महाराणी ताराबाई चरित्र संपूर्ण भाग ४, (१३ ते १६)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


       ७०० वस्तीच छोटसं गांव.सुराज्यातील सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं जन्म गाव असल्यामुळे प्रसिध्द होतं.शहाजी राजे भोसलेंच्या आधीपासूनच तळबीड मधील मोहिते घराणे मातब्बर!मुर्तूजा निजामशहाच्या विरोधाच्या बंडात रतोजी ने अतुलनिय शौर्य गाजवल्यामुळे त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन…………………

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! महाराणी ताराबाई!!!

!! महाराणी ताराबाई !!

                    भाग – १३.

           ताराबाईंनी आवाक होऊन विचारले,किल्ला विकण्याची आवश्यकता कां भासली?राजेंनी इंग्रजा कडून ५१,००० चं चक्रवाढ व्याजानं म्हणजेच एक लक्ष,आठ हजार,पांचशे दहा रुपयांचे घेतलेल्या कर्जापोटी,इंग्रजां नी तैनापट्टचा किल्ला मागीतला होता. म्हणजे स्वारींनीच दिला तर?होय मातोश्रीसाहेब!शिवाय किल्ल्याखालची खेडी डच व्यापाराला विकली.या व्यवहारांत प्रल्हादपंतांनी पुरेपुर हात धुवून घेतले.

         गंभीर झालेल्या ताराबाईंना कांही दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.रामचंद्र पंत सकाळीच आलेले पाहून,त्यांच्या मुजर्‍याचा स्विकार केल्यावर,एवढ्या सकाळी येण्याचे कारण विचारल्यावर, धाडस करुन म्हणाले,दौलतीचा वरिष्ठ अंमलदार शंकरजी नारायण विरुध्द सर्जेराव जेध्यांची फिर्याद आली आहे. काय फिर्याद?प्रयागजी दिनकरराव हवनोलीकरांचा कुटुंब कबिला जेरबंद केल्याची.हुकुमतपन्हा!आगळीक एकाची व सजा दुसर्‍याला हे बरोबर नाही.स्वारींना माहित आहे? होय,स्वतः जेधे,महाराजांना भेटल्यावर कुटुंब कबिला सोडण्याची आज्ञा दिली,पण… ताराबाई काय ते समजल्या.पंत शंकरजी तुमचा माणूस ना?निष्ठेने सेवा करतो म्हणून,स्वामींनी त्यांना सचिवपद दिले ना आज त्यांचीच अवाज्ञा?हे बरदास्त केले जाणार नाही पंत!मातोश्रीसाहेब, शंकरजी, हवनोलीकरांना ४० हजार लक्ष रुपये मागतो आहे.पंत त्याच्या आणखी बर्‍याच कागाळ्या कानावर आल्या आहे त्यांनी नरसू प्रभूचे वतन बळकावले. पुरंदर मिळवून देतो म्हणाले,म्हणून असूयेपोटी त्यांना वेठीस धरले.महाराजां नी स्वतः त्यांना अभय दिले.त्यांची हराम खोरी मोडून काढण्यासाठी कठोर व्हावच लागेल.

          पंत!प्रल्हादपंतांनी चंदीत स्वारीं च्या उपस्थिती केलेला गैरकारभार आणि लाचलूटपत बरदास्त केलाच कसा? पंत, संताजी,धनाजी गर्दन झुकवुन चुप बघून अस्वस्थ ताराबाई भान सोडून ओरडत विचारले,सांगा सेनापती…संताजी साहस करुन म्हणाले,स्वतः राजेच…पुढचे शब्द उच्चारुं शकले नाही.आतां मात्र ताराबाई चा ताबा गेला,राग आवरता आलाच नाही.संताजीराव,तुम्ही दौलतीचे सेनापती,स्वारी, स्वामी दोघेही स्वराज्या चे पाईक,कुणीही कुणाचा दोष लपवणे म्हणजे स्वराज्याशी बेईमानीच,आमचा तुमच्यावर पुरा यकीन आहे.निःसंकोच बोला.. मातोश्रीसाहेब,राजेंबद्दल कांही उणे बोलणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होईल.पण स्वराज्या चे हित लक्षात घेता,असच जर चालू राहिले तर दौलत तर संकटात येईलच, पण स्वराज्यातील बेदिलीचा फायदा घेऊन,गनीम राजेंवर हमला करायलाही कचरणार नाही,शिवाय राजेंचे सतत बेहोशीत असणेही कारक ठरेल.बेहोशी? कसली बेहोशी सेनापती? भांग आणि शराब…कुनीनेंदू येथील इंग्रज वखारीतून विलायती दारुच्या शिशांची पेटी प्रल्हाद पंतांनी आणून दिल्याचे कळले.भांग, मदिरा,नृत्य,नाटकशाळा…नाटकशाळा? होय मातोश्रीसाहेब!चंदीत नुसतां उत आला आहे नाटकशाळांना!मद्रासहुन त्याच्यासाठी जडजवाहर आणले जातात सारा पैसा त्यांच्यावर उधळला जातो. प्रल्हादपंताचं इथेच फावलं.मातोश्री साहेब दौलत मुसीबतीत आहे.राजधानी आधीच पडली आहे.रयत यवनांकडून बाटवली जात आहे.घरंदाज स्रीयांवर भर दिवसा बलात्कार होत आहे.खुद्द चंदी झुल्फिकारखानच्या विळख्यात अडकली आहे.अशा भीषण परिस्थितीत सारा पैसा व्यसनात बरबाद होत आहे.ज्यांच्या जीवावर ही दौलत उभी आहे ते सैनिक मात्र पोटासाठी रयतेची लूटमार करीत आहे

         मातोश्री!आम्ही दौलतीचे शिलेदार नेहमी शिर तळहातावर घेऊन,दौलती साठी सतत प्राण संकटात टाकून राहणारे,आम्ही उघड्या डोळ्यांनी हा विनाश नाही पाहू शकलो म्हणून इथे येण्याची आगळीक घडली.मातोश्रीसाहेब हे कुणीतरी थांबवायला हवय!नाही तर  दौलत संपायला,धर्म बुडायला,हिंदु संपायला वेळ लागणार नाही.हे सारं संताजी एका दमात बोलून गेले.

        ताराबाईच्या पायाखालची जमीनच सरकली.काय बोलावे,काय सांगावे,कांही सुचेनासे झाले.मान खाली झुकली.सर्वां ना जाण्याचा हातानेच इशारा केला. मसनदीवर एकट्या ताराबाई..संताजीचे शब्द नव्हतेच घणाघात होते.तारांच्या बर्दास्तीबाहेर होते.पाण्याबाहेर काढले ल्या माशागत त्यांची स्थिती झाली. दौलतीवर आतांपर्यंत कमी का संकटं आले होते,पण धर्म,सदाचार!नीतिमूल्यां च्या बुनियादीवर उभी असलेल्या दौलती ची इमारत अचल होती.

     पण? आजचं संकट अगदीच वेगळं होत.थोरल्या महाराजांनी आठ लग्ने केलीत पण फक्त राजकारण साधण्या साठी, दादामहाराजांचीही दोन लग्ने झाली,दौलतीच्या नाटकशाळांकडे वळण्यासाठी त्यांना अवसरच मिळाला नाही,आणि कदाचित मिळाला असता तरी,परस्री मातेसमान मानणार्‍या दौलती च्या स्वामींकडून असं अनितीचं कृत्य घडलचं नसतं.पण स्वारी?या मोहात कशी गुरफटली?असा अविचार करतांना आपल्या महान पित्याचाही विचार मनी आला नाही?भोसले कुळाची प्रतिष्ठा मातीत मिसळतोय,प्रतिष्ठा,जिम्मेदारी, देश,धर्म,नीतिनियम हे सारं कसं विसरले

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि.  २०-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

                   भाग – १४.

         ताराबाई एकट्याच मसनदीवर बसून विचारांत गुरफटल्या होत्या.त्याच अवस्थेत पूर्वायुष्यातला एक प्रसंग त्यांच्या नजरेसमोर साकार झाला.त्या वेळी दौलतीचा कारभार दादामहाराजां कडे होता.आणि एक भयानक कडू खबर आली.दौलतीचे सरसेनापती वाईजवळ तोफेचा गोळा लागून वीरगतीस प्राप्त झाले.धारातीर्थी पडण्याने पित्रुछाया हरवल्याने कोलमडून पडलेल्या ताराबाई चे सांत्वन करायला स्वतः शंभूराजे,येसू बाई आल्या होत्या.त्यानंतर मग आले रामराजे!शोकमग्न ताराला भानही नव्हते हळूवार स्वरांत हाक आली,ताराऽऽ आवाज ओळखून त्याही अवस्थेत मुजरा करण्याची कोशीस केली…पण महत् प्रयासाने आतांपर्यत आवरुन धरलेला बांध फुटला व केव्हा पतीला बिलगली कळलेही नाही.ताराऊ तू रडतेस?त्या आणखी हमसू हमसू रडू लागल्या. त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवत प्रेमळ स्वरात राजाराम म्हणाले,तारा विधिलिखित टाळणे आपल्या हाती नसते.मृत्यु हे अटळ सत्य आहे.मामा साहेबांना वीरगती…पन आमचं तर कृपा छत्र हरवलं.कृपाछत्रही अशाश्वतच असते तारा.आम्हीही केवळ दहा वर्षाचे असतांनाच हरवून बसलो.दादासाहेबांचे कृपाछत्र मिळाल्यामुळे आम्ही दुःखाला आवर घालून वाटचाल करीत राहिलो.

          मग आम्हाला कुणाचं कपाछत्र?आमच्या पदराखाली आपलं दुःख झाकाव…आम्हाला पितास्थानी माणून निश्चिंत व्हावं!एकदा स्री विवाहसंबंधात अडकली की,ती सारे नाते तोडून,ते सारे नाते पतीतच पहावे लागते.ताराऊ?तुम्ही आमच्या झाल्या नी पतीबरोबरच बहिण भाऊ,माता,पिता,ही सारी नाती आमच्या शिरावर आलीत.ताराऊ  शोक आवरा आणि आमच्याकडे ज्या नात्याने बघाल त्या नात्यातील जिम्मेदारी,प्रेम सहानुभूती सारं मिळेल,कुठेच आम्ही कमी पडणार नाही.हा प्रसंग आठवल्यावर त्या केविल वाण्या हसल्या.

          नकळत पुटपुटल्या,ज्यावेळी आम्हाला सोडून स्वारी चंदीला निघून गेली,त्यावेळी पित्याच्या नात्याने पाहिले होते,ते नातं स्वारीने तोडलं,भांग,मदिरे च्या अधिन होऊन बहिण भावाचे आणि नाटकशाळा जवळ करुन,आमच्या पत्नी पदालाही निष्ठूरपणे नख लावले.खरच माणूस एवढ्या लवकर नाते विसरुं शकतो?नयनांत अश्रू जमा झाले.कंठ अवरुध्द झाला.मन मोकळं होईस्तोवर खूप रडावे,आक्रंदावे,कुणाला तरी दुःख सांगून,कुणाच्यातरी गळी पडून शोकावेग हलका करावेसे वाटले,पण कोण होतं त्यांचे?ज्यांना पितृवत मानले ते दादा साहेब केव्हाच काळाच्या पडद्याआड गेलेले,ज्यांना माताठीकाणी मानुन वेळ प्रसंगी कुशीत शिरुन मन हलके करावे त्या येसूबाई आलमगीरच्या गिरफ्तारीत, पिता हंबीरराव अनंतात विलिन झालले, आतां फक्त एकच आधार होता,पतीचा.. पण त्या स्वतःशीच हसल्या.भोसल्यांची स्नुषा,रामराजेंची पत्नी म्हणून या घरांत पाऊल टाकले,तेव्हा केवढ्या आनंदात होते?सरसेनापतीची कन्या अगदी केर कचर्‍यागत दूर फेकल्या गेली.परमेश्वरा सारखी श्रध्दा ठेवलेल्या पतीला तुझी आठवण तरी येत असेल का?स्वतःचेच अश्रू स्वतः पुसण्याची ज्यांचेवर वेळ येते ती व्यक्ती किती कमनशिबी,दुर्देवी,एकटी सर्वार्थाने एकटी…

         त्याचवेळी तीच्यातील दुसर्‍या तारा ने बजावले ताराऽ तूं सामान्य स्री नाहीस. आतां तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे.तूं कुणाची पत्नी नाहीस,किंवा कोणत्याही नाताचे बंधन तुला स्विकारता येणार नाही.आहेस फक्त दौलतीची स्वामीनी!दौलतीची हिफाजत,रततेचं सुख,दुःख हे सारं आतां तुझ्यावर निर्भर आहे.स्वःचे दुःख बाजूला ठेवून,दौलतीला च सर्वस्व समजून कठोर मनानं,निर्विकार चेहर्‍याने उभी रहायला हवय!दौलतीच्या महाराणी येसूबाईसाहेबांनी ही जबाब दारी तुझ्यावर सोपवली आहे.तेव्हा…

       ताराबाईंनी अश्रू पुसले.संथ पावला ने निर्विकार मुखाने मसनदीबाहेर पडल्या

आपल्या महालात येताक्षणीच मंजुळा कडून हुकुमतपन्हा रामचंद्रपंताना त्वरीत बोलावले.परिस्थितीचं गांभीर्य जाणून असलेले रामचंद्रपंत गर्दन झुकवून तारा बाईसमोर आल्यावर,त्या अत्यंत रुक्ष स्वरांत म्हणाल्या, तात्काळ आमची चंदी ला पाठविण्याची व्यवस्था करा.मातोश्री! फारमोठा जान खतर्‍यात घालणारा धोका आहे.पंत यावेळी जीवचे काय कौतुक करायच?दौलत धोक्यात आहे, बेसहारा निराश्रीत जनता समोर उभी असतांना,जीवाची पर्वा करण्याइतक्या आम्ही भेकड,कायर खचितच नाही. थोड्या वेळापूर्वी रामराजेंच्या नादानपणा च्या वार्ता ऐकून,गलितगात्र झालेल्या ताराबाईचे आगळेवेगळे रुप बघून पंत दिःग्मुढ झाले.मातोश्रीसाहेब!गनीम दौलतभर पसरला आहे,त्यातच बादक्षहा ने टोपीवाल्यांनाही सावध राहण्याचा इशारा दिला आहे.अशा परिस्थितीत ज्या इराद्याने चंदीला जायचे म्हणजे…पंत, येसूबाईंनी आमच्यावर सोपवलेली जिम्मे दारी पार पाडणे आमचा फर्ज आहे.प्रसंग पडलाच तर यवनाशी दोन हात करण्याचे बळ आहे आमच्यात,शिवाय दौलतीचे स्वामी,स्वारी नसून,बाल शिवाजी आहेत. केवळ मजबुरीने दौलतीची अमानत स्वारीकडे सोपवली आहे.त्या अमानची हिफाजत करण्याचा वकुब स्वारींत नाही.

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि.  २१-१२-२०२१.

!!  महाराणी ताराबाई !!

                   भाग – १५.

           पंत,चुक कुणाचीही असो, राष्र्ट हितासाठी,मुलाहिजा न ठेवतांं,मग कोणी ही असो,बाजूला करणे अगत्याचे असते. वेळ कुणासाठी थांबत नसते.पंत,आम्ही एक हिंदु स्री,पतीला परमेश्वर मानणार्‍या, पण,मजबुरीने आमच्यावर मर्यादा उल्लंघण्याचा प्रसंग आला हे आमचं दुर्देव!पंत, येसूबाईसाहेबांकडे बंकी गायकवाड,भक्ताजी हुजरच्या सह्याने, स्वारींबद्दल लिहून,त्वरीत खलिता रवाना करा.त्या स्वारींची कानउघाडणी करुन, आम्हाला चंदीला बोलवण्याबद्दल कळवले की,आमच्या चंदीला जाण्याची कांही तरी व्यवस्था स्वारी नक्की करतील पंत,एक एक क्षण मोलाचा आहे.त्वरा करा.

           आणि दुनियेतील कोणतीच स्री बरदास्त करणार नाही अशी वज्राघात करणारी खबर मिळाली,नी तारांना ब्रम्हांड आठवले.मस्तकावर विज कोसळल्याचा भास झाला.ज्वालामुखी च्या उद्रेकात आतली राख झाल्यासारखे त्यांना वाटले.सर्वांगाला  आग लागली. तरीही त्यांना खबर खरी असल्याबद्दल शाशंक होत्या.थोरल्या महाराजांचं स्वाभीमानी,कुलीन,तडफदार रक्त..भोसले कुळ एवढं घसरणच शक्य वाटेना! भोसले कुलदीप आपली परंपरा विसरणं शक्याच नाही.कुणीतरी कुभांड रचले असावं.सहनशक्ती बाहेर झाल्यावर त्यांनी रामचंद्रपंतांना बोलावणे पाठवले.

        पंत ही सगुणा कोण?आमच्या माहितीनुसार राजेंची नाटकशाळा.. मातोश्रीसाहेब!ही सगुणा व तीचा पुत्र कर्णला प्रल्हादपंतांनीच महाराजांच्या सानिध्यात आणले.शिवाय या कर्णाला, पंचहजारी व त्याचा कारभारी म्हणून निळो बल्लाळाची नियुक्तीही केली.आणि आतां,छत्रपतींचे वारसदार म्हणून मान्यताही देत आहेत.प्रल्हादपंतांनी राजें च्या अस्थिर स्वभावाचा असा फायदा घ्यायला नको होता.त्यांना राजेंबरोबर पाठवण्यात आमच्याकडून फार मोठी गलती झाली.दौलतीचा बुजुर्ग पाईक असा वागेल ही स्वप्नातही कल्यना नव्हती

         पंत!आतां पश्चाताप करुन तुम्ही जबाबदारीतून सुटत नाही.राज्याचं स्वामीत्व,स्वारिंकडे नसून,दौलतीचे खरे स्वामी यवनाच्या कैदेत आहे.असं असतांना,कुणालाही वारसदार म्हणून मान्यता देण्याचा अधिकार स्वारींना पोहोचतोच कसा?आम्ही कदापी हा अन्याय सहन करणार नाही.आज जर स्वारींच्या इच्छेपुढे झुकलो तर,उद्या मराठी रयत,कैलासवासी थोरले महाराज दादामहाराज आम्हाला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही.तारांचा उर भरुन आला.स्वतःला सावरुन म्हणाल्या, ही परमपवित्र,पुण्यवंत दौलत जर का बटकी च्या मालकीची झाली तर,उद्या मराठी दौलतीतलं खानदान बुडेल.यवनाच्या व्यभिचाराचा हिंदु अड्डा बनेल.मराठी रयतेला थाराच उरणार नाही,हे आम्ही होऊ देणार नाही.आमच्या प्रयाणाचा त्वरीत इंतजाम करा..

         मातोश्रीसाहेब,येसूमहाराणीसाहेबां नी राजेंची कानउघाडणी करुन,विशाल गडी असलेल्या तीन्ही पत्नींना चंदीस घेऊन जाण्याची त्वरीत व्यवस्था करावी,  आपल्याला पुत्र झाल्याचा आनंद झाला. तसेच आम्ही बादशहाच्या कैदेत ठीक असलो तरी,आम्हास व बाळराजेंना कैदे तून सोडवण्याची शिकस्त करावी अशा आशयाचा खलीता चंदीला गेला. .तारांचे डोळे भरुन आले,म्हणाल्या,पंत,बाई साहेबांच्या रुपाने आई जगदंबाच पावली मातोश्रीसाहेब,राजेंनी आपल्या जाण्याचा इंतजाम केला आहे.खंडो बल्लाळ, चिटणीसचे मामा लिंगो शंकर व विसाजी शंकर यांचे यशवंत गडाच्या बंदरांत तयार असलेल्या जहाजांतून यशवंतगडा पर्यत व तिथून कान्होजी आंग्रेच्या जहाजातून चंदीला पोहचण्याची व्यवस्था केली आहे.

          ताराबाई चंदीत आल्या आल्या प्रथम किल्ल्याची पाहणी केली.भक्कम, अतिशय सुरक्षित,अभेद्य किल्ला बघून ताराबाई संतोष पावल्या.वास्तविक आल्या आल्या रामराजेंची भेट घेऊन, त्यांना जाब विचारायचा होता.शक्य झाल्यास चार हितकारी गोष्टी सांगून, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याचा त्यांचा इरादा होता,पण बराच प्रयत्न करुनही भेट घडत नव्हती, किंबहुना राजे मुद्दामच टाळत होते. अस्वस्थ होऊन वेळ घालवण्याच्या इराद्याने,त्या किल्ला निरखित होत्या. किल्ल्याची सुरक्षा व्यवस्था.बळकटी बघून,कितीही झुल्फिकार खान आले, आपले डोके आपटले तरी चंदी फत्ते होणे शक्य नाही हे पाहून त्या आपले दुःख, बेचैनी अस्वस्थता विसरल्या आणि रामराजेंची कीव करावीशी वाटली.

             एवढा भक्कम,बलदंड किल्ला पाठीशी ऊभा असतांना,तंजावरचा आश्रय घेतला आणि परत मौका साधून चंदीत परत आले.ताराबाई चंदीला रवाना होण्यापूर्वी,रामचंद्रपंतानी त्यांची भेट घेऊन,स्वतःचा तोल न ढळू न देण्याचा सल्ला दिला होता.स्वतःला स्वामीनिष्ठ महणवून घेणार्‍या प्रल्हादपंतांनी राजेंची फसगत करुन,त्यांच्या कोमल मनाचा फायदा उठवून त्यांच खेळणं करुन खेळवलं.प्रल्हादपंताचा दोष,आगळीकते चं प्रायश्चित राजेंना दिलं तर,त्यांचेवर अन्याय तर होईलच,पण परिणाम दौलती वर होईल.मुसीबत कमी होण्याऐवजी वाढेल म्हंणून विनवतो,स्वतःला आवरुन राजेंना क्षमा करा,आणि दौलतीसाठी कांही करण्याचा त्यांना मौका द्यावा..

                क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि. २१-१२-२०२१.

!! महाराणी ताराबाई !!

                   भाग – १६.

       पंतानी दिलेला सल्ला,ताराबाईना विचारांती पटला.व त्याच दृष्टीने स्वतःला  समजावयाला सुरुवात केली.चुक कुणा कडून होत नसते?,सुधारण्याची संधी न देणे म्हणजे निष्ठूरपणे अन्यायच नाही कां  होणार?शंभूराजे यवनाला मिळाल्यावर, जर त्यांना थोरल्या महाराजांनी शासन केलं असतं तर,त्यांच्या पश्चात प्रत्यक्ष औरंगजेबशी सतत लढा देऊन नऊ वर्षे दौलतीची हिफाजत झाली असती कां?  आज दौलतीला कुणाच्या तरी नेतृत्वाची निकड आहे.स्वारीला दुखवणे म्हणजे, पंत म्हणतात त्याप्रमाणे दौलतीचे अहित करणे,आपल्याला सावरायलाच हवय! तोल ढळणार नाही ही खबरदारी घ्यायला हवी.

‌          चंदीवरुन आलेली माणसं व बिदनूरच्या राणीच्या सहकार्याने तारा    

बाई सकुशल चंदीत पोहोचल्या.चंदीला घाईने यायचे असल्यामुळे,बिदनूरच्या केळीदीला मुक्कामाचा आग्रह मात्र त्यांनी मानला नाही.स्वतःला समजावून, पत्नी या नात्याने झालं गेलं विसरुन, स्वारीला अपराधबोधातून मुक्त करायचे ही भावना ठेवून,चंदीस आल्यावर,त्यांना  वेगळाच अनुभव आला.रामराजे त्यांची भेट घेण्याचे टाळत होते.ताराबाईची सहनशक्ती संपली आणि मंजुळाकरवी स्वारीच्या भेटीस येत असल्याची वर्दी रामराजेंना दिली.

         ज्यावेळी ताराबाई रामराजेंच्या महाली पोहचल्या,तेव्हा प्रल्हादपंत दारांतून बाहेर पडत होते.महालांत प्रवेशून पाठमोर्‍या रामराजेंना म्हणाल्या, स्वारींनी आमच्या मुजर्‍याचा स्विकार करावा.ते वळतांच,त्यांना बघून तारांचे मन गलबलून आले.रामराजेंची प्रकृती ढासळलेली,डोळे खोल गेलेले,पण मुखा वर व्याकुळ भाव न दिसू देता,त्या स्वतः ला नाही आवरु शकल्या.आणि तडतड फुटाणे फुटावे तसे,मुखातून प्रश्नावली निसटू लागली.त्यांच्या दोषाचं माप त्यांच्या पदरात टाकत,निर्भत्सना करत अनेक प्रश्नांची उत्तरे मागीतली.तिकडे धनाजी,संताजी या दोन अनमोल हिर्‍यां नी बादशहाला जेरीस आणले.त्याच्या मोठमोठ्या सरदारांचा पराभव करुन कांही मुलुख हस्तगत केला आणि स्वारी थोरल्या महाराजांनी कणाकणान जोडलेला मुलुख विकू लागले.महाराजां नी वतनप्रथा बंद केली,तीला सुरुंग लावून वतनाचं वाटप सुरु केलं आणि हे सारं भांग,मदिरेच्या बेहोशीत,सगुणा सारख्या सुंदर नाटकशाळेतील रमणीत स्वतःला झोकून देतांना एवढाही विचार नाही आला,आपण एक जबाबदार व्यक्ती,दौलतीच्या सुरक्षिततेची जिम्मेदारी केवळ आपल्यावर आहे,तिचे रक्षण करणे आपला फर्ज आहे.स्वामी हे तर विसरले नाहीना की,दौलतीचा स्वामी दुसरीकडे आहे,आपल्याकडे दौलत फक्त अमानत आहे.?नाही तारा,हे आम्ही कधी च नाही विसरलो व विसरणारही नाही. मग दुसर्‍याची अमानत एका बटकीच्या स्वाधीन करायला,तीच्या पोराला स्वराज्याचा स्वामी बनवण्याचा विचार मनी आला तरी कसा?झुल्फिकारखान ला नमवायचा मोका केवळ प्रल्हादपंता च्या मतलबी मसलतीने हातचा गेल्याने,  जातीवंत शेर हातची शिखार गेल्या वर जसा संताप होतो,तीच गत संताजीची झाली,म्हणून आपली पायरी सोडून उचित सल्ला देण्याचा प्रयत्न केला तर, अनुचित बर्ताव केला म्हणून त्या हिर्‍या ला स्वारीने  दौलतीतून हद्दपार करुन स्वराज्याचे केवढेा मोठे नुकसान केले हे लक्षात नाही आले?

         रामराजांच्या सार्‍या अपराधाचा पाढा वाचून दाखवल्यावर,त्यांना आपली चुक उमगली.हे लक्षात आल्यावर मुजरा करुन त्या जायला निघाल्या असतां,तारा

अशी आर्त हाक त्यांच्या कानी आली.त्या थबकल्या.राजे म्हणाले,आम्ही सडे चंदी ला आलो हीच मोठी चुक झाली.त्यांच्या नजरेतील व्याकुळता बघून स्री मन  विरघळले.ताराऽऽ आमच्या हातून न कळत अनेक चुका झाल्यात,आमचं हळवं,कमकुवत मन,प्रल्हादपंताच्या मधाळ वाणीच्या प्रवाहात वाहत गेलं. तारा फांदीपासून पान अलग झाल्यावर जी गत पानाची होते,तीच आमची झाली. आमच्या बेबंद वर्तनाला अंकुश लावण्या चा कुणी प्रयत्नच केला नाही.तारा आमच्या चुका उमगल्यात,जी शिक्षा द्याल ती भोगण्यास तयार आहोत.

          मग प्रथम प्रल्हादपंतांना दूर करा. शिवाय भांग,मदिरा…आम्ही वचन देतो त्या विषाला स्पर्शही करणार नाही आणि सगुणाचा फैसला तुमच्यावर सोपवतोय! आम्ही सगुणाला भेटून आलो,तीला आपल्या जबाबदारीची जाणीव करुन दिल्यावर,आम्ही सांगू त्याप्रमाणे तीने वागण्याचे आम्हाला वचन दिले.ताराऽ आम्हाला फार मोठ्या मुसीबतीतून बाहेर काढलं,हे ऋण…पत्नीचं पतीवर कधीच ऋण नसते,फक्त कर्तव्य निभवावे लागते त्यासाठी प्रसंगी कठोरही व्हावं लागते. तेच केलं आम्ही.ताराऽऽ म्हणून भाववेगा ने ताराला आपल्या कवेत घेतले.त्या स्पर्शाने तारा सारं कांही भरुन पावल्या, तृप्त झाल्या.आई जगदंबेचे आभार मानले.आणि नकळतच ताराचाही कर पाश त्यांच्या कमरेभोवती आवळल्या गेला.त्याचवेळी कुठेतरी घंटानाद झाला आणी ताराने रामराजेंचा खांदा आपल्या अश्रूंनी भिजवू लागल्या.

                 क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
             दि.  २१-१२-२०२१.

महाराणी ताराबाई चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading