कुळाचे विजयशस्त्र: दसरा, विजययात्रा, लग्न, इत्यादी वेळी विजयाचे प्रतिक म्हणून त्याची पूजा करून धारण केले जाते,
तलवार,
कट्यार,
खांडा,
खंजीर,
तेगा,
धनुष्यबाण,
हस्तिदंत,
विजय शस्त्र म्हणजे काय?.
विजयशस्त्र म्हणजे आपल्या 96 कुळी मराठा कुळात ज्या शस्त्राने विजयश्री मिळाली त्या शस्त्राने त्या शस्त्राशिवाय काही विधी न करणे.
अर्थात विवाहात (लग्नात) वराच्या (नवरदेवाच्या) कमरेला आपल्या कुळाचे विजयशस्त्र असावे. जसे, तलवार, कट्यार, खांण्डा, इत्यादी विजय शस्त्र देत असतात. किमान हळद (हल्दी) लावल्यापासून हळद फेडेपर्यंत. तरी विजयशस्त्र जवळ असावे.
टीप:- स्वतंत्र भारतात शीख धर्मातील कृपाण/क्रीपाण शस्त्राशिवाय कायद्याने कोणतेही शस्त्र घरात, किंवा जवळ बाळगणे भारतात गुन्हा मानल्या जातो. याची नोंद घ्यावी.

