ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग ३, (९ ते १२)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


       राम,सीता,लक्ष्मण रावणाचा पराभव झाल्यावर,त्याच्या मृत्युनंतर लंके ची सारी व्यवस्था लावून अयोध्येत परत आले.संपूर्ण अयोध्यानगरी नववधूसारखी नटून त्यांच्या स्वागतास सज्ज झाली. नंतर रामाचा अभिषेक झाला.सर्व स्थिर स्थावर झाल्यावर सुमित्रेने स्वतः पुढाकार घेऊन लक्ष्मण-उर्मिलेचा………………………….

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! ऊर्मिला !!!

!!!  उर्मिला  !!!

                     भाग – ९.

         विश्वामित्रांचा निरोप घेऊन चौघीही  आपल्या प्रासादाकडे निघाल्या.त्या प्रासादाजवळ पोहोचल्या तेवढ्यात त्यांच्या कानावर लक्ष्मणाचे रागीट शब्द कानावर पडले.मला विवाह करायचा नाही हे वारंवार सांगूनही कां माझ्यावर लादल्या जात आहे?राम समजावत म्हणाले,कां असा हेकटपणा करतोस?तूं विवाह केला नाही तर आपली किती लाजिरवाणी अवस्था होईल?उर्मिलेला कळलं हे बोलणं आपल्याच संबधीच आहे,ती जागीच थबकून पुढे ऐकू लागली मी विवाह न करणेच योग्य आहे,त्यामुळे इतरांची ह्रदय तरी भंग होणार नाही.मग असे उर्मिलेला जाऊन सांग,कदाचित ती तुला समजावून घेऊ शकेल राम म्हणाले.

मी तिला कसं सांगू?उर्मिलाला हे सारं असह्य झालं,पुढचं ऐकण्याआधीच ती  तीथून निघाली,तर पावलांचा आवाज आल्याने लक्ष्मणाने गवाक्षातून पाहिले. त्याच्या चेहर्‍यावर औदासिन्य,अविश्वास पसरला.गवाक्षातून लक्ष्मणाने तिला साद घातली.थांब मिला,थांब…पण ती न थांबता तडक,लहानपणापासून जेव्हा तिला शांती एकांताची गरज असे,त्या वेळी या दाट झाडीत येऊन बसत असे. ती अतिशय अस्वस्थ होती.डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते.ह्रदय भंग झालेलं,मनांतील वेदना कांही केल्या कमी होत नव्हत्या.म्हणजे त्यांचं प्रेम नव्हतं तर?तिच्याशी त्यांना विवाह करायचा नव्हता तर?हा नकार पचवणं तिला जड जात होता.त्यांनी दाखवलेल्या परकेपणाने,वागण्याने तिचं मन,आत्मा, अस्तित्व अंतर्बाह्य ढवळलं होतं.ती मन मानेल तशी झाडीत पळत होती.हुंदक्यां नी शरीर थरथरु लागलं.तिचं हरवलेलं प्रेम,छिन्नविछिन्न झालेला विश्वास,वेदना की अपमान,नेमकं कशाचं दुःख जास्त हेच तिला समजेना.त्यांच्या प्रेमात पडण्याचा मुर्खपणा घडला का?त्यांना आयुष्यभर जपावं,सोबत करावी असं कां वाटत होतं?ते मिळणार नाही हे सत्य पचवणं कठीण जात होत.त्याहून त्यांना

ती नकोशी ही भावनाच तिला मुळापासून उध्वस्त करीत होती.सूर्य माथ्यावर आला तेही तिला कळलच नाही.आपण न दिसल्याने प्रासादात गोंधळ उडेल,त्या आधी आपण जायला हव हे कळत होत. पण लक्ष्मण आपल्याशी विवाहास तयार नाही हे कसं सांगावे?

           तेवढ्यात झाडीत खसखस झाली.कुणी प्राणी असेल तर रक्षणार्थ आपल्याजवळ शस्र नाही हे लक्षात आल्यावर,एखादी झाडाची फांंदी किंवा दगड शोधावा म्हणून इकडे तिकडे पाहत असतांनाच अचानक लक्ष्मणच समोर अवतीर्ण झाले.तिला मिठीत घेण्याची अनिवार इच्छा महत् प्रयासाने दाबली. कांही वेळापूर्वी रामाशी बोलण्याची आठवण झाली.खरं तर ते शब्द तिच्या साठी नव्हतेच.पण दुर्देवाने तिने ऐकले. रामाशी बोलण्याआधी तिच्याशी संवाद साधायला हवा होता.त्यांना तिथे बघून , तुम्हाला ही वाट कशी गवसली?तुला शोधण्यासाठी आकाशपाताळ एक करुं शकतो मिला! मि..ला या शब्दातील ओलावा तिला सहन झाला नाही.

          आवेगाने म्हणाली,अशी हाक परत नका मारु..कंठ दाटून आल्यामुळे तिला धड बोलताही येईना.मिला तुला दुखवण्याचा हेतू बिलकुल नव्हता.तू जे ऐकलेस त्यामागे फार मोठं वास्तव आहे. तुला सत्य सांगायचय पण.. पण काय? सांगण्याचं तेवढ धाडस नव्हतं ना? स्पष्टीकरण नकोय…उद्वेगाने लक्ष्मण म्हणाले,धाडस नाही अस नाही तर ह्रदय गमावलं जे तुला देऊ केलं …आणि त्या मुळेच पुढचं सारं कठीण झालं,माझं तुझ्यावर आत्यंतिक प्रेम आहे.मनापासून तूं मला हवी आहेस.तरी सुध्दा तुलां प्राप्त करुं शकत नाही.

           कडवटपणे उर्मिला म्हणाली,पुरे करा…मी स्वतः बोलणे ऐकले आहे.मिला तूं ऐकलस ते अर्धवट.मी तुला सांगीतल्या वर तुला गमवण्याची भिती वाटत होती.तूं माझ्या प्रेमाचा स्विकार करशील की नाही याची खात्री नव्हती.अगदी पहिल्यांदा तुला उपवनात बघितले,तेव्हाच माझं जीवन आमुलाग्र बदललं.माझी मनःशांती तत्व,वचनं…पूर्वीचं कांहीच उरलं नाही. माझं मन,ह्रदय,स्वाभिमान सारं सारं तूं हिरावून घेतलस.तुला आनंदी ठेवण्याचं कुठलही वचन देऊं शकत नसल्यामुळेच तुझ्याशी विवाह करुं शकत नाही हेच रामाला सांगत होतो.मिला..तुझ्यावर माझं अफाट प्रेम आहे.तरी सुध्दा विवाह करुं शकत नाही.मिला!मी उध्वस्त आहेगं

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. १६-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                   भाग -१०.

       लक्ष्मण पुढे बोलतच राहिले.. आजन्म अविवाहित राहण्याचं ठरवलं आहे.अष्टौप्रहर रामाबरोबर राहणे हेच माझं जीवन आहे.राम माझे सर्वस्व आहे.  सखा,गुरु,जीवन,आत्मा,त्याच्याशिवाय माझं अस्तित्वच नाही.मी त्याचीच सावली आहे.आजपर्यंत याच पध्दतीने वाढलो आणि घडलोही..

          माझी आई सुमित्रा इतर राण्यां प्रमाणे राजघराण्याची वंशज नसून तीचं घराणं दासीचं आहे अशी आवई उठवली  म्हणून मी रामाची सेवा करतो असे सर्व म्हणतात,पण मला या प्रवादाशी कांही घेणं देणं नाही.माझ्या मातेइतकी  दुसरी हुशार स्री दुसरी क्वचितच असेल.राम माझा ईश्वर आहे.त्याची सेवा आणि संरक्षण करणे हेच माझं कर्तव्य आहे हे बाळकडू तीने मला माझ्या जन्मापासून पाजले. मी रामाचा दास आहे.मोठ्या बंधूप्रति स्वतःला संपूर्ण समर्पित केलेला धाकटा भाऊ असच मी स्वतःला समजतो.आज वर हेच माझ्या आयुष्याचे ध्येय होत आणि अचानक तूं माझ्या आयुष्यात आलीस.त्यांच्या डोळ्यातील आर्जव बघून ती विरघळू लागली.कोणत्याही स्री कडे मी आकर्षित होणार नाही असाच ठाम समज असल्यामुळे आजन्म अविवाहित राहण्याचा निश्चय होता. कधी प्रेमात पडेल असे वाटलेच नाही.नुसता पडलोच नाही तर आकंठ बुडलो

           एखादी स्री इतकी सर्वगुणसंपन्न असू शकते असं वाटलंच नव्हतं.माझ्या तत्वाप्रमाणेच,तुझ्या बहिणी तुझा जीवनाधार आहे हे लक्षात आल्यावर मी जास्तच आकृष्ट झालो.खर सांगायच तर  मी प्रेमप्रवाहात गंटागंळ्या खाऊ लागलो. नेमकी त्याचवेळी मनात विचित्र भीती निर्माण झाली.प्रेमाच्या या अनिवार ओढी मुळे कर्तव्यच्युत झालो तर?रामाच्या सेवेत चित्त विचलित झाले तर?खरं तर तू प्रत्येकवेळी वेगवेगळी विलोभनीय वाटत होती आणि मी वेडावत होतो.मला तूं संपूर्ण हवी होतीस,त्याचवेळी माझ्या तत्वांची आठवण येऊन मी तुला पूर्णपणे समर्पित होऊ शकणार नाही असे वाटत होते.रावणाने तुझ्याकडे पाहण्याचं धारिष्ट्य केलं तेव्हा माझा संताप अनावर झाला होता.इतर राजपुत्रांनी अपमानास्प द गोंधळ घातला होता तेव्हा इर्षा,असूये ने पेटून उठलो.तुला गमावण्याची भीती वाटत होती.त्याचवेळी लक्षात आले की, मी तुझ्या प्रेमात पडलो.परंतु कृतीत आणू शकत नाही हेही लक्षात आले होते. आणि याच नैराश्यामुळे स्वतःला तुझ्या पासून दूर ठेवू लागलो.तूं माझी कधीच होऊ शकणार नाही हे माहीत असल्यामुळेच…..

         चुकतय तुमचं!मी तुमचीच आहे, पण तुम्ही मात्र माझे नाहीत.आहे ग!आहे  एवढं उत्कट,आंधळेपणे,अविचाराने कधीही कुणावर प्रेम केले नाही.माझ्या तील “तो” मला सतत वास्तव्याची जाणीव करुन देतो.मी सर्वस्वाने तुझा होऊ शकेल कां?आयुष्यात तुला सुख देऊ शकेल कां?या विचारांतच मी बंदिस्त झालोय ग…

        उर्मिलाच्या मनांतील राग,दुखावले ल्या भावना सर्व नाहीशा झाल्यात आणि हळुवार स्वरात म्हणाली,प्रेम म्हणजे देणं आणि तुम्ही स्वतःला मला द्यायला तयार नाही.मला तुमचं संपूर्ण समर्पन नकोय, मी तुमच्यावर प्रेम करीत असले तरी, तुमच्या निष्ठा,श्रध्दा माझेमुळे विसराव्या, कर्तव्यापासून विन्मुख व्हावे असे  मला कधीच वाटणार नाही.तुमच्या भावांच्या, कुटुंबाच्याबद्दल असलेल्या निष्ठेच्या आड मी कधीही येणार नाही.त्याचप्रमाणे माझे कुटुंब,बहिणींपासून दुरावणार नाही हे ही तेवढेच ठामपणे सांगते.माझं जसं त्यांचे वरचं प्रेम कमी होणार नाही,तसच तुमचं ही होऊ नये.पण कधी तरी संघर्ष होऊ शकेल म्हणून कां प्रेम त्यागावं?अशा त्यागाला काय अर्थ?

         कदाचित माझ्या आयुष्यात द्विधा अवस्था निर्माण झालीच तर,मी रामाचीच निवड करेन..याच विषयावर तुझ्याशी सविस्तर बोलायचे होते,पण त्यापूर्वीच…

जर आपला विवाह झालाच तर तुझ्या कडे संपूर्ण लक्ष देणे,तुला आनंदी,सुखी ठेवणे माझे कर्तव्य असेल पण तसं करुं शकणार नाही.तुझ्यावर अन्याय होईल,तू दुखावल्या जाशील.निवडीची वेळ आली तर तुझ्याऐवजी मी भावाची निवड करेन म्हणून मी विवाहास नाही म्हणतोय!लक्ष्मण कठोर पण सत्य सांगत होते. त्यांच्या स्पष्टोक्तीचं कौतुक करावं की, तिरस्कार हेच तिला समजत नव्हतं.स्वतः चे आयु

ष्य भावाला समर्पित केल्यामुळे ते तिला सामावून घेऊ शकत नव्हते. ज्यांच्यावर ती वेड्यासारखं प्रेम करीत होती.सत्य समजल्यावर विवाह करावा का?लक्ष्मण म्हणाले, हे सर्व तुला समजावून सांगायचे होते.पण मी लग्न करीन हे तातांनी गृहित धरुन आपणां सर्वांचे लग्न निश्चित केले.या परिस्थितीतू न कसं बाहेर पडावं,समजत नाही तुमची

 द्वीधा मनःस्थिती समजते,पण जगाला, समाजाला पिताजींना कसे समजवणार?

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. १७-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                   भाग -११.

        लक्ष्मण म्हणाले,मी तुला कधीही अपमानित होऊ देणार नाही,तशी वेळ आलीच तर स्वतःला संपवेन.सत्य तातांना सांगेन..काय सांगणार? तुम्हा दोघां भावांमधे मी येऊं शकेन या भितीने तुम्ही  विवाह करायला तयार नाही?निःश्वास टाकत लक्ष्मण म्हणाले,तुझ्यावर माझे कितीही प्रेम असले तरी मी विवाह करुं शकत नाही.माझ्या तत्वापायी तुझे जीवन,तुझा आनंद पायदळी नाही तुडवणार….

        झालं तुमचं बोलून?आतां मी काय सांगते ते नीट ऐका!स्री आयुष्यात एकच वेळा प्रेम करते आणि माझ पहिलं आणि शेवटचं प्रेम तुम्ही आणि तुम्हीच आहात. निर्णय तुमच्या हाती आहे.लग्न मोडून माझ्या नशीबावर सोडून द्या,किंवा भावा प्रती असलेला समर्पित भाव कायम ठेवून माझ्याशी विवाह करणे.पती म्हणून तुमच्याशिवाय दुसर्‍याचा विचारही करुं शकत नाही.तुम्हाला मी स्विकारार्ह आहे?माझंही तुमच्यावर उत्कट प्रेम आहे स्वतःच्या तत्वापायी मला मात्र कायमचे गमावून बसाल.भविष्याचा विचार करुन  वर्तमानापासून वंचित राहणे उचित नाही. मी तुम्हाला रामापासून कधीही हिरावून घेणार नाही हे तुम्हाला वचन देते.

            प्रासादात ऊर्मिलेने पाय ठेवल्या बरोबर तिन्ही बहिणींनी प्रश्नांचा भडीमार केला.मग उर्मिलेने कांहीही न लपवता हातचं कांहीही राखून न ठेवता.सारं सांगीतलं..आणि विवाहास कां तयार नाही हे सांगून म्हणाली,हा नियम फक्त मलाच नाही तर आपणां सर्वांना लागू आहे कारण त्या चौघा भावांत आपल्या सारखेच दृढबंध आहे.भविष्यात आपल्याला सारख्याच परिस्थितीला तोंड द्यावं लागेल हे जाणूनच विश्वामित्रांनी आपल्या चार बहिणींची निवड केली.

          त्या चार भावांमधील प्रेम असिम समर्पनाच्या पायावर उभं आहे.विशेषतः रामाप्रती त्या तिन्ही भावांचे बंधूभाव वाखाणण्यासारखं आहे.स्विकार करण्या वाचून त्यांचेपुढे पर्याय नव्हता.

    त्यांच्या विवाहाची तयारी सुरु असतां राजपुरोहित शतानंद जनकराजा समोर येऊन म्हणाले,इतरांच्या पत्रिका तर व्यवस्थित जुळल्या पण रामाच्या पत्रिके त मंगळ दोष असल्यामुळे,सीतेच्या आयुष्यात दुःखच येईल म्हणून हा विवाह रद्द करणे योग्य होईल.राजकुटुंबात एकच खळबळ उडाली.राजपुरोहितांच्या भविष्यकथनावर जनकांची नितांत श्रध्दा विश्वास होता.रामाने पण जिंकला होता. त्यामुळे जनकाची स्थिती मोठी विकट झाली होती.दुसर्‍या दिवशी सकाळी वरां कडील मंडळी मिथिलेला पोहचणार, तेव्हा राजा दशरथ व त्यांच्या पुत्रांना कसं सामोरं जायच? सुनयनाने ठामपणे मी माझ्या मुलीच्या भवितव्याशी खेळू इच्छित नाही असे म्हटल्यावर,सीतेने आपल्या मातापित्यांना ठासून सांगीतले, मी रामालाच पती मानले व जन्मोजन्मी हाच सहचर म्हणून स्विकारला आहे.त्या मुळे आतां कुठलाही वाद किंवा तडजोड नको.रामाशी जर विवाह होत नसेल तर  आजन्म अविवाहित राहीन.

          राजपुरोहितांच्या भाकितानुसार तू राजकन्या असूनही वैवाहिक जीवनाचा अधिकांश भाग अरण्यात घालवावा लागेल.माझं त्यांचेवर निःस्सीम प्रेम असल्यामुळे त्यांचेसोबत प्रत्येक परिस्थितीत सुखी राहीन.विवाह झाला नाही तर मात्र दुःख होईल.सीतेचा दृढ निश्चय पाहून सुनयनाला स्वतःची आठवण झाली.तिचेही असेच नव्हते कां झाले?कसंनुसं हसून म्हणाली,होऊ दे तुझ्या मनासारखं!सुखी भव!हाच आशिर्वाद उर्मिलेने स्वतःसाठी ग्राह्य धरला.कारण उर्मिलेने आपल्या कर्मठ, परंपरा,रीतीरुढीनुसार वागणार्‍या आईला तीने लक्ष्मणाबद्दल कांहीच सांगीतले नव्हते.

           दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे राजा दशरथ धाकट्या दोन पुत्रांसह मिथीला नगरीत पोहोचले.नेहमीप्रमाणे देवदर्शनास निघालेल्या मांडवी व श्रुतीची घालमेल सुरु होती.आणखी एक दिवसा ने ज्या राजपुत्रांशी त्या विवाहबध्द होणार होत्या,त्यांना एकदा प्रत्यक्ष बघण्याची ओढ होती.आणि त्यांची प्रार्थना फळास आली.रोजची पुजा आटोपून त्या परत येत असतांना,उपवनात फिरणार्‍या राज पुत्रांवर त्यांची नजर पडली.राजकन्यांना आज हळद लावण्याचा विधि असल्याने, आपल्या  वाग्दत्त वरांकडे जेमतेम नेत्र कटाक्ष फक्त टाकू शकल्या.उर्मिला लक्ष्मणाचा वेध घेत असतांना त्यांच्या समवेत तीन भावांसह एक सुंदर स्री होती ती हसून बोलत असलेली बघून उर्मिले च्या ह्रदयात असूयेची कळ उठली.कोण असेल ती स्री?त्या दोघांमधील सहज हसणे बोलणे उर्मिलेला सतावू लागले.

                     क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
                   दि. १७-१-२०२२.

!!!  उर्मिला  !!!

                  भाग -१२.

          इकडे राजमहालात राजा दशरथ, वसिष्ठमुनी,राजा जनक,विश्वामित्र आणि राजगुरु शतानंद यांनी चारही जोडप्यां साठी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सुयोग्य मुहुर्त सुनिश्चित केला.

            विवाहदिनी चारही वधू आपल्या आवडत्या रंगाच्या वधूवेषात तयार झाल्या.विवाहविधी अंतिम टप्प्यात आली होती.सनई चौघड्यांच्या जयघोषा त चारही वधूंनी आपापल्या वरांच्या गळ्यात पुष्पमाला घातल्या.विवाह सोहळा संपन्न होत असतांना शत्रृघ्न आपल्या मिस्कील स्वभावाने सर्वांना हसवित होता.उर्मिलेची नजर मात्र त्या सुंदर तरुणीवर खिळलेली होती.ती तरुणी राजा दशरथ व राणी कौसल्याची मोठी मुलगी रामाची थोरली बहिण शांता होय,हे समजल्यावर उर्मिला स्वतःलाच धिक्कारुं लागली.ती राजकन्या असली तरी तिचे जीवन सुखनैव गेले नव्हते.ती राजकन्या म्हणून जरी जन्माला आली असली तरी,राणी कौशल्येची मोठी बहिण वार्शिणी व तिचा पती अंगदेश नरेश लोपपाद या निपुत्रिक जोडप्याने तिला दत्तक घेतले होते.ती अर्भकावस्थे पासूनच आपल्या मातापित्यांपासून दूर अंगदेशची राजकुमारी म्हणून वाढूं लागली.तिने वेद,कला,कौशल्य,संगीता चा गाढा अभ्यास करुन पांडित्य प्राप्त केलं होत.अतिशय रुपवान शांताचा विवाह राजपुत्राशी न होता ऋष्यशृंग ऋषींशी झाला आणि राज्यावर कोसळले ल्या भीषण दुष्काळापासून सर्वांची सोडवणूक केली होती.

         शातांनंतर दशरथ राजाला मूल बाळ न झाल्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. या यज्ञासाठी शांताचे पती ऋष्यशृंग ऋषींना पाचारण केले होते.या यज्ञाचा प्रसाद म्हणून दशरथांना राम,लक्ष्मण, भरत,शत्रृघ्न हे चार पुत्र प्राप्त झाले.या चारही राजकुमारांच्या विवाहास ऋष्यशृंग ऋषी हजर होते.ते विश्वामित्रां शी गहन चर्चेत गढले असतांना शांताला येतांना बघून,त्यांच्या चेहर्‍यावरची गंभीर भाव जाऊन मार्दव उमटले.त्या दोघांची प्रेमकथा चित्तवेधक होती.

           शांता भेटण्यापूर्वी ऋष्यशृंग ऋषी  एकांतवासात जीवन कंठीत होते.त्यांचा जन्म झाल्यावर त्यांची माता म्हणजेच उर्वशीने त्यांचे पिता विभंदकांच्या सुपुर्द केले होते.त्यांचा तपोभंग करण्यासाठी इंद्राने उर्वशीला पृथ्वीवर पाठवले होते. तिचे कार्य संपल्यावर ती निघून गेली. तिच्या अश्या विश्वासघातामुळे समस्त स्री जातीविषयी त्यांच्या मनांत तिरस्कार निर्माण झाला आणि हीच भावना त्यांनी आपल्या पुत्रामधे निर्माण केली.जन्मा नंतर ऋष्यशृंगांना कधीच स्री दर्शन झाले नव्हते.पित्याने त्यांना घनदाट अरण्यात एकांतात ध्यानधारणेची दीक्षा दिली होती

         रोमपाद राज्यात अवर्षण व दुष्काळाचं पडलेलं संकट,ज्याने कठोर ब्रम्हश्चर्य पालन केलं अश्याच व्यक्तीकडून यज्ञ केल्यास हे संकट दूर होऊ शकेल असं भाकित केल्यावर,ऋष्यशृंगाशिवाय दुसरं कुणीही नव्हतं.पण त्या घनदाट अरण्यातील दुर्दम्य अंतरभागात जाऊन कोण त्यांना पाचारण करेल?आणि महत्वाचे म्हणजे,जंगलाच्या सुरक्षित परिसरातून विभंदकांनी आपल्या पुत्राला बाहेर येऊ दिलं असतं का?

         अश्या कठीण व अडचणीच्या प्रसंगी शांताने पुढाकार घेतला.राजवारांग ने ला सोबत घेऊन ती त्या दाट अरण्यात शिरली.विभंदक ऋषी कुटीपासून दूर गेल्याची संधी साधून तीने ऋष्यशृंगांची भेट घेतली.अनपेक्षितपणे दोन सुंदर स्रीया समोर बघून ते बावरले.बघताक्षणी च ते शांताच्या प्रेमात पडले.अग्निहोत्र पूजा करण्यासाठी त्यांना आपल्या राज्यात येण्याची गळ घातली.प्रेमाची गोडी पहिल्यांदाच अनुभवणार्‍या ऋषीने यायचे कबूल केले.आपल्या संतप्त पित्या पासून दूर, ते शांताबरोबर अंगदेशी आले  तिथल्या रुक्ष भूमीवर आपल्या शक्तीचा वापर करुन पाऊस पाडला.त्यांच्या पौरोहित्याखाली यज्ञाला प्रारंभ झाला. आभाळांत ढगांची दाटी झाली आणि इकडे विदंभकांच्या मनात संतापाने पेट घेतला.पुत्राला परत आणण्यासाठी तावा तावाने अंगदेशी पोहोचले तेव्हा आपल्या पुत्राचा विवाह राजकन्येशी होत असलेचे दिसले.त्यांनी मनाला समजावून शांत केले.संतापलेल्या श्वशूरांनी आपल्या गोड वाणीने व मृदु स्वभावाने जिंकले.वृध्द विभंदकांनी आपल्या पुत्र,स्नुषेला सौख्य पूर्ण,फलदायी,आनंदी व दीर्घ वैवाहिक जीवन जगण्याचा आशिर्वाद दिला.

          अशी ही वस्रालंकाराने सजलेली शांता रामाच्या मागे उभी होती.उर्मिलेने तिच्याकडे आदराने बघितले.तिने लक्ष्मणाला वरमाला घातल्यावर,शांता म्हणाली, गुरु परशुरामांच्या कोपापासून जसे सौमित्रला तू वाचवले होते,तसेच मी माझ्या संतप्त श्वशूरांचा राग कसा शांत केला होता ते आठवले.प्रिये तू सदैव अशीच आनंदात राहशील शांताने आशिर्वाद दिला.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि.  १७-१-२०२२.

ऊर्मिला चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading