“१२ नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 12 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १२ नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३७८१ ते ३७९२ चे पारायण आपण करणार आहोत.
१२ नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ६७६ ते ७००,
676-18
का हींव ऐसा पदार्थु । घातलिया आगीआंतु । तेचि क्षणी धडाडितु । अग्नि होय ॥676॥
अथवा कितीही थंड पदार्थ जर अग्नित घातला तर तो अग्नी उलट त्याच क्षणी धडाडतो, 676
677-18
नाना सुद्रव्ये गोमटी । जालिया शरीरी पैठी । होऊनि ठाती किरीटी । मळुचि जेवी ॥677॥
किंवा अर्जुना, कितीही उत्तम पदार्थ असेल तरी त्याप्रमाणे ते पोटात गेले म्हणजे त्यांचा मलच होतो, 677
678-18
तैसे पुढिलाचे बरवे । जयाच्या भीतरी पावे । आणि विरुद्धचि आघवे । होऊनि निगे ॥678॥
त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले याने ऐकिले केले किंवा पाहिले तर ते त्याला सहन न होऊन तो उलट निंदा करू लागतो. (त्याला वाईट वाटते) 678
679-18
जो गुण घे दे दोख । अमृताचे करी विख । दूध पाजलिया देख । व्याळु जैसा ॥679॥
सर्पास दूध पाजले तरी ज्याप्रमाणे त्याचे विषच होते, त्याप्रमाणे दुसऱ्याचे गुण ऐकल्याबरोबर जो त्याच दुर्गुण मानतो; 679
980-18
आणि ऐहिकी जियावे । जेणे परत्रा साच यावे । ते उचित कृत्य पावे । अवसरी जिये ॥680॥
आणि इहलोकी कीर्ती होवून ज्याचे योगाने परलोक ही मिळेल असे कृत्य ज्यावेळेस प्राप्त होईल; 680
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
681-18
तेव्हा जया आपैसी । निद्रा ये ठेविली ऐसी । दुर्व्यवहारी जैसी । विटाळे लोटे ॥681॥
त्यावेळेस त्याला हटकून झोप ठेवल्याप्रमाणे येते; आणि वाईट कर्माचे वेळेस तीच झोप विटाळशी सारखी दूर राहते. 681
682-18
पै द्राक्षरसा आम्ररसा । वेळे तोंड सडे वायसा । का डोळे फुटती दिवसा । डुडुळाचे ॥682॥
हे पहा, द्राक्षांच्या किंवा आंब्याच्या दिवसात ज्याप्रमाणे कावळ्यास मुखरोग होतो, किंवा घुबडाचे डोळे ज्याप्रमाणे दिवसात फुटतात, 682
683-18
तैसा कल्याणकाळु पाहे । तै तयाते आळसु खाये । ना प्रमादी तरी होये । तो म्हणे तैसे ॥683॥
त्याप्रमाणे कल्याण होण्याची वेळ आली असता म्हणजे सत्संगती किंवा सत्शास्त्र अशी वेळ आली असता श्रवणाची वेळ आली असता त्याच्यावरच लोटतो, आणि अन्यायाचे कर्म करण्याचे वेळी तोच आळस त्याचे हुकुमात वागतो. 683
684-18
जेवीचि सागराच्या पोटी । जळे अखंड आगिठी । तैसा विषादु वाहे गाठी । जिवाचिये जो ॥684॥
जसा समुद्राची पोटात अग्नी(वडवानळ) अखंड जळत असतो, तसा याच्या अंतकरणात दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही, असा विशाद असतो. 684
685-18
लेंडोराआगी धूमावधि । का अपाना आंगी दुर्गंधि । तैसा जो जीवितावधि । विषादे केला ॥685॥
लेंड्यांचे विस्तवात जसा धूरच असतो किंवा अपानद्वाराने निघणारा वायू जसा दुर्गंधयुक्त असतो, तशी जन्मभर विषादाची गाठ ज्याच्या जीवाशी असते (विषयात मनात बाळगतो) 685
686-18
आणि कल्पांताचिया पारा । वेगळेही जो वीरा । सूत्र धरी व्यापारा । साभिलाषा ॥686॥
आणि अर्जुना, कल्पांताच्याही पलीकडे, लाभ होईल, अशा कल्पनेने व्यापाराला आरंभ करतो; 686
687-18
अगा जगाही परौती । शुचा वाहे पै चित्ती । करिता विषी हाती । तृणही न लगे ॥687॥
अरे, जगातील जे लोक व्यापार करीत नाहीत, ते करण्याविषयी मनात इच्छा धरून कर्म करतो, परंतु ज्यापासून तृणाचाही लाभ त्यास होत नाही, 687
688-18
ऐसा जो लोकाआंतु । पापपुंजु मूर्तु । देखसी तो अव्याहतु । तामसु कर्ता ॥688॥
असा जो लोकांमध्ये मूर्तिमंत पापाची राशीत होय, तो नि:संशय तामस कर्त जाण. 688
689-18
एवं कर्म कर्ता ज्ञान । या तिहीचे त्रिधा चिन्ह । दाविले तुज सुजन । चक्रवर्ती ॥689॥
याप्रमाणे अर्जुना, तुला कर्म, कर्ता व ज्ञान या तिन्हीची त्रिविध लक्षणे सांगितली. 689
बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु ।
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ॥18. 29॥
690-18
आता अविद्येचिया गावी । मोहाची वेढूनि मदवी । संदेहाची आघवी । लेऊनि लेणी ॥690॥
आता अज्ञानरूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयरुपी सर्व अलंकार घालून, 690
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
691-18
आत्मनिश्चयाची बरव । जया आरिसा पाहे सावयव । तिये बुद्धीचीही धाव । त्रिधा असे ॥691॥
आत्मनिश्चयाचा चांगलेपणाचा ज्या बुद्धीरूप आरशात स्पष्ट दिसतो, त्या बुद्धीचे तीन प्रकार आहेत, 691
692-18
अगा सत्वादि गुणी इही । कायी एक तिही ठायी । न कीजेचि येथ पाही । जगामाजी ॥692॥
अर्जुना, अरे ! या सत्व-रज-तम गुणांनी जगांतील कोणत्या वस्तूचे तीन प्रकार केले नाहीत ? 692
693-18
आगी न वसता पोटी । कवण काष्ठ असे सृष्टी । तैसे ते कैचे दृश्यकोटी । त्रिविध जे नोहे ॥693॥
पोटात अग्नी नाही असे या सृष्टीत कोणते लाकूड आहे ? त्याप्रमाणे जिचे तीन प्रकार नाहीत, अशी दृश्य वस्तुत कोणती वस्तू आहे ? 693
694-18
म्हणौनि तिही गुणी । बुद्धी केली त्रिगुणी । धृतीसिही वांटणी । तैसीचि असे ॥694॥
म्हणून या तीन गुणांनी बुद्धीचे तीन प्रकार केले आहेत. तसेच बुद्धीचेही तीन भेद झालेले आहेत. 694
695-18
तेचि येक वेगळाले । यथा चिन्ही अळंकारले । सांगिजैल उपाइले । भेदलेपणे ॥695॥
तेच निरनिराळे भेद त्यांच्या चिन्हासहवर्तमान विस्तारपूर्वक सांगतो. 695
696-18
परी बुद्धि धृति इया । दोही भागामाजी धनंजया । आधी रूप बुद्धीचिया । भेदासि करू ॥696॥
परंतु हे धनंजया, बुद्धी व धृत्ति या दोहोंपैकी अगोदर बुद्धीच्या भेदाची कारणे सांगतो. 696
697-18
तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा । संसारासि गा सुभटा । प्राणिया येतिया वाटा । तिनी आथी ॥697॥
तर हे सुभटा, मनुष्याला या संसारांत येण्यास उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे तीन मार्ग आहेत. 697
698-18
जे अकरणीय काम्य निषिद्ध । ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध । संसारभये सबाध । जीवा यया ॥698॥
ते तीन मार्ग म्हणजे अकरणीय, काम्य व निषिद्ध कर्म हे प्रसिद्ध आहेत आणि प्राणिमात्राला यांच्यापासून संसार भय प्राप्त असते. 698
प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये ।
बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥18. 30॥
699-18
म्हणौनि अधिकारे मानिले । जे विधीचेनि वोघे आले । ते एकचि येथ भले । नित्य कर्म ॥699॥
याकरिता, या लोकी अधिकारसमंत व विधीच्या ओघाने प्राप्त झालेले जे कर्म, ते नित्यकर्म एक उत्तम होय, 699
700-18
तेचि आत्मप्राप्ति फळ । दिठी सूनि केवळ । कीजे जैसे का जळ । सेविजे ताहने ॥700॥
तेच नित्यकर्म आत्मप्राप्ती रूप फळावर दृष्टी ठेवून, तृषा क्रांत मनुष्य जसे अत्यंत आदराने पाणी पितो तसे करावे. 700
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३१६ वा. १२, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३७८१ ते ३७९२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३७८१ (गवळणींचीअवस्था)
आलिये धावति धावति भेट होईल म्हुण । तव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥१॥
आता काय करू सांग वो मज भेटेल कैसा । हरीलागी प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥धृपद॥
लाविती उशीर बहुती बहु ओढिती ओढा । सांभाळिता सांग असांग दुःख पावल्ये पीडा ॥२॥
जळो आता संसारु वो कई शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागी जीव झुरे ॥३॥
अर्थ
माझी व कृष्णाची भेट होईल यासाठी मी धावत धावत आले परंतू कृष्णाच्या भेटीची वेळ टळली आणि केवळ माझे श्रमच उरले. आता मी काय करु मला सांगा मला हरी कसा भेटेल ते तुम्ही सांगा हरीवाचून माझा प्राण फुटू पाहात आहे मला त्याची मोठी अपेक्षा लागली आहे. अहो घरकाम करत असताना सर्वाची मर्जी मला सांभाळावी लागते त्यातच माझा खूप वेळ गेला त्या कामानेच माझी खूप ओढताण होते व त्यामुळे मला इकडे येण्यास उशीर झाला तर कृष्णाचीही भेट मला झाली नाही त्यामुळे माझ्या जीवाला खूप दु:ख व पीडा झाली. तुकाराम महाराज म्हणतात, “त्या गोपीकेला असे वाटत होते की आता हा संसार केव्हा जुळून जाईल तर जावो याचा शेवट कधी होईल तर होवो अशा प्रकारे गोपीकाचा जीव कृष्णासाठी झुरत होता. ”
12:57
अभंग क्र. ३७८२ (गवळणींचीअवस्था)
घाली कवाड टळली वाड राती । कामे व्यापिली का पडिली दुश्चित्ती ।
कोणे लागला गे सदैवेचे हाती । आजि शून्य शेजे नाही दिसे पती वो ॥१॥
बोले दूतिकेशी राधा हे वचन । मशी लाघव दाखवी नारायण ।
म्हणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशी न बोले कळला मज पूर्ण वो ॥धृपद॥
धाडिले गरुडा आणिले हनुमंता । तै पाचारिले होउनि ये वो सीता ।
लाजिन्नली रूप न ये पालटिता । झाला भीमकी आपण राम सीता वो ॥२॥
सत्यभामा दान करी नारदासी । तै कळला वो मज हृषीकेशी ।
तुळे घालिता वो न ये कनक रासी । सम तुके एक पान तुळसी वो ॥३॥
मज भुली पडली कैशा परी । आम्हा भोगूनि म्हणे मी ब्रम्हचारी ।
दिली वाट यमुने माये खरी । तुम्हा आम्हा न कळे अद्यापवरी वो ॥४॥
जाणे जीवीचे सकळ नारायण । असे व्यापूनि तो न दिसे लपून ।
राधा संबोखिली प्रीती आळिंगून । तुका म्हणे येथे भावचि कारण वो ॥५॥
अर्थ
एक दिवस श्रीकृष्ण येण्यास खूप उशीर झाला खूप रात्र झाली होती त्यामुळे राधेने कवाड लावून घेतले व उगाचच सेजेवर पडली परंतू तिचे मन कामनेने व्यापले होते. ती म्हणाली आज हा श्रीकृष्ण कोणत्या भाग्यवान गोपीकेच्या हाती लागला असेल काय माहित आज माझी सेज देखील शून्य दिसत आहे माझा पतीही मला येथे दिसत नाही. असे वचन राधा आपल्या दासीशी बोलत होती ती तिला म्हणत होती की हा नारायण नेहमी मला अशाच प्रकारचे खोटेच काहीतरी दाखवून माझ्याशी कपट करुन मला फसवत असतो. राधा पुढे म्हणते हा दिसण्यास खूप कोमल आहे परंतू आतून खूप निर्गुण आहे आता मी याच्याशी बोलणारच नाही हा कसा आहे ते मला आता पूर्णपणे कळले आहे. एकदा या श्रीकृष्णाने गरुडाला आ�
12:57
अभंग क्र. ३७८३ (गवळणींचीअवस्था)
मिळोनि गौळणी देती यशोदे गाऱ्हाणी । दहिं दुध तुप लोणी शिंकी नुरेचि काही ।
मेळवुनी पोरे तेथे रिघे एकसरे । वेगी आणोनी सामोरे तेथे लोणी खाय ॥१॥
हरी सोंकला वो सोंकला वो सोंकला तो । वारी तुज लाज नाही तरी ।
आम्हा सांपडता उरी तुज मज नाही ॥धृपद॥
तुज वाटतसे कोड यासि लागतसे गोड । काय हासतेसी वेड तुज लागले वो ।
आम्ही जाऊ तुजवरी पोरे चाळविल्या पोरी । काय सांगो भांडखोरी लाज वाटे आम्हा ॥२॥
मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणे । तव दसवंती म्हणे आणा शीक लावू ।
थोर आणिला काटाळा घरी दारी लोकपाळा । डेरा रिघोनी घुसळा तेथे लोणी खाय ॥३॥
मिळोनिया सकळा दावे लावूनिया गळा । कैशा बांधिती उखळा येथे राहे उगा ।
बरा सापडलासी हरी आजिच्याने करिसिल चोरी । डोळे घालुनिया येरी येरीकडे हासे ॥४॥
फांकल्या सकळा उपडूनिया उखळा । मोडी वृक्ष विमळादुर्जन दोन्ही ।
उठिला गजर दसवंती नव्हे धीर । धावे तुकयाचा दातार आळंगिला वेगी ॥५॥
अर्थ
सर्व गवळणी यशोदेला गाऱ्हाणे देऊ लागले की हे यशोदे आता आमच्या शिंक्यामध्ये दही, दूध, लोणी काहीच उरत नाही. तुझा कान्हा आणि सर्व पोरे मिळून आमच्या शिंकेतील दही, दूध, तूप, लोणी जे काही असेल ते सर्व घेऊन त्वरेने येथून निघून जातात आणि त्वरेने ते सर्व खाऊन टाकतात. यशोदे तू तुझ्या हरीला काहीतरी शिकव तो फारच सोकला आहे तू जर काही शिकवले नाही तर आम्ही समजू की तुलाही आता लाज राहिली नाही. जर का तो हरी आमच्या हाती सापडला तर आम्ही तुझे काहीही चालू देणार नाहीत. पुढे त्या गवळणी म्हणू लागल्या हे यशोदे तुला तुझ्या पोराचे कोड कौतुक वाटते �
12:57
अभंग क्र. ३७८४ (गवळणींचीअवस्था)
आत हरी बाहेर हरी । हरीने घरी कोंडिले ॥१॥
हरीने कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविले ॥धृपद॥
हरीने जीवे केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥२॥
तुका म्हणे वेगळा नव्हे । हरी हा भोवे भोवताला ॥३॥
अर्थ
आत हरी आहे बाहेर हरी आहे हरीने तर मला नीजस्वरुपाच्या घरातच कोंडून टाकले आहे. हरीने माझ्या कामवासनेवर दगड घालून धन आणि पती यांच्यापासून मला वेगळे केले आहे. हरीने माझा जीवभावच नाहीसा केला व सर्वाच्या संबंधातून मला तोडून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात, “हरी आणि मी वेगळा नाही परंतू हरी हा माझ्या भोवतालीच माझ्याजवळच आहे. ”
12:57
अभंग क्र. ३७८५ (गवळणींचीअवस्था)
हरीने माझे हरीले चित्त । भार वित्त विसरले ॥१॥
आता कैसी जाऊ घरा । नव्हे बरा लौकिक ॥धृपद॥
पारखियांसी सांगता गोष्टी । घरची कुटी खातील ॥२॥
तुका म्हणे निवांत राही । पाहिले पाही परतुनी ॥३॥
अर्थ
हरीने माझे चित्तच हरण केले त्यामुळे सर्व प्रपंचातील भार व धन वित्त मी विसरुन गेले. आता मी पुन्हा प्रपंचाकडे मागे म्हणजे माझ्या घराकडे मागे कसे जाऊ जरी गेले तरी तो लौकिक काही बरा राहाणार नाही. परक्याशी म्हणजे हरीशी मी जर गुजगोष्टी बोलू लागले तर घरची माणसे मला नको ते बोलू लागतील. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यामुळे हे गवळणी तू आता काहीही चिंता करु नकोस जे हरीचे रुप तू पाहिले आहे ते पुन्हा परतून पाहा. ”
12:57
अभंग क्र. ३७८६ (गवळणींचीअवस्था)
बाळपणी हरी । खेळे मथुरेमाझारी । पायी घागरिया सरी । कडदोरा वांकी ।
मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवले आजि ॥१॥
बाळ चांगले वो । बाळ चांगले वो । म्हणता चांगले । वेळ लागे तया बोले ।
जीवापरीस ते वाल्हे । मज आवडते ॥धृपद॥
मिळोनिया याती । येती नारी कुमारी बहुती । नाही आठव त्या चित्ती । देहभाव काही ।
विसरल्या घरे । तान्ही पारठी लेकुरे । धाक सांडोनिया येरे । तहान भूक नाही ॥२॥
एकी असतील घरी । चित्त तयापासी परी । वेगी करोनि वोसरी । तेथे जाऊ पाहे ।
लाज सांडियेली वोज । नाही फजितीचे काज । सुख सांडोनिया सेज । तेथे धाव घाली ॥३॥
वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळती अबला । त्याही विसरल्या ।
कुमर कुमारी । नाभाव हा शरीरी । दृष्टी न फिरे माघारी । तया देखता हे ॥४॥
वैरभाव नाही । आप पर कोणी काही । शोक मोह दुःख ठायी । तया निरसली ।
तुका म्हणे सुखी । केली आपणासारिखी । स्वामी माझा कवतुकी । बाळवेषे खेळे ॥५॥
अर्थ
बाळपणी हरी मथुरेतच असलेल्या गोकुळामध्ये खेळत होता. पायात घागरिया गळयात सरी कमरेला करदोरा व दंडात वाकी असे अलंकार हरीच्या अंगावर होते. यशोदा माता हरीचे मुख पाहाते व हरीचे रुप पाहून तिच्या चित्तात सुख सामावत नाही. हरीचे सुंदर रुप पाहून यशोदा मनात म्हणू लागली की माझे संचित धन्य मानावे लागेल की माझ्या पोटी असे सुंदर बाळ जन्माला आले. माझे बाळ फारच चांगले आहे फारच चांगले आहे. चांगले आहे असे बोलण्यात देखील वेळ जात आहे. इतके सुंदर असे माझे बाळ आहे असे यशोदा म्हणू लागली आणि पुढे म्हणते माझ्या
12:58
अभंग क्र. ३७८७ (गवळणींचीअवस्था)
होते बहुत दिवस मानसी । आजि नवस हे फळले नवसी ।
व्हावी भेटी ते झाली गोविंदासी । आता सेवा करीन निश्चयेसी वो ॥१॥
स्थिर स्थिर मजसी साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ।
येथे आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आले ते दुसरे वारा वो ॥धृपद॥
मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळे होऊ एकी घडी ।
नाही लौकिक स्मरला आवडी । आता येणे काळे या वो लोभे वेडी वो ॥२॥
उदयी उदयो साधिला अवकाश । निश्चिंतीने निश्चिंती सावकाश ।
धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता न ये दिवस वो ॥३॥
अर्थ
गोविंदाची व माझी भेट व्हावी हे खूप दिवसापासून माझ्या मनात होते व तसा मी नवसही केला होता तो नवस आज फळाला आला आहे. आता गोविंदाची व माझी भेट झाली मी निश्चयाने यापुढे गोविंदाची सेवा करीन. आता मला माझ्या कार्यामध्ये तुम्ही सहकार्य करा मला स्थिर करा मी आतापर्यंत जन्ममरणाच्या खूप येरझारा सोसल्या आहेत. आता गोविंदाची व माझी भेट झाली आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आडवेपणा आलेला मला सहन होणार नाही मी सर्व प्रकारचे दार बंद करुन आलेले आहे जरी काही मधे प्रतिबंध आला तर तुम्ही त्याचे निवारण करा. स्वस्वरुपाची प्राप्ती मला खूप कष्टाने झाली आहे तसे पाहिले तर स्वस्वरुपही माझी मूळचीच सत्ता आहे परंतू आता मला ती सायासाने प्राप्त झाली आहे आता मी त्याला माझ्यापासून एक क्षणभर देखील वेगळे होऊ देणार नाही. स्वस्वरुप प्राप्त करुण घेताना मला कोणताही लोक लौकिक आडवा आला नाही किंवा मी त्याची आठवण केली नाही आता यावेळी मला स्वस्वरुपाची प्राप्ती झाली आहे ती माझ्या आवडीने आणि तिच्�
12:58
अभंग क्र. ३७८८ (गवळणींचीअवस्था)
एकली राना गोविंदा सवे । गेले ठावे ते झाले ॥१॥
मज न म्हणा न म्हणा शिंदळी । नाही विषम जवळी आतळले ॥धृपद॥
नव्हती देखिली म्या वाट । म्हणोनि हा धीट संग केला ॥२॥
सलगी धरी पयोधर । साहाती करमुर सवे ॥३॥
भेणे मिठी दिधली गळा । सेजे जवळा दडाले ॥४॥
आहेव मी गर्भीन पणे । हे सांगणे का लागे ॥५॥
तुका म्हणे शेवटा नेले । संपादिले उभयंता ॥६॥
अर्थ
एक गोपी म्हणते मी एकटी गोविंदा सोबत रानामध्ये गेले हे तुम्हा सगळ्यांना समजलेच. त्यामुळे मला तुम्ही मी व्याभिचारी आहे असे म्हणू नका म्हणू नका कारण मी विषमतेला पोहोचले आहे आणि त्याच्याशी माझे संघटना देखील झालेले नाही. मला रानातील ( संसार ) वाट देखील माहित नव्हती आणि मी ती वाट पाहिली देखील नव्हती त्यामुळे तर मी निर्भय अशा गोविंदाच्या संगतीत या रानात गेले. त्याने प्रीतीने माझे चित्त रुपी पयोधर धरले असे करू नको अशी कुरकुर करीत सहन केले मग तुम्हीच सांगा की माझ्याकडून चुकीचे काय घडले ते. मी गोविंदाला मिठी मारली कारण या रानातील श्वाप दे म्हणजे कामक्रोध रुपी श्वावपदे यांच्यापासून मला भीती वाटत होती या कारणामुळेच मी त्याच्या सुखाच्या शेजारी जवळ जाऊन लपून बसले आहे. आता तुम्ही मला विचारल की तू गरोदर कशी राहिली आहे ते तर मला तुम्हाला हे सांगावा लागेल की काय की मी विवाहित आहे व मला नवरा देखील आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशाप्रकारे त्या गोपी केने कृष्णाचे व स्वतःचे लौकिक सांभाळला व आपला परमार्थ शेवटास नेला.
12:58
अभंग क्र. ३७८९ (गवळणींचीअवस्था)
गोरस घेउनी साते निघाल्या गौळणी । तव ती कृष्णाची करणी काय करी तेथे ।
झाला पानसरा मिठी घातली पदरा । आधी दान माझे सारा मग चाला पंथे ॥१॥
सर जाऊ दे रे सर जाऊ दे रे सर जाऊ दे परता । मुळी भेटलासी आता । नाट लागले संचिता । खेपा खुंटलिया ॥धृपद॥
आसुडी पदरा धरी आणीक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी ।
आलो गेलो बहु वेळा नेणो गोरा की सावळा । सर परता गोवळा काय बोलतोसी ॥२॥
आम्ही येथे अधिकारी मागे केली तुम्ही चोरी । आता कळिलियावरी मागे केले त्याचे ।
बोलिल्या हांसुनी आम्ही सासुरवासिनी । का रे झोंबसी दुरूनी करी मात काही ॥३॥
वाया परनारी कैशा धरिसी पदरी । तया कळलिया उरी तुज मज नाही ।
जडला जिव्हारी फांको नेदी तया नारी । जेथे वर्म ते धरी जाऊ पाहे तियेचे ॥४॥
तया हाती सांपडल्या हाटी पाटी चुकाविल्या । कृष्णमळिणी मिळाल्या त्याही न फिरती ।
तुका म्हणे खंती वाया न धरावी चित्ती । होते तुमच्या संचिती वोढवले आजि ॥५॥
अर्थ
गोरस घेऊन काही गवळणी बाजारात निघाल्या. त्यावेळची कृष्णाची करणी पाहा त्यावेळी तो तेथे काय करीत होता तर, तो तेथे पानसरा म्हणजे जकातदार झाला आणि गवळणींच्या पदरांना धरुन म्हणू लागला, आधी माझे दान मला दया मग तुम्ही वाटेने चाला. त्या गवळणी कृष्णाला म्हणाल्या हे कृष्णा चल वाटेतून बाजूला हो आम्हाला येथून तू जाऊन दयावेस. कृष्णा चल बाजूला हो तू सकाळी सकाळीच आम्हाला भेटला आहेस. कृष्णा तू आम्हाला भेटल्यामुळे आमच्या संचितकर्माला नाट लागले व आमच्या जन्ममरणाच्या खेपाच आता खुंटल्या. एका गवळणीने आपला पदर हिस�
12:58
अभंग क्र. ३७९० (गवळणींचीअवस्था)
हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शने होईन काळी । मग हे वाळी जन मज ॥१॥
उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगो रे गोवळा । तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥धृपद॥
तुझिये अंगी घुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी । घरिचे बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥२॥
मज ते हासतील जन । धिक्कारिती मज देखोन । अंगींचे तुझे देखोनि लक्षण । मग विटंबणा होईल रे ॥३॥
तुज तव लाज भय शंका नाही । मज तव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलू काही । कसी भीड नाही तुज माझी ॥४॥
वचन मोडी नेदी हात । कळले न साहे ची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥५॥
अर्थ
हे हरी तुझी कांती सावळी आहे तर माझी चाफ्याच्या कळीप्रमाणे गोरी आहे. देवा तुझे दर्शन मला आत्मस्वरुपाने जर झाले तर माझी कांती देखील काळी होईल मग हे संसारीक लोक माझा त्याग करतील. हे गोपाळा तू शांत राहा कोणत्याही प्रकारचे चाळे करु नकोस या गोष्टी तुला किती वेळा सांगाव्यात ? हे नंदलाला नंदाच्या बाळा खोडकरा तुझा कांबळा तर फार खडबडीत आहे. कान्हा तुझ्या अंगाचा खूप घुरट घाण वास येतो कारण तू दुध तूप लोणी खूप खातोस. घरचे बाहेरचे सारखे दुध तूप लोणी खातच असतोस. मी चांदणीसारखी सुकुमार व गोरी आहे जर मी तुझे दर्शन घेतले तर माझ्यादेखील शरीराचा उग्र वास येईल. कान्हा लोक मला हसतील मला पाहूनच माझा धिक्कार करतील. तुझ्या अंगातील सर्व लक्षण माझ्या अंगी जर आले तर लोक तर मला हसतील परंतू माझी फार विटंबना होईल. अरे कृष्णा तुला तर लाज भय शंका काहीच नाही. मला तर चांगले वाईट आप्तइष्ट व्याही सर्व आहेत. अरे �
12:58
अभंग क्र. ३७९१ (गवळणींचीअवस्था)
सात पाच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गाऱ्हाणे देती कैसे ।
काय व्यालीस पोर चोरटे सिरजोर जनावेगळे ची कैसे ।
दहिं दुध लोणी शिंका नुरे चि काही कवाड जैशाचे तैसे ।
चाळवूनि नाशिली कन्याकुमरे आमुच्या सुनांसि लाविले पिसे गे बाइये ॥१॥
आझुनि तरी यासि सांगे बरव्या परी । नाही तरी नाही उरी जीवेसाटी ।
मिळोनि सकळै जणी करू वाखा । सखी तुज मज होईल तुटी गे बाइये ॥धृपद॥
नेणे आपपर लौकिक वेव्हार । भलते ठायी भलते करी ।
पाळतुनि घरी आम्ही नसता । तेथे आपण संचार करी ।
सोगया चुंबन देतो आळिंगन । लोळे आमुच्या सेजाबाजावरी ।
शिंकी कडाडा फोडी गोरसाचे डेरे धरिता न सापडे करी गे बाइये ॥२॥
आता याची चाड नाहो आम्हा भीड । सांपता कोड पुरवू मनिचे ।
सोसिले बहु दिस । नव्हता केला निस । म्हणुनि एकुलते तुमचे ।
चरण खांबी बांधेन जीवे । सरिसा जवे न चले काही याचे ।
अर्थ प्राण देता न सोडी सर्वथा । भलते हो या जिवाचे गे बाइये ॥३॥
घेउनी जननी हाती चक्रपाणी । देतिसे गौळणी वेळोवेळा ।
निष्ठुर वाद झणी बोलाल सकळा । क्षोभ जाइल माझ्या बाळा ।
जेथे लागे हात वाढते नवनीत अमृताच्या कल्लोळा ।
देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे बाइये ॥४॥
अर्थ
एक दिवस सात पाच गवळणी मिळून यशोदेकडे कृष्णाविषयी गाऱ्हाणे सांगण्यासाठी आले व यशोदेला ते म्हणतात की हे यशोदे तू जगावेगळया चोरटया शिरजोर अशा मुलाला जन्म दिला का आहेस ? अगं यशोदे आमच्या शिंकेमध्ये आता दही, दूध, तूप, लोणी काहीच शिल्लक राहात नाही घरचे दार पाहिले तर जसेच्या तसे लावलेले दिसते परंतू चोरी तर �
12:58
अभंग क्र. ३७९२ (गवळणींचीअवस्था)
विरहतापे फुंदे छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवेचि दुश्चिती ।
न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोवती । वेगळीच पडो पाहे कुळाहुनि याती वो ॥१॥
खुंटलीसी झाली येथे अवघियांची गती । आपुली परावे कोण नेणे भोवती ।
त्यांच्या नावे बोभे बोभे हा हो श्रीपती । नवलाव हा येरा वाटोनिया हासती ॥धृपद॥
बाहेरीच धावे राना न धरीच घर । न कळे बंधना झाला तेणे संचार ।
विसरूनि गेली सासुरे की माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥२॥
तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा । नये आता येऊ येथे सर्वथा बळा ।
त्याचा त्याच्या मुखे अवघायांची निर्वाळा । बहुता मते येथे तर्कवाद निराळा वो ॥३॥
अर्थ
एक गवळण हरीच्या विरहामध्ये स्फुंदत होती त्याच्या छंदात ती माघारी जात होती आणि रस्त्याने कुणी दिसले की, “हा बघा माझा हरी, तो बघा माझा हरी असे ती म्हणत होती आणि लगेच सावधान होत होती व हरी दिसला नाही की ती पुन्हा उदास होत होती. ” आणि तिची अशी अवस्था झाल्यामुळे ती स्वत:चे अंगही ति सांभाळू शकत नव्हती अंग जमिनीवर टाकून देत होती व तिच्या अशा वागण्यामुळे कुळाहून, तिच्या जातीहून ती वेगळी होऊ पहात होती. तिला आपले कोण, परके कोण हे काहीच कळत नव्हते तिला भानावर आणण्यासाठी सर्व आप्टेष्टांची बुध्दी खुंटली होती. ती श्रीपतीच्या नावाने बोभाटा करत होती त्याच्याच नावाने ओरडत होती इतरांना हा प्रकार पाहून हसू येत होते. ती गवळण बाहेर रानावनात धावत होती, घरात थांबतच नव्हती तिला बंधन वगैरे काहीच कळत नव्हते कारण तिच्या अंतरंगात कृष्णाचा संचार झाला होता. ती सासर आणि माहेर यांना विसरुन गेल�
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

