Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

28. कुळ वतन म्हणजे काय ? 96 कुळी मराठा

कुळ वतन Kul Vatan वंशावळ VANSHAVAL KUL 96 KULI MARATHA DEVAK GOTRA 96 कुळी मराठा देवक गोत्र

कुळदैवत व कुळदेवी आणि कुलदेवता ह्या सर्व एकच असतात का वेगवेगळ्या ?
या साठी आपल्या कुळाचा कुळवृतांत ची फाईल बनवून घेणे.

कुळ वतन म्हणजे काय ?
KUL VATAN
KUL WATAN

कुळातील एखाद्याने किंवा समुदायाने (गटाने) विशेष कार्य केले असता त्याने राजाला, राज घराण्याला, किंवा समाजाला किंवा जीवाला, धनधान्याला, स्वता:च्या जीवाची पर्वा न करता रक्षण केले असेल, किंवा हिताची गोष्ट कोणतीही सकाम भावना न ठेवता जीवावर उदार होऊन कार्य केलास त्याला त्याने जिंकलेला किंवा राजाच्या मर्जीने काही गांवे, किंवा १ गांव हे वतन म्हणून दिल्या जात असे,

त्या वतनाची लेखी नोंद राजदरबारी होऊन त्यावर राजाची मुद्रा (शिक्का) मारून ते कागदावर, तांब्याच्या पत्रावर, भूर्जपत्रावर, कापडावर सन्मानपूर्वक दिल्या जात असे,
हे वतन दिल्या गेल्यापासून गावातील महत्वाचे न्यायनिवाडे, पंचायती कामे, पाटीलकीची कामे, सण उत्सवाच्या प्रसंगी, वतनदारांचा मान असतो.

आजही २०२२ मध्ये सुद्धा आमच्या मांगवाडी गावात बैलपोळ्याचा बैलाला तोरण धरण्याचा मान मानकरी लोकांनाच आहे. बैल पोळ्याच्या दिवशी गावातील गांवकामगार वतनदाराच्या दारी सर्वात प्रथम पूजा करण्यासाठी येतात.

आजही आपल्या मराठा समाजात वतनदार हे आडनांव आहे.
पोळा, शिमगा, (होळी) गुढीपाडवा, दसरा, इत्यादींवेळी वतनदारांचा मान पहिला असायचा.

संपूर्ण-माहिती-पहा

Exit mobile version