आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

श्री भ. दतात्रय प्रभू संपूर्ण भाग ६, (२६ ते ३०)
ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
श्री दतात्रय
भाग – २६.
विश्वावसु गंंधर्व कन्या मदालसाची मैत्रीण कुंडलेके त्रृतध्वजाला मदलसे बरोबर विवाहासाठी खुप मनधरणी केली.त्यालाही मदालसा आवडली होती पण! धर्मानुसार विधिवत देवा-ब्राम्हणां च्या साक्षीशिवाय पत्नी म्हणुन अंगीकार करणे त्याला योग्य वाटेना! शिवाय ही त्रृषीकन्या नी तो क्षत्रिय, असा विवाह धर्मसम्मत होणार नाही अशी शंका कुंडलेकेला बोलुन दाखवल्यावर, गांधर्व विवाहाला सर्वीकडे मान्यता असते असे म्हणुन तिने आपल्या गुरुंना पाचारण केले. त्यांनी येऊन दोघांचा विधिवत विवाह लावुन दिला.आणि कुंडलेका आपल्या तपःस्थानी हिमालयात निघुन गेली.
राजा त्रृतध्वज नवपत्नीसह घोड्यावर स्वार होणार तोच दैत्यसैन्या सह पातालकेतू समोर येऊन ठेपला. एकट्या त्रृतध्वजाने दैत्यसेनेचा नाश करुन, पातालकेतूलाही एका धारदार बाणाने ठार केले. त्याचा भाऊ तालकेतू मात्र पाताळात लपुन बसला. राजपुत्र त्रृतध्वज मदालसेला घेऊन प्रथम गालव मुनींच्या आश्रमांत येऊन त्यांना सर्व वृतांत कथन केला. यज्ञांना विघ्न आणणारा दैत्य ठार झाल्याचे ऐकुन त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नवदंपतीला भरभरुन आशिर्वाद देऊन घरी जाण्यास सांगीतले. दुष्ट दैत्याचा वध करुन येत असलेल्या मुलगा त्रृतध्वजाच्या स्वागताची जय्यत तयारी केली. समारंभपुर्वक वाजत गाजत मान्य वर लोकांसह जयघोषांत राजाने जाहीर पणे आपल्या पराक्रमी मुलाचे नांव “कुवलयाश्व” ठेवले. राजमहालात प्रवेश ल्यावर नव दाम्पत्यांनी राजाला नमस्कार केला. मदालसाने नम्रतेने,सदा चारणाने, मनमिळाऊ स्वभावाने आणि पावित्र्याने सर्वांची मनें जिंकली.
पातालकेतूचा भाऊ तालकेतू
समोरासमोर त्रृतध्वजाशी युध्द करुं शकत नसल्यामुळे तो युध्दातुन पळून गेला.एकदा कुवलयाश्व शिकारीसाठी वनात आल्याची संधी पाहुन तालकेतुने आसुरी मायेने एका तपोवनाची निर्मिती करुन स्वतः तपस्वी वेशात, वाढलेल्या जटा, अंगावर भस्माचे पट्टे,हातात गोमुख जपमाळ, नासिकाग्र दृष्टी, अशा रुपात ध्यानस्थ बसलेला पाहुन कोणालाही आदरभाव वाटावा.परंतु त्याचे अंतरंग मात्र कपटी दुष्टावाने भरलेले होते.आश्रम पाहुन कुवलयाश्व जिज्ञासाने तालकेतूच्या सोंगाला फसुन त्याच्या दर्शनासाठी आश्रमात प्रवेश केला. राजाला आशिर्वाद देऊन म्हणाला, यज्ञासाठी दक्षिणा द्यायला धनाची गरज आहे. त्रृतध्वज म्हणाला, मी राजधानीला जाऊन धन आणुन देतो, म्हटल्यावर तो ढोंगी राक्षस म्हणाला, एवढा त्रास घेण्यापेक्षा तुझ्या गळ्यांतील कंठीने माझे काम भागेल. लगेच कंठी दिल्यावर राक्षस म्हणाला, मी वरुणाचे दर्शन करुन येईस्तोवर तू इथेच थांब!
असे म्हणुन तो राक्षस थेट कुवलयाश्वा च्या राजधानीत पोहचुन राजाला व मदलेसेला बोलावुन दुःखाचे नाटक करुन विलाप करीत म्हणाला,पाताल केतूचा भाऊ तालकेतूने कुवलयाश्वला एकटे गाठुन भावाचा सूड घेण्यासाठी युध्दाचे आव्हान केले.दोघांच्या युध्दात कुवलयाश्व ठार झाला.त्याचे वनांत दहन करुन त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याची कंठी घेऊन आलो, पुत्राच्या मृत्यु ची बातमी ऐकुन राजा वेडापिसा झाला आणि मदलसा? ती तर पतीशिवाय जगनेच अशक्य! तिने अग्निप्रवेश केला. वार्धक्यात पुत्र आणि सुनेच्या मृत्त्युने चिरविरह सहन न झाल्याने प्राण देण्या चा प्रयत्न करीत शिळेवर डोके आपटुन बेशुध्द पडला. राक्षस परत वनांत येऊन त्रृतध्शजाची प्रशंसा करीत, हा आश्रम तुझाच समजुन कितीही काळ राहु शकतोस, असे म्हणुन निघुन गेला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – २७.
त्रृतध्वज वनांत एकटाच आल्या ने घरी सर्व चिंतेत असतील या विचाराने तो भोळाराजा राजधानीकडे परतत असतांना मार्गात त्याला अपशकुन होऊ लागल्याने त्याच्या मनांत चिंता,भय निर्माण झाले. नगरांत प्रवेश करतांच सगळीकडे शुकशुकाट पाहुन त्वरेने धावतच त्याने राजवाड्यात प्रवेश करुन तडक वडिलांकडे गेला. मुलगा सुखरुप पाहून एकीकडे आनंद तर दुसरीकडे मन शंकाकुल झाले.हा नक्की आपलाच मुलगा असेल का? असेल तर पत्नीच्या मृत्युच्या बातमीने विपरीत परीणाम होईल. गोंधळलेल्या राजाला एवढे दुःखी,चिंतीत कां? असे विचारले असतां मुलगा आल्याचा आनंद झाला पण मदालसेच्या आत्मदहनाची दुःखद वार्ता सांगण्यास तो धजेना! वारंवार विचारुन अनेक प्रकारे आश्वास्त करुन विचारल्या वर मोठ्या कष्टाने घडलेली हकीकत सांगीतल्यावर त्रृतध्वज दुःख, संभ्रम आश्चर्याने स्तंभीत होऊन सगळी हकीकत परत नीट सांगण्याची विनंती केल्यावर, एक जटाधारी तापसीने कंठी दाखवुन तुझ्या मृत्युची बातमी सांगीतली.
राजाने विचारले, हा कोण मुनी होता? त्याच्याजवळ तुझी कंठी कशी आली? हे विचारल्यावर त्रृतध्वजाने सर्व हकीकत सांगुन म्हणाला, हा नक्कीच तालकेतूच असावा.विरहाग्नीच्या दारुण दुःखात, प्राणप्रिय पत्नीच्या त्रृणातुन उतराई होण्यासाठी यावज्जन्म कोणत्या ही स्रीशी संग न करण्याची प्रतिज्ञा केली विरक्त होऊन वनवासी जिवन पत्करले. तो वनांत असतांना नागलोकातुन अश्वत्तर नागाचे पुत्र, वानप्रस्थ मुनींचा वेश धारण करुन तिथेआले. समवयस्क व समानशील असल्याने लवकरच त्यांची घनिष्ट मैत्री झाली, इतकी की, त्यांना एकमेकांशिवाय करमत नव्हते.पण नेहमी उदास असलेल्या राज पुत्राने मनांतले शल्य कधी सांगीतले नाही.आणि नागपुत्रांनीही आपली खरी ओळख दिली नाही. एकदा राजपुत्राचे रडुन लाल झालेले डोळे पाहुन नागपुत्रा ने अगदी आग्रहाने दुःखाचे कारण सांगण्यास भाग पाडल्यावर, राजपुत्राची सर्व हकीकत ऐकल्यावर नागपुत्रही अत्यंत दुःखी झालेत.
नागपुत्र घरी आल्यावर अत्यंत अस्वस्थ असल्याचे पाहुन वडिल अश्वत रांनी कारण विचारल्यावर मित्राची व्यथा कथन केली. हे ऐकुन वडील त्यांना अश्वास्त करत म्हणाले, तुमच्या मित्राचे हरवलेले सुख परत मिळवुन देईन असे वचन दिले. आणि भाऊ कंबल नागाला सोबत घेऊन हिमालयात प्लक्षतीर्थाला (सरस्वतीचे उगमस्थान) जाऊन तपश्चर्ये ला बसला. आहार, इंद्रियांचे नियमन करुन असन, प्राणयामादी योगसाधनांनी एकाग्रता साधुन वेदजननी सरस्वतीचे ध्यान व स्तुती आरंभली.
अश्वतराची स्तुती ऐकुन,शारदा प्रसन्न होऊन ‘वर’ मागण्यास सांगीतले
त्या नागाने अपला भाऊ कंबलला उत्तम गायनकलेत प्रविण व्हाव की, भगवान शंकरही लुब्ध होऊन प्रसन्नतेने उमा रमणाने आम्हाला हवा असलेला वर द्यावा. तथास्तु! तुम्ही उत्कृष्ट, सुमधुर रागदरीने नटराजाला प्रसन्न करुन तुम्हाला हवा तो वर मिळेल अहे म्हणुन माता गुप्त झाली.
कंबलसह अश्वतरनाग कैलासपर्वता वरील उपवनांत जाऊन दोघा भावांनी मनोहर गायनातुन नऊही रसांचा परिपोष करीत असल्याने भगवान शंकर प्रसन्न होऊन म्हणाले, अरे!अश्वतरा सर्वा ना आकर्षणारा-हरणारा म्हणुन मला ‘हर’ म्हणतात. तुमच्या गायनाने माझे मन खेचुन घेतले. तुम्हाला पाहिजे तो ‘वर’ मागुन घ्या! त्यांच्या दिव्य दर्शनाने दोघांचेही ह्रदय भरुन आली.अष्ट सात्विक भाग जागृत झाले. भारावल्या अंतःकरणाने दंडवत घालुन अश्वतर म्हणाला, मी जो वर मागेल तो कुवल याश्वरा साठी!
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – २८.
अश्वतर पुढे म्हणाला, राजकुमार त्रृतध्वजची पत्नी मदलसा दैत्यांच्या कपटामुळे अपला पती मरण पावला या भ्रमाने तिने आत्मदहन केले.ती मदलसा स्वरुपाने व वयाने जशीच्या तशी माझी मुलगी व्हावी, दया,क्षमा! शांती हे तिचे दैवी गुण, शील,स्वभाव पुर्वीप्रमाणेच राहून तिला पुर्वजन्मीचे स्मरण,व पति व्रता, ब्रम्हज्ञानी, योगीनी असावी.ती योगमाता व तिचे पुत्र ब्रम्हज्ञानी व्हावेत. हे दुष्कर आहे पण! आपल्याला कांहीही अशक्य नाही. हे मदनदहना! यापेक्षा वेगळा वर नको. तथास्तु! घरी जाऊन पत्नीसह यथाविधी श्राध्द करुन त्याती ल तीन पिंडापैकी मधला पिंड पत्नीला मदलसेचे रुप मनांत आणुन खाताच तिच्या श्वासातुन ती साध्वी प्रगट होईल. असे म्हणुन शिव अंतर्धान पावले.त्यांना मनोमन नमस्कार करुन दोघे भाऊ रसातलाला(नागलोक) परतले.
घरी येऊन अश्वतराने भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार यथाविधी श्राध्द केले. पत्नीने मधला पिंड भक्षण केल्या केल्या उत्साहाबरोबर एक तेजःपुज्य गोलक बाहेर पडला. मदालसेची आकृती भासत असलेला तो सुक्ष्म अंगठ्याऐवढा गोलक बघतां बघतां मोठा झाला. आणि पुर्णाकार हुबेहुब मदालसेच्या रुपात दिसु लागला.तिचा रंग,रुप,आवाज,बुध्दी,वृत्ती,स्मृती हे सर्व हे सर्व अगदी पुर्ववत आले फक्त शरीर अग्नीत विसर्जन केल्याची आठवण मात्र तिला नव्हती. फक्त प्राणप्रिय पतीच्या निधनाची वार्ता आताच ऐकल्यासारखी ताजी होऊन उच्च स्वराने शोक करुं लागली. अश्वतराला आश्चर्य वाटले.हिला आत्मदहन केल्याचे सोडुन सर्व आठवले तिचे कसेबसे सांत्वन करुन तिला आपल्या पत्नीजवळ अंतःपुरात पाठवले.वेदधर्मा गुरु संदीपकाला पुढे सांगु लागले…. अश्या रितीने मदलसेची प्राप्ती झाल्यावर अश्वतराने आपल्या मुलांना, कुवलयाश्वाला अर्थात त्रृतध्वजा ला आणण्यास सांगीतले, परंतु त्याला कांहीही न सांगण्याची ताकीद दिली. लगेच नागपुत्रांबरोबर राजपुत्र त्यांच्या सोबत निघाला. गोमती किनार्यावल आल्यावर त्यांच्या घराचा मार्ग पाण्या तुन जातो याचे त्याला आश्चर्य वाटले.व शंका निर्माण झाली की,ही मुलं वनवासी नसुन कोणीतरी वेगळे आहेत, तुम्ही कोण आहात? हे कळल्याशिवाय मी तुमच्याबरोबर येणार नाही.त्यावर थोडे हसुन नागपुत्रांनी स्वस्तिकादि चिन्हयुक्त, मण्यांनी तेजाळलेले फणा धारी नागरुप प्रगट करुन म्हणाले, पाताळातील कंबल नावाचा नाग थोर शिवभक्त असुन सर्व योगांचे त्याला ज्ञान आहे.त्याचा भाऊ अश्वतराचे आम्ही दोघे भाऊ पुत्र आहोत. योगबळाने राजपुत्रा ला पाताळात नेऊन पित्यासमोर उभे करुन त्रृतध्वजाचा परिचय करुन दिला.
त्रृतध्वज म्हणाला, मी आपल्या अपुर्व दर्शनाने धन्य झालो. अश्वतर म्हणाला, तू सर्वगुण संपन्न, धर्माचरण करणारा असल्यामुळे मी प्रसन्न झालो. हवा तो ‘वर’ माग! त्यावर राजपुत्र उत्तरला! माझे मन सदैव धर्मनिष्ठ राहुन पित्याची अखंड सेवा घडावी. यानुसार तर तुझे वागणे निर्मळ आहेच,पण मना पासुन हवीशी वाटणारी एखादी गोष्ट मागीतल्यावर ती पुरविण्यांत मला आनंद वाटेल. सहाजिकच मदालसेच्या आठवणीने तो मित्रांकडे पाहु लागला. अहो बाबा! हा रात्रंदिवस मदालसेच्या विरहाग्नीत होरपळत आहे. नागराजाने पुनर्जीवित झालेल्या मदालसेला त्याच्या समोर उभी केल्यावर क्षणभर तर तो अचंबितच झाला, मग मात्र बेभान होऊन,कोणताही संकोच न करतां तिच्याकडे धाव घेतली व कडकडुन मिठी मारली. जगन्मातेच्या अनुग्रहाने व शंंकराच्या कृपाप्रसादाने मदलसा कशी प्राप्त झाली सांगीतले. नंतर राजाने त्यांना अमुल्य रत्नालंकार आंदन देऊन थाटामाटात त्यांची पाठवणी केली. आपल्या मित्रद्वयांसह त्रृतध्वज सपत्निक राजवाड्यांत आल्यावर शत्रुजीत राजाला अत्यंत आनंद झाला. पण मदालसेबद्दल शंका उपस्थित केल्यावर त्याने सविस्तर हकिकत सांगुन त्यांचे शंका समाधान केले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – २९.
अशा तर्हेने सर्व आनंद व
घडी नीट बसल्यावर पुत्र त्रृतध्वजाला राज्याची धूरा सोपवुन, क्षात्र धर्माला अनुसरुन राजाने वानप्रस्थाश्रम स्विकारला. सर्व कर्तव्ये उत्तमरित्या पार पडत होती,पण भगवान शंकराच्या कृपेने आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे मदालसा संसारात असुनही विरक्त होती.तरी ब्रम्हज्ञानी मदालसाने राजाची पट्टराणी म्हणुन संसार केला. निसर्गनियमाप्रमाणे तिला पुत्रही झाला. नवजात, अजान अर्भका ला राणीने वेदांताचा उपदेश केल्यामुळे तो ब्रम्हज्ञानी झाला.त्याचे नांव विक्रांतवर्म ठेवले.वेदधर्मा मुनी संदीप काला पुढे सांगतात…. जसा जसा विक्रांत मोठा होऊ लागला तसतसा त्याच्या मनात अद्विताचा बोध होऊन आत्मज्ञानी झाला, पण वरकणी त्याने वेड्याचे सोंग घेतल्याने चिंतेने राजा रात्रंदिवस व्याकुळ होऊन दुःखाने तळमळु लागला. अशातच तिला सुबाहु नांवाचा मुलगा झाला. त्यालाही वेदांता चा उपदेश सांगायला सुरुवात केली. सुबाहुही आत्मनिष्ठ होऊन पडुन रांगु लागला.इतरांना मात्र तो मंदमती, जड आहे असे वाटु लागले. मदालसेला शत्रु मर्दन नांवाचा तिसरा पुत्र झाला, तेव्हा त्रृतध्वजाने राजज्योतिषाला बोलावुन त्याचे भविष्य विचारले असतां, ज्योतिषाने सांगीतले की, हा मुलगा खुप हुशार, बुध्दीमान होऊन अपरिमित विद्या शिकेल. दिर्घायुषी आहे,पण ग्रह मात्र उच्चीचे नाहीत.
त्यालाही मदालसेने ज्ञानोपदेश करुन तोही अंतरात्म्यातल्या आत्म्यात मन स्थिरावुन जड-मुढवत पडुन राहुं लागला. चौथ्यांदा झालेल्या मुलाचे नांव यावेळी मात्र राणीला विचारुन अलर्क ठेवले. पहिल्या तीन मुलांची अवस्था पाहुन राजा अत्यंत व्यथित होता. बरेच प्रयत्न करुनही तिन्ही मुलांत कांहीही सुधारणा होत नव्हती. राजाच्या लक्षात आले की, मदलसेच्या शिकवण्याने व संस्कारानेच तिन्ही मुलांनी निवृत्तीचा धरलेला मार्ग न रुचल्याने त्याने तिची कानउघाडणी केली. निदान चौथ्या मुलाला तरी प्रकृति मार्गाने जाऊ दे.
यावर तिने राजाला आश्वास्त केले. दत्तप्रभुंची प्रार्थना करीत ती म्हणाली,हे अत्रिपुत्रा! हा माझा पुत्र आपल्या चरणी अर्पण करीत आहे. मदालसेने अलर्का ला वेद, शास्र, आचार, व्यवहार इत्यादी सर्व विषयांचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. सहा प्रकारची राजनीती व धनुर्विद्येत त्याला प्रविण केलेले पाहुन राजा समाधान पावला.
अलर्क शूर धूरंधर झाला. अनेक स्वयंवरांतुन राजकन्यांशी विवाह झाले.त्याचा अभिषेक करुन त्रृतध्वज व मदालसाने वानप्रस्थाश्रम स्विकारुन वनांत निघुन गेले. जातांना तिने एका रेशमी कपड्यावर सुक्ष्म अक्षरांत लिहिलेला लेख एका छोट्या पेटीत
ठेऊन संकट समयी कामाला येईल, असे म्हणुन आशिर्वादासह त्याच्या सुपुर्द केली. अलर्क आईच्या शिकवणीनुसार उत्तम राज्य करुं लागला.परंतु मिथुन सुखात तो तुडुंब बुडाला. सहासष्ट हजार वर्षे एकछत्री राज्य करुनही तो समाधानी नव्हता.त्याची ही अधोगती पाहुन त्याला ताळ्यावर आणण्यासाठी सुबाहुने राज्याची वाटणी मागीतली,पण अलर्कने त्याला दुरुत्तरे करुन हाकलुन दिले.
सुबाहुने काशिराजाकडे सहाय्य मागीतले. घनघोर युध्द होऊन अलर्कचा पराभव झाला. निराश होऊन एका रात्री चिंताग्रस्त अलर्क घोड्यावर बसुन वनातील एका आश्रमाजवळ आला.गत आयुष्याचा त्याने आढावा घेतला असतां त्याला आईने दिलेल्या पत्राचे स्मरण झाले. दुसर्या दिवशी सकाळी स्नानादी कर्मे उरकवुन पत्राचे वाचन केल्यावर त्याच्या लक्षात आले की, शास्वत सुखा साठी मुमुक्षा निर्माण होणे गरजेचे आहे, त्यासाठी संतसंंगासाठी आश्रमातील मुनीकडे जाऊन, आपल्या असह्य दुःखा चे प्रशमन करायचे मनोगत व्यक्त केल्या वर त्याला दक्षिण दिशेसस सह्यापर्वता वर योग्यांचा राणा दत्तप्रभु मातापुर (माहुर) येथे त्यांचे वास्तव्य आहे, तिथे गेल्यास तुझ्या संसारचक्राचा भेद होऊं शकेल, हे ऐकुन त्वरीत सह्याद्रु पर्वता कडे रवाना झाला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – ३०.
अलर्क दत्तप्रभुंच्या आश्रमांत निःसंग,निर्मल, आनंदस्वरुप दत्तप्रभुंना अत्यंत आर्ततेने साष्टांग नमस्कार केला. व सद्गतीत कंठाने दुःखाचे निवारण करण्याची प्रार्थना केली. दत्तप्रभुंनी योग सामर्थ्यांने त्यांना सर्व कळले. मदालसे च्या उपदेशाने तो आधीच ब्रम्हचैतन्य झालेला होताच, थोडा भटकला होता, पण दत्तप्रभुंच्या दर्शनाने उपरती होऊन त्याला सर्व मिथ्या वाटु लागले. आतां वैभवाची किंवा राज्याची किंचितही आसक्ती त्याच्यात ऊरली नाही.असे दत्त प्रभुंना निक्षुन सांगीतल्यावर प्रभू समाधान पावले. एका दृष्टीक्षेपाने कृतार्थ होणारा शिष्य मिळाल्याने मी धन्य झालो. तुला अपेक्षित असलेल्या प्रवृतीच्या गुणांपासुन मुक्तीचे तीन उपाय आहेत. तत्वज्ञान, मनोभंग आणि वासनाक्षय! यांची खरी ओळख पटली की, संसाराचे आदिकरण नष्ट होऊनही विकल्प नाहीसा होत नाही. प्रारब्धाचा भोग शरीर असेस्तोवर राहतोच.
दत्तप्रभु पुढे सांगतात…निष्काम कर्मयोग. ज्ञानयोग, अन्वय आणि व्यतिरेक, सद् सद् विचाराचे महत्व, अध्यारोप, अपवाद, मनाची दुर्जयता, वैराग्य, योगाभ्यास, प्राणायम, मात्रा, अवस्था, चतुष्ट्य,नाडीशुध्दी,केवलकुंक,प्रत्याहार धारणा, ध्यान, समाधी या सर्वांचे विसृत वर्णन करुन त्याला उपदेश केला. साक्षात दत्तप्रभुच्या मुखातुन हा सगळा उपदेश ऐकत असतांना अलर्कचे मन आनंदाने भरुन, त्याचे अष्टसात्विक भाव उमलले. आपण अखंड आनंदरुप समाधीतुन बाहेर येऊन माझ्या कल्याणा साठी प्रयत्न केले, त्यामुळेच माझ्यात ल्या अज्ञानाचा अंधकार निरसुन जन्म मरणरुपी संसारांतुन सुटका झाली.
याचा परिपाक म्हणुन अलर्काने संपत्ती, राज्य, घरादाराचा त्याग करुन वैराग्य उत्पन्न झाल्याने आत्मचिंतना साठी वनात जाण्याचा निश्चय दततप्रभुं ना सांगीतल्यावर, ते म्हणाले, प्रथम मोठा भाऊ सुबाहुला शरण जा! त्याच्या च परिश्रमाचे फलीत तुला मिळाले. तुझे आतां अधःपतन किंवा मायेच्या मोहात अडकण्याचे भय उरले नाही. याप्रमाणे आश्वास्त करुन दत्तप्रभूंनी त्याला अलिंगन दिले.त्या अलिंगनाने राजा निस्तब्ध झाला, देहभान हरपला, मना च्या क्रीया थांबल्या. परमानंदाच्या सुखा च्या डोहात डुंबु लागला. अलर्काची निश्चल तटस्थ दत्तस्वरुपात रमुन गेलेली स्थिती पाहुन त्याला भानावर आणत दत्तप्रभु म्हणाले, तुझ्या चित्तात माझे ध्यान समावले असल्याने ते कधीच सुटणार नाही. प्रथम तू सुबाहुचेदर्शन घेऊन वनांत जाऊन माझ्या रुपात चित्ताचा लय कर! सतत माझ्याच ध्याना त राहिल्याने चित्त निर्वासन होईल.गुरुं ची आज्ञा झाल्याने आपल्याला दत्त चरणापासुन दूर जावे लागेल ही जाणीव झाल्याने त्यांची स्तुती करुन चरणाशी जागा देण्याची विनंती केली. त्याला आलेल्या अनुभुतीने गुरु-शिष्य किंवा देव-भक्त यांच्यातले द्वैत नाहीसे झाले. गुरुंच्या आज्ञेने बंधु सुबाहुच्या दर्शनाला जाण्यासाठी पुनश्च त्यांच्या पायावर मस्तक ठेवुन निरोप घेतला.
संदीपक शिष्याला वेदधर्मा पुढे सांगतात…..दत्तप्रभुंची आज्ञा घेऊन अहंकार व ममता नाहिसा झालेला वेगळा मदलसापुत्र अलर्क सुबाहुला भेटला. नंतर काशीराजाला म्हणाला, हे राजा, हे राज्य तुम्हाला देऊन टाकले, याचं काय करायचे ते तुम्हीच ठरवा.मी या राज्यावरचा अधिकार सोडुन दिला. काशीराजाने क्षत्रियधर्माची जाणीव देऊन बराच उपदेश केला, पण अलर्क म्हणाला, तुम्ही माझा पराभव करुन उपकारच केला. त्यामुळेच दत्तप्रभुंच्या कृपेचा मला लाभ झाला.आतां माझ्या मनांत कसलेही द्वैत उरलेले नाही. अलर्कची अलिप्तता पाहुन सुबाहुलाही आपल्या मनासारखे झाल्याचे समाधान वाटले. त्याने सुध्दा वनांत जाण्याचा निश्चय केला. काशीराज चक्रावुन गेला. ज्यासाठी एवढा अट्टाहास केला तो हेतु पुर्ण झाला. हे सार्वभौम राज्य आमच्या मेरुतुल्य आत्मसुखासमोर तुच्छ आहे.
क्रमशः संकलन – मिनाक्षी देशमुख








