“१५ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 15 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १५ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३८१७ ते ३८२८ चे पारायण आपण करणार आहोत.
१५ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ७५१ ते ७७५ ,
751-18
पै ग्रहांमाजी इंगळु । तयाते म्हणिजे मंगळु । तैसा तमी धसाळु । गुणशब्दु हा ॥751॥
सर्व ग्रहात जो इंगळ (निखाऱ्याप्रमाणे ताप देणारा) त्यालाही मंगळ म्हणत नाहीत काय ? तसा तमाला गुण हा ढसाळ हा (साधरण) शब्द आहे. 751
752-18
जे सर्वदोषांचा वसौटा । तमचि कामऊनि सुभटा । उभारिला आंगवठा । जया नराचा ॥752॥
हे सुभटा अर्जुना, सर्व दोषांचे वसतिस्थान जो तमोगुण, तो कमवून त्या नराची मूर्ती बनवली आहे: 752
753-18
तो आळसु सूनि असे कांखे । म्हणौनि निद्रे कही न मुके । पापे पोषिता दुःखे । न सांडिजे जेवी ॥753॥
ज्याप्रमाणे पापांचे पोषण केले असता दुःख सोडीत नाही, त्याप्रमाणे तो काखेत आळस बाळगून असतो; म्हणून निद्रा त्याला कधी सोडत नाही, 753
754-18
आणि देहधनाचिया आवडी । सदा भय तयाते न सांडी । विसंबू न सके धोंडी । काठिण्य जैसे ॥754॥
आणि ज्याप्रमाणे दगडापासून कठीणपणा कधी दूर होत नाही, त्याप्रमाणे देहरूप धनावर त्याची नेहमी अत्यंत प्रीति असल्यामुळे त्याला भव्य सोडत नाही; 754
755-18
आणि पदार्थजाती स्नेहो । बांधे म्हणौनि तो शोके ठावो । केला न शकेपाप जावो । कृतघ्नौनि जैसे ॥755॥
आणि कृतघ्न मनुष्याचे पाप जाण्याविषयी कितीही खटपट केली असता जसे ते जात नाही, तसे पदार्थमात्राच्या ठिकाणी; प्रीती ठेवल्यामुळे तो शोकाचे राहण्याचे ठिकाण होतो; 755
756-18
आणि असंतोष जीवेसी । धरूनि ठेला अहर्निशी । म्हणौनि मैत्री तेणेसी । विषादे केली ॥756॥
आणि रात्रंदिवस असंतोष आपल्या जीवाशी बांधून ठेवला असल्यामुळे विषादाने ज्याच्याशी मैत्री केली आहे 756
757-18
लसणाते न सांडी गंधी । का अपथ्यशीळाते व्याधी । तैसी केली मरणावधी । विषादे तया ॥757॥
लसुनाची घाण जशी त्याजपासून दूर होत नाही, किंवा कुपथ्य करणाऱ्या मनुष्याला व्याधी सोडीत नाही, त्याप्रमाणे विषादाने त्याचबरोबर आजन्म मैत्री केलेली असते; 757
758-18
आणि वयसा वित्तकामु । ययाचा वाढवी संभ्रमु । म्हणौनि मदे आश्रमु । तोचि केला ॥758॥
आणखी तारुण्य, वित्त व काम यांचा जो गर्व वाहतो, म्हणून त्याच्या ठिकाणी मदही वास करतो; 758
759-18
आगीते न सांडी तापु । सळाते जातीचा सापु । का जगाचा वैरी वासिपु । अखंडु जैसा ॥759॥
अग्नीला जशी तप्तता सोडीत नाही, जातिवंत साप जसा आपला डाव धरण्याचा स्वभाव सोडत नाही अथवा भय हे जसे सर्व जगाचे वैरी असून त्याला सोडत नाही; 759
760-18
नातरी शरीराते काळु । न विसंबे कवणे वेळु । तैसा आथी अढळु । तामसी मदु ॥760॥
अथवा काळ हा शरीराला कधीही विसरत नाही, तसा तमोगुणाच्या ठिकाणी मद अखंड असतो. 760
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
761-18
एवं पांचही हे निद्रादिक । तामसाच्या ठाई दोख । जिया धृती देख । धरिले आहाती ॥761॥
याप्रमाणे निद्रा, भय, शोक, विशाद व मद हे पाच तमाचे दोष ज्या धैर्याने धारण केले आहेत, 761
762-18
तिये गा धृती नांवे । तामसी येथ हे जाणावे । म्हणितले तेणे देवे । जगाचेनी ॥762॥
त्याला धैर्याला तामस धैर्य असे म्हणतात, असे जगन्नायक भगवान श्रीकृष्ण बोलले. 762
763-18
एवं त्रिविध जे बुद्धि । कीजे कर्मनिश्चयो आधि । तो धृती या सिद्धि । नेइजो येथ ॥763॥
याप्रमाणे तीन प्रकारच्या बुद्धीने जो कर्माचा निश्चय केला. तो धैर्य शेवटास नेते. 763
764-18
सूर्ये मार्गु गोचरु होये । आणि तो चालती कीर पाये । परी चालणे ते आहे । धैर्ये जेवी ॥764॥
सूर्य उगवल्यावर मार्ग दिसू लागला त्यावरून मनुष्य पायांनी चालतो, परंतु चालनाराणे आणि धैर्य धारण केल्याशिवाय चालणे होत नाही, 764
765-18
तैसी बुद्धि कर्माते दावी । ते करणसामग्री निफजवी । परी निफजावया होआवी । धीरता जे ॥765॥
त्याप्रमाणे बुद्धी ही कर्माला दाखविते ते कर्म इंद्रिये उत्पन्न करितात, परंतु उत्पन्न होण्याला जे धैर्य लागते, 765
766-18
ते हे गा तुजप्रती । सांगीतली त्रिविध धृती । यया कर्मत्रया निष्पत्ती । जालिया मग ॥766॥
ते धैर्य तुला तीन प्रकारांनी सांगितले; आणि त्याच धैर्यामुळे तीन प्रकारचे कर्म उत्पन्न झाले. 766
767-18
येथ फळ जे एक निफजे । सुख जयाते म्हणिजे । तेही त्रिविध जाणिजे । कर्मवशे ॥767॥
मग त्याला जे फळ येते व ज्याला सुख अशी संज्ञा आहे, तेही कर्माप्रमाणे तीन प्रकारचे आहे, 767
768-18
तरी फळरूप ते सुख । त्रिगुणी भेदले देख । विवंचू आता चोख । चोखी बोली ॥768॥
तर फळरूप जे सुख, ते तीन गुणांनी निरनिराळे केलेले आहे. त्याचा आता स्पष्ट भाषणांनी विचार करू. 768
769-18
परी चोखी ते कैसी सांगे । पै घेवो जाता बोलबगे । कानीचियेही लागे । हातीचा मळु ॥769॥
ते स्पष्ट असे सांगेन म्हणशील तर शब्दाच्या मार्गाने सांगण्यास गेले असता शब्दांचा मळ त्याला लागतो व कर्ण द्वारा श्रवण केले असता, कर्णरोग हाताचा मळ त्याला लागतो. 669
770-18
म्हणौनि जयाचेनि अव्हेरे । अवधानही होय बाहिरे । तेणे आइक हो आंतरे । जीवाचेनि जीवे ॥770॥
म्हणून शब्दाचा व अवधानाचा अव्हेर करुन ते केवळ अंत:करणाने श्रवण कर. 770
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
771-18
ऐसे म्हणौनि देवो । त्रिविधा सुखाचा प्रस्तावो । मांडला तो निर्वाहो । निरूपित असे ॥771॥
असे बोलून देवांनी त्रिविध सुखाचे वर्णन करण्या विषयी प्रस्तावना केली, तीच व्यवस्था मी सांगतो, 771
सुखं त्विदानी त्रिविधं शृणु मे भरतर्षभ ।
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥18. 36॥
772-18
म्हणे सुखत्रयसंज्ञा । सांगो म्हणौनि प्रतिज्ञा । बोलिलो ते प्राज्ञा । ऐक आता ॥772॥
भगवान म्हणतात:- हे बुद्धिमंता अर्जुना, सुखाचे तीन रूपे गुणांच्या योगाने आहेत म्हणून तुला जे म्हटले होते ती सांगतो, ऐक. 772
773-18
तरी सुख ते गा किरीटी । दाविजेल तुज दिठी । जे आत्मयाचिये भेटी । जीवासि होय ॥773॥
हे किरीटी, जीवाला आत्म्याची भेट होती त्यावेळेस जो आनंद होतो, त्याला सुख असे म्हणावे. ते सुख तुला समजेल असे सांगतो. 773
774-18
परी मात्रेचेनि मापे । दिव्यौषध जैसे घेपे । का कथिलाचे कीजे रुपे । रसभावनी ॥774॥
जसे उत्तम औषध मात्रेच्या प्रमाणाने सेवन करावे अथवा रसाचे पुटे देऊन जसे कथलाचे रूपे करावे 774
775-18
नाना लवणाचे जळु । होआवया दोनि चार वेळु । देऊनि सांडिजती ढाळु । तोयाचे जेवी ॥775॥
किंवा मिठाचे पाणी करणे असल्यास ज्याप्रमाणे त्याजवर दोन-चारवेळ पाणी घालावे लागते, 775
दिवस ३१८ वा. १५, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३८१७ ते ३८२८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३८१७ (बाळकोडेचेअभंग)
वर्म दावी सोपे भाविका गोपाळा । वाहे त्यांच्या गळा पाले माळा ॥१॥
मान देती आधी मागतील डाव । देवा ते गौरव माने सुख ॥२॥
मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरी स्नान तेणे ॥३॥
वस्त्रे घोंगडिया घालुनिया तळी । वरी वनमाळी बैसविती ॥४॥
तिही लोकासी जो दुर्लभ चिंतना । तो धावे गोधना वळतिया ॥५॥
यांच्या वचनाची पुष्पे वाहे शिरी । नैवेद्य त्यांकरी कवळ मागे ॥६॥
त्यांचिये मुखींचे हिरोनिया घ्यावे । उच्छिष्ट ते खावे धणीवरी ॥७॥
वरी माथा गुंफे मोरपिसांवेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदे ॥८॥
छंदे नाचतील जयासवे हरी । देहभाव वरी विसरली ॥९॥
विसरली वरी देहाची भावना । ते चि नारायणा सर्वपूजा ॥१०॥
पूजा भाविकांची न कळता घ्यावी । न मागता दावी निज ठाव ॥११॥
ठाव पावावया हिंडे मागे मागे । तुका म्हणे संगे भक्ताचिया ॥१२॥
अर्थ
देवाने भाविक गोपाळांना आपल्या प्राप्तीचे अगदी सोपे वर्म दाखवून दिले ते वर्म म्हणजे एकनिष्ठ भक्तिभाव आणि त्या अनुषंगाने गोपाळ वागत होते गोपाळाने रानातील झाडाच्या पालांच्या माळा तयार करुन हरीच्या गळयात घातल्या ते ही अगदी प्रेमपूर्वक. खेळ खेळताना पहिला डाव कोणाचा हे विचारण्याचा मान ते देवाला देत असत आणि या मानानेच देवाला गौरव वाटून तो सुख मानत असत. हमामा, हुंबरी हे खेळ खेळत असताना जे गोपाळ आरडा ओरडा करायचे तेच मंत्र आहे असे देव मानायचा जलक्रिडा करत असताना देवाच्या अंगावर शिंतोडलेले पाणी हाच अभिषेक आहे असे देव मानायचा. ते गोपाळ रानामध्ये वनमाळी कृष्णाला खाली बसू देत नव्हते त्याला बसण्यासाठी आसन टा
12:21 Sdm:
अभंग क्र. ३८१८ (बाळकोडेचेअभंग)
भक्तजना दिले निजसुख देवे । गोपिका त्या भावे आळंगिल्या ॥१॥
आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरी हरी ॠणी ॥२॥
रुसलिया त्यांचे करी समाधान । करविता आपण क्रिया करी ॥३॥
क्रिया करी तुम्हा न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकासी ॥४॥
गोपिकासी म्हणे वैकुंठीचा पति । तुम्ही माझ्या चित्ती सर्वभावे ॥५॥
भाव जैसा माझ्याठायी तुम्ही धरा । तैसा चि मी खरा तुम्हालागी ॥६॥
तुम्हासी कळो द्या हा माझा साच भाव । तुमचा चि जीव तुम्हा ग्वाही ॥७॥
ग्वाही तुम्हा आम्हा असे नारायण । आपुली च आण वाहातसे ॥८॥
सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभवे सरसा आणूनिया ॥९॥
यांसी बुझावितो वेगळाल्या भावे । एकीचे हे ठावे नाही एकी ॥१०॥
एक क्रिया नाही आवघियांचा भाव । पृथक ते देव घेतो तैसे ॥११॥
तैसे कळो नेदी जो मी कोठे नाही । अवघियांचे ठायी जैसा तैसा ॥१२॥
जैसा मनोरथ जया चित्ती काम । तैसा मेघशाम पुरवितो ॥१३॥
पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥
गोकुळींच्या लोका लावियेला छंद । बैसला गोविंद त्यांचा चित्ती ॥१५॥
चित्ते ही चोरूनि घेतली सकळा । आवडी गोपाळांवरी तया ॥१६॥
आवडे तयांसी वैकुंठनायक । गेली सकळिक विसरोनि ॥१७॥
निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाही या देहाची शुद्धि कोणा ॥१८॥
कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव म्हणुनि तया चुंबन देती ॥१९॥
देती या टाकून भ्रतारांसी घरी । लाज ते अंतरी आथी च ना ॥२०॥
नाही कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका म्हणे वाचा काया मने ॥२१॥
अर्थ
देवाने भक्तांना निजसुख दिले आहे गोपीकांना प्रेम
12:21 Sdm:
अभंग क्र. ३८१९ (बाळकोडेचेअभंग)
मने हरीरूपी गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥
यांच्या भ्रतारांची धरूनिया रूपे । त्यांच्या घरी त्यापे भोग करी ॥२॥
करी कवतुक त्याचे तयापरी । एका दिसे हरी एका लेंक ॥३॥
एक भाव नाही सकळांच्या चित्ती । म्हणऊनि प्रीति तैसे रूप ॥४॥
रूप याचे आहे अवघेचि एक । परि कवतुक दाखविले ॥५॥
लेकरू न कळे स्थूल की लहान । खेळे नारायण कवतुके ॥६॥
कवतुक केले सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥७॥
अर्थ
गोकुळातील गवळयांच्या सुना मनाने हरीरुप झाल्या होत्या हरीच्या ठिकाणीच त्या असक्त झाल्या होत्या देहाविषयी त्या उदास झाल्या होत्या. देव त्यांच्याच नव-याचे रुपे धारण करुन त्यांचे भोग घेत होता. देव ज्याच्या त्याच्या परीने ज्याच्या त्याच्याशी लीला करत होता एकाला देव भगवंताप्रमाणेच दिसत होता तर एकाला लेकाप्रमाणे दिसत होता. कारण सर्वाच्या चित्तामध्ये एकच भक्तीभाव नव्हता त्यामुळेच देव ज्याच्या त्याच्या आवडीने जसे तसे रुप घेत असे. वस्तुत: पाहिले तर देवाचे एकच रुप आहे परंतु ज्याच्या त्याच्या आवडीने देवाने वेगवेगळे रुप धारण करुन कौतुकच दाखविले आहे. हा स्थूल आहे की मोठा आहे, लेकरु आहे की काय हे कोणालाही कळत नव्हते, अशा प्रकारे नारायण कौतुकाने खेळ खेळत होता. तुकाराम महाराज “देवाने अनेक रुपे अनेक सोंगे घेतले खरे परंतु हाच खरा जगाचा बाप आहे. ”
12:21 Sdm:
अभंग क्र. ३८२० (बाळकोडेचेअभंग)
जगाचा हा बाप दाखविले माये । माती खाता जाये मारावया ॥१॥
मारावया तिणे उगारिली काठी । भुवने त्या पोटी चौदा देखे ॥२॥
देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तियेपुढे ॥३॥
पुढे रिघोनिया घाली गळा कव । कळो नेदी माव मायावंता ॥४॥
मायावंत विश्वरूप काय जाणे । माझे माझे म्हणे देवा बाळ ॥५॥
बाळपणी रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥
अर्थ
गळा बांधऊनि उखळासी दावे । उन्मळी त्या भावे विमळार्जुन ॥७॥ @
न कळे जुनाट जगाचा जीवन । घातले मोहन गौळियांसी ॥८॥ @
सिंकी उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥९॥ @
तरी दुधडेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥१०॥ @
दुणी झाले त्याचा मानिती संतोष । दुभत्याची आस धरूनिया ॥११॥ @
आशाबद्धा देव असोनि जवळी । नेणती ते काळी स्वार्थामुळे ॥१२॥ @
मुळे याच देव न कळे तयांसी । चित्त आशापाशी गोवियेले ॥१३॥ @
लेकरू आमचे म्हणे दसवंती । नंदाचिये चित्ती तोचि भाव ॥१४॥ @
भाव जाणावया चरित्र दाखवी । घुसळिता रवी डेरियात ॥१५॥ @
डेरियात लोणी खादले रिघोनि । पाहे तो जननी हाती लागे ॥१६॥ @
हाती धरूनिया काढिला बाहेरी । देखोनिया करी चोज त्यासी ॥१७॥ @
सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियात ॥१८॥ @
यांसी पुत्रलोभे न कळे हा भाव । कळो नेदी माव देव त्यासी ॥१९॥ @
त्यासी मायामोहजाळ घाली फांस । देर आपणास कळो नेदी ॥२०॥ @
नेदी राहो भाव लोभिकांचे चित्ती । जाणता चि होती अंधळी ती ॥२१॥ @
अंधळी ती तुका म्हणे संवसारी । जिही नाही हरी ओळखिला ॥२२॥
12:22 Sdm:
अभंग क्र. ३८२१ (बाळकोडेचेअभंग)
ओळखी तयाची होय एका भावे । दुसरिया देवे न पविजे ॥१॥
न पविजे कदा उन्मत्त झालिया । दंभ तोचि वाया नागवण ॥२॥
वनवास देवाकारणे एकांत । करावी ही व्रततपे याग ॥३॥
व्रत याग यांसी फळली बहुते । होती या संचिते गौळियांची ॥४॥
यांसी देवे तारियेले न कळता । मागील अनंता ठावे होते ॥५॥
होते ते द्यावया आला नारायण । मायबापा ऋण गौळियांचे ॥६॥
गौळियांचे सुख दुर्लभ आणिका । नाही ब्रम्हादिका तुका म्हणे ॥७॥
अर्थ
देवाची ओळख एका भक्तिभावाने होते दुस-या कोणत्याही साधनेने देव प्राप्त होत नाही. उन्मत्त होऊन दंभाने वागले तर केवळ व्यर्थ फजिती होईल देव कधीही प्राप्त होणार नाही. देवाकरीता एकांत, वनवास, व्रत, तपे, याग करावेत. गवळयांनी पूर्वी केलेले व्रत, याग फळाला आले त्यांचे पूर्वसंचित खूप चांगले होते त्यामुळे तर त्यांचे व्रत, याग फळाला आले आहेत, फलद्रुप झाले आहेत. गवळयांना त्यांचे पूर्व पुण्याई चांगले होते या गोष्टी माहितच नव्हत्या परंतु देवाला त्या माहिती होत्या त्यामुळे तर देवाने त्यांना भवसागरातून तारले आहे होते. अहो या गवळयांचे मायबाप नंद यशोदेचे पूर्वी देवाकडे या नारायणाकडे सेवारुपी ऋण होते तेच देण्याकरता तेच फेडण्यासाठी देवाने गोकुळात अवतार घेतला. तुकाराम महाराज म्हणतात, “गवळयांना देवाकडून मिळालेले सुख हे दुर्लभ होते ते इतरांना काय ब्रम्हादिक देवांना देखिल दुर्लभच होते. ”
12:23 Sdm:
अभंग क्र. ३८२२ (बाळकोडेचेअभंग)
नेणतियांसाठी नेणता लाहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥१॥
माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तयांवरी ॥२॥
तयांवरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥
घेउनिया एके ठायी अवतार । एकी केला थोर वाढवूनि ॥४॥
उणा पुरा यासी नाही कोणी ठाव । सारिखा चि देव अवघियांसी ॥५॥
यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥
वाढला तो सेवाभक्तिचिया गुणे । उपचारमिष्टान्ने करूनिया ॥७॥
करोनिया सायास मेळविले धन । ते ही कृष्णार्पण केले तीही ॥८॥
कृष्णासी सकळ गाईं घोडे म्हैसी । समर्पिले दासी जीवे भावे ॥९॥
जीवे भावे त्याची करितील सेवा । न विसंबती नावा क्षणभरी ॥१०॥
क्षणभरी होता वेगळा तयास । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥
त्यांचे ध्यानी मनी सर्वभावे हरी । देह काम करी चित्त त्यापे ॥१२॥
त्याचे चि चिंतन कृष्ण कोठे गेला । कृष्ण हा जेविला नाही कृष्ण ॥१३॥
कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयीरा भेटो कृष्ण ॥१४॥
कृष्ण गाता ओंव्या दळणी कांडणी । कृष्ण हा भोजनी पाचारिती ॥१५॥
कृष्ण तया ध्यानी आसनी शयनी । कृष्ण देखे स्वपनी कृष्णरूप ॥१६॥
कृष्ण त्यास दिसे आभास दुश्चिता । धन्य मातापिता तुका म्हणे ॥१७॥
अर्थ
श्रीकृष्ण गोकुळामध्ये अज्ञानी मनुष्यासाठी देखील अज्ञानी व लहान होता, रडत आईच्या पाठीमागे भोजनासाठी लागत होता. या नारायणाला दोन आया यशोदा आणि देवकी तसेच दोन बाप नंद आणि वसुदेव होते परंतु दोघावरही त्याची सारखीच भावना होती. देवाचे दोघावरही म्हणजे नंद, यशोदा व वसुदेव, देवकी यांच्यावर समचित्त भाव होता. द�
12:23 Sdm:
अभंग क्र. ३८२३ (बाळकोडेचेअभंग)
कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी म्हणे ॥१॥
म्हणे कृष्णाविण कैसे तुम्हा गमे । वेळ हा करमे वायाविण ॥२॥
वायाविण तुम्ही पिटीता चावटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥
क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनिया ॥४॥
याचे सुख तुम्हा कळलियावरी । मग दारोदारी न फिराल ॥५॥
लटिके हे तुम्हा वाटेल खेळणे । एका कृष्णाविणे आवघेंचि ॥६॥
अवघ्यांचा तुम्ही टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥७॥
नावडे तुम्हास आणीक बोलिले । मग हे लागले कृष्णध्यान ॥८॥
न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिक ही ॥९॥
आणिक ही तुम्हा येती काकुलती । जवळी इच्छिती क्षण बैसो ॥१०॥
बैसो चला पाहो गोपाळाचे मुख । एकी एक सुख सांगतील ॥११॥
सांगे जव ऐसी मात दसवंती । तव धरिती चित्ती बाळा ॥१२॥
बाळा येती घरा घेउनिया जाती । नाही त्या परती तुका म्हणे ॥१३॥
अर्थ
यशोदा गवळणींना म्हणते, “अहो तुम्ही कोणतेही लौकिक व्यवहार करताना, कोणतही काम करताना, संसार करताना कृष्णाचेच नाम घ्यावे. ” पुढे ती गवळणींना म्हणते, “तुम्हाला कृष्णावाचून कसे करमते, तुमचा वेळ तरी कसा जातो व्यर्थ कृष्णाशिवाय तुम्हाला कसे बसवते ? व्यर्थ तुम्ही चावटया मारीत बसता त्यापेक्षा क्षणभर तरी जगजेठी कृष्णाचे नांव घ्यावे. ” अग तुम्ही एक क्षणभर तरी याच्या सुखाचा सोहळा घेऊन पहा. एकदा की, कृष्णाचे सुख समजले की, दारोदार तुम्ही फिरणारच नाही. एका कृष्णावाचून सर्व काही व्यर्थ खेळ आहेत हे तुमच्या लक्षात येईल. सर्वाची संगती टाकून देऊन तुम्ही अनंताला घेऊन रानात जावे. एकदा की, तुम्ह�
12:24 Sdm:
अभंग क्र. ३८२४ (बाळकोडेचेअभंग)
तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासी खेळता दिवस गमे ॥१॥
दिवस राती काही नाठवे तयांसी । पाहाता मुखासी कृष्णाचिया ॥२॥
याच्या मुखे नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥३॥
तटस्थ राहिले सकळ शरीर । इंद्रिये व्यापार विसरली ॥४॥
विसरल्या तान भुक घर दार । नाही हा विचार आहो कोठे ॥५॥
कोठे असो कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥
विसरल्या आम्ही कोणीये जातीच्या । वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥
एक जाल्या तेव्हा कृष्णाचिया सुखे । निःशंके भातुके खेळतील ॥८॥
खेळती भातुके कृष्णाच्या सहित । नाही आशंकित त्यांचे चित्त ॥९॥
चित्ती तो गोविंद लटिके दळण । करिती हे जन करी तैसे ॥१०॥
जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनिया ॥११॥
करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥
त्याणी केला हरी सासुरे माहेर । बंधु हे कुमर दीर भावे ॥१३॥
भावना राहिली एकाचिये ठायी । तुका म्हणे पायी गोविंदाचे ॥१४॥
अर्थ
महाराज म्हणतात, “एकदा की गवळणींनी कृष्णाला घरुन नेले की, दिवसभर गवळणी कृष्णासोबतच खेळत बसत असत दिवस जायचा तरी देखील त्या काही घरी माघारी येत नव्हत्या. ” एकदा की, त्या गवळणींनी कृष्णाचे मुख पाहिले की, त्यांना दिवस रात्र काहीच आठवत नव्हते. कृष्णाचे मुख पाहताना गवळणींच्या डोळयांना कधीही वीट येत नव्हता त्यांचे नेत्र कृष्णाच्या रुपाशी अगदी तटस्थ झाले होते. गवळणींचे सर्व शरीर, व्यापार तटस्थ झाले इंद्रियाचे सर्व व्यापार ते विसरुन गेले. गवळणी तहान, भूक, घरदार सर्व विसरुन गेल्या आपण कोठे आहोत याची देखील आठवण राहत नव�
12:24 Sdm:
अभंग क्र. ३८२५ (बाळकोडेचेअभंग)
गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामे भेद परि एक चि तो ॥१॥
एकाची च नामे ठेवियेली दोनी । कल्पितील मनी यावे जावे ॥२॥
जावे यावे तिही घरचिया घरी । तेथिची सिदोरी तेथे न्यावी ॥३॥
विचारिता दिसे येणे जाणे खोटे । दाविती गोमटे लोका ऐसे ॥४॥
लोक करूनिया साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥
लटिकी करिती मंगळदायके । लटिकी च एके एका व्याही ॥६॥
व्याही भाईं हरी सोयरा जावायी । अवघियांच्या ठायी केला एक ॥७॥
एकासि च पावे जे काही करिती । उपचार संपत्ति नाना भोग ॥८॥
भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाईं ॥९॥
लटिका च त्यांणी केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥
त्यांणी मृत्तिकेचे करूनि अवघे । खेळतील दोघे पुरुषनारी ॥११॥
पुरुषनारी त्यांणी ठेवियेली नावे । कवतुकभावे विचरती ॥१२॥
विचरती जैसे साच भावे लोक । तैसे नाही सुख खेळती त्या ॥१३॥
यांणी जाणितले आपआपणया । लटिके हे वाया खेळतो ते ॥१४॥
खेळतो ते आम्ही नव्हो नारीनर । म्हणोनि विकार नाही तया ॥१५॥
तया ठावे आहे आम्ही अवघी एक । म्हणोनि निःशंक खेळतील ॥१६॥
तया ठावे नाही हरीचिया गुणे । आम्ही कोणकोणे काय खेळो ॥१७॥
काय खातो आम्ही कासया सांगाते । कैसे हे लागते नेणो मुखी ॥१८॥
मुखी चवी नाही वरी अंगी लाज । वरणा याती काज न धरिती ॥१९॥
धरितील काही संकोच त्या मना । हासता या जना नाइकती ॥२०॥
नाइकती बोल आणिकाचे कानी । हरी चित्ती मनी बैसलासे ॥२१॥
बैसलासे हरी जयांचिये चित्ती । तया नावडती मायबापे ॥२२॥
मायबापे त्यांची न�
12:27 Sdm:
अभंग क्र. ३८२६ (बाळकोडेचेअभंग)
लीळाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥
मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनिया करी स्तनपान ॥धृपद॥
नभाचा ही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हाते त्यासि ॥२॥
हाते कुर्वाळुनी मुखी घाली घास । पुरे म्हणे तीस पोट धाले ॥३॥
पोट धाले मग देतसे ढेकर । भक्तीचे ते फार तुळसीदळ ॥४॥
तुळसीदळ भावे सहित देवापाणी । फार ते त्याहुनि क्षीरसागरा ॥५॥
क्षीराचा काटाळा असे एकवेळ । भक्तीचे ते जळ गोड देवा ॥६॥
देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्याठायी ॥७॥
त्यांचा हा अंकित सर्व भावे हरी । तुका म्हणे करी सर्व काज ॥८॥
अर्थ
स्वत: विविध प्रकारची लीला करणारा भगवान श्रीकृष्ण यशोदेच्या हाताने विविध प्रकारचे अलंकार व वस्त्रे नेसत होता व यशोदाही त्याला मांडीवर बसून घास भरवित असे. कृष्ण यशोदेच्या मांडीवर बसून स्तनपान करत असे त्यावेळी यशोदेला तो फुलासारखा हलका वाटत असे. नभाचाही साक्ष असलेला व पाताळाच्याही पलीकडे असलेल्या कृष्णाला यशोदा माता आपल्या हाताने कुरवाळत होती. यशोदा माता आपल्या हाताने कुरवाळून कृष्णाला घास भरवित असे त्यावेळी कृष्ण यशोदा माताला म्हणे, “आता पुरे झाले माझे पोट भरले आहे. ” पोट भरल्यानंतर कृष्ण् ढेकर देत असे अशा या कृष्णाला भक्तिपूर्वक तुळशीचे एक पत्र जरी वाहिले तरी त्याला ते पुष्कळ वाटत असे. तुळशीदळ आणि पाणी भक्तिभावपूर्वक देवाला वाहिले की, ते त्याला फार वाटत असे. एक वेळ क्षीरसागराचाही देवाला कंटाळा येईल परंतु भक्ताने अर्पण केलेले जल देवाला फार गोड वाटते. देवाला आपला भक्त जीवापेक्षाही जास्त �
12:27 Sdm:
अभंग क्र. ३८२७ (बाळकोडेचेअभंग)
जीयेवेळी चोरूनिया नेली वत्से । तयालागी तैसे होणे लागे ॥१॥
लागे दोही ठायी करावे पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥
माय झाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरी वत्से जीची तैसा झाला ॥३॥
झाला तैसा जैसे घरिंचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पावे ॥४॥
मोहरी पावे सिंगे वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रम्हादिकी ॥५॥
ब्रम्हांदिका सुख स्वपनी ही नाही । तैसे दोही ठायी वोसंडले ॥६॥
वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आईं तैसा जाला ॥७॥
लाघव कळले ब्रम्हयासी याचे । परब्रम्ह साचे अवतरले ॥८॥
तरले हे जन सकळ ही आता । ऐसे तो विधाता बोलियेला ॥९॥
लागला हे स्तुती करू अनंताची । चतुर्मुख वाची भक्ती स्तोत्रे ॥१०॥
भक्तिकाजे देवे केला अवतार । पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥
पृथिवी दाटीली होती या असुरी । नासाहावे वरीभार तये ॥१२॥
तया काकुलती आपल्या दासांची । तयालागी वेची सर्वस्व ही ॥१३॥
स्वहित दासांचे करावयालागी । अव्यक्त हे जगी व्यक्ती आले ॥१४॥
लेखा कोण करी यांचिया पुण्याचा । जयांसवे वाचा बोले हरी ॥१५॥
हरी नाममात्रे पातकांच्या रासी । तो आला घरासि गौळियांच्या ॥१६॥
गौळिये अवघी झाली कृष्णमय । नामे लोकत्रय तरतील ॥१७॥
तरतील नामे कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशी होईल पाप ॥१८॥
पाप ऐसे नाही कृष्णनामे राहे । धन्य तोचि पाहे कृष्णमुख ॥१९॥
मुख माझे काय जो मी वर्णू पार । मग नमस्कार घाली ब्रम्हा ॥२०॥
ब्रम्हा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हाचि देव ॥२१॥
देव चि अवगा झाला से सकळ । गाईं हा गोपाळ वत्से तेथे ॥२२॥
तेथे पाहाणे ��
12:28 Sdm:
अभंग क्र. ३८२८ (बाळकोडेचेअभंग)
कुंभपाक लागे तयासि भोगणे । अवघाचि नेणे देव ऐसा ॥१॥
देव ऐसा ठावा नाही जया जना । तयासि यातना यमकरी ॥२॥
कळला हा देव तयासीच खरा । गाई वत्से घरा धाडी ब्रम्हा ॥३॥
ब्रम्हादिका ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥
जाणवेल देव गौळियांच्या भावे । तुका म्हणे व्हावे संचित हे ॥५॥
अर्थ
सर्व जग देवाचेच स्वरुप आहे असे ज्याला समजत नाही त्याला कुंभीपाक नरकच भोगावा लागतो. ज्या लोकांना सर्वत्र देवच आहे हे समजत नाही त्यांना पुढे यमयातना करतो, त्यांना त्रास देतो ज्यावेळी ब्रम्हदेवाला कृष्णाचा खरा महिमा कळाला त्यावेळी ब्रम्हदेवाने चोरुन नेलेले गाई, गोपाळ, वत्स पुन्हा घरी पाठवून दिले. ब्रम्हादिक देवांना देखील हा देव अगोचर आहे तर मग सामान्य मनुष्याला देवाचा महिमा कसा जाणवेल ? तुकाराम महाराज म्हणतात, “जर आपले पूर्वसंचित आणि भक्तिभाव गवळयांसारखा असेल त्या गोपाळांसारखा असेल तरच आपल्याला देवाचा महिमा जाणवेल. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

