Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

२१ मार्च, दिवस ८० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा, ओवी १५१ ते १७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ९४९ ते ९६०

“२१ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २१ March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २१ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ९४९ ते ९६० चे पारायण आपण करणार आहोत.


२१ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा, ओवी १५१ ते १७५,

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धय: ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥7. 24॥

151-7
परी तैसे ते न करिती प्राणिये । वाया आपुला हिती वाणिये । पै पोहताति पाणिये । तळहातिंचेनि ॥151॥
पण प्राणी तसे करीत नाहीत, आणि फुकट आपल्या हिताचे नुकसान करुन घेऊन (इतर देवतांच्या पूजनाने अल्प फलप्राप्ती करून घेऊन) तळहातावरच्या पाण्यात पोहल्याप्रमाणे करतात !
152-7
नाना अमृताचा सागरी बुडिजे । मग तोंडा का वज्रमिठी पाडिजे । आणि मनी तरी आठविजे । थिल्लरोदकाते ॥152॥
किंवा अमृताच्या समुद्रांत बुडाला असता मग तोंड दाबून का धरावे ? आणि मनामध्ये डबक्यातील पाण्याची आठवण का करावी ?
153-7
हे ऐसे काइसेया करावे । जे अमृतीही रिगोनि मरावे । ते सुखे अमृत होऊनि का नसावे । अमृतामाजी ॥153॥
अमृतांत शिरून देखील मरावयाचे, हे असे तरी का करावे ? अमृतांत सुखाने अमृतरूप होऊन का राहू नये ?
154-7
तैसा फळहेतूचा पांजरा । सांडूनिया धनुर्धरा । का प्रतीतिपाखी चिदंबरा । गोसाविया नोहावे ॥154॥
त्याचप्रमाणे धनुर्धरा, फलाशारूप पिंजरा टाकुन देऊन अनुभवरूप पंखांनी (संचार करुन) चिदाकाशाचे (भगवत्स्वरुपाने) धनी का न व्हावे ?
155-7
जेथ उंचावतेनि पवाडे । सुखाचा पैसारु जोडे । आपुलेनि सुरवाडे । उडो ये ऐसा ॥155॥
ते चिदाकाश, आपण कितीही उंच उडण्याचे मनात आणले तरी सुखाने उडण्यास फैलावलेले आहे


156-7
तया उमपा माप का सुवावे । मज अव्यक्ता व्यक्त का मानावे । सिद्ध असता का निमावे । साधनवरी ॥156॥.
त्या मला, न मोजता येणाऱ्याला, मापांत का घालावे ? मज निराकाराला साकार का मानावे ? मी सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरता साधनाने का शिणावे ?
157-7
परी हा बोल आघवा । जरी विचारिजतसे पांडवा । तरी विशेषे या जीवा । न चोजवे गा ॥157॥
पण अर्जुना, खरे विचारशील की नाही, तर बहुतकरुन हे बोलणे कोणाला आवडत नाही.

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृत्तः ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥7. 25॥

158-7
का जे योगमायापडळे । हे जाले आहाती आंधळे । म्हणोनि प्रकाशाचेनिही देहबळे । न देखती माते ॥158॥
का की योगमायेच्या पडद्याने ते आंधळे झालेले असतात; म्हणून देहबुद्धीच्या बळाने, प्रकाशरूप जो मी त्या मला ते पहात नाहीत.
159-7
येऱ्हवी मी नसे ऐसे । काही वस्तुजात असे । पाहे पा कवण जळ रसे- । रहित आहे ॥159॥
येऱ्हवी, मी जीत नाही अशी एक तरी वस्तु आहे का ? पहा की, कोणतेही पाणी रसविरहीत आहे का ?
160-7
पवन कवणाते न शिवेचि । आकाश के न समायेचि । हे असो एक मीचि । विश्वी असे ॥160॥
वारा कोणाला स्पर्श करीत नाही ? आकाश कोठे सामावत नाही ? हे असो; अवघ्या विश्वात मीच एकटा भरलेला आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥7. 26॥


161-7
येथे भूते जिये अतीतली । तिये मीचि होऊन ठेली । आणि वर्तत आहाति जेतुली । तीही मीचि ॥161 ।
ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले, त्यांचे ठिकाणी मीच होतो, आणी हल्ली आहेत त्यातही मीच आहे.
162-7
भविष्यमाणे जिये ही । तीही मजवेगळी नाही । हा बोलचि येऱ्हवी काही । होय ना जाय ॥162॥
किंवा पुढे होणार आहेत, तेही मनापासुन भिन्न नाहीत, परंतु हे फक्त बोलणे आहे. बाकी काही होत नाही, आणी काही जात नाही.
163-7
दोराचिया सापासी । डोंबा बडि ना गव्हाळा ऐसी । संख्या न करवे कोण्हासी । तेवि भूतासि मिथ्यत्वे ॥163॥
ज्याप्रमाणे दोरीच्या सापाविषयी तो काळा, कवड्या, गव्हळा वैगेरे काहीच कल्पना करता येत नाही, त्याप्रमाणे, प्राणिमात्र मिथ्या असल्यामुळे तत्संबंधी कोणतीच कल्पना करता येत नाही;
164-7
ऐसा मी पंडुसुता । अनस्यूत सदा असता । या संसार जो भूता । तो आने बोले ॥164॥
हे पंडुसुता, अशा प्रकारे मी सदा अखंड आहे; प्राणिमात्राच्या मागे जो संसार लागला आहे, त्याचे कारण निराळे आहे.
165-7
आता थोडी ऐसी । गोठी सांगिजेल परियेसी । जै अहंकारतनूंसी । वालभ पडिले ॥165॥
म्हणून त्याविषयी थोडीशी गोष्ट सांगतो, ती ऐक : अभिमान व तनु (शरीर) या दोहोंची प्रीती जडली.

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वंद्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥7. 27॥

166-7
तै इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली । तेथ द्वेषेसी मांडिली । वराडिक ॥166॥
त्या दोघांच्या प्रीतीपासुन इच्छारूप कन्या उत्पन्न झाली, व ती आपल्या पूर्ण तारुण्यात आल्यावर तिचे द्वेषाशी लग्न लागले.
167-7
तया दोघास्तव जन्मला । ऐसा द्वंद्वमोह जाला । मग तो आजेयाने वाढविला । अहंकारे ॥167॥
त्या दोघांपासून (सुखदुःखरूप) द्वंदमोह हा पुत्र झाला. नंतर त्याच्या अहंकार आजोबाने त्याला वाढविले.
168-7
जो धृतीसि सदा प्रतिकूळु । नियमाही नागवे सळु । आशारसे दोंदिलु । जाला सांता ॥168॥
तो द्वंदमोह नेहमी धैर्याला व इंद्रियदमनालाही सदा प्रतिकूळ आणी आशारूप दुग्धाने पुष्ट झालेला आहे.
169-7
असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होवोनि धनुर्धरा । विषयांचा वोवरा । विकृतीसी असे ॥169॥
हे धनुर्धरा, असंतोषरूप मद्याने उत्पन्न झाल्यामुळे तो विषयांच्या उपभोगाला विटत नाही.
170-7
तेणे भावशुद्धीचिया वाटे । विखुरले विकल्पाचे काटे । मग चिरिले अव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥170॥
त्याने शुद्ध भक्तीच्या वाटेवर विकल्पाचे काटे पसरुन मग कुमार्गाच्या आडवाटा काढिल्या आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


171-7
तेणे भूते भांबावली । म्हणोनि संसाराचिया आडवामाजी पडिली । मग महादु:खाचा घेतली । दांडेवरी ॥171॥
त्या योगाने प्राणिमात्र भ्रम पावून संसाररूप अरण्यात पडतात, व त्यांना महादुःखाचे सपाटे सोसावे लागतात.

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥7. 28॥

172-7
ऐसे विकल्पाचे वायाणे । काटे देखोनि सणाणे । जे मतिभ्रमाचे पासवणे । घेतीचिना ॥172॥
याप्रमाणे विकल्पाचे तीक्ष्ण परंतु निष्फल काटे पाहुन, ज्यापासून मतिभ्रम उत्पन्न होतो त्यांना जे मानीत नाहीत;
173-7
उजू एकनिष्ठतेचा पाउली । रगडूनि विकल्पाचिया भाली । महापातकांची सांडिली । अटवी जिही ॥173॥
भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलांनी जे नीट जातांना विकल्पाचे काटे चिरडून टाकतात, ते महापातकांचे अरण्य टाकुन सरळ मार्गाने जातात.
174-7
मग पुण्याचे धावा घेतले । आणि माजी जवळीक पातले । किंबहुना ते चुकले । वाटवधेया ॥174॥
नंतर, पुण्याच्या मार्गाने लौकर चालून माझे सान्नीध्य पावतात आणी अशा रीतीने वाटमाऱ्यांच्या (कामक्रोधादिकांच्या) हातून सुटतात !

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदु: कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥7. 29 ।
175-7
येऱ्हवी तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा । ऐसिया प्रयत्नाते आस्था । विये जयाची ॥175॥
येऱ्हवी, पार्था, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटावे असे जे साधन आहे, त्याच्या प्राप्तीची ज्यांना इच्छा उत्पन्न होते,

दिवस ८० वा, २१, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ९४९ ते ९६०
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ९४९
आशा तृष्णा माया अपमानाचे बीज । नासिलिया पूज्य होईजेते ॥१॥
अधीरासी नाही चालो जाता मान । दुर्लभ दर्शन धीर त्याचे ॥२॥
तुका म्हणे नाही आणिकासी बोल । वाया जाय मोल बुद्धीपाशी ॥३॥
अर्थ

आशा तृष्णा माया हे अपमानाचे बीज आहेत यांना जर नष्ट केले तर मनुष्य पूज्य होतो. त्यांचा त्याग केला नाही तर कोठेही मान मिळत नाही व ज्याने यांचा त्याग केला तो धीर समजून त्याचे दर्शन दुर्लभ आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात जो बुद्धिवान आहे त्याना उपदेश लगेच समजतो व जे अज्ञानी लोक आहे त्यांच्या ठिकाणी बोलणे व्यर्थच होय अर्थातच त्यांची बुद्धीच अल्प असते.
अभंग क्र. ९५०
चिंतने सरे तो धन्य धन्य काळ । सकळ मंगळ मंगळाचे ॥१॥
संसारसिंधु नाही हरीदासा । गर्भवास कैसा नेणती ते ॥धृपद॥
जनवन ऐसे कृपेच्या सागरे । दाटला आभारे पांडुरंग ॥२॥
तुका म्हणे देवा भक्तांचे बंधन । दाखविले भिन्न परी एक ॥३॥
अर्थ

हरीचिंतनात घातलेला वेळ हा धन्य धन्य आहे सर्व मंगलाचेहि तो मंगळ काळ आहे. हरिदासांना संसार सिंधूचे अस्तित्व नसते मग ते गर्भवास जन्म मरण हे कसे जाणतात ? त्यांच्या दृष्टीने संसार हा हरी रूपच हरीचा कृपा सारच आहे म्हणून पांडुरंगहि त्यांचा आभारी आहे. तुकाराम महाराज म्हणतात देव हा भक्तांच्या बंधनात बंध झालेला आहे या हरीने त्याचे मायाने देव आणि भक्त असे वेगळे आहेत असे दाखविले आहे.
अभंग क्र. ९५१
मोक्षाचे आम्हासी नाही अवघड । तो असे उघड गांठोळीस ॥१॥
भक्तीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशी पुरविता ॥धृपद॥
ज्याचे त्यासी देणे कोण ते उचित । मानूनिया हित घेतो सुखे ॥२॥
तुका म्हणे सुखे देई संवसार । आवडीसी थार करी माझे ॥३॥
अर्थ

मोक्षाची प्राप्ती आमच्या साठी आवघड नाही मोक्ष तर आमच्या पदरीच आहे. आम्हास जे आवडते ते म्हणजे भक्तीचे सोहळे आहे व ते तुम्ही देवा पुरविता हे नवल आहे. ज्याचे आहे ते त्यालाच दिले तर त्यात काय विशेष आहे ? म्हणजे मोक्ष तर आमचेच स्वरूप आहे पण तू जर ते आम्हाला देत असलाच तर त्याचा आम्ही आंनदाने स्वीकार करू. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला तुझ्या भक्ती प्रेमाची गोडी आहे संसारात आम्हाला हेच सुख दे व माझ्या या आवडीला तू थारा द्यावा म्हणजे आश्रय द्यावा.
अभंग क्र. ९५२
चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावे ॥१॥
सदा वाचे नारायण । ते वदन मंगळ ॥धृपद॥
पढिये सर्वोत्तमा भाव । येर वाव पसारा ॥२॥
ऐसे उपदेशी तुका । अवघ्या लोका सकळा ॥३॥
अर्थ

आहो चिंतन करण्यासाठी काहीवेळ काळ लागत नाही ते केव्हाही सर्व काळ करावे. ज्याच्या वाचेतनेहमी नारायणाचे नाम आहे ते वदन हे मंगल स्थान आहे असे समजावे. त्याच्या ठिकाणी हरीचा सर्वोत्तम भाव आहे इतर पसारा हा व्यर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी सर्व लोकांना नाम उपदेश करीत आहे.
अभंग क्र. ९५३
अंतराय पडे गोविंदी अंतर । जो जो घ्यावा भार तो तो बाधी ॥१॥
बैसलिये ठायी आठवीन पाय । पाहीन तो ठाय तुझा देवा ॥धृपद॥
अखंड ते खंडे संकल्पी विकल्प । मनोजन्य पाप रज्जुसर्प ॥२॥
तुका म्हणे विश्वी विश्वंभर वसे । राहो ऐसे दशे सुखरूप ॥३॥
अर्थ

गोविंदा शिवाय जो काही व्यवहार होतो तो म्हणजे बधिक होतो. म्हणून देवा मी बसल्याजागी तुझे चरण कमल आठवीन आणि तुझ्या स्वरुपाची जाणीव करून घेईन. या हरीचे अखंड स्वरूप हे संसारिक विकल्पामुळे खंडल्या सारखे होते व ज्या प्रमाणे अंधारात दोरी हि सर्प प्रमाणे भासते त्या प्रमाणे आपल्याला या देवाच्या अखंड स्वरूपातील आनंदाचा संसारामुळे खंड पडतो व हे एक प्रकारचे पाप आहे. तुकाराम महाराज म्हणतात या विश्वात सगळीकडे हा विश्वंभर वसलेला आहे असे जाणून आम्ही सुखरूप राहू.
अभंग क्र. ९५४
एकाचिया घाटया टोके । एका फिके उपचार ॥१॥
ऐसी सवे गोविळया । भाव तया पढियंता ॥धृपद॥
एकाची ते उष्टे खाय । एका जाय ठकूणि ॥२॥
तुका म्हणे बहु सोपे । बहु रूपे अनंता ॥३॥
अर्थ
भक्तांच्या कन्याही हा देव आवडीने खातो पण अहंकारी माणसाने केलेल्या पक्कांन्नही तो त्या कन्या पुढे फिके मानतो. अशी सवय या गोवाळ्यास म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यास आहे त्याला भक्तांचा भक्ती भाव हा प्रिय आहे. एकाचे तो उष्टे खातो व अहंकारी माणसाला फसवून निघू जातो. तुकाराम महाराज म्हणतात हा अनंत वेष धरी आहे परंतु हा भक्तांना हा सोपा व सुलभ आहे.
अभंग क्र. ९५५
कोठे नाही अधिकार । गेले नर वाया ते ॥१॥
ऐका हे सोपे वर्म । न लगे श्रम चिंतना ॥धृपद॥
मृत्युचिये अंगी छाये । उपायेचि खुंटता ॥२॥
तुका म्हणे अवघे जन । येथे मन असो द्या ॥३॥
अर्थ

परमार्थिक अधिकार ज्याच्या ठिकाणी नाही असे लोक वयाला जातात. अहो लोकांनो म्हणून मी तुम्हाला एक सोपे वर्म सांगतो ते म्हणजे फक्त देवाच्या चिंतनाने तुम्हाला आनंद प्राप्त होतो याला कुठल्याही प्रकारचे श्रम लागत नाही. मृत्युच्या छाया खाली आल्या नंतर सर्व उपाय थांबतात. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून हे जनहो सर्वानी हरिनामात मन गुंतवून ठेवा.
अभंग क्र. ९५६
ज्याणे ज्याणे जैसे ध्यावे । तैसे व्हावे कृपाळे ॥१॥
सगुणनिर्गुणाचा ठाव । विटे पाव धरियेले ॥धृपद॥
अवघे साकरेचे अंग । नये व्यंग निवडिता ॥२॥
तुका म्हणे जे जे करी । ते ते हरी भोगिता ॥३॥
अर्थ

जो भक्त ज्या स्वरूपाचे ध्यान करील ते स्वरूप हा हरी धारण करतो. या हरीचे चरण हे सम आहेत ते विटेवर आहे जणू काही ते सगुण निर्गुणाचे प्रतिक आहे. जसे साखर हि सर्व बाजूने गोड असते त्या मध्ये कोठेही काहीही कमी पणा निवडून काढता येत नाही. तसेच या चरण कमलाचेही तसेच आहे या मध्येही कोठेही सगुण निर्गुण निवडून काढता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण जे जे काही सेवन करू ते ते हा श्रीहरीच भोगत असतो.
अभंग क्र. ९५७
आचरती कर्मे । तेथे कळे धर्माधर्म ॥१॥
खेळे गोवळियांसवे । करिती त्यांचे साहावे ॥धृपद॥
यज्ञमुखे घास । मंत्रपूजेसी उदास ॥२॥
तुका म्हणे चोरी । योगियांही सवे करी ॥३॥
अर्थ

विधी पूर्वक कर्मे आचरणे मुहूर्त पाहून केलेल्या कर्माकडे पांडुरंग पाहत नाही पण शुध्द भाव असणाऱ्या भोळ्या गोपाळा बरोबर हा खेळतो त्यांचे काहीही तो सहन करत असतो. यज्ञ करतांना अनेक मंत्र उच्चार करतात पण त्यांच्या ठिकाणी प्रेम नसल्या मुळे हा हरी त्यांच्या पासून उदास असतो. तुकाराम महाराज म्हणतात हा हरी मोठ्या योगींनाही फसवितो कारण त्यांच्या मध्ये प्रेम नसल्यामुळे त्यांच्या हृदयात तो कधीही प्रकट होत नाही.
अभंग क्र. ९५८
नामाचे पवाडे बोलती पुराणे । होऊनि कीर्तन तोचि ठेला ॥१॥
आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र । आवडीचे स्तोत्र सदा घोकी ॥धृपद॥
आगळे हे सार उत्तमा उत्तम । ब्रम्हकर्मा नाम एक तुझे ॥२॥
तिही त्रिभुवनी गमन नारदा । हाती विणा सदा नाम मुखी ॥३॥
परिक्षिती मृत्यु साता दिवसांचा । मुक्त जाला वाचा उच्चारिता ॥४॥
कोळियाची कीर्ती वाढली गहन । केले रामायण रामा आधी ॥५॥
सगुण निर्गुण तुज म्हणे वेद । तुका म्हणे भेद नाही नामी ॥६॥
अर्थ

नामाचे वर्णन त्याची कीर्ती पुराणात आहे जो क्कोनी मनोभावे हरी कीर्तन करतो तो हरी रूप होतो भगवान आदिनाथ याच्या कंठात हा मंत्र कायम असतो व ते मंत्र हा आदिनाथ शंकर कायम आवडीने घोकत असतो. हे देवा तुझे नाम हे सर्व सर्व साराचे सार आहे उत्तमातील उत्तम आहे वेदात सांगितलेली कर्मे तुझ्या नामामुळे सार्थ होतात. नारद मुनी हाती वीणा मुखी नाम घेत त्रैलोक्यात संचार करत असतात. परीक्षित राजाला सात दिवसत मृत्यू येणार परंतु तुझ्या नाम उच्चारामुळे तो मुक्त झाला. अरे भगवंता तुझ्या नामचे इतके मोठे गहन महत्व आहे की, केवळ वाह्ल्या कोळ्याने अखंड तुझे नाम स्मरण केले म्हणून त्याने त्या नामाच्या जोरावर राम आवतारच्या आधी रामायण लिहिले. तुकाराम महाराज म्हणतात तुला वेद सगुण निर्गुण असे म्हणतात पण तुझ्या नामात तसा भेद नाही.
अभंग क्र. ९५९
भूतदयापरत्वे जया तया परी । संत नमस्कारी सर्वभावे ॥१॥
शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथे ॥धृपद॥
हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संता तैसी ॥२॥
सरिता वोहोळ गंगा सागरा समान । लेखी तयाहून अधम नाही ॥३॥
आणीक अमुप होती तारांगणे । रविसी समान लेखू नये ॥४॥
तुका म्हणे नाही नम्रता अंगी । नव्हे ते फिरंगी कठिण लोह ॥५॥
अर्थ

मनुष्य व प्राणी या मध्ये ज्याच्या त्याच्या योग्यतेने दया दाखवावी परंतु संतांना सर्वभावे नमस्कार करावा. जर तू शिकल्याचा ताठा (अभिमान) धरशील तर तुला यम मार्गाने जावा लागेल. हिरा परीस मोहरा यांची तुलना दगडाशी होऊ शकत नाही त्याप्रमाणे संतांनची तुलना सामान्य माणसाशी करू नये. नद्या ओढे यांना जर गंगे प्रमाणे किंवा सागराप्रमाणे मानले तर त्याच्या इतका दुष्ट कोणी नाही. आकाश गंगेत अनेक तारांगणे आहेत पण त्यांची तुलना सूर्‍याशी करू नये माणू नये. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या अंगी नम्रता नाही ते कठीण लोखंड प्रमाणे आहेत असे समजावे.
अभंग क्र. ९६०
आणीक मज काही नावडती मात । एका पंढरिनाथावांचुनिया ॥१॥
त्याचीच कथा आवडे कीर्तन । ते मज श्रवणे गोड लागे ॥२॥
तुका म्हणे संत म्हणोत भलते । विठ्ठलापरते न मनी काही ॥३॥
अर्थ

एक पंढरीनाथ म्हणजे विठोबा या वाचून मला काहीच आवडत नाही कोणतीही गोष्ट आवडत नाही. या विठोबाचे कीर्तन आणि कथा हे मला आवडते आणि तेच श्रवण करायला मला गोड वाटते. तुकाराम महाराज म्हणतात संत दुसरे काहीही म्हणोत पण मी या विठ्ठला वाचून मी बाकी काही मानत नाही.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version