आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

महाराणी ताराबाई चरित्र संपूर्ण भाग २, (५ ते ८)
७०० वस्तीच छोटसं गांव.सुराज्यातील सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं जन्म गाव असल्यामुळे प्रसिध्द होतं.शहाजी राजे भोसलेंच्या आधीपासूनच तळबीड मधील मोहिते घराणे मातब्बर!मुर्तूजा निजामशहाच्या विरोधाच्या बंडात रतोजी ने अतुलनिय शौर्य गाजवल्यामुळे त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन…………………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! महाराणी ताराबाई!!!
!! महाराणी ताराबाई !!
भाग – ५.
हंबीररावांनी कौतुकाने तिच्या पाठीवरुन हात फिरवत म्हणाले,रामजी काका,पोर आमची असली तरी तीला घडवले तुम्ही..आम्हाला स्वराज्यासाठी खूप कांही करायचे होते,पण नियतीने आमचा उजवा हातच हिरावून घेतला,तेच दुःख विसरण्यासाठी आम्ही ताराक्कांना लढाईचे धडे देतो,आमचे हे कष्ट वाया जाणार नाही.पन्हाळगडकडे कूच करणार्या त्या मेण्यात बसलेल्या ताराऊ च्या नजरेसमोर आणखी एक प्रसंग आला.त्यादिवशी अचानक आलेल्या हंबीररावांच्या मुखावर वेगळाच आनंद दिसत होता.वाड्यात शिरतांच,समोर उभ्या असलेल्या ताराला बघून सारे रिती रावाज विसरुन,तीला छातीशी धरुन तिचा लाड करुं लागले.असे अनपेक्षित, अचंभित वर्तन बघून सारेच आश्चर्याने पाहतच राहिले.अचानक सरनौबत वाड्यावर आल्याची वार्ता कळल्यामुळे, तळबीडची प्रतिष्ठीत मंडळी वाड्यावर हजर झाली.त्यात वृध्द,अपंग रामजी काकाही होते.त्यांनी मुजरा केल्यावर, म्हणाले,काका!आमचा हा अधिकार या ताराने हिरावून घेतला.काका,आम्ही केवळ दौलतीचे सरसेनापती…पण ही तारा प्रत्यक्ष दौलतीच्या स्वामींच्या बंधूंची राजारामची पत्नी…मग तुम्हीच सांगा, मुजर्याचा पहिला मान कुणाचा?आम्हाला समजेल असं सांगावं…
काका,आज आम्ही तळबीडात आलोय,ते आनंदाची बातमी देण्यासाठी
आमची तारा भोसल्यांची सून होणार आहे.प्रत्यक्ष शंभूराजेंनीच प्रस्ताव ठेवला. ही आनंदवार्ता ऐकून रामजींचा कंठ दाटून आला.नकळत नेत्रातून अश्रूधारा वाहू लागल्या.सरनौबत!रत्नाला सोन्याचं कोंदन लाभलं.तेज समशेरीला हिर्या मोत्याचं म्यान गवसलं.दौलतीच्या एका मोठ्या जबाबदार शिलेबाराची पत्नी होण्याचा मान मिळाला.ताराक्काच्या जीवनाचं सोनं झालं,या रामजीचं स्वप्न वास्तवतात आलय!आतां केव्हाही डोळे मिटायला मोकळ…नाही काका,लेक आमची असली तरी,शिष्या तुमची आहे. अशावेळी तुमचे आशिर्वाद महत्वाचे आहे.
ही आनंदवार्ता वायुवेगाने केव्हाच
तळबीडमधे पसरली आणि मोहित्यांच्या वाड्यासमोर लोकांनी गर्दी केली.मुजर्या ने व जयजयकाराने वाडा दणाणून गेला. मराठ्यांच्या भावी महाराणीला…
हंबीररावांनी सर्वांना लग्नाचे आमंत्रण देऊन प्रत्येकाने जातीने हजर राहण्याची विनंती करुन म्हणाले,हल्लीचे धामधूमीचे दिवस,दौलतभर यवन पसरले ला,केव्हा कुठे हमला करेल याचा नेम नाही,म्हणून हा विवाह सोहळा लवकर आटोपण्याच्या दृष्टीने उद्याच पन्हळगडा कडे कूच करत आहे.
शसस्र मावळा शिपायांच्या निगराणीत ११-१२ वर्षाच्या ताराचा मेणा पन्हाळगडाजवळ कधी येऊन पोहोचला विचारांच्या गर्तेत ताराला कळलेही नाही. विवाह..लग्न! स्री जीवनांतील अति महत्वाचा संस्कार!स्वतःच्या विवाह कल्पनेने स्री भारावून जाते,तसेच पडणा र्या जबाबदारीने भांबावून,गोंधळून जाते स्वकियांच्या विरह कल्पनेने दुःखी होते.ताराच्या बाबतीतही हेच घडले होते.निघतांना रामजीकाका मुजर्यासाठी खाली वाकले असतां ती धावत त्यांच्या पायावर झुकत म्हणाली, काका,तुमच्यामुळे आज आम्हाला खूप कांही मिळाले.तुम्ही जे दिले,शिकवले त्याचा आम्ही कधीच गैरवापर करणार नाही.जरुरत पडेल तेव्हा हे सारं दौलती च्या हितापायी खर्च करुं!ताराक्का या वृध्दाला विसरलीस तरी चालेल,पण थोरल्या महाराजांनी हे उभारलेलं मराठी राज्य कसं वाढेल हाच विचार सदैव मनी बाळगा.पन्हाळगड आल्याने भोयांची चाल मंदावली आणि ताराचे स्मृतीचक्रही
ताराला तो दिवस आठवला.राम राजेंच्या महालात,चिंतायुक्त स्वरांत त्यांना विचारत होती,स्वामी!दादा महाराज खेळण्यास एकटेच जाताहेत हे धोकादायक नाही का?तारा,दौलतीत गनिम जागोजागी पसरला असतांना धोक्याचं आहे,पण त्यांना कुणाचं पटत नाही.तेवढ्यात प्रत्यक्ष शंभूराजेच दारांत आलेले बघून आश्चर्यच वाटले,क्षणभरच! दुसर्याच क्षणी आदतीनुसार मुजरा केला मधूर स्वरांत हांक आली,रामराजेऽऽ गणोजीराजेच्या आगळिकतेची खबर तुम्हाला कळली असेलच.त्यांनी विणाका रण कविजींशी दुष्मणी पत्करली.रामराजे आज जरी आम्ही दौलतीचे स्वामी असलो तरी,दौलतीची जिम्मेदारी तुमच्या वरही आहे.दुर्देवाने ८-९ वर्षापासून मृत्युला हुलकावण्या देत वावरतोय, नेहमीच आम्ही मृत्युला चुकवूं शकू असे नाही.यापुढे तुम्हीही आपली जिम्मेदारी ओळखायला हवी!
आम्हीही एक साहस करावं म्हणतो,ताराच्या वाक्याने शंभूराजे निमिषमात्र चकीत झाले.बोला ताराऊ तो तुमचा अधिकारच आहे.त्याच अर्थाने म्हणते,आपण सडे न जातां,निदान स्वामींना तरी सोबत न्यावे..तशीच वेळ आली तर,रामराजेंनाही नेऊ,पण सध्याचा मामला तेवढा गुंतागुंतीचा नाही. स्वकियांची आगळीक मोडून काढण्याचा आम्हाला सराव आहे,शिवाय दौलतीत गनीम ठायी ठायी दबा धरुन बसला आहे
फौजफाटा घेऊन निघणं म्हणजे आयतंच मोका देण्यासारखं आहे. सडं निघणच सुरक्षिततेच्या दृष्टीने उचित आहे.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि १८-१२-२०२१.
!! महाराणी ताराबाई !!
भाग – ६.
शंभूराजे म्हणाले,आम्ही तुमच्या कडे विशिष्ट हेतूने आलोय!रामराजे, आम्ही गेली ८-९ वर्षे गनीम पाठीवर घेऊन वावरत आहोत.हिंदवी स्वराज्याचा कर्दनकाळ आलमगीर जातीने दक्षिणेत तळ ठोकून बसला आहे.तेवढाच शत्रू असता तर फिकिर नसती,पण अस्तनीत असलेले निखारे,श्रींच्या इच्छेने उभी राहिलेल्या या दौलतीवरची श्रध्दा उडाले ले काही स्वकीय,त्यांना देशापेक्षा वतन प्रिय आहे.यवनांपेक्षा भीती वाटते ती या स्वार्थी स्वकीयांची.मराठी दौलतीला फितूरीचा शाप आहे.हे बाजी जेध्या पासून जावळीच्या चंद्रराव मोर्यापर्यंत. इतकच काय,स्वार्थासाठी गनीमपुत्र अकबराला दौलतीचा कांही हिस्सा सुपूर्द करण्याची मसलत,जुने जाणते अन्नाजी दत्तो,मोरोपंतांनी केली.आम्ही घाबरतो ते या अस्तीनातल्या निखार्यांनाच!
आजपर्यंत आपण रामलक्ष्मणा सारखे वागलो.राजे,आम्हाला मृत्युचं भय नाही,पण कुत्र्याची मौत पसंत नाही.राम राजे,यदाकदाचित…असंच कांही घडलं तर,बंधू म्हणून या फितूरांचा बदला तुम्हा ला घ्यायचाय,शिवाय आमच्या पश्चात या मराठी दौलतीचे स्वामी म्हणून,स्वराज्या ची जबाबदारी तुमच्या सुपूर्द करीत आहो नंतर ताराकडे वळून म्हणाले,ताराऊ!तुमच्याकडूनही आम्हाला कांही हवं आहे
दादासाहेबांनी आज्ञा करावी. ताराऊ रामराजे हळव्या स्वभावाचे व नाजूक प्रकृतीचे आहेत.तसेच त्यांना आजूबाजूच्या लोकांची पारख नाही,ती जाण तुमच्यात आहे.तुम्ही आमच्या बंधू च्या स्वामिनी,ताराऊसाहेब,स्वराज्य संस्थापक आबासाहेबांचे पुत्र आहेत ते. शिलेदारी बाणा जन्मतःच त्यांच्या रक्तात आहेच.तुम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहून वेळीच उचित-अनुचिताची जाणीव करुन देत ,तुम्ही त्यांच्या मागे उभ्या राहिलातर एकच काय हजारों आलमगीर आले तरी त्यांना पुरुन उरतील.
शंभूराजेंचा कंपित,विनवणी स्वर ऐकून,हळव्या,नाजूक मनाच्या ताराऊ च्या गळ्यातून शब्दाऐवजी हुंदका बाहेर पडला.ताराऊसाहेब,सारं भरुन पावलोय, एवढं म्हणून जसे आले!तसेच निघून गेले
शंभूराजेंना कैद केल्याची वार्ता कानावर येताक्षणीच कांही दिवसांपूर्वीचा प्रसंग जसाच्या तसा तारांना आठवला आणि उर भरुन आला.नकळत अश्रू वाहूं लागले.त्यांच्या कैदेला स्वकीयच जबाबदार असले तर,नक्कीच दादा महाराजांना नक्कीच सुगावा लागला असावा,म्हणूनच त्या दिवशी स्वारींच्या महालात अनपेक्षित येऊन,दौलतीची जिम्मेदारी सुपर्द केली होती,शिवाय आपल्यावरही…
घडलं ते शंभूराजेंनी केलेल्या भाकीताप्रमाणेच!नको त्या वार्ता येऊन रात्रंदिवस मराठी रयतेला विदिर्ण करुं लागल्या.प्रथम खबर आली ती मराठी अस्मितेला धक्का देणारी,प्रत्यक्ष दौलती चे स्वामी छत्रपती शंभूराजेंचा जुलूस काढून वडूज येथे औरग्यासमोर पेश केल्याची.त्याला वाटले,स्वराज्याच्या राजाचा मानभंग झाला की,मराठा माणूस भयभीत होऊन आपल्यापुढे नांगी टाकून स्वराज्यातील गडकोट किल्ले आपल्या स्वाधीन करतील.आतां मराठी धर्म बुडवायला आणि स्वराज्य यवनसत्तेत घ्यायला कांहीच अडचण येणार नाही.सहाजिकच सिवाचा बेटा संबा हातात आला नी जन्नत हासील झाल्याचं समाधान त्याला झाले.
मराठी माणूस,औरंगजेबला चांगलेच ओळखत होता.नुसतं छत्रपतीं ना जेरबंद करुन तो थांबणार नाही तर, हाती गवसलेल्या सिंहाच्या छाव्याच्या गळ्यात मृत्युघंटा बांधल्याशिवाय तो राहणार नाही आणि याच विचाराने स्वराज्यातला प्रत्येक माणूस भयभीत झाला होता.पण ताराला वेडी आशा होती.एक दिवस ती येसूबाईंना म्हणाली, असले संकट याआधीसुध्दा दौलतीवर आलेले आहे.कैलासवासी आबासाहेब सुध्दा पन्हाळगडावर अडकले होते.सिद्दी चा वेढा पन्हाळगडाभोवती दिवसेंदिवस आवळला जात होता.रिहाईचा मार्ग दिसत नव्हता.त्याचवेळी,शिवा न्हाव्या च्या रुपाने देव पुढे येऊन,स्वतः शिवाजी राजे बनून सिद्दीच्या डोळ्यात धूळ फेकल्याने,लाखाचे पोशिंदे अबासाहेब निसटुन सुखरुप खेळण्यास पोहोचले. प्रतापगडावरही अफजलखानाच्या रुपानं एक मदांध सैतान आबासाहेबांना नेस्त नाबूत करायला आला होता,पण त्याही वेळी परमेश्वर कृपेने,आबासाहेबांनी एक दगलबाज सैतान मातीत मिसळवला होता.आग्र्याचं संकट तर त्याहून भयंकर होतं.बाईसाहेब,त्यावेळी दादासाहेब व आबासाहेब दिल्लीपती औरंगजेब सैतानाच्या गुहेतच शिरले होते,त्यावेळी आईजगदंबेने निभावले,तसे आतांसुध्दा तीच रक्षण करेल.ताराबाईच्या बोलण्या वर येसूबाई केवळ हसल्या.केवढं भेसूर होतं ते हसणं.मग मात्र पुढे बोलण्याचं साहस तारला झाले नाही.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १८-१२-२०२१.
!! महाराणी ताराबाई !!
भाग – ७.
विदिर्ण स्वरांत येसूबाई उद्गारल्या, ताराऊ!आबासाहेबांची गोष्टच वेगळी होती.ते लाखांचे पोशिंदे आहेत ही मान्यता सार्या मराठी राज्याला होती. शिवाय दौलतीचे बुजुर्ग अधिकारी त्यांचे पाठीराखे होते.पण स्वामी.. मराठी रयत जरी स्वामींच्या मागे असली तरी,हिंदवी स्वराज्याचे बुजुर्ग अधिकारी…कसेतरी बोलून त्यांनी मान फिरवली.आसवं आवरुन एवढच म्हणाल्या,आम्हाला एकांत हवाय….येसूबाईचे सांत्वन,दुःख कांही अंशी कमी करण्याच्या उद्देशाने ताराबाई बोलल्या,पण दुःख कमी होण्या ऐवजी त्या अधिकच अस्वस्थ,बेचैन झाल्या.
दुसर्या दिवशी ताराबाईने राजा रामच्या महाली प्रवेशल्या तेव्हा ते चिंता ग्रस्त,बेचैन,सर्वांगातले बळ गेल्यासारखे हताश,उदास बसून होते.स्वारीऽऽ येसू बाईसाहेब फारच अस्वस्थ आहेत.स्वतःचं सौभाग्य धोक्यात असतांना कोणती स्री अस्वस्थ होणार नाही तारा?स्वामीऽ त्या अडखळल्यामुळे,रामराजे म्हणाले,बोल तारा,मोकळ्या मनाने बोल…स्वामीऽ, दादामहाराजांची धिंड काढून वडूजला नेले असं ऐकले.स्वामी,दौलतीत प्रल्हाद निराजी,रामचंद्रपंत,संताजीराव,धनाजी, शंकरजी नारायण,खंडो बल्लाळ,मानसिं ग मोरे,कृष्णाजी अनंत,निळकंठ मोरेश्वर,बाजी कदम,खंडाजी कदम असे एकाहून एक जबरदस्त मोहरे असतांना दादासाहेबांच्या सुटकेसाठी वडूजवर तुटून पडूं शकत नाही?
तारा या गोष्टींचा आम्ही विचार नसेल का केला?पण आम्ही मजबूर आहोत तारा…सध्या गडाचा सारा कारभार वहिणीसाहेबांच्या हाती असून, मनसदी त्यांच्या इशार्यावर चालतात. दौलतीचे बुजुर्ग अधिकारी या बेताला राजी होतील असे वाटत नाही.कां स्वामी तारा,फर्ज आणि इनाम यात फरक आहे
शिवाय दादासाहेबांचा तापट व स्पष्टवक्ते पणाही कांही अंशी जबाबदार आहे. आलमगीरच्या अफाट सैन्यावर चढाई करणे म्हणजे,आतताईपणा होईल असेच सर्वांचे मत आहे.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे,जे दादासाहेबांचे समर्थक अधिकारी,ते सर्व महाराष्र्टाबाहेर वेगवेग ळ्या मोहिमेवर लढाईत गुंतलेले आहेत. त्यांना तर या भीषण प्रकाराची कल्पनाही नसेल.मग स्वतः स्वामींनी पुढे व्हावं,जर आज्ञा झाली तर आम्हीही…तुम्ही एक स्रीहांत.कां? थोरल्या मांसाहेब?पन्हाळगडावर आ
आबासाहेब अडकले होते तेव्हा त्या तलवार घेऊन नव्हत्या कां पुढे झाल्या?ताराऽऽ आम्ही एकटे आहो गऽऽ!रायगडा वरील अधिकार्यांचा कानोसा घ्या म्हणजे आम्ही काय म्हणतो ते पटेल.त्या अधिकच बेचैन होऊन महालाबाहेर पडल्या.
या गोष्टीला आठच दिवस उलटत नाही,तोच आलेल्या खबरीने सारी दौलत हादरली.ताराच्या हळव्या ह्रदयाच्या ठीकर्या ठीकर्या उडाल्या.काल दादा महाराजांना आलमगीरने जेरबंद केले, आज डोळे काढले,उद्या कदाचित…या सर्वाला जबाबदार आम्हीच नाही कां?मी स्वतः,खुद स्वामी रामराजे,दौलतीचे सेवा निष्ठ म्हणविणारे अधिकारी…दौलतीचा स्वामींची जान खतर्यात असतांना त्यांच्या रिहाईसाठी जातीनीशी कां नाही तुटुन पडले?थोरले महाराज असते तर?
दौलतीचे स्वामीनिष्ठ सेवक,येसू बाईसाहेबांच्या अपरोक्ष जे करताहेत ते पाहून तर ताराबाई आवाक झाल्या.त्यात च खबर आली,दादासाहेबांचे हालहाल करुन त्या हैवानाने कातडी सोलून काढली,हातपाय तोडले आणि त्यांची गर्दन उडवली.दादासाहेबांनी हिंदुधर्म व स्वराज्य राखण्यासाठी धैर्याने होणार्या हालांची पर्वा न करता,अगदी बेडरपणे अनंत यातना भोगून मृत्युला मिठी मारुन अनंतात विलिन झालेत.
दादासाहेबांच्या मृत्युने मराठी रयत शोकसागरांत बुडुन गेली.स्वतः येसू बाई तर,कोलमडून पडल्या.ताराबाईही कमी दुःखी नव्हत्या.रामराजे…बंधूहत्येचे दुःख…केवढे शोकमग्न असतील?पण मतलबी मसनदीत ज्या पध्दतीने ओढल्या गेले,नव्हे दौलतीच्या स्वानीनिष्ठ सेवकांनी त्यांना बळजबरीने या शोकावस्थेतून ओढून काढले
दादामहाराज कालवश झाले नी दौलतीच्या राजधानीत स्वामीनिष्ठ म्हणवून घेणार्यांंची वर्दळ वाढली.स्वतः च सौभाग्य हरपलेल्या नी सध्या दौलती च्या महाराणी असलेल्या येसूबाईंनाही या मतलबी लोकांनी मसलतीपासून दूर ठेवले,हे लक्षात आल्यावर,आपलं डोंगरा एवढं दुःख बाजूला सारुन त्या विरांगना येसूबाईने सदरेवर सर्वांनी उपस्थित राहण्याची आज्ञा दिली.आज्ञा ताराबाईंना ही होती.
रायगड…मराठी दौलतीची राजधानी..या रायगडानं आजपर्यंत काय काय पाहिलं नव्हतं?खूप खूप सोसलं होतं,प्रत्यक्ष वीजही कोसळली होती,बल दंड छातीवर मोठमोठे वार झेलले होते, तेवढ्याच जिद्दीने आणि तरीही ताठमाने ने झोकात उभा होता रायगड!
दादामहाराजांचा अकाली मृत्यू धरणीकंपासारखा वज्राघातच नव्हता कां मराठी दौलतीचे झुंझार सेनानी खड्ग हीन बनले होते.कोणाच्याही ध्यानीमनी नसतां हे सारे दुःस्वप्नवत घडले होते.शंभू राजें सारख्या झुंझार सेनानीचं तेजच अस्ताला गेलं होत…..
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-१२-२०२१.
!! महाराणी ताराबाई !!
भाग – ८.
सातमहालातल्या आपल्या महाला तील खिडकीत ताराबाई उभी राहून समोरच्या काळोखात पाहत होत्या.आणि त्यांच्या मनःचक्षूसमोर एकेक घटना साकारत होती.जानकीबाई…सवत तारा च्या.स्वामींची पहिली पत्नी.स्वारींवर त्यांच्याच जास्त अधिकार,वयाने व अनुभवाने मोठ्या…खरं तर ताराने त्यांच्या धाकात रहायला हवय!आपण भोसल्यांची सून आहो हे जसं त्या विसर ल्या नव्हत्या,तसंच कुणाची तरी सवत आहोत हेही त्या डोळ्याआड होऊ देत नव्हत्या.सवत म्हणजे किती भयंकर असते हे त्यांच्या मनावर बिंबवलेल्या मनानेच,जे काय होईल,त्या दुःखाला तोंड देण्याच्या तयारीनेच त्यांनी या दौलतीच्या राजधानीच्या घरांत पाऊल टाकले होते. पण झाले वेगळेच!जानकीबाई मोठ्या बहिणीच्या मायेने तारासमोर उभ्या राहून आपल्या वात्सल्यपूर्ण नजरेन प्रथम भेटीतच ताराऊच्या ह्रदयात घर केले. आणि एक वेगळीच किमया घडली.आज पर्यंत ह्रदयात दडवून ठेवलेलं दुःख तारा समोर उघडं केलं….
ताराऊसाहेब,तुम्हाला प्रत्यक्ष दौलतीचे स्वामी,शंभूभावोजींना पसंत केलेलं,येसूबाईसाहेबांनीही मान्यता दिलेली म्हणूनच तुमचं पाऊल सोन्याचं वाटलं सर्वांना..मराठी दौलतीच्या सर सेनापतींची,प्रत्यक्ष हंबीररावांची सुकन्या, भोसल्यांची सून बनून या घरांत आल्या, सर्वांनी कौतुकाच्या पायघड्या घातल्या, आणि आम्ही…गतस्मृतीने हुंदका दाटून आल्याने,क्षणभर जानकीबाई स्तब्ध झाल्या.पुढे म्हणाल्या,वास्तविक थोरल्या महाराजांची पसंती,सोयरा मासाहेबांची मान्यता,लग्न सोहळ्यात थोरल्या महाराजांनी जातीने लक्ष घातलेले आम्ही स्वतःला खूपच भाग्यवान समजू लागलो पण,ताराऊसाहेब,आमचा हा आनंद जास्तवेळ टिकला नाही.लग्नाच्या दुसर्या दिवसांपासून थोरले महाराज आजारी पडले,त्याच खापर आमच्यामाथी फोडल्या गेलं,त्यांच्या आजारपणाला आम्हाला जबाबदार धरल्या गेलं.सत्य कटू,….आम्ही अजपर्यंत मनाचे कवाड बंद करुन कुणाजवळच दुःख उघड केलं नव्हतं.आमच्या महालात स्वतःला कोंडून एकटेच रडत राहिलो,आमच्या कोवळ्या शरिरावरची हळदही सुकायची असतांना, आमचा कोणताही अपराध नसतांना, प्रत्यक्ष दौलतीच्या स्वामींचा थोरल्या महाराजांच्या आजाराला आम्ही दोषी आहोत असे मानल्या गेले,यासारखा दुर्विलास तो कोणता?ताराऊसाहेब, महालाची कवाडे बंद करुन आम्ही रडत होतो,आक्रंदत होतो,पण सहानुभुती मिळण्याऐवजी आम्ही त्याच योग्यतेच्या आहोत असे बोलल्या जात होते.
पण कां?आक्कासाहेब कां पण? कारण आम्ही अपशकुणी,पांढर्या पायाची,गडावर पाऊल ठेवल्याबरोबर थोरले महाराज आजारी पडले..पण हा तर अन्याय होता.न्याय नी अन्याय कुणी फैसला करायचा ताराऊसाहेब?अपल्या तलवारीने शत्रूला चळाचळा कापायला लावणारा महामेरु व्याधीग्रस्त,आणि सत्ता अशा माणसांच्या हाती पोहचली होती की,ती आम्हालाच काय,प्रत्यक्ष परमेश्वरालाही न्याय देऊ शकणार नव्हती जानकीबाईंच सांत्वन कसं करावं,तारांना सूचेना!ताराऊसाहेब,लग्नाच्या दिवशी आम्ही सार्यांच्या कौतुकात न्हात होतो, रात्र उलटली तशा नजराही पालटल्या. कौतुकाची जागा तिरस्काराने घेतली. बोचक शब्दांनी बोचकारुं लागले.एकवेळ वाटे,असंच धावत,रडत,आक्रंदत जाऊन थोरल्या महाराजांच्या पायावर पडून न्याय मागावा…पण आम्ही हतबल होतो. आमच्यावर,आमच्या हालचालीवर सक्त पहारा होता,पाळत होती.आमच्या महालाबाहेर पाऊल टाकण्याचा आम्हाला अधिकार नव्हता.त्या चार भिंतीतच कुजत,सडत मरायचं होत.. ताराबाईंना,त्यांना कुशीत घेऊन,पाठीवर मायेचा हात फिरवायचा मोह झाला,पण क्षणभरच!कारण त्या आपल्या मर्यादा ओळखून होत्या.
ताराऊसाहेब!आम्हाला तोंड असून मुक्या झालो होतो.शब्दही उच्चारायची चोरी!आमच्या महालाचे दरवाजे बंद असल्याने बाहेरचे कांही बघण्याचा प्रश्नच नव्हता,तरी पण भिंतीलाही कान असतात…बंद महालात ही आमच्या कानावर आल…रामायण पुन्हा घडत होत,मंथरेच्या विष पेरणीने खराब झालेली कैकयी पुन्हा जन्मास आली होती.आपण एका महान शिलेदारा च्या,दौलतीच्या महाराणी आहोत हे विसरुन सोयरामासाहेबांनी पाशवी पवित्रा घेतला होता.ताराऊसाहेब,आबा साहेबांचं आजारपण मतलबी,स्वार्थी लोकांच्या कटाचाच नतीजा होता,खापर मात्र आमच्या माथ्यावर फोडण्यांत आलं पांढर्या पायाची म्हणून बदनाम करण्यांत आलं होतं.आक्कासाहेब,कळलं नाही आम्हाला.पहिल्यांदा आम्हालाही नव्हत कळलं,पण काळानेच आम्हाला सांगीतल…ताराऊसाहेब,अन्नाजी दत्तो, मोरोपंत,प्रल्हाद निराजी,बाळाजी आवजी ही दौलतीची माणसं थोरल्या महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढलेली,दौलत उभी करण्यांत यांचा सिंहाचा वाटा असलेले,त्यांच्याचकडून विनाशाचे बीज पेरल्या गेले….
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १९-१२-२०२१.








