपेक्षितच होत.तिघेही घनघोर अरण्यातून प्रवास करत प्रथम भरद्वाज ऋषींच्या आश्रमात जाऊन,पुढे चित्रकुट  नंतर अत्रीऋषींच्या आश्रमात वास्तव्य करीत दंडकारण्यात जाणार,त्यापूर्वी रामासाठी दक्षिण सागरापर्यंत सांस्कृतिक कार्याचा विस्तार करणे अगस्त्यऋषींना आवश्यक वाटले.

            क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

         दि. २७-११-२०२१.

!!! अगस्त्यऋषी !!!

भाग – ३३.

       अगस्त्यऋषी आपल्या कुटीत प्रवेशले तेव्हा रात्र सरत आली होती.पती ची वाट बघून लोपमुद्रा अस्ताव्यस्थ अवस्थेत झोपली होती.पण त्यांचा पदरव ऐकून तीला जाग आली.म्हणाली,किती ही प्रतिक्षा?अग! कांही कार्यच अशी असतात की….कार्याशिवाय दुसरंही कुणी आपल्या प्रतिक्षेत आहे…खरय! तुझ्यावर खरच खुप अन्याय करतो मी… राजवाड्यात सर्व सुखसोयीत वाढलेली, इथे सारा अभावच…मला याबद्दल कांही नाही वाटत,पण आपल्या सानिध्याची आस असते,त्यालाच पारखी झालेय! ती जी अपेक्षा पतीकडून करत होती,ती त्यांना समजली नाही की,समजून दुर्लक्ष करत होते,कळायला मार्ग नव्हता.तिचा अपेक्षाभंग झाल्याने कितीतरी वेळ ती रडत होती.व ते मात्र शांत झोपी गेलेत.

         दुसरा दिवस अबोल्यातच गेला.ती

दिवसभर आश्रमीय कार्य,पतीसेवा सर्व एक शब्दही न बोलता करत राहिली. विरहिणीचं हे रुप अगस्त्यांना प्रथमच अनुभवायला मिळत होत.सृष्टीचं सारं ज्ञान त्यांचेजवळ होतं,पण पत्नी रागवली रुसली,फुगली की,ती आणखीणच सुंदर दिसते हा शोध मात्र त्यांना आज प्रथमच लागला.त्या नवदांम्पत्यामधे कांही तरी बिनसले हे चाणाक्ष सुभद्रादेवीच्या लक्षात आले.अगस्त्य विद्याथ्यांशी श्रृती-स्मृती या विषयावर चर्चा करीत कुटीबाहेर असलेल्या वृक्षाखाली बसलेले होते.ती संधी साधून सुभद्रादेवीने त्यांच्या कुटीत प्रवेश करुन,लोपमुद्रेला रुसव्याचे कारण विचारल्यावर,तीने आधी बरीच टाळाटाळ केली सांगण्याची,पण प्रेमळ पणे सुभद्रादेवीने तिच्या अंतरंगातच हात घातल्याने,लाजत लाजत म्हणाली,माझ्या ही त्यांच्याकडून कांही अपेक्षा आहेत ना

एकांतातही पत्नीचं अस्तित्व विसरून दुसर्‍याच गोष्टीत रमायच…सुभद्रादेवी तिला जवळ घेत प्रेमाने कुरवाळत समजावू लागल्या, लोपमुद्रा!तो एक तपस्वी असून पूर्वाश्रमाचा देव आहे. सुसंकृत मानव निर्माण करणं हीच त्याची जिवननिष्ठा..असे लोकं संसारात पडत नाही.पण पत्नीशिवाय ऋषीयकार्याला  अपूर्णता येते म्हणून मीच त्याच्या मागे लागल्याने तो विवाहास सिध्द झाला. लोपमुद्रा तूं फार पुण्यवान म्हणून तुला असा तपोनिष्ठ,ज्ञानी ऋषी पतीच्या रुपात प्राप्त झाला.अग!संसारसुख तर कुणीही सामान्य व्यक्ती उपभोगतो,पण असे ऋषी संसारापलिकडचं पाहणारे द्रष्टे असतात,त्यांना थोडे समजून घ्यावं.मी घेतच आहे की समजून…मी एका महान ऋषींची पत्नी असल्याचा अभिमान निश्चितच आहे.पण आतां विवाहाला चार महिने झाले तरी संसारसुख…..

        लोपमुद्रे थोडी आणखी प्रतिक्षा कर

त्याच्याजवळ येवढ्या प्रभावी सिध्दी आहेत की,तुझ्याजोगा तरुणही होऊ शकतो.पण तो स्वतःसाठी सिध्दीचा वापर कधीच करणार नाही.तुझे अंतर्मन मी जाणते.ऐन वीशित राजवैभवाचा त्याग करुन इथे आश्रमीय जीवन जगतेस यातच तुझे श्रेष्ठत्व,थोरपण आहे.तुझ्या त्यागाला तोड नाही.याचा अर्थ असाही नाही की,देवकार्य,यज्ञीय कार्यात स्वतःला झोकुन दिले की,शरीरसुखा पासून वंचित रहावे.पती-पत्नीच्या परस्पर प्रेमातूनच भावना खुलतात.पण त्यासाठी तुला प्रतिक्षा करावी लागेल. लोपमुद्रेची मान लज्जेने खाली गेली.त्या मनांत म्हणाल्या,हे सौंदर्य,यौवन तसंच सुकुन जाता कामा नये.उलट ते फुलत रहायला हवय!

        उघडपणे म्हणाल्या,तो जेव्हा प्रसन्न असेल त्यावेळीच शरीरसुखाची अपेक्षा कर,पण स्वतः पुढाकार घेऊ नकोस. तो पर्यत त्याच्या भावविश्वात जगायचा प्रयत्न करुन त्याला समजून घे.त्यातूच तो प्रसन्न होईल.सुभद्रादेवीने अनुभवाचे बीज पेरले,ते फलद्रूप होण्याची प्रतिक्षा तर करावीच लागेल.लज्जेने चूर झालेल्या लोपमुद्रेला जवळ घेऊन कुरवाळले, प्रेमाने मस्तकावर थोपटले,आणि ऋषी कुटीत प्रवेशनापूर्वीच त्या बाहेर पडल्या.

        अगस्त्यऋषी कुटीत प्रवेशले तर आश्चर्यचकित झाले.सुभद्रादेवीच्या समजावण्याने लोपमुद्रेच्या वृत्तीत फरक पडल्यामुळे,तीने पतीचे हसतमुखाने स्वागत केले.गेल्या दोन तीन दिवसांतील दोघांमधे असह्य ताण एकदम सैलावला. दोघेही सुखावले.मनोमिलन झाले. अगस्त्यांनी आवेगाने तीला मिठीत घेतले त्यांच्या घट्ट अलिंगणात कांही क्षण सुखावली.लगेच त्यांच्या मिठीतून विलग

  होऊन क्षमा मागत म्हणाली,यापुढे कधी ही आपल्या कार्यात माझी अडसर,विघ्न येऊ देणार नाही.क्षमा कसली मागतेस मुद्रा?उलट मीच तुझ्या भावना समजू शकलो नाही त्याबद्दल तूच मला…तिने चटकण त्यांच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली,झालं गेलं विसरून जायचय! विसरायचच असतं,पण भूत भविष्याची नोंद आधीच झालेली असते,तेच तर तुला सांगायचे होते….

              क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

         दि. २९-११-२०२१.

!!! अगस्त्यऋषी !!!

भाग – ३४.

        अगस्त्यऋषी पुढे सांगू लागले,ही संपूर्ण सृष्टी म्हणजे परमात्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे.ब्रम्हा,इंद्र प्रजापती हे सर्व देव,पृथ्वी,वायु,जल,तेज आकाश इतर भुतं,सर्व स्थावर जंगम, प्राणी,पक्षी,कीटक या सर्वांमधून परमात्माच व्यक्त होत असतो.मनुष्या सारखा विकसित जीव हा पूर्वनियोजित, तसेच प्रत्येक व्यक्तीचे जन्म, मृत्यु, पुनर्जन्म ह्या सार्‍या घटना पूर्व नियोजितच! लोपमुद्रा चकित होऊन म्हणाली,आपल्याला हे ज्ञान कधी प्राप्त झाले देवा? या ज्ञानार्जनाचा आरंभ भृगु आश्रमात असतानाच झाला.

         विंध्याला नमवल्यावर अगस्त्य भृगु आश्रमात गेले असतां भृगुंकडून प्राप्त झाले होते.भृगुऋषींनी ज्योतिषशास्र, पंचगविद्या यावर भृगुंनी प्रचंड संशोधन करुन त्या ज्ञानाची एक संहिता सिध्द केली होती,ती पुढे “भृगुसंहिता” म्हणून नावारुपाला आली.अगस्त्यऋषींनी या दोन्ही विद्यांचा सखोल अभ्यास करुन ज्ञान प्राप्त केले.पुढे विविध आश्रमांची स्थापना करीत असतांनाही त्यांचा या भृगुसंहितेवर सखोल अभ्यास सुरुच होता.त्याविषयी थोडक्यात सांगून म्हणाले,कर्माचे बरे वाईट परिणाम होणं, ते भोगणं,आणि उर्वरित भोग भोगण्या साठी पुन्हा जन्मास येणं हे पूर्वनियोजित ठरलेले असते.

        प्रचंड तप,लोकसंग्रह,संस्कृती  स्थापणेसाठी निरपेक्ष भावनेनं झिजणं या परमेश्वरी कार्यामुळे ते प्रेरणा स्थाना पलिकडे गेले होते.केवळ विद्वताच नव्हे तर,विशुध्दता,विनम्रता त्यांच्यात पुरेपुर बाणली होती.ज्ञानमार्गाने पुढे जाऊन ते परमेश्वराच्या विशाल यंत्रणेपर्यंत पोहोचले होते.मुद्रा! हे साक्षात ज्ञान आपोआप माझ्यात संग्रहित झाले.हे ज्ञान अनेकविध सिध्दीच्या पलिकडचं आहे. हे ज्ञान कोणत्याही ज्ञानशाखेत बसणार नाही.विश्वातील प्रत्येक व्यक्तीची नाडी माझ्या हाती आली असं समज.जी व्यक्ती माझ्या समोर येते तिचं संपूर्ण चरीत्र आणि चारित्र्य माझ्यानजरेसमोर तरळते. लोपमुद्रा एकदम त्यांचे पाय पकडून भाव विवेश होत विचारले,माझं चारित्र्य शुध्द आहे ना?

      तिला उठवत म्हणाले अतिशय शुध्द!

जन्मोजन्मी उत्कर्ष पावत तूं या जन्मात आली आहेस म्हणूनच तू एक ऋषीपत्नी झाली आहेस.पुढे तुला एक पुत्र…बस.. बस..मला वेगळं भविष्य मुळीच जाणून घ्यायचं नाही.मी आपल्याशी निगडीत असल्यामुळे आपलं जे भविष्य तेच माझं

मी शुध्द व पतिव्रता आहे हे ऐकूनच माझे कान तृप्त झाले आणि ती आवेगाने त्यांच्या मिठीत शिरली.

        प्रवरानदी ओलांडून लोपमुद्रेच्या छकड्या बरोबर,अगस्तऋषी,अनेक गाडे अश्व,अश्वस्वार,अनेक स्नातक,पुरोहित त्यांच्या दक्षिण द्विग्विजयात सहभागी झाले होते.प्रवासात सोबत नेल्या जाणार्‍या शिदोरीला पट्याशन म्हणतात तेही भरपूर प्रमाणात घेतले होते.थोडे फार द्रव्य, शस्रसाठाही घेतला होता. ऋषीय ध्वज पताका सर्वात पुढच्या गाड्यावर फडकत होता.पूर्वेकडचा प्रवास पूर्ण होऊन जत्था दक्षिणेकडे वळला होता.घनदाट वृक्षराजींखाली समूहाने थोडा वेळ विश्रांती घेतली. भोजन आटोपल्यावर दहा योजनं पुढे जाऊन घनदाट वनराईत वास्तव्यास्तव सुरक्षित जागा पाहून तळ ठोकला.जत्था च्या रक्षणाचा भार कांही युवकांवर सोपवल्या गेले.प्रवासाने थकल्यामुळे लवकरच सारे निद्राधिन झाले.परंतु  अगस्त्य मात्र  ध्यानस्थ बसले.

          खडतर प्रवासाची आतां सर्वांनाच संवय झाली होती.प्रवास करीत आता ते सारे करवीर प्रांती येऊन पोहोचले.दक्षिण दिग्विजयासाठी करवीर प्रांत शुभारंभाचा प्रदेश ठरणार होता.प्रवासतच नियोजन केलं होतं.सार्‍या नियोजनाचा आढावा प्रतिरात्री अगस्त्य घेत होते.पुढील कार्या ची आखणी करीत सर्व कार्यकर्ते शेकोटी भोवती गोलाकार बसले होते.सर्वांवर प्रेमळ कटाक्ष टाकत अगस्त्य म्हणाले, आपण दंडकारण्यात यज्ञीय संस्था रुजवली आहे.राक्षस तिथे होणार्‍या यज्ञीय कार्यात विघ्न आणत राहणारच. पण आणखी कांहीच वर्षे… राम जेव्हा जनस्थानात पोहचतील तेव्हा राक्षसांचा समूळ उच्छेद होईलच.ऋषीमंडळी सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहे.त्यांच नियोजन आणि संपर्कयंत्रणा कल्पांतीत आहे.आपल्याला आतां दक्षिण सागरा पर्यंतची भूमी वैदिक विचारांनी प्रभावित करायची आहे.

       उत्तर दंडकारण्यात जटायू जमातीत वैदिक विचार रुजले आहेत.दक्षिणेकडे किष्किंधराज्यात वानर जमात मोठ्या प्रमाणात आहेत.त्यांच्यात आपल्याला संस्कृती रुजवायची आहे.तसेच इल्वाल व शूरपक्ष हे रावणाला अनुकुल असलेले

दोन दैत्यराज्यही आपल्या अनुकुल करुन घेण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.हे दोन्ही दैत्य कालकेय वंशातील असल्यामुळे सहाजिकच ते देवांचे हाड वैरी,त्यामुळे त्यांना हाताळतांना आपल्या ला वेगळा मार्ग अवलंबवा लागेल.

           क्रमशः

संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

           दि. २९-११-२०२१.

!!!  अगस्त्यऋषी  !!!

भाग – ३५.

        अगस्त्यऋषी पुढे म्हणाले,आपल्या ऋषीय कार्याचे व संस्कृतीचे पडसाद या करवीर प्रांती उमटल्यामुळे इथे कार्य करणें तसे अवघड नाही.दक्षिणेकडे मार्ग क्रमण करीत असतां ज्या डोंगरावर अगस्त्यांनी कांही काळ तपश्चर्या केली होती,त्यापूर्वीही अनेक ऋषींनी तप केले होते,भावी काळात जिथे मनमाड नावाचे शहर निर्माण होणार होते,त्याच डोंगरावर अगस्त्यांनी आश्रम स्थापन केला.

         त्या डोंगरावरच्या प्रमाणेच करवीर प्रांतातील वनात राहणारे लोक लाघवी, सद् ह्रदयी,भावुक असल्यामुळे कार्य करणे कठीण नाही.इथेही विनाविलंब आश्रमाची स्थापना केल्यावर त्यांच्या कार्याने वेग घेतला.पूर्वसागर ते महानदी टापूत त्यांनी प्रचंड तपश्चर्या केली. परिवारासह वस्ती वस्तीवर जाऊन विचारसिंचन केले.सहस्रो लोकं ऋषीय कार्याला जोडले.कांही वर्षातच असच  कार्य करीत सागरतटाजवळच्या प्रदेशात स्थिरावले.पुढे हा प्रांत “कर्नाटक” नावाने प्रसिध्द झाला.

        आश्रमाजवळच असलेल्या सागर किनारी बसून सागराशी सूर्य अस्ताला जाईपर्यंत हितगुज करण्याची त्यांना संवय होती.कित्येकदा लोपमुद्राही सोबत असायची.त्यादिवशीही ते असेच बसून होते.मावळत्या दिनकराला अर्ध्य दिले व सागराला वंदन करुन मागे वळले तोच लोपमुद्रा त्यांच्या शेजारीच उभी असल्याने,तीच्या अभावित स्पर्शाने अगस्त्यांचे अंग अनामिक लहरींनी शहारुन आले.त्या प्रणयलहरी होत्या कां

कारण आजपर्यंत प्रणयलहरींना अंगात शिरकाव करायला संधीच मिळाली नसल्यामुळे मदनबाण अद्याप त्यांचे पर्यत पोहचू शकले नव्हते.अनिमिष नेत्रां नी कांही क्षण तीला न्याहळत राहिले. जिथे विश्वामित्रा सारख्या ऋषींचाही तपोभंग… लोपमुद्रेच्या लक्षात त्यांची स्थिती आल्यावर त्यांना हाताला धरुन जरा ओढतच त्यांना कुटीकडे नेऊ लागली.सुभद्रादेवीचा उपदेश तिच्या मनात घुमत होता.चलता चलता ते म्हणाले, मुद्रे आज तुझी इच्छा…कां तुमची इच्छा नाही?आज मी… देवा!थोडा धीर धरावा.कांही वेळातच दोघेही  आश्रमात पोहोचले.सर्व सायंप्रार्थनेसाठी जमलेले होते.नंतर भोजन झालेवर सारे आपापल्या कुटीरात निघून गेलेत.

         लोपमुद्रा व अगस्त्सीही आपल्या कुटीरात आले.विषयविकार अजुनही अगस्त्यांच्या मनाआड झाला नव्हता. खाटेवर तीच्या शेजारी बसून,तीच्या मुक्त केसांवरुन हात फिरवित म्हणाले,देवांनी सोपवलेले ऋषीय कार्य करण्यांतच सारा जन्म गेला.हे सळसळणारं तारुण्य पुढ्यात असूनही मी कधी उपभोग घेतला नाही.किंबहुना दुर्लक्षच झालं…आतां ऋषीय कार्याचा संध्यासमय जवळ आला जेवढं कार्य घडले त्यात मी तृप्त आहे. त्यामुळे थोडी उसंत मिळाली.आज मन प्रसन्न आहे.पण वेगळ्याच अनामिक जाणिवेनं अंगप्रत्यंग सळसळत आहे. तुझी इच्छा…देवा मी मनावर ताबा ठेवून आपल्या कार्यात तनमनानं गुंतून गेलेय! तरी पण,विवाहित स्री नेहमीच पुत्रप्राप्ती च्या प्रतिक्षेत असते.तेच तर म्हणतोय.. असे म्हणून तीच्या जवळ सरकले.पण तीने त्यांना हलकेच दूर केल्याने ते खंतावले.

       हिला पुत्रसंतान हव असतांनाही,ही आपल्याला दूर का करते?मी वृध्द असल्यामुळे?थोड्या नाराजीनेच तिच्या पासून दूर सरकुन मान खाली घालून बसलेले बघून खोडसळपणे विचारले, कसल्या विचारात आहात देवा?एक सुस्कारा सोडून म्हणाले, मी वृध्द झालो मुद्रा!तुझ्या सळसळत्या तारुण्याचं…हे काय भलतच मनात आलं आपल्या?कधी तरी मी असं दर्शवलं का?त्यांच्या जवळ सरकत म्हणाली,आपल्या भावना मी जाणते.आपण मला परमप्रिय आहांत मी सुध्दा मिलनासाठी तेवढीच आतुर आहे.पण त्यापूर्वी माझी एक अट आहे…

      अट?आपला विवाह होऊन इतकी वर्षे उलटली तरी?बरं सांग!मी राजवाड्यात वाढले तरी,तुमच्याशी विवाहबध्द होऊन हा वनवास मी आनंदाने स्विकारला.पण हा वनवास  माझ्या होणार्‍या अपत्याच्या नशीबी येऊ नये म्हणून….आजवर आपण केलेल्या तपश्चर्येला तोड नाही,त्यासाठी देवपण पणाला लावले.सार्‍या दैवी भोगाचा त्याग केला.निरिच्छ,निरपेक्ष वृत्तीने देवकार्य करत अनेक राजमंडळं निर्माण केलेत. आपल्या एका शब्दावर धनाच्या राशी आपल्या पायाशी येतील.देवा!भारतवर्षा त जो राजा सर्वात धनवान आहे,त्याच्या कडून येणार्‍या अपत्यासाठी धन आणावं हीच माझी अट आहे.हे काय बोलतेस मुद्रा?आजपर्यंत मी अयाचक व्रताचं काटे कोर पालन केलं आणि आतां तूं मला हात पसरावयाला सांगतेस?अशक्य… माझी अस्मिता मुळीच पणाला लावणार नाही.हा अंतिम निर्णय आहे.मग मीही मिलनासाठी सिध्द होऊ शकत नाही. तिचं निर्वाणीचं बोलणं ऐकून त्यांना धक्काच बसला.ती आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक कार्यात बरोबरीने सहभागी झाली होती.ऋषीय विचार तिच्यात पुरेपुर भिनले होते.तिने अशी विचित्र अट कां घालावी याचे आश्चर्य वाटले.

             क्रमशः संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

                       

महर्षीं अगस्त्यऋषी सर्व भाग पहा

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading