आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

महर्षी अगस्त्यऋषी संपूर्ण चरित्र भाग २, (६ ते १०)
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
Maharishi Agastya Rishi! !
महर्षी अगस्त्यऋषी ! !
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – ६.
पश्चिम सागरकिनारी कांही छोट्या छोट्या झोपड्या होत्या.रात्री गस्त घालण्याचे काम रोज दोन साहसी तरुण करायचे.आज बरच्या व सरम्या या दोन युवकांची पाळी होती.झोप जावी म्हणून ते पाण्यात पाय बुडवायला आले,तोच त्यांच्या दिशेने कालकेय दानवांच्या नावा येतांना दिसताच तसेच सावधss धावाs पळाss ओरडत झोपड्यांकडे धावत सुटले.त्यांच्या ओरड्याने निद्रिस्त सारे नेसत्या वस्रानिशी,पोरांना कडेवर घेऊन धडपडत बाहेर पडले.स्रीयांच्या किंकाळ्या,वृध्दांचा आकांत,रडणारे पोरं सर्वांना कांही तरुण किनार्यापासून शक्य तेवढ्या लांब ओढत नेत होते.सर्व जण चढ चढू लागले.कांही ठेचकाळत, पडत, जखमी होत होते.त्याहीपेक्षा त्यांना जीवाची व स्रीयांना अब्रूची चिंता होती.तोवर कालकेयांच्या ८-१० नौका किनार्याला लागून ते गौरवर्णीय दानव हाती भाले,तलवारी,काटेरी तूणीर असे हत्यारे घेऊन सागरवासियांना पकडण्या साठी त्यांच्या मागे धावत होते.एकाकाला पकडून,मुलांना खाली फेकून दिले.पुरुषां नि मारहाण करुन जमीनीवर लोळवले. कांहीनी तरुण स्रीयांना पकडून झोपडी कडे चालते झाले.कांही साहसी तरुणांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण सशस्र महाकाय दानवांपुढे त्यांचा काय टिकाव लागणार? स्रीया दानवांच्या हातून सुटण्याची धडपड करुं लागल्या. सारा हाहाकार माजला.कालकेयांच्या असूरी शक्तीपुढे या सामान्यांची शक्ती निष्पभ ठरली. सारा खेळ पाव घटकेचा.. कालकेय दानवांच्या नौका माघारी परतल्या.उध्वस्त झालेली मानवता दूर जाणार्या असूरी शक्तिकडे हताश नजरेने बघत होती.
वसिष्ठाश्रमातून परतल्यावर अगस्त्यांनी आपलं सारं लक्ष पश्चिम सागर परिसरावर केंद्रित केलं.कार्याचं व्यवस्थित नियोजन असल्यामुळे सहस्रौ सागरजनीयांना एकत्रीत करुन त्यांच्यातील भांडण तंटे मिटवले.त्यांच्यात परिवर्तन घडवून कुटुंब निर्मिती केली. अर्वाच्य भाषा जाऊन ती जागा वैदिक मंत्रांनी घेतली.ब्राम्हण गटागटाने जाऊन त्यांना संथा देत,वैदिक संस्कृती त्यांच्यात रुजवत होते.एक विचार,एका उपासना पध्दतीला अवलंबणारा समाज किनार पट्टीवर तयार होत होता.सारा विध्वंश करुन दानव निघून गेल्यावर,ते सागरजन उध्वस्त झालेल्या झोपड्यांकडे परतले. आणि ह्या घटनेची माहिती अगस्त्यांना कळविण्यात आली.ते आल्यावर आचार्य गुरुदेव नक्कीच कांहीतरी मार्ग काढतील याची त्यांना खात्री होती.कारण गेल्या ३-४ वर्षात त्यांनी घडवून आणलेल्या परिवर्तनाने त्यांच्यावर नितांत श्रध्दा निर्माण झाली होती.
दोन दिवस उलटले तरी,अद्याप सागरवासी धक्क्यातून सावरले नव्हते. आचार्यासमोर आपापल्या व्यथा सांगू लागले.एक तरुण सांगू लागला…माझ्या बायकोचे तुकडे तुकडे करुन… पुढे बोलवेना.एक बाई सांगू लागली..माझ्या दोन तरुण पोरी पळवून नेल्या.एक तरुण उभा राहिलेला पाहून तर अगस्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.कारण त्या तरुणाचे दोन्ही हात त्या दानवांनी कापले होते, कारण त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता….गदगदलेल्या स्वरात आचार्य म्हणाले,तुम्हाला फार सहन करावे लागतय!तिकडे राक्षस,इकडे दानव!
त्याही गंभीर वातावरणात एका युवकाने आपल्या कार्याचा अहवाल देत म्हणाला,इतके अत्याचार सुरु असतांना ही आमच्या कामात खंड पडू दिला नाही. आपल्या सुचनेनुसार एकत्र जमून प्रार्थना करतो,दुसर्या वस्त्यांमधे जाऊन विचारां चे आदान प्रदान करतो,तसेच वरच्या पठारावर काही वनवासींनी शेती सुरु केली.फार छान! परिवर्तन एकदम होत नसते.सत्कार्याची फळ यायला वेळ लागतोच.धक्क्यातून थोडे सावरलेले अगस्त्य म्हणाले.
संस्कृती रुजने सुरु झाली होती, पण आव्हाने संपली नव्हती.कालकेय दानव दिवसेंदिवस उग्ररुप धारण करीत होता.कारण दानवांचे सागरावर प्रभुत्व असल्यामुळे त्यांचा उच्छेद करणं कठीण होते.कोणताही राजा आरमाराभावी सागरात सैन्य घालून बिमोड करुं शकत नव्हता.त्यांचे सांत्वन करत अगस्त्य म्हणाले,तुम्ही सर्वांनी खुप सहन केल, तुमचे दुःख सांत्वनापलिकडे आहे.अशा परिस्थितीत देखील तुम्ही ईश्वरीय कार्य सुरु ठेवलेत ही फार मोठी गोष्ट आहे. अशी दुःख,संकटं पाठवून परमेश्वर आपली परिक्षाच पाहत आहे.आज जरी डोंगराएवढ्या संकटांचा सामना करावा लागत असला तरी तुमच्या पुढच्या पिढ्यांचं नक्कीच भलं होईल.सागर किनारी कुटुंब व्यवस्था निर्माण होऊन रीतभात शिकले.कुकर्म थांबले.स्रीया निर्भय बनल्या.जीवनमान सुधारुन सुसंस्कृत बनु लागलं.आता राहिला प्रश्न कालकेय दानवांचा..त्यासाठी सर्वांनी संघटीत होऊन समर्थपणे सामना करणे भाग आहे.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – ७.
अगस्तींच्या सकारात्मक उर्जेच्या बोलण्याने सागरवासीयांना थोडा धीर आला.अगस्त्यांनी प्रत्येकाजवळ जाऊन विचारपूस केली.दुःखी,जखमी लोकांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांचे सांत्वन केले. अगस्त्य तिथून निघाले तेव्हा सार्यांची मनं भरुन आली.
कालकेय दानवांनी उच्छाद मांडले ल्या पश्चिम सागर परिसराला भेट दिल्या नंतर अक्षय,प्रगाथा व शंख या शिष्यांसह अगस्त्य उत्तरेकडे निघाले.दोन दिवसांच्या प्रवासानंतर एका पठारी प्रदेशात विश्रांती साठी थांबले.भोजन वगैरे आटोपल्यावर अक्षय म्हणाला,आचार्य, आपल्या परिसरातही अनेक राक्षस आहेत पण हे दानव यांच्यापेक्षाही भयंकर आहेत.होय! क्रौर्याची परिसीमा म्हणजे कालकेय दानव.एकवेळ राक्षस सुधरतील पण हे दानव सुधरण्या पलिकडे आहेत.एखाद्या राजाचं सैन्य नेल तर? नाही प्रगाथा,त्यांच सागरावर वर्चस्व असल्यामुळे फार मोठ्या आरमारीची गरज आहे.आर्यवर्ता त सध्या तरी कोणत्याही राजाजवळ नाही.आपल्यालाच कांहीतरी उपाय शोधावा लागेल तेही येत्या कांही वर्षातच.. सागरीयांना प्रेरणा देऊन त्यांच्यात संघ शक्ती निर्माण करावी लागेल.
संधी पाहून अक्षय म्हणाला,आचार्य! आपली इच्छा असेल तर देवांबद्दल जाणण्यास आम्ही उत्सुक आहोत.मागे आपण पश्चिम सागरतटी देवांचा संबंध आहे असे म्हटले होते, ती काय पार्श्वभूमी आहे?अगस्त्य म्हणाले, तो फार गूढ इतिहास आहे.देवांविषयी जाणून घ्यायचे असेल तर प्रथम ‘देव’ आणि ‘परमेश्वर’ मधील भेद जाणून घ्यावा लागेल.या सर्व चराचरात भरुन राहिलेला,सर्वव्यापक, प्रत्येक जीवात वसलेला अविनाशी तो परमेश्वर!आणि देव म्हणजे परमेश्वराच्या च विशाल परिzzवारातले आपल्या सारखेच पण आपल्यापेक्षा अति उन्नत अतिमानव व्यवहारात आपण परमेश्वरालाच देव म्हणून संबोधतो.द्वैतभावाने देवांना पाहू शकतो पण परमेश्वर फक्त अनुभवु शकतो. देव मुळचे पृथ्विवरचे नाहीतच. आपल्यासारखीच देवांची वेगळी योनी आहे.मानवांमधे दोन तृतीयांश अंश देवांचा आहे.देवांचं मुख्य स्थान म्हणजे स्वर्ग!हवं तर स्तर म्हणू या! देवांना अनेक विद्या अवगत आहेत.सध्या आपण जसं आदिम जमातीसाठी प्रसंगी जीव धोक्यात घालून त्यांंच्या विकाराचा प्रयत्न करतो,तीच भूमिका अनेक ग्रहावर अधिपत्य असलेल्या देवांची असते.देवां च्या कार्याचा आवाका मानवापेक्षा फार मोठा आहे.पृथ्वीवर दैवी कार्य करण्या साठी देवांनी ईश्वर जाणणार्या सप्त ऋषींचे सहाय्य घेण्यासाठी अद्भूत यंत्रणा करुन उत्तर धृवाजवळ त्यांची व्यवस्था केली.हे सप्तऋषी आकाशातून पृथ्वीवर आल्याची नोंद अनेक ग्रंथात आढळून येतात.
देव आणि ऋषी यांचे ज्ञान आणि सिध्दी कल्पांतीत आहे.परमेश्वर प्राप्ती होणे फार कठीण!उपासने बरोबरच कर्मसुचिता,विचारसुचिता,तपाचरण आणि निष्काम कर्म हे अत्यंत आवश्यक आहे.सहस्रोवर्षापासून पशुवत् जगणार्या आदिमानवामधे विकास व परमेश्वराची जाणीव व त्यांचे जीवन ईश्वराभिमुख करण्यासाठी देव आणि ऋषी कार्य करुं लागले.चकित होऊन तिघेही शिष्य ज्ञान ग्रहन करण्याचा प्रयत्न करीत होते.देवांनी निर्माण केलेल्या यशापयश चिंतेने व्यक्ती जर त्यात अडकला तर सुरु होतो पृथ्वीवर जन्म मरणाचा खेळ.जोपर्यंत मनुष्याला जीवनाचा मूळ उद्देश सांपडत नाही तो पर्यंत तो पृथ्वीवर जन्म घेतच राहतो. मनुष्याचा पुनर्जन्म झाला की,त्याच्या स्मृती लोप पावाव्यात ही योजना देवांनी केली.कारण पूर्वजन्माची स्मृती राहिली तर मनुष्य संभ्रमित होऊन,तो विकासच करुं शकणार नाही.देवांनी दाखवलेल्या ज्ञानाने पृथ्वीवरचा माणूस विकसित जीवन जगू लागला.पण जसजशा अनेक पिढ्या संपल्या व मनुष्य आपल्या मूळ हेतूपासून ढळला.ज्ञानरहित झाला.त्या वेळी देव आणि ऋषी हे कार्य आकाशात राहून होऊ शकत नाही म्हणून सदेह पृथ्वीवर येऊन करावे लागले
मनुष्याला आपल्या कर्मानुसार मृत्युनंतर जाण्यासाठी दोन मार्गांचा अवलंब केला.एक देवयान व दुसरा पितृयान मार्ग!ज्यांनी आपल्या जीवनाचा योग्य विकास,तपसाधना,आत्मिक शिक्षण,सात्विकता,ईश्वरप्राप्तीसाठी कायम झिजले ते थेट देवयान मार्गाने स्वर्गात जातात.तर जी व्यक्ती प्रलोभनां ना बळी पडली,फक्त स्वहिताचाच विचार केला,देवाला विसरले ते पितृयान मार्गाने जातात.आणि जी व्यक्ती लूटमार,हिंसक कृत्ये,दुसर्यांचे वाईट चिंततो,सत्कार्यात अडथळे आणतो,परपिडा हाच धर्म बनवतो तो थेट नरकात जातो.ब्रम्हांडात कोट्यावधी तारकासमूह आहेत,मनुष्य तिथल्या अनेक स्तरांतून जात शेवटी त्याला परमेश्वर प्राप्त होतो.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग -८.
देवांनी सहस्रो वर्षै कार्य केल्यावर पृथ्वीवर “स्वर्ग” निर्माण झाला.भौतिक जीवनाचा उपभोग घेत पृथ्वीवासी आत्मोन्नती करुं लागल्याने नरकाचे स्तर रिते राहू लागले.वैदिक ऋषींच्या अविरत तपामुळे पृथ्वीवर सत्ययुग अवतरलं,पण जसाजसा काळ पुढे जाऊ लागला,तसे तसे मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश विसरुन भोगात रमू लागला.आणि त्याचे दोन पायांच्या पशूत रुपांतर झाले.कोणतीही निष्ठा ३-४ पिढ्यांपर्यंतच टिकते.पुढे मग चुकीचे वळण लागते.विपरित काळ आला की,देवांचे निरिक्षक म्हणजेच देव दूत पृथ्वीवर अदृष्य रुपात अवतीर्ण होतात.आणि मानवाला योग्य प्रेरणा देऊन मानव्यांचं जतन करुन या कार्याचा अहवाल देवांकडे पोहचविण्याचं काम ही देवदूत करतात.या देवदूतांमधील कांही भ्रष्ट झाले.त्यांना पृथ्वीवरच्या स्रीयां विषयी मोह निर्माण झाला.कामविकाराने ग्रासलेल्या या निरिक्षक देवदूमुळे देवांच्या सुनियंत्रीत यंत्रणेलाच धक्का बसला. तामसी वृत्ती बळावली.त्यांनी मनुष्यदेह रुपाने रानटी स्रीयांचा तामसी वृत्तीने उपभोग घेतल्यामुळे फळप्राप्तीही तशीच झाली.त्या स्रीयांच्या पोटी सहा हात उंच, आडदांड राक्षसांची निर्मिती झाली.पर पिडा,अविवेकी उपभोग,मोह,तामसीवृत्ती ऐतखाऊपणा,भ्रष्टाचार इत्यादी अवगुणां चं स्वरुप म्हणजे साक्षात राक्षस!मोहातून तामसीवृत्तीतून जन्म झाला की, ओघाने हे अवगुण येतातच!
याच राक्षसांनी आणि त्यांच्याच सारख्या वृत्तीच्या असूरांनी पृथ्वीवर हौदोस माजवला.त्यांचे वास्तव्य आजही घनदाट अरण्यात आहे.कांही राक्षस पृथ्वीच्या खालच्या भागात म्हणजे पाताळात आहे.वाईट संकरातून जन्माला आलेल्या या जीवांचे वृत्तीपरिवर्तन शक्य नसल्यामुळे त्यांचा नायनाट हाच उपाय उरतो.आपल्या गुरुंना विश्वाचं एवढं गहन गुढ ज्ञान असल्यामुळे त्या तिन्ही शिष्यांना अतिशय आश्चर्य व अभिमान वाटला. अगस्त्य पुढे सांगू लागले..पृथ्वी वरचा मनुष्याचा उच्छाद,भोगवाद नष्ट करण्यासाठी दोन वेळा प्रलय घडवून आणला.त्यानंतर असूरी वृत्तीचा नायनाट करण्यासाठी देवांनी आपला दैवी अंश पाठवून साम आणि दंड या दोन उपायाने असूरीवृत्तींना वळणावर आणण्यासाठी व तो उपाय व्यर्थ ठरला तर विनाश घडवून आणतील.आणि ऋषी,साधू आणि सात्विकांना भेदून त्यांच्या सहकार्याने पुन्हा शुध्द मानवधर्माची स्थापना करतील.
वायुदेव प्रमुख असला तरी इंद्राच्या अधिपत्याखाली देवांची आकाशास्थित विशाल यंत्रणा कार्यरत असते.इंद्रदेव अतिशय न्यायनिष्ठूर!शंभर अश्वमेध यज्ञ केलेली व्यक्तीच इंद्रपद भूषवू शकतो.पृथ्वीवर मनुष्यधर्माची स्थापना करण्यासाठी इंद्रांनीच योजना कार्यान्वित केली.अवतारांपूर्वी विकसित जीवनपध्दतीचा प्रभाव पृथ्वीवरच्या लोकांवर पडावा म्हणून,देवांनी कांही कुटुंबे पृथ्वीवर पाठवले.त्यावेळी त्यांना भौतिक शरीर धारण करावी लागल्याने सहजिवन मानवांच्या मर्यादाही स्विकारा व्या लागल्यात.मुळातच ते ज्ञानसंपन्न असल्यामुळे,वास्तुकला,शिवणकला.मूर्तिकला,गायनकला,शिल्पकला याबरोबरच भौतिकशास्र,रसायनशास्र,भूगर्भशास्र, खगोलशास्र इत्याबी अनेक विद्या अवगत असल्यामुळे त्यांनी असामन्य प्रगती केली.या विद्यांचा अविष्कार पृथ्वीवर घडवण्यासाठी बलदंड कामगार निर्माण केले.यानांच राक्षस म्हणून ओळखल्या जाऊ लागले.देवदूतांपासून निर्माण झालेले असूर आणि राक्षस पुढे देवांवरच उलटले…पूर्वी याच राक्षसांच्या सहाय्याने देवांनी अवाढव्य बांधकामं निर्माण केली, सोबतच ऋषींच्या सहकार्याने दैवी संस्कृतीही प्रस्थापित केली.
देवांची कुटुंबे पृथ्वीवरआल्यावर त्यांचे वास्तव्य इतरांपासून वेगळे, सुरक्षित ठीकाणी म्हणजे उत्तर धृवावर केले,सोबतच वैदिक ऋषींनाही ठेवून घेतले.सुमारे पांच सहस्र वर्षापूर्वी त्या प्रदेशात उलथापालथ झाल्यावर,पुढे ‘तुर्कस्तान’ म्हणून ओळखल्या जाणार्या देशाच्या सीमेवर “वृत्र पर्वत” ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन अरारत पर्वताच्या पायथ्याशी “सूर्यदेश” पुढे सिरिया म्हणून ओळखल्या जाणार्या देशात देवांनी वास्तव्य केले.दक्षिण-पश्चिमकडे एक विशाल महासागर लागतो.तिथे उंचच उंच आणि दुर्गम पर्वतरांगा लागतात. यालाच ॲण्डिज पर्वतरांगा,इजिप्त किंवा सुमेरियन संस्कती म्हणून ओळखल्या जाणार्या प्रदेशात भव्य वास्तू उभारुन देवांनी वास्तव्य केले होते.पहिल्या प्रलया तून बचाव करण्यासाठी अशा अनेक दुर्गमस्थानी जाऊन राहिलेत.पृथ्वीवर राहणार्या देवांच्या वंशजांना मार्गदर्शन करण्यासाठी आकाशस्थ देव देवता,यक्ष अप्सरा,गंधर्व, अदृष्य रुपात राहायला आलेत.नंतर ब्रम्हदेवांनी हिमवान प्रदेशा तील दुर्गम स्थानी ‘मानस सरोवर’ निर्माण केलं.आजही या सौंदर्ययुक्त जागेत आकाशस्थ अदृष्यरुपात वास्तव्यासआहे
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ९-११-२२१.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – ९.
आकाशातील देवांच्या कार्यभारा प्रमाणेच पृथ्वीवरच्या देवराज्यात कामा ची विभागणी झाली.पृथ्वीवर प्रथम देव राज्य सुरु झालं ते आकाशातील प्रणाली प्रमाणेच!म्हणून पृथ्वीवरच्या देवांचा अधिपती इंद्रच होता.कालांतराने आकाशातील देवांच्या मार्गदर्शनाचा विसर पडून मानव संस्कृती निर्माण झाली.आपणही त्यातलेच!काळ जसा बदलत गेला तसे मनुष्याला स्वतःमधील देवत्वाचा विसर पडून त्याच्याकडून दुष्कृत्ये घडू लागले.जीवन हे उपभोगा साठीच आहे आहे असे वाटल्याने कुकर्मे होऊन पाशवीवृत्ती बनली.सहयोगातमक विकासाचे विचार मागे पडून स्वार्थाने एवढा कळस गाठला की,व्यक्तीकडून राजसी,तामसी कर्म होऊ लागली.पण परमात्मा या सर्वापलिकडे असल्यामुळे आपण त्याच्यापर्यंत पोहोचणे अवघड आहे.काळ बदलत गेला.
नवीननवीन आलेल्या आव्हानां वर मात करुन वायव्य प्रांतातल्या गांधारा पासून उत्तर भारतात आर्यवर्तात अनेक राज्यव्यवस्था आकाराला आल्या.ऋषीं च्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कृत नगरे निर्माण झाली.कश्यपऋषींनी शेतीस चालना देऊन राज्यांमधे समृध्दी आणली
अयोध्या नगरीचा भरभराट होऊन ऋषीं च्या मार्गदर्शनाने एक आदर्श समाज रघु कुलाने प्रस्थापित केला.रुद्रप्रयाग,काशी या ठीकाणी असलेल्या अगस्त्यांचे आश्रमक्षेत्र बरेच विस्तारले.उत्तर,पूर्व प्रांतापर्यत त्यांनी आश्रम साखळ्या निर्माण केल्या.स्वतः अनेक युवकांना घडविले.प्रत्येक आश्रमात आचार्यवर्ग नियुक्त केला.वेदविद्येबरोबरच व्यावसायि क शिक्षण दिलं जाऊं लागले.सोबतच विद्यार्थ्यांच्या उपजिविकेचीही सोय केली घनदाट अरण्यात असंख्य यज्ञ करुन, रानटी लोकांमधे आचारविचारांत सात्विकता आणून परिवर्तन घडवून आणले.अमानुषी रीतीभाती जाऊन शेती वर भर दिल्यामुळे कुटुंबव्यवस्था रुजवली,ऋषक आणि कृषक संस्कृती रुजवण्यासाठी अगस्त्यऋषींनी सहस्रो युवक विद्यार्थ्यांना कार्यात सहभागी करुन,सातत्याने अरण्यवासीयांना भेटून दिशादर्शन करीत अविरत फिरत होते. अरण्यवासीयांचे जीवन पार बदलून, पाशवी वृत्ती जाऊन परस्पर सहकार्याने सुखी जीवन जगू लागले.त्यामुळेच त्यांच्या मनात अगस्त्य ऋषींविषयी पराकोटीचा आदरभाव,कृतज्ञता होती. अधे मधे अगस्त्य स्वतः अरण्यात जाऊन अरण्यवासीयांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करीत असल्यामुळे त्यांच्यात कमालीचे परिवर्तन घडून आले होते.एका तरुणाने एकाच तरुणीची निवड करुन,तिथे जात असलेल्या ब्राम्हणांनी त्यांचे वैदिक पध्दतीने लग्ने लावून कुटुंबव्यवस्था अस्तित्वात आणली.एकमेकांशी विशेषतः पती पत्नीने एकमेकांचा आदर करुन कसे रहावे याचे मार्गदर्शन केले.
अगस्त्य पुढे म्हणाले,अक्षय! कौटुंबिक जीवन सुखी रहावे,व्यक्तीचे मन स्वैरभैर होऊ नये,एकाकीपणा नैराश्य येऊ नये यासाठी त्यांना व्रतवैकल्ये,परमेश्वराविषयीची निष्ठा रुजवण्यासाठी मूर्तीचे माध्यम वापरुन, उपासना कशी करायची,मानसशास्राचा आधार घेऊन कुटुंबव्यवस्था स्थिर करावी लागेल,त्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागेल.
काशी राज्यात वास्तव्याला असलेल्या इंद्रादी देवांना भेटण्याचे निमंत्रण घेऊन स्वतः काशीराज इंद्राच्या आज्ञेने अगस्त्यऋषींच्या आश्रमात आले. निमंत्रणानुसार अगस्त्य काशीराजाच्या भव्य प्रासादात पोहोचल्यावर,त्यांचे यथोचित स्वागत झाले.स्वतः ते व पत्नी पट्टराणी मंदाकिनीने त्यांचे व इतर ऋषी गणांचे पाद्यपुजा विधी केले.मध्यान्ह भोजन,विश्रांती आटोपल्यावर स्वतः काशीराजांनी अगस्त्यांना असिम आदरपूर्वक मंत्रणाकक्षात नेले.त्यांच्या प्रतिक्षेत इंद्रासह सारे देव तिथे आधीच उपस्थित होते.
अगस्त्यांनी मंत्रणकक्षात प्रवेश करतांच,भव्य आसनावर विराजमान असलेल्या इंद्र तत्परतेने उठून त्यांना सामोरे गेले.इतर देवांनीही त्यांना उत्थान दिले.इंद्र कडकडीत मिठी मारुन म्हणाले, दोन तपानंतर आपली भेट होत आहे मुनीवर!किती पटकण काळ पुढे सरकला?ऋषीवर आपल्यात किती परिवर्तन झाले,शरीर कृश झाले?देव कार्यात किती झिजवले स्वतःला? हसून अगस्त्य म्हणाले,देवाधिदेवा!ईश्वरकार्या साठी झिजणे हेच तर खर्या ऋषीची ओळख आहे.तुम्ही मात्र जसेच्या तसेच आहात.नंतर त्यांना त्यांच्यासाठी केलेल्या आसनावर आदरपूर्वक बसवले. काशीराजासह सर्व देवांनी भावपूर्ण अंतःकरणाने दर्शन घेतले.परस्परांची विचारपूस झाल्यावर,इंद्रांनी गंभीरपणे बोलण्यास सुरुवात केली.ऋषीवर आपण जाणताच,देवांना दिवसेंदिवस अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. ९-११-२०२१.
!!! अगस्त्यऋषी !!!
भाग – १०.
इंद्र पुढे बोलू लागले….देवांनी घडविलेल्या प्रलयानंतर,देवराज्य कांही काळ विविध भागात विस्थापित झालं.४० दिवसांनी पाणी ओसरताच,पुन्हा नव्याने देवराज्याची निर्मिती केली.त्या प्रलयात अनेक दानव वाहून गेले.कांहींना आम्ही पाताळात घातले.पण उर्वरीत दानव,राक्षस,दैत्य शिरजोर होऊन त्यांनी पूर्वी देवांकडून मिळालेले तंत्र,शस्र,ज्ञान देवांविरुध्दच वापरायला सुरुवात केली. आपणच निर्माण केलेले हे जीव आपल्या लाच त्रासदायक ठरले.पठारी प्रदेशा पासून वायव्य प्रातांपर्यंत देवांना वास्तव्सास जागाच उरली नाही.
नंतर इंद्राच्या अधिपत्याखाली देवां नी अर्बुद सागर ओलांडला.कुत्स,त्रिता वंशाना सहाय्य देऊन शुष्ण,शंबर इत्यादी शत्रूंना ठार केले.दिवोदास राजाने करंज आणि पर्णय राजांचा पराभव केला.देवां च्याच सहाय्याने ऋजिश्वनानं वंगृदाची शंभर शहरे बेचिराख केली.नरु वंशातील सुश्रवानं कुत्स,आयू आणि दिवोदास सारख्या श्रेष्ठ राजाचा पराभव केल्यामुळे दिवोदास अत्यंत क्रुध्द होऊन,वज्राच्या सहाय्याने कुत्स,आयू व दिवोदास या तिघांनी भयंकर संहार करुन अनेक राजां चा पराभव करुन त्यांच्या राज्यांची अपरिमित हानी केली.
त्याचवेळी उरुवासी विष्णूनी इंद्राच्या सहाय्याने तीन मोठ्या प्रांतात स्वतःचे वर्चस्व स्थापित केले.वैदिक ऋषीं नी आर्यसंस्कृती उत्कर्षाप्रत आणली. उत्तरेकडील राज्य “आर्यवर्त” म्हणून ओळखले जाऊं लागले.इंद्रांच्या म्हणण्यास दुजोरा देऊन अगस्त्य म्हणाले आर्यवर्तातील अनेक राज्यांमधे दास, पणी,व्रात्य,नाग,गरुड,अज,शिघ्र,याक वगैरे जमाती एकत्र नांदताहेत.पण हे समुह स्नेहभावाने राहतात का?देवाधिदेव! अनेक जमाती एकत्र नांदतांना थोडीफार कुरबुर तर राहणारच ना?पण वैदिक ऋषींनी अनेकांतून एकत्व निर्माण करुन त्यांना एकत्रीत बांधण्यासाठी हे ऋषी अक्षरशः झिजले. या भूमीत राहणारे आर्य,द्रविड,द्रास,पणी आणि घनदाट अरण्यात राहणार्या अनेक टोळ्या,वनचरांना एकत्रीत आणण्यासाठी ठीकठीकाणी राज्य व्यवस्था निर्माण करुन,राज्यांची आचार संहिता,नियमावली ठरवली.पण केवळ राज्ये निर्माण करुन उपयोगाचं नव्हतं त्या साठी ऋषीविचार आवश्यक असल्यामुळे वैदिक ऋषींनी आपले योगदान दिल्याने समाज विचारी बनला.देवा! हे कुणा एका ऋषीचं काम नाही.त्यासाठी असंख्य ऋषी पिढ्यान् पिढ्या मानवता रुजवण्यासाठी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिल्यात.पूर्वेकडे कौशिक,गार्ग्य, यवक्रीत,गालब आणि कण्व हे ऋषी तप करीत आहेत.दक्षिणेकडे स्वस्त्यात्तेय, नमुची,प्रभुची,अत्री,सुमुख आणि विमुख हे ऋषी कार्यरत आहेत.पश्चिमेकडे कवषी धौम्य आणि कौषेय हे ऋषी तर,उत्तरेकडे वसिष्ठ,कश्यप,विश्वामित्र,जमदग्नी,गौतम भरद्वाज आणि अत्री हे सप्तर्षी कार्य करीत आहेत.
इंद्र अगस्त्यांची स्तुती करत म्हणाले,उत्तर,पूर्व,पश्चिम एवढ्या मोठ्या परिसरात एका महान ऋषीने त्या त्या परिसरांतील ऋषींच्या सहाय्याने एक विशाल संस्कृती रुजवली आहे.असंख्य आश्रम व आश्रमशाळांची निर्मिती केल्या ने हजारो स्नातक विद्यार्जन करताहेत. स्वतः झिजून अरण्यात यज्ञसंस्था नेली. प्रचंड तप करुन एकविचारांचा मानवसंघ निर्माण केला.या पूर्ण क्षेत्रात त्यांनी कुटुंब व्यवस्था आणि शेतीचा विकास घडविला आपली स्तुती ऐकून अगस्त्यांच ह्रदय उचंबळून आलं.विनयाने त्यांची मान खाली गेली.इंद्र पुढे म्हणाले,या तपस्वी ऋषीमुळेच भृगू,मिथिला,काशी,अयोध्या, कान्यकुब्ज अशी राज्ये आर्यवर्तात अस्तित्वात आली.त्यात अयोध्या तर अत्यंत प्रबल राज्य आहे.ती मनुनिर्मित नगरीआहे.पण देवराज्याच्या सभोवताल च्या राज्यांमधे ऋषीविचार नसल्यामुळं तिथल्या संघर्षाला आम्हाला तोंड द्यावे लागत असल्यामुळेच विचारपूर्वक देव राज्यातून विस्थापित व्हायचे ठरविले.तरी परंपरागत शत्रू त्रास देतातच,त्यांचा निःपात करण्यासाठी स्थानिक राजांसह शस्र उचलावे लागेल.दक्षिणेकडील दैत्यांनी असाच उत्पाद माजवला होता तेव्हा स्वतः मला युध्दात उतरावे लागले होते,त्यावेळी अयोध्येचा तरुण राजा दशराथाचे शौर्य प्रत्ययास आले.विशेषतः त्यांची पत्नी कैकयी विरांगणा तिचेही धैर्य अनुभवायला मिळाले.
त्यावेळी देवांचा व आर्यांचा कट्टर विरोधक दंडकारण्यात शंबर नावांने प्रसिध्द तिमिरधावज दैत्य राजा वैजयंत राजधानीत राज्य करीत होता.तो ऋषी व इतरांना फार छळत असे.नव्या भूमीत स्थिरावण्यासाठी देवांना या दैत्याशी युध्द करावे लागले त्यावेळी पराक्रमी राजा दशरथाचे सहाय्य देवांनी घेतले आणि दशरथ सुध्दा पराक्रमाची शर्थ करीतहोता
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.




