महाराणी ताराबाई चरित्र संपूर्ण भाग ८, (२९ ते ३१)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


       ७०० वस्तीच छोटसं गांव.सुराज्यातील सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं जन्म गाव असल्यामुळे प्रसिध्द होतं.शहाजी राजे भोसलेंच्या आधीपासूनच तळबीड मधील मोहिते घराणे मातब्बर!मुर्तूजा निजामशहाच्या विरोधाच्या बंडात रतोजी ने अतुलनिय शौर्य गाजवल्यामुळे त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन…………………

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! महाराणी ताराबाई !!!

!! महाराणी ताराबाई !!

                  भाग – २९.

        ताराबाई स्वपुप्राच्या भ्रांतआजाराचं दुःख विसरुन हेराने आणलेल्या खबरा ऐकत होत्या.धनाजीरावांचा वरदहस्त प्राप्त झाल्यावर राणोजीला जणूं पंखच फुटले.त्याने वाकान खेड्यातील बेडरां च्या सहाय्याने बादशहाच्या विजापुरी मुलखात धुमाकुळ घालून गुलबर्ग्याची मोहिम फत्ते केली.सातारा,परळी,खेळणा गेला,पण हिंदुराव घोरपडेंनी भीमगड हस्तगत केला.फोंडा महल,फोंडा किल्ला जिंकला.मर्दनगडला वेढा घातला,दौलती त यवनांनी जी जी ठाणी उभारली होती ती सर्व मराठ्यांनी उध्वस्त केली.अनेक यवन ठाणेदारांना पकडले,यांत  स्वकीयच ज्यांनी स्वराज्याशी हरामखोरी करुन यवनास मिळालेले बरेच जणं होते. स्वामीनिष्ठांनी आपपर भेदभाव न करतां त्यांच्या कृतकर्माचे प्रायश्चित त्यांना दिले.

         ज्योत्याजी जासूद पुढे सांगू लागला,खेळणा पडल्यानंतर,बादशहा बहादूरगडकडे जातांना त्याची कशी फजिती झाली,रस्त्यात मराठ्यांनी हत्ती घोडे,सामानसुमान लुटूनच थांबले नाही तर,बादशहाचा न्यायाधीश महमंद अमीन खान बहादुरच्या अंगावरचे कपडेही काढून घेतले.

         तेवढ्यात पुत्र शिवाजीची बडबड वाढल्याने त्याच्याकडे बघत विचार करुं लागल्या,असं कां व्हावं?एकीकडे विजया च्या वार्ता तर दुसरीकडे पुत्राच्या आजारा ची चिंता…एका डोळ्यात पुत्राच्या बिमारीबद्दल आसवं तर दुसर्‍या डोळ्यात मराठ्यांच्या यशस्वीतेचा आनंद,ताराबाई एक स्री असूनही मराठ्यांमधे एकजुट करुन मराठेशाही नर्मदेपार गुजरात, माळव्यापर्यंत भिडवली.दौलतीत लाखाहू न अधिक फौज गोळा केली.राजकारणा त स्वतःचं दुःख बाजूला ठेवून झोकून देत पण त्याचवेळी आपला पुत्र कर्तृत्वानं उजळून निघावं असं तिव्रतेने वाटत असे. त्याचवेळी यवनांनी सिंहगडला वेढा घातल्याची खबर आली.त्यांनी दिवाण गिरजोजी यादवला बोलावून घेतले.

          गिरजोजी,सिंहगडाला वेढा पडला रसद जरी भरपूर असली तरी,कुमक थोडी आहे.आपल्या नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे भरपूर खंडणी घेऊन किल्ला त्यांना द्यायचा पण पावसाळ्यात.आणि पावसाळा सहा महिने दूर आहे.तोपर्यत त्यांच बळ कमी करायचा प्रयत्न करायचा त्यामुळे वेढ्याचा वेळही वाढेल.यवन मुलुखात आपल्या मराठ्यांनी घुसायला सांगा.शाही फौजा परतल्याच तर,वाट अडवण्यासाठी कांही कुमक बाजूस ठेवा आणि गिरजोजींने ताबडतोब आदेश अमलांत आणला.खानदेश,माळव्यात मराठ्यांनी धुमाकुळ घातल्याने, झुल्फिकारखान तिकडे रवाना झाला. फिरोजगंज,शहाजादा बेदरुनवर गुंतुन पडल्यामुळे सहाजिकच अंदाजाप्रमाणे सिंहगडचा वेढा कमजोर,दुबळा पडला. आतां पावसाळ्यापर्यत वेढा अडवून धरायचा…त्याचवेळी त्यांच्या मनात एक कल्पना सुचली व ती अमलातही आणली.धनाजीचे पुत्र चंद्रसेन जाधवास  कमजोर पडलेल्या सिंहगडाच्या वेढ्यावर चालून जायचा आदेश दिला,त्याप्रमाणे चंद्रसेन शिरवळ्यापर्यत पोहचल्याची वार्ता झुल्फिकारखानला लागल्यामुळे, तातडीने तिथल्या तिथे चंद्रसेनला रोखून धरले.

            आपली चाल वाया गेल्याने तारा थोड्याशा निराश झाल्या.भ्रांतीत अखंड बडबड करणार्‍या पुत्राकडे अगतिकतेने बघत होत्या.तोच गिरजोजीने येऊन सिंह गड पडल्याची खबर दिली.मोगल तबियतखानाने भारी रक्कम देण्याचे कबूल केल्यामुळे बेडर बधई व खंडई यांनी सुलुख केला.पण त्यांना सुलुख करण्याचा अधिकार दिला कुणी?संतापा ने थरथरत,ओरडून म्हणाल्या या दोन बेडरावर आम्ही विश्वास टाकला ही आमची चुकच झाली,त्याच तिरिमिरित त्यांना पत्र लिहायला गिरजोजीला सांगीतले.ताराबाई मजकूर सांगत होत्या आणि थरथरत्या हाताने,चेहर्‍यावर घामा चे ओघळ वाहत असतांना ते पत्र लिहित होते.पत्र संपल्यावर ते तुरंत मुजरा करुन महालाबाहेर पडले.

         रामराजेंच्या महानिर्वाणानंतर तारा बाईंनी मंचक वर्ज्य केला होता.रात्रभर अखंड बडबड करुन थकल्यामुळे ग्लानी येऊन बाळ शिवाजीराजे मंचकावर शांत पणे पहुडले होते.त्यांची पत्नी भवानी बाई मंचकाच्या एका खांबाला टेकून रात्र भर जागल्याने,त्याही तिथेच निद्रेच्या स्वाधीन झाल्या होत्या.ताराबाई मंचका च्या पायालगतच जमीनीवर टेकल्या होत्या.आणि त्याही झोपेच्या अधिन झाल्या आणि त्यांना स्वप्न पडलं.स्वप्नात शिवाजीमहाराज आलेले दिसल्याबरोबर दंडवत घातला व मान खाली घालून उभ्या राहिल्या.

           ताराऊऽऽ आम्हाला स्वराज्या साठी खूप कांही करायचे होते.पण अकालीच आमच्या आयुष्याची दोरी तुटली आणि आमचा अतृप्त आत्मा दौलतीभोवती फिरत राहिला.आमचे जेष्ठ पुत्र शंभूराजे अफाट सैन्यबळ,मुबलक पैसा असलेल्या बादशहाशी तब्बल नऊ वर्षे  झुंज दिली.पण नियतीने जबरदस्त वार केला नी ३०-३२ वर्षाच्या शंभूराजेना   गणोजीसारख्या आप्तानेच हरामखोरी करुन घात केला.त्यांच्या अकाली मृत्युने एवढ्या महत् प्रयासाने उभी राहिलेली दौलत टिकेल की नाही याबाबत शासंक होतो.ताराऊ!आम्ही रामराजाचा वकूब ओळखून होतो.त्यांच्या मातोश्रींनी आपला पुत्र छत्रपती व्हावा ऐवढ  बघितल,पण पुत्रात बळ भरण्याचे विसरुन गेल्या.सतत पदराखाली ठेवून, बुध्दीबळातील मोहर्‍यासारखा वापर केला.तारा मान खाली घालून ऐकत होत्या.

                  क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. २४-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

                    भाग – ३०.

          थोरले महाराज बोलतच होते.शंभू राजे अकाली गेले नी औरंगजेबसारखा धर्मद्वेष्टा मराठेशाही बुडवल्याशिवाय राहणार नाही,त्यात रामराजेंविरुध्द प्रल्हाद निराजींच्या कारवाया,चंदीतील त्यांचे वर्तणूक,परस्री मातेसमान या आमच्या तत्वाला चुड लावून नाटकशाळा मद्यप्राशन,भांगेत बेहोश होणं,यामुळे आम्ही निराशेने पुरते ग्रासले असतांनाच आमच्या डोळ्यासमोर तुमच्या रुपाने विद्युल्लताच चमकली.रामराजेंत आमुलाग्र बदल घडवून त्यांनी स्वतः हाती समशेर घेऊन मोहिमेसाठी बाहेर पडले,ही सारी तुमची किमया बघून तुमचे मनोमन कौतुक केले.ताराबाई,तुम्ही गेली सात वर्षापासून एखाद्या कुशल सेनानी सारख्या,औरंगजेबचा मुलाहिजा न ठेवतां लढताहात,देव,धर्माचे रक्षण करताहात.लाखाची फौज जमवली जे आम्हालाही जमलं नसतं.मराठेशाही नर्मदेपार नेणे आम्हालाही जमले नव्हतं, ते तुम्ही करुन दाखवलं!ताराऊऽऽशाबास तुमची!आम्ही धन्य झालो.थोरल्या महाराजांच्या शब्दांनी आपलं जीवन सार्थकी लागल्याचं समाधान वाटले, अत्यानंदाने नेत्र भरुन आले आणी त्याचवेळी

        शंभूराजेंची हाक कानावर आली.

ताराबाई,आमचा अतृप्त आत्मा इथे घोटाळतोय,तडफडतो आहे.ज्याने ऐन उभारीच्या वयात आमच्यावर घाव घातला,हात,पाय जखडून आमच्या सुंदर शरीराचे हालहाल करुन मातीमोल केले त्या औंरग्याच्या मृत्युच्या इंतजारीत आहो आमच्या जानच्या बदल्यात आमचा धर्म विकत घेऊ पाहणार्‍या दुष्ट औरंगजेबचा असा कांही सूड उगवला असता,पण नियतीने आम्हाला मौकाच दिला नाही. आम्ही अतृप्त इच्छेने भटकतो आहोत.

            ताराबाई आमची पारख नाही चुकली.अकाली मृत्युमुखी गेलेलेल्या पतीचा निर्घुण घाव पचवून ज्या खंबीर पणे,स्रीत्व विसरुन बादशहाशी मुकाबला करीत असलेले बघून,तुमच्या बद्दल अभिमानिने उर भरुन आला.आम्हाला यकीन होता एक ना एक दिवस तुम्ही तार्‍यागत चमकाल.अफाट सैन्य आणि अगणित संपती घेऊन आलेला बादशहा तुमच्यापुढे नमला.आम्ही शरीराने जरी नसलो तरी आमचा आत्मा इथेच घुटमळतोय!

         दादामहाराज आम्हीही खूप प्रयत्न करतोय,अनेक सरदार जमविले,लाखोंची फौज गोळा केली..ताराऊ गेली कित्येक वर्षे ज्या जिद्दीने,तडफेने झुंज देताहात, स्वपुत्राचे दुःख बाजूला ठेवून बादशहा सारख्या मोठ्या गनिमाशी ज्या धीराने तोंड देताहात,ते पाहतां,आमच्या मोबदल्यात धर्म खरेदी करुं पाहणार्‍या  ओरंगजेबला लवकरच प्रायश्चित मिळेल, त्याची कबर इथेच तेही तुमच्या हस्तेच बांधल्या जाईल…

        ताराबाईंनी खाडकण डोळे उघडले. महालात इकडेतिकडे बघू लागल्या.ना आबासाहेब,ना शंभूराजे दादामहाराज दिसले.मंचकावर बाळ शिवाजीराजे शांत झोपले होते.त्यांनी परत झोपण्याचा प्रयत्न केला.डोळे मिटले.

        आतां पर्यंत ताराबाईच्या आज्ञेने आधी जबर खंडणी घेऊन सुलुख करुन गडकोट सोडायचे आणि गनिमाची पाठ वळली की,गेलेले किल्ले परत मिळवाय चे त्यामुळे पैशाची निकड भागायची व सैन्यहानीही टळायची.पण तोरणा गेल्याचं दुःख फार मोठ होत,पण दुःखात ही सुख असे की,त्याचवेळी उत्तरेकडून बादशहाचा खजिना मराठ्यांनी लुटल्या ची,तसेच हैदराबादेवर आक्रमण,कर्नाट कात उच्छाद मांडल्याच्या व सिंहगड परत हासिल झाल्याच्या वार्तांनी तोरण्या चा घाव थोडा कमी झाला.रायगड,वसंत गड ही जिंकला.धनाजी जाधवांनी तर पराक्रमाची शर्थ करुन गुजरातवर हल्ला केला.

‌         ताराबाईंनी सार्‍या सरदारांना पत्रे लिहून,जेरीस आलेल्या यवन सैनिकांवर चोहोबाजुंनी हल्ला चढवायच्या आज्ञा दिल्रात.त्याचा परिणाम लोहगड हाती आला.सुलुख करुन गेलेले गडकोट, दौलतिचे एकनिष्ठ सेवक दौलतीत सामील करुन घेऊ लागले.तेवढ्यातच वाकिन खेड्यातील बेडरावर स्वतः ओरंगजेबने हल्ला चढवल्याचे कळल्या बरोबर,ताराबाईंनी तुरंत धनाजीराव व हिंदुरावांना बेडरांच्या मदतीस जाण्याची आज्ञा दिली. वाकिनखेडं पडलं,पण बादशहाला

फार मोठं मोल मोजावं लागलं.त्याचे अनेक सैनिक गारद झाले.पातशाही किल्लेदार मुहतशिमखानला कारभार्‍यां नी कैद केले.

        वाकिनखेडं हस्तगत करुन बादशहा अहमदनगरकडे जात असतांना मधेच बिमार पडल्यामुळे बहादूरगडावर छावणी उभारुन राहिला.मराठे त्याच्या मागावर होतेच.त्यांनी बहादूरगडावरील शाही छावणीवर हमला केला.सियाद खान हाती गवसला.सियादखान नेहमी साठी अंध झाला.बादशहाच्या आयुष्या ची दोरी बळकट म्हणूनच वेळेवर बेदार खान त्याच्या मदतीला आल्यामुळे वाचला.मग जाधवाने औरंगबादेत धुमाकुळ घातला.विजापूर उध्वस्त केले. हिंदुरावांनी येनुकोटावर हल्ला करुन स्वराज्यात सामील करुन घेतला.अशा विजयी वार्तेने ताराबाई आपल्या पुत्राचे दुःख विसरल्या.आपल्या कष्टाचे,चीज, सार्थक झाले,जीवन सफल झाल्याच्या समाधानात होत्या.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख
                दि. २४-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

               अंतिम भाग -३१.

        आतां फक्त ताराबाईंना इंतजार होता,दौलतीचा स्वामी शाहूराजे येण्याची

त्यांची अमानत त्यांच्या स्वाधीन केली की त्या ऋणमुक्त होणार!आणि त्याचवेळी खबर आली,मराठी दौलतीचा,स्वराज्या चा शत्रू,परधर्म बुडवा,धर्मांध सैतान दिल्लीपती बादशहा औरंजेब जहन्नुमधे गेला…अखेर त्याच्या पापाचा घडा भरला

आणि ताराबाईंच्या नजरेसमोर आतां पर्यतच्या ओरंगजेबच्या बर्तावाचा इतिहास साकार झाला.ज्या मराठीशाही ला बुडवण्याच्या जिद्दीने दक्षिणेत ठाण मांडून बसला होता,त्याच मराठीशाहीने त्याला गुडघे टेकवायला भाग पाडले.गेली २७ वर्षे ज्या पहाडावर माथा आपटला, पहाड तर कधी तुटत नसतो,तर माथाच फुटतो हे त्याला कळलेच नाही.गोवळ कोंडा व विजापूर ह्या दोन्ही शाह्या ८०-८० हजाराचे सैनिक बाळगून असलेल्या वास्तविक त्याचा स्वधर्मीयच, त्यांना बुडवण्याऐवजी त्यांचे सहकार्य घेतले असते तर…पण त्यांनाच नेस्तनाबूत करुन आपल्या सामर्थ्याचं नको तिथे प्रदर्शन करुन पायावरच धोंडा पाडून घेतला आणि मराठ्यांना मच्छली पट्टणपासून सुरतेपर्यंत,गोदावरीपासून त्रिचनापल्लीपर्यंतचे रान मोकळे करुन दिले.आणि म्हणे औरंगजेब कुशल राज धुरंधर…अरे,ज्याने आपल्या जन्मदात्या ला कैदेत टाकून हालहाल केले,स्वतःच्या भावांचा वध करुन त्यांच्या कबरीवर आपले राज्य उभारले…अरे धर्मद्वेष्ट्या, दुराग्रही दुरात्म्या एका संभाजीला जेरबंद करुन हालहाल करुन हत्या करुन पोरकी झालेली मराठेशाही,हिंदवी स्वराज्य हासील झाल्याचे स्वप्न पाहू लागलास, पण या मातीत एकच शिवाजी वा एकच संभाजी जन्माला आलेले नाहीत तर या मातीच्या कणाकणातून शेकडो शिवाजी संभाजी जन्माला आलेत.आणि प्रत्येक मराठी माणसाने शिवाजी,संभाजीचे रुप धारण करुन,झंझावतात उन्मळून पडणा र्‍या वक्षांसारखे तुझं सैन्य तुझ्यासकट कोसळून पडलं,नेस्तनाबूत झालंं…

         पतीनिधनानंतर आम्ही एक असहाय्य स्री आहोत या भावनेने तूं आम्हाला मोजलेच नाहीस.नेतृत्वहीन दौलत आता आपलीच झाली,मराठेशाही बुडाली या धुंदीत आमचे अस्तित्व विसरलास,पण आम्ही गेल्या सात सालात तुला दे माय धरणी ठाय करुन सोडले.आणि शेवटी इथल्याच मातीत तुझा अंत झाला. शहेनशहा,तुझ्या जीवनाकडे बघितले तर,तुला माणूस म्हणून जन्माला घातलेल्या त्या अल्लाला ही शरम वाटली असेल.तख्तासाठी प्रत्यक्ष बापाला अंधारकोठडीत डांबलेस, भावांचा वध,जससिंगसारख्या सच्चा दोस्ताचा विश्वासघात,स्वपुत्र अकबरचा नाश केलास.शक आणि संशयाच्या जाळ्यात गुरफटून वावरणार्‍या सैताना, तुझा राग येण्यापेक्षा कीवच करावीशी वाटते.अशाच विचारांच्या आवर्तनात असतांनाच आवाज कानावर आला.तारा आम्हाला नाही ओळखलेस?आम्ही दुर्देवी रामराजे…तारा आज आमच्या आत्म्याला शांती मिळाली.आमचे राहिलेलं अर्धवट कार्य पूर्ण करण्याची एकटीने शिकस्त केली,धडपड केली व त्यांत बर्‍याच अंशी यशस्वीही झालीस.

            ताराऽऽ आज आम्ही प्रसन्न आहोत.आमची व दौलतीची लाज राखली नी यवन गनिमाला नेस्तनाबूत करुन दौलतीची हिफाजत केली.पुढे मागे इतिहास लिहिल्या गेला तर तुमच्या पराक्रमाची नोंद नक्कीच होईल.स्वारी आम्हाला उगीच मोठेपण देताहेत. पराक्रमावर तर,रयतेचा.लढणार्‍या सरदारांचा, सैन्यांचा…त्यांची इतिहासाने नोंद करावी.त्यांच कर्तृत्व कसं दृष्टीआड करतां येईल तारा?पण तुमचं खंबीर नेतृत्व,स्वतः हाती घेऊन केलेली समशेर बाजी,राजकारणातले कुशल सेनानी सारखे डावपेच…ताराऊ!गेली सात वर्षे ज्या तडफेने झुंज दिली,वेळोवेळी उचित, योग्य निर्णय घेऊन फौजेला दिशा दाखवली,अहोरात्र दौलतीत जातीने संचार केला,स्वपुत्राचं दुःख ह्रदयात दडवून मराठी दौलतीची मान उंचावलीस आम्हाला अभिमान आहे तारा…

       ताराऽऽ गेली २७ वर्से ज्या ग्रहणाने दौलत ग्रालली होती,ते ग्रहण सुटलं. तुझ्या अथक प्रयत्नाने,दौलतीचा फार मोठा शत्रू उन्मळून पडला.त्याच्या कचाट्यातून स्वराज्य मुक्त झाले.देश,धर्म रयत सार्‍यांची हिफाजत तुमच्या उचित डावपेचामुळेच झाली.

      स्वारींना आमचा यकीन आला, आमच्या कष्टाचं चीज झालं.आतां आम्ही चिंतामुक्त झालो.आतां कशाचाच मोह उरला नाही.यापेक्षा जास्त कांही करायची इच्छा पण राहिली नाही.स्वारी.. आपल्या,आबासाहेब,दादामहाराजांच्या कौतुकाने आम्ही सारं भरुन पावलो. आतां कधीही मृत्यु आला तरी मोकळ्या मनाने स्वागतास सज्ज आहोत.

         तेवढ्यात झालेल्या तोफेच्या आवाजाने त्या भानावर आल्या.शाही वाड्यावर भगवा डौलाने फडकत होता. घरांघरावर गुढ्या,तोरणे उभारल्या गेले. सुंदर रांगोळ्यांनी अंगणं सजविण्यात आले.रयतेच्या मुखावरचा आनंद नुसता ओसंडून वाहत होता.शिवाजी महाराज की जय,संभाजी महाराज की जय, रामराजे महाराज की जय,मातोश्री ताराबाईसाहेबांचा विजय असो अशा जयघोषांनी सारा आसमंत दुमदुमुन गेला

               !!  समाप्त  !!
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
                  दि. २४-१२-२०२१.

महाराणी ताराबाई चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading