7. श्री भ. दतात्रय प्रभू संपूर्ण भाग १, (१ ते ५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

श्री दतात्रय

*।। श्री दतात्रय ।।*

*भाग – १.*

       ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत. नैमित्तिक प्रलयाच्या अंती ब्रम्हदेवाची रात्र संपल्यावर, सर्व जग जलमय झाले ले असतांना शेषशायी नारायणाने विश्वाच्या निर्मितीचा  संकल्प केला, व  आपल्या दृष्टीक्षेपाने मायेला प्रेरीत करुन प्रथम ब्रम्हदेवाला जागे केले, त्यांना वेद देऊन त्याच्याकरवी भूतभौतिक सृष्टीची रचना केली.ब्रम्हदेवाने मरीची,अत्री,क्रतु, पुलस्य, पुलह, अंगिरस आणि दक्ष हे सप्तर्षी तसेच सनत्कुमार, सनक, सनन्दन सनातन आणि नारद या मानसपुत्रांना जन्म दिला.

       दुसरा पुत्र अत्रिचा वेदांने गौरविले असुन त्यांनी सत्व,रज,तम, या तिन्हीही गुणांना ओलांडुन “अत्रि” नांव सार्थ केले त्यांनी केलेल्या ब्रम्हदेवांच्या तपाचे सुंदर मूर्तरुप म्हणजेच अत्रि त्रृषी होय.सुर्याला राहुने जेव्हा अंधःकाराने ग्रासले तेव्हा त्या ग्रहणाची कारणमिमांसा अत्रित्रृषीं नाच आकळली. अत्रिमुनींनी जीचे पाणीग्रहण केले ती अनूसया म्हणजे कर्दम त्रृषींचे, मनुची कन्या देवहुतीच्या उदरात साकारलेले मुर्तिमंत तप होय. जीने स्वप्नातही अतिथिला विन्मुख जाऊ दिले नाही. जीने स्वतः नग्न होऊन अतिथिवेशात आलेल्या ब्रम्हा,विष्णु, महेश या त्रिमुर्तिला भिक्षा दिली. तिच्या पातिव्रत्याच्या कीर्तीने मत्सरग्रस्त होऊन अनुसयेचे सत्वहरण करण्यासाठी सावित्री-लक्ष्मी-पार्वती या तीन देवींनी आपपाले पती पाठविले असतां त्या त्रिमूर्तींची आपल्या पातिव्रत्य धर्माच्या सामर्थ्याने अनुसयेने बाळे केलीत. तिन्ही देवींचा अहंकाराचा ताठा,गर्व हरण झाल्यावर पार शरण जाऊन आपले पती परत मागीतल्यावर अनुसयेने बाळं त्यांच्या समोर ठेवलीत. पण आपापल्या पतींची ओळख न पटल्यामुळे,अनुसयेने पातिव्रत्यधर्माच्या सामर्थ्याने त्यांचे पती त्यांच्या सुपुर्द केले.

        मांडव्य त्रृषींच्या शापाने कौशिक ब्राम्हण सुर्योदयापुर्वी मरण पावणार असे त्या ब्राम्हणपत्नीला समजल्यावर तीने आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर सुर्याचेच स्तंभन केल्यामुळे सर्व विश्व अंधःकारग्रस्त झाले, त्यावेळी अनुसयेनेच त्या ब्राम्हणपत्नीची समजुत काढून व पती जिवंत करण्याचे आश्वासन देऊन सूर्याला उदयास आणण्यासाठी तीला तयार केले. त्यानुसार  सुर्य उदयास आल्याबरोबर, मांडव्य मुनीच्या शापानुसार कौशिक मरुण पडले असतां अनुसयेने तत्क्षणी त्याला जिंवत केले. हे कठीण कर्म करुन त्रैलोक्याचे रक्षण केल्यामुळे देवांनी अनूसयेला ब्रम्हा-विष्णु-महेश हे पुत्र होऊन तुझ्या अधिन राहतील असा “वर” दिला. सतीच्या शापाला भिऊन कौशिकाने दहा दिवस झोप घेतली असतां अनुसयेनेच त्याला जागृत केले. दया,क्षमा,शांती इत्यादी गुणांनी युक्त अशा भगवान विष्णुला कपिलमुनींच्या रुपात आपला धाकटा भाऊ आणि नंतर पुत्र! त्या अनुसयेची जगात कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. तिला कसलीच उपमा दिल्या जाऊ शकत नाही.

       तप हेच ज्यांचे सर्वस्व आहे अशा महासमर्थ परोपकारी, निःस्वार्थ अत्रिमुनींची अनुसयासारखी पत्नी त्रिभुवन धुंडाळुनही सांपडणार नाही. असे परमार्थसाधनभूत साध्वीरत्न तपादी प्रयत्न न करतां अत्रिमुनींना सहज प्राप्त झाले.

          क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.

!! श्री दत्तात्रय  !!

भाग – २.

          अनुसया ही साक्षात चेतना आहे. तीची बरोबरी जड-अचेतन आदिमायेशी ही होऊ शकत नाहि.कर्दममुनींची निरुपम द्वितिय कन्या ब्रम्हदेवाच्या द्वितिय मानसपुत्र अत्रिला दिली.त्यांचा पुत्र मात्र “दत्त” अद्वितिय असुन स्वतःचे च दान करणारा स्वयंदत्त, भगवान दत्तात्रय नांवाने प्रसिध्द आहे. दत्तप्रभु अजन्मा असल्याने त्यांना माता,पिता, कुळ, गोत्र वगैरे कांहीच नाही.अप्रमेय अत्रिमुनींच्या भक्तीसाठी स्वतःच दाता आणि देय झालेले भगवान सद्गुणाकार दत्तात्रय ज्याचे गुणगान करुन वेद,पुराणें थकुन गेलेत.

       ब्रम्हदेवांनी भूलोकांची चार वर्ण व चार आश्रम यांच्यासह मानवनिर्मिती केली, मानवी संस्कृतीच्या धारणेसाठी कृत, त्रेता! द्वापार व कली या चार युगां ची योजना करुन क्रमशः ब्रम्हदेवाने त्यांना पृथ्वीवर पाठविले. कली मात्र भरतखंडातील धर्मपरायण मानवांचे भय वाटुन पृथ्वीवर येण्यास घाबरुं लागला, तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले, “तुझ्या बरोबर आसुरी संपत्ती व अनुकुल काळ पाठवतो, ज्यामूळे सगळे मानव तुला वश होतील. पण गुरु, सद् ब्राम्हण,साधु संत यांची भक्ती करणार्‍यांना मात्र तूं त्रास द्यायचा नाही. सद्गुरुंच्या भक्तांवर देवांचा रोष झाला तर सद्गुरु त्यांचे रक्षण करतात,पण गुरुंचा रोष झाल्यास कुणीही वाचवुं शकत नाही. त्यावर कलीने सद्गुरुंचे महात्म्य सोदाहरण स्पष्ट करण्याची विनंती केली.

        गोदावरीच्या तिरावर वेदधर्मा त्रृषीं चा मोठा आश्रम होता.तिथे अनेक शिष्य विद्या संपादन करीत होते. एकदा  वेदधर्मांनी गुरुभक्तीची कसोटी पाहण्या चे ठरविले. त्यांनी सर्व शिष्यांना बोलावुन सांगीतले की, माझे जन्मजन्मां तरीचे बरेचसे पाप मी तपाने नाहीसे केले, पण अजुन बरेच पाप शिल्लक आहे ते भोगुनच संपवणे भाग आहे, मला कुष्टरोग होऊन अंधत्व येईल, त्यामुळे स्वतःचे रक्षन करतां येणार नाही हा रोग २१ वर्से भोगावा लागणार, तेव्हा  अशा कठीण स्थितित काशीस जाण्याचे ठरविले. तिथे मला अन्नपाणी देऊन माझ्या शरीराचा सांभाळ करण्याकरितां तुमच्यापैकी कोण येण्यास तयार आहे हे विचार करुन सांगा!

        गुरुंचे मनोगत ऐकुन सर्व शिष्य स्तब्ध झालेत. कुणीही जबाबदारी स्विकारण्यास धजावला नाही.परंतु संदीपक नांवाचा शिष्य तयार झाल्या वर, उभयंता गुरुशिष्य काशीला कंबलाश्वतराजवळ आश्रम करुन राहु लागले. काशीत आल्यावर वेदधर्मा त्रृषी रुग्ण झाले. सर्वांग गळक्या व्रणांनी भरुन गेले. दृष्टी गेली. शरीर दुर्बल,क्षीण झाले. सहनशक्ती जाऊन विवेकही नष्ट झाल्यामुळे स्वभाव तापट झाला. त्यामुळे संदीपकला खुप त्रास देऊ लागले. त्यांचा सर्व छळ संदीपक शांत पणे सहन करीत होता.

        सद्गुरुच सर्व देवांचे देव आहे. त्यांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे, या दृढ भावनेने स्वतःची पर्वा न करतां २१ वर्षाच्या काळात तो कधी देवळात गेला नाही की, गंगास्नानाला! त्याच्या अविश्रांत गुरुसेवेने साक्षात भगवान  विश्वेश्वर व विष्णु प्रसन्न होऊन हवा तो “वर” मागण्यास सांगीतल्यावर गुरुंच्या आज्ञेशिवाय “वर” घेण्याचे नाकारले.

          संदीपक परीक्षेत पुर्ण उतरल्याने प्रसन्न होऊन सद्गुरींनी त्याच्या मस्तकावर कृपापुर्ण हात ठेवतांक्षणीच संदीपकाला वेदवेदांगात पारंगत झाला.

 ब्रम्हज्ञानाची प्राप्ती होऊन तो ब्रम्हविद्येत कुशल झाला. वेदधर्मा पुर्ववत झाले. हे सर्व त्यांनी शिष्याची परीक्षा व काशीचे महात्म्य प्रकट करण्यासाठी केलेले नाटक होते. वेदधर्मांनी त्याला “वर” मागण्यास सांगी तले असतां त्याने “दततचरित्र” ऐकण्या ची इच्छा व्यक्त केली. वेदधर्मांनी प्रसन्न पणे दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली.

श्री दत्तात्रय

भाग – ३.

वेदधर्मामुनींची अनुकुलता पाहुन संदीपाकने त्यांना अत्यंत नम्रपणे म्हणाला, गुरुदेव माझ्या कांही प्रश्नांचे निराकरण करावे! कुणी म्हणतात, दत्तात्रय (अत्री) त्रृषींचा पुत्र आहे.कुणी देव, कुणी त्यांना ध्यान करण्यास योग्य समजतात, कुणी साक्षात ब्रम्हच मानतात, या सर्व मतमतांतरे ऐकुन माझा गोंधळ उडाला तरी सत्य काय आहे? दत्तप्रभूने अवतार कसा घेतला? कशा लीला केल्या? शिष्यांंचा उध्दार कसा केला? हे सर्व मला समजावुन सांगावे…..

        आपल्या प्रिय शिष्याची दत्ता विषयीची जिज्ञासा व आस्था पाहून त्यांना गहिवरुनआले ते सांगु लागले… एका वेदशास्र संपन्न ब्राम्हणाला नवस सायाने म्हातारपणी झालेला मुलगा पुर्व जन्मीचा योगी असुन सर्वज्ञ होता. तो शहाणा सवरता असुन सुध्दा वरवर वेड्यासारखा वागत असे. वडिलांनी मोठ्या प्रयासाने शिकवले. योग्य वयात मुंज करुन वेदाध्ययानाला सुरुवात केली

        वडिलांची धडपड, तळमळ पाहुन तो म्हणाला, बाबा! माझे वेदादिक सर्व कांही शिकुन झाले. कर्माचे यथासांग आचरण केले आहे. नवविधा भोग भोगले. राजा,मंत्री,रयत, एवढेच नाही तर मनुष्याहुन श्रेष्ठ व नीच अशा कित्येक योनींचा अनुभव मला आठवत आहे. पुर्वीचा मी योगभ्रष्ट असुन, कोणत्याही मोहाचा सामना करण्यास मी समर्थ आहे. त्यामुळे तुम्ही श्रमु नका.

      माझ्या सर्व चित्तवृत्ती, मनाचे संकल्प, विकल्प निमाल्या आहेत.परम शांतीचा लाभ होऊन वैराग्य निर्माण झाले आहे. तर मग माझे शिष्यत्व पत्करुन मला उपदेश कर! त्यावर पुत्र म्हणाला, श्रीदत्तांच्या उपदेशाने कार्तवीर्य अर्जुनाने योग्याभ्यास करुन ज्ञान प्राप्त केले, तसाच प्रयत्न तुम्ही करा. हे श्रीदत्त कोण? कार्तवीर्य अर्जुन कुणाचा पुत्र? त्याने कसे ज्ञान प्राप्त केले हे सविस्तर मला सांग!

        पैठणक्षेत्रात एक ब्राम्हण प्रारब्धयोगाने व्यसनाधीन होऊन सदैव वेश्येच्या घरीच राहत असे. स्वैर आणि अतिरिक्त विषयसेवनाने तो कुष्ठरोगग्रस्त झाल्यामुळे वेश्येने त्याला हाकलुन दिले. मग त्याला पत्नीची आठवण होऊन घरी

परतला. पत्नीने त्याची निरलासपणे, न कंटाळता,उबग न येता, सेवा करीत असे

तरी तो पत्नीची निर्भत्सना करीत असे. पतीचा भाव कसाही असला तरी त्या सतीने मात्र अनन्यभावे सेवा करावी. एकदा त्याच्या दृष्टीला एक वेश्या पडली सारी लाजलज्जा सोडुन पत्नीला विनवत म्हणाला, या ” कामा” पुढे ब्रम्हांदिकांची मती खुंटली तिथे मी तर साधा माणुस आहो, तरी मला तीची भेट घडवुन दे. पतीने आपल्याला कांही तरी मागीतले यानेच ती हर्षित होऊन कांही दागिने व पतीला खांद्यावर घेऊन निघाली. अंधार पडलेला होता. तेवढ्या त दैवयोगाने मोठेच विघ्न उपस्थित झाले.

        राजाज्ञेने एका चोराला सुळावर चढवायला नेत असतां, तो चोर पळुन गेला व त्याच्यासारखाच दिसणार्‍या, तोच चोर समजुन दुसर्‍याच माणसाला सुळीवर चढवुन राजदूत तिथुन निघुन गेलेत. तो मणुष्य दुसरा तिसरा कोणी नसुन मांडव्य त्रृषी होते. सुळाच्या वेदना निवारण्यासाठी त्यांनी ध्यान लावले. अंधारांत पतीला घेऊन जातांना त्या सतीला ते न दिसल्याने तिच्या खांद्या वरचा पती कौशिकचा धक्का लागल्याने त्रृषीचे ध्यान भंगुन ते कासाविस झाले व  वेदनेने त्रस्त होऊन म्हणाले, ज्याच्या घक्क्याने माझे ध्यान भंग झाले तो सुर्योदय होताच मरण पावेल,असा शाप दिला. शाप ऐकुन सती म्हणाली, जर मी  पतिव्रता असेल तर, तू उदयाला येताच भस्म होशील, असा शाप सुर्याला देऊन पतीला वेश्येच्या घरी नेऊन परत घरी आली.

       शापाच्या भितीने सुर्य लपुन बसल्यामुळे सर्वीकडे गाढ अधःकार पसरला, व स्वर्ग, पृथ्वीवर गोंधळ माजला. सर्व देव ब्रम्हाकडे गेल्यावर त्यांनी सतीशिरोमणी अनुसयाला पैठणला नेऊन कौशिकपत्नीला समजावुन सुर्योदय व्हावा म्हणुन विनवले. सुर्योदयानंतर मृत्यु झालेल्या तुझ्या पतीला मी लगेच जिवंत करीन असे वचन दिल्यावर सतीने शाप मागे घेतला. व सुर्योदय झाला. देवगण प्रसन्न होऊन अनुसयेच्या इच्छेप्रमाणे ब्रम्हा,विष्णु महेश तुझे पुत्र होऊन जगाचा उध्दार करतील असा वर दिला,

        “क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

श्री दत्तात्रय

भाग – ४.

         इकडे राजाला झालेली चुक कळल्यावर त्याने मांडवी त्रृषींना सुळा वरुन ऊतरवुन मुक्त केले. राजाला शाप न देतां तडक यमधर्माकडे जाऊन मांडव्य त्रृषींनी विचारले, मला सुळावर कां चढविले? यम म्हणाले,कुमारावस्थेत तुम्ही एका पाखराला काट्याने वेधले होते, त्या पापाचा परिपाक म्हणुन हे शूलारोहन झाले. त्रृषीने रागाने “तू व्दापार युगात दासीच्या पोटी जन्म घेशील असा शाप दिला. त्याप्रमाणे यमाला विदूर म्हणुन जन्म घ्यावा लागला. तेवढा काळ यमाच्या जागी

 अर्थमाने पितरांचा अधिपती म्हणुन कार्यभार सांभाळला.

      वेदधर्मा संदीपकाला पुढे सांगु लागले, देवगणांच्या वरदानाला मान देऊन ब्रम्ह-विष्णु-महेश ही त्रिमुर्ती सती अनुसयेच्या उदरी गर्भरुपाने वाढु लागले ज्यांच्या स्मरणाने संसारपाशातुन मुक्ती मिळते,जे जन्ममरणांदी विकारातीत आहेत तेच भक्तिपराधिनता प्रकार करण्यासाठी गर्भवास सोसत आहे.

      मार्गशीर्ष पोर्णिमेस बुधवारी संध्याकाळी मृग नक्षत्रावर अनूसयेने तीन बालकांना जन्म दिला. जेव्हा अत्रिमुनी पुत्रमुख बघण्यासाठी गेले तर त्यांना तिथे त्रैयमूर्तीचे दर्शन झाले. खालच्या दोन हातात माला व कमंडलु, मधल्या दोन करांत डमरु त्रिशूल, वरच्या हातात शंख आणि चक्र, धारण केलेला भक्त कैवारी त्रिमूर्तीचे त्यांना दर्शन झाले. अत्रि व अनुसया सद्गतीत होऊन म्हणाले आपल्या या रुपाला पुत्र म्हणने म्हणजे विडंबनच ठरेल, तरी हे भगवंता!आपण बालस्वरुप राहिल्यास पुत्रभावाने आपले कोडकौतुक करतांना आनंद वाटेल असे म्हणुन त्या दोघांनी भगवंता चे पाय धरले. भगवंत म्हणाले,  सती कौशिक पत्नीच्या शापातुन सुर्याला  सोडवल्यावर देवगणांनी दिलेले वरदान खरे करण्यासाठी, लोकांत भक्तीची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हे दिव्यरुप दाखवले. तुमचा भक्तिभाव पाहुन मी स्वतःचेच दान तुम्हाला दिले. सदैव तुमच्या स्वाधीन राहील,असे म्हणुन तो विश्वनाटकी घननीळ तीन बालके होऊन पाळण्यांत पहुडले.

      बाराव्या दिवशी अत्रिमुनींनी नामकरण विधि करुन आत्मदान करणा र्‍या विष्णुचे नांव “दत्त” ज्याने स्वतःलाच देऊन टाकले त्या ब्रम्हदेवाचे “चंद्र” व रुद्राला साजेसे “दुर्वास” असे नांवे दिलीत. धन्य ती अनूसयामाता! जीने विधि, हरि, हर या त्रिमुर्तीला पुत्ररुपाने जन्म दिला, जिचे दुग्धपान करुन या विश्वाच्या उत्पत्ती-स्थिती-लय कर्त्यांना तृप्तीचा अनुभव मिळाला. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणार्‍या बालकांच्या बाललिलेत व कोड कौतुकात दोघांचाही वेळ छान जाऊ लागला.

        अशा तर्‍हेने तिघेही मोठे झालेत. चंद्राने चंद्रमंडलात जाण्याची अनुज्ञा घेतली. आजही भूलोकावरील वनस्पतीं ची पुष्टी आणि जीवमात्रांची वंशवृध्दी करत आहे. मनस्वी दुर्वास स्वच्छंद संचार करुन ऊन्मार्गगामु लोकांना सन्मार्गावर आणण्याचे कार्य करीत आहेत. दोन्ही पुत्र निघुन गेल्यामुळे उदास झालेल्या अनुसयेसमोर लहान रुप घेऊन दत्त तिच्या पुढ्यात उभा राहिला, तिने पुर्वी पाहिलेले त्रिमुर्तीरुप दिसुं लागले, त्या दर्शनाने विस्मित होत  आहे तोच दत्तस्वरुपात सर्व विश्व सामावलेले दिसु लागले. आश्चर्याने विश्वरुप ती डोळ्यात साठवते आहे तोच मांडीवर बसुन बालदत्त तीला स्तनपान मागत आहे. मुक्याला वाचाळ करणारा दत्त तिच्याशी बोबडे बोल बोलूं लागला.पांगळ्याला चालविणारा अडखळत येऊन तिच्या गळी पडुं लागला. अशा अनेक बाल लिला दाखवु न बालदत्ताने आपल्या मातेचा शोक दूर केला.आश्रमांतील बालके जमवुन खेळ मांडावा, त्या खेळात इतका गुंग होई की, मातेने बोलावले तरी येऊ नये, तीने त्याला धरायला जावे तर योग्यांनाही न गवसणारा तो प्रभू तीच्या हाती कसा बरं लागेल? तिची दमछाक पाहुन मग स्वतःच तिच्या स्वाधीन होई. त्याचे स्नान झाले की, लगेच अंगाला माती फासुन घेई. अशा अनेक खोड्या करुन त्या निःसंग प्रभुने वात्सल्यसुखाचा आनंद मातापितांना भरभरुन दिला. आणि जगाला आपली भक्तवत्सलता दाखवुन दिली.

          क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

श्री दत्तात्रय   !!!!

भाग  –  ५.

          दत्तप्रभुंना आठ वर्षे पुर्ण झाल्यावर त्यांचे व्रतबंधन करुन वेदविद्ये चा बोध केला. सर्व शास्रांचे ऊत्पत्ती स्थान असलेल्या दत्तप्रभुंनी कौपानादिकांचा त्याग करुन नग्नावस्थे त स्मशानात जाऊन नासाग्रदृष्टी लावुन ध्यानस्थ झाले. त्यावेळी पिंगलनाग  व साध्यदेव या दोघांनी येऊन दत्तात्रयांना विचारले, तुमचा आश्रम कोणता?दत्त प्रभूंनी “पंचमाश्रम” सांगुन त्यांनी आपले त्रिगुणातीत अवधूतरुप प्रकट करुन त्यांना योगासहित आत्मज्ञानाचा ऊपदेश केला.(ब्रम्हचर्य,गृहस्थ,वानप्रस्थ आणि सन्यास या चार आश्रमापलीकडी ल पांचवाश्रम) त्या दिवसांपासुन दुर्जनां ना शिक्षा, सज्जनांचे पालन करणारा योगमार्गप्रवर्तक अशी श्रीदत्तांची सर्वत्र प्रसिध्दी झाली. त्यामुळे ठीकठीकाणा हुन मुनींचे बालक त्यांचा उपदेश घेण्या साठी येऊ लागले.,

      विश्वचालक दत्तप्रभुंनी त्यांची परिक्षा पाहण्यासाठी अगाध जलात बुडी मारुन दिर्घकाळ तिथेच राहिले. घाबरुन कित्येक मुनी बालकं पळून गेले पण बरेचसे बालक शंभरवर्षापर्यंत त्यांची प्रतिक्षा पाहत थांबले. त्यांनाही मोहवुन त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एका नग्न स्रीला व स्वतः नग्न होऊन तीला मांडीवर बसवुन तिच्यासह क्रीडा करुं लागले. ती स्री दुसरी कोणी नसुन पराशक्ती अदिमाया होय. ती अनघा दत्तात्रयाच्या मांडीवर बसुन तिच्यासह वीर्यचर्वणादी विभित्स क्रिडा करतांना पाहुन बरेचसे विद्यार्थी पळुन गेले. सर्व समर्थ परमात्म्याला व ज्ञानी पुरुषांना त्यांच्या तेजस्वितेमुळे दोष स्पर्शत नाही असा विचार करुन जे थांबले त्यांच्यावर मात्र दत्तप्रभु प्रसन्न होऊन सविशेष योगाचा उपदेश केला. ज्यायोगे त्यांचा ऐहिक व पारलौकीक कल्याण झाले. असा सर्व विभित्स व्यवहार पाहुनही आणि परीक्षेचे सर्व कष्ट सहन करुनही कृतविर्य पुत्र अर्जुन टिकल्यामुळे त्याला ज्ञान आणि योगाचा लाभ प्राप्त झाला.

        सोमवंशातर्गत  हैहय राजाच्या वंशात कृतवीर्य हा एक प्रसिध्द धर्मपरा यण राजा जो जिताहित अर्थात सर्व शत्रुं ना जिंकुन सार्वभौम सम्राट राजा होता. त्याला १०० पुत्र होते, पण च्यवन त्रृषीं च्या शापाने ते सर्व भस्मसात झालेत. असह्य दुःखाने खचुन राजाचे राजकार भारातले लक्ष उडाले.अचानक एके दिवशी घरी आलेल्या गुरुंना साष्टांग नमस्कार करुन आर्ततेने कृतवीर्य म्हणाले, मी पुत्रहीन झालो या दुःखातुन माझी सुटका करावी! सूर्यदेवतेचे व्रत केल्यास तुला पुण्यप्राप्ती होऊन तुझा वंश वाढेल. धीर धर!

        गुरुदेवांनी कृतवीर्याला व्रत कसे करायचे हे सांगीतल्यावर कृतवीर्याने त्यांचा सत्कार केला व भक्तीयुक्त अंतःकरणाने व्रताचे आचरण केले.कांही दिवसांनी महासाध्वी मैत्रेय त्यांच्या घरी आली असतां कृतवीर्य पत्नी शीलधराने आपले दुःख तिला निवेदन केल्यावर मैत्रेयीने तीला “अनंतव्रत” करायला सांगीतले. या व्रताला “दत्तव्रत” म्हणतात या व्रताच्या प्रभावाने तुम्हाला सद्गुणी पुत्र होऊन सर्व भूमंडळात शूर वीर म्हणुन ख्याती पावतील, असे म्हणुन व्रताची सविस्तर माहिती सांगीतली. शीलधरेने व्रत करतांना अनंत म्हणजेच दत्त अशी भावना ठेवुन कठोर साधना व निष्ठेने व्रत केले.

     शीलधरेच्या कठोर व्रताचारणाने श्रीदत्तप्रभू प्रसन्न झाले. तिच्या स्वप्नात येऊन अभिनंदन करीत म्हणाले, हे राणी ज्या आंतरीक उत्कटतेने हे धर्माचरण व्रत केलेस त्याचे फळ तुला सप्तद्वीपा वर राज्य करणारा,केवळ संकल्पाने कुठेहि जाऊं शकणारा,स्मरण केल्या बरोबर भेटणारा असा बलवान पुत्र होईल, असा “वर” देऊन भक्ताचा कैवारी गुप्त झाले.

                         

श्री भ. दतात्रय प्रभू संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading