महाराणी ताराबाई चरित्र संपूर्ण भाग ७, (२५ ते २८)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


       ७०० वस्तीच छोटसं गांव.सुराज्यातील सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं जन्म गाव असल्यामुळे प्रसिध्द होतं.शहाजी राजे भोसलेंच्या आधीपासूनच तळबीड मधील मोहिते घराणे मातब्बर!मुर्तूजा निजामशहाच्या विरोधाच्या बंडात रतोजी ने अतुलनिय शौर्य गाजवल्यामुळे त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन…………………

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! महाराणी ताराबाई!!!

!! महाराणी ताराबाई !!

                  भाग – २५.

        दोन दिवसांनंतर,शाहूराजे आल्या ची खबर देत रामचंद्रपंत म्हणाले,राजेंच्या स्वागताला आपण जातीने हजर राहिला तर,राजेंना व रयतेला आनंद वाटेल.पंत दोन दिवसांपासून ताप असल्यामुळे खूप थकवा आल्यामुळे आम्ही हजर नाही होऊ शकत नाही.आमच्या वतीने त्यांच्या स्वागतात कोणतीही उणीव ठेवू नका. उचित समयी आम्ही त्यांची भेट घेणार आहोत.पंत गेले नी थोड्याच वेळात सलामीच्या तोफा,सनई चौघड्याच्या आवाजाबरोबर शाहूराजेंच्या जयजयकार चा आवाज ताराबाईंना आपल्या महाला त ऐकू येऊ लागला,पण तिकडे लक्ष नव्हते,त्यांना प्रतिक्षा होती गिरजोजींची!

         शाहूराजे गडावर येऊन ४ थ्या दिवशी गिरजोजी येऊन ताराबाईंना मुजरा करुन माहिती देत होते.आणि जसे जसे ऐकत होत्या,त्यांचा चेहरा कठोर बनला.ते निघून गेल्यावर,रामचंद्रपंतांना बोलावून घेतले.त्यांचा मुजरा स्विकारुन, ताराबाई म्हणाल्या,राजेंना निरोप द्या, आम्ही त्यांना मसनीवर भेटत आहो.पंत १२-२३ वर्षांनी राजेंना भेटून,येसूबाईंनी आमच्या सुपुर्द केलेली दौलतीची अमानत त्यांची त्यांना बहाल करुन मोठ्या जबाबदारीतून मुक्त व्हायचेय!सर्व वरीष्ठ मंडळींना उपस्थित रहायला सांगा.

             दुसर्‍या दिवशी मसनदीवर राजें ची  सर्वजण वाट बघत बसले होते. थोड्याच वेळात मंद पावले टाकीत आल्या आल्या ताराबाईंना वाकून मुजरा केला.राजे मसनदीवर आले नी सार्‍यांनी त्यांना मुजरे केले.हसतमुखाने राजे बैठकीजवळ पोहचून पायर्‍या चढणार येवढ्यात ताराबाई म्हणाल्या, थांबा राजे..राजे बराचकाळ यवनाकडे राहिल्याने,थोरल्या महाराजांचे रिती रिवाजांचा विसर पडलेला दिसतो.आज पर्यत पायात मोजडी घालून…राजे खजिल होऊन,पायातील मोजडी काढत म्हणाले,काकीसाहेब परत अशी गलती होणार नाही.राजे बैठकीवर बसण्या आधी कांही प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

          देव,धर्म वाचवण्यासाठी व गो ब्राम्हणांच्या हितास्तव आपले सारे जीवन थोरल्या महाराजांनी खर्ची घातले,या बेठकीचे पावित्र्य त्यांनी आपल्या स्वच्छ व निष्कलंक चारीत्र्याने आबाधीत राखले अशा या पवित्र,निर्मळ राजसिंहासनास जर कुणी कलंकित माणूस विटाळू लागेल तर तुम्ही काय कराल?आम्ही त्याला देहांत प्रायश्चित देऊ.झालं तर, उचित फैसला केला.रामचंद्रपंता कडे  बघत म्हणाले,त्यांनीच केलेल्या फैसल्या नुसार उचित कार्यवाही अमलांत आणावी.पंत गडबडले,मसनदीवरचे सर्व च गडबडले.पंत समोर राजे म्हणून उभे आहेत,तेच हे पवित्र सिंहासन विटाळण्या च्या प्रयत्नात होते. म्हणजे?मसनदीवरी ल सार्‍यानीच विचारले.हे खोटं आहे काकीसाहेब!आमच्यावर झूठा आरोप करीत आहेतआम्हाला  नाहक बदनाम करुन आमचा हक्क डावलण्यासाठी…

       खामोशऽऽऽ डोळे आग ओकत तारा केवढ्यांदा तरी ओरडल्या.संतापातिरेका ने सर्वांग थरथरु लागले.गिरजोजी यादव ना पुरावा हजर करण्यास फर्मावले.ते तात्काळ बाहेर पडून सोबत एका मध्यम वयाचा,खटाव गावचा लिंगो कुळकर्णीस आणले.राजेकडे बोट दाखवून,यांना ओळखता का विचारल्यावर,ते म्हणाले,हे आमचे खंडो नावाचे कनिष्ट चिरंजीव.हे ऐकल्याबरोबर राजेंच्या रुपात असलेल्या खंडोने पळ काढण्याचा प्रयत्न केला पण सावध गिरजोंनीने तात्काळ पकडले.

       गिरजोजीबाबा, खंडो कुळकर्ण्याचा फैसला आपण नंतर करु पण,त्यांचे वडिल लिंगो कुळकर्णीमुळे आज सिंहासनाचे पावित्र्य राखल्या गेले.पुत्रा च्या गैरकृत्याने खवळून इथपर्यंत येण्याचे कष्ट व सिंहासनाची इज्जत ठेवल्याबद्दल ही दौलत आपली सदैव ऋणी राहील. गिरजोजीबाबा,तुमची उचित खातीरदारी करुन सुरक्षित खटावला पोहचवण्याची व्यवस्था करतील.

         हुकुमतपन्हा!दौलतीचे स्वामी शाहू महाराज आहेत हे आम्ही कधी विसरलो नाही व विसरणारही नाही.ते दौलतीत परतले तर त्यांचे भव्य स्वागत करु,पण कोणी तोतया आला किंवा तोतयाला कुणी यापुढे उभं करुन हे पवित्र सिंहासन विटाळण्याचा प्रयत्न केला तर,आम्ही कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. आणि तडक मसनीवरुन उठून गेल्या. एक धोका टळला होता.तोतयाचं पारिपत्य झालं होतं.ताराबाईंनी सुटकेचा श्वास टाकला नाही तोच दुसरा धोका…

     जावजी नाईक बलकवडे यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून रामराजें साठी कामगीरी केली होती म्हणून त्यांना सप्तसहस्री व दोन गाव देऊन,दौलतीचे वरिष्ठ अधिकारी केसो त्रिमलांनी,तशी कागदपत्रें तयार करुन दिली होती.आणि  त्यानेच बेईमानी करुन चार माणसे जोडून सुधागडचा आसरा घेतला व आपणच शाहूराजे असल्याची हूल उठवून,सुधागड परिसरांतील एक गांव मारला.पण चाणाक्ष ताराबाईंना त्याची लबाडी उघडकीस आणून त्याला योग्य प्रायश्चित दिले.

                    क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. २३-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

                    भाग – २६.

          ताराबाई मुलुखगिरीवर निघाल्या. तेव्हा त्यांना भीषण विदारक दृष्ये दृष्टीस पडत होती.गावच्या गांव बेचीराख झाले ली,जळलेली घरं,उजाडलेली शेतीवाडी, हताश झालेली,शोकाकुल,उर पिटीत आक्रंदणारी माणसं,वृक्षहीन,झाडाझुडपा विना कोसच्या कोस माळरानं,ढासळले ली देवळं,फुटलेल्या,दुभंगलेल्या देवमूर्ती पाहून त्या अत्यंत व्यथित होत होत्या. हजारो निष्पाप बांगड्या फुटु लागल्या, निरपराधी मुलं निराश्रीत,अनाथ होऊं लागली.हिंदुंची देवळं,मूर्ती भंगू लागल्या. हे सारं पाहून,मनाने,शरीराने व दिवस भराच्या घोडदौडीने थकलेल्या ताराबाईने जवळच दिसत असलेल्या धनगर वाड्यात मुक्काम करायचे ठरवल्यावर,  गिरजोजी म्हणाले, जवळच चार दोन कोसांवर मुगलांचं ठाणं असल्यामुळे इथे थांबण धोक्याचं आहे.धोका कुठे नाही? हातातोंडाशी येत असलेला सातारा सुभानजी भांडवलकर सारखा माणूस विश्वासघात करेल असे स्वप्नांततरी वाटले होते कां?

          गेली १०-१२ वर्षापासून यवन सैनिक मराठी मुलखातले उतुंग गडकोट, विपूल जंगल,भंडावून सोडणारे ऊन पाउस,शिवाय यवनांना येणारी उत्तरेकडी ल रसद मराठे टोळधाड टाकून लुटूत असल्यामुळे मुगल सैन्यांना फाके पडत असल्यामुळे तडफडून मरुं लागली.जना वरांची तर त्याहुन दुर्दशा..या सर्वामुळे यवन सैनिकांत असंतोष माजला.आणि उत्तरेकडे जाण्यास उतावळे झाले.तारांनी ही सर्व परिस्थिती हेरली.म्हणूनच मुलूख गिरीवर निघून दौलतीतील गडकोटांना जातीने भेट देऊन,त्यांच्या अडीअडचणी समजून घेत,त्यांना सूचना देत घोडदौड करीत होत्या.गिरजोजींच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन धनगरवाड्यावर मुक्काम करायचा निश्चय केला.

         आणि थोड्या निवांत झाल्यावर त्यांच्या नजरेसमोर यापूर्वीच्या घडामोडी तरळल्या.त्यांनी मसनद भरवली होती. प्रमुख व मोठमोठे धुरंदर मुत्सद्दी जमा झाले होते.वातावरण गभीर झालेलं,कुणी च बोलत नव्हते.ताराबाईंनीच सुरुवात केली.गनिम मोठा तर आहेच,पण त्याच्या जवळ मुबलक सैन्यबळ,पैसा,शिवाय हाक देताच,नव्या दमाची कुमक उत्तरे कडून मागवू शकतो.त्या उलट आपली परिस्थिती आहे.आज लष्कराला पगार नाही,फौजेला विश्रांती नाही.त्यांची केविलवाणी परिस्थिती बघून ते कितपत लढूं शकतील?त्यांना थोडी उसंत मिळावी यासाठी बादशहाबरोबर सुलुख करण्याच्या वाटाघाटी केल्यात तर आपल्या फौजांना विश्रांतीसाठी वेळ मिळेल,आणि वाटाघाटी फत्ते झाल्याच तर,तो उत्तरेकडे निघू शकेल,की लगेच आपले गेलेले गडकोट किल्ले परत मिळवण्याचा प्रयत्न करतां येईल. सर्वाना च ही मसलत पसंद पडली.

        मराठ्यांनी परळी शहजाद्याच्या स्वाधीन केल्यावर,आलमगीरला परळी कडे येतांना निसर्गाच्या अनेक संकटांना तोंड द्यावे लागले.त्यातच तो पाय घसरुन पडल्यावरही अधू पायाने पन्हाळ्याकडे कूच केले.जन्माचे लंगडेपण नशीबी आले.

        संताजी घोरपडेचा पुत्र आणि बंधू हिंदुरावने हुबळीत धांदल उडवून दिली. त्यातच तो कैद झाला पण बाकीच्या वीर सरदारांनी सतत तीन महिने यवनांशी लढा देऊन हुबळी तर मिळवलीच,पण हिंदुरावानाही सोडवले.कृष्णा सावंतने नर्मदा पार  करुन धामुनीच्या प्रदेशात धामधूम उडवली तर,कांही सरदारांनी खटाव,कर्‍हाड भागात यवनांची लंगडे तोड केली,तर धनाजीने कर्‍हाडच्या ठाण्यावर हमला करुन फौजदार घोरीवानालाच पकडले,पण ऐनवेळी हमीदुल्लाखान आल्यामुळे तो वाचला.

हणमंतराव निंबाळकरांनी औरंगजेबच्या छावनीपासून अवघ्या चार मैलाच्या प्रदेशावर हल्ला करुन इखलासखानास घेरले व त्याच्या पुत्रास ठार करुन त्याचे सामान लुटले.रहिमतपूरजजवळ तुंबळ युध्द होऊन खानापूरच्या ठाणेदारास जेर बंद केले.हणमंत निंबाळकरांनी सातार्‍या ला लढाई सुरु असतांना,यवनांना रसद पुरवणार्‍या खटावच्या रामचंद्र नारोस ठार केले.

          राणोजी घोरपडेंनी विजापूरपर्यत मजल मारून बागेवाडीच्या ठाणेदारास कैद केले शिवाय इंदोरपर्यतचा प्रदेश लुटला.त्यावेळी खेळण्यावर असलेले रामचंद्रपंतांना ताराबाईचा खलिता मिळाल्याबरोबर,३० हजार सैन्यासह पन्हाळगडावर चालुन गेले.त्यांच्या पडावा साठी बादशहाचे कसलेले सरदार,झुल्फि कारखान,बुंदेला,रामसिंग हाडा धावेन आले,रावदल्पतशी जोरदार लढाई करुन माघार घेतली.ही सर्व माहिती हेबिजने देऊन निघून गेला.हे सर्व त्याना आठवले.

          गिरजोजींचा विरोध असतांनाही संध्याकाळी धनगर वाड्यावर पोहोचल्या .तिथे त्यांना दिसले,सर्व घरांचे दरवाजे बंद व निरव शांतता पाहून वस्ती वर कुणी आहे की नाही हीच शंका आली कुणीच समोर न दिसल्याने,वस्तीच्या दुसर्‍या टोकावर बिरोबाच्या देवळात आल्या.बिरोबाच्या भव्य मूर्तीला भक्ती भावाने नमस्कार करुन बाहेरच्या ओट्या वर विसावल्या.गिरजोजी आज इथे मुक्काम केलाच आहे तर इथल्या लोकांना भेटून त्यांच्या अडचणी,सुख दुःखे जाणून घ्यायची इच्छा आहे. गिरजोजी लगेच बाहेर गेले व आले तेव्हा त्यांचेसोबत वस्तीवरचे बरेचसे स्री पुरुष पलिते घेऊन आले. त्यांच्या दारिद्र्याची भीषण अवस्था बघून त्यांचे डोळे पाणावले.त्याचवेळी प्रत्येकजण आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय भिजवू लागले.

                  क्रमशं
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
               दि. २३-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

                    भाग – २७.

            ताराबाई स्तब्दपणे नुसत्या बघत होत्या.एकएक जण त्यांच्या पाया पडून जिथे जागा मिळेल तिथे दाटीवाटीने बसू लागला.नंतर धनगर वाड्याचा प्रमुख, ७०-८० वय असलेला सत्तू धनगर पुढे येऊन दोन्ही हात जोडून नमस्कार केला. त्याला बाबा म्हणून आवाज दिल्यावर त्याला एकदम गहिवरुन आले.म्हणाला, ज्याच्या जवळचे सारे हिरावल्या गेले तो काय आशिर्वाद देईल मातोश्री?दहा दिवसांपूर्वी टोळधाडीगत गनिम आला नी सारं धुवून नेले.ताराबाईंचा कंठ दाटून आला.अश्रू पुसीत स्वतःला सावरुन विचारले,तुम्ही पांच पन्नास लोकं असून गनिमाचा प्रतिकार कां नाही केला?त्यांचे जवळ तलवार,बंदुका,घोडे होते.आले कधी नी गेले कधी कळलेच नाही.तरी माझ्या मुलाने एकट्याने दहा जनांना निजवलं,पण त्याचा एकट्याचा टिकाव लागला नाही.त्या राक्षसांनी त्याला भोसकून ठार केले.त्याचं सहा महिण्या पर्वीच लग्न झालेलं,त्या तरुण पोरीने आतां कुणाच्या आधारावर जगायच?कसं आयुष्य काढायचं?

            बाबा आमच्याकडे बघा.आमचं हे पांढरं कपाळ घेऊन जगण्यापेक्षा सती जायचे होते,पण दैवाने आमच्या नशीबी तेही सुख दिलं नाही.दैवाने देश,धर्म,रयचे ची जबाबदारी टाकून पोटभर रडायलाही अवसर दिला नाही.डोळ्यांतील आसवं स्वतःच पुसुन,दिल घट्ट करुन कमरेला समशेर लटकवली.स्री आहो हे विसरुन घोड्यावर मांड टाकून मुलुखगिरी पत्करली.ताराबाईंचे भाववश बोलणे ऐकुन जमा असलेल्या लोकांना अश्रू आवरेनासे झाले.

          थोड्या वेळाने बायकांनी झुणका भाकरी आणून सर्वांना आग्रहाने जेऊ घातले.तिथेच अंथरलेल्या घोंगडीवर झोपलेल्या ताराबाईंना चिंतेने रात्रभर झोप आली नाही.पहाटेच्यावेळी घोड्यां च्या टापांनी सर्वांना जाग आली.चौकशी केल्यावर कळले की,त्याच वस्तीतला बिर्‍या धनगर यवनांना मिळाल्यामुळे धनगर वाड्याची अशी दुर्दशा झाली. आणि आपल्या माणसांना इशारा करुन पटकण बाहेर पडले.गिरजोजी चिंतायुक्त स्वरात म्हणाले,यासाठीच नको म्हणत होतो.मातोश्री काळजी करु नका.सोबत चे मावळे हाती तलवार घेऊन सज्ज होते पुढे आलेल्या गनिमाला कळायच्या आंत हरहर महादेवाच्या गर्जनेत खणाखणीस सुरुवात झाली.ताराबाईंची तलवार विद्युल्लतेगत लवलवत होती.प्रहरभर युध्द झालं,त्यांत ३०-३५ गनिम कामी आले.१०-२० हातपाय गमावून बसले. ४-५ मावळेही कामी आलेत,५-६ घायाळ झाले.आपला निभाव लागत नाहीसा बघून समशेरी व घोडे तिथेच टाकून वाट मिळेल तिकडे जीव वाचवत उरलेला गनिम पळून गेला.

        ताराबाईच्या खांद्याला तलवारीचा निसटता वार लागल्याने रक्त वाहत असूनही आपले फत्ते झाले या नशेत त्यांना वाहत असलेले रक्त व वेदनेचेही भान नव्हते.एवढ्यात जखमी व रक्तात न्हालेल्या सत्तुने एका तरुणाला ताराबाई कडे ढकलून म्हणाला,हाच तो बिर्‍या धनगर!माझी लेक रंडकी झाली तरी चालेल पण या दगलबाजाला सोडू नका. त्याचवेळी तोल जाऊन पडत असलेल्या सत्तुला उचलून गिरजोजींनी देवळातल्या ओवरीत आणून निजवले.ताराबाईंनी स्वतः त्याला पाणी पाजून बाबा अशी हाक मारल्यावर सत्तुने क्षणभर डोळे उघडून म्हणाला,मातोश्री..रा..म..रा..म जातो..आ..म्ही..आमच्या माघारी कारभारीन व लेक तुमच्यावर…आणि त्याचे प्राण अनंतात विलिन झाले.सार्‍या धनगर वाड्यात एकच आकांत उठला. ताराबाईंना तर त्यांचे वडिल गेले तेव्हा जेवढे दुःख झाले नव्हते तेवढे सत्तुच्या जाण्याने झाले.

      स्वतःला सावरुन समोर उभ्या असले  ल्या बिरुककडे बघून क्रुध्द स्वरांत विचारले,बिरु,कां असा वागलास?केवळ कांही पैशासाठी वडिलांसमान सत्तुच्या

मौतीचा कारक बनलास…अरे आम्हाला पकडून गनिमाच्या स्वाधीन करायचे होते ना? ही घे तलवार…आम्हाला जीवे मारुन तृप्त हो..पण तत्पूर्वी तोच यवन तुझ्या आई बहिणी,तुझ्या बायकोवर झडप घातल्या शिवाय राहणार नाही.मग तू.. तारा बोलत होत्या नी बिरु त्यांच्या पाया वर चुकलं,म्हणून लोळण घेत होता,क्षमा मागत होता.पण फार उशीर झाला होता.

          त्यांच्या समोर सत्तुबाबासारखे अनेक लोकं,अनेक जातीचे उभे राहिले. ताराबाईंनी दौलतभर संचार करुन वस्ती वस्तीला भेटी दिल्या.सार्‍यांनी आपला कामधंदा सोडून फौजेत सामील झाले. ताराबाईंचे बळ आणखी वाढले.त्या मनात पुटपुटल्या,औरंग्या,फत्ते आमचीच होईल.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
                 दि. २३-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

                    भाग – २८.

         ताराबाईंना विवाहानंतर कांही दिवसांतच पतीविरहात जळावं लागलं. ज्यांच्याशी जीवन बांधले गेले तो पती सगुणासारख्या नाटकशाळेत गुंतले.पण प्रयत्नाने त्यांच्यात सुधारणा झाल्यावर, त्यांच्या पराक्रमाने त्या सुखावल्या.दोन अपत्यांना जन्म देऊन सार्थक झाल्याच्या समाधानात असतांना नियतीने घाव घातला नी सौभाग्य हिरावून घेतलं. पहाडाएवढे दुःख गिळून दौलतीची जबाबदारी अंगावर घेतली.एक स्री असून यवनाशी भिडल्या.गेल्या ३-४ वर्षे दौलतीचा डोलारा मोठ्या हिंमतीने सावरला.लाखोंची फौज गोळा केली.धर्म वेड्या औरंगजेबला नेस्तनाबूत करण्या चा विडा उचलला.ज्याच्या जीवावर राज कारण करायचे,तोच त्यांचा पुत्राला भ्रांत झाली. सर्व प्रकारच्या उपाय योजना करुनही फरक पडत नव्हता.बुधकर घाटग्यांची  कन्या भवानीबाईशी विवाह करुन दिला,पण भ्रांत कमी होत नव्हती. इकडे बादशहाच्या विराट सेनेला यशस्वी रित्या तोंड देत असतांनाच,देवदेवतांचे बळ मिळण्याच्या उद्देशाने देवळे,मठ, धार्मिक संस्थांकडे जातीने लक्ष घालून देवस्थानाच्या नांवे रोखे केले.पुजारी नेमून नेहमीसाठी दिव्याबत्तीच्या सोयी केल्यात.अनेक भंगलेली देवळे दुरुस्त करुन घेतल्या.

          स्वराज्याची हिफाजत व चिरंजीवाच्या कुशलतेसाठी तारांना जेवढ करतां येईल तेवढं त्या करीत होत्या. स्वराज्यासाठी आपलं स्रीत्व विसरुन ठायी ठायी गनिम ठेचत होत्या.पण त्यांच्यातील मातृत्व पुत्राच्या भ्रांतरोगाने कासाविस झाल्या होत्या.एकांतात त्या अश्रूला वाट करुन देत आई भवानीला साकडे घालीत नवस बोलत असत.

          त्यांना आसवं गाळायलाही अवधी मिळत नव्हता.मातृह्रदय दडपून अश्रू पुसुन,हाती नंगी तलवार घेऊन,घोड्यावर स्वार होऊन झंझावत सार्‍या दौलतभर संचार करीत होत्या.त्यांच्यातील शिलेदारी बाण्याला,येणार्‍या खबरा आव्हान देत होत्या.सातारा,परळी,पावन गड,पन्हाळा,चंदन,वंदन,वर्धनगड,नांदगिरी खेळणं पडल्याच्या खबरी येत पण,हे त्यांच्या सूचनेप्रमाणेच घडत होते,कारण हे गडकिल्ले भरपूर पैसे यवनाकडून घेऊन स्वाधीन करत होते,आणि त्यांची पाठ फिरली की,पावसाळ्याच्या तोंडी परत आक्रमण करुन ताब्यात घ्यायचे या नितिमुळे गनिम दुबळा होत होता.एवढी मोठी दौलत चालवायला पैसा तर हवा होता ना?पन्हाळ,पावनगडाने पंचावन हजार व खेळण्यावर दोन लाख यवनां कडून वसूल केले होते.गनिम मोठ्या संखेने एकाच गडाखाली अडून राहतो हे हेरुन,मराठ्यांना थेट सिरोज,मंदसोर, माळवा प्रांती धाडले,तसेच यवन अख्त्यारीत असलेले खानदेश,वर्‍हाडात चौथाई वसुलीची व धुमाकुळ घालण्याची पूर्ण मुभा दिली.दौलतीची कामे नीट होण्यासाठी त्यांनी प्रांताप्रांतातून सरंजाम वाटून दिला.मराठ्यांनी सुरत,बर्‍हाणपुर च्या भोवतालचा भाग व सरगोणही लुटला.धनाजी जाधवच्या पुत्राने मुल्तान पूर व नंदुरबारला वेढा घालून पुढे बागलाणही लुटले.

           बर्‍याच दिवसांनंतर धनाजी जाधव भेटीला आल्यावर हाच मौका ठीक आहे या विचाराने ताराबाई म्हणाल्या,धनाजीराव तुम्ही भेटले की, पाठचा भाऊ भेटल्यागत वाटते.मग गंभीर होऊन म्हणाल्या,धनाजीराव, प्रभावळीचे कान्होजी शिर्के व गणोजी शिर्के मातब्बर,स्वकीय व आप्तही,पण ही वीर माणसं यवनाच्या ताबेदारीत, तसेच शिंदखेडचे जाधव,राजे उदाराम, यशवंतराव दळवी,नागोजी माने,रायभान जी भोसले,जतचे सटवाजी डफळे, शंकरजी मल्हार,मुधोळचे घोरपडे ही सारी आपलीच माणसं केवढी ताकदवार पण आज यवन त्यांना किती हीन दर्जा ची वागणूक देतो आणि हे सारे वीर निमुटपणे सहन करुन आपल्याच मातृ भूमीविरुध्द तलवार उचलतात.उलट आजची निकड जाणून दौलतीच्या मागे उभे राहिले असते तर…? धनाजीराव कमीतकमी जे आहेत त्यांनी तरी दौलत सोडू नये ही खबरदारी घेणं अत्यंत गरजे चे आहे.मातोश्रींना काय म्हणायचे आहे?

          धनाजीराव! संताजी व तुमच्याती ल वैराने दौलतीचे फार मोठे नुकसान झाले.संताजी गेले नी त्यांच्याबरोबर वैरही खतम झालं असं मानायला काय हरकत आहे?मातोश्री आम्ही मानतो पण   राणोजींच्या मनातील तेढ…त्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन,राणोजीच्या कोणत्याही वागण्याचा आतताईपणा सहन करुन मोठेपणा घेऊन त्यांना आपलस करा,नाहीतर ते दौलतीतून निघून जातील,आणि दौलत एका चांगल्या सेनानीला मुकेल.बोलतां बोलतां त्यांचा आवाज रुध्द झाला,डोळ्यात आसवं जमा झाले,आमच्यासाठी ऐवढं कराल धनाजीराव?हळव्या मनाच्या, साफ दिलाचा,उमद्या स्वभावाचा शिलेदार,तारांच्या भावस्पर्शी बोलण्याचा परिणाम होऊन राणोजीला आपलस करण्याचं वचन दिले आणि मुजरा करुन निघून गेले.धनाजीरावांनी दिलेले वचन खरे केले.राणोजीही तेढ विसरुन त्यांच्या कुशीत शिरला.मग दोघांनी मिळून यवन मुलखात उच्छाद मांडला.

               क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि.  २६-१२-२०२१.

महाराणी ताराबाई चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading