Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१५ मार्च, दिवस ७४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ८७७ ते ८८८

“१५ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 15 March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक १५ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ८७७ ते ८८८ चे पारायण आपण करणार आहोत.


१५ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी १ ते २५,

सार्थ श्रीज्ञानेश्वरी: ॥
॥ अथ सप्तमोऽध्यायः – अध्याय सातवा ॥
॥ ज्ञानविज्ञानयोगः ॥

अध्याय सातवा
श्रीभगवानुवाच :
मय्यासक्तमना: पार्थ योगं युञ्जन्मदाश्रय: ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥7. 1॥
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषत: ।
यज्ज्ञात्वा नेहभूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥7. 2॥

1-7
आइका मग तो अनंतु । पार्थाते असे म्हणतु । पै गा तू योगयुक्त । जालासि आता ॥1॥
श्रोतेहो, ऐका. मग श्रीअनंत पार्थाला म्हणाले :- अरे, तू निश्चयेंकरून योगयुक्त झालास.
2-7
मज समग्राते जाणसी ऐसे । आपुलिया तळहातीचे रत्न जैसे । तुज ज्ञान सांगेन तैसे । विज्ञानेसी ॥2॥
आता मी तुला व्यावहारिक (प्रापंचिक) ज्ञानासह ब्रह्मज्ञान अशा रितीने सांगेन की, त्या योगाने, तळहातावरील रत्न आपण पहातो, त्याप्रमाणे तू मला सगळा ओळखशील.
3-7
एथ विज्ञाने काय करावे । ऐसे घेसी जरी मनोभावे । तरी पै आधी जाणावे । तेचि लागे ॥3॥
या ठिकाणी प्रापंचिक ज्ञानाशी काय करावयाचे आहे, असा जर तुझ्या मनाचा ग्रह होईल तर आधी खरोखर तेच समजून घेतले पाहिजे.
4-7
मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे । जैसी तीरी नाव न ढळे । टेकलीसांती ॥4॥
मग ज्ञानाच्या साक्षात्काराच्या वेळी बुद्धीची नजर थांबते. ज्याप्रमाणे तीराला टेकलेली नाव हालत नाही
5-7
तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउली निघे । तर्कु आयणी नेघे । आंगी जयाचा ॥5॥
त्याप्रमाणे, ज्या ठिकाणी बुद्धिचा शिरकाव होत नाही, विचारही मागे राहतो आणि तर्काचा हुरूप मोडतो, त्यालाच ज्ञान असे म्हणतात.


6-7
अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हे विज्ञान । तेथ सत्यबुद्धि ते अज्ञान । हेही जाण ॥6॥
अर्जुना, बाकीची सर्व प्रापंचिक ज्ञाने त्याला विज्ञान असे म्हणतात; आणि प्रपंच खरा मानणे हे खरे अज्ञान होय असे समज.
7-7
आता अज्ञान अवघे हरपे । विज्ञान नि:शेष करपे । आणि ज्ञान ते स्वरूपे । होऊनि जाईजे ॥7॥
आता, सर्व अज्ञान नाहीसे होईल, विज्ञान समुळ जळुन जाईल आणि मुर्तिमंत ज्ञान प्रकट होईल.
8-7
ऐसे वर्म जे गूढ । ते किजेल वाक्यारूढ । जेणे थोडेन पुरे कोड । बहुत मनीचे ॥8॥
ज्याच्या योगाने सांगणाराचे बोलने खुंटते, ऐकणाराची इच्छा कमी होते, आणि अमुक मोठे व अमुक लहान असा भेद रहात नाही;
9-7
जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे । ऐकतयाचे व्यसन तुटे । हे जाणणे साने मोठे । उरो नेदी ॥9॥
व जे थोडे ऐकले असता सुद्धा मनातील पुष्कळ हेतु पुर्ण होतील, ते गुप्त तत्त्व तुला सांगतो.

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ॥7. 3॥

10-7
पै गा मनुष्यांचिया सहस्रशां- । माजि विपाइलेयाची येथ धिंवसा । तैसेया धिंवसेकरा बहुवसां- । माजि विरळा जाणे ॥10॥
अरे, खरोखर हजारो मनुष्यात एखाद्यालाच या ज्ञानाची इच्छा होते, आणि तसेच, ज्ञानाची इच्छा उत्पन्न झालेल्या पुष्कळांत मला तत्त्वतः जाणणारा क्वचितच सांपडतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


11-7
जैसा भरलेया त्रिभुवना- । आतु एक एकु चांगु अर्जुना । निवडूनि कीजे सेना । लक्षवरी ॥11॥
ज्याप्रमाणे मनुष्यांनी भरलेल्या त्रिभुवनात फौजेमध्ये ठेवण्याकरिता एकेक चांगला शूर निवडून लक्षावधि फौज तयार करितात,
12-7
की तयाहीपाठी । जे वेळी लोह मांसाते घाटी । ते वेळी विजयश्रीयेचां पाटी । एकुचि बैसे ॥12॥
आणि त्यातूनही, ज्या वेळेस तलवारींचे घाव, शरीरावर बसतात त्या वेळेस एखादाच विजयश्रीचा अधिकारी होतो,
13-7
तैसे आस्थेचा महापुरी । रिघताति कोटिवरी । परी प्राप्तीचा पैलतीरी । विपाइला निगे ॥13॥
त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाच्या प्राप्तीच्या आस्थेच्या पुरांत कोट्यवधि लोक उड्या टाकतात, परंतु एखादाच तिच्या पैलथडीस जातो. (एखाद्यालाच माझी प्राप्ति होते).
14-7
म्हणऊनि सामान्य गा नोहे । हे सांगता वडील गोठी गा आहे । परी ते बोलो येईल पाहे । आता प्रस्तुत ऐके ॥14॥
म्हणुन, ही सामान्य गोष्ट नसुन मोठी श्रेष्ठ आहे; परंतु ती पुढे सांगता येईल. प्रस्तृत (तुला विज्ञानाचे रुप) सांगतो ते ऐक.

भूमिरापोऽनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च ।
अहंकार इतीयं मे भिन्नाप्रकृतिरष्टधा ॥7. 4॥

15-7
तरी अवधारी गा धनंजया । हे महदादिक माझी माया । जैसी प्रतिबिंबे छाया । निजांगाची ॥15॥
हे धनंजया, ऐक; आपल्या अंगाची पडछाया असते, त्याप्रमाणे ही महदादि तत्त्वे म्हणजे माझी माया होय.


16-7
आणि इयेते प्रकृति म्हणिजे । जे अष्टधा भिन्न जाणिजे । लोकत्रय निपजे । इयेस्तव ॥16॥
हिलाच प्रकृति असे म्हणावे; व हिचे आठ निरनिराळे प्रकार आहेत असे समजावे; आणि हिच्यापासून हे त्रैलोक्य उत्पन्न होते.
17-7
हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसी । तरी तेचि गा आता परियेसी । विवंचना ॥17॥
ही आठ प्रकारांनी कशी निराळी आहे अशी शंका जर तू मनात आणशील, तर तोच विचार सांगतो, ऐक.
18-7
आप तेज गगन । मही मारुत मन । बुद्धि अहंकार हे भिन्न । आठै भाग ॥18॥
उदक, तेज, आकाश, पृथ्वी, वायु, मन, बुद्धि आणि अहंकार हे तिचे निरनिराळे आठ प्रकार आहेत.

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।
जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥7. 5॥

19-7
आणि या आठांची जे साम्यावस्था । ते माझी परम प्रकृति पार्था । तिये नाम व्यवस्था । जीवु ऐसी ॥19॥
पार्था, ह्या आठ भागांची साम्यस्थिति (एकीकरण) ती माझी परमप्रकृति, आणि तिलाच जीवभुता ही संज्ञा आहे.
20-7
जे जडाते जीववी । चेतनेते चेतवी । मनाकरवी मानवी । शोक मोहो ॥20॥
ही अचेतनाचे (शरीराचे) जीवना करते, ज्ञानाला चेतना देते, आणि मनाला शोक व मोह मानण्यास लाविते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


21-7
पै बुद्धिचा अंगी जाणणे । ते जियेचिये जवळिकेचे करणे । जिया अहंकाराचेनि विंदाणे । जगचि धरिजे ॥21॥
हे पहा की, हिच्या सान्निध्याने बुद्धीच्या अंगी ज्ञान उत्पन्न होते, व ही अहंकाराच्या कुशलतेने जगाला धारण करिते.

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।
अहं कृत्स्नस्य जगत: प्रभव: प्रलयस्तथा ॥7. 6॥

22-7
ते सूक्ष्म प्रकृति कोडे । जै स्थूळाचिया आंगा घडे । तै भूतसृष्टीची पडे । टांकसाळ ॥22॥
ही सूक्ष्म (परा) प्रकृती जेव्हा स्वच्छेने स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते, तेव्हा सृष्टीतील प्राण्यांची टांकसाळ सुरू होते.
23-7
चतुर्विधु ठसा । उमटो लागे आपैसा । मोला तरी सरिसा । परी थरचि आनान ॥23॥
त्या टांकसाळींत आपोआप चार प्रकारचे ठसे उमटू लागतात. त्यातील पंचमहाभुतांची योग्यता सारखीच असते, परंतु जाति भिन्न असतात.
24-7
होती चौऱ्यांसी लक्ष थरा । येरा मिती नेणिजे भांडारा । भरे आदिशून्याचा गाभारा । नाणेयांसी ॥24॥
त्यांच्या चौऱ्यांशी लक्ष जाति असून, त्या जातीत आणखी किती जाति आहेत त्यांची गणती नाही. अशा पुष्कळ नाण्यांनी (जातींनीं) निराकार शून्य म्हणजे अव्यक्ताचा गाभारा भरून जातो.
25-7
ऐसे एकतुके पांचभौतिक । पडती बहुवस टांक । मग तिये समृद्धीचे लेख । प्रकृतीचि धरी ॥25॥
याप्रमाणे पंचमहाभूतांचे एकसारखे पुष्कळ ठसे बनतात व त्यांच्या वृद्धिची गणना प्रकृति (माया) हीच ठेवते.

दिवस ७४ वा, १५, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १५ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ८७७ ते ८८८
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ८७७
रवीचा प्रकाश । तोचि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥१॥
आता हाचि वसी जीवी । माझे अंतरी गोसावी । होऊ येती ठावी । काय वर्मे त्याच्याने ॥धृपद॥
सवे असता धणी । आड येऊ न सके कोणी । न लगे विनवणी । पृथकाची करावी ॥२॥
जन्माचिया गति । येणे अवघ्या खुंटती । कारण ते प्रीति । तुका म्हणे जवळी ॥३॥
अर्थ

एकदा कि सूर्योदय झाला की अंधाराचा नाश होतो. पण जर अनेक दिवे लावले तर रात्र नाहीशी होत नाही. अगदी त्याप्रमाणे आता माझ्या अंतरंगात माझा स्वामीचे माझ्या जीवामध्ये वास्तव्य होवो. जेणेकरून आज पर्यंत ज्या काही गोष्टी होत्या जी काही वर्मे आहेत ती सर्व वर्मे मला माहीत होतील. राजा जर आपल्या बरोबर असेल तर रस्त्यामध्ये कोणीही आपल्याला आडवे येऊ शकत नाही. मग कोणाचीही विनाकारण विनवणी करावी लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जर हरी आपल्याबरोबर असेल तर जन्म-मरणाच्या सर्व गतीच खुंटतात. परंतु हे सर्व करत असताना आपल्या जवळ हरी विषय प्रेम असू द्यावे.
अभंग क्र. ८७८
ऐसे सांडुनिया धुरे । किविलवाणी दिसा का रे । कामे उर भरे । हाती नुरे मृत्तिका ॥१॥
उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥धृपद॥
न लगे पुसावी चाकरी । कोणी वकील ये घरी । त्याचा तोचि करी । पारपत्य सकळा ॥२॥
नाही आडकाठी । तुका म्हणे जाता भेटी । न बोलता मिठी । उगीच पायी घालावी ॥३॥
अर्थ

या सच्चिदानंद रुपास सोडून तुम्ही केविलवाणे का बरे झालात ? काम रुपी वासना तुमच्या हृदयात निर्माण झाली कि शेवटी तुमच्या हातात माती सुद्धा राहणार नाही. उदार असा सर्व श्रेष्ठ दान शूर असा परमात्मा तो भक्तांचा अभिमानी आहे त्याला तुम्ही तुलसी पत्र शुध्द पाणी वाहून चिंतन करावे तो तुमच्या चिंतनाचा भुकेला आहे त्याला तुमच्या चिंतांची अपेक्षा आहे. अहो तुम्ही देवाचे किती स्मरण करता किती सेवा करता किती चिंता करता ? हे तुम्हाला कोणीही विचारावयास येणार नाही त्यासाठी कोणत्याही वकिलाची म्हणजे मध्यस्तीची गरज नाही त्याचा तोच सर्व दुखाचे निवारण करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात या परमात्म्याच्या भेटीला जाताना कसलीही आड कठी येत नाही काही न बोलता तुम्ही त्याला शुद्ध भावाने शरण जा त्याच्या चरणकमलाला मिठी घाला.
अभंग क्र. ८७९
उपकारी असे आरोनी उरला । आपुले तयाला पर नाही ॥१॥
लाभावरी घ्यावे सापडले काम । आपला तो श्रम न विचारी ॥धृपद॥
जीवा ऐसे देखे आणिका जीवांसी । निखळचि रासि गुणाचीच ॥२॥
तुका म्हणे देव तयांचा पागिला । न भंगे संचला धीर सदा ॥३॥
अर्थ

जो दुसर्‍यावर उपकार करण्यासठी सदैव तत्पर असतो त्याच्या ठिकाणी दुजा भाव नसतो. ज्यात परोपकार आहे असे काम संपन्न करण्यात त्याला मोठा लाभ वाट असतो अश्यावेळी त्याला किती श्रम करावे लागतात याचा तोविचार हि करत नाही व परवा हि करत नाही. असा हा मनुष्य इतरांच्या जीवाची काळजी घेतो व हा मनुष्य म्हणजे फक्त सद्गुनांचीच खाण असते. तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारे आपल्या हृदयात ज्याने परोपकाराचे धैर्य जपलेले असते त्या भक्तांचा देव अंकित झालेला असतो.
अभंग क्र. ८८०
कोण पुण्ये यांचा होईन सेवक । जीही द्वंदादिक दुराविले ॥१॥
ऐसे वर्म मज दावी नारायणा । अंतरीच्या खुणा प्रकटोनि ॥धृपद॥
बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥२॥
तुका म्हणे मग नये वृत्तीवरी । सुखाचे शेजारी पहुडईन ॥३॥
अर्थ

कोणत्या पुण्याईने मी जे संत महात्मे सुख व दुख यांचा त्याग केल्यावर त्यांचा मी सेवक होईल ? हे नारायणा मला ते वर्म सांग कि ज्या मुळे माझ्या अंतःकरणातील गुह्य ज्ञान प्रकट करून संतांची भेट होईल. हे हरी अश्या संताची भेट होणे खूप अवघड आहे म्हणून मी तुम्हाला हि करुणा केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात या संतांचीची मला जर भेट घडली तर मी वृत्तीहीन होईल आणि मी जे अखंड सुख आहे त्या चिद आनंदा जवळ वीरज मान होईल किंवा त्या जवळ मी राहीन.
अभंग क्र. ८८१
क्षणक्षणा सांभाळितो । साक्षी होतो आपुला ॥१॥
न घडावी पायी तुटी । मने मिठी घातली ॥धृपद॥
विचारतो वचना आधी । धरूनि शुद्धी ठेविली ॥२॥
तुका म्हणे मागे भ्यालो । तरी जालो जागृत ॥३॥
अर्थ
हरी चरणी माझे मन रममाण झाले आहे ते कोठेही जाऊ नये म्हणून मी क्षण क्षणाला त्याचा सांभाळ करतोय आणि त्याचा मीच माझा साक्षीदार आहे. म्हणून मी तुमच्या चरणाला जी मिठी घातली आहे ती कधी तुटू नये म्हणू सावधगिरी बाळगतो आहे. या पूर्वीही कित्येक वेळा मी असा अनुभव घेतला आहे कि हरी आज्ञेचे विस्मरण झाले की, तुकाराम महाराज म्हणतात हरी चरणाचा वियोग होतो आणि मी हे पाहूनच सावध झालो आहे.
अभंग क्र. ८८२
आणूनिया मना । आवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥१॥
यासी अनुसरल्या काय । घडे ऐसे वाया जाय । देखिले ते पाय । सम जीवी राहाती ॥धृपद॥
तो देखावा हा विध । चिंतने ते कार्य सिद्ध । आणिका संबंध । नाही पर्वकाळासी ॥२॥
तुका म्हणे खळ । होती क्षणेचि निर्मळ । जाऊनिया मळ । वाळवंटी नाचती ॥३॥
अर्थ
अनेक ठिकाणी फीरून मानाने शेवटी तो पंढरीचा राणा पंढरपूर निवासी तो विठ्ठल परमात्मा याच्या चरणासी जाऊन लीन व्हावे हे योग्य आहे असे ठरविले. या हरीच्या चरणी कोणी शरण गेले तर वाया जाईल काय ? त्याचे सम चरण पाहता क्षणीच मनात ठसतात. या हरीचे दर्शन झाले हेच पूजा विधी आहे. त्याचे चिंतन केले तर सर्व कार्य सिद्धीस जाते व दुसऱ्या कोणत्याही पर्वकाळासी संबंध ठेवण्याची वेळ येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूरला कोणी सहज जरी गेले तरी त्याच्या पापाचे मळ क्षणात निघून जातात मग तो वाळवंटात हरिनामाच्या छदाने आंनदाने नाचू लागतो.
अभंग क्र. ८८३
धरिता पंढरीची वाट । नाही संकट मुक्तीचे ॥१॥
वंदू येती देव पदे । त्या आनंदे उत्साहे ॥धृपद॥
नृत्यछंदे उडती रज । हे सहज चालता ॥२॥
तुका म्हणे गरुड टके । वैष्णव निके संभ्रम ॥३॥
अर्थ

जो मनुष्य पंढरीची वाट धरतो त्याला मुक्तीचे संकट नाही. हरीनाम सोहळ्यात हरी चरणांना वंदन करण्यास त्या सोहळ्याच्या उत्सहसाठी आंनदाने देव स्वर्गावरून खाली येतात. वैष्णव जे पंढरपूरला चाललेले असतात त्यांच्या चालण्याने जे त्यांच्या चरणांचे रज उडतात त्याच्या आशेने देव तेथे येतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वैष्णवांच्या हातात गरुड ध्वज आहे तेथे कोणताही संभ्रम न धरता तेच खरे वैष्णव आहेत असे समजावे.
अभंग क्र. ८८४
नाम घेता मन निवे । जिव्हे अमृतचि स्रवे । होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥१॥
मन रंगले रंगले । तुझ्या चरणी स्थिरावले । केलिया विठ्ठले । ऐसी कृपा जाणावी ॥धृपद॥
जाले भोजनसे दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसे । अंगा येती उद्गार ॥२॥
सुख भेटो आले सुखा । निध सापडला मुखा । तुका म्हणे लेखा । आता नाही आनंदा ॥३॥
अर्थ

हरी नाम घेता मनाला शांती लाभते. आणि ते हरी नाम घेताना असे वाटते कि जिभेवर वर हरी नाम घेल्यावर शुभ शकुनाचे लाभ होतात. मन हे आता हरी चरणी रंगले आहे. स्थिरावले आहे व हि कृपा विठ्ठलानेच केली आहे. हरीनाम भोजनाने विषय इच्छेवर दगड पडलेला भासतो आणि हे चिन्ह आपोपाप दिसून येतात. आणि आपल्या अंगावर दिसून येतात आणि तसे उद्गार मुखावाटे बाहेर येतात. पांडुरंग रुपी सुख हे आमच्या वाणीला सुख देतात. व तो ठेवा आम्हाला मुखा द्वारे सापडलातुकाराम महाराज म्हणतात या आंनदाला आता पारावार नाही.
अभंग क्र. ८८५
रुची रुची घेऊ गोडी । प्रेमसुखे जाली जोडी ॥१॥
काळ जाऊ नेदू वाया । चिंतू विठोबाच्या पाया ॥धृपद॥
करू भजन भोजन । धणी घेऊ नारायण ॥२॥
तुका म्हणे जीव धाला । होय तुझ्याने विठ्ठला ॥३॥
अर्थ

हे देवा तुझ्या जवळ जे आम्हाला प्रेमसुख लाभले आहे आता आम्ही ते प्रेम सुख आनंदाने घेऊ. आम्ही एक क्षण देखील वाया जाऊ देणार नाही कायम त्या विठोबाच्या पायचे चिंतन करू. हरीनाम रुपी भजन आणि भोजन करून आम्ही तृप्त होऊ. हे विठ्ठला तुझ्याच चिंतनाने जीव समाधान पावतो.
अभंग क्र. ८८६
वेळोवेळा हेचि सांगे । दान मागे जगासि ॥१॥
विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊ धणी पंगतीसी ॥धृपद॥
वेचतसे पळे पळ । केले बळ पाहिजे ॥२॥
तुका म्हणे दुश्चित नका । राहो फुका नाड हा ॥३॥
अर्थ

मी जगासी हेच दान मागत आहे व जगाणे तसेच वागावे की, श्री विठ्ठलाचे चिंतन सर्वानी करावे या पांडुरंगाचे चिंतन करणे हे मंगल आहे संतांच्या पंगतीस बसून आपण विठ्ठल नाम भोजन सेवन करू क्षणा क्षणाला आपले आयुष्य सरत आहे त्या करता आपण हरी भजना साठी ओढ घेतली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात जर हरी भजना विषयी आलास केला तर तुम्ही फुकट फसाल.
अभंग क्र. ८८७
आणीक ऐसे कोठे सांगा । पांडुरंगा सारिखे ॥१॥
दैवत ये भूमंडळी । उद्धार कळी पाविते ॥धृपद॥
कोठे काही कोठे काही । शोध ठायी स्थळासी ॥२॥
आनेत्रींचे तीर्थी नासे । तीर्थी वसे वज्रलेप ॥३॥
पांडुरंगीचे पांडुरंगी । पाप अंगी राहेना ॥४॥
ऐसे हरे गिरिजेप्रति । गुह्य स्थिती सांगितली ॥५॥
तुका म्हणे तीर्थ क्षेत्र । सर्वत्र हे दैवत ॥६॥
अर्थ

हे जन हो या पांडुरंगा सारखे दैवत अन्य कोठे आहे का ? या कलियुगात हेच एक दैवत आहे कि ते जीवाचा उद्धार करण्यास समर्थ आहे. बाकी दैवातामध्ये काही तरी न्युन असलेले आपल्याला दिसून येते. इतर ठिकाणी केलेल्या पातकाचे क्षालन हे तीर्थाने होते पण तीर्थे करत असताना केलेले पातक जात नाही. आपण केलेले कर्म पांडुरंगाला अर्पण केले तर ते त्याला अर्पण होते आणि आपल्या अंगी पाप हि राहत नाही. प्रभू शंकराने पार्वतीला हेच गुह्य ज्ञान रहस्य सांगितले आहे. तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूर हे तीर्थ क्षेत्र म्हणजे पांडुरंगाचेच रूप आहे.
अभंग क्र. ८८८
पुराणीचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥
नव्हती हे आहाच बोल । मोकळे फोल कवित्व ॥धृपद॥
भावे घ्या रे भावे घ्या रे । एकदा जा रे पंढरिये ॥२॥
भाग्ये आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥
पापपुण्या करिल झाडा । जाइल पीडा जन्माची ॥४॥
घ्यावी हाती टाळदिंडी । गावे तोंडी गुणवाद ॥५॥
तुका म्हणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥६॥
अर्थ

पुराणातील इतिहासाचा गोड रस मी ग्रहण सेवन केलेला आहे. म्हणून मी जे बोल बोलतो ते इतरांच्या काव्य प्रमाणे वाया जात नाही. म्हणून मी जे बोल बोलतो आहे त्या मधील तुम्हीअर्थ लक्षात घेऊन पंढरीला अवश्य जा. अहो तुम्ही भाग्यवान आहात कारण तुम्हला मनुष्य देह मिळाला आहे म्हणून या विठ्ठलाचे दर्शन घ्या. त्यामुळे तुमच्या पाप पुण्याचा झाडा होऊन ते नष्ट होईल आणि तुमच्या जन्म मरणाची पीडाच टळेल. हातात टाळविना घेऊन या विठ्ठलाचे गुणगान गावे. तुकाराम महाराज म्हणतात असे केल्याने तुम्हाला घट पट व इतर मार्ग शोधावे लागणार नाही.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version