आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

श्री भ. दतात्रय प्रभू संपूर्ण भाग ५, (२१ ते २५)
ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
श्री दतात्रय
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – २१.
जमदग्नीकडे एक कामधेनु होती जे हवं,जेव्हा हवं, जितकं हवं ते ती कामधेनु देत असे. तिची प्रार्थना करुन मुनींनी राजाची व त्याच्या सेनेची अनेक प्रकारच्या पक्वानांनी भोजन व्यवस्था केली. जमदग्नी स्वतः पंक्तीत फिरुन जेवणाचा आग्रह करीत होते. आश्रमाती ल स्वर्गतुल्य वातावरण व रुचकर जेवण सेवनाने सर्वजण तृप्त तृप्त झालेत. सर्व सिध्दी आणि निधी बाळगणार्या विवेक शील अर्जुनाची बुध्दी मात्र पालटली. जमदग्नीकडे असलेली चिंतामणी कामधेनु आपल्याकडे असावी अशी प्रबळ इच्छा झाल्याने त्याने जमदग्नी कडे मागणी केली. त्यांच्या नकारामुळे कसलाही विधिनिषेध न ठेवता, दुष्परि णामांचा विचार न करतां आपली दुर्दम्य पुर्ण हट्ट त्याने सोडला नाही.आज्ञानुसार राजसेवकांनी कामधेनुसह नगराची वाट धरली. थोड्या वेळाने समिधांची मोळी घेऊन परतलेल्या परशुरामाला आश्रमा तले तंग व बदलेल्या वातावरणाचे कारण कळल्यावर ज्वलंत निखार्या सारखा लालबुंद झाला. वडिलांचा विचार न घेता, “या दुष्ट, उन्मार्गगामी ब्रम्हद्वेषी राजाचे सहस्र हात तोडुन,शिर च्छेद करीन” अशी घोर प्रतिज्ञा केली.
क्रोधावेशात हाती परशु घेऊन राम अर्जुनाच्या मागे धावला. परशुरामाचा रुद्रावतार पाहुन कार्तवीर्याने ओळखले की, हाच भार्गवराम, भगवान विष्णुचा अवतार आहे. वरदानाप्रमाणे माझ्या पेक्षा श्रेष्ठाकडुनच माझा मृत्यु होईल, आणि ती वेळ आतां आली आहे,नाही तर गाय चोरण्याची दुर्बुध्दी कां व्हावी? आतां माघार न घेता, दत्तप्रभुंच्या कृपेनेच हा सुयोग जुळुन आला.भगवान विष्णुंना युध्दानेच प्रसन्न करुन, त्यांच्या च हाताने मरण पत्करुन परमश्रेष्ठ विष्णुकडुन मोक्ष प्राप्त करुन घ्यावी असा निर्धार करुन परशुरामासमोर युध्दा ला सामोरा झाला. रामने फक्त एका परशुने राजाच्या सैन्याचा फडशा पाडला.हाच विष्णुचा अवतार आहे याची पक्की खात्री अर्जुनाला झाली.
दत्तप्रभुंचे स्मरण करुन सिंहगर्जना करीत परशुरामाशी आपल्या सहस्र बाहूं नी युध्द करुं लागला. दोघांतही न भूतो न भविष्यंती असे घनघोर युध्द सुरु झाले. झाडांच्या फांद्या तोडाव्यात तश्या परशुराम त्याच्या भुज्या फक्त एका परशुने तोडू लागला! पण तुटलेल्या ठीकाणी परत नवा हात उगवावा,तुटले ल्या हातांचा पर्वत झाला. राम वैफल्याने व निराशेने तो खचुन गेला. त्याचवेळी आकाशवाणी झाली! अरे भार्गवा, रामा! याच्या भुजा ज्या बीजापासुन झाल्या ते बीज त्याच्या छातीत आहे. दैवी वाणी ऐकुन रामाने आग्नेयास्र त्याच्या छातीवर सोडले व पाहतां पाहतां दोन हात सोडुन हजार बाहु तुटुन पडल्यात. कार्तवीर्याला अंत जवळ आल्याची जाणीव झाली. ख्यात्याधिका च्या हातुन समरांगणावर क्षात्रोचित मृत्यु यावा ही आपली मनोकामना सद्गुरु दप्रभुने पुर्ण केल्याच्या जाणीवेने त्याचे मन कृतज्ञतेने, भक्तिभावाने भरुन आले.
त्याने स्वतःचे संपुर्ण अस्तिताव..मन शरीर! बुध्दी सर्व श्रीदत्तपदी समर्पण केले. मी दत्तस्वरुपच आहे. आत्म स्वरुपात चित्त स्थीर करुन, इंद्रीय निग्रह करुन प्राणात लय करुन शेवटी तो ब्राम्हण झाला. अर्जुनाने प्राण ब्रम्हरंघ्रा तुन काढतांक्षणीच रामाने परशुने त्याचा शिरच्छेद केला. अर्जुन मरण्याच्या आधी ही जीवन्मुक्त होताच, मृत्युनंतर तो विदेहमुक्त झाला. “गोविंद गोविंद मना लागलिया छंद। मग गोविंद ते काया,भेद नाही देवा तया। या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे कार्तवीर्य अर्जुन दत्तस्वरुपच होता,आणि दत्तस्वरुपातच समावुन गेला. परशुराम मात्र निमित्यमात्र झाला.आत्मरति, आत्मतृप्त अर्जुन अशा रितीने दत्तरुप झाला,”श्रीदत्ता चा पुर्ण भक्त। सर्वसंग परित्यक्त। पुर्वीच होता, जीवन्मुक्त,विदेहमुक्त आतां झाला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – २२.
इंद्रादिक देवांची झोप उडवुन टाकणार्या अर्जुनाचा रणांगणांत परशु रामाने केलेल्या पाडावामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत होते.आपली प्रतिज्ञा सफल झाल्याच्या आनंदात कामधेनुला घेऊन परतल्यावर वडिलांना वंदन करुन अर्जुनाचा कसा निःपात केला हे सांगीत ल्यावर जमदग्नीचे मन पश्चातापाने खिन्न झाले. परशुरामाचा धिक्कार करुन पुनः तोंड दाखवु नकोस म्हणाले, केवढ्या मोठ्या पापाचा तू धनी झालास? त्याला कळेना की, आपले काय चुकले? जमदग्नी म्हणाले,”दशश्रोत्रियसमो राजा हे स्मृतिवचन तू कसा विसरलास?हा तर दत्तभक्त,ब्रम्हण्य, पुण्यश्र्लोक राजा होता.मी सुध्दा त्याला शाप दिला नाही.
पित्याचे विवेकी,धर्मयुक्त बोलणे ऐकुन आपल्या हातुन खरोखरच फार मोठे पाप झाल्याचा पश्चाताप रामाला झाला. त्याने अत्यंत कळवळुन जमदग्नीचे पाय धरुन अजाणता पापा पासुन मुक्त होण्याचा उपाय सांगावा… जमदग्नीचे मन द्रवले. ते म्हणाले,माझ्या वचनावर श्रध्दा ठेवुन भारतखंडातील असंख्य तिर्थांची यात्रा व पावक जला मधे स्नान करुन त्याचे सेवन कर, चार धाम,सात पुरी, आणि बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन कर! पितृवचन शिरसावंद्य मानुन, आईचा निरोप घेतला. पित्याच्या आज्ञानुसार सर्व आचरण रामाने केले.
वस्तुतः राम हा प्रत्यक्ष विष्णुंचा अवतार! विष्णु म्हणजेच सर्वव्यापक! देवकार्या साठीच सहस्रार्जुनाला ठार करण्यासाठीच भगवान भूतलावर अवतरले होते. अवतारादी श्रेष्ठ पुरुषाचे अनुकरण सामान्य जन करतात. याच हेतुने परशुरामाने पितृज्ञानेचे निमित्य करुन लोकांसमोर तिर्थयात्रेचा आदर्श ठेवला.
परशुरामाने तिर्थयात्रा आटोपुन काशीला तिर्थयात्रेची सांगता केली.
आश्रमात येऊन वडिलांना सर्व वृतांत निवेदन केले.
वेदधर्मामुनी संदीपकाला पुढे सांगु लागले, महिष्मतीत अर्जुनाच्या वधाची बातमी समजल्याबरोबर मुलांवर जणुं डोंगरच कोसळला.इंद्रालाही पराभूत करणारा आपला अजिंक्य,त्रैलो क्यात ज्याचा दरारा असणारा पिता एका ब्राम्हणाकडुन मारला जावा, हे खरचं वाटेना! ज्याने वध केला, त्याच्या सुडाची प्रतीज्ञा केल्यानंतरच पित्याचा अंत्यसंस्कार झाला. नंतर आपले चतुरंग सैन्यासह परशुरामाचा माग काढत जमदग्नीच्या आश्रमाला वेढा घातला. त्यावेळी दैवयोगाने परशुराम बंधुंसह वनांत गेलेला होता. यज्ञशाळेत हवन कार्यात निमग्न असलेल्या जमदाग्नीला अर्जुनपुत्रांनी घेरलेले पाहुन रेणुकादेवीं नी व नंतर जमदग्नीनेही या ब्रम्हहत्ते पासुन परावृत्त करण्यासाठी खुप विनवले, पण सुडाने पेटलेल्या अर्जुन पुत्रांनी निष्ठुरतेने जमदग्नीचे मस्तक मारुन रामाचा शोध घेऊं लागले.
शोकदग्ध रेणुका तडफडुन “राम अजुन कसा आला नाही” म्हणत तळमत केवीलवाना शोक ती महासती कं लागली. तिकडे वनांत पपरशुरामाला सारखे अपशकुन होऊं लागले. घाईघाई ने तो आश्रमांत पोहोचल्यावर घडलेला अनर्थ पाहुन तो विलाप करुं लागला. पित्याचा वध करणार्या नराधामाचा सूड घेतल्याशिवाय, मी पितृत्रृणांतुन मुक्त होऊ शकणार नाही. गगनभेदी गर्जना करीत परशुराम नगराबाहेर उभा राहुन युध्दाचे आव्हान दिले. युध्दात परशुने सर्व सैन्य व कार्तवीर्याच्या सर्व मुलांचा शिरच्छेद केला. त्यांचे राजवाडे जमीनदोस्त केले व आश्रमांत येऊन सूड घेतल्याबद्दल सांगीतले व भयंकर प्रतीज्ञा केली. २१ वेळा माझ्या बाहुबळा ने पृथ्वी निःक्षत्रिय करुन क्षत्रियकुळ निर्बिज करुन त्यांच्या रक्ताने तर्पन केल्यावरच पित्याच्या त्रृणांतुन मुक्त होईन. पुत्राची प्रतिज्ञा ऐकुन रेणुका समाधान पावली, ती म्हणाली, कार्तवीर्य अर्जुन हा दत्तभक्त असल्यामुळे तुझी प्रतिज्ञा पुर्ण होण्यासाठी प्रथम दत्तप्रभुं ची कृपा संपादन झाल्यावरच मार्ग निष्कंटक होईल.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – २३.
रेणुका पुढे म्हणाली, ऐक कावड घे. एका पारड्यात पित्याला व दुसर्या पारड्यात मला ठेवुन दक्षिणेकडे नेतांना तुला एक योगसंपन्न ब्राम्हण आचार्य मिळतील, त्याच्या मार्गदर्शनाने माझे सहगमन आणि पित्याचे अंतक्रीया पार पाड. रेणुकादेवीला महाराष्र्ट आणि कर्नाटकात मुख्यतः पुजिले जाणारे महान दैवत आहे. माहुरला श्री दत्तप्रभु च्या निवासाजवळच या देवीचे मुख्य स्थान आहे. वरील सर्व घटना इथेच घडल्या आहेत. शोधत शोधत परशुराम ने आई-वडिलांची कावड खाली ठेवुन आश्रमात प्रवेश केला. थोडं पुढे गेल्या वर अग्निप्रमाणे तेजःपुंज अशा अवधूता चे दर्शन झाले. तेच भक्तांचे कैवारी दत्त प्रभु असल्याची खात्री पटली.आश्चर्याने व आनंदाने भारावुन राम थोडा पुढे येऊन पाहिल्यावर त्या अवधुताच्या मांडीवर अतिशय लावण्यवती स्रीशी गळ्यात गळा घालुन दत्तप्रभु प्रेमाति शयाने तिचे चुंबन घेत होते.नग्नावस्थेत त्यांची परस्परांशी चाललेली प्रणयक्रीडा रंगात आली होती.हा सारा मायेचा थाट!
यापुर्वीही अशा मायावी स्वरुपात दत्तप्रभुने देवादिकांना पळवुन लावले होते. पण परशुराम ही भगवंताचीच विभुती असल्याने त्याची श्रध्दा या विपरीत दर्शनाने थोडी सुध्दा विचलीत झाली नाही. रामाची धिटाई पाहुन दत्त प्रभु तसेच नग्नावस्थेत निर्लज्जपपणे त्याच्या समोर उभे राहिल्यावर, परशु रामाने अत्यंत नम्रपणे दोन्ही कर जोडुन साष्टांग नमस्कार केला व आपली हकीकत सांगीतली. कावडीत बसलेल्या रेणुकेने दत्तप्रभुंची स्तुती केली तर उलट त्यांनीच तिचि स्तुती केली.म्हणाले, सर्वांना वंद्य असे तुझे पती जमदग्नी, त्रैलोक्यात मोठा लौकीक! साक्षात काळही त्यांचे नांव घ्यायला घाबरतो, त्यांच्या अलौकीक तपश्चर्येचे वर्णन करण्यास मी देखील असमर्थ असतांना त्यांचा मृत्यु झालाच कसा? तेव्हा परशु रामने सांगीतले तो आश्रमांत नसतांना क्षत्रियांनी सुडभावनेने अचानक हल्ला करुन वडिलांचा वध केल्याचे विशद केले. हे ऐकताच अत्रिनंदन दत्त एकदम संतप्त होऊन त्यांच्या मुखातुन शापवाणी बाहेर पडली. दत्तप्रभूंची रोषयुक्त वाणी ऐकताच राम नम्रपणे हात जोडुन म्हणाला, आश्रमात क्षत्रियां नी केलेला अनर्थ पाहिल्यावर दुःखाच्या भरांत प्रतिज्ञा केली की! ” २१ वेळा पृथ्वीचे परिभ्रमण करुन निःक्षत्रिय करुन त्यांच्या रक्ताने पांच डोह भरुन त्या रक्ताने पितरांचे तर्पन करीन” या प्रतिज्ञेची पुर्तता आपल्याच कृपेने होऊं शकेल. दत्तप्रभुंनी त्याला अश्वास्त करीत म्हणाले, तुझी प्रतिज्ञा पुर्ण होऊन तुझे पृथ्वीवर अधिराज्य शिघ्रच स्थापन करशील!
परशुराम पुढे म्हणाला, कार्तवीर्य अर्जुन आपला कृपापात्र अतिशय प्रिय शिष्य, ब्राम्हणांचा आदर करणारा अश्या श्रेष्ठ, पुण्यश्र्लोक, ब्राम्हनिष्ठ पुजनीय राजाची हत्या माझ्या हातुन झाली, त्या साठीच आपली क्षमा मागुन आश्रय मागण्यासाठी आलो आहे. दत्तप्रभु म्हणाले, अरे रामा! त्याच्या इच्छेनुसार ख्याताधिकाराकडुन रणांगणांत विरोचित मरण यावा! तसा मीच “वर” दिला होता. तू माझीच विभूती आहे निश्चिंतपणे तुझी प्रतिज्ञा पुर्ण कर! रामाने पित्याच्या अंत्यसंस्काराचे आचारत्व स्विकारण्याची विनंती केली.”तथास्तु” म्हणुन रामाला आईच्या स्नानासाठी व लोकांच्या कल्याणाचाही उद्देश ठेवुन सर्व तिर्थे आणायची आज्ञा केली. रामाने बाणाने भूमंडळाचा भेद करुन पाताळांतुन सारी तिर्थे आणली. प्रभुच्या आज्ञेनुसार त्याने व आईने (रेणूका) विधिपुर्वक स्नान केले. ते तिर्थ “मातृतीर्थ”(मातापुर) या नांवाने प्रसिध्द आहे. दत्तप्रभुने त्यांच्याकडुन आवश्यक विधि व प्रायश्चित्ते करवुन घेतली.अग्नि प्रवेशापुर्वी रेणुका त्याला म्हणाली, सदैव दत्तप्रभुंच्या आज्ञेत राहुन, प्रतिज्ञा खरी करुन गोब्राम्हणांचे पालन, मिळव लेली सर्व भूमी ब्राम्हणांना दान करण्यास सांगीतले. त्याला चिरंजीव व सुखी राहण्याचा “वर” देऊन वियोगाचे दुःख आवरायचा उपदेश केला. रामाला दत्तप्रभुंच्या स्वाधीन करुन त्यांना पुनश्च वंदन करुन तीने अग्नीप्रवेश केला.महान पुण्यशालीनी प्रतिव्रता रेणुकामातेला अश्वमेध यज्ञाचे फळ पावत होते.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – २४.
वेदधर्मा संदीपाकाला पुढे सांगु लागले….रामाने आई-वडिलांचे क्रीयाकर्म करण्यासाठी दत्तप्रभुनांच आचार्य होण्याची प्रार्थना केल्यावर त्यांनी यथासांग सर्व विधि त्याच्याकडुन करवुन झाल्यावर त्यांनी रामाला विचारले, तुझे आई-वडिल कुठे आहेत हे माहित आहे का? अचंभित होऊन म्हणाला, आपणच तर त्यांची उत्तरक्रिये द्वारा मोक्ष प्राप्ती करुन दिली. ते तर मरण पावले.त्यावर किंचित हसुन म्हणाले, तू सुध्दा भुललास? प्रमाणावर च विश्वास ठेवलील ना? ते मरण पावले, स्वर्गाला गेले ह्या कल्पना अज्ञानमुलक आहेत. ते जगताचे जनक-जननी प्रत्यक्ष शिव-पार्वतीच! अनेक धर्मांची संस्थापना करण्यासाठी मानवीरुपाने अवतरले होते.
तुझी आई साक्षात जगन्माता आणि पिताजी तारक परमशिव आहेत.भूतलावरचे नियत कार्य पूर्ण होताच अंतर्धान पावले असले तरी, आजही सर्वव्यापी स्वरुपात आपल्यात विद्यमान आहेत. ते कुठेही जात नाही की, कुठुनही येत नाही, आतांसुध्दा ते इथेच आहे असे म्हणुन, परशुरामाला माता-पित्याचे दर्शन घडविले.दत्तप्रभुंनी त्याच्यात शक्तीसंक्रमण केले व त्यांच्या आज्ञेनुसार प्रणिता नदीत स्नान व संकल्प केला व परशु घेऊन पृथ्वी निःक्षत्रिय करण्याच्या मोहिमेवर निघाला.कुरुक्षेत्रावर जाऊन सर्व क्षत्रियांना आव्हान देऊन त्यांचा युध्दात संहार केला. अशा प्रकारे २१ वेळा युध्द करुन पृथ्वीवरील क्षत्रिय नामशेष करुन टाकले. प्रतिज्ञेप्रमाणे क्षत्रियांच्या रक्ताने पांच तळी भरुन त्या रक्ताने वडिलांचे तर्पन केले. आजही ती तळे स्यमंतपंचक म्हणुन प्रसिध्द आहे. अखेर परशुरामाचा क्रोध शांत झाला, तो दत्तप्रभुंच्या दर्शनाला परतला.
दत्तप्रभुंना नमस्कार करुन राम म्हणाला, आपल्या कृपेने व तेजाने मी क्षत्रिय संहार केला, प्रतिज्ञापुर्तीचे समाधान मिळाले, पण अति क्रोधाने आर्यत्व विसरुन असंस्कृत रानटीप्रमाणे वागण्याचा पश्चाताप होत आहे. या महत्पापापासुन, आपण तर पतितपावन आहांत,मी शरण आलो,आपणच माझे रक्षण करुं शकता. दत्तप्रभु म्हणाले! हे ईश्वरी कार्य आहे! यासाठीच तुझा अवतार झाला आहे. तरीसुध्दा तुला खंत वाटत असेल तर यथाविधि यज्ञ केल्यास तुझ्या पापाचे क्षालण व देव ब्राम्हणांचा संतोष होऊन तुझी किर्ती दिंगवत पसरेल. यज्ञाच्या निमित्याने तुझ्याजवळचे सर्व दान कर! कश्यप त्रृषिंना पृथ्वि समर्पन कर! या यज्ञाने तू अत्यंत पवित्र होशील.
श्री दत्तगुरुंची आज्ञा शिरसावंद्य मानुन, सप्तत्रृषी व श्रेष्ठ त्रृषींना पाचारण केले व आचार्यपदाचा अग्रमान दत्तप्रभुं ना देऊन यज्ञाची सुरुवात केली. भरंपुर धनधान्य,द्रव्य देऊन ब्राम्हणांना संतुष्ट केले. यज्ञसांगतेनंतर विधियुक्त कश्यप त्रृषींचे पुजन करुन त्यांना सर्व पृथ्वी दान केली. या आनंदाच्या क्षणी दत्तप्रभु रामाला म्हणाले, येवढ्या लहान वयात एकट्याने क्षत्रियांचा पराभव करुन सर्वाना सुखी केलेस, खळांचा संहार व सज्जनांचे रक्षणार्थ तू अवतार घेतला आहेस. तू साक्षात विष्णुरुप आहेस. स्तुति ऐकुन तो अतिशय संकोचला,नम्र पणे म्हणाला, ही आपलीच सर्व कृपा आहे. दोघांचा संवाद ऐकुन तिथे उपस्थित असलेल्या मुनींनी जयजयकार करुन म्हणाले,आपण दोघेही महान आहात. स्थुल दृष्टीने जरी तुम्ही दोन दिसतां तरी तत्वतः एकच आहांत.लोकां च्या ऊध्दारासाठी विविधरुपे धारण करुन अशा लिला तुम्ही नेहमीच करतां.
यानंतर परशुरामाची व दत्तप्रभुंचा चांगलाच स्नेह जडला. अत्यंत प्रेमाणे दत्तप्रभुंनी त्याला आपल्याजवळ ठेवुन घेतले. यज्ञदानादिकांच्या निष्काम अनुष्ठानाने रामाचे चित्त शुध्द झाले. त्याने शाम-दम-तितिक्षा-उपरती-श्रध्दा, साधना या षटसंपतीची जोड केली. त्याच बरोबर विवेक, वैराग्य आणि मुमुक्षा मुळे तो आत्मज्ञानाचा अधिकारी झाला हे जाणुन दत्तप्रभुंनी त्रिपुरारहस्या चा उपदेश केला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – २५.
दत्तप्रभुंनी निरोप देत रामाला तपाला जायची आज्ञा केली.पुढे ज्या वेळी दाशरथी रामाचा अवतार घेईन,त्या वेळी तुझ्यात संक्रमण केलेले तेज शोषुन घेईन.त्यानंतर वैवस्तव मन्वंतर संपेपर्यंत समुद्रतिरी तपस्या करीत रहा. पुढच्या सावार्णिक मन्वंतरात तुला महर्षीपद मिळेल आणि महाकल्पाच्या अंती मुक्त होशील,असा आशीर्वाद दिला कांही दिवस त्यांच्या सोबत राहुन समुद्रा काठी तप करण्यासाठी प्रयाण केले. तो तप करीत असतांना कांही दरिद्री ब्राम्ह णांनी त्याच्यकडे दानाची याचना केल्या वर तो म्हणाला, सर्व पृथ्वी कश्यपत्रृषीं ना व सर्व धन ब्राम्हणांना वाटुन टाकले. जर पृथ्वी दान केली तर, दिलेल्या दाना चा इथे राहुन उपभोग कसा घेत आहेस त्यांचे म्हणने पटल्याने, परशुरामाने बारा कोस रुंद व चारशे कोस लांब, बाणाने समुद्राला हटवुन कोकणपट्टी निर्माण केली. तीही ब्राम्हणांनी मागुन घेतली.
त्रेता युगात दाशरथी रामाचा अवतार झाला. सीतेला स्वयंवरांत जिंकुन राम मिथिलेहुन अयोध्येला जातांना परशुरामाने त्यांना अडवुन आपल्या शिवधनुष्याचा भंग कां केला? असा जाब विचारल्यावर रामाने त्याचे तेज आकर्षुन घेतले.त्यानंतर परशुराम चिपुळणजवळील समुद्रात गुप्त राहुन आजपर्यत तपश्चर्या करीत आहे. भावी सावर्णि मन्वंतरात तो महर्षि होणार …
वेदधर्मामुनी आपला प्रिय शिष्य सांदीपकाला पुढे सांगु लागले…
सोमवंशातील शत्रुजीत राजाला भगवान शंकराच्या कृपेने तेजस्वी, पुण्यखाणी, सुंदर, सद्गुणी त्रृतध्वज नांवाचा मुलगा होता. यथाकाळ त्यांची मुंज झाल्यावर सर्व विद्यांचे अध्ययन व विशेषतः धनुर्वेदात तो अतिशय प्रवीण झाला होता. नितिशास्राचा केवळ अभ्यासच नाही तर तो निष्ठेने पालन करीत तो शरणांगताचे रक्षण व गरजुंचे तो औदार्याने साह्य करीत असे. सहाजिकच त्याची किर्ती सर्वत्र पसरली. त्यावेळी नर्मदातीरी गालव नावाचा एक महान त्रृषी आश्रम करुन राहत होता.पवित्र असलेला अधिक मास, संक्रात ग्रहणाची पर्वणी साधुन मुनीने एका यज्ञाला प्रारंभ केला. पण होमाचा धूर दिसल्यावर, पातालकेतू नावाचा महाकाय राक्षस यज्ञात अपवात्र वस्तु टाकुन यज्ञाचा नाश करु लागला. मुनीने यज्ञाची दीक्षा घेतलेली असल्यामुळे, सामर्थ्य असुनही प्रतिकार, हिंसा किंवा शाप देता येत नव्हतं. त्या त्रृषीने आर्तपणे परमेश्वराची करुणापुर्ण हाक मारल्याने आकाश वाणी द्वारे अभयवचन कानावर पडले.व त्याचवेळी एक दिव्य घोडा गालवत्रृषीं च्या शेजारी उभा राहिला. अशरिरी वाणीने आज्ञा झाली, हा घोडा घेऊन शत्रुजीत राजाचा मुलगा त्रृतध्वजकडे गेल्यास यज्ञात विघ्न आणणार्यास ठार करेल.नंतर तुझा यज्ञ निर्विघ्न पार पडेल
गालवत्रृषीने आश्वस्त झाल्याने पुनः यज्ञास सुरुवात केल्याबरोबर, तो असुर रानडुक्कराच्या रुपाने गुरगुरत तिथे आल्यावर, त्या दिव्य घोड्यावर आरुढ त्रृतध्वजाने तीन बाणांत असुराचे ह्रदय वेधले, पण तो न मरतां,वर्मी लागले ला रानडुक्कर(असुर) पाताळांत शिरला.त्याच्या मागोमाग त्रृतध्वजहीही
पोहचला. तिथे रत्नजडीत गगनचुंबी प्रासाद व देवतुल्य सुंदर युवती दिसली. राजपुत्राला पाहुन ती मुर्च्छित झाली.ते पाहून तिथे असलेल्या तिची सखी कुंडलेकाला मुर्च्छित होण्याचे कारण विचारल्यावर तीने सांगीतले की, ही युवती विश्वावसु गंधर्वाची कन्या मदालसा असुन पातालकेतूने इथे पळवून आणले. तिच्याशी विवाह करण्याचा उद्याचा मुहुर्त विश्वामित्राने सांगीतला होता. त्यामुळे ती प्राण द्यायला निघाली असतां गो-लोकांतुन कामधेनुने तिला वाचवले व उद्या एक राजकुमार येईल,त्याच्याशी तुझा विवाह होईल असे सांगुन कामधेनु गुप्त झाली.
कुंडलेका म्हणाली, अशा संकट समयी आपण येऊन आमची मदत केली हे आमचे अहोभाग्यच!
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.








