झाशीची राणी संपूर्ण भाग ६, (२६ ते २९)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

आतां आपल्यासमोर घेऊन येत आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई ! धगधगती शलाका, इतिहासातील एक पर्व ! स्वाभिमानाने आणि देशप्रेमाने लखलखणारी तेजोमय गाथा ! इंग्रजांचा तनखा खात, त्यांचे पाय चाटत, देशाची माती त्यांच्या स्वाधीन करुन ऐषारामात जगणार्‍या संस्थापिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी तेजोमयी ज्योत म्हणजे झाशीची राणी !

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

झाशीची राणी

 

 ! ! ! झाशीची राणी ! ! !

भाग – २६.

 सर्वांनी गोपाळपुरला मुक्काम करुन शिद्यांच्या हद्दीतील आमेन गांवी पोहचले. तात्या टोपे पण सर्वांना येऊन मिळाले. त्यांच्यावर आग पाखडत म्हणाल्या, बंधो ! ऐन मोक्याच्यावेळी दोनदा आम्हाला एकटं पाडलेत. . . काय उपयोग आपल्या शौर्याचा, विरश्रीचा? आतां ग्वाल्हेर किल्ल्यात जाऊन सुरक्षित होऊन लढणे एवढा एकच मार्ग उरलाय. .

जयाजी शिंदे दत्तक असला तरी महादजी चा वारस. . . त्यांचा दिवाण दिनकरराव व्यवहार कुशल व राजकारणांत दक्ष, त्यांच्याशी वाटाघाटी करुन फौजेसह आपल्यात सामिल करुन घ्या. जरी ते इंग्रजभक्त असले तरी. . . एवढं तुम्ही केलत तरी आम्ही मागचं सारं विसरु. मी. .

 तेवढ्यात जयाजी शिंदेकडुन निरोप आला. . . आमच्या राज्यातुन त्वरीत निघुन जा. . . पेशवे असलेल्या नानासाहेबां ना राग अनावर होऊन, आलेल्या हारकर्‍याजवळ निरोप दिला, हे राज्य आम्ही दिलय, शिंद्यांची फौज आमची आहे. आमच्याशी गद्दारी केल्यास राष्र्ट द्रोह केल्याबद्दल कुत्र्याच्या मौतीने मारु. हरकर्‍या गेल्यावर मनूबाई म्हणाल्या, आतां ही जलाली भाषा सोडुन द्या. पेशवाई, सरदारी सारचं नष्ट होण्याची वेळ आली आहे. ग्वाल्हेरखेरीज आपल्याला दुसरी वाट नाही. शिंद्यांच्या फौजेचा ओढा आपल्याकडे आहे. त्यांच्याशी समापोचारा ने वाटाघाटी कराव्या. कालपीची अगदी दशादशा झाली. ३०, ००० वस्ती असलेलं शहर निर्मनुष्य झालं. कालपीच्या किल्ल्यातील अगनित शस्रास्रे इंग्रजांच्या हाती लागली.

 काशी ! महाराजांच्या निधनानंतर केशवपन करण्यास काशीला जाण्याची परवाणगी नाकारली होती. . आतां त्याची गरजही नाही. आमचा स्री असल्याचा शेवटचा पुरावा हे केस कापुन टाक ! शिरस्राणाखाली लपवतां आले पाहिजे. काशी आजपासुन तुं लढाईत न उतरतां माझ्या दामोदरला, झाशीच्या वारसाला सांभाळ. . . तुझ्या भरोश्यावर आम्ही प्राण सोडु. . . .

 नानासाहेबांनी व राणीसाहेबांनी शिंद्यांना प्रेमाणे, धाकाने हरप्रकारे समजा वण्याचा प्रयत्न केला, पण इंग्रजांची शाबासकी मिळवण्यासाठी आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याची बातमी नजरबाजाने आणली. परंतु शिंद्यांच्या सैन्यात आपले भक्त असल्यामुळे त्यांंना आपल्याविरुध्द नाही लढायचे. . . नानासाहेब ! गोरे सैन्य पोहोचयाच्या आंत आपणच हल्ला करुं. . योजना आखली जात असतांनाच १ जुन १८५८ च्या सकाळी शिंद्यांच्या फौजेने बहादूरपुरला असलेल्या पेशव्यांच्या सैन्यावर हल्ला केला. राणींनी आपल्या सैन्यांना प्रोत्साहित तर केलेच पण शिंद्यांच्या सैन्यात घुसुन त्यांचे बौधीक घेऊन त्यांनाही आपल्याकडे वळविले. आक्रमणाचा रोख आपल्याकडे आहेसे पाहुन जयाजी आग्र्याला पळुन गेले. राजस्रीयांना नरवर गावी पोहचवुन दिवाण दिनकररावही आग्र्याला पळाले. लक्ष्मीबाई, नानासाहेब, तात्या टोपे, राव साहेब यांनी ग्वाल्हेरात समाधानाने प्रवेश केला. नानासाहेब राणींच्या दूरंदेशी बुध्दी चातुर्याचे कौतुक करत म्हणाले, तुम्ही मनांत आणले असते तर दामोदरला घेऊन कुठेही इंग्रजांचा तनखा खात ऐशारामात जगला असतां, पण मखमली वाट न निवडतां काटेरी मार्ग. . . .

 आतां ते सारं जाऊ द्या. तीन महिन्यापासुन सैन्यास रोजमुरा नाही तो आधी द्या. तुरुंगातील कैदी सोडा. . तीन जुनला नानासाहेबांचा अभिषेक होणार म्हणुन बाहेर शहाजणे वाजत असलेले पाहुन, राणीसाहेब म्हणाल्या, ही वेळ विजयोत्सव साजरी करण्याची आहे का? इंग्रज चूप बसुन ग्वाल्हेर पचु देईल?सध्या पंचांगे सावध राहुन शहराबाहेर मोर्चे, किल्ल्यावर तोफगोळे सज्ज ठेवण्याची. . आम्ही नाही या उत्सवात सहभागी होऊ शकत, त्या नवलखा बागेतील वाड्यात रहायला निघुन गेल्या.

 तीन जून रोजी दरबार भरवुन नाना साहेब पेशव्यांच्या नावाची द्वाही फिरवली. ७॥ लाख सैनिकांचा पगार, ९ लाख बक्षिसासाठी वाटल्या गेले. जुन्या अधिकार्‍यांना त्यांचे पद परत दिले. दिवाण दिनकरराव व मोहनधूर बळवंत राव यांचे वाडे आणि संपत्ती जप्त करण्यांत आली. दरबारांत राणींसाहेबां साठी सन्मानाचे आसनही नव्हते.

 पांच जुनला दोनच दिवसांनंतर खबर आली. . ब्रिगेडियर स्मिथ व रिडर ह्युरोजच्या मदतीस गेले असुन महाराष्र्टा तला उठाव रोखण्यासाठी ग्वाल्हेरकडे निघाले. ह्युरोजचे पध्दतशीर आक्रमणा ची योजना व सैन्य शिस्त असल्याने राणी साहेब धसकल्या. त्यांच्या हाती फक्त २५० स्वाराची तुकडी, नानासाहेब, राव साहेब, तात्या सारेच उत्सवात मग्न. . थोड्या वेळाने तात्या त्यांना थाळ्यासाठी आमंत्रीत करायला आल्यावर मोठ्या प्रयासाने संयम ठेवत म्हणाल्या. . . .

 क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 ! ! ! झाशीची राणी ! ! !

भाग – २७.

 तात्या आमच्या जलाली बोलण्याने तुम्ही दुखावले जाता, पण ही वेळच आणिबाणीची आहे, ह्युरोज ग्वाल्हेरकडे निघाला आणि तुम्ही काय करतां तर ब्राम्हणभोजने, अनुष्ठाने, अभिषेक, पुजा, आरत्या याने लढाई जिंकल्या जाते? खरं म्हणजे, आतां पुढील मसलती, सेना प्रशिक्षित करणे, मोर्चे बांधणे, तोफगोळे, बारुद, शस्रे यांची बेगामी करणे हे सोडुन, उत्सवात निमग्न आहात. . आम्हास हे मान्य नाही. थाळ्यास आम्ही येणार नाही. पेशव्यांचा हुकुम आहे तुम्हास घेऊन येण्याचा. . . पेशवे? कुठे आहे पेशवाई?ती तर केव्हाच नाचगाण्यां त, ऐशारामात, जेवनावळीत, ब्राम्हणभोजनांत गेलीय ! आताही तेच चाललय ! तात्या आतां ना आम्ही राणी, ना नानासाहेब पेशवे. . . आतां फक्त क्रांतीकारक, क्रांतीचे सेनापती आहोत. आतां सावधतेने वागणे गरजेचे आहे. या तुम्ही. तात्या निघुन गेल्या वर त्या काशी, मुंदरकडे वळत म्हणाल्या, आम्ही खुप कठोर बोललो का?काय करावे?किती सलमाईने बोलावे?तानु मावशीने पानिपतच्या युध्दाची हकिकत सांगतांना सुभेदार मल्हाररावांची जी स्थिती झाली होती, काशी ! आज नेमकी तीच परिस्थिती आमच्या समोर ठाकली. .

आमच्या शब्दास किंमत उरली नाही. पहिला दरबार झाला तेव्हा तर आम्हास आमंत्रणही नव्हते. किती अपमानित वाटले?पण भावी कार्याच्या आशेने स्वस्थ राहिलो. दुसर्‍या दिवशी निमंत्रीत केले पण आमचे स्थान नगण्य होते, तरी सुध्दा सर्वजण एकत्रीत येऊन लढाईच्या तयारीस लागते तर सारं विसरुन आम्ही जाऊ. यांना डेर्‍याचे दांडेच करायचे असेल तर, आम्ही एकटे काय करणार?

 १३ जुन उजाडली. अनेक लेफ्टनंट कर्नल, स्टुअर्स, नेपिअर, एबर्ट, हरकारे, लाईट फुट, रीच हे सगळे सेनापती तोफा, हत्ती, घोडे, शस्रसज्ज होऊन ह्युरोज ग्वाल्हेरकडे निघाला. राणींनी सगळे विश्वासु एकत्रीत करुन बैठक बोलावली. त्यांना संबोधीत करणार तोच रावसाहेब, तात्या व बांद्यांचे नबाब तिथे आले. ही बैठक बघुन आश्चर्याने म्हणाले, मनूबाई ! एकट्याच कशाची मसलत करीतआहात तात्या ! इंग्रजसेना चारही बाजुने येत आहे. यावेळी युध्दाची मसलत करायची तर, आपण सारे विजयोत्सवात मग्न ! मी तर एक शुद्र स्री. . . एकटीने जोवर जिवंत आहे तोवर घेतलेले व्रत निभवायचेय ! तात्याने विषादाने आपली पगडी त्यांच्या पायाशी ठेवुन म्हणाले, आतांपर्यत खुप चुका झाल्यात. आपण सेनापती होऊन सुत्र हाती घ्या, एकमुठीने इंग्रजांचा मुकाबला करु. . . ग्वाल्हेर आपलेच राहील मग सारी योजना निश्चित झाली.

 कोटाई सराईकडचा विभाग राणीं कडे, किल्ल्याचा सर्व परिसर बांद्यांच्या नबाबाकडे, कंपूचा विभाग तात्याटोपेंकडे, फुलबाग परिसर मुंदरकडे, असे सर्व ठरल्यावर त्या निर्वाणीचे बोलल्या, पुढे संधी मिळेल न मिळेल, मी आपल्या सर्वां चा अखेरचा निरोप व धन्यवाद देत म्हणाल्या, हा माझा शेवटचा हुकुम समजा. . . . माझी रत्नजडीत सुवर्णाची आभुषणे व दामोदरला ताब्यात घ्या. आजपर्यत आपणासर्वांची जशी साथ मिळाली तशीच पुढेही द्या. पराभव झाला तर इंग्रज सूड घेण्यासाठी याला मारुन टाकण्यास पुढे मागे पाहणार नाही, याला सुरक्षित स्थळी घेऊन जा.

 दामोदरास जवळ घेऊन कुरवाळत म्हणाल्या, बाळा ! मी एका मोठ्या युध्दा वर जात आहे. देशासाठी रक्त सांडणार्‍या राणी लक्ष्मीबाईचा तूं पुत्र आहेस, याचा विसर न पडु देता हसत हसत निरोप दे. .

 १६ जूनची पहाट ! युध्दाची सर्व तयारी झाली. ठरल्याप्रमाणे सर्वजण आपापल्या मोर्चावर जायला सज्ज ! आमची एक अंतिम इच्छा. . . शत्रु प्रबळ आहे, अनिष्ट घडुन आम्हाला रणांगणी विरमरण आले तर आमचा देह फिरंग्या च्या हाती पडु देवु नये, अर्धमृतावस्थेत असलो तरी प्राण जाण्याची वाट न पाहतां अगोदरच अग्नि द्या. ही आमची तुमच्या सेनापतीची अखेरची आज्ञा ! तुमच्या डोळ्यांत अश्रू?हा स्वातंत्र्य वाटे वरचा सोहळा. . . अश्रूंचा टिळा नको, कुंकु उधळा. . . गुलाल उधळा. . . आमचा अंतिम नमस्कार स्विकार करा. . . . उदास, जड अंतःकरणाने सारे निघुन गेल्यावर राणी मुंदरकडे वळुन म्हणाल्या, आम्ही स्रीत्वा चे फास तर कधीच तोडले. . . आमचा पठाणी वेश, जंबीया, दोन तलवारी, बंदुक सारं आण. . . सारंगी घोडीसाठी मन आक्रंदत आहे पण आम्हाला सुखरुप पोहचवुन रक्त ओकीत गेली बिचारी. . . पागेतील उत्तम घोडा घेऊन ये. . . कौंचच्या युध्दात चिलखते फाटली ती दुरुस्त करायला नानासाहेबांना त्यांच्या विजयोत्सवाच्या व्यापात सवड झाली नाही. मुंदरने आणलेली सर्व शस्रे मनःपुर्वक वंदन करुन चिलखताशिवाय अंगावर चढविली. सेनापतीची खूण, मोत्याचा कंठा गळ्यात घातला.

 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 ! ! ! झाशीची राणी ! !

भाग – २८.

 सर्व तयारी झाली. मुंदरने आणलेला घोडा तपासला असतां, त्याची डावी कुस सैल, टाचांचा आकार बसलेला मुंदर घोडा अडणार. . . पण थांबायला वेळ नव्हता. हरहर महादेवाच्या गर्जनेत लक्ष्मी बाईंचा घोडा निघाला. पाठीशी विश्वस्त अनुचर, सैन्य. . . लढाई आतां हाकेच्या अंतरावर होती.

 ब्रिगेडियर स्मिथ हुस्सारची प्रशिक्षित सेना सराई कोट्याकडे निघाल्याची वार्ता, त्यांच्याबरोबर कर्नल ब्लेक, ऑवेन, लाॅक वाॅयल्स, हीथ सारखे कसलेले सेनापती आपापल्या तुकड्यानीशी पुढे सरकले तोच भारतीय सेनेकडुन तोफांचे गोळे धडाडु लागले. स्मिथने केलेल्या तोफांच्या वर्षवात एक भारतीय गोलंदाज बळी पडल्याने फौज बिचकुन मागे सरकु लागल्यावर कर्नल स्मिथने पाठलाग करुं लागला असतां मधेच सोनरेखा नाला. . पलीकडे असणार्‍या गुलाम महम्मदने चार फुट खोलीचं अंतर कापत येणार्‍या इंग्रज सेनेवर, गोळ्या, तोफा, उठवल्या. त्याचवेळी तात्या टोपेकडे रेंस व वाॅयल्स सरकले. दोन घंटे धूमसान लढाई सुरु होती. हळुहळु कॅप्टन रेंस व वाॅयल्सची सेना अस्तव्यस्त होऊन पळु लागली. आपला विजय निश्चित समजुन राणीने प्राण पणाला लावुन, सैनिकांना प्रोत्साहित, उत्साहित, उत्तेजन देत विजे सारखी तळपु लागली. उन्हाची किरणें पडुन तलवारी पेटल्यासारख्या, तलवारी तुन ठीणग्या पडल्याचा भास होत होता. सैनिक थकले. उन्हाचा कडाका असह्य, हत्ती घोडे पाण्यासाठी खिंकाळत होते. सैनिक तोंडात लिंबाच्या फोडी ठेवुन घशाची कोरड शमवित होते.

 दुपारसाठी मुद्दाम राखुन ठेवलेली ताज्या दमाचची हुस्सार फौज स्मिथने आणली. भारतीय सेना या आक्रमणापुढे धारातीर्थी कोसळु लागली. रक्ताचे पाट वाहु लागले. कॅप्टन पूर, कॅप्टन हिनीज, लेफ्टनंट रेंस डाव्या बाजुकडे वळले. ताज्या दमाच्या हुस्सार सैनिकांनी बेधुंद गोळीबार, तोफमारा करत राणींच्या सैन्या वर तुटुन पडले. अर्ध्या तासातच युध्दाचा रंग पालटला. त्यांचे शिस्तबध्द डावपेच यशस्वी होत होते. त्याचवेळी कॅप्टन हिनीजने फुलबाग छावणीतील तीन गोलंदाजांना टिपून तीन तोफा हस्तगत करुन त्यावर स्वतःचे तोफची बसवले. त्याच तोफेतुन भारतीय सैन्यावर धडाधड तोफा सुटु लागल्या. आधीच शिस्तीचा अभाव असलेली भारतीय सैनिक पळु लागली. एकच आकांत, किंकाळ्यांचे आवाज गगनाला भिडले. राणीसाहेब फुलबाग छावणीच्या बाहेरच शत्रुंच्या सैन्यांना सपासप कापत सैन्याला ओरडत धीर देत होत्या. घसा एवढा बसला की, आवाज सुध्दा निघेनासा झाला. अत्यंत घाबरलेली सेना सोनरेखा नाला ओलांडुन किल्ल्याकडे पळु लागली त्याचवेळी कर्नल हीचने फुलबाग छावणीत घुसखोरी केली. संकट चारी बाजुने. .

 राणीसाहेब, मुंदर, रघुनाथसिंह आणि १५-१६ एकटे सपाट प्रदेशावर होते. आजु बाजुच्य्या टेकड्या आणि डोंगरावरुन हुस्सारांची तुकडी वेगाने, भयंकर गतीने आक्रमण करीत होती. सोनरेखा नाला पार करण्यावाचुन गत्यंतर नव्हते. सारे सोनरेखा नाल्याकडे वळले तोच मुंदर गोळीला बळी पडली. राणींनी दोन्ही हाती तलवार घेऊन मुंदरच्या मारेकर्‍यास कंठस्नान घातले. त्या दोन्ही हातांनी सपासप वार करीत वाट काढत पुढे जात असतांना त्यांच्या गळ्यातला मुल्यवान हार गोर्‍या सैनिकांना दिसला. अंगरखा फाटला होता. सोनरेखा नाला पार करणें आवश्यक होते पण दुर्देव आडवे आले. घोड्याला नाला पार न करतां आल्याने मधेच अडुन उभा. . . त्याचवेळी एका गोर्‍याने बायोनेट त्यांच्या बरगडीत घुसवला. एका शिपायाची गोळी मांडीत घुसली. तशाही अवस्थेत लक्ष्मीबाईने दोन गोर्‍यांना चिरले. घोड्याला टांच मारण्याचा प्रयत्न असफल होत होता. घोडा जराही हलत नव्हता. गुलाममहंमद, रामचंद्रराव, रघुनाथराव गोर्‍यांवर तुटुन पडले. तीन गोरे राणींशी लढत होते. गळ्यातील कंठा घेण्यासाठी एकाने मागुन त्यांच्या मस्तकावर वार करुन गळ्यातील कंठा ओढुन पळुन जात असतांना राणीने त्याचे हातच कापले. लक्ष्मीबाईचे मस्तक उजवीकडुन खांद्या पर्यंत चिरले, उजवा डोळा लोंबत होता, त्यानी घोड्यावरच मान टाकली. त्याच्या हातातील तलवारी खाली पडल्यावर जंबीयासाठी धडपडणारा हात. . . सगळे त्यांच्या भोवती जमा झाले, तरीही त्या जिवंत होत्या. घोड्याच्या अंगावरुन रक्ताच्या धारा वाहत होत्या. संध्याकाळचा अंधार दाटुन आला. . .

 क्रमशः
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

 ! ! ! झाशीची राणी ! ! !

अंतिम भाग -२९.

 गदगदलेल्या आवाजात गुलमोहमंद म्हणाला, कुणीतरी काशीस व दामोदरास घेऊन या. रामचंद्रांनी तिथेच मरुन पडलेल्या एका गोर्‍या सैन्याचा डगला चढवुन दामोदरास आणण्यास गेले. युध्द अजुनही सुरुच होते. तोफा गोळ्यांचे आवाज आरपार जात होते. रक्ताच्या वासाने पोटांत ढवळत होते.

 जवळच गंगादास बाबांची कुटी. . . राणीसाहेबांची काया कुटीकडे नेली. त्यांचे फक्त ४-५ अनुचर होते. कुटीबाहेर गवताची मोठी गंजी होती. त्या गंजीवर शेला अंथरुन त्यावर राणीचा देह ठेवला. गंगादासबाबा धावत जाऊन कुटीतील गंगाजल त्यांच्या तोंडात घातले. निरांजन पेटलेलं होतच, राणींना ओवाळलं, मंत्र पठण सुरु केलं, तेवढ्यात काशी व दामोदरास घोड्यावर बसवुन रामचंद्र आले. काशीने राणींच्या पायाला घट्ट धरुन आकांत मांडला. अर्धबेशुध्दावस्थेत, प्राण धुगधुगता, मुखातुन क्षीण शब्द. . . पे. . ट. . वा. . पे. . ट. . वा. . . . रामचंद्र चिंतेत अजुन प्राण आहेत. बाबा कसं पेटवावं? तेवढ्यात क्षीण शब्द आले. . . पे. . ट. . वा. . गंगादास बाबांनी राणींच्या मुखात गंगा जल घालुन देहावर शिंपडले. . . त्यांच्या शौर्यास साजेसे विसर्जन करा. . . ही शोक करण्याची वेळ नाही. शत्रु कधीही येऊ शकतो. दुरवरुन घोड्यांच्या टापांचे आवाज येत होते. सगळ्यांना आठवणीचे उमाळे. . . आतां क्षणाचाही विलंब नको. . गंगादास बाबांनी दामोदरच्या हस्ते गवता च्या गंजीला निरांजन ज्योत लावली. ज्वाला आकाशाला भिडल्या.

‌ दामोदर सर्वांना विचारु लागला. . आमच्या मातोश्री कुठेय. . कुठैत मातोश्री सर्वजन धरणीवर अंग टाकुन रडत होते, शोक करत होते. गंगादासबाबांनी कुटीतील फुलांची परडी व शंख आणले. शंखाचा पवित्र निनाद. . . फुलांची उळळण अश्रूंचे अर्ध्य. . एक रणयोगिनी अंतिम यात्रेला निघाली. . . या सर्वांपासुन अनभिन्न दामोदर सगळ्यांना एकच प्रश्न विचारत होता, मातोश्री कुठैय?काशी त्याला कुशीत घेत म्हणाली, बाळा ! त्या अंतिम यात्रेला गेल्या. . . अंतिम यात्रेला. दामोदरला फक्त गेल्या इतकचं कळलं गेल्या? आम्हाला सोडुन?मातोश्री ! कुठे गेलात आपण?आम्हालाही घेऊन जा. . घेऊन जा. . .

 दामोदरने हंबरडा फोडमला, शंखा चा निनाद. . . वातावरणांत धूर. . चित्ता हळू हळु शांत होत होती. गंगादासबाबा म्हणाले, दामोदरास ताबडतोब घेऊन निघा. . . मी राणींसाहेबाच्या अस्थि यमुनेत विसर्जित करेन. त्यांची रक्षा मात्र झाशीच्या किल्ल्यातच. . . . .

 झाशी आणि किल्ला सगळ्यांनाच आठवणीचे उमाळे, कढ आले, रडण्याचा भेसूर आवाजाने घोडेही बिचकले. चित्ता जळत होती. राणींच्या शोधासाठी चौदिशांना पिंजुन काढणार्‍या गोर्‍या सैनिकांच्या घोड्याच्या टापांचा आवाज जवळ. . जवळ. . . जवळ. . . टप. . टप. . . टप. . इथुन त्वरीत निघणे भाग होते. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी होती. ती म्हणजे लक्ष्मीबाईच्या काळजाचा तुकडा आनंद उर्फ दामोदर, ज्याच्या रक्षणासाठी आपल्या अनुचरांना अनेक शपथा दिल्या भरपूर सोन्या हिर्‍यांचे दागिने देऊन ठेवले. काशी, गणपतराव मराठा, रामचंद्र देशमुख, रघुनाथसिंह यांनी आपले कर्तव्य चोख बजावलं. लक्ष्मीबाई नावाच्या धैर्याचा अस्त झाल्यावर ग्वाल्हेरची लढाई जेमतेम दोन दिवसांत संपली. रावसाहेब, तात्या टोपे अलिबहादूर ग्वाल्हेर सोडुन निघुन गेले. इंग्रजांना रान मोकळं. . .

 किल्ल्यावर युनियन जॅक फडकला इंग्रज राणींचा शोध गावोगावी करत होते. कुणी नुसतं राणीचं नांव जरी घेतलं तरी मृत्युदंड ! त्यामुळे दामोदरला घेऊन जाणार्‍या त्या चौघांना आश्रय मिळणे दुरापास्त झाले. तरी कुणीतरी लपुन छपुन भाजीभाकरी देत. बेतवा नदीच्या किनार्‍याने चालत, चंदेरी जिल्ह्यातील झाशीजवळचे स्थान तालबेहट कुटराला पोहोचले. इंग्रजांना सुगावा लागु नये म्हणुन कुटारापासुन ५-६ मैल दूर असले ल्या बेतवा नदीकाठी एका जीर्ण मंदिरांत सारे राहुं लागले. अशीच त्यांनी दोन वर्षे काढली. अशातच आजारी पडलेल्या दामोदरला हवा सोसवेना म्हणुन सारे शिवपुरीस आले. तिथे तात्या टोपेंना एका फितूराने पकडुन दिल्यामुळे नुकतीच फाशी दिली होती.

 पाटणमधील पृथ्वीसिंहाच्या मदतीने नन्हे खाॅं व गणपतराव मेजर फ्लीकला भेटुन दामोदरची सर्व हकिकत सांगुन म्हणाले, शूरवीर, निर्भय राणीच्या पुत्रासाठी कांहीच करणार नाही का? फ्लीकचे मन आधीच राणीच्या शौर्याने भारावलेलं होतं. त्याने इंदौरचा प्रतिनिधी सर रिचमंड शेक्सपिअरची भेट घेतली. आणि शूर राणीच्या काळजाचा तुकडा दामोदर इंग्रजांच्या आश्रयाने राहु लागला केवढा हा दैवदुर्विलास?

 दामोदर सज्ञान झाल्यावर त्याचा हक्क मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले पण व्यर्थ ! मग गव्हर्नर जनरल लाॅर्ड नोर्थब्रकुनने एकरकमी १०, ००० व दोनशे रु. चा तनखा मंजुर केला. परंतु राणीसाहेबांनी क्रातीचा ऊठाव करुन युध्दात प्रत्यक्ष सहभाग घेतल्यामुळे जप्त केलेली व्यक्तीगत संपती परत देण्याचा प्रश्नच नाही असे म्हणुन, ज्या राणीने अजोड पराक्रम केला तिच्याच पुत्राला कठपुतली सारखं नाचवलं व निर्धन करुन सोडलं. रावसाहेबांनाही सियालकोटमधे फाशी दिली.

 छबेली, मनकर्णिका, मनू, मनूबाई, झाशीची राणी लक्ष्मी, महाराणी लक्ष्मीबाईसाहेब. . . क्रांतीज्योत लक्ष्मीबाई अवघा २६ वर्षाचा प्रवास स्तिमित करणारा, व्यक्तीमत्व विकास तेजस्वी दैदीप्यमान आहे. त्यांचेपत्रव्यवहारातील मुत्सद्दीपणा, अन्यायाविरोधी धिरोदत्त लढाई, आत्मस्वातत्र्याची तेजस्वी जाणीव गंगाधरसारख्या अनेक लोकप्रवाद असलेल्या पतीबरोबरचे सहजीवन, आलेल्या अनेक आपत्ती, दैवाचे घाव, पुत्र शोक, समरप्रसंगी वेळेवर न मिळालेली साथ, या सर्व प्रसंगी त्यांच्या मनाची उलघाल, तळमळ, वेदना, रुखरुख, खंत. . . याचा वेध कसा घ्यायचा?या तेजस्वी, बाणेदार स्रीचं अवघं २६ वर्षाचं आयुष्य म्हणजे लखलखत्या तारकांचा पुंज. . . ग्वाल्हेरची धूमसान लढाई दोनशे मैलांच्या टापूमधे चालली. अवघं २६ वर्षाचं वय असलेली धैर्यमूर्ती लक्ष्मीबाई. . आपल्या अफाट कर्तुत्ववान, धैर्याने, शौर्याने लढणार्‍या राणीचे नांव इतिहासात सुवर्णाक्षराने कोरुन ठेवले. त्यांचा मृत्युही त्यांच्या शौर्याला साजेसाच रणांगणात लढतां लढतां, दहा जणांना कंठस्नान घालत, स्वातंत्र्याचा उद्घोष करत, जिवंतपणी आपले सरण पेटवायला सांगण्याचं अलौकीक धारिष्ट दाखवत किर्तीच्या विमानांत बसुन त्या स्वर्गात गेल्या. या विद्रोहाच्या लढ्यात, स्वातंत्र्ययुध्दात जी विरंगना अग्रभागी होती ती शौर्य सौदामिनी झाशीची राणी लक्ष्मीबाई. . . विपुल धन आणि अतुल वैभव कस्पटासमान मानुन या क्रांती युध्दात उडी घेतली.

 स्वातंत्र्यज्योत पेटवणारी मशाल शांत झाली.
अशा या तेजोमयी रणरागीनीला, अग्नि शलाकेला शतशः साष्टांग दंडवत ! ! ! कोटी कोटी प्रणाम ! !

 ! ! समाप्त ! !
 संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

                        

झाशीची राणी संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading