Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

२० ऑगस्ट, दिवस २३२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ७५ ते १०० सार्थ तुकाराम गाथा अभंग २७७३ ते २७८४

20 AUGUST NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

20 AUGUST NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“२० ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २० August
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक २० ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २७७३ ते २७८४ चे पारायण आपण करणार आहोत.
२० ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ७५ ते १००

76-15
उपाधीचा दुसरा । घालिता वोपसरा । नामरूपाचा संसारा । होय जयाते ॥76॥
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला असता नामरूपाचा व्यवहार होतो.
77-15
ज्ञातृज्ञेयाविहीन । नुसधेचि जे ज्ञान । सुखा भरले गगन । गाळीव जे ॥77॥
जे ब्रह्म ज्ञाता आणि ज्ञेय यावाचून केवळ ज्ञानमात्र आहे आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले आकाशापासून सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे.
78-15
जे कार्य ना कारण । जया दुजे ना एकपण । आपणया जे जाण । आपणचि ॥78॥
जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसर्‍याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही त्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज.
79-15
ऐसे वस्तु जे साचे । ते ऊर्ध्व गा यया तरूचे । तेथ आर घेणे मूळाचे । ते ऐसे असे ॥79॥
(माया) अशी जी सत्यवस्तू (ब्रह्मवस्तू), ती या संसारवृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिचे ठिकाणी संसारवृक्षाच्या मुळाचे अंकूर निघाले ते असे आहे. (तो प्रकार पुढीलप्रमाणे आहे.
80-15
तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी । का वांझेची संतती । वानणे जैशी ॥80॥
तर या संसारवृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्धी आहे ती नसलेलीच आहे किंवा ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्द आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


81-15
तैशी सत् ना असत् होये । जे विचाराचे नाम न साहे । ऐसेया परीची आहे । अनादि म्हणती ॥81॥
त्याप्रमाणे जी माया ब्रम्हज्ञानाने बाधित असल्यामुळे खरी आहे म्हणता येणार नाही व ‘नाही ” म्हणता पण येत नाही कारण ‘आहे ” म्हणावे तर विचाराने तिचा बोध होतो व नाही ” म्हणावे तर जगत्कार्यावरून ती असावी, असे तिचे अनुमान करता येते ज्या मायेस ब्रम्हविचाराचे नाव सहन होत नाही, अशा प्रकारची ती आहे व तिला अनादि (आरंभरहित) असे म्हणतात.
82-15
जे नानातत्त्वांची मांदुस । जे जगदभ्राचे आकाश । जे आकारजाताचे दुस । घडी केले ॥82॥
जी अनेक तत्वं मिळुन तयार झालेली शक्तिची पेटी आहे. ती विक्ष्वरुप अभ्राला आधार आहे. आणि ती विक्ष्वाकाररुपी असणार्‍या वस्ञाची ती एकप्रकारे घडी आहे.
83-15
जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचचित्र भूमिका । विपरीत ज्ञानदीपिका । सांचली जे ॥83॥
संसाररुपी असणारी जी माया आहे ती संसारवृक्षाचे बीज असुन ती संसारविस्ताराची आधारभुमी आहे. अथवा जे काही विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित अशी मशाल आहे.
84-15
ते माया वस्तूच्या ठायी । असे जैसेनि नाही । मग वस्तुप्रभाचि पाही । प्रगट होय ॥84॥
ती माया ब्रह्माच्या ठिकाणी जशी नाहीच, अशा स्वरुपानेच ती असते. मग तीब्रम्ह तेजाच्या योगाने ब्रम्हाच्या तेजाने ती विक्ष्वरुपाने प्रगट होते.
85-15
जेव्हा आपणया आली निद । करी आपणपे जेवी मुग्ध । का काजळी आणी मंद । प्रभा दीपी ॥85॥
जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूढ करते, अथवा निजरुप करते अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी (जशी) दिव्याचा प्रकाश मंद करते.


86-15
स्वप्नी प्रियापुढे तरुणांगी । निदेली चेववूनि वेगी । आलिंगिलेनिवीण आलिंगी । सकामु करी ॥86॥
स्वप्नात आपल्या नवर्‍यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवर्‍याला जागे करून त्याला खरे खरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला खरोखर सकाम करते.
87-15
तैसी स्वरूपी जाली माया । आणी स्वरूप नेणे धनंजया । तेचि रुखा यया । मूळ पहिले ॥87॥
त्याप्रमाणे स्वरूपाच्या धनजंया, ब्रम्हस्वरुपाच्या ठिकाणी जमा झालेली माया आपला आश्रय जे स्वरूप, त्याच्या ठिकाणी नेणतेपणा किंवा अज्ञान आणते, आणि ब्रम्हस्वरुपालाच विषय करते. अशा प्रकारची माया संसारवृक्षाचे पहिले मूळ आहे.
88-15
वस्तूसी आपुला जो अबोधु । तो ऊर्ध्वी आठुळैजे कंदु । वेदांती हाचि प्रसिद्धु । बीजभावो ॥88॥
जीवाला आपले वास्तव स्वरुप ब्रम्ह आहे. हे जिवास कळत नाही. जसे ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसारवृक्षाचा, ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कांसा आहे आणि उपनिषदांमध्येही यालाच बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे.
89-15
घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । हा फळभावो तियेचा ॥89॥
पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था, तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात व इतर ज्या दोन जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्यास त्या सुषुप्तिरूपी अंकुराची फलावस्था आहे असे म्हणतात.
90-15
ऐसी यया वेदांती । निरूपणभाषाप्रतीती । परी ते असो प्रस्तुती । अज्ञान मूळ ॥90॥
ज्याप्रमाने अशा प्रकारे वेदांतामध्ये सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती यांचे निरुपण करावयाची जी परिभाषा आहे, त्यावरुन बीज, अंकुर व फल याचा बोध प्राप्त होतो. पण ते आत्ता राहु दे. संसारवृक्षाचे मुळ घन अज्ञानात आहे, पार्था ते तु निश्चित जाणुन घे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


91-15
ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे । अधोर्ध्व सूचिती मूळे । बळिया बांधोनि आळे । मायायोगाचे ॥91॥
ज्याप्रमाने स्वच्छ आणि निर्मळ आत्म्याशी मायेचा म्हणजे अज्ञानाचा काल्पनिक सबंध आहे. ते एकप्रकारे संसारवृक्षाचे बळकट असे जाळे असुन ते आळेच संसारवृक्षाचे मुख्य कारण आहे. असे मायासंबधीचे आळे झाल्यावर,
92-15
मग आधिली सदेहांतरे । उठती जिये अपारे । ते चौपासि घेऊनि आगारे । खोलावती ॥92॥
मग त्या मुळातच सुरुवातीला देह निर्माण होऊन खालच्या बाजुस चार प्रकारचे अंकुर निर्माण होतात.
93-15
ऐसे भवद्रुमाचे मूळ । हे ऊर्ध्वी करी बळ । मग आणियांचे बेंबळ । अधी दावी ॥93॥
असे जे संसारवृक्षाचे मूळ माया ते वरच्या बाजूस स्वरुपाच्या ठिकाणी बळकट झाल्यावर म्हणजे मग त्याला खाली अंकुराचे झुपके खाली येतात
94-15.
तेथ् चिद्वृत्ति पहिले । महत्तत्त्व उमलले । ते पान वाल्हेदुल्हे । एक निघे ॥94॥
त्या अंकुरात, चिद्वृत्ती म्हणजे माया, त्या मायेपासून पहिल्या प्रथम महतत्व हेच काय ते एक उमलेले कोवळे लुसलुशीत पान निघते.
95-15
मग सत्त्वरजतमात्मकु । त्रिविध अहंकारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ॥95॥
मग त्या पानास महत् तत्वापासुन अंहकार तयार होतो. तो अहंकार मुळात एकच असुन सात्विक, तामस, राजस असा तीन प्रकारचा होतो. त्यामुळे महत् तत्वाला सत्व, रज, तम अशी तीन पाने असलेला आणि मुळाशी विस्तारलेला अहंकाररुपी कोंब किंवा अंकुर फुटतो.


96-15
तो बुद्धीची घेऊनि आगारी । भेदाची वृद्धि करी । तेथे मनाचे डाळ धरी । साजेपणे ॥96॥
तो त्रिगुणात्मक अहंकाररुपी सत्वापासून उपन्न होणार्‍या बुद्धीचे शेंडा निर्माण करुन सर्व प्रकारच्या भेदभावांची वृद्धी करतो, त्याच वेळी तो अहंकाररुपी मनाची डहाळी विकसितपणाने धारण करतो.
97-15
ऐसा मूळाचिया गाढिका । विकल्परस कोवळिका । चित्तचतुष्टय डाहाळिका । कोंभैजे तो ॥97॥
याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन, बुद्धी, चित्त, अहंकाररूपी कोवळ्या फांद्या, या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात.
98-15
मग आकाश वायु द्योतक । आप पृथ्वी हे पांच फोंक । महाभूतांचे सरोख । सरळे होती ॥98॥
मग तामस अहंकारापासून उत्पन्न होणार्‍या आकाश, वायू, अग्नि, पाणी आणि पृथ्वी या पंचमहाभूतांचे पाचही फोक वेगाने सरळ निघतात.
99-15
तैसी श्रोत्रादि तन्मात्रे । तिये अंगवसा गर्भपत्रे । लुळलुळिते विचित्रे । उमळती गा ॥99॥
त्याचप्रमाणे राजस अहंकारापासुन महाभुत स्वरुप अशी श्रोञादी दहा इंद्रिये तयार होतात. शरिराच्या आश्रयाखाली राहतात, इकडे तिकडे डोलणारी, चिञविचिञ अशी लुसलुशीत पानाप्रमाने आहेत.
100-15
तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रा वाढी देव्हडी । होता करित कांडी । आकांक्षेची ॥100॥
ज्याप्रमाने त्या पंचमहा भुतांमध्ये एकमेकाबद्दल पंचीकरण झाल्यानंतर आकाशापासुन शब्दाचा अंकुर तयार होतो. त्या अकुंराला भेटण्याकरता श्रोञेंद्रियांची दिडपट वाढ होत असताना ती वाढ अपेक्षेचे पेरे करीत असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २३२ वा. २०, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २७७३ ते २७८४
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २७७३
कोठे देवा बोलो । तुम्हा भीड घालू गेलो ॥१॥
करावाया सत्वहाणी । भांडवलाची टांचणी ॥धृपद॥
दुर्बळा मागता । त्याच्या प्रवर्तला घाता ॥२॥
तुका म्हणे नाही । मज कळले ऐसे काही ॥३॥
अर्थ
देवा कुठे तुमच्यासंगे मी बोलायला निघालो आणि तुम्हाला भीड घालायला निघालो आहे ? देवा मी तुमच्याशी बोलायला आणि भीड घालणे हे म्हणजे तुमचे सत्वहरण करण्यासारखेच होईल कारण तुमच्याकडे भांडवलाची फारच कमतरता आहे. देवा एखादया दुर्बळाने तुम्हाला काही मागणी मागितली तर तुम्ही त्याचा घात करण्यासाठी प्रवृत्त होता. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही असे विश्वासघातकी आहात हे मला यापूर्वी कळलेच नाही. ”
अभंग क्र. २७७४
पाहिजे ते आता प्रमाण प्रत्यक्ष । आलियाने साक्ष खरे खोटे ॥१॥
काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥धृपद॥
ठेवीयली खूण करोनी संकेत । तया पाशी चित्त लागलेसे ॥२॥
जाणसी गे मते लेकरांचा लाड । नये पडो आड निष्ठुरता ॥३॥
तुका म्हणे आम्ही करावे वचन । तुम्हासी जतन करणे ते ॥४॥
अर्थ
देवा आता मला तुझा प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे जर मला अनुभव आला तरच मला खरे काय खोटे काय याचा पुरावा निश्चिंत होईल. देवा मी पूर्वी जी तुमची सेवा केली त्याचे फळ मिळण्याचा उचित दिवस आज आला आहे काय ? देवा तुम्ही देव आहात आणि मी भक्त आहे आणि मी भक्त म्हणून तुमची सेवा करावी तुम्ही मला तुमचे सगुणरुप दाखवावे असा जो आपण यापूर्वी संकेत करुन ठेवला आहे त्यापाशीच माझे आता चित्त लागले आहे. हे माते विठाबाई तू तुझ्या लेकरांची म्हणजे आमचे सर्व लाड जाणते आहेस मग त्या लाडामध्ये आता निष्ठूरता आड येऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आम्ही लेकरांनी तुमच्यापुढे लाडाने हट्ट करावेत आणि तुम्ही त्याचे जतन करुन ते पूर्ण करावेत हे तुमचे कर्तव्य आहे. ”
अभंग क्र. २७७५
पडिला प्रसंग का मी ऐसा नेणे । संकल्प ते मने जिरवले ॥१॥
चेष्टाविले तरी सांगावे कारणे । भक्ती ते जिवन करावया ॥धृपद॥
लावूनिया दृष्टि घेतली सामोरी । बैसले जिव्हारी डसोन ते ॥२॥
तुका म्हणे जीवा लाविला तो चाळा । करावे गोपाळा शीघ्र दान ॥३॥
अर्थ
देवा मी निराश होण्याचा प्रसंग का आला हे मला काही कळत नाही काय, मला सर्व कळते आणि मी मनात ठरवलेले संकल्प तुला मागणार होतो ते मी माझ्या मनातच जिरुन टाकले आहेत. देवा मी आजपर्यंत जे जे काही कर्म केले ते भक्ती म्हणून आणि भक्ती हेच माझे जगण्याचे साधन व्हावे यामुळेच ते केले आहे. मी हरीच्यासमोर माझी दृष्टी लावून बसलो आहे आणि हरीचे तेच स्वरुप माझ्या जीवाशी जडून बसलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे देवा गोपाळा मी माझ्या जीवाला तुमचाच चाळा लावला आहे त्यामुळे तुमच्या कृपेचे दान मला शीघ्र दयावे. ”
अभंग क्र. २७७६
मागील विसर होईंल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥१॥
दोहीचे ऐक्य घाली गडसंदी । स्थिरावली बुद्धी पायापाशी ॥धृपद॥
अहाच या केलो देहपरिचारे । तुमचे ते खरे वाटो नये ॥२॥
तुका म्हणे व्हावे लवकरी उदार । मी आहे सादर प्रतिग्रहा ॥३॥
अर्थ
मागील जी संसारदु:खाची तळमळ होती त्याचा नाश झाल्यामुळे त्याचा विसर पडेल. संसार आणि बुध्दी यांचे ऐक्य जर झाले तर ते अडचणीच्या गडसंधीत आपल्याला घालत असते परंतू आता तसे न होता माझी बुध्दी तुझ्या पायापाशी स्थिर झाली आहे देवा. देहाचे चोचले पुरवणारा मी दांभिक भक्त झालो होतो त्यामुळे मला तुमचे खरे वाटत नव्हते. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही आता लवकर उदार व्हा मी तुमच्याकडून दान घेण्यासाठी उभा आहे. ”
अभंग क्र. २७७७
वाढवावा पुढे आणीक प्रकार । एकचि ते फार रुचि नेदी ॥१॥
निच नवे लेणे देह हा पवाडा । पालट रोकडा वरावरी ॥धृपद॥
दिसे शोभिवंत सेवेने सेवक । स्वामीची ते लोकत्रयी कीर्ति ॥२॥
तुका म्हणे आजी पाववा संतोष । करुनि कीर्तिघोष नाचईन ॥३॥
अर्थ
देवा भक्तीमार्गामध्ये अनेक प्रकार पुढे वाढतच राहावे कारण एकच प्रकार सारखा सारखा आवडतच नसतो अहो देवा देहाला देखील नवीन अलंकार कपडे घालून फिरण्याची हौस असतेच. स्वामीची सेवा केल्याने सेवक देखील शोभून दिसतो आणि सेवा केल्याने स्वामीची देखील त्रैलोक्यात किर्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात देवा भक्तीमार्गामध्ये अनेक साधने मला देऊन आज संतुष्ट करावे मग तुमच्या किर्तीचा घोष करुन मी तुमच्यापुढे आनंदाने नाचेन. ”
अभंग क्र. २७७८
क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी ॥१॥
क्षणभंगुर ते उपजली चिंता । खरी अखंडीता आवडीची ॥धृपद॥
शिकवू जाणे ते गोमाटियासाठी । लोभे नाही तुटी निश्चियेंसी ॥२॥
अवघेचि मिथ्या समया आरते । देता तो उचिते काय जाणे ॥३॥
न करी अव्हेर गांजू नेदी कोणा । भेडसावी तान्हे हाऊ आला ॥४॥
तुका म्हणे करी जिवासी जतन । दचकूनि मन जवळी आणी ॥५॥
अर्थ
मुलावर रागावणे किंवा मुलाला माया लावणे हे दोन्हीही मातेसाठी सारखे समानच असते कारण योग्य वेळी या दोन्ही विकरांचा माता वापर करत असते व मुलाचे हित व्हावे यासाठीच अंतकरणाची ही दोन्हीही विकार ती माता जतन करून ठेवत असते. कधी कधी तर आई मुलांविषयी चिंता करते व कधीकधी त्याच्यावर प्रचंड चिडते परंतु मुलाविषयी जो प्रेमाचा झरा आहे तो अखंडित तिच्या अंतकरणात असतो. आई मुलाला कोणतीही गोष्टी शिकवताना त्याच्या प्रेमापोटी त्याला चांगली गोष्ट शिकवते परंतु काहीही शिकवत असताना तिच्या मनात कोणत्याही प्रकारचा लोभाची तूट नसते हे मात्र निश्चिंत. कोणत्याही वेळी मुलाने काहीही मागितले तरी ती आई त्याला ते योग्य असेल तर देते अयोग्य असेल तर देत नाही कारण मुलाचे हित कशात आहे हे ती जाणते आणि योग्य काळी काय देणे योग्य आहे हे देखील जाणत असते. ती माता आपल्या मुलाचा कधीही तिरस्कार करीत नाही व आपल्या मुलाला कोणाकडूनच त्रासही होऊ देत नाही मुलगा फारच हट्टीला आला तर त्याला बागुलबोवा ची भीती दाखवून भेडसावत असते. तुकाराम महाराज म्हणतात मुलाचे रक्षण ही माता आपल्या जीवाचे पेक्षाही जास्त करत असते बाळ थोडेसे बाहेर कुठे बाहेर गेला तर आईचे मन भयभीत होते व ती माता मुलाला शोधून पुन्हा आपल्या जवळ आणते.
अभंग क्र. २७७९
संसाराचे धावे वेठी । आवडी पोटी केवढी ॥१॥
हागो जाता दगड सांची । अंतरी ही संकल्प ॥धृपद॥
लाज तेवढी नारायणी । वांकडी वाणी पोरांपे ॥२॥
तुका म्हणे बेशरमा । वरी श्रमा पडिभरू ॥३॥
अर्थ
मनुष्य संसाराच्या वेठबिगारी मध्ये किती आवडीने काम करतो यावरूनच त्याचे पोटामध्ये संसारा विषय किती आवड आहे हे समजते. मनुष्य हागण्यास जरी गेला तरी दगडे साठवित असतो यावरून असे लक्षात येते की त्यावेळी देखील त्याच्या मनात संसाराचा संकल्प चालू असतो. नारायणा चे नांव घेण्यासाठी तेवढी त्याला लाज वाटते परंतु पोराबरोबर वाकडे तोंड करून बोलताना त्याला लाज वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अशा बेशरम मनुष्याला संसारामध्ये श्रम करण्यात जास्त भर असतो.
अभंग क्र. २७८०
मी त्यासी अनन्य ती कोणा असती । ऐसे तव चित्ती विचारावे ॥१॥
आहे तो विचार आपणयापाशी । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबी ॥धृपद॥
शुभ शकून तो शुभ लाभे फळे । पुढील ते कळे अनुभवे ॥२॥
तुका म्हणे माझा असेल आठव । तैसा माझा भाव तुझ्या पायी ॥३॥
अर्थ
मी माझ्या विठाबाईशी अनन्य आहेत तर माझी विठाबाई कोणाशी अनन्य आहे याविषयी भक्ताने आपल्या मनामध्ये विचार करावा. याविषयी विचार करावा तर तो आपल्या जवळच आहे जसे आपले प्रतिबिंब आपण आरशात पाहिले की ते जसेच्या तसे समोर आरश्या मध्ये दिसते त्याप्रमाणे आपण देवाशी अनन्य झालो तर देवही आपल्याशी अनन्य होत असतो. एखादा शुभशकुन झाला आणि त्यानंतर आपल्याला लगेच शुभ फळ मिळाले तर तो लाभ तो शुभ शकुन खरा ठरतो आणि अनुभवाने आपल्याला पुढे होणाऱ्या शुभ शकुन हे कळत असते. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझा जसा भक्तिभाव असेल तशा प्रकारचा आठव माझ्याविषयी तुझ्या मनात असेल.
अभंग क्र. २७८१
बहु कृपावंते माझी मायबापे । मी माझ्या संकल्पे अंतरलो ॥१॥
संचिताने नाही चुको दिली वाट । लाविले अदट मजसवे ॥धृपद॥
आता मी रुसतो न कळता वर्म । परी ठावे धर्म सर्व देवा ॥२॥
तुका म्हणे उभा राहिला न बैसे । आमुचीया आसे उद्वेग त्या ॥३॥
अर्थ
माझा माय बाप पांडुरंग हा खूप कृपावंत आहे परंतु माझ्या मनातील विविध संकल्पाने मी त्याच्या पासून अंतरलो आहे. परंतु माझे पूर्व संचित चांगले म्हणून मी भक्तीचा मार्ग सोडला नाही आपोआप त्या भक्तीच्या मार्गाला मी लागलो आणि देवाने जणू भक्तीच्या मार्गा जवळच मला ठेवले आहे असे मला वाटते. मी आता देवा वर त्याचे वर्म मला कळत नाही तरी देखील रुसून बसत आहे परंतु देवाला त्याचे सर्वधर्म माहित आहे. तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच तर आमच्यासारख्या भक्तांचा उद्धार करण्याकरता यासाठी देव विटेवर सारखा उभा आहे कधीही बसत नाही इतकी आमची काळजी त्या देवाला आहे.
अभंग क्र. २७८२
कैसी दिसो बरी । आम्ही आळविता हरी ॥१॥
नाही सोंग अळंकार । दास झाला संवसार ॥धृपद॥
दुःख आम्हा नाही चिंता । हरीचे दास म्हणविता ॥२॥
तुका म्हणे देवा । ऐसी झालो करिता सेवा ॥३॥
अर्थ
आम्ही हरीला आळवले तेव्हापासून कशी चांगली दिसत आहोत. आम्हाला अंगावर घालण्यासाठी विविध प्रकारचे वस्त्र किंवा अलंकार नाहीत परंतु संसार आमचा दास झाला आहे. जेव्हापासून आम्ही स्वतःला हरीचे दास म्हणून घेतले आहे तेव्हापासून आम्हाला कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा चिंता नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी सेवा आम्ही केली तेव्हापासून आम्ही दुःख विरहित चिंता विरहित अगदी चांगली झालो आहोत.
अभंग क्र. २७८३
आता सांडू तरी हाती ना पदरी । सखी सहोदरी मोकलीलो ॥१॥
जनाचारामध्ये उडाला पातेरा । झालो निलाजिरा म्हणऊनि ॥धृपद॥
कोणाचिया दारा जावेनासे झाले । म्यांच विटंबिले आपणासी ॥२॥
कोण झाला माझे बुद्धीसी संचार । नाही कोठे थार ऐसे झाले ॥३॥
तुका म्हणे तुज भक्त झाले फार । म्हणोनिया थार नाही येथे ॥४॥
अर्थ
आता मी जर देवाला सोडून दिले तर माझ्या हातात आणि पदरात काहीच राहणार नाही कारण माझा तर आता माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या मित्रांनी माझ्या इष्ट परिवाराने देखील त्याग केला आहे. लोकांमध्ये माझा तर पातेरा उडालेला आहे त्यामुळे मी निर्लज्ज झालो आहे. मीच माझी विटंबना सर्वत्र करून घेतली आहे त्यामुळे आता मला कोणाच्या दारातही जावेसे वाटे ना. माझ्या बुद्धीमध्ये देवाचा संचार कसा काय झाला हे मला काही कळले नाही परंतु आता देवा वाचुन मला कोठेही आश्रय राहिला नाही असे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा परंतु आता तुला ही फार फक्त झाले आहे त्यामुळे मला तुझ्याजवळ ही आश्रय मिळत नाही.
अभंग क्र. २७८४
जेथे जातो तेथे पडतो मतोळा । न देखिजे डोळा लाभ काही ॥१॥
कपाळीची रेखा असती उत्तम । तरि का हा श्रम पावतो मी ॥धृपद॥
नव्हेचि तुम्हास माझा अंगीकार । थीता संवसार अंतरला ॥२॥
भोग तव झाला खरा भोगावा तो । भांडवल नेतो आयुष्य काळ ॥३॥
कोठे तुझी कीर्ती आइकिली देवा । मुकतो का जीवा तुका म्हणे ॥४॥
अर्थ
मी जेथे जातो तेथे मला केवळ नुसकानचं दिसत आहे माझ्या डोळ्याने काही लाभ दिसतच नाही. माझ्या कपाळाची भाग्य रेषा जर चांगली असती तर मला एवढे कष्ट भोगावे लागले असते काय. देवा तुम्ही माझा अंगिकार करत नाही आणि माझ जो संसार होता तोही आता माझ्यापासून अंतरला आहे. जेवढा सुख आणि दुःख रुपी भोग होता तेवढा भोगला खरा पण आता मात्र काळ माझ्या आयुष्याचे भांडवल नेता आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी कुठं तुझ्या नादी लागलो काय माहित तुझ्या जर नादी लागलो नसतो तर मी माझ्या जीवाला मुकलो असतो काय ?

ऑगस्ट नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version