आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय ९ वा राजविद्याराजगुह्ययोग
शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 9: RAJVIDDYARAJGUHYA Yoga:
Sartha Dnyaneshwari Adhyay RAJVIDDYARAJGUHYA
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ नवमोऽध्यायःअध्याय नववा ॥ राजविद्याराजगुह्ययोग ॥
अध्याय नववा
सार्थ श्रीज्ञानेश्वरी: :: ॥ अथ नवमोऽध्यायःअध्याय नववा ॥ राजविद्याराजगुह्ययोग ॥
अध्याय नववा
1-9
तरि अवधान एकवेळे दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ॥1॥
श्री ज्ञानेश्वर म्हणतात, ” श्रोतेहो, ऐका. मी प्रतिज्ञापुर्वक हे स्पष्ट सांगतो की, तुम्ही एक लक्ष इकडे दिले तर सर्व सुखाला पात्र व्हाल.
2-9
परि प्रौढी न बोले हो जी । तुम्हा सर्वज्ञांचा समाजी । देयावे अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥2॥
पण तुम्हा सर्वज्ञांच्या सभेपुढे मी हे आढ्यतेने बोलत नाही हो! ‘तुम्ही लक्ष द्या ‘ ही माझी तुम्हाला लडिवाळपणाची विनंती आहे.
3-9
का जे लळेयांचे लळे सरती । मनोरथाचे मनौरे पुरती । जरी माहेरे श्रीमंते होती । तुम्हा ऐसी ॥3॥
कारण, तुम्हासारखी संपन्न माहेरघरे असल्यावर, आवड म्हणुन जी एक वृत्ति आहे तिची देखील आवड पुर्ण होते, आणि मनोरथाची देखील इच्छा तृप्त होते!
4-9
तुमचेया दिठिवेचिया वोले । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे । ते साऊली देखोनि लोळे । श्रांतु जी मी ॥4॥
तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने भरांत आलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून, श्रमलेला असा जो मी, तो त्या ठिकाणी विश्रांति घेतो.
5-9
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छावोलावो लाहो । येथ जरी सलगी करू बिहो । तरी निवो के पा ॥5॥
महाराज, तुम्ही सुखामृताचे डोहच आहां, म्हणुन आम्ही आपले इच्छेप्रमाणे त्यात बागडावे असे म्हणतो. येथेही जर तसे करून घेण्यास तुमच्याशी सलगी करण्यास भिऊ लागलो, तर आम्ही तृप्त तरी व्हावे कोठे ?
6-9
नातरी बालक बोबडा बोली । का वाकुडा विचुका पाऊली । ते चोज करूनि माऊली । रिझे जेवी ॥6॥
किंवा बालकाच्या बोबड्या बोलांनी व वेड्यावाकड्या चालण्याने ज्याप्रमाणे कौतुक मानून आई आनंद पावते, त्याप्रमाणे
7-9
तेवी तुम्हा संतांचा पढियावो । कैसेनि तरि आम्हावरी हो । या बहुवा आळुकिया जी आहो । सलगी करीत ॥7॥
तुम्हा संतजनांची प्रीति कोणत्या तरी रितीने मजवर व्हावी, या पुर्ण इच्छेने मी तुमच्याशी सलगी करीत आहे.
8-9
वाचूनि माझिये बोलतीये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते । काय धड्यावरी सारस्वते । पढो सिकिजे ॥8॥
याशिवाय तुमच्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांची माझ्या बोलण्याच्या नुसत्या योग्यतेवर प्रिती बसनार नाही. सरस्वतीपुत्राला धडे पाठ करून विद्या संपादन करावी लागते काय ?
9-9
अवधारा आवडे तेसणा धुंधुरु । परि महातेजी न मिरवे काय करू । अमृताच्या ताटी वोगरू । ऐसी रससोय कैची ॥9॥
पहा की, पाहीजे तेवढा मोठा जरी काजवा असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडेल काय ? तसेच अमृतरूप ताटांत वाढण्याजोगी पाकनिष्यत्ति कोणती आहे ?
10-9
अहो हिमकरासी विंजणे । की नादापुढे आइकवणे । लेणियासी लेणे । हे कही आथी ॥10॥
अहो, ज्याचे थंड किरण आहे अशा चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा सुस्वराला गायन ऐकविणे, तसेच दागिन्याला अलंकार घालने असे कोठे होईल का ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-9
सांगा परिमळे काय तुरंबावे । सागरे कवणे ठायी नाहावे । हे गगनचि आडे आघवे । ऐसा पवाडु कैचा ॥11॥
परिमळाने कशाचा वास घ्यावा ? समुद्राने कशांत न्हावे ? आणि हे आकाश ज्यात मावेल अशी मोठी वस्तु कोणती आहे सांगा बरे!
12-9
तैसे तुमचे अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हे होये । ऐसे वक्तृत्व कवणा आहे । जेणे रिझा तुम्ही ॥12॥
त्याचप्रमाणे, तुमचे अवधान तृप्त होईल, आणि तुम्ही असे म्हणाल की, ‘ ही गोष्ट खरी ‘, असे तुम्हाला तृप्त करण्याजोगे वक्तृत्व कोणाचे आहे ?
13-9
तरि विश्वप्रगटतिया गभस्ती । हातिवेनि न कीजे आरती । का चुळोदके अपांपती । अर्घ्यु नेदिजे ॥13॥
म्हणुन, सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सुर्याला काडवातीने आरती करू नये की काय ? किंवा समुद्राला चुळकाभर पाण्याने अर्ध्य देऊ नये का ?
14-9
प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती । म्हणोनि बेल जऱ्ही गंगावती । तऱ्ही स्वीकाराल की ॥14॥
महाराज, तुम्ही केवळ शंकराची मुर्ति आहां, आणि मी गरीब तुमची भक्तीने पूजा करीत आहे. म्हणून बोलाच्या ऐवजी माझ्या बोलरूपी निर्गुडीचा तुम्ही स्वीकार करणार नाही का ?
15-9
बाळक बापाचिये ताटी रिगे । रिगौनि बापातेच जेवऊ लागे । की तो संतोषलेनि वेगे । मुखचि वोडवी ॥15॥
लहान मुल बापाच्या ताटात जेवायला बसुन बापालाच जेवू घालते, तेव्हा तो संतोषभराने आपले तोंड घास घेण्याकरीता पुढे करतोच;
16-9
तैसा मी तुम्हाप्रती । चावटी करितसे बाळमती । तरी तुम्ही संतोषिजे ऐसी जाती । प्रेमाची या ॥16॥
त्याचप्रमाणे, मी जरी तुमच्याशी बालकाप्रमाणे विनोदाने वर्तन करितो, तरी तुम्हाला त्या माझ्या वर्तनापासून आनंदच झाला पाहीजे, असा प्रेमाचा गुण आहे;
17-9
आणि तेणे आपुलेपणाचेनि मोहे । तुम्ही संत घेतले असा बहुवे । म्हणोनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हा 17
आणि त्या आपलेपणाच्या अभिमानाने तुम्ही संतजनांनी बहूत प्रकारांनी मला ‘ आपला ‘ असे म्हटले आहे; म्हणून माझ्या या सलगीचा आपणास विषाद होणार नाही.
18-9
अहो तान्हेयाची लागता झटे । तरी अधिकचि पान्हा फुटे । रोषे प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥18॥
अहो, वासराने दुशी दिल्यावर गाईला ज्याप्रमाणे अधिकच पान्हा फुटतो, त्याप्रमाणे अत्यंत प्रिय जो मनुष्य असतो त्याच्या रागावण्याने प्रेम दुप्पट होते.
19-9
म्हणऊनि मज लेकुरवाचेनि बोले । तुमचे कृपाळूपण निदैले । ते चेइले हे जी जाणवले । यालागी बोलिलो मी ॥19॥
म्हणून, मज लेकराच्या बोबड्या बोलांनी तुमचे निजलेले कृपाळूपण जागे झाले, असे जाणून मी बोललो.
20-9
एऱ्हवी चांदणे पिकविजत आहे चेपणी । की वारया धापत आहे वाहणी । हा हो गगनासी गंवसणी । घालिजे केवी ॥20॥
येऱ्हवी चंद्राचे चांदणे कोणी आठीत घालून पिकविले आहे काय ? किंवा वाऱ्याला वाहण्याकरीता कोणी गति दिली आहे का ? तसेच आकाशाला कोणी गवसणी घातली आहे का ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-9
आइका पाणी वोथिजावे न लगे । नवनीती माथुला न रिगे । तेवि लाजिले व्याख्यान न निगे । देखोनि जयाते ॥21॥
ऐका : पाण्याला पातळ करावे लागत नाही; आणि लोणी तयार झाल्यावर ते रवीने कोणी घुसळीत नाही, त्याचप्रमाणे, ज्याला पाहून माझे व्याख्यान लाजल्यामुळे माघारी येते.
22-9
हे असो शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावळलेया निवांतु निजे । तो गीतार्थु मऱ्हाटिया बोलिजे । हा पाडु काई ॥22॥
हे असो, ज्यापुढे वेदांचे शब्द कुंठित झाल्यामुळे तेही ज्याच्या शय्येवर गाढ निद्रा घेतात, (ज्यापुढे वेदांची मति कुंठित झाल्यामुळे तेही स्तब्ध राहातात, ) तो गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा असा माझा अधिकार आहे का ?
23-9
परि ऐसियाही मज धिंवसा । तो पुढतियाचि येकी आशा । जे धिटीवा करूनि भवादृश्या । पढियंता होआवे ॥23॥
परंतु अशी स्थिति असतांही मला पुढच्या आशेवर इच्छा उत्पन्न झाली, ती ही की, मन धीट करून तुमच्यासारख्यांची प्रीति संपादन करावी.
24-9
परि आता चंद्रापासोनि निवविते । जे अमृताहूनि जीवविते । तेणे अवधान कीजो वाढते । मनोरथा माझिया ॥24॥
तर आता चंद्रापेक्षाही थंड करणाऱ्या व अमृताहूनही जीवन देणाऱ्या अशा अवधानाने माझ्या मनोरथाला पुष्टि द्या.
25-9
का जै दिठिवा तुमचा वरुषे । तै सकळार्थसिद्धि मती पिके । एऱ्हवी कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥25॥
कारण, जर तुमची कृपादृष्टीरूप वृष्टि मजवर पूर्ण होईल, तर माझ्या बुद्धिरूप भूमींत सकलार्थरूप धान्य पिकेल. येरव्ही जर तुम्ही उदास असाल, तर अंकुर आलेले ज्ञान सुकून जाईल.
26-9
सहजे तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदे पेलती अक्षरा । प्रमेयाची ॥26॥
वक्तृत्वरूप पांखराला अवधानरूपी चारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षररूपी अवयवाला अर्थरूपी पुष्टि येईल.
27-9
अर्थु बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायाते विये । भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥27॥
अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पहात असतो, शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थावर अर्थ निघतात आणि बुद्धीला नानाप्रकारचे श्लेष सुचू लागतात.
28-9
म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वते वोळे । आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥28॥
म्हणून, संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता वक्त्याच्या ह्रदयाकाशांत ब्रह्मज्ञानाची वृष्टि होते; आणि जर ऐकणाराचे दुर्लक्ष असेल, तर वक्तृत्वाला आलेला रस वितळून जातो.
29-9
अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हातवटी चंद्री की आहे । म्हणऊनि वक्ता तो वक्ताचि नव्हे । श्रोतेनि वीण ॥29॥
अहो, चंद्रकांत मण्याला पाझर सुटतो ही गोष्ट खरी आहे, परंतु ही शक्ति एका चंद्राचेच ठिकाणी आहे. म्हणून बोलणारास श्रोत्याशिवाय किंमत नाही;
30-9
परी आता आमुते गोड करावे । ऐसे तांदुळी कायसा विनवावे । साइखडियाने काइ प्रार्थावे । सूत्रधाराते ॥30॥
परंतु आम्हास गोड करुन घ्या, अशी तांदुळांना विनंति करावी लागते का ? तसेच, कळसूत्री बाहुल्यांना, ‘आम्हाला नाचवा ‘ म्हणून सुत्रधाराची विनंती करावी लागते का ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-9
काय तो बाहुलियांचिया काजा नाचवी । की आपुलिये जाणिवेची कळा वाढवी । म्हणऊनि आम्हा या ठेवाठेवी । काय काज ॥31॥
तो सुत्रधार बाहुल्यांच्या कामाकरिता त्यांना नाचवीत नाही, तर आपली कुशलता दाखविण्याकरिता नाचवितो; म्हणून आम्हाला या उठाठेवी करण्याचे काय कारण आहे ? त्या वेळी श्रीगुरु निवृत्तिराज म्हणतात,
32-9
तव गुरु म्हणती काइ जाहले । हे समस्तही आम्हा पावले । आता सांगे जे निरोपिले । नारायणे ॥32॥
तुला इतके उदास होण्याचे कारण काय झाले ? तुझे सर्व बोलणे आम्हाला मान्य आहे; तर आता श्रीकृष्णांनी जे अर्जुनास सांगीतले, ते सांग. “
33-9
येथ संतोषोनि निवृत्तिदासे । जी जी म्हणऊनि उल्हासे । अवधारा श्रीकृष्ण ऐसे । बोलते जाहले ॥33॥
तेव्हा निवृत्तिदासास ज्ञानदेव संतोष पावून मोठ्या उल्हासाने म्हणाले :- होय महाराज, ऐका. श्रीकृष्ण असे म्हणाले :-
श्री भगवानुवाचः
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्षसेऽशुभात् ॥9. 1॥
34-9
नातरि अर्जुना हे बीज । पुढती सांगिजेल तुज । जे हे अंतःकरणीचे गुज । जीवचिये ॥34॥
अर्जुना, माझ्या अंतःकरणातील अति गुह्य असे जे ज्ञानाचे आदिकारण, ते पुनः तुला सांगतो.
35-9
येणे माने जीवाचे हिये फोडावे । मग तुज का पा मज सांगावे । ऐसे काही स्वभावे । कल्पिशी जरी ॥35॥
आता अशा प्रकारे हे जीवीचे गुह्य फोडुन ते तुला मी का सांगतो अशी जर तुझ्या मनात सहज शंका येईल,
36-9
तरी परियेसी प्राज्ञा । तू आस्थेचीच संज्ञा । बोलिलिये गोष्टीची अवज्ञा । नेणसी करु ॥36॥
तर बाबारे, ऐक, तू समजदार असून केवळ आस्थेची मूर्ति आहेस; आणि आम्ही जे तुला सांगतो, ते तू मनापासून ऐकतोस; म्हणून,
37-9
म्हणोनि गूढपण आपुले मोडो । वरि न बोलावेही बोलावे घडो । परि आमुचिचे जीवीचे पडो । तुझा जीवी ॥37॥
आमची गुह्य गोष्ट पडली तरी पडो, आणि न बोलावयाची गोष्ट बोलावी लागली तरी लागो, पण आमच्या ह्रदयातील गुह्य गोष्ट तुझ्या ह्रदयात पडो.
38-9
अगा थानी कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे की गोड । म्हणोनि सरो का सेवितयाची चाड । जरी अनन्य मिळे ॥38॥
अरे, स्तनांत जरी दूध साठविलेले असले तरी त्याची गोडी स्तनाला नसते; म्हणून, जर एकनिष्ठ सेवन करणारा वत्स मिळाला, तर त्याची इच्छा पूर्ण होवो.
39-9
मुडाहूनि बीज काढिले । मग निर्वाळलिये भूमी पेरिले । तरी ते सांडीविखुरी गेले । म्हणो ये कायी ॥39॥
मुढ्यातून पेरण्याचे बी काढून ते तयार केलेल्या जमिनीत पेरले, तर ते सांडलवंडीवरी गेले असे म्हणता येईल का ?
40-9
यालागी सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती । पै गा गौप्यही परि तयाप्रती । चावळिजे सुखे ॥40॥
याकरिता, प्रशस्त अंतःकरणाचा, शुद्ध बुद्धिचा, निंदा न करणारा व एकनिष्ठ असा जर भक्त असेल, तर त्याला आपली मनातील गुप्त गोष्टही आनंदाने सांगावी.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-9
तरि प्रस्तुत आता गुणी इही । तू वाचूनि आणिक नाही । म्हणोनि गुज तरी तुझा ठायी । लपवू नये ॥41॥
तर ह्या गुणांनी संपन्न असा सांप्रत तुजवाचून कोणी नाहीं, म्हणून गुप्त अशी ही गोष्ट तुझ्यापासून चोरता येत नाही.
42-9
आता किती नावानावा गुज । म्हणता कानडे वाटेल तुज । तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेसी ॥42॥
आता वारंवार गुप्त गुप्त म्हटल्यामुळे तुला कंटाळवाणे वाटेल; तर आता तुला प्रापंचिक ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगतो.
43-9
परि तेचि ऐसेनि निवाडे । जैसे भेसळले खरे कुडे । मग काढिजे फाडोवाडे । पारखूनिया ॥43॥
परंतु खरे आणि खोटे नाणे एके ठिकाणी मिसळल्यावर ज्याप्रमाणे फाडी लावून निराळे करतात, त्याप्रमाणे ज्ञान व विज्ञान निराळे करुन दाखवितो.
44-9
का चांचूचेनि सांडसे । खांडिजे पय पाणी राजहंसे । तुज ज्ञान विज्ञान तैसे । वांटूनि देऊ ॥44॥
किंवा राजहंस आपल्या चोचीची सांडस करून दूध व पाणी निरनिराळे करतो, त्याप्रमाणे हे ज्ञान-विज्ञान तुला स्पष्ट करून सांगतो.
45-9
मग वारयाचिया धारसा । पडिला कोंडा का नुरेचि जैसा । आणि अन्नकणाचा आपैसा । राशि जोडे ॥45॥
म्हणजे मग कोंडा व धान्य उफणण्याकरिता वाऱ्यावर धरले असता धान्याची खाली सहज रास होऊन कोंडा निराळा होतो.
46-9
तैसे जे जाणितलेयासाठी । संसार संसाराचिये गाठी । लाऊनि बैसवी पाटी । मोक्षश्रियेचां ॥46॥
त्याप्रमाणे ते जाणल्याबरोबर संसाराच्या पाठीमागेच संसार लावून साधकाला ते मोक्षश्रीच्या पाठीवर नेऊन बसविते!
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥9. 2॥
47-9
जे जाणणेया सुविद्येच्या गावी । गुरुत्वाची आचार्यपदवी । जे सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रा रावो ॥47॥
ज्याला सर्व ज्ञानांच्या ठिकाणी मुख्य असे आचार्याचे स्थान मिळते, जे सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र वस्तुंचा राजा,
48-9
आणि धर्माचे निजधाम । तेविचि उत्तमाचे उत्तम । पै जया येता नाही काम । जन्मांतराचे ॥48॥
आणि धर्माचे अधिष्ठान; तसेच उत्तमांत उत्तम, व ज्या ज्ञानाची प्राप्ति झाली असता दुसरा जन्म घेण्याचे कारण रहात नाही;
49-9
मोटके गुरुमुखे उदैजत दिसे । आणि हृदयी स्वयंभचि असे । प्रत्यक्ष फावो लागे तैसे । आपैसयाचि ॥49॥
जे गुरूच्या मुखांतून थोडे बाहेर पडू लागले नाही तोच शिष्याच्या ह्रदयात स्वयमेव असलेले (ब्रह्म) त्यास सहज प्राप्त होते;
50-9
तेविचि पै गा सुखाचा पाउटी । चढता येइजे जयाचिया भेटी । मग भेटल्या कीर मिठी । भोगणे याहि पडे ॥50॥
त्याचप्रमाणे, सुखाच्या पायरीने चढत गेले असता ज्याची भेट होते; आणि मग भेट झाल्यावर, भेटीपासून, होणाऱ्या सुखाचा ज्याच्या ठिकाणी लय होतो;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
51-9
परि भोगाचिये ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभे ठेलेचि सुखा भरे । ऐसे सुलभ आणि सोपारे । वरि परब्रह्म ॥51॥
परंतु ज्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडील कांठावर उभे असतांही चित्त आनंदयुक्त होते, असे सुलभ आणि सोपे असून जे परब्रह्म होय.
52-9
पै गा आणिकही एक याचे । जे हाता आले तरी न वचे । आणि अनुभविता काही न वेचे । वरि विटेहि ना ॥52॥
खरोखर या ज्ञानांत आणखीही गुण आहेत, ते हे की, हे प्राप्त झाले असता नाहीसे होत नाही; हे अनुभव घेतल्याने कमी होत नाही, तसेच जवळ असते, परंतु विटतही नाही.
53-9
येथ जरी तू तार्किका । ऐसी हन घेसी शंका । ना येवढी वस्तु हे लोका । उरली केवि पा ॥53॥
हे चतुर अर्जुना, आता, तू जर अशी शंका घेशील की, एवढी अप्रतिम वस्तु असता लोकांना मिळाल्याशिवाय कशी राहिली ?
54-9
एकोत्तरेयाचिया वाढी । जे जळतिये आगी घालिती उडी । ते अनायासे स्वगोडी । सांडिती केवि ॥54॥
जे लोक एकोत्रा व्याजाकरिता जळत्या आगीतही उडी घालण्यास मागेपुढे पहात नाहीत, ते सहज आपल्या ठिकाणीच असलेली गोडी कशी टाकुन देतील ?
55-6
तरि पवित्र आणि रम्य । तेविचि सुखोपायेचि गम्य । आणि स्वसुख परि धर्म्य । वरि आपणपा जोडे ॥55॥
तरी पवित्र आणि रमणीय, तसेच सुख देणारे, जाणण्यास सुलभ, अति सुखकारक, धर्माला पूर्ण अनुकूल व आपले ठिकाणीच प्राप्त होणारे,
56-9
ऐसा अवघाचि सुरवाडु आहे । तरी जनाहाती केवि उरो लाहे । हा शंकेचा ठाव कीर होये । परि न धरावी तुवा ॥56॥
अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असतांही लोकांच्या हाती लागल्याशिवाय हे कसे राहिले, ही शंका घेण्यास जागा आहे खरी; परंतु तू अशी शंका घेऊ नको.
अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥9. 3॥
57-9
पाहे पा दूध पवित्र आणि गोड । पासी त्वचेचिया पदराआड । परि ते अव्हेरुनि गोचिड । अशुद्ध काय नेघती ॥57॥
पहा, गाईचे दूध हे पवित्र असून गोड आहे; तसेच अगदी जवळ त्वचेच्या पडद्याच्या आंतच आहे; परंतु त्याचा त्याग करून गोचीड रक्तच सेवन करीत नाही का ?
58-9
का कमलकंदा आणि दर्दुरी । नांदणुक एकेचि घरी । परि परागु सेविजे भ्रमरी । जवळिला चिखलुचि उरे ॥58॥
किंवा कमळाचा कांदा व बेडूक हे एकेच ठिकाणी वास्तव्य करतात, परंतु कमळांतील मकरंदाचे सेवन भ्रमर करतात व बेडकांच्या वांट्याला चिखलच राहतो!
59-9
नातरी निदैवाचा परिवरी । लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासु करी । का दरिद्रे जिये ॥59॥
अथवा, दुर्दैव्याच्या घरी मोहरा वगैरे अगणित द्रव्य पुरलेले असूनही तो तेथे बसून उपास काढून दरिद्रावस्था भोगतो
60-9
तैसा हृदयामध्ये मी रामु । असता सर्वसुखाचा आरामु । की भ्रांतासी कामु । विषयावरी ॥60॥
त्याचप्रमाणे; मनुष्याच्या सर्व सुखाचे विश्रांतिस्थान असा मी ” राम ” मनुष्याच्या ह्रदयात असता त्या अज्ञानी पुरूषाची विषयावर वासना असते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-9
बहु मृगजळ देखोनि डोळा । थुंकिजे अमृताचा गिळिता गळाळा । तोडिला परिसु बांधिला गळा । शुक्तिकालाभे ॥61॥
पुष्कळसे मृगजळ दृष्टीस पडून तोंडात असलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा, किंवा शिंप मिळाली असता गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा,
62-9
तैसी अहंममतेचिये लवडसवडी । माते न पवतीचि बापुडी । म्हणोनि जन्ममरणाची दुथडी । डहुळिते ठेली ॥62॥
त्याचप्रमाणे ज्यांचे मनावर अहंममतेचा पगडा बसलेला आहे, ते बिचारे मला प्राप्त होत नाहीत. म्हणून जन्ममरणांच्या दोन्ही तिरांच्या मध्येंच बुचकळ्या खात बसतात
63-9
एऱ्हवी मी तरी कैसा । मुखाप्रती भानु का जैसा । कही नसे न दिसे ऐसा । वाणीचा नव्हे ॥63॥
येरव्ही मी कसा आहे म्हणशील, तर सुर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणाराला तोंडासमोर दिसतो, त्याचप्रमाणे आहे, परंतु त्याच्यात जी एक उणीव आहे, की तो केव्हा दिसतो व केव्हा दिसत नाही, ती मात्र माझ्यात नाही.
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थित: ॥9. 4॥
64-9
माझेया विस्तारलेपणाचेनि नांवे । हे जगचि नोहे आघवे । जैसे दूध मुराले स्वभावे । तरि तेचि दही ॥64॥
माझ्या निर्गुण स्वरूपाचा विस्तार कोणता म्हणशील, तर हे सर्व जगच नव्हे का ? ज्याप्रमाणे, दूध सहज जरी थिजले तरी तेच दही;
65-9
का बीजचि जाहले तरु । अथवा भांगारचि अळंकारु । तैसा मज एकाचा विस्तारु । ते हे जग ॥65॥
किंवा बीजाचाच वृक्ष होतो, अथवा सुवर्णाचे अलंकार होतात, त्याचप्रमाणे, निर्गुण असा जो एकटा मी, त्या माझा जो विस्तार तेच हे जग होय.
66-9
हे अव्यक्तपणे थिजले । तेचि मग विश्वाकारे वोथिजले । तैसे अमूर्तमूर्ति मिया विस्तारले । त्रैलोक्य जाणे ॥66॥
हे स्वरूप अव्यक्त असते. तेव्हा निराकार असते, तेच मग सृष्टीच्या रूपाने विस्तार पावून आकाराला येते. याप्रमाणे, निर्गुण असून साकार झालेला जो मी, त्यानेच हे त्रैलोक्य मांडले असे जाण.
67-9
महदादि देहाते । इये अशेषेही भूते । परि माझा ठायी बिंबते । जैसे जळी फेण ॥67॥
महात्तत्त्वापासून देहापर्यंत ही सर्व भूते खरोखर माझ्यापासूनच उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे पाण्यापासून फेंस उत्पन्न होतो,
68-9
परि तया फेणांआंतु पाहता । जेवी जळ न दिसे पंडुसुता । नातरी स्वप्नीची अनेकता । चेइलिया नोहिजे ॥68॥
परंतु त्या फेसाच्या आत पाहू गेले असता पाणी दिसत नाही, किंवा अर्जुना, स्वप्नांत जीवाचे अनेक रूपे धारण करणे ज्याप्रमाणे जागे झाल्यावर नाहीसे होते,
69-9
तैसी भूते इये माझा ठायी । बिंबती तयांमाजी मी नाही । इया उपपत्ती तुज पाही । सांगितलिया मागा ॥69॥
त्याप्रमाणे, ही भूते जरी माझ्या ठिकाणी भासली, तरी त्यांचे ठिकाणी मी नाही. हे उत्पादन तुला मागे सांगितलेंच आहे. (अध्याय 7 श्लोक 12)
70-9
म्हणऊनि बोलिलिया बोलाचा आतिसो । न कीजे यालागी हे असो । तरी मजाआंत पैसो । दिठि तुझी ॥70॥
म्हणून, बोललेल्या गोष्टींचा पाल्हाळ करु नये. तेव्हा ते राहू दे. परंतु तुझ्या दृष्टीचा प्रवेश माझ्या अंतर्यामी होऊ दे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।
भूतभृन्नच भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥9. 5॥
71-9
आमचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी कल्पनेवीण लागसी पाहो । तरी मजमाजि भूते हेही वावो । जे मी सर्व म्हणऊनि ॥71॥
मायेच्या पलीकडील माझे जे स्वरूप, ते जर कल्पनेशिवाय पाहू लागलास, तर माझे ठिकाणी सर्व भूते आहेत असे जे तुला सांगितले, ते सर्व मिथ्या आहे असे तुला भासेल; कारण सर्व मीच आहे.
72-9
एऱ्हवी संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे । म्हणोनि अखंडित परि झांवळे । भूतभिन्न ऐसे देखे ॥72॥
एरव्ही, संकल्परूप संध्याकाळचे वेळेस ज्ञानरूप डोळे अज्ञानरूप अंधकाराने काही वेळ ग्रासले जातात; म्हणून त्या झांजडीत, मी अखंड असता भूते मजहून निराळी दृष्टीस पडतात.
73-9
तेचि संकल्पाची सांज जै लोपे । तै अखंडितचि आहे स्वरुपे । जैसे शंका जातखेंवो लोपे । सापपण माळेचे ॥73॥
त्याच संकल्परूपी संध्याकाळचे वेळेचा लोप झाला म्हणजे, ज्याप्रमाणे नीळमण्याच्या माळेवर कवड्या सापाचा झालेला सर्व भास, शंका दूर होण्याबरोबर नाहीसा होतो, त्याप्रमाणे मी अखंड आहे असा दिसतो.
74-9
एऱ्हवी तरी भूमीआतूनि स्वयंभ । काय घडेया गाडगेयांचे निघती कोंभ । परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले की ॥74॥
येरव्ही जमिनीतून घागर, मडकी वैगेरेचे कोंब स्वतःसिद्ध निघतात काय ? परंतु कुंभाराच्या बुद्धीने ते सर्व तयार होतात.
75-9
नातरी सागरीचा पाणी । काय तंरगाचिया आहाती खाणी । ते अवांतर करणी । वारयाची नव्हे ॥75॥
किंवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी का आहेत ? तर ते कृत्य वाऱ्याशिवाय इतराचे नव्हें;
76-9
पाहे पा कापसाचा पोटी । काय कापडाची होती पेटी । तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥76॥
हे पहा, कापसाच्या पोटांत कापडाचे गठ्ठे असतात का ? वापरणाराच्या समजुतीने तो कापड बनला आहे!
77-9
जरी सोने लेणे होऊनि घडे । तरी तयाचे सोनेपण न मोडे । येर अळंकार हे वरचिलीकडे । लेतयाचेनि भावे ॥77॥
जर सोन्याचे दागिने बनविले तर सोनेपण नाहीसे होते का ? बाकी स्थुल दृष्टीने वापरणाराच्या कल्पनेने ते दागिने दिसतात;
78-9
सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे । का आरिसा जे आविष्करे । ते आपले की साचोकारे । तेथेचि होते ॥78॥
आपल्या शब्दाचा जो प्रतिध्वनि ऐकू येतो, किंवा आरशांत जे आपले स्वरूप आपण पाहतो, तो खरोखर आपल्या बोलण्याचा किंवा पाहण्याचा परिणाम आहे, किंवा आपल्या पूर्वीच ते तेथे होते सांग बरे!
79-9
तैसी इये निर्मळे माझा स्वरुपी । जो भूतभावना आरोपी । तयासी तयाच्या संकल्पी । भूताभासु असे ॥79॥
त्याचप्रमाणे ह्या माझ्या निरुपाधिक स्वरूपावर जो भूतांच्या कल्पनेचा आरोप घेतो, त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होतो.
80-9
तेचि कल्पिती प्रकृती पुरे । आणि भूताभासु आधीच सरे । मग स्वरुप उरे एकसरे । निखळ माझे ॥80॥
तीच कल्पना करणारी माया संपली, म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास नाहीसा होतो. मग, माझे निरुपाधिक असे जे शुद्ध स्वरूप, तेच निखालस उरते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-9
हे असो आंगी भरलिया भवंडी । जैशा भोवत दिसती अरडीदरडी । तैशी आपुलिया कल्पना अखंडी । गमती भूते ॥81॥
हे असो; आपल्या भोवती गरगर फिरतांना भोवंड आल्यावर ज्याप्रमाणे डोंगर वैगेरे फिरतातसे दिसते,
82-9
तेचि कल्पना सांडूनि पाही । तरि मी भूती भूते माझिया ठायी । हे स्वप्नीही परि नाही । कल्पावयाजोगे ॥82॥
त्याचप्रमाणे, आपल्या मनात कल्पना उत्पन्न झाल्यावर अखंड ब्रह्मस्वरूपात भूतांचा भास होतो. तीच कल्पना सोडून जर पाहीले, तर मी भूतांच्या ठिकाणी व भुते माझ्या ठिकाणी आहेत, अशी स्वप्नांत देखील कल्पना करण्यासारखी गोष्ट नाही.
83-9
आता मीच एक भूताते धर्ता । अथवा भूतामाजि मी असता । या संकल्पसन्निपाता । आंतुलिया बोलिया ॥83॥
आता, ‘ मीच एक भूतांचा धारण करणारा अथवा भूतांत असणारा’ ह्या सर्व गोष्टी संकल्परूप सन्निपात वायुच्या लहरीतील बडबडी आहेत.
84-9
म्हणोनि परियेसी गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्वासी विश्वात्मा । जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ॥84॥
म्हणून हे प्रियोत्तमा, ऐक की, अशा प्रकारे मी सृष्टीचा विश्वात्मा किंवा खोट्या सृष्टीचा आधार, ह्या कल्पना मिथ्या आहेत.
58-9
रश्मीचेनि आधारे जैसे । नव्ह तेचि मृगजळ आभासे । माझा ठायी भूतजात तैसे । आणि मातेही भावी ॥85॥
ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रखर किरणांनी, पाणी नसता मृगजलाचा भास होतो, त्याप्रमाणे, सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत व मीही त्यांमध्ये आहे, अशी कल्पना उत्पन्न होते.
86-9
मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु । जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥86॥
अशा प्रकारे, भूतांना उत्पन्न करणारा असुनही, सुर्य आणि त्याचे तेज ही ज्याप्रमाणे एकच आहेत, त्याप्रमाणे मी त्यापासून निराळा नाही.
87-9
हा आमचा ऐश्वर्ययोगु । तुवा देखिला की चांगु । आता सांगे काही एथ लागु । भूतभेदाचा असे ॥87॥
हा आमचा ऐश्वर्ययोग (अद्भूत कृत्य) तुला चांगला समजला ना ? तर आता सांग बरे, की मी व प्राणिमात्र यांच्यात काही तरी भेदाचा संबंध आहे काय ?
88-9
यालागी मजपासूनि भूते । आने नव्हती हे निरुते । आणि भूतावेगळिया माते । कहीच न मनी हो ॥88॥
याकरिता, माझ्याहून सर्व प्राणिमात्र खरोखर वेगळे नाहीत; आणि मीही त्यांच्यापासून वेगळा आहे असे कधी समजू नको.
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥9. 6॥
89-9
पै गगन जेवढे जैसे । पवनु गगनी तेवढाचि असे । सहजे हालविलिया वेगळा दिसे । एऱ्हवी गगन तेचि ते ॥89॥
आकाशाचा जेवढा विस्तार आहे, तेवढा वारा भरून राहीलेला आहे; परंतु तो सहज हालवला तर आकाशापासुन निराळा भासतो. येरव्ही आकाश तेच तो आहे;
90-9
तैसे भूतजात माझा ठायी । कल्पिजे तरी आभासे काही । निर्विकल्पी तरि नाही । तेथ मीच मी आघवे ॥90॥
त्याप्रमाणे, प्राणी माझ्या ठिकाणी आहेत अशी मनात कल्पना आली, म्हणजे थोडा भास होतो. तेच कल्पनेच्या अभावी पांहू गेले असता सर्वत्र मी एकच आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-9
म्हणऊनि नाही आणि असे । हे कल्पनेचेनि सौरसे । जे कल्पनालोपे भ्रंशे । आणि कल्पनेसवे होय ॥91॥
म्हणून भूतांचे नसणे आणि असणे हे कल्पनेच्या संबंधाने भासते; व जे कल्पना नाहींशी झाल्यावर भासत नाही आणि कल्पनेबरोबर भासते, .
92-9
तेचि कल्पिते मुदल जाये । तै असे नाही हे के आहे । म्हणऊनि पुढती तू पाहे । हा ऐश्वर्ययोगु ॥92॥
तेच कल्पना उत्पन्न करणारे अज्ञान समूळ नाहीसे झाल्यावर भूतांचे असणे व नसणे कोठून भासणार ? म्हणून यापुढे माझी अद्भूत कृति तुला सांगतो ती पहा
93-9.
ऐसिया प्रतीतिबोधसागरी । तू आपणपेयाते कल्लोळु एक करी । मग जव पाहासी चराचरी । तव तूचि आहासी ॥93॥
अशा ह्या अनुभवरूपी समुद्रांत तू स्वतः एक लाट बनून रहा; मग तू या चराचरांकडे पांहू लागलास, म्हणजे सर्वत्र तूंच भरला आहेस असे तुझ्या दृष्टीस पडेल ऐस
94-9
या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना म्हणती देवो । तरी आता द्वैतस्वप्न वावो । जाले की ना ॥94॥
देव म्हणाले :- अर्जुना ! हे जे मी तुला ज्ञान सांगितले त्याचा तुझ्या मनात काही प्रकाश पडला का ? तर आता तुला जे मी व विश्व ही दोन आहेत असे स्वप्न पडले होते, ते खोटे ठरले नाही का ?
95-9
तरी पुढती जरी विपाये । बुद्धीसि कल्पनेची झोप ये । तरी अभेदबोधु जाये । जै स्वप्नी पडिजे ॥95॥
परंतू पुढे कदाचित् तुझ्या बुद्धीला जर कल्पनारूपी झोप लागली, तर मी व जग ही एकच आहेत असा जो बोध, तो जगद्रूपी स्वप्न पडू लागल्यावर नाहीसा होईल;
96-9
म्हणोनि ये निद्रेची वाट मोडे । निखळ उद्बोधाचेचि आपणपे घडे । ऐसे वर्म जे आहे फुडे । ते दावो आता ॥96॥
म्हणून या कल्पनारूप निद्रेची वाट मोडून, शुद्ध असे जे ब्रह्मज्ञान ते आपोआप तुला प्राप्त होईल असे जे एक खरे तत्त्व आहे ते तुला आता दाखवून देतो.
97-9
तरी धनुर्धरा धैर्या । निके अवधान देई बा धनंजया । पै सर्व भूतांते माया । करि हरि गा ॥97॥
तर, हे धैर्यवान धनंजया, तू नीट लक्ष दे की, प्राणिमात्राची उत्पत्ति, स्थिति व लय यास एक मायाच कारण आहे.
सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् ।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥9. 7॥
98-9
जिये नांव गा प्रकृती । जे द्विविध सांगितली तुजप्रती । एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरुपा ॥98॥
त्या मायेला प्रकृति असे म्हणतात, व ती दोन प्रकारची आहे म्हणून तुला पूर्वी (अध्याय 7 श्लोक 4-5) सांगितलेंच आहे. पैकी एक आठ प्रकारच्या रूपाने भिन्न आहे व दुसरी जीवरूप अशी आहे.
99-9
हा प्रकृतीविखो आघवा । तुवा मागा परिसिलासे पांडवा । म्हणोनि असो काइ सांगावा । पुढतपुढती ॥99॥
हे पांडवा, हा प्रकृतीचा सर्व विषय तू पूर्वी ऐकलाच आहेस, म्हणून त्याजबद्दल पुनः पुनः सांगण्याचे कारण नाही.
100-9
तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाचां अंती । सर्व भूते अव्यक्ती । ऐक्यासी येती ॥100॥
तरी महाप्रलयाच्या शेवटी ही सर्व भूते माझ्या प्रकृतिरूप अव्यक्त स्वरूपात लय पावतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-9
ग्रीष्माचा अतिरसी । सबीजे तृणे जैसी । मागुती भूमीसी । सुलीने होती ॥101॥
ग्रीष्म ऋतूमध्ये कडक उन्हाच्या योगाने ज्याप्रमाणे गवत बीजासह जिरून जाते; किंवा वर्षाकालच्या मेघाचे अवडंबर संपल्यावर शरदऋतूचा अंकुर फुटतो,
102-9
का वार्षिये ढेंढे फिटे । जेव्हा शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हा घनजात आटे । गगनीचे गगनी ॥102॥
तेव्हा सर्व आकाशांतील ढग आकाशातच जिरून जातात; अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायु उत्पन्न होऊन नाहीसा होतो
103-9
नातरी आकाशाचिये खोपे । वायु निवांतुचि लोपे । का तरंगता हारपे । जळी जेवी ॥103॥
अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायु उत्पन्न होऊन नाहीसा होतो, किंवा पाण्यात उत्पन्न झालेल्या लाटा पाण्यातच नाहीतशा होतात,
104-9
अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनीचे मनी मावळे । तैसे प्राकृत प्रकृती मिळे । कल्पक्षयी ॥104॥
नाही तर जागे झाल्यावर मनातले स्वप्न मनातच मावळते, त्याप्रमाणे महाप्रलयाच्या शेवटी प्रकृतीपासून उत्पन्न झालेली सर्व भूते प्रकृतींतच मिळतात
105-9
मग कल्पादी पुढती । मीचि सृजी ऐसी वदंती । तरी इयेविषयी निरुती । उपपत्ती आइक ॥105॥
मग सृष्टीच्या आरंभी पुनः ती मीच निर्माण करितो अशी जी बोलवा आहे, ती विषयीची खरी खुबी तुला सांगतो, ती ऐक.
प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः ।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥9. 8॥
106-9
तरी हेचि प्रकृति किरिटी । मी स्वकीया सहजे अधिष्ठी । तेथ तंतुसमवायपटी । जेवि विणावणी दिसे ॥106॥
तर अर्जुना, ह्याच माझ्या प्रकृतीचा मी जेव्हा सहज अंगीकार करतो, तेव्हां, तंतूंच्या समुदायासंबंधाने ज्याप्रमाणे वस्त्रावर विणकर दिसते
107-9
मग तिये विणावणीचेनि आधारे । लहाना चौकडिया पटत्व भरे । तैसी पंचात्मके आकारे । प्रकृतिचि होये ॥107॥
मग त्या विणकरीच्या आधाराने जशी लहान चौकड्यांची वस्त्रे तयार होतात, त्याप्रमाणे, पंचभूतात्मक आकाराने प्रकृति सृष्टिरूपाने चमकूं लागते.
108-9
जैसे विरजणियाचेनि संगे । दूधचि आटेजो लागे । तैशी प्रकृति आंगा रिगे । सृष्टिपणाचिया ॥108॥
ज्याप्रमाणे विरजण घातल्याच्या योगाने दूध विरजू लागते त्याप्रमाणे, प्रकृति ही सृष्टीतील आकार बनूं लागते.
109-9
बीज जळाचि जवळीक लाहे । आणि तेचि शाखोपशाखी होये । तैसे मज करणे आहे । भूतांचे हे ॥109॥
ज्याप्रमाणे पाण्याच्या सान्निध्याने बीजाला फांद्या वैगेरे फुटून त्याचे झाड होते, त्याप्रमाणे प्राणिमात्रासंबंधी सृष्टीतील पसारा माझ्यामुळे होतो.
110-9
अगा नगर हे राये केले । या म्हणणया साचपण कीर आले । परि निरुते पाहता काय शिणले । रायाचे हात ॥110॥
अरे, एखादे शहर राजाने वसविले हे म्हणणे जरी खरे असले, तरी खरोखर पाहू गेले असता राजाच्या हाताला काही शीण पडतो का ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-9
आणि मी प्रकृति अधिष्ठी ते कैसे । जैसा स्वप्नी जो असे । मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥111॥
आणि मी प्रकृतीचा स्वीकार करतो तो कसा म्हणशील, तर जसा स्वप्नावस्थेंत असलेला मनुष्य जागृतावस्थेत येतो तसा
112-9
तरि स्वप्नौनि जागृती येता । काय पाय दुखती पंडुसुता । की स्वप्नामाजी असता । प्रवासु होय ॥112॥
हे पंडुसुता, स्वप्नावस्थेंतून जागृतावस्थेत येतांना त्या मनुष्याचे पाय दुखतात का ? किंवा स्वप्नावस्थेंत असतांना त्याला फिरण्याचे श्रम होतात का ?
113-9
या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हे भूतसृष्टीचे काही । मज एकही करणे नाही । ऐसाचि अर्थु ॥113॥
या सर्वाचा अभिप्राय काय म्हणशील, तर ही भूतसृष्टि निर्माण करण्याला मला काही एक करावे लागत नाही, हाच अर्थ आहे.
114-9
जैशी राये अधिष्ठिली प्रजा । व्यापारे आपुलालिया काजा । तैसा प्रकृतिसंगु माझा । येर करणे ते इयेचे ॥114॥
ज्याप्रमाणे राजाने आज्ञेत ठेवलेली प्रजा आपल्या प्राप्तीस्तव व्यापार करते, त्याप्रमाणे, प्रकृतीचा व माझा संबंध आहे. येरव्ही उत्पत्ति, स्थिती व लय हे सर्व व्यापार तिचेच आहेत.
115-9
पाहे पा पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्र भरते अपार दाटी । तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ॥115॥
हे पहा, पौर्णिमेच्या चंद्राची भेट होताच समुद्राला अपार भरती येते. पण अर्जुना येथे चंद्राला काही श्रम पडतात का ?
116-9
जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो का । कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा ॥116॥
लोखंड जड असूनही लोहचुंबक जवळ असल्याने जरी हालते, तरी लोहचुंबकाला लोखंड हालवण्याचे कोणते श्रम पडतात ?
117-9
किंबहुना यापरी । मी निजप्रकृति अंगीकारी । आणि भूतसृष्टी एकसरी । प्रसवोचि लागे ॥117॥
किंबहुना याप्रमाणे मी सृष्टि उत्पन्न होणाऱ्या इच्छेचा अंगीकार केल्यावर एकदम प्राणिमात्राचा विस्तार होऊ लागतो.
118-9
जो हा भूतग्रामु आघवा । असे प्रकृतिआधीन पांडवा । जैसी बीजाचिया वेलपालवा । समर्थ भूमि ॥118॥
पांडवा, हा सर्व प्राणिसमुदाय प्रकृतीच्या आधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाला वेली, पाने वैगेरे उत्पन्न करण्यास भूमि समर्थ आहे,
119-9
नातरि बाळादिका वयसा । गोसावी देहसंगु जैसा । अथवा घनावळी आकाशा । वार्षिये जेवी ॥119॥
अथवा बाळपण, तारुण्य व वृद्धपण या अवस्थाना ज्याप्रमाणे देहसंग हे मुख्य कारण आहे, किंवा आकाशांत मेघपंक्ति उत्पन्न होण्यास जसा वर्षाकाल कारण आहे,
120-9
का स्वप्नासि कारण निद्रा । तैसी प्रकृति हे नरेंद्रा । या अशेषाहि भूतसमुद्रा । गोसाविणी गा ॥120॥
किंवा स्वप्नाला जशी निद्रा कारण आहे, त्याचप्रमाणे हे नरेंद्रा, या सर्व प्राणिसमुदायाला प्रकृति मुख्य कारण होय.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-9
स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा । हे असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ ॥121॥
स्थावरजंगमाला, स्थुलसूक्ष्माला, फार काय सांगावे ? या जगाला प्रकृतिच मूळ कारण होय.
122-9
म्हणोनि भूते हन सृजावी । का सृजिली प्रतिपाळावी । इये करणी न येती आघवी । आमुचिया आंगा ॥122॥
म्हणून, प्राणी उत्पन्न करावे किंवा उत्पन्न झालेल्यांचा प्रतिपाळ करावा, या सर्व कृतीचे कर्तुत्व मजकडे येत नाही.
123-9
जळी चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रे नाही वाढविली । तेवि माते पावोनि ठेली । दुरी कर्मे ॥123॥
पाण्यात चंद्राला प्रकाश वेल पसरल्याप्रमाणे दिसतो, त्याची उत्पत्ति चंद्राने केली नाही, त्याप्रमाणे, ही कर्मे मजपासून उत्पन्न झालेली असुनही मजपासून दुरच असतात.
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥9. 9॥
124-9
आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरु सैंधवाचा घाटु । तेवि सकळ कर्मा मीच शेवटु । ती काइ बांधती माते ॥124॥
ज्याप्रमाणे, समुद्राच्या पाण्याचा लोट वाहू लागल्यावर त्याला मिठाचा बांध आडवू शकत नाही, त्याप्रमाणे, माझ्यात लय पावणारी सर्व कर्मे मला कशी बांधू शकतील ?
125-9
धूम्ररजांची पिंजरी । वाजतिया वायुते जरी होकारी । का सूर्यबिंबामाझारी । आंधारे रिगे ॥125॥
धूराचे छत जर वाहणाऱ्या वायुस हाक मारुन अडथळा करील, किंवा सुर्यकिरणात अंधार शिरेल, फार काय सांगावे ?
126-9
हे असो पर्वताचिये हृदयीचे । जेवि पर्जन्यधारास्तव न खोंचे । तेवि कर्मजात प्रकृतीचे । न लगे मज ॥126॥
ज्याप्रमाणे पर्वताच्या पोटांतील द्रव्यांना पर्जन्याच्या अतिवृष्टीनेही काही बाधा होत नाही, त्याप्रमाणे, प्रकृतीच्या कर्मापासून मला काही एक बाधा होत नाही.
127-9
एऱ्हवी इये प्राकृती विकारी । एकु मीचि आहे अवधारी । परि उदासीनाचिया परि । करी ना करवी ॥127॥
त्याप्रमाणे, प्रकृतीच्या कर्मापासून मला काही एक बाधा होत नाही. एरव्ही त्या प्रकृतीच्या कार्याला एक कारण आहे असे समज; परंतु उदासीनाप्रमाणे मी काही करीत नाही.
128-9
दीपु ठेविला परिवरी । कवणाते नियमी ना निवारी । आणि कवण कवणिये व्यापारी । राहाटे तेहि नेणे ॥128॥
ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा अमुक कर किंवा करू नको असे कोणाला सांगत नाही, आणि कोण काय व्यापार करतो हेही जाणत नाही
129-9
तो जैसा का साक्षिभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु । तैसा भूतकर्मी अनासक्तु । मी भूती असे ॥129॥
तो साक्षिभूत असून गृहकृत्यांची प्रवृत्ति होण्यास कारणीभूत होतो त्याप्रमाणे, सृष्टीची उत्पत्ति, स्थिति व लय या कर्मात मी उदासीन असून भूतांच्या ठिकाणी आहे.
130-9
हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती । काय सांगो बहुता उपपत्ती । येथ एकवेळा सुभद्रापती । येतुले जाण पा ॥130॥
हा एकच अभिप्राय खरा आहे. पुनः पुनः पुष्कळ पर्यायांनी काय सांगू ? तर हे सुभद्रापति, एकदां एवढे लक्षात ठेव.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम् ।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥9. 10॥
131-9
जे लोकचेष्टा समस्ता । जैसा निमित्तमात्र का सविता । तैसा जगत्प्रभवी पंडुसुता । हेतु मी जाणे ॥131॥
अर्जुना, सर्व सृष्टीतील लोकांच्या व्यापारास ज्याप्रमाणे सूर्य कारणीभूत आहे, त्याप्रमाणे, जगाच्या उत्पत्तीला मी कारण आहे असे जाण.
132-9
का जे मिया अधिष्ठिलिया प्रकृती । होती चराचराचिया संभूती । म्हणोनि मी हेतु हे उपपत्ती । घडे यया ॥132॥
का कीं, मायेचा अंगीकार मी केला आहे, व तिच्या योगाने प्राणिमात्राची उत्पत्ति होते. म्हणून या जगाच्या उत्पत्तीचे कारण मी अशी लोकांची समजूत आहे.
133-9
आता येणे उजिवडे निरुते । न्याहाळी पा ऐश्वर्ययोगाते । जे माझा ठायी भूते । परी भूती मी नसे ॥133॥
तेव्हा माझ्यापासून भूतांची उत्पत्ति जरी होते, तरी भूतांत मी नाही, ही माझी अद्भूत करणी या ज्ञानाच्या उजेडाने नीट न्याहाळून पहा.
134-9
अथवा भूते ना माझा ठायी । आणि भूतांमाजि मी नाही । या खुणा तु कही । चुको नको ॥134॥
अथवा प्राणी माझ्या ठिकाणी नाहीत व मी त्यांच्या ठिकाणी नाही हे वर्म तू कधी विसरू नकोस.
135-9
हे सर्वस्व आमुचे गूढ । परि दाविले तुज उघड । आता इंद्रिया देऊनि कवाड । हृदयी भोगी ॥135॥
हे माझे मुख्य वर्म असुनही तुला उघड करुन दाखविले आहे. तर आता तू आपल्या इंद्रियांची दारे बंद करून त्यांना कळू न देता आपल्या ह्रदयात याचा उपभोग घे.
136-9
हा दंशु जव नये हाता । तव माझे साचोकारेपण पार्था । न संपडे गा सर्वथा । जेवि भुसी कणु ॥136॥
पार्था, हे वेदांतसिद्धांतांचे वर्म जोपर्यत हाती लागले नाही, तोपर्यंत माझे खरे स्वरूप कधीही कळणार नाही. ज्याप्रमाणे कोड्यात शोधूं लागले असता दाण्याचा एक कण सुद्दा सांपडत नाही.
137-9
एऱ्हवी अनुमानाचेनि पैसे । आवडे कीर कळले ऐसे । परि मृगजळाचेनि वोलांशे । काय भूमि तिमे ॥137॥
एरव्ही, अनुमानाच्या साह्याने माझे खरे स्वरूप कळले असे वाटते. पण मृगजलाच्या ओलाव्याने जमीन कधी भिजली आहे का ?
138-9
जे जाळ जळी पांगिले । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडले । परि थडिये काढूनि झाडिले । तेव्हा बिंब के सांगे ॥138॥
माशाला धरण्याकरिंता जे जाळे पसरतात त्यात चंद्राचे बिंब सापडल्यासारखे दिसते, परंतु ते जाळे नदीच्या कांठावर काढून झाडल्यावर चंद्रबिंब कोठे असते का सांग बरे ?
139-9
तैसे बोलवरि वाचाबळे । वायाचि झकविजती प्रतीतीचे डोळे । मग साचोकारे बोधावेळे । आथि ना होईजे ॥139॥
त्याचप्रमाणे ‘ आम्हाला अनुभव आला ‘ असे शब्दाच्या व वाणीच्या योगाने कितीएक लोक वरकरणी दाखवितात; पण मग खऱ्या बोधाच्या परिक्षेची वेळ आली म्हणजे त्या वेळेस खरोखर त्यांना ज्ञान झालेले नाही (असे अनुभवास येते), व दुसऱ्यास ते करूनही देता येत नाही.
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ 9-11 ॥
संदर्भित अन्वयार्थ
मम = माझा, परम् = परम, भावम् = भाव, अजानन्तः = न जाणणारे, मूढाः = मूढ लोक हे, मानुषीम् = मनुष्याचे, तनुम् = शरीर, आश्रितम् = धारण करणाऱ्या, माम् = मज, भूतमहेश्वरम् = संपूर्ण भूतांचा महान ईश्वर असणाऱ्याला, अवजानन्ति = तुच्छ समजतात (म्हणजे आपल्या योगमायेने संसाराच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात संचार करणाऱ्या मज परमेश्वराला साधारण मनुष्य समजतात) ॥ 9-11 ॥
अर्थ
माझ्या परम भावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्यशरीर धारण करणाऱ्या मला-सर्व भूतांच्या महान ईश्वराला-तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. ॥ 9-11 ॥
140-9
किंबहुना भवा बिहा या । आणि साचे चाड आथि जरी मिया । तरि तुम्ही गा उपपत्ती इया । जतन कीजे ॥140॥
किंबहुना या संसाराला भिऊन माझ्या प्राप्तीची जर खरी इच्छा असली तर तुला हे जे मी वर्म सांगितले, ते आपल्या लक्षात पूर्ण वागीव.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-9
एऱ्हवी वेधली दिठी कवळे । ते चांदणियाते म्हणे पिवळे । तेवि माझा स्वरुपी निर्मळे । देखाल दोष ॥141॥
एरवी, काविळीच्या योगाने दृष्टी ग्रासल्यावर तो मनुष्य चांदण्याला पिवळे म्हणतो, त्याप्रमाणे, निर्दोष असे जे माझे शुद्ध स्वरूप, त्या स्वरूपावर त्याला दोष दिसतात.
142-9
नातरी ज्वरे विटाळले मुख । ते दुधाते म्हणे कडू विख । तेवि अमानुषा मानुष । मानाल माते ॥142॥
किंवा तापाने कडू तोंड झाल्यावर त्याला ज्याप्रमाणे दूध विषासारखे कडू लागते, त्याचप्रमाणे मी मनुष्य नसूनही मनुष्य आहे असे ते मला मानतात.
143-9
म्हणऊनि पुढती तू धनंजया । झणे विसंबसी या अभिप्राया । जे इया स्थूलदृष्टी वाया । जाइजेल गा ॥143॥
म्हणून, हे धनंजया, वारंवार या अभिप्रायाला विसरू नको. जर नुसत्या स्थुल दृष्टीने पाहू लागलास, तर तुझे पाहणे व्यर्थ होईल.
144-9
पै स्थूलदृष्टी देखती माते । तेचि न देखणे जाण निरुते । जैसे स्वप्नीचेनि अमृते । अमरा नोहिजे ॥144॥
ज्याप्रमाणे स्वप्नांतील अमृताने कोणी अमर होत नाही, त्याप्रमाणे जे मला स्थूल दृष्टीने पाहतात, ते खरोखर मला पहात नाहीत.
145-9
एऱ्हवी स्थूलदृष्टी मूढ । माते जाणती कीर दृढ । परि ते जाणणेचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥145॥
एरवी अज्ञानी लोक स्थूल दृष्टीने मला जाणले असे म्हणतात, परंतु त्यांचा समज त्यांच्या खऱ्या समजाच्या आड येतो.
146-9
जैसा नक्षत्राचिया आभासा- । साठी घातु झाला तया हंसा । माजी रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनिया ॥146॥
ज्याप्रमाणे नक्षत्राचे प्रतिबिंब पाण्यात पाहून ते मोतीच आहे असे समजून ते प्राप्त करून घेण्याकरीता हंस पक्षी आकाशातून उडी टाकून प्राणास मुकतो;
147-9
सांगे गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचे कवण फळ । काय सुरतरु म्हणोनि बाबुळ । सेविली करी ॥147॥
गंगा आहे असे समजून मृगजळाजवळ जर कोणी गेला, तर त्याला त्या ठिकाणी काय प्राप्त होईल सांग बरे ? त्याचप्रमाणे, कल्पवृक्ष समजून बाभूळ हाती धरल्यावर त्याचा काय उपयोग होणार ?
148-9
हा निळयाचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । का रत्ने म्हणोनि गारा । वेची जेवि ॥148॥
नीलमण्याचा दोन सरांचा हार समजून जर कवड्या सर्पाला हाती धरले; किंवा रत्न समजून गारा वेचून घेतल्या,
149-9
अथवा निधान हे प्रगटले । म्हणोनि खदिरांगार खोळे भरिले । का साउली नेणता घातले । कुहा सिंहे ॥149॥
अथवा द्रव्याचा ठेवा जमिनीतून वर येऊन उजेड पडला आहे असे समजून खैराचे निखारे पदरांत घेतले, अथवा आपलीच पडछाया पाण्यात पाडली आहे असे न जाणता सिंह विहीरीत उडी टाकून ज्याप्रमाणे प्राणास मुकला,
150-9
तेवि मी म्हणोनि प्रपंची । जिही बुडी दिधली कृतनिश्चयाची । तिही चंद्रासाठी जेवि जळीची । प्रतिमा धरिली ॥150॥
त्याप्रमाणे, प्रपंचात मी खास आहे, अशा कृतनिश्चयाने जे प्रपंचातच गुंग होतात, ते चंद्राच्या ऐवजी त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब धरण्याकरिंता प्रयत्न करणाऱ्याप्रमाणे फसतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
151-9
तैसा कृतनिश्चय वाया गेला । जैसा कोण्ही एकु कांजी प्याला । मग परिणाम पाहो लागला । अमृताचा ॥151॥
त्याचप्रमाणे संसारात मी आहे असा जो त्यांचा कृतनिश्चय, तो वाया जातो. असा कोणी एखादा कांजी पिऊन अमृतापासून होणाऱ्या सुखाचा लाभ इच्छितो,
152-9
तैसे स्थूलाकारी नाशिवंते । भरवसा बांधोनि चित्ते । पाहती मज अविनाशाते । तरी कैचा दिसे ॥152॥
त्याप्रमाणे, अंतःकरणपूर्वक भरंवशाने नाशवंत अशा देहाचे ठिकाणी अविनाशी अशा मला पाहतात, तर मी त्यांना कसा दिसेन ?
153-9
काइ पश्चिमसमुद्राचिया तटा । निघिजत आहे पूर्विलिया वाटा । का कोंडा कांडता सुभटा । कणु आतुडे ॥153॥
हे पहा कोणी पश्चिमसमुद्राकडे जाण्याचा हेतूने पूर्वसमुद्राच्या वाटेला जाऊ लागला, तर त्याला पश्चिमसमुद्र प्राप्त होईल का ? किंवा हे महाविरा, कोंडा कांडू लागले असता त्यात धान्य प्राप्त होईल का ?
154-9
तैसे विकारले हे स्थूळ । जाणितलेया मी जाणवतसे केवळ । काइ फेण पिता जळ । सेविले होय ॥154॥
त्याचप्रमाणे, हे विस्तार पावलेले जग जाणल्याने निर्दोष अशा मला जाणता येईल का ? फेस प्याल्याने पाणी प्याल्याप्रमाणे होते का
155-9
म्हणोनि मोहिलेनि मनोधर्मे । हेचि मी मानूनि संभ्रमे । मग येथिची जिये जन्मकर्मे । तिये मजचि म्हणती ॥155॥
म्हणून मायामोहीत मनोवृत्तीने संसारांतच मी आहे असे भ्रांतीने मानून तेथील जन्ममरणादि सर्व स्थिति मलाही आहेत असे समजतात.
156-9
येतुलेनि अनामा नाम । मज अक्रियासि कर्म । विदेहासि देहधर्म । आरोपिती ॥156॥
याप्रमाणे नामरहित, क्रियारहित व देहरहित असा जो मी, त्या मला नामधारी, कर्मकारी व देहधर्मानी युक्त असणारा असे समजतात,
157-9
मज आकारशून्या आकारु । निरुपाधिका उपचारु । मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक ॥157॥
मला निराकाराला आकार, निरुपाधिकाला उपचार, कर्तव्यरहिताला व्यवहार,
158-9
मज वर्णहीना वर्णु । गुणातीतासि गुणु । मज अचरणा चरणु । अपाणिया पाणी ॥158॥
मला जातिरहिताला जात, गुणातीताला गुण, चरणहिताला चरण, हस्तरहिताला हस्त,
159-9
मज अमेया मान । सर्वगतासी स्थान । जैसे सेजेमाजी वन । निदेला देखे 159॥
मज परिमाणातीताला परिमाण, सर्वव्यापकाला ठिकाण; ज्याप्रमाणे अंथरुणात निजलेला वनाची शोभा स्वप्नांत पाहतो.
160-9
तैसे अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र । अगोत्रा गोत्र । अरुपा रुप ॥160॥
त्याप्रमाणे कर्णरहिताला कान, नेत्ररहिताला नेत्र, गोत्ररहीताला गोत्र, निराकाराला रूप,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-9
मज अव्यक्तासि व्यक्ती । अनार्तासी आर्ती । स्वयंतृप्ता तृप्ती । भाविती गा ॥161॥
अव्यक्त असा जो मी त्या मला व्यक्ती, निरिच्छास इच्छा व जो मी स्वयमेव तृप्त आहे, त्यास तृप्ति अशा कल्पना करतात.
162-9
मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण । मज सकळकारणा कारण । देखती ते ॥162॥
मी वस्त्ररहित म्हणजे सर्व जगाला पांघरूण घालणारा, त्या मला पांघरूण घालतात; भूषणातीत म्हणजे निराकार असा जो मी, त्या मला दागिने घालतात;
163-9
मज सहजाते करिती । स्वंयभाते प्रतिष्ठिती । निरंतराते आव्हानिती । विसर्जिती गा ॥163॥
मी सर्व जगाला उत्पन्न करणारा असून मला दुसऱ्यांनी उत्पन्न केला आहे असे मानतात; मी स्वयमेव असून माझ्या मूर्ति करतात; मी स्वतःसिद्ध असून माझी प्राणप्रतिष्ठा करतात, व ओतप्रोत भरलेला असून माझे आव्हानविसर्जन करतात.
164-9
मी सर्वदा स्वतःसिद्धु । तो की बाळ तरुण वृद्धु । मज एकरुपा संबंधु । जाणती ऐसे ॥164॥
मी नेहमी स्वयमेव व निराकार असून मला बाल्य, तारुण्य व वार्धक्य अशा अवस्था आहेत असे मानतात.
156-9
मज अद्वैतासि दुजे । मज अकर्तायासि काजे । मी अभोक्ता की भुंजे । ऐसे म्हणती ॥165॥
मी अद्वैत असून माझ्या ठिकाणी द्वैत मानतात; मी काहीएक न करणारा असून कर्मे करतो व काही न खाणारा असून खातो, असे म्हणतात;
166-9
मज अकुळाचे कुळ वानिती । मज नित्याचेनि निधने शिणती । मज सर्वातराते कल्पिती । अरि मित्र गा ॥166॥
मला कुळगोत नसून माझ्या कुळाचे वर्णन करतात, मी नित्य असून मी मरतो असे मानून माझ्या मरणाने शोक करतात; तसेच मी सर्वाच्या अंतर्यामी राहणारा असून अमक्याचा शत्रु व अमक्याचा मित्र अशी माझ्या ठिकाणी कल्पना करतात.
167-9
मी स्वानंदाभिरामु । तया मज अनेका सुखांचा कामु । अवघाची मी असे समु । की म्हणती एकदेशी ॥167॥
मी निजानंदांत निमग्न असणारा, त्या मला इतर सुखांची इच्छा करणारा असे मानतात, व सर्व ठिकाणी माझी समदृष्टि असुन मला एकदेशी म्हणजे एका स्थळी राहणारा म्हणतात.
168-9
मी आत्मा एक चराचरी । म्हणती एकाचा कैपक्ष करी । आणि कोपोनि एकाते मारी । हेचि वाढविती ॥168॥
मी सर्व स्थावरजंगमांचा आत्मा असून एकाचा कैवारी व एकावर रागावून त्यास मारणारा अशी माझी सर्वत्र प्रसिद्धि करतात.
169-9
किंबहुना ऐसे समस्त । जे हे मनुष्यधर्म प्राकृत । तयाचि नांव मी ऐसे विपरीत । ज्ञान तयांचे ॥169॥
किंबहुना जे जे मनुष्यधर्म, ते ते सर्व मला लागू आहेत असे त्यांचे विपरीत ज्ञान असते.
170-9
जव आकारु एक पुढा देखती । तव हा देव येणे भावे भजती । मग तोचि बिघडलिया टाकिती । नाही म्हणोनि ॥170॥
ज्या वेळेस ते दृष्टीसमोर एखादी मूर्ति पाहतात, त्या वेळेस ती देवच आहे या भावाने तिला भजतात; ; मग तीच भंगल्यावर तिच्यातील देवपण नाहीसे झाले असे मानून तिचा त्याग करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-9
माते येणे येणे प्रकारे । जाणती मनुष्य ऐसेनि आकारे । म्हणऊनि ज्ञानचि ते आंधारे । ज्ञानासि करी ॥171॥
अशा प्रकाराने मी मनुष्याचा देह धारण करणारा आहे असे समजतात, म्हणून त्यांचे हे ज्ञानच खऱ्या ज्ञानाच्या आड येते.
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतस: ।
राक्षसीमासुरी चैव प्रकृतिं मोहिनी श्रिता: ॥9. 12॥
172-9
यालागी जन्मलेचि ते मोघ । जैसे वार्षियेवीण मेघ । का मृगजळाचे तरंग । दुरुनीचि पाहावे ॥172॥
सारांश, ज्याची मजविषयी अशा प्रकारची समजूत असते, त्यांचा जन्म व्यर्थच होय. ज्याप्रमाणे, पर्जन्यकालावाचून मेघ व्यर्थ आहेत किंवा मृगजलाच्या लाटा जशा दुरूनच पाहण्यास योग्य होत,
173-9
अथवा कोल्हेरीचे असिवार । नातरी वोडंबरीचे अळंकार । की गंधर्वनगरीचे आवार । आभासती का ॥173॥
अथवा मातीच्या चित्रांतले घोडेस्वार, कपटविद्येचे अलंकार किंवा संध्याकाळी ढगांत दृष्टीस पडणाऱ्या गावाचे कुसू भासते,
174-9
सांवरी वाढिन्नल्या सरळा । वरि फळ ना आंतु पोकळा । का स्तन जाले गळा । शेळिये जैसे ॥174॥
शेर जरी सरळ वाढला तरी तो जसा आत पोकळ असून वर फलही येत नाही, किंवा शेळीच्या गळ्याला उत्पन्न झालेल्या स्तनांतून जसे दूध निघत नाही,
175-9
तैसे मूर्खाचे तया जियाले । आणि धिक् कर्म तयांचे निपजले । जैसे सांवरी फळ आले । घेपे ना दीजे ॥175॥
किंवा सांवरीच्या झाडाला फळ झाले असता ते जसे कोणाला घेता किंवा देता येत नाही, त्याप्रमाणे त्या मूर्खांचे जिणे होय, आणि त्यांच्या कार्यालाही धिक्कार असो!
176-9
मग जे काही ते पढिन्नले । ते मर्कटे नारळ तोडिले । का आंधळ्या हाती पडिले । मोती जैसे ॥176॥
मग त्या मूर्खांनी जे काही शास्त्राध्ययन केले असेल, ते म्हणजे माकडाने नारळ तोडल्याप्रमाणे किंवा अंधळ्याला मोती सांपडावे त्याप्रमाणे होय.
177-9
किंबहुना तयांची शास्त्रे । जैशी कुमारी हाती दिधली शस्त्रे । का अशौच्या मंत्रे । बीजे कथिली ॥177॥
किंबहुना त्यांनी म्हटलेली ती शास्त्रे लहान मुलीच्या हातात दिलेल्या शस्त्राप्रमाणे, अथवा अशुचिर्भूताला बीजांसह शिकवलेल्या मंत्राप्रमाणे निरर्थक होत.
178-9
तैसे ज्ञानजात तया । आणि जे काही आचरले गा धनंजया । ते आघवेचि गेले वाया । जे चित्तहीन ॥178॥
धनंजया, त्याचप्रमाणे, ज्यांचे चित्त स्वाधीन नाही, त्यांचे सर्व ज्ञान व आचरण ही व्यर्थ होत.
179-9
पै तमोगुणाची राक्षसी । जे सद्बुद्धीते ग्रासी । विवेकाचा ठावोचि पुसी । निशाचरी ॥179॥
याप्रमाणे तमोगुणरूप राक्षसी सद्बुद्धीला ग्रासून ज्ञानाचा ठाव-ठिकाण नाहीसा करणारी आहे. .
180-9
तिये प्रकृती वरपडे जाले । म्हणऊनि चिंतेचेनि कपोले गेले । वरि तामसीयेचिये पडिले । मुखामाजी ॥180॥
त्या प्रकृतीने जे ग्रस्त होतात, ते सदोदित चिंताक्रांत असून शिवाय तामस प्रकृतीच्या आयतेच घशात उतरतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-9
जेथ आशेचिये लाळे । आंतु हिंसा जीभ लोळे । तेवीचि संतोषाचे चाकळे । अखंड चघळी ॥181॥
जी राक्षसी प्रकृति आशारूप लाळेत हिंसारूप जीभ लोळवून असंतोषरूप मांसाचे गोळे निरंतर चघळते;
182-9
जे अनर्थाचे कानवेरी । आवाळुवे चाटीत निघे बाहेरी । जे प्रमादपर्वतीचि दरी । सदाचि मातली ॥182॥
जी अनर्थरूप कानापर्यंत ओठ चाटीत बाहेर निघते; जी प्रमादरूपी म्हणजे भूलरूपी पर्वताची मोठी माजलेली दरी आहे;
183-9
जेथ द्वेषाचिया दाढा । खसखसा ज्ञानाचा करिती रगडा । जेअगस्ती गवसणी मूढा । स्थूलबुद्धी ॥183॥
जिच्या द्वेषरूप दाढा खसखसा चावून ज्ञानाचा चुराडा करतात, व जी अगस्ति ऋषीला असलेल्या कुंभाच्या आवरणाप्रमाणे स्थूलबुद्धि लोकांना आसुरी मायेची गवसणी आहे;
184-9
ऐसे आसुरिये प्रकृतीचा तोंडी । जे जाले गा भूतोंडी । ते बुडोनि गेले कुंडी । व्यामोहाचा ॥184॥
अशा प्रकारच्या त्या आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे बळी होऊन पडतात, ते भ्रांतिरूप कुंडांत बुडून जातात.
185-9
एवं तमाचिये पडिले गर्ते । न पविजतीचि विचाराचेनि हाते । हे असो ते गेले जेथे । ते शुद्धीचि नाही ॥185॥
याप्रमाणे जे अज्ञानाच्या खळग्यात पडतात, ते विचाररूपी हाताला सांपडत नाहीत; इतकेच नव्हें, तर ते कोठे जातात त्याचा देखील पत्ता लागत नाही.
186-9
म्हणोनि असोतु इये वायाणी । कायशी मूर्खाची बोलणी । वाया वाढविता वाणी । शिणेल हन ॥186॥
म्हणून ही निष्फल कथा राहू दे. कारण, मूर्खांचे व्यर्थ वर्णन केले असता वाणीला शीण मात्र होईल.
187-9
ऐसे बोलिले देवे । तेथ जी म्हणितले पांडवे । आइके जेथ वाचा विसवे । ते साधुकथा ॥187॥
असे श्रीकृष्ण बोलल्यावर अर्जुन ‘ हो हो !’ असे म्हणाला. नंतर भगवान फिरून म्हणतात :- जिचे वर्णन केले असता सुख होते, ती साधूंची कथा ऐक
महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिता: ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥9. 13॥
188-9
तरी जयाचिये चोखटे मानसी । मी होऊनि असे क्षेत्रसंन्यासी । जया निजेलियाते उपासी । वैराग्य गा 188॥
ज्या साधूंच्या निर्मळ अंतकरणात मी क्षेत्रसंन्यासी होऊन वास करितो; व जे निजले असतांही वैराग्य हे ज्यांची सेवा करिते, म्हणून ज्यांना स्वप्नांत सुद्धां विषयवासना होत नाही;
189-9
जयाचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्म करि राणिवा । जयांचे मन ओलावा । विवेकासी ॥189॥
ज्यांच्या सद्वासनेत धर्म राज्य करतो, (ज्यांना अधर्माची इच्छा सुद्धां होत नाही) व ज्यांचे मन नेहमी सद्विचाराला पुष्टि देते;
190-9
जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले । जे शांतीसि आले । पालव नवे ॥190॥
जे ज्ञानरूप गंगेत स्नान करुन अंतर्बाह्य शुद्ध झाले, पूर्णब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीने तृप्त झाले, व शांतीला नवीन पालवी फुटल्याप्रमाणे शांत झाले,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-9
जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ । जे आंनदसमुद्री कुंभ । चुबकळोनि भरिले ॥191॥
जे ब्रह्माच्या रूपांतराला कोंब निघाल्याप्रमाणे आहेत, व जे धैर्यरूप मंडलाचे खांबच होत; त्याचप्रमाणे, जे आनंदसमुद्रांत बुडवून काढलेल्या कुंभाप्रमाणे ओतप्रोत भरलेले असून,
192-9
जया भक्तीची येतुली प्राप्ती । जे कैवल्याते परौते सर म्हणती । जयांचिये लीलेमाजी नीति । जियाली दिसे ॥192॥
ज्यांना भक्तीची इतकी योग्यता वाटते की, ते मोक्षालाही मागे सर असे म्हणतात, व ज्यांच्या सहज लीलेंत नीति जागृत दिसते,
193-9
जे आघवाचि करणी । लेइले शांतीची लेणी । जयांचे चित्त गवसणी । व्यापका मज ॥193॥
ज्यांनी आपल्या सर्व अवयवांत शांतिरूप अलंकार घातले आहेत (ज्यांच्या इंद्रियांची विषयावर कधीही वासना जात नाही), व ज्यांनी आपल्या चित्ताची मज सर्वव्यापकाला गवसणी केली आहे;
194-9
ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचे दैव । जे जाणोनिया सर्व । स्वरुप माझे ॥194॥
असे जे महात्मे, ते भगवद्भक्तीला अनुकूल असणाऱ्या सात्त्विक प्रकृतीचे भाग्यच होत. ते माझ्या सर्व स्वरूपाला जाणतात
195-9
मग वाढतेनि प्रेमे । माते भजती जे महात्मे । परि दुजेपण मनोधर्मे । शिवतले नाही ॥195॥
आणि मग वाढत्या प्रेमाने ते महात्मे मला भजतात पण त्यांच्या मनोधर्माने द्वैताला स्पर्श सुद्धा केलेला नसतो.
196-9
ऐसे मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा । परि नवलावो तो सांगावा । असे आइक ॥196॥
अर्जुना, अशा प्रकारे जे मद्रूप होऊन माझी सेवा करतात, त्यांच्या सेवेची आश्चर्यकारक गोष्ट सांगावयाची राहिली आहे ती ऐक.
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता:॥
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥9. 14॥
197-9
तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे । जे नामचि नाही पापाचे । ऐसे केले ॥197॥
तरी हरिकीर्तनाच्या प्रेमाने ते नाचतात, त्यामुळे प्रायश्चित्ताचे सर्व व्यापार नाश पावले आहेत, व त्या किर्तनाने पापाचे नाव देखील राहू दिले नाही.
198-9
यमदमा अवकळा आणिली । तीर्थे ठायावरुनि उठविली । यमलोकी खुंटिली । राहाटी आघवी ॥198॥
यम म्हणजे मनोनिग्रह व दम म्हणजे इंद्रियनिग्रह यांना निकृष्ट दशा आणिली, तीर्थे आपापल्या जाग्यांवरून उठवून लावली, व यमलोकचे सर्व व्यापार बंद पाडले!
199-9
यमु म्हणे काय यमावे । दमु म्हणे कवणाते दमावे । तीर्थे म्हणती काय खावे । दोष ओखदासि नाही ॥199॥
यम म्हणू लागला की; कोणाचे नियमन करावे ? दम म्हणाला कोणाला जिंकावे ? व तीर्थे म्हणू लागली, ” आम्ही कशाचे क्षालन करावे ? कारण दोष औषधासही उरले नाहीत! “
200-9
ऐसे माझेनि नामघोषे । नाही करिती विश्वाची दुःखे । अवघे जगचि महासुखे । दुमदुमित भरले ॥200॥
याप्रमाणे माझ्या नामघोषाने जगांतील सर्व प्राण्यांची दुःखे नाहीतशी होतात, व सर्व जग ब्रह्मसुखाने दुमदुमून जाते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
201-9
ते पाहाटेवीण पाहावित । अमृतेवीण जीववित । योगेवीण दावित । कैवल्य डोळा ॥201॥
ते साधू पहांट झाल्याशिवाय जीवांना प्रकाश म्हणजे आत्मज्ञान करून देतात; अमृताशिवाय प्राण्यांच्या जीवाचे रक्षण करतात; व योगसाधनाशिवाय धडधडीत डोळ्यांसमोर मोक्ष दाखवितात.
202-9
परि राया रंका पाड धरु । नेणती सानेया थोरा कडसणी करु । एकसरे आंनदाचे आवारु । होत जगा ॥202॥
परंतु राजात व रंकात अंतर मानीत नाहीत, व लहान थोर जाणीत नाहीत. याप्रमाणे जगाला सरसकट आनंदाचे माहेरघर होतात.
203-9
कही एकाधेनि वैकुंठा जावे । ते तिही वैकुंठचि केले आघवे । ऐसे नामघोषगौरवे । धवळले विश्व ॥203॥
वैकुंठास जाणारा क्वचितच आढळतो; परंतु ह्या साधूंनी सर्व जगच वैकुंठ केले. अशा माझ्या नामभजनाच्या योग्यतेने सर्व जग पवित्र केले.
204-9
तेजे सूर्य तैसे सोज्वळ । परि तोहि अस्तवे हे किडाळ । चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते ॥204॥
त्या साधूंचे तेज सूर्याप्रमाणे निर्मल आहे. परंतु त्या सूर्यातही तो अस्तास जातो हा दोष आहे, चंद्रासारखे म्हणावे, तर तो एखादे वेळेसच पूर्ण असतो.
205-6
मेघ उदार परि वोसरे । म्हणऊनि उपमेसी न पुरे । हे निःशंकपणे सपांखरे । पंचानन ॥205॥
परंतु हे साधू नेहमी पूर्णत्वास पावलेले आहेत. यांचे औदार्य मेघाप्रमाणे म्हणावे, तर तो ओसरतो; म्हणून उपमा देण्यास योग्य होत नाही. तर हे साधू निःशंकपणे पंख असणाऱ्या सिंहाप्रमाणे होत.
206-9
जयांचे वाचेपुढा भोजे । नाम नाचत असे माझे । जे जन्मसहस्त्री वोळगिजे । एकवेळ मुखासि यावया ॥206॥
ज्या माझ्या नांवाचा मुखाने एकदा उच्चार होण्याकरिंता सहस्त्र जन्म माझी सेवा करावी लागते, ते माझे नांव ज्यांच्या वाचेपुढे कौतुकाने नाचत असते, (ज्या माझ्या नांवाचा असा महिमा आहे, )
207-9
तो मी वैकुंठी नसे । एक वेळ भानुबिंबीही न दिसे । वरी योगियांचीही मानसे । उमरडोनि जाय ॥207॥
तो मी वैकुंठलोकीही नसतो, एखादे वेळी सूर्यमंडळातही दिसत नाही; इतकेच नव्हे तर, योग्यांच्याही मनाचे उल्लंघन करून जातो,
208-9
परि तयापाशी पांडवा । मी हारपला गिंवसावा । जेथ नामघोषु बरवा । करिती ते माझे ॥208॥
परंतु, हे पांडवा; जरी मी कोठे सापडलो नाही, तरी जे माझ्या नांवाचा सतत घोष करतात, त्यांच्याजवळ सापडायचाच.
209-9
कैसे माझा गुणी धाले । देशकाळाते विसरले । कीर्तनसुखे झाले । आपणपाचि ॥209॥
ते माझ्या गुणांनी इतके तृप्त झालेले असतात की, ते देशकालाला विसरून नामसंकीर्तनाच्या योगे आपल्या ठिकाणीच सुखी झालेले असतात.
210-9
कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध । माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥210॥
कृष्ण, विष्णु, हरि, गोविंद या शुद्ध नांवांच्या कवितेने आत्मानात्मविचार करुन ते सतत नामस्मरण करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-9
हे बहु असो यापरी । कीर्तित माते अवधारी । एक विचरती चराचरी । पांडुकुमरा ॥211॥
हे पंडुकुमरा, अशा प्रकारे आणखी पुष्कळ तऱ्हांनी माझे गुणानुवाद वर्णन करीत कोणी जगतांत हिंडतात.
212-9
मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना । पंचप्राणा मना । पाढाऊ घेउनी ॥212॥
अर्जुना, मग दुसरे कित्येक पंचप्राण व मन यांना अंतर्यामी जिंकून जयपत्र मिळवितात.
213-9
बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली । वरी प्राणायामांची मांडिली । वाहाती यंत्रे ॥213॥
बाहेरून यमनियमांचे कुंपण लावून, आत मूळबंधाचा कोट तयार करतात, व त्यावर प्राणायामरूप सतत चालू असणाऱ्या तोफा ठेवतात.
214-9
तेथ उल्हाट शक्तीचेनि उजिवडे । मन पवनाचेनि सुरवाडे । सतरावियेचे पाणियांडे । बळियाविले ॥214॥
मग कुंडलिनी ऊर्ध्वमुख होऊन, तिच्या प्रकाशाने मन व प्राण यांच्या अनुकूलतेने चंद्रामृताचे – सतराव्या कलेचे तळे स्वाधीन करुन घेतात.
215-9
तेव्हा प्रत्याहारे ख्याति केली । विकारांची संपिली बोहेरिली । इंद्रिये बांधोनि आणिली । हृदयाआंतु ॥215॥
त्या वेळी प्रत्यहार हा मोठ्या पराक्रमाने कामक्रोधादि विकारांचा, परिवारासह फडशा करतो ? आणि इंद्रिये बांधून ह्रदयात आणतो.
216-9
तव धारणावारु दाटिले । महाभूतांते एकवटिले । मग चतुरंग सैन्य निवटिले । संकल्पाचे ॥216॥
इतक्यात धारणारूप घोडेस्वार हल्ला करून पंचमहाभूतांचे ऐक्य करतात, व संकल्पाचे चतुरंग सैन्य (मन, बुद्धि, चित्त व अहंकार) नाहीसे करतात.
217-9
तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचे निसाण वाजत । दिसे तन्मयाचे झळकत । एकछत्र ॥217॥
नंतर जयजयकार शब्द होतो; ध्यानरूपी नौबद वाजू लागून एकरूपतेचे छत्र चमकूं लागते.
218-9
पाठी समाधिश्रियेचा अशेखा । आत्मानुभवराज्यसुखा । पट्टाभिषेकु देखा । समरसे जाहला ॥218॥
मागाहून समाधिरूप लक्ष्मीचा अखंड -आत्मानुभवरुपी राज्यसुखाच्या ब्रह्मरूप ऐक्यतेने पट्टाभिषेक होतो.
219-9
ऐसे हे गहन । अर्जुना माझे भजन । आता ऐके सांगेन । जे करिती एक ॥219॥
हे अर्जुना, असे जे माझे कठीन भजन, ते कोण करतात हे तुला सांगितले. आता याशिवाय दुसरे भजन करणारे कोण आहेत ते ऐक.
220-9
तरी दोन्ही पालववेरी । जैसा एक तंतु अंबरी । तैसा मीवाचूनि चराचरी । जाणती ना ॥220॥
वस्त्राच्या दोन्ही पदरांपर्यंत जसा आडवा व उभा भरलेला तंतुच असतो, त्याप्रमाणे माझ्याशिवाय हे जगत् दुसरे कशानेही व्यापलेले नाही, अशी त्यांची समजूत आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-9
आदि ब्रह्मा करुनी । शेवटी मशक धरुनी । माजी समस्त हे जाणोनी । स्वरुप माझे ॥221॥
ब्रह्मदेव एका बाजूस व दुसरे बाजूस चिलीट धरून मध्ये माझ्या स्वरूपाशिवाय दुसरे काही नाही असे ते समजतात.
222-9
मग वाड धाकुटे न म्हणती । सजीव निर्जीव नेणती । देखिलिये वस्तू उजू लुंटिती । मीचि म्हणोनि ॥222॥
मग लहान व मोठे, सजीव व निर्जीव असा भेद न धरता जी जी वस्तु दृष्टीस पडेल ती मद्रूपच आहेत.
223-9
आपुले उत्तमत्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे । एकसरे व्यक्तिमात्राचेनि नांवे । नमूचि आवडे ॥223॥
अशा सरळ भावाने ते जीवमात्राला नमस्कार करतात. आपला मोठेपणा विसरून, पुढे येणारी वस्तु योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे न जाणता सरसकट सर्व वस्तूंला नमस्कार करणे हेच त्यांना आवडते.
224-9
जैसे उंची उदक पडिले । ते तळवटवरी ये उगेले । तैसे नमिजे भूतजात देखिले । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥224॥
ज्याप्रमाणे पुष्कळ उंचीवरून पडणारे पाणी एकदम सहज तळाशी येते, त्याप्रमाणे, जो प्राणी दृष्टीस पडेल त्यास नमस्कार करणे असा त्यांचा स्वभावच बनतो.
225-9
का फळलिया तरुची शाखा । सहजे भूमीसी उतरे देखा । तैसे जीवमात्रा अशेखा । खालावती ते ॥225॥
किंवा फळाने भरलेल्या झाडाची खांदी जशी सहज भुईला लावल्याप्रमाणे दिसते, त्याप्रमाणे प्राणीमात्रापुढे ते नमस्कार घालतात.
226-9
अखंड अगर्वता होऊनि असती । तयाते विनयो हेचि संपत्ती । जे जयजयमंत्रे अर्पिती । माझाचि ठायी ॥226॥
ते नेहमी गर्वरहित असतात व नम्रता हीच त्यांची संपत्ति असते; व ते जयजयमंत्राने माझ्या ठिकाणी आपली सर्व कर्मे अर्पण करतात.
227-9
नमिता मानापमान गळाले । म्हणोनि अवचिते ते मीचि जहाले । ऐसे निरंतर मिसळले । उपासिती ॥227॥
नम्र होता होता त्यांना मानापमानाचा विचार राहात नाही, म्हणून ते मीच होऊन राहतात; व अशा प्रकारे मद्रूप होऊनही निरंतर माझीच उपासना करतात.
228-9
अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती । आता ज्ञानयज्ञे यजिती । ते भक्त आइके ॥228॥
अर्जुना, अशा प्रकारे ही श्रेष्ठ भक्ति तुला सांगितली. आता जे माझी ज्ञानयज्ञाने भक्ति करतात, ते कोणते भक्त ते ऐक.
229-9
परि भजन करिती हातवटी । तू जाणत आहासि किरीटी । जे मागा इया गोष्टी । केलिया आम्ही ॥229॥
परंतू हे किरीटी, त्यांची भजन करण्याची शैली तुला माहीत आहेच, व त्याबद्दल आम्ही पूर्वी (अ. 4 श्लो 33-42) वर्णन केलेच आहे.
230-9
तव आथि जी अर्जुन म्हणे । ते दैविकिया प्रसादाचे करणे । तरि काय अमृताचे आरोगणे । पुरे म्हणावे ? 230॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, ” होय, हा ईश्वरी प्रसादच आहे. तथापि अमृताचे सेवन करणाराच्याने कधी पुरे म्हणवते का ? “
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-9
या बोला श्रीअनंते । लागटा देखिले तयाते । की सुखावलेनि चित्ते । डोलतु असे ॥231॥
तेव्हा अर्जुनाचे हे बोलणे ऐकुन, हा कार्यसाधु आहे असे पाहून श्रीअनंत चित्तांत संतोष मानून डोलू लागले.
232-9
म्हणे भले केले पार्था । एऱ्हवी हा अनवसरु सर्वथा । परि बोलवीतसे आस्था । तुझी माते ॥232॥
आणि म्हणाले, ” पार्था शाबास! बाकी सांगितलेली गोष्ट पुनः सांगणे हे अप्रासंगिकच, पण तुझी ऐकण्याची उत्कंठा पाहून मला सांगणे भाग पडते.
233-9
तव अर्जुन म्हणे हे कायी । चकोरेवीण चांदिणेचि नाही । जग निवविजे हा तयाच्या ठायी । स्वभावो की जी ॥233॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, ” तुम्ही म्हणता अशी गोष्ट नाही. पहा की, चकोर पक्ष्याची तहान भागविण्याशिवाय चंद्राला इतर काही कर्तव्य नाही की काय ? जगाला शांत करणे हा त्याचा स्वभावच आहे;
234-9
येरे चकोरे तिये आपुलिये चाडे । चांचु करिती चंद्राकडे । तेवि आम्ही विनवु ते थोकडे । देवो कृपासिंधु ॥234॥
एरव्ही, चकोर पक्ष्याने आपल्या गरजेकरता ज्याप्रमाणे चंद्राकडे चोच करावी, त्याप्रमाणे आम्ही आपली जेवढी विनंति करावी तेवढी थोडीच आहे. कारण, देवा आपण दयेचे सागर आहांत.
235-9
जी मेघ आपुलिये प्रौढी । जगाची आर्ति दवडी । वाचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी ॥235॥
मेघ आपल्या थोरपणाने जगाचे दुःख निवारण करतो, त्या त्याच्या मोठ्या वर्षावाच्या मानाने पाहिले असता चातकाची तहान ती केवढी असणार!
236-9
परि चुळा एकाचिया चाडे । जेवि गंगेतेचि ठाकावे पडे । तेवि आर्त का बहु का थोडे । तरि सांगावे देवा ॥236॥
परंतु एकच चूळ भरण्याची इच्छा झाली तरी ज्याप्रमाणे गंगेतच जावे लागते, त्याप्रमाणे, आम्हाला ऐकण्याची इच्छा थोडी किंवा बहुत असली, तरी देवा, आता सांगण्यास सुरवात करावी.
237-9
तेथे देवे म्हणितले राहे । जो संतोषु आम्हा जाहला आहे । तयावरी स्तुति साहे । ऐसे उरले नाही ॥237॥
त्या वेळेस देव म्हणाले :- अर्जुना, आता तुझे बोलणे राहू दे. आम्हाला जो संतोष झाला आहे, त्यापेक्षा तू स्तुति करुन तो वाढेल असे नाही;
238-9
पै परिसतु आम्हासि निकियापरी । तेचि वक्तृत्वा वऱ्हाडीक करी । ऐसे पुरस्करोनि श्रीहरी । आदरिले बोलो ॥238॥
परंतु तू ज्याप्रमाणे लक्ष देऊन एवढा वेळ ऐकलेस, तसेच लक्ष देऊन आमच्या बोलण्यास मेजवानी कर (व पुढेही तसेच ऐक). अशा रीतीने श्रीहरिंनी अर्जुनास मान देऊन बोलण्यास सुरवात केली.
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुदा विश्वतोमुखम् ॥9. 15॥
239-9
तरी ज्ञानयज्ञु तो एवंरुपु । तेथ आदिसंकल्पु हा यूपु । महाभूते मंडपु । भेदु तो पशु ॥239॥
ज्ञानयज्ञाचे लक्षण कोणते म्हणशील, तर ज्या ठिकाणी ‘ ब्रह्माचे बहुत प्रकारचे होणे ‘ म्हणजे आदिसंकल्प हाच पशु;
240-9
मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रिये आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान धृत ॥240॥
मग पंचमहाभूतांचे जे विशेष गुण ते, अथवा पांच इंद्रिये आणि पंचप्राण हेच यज्ञाचे साहीत्य, व ब्रह्माविषयी जे अज्ञान तेच घृत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-9
तेथ मनबुद्धीचिया कुंडा- । आंतु ज्ञानाग्नि धडफुडा । साम्य तेचि सुहाडा । वेदि जाणे ॥241॥
हे बलाढ्य अर्जुना, त्या यज्ञांत मन व बुद्धि ही दोन कुंडे असुन या दोन कुंडांत ज्ञानरूप अग्नि प्रदीप्त केला जातो; सुख व दुःख यांचे ठिकाणी जी समता तीच वेदिका म्हणजे यज्ञकुंडाच्या सभोवती असलेला परिघ होय;
242-9
सविवेकमतिपाटव । तेचि मंत्रविद्यागौरव । शांति स्त्रुकस्त्रुव । जीव यज्वा ॥242॥
आत्मानात्मविचार करण्याविषयी जी बुद्धीची कुशलता, तेच यज्ञांतील मंत्र होत; शांति हीच स्त्रुक व स्त्रुवा नांवाची हवनपात्रे व जीव हा यज्ञ करणारा होय.
243-9
तो प्रतीतीचेनि पात्रे । विवेकमहामंत्रे । ज्ञानाग्निहोत्रे । भेदु नाशी ॥243॥
तो यज्ञ करणारा जीव अनुभवरूप पात्रांनी, ब्रह्माच्या विचाररूप महामंत्रांनी, ज्ञानरूप अग्निहोस्त्र कर्माने, जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुति देऊन तो भेद नाहीसा करतो,
244-9
तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हे ठाये । आत्मसमरसी न्हाये । अवभृथी जेव्हा ॥244॥
त्या वेळेस अज्ञान नाहीसे होऊन यज्ञ करणारा व यज्ञक्रिया ही जागचे जागीच राहतात. नंतर आत्मानंदरसात जीव यजमानाचे अवभृथस्नान होते.
245-9
तेव्हा भूते विषय करणे । हे वेगळाले काही न म्हणे । आघवे एकचि ऐसे जाणे । आत्मबुद्धी ॥245॥
तेव्हा पंचमहाभूते, शब्द, स्पर्श इत्यादि विषय व इंद्रिये ही वेगळाली आहेत असे म्हणत नाही व ब्रह्माशी तादात्म्य झाल्यामुळे सर्व एक आहे असे तो जाणतो.
246-9
जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना । मीचि जाहालो होतो ना । निद्रावशे ॥246॥
अर्जुना, ज्याप्रमाणे झोपेतून जागा झालेला मनुष्य म्हणतो की, ‘ स्वप्नांत पाहिलेली चित्रविचित्र सेना झोप लागल्यामुळे मीच झालो होतो ना
274-9
आता सेना ते सेना नव्हे । हे मीच एक आघवे । ऐसे एकत्वे मानवे । विश्व तया ॥247॥
आता जी सेना पाहिली होती, ती सेना नव्हती; ती मीच झालो होतो; ‘ अर्जुना, अशा प्रकारे त्या पुरुषाला जग एकरूप भासते.
248-9
मग तो जीवु हे भाष सरे । आब्रह्म परमात्मबोधे भरे । ऐसे भजती ज्ञानाध्वरे । एकत्वे येणे ॥248॥
मग तो जीव ‘मी आहे ‘ अशी आठवण विसरतो, व ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत आत्माच भरलेला आहे असे मानतो. अशा प्रकारे ज्ञानयज्ञाने ऐक्य पावून कितीएक मला भजतात.
249-9
अथवा अनादि हे अनेक । जे आनासारिखे एका एक । आणि नामरुपादिक । तेही विषम ॥249॥
दुसरा, माझे भजन करणारा असे समजतो की, जगांतील जे सर्व पदार्थ दिसतात, ते अनादि आहेत. एकासारखे एक असुनही निराळे आहेत, आणी त्यांची नांवे व रूपे ही निराळी आहेत, म्हणून, जग हे जरी भिन्न वस्तूंनी भरलेले आहे,
250-9
म्हणोनि विश्व भिन्न । परि न भेदे तयांचे ज्ञान । जैसे अवयव तरी आन आन । परि एकेचि देहीचे ॥250॥
तरी त्या वस्तुचे जे अधिष्ठान त्याच्या ज्ञानाबद्दल त्यांचे मनात भेद नसतो. ज्याप्रमाणे, अवयव जरी निरनिराळे आहेत, तरी ते एकाच देहाचे आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
251-9
का शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिये तरुवरा । बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवी ॥251॥
किंवा फांद्या जरी लहानमोठ्या असल्या तरी त्या एकाच झाडाच्या असतात, अथवा पुष्कळ किरणे दृष्टीस पडली तरी ती जशी एकाच सुर्यापासून निघालेली असतात;
252-9
तेवि नानाविधा व्यक्ती । आनाने नामे आनाना वृत्ती । ऐसे जाणती भेदला भूती । अभेदा माते ॥252॥
त्याप्रमाणे अनेक व्यक्ति असून जरी त्यांची नावे व स्वभाव पुष्कळ आहेत, तरी भूतांमध्ये माझे ऐक्य आहे असे जाणतात.
253-9
येणे वेगळालेपणे पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा । जे न भेदती जाणिवा । जाणते म्हणउनि ॥253॥
हे पांडवा, अशा रीतीने सर्व भूते वेगळी आहेत असे जाणून जे उत्तम असा ज्ञानयज्ञ करतात, व जे जाणते असल्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या ठिकाणी भिन्न भाव उरत नाही;
254-9
ना तरी जेधवा जिये ठायी । देखती का जे जे काही । ते मीवाचूनि नाही । ऐसाचि बोधु ॥254॥
किंवा जेव्हा ज्या ठिकाणी ते जी जी वस्तु पाहतात, त्यात माझ्यावाचून दुसरे काही नाही असा ज्यांच्या मनाचा निश्चय असतो;
255-9
पाहे पा बुडबुडा जेउता जाये । तेउते जळचि एक तया आहे । मग विरे अथवा राहे । तऱ्ही जळाचिमाजि ॥255॥
हे पहा, पाण्यावरील बुडबुडा जिकडे जातो, तिकडे पाणी म्हणून त्याला एकच आहे, मग तो नाहीसा झाला अथवा राहिला तरी तो पाण्यातच असतो; .
256-9
का पवने परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाही गेले । आणि माघौते जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥256॥
किंवा वाऱ्याने मातीचे कण उंच उडाले, तरी त्यांना काही पृथ्वीपणावेगळे केले नाही, आणि पुनः जरी ते खाली पडले, तरी ते पृथ्वीवरच;
257-9
तैसे भलतेथ भलतेणे भावे । भलतेही न हो अथवा होआवे । परि ते मी ऐसे आघवे । होऊनि ठेले ॥257॥
त्याचप्रमाणे, पाहिजे तेथे पाहिजे त्या भावनेने पाहिजेल ते होवो, परंतु ते सर्व ‘ मीच आहे ‘ अशी ज्यांचे मनाची वृत्ति होऊन गेली आहे;
258-9
अगा हे जेव्हडी माझी व्याप्ति । तेव्हडीचि तयांचि प्रतीति । ऐसे बहुधाकारी वर्तती । बहुचि होउनि 258॥
अर्जुना, माझी जेवढी व्याप्ति आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे; आणि याप्रमाणे पुष्कळ व्यक्तींत जरी ते वागले, तरी ते मद्रूपच झालेले असतात.
259-9
हे भानुबिंब आवडे तया । सन्मुख जैसे धनंजया । तैसे ते विश्वा इया । समोर सदा ॥259॥
हे धनंजया, सुर्यबिंब पाहिजे त्याने पाहिले असता त्याच्यासमोरच ते दिसते, त्याप्रमाणे ते ज्ञानी नेहमी जगाच्या समोरच असतात;
260-9
अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाही अर्जुना । वायु जैसा गगना । सर्वागी असे ॥260॥
अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला आंतबाहेर असा भेद नाही. ज्याप्रमाणे वायु हा आकाशांत सर्वत्र भरलेला आहे;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-9
तैसा मी जेतुला आघवा । तेचि तुक तयांचिया सद्भावा । तरी न करिता पांडवा । भजन जहाले ॥261॥
त्याप्रमाणे; मी जेवढा संपुर्ण आहे, तेवढा त्यांच्या सद्भावाच्या मापास उतरतो, म्हणून हे पांडवा, त्यांनी भजन न करिता माझे भजन केल्याप्रमाणे होते.
262-9
एऱ्हवी तरी सकळ मीचि आहे । तरी कवणी के उपासिला नोहे । एथ एके जाणणेवीण ठाये । अप्राप्तासी ॥262॥
एरव्ही तरी मी सर्वत्र भरलेला आहे; परंतु माझी कोण व कोठे उपासना करीत नाहीत ? परंतु एक पूर्ण ज्ञानाशिवाय अज्ञानी जनाला माझी प्राप्ति होत नाही. .
263-9
परि ते असो येणे उचिते । ज्ञानयज्ञे यजितसांते । उपासिती माते । ते सांगितले ॥263॥
परंतु हे असो; या योग्य ज्ञानयज्ञाने यज्ञ करून जे माझी उपासना करतात; ते भक्त तुला सांगितले. .
264-9
अखंड सकळ हे सकळा मुखी । सहज अर्पत असे मज एकी । की नेणणेयासाठी मूर्खी । पविजेचि माते ॥264॥
सदासर्वकाली जी जी कर्मे होतात, ती सर्व बाजूंनी मला सहज पावतात, परंतू हे मुर्खांना समजत नसल्यामुळे मी त्यांना प्राप्त होत नाही.
अहं क्रतुरहं यज्ञ: स्वधाहमहमौषधम् ।
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥9. 16॥
265-9
तोचि जाणिवेचा जरी उदय होये । तरी मुदल वेदु मीचि आहे । आणि तो विधानाते जया विये । तो क्रतुही मीचि ॥265॥
तेच ज्ञान झाले असता, मुख्य वेद मीच आहे, त्यात विधि-अनुष्ठान जे सांगितले आहे तो ऋतुही मीच.
266-9
मग तया कर्मापासूनि बरवा । जो सांगोपांगु आघवा । यज्ञु प्रगटे पांडवा । तोही मी गा ॥266॥
मग हे पांडवा, त्या यज्ञविधानापासून प्रकट होणारा जो यथाविधि यज्ञ, तोही मीच आहे
267-9
स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा । आज्य मी समिधा । मंत्रु मी हवि ॥267॥
देवांस हवि देण्याचा मंत्र मी, पितरांसही हवि देण्याचा मंत्र मी, सोमवल्ली वैगेरे नानाप्रकारच्या औषधि मी,
268-9
होता मी हवन कीजे । तेथ अग्नि तो स्वरुप माझे । आणि हुतके वस्तू जे जे । तेही मीचि ॥268॥
धृत मी, समिधा मी, मंत्र मी, होमद्रव्य मी, ऋत्विज मी, ज्यात हवन करावयाचे तो अग्निही माझे स्वरुप आहे, आणि अग्नीत हवन करण्याचा ज्या ज्या वस्तु, त्याही मीच आहे.
पिताहमस्य जगतो माता धाता पितामह: ।
वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च ॥9. 17॥
269-9
पै जयाचेनि अंगेसंगे । इये प्रकृतीस्तव अष्टांगे । जन्म पाविजत असे जगे । तो पिता मी गा ॥269॥
हे पहा, ज्याच्या अंगसंगाने अष्टांग-प्रकृति ही जगास प्रसवते, तो जगत्पिता मी
270-9
अर्धनारीनटेश्वरी । जो पुरुष तोचि नारी । तेवि मी चराचरी । माताही होय ॥270॥
अर्धनारीनटेश्वर स्वरूपात ज्याप्रमाणे पुरुष तोच स्त्री व स्त्री तोच पुरुष असतो, त्याप्रमाणे स्थावरजंगमाची माताही मी;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-9
आणि जाहाले जग जेथ राहे । जेणे जीवित वाढत आहे । ते मीचि वाचूनि नोहे । आन निरुते ॥271॥
आणि उत्पन्न झालेले जग ज्या ठिकाणी राहते, व ज्याच्या योगाने प्राणिमात्राचे रक्षण होते ते निःसंशय माझ्याशिवाय होत नाही.
272-9
इये प्रकृतिपुरुषे दोन्ही । उपजली जयाचिया अमनमनी । तो पितामह त्रिभुवनी । विश्वाचा मी ॥272॥
प्रकृति व पुरुष ही दोन्ही ज्याच्या अंतःकरपाधिरहित स्वरूपात म्हणजे निर्गुणात उत्पन्न होतात, तो या विश्वाचा आजा त्रिभुवनांत मीच.
273-9
आणि आघवेया जाणणेयाचिया वाटाणो । जया गावा येती गा सुभटा । वेदांचिया चोहटा । वेद्य जे म्हणिजे ॥273॥
अर्जुना, सर्व ज्ञानाच्या वाटा ज्या गावात येऊन मिळतात, व चारी वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य असे म्हणतात.
274-9
जेथ नाना मता बुझावणी आली । एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली । चुकली ज्ञाने जेथ मिळो जाहली । जे पवित्र म्हणिजे ॥274॥
ज्या ठिकाणी पुष्कळ प्रकारची मते ऐक्यतेस आली, शास्त्रांची एकमेकांशी ओळख झाली; व चुकलेली ज्ञाने जेथे एकत्र मिळाली, असे जे स्थान, त्याला पवित्र असे म्हणतात.
275-9
पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनी नादाकारु । तयांचे गा भवन जो ॐकारु । तोही मी गा ॥275॥
हे पहा, ब्रह्मबीजाला परा, पश्यंती, मध्यमा आणी वैखरी या चार वाचा हेच अंकुर फुटल्यावर, त्यांचे मंदीर जो ॐकार, तोही मीच होय.
276-9
जया ॐकाराचिये कुशी । अक्षरे होती अउमकारेसी । जिये उपजत वेदेसी । उठली तिन्ही ॥276॥
ज्या ॐकाराच्या पोटी अ, उ व म् अशी अक्षरे उत्पन्न होतात, व जी उपजल्याबरोबर तीन वेद उत्पन्न झाले,
277-9
म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु । एंव मीचि कुलक्रमू । शब्दब्रह्माचा ॥277॥
ज्या ॐकाराच्या पोटी अ, उ व म् अशी अक्षरे उत्पन्न होतात, व जी उपजल्याबरोबर तीन वेद उत्पन्न झाले, म्हणून ऋक्, यजु व साम हे तिन्ही वेदही मीच, व ज्याप्रमाणे वेदांची वंशपरंपराही मीच होय, असे श्रीकृष्ण म्हणाले.
गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत् ।
प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥9. 18॥
278-9
हे चराचर आघवे । जिये प्रकृती आत साठवे । ते शिणली जेथ विसवे । ते परमगती मी ॥278॥
हे सर्व स्थावर जंगम विश्व ज्या प्रकृतीच्या आत भरलेले आहे, ती प्रकृति श्रमली असता ज्या ठिकाणी विश्रांती पावते ते उत्तम स्थान मी;
279-9
आणि जयाचेनि प्रकृति जिये । जेणे अधिष्ठिली विश्व विये । जो येऊनि प्रकृती इये । गुणाते भोगी ॥279॥
आणि ज्याच्यामुळे ही प्रकृति वांचते ज्याच्या आश्रयाने विश्व प्रसवते व जो प्रकृतीच्या निमीत्ताने सत्व, रज, तम या गुणांचा उपभोग घेतो,
280-9
तो विश्वश्रियेचा भर्ता । मीचि गा पंडुसुता । मी गोसावी समस्ता । त्रैलोक्याचा ॥280॥
तो विश्वलक्ष्मीचा पति मीच; आणि अर्जुना, सर्व त्रैलोक्याचा स्वामी मीच.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-9
आकाशे सर्वत्र वसावे । वायूने नावभरी उगे नसावे । पावके दहावे । वर्षावे जळे ॥२८१॥
आकाशाने सर्व ठिकाणी असावे, वायुने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जाळावे, मेघाने वृष्टि करावी,
282-9
पर्वती बैसका न संडावी । समुद्री रेखा नोलांडावी । पृथ्वीया भूते वाहावी । हे आज्ञा माझी ॥२८२॥
पर्वतांनी आपली जागा सोडु नये, समुद्राने आपली मर्यादा ओलांडु नये व पृथ्वीने सर्व भूतांचा भार वहावा, ही आज्ञा माझी आहे.
283-9
म्या बोलविल्या वेदु बोले । म्या चालविल्या सूर्यु चाले । म्या हालविल्या प्राणु हाले । जो जगाते चाळिता ॥२८३॥
मी बोलविल्याने वेद बोलतात मी चालविल्याने सुर्य चालतो, सर्व जगाचा मालक जो प्राण, तोही मी हालविल्याने हालतो;
284-9
मियाचि नियमिलासांता । काळु ग्रासितसे भूता । इये म्हणियागते पंडुसुता । सकळे जयाची ॥२८४॥
आणि मीच आज्ञा दिली असता भुतांना काळ ग्रासतो. अर्जुना, याप्रमाणे हाच सर्व ज्यांची आज्ञाधारक असून
285-9
ऐसा जो समर्थु । तो मी जगाचा नाथु । आणि गगनाऐसा साक्षिभूतु । तोहि मीचि ॥२८५॥
आपापली कामे करतात असा जो समर्थ, तो जगाचा नाथ मी; व आकाशाप्रमाणे सर्व ठिकाणी असुन साक्षीभूत असणारा तोही मीच.
286-9
इही नामरुपी आघवा । जो भरला असे पांडवा । आणि नामरुपाहि वोल्हावा । आपणचि जो ॥२८६॥
हे पांडवा, याप्रमाणे या नामरूपांनी जो सर्वत्र भरलेला आहे, आणि जो आपणच नामरूपांचाही जिव्हाळा आहे,
287-9
जैसे जळाचे कल्लोळ । आणि कल्लोळ आथी जळ । ऐसेनि वसवितसे सकळ । तो निवासु मी ॥२८७॥
ज्याप्रमाणे लाटा पाण्यातच उत्पन्न होतात आणि लाटांतही पाणी असते, त्याप्रमाणे जग माझ्यात व मी जगात आहे.
288-9
जो मज होय अनन्य शरण । त्याचे निवारी मी जन्म मरण । यालागी शरणागता शरण्य । मीचि एकु ॥२८८॥
जो मला एकनिष्ठपणे शरण येतो, त्याला जन्ममरणापासून मी मुक्त करतो. म्हणून शरणागताचे रक्षण करणारा एकटा मीच आहे.
289-9
मीचि एक अनेकपणे । वेगळालेनि प्रकृतीगुणे । जीत जगाचेनि प्राणे । वर्तत असे ॥२८९॥
प्रकृतीच्या वेगळाल्या गुणांनी मी एक असून अनेकपणाने जगांतील प्राणिमात्रांत प्राणरूपाने असतो.
290-9
जैसा समुद्र थिल्लर न म्हणता । भलतेथ बिंबे सविता । तैसा ब्रह्मादि सर्वा भूता । सुहृद तो मी ॥२९०॥
ज्याप्रमाणे, हा समुद्र किंवा हा नाला असे न म्हणता सुर्य सर्व ठिकाणी प्रकाशित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मापासून चिलटापर्यंत प्राणिमात्राला आवडता म्हणून जो आहे तो मीच.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-8
मीचि गा पांडवा । या त्रिभुवनासी वोलावा । सृष्टिक्षयप्रभावा । मूळ ते मी ॥291॥
हे पांडवा, या त्रिभुवनाचे जिवन, आणि उत्पत्ति, स्थिति, लय ह्या तिन्ही अवस्थांस जो मुळ तो मीच
292-9
बीज शाखाते प्रसवे । मग ते रुखपण बीजी सामावे । तैसे संकल्पे होय आघवे । पाठी संकल्पी मिळे ॥292॥
बीजापासुन वृक्ष व शाखा उत्पन्न होतात, पुढे ती झाडेच बीजांत समावेश पावतात; त्याप्रमाणे, आदिसंकल्पापासून सर्व जगाची उत्पत्ति होऊंन पुनः ते जग आदिसंकल्पातच लय पावते.
293-9
ऐसे जगाचे बीज जो संकल्पु । अव्यक्त वासनारुपु । तया कल्पांती जेथ निक्षेपु । होय ते मी ॥293॥
असे अव्यक्त वासनारूप जगाचे बिज जो संकल्प, त्याला कल्पांती जेथे राहण्यास ठिकाण मिळते, ते मीच.
294-9
इये नामरुपे लोटती । वर्णव्यक्ती आटती । जातीचे भेद फिटती । जै आकाश नाही ॥294॥
जेंव्हा निराकार स्वरूप प्रकट होते, तेंव्हा ही सर्व नाना रूपे लय पावतात, वर्णव्यक्ति नाहीतशा होतात, व जातीचे भेदही राहत नाहीत;
295-9
तै संकल्पु वासनासंस्कार । माघौते रचावया आकार । जेथ राहोनि असती अमर । ते निधान मी ॥295॥
तेव्हा पुनः जग निर्माण करण्याकरिता संस्काररूप वासनाशक्ति धारण करून ज्या ठिकाणी देव राहातात, ते ठिकाणही मीच.
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन 9. 19॥
296-9
मी सूर्याचेनि वेषे । तपे तै हे शोषे । पाठी इंद्र होऊनि वर्षे । तै पुढती भरे ॥296॥
मी सुर्याच्या रुपाने ज्या वेळेस तापतो, त्या वेळेस हे जग कोरडे होते, आणि पुनः इंद्राच्या रूपाने पाऊस पाडतो,
297-9
अग्नि काष्ठे खाये । ते काष्ठचि अग्नि होये । तेवि मरते मारिते पाहे । स्वरुप माझे ॥297॥
तेव्हा पुनः समृद्धि होते. ज्याप्रमाणे अग्नीने काष्ठ भक्षण केल्यावर तेच काष्ठ पुनः अग्नी होते,
298-9
यालागी मृत्यूचा भागी जे जे । तेही पै रुप माझे । आणि न मरते तव सहजे । अविनाशु मी ॥298॥
त्याचप्रमाणेच मरणारे स्वरुप माझेच आहे. यावरुन, मृत्युच्या भागातील जी जी रूपे आहेत, ती ती माझीच आहे, आणि न मरणारीही रुपे सहज माझीच आहेत.
299-9
आता बहु बोलोनि सांगावे । ते एकिहेळा घे पा आघवे । तरी सतासतही जाणावे । मीचि पै गा ॥299॥
आता फार बोलून काय सांगावे ? सर्व तुला एकदाच सांगतो की, व्यक्त आणि अव्यक्त रुपे ही माझीच आहेत असे जाण
300-9
म्हणोनि अर्जुना मी नसे । ऐसा कवणु ठाव असे । परि प्राणियांचे दैव कैसे । जे न देखती माते ॥300॥
म्हणून अर्जुना, मी नाही असे कोणते ठिकाण आहे ? परंतु प्राणिमात्राचे दैव काय चमत्कारिक आहे, की ते मला पहात नाहीत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
301-9
तरंग पाणियेवीण सुकती । रश्मि वातीवीण न देखती । तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखे ॥301॥
ज्याप्रमाणे लाटा पाण्याशिवाय आटाव्या किंवा सुर्यकिरण दिव्याच्या उजेडाशिवाय दिंसू नयेत, त्याप्रमाणे सर्व जीव मीच बनलेला असून, ते मला ओळखत नाहीत, हे केवढे आश्चर्य आहे
302-9
हे आतबाहेर मिया कोंदले । जग निखिल माझेचि वोतिले । की कैसे कर्म तया आले । जे मीचि नाही म्हणती 302॥
पहा. या सकल विश्वांत अंतर्बाह्य मीच भरलेला आहे, व हे जग मद्रूपच आहे; परंतु जीवांची कर्मे त्यास कशी आड येतात पहा, की ते मलाच ‘ नाही ‘ असे म्हणतात.
303-9
परि अमृतकुहा पडिजे । का आपणयाते कडिये काढिजे । ऐसे आथी काय कीजे । अप्राप्तासि ॥303॥
परंतु अमृताच्या कूपांत पडल्यावर ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपल्याला बाहेर काढा असे म्हणतो, तेव्हा अशा त्या अभाग्याला काय म्हणावे ?
304-9
ग्रासा एका अन्नासाठी । अंधु धावताहे किरीटी । आडळला चिंतामणि पाये लोटी । आंधळेपणे ॥304॥
हे किरीटी, अन्नाकरिता धावणाऱ्या अंधळ्याला चिंतामणी सांपडला असता दृष्टि नसल्यामुळे तो जसा त्याला पायाने लोटून देतो,
305-9
तैसे ज्ञान जै सांडुनि जाये । तै ऐसी हे दशा आहे । म्हणोनि कीजे ते केले नोहे । ज्ञानेवीण ॥305॥
त्याप्रमाणे ज्ञानाचा त्याग केला म्हणजे अशी स्थिती होते; म्हणून ज्ञानाशिवाय जी जी कर्मे करावी ती न केल्यासारखी आहेत.
306-9
आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती । तैसे सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेवीण ॥306॥
अंधळ्याला गरुडाचे पंख जरी मिळाले, तरी त्याला काय उपयोग होणार ? त्याचप्रमाणे, ज्ञानाशिवाय सत्कर्माचे श्रम व्यर्थ आहेत.
त्रैविद्या मां सोमपा: पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥9. 20॥
307-9
देख पा गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी । विधिमार्गा कसवटी । जे आपणचि होती ॥307॥
अरे अर्जुना, हे पहा, वर्णविहित धर्माचे आचरण करून जे आपणच विधिमार्गाची कसोटी बनतात, (वेदांत सागितल्याप्रमाणे यथाविधि आचरण करतात, )
308-9
यजन करिता कौतुके । तिही वेदांचा माथा तुके । क्रिया फळेसि उभी ठाके । पुढा जया ॥308॥
ते यज्ञ करू लागले म्हणजे तीन्ही वेद संतोष पावून मान डोलवितात, व त्यांच्यापुढे क्रियाही फलप्राप्तीसह उभी राहते.
309-9
ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचे स्वरुप । तीही तया पुण्याचेनि नांवे पाप । जोडिले देखे ॥309॥
याप्रमाणे यज्ञांतील सोमपान करणारे यज्ञकर्ते (दीक्षित) जे आपणच यज्ञरूप होतात, त्यांनी, नाव मात्र पुण्य परंतु खरोखर पापाचीच जोड केली असे समज
310-9
जे श्रुतित्रयाते जाणोनि । शतवरी यज्ञ करुनि । यजिलिया माते चुकोनि । स्वर्गु वरिती ॥310॥
ते ऋक्, यजु व साम या तीन्ही वेदांस जाणून शंभर यज्ञांनी माझे यजन करतात; परंतु माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-9
जैसे कल्पतरुतळवटी । बैसोनि झोळिये पाडी गाठी । मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करु ॥311॥
अर्जुना, ज्याप्रमाणे एखादा हतभाग्य मनुष्य कल्पतरूचे खाली बसून झोळीच्या पदरास गाठी मारतो, आणि मग भिक्षा मागण्यास निंघतो
312-9
तैसे शतक्रतू यजिले माते । की ईप्सिताति स्वर्गसुखाते । आता पुण्य की हे निरुते । पाप नोहे ॥312॥
त्याप्रमाणे, शंभर यज्ञांनी माझे यजन करून ते स्वर्गसुखाची इच्छा करतात; तेव्हा हे पुण्य नसून खरोखर पाप नव्हे का ?
312-9
म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु । ज्ञानिये तयाते उपसर्गु । हानि म्हणती ॥313॥
म्हणून, माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून जे स्वर्गाला जातात, त्यांना अज्ञानी लोक पुण्यमार्ग म्हणोत, परंतु ज्ञानी जे आहेत, ते, तो जन्ममरणरूप फेऱ्यात पडून त्याची हानि झाली असे म्हणतात.
314-9
एऱ्हवी तरी नरकीचे दुःख । पावोनि स्वर्गा नाम की सुख । वाचूनि नित्यानंद गा निर्दोष । ते स्वरुप माझे ॥314॥
एरव्ही नरकांतीलदुःखाच्या मानाने स्वर्गप्राप्तीला सुख म्हणता येईल; परंतू या दोहोंशिवाय अखंड आनंददायक व निर्दोष असे जे सुख, ते माझे स्वरूप होय.
315-9
मज येता पै सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा । स्वर्गु नरकु या वाटा । चोराचिया ॥315॥
हे महावीरा अर्जुना, माझ्याकडे येण्याला स्वर्ग व नरक हे दोन आडमार्ग असून चोरांच्या वाटा आहेत.
316-9
स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे । पापात्मके पापे नरका जाइजे । मग माते जेणे पाविजे । ते शुद्ध पुण्य ॥316॥
स्वर्गप्राप्ति पुण्यात्मक पापाने होते, व नरकप्राप्ति पापात्मक पापाने होते, पण ज्या योगाने माझी प्राप्ति होते, ते शुद्ध पुण्य समज.
317-9
आणि मजचिमाजी असता । जेणे मी दूरी होय पंडुसुता । ते पुण्य ऐसे म्हणता । जीभ न तुटे काई ॥317॥
हे पंडुसुता माझाच अंश असून ज्या कर्मामुळे मी अंतरतो, त्याला पुण्य असे जर म्हटले, तर जीभ तुटणार नाही काय ?
318-9
परि हे असो आता प्रस्तुत । ऐके यापरि ते दीक्षित । यजुनि माते याचित । स्वर्गभोगु ॥318॥
परंतु हे आता राहू दे. याप्रमाणे ते दीक्षित माझे यजन करून स्वर्गभोगाची इच्छा करतात.
319-9
मग मी न पविजे ऐसे । जे पापरुप पुण्य असे । तेणे लाधलेनि सौरसे । स्वर्गा येती ॥319॥
मग ज्या पुण्याने मी पावणार नाही असे पापरूप पुण्य प्राप्त करून हौसेने स्वर्गी जातात.
320-9
जेथ अमरत्व हेचि सिंहासन । ऐरावतासारिखे वाहन । राजधानीभुवन । अमरावती ॥320॥
जेथे अमरत्व हेच सिंहासन ऐरावतासारखे वाहन, अमरावती हे राजधानीचे शहर;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-9
जेथ महासिद्धींची भांडारे । अमृताची कोठारे । जिये गावी खिल्लारे । कामधेनूची ॥321॥
जेथे अष्टमहासिद्धीचीभांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत, व ज्या गावात कामधेनूचे कळपच्या कळप आहेत;
322-9
जेथ वोळगे देव पाइका । सैघं चिंतामणीचिया भूमिका । विनोदवनवाटिका । सुरतरुंचिया ॥322॥
जेथे देवांच्या चाकरांना वागण्याकरिता चिंतामणीच्या वाटा आहेत व कल्पतरूंची उपवने आहेत;
323-9
गंधर्वगान गाणी । जेथ रंभेऐशिया नाचणी । उर्वशी मुख्य विलासिनी । अंतौरिया ॥323॥
जेथे गंधर्व गायन करताहेत, रंभेसारख्या अप्सरा नृत्य करणाऱ्या आहेत, व जेथे उर्वशीप्रमुख स्त्रिया विलासाकरिता आहेत,
324-9
मदन वोळगे शेजारे । जेथ चंद्र शिंपे सांबरे । पवना ऐसे म्हणियारे । धावणे जेथ ॥324॥
ज्या ठिकाणी मदन सेजघरात चाकरी करतो आहे, चंद्र सडा संमार्जन करतो आहे, व वायूसारखे धावनारे चाकर आहेत,
325-9
पै बृहस्पति आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचेब्राह्मण । ताटियेचे सुरगण । विकार जेथे ॥325॥
इंद्राला आशीर्वाद देणारांत बृहस्पतीसारखे मुख्य ब्राह्मण आहेत, व ज्यांच्या पंक्तीला देवमंडळी आहेत,
326-9
लोकपाळरांगेचे । राउत जिये पदीचे । उचैःश्रवा खाचे । खोलणिये ॥326॥
ज्यांच्या सभोवती लोकपालांसारखे राजे चालत असुन, जय मिळविलेले पदवीधर सरदार आहेत, व उच्चैःश्रवा नामक खाजगी कोतवालघोडा आहे.
327-9
हे बहु असो जे ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे । ते भोगिजती जव असे । पुण्यलेशु ॥327॥
हे असो; याप्रमाणे तोपर्यंत पुण्याचा अंश आहे, तोपर्यंत ते इंद्राच्या सुखासारखे पुष्कळ भोग भोगतात.
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवंत्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥9. 21॥
328-9
मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेचि इंद्रपणाची उटी उतरे । आणि येऊ लागती माघारे । मृत्युलोका ॥328॥
मग त्यांच्या पुण्याची पुंजी संपताक्षणीक इंद्रपणाचा अभिमान लोपून ते मृत्युलोकी माघारे येतात.
329-9
जैसा वेश्याभोगी कवडा वेचे । मग दारही चेपू न ये तियेचे । तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे । काय सांगो ॥329॥
ज्याप्रमाणे वेश्येच्या पायी एखाद्याने आपले सर्व द्रव्य खर्च केल्यानंतर त्याला तिच्या दाराला देखील बोट लावण्याची सत्ता नसते, त्याप्रमाणे या यज्ञकर्त्याची स्थिति फार लाजिरवाणी होते, ती तुला काय सांगूं ?
330-9
एवं थितिया माते चुकले । जीही पुण्ये स्वर्ग कामिले । तया अमरपण ते वावो जाले । अंती मृत्युलोकु ॥330॥
याप्रमाणे, ज्या वेळेस जपावयाचे, त्या वेळेस मला चुकून ज्यांनी पुण्यमार्गाच्याआचरणाने स्वर्गप्राप्ति करुन घेतली, त्यांचे अमरत्व वाया जाऊन शेवटी ते मृत्युलोकी परत येतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-9
मातेचिया उदरकुहरी । पचूनि विष्ठेचा दाथरी । उकडूनि नवमासवरी । जन्म जन्मोनि मरती ॥331॥
नंतर मातेच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरांत नऊ महिनेपर्यंत उकडून पक्क दशेत येतात, आणि जन्माला येऊन मरण पावतात.
332-9
अगा स्वप्नी निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवे । तैसे स्वर्गसुख जाणावे । वेदज्ञाचे ॥332॥
अरे, स्वप्नात प्राप्त झालेला ठेवा जसा जागृत झाल्यावर सर्व नाहीसा होतो, त्याप्रमाणे यज्ञकर्त्याचे सुख आहे असे समज.
333-9
अर्जुना वेदविद जऱ्ही जाहला । तरी माते नेणता वाया गेला । कणु सांडूनि उपणिला । कोंडा जैसा ॥333॥
समज. अर्जुना, ज्याप्रमाणे धान्य काढून घेतलेला कोंडा उफनला असता व्यर्थ होतो, त्याप्रमाणे, वेदार्थज्ञानी जरी झाला, तरी मला जाणल्याशिवाय त्याचा जन्म व्यर्थ होय.
334-9
म्हणऊनि मज एकेविण । हे त्रयीधर्म अकारण । आता माते जाणोनि काही नेण । तू सुखिया होसी ॥334॥
म्हणून माझ्या एकट्याशिवाय हे तीन्ही वेदोक्त धर्म व्यर्थ आहेत; तेव्हा आता मलाच जाण, दुसरे मनात आणू नको, म्हणजे सुखी होशील.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥9. 22॥
335-9
पै सर्वभावेसी उखिते । जे वोपिले मज चित्ते । जैसा गर्भगोळु उद्यमाते । कोणाही नेणे ॥335॥
हे पहा, ज्यांनी आपले चित्त सर्वभावेकरून माझ्याच ठिकाणी उक्ते विकले आहे; ज्याप्रमाणे गर्भातील गोळा कोणताही उद्योग करावयाचे जाणत नाही,
336-9
तैसा मीवाचूनि काही । आणिक गोमटेचि नाही । मजचि नाम पाही । जिणेया ठेविले ॥336॥
त्याप्रमाणे ज्यांना माझ्या वाचून दुसरे काहीच चांगले दिसत नाही, व ज्यांनी माझ्याचकरिता आपला जीव ठेवला आहे,
337-9
ऐसे अनन्यगतिके चित्ते । चिंतितसांते माते । जे उपासिती तयाते । मीचि सेवी ॥337॥
अशा प्रकारे एकनिष्ठ अंतःकरणाने जे माझे चिंतन करुन माझी सेवा करतात, त्यांची सेवा मीच करतो.
338-9
ते एकवटूनि जिये क्षणी । अनुसरले गा माझिये वाहणी । तेव्हाचि तयांची चिंतवणी । मजचि पडली ॥338॥
ते ऐक्यतेस पावून ज्या वेळेस माझ्याच भजनी लागले, त्याच वेळी त्यांचीचिंता मला पडली.
339-9
मग तीही जे जे करावे । ते मजचि पडिले आघवे । जैशी अजातपक्षांचेनि जीवे । पक्षिणी जिये ॥339॥
मग जे जे काही करण्याचे ते मनात आणतात; ते सर्व मला करावे लागते. ज्याप्रमाणे पंख न फुटलेल्या पक्ष्यांच्या जीवनाकरिता पक्षिणीच सारखी खटपट करीत असते,
340-9
आपुली तहानभूक नेणे । तान्हया निके ते माउलीसीचि करणे । तैसे अनुसरले जे मज प्राणे । तयांचेन काइसेनिहि न लजे मी ॥340॥
कींवा, आपली तहानभूक न जाणता, आपल्या तान्ह्या लेंकरास जे सुखकारक तेच आईला करावे लागते, त्याचप्रमाणे, ज्यांनी मनापासून सर्व भार मजवर टाकला आहे,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-9
तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेचि पुरवी कोड । का सेवा म्हणती तरी आड । प्रेम सुये ॥341॥
त्यांचे सर्व इच्छित मीच पूर्ण करतो. त्यांना माझ्या ऐक्याची इच्छा झाली, तर मी त्यांचे कौतुक पुरवितो; किंवा माझी सेवाच करावी असे ते म्हणतील, तर त्यांच्या व माझ्यामध्ये प्रेमभाव उत्पन्न करतो.
342-9
ऐसा मनी जो जो भावो । तो तो पुढा पुढा लागे तया देवो । आणि दिधलियाचा निर्वाहो । तोहि मीचि करी ॥342॥
याप्रमाणे ते आपल्या मनात जी जी इच्छा करतात, ती ती वारंवार मला पुरवावी लागते; आणि जे त्यांना दिलेले असते, त्याचे रक्षणही मीच करतो.
343-9
हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा । जयाचिया सर्वभावा । आश्रयो मी ॥343॥
हे पांडवा, ज्यांचा सर्व भाव मजवरच असतो, त्यांचा योगक्षेम मजवरच पडतो.
येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता: ।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥29. 3॥
344-9
आता आणिकही संप्रदाये । परि माते नेणती समवाये । जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये । म्हणऊनि यजिती ॥344॥
आता मी सर्वव्यापकरूपाने आहे असे न जाणून प्रत्येक सांप्रदायिक लोक अग्नि, इंद्र, सुर्य, चंद्र यांना मीच जाणून भजतात;
345-9
तेही कीर मातेचि होये । का जे हे आघवे मीचि आहे । परि ते भजती उजरी नव्हे । विषम पडे ॥345॥
ते त्यांचे पूजन खरोखर माझेच होते, कारण या सर्व जगात मीच भरून राहिलो आहे, परंतु ते त्यांचे भजन पद्धतशीर नसून चुकलेले असते
346-9.
पाहे पा शाखा पल्लव वृक्षाचे । हे काय नव्हती एकाचि बीजाचे । परि पाणी घेणे मुळाचे । ते मुळीचि घापे ॥346॥
हे पहा, वृक्षांच्या शाखा, पाने वगैरे एकाच बीजापासून उत्पन्न झालेली नव्हत का ? परंतु पाणी जे घालावयाचे, ते मुळाशीच घातले पाहिजे;
347-9
का दहाही इंद्रिये आहाती । इये जरी एकेचि देहीची होती । आणि इही सेविले विषयो जाती । एकाचि ठाया ॥347॥
किंवा दहा ईंद्रिये जरी एकाच देहाची आहेत, आणि त्यांनी सेवन केलेले विषय जरी एकाच ठिकाणी जातात,
348-9
तरि करोनि रससोय बरवी । कानी केवि भरावी । फुले आणोनि बांधावी । डोळा केवि ॥348॥
तरी उत्तम स्वयंपाक करून तो कानांत कसा घालावा ? आणि फुले आणून डोळ्यांनी कशी हुंगावी ?
349-9
तो रसु तो मुखेचि सेवावा । परिमळु तो घ्राणेचि घ्यावा । तैसा मी तो यजावा । मीचि म्हणोनि ॥349॥
तर अन्न हे तोंडानेच सेवन केले पाहीजे, आणि सुवास हा नाकानेच घेतला पाहिजे, त्याचप्रमाणे माझी पुजा करणे ती मीच समजून केली पाहिजे.
350-9
येर माते नेणोनि भजन । ते वायाचि गा आनेआन । म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान । ते निर्दोष होआवे ॥350॥
एरव्ही, मला न जाणता जे भजन ते, करणे काही तरी असून व्यर्थ होय. म्हणून, कर्म आचरण्यास ज्ञान ही दृष्टि आहे; तर ते ज्ञान निर्दोष असे झाले पाहिजे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
न तु मामभिजानंति तत्वेनातश्च्यवंति ते । 9. 24 ।
351-9
एऱ्हवी पाहे पा पंडुसुता । या यज्ञोपहारा समस्ता । मीवाचूनि भोक्ता । कवणु आहे ॥351॥
अर्जुना, एरव्ही असे पहा की, या सर्व यज्ञोपचारांचा माझ्यावाचून दुसरा कोण भोक्ता आहे ?
352-9
मी सकळा यज्ञांचा आदि । आणि यजना या मीचि अवधि । की माते चुकोनि दुर्बुद्धि । देवा भजले ॥352॥
मी सकळा यज्ञांचा आदि । आणि मी सर्व यज्ञांचा आदि आहे, व यजनाचा शेवटही मीच आहे; परंतु दुर्बुद्धि जे असतात, ते मला सोडून इंद्रादि देवांसभजतात.
353-9
गंगेचे उदक गंगे जैसे । अर्पिजे देवपित्तरोद्देशे । माझे मज देती तैसे । परि आनानी भावी ॥353॥
ज्याप्रमाणे गंगेचे पाणी देव व पितर यांच्या नांवाने गंगेतच अर्पण करतात, त्याप्रमाणे ते माझे मलाच देतात
354-9
म्हणऊनि ते पार्था । माते न पवतीचि सर्वथा । मग मनी वाहिली जे आस्था । तेथ आले ॥354॥
पण निराळ्या भावाने! म्हणून पार्था, ते कधीही मला पावत नाहीत; मग मनात जी इच्छा धारण करतात, त्या ठिकाणी ते जातात.
यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रता: ।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥9. 25॥
355-9
मने वाचा करणी । जयांची भजने देवांचिया वाहणी । ते शरीर जातियेक्षणी । देवचि जाले ॥355॥
मन, वाचा व इंद्रिये यांच्या योगाने जे इंद्रादि देवाचे भजन करतात, ते, शरीर जाताक्षणीच देवरूप होतात.
356-9
अथवा पितरांची व्रते । वाहती जयांची चित्ते । जीवित सरलिया तयाते । पितृत्व वरी ॥356॥
अथवा, ज्यांच्या मनाने पितरांची व्रते करण्याचे घेतले आहे, त्यांना प्राणांती पितृलोक प्राप्त होतो; .
357-9
का क्षुद्रदेवतादि भूते । तियेंचि जयांची परमदैवते । जीही अभिचारिकी तयाते । उपासिले ॥357॥
किंवा वेताळादि पिशाच व शुद्र देव ही ज्यांची परम दैवते आहेत, व ज्यांनी घातक अशा जारणमारण कर्मांनी त्यांची उपासना केली आहे,
358-9
तया देहांची जवनिक फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली । एवं संकल्पवशे फळली । कर्मे तया ॥358॥
त्यांना देहाचा पडदा पडतांच पिशाचयोनीची प्राप्ति होते. अशा प्रकारे त्यांच्या संकल्पाप्रमाणे त्यांची कर्मे त्यांना फळतात!
359-9
मग मीचि डोळा देखिला । जीही कानी मीचि ऐकिला । मनी मी भाविला । वानिला वाचा ॥359॥
मग जे दृष्टीने मलाच पाहतात, कानांनी माझ्याच नांवाचे श्रवण करतात, मनाने माझेच ध्यान करतात, व माझेच वर्णन करतात,
360-9
सर्वागी सर्वाठायी । मीचि नमस्कारिला जिही । दानपुण्यादिके जे काही । ते माझियाचि मोहरा ॥360॥
सर्वागाने व सर्व ठिकाणी मलाच नमस्कार करतात, दाने, पुण्य वगैरे सर्व काही माझ्याच उद्देशाने करतात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
361-9
जिही मातेचि अध्ययन केले । जे आंतबाहेर मियाचि धाले । जयांचे जीवित्व जोडले । मजचिलागी ॥361॥
ज्यांनी माझ्या नामस्मरणाचेच अध्ययन केले आहे, जे माझ्याच योगाने अंतर्बाह्य तृप्त झाले आहेत, ज्यांनी आपले आयुष्य माझ्याकडेच खर्च केले आहे,
362-9
जे अहंकारु वाहत आंगी । आम्ही हरीचे भूषावयालागी । जे लोभिये एकचि जगी । माझेनि लोभे ॥362॥
ज्यांना माझ्याशिवाय दुसऱ्या कसल्याही प्राप्तीची इच्छा नाही; आम्ही हरिची कीर्ती वाढविणारे आहो असा जे अहंकार बाळगतात,
363-9
जे माझेनि कामे सकाम । जे माझेनि प्रेमे सप्रेम । जे माझिया भुली सभ्रम । नेणती लोक ॥363॥
माझीच इच्छा करून ज्यांची इच्छा पूर्ण होते, जे मजवरच प्रेम ठेवून आनंदित होतात, जे माझ्याच मुळे वेडावून जाऊन लोकांची पर्वा करीतनासे होतात,
364-9
जयांची जाणती मज शास्त्रे । मी जोडे जयाचेनि मंत्रे । ऐसे जे चेष्टामात्रे । भजले मज ॥364॥
मलाच जाणणे हीच ज्यांची शास्त्रे आहेत, आणि ज्यांच्या गुरुमंत्राने इतरांना माझीप्राप्ति होते, व अशा प्रकारे जे सर्व व्यवहारांत माझ्याशिवाय इतर कोणाचेच भजन करीत नाही,
365-9
ते मरणाऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे । मग मरणी आणिकीकडे । जातील केवि ॥365॥
ते मरणाच्या अगोदरच मद्रूप होऊन जातात; मग मरणानंतर माझ्याशिवाय दुसरीकडे कसे जातील ?
366-9
म्हणोनि मद्याजी जे जाहाले । ते माझिया सायुज्या आले । जिही उपचारमिषे दिधले । आपणपे मज । 366 ।
म्हणून, माझे यजन करणारे जे होतात, ते माझ्यात मिसळतात; कारण त्यांनी सेवेच्या मिषाने आपलेपणा मला अर्पण केला आहे.
367-9
पै अर्जुना माझा ठायी । आपणपेवीण सौरसु नाही । मी उपचारी कवणाही । नाकळे गा ॥367॥
अर्जुना, माझ्या ठिकाणी आत्मत्व समर्पण केल्याशिवाय माझ्यावर त्यांचे खरे प्रेम उत्पन्न होत नाही. म्हणून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मी प्राप्त होत नाही
368-9
एथ जाणिव करी तोचि नेणे । आथिलेपण मिरवी तेचि उणे । आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे । तो काहीचि नव्हे l368l
मजविषयी ज्ञान झाले असे जो म्हणतो, त्याला खरोखर माझे ज्ञान होत नाही. मी कृतार्थ झालो असे जो दाखवितो, तो कृतार्थ होत नाही.
369-9
अथवा यज्ञदानादि किरीटी । का तपे हन जे हुटहुटी । ते तृणा एकासाठी । न सरे एथ ॥369॥
अथवा, हे किरीटी, आम्ही यज्ञ केले; आम्ही धर्म केला, किंवा आम्ही तप केले, अशी जी घमेंड बाळगतात, त्यांना माझ्या प्राप्तीच्या मानाने पाहिले असता काडीइतकीही योग्यता नसते.
370-9
पाहे पा जाणिवेचेनि बळे । कोण्ही वेदापासूनि असे आगळे । की शेषाहूनि तोंडागळे । बोलके आथी ॥370॥
हे पहा, ज्ञानबलात वेदाहून कोणी अधिक जाणता आहे काय ? किंवा शेषापेक्षा बोलण्यात किंवा मुखांनी कोणी अधिक आहे काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-9
तोही आंथरुणातळवटी दडे । येरु नेति नेति म्हणोनि बहुडे । एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥371॥
पण तो शेषही ज्याच्या अंथरूणाखाली दडतो, वेदही ” नेति नेति ” म्हणून मागे सरतो, तसेच सनकादिक पूर्ण ब्रह्मज्ञानीही ज्याच्याविषयी वेडे झाले आहेत;
372-9
करिता तापसांची कडसणी । कवणु जवळा ठेविजे शूळपाणी । तोहि अभिमानु सांडूनि पायवणी । माथा वाहे ॥372॥
तपस्व्यांची गणती करू लागले तर महादेवाच्या योग्यतेला दुसरा कोण लागेल ? परंतु त्यानेही अभिमान सोडून ज्याचे पादोदक म्हणजे भागीरथी आपले मस्तकावर धारण केली आहे;
373-9
नातरी आथिलेपणे सरिसी । कवणी आहे लक्ष्मियेऐसी । श्रियेसारिखिया दासी । घरी जियेते ॥373॥
किंवा संपन्नपणात लक्ष्मीपेक्षा कोणी अधिक आहे का ? तिच्या घरी सिद्धीसारख्या दासी आहेत. ,
374-9
तिया खेळता करिती घरकुली । तया नामे अमरपुरे जरि ठेविली । तरि न होती काय बाहुली । इंद्रादिक तयांची ? ॥374
त्या दासी आपल्या खेळांत जी घरकुली करतात, त्यांचे नाव जर अमरपुरी ठेविले, तर इंद्रादिक देव हे त्यांच्या घरकुल्यातील बाहुली होणार नाहीत काय ?
375-9
तया नावडोनि जेव्हा मोडती । तेव्हा महेंद्राचे रंक होती । तिया जेउते झाडा पाहती । ते कल्पवृक्ष ॥375॥
पुढे त्या दासींना ती घरकुली न आवडून जेंव्हा ती मोडतात, तेंव्हा इंद्राचे रंक बनतात व त्या ज्या झाडाकडे पाहतात, ती झाडे कल्पवृक्ष होतात;
376-9
ऐसे जियेचिया जवळिका । सामर्थ्य घरीचिया पाइका । ते लक्ष्मी मुख्यनायका । न मनेचि एथ ॥376॥
असे जिच्या घरातील दासींचे सामर्थ्य आहे, त्या पट्टराणी श्रीलक्ष्मीचीहीया ठिकाणी प्रतिष्ठा नाही.
377-9
मग सर्वस्वे करुनि सेवा । अभिमान सांडूनि पांडवा । ते पाय धुवावयाचिया दैवा । पात्र जाहाली ॥377॥
मग अर्जुना, मनोभावाने सेवा करून व सर्व अभिमान टाकून ती पाय घुण्याच्या अधिकारास पात्र झाली! म्हणून,
378-9
म्हणोनि थोरपण पऱ्हाचि सांडिजे । व्युत्पत्ति आघवी विसरिजे । जै जगा धाकुटे होइजे । तै जवळीक माझी 378॥
म्हणून, थोरपणा एकीकडे ठेवून व सर्व शास्त्रीय ज्ञान विसरून जेंव्हा जगतांत नम्रपणाने वागावे, तेव्हांच माझी प्राप्ति होते. हे किरीटी, ज्या ठिकाणी सुर्याचे तेजापुढे चंद्रही लोपून जातो,
379-9
अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी । पुढा चंद्रही लोपे किरीटी । तेथ खद्योत का हुटहुटी । आपुलेनि तेजे ॥379॥
हे किरीटी, ज्या ठिकाणी सुर्याचे ते जापुढे चंद्रही लोपून जातो, तेथे काजव्याने आपल्या तेजाबद्दल का घमेंड मारावी ?
380-9
तैसे लक्ष्मियेचे थोरपण न सरे । जेथ शंभूचेही तप न पुरे । तेथ येर प्राकृत हेंदरे । केवि जाणो लाहे ॥380॥
त्याचप्रमाणे, लक्ष्मीचेही ऐश्वर्य जेथे शोभत नाही, व शंभूचे तपही पुरत नाही, त्या ठिकाणी अज्ञानी व हेंदरा मला कसा जाणू शकेल ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-9
यालागी शरीरसांडोवा कीजे । सकळगुणांचे लोण उतरिजे । संपत्तिमदु सांडिजे । कुरवंडी करुनी ॥381॥
याकरिता, सर्व अभियान टाकून, सर्व गुणांचे लिंबलोण उतरून, आणि संपत्तीचा मद सोडून आपला देह मजवरून ओवाळून टाकला पाहिजे.
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥9. 26॥
382-9
मग निस्सीमभाव उल्हासे । मज अर्पावयाचेनि मिसे । फळ एक आवडे तैसे । भलतयाचे हो ॥382॥
नंतर, दृढ भक्तीने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने, हव्या त्या झाडाचे हवे ते फळ
383-9
भक्तु माझियाकडे दावी । आणि मी दोन्ही हात वोडवी । मग देठु न फेडिता सेवी । आदरेसी ॥383॥
भक्ताने माझ्या पुढे केले म्हणजे मी ते दोन्ही हात पुढे करून घेतो, व त्याचा देंठ न तोडता ते आदराने सेवन करतो.
384-9
पै गा भक्तीचेनि नांवे । फूल एक मज द्यावे । ते लेखे तरि म्या तुरंबावे । परि मुखीचि घाली ॥384॥
हे पहा, भक्तिभावाने जर मला कोणी एखादे फूल दिले, तर वास्तविक पाहता ते हुंगावयाचे; पण ते सोडून देऊनप्रेमाच्या भरांत मी तोंडातच घालतो! फार काय सांगावे ?
386-9
हे असो कायसी फुले । पानचि एक आवडे ते जाहले । ते साजुकही न हो सुकले । भलतैसे ॥385॥
फुलेचशी काय, परंतु मला एका झाडाचे पानही प्रिय आहे; मग ते कोणत्याही झाडाचे आणि ताजे किंवा सुकलेले कसेही असो,
386-9
परि सर्वभावे भरले देखे । आणि भुकेला अमृते तोखे । तैसे पत्रचि परि तेणे सुखे । आरोगू लागे ॥386॥
पण ते भक्तिभावाने अर्पण केलेले आहे असे पाहतांच, ज्याप्रमाणे एखादा क्षुधित मनुष्य अमृताने तृप्त होतो, त्याप्रमाणे भक्तिभावाने अर्पण केलेले ते पान अमृततुल्य मानुन मी खाऊ लागतो.
387-9
अथवा ऐसेही एक घडे । जे पालाही परि न जोडे । तरि उदकाचे तव सांकडे । नव्हेल की ॥387॥
अथवा एखाद्या वेळेस अशी गोष्ट घडली की, झाडाला कोठेंच पाला नाही, पण पाणी मिळण्याचे तर संकट पडणार नाहींना ?
388-9
ते भलतेथ निमोले । न जोडिता आहे जोडले । तेचि सर्वस्व करुनि अर्पिले । जेणे मज ॥388॥
ते वाटेल त्या ठिकाणी फुकट मेहनतीशिवाय मिळते. तेच मला मनोभावाने अर्पण करतो,
389-9
तेणे वैकुंठापासोनि विशाळे । मजलागी केली राऊळे । कौस्तुभाहोनि निर्मळे । लेणी दिधली ॥389॥
त्याने माझ्याकरिता वैकुंठाहूनही मोठी देवळे बांधल्याप्रमाणेव कौस्तुभ मण्याहूनही तेजस्वी असे दागिने दिल्याप्रमाणे होते.
390-9
दूधाची शेजारे । क्षीराब्धीऐसी मनोहरे । मजलागी अपारे । सृजिली तेणे ॥390॥
त्याने दुधासारखी स्वच्छ व क्षीरसमुद्रांतील लाटांप्रमाणे फुगीर व मनोहर अशी अगणित शय्यास्थाने माझ्याकरिता निर्माण केल्याप्रमाणे आहेत.
391-9
कर्पूर चंदन अगरु । ऐसेया सुगंधाचा महामेरु । मज हाती लाविला दिनकरु । दीपमाळे ॥391॥
कापूर, चंदन, कृष्णागरू अशा सुगंधाच्या महामेरूएवढाल्याढिगांनी माझ्यापुढे काडवाती लावून सुर्याची दीपमाळ पाजळल्याप्रमाणेआहे;
392-9
गरुडासारिखी वाहने । मज सुरतंरुची उद्याने । कामधेनूची गोधने । अर्पिली तेणे ॥392॥
त्याने गरूडासारखी वाहने, कल्पतरूच्या बागा, व कामधेनूची खिल्लारे मला अर्पण केल्याप्रमाणे आहेत.
393-9
मज अमृताहूनि सुरसे । बोनी वोगरिली बहुवसे । ऐसा भक्तांचेनि उदकलेशे । परितोषे गा ॥393॥
मला अमृताहूनही गोड अशी पुष्कळ पक्वान्ने वाढून जो संतोष होतो, तो अशा भक्तियुक्त अंतःकरणाने अर्पण केलेल्या पाण्याच्या थेंबापासून होतो.
394-9
हे सांगावे काय किरीटी । तुम्हीचि देखिले आपुलिया दिठी । मी सुदामयाचिया सोडी गाठी । पव्हयालागी ॥ 394॥
हे किरीटी, मी पोह्यांसाठी सुदामजीच्या जवळील गांठोडीच्या गाठी सोडल्या, त्या तू पाहिल्या आहेस ना ? हे तुला सांगितले पाहिजे का ?
395-9
पै भक्ति एकी मी जाणे । तेथ साने थोर न म्हणे । आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥395॥
म्हणून, मी फक्त एक भक्ति ओळखतो. त्या ठिकाणी लहानथोर हे मनात आणीत नाही; आणि वाटेल त्याने भक्तीची मेजवानी केली असता आम्ही तिचा आदर करतो.
396-9
येर पत्र पुष्प फळ । ते भजावया मिस केवळ । वाचूनि आमुचा लाग निष्फळ । भक्तितत्व ॥396॥
एरव्ही पत्रे, पुष्पे, फळे, ही आमची भक्ती करण्याकरिता केवळ निमित्तमात्र आहेत. याशिवाय भक्तितत्वाखेरीजइतर सर्व सामुग्री आम्ही व्यर्थ समजतो.
397-9
*म्हणोनि अर्जुना अवधारी । तू बुद्धि एकी सोपारी करी । तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी । न विसंबे माते ॥397॥
म्हणून, ऐक; तू आपली बुद्धि स्वाधीन करून नेहमी आपल्या मनोरूप मंदिरात माझा विसर पडू देऊ नको.
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥9. 27॥
398-9
जे जे काही व्यापार करिसी । का भोग हन भोगिसी । अथवा यज्ञी यजसी । नानाविधी ॥398॥
तू जे जे काही करशील, किंवा ज्या वस्तूंचा उपभोग घेशील, अथवा, ज्या पुष्कळ प्रकारच्या यज्ञांनी माझे यजन करशील,
399-9
नातरी पात्रविशेषे दाने । का सेवका देसी जीवने । तपादि साधने । व्रते करिसी ॥399॥
किंवा सत्पात्री जी जी दाने करशील, अथवा चाकरमाणसांस जी वेतने देशील आणि जी जी तपादि सर्व साधने व व्रते करशील,
400-9
ते क्रियाजात आघवे । जे जैसे निपजेल स्वभावे । ते भावना करोनि करावे । माझिया मोहरा ॥400॥
ती तुझ्या हातून सहजगत्या होणारी सर्व कर्मे तू माझ्या उद्देशाने भक्तिपुरःस्सर कर
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
401-9
परि सर्वथा आपुला जीवी । केलियाची शंका काहीचि नुरवी । ऐसी धुवोनि कर्मे द्यावी । माझिया हाती ॥401॥
परंतु ती केल्याबद्दलची आपल्या मनात आठवणही राहू नये इतक्या निष्कामतेने ती सर्व मला अर्पण कर.
शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनै: ।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥9. 28॥
402-9
मग अग्निकुंडी बीजे घातली । तिये अंकुरदशे जेवि मुकली । तेवि न फळतीचि मज अर्पिली । शुभाशुभे ॥402॥
मग, ज्याप्रमाणे अग्नीत भाजलेल्या बीजाला अंकुर येत नाहीत, त्याप्रमाणे मला अर्पण केलेल्या शुभाशुभ कर्माची फलप्राप्ती तुला होणार नाही.
403-9
अगा कर्मे जै उरावे । तै तिही सुखदुःखी फळावे । आणि तयाते भोगावया यावे । देहा एका ॥403॥
अरे, जर कर्म उरले, तर त्याच्यापासून सुखदुःख भोगावे लागते, व ते भोगण्याकरिता जन्म घ्यावा लागतो.
404-9
ते उगाणिले मज कर्म । तेव्हाचि पुसिले मरण जन्म । जन्मासवे श्रम । वरचिलही गेले ॥404॥
तेच कर्म जर मला अर्पण केले, तर लागलीच जन्ममरण चुकते; आणि जन्माबरोबर त्याच्या पुढील भोगावयास लागणारे श्रमही चुकतात.
405-9
म्हणऊनि अर्जुना यापरि । पाहेचा वेळु नव्हेल भारी । हे संन्यासयुक्ति सोपारी । दिधली तुज ॥405॥
म्हणून अर्जुना, याप्रमाणे आजचे काम उद्यावरटाकलेस तर फलप्राप्तीला वेळ लागणार नाही काय ? म्हणून, सोपी अशी ही सर्व (कर्मफलाचा त्याग करण्याची) युक्ति तुला सांगितली.
406-9
या देहाचिया बांदोडी न पडिजे । सुखदुःखाचिया सागरी न बुडिजे । सुखे सुखरुपा घडिजे । माझिया आंगा ॥406॥
आता या देहाच्या बंधनांत न पडता व सुखदुःखाच्या सागरांत न बुडता, अनायासाने, संतोषकारक असे जे माझे रुप, त्यात मिसळून जा.
समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय: ।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥9. 9॥
407-9
तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूती सदा सरिसा । जेथ आपपरु ऐसा । भागु नाही ॥407॥
तो मी कसा आहे म्हणून विचारशील, तर सर्व भूतांचे ठिकाणी नेहमी सारखा असून माझ्या ठिकाणी ‘ माझे ‘ व ‘तुझे ‘ असा भेद नाही.
408-9
जे ऐसिया माते जाणोनि । अहंकाराचा कुरुठा मोडोनि । जे जीवे कर्मे करुनि । भजती माते ॥408॥
जे अशा माझ्या स्वरूपाला जाणतात, व अहंकाराचा बीमोड करून कायावाचामनाने कर्मे करून मला भजतात,
409-9
ते वर्तत दिसती देही । परि ते देही ना माझा ठायी । आणि मी तयांचा हृदयी । समग्र असे ॥409॥
ते जगात देहाने जरी व्यापार करीत असले, तरी त्यांचे चित्त इकडे नसुन माझे ठिकाणी असते, आणि मीही त्यांच्या ह्रदयात पूर्ण भरलेला असतो.
410-9
सविस्तर वटत्व जैसे । बीजकणिकेमाजी असे । आणि बीजकणु वसे । वटी जेवी ॥410॥
ज्याप्रमाणे विस्तारासह वडाचे मोठे झाड वडाच्या बीजांतच असते व बीज त्या झाडातच असते,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
411-9
तेवी आम्हा तया परस्परे । बाहेरी नामाचीचि अंतरे । वाचुनि आंतुवट वस्तुविचारे । मी तेचि ते ॥411॥
त्याप्रमाणे माझ्यात व त्यांच्यात केवळ नांवाचेच अंतर असते, बाकी अंतःस्थितीचा विचार करून पाहता ते व मी हे एकच आहो.
412-9
आता जायांचे लेणे । जैसे आंगावरी आहाचवाणे । तैसे देह धरणे । उदास तयाचे ॥412॥
आता, लोकांचे मागून आणलेले दागिने अंगावर घालणे जसे व्यर्थ त्याचप्रमाणे त्यांचे देह धारण करणे उदासीनपणाचे असते.
413-9
परिमळु निघालिया पवनापाठी । मागे वोस फूल राहे देठी । तैसे आयुष्याचिये मुठी । केवळ देह ॥413॥
वाऱ्याबरोबर ज्याप्रमाणे फुलांचा वास त्याचे मागोमाग जातो, व देठापाशी फुल जसे वासरहीत राहते, त्याप्रमाणे, आयुष्याची मुदत संपविण्यापुरतांच ते देह धारण करतात.
414-9
येर अवष्टंभु जो आघवा । तो आरुढोनि मद्भावा । मजचि आंतु पांडवा । पैठा जाहला ॥414॥
हे पांडवा; जो अभिमान म्हणून आहे, तो सर्व माझी भक्ति पावून माझ्या स्वरूपांतच मिळाला.
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥9. 30॥
415-9
ऐसे भजतेनि प्रेमभावे । जया शरीरही पाठी न पवे । तेणे भलतया व्हावे । जातीचिया ॥415॥
अशा प्रेमभावाने जे मला भजतात; व ज्यांना हे शरीर पुनः प्राप्त होत नाही, ते हव्या त्या जातीचे असले तरी असोत;
416-9
आणि आचरण पाहाता सुभटा । तो दुष्कृताचा सेल वाटा । परि जीवित वेचिले चोहटा । भक्तीचिया की ॥416॥
आणी हे महावीरा त्यांचे आचरण जरी पाप करणाऱ्यात पहील्या प्रतीचे असले, तरी ज्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट भक्तीमार्गात केला आहे;
417-9
अगा अंतींचिया मती । साचपण पुढिले गती । म्हणोनि जीवित जेणे भक्ती । दिधले शेखी ॥417॥
अरे अंतकाली जी मनाला बुद्धि होते तीच गति खरोखर पुढील जन्मी प्राप्त होते; म्हणून आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ जो माझ़्या भक्तीत घालवितो,
418-9
तो आधी जरी अनाचारी । तरी सर्वोत्तमुचि अवधारी । जैसा बुडाला महापूरी । न मरतु निघाला ॥418॥
तो पुर्ववयात जरी दूराचरण करणारा असला, तरी तो सर्वौत्तमच आहे असे समज. एखाद्या मनुष्यांने महापुरांतच नदी अलीकडील कांठी उडी घातली, मग जरी सर्व मनुष्यास तो मेला असे वाटले,
419-9
तयाचे जीवित ऐलथडिये आले । म्हणोनि बुडालेपण जेवी वाया गेले । तेवी नुरेचि पाप केले । शेवटलिये भक्ती 419॥
तरी तो न मरता जसा पलीकडील काठाला महापूरांतून बाहेर निघावा व तसा जो जिवंत निघाल्यामुळे जसे त्याचे बुडालेपण व्यर्थ व्हावे, त्याचप्रमाणे पुर्ववयात केलेले पाप उत्तरवयातील ज्ञानोत्तर भक्तीने नाहीसे होते.
420-9
यालागी दुष्कृती जऱ्ही जाहला । तरि अनुतापतीर्थी न्हाला । न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावे ॥420॥
याकरिता, पापाचरण करणारा जरी असला तरी तो पश्चातापरूप तीर्थात न्हाऊन जर सर्वभावाने मला शरण आला,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
421-9
तरि आता पवित्र तयाचेचि कुळ । अभिजात्य तेचि निर्मळ । जन्मलेया फळ । तयासीच जोडले ॥421॥
तर त्याचे कुल पवित्र होते, तो निर्मल कुलीनपणास पावतो, व जन्मास आल्याचे फळ जी भक्ती तीही त्यालाच प्राप्तहोते.
422-9
तो सकळही पढिन्नला । तपे तोचि तपिन्नला । अष्टांग अभ्यासिला । योगु तेणे ॥422॥
त्याला सर्व शास्त्रे वगैरे अवगत होतात; त्याला तपाचेही आचरण केल्याचे श्रेय येते, व त्याला अष्टांगयोगसाधनाची सिद्धि मिळते.
423-9
हे असो बहुत पार्था । तो उतरला कर्मे सर्वथा । जयाची अखंड गा आस्था । मजचिलागी ॥423॥
पार्था, फार काय सांगावे ? तो सर्व कर्माच्या झपाट्यातून पार पडतो; व त्याचे सर्व प्रेम माझ्याच ठिकाणी असते.
224-9
अवघिया मनोबुद्धीचिया राहटी । भरोनि एकनिष्ठेचिया पेटी । जेणे मजमाजी किरीटी । निक्षेपिली ॥424॥
हे किरीटी, एकनिष्ठारूप पेटीत मनोबुद्धीचे सर्व व्यापार भरून ती माझ्यामध्ये जो ठेवितो,
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्त: प्रणश्यति ॥9. 31॥
425-9
तो आता अवसरे मजसारिखा होइल । ऐसाही भाव तुज जाइल । हा गा अमृताआंत राहील । तया मरण कैचे ॥425॥
तो काही अवकाशाने मजसारखा होणार असा जर तुझा कदाचित् समज होईल, तर पहा की, जो अमृतांत वास करील त्याला मरण कोठून प्राप्त होणार ?
426-9
पै सूर्य जो वेळु नुदैजे । तया वेळा की रात्र म्हणिजे । तेवी माझिये भक्तीविण जे कीजे । ते महापाप नोहे ॥426॥
हे बघ, ज्या वेळी सुर्य उदय पावत नाही, त्याच वेळेला रात्र असे म्हणतात; त्याचप्रमाणे, माझ्या भक्तीशिवाय जे करणे ते महापाप नव्हे काय ?
427-9
म्हणोनि तयाचिया चित्ता । माझी जवळीक पंडुसुता । तेव्हाचि तो तत्वता । स्वरुप माझे ॥427॥
म्हणून हे पंडुसुता, त्याच्या चित्ताला जेव्हा माझा योग होतो, तेव्हांच खरोखर तो माझ्या स्वरूपाला पावतो.
428-9
जैसा दीपे दीपु लाविजे । तेथ आदील कोण हे नोळखिजे । तैसा सर्वस्वे जो मज भजे । तो मी होऊनि ठाके ॥428॥
ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यात पहीला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे, जो सर्व भावाने मला भजतो, तो मद्रूपच होऊन राहतो.
429-9
मग माझी नित्य शांती । तया दशा तेचि कांती । किंबहुना जिती । माझेनि जीवे । 429॥
मग त्याला माझी स्थिति, माझी कांति व माझी नित्य शांति प्राप्त होते. फार तर काय, तो माझ्या जीवानेच जिवंत राहतो.
430-9
एथ पार्था पुढतपुढती । तेचि ते सांगो किती । जरी मिया चाड तरी भक्ती । न विसंबिजे गा ॥430॥
पार्था, येथे वारंवार तेच ते काय सांगुं ! पण जर कोणाला माझ्या प्राप्तीची इच्छा असेल, तर त्याने माझी भक्ती विसरता कामा नये.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
431-9
अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । अभिजात्य झणी श्लाघा । व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु का वहावा ॥431॥
अरे कुळाच्या चांगुलपणाची आवश्यकता नाही, चांगल्या जातीचीही अडचण नाही, आणखी मग विद्वत्तेचा तरी उगीच सोस पाहिजे कशाला ?
432-9
का रुपे वयसा माजा । आथिलेपणे का गाजा । एक भाव नाही माझा । तरी पाल्हाळ ते ॥432॥
अथवा रूपाची आणि वयाची प्रतिष्ठा किंवा डौल (ह्यापैकी काही सुद्धा नको) एक माझ्या ठिकाणी भक्ति नसली तर ही सर्व व्यर्थ.
433-9
कणेविण सोपटे । कणसे लागली आथी एक दाटे । काय करावे गोमटे । वोस नगर ॥433॥
दाण्याशिवाय रिकामी कणसे जरी पुष्कळ दाट लागली असती, अथवा सुंदर शहर असून ते जरओसाड असले; तर त्याला काय करावयाचे आहे ?
434-9
नातरी सरोवर आटले । रानी दुःखिया दुःखी भेटले । का वांझ फुली फुलले । झाड जैसे ॥434॥
किंवा मोठा तलाव असुन तो जर आटला, तसेच रानांत एका दुःखकष्टी मनुष्यास दुसरा तसाच भेटला, अथवा ज्याप्रमाणे वांझ फुलांनी एखादे झाड फुलले असावे,
435-9
तैसे सकळ ते वैभव । अथवा कुळजातीगौरव । जैसे शरीर आहे सावेव । परि जीवचि नाही ॥435॥
त्याचप्रमाणे सर्व वैभव, कुल अथवा जातीचा मोठेपणा व्यर्थ होय. जसे सर्व अवयवांनी युक्त शरीर असून त्यात फक्त जीव नसावा.
436-9
तैसे माझिये भक्तीविण । जळो ते जियालेपण । अगा पृथ्वीवरी पाषाण । नसती काई ॥436॥
त्याचप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय त्याचे जीवन व्यर्थ होय. अरे पृथ्वीच्या पाठीवर दगड नाहीत का ?
437-9
पै हिवराची दाट साउली । सज्जनी जैसी वाळिली । तैसी पुण्ये डावलूनि गेली । अभक्ताते ॥437॥
हे पहा हिवराची अगदी दाट सावली आहे; पण सज्जनांनी ती निषिद्ध मानली आहे, त्याचप्रमाणे जो माझी भक्ति करीत नाही, त्याला पुण्य डावलून (सोडुन) जाते.
438-9
निंब निंबोळिया मोडोनि आला । तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला । तैसा भक्तिहीनु वाढिन्नला । दोषांचिलागी ॥438॥
लिंब हा लिंबोळ्यांच्या भाराने वांकला, तरी त्यापासून ज्याप्रमाणे कावळ्यांनाच सुकाळ होतो, त्याप्रमाणे माझी भक्ति न करणारा पापाचीच जोड करण्याकरिता जगतो.
439-9
का षड्रस खापरी वाढिले । वाढूनि चोहटा रात्री सांडिले । ते सुणियांचेचि ऐसे झाले । जियापरी ॥439॥
किंवा ज्याप्रमाणे, षड्रस अन्नांनी भरलेले खापर चव्हाट्यावर ठेविले म्हणजे कुत्र्यांच्याच उपयोगाला येते,
440-9
तैसे भक्तीहीनाचे जिणे । जो स्वप्नीही परि सुकृत नेणे । तेणे संसारदुःखासी आवंतणे । वोगरिले गा ॥440॥
त्याप्रमाणे, जो स्वप्नातही पुण्यमार्गाचे आचरण जाणत नाही, त्या भक्तिहीनाचे जिणे म्हणजे संसारदुःखाला ताट वाढून ठेवल्याप्रमाणेंच होय.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
441-9
म्हणोनि कुळ उत्तम नोहावे । जाती अंत्याही व्हावे । वरि देहाचेनि नांवे । पशूचेही लाभो ॥441॥
म्हणून, उत्तम कुल नसले अथवा जातीने अंत्यज असला, व पशूचाही देह प्राप्त झाला असला, (तरी चालेल पण भक्ति पाहिजे. )
442-9
पाहे पा सावजे हातिरु धरिले । तेणे तया काकुळती माते स्मरिले । की तयाचे पशुत्व वावो जाहले । पातलिया माते॥442॥
पहा की नक्राने गजेद्राला धरल्यावर त्याने दीनपणाने माझे स्मरण केले, त्या वेळेस तो मजप्रत प्राप्त झाल्यामुळे त्याचे पशुत्व व्यर्थ झाले.
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय: ।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परा गतिम् ॥9. 32॥
443-9
अगा नांवे घेता वोखटी । जे आघवेया अधमांचिये शेवटी । तिये पापयोनीही किरीटी । जन्मले जे ॥443॥
हे किरीटी, जी अधमाहून अधम, व तिचे नांव देखील घेणे उचित नव्हे, अशा पापयोनीत ज्यांनी जन्म घेतला आहे;
444-9
ते पापयोनि मूढ । मूर्ख ऐसे जे दगड । परि माझा ठायी दृढ । सर्वभावे ॥444॥
जन्म तर अशा पापयोनीत व मूर्खपणाने केवळ दगड, परंतु माझ्या ठिकाणी सर्वस्वी दृढ भाव आहे.
445-9
जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टी भोगी माझेचि रुप । जयांचे मन संकल्प । माझाचि वाहे ॥445॥
ज्याच्या वाणीने माझा नामोच्चार होतो, जे दृष्टीने माझ्याच रूपाचा उपभोग घेतात, व ज्यांच्या मनात माझ्याशिवाय दुसरा संकल्पच नसतो;
446-9
माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाही श्रवण । जया सर्वागी भूषण । माझी सेवा ॥446॥
ज्यांचे कान माझा गुणानुवाद ऐकण्याशिवाय रिकामे नसतात, व ज्यांच्या सर्व अवयवांना माझ़्या सेवेशिवाय दुसरे कशाचेच भूषण नाही;
447-9
जयांचे नाव विषो नेणे । जाणीव मजचि एकाते जाणे । जया ऐसे लाभे तरी जिणे । एऱ्हवी मरण ॥447॥
ज्यांच्या बुद्धीला विषयांची आठवणही होत नाही, जे मला एकट्यालाच जाणतात, व ज्यांना या गोष्टी प्राप्त झाल्याशिवाय जिवंत राहण्यापेक्षा मरण बरे वाटते
448-9
ऐसा आघवाचि परि पांडवा । जिही आपुलिया सर्वभावा । जियावयालागी वोलावा । मीचि केला ॥448॥
हे पांडवा, अशा सर्व प्रकाराने जे आपला भाव सर्वस्वी मजवर ठेवून असतात; .
449-9
ते पापयोनीही होतु का । ते श्रुताधीतही न होतु का । परि मजसी तुकिता तुका । तुटी नाही ॥449॥
ते पापयोनीत जन्म घेतलेले असोतकिंवा शास्त्र देखील पडलेले नसोत, पण त्यांची माझ्याबरोबर तुलना केली असता ते मजपेक्षा कमी नाहीत.
450-9
पाहे पा भक्तिचेनि आथिलेपणे । दैत्यी देवा आणिले उणे । माझे नृसिंहत्व लेणे । जयाचिये महिमे ॥450॥
हे पहा कीं, भक्तीच्या महत्वाने दैत्यांनी देवांनाही मागे टाकले, व त्या भक्तीच्या महिम्याकरिता मला नरसिंह अवतार घ्यावा लागला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
451-9
तो प्रल्हादु गा मजसाठी । घेता बहुते सदा किरीटी । का जे मिया द्यावे ते गोष्टी । तयाचिया जोडे ॥451॥
हे किरीटी, ज्या प्रल्हादाला माझ्याकरिता पुष्कळांनी नेहमी छळले, तो, एका भक्तीने, मजपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी दुसऱ्यास प्राप्त करून देण्यास समर्थ झाला.
452-9
एऱ्हवी दैत्यकुळ साचोकारे । परि इंद्रिही सरी न लाहे उपरे । म्हणोनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण ॥452॥
बाकी वास्तविक पाहता त्याने दैत्यकुळात जन्म घेतलेला, पण त्याच्यापेक्षा अधिक मोठेपणा इंद्रालाही प्राप्त झालेला नाही; म्हणून माझी प्राप्ति करून घेण्याला एक भक्ति पूरे आहे; जात वैगेरेची काही एक चाड नाही
453-9
राजाज्ञेची अक्षरे आहाती । तिये चामा एका जया पडती । तया चामासाठी जोडती । सकळ वस्तु ॥453॥
राजाज्ञेची अक्षरे एका कातड्याचे तुकड्यावर जरी पडली; तरी त्या कातड्यापासून सर्व वस्तु प्राप्त होतात.
454-9
वाचूनि सोने रुपे प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे । तेचि चाम एक जै लाहे । तेणे विकती आघवी ॥454॥
त्या अक्षरांवाचून सोन्यारूप्याला किंमत नाही, तर येथे राजाज्ञा हीच मुख्य होय, व त्याच राजशिक्क्याच्याकातड्याने सर्व वस्तु विकत मिळतात.
455-9
तैसे उत्तमत्व तैचि तरे । तैचि सर्वज्ञता सरे । जै मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमे ॥455॥
त्याचप्रमाणे, जेंव्हा मन व बुद्धि ही माझ्याच प्रेमाने युक्त होतात, तेव्हांच मोठेपणा व सर्वज्ञपणा यांचा डौल शोभतो.
456-9
म्हणोनि कुळ जाति वर्ण । हे आघवेचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥456॥
म्हणून कुळ, जात, वर्ण हे निष्कारण आहेत. तर अर्जुना, फक्त माझी भक्ति केली असता सार्थक होते.
457-9
तेचि भलतेणे भावे । मन मजाआंतु येते होआवे । आले तरी आघवे । मागील वावो ॥457॥
ती माझी भक्ति वाटेल त्याने मनोभावाने केली असता, तो पुर्वी कोणत्याही वर्णातला असला तरी चिंता नाही.
458-9
जैसे तवंचि वहाळ वोहळ । जव न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारुप ॥458॥
ओढे जोपर्यंत गंगेस मिळाले नाहीत तोपर्यंतच त्यास ओहोळ, वहाळ वैगेरे म्हणतात, पण ते गंगेस मिळाल्यावर जसे गंगारूपच होतात,
459-9
का खैर चंदन काष्ठे । हे विवंचना तवचि घटे । जव न घापती एकवटे । अग्नीमाजी ॥459॥
किंवा लाकडे जोपर्यंत अग्नीत घातली नाहीत तोपर्यंतच त्यास खैर, चंदन अशी नावे असतात.
460-9
तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । का शूद्र अंत्यादि इया । जाती तवचि वेगळालिया । जव न पवती माते ॥460॥
त्याचप्रमाणे, जोपर्यंत मद्रूपता प्राप्त झाली नाही, तोपर्यंतच क्षत्रिय, वैश्य, स्त्री, शुद्र, अंत्यज इत्यादि जाति वेगळाल्या असतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
461-9
मग जाती व्यक्ती पडे बिंदुले । जेव्हा भाव होती मज मीनले । जैसे लवणकण घातले । सागरामाजी ॥461॥
मनोभावाने मला शरण आल्यावर जाति, व्यक्ति वगैरे भेद नाहीसा होतो. ज्याप्रमाणे समुद्रांत मीठ घातल्यावरएकरूप होऊन जाते,
462-9
तंववरी नदानदीची नांवे । तवचि पूर्वपश्चिमेचे यावे । जव न येती आघवे । समुद्रामाजी ॥462॥
जोपर्यंत समुद्राला येऊन मिळाले नाहीत, तोपर्यंत नद, नदी, पूर्ववाहिनी, पश्चिमपाहिनी वगैरे भेद असतो;
463-9
हेचि कवणे एके मिसे । चित्त माझा ठायी प्रवेशे । येतुले हो मग आपैसे । मी होणे असे ॥463॥
त्याचप्रमाणे, कोणत्याही निमीत्ताने माझ्याकडे चित्त लागले म्हणजे पुरे; मग सहजच मद्रूपत्व प्राप्त होते
464-9.
अगा वरी फोडावयाचि लागी । लोहो मिळो का परिसाचा आंगी । का जे मिळतिये प्रसंगी । सोनेचि होईल ॥464॥
अरे, परिसाला फोडण्याकरिता जरी लोखंडाने स्पर्श केला, तरी त्याचे लागलीच सोने होते.
465-9
पाहे पा वालभाचेनि व्याजे । तिया व्रजांगनांची निजे । मज मीनलिया काय माझे । स्वरुप नव्हतीचि ॥465॥
हे पहा, गोपींनी प्रीतीच्या मिषाने माझे ठिकाणी आपले चित्त ठेवले तरी त्या मद्रूप झाल्या नाहीत का ?
466-9
नातरी भयाचेनि मिसे । माते न पविजेचि काय कंसे । की अखंड वैरवशे । चैद्यादिकी ॥466॥
किंवा भीतीच्या योगाने कंस मद्रूप झाला नाही का ? किंवा माझ्याशी अखंड वैर केल्याने शिशुपालादिक मद्रूप झाले नाहीत का ?
467-9
अगा सोयरेपणेचि पांडवा । माझे सायुज्य यादवा । की ममत्वे वासुदेवा- । दिका सकळा ॥467॥
अरे, तसेच पांडव व यादव यास सोयरिकीच्या नात्याने व वासुदेवादिक यांना ममत्वाने माझे सायुज्य मिळाले नाही का ?
468-9
नारदा ध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा । या भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥468॥
हे धनुर्धरा, नारद, धृव, अक्रूर, शुक्र आणि सनतकुमार यांना जसा मी भक्तीने प्राप्त झालो आहे, .
469-9
तैसाचि गोपीसी कामे । तया कंसा भयसंभ्रमे । येरा घातकेया मनोधर्मे । शिशुपालादिका ॥469॥
तसाच गोपींना विषयबुद्धीने, कंसाला भीतीने, व शिशुपालादिकांनावैरबुद्धीने मी प्राप्त झालो आहे, .
470-9
अगा मी एकुलाणीचे खागे । मज येवो ये भलतेनि मार्गे । भक्ती का विषये विरागे । अथवा वैरे ॥470॥
अरे, मीनिर्वाणीचे स्थान आहे, म्हणून मला वाटेल त्या मार्गाने – भक्तीने, विषयबुद्धीने, विरक्ततेने अथवा वैराने- कोणीही प्राप्त झाला असता हरकत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
471-9
म्हणोनि पार्था पाही । प्रवेशावया माझा ठायी । उपायांची नाही । केणि एथ ॥471॥
म्हणून पार्था, हे पहा की, मला येऊन मिळण्याकरिता येथे उपायांची उणीव नाही.
472-9
आणि भलतिया जाती जन्मावे । मग भजिजे का विरोधावे । परि भक्त का वैरिया व्हावे । माझियाचि ॥472॥
आणि वाटेल त्या जातीत जन्महोवो आणि माझी भक्ति करो अथवा वैर करो; परंतु भक्त किंवा वैरी जे व्हावयाचे, ते माझेच व्हावे.
473-9
अगा कवणे एके बोले । माझेपण जऱ्ही जाहाले । तरी मी होणे आले । हाता निरुते ॥473॥
अरे कोणत्याही निमीत्ताने जर मला कोणी शरण आला, तर मद्रूप होणे हे अगदी त्याच्या हातचे आहे.
474-9
यापरि पापयोनीही अर्जुना । का वैश्य शूद्र अंगना । माते भजता सदना । माझिया येती ॥474॥
यास्तव हे अर्जुना, पापयोनीत जन्म घेतलेले, किंवा वैश्य, शुद्र, स्त्रिया यांनी माझी भक्ति केली असता ते माझ्याजवळ येतात.
किं पुनर्ब्राह्मणा:पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥9. 33॥
475-9
मग वर्णांमाजी छत्रचामर । स्वर्ग जयांचे अग्रहार । मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ॥475॥
मग, स्वर्गलोक म्हणजे ज्यांचे केवळ इनामगावच; आणि जे मंत्रविद्येचे माहेरघरच; जे सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ ब्राह्मण
476-9
जेथ अखंड वसिजे यागी । जे वेदांची वज्रांगी । जयाचिये दिठीचा उत्संगी । मंगळ वाढे ॥476॥
जे पृथ्वीवरील देवच; जे तपश्चर्येचे मूर्तिमंत अवतार; ज्यांच्या योगाने सर्व तीर्थाचे दैव उदय पावले आहे;
477-9
जे पृथ्वीतळींचे देव । जे तपोवतार सावयव । सकळ तीर्थांसी दैव । उदयले जे ॥477॥
ज्यांच्या ठिकाणी यज्ञाचा अखंड वास, जे वेदांची बळकट कवचे, व ज्यांच्या दृष्टींच्या संबंधाने सर्व ठिकाणी मंगलाची वृद्धि होते
478-9
जयाचिये आस्थेचिये वोले । सत्कर्म पाल्हाळी गेले । संकल्पे सत्य जियाले । जयांचेनि ॥478॥
ज्यांच्या आस्तारूप ओलाव्याने सत्कर्माचा प्रसार झाला, व ज्यांच्या निश्चयाने सत्य कायम राहिले;
479-9
जयांचेनि गा बोले । अग्नीसि आयुष्या जाहाले । म्हणोनि समुद्रे पाणी आपुले । दिधले यांचिया प्रीती ॥479॥
ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले म्हणून त्यांच्या प्रीतीस्तव अग्नीला समुद्राने आपल्या ठिकाणी आश्रय दिला.
480-9
मिया लक्ष्मी डावलोनि केली परौती । फेडोनि कौस्तुभ घेतला हाती । मग वोढविली वक्षस्थळाची वाखती । चरणरजा ॥480॥
मी लक्ष्मीला ढकलून पलीकडे केली, व कौस्तुभ मणि गळ्यातून काढून हातात घेतला;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
481-9
आझूनि पाउलांची मुद्रा । मी हृदयी वाहे गा सुभद्रा । जे आपुलिया दैवसमुद्रा । जतनेलागी ॥481॥
आणि मग ज्यांच्या चरणरजाच्या प्राप्तीकरिता मी आपल्या उराची खळगी म्हणजे छाती पुढे केली; ; हे नरेंद्रा, माझा शांतपणाचा लौकीक कायम राहण्याकरिता ज्यांच्या पावलाची खूण मी अजून आपल्या ह्रदयावर बाळगली आहे
482-9
जयांचा कोप सुभटा । काळाग्निरुद्राचा वसौटा । जयांचा प्रसादी फुकटा । जोडती सिद्धी ॥482॥
ज्यांचा कोप म्हणजे काळ, अग्नी व रुद्र यांचे वसतिस्थान होय, व जे प्रसन्न झाले असता फुकट सिद्धि प्राप्त होतात,
483-9
ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । आणि माझा ठायी आर्तिनिपुण । आता माते पावती हे कवण । समर्थणे ॥483॥
असे पुण्यपुज्य जे ब्राह्मण, आणि त्यातून माझे ठिकाणी पूर्ण भक्ति करितात, ते मद्रूप होतात, यात सिद्ध ते काय करावयाचे आहे ?
484-9
पाहे पा चंदनाचेनि अंगानिळे । शिवतिले निंब होते जे जवळे । तिही निर्जिवीही देवांची निडळे । बैसणी केली ॥484॥
हे पहा, चंदनाच्या अंगवायूने स्पर्श केलेल्या जवळच्या कमी किंमतीच्या लिंबासही जर देवाच्या मस्तकावर स्थान मिळते
485-9
मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसे मनी कैसेनि धरावे । अथवा पातला हे समर्थावे । तेव्हा कायि साच ॥485॥
तर मग चंदनाचे वास्तव्य तेथे घडणार नाही, अशी मनात शंका कशी धरावी ? अथवा, त्या ठिकाणी त्याचे वास्तव्य घडले असे सांगितल्यावर खरे वाटावे,
486-9
जेथ निववील ऐसिया आशा । हरे चंद्रमा आधा ऐसा । वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥486॥
नाही तर खोटे का होईल ?विष प्राशन केल्याने त्यापासून होणाऱ्या दाहाचे शमन होईल अशा आशेने, शंकरांनी मस्तकावर निरंतर अर्धचंद्रधारण केला,
487-9
तेथ निवविता आणि सगळा । परिमळे चंद्राहूनि आगळा । तो चंदनु केवि अवलीळा । सर्वागी न बैसे ॥487॥
तर दाहाचे शमन करणारा, व पुर्ण आणि चंद्राहून सुवासाने अधिक असा जो चंदन, तो सर्वागावर सहजचका धारण केला जाणार नाही ?
488-9
का रथ्योदके जियेचिये कासे । लागलिया समुद्र जाली अनायासे । तिये गंगेसि काय अनारिसे । गत्यंतर असे ॥488॥
किंवा रस्त्यावरील उदक जिच्यात मिळाल्यामुळे समुद्रात सहज जाऊन मिळतात त्या गंगेला समुद्राशिवाय दुसरीगति आहे काय ?
489-9
म्हणोनि राजर्षि का ब्राह्मण । जया गती मती मीचि शरण । तया त्रिशुद्धी मीच निर्वाण । स्थितिही मीचि ॥489॥
म्हणून ज्यांना गति व ज्ञान देणारा आणी ज्यांचे रक्षण करनारा मीच आहे, त्या राजर्षीना व ब्राह्मणांना भुक्ति व मुक्ति खरोखर मीच आहे.
490-9
यालागी शतजर्जरे नावे । रिगोनि केवि निश्चिंत होआवे । कैसेनि उघडिया असावे । शस्त्रवर्षीं ॥490॥
यास्तव शतावधि छिद्रांच्या नावेत बसून आपण बुडनार नाही अशा भरवशाने निष्काळजी कसे राहावे ? तसेच शस्त्रांचा वर्षाव चालला असता आपल्याला दुखापत होणार नाही अशा भरंवशाने उधड्या अंगाने कसे फिरावे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
491-9
अंगावरी पडता पाषाण । न सुवावे केवि वोडण । रोगे दाटलिया आणि उदासपण । वोखदेसी ॥491॥
अंगावर दगड पडत असता ढाल का न पुढे करावी ? रोगाने त्रस्त असता औषध घेण्याविषयी कसे उदासीन असावे ?
492-9
जेथ चहूकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केवि पांडवा । तेवि लोका येऊनिया सोपद्रवा । केवि न भजिजे माते ॥492॥
हे अर्जुना चोहोकडुन वणवा लागल्यावर तेथुन बाहेर कसे पंडु नये ? त्याचप्रमाणे उपद्रवासहीत असलेला जो मृत्युलोक त्यात जन्मल्यावर माझे भजन का न करावे ?
493-9
अगा माते न भजावयालागी । कवण बळ पा आपुला आंगी । काइ घरी की भोगी । निश्चिती केली ॥493॥
अरे, मला न भजण्याविषयी मनुष्यांच्या अंगी असे कोणते सामर्थ्य आहे ? त्यांच्या घरी सर्व भोग्य वस्तुंची समृद्धि असल्यामुळे ते निष्काळजी झाले काय ?
494-9
नातरी विद्या की वयसा । या प्राणियासि हा ऐसा । मज न भजता भरवसा । सुखाचा कोण ॥494॥
का, मला न भजता विद्या, तारूण्य यापासुन सुखप्राप्ति होईल असा प्राण्यांना भरवंसा आहे ?
495-9
तरी भोग्यजात जेतुले । ते एका देहाचिया निकिया लागले । आणि येथ देह तव असे पडिले । काळाचा तोंडी ॥495॥
तर बाबारे, जितक्या म्हणून भोग्य वस्तू आहेत तितक्या एका देहाच्या सुखाकरीता उत्पन्न केलेल्या आहेत, आणि पाहू गेलेअसता ह्या मृत्युलोकी देह काळाच्या तोंडात पडलेला आहे!
496-9
बाप दुःखाचे केणे सुटले । जेथ मरणाचे भरे लोटले । तिये मृत्युलोकीचियेशेवटिले । येणे जाहाले हाटवेळे ॥496॥
या मृत्युलोकाच्या बाजारांत दुःखरूपी माल भरलेलाअसून मरणरूपी माप चालले आहे त्या ठिकाणी बाजार उठण्याचे समयी मनुष्यरूपाने येणे झाले आहे.
497-9
आता सुखेसि जीविता । कैची ग्राहिकी कीजेल पंडुसुता । काय राखोंडी फुंकिता । दीपु लागे ॥497॥
तर हे पंडूसुता, अशा वेळी जीवाला सुख होईल अशी कोनती खरेदी करता येईल ? हे पहा (विस्तव विझून गेल्यावर राहीलेली) राख फुंकून दिवा लागेल का ?
498-9
अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रसु घेइजे पिळुनी । तया नाम अमृत ठेउनी । जैसे अमर होणे ॥498॥
ज्याप्रमाणे विषाचे कांदे वाटून त्याचा रस काढावा व त्याला अमृत हे नाव देऊन तो प्यावा आणि अमर होण्याची इच्छा करावी.
499-9
तेवि विषयांचे जे सुख । ते केवळ परम दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेविता न सरे ॥499॥
त्याप्रमाणे विषयापासून होणारे जे सुख नव्हे, ते परमदुःख होय, पण काय करावे, मूर्ख लोक विषयसुख भोगल्यावाचून राहत नाहीत.
500-9
का शीस खांडूनि आपुले । पायीचा खती बांधिले । तैसे मृत्युलोकीचे भले । आहे आघवे ॥500॥
किंवा आपले मस्तक तोडून ते जसे पायाला झालेल्या क्षतावर बांधावे, त्या प्रमाणे या मृत्युलोकातील सर्व विषयसुख आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
501-9
म्हणोनि मृत्युलोकी सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचा श्रवणी । कैची सुखनिद्रा आंथरुणी । इंगळाचा ॥501॥
म्हणुन मृत्युलोकात खर्या सुखाची कथा कोणाच्या कानांनी ऐकली जाईल ?निखार्याच्या (इंगळ म्हणजे विंचू किंवा विस्तव) अंथरुणावर मनमोकळेपणाने (निश्चिंत)झोप घेता येईल काय.
502-9
जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागी । दुःख लेऊनि सुखाची आंगी । सळित जगाते ॥502॥
ज्या लोकीचा चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे. जेथे अस्ताला जाण्यासाठीच सुर्याचा उदय होत असतो, दुःखच सुखाचा अंगरखा घालून नाटक करुन जगाला छळण्याचे काम करत असते. (म्हणजे विषयात सुख भासते पण अनुभवास येत नाही)
503-9
जेथ मंगळाचा अंकुरी । सवेचि अमंगळाची पडे पोरी । मृत्यु उदराचिया परिवरी । गर्भु गिंवसी ॥503॥
जेथे मांगल्याच्या अंकुराबरोबरच अमंगलाची कीड आहे. आणि आईच्या पोटातील गुप्त गर्भाशयात सुद्धा मृत्यु गर्भाला गाठतो.
504-9
जे नाही तयाते चिंतवी । तव तेचि नेइजे गंधर्वी । गेलियाची कवणे गावी । शुद्धी न लभे ॥504॥
जेवत नाही त्याचे चिंतन मृत्युलोक करायला लावतो, मग तिच गोष्ट गंधर्व हिरावून नेतात. पण कोठे नेतात याचा पत्ताही लागत नाही.
505-9
अगा गिंवसिता आघवा वाटी । परतले पाउलचि नाही किरीटी । सैंघ निमालियाचियाचि गोठी । तिंये पुराणे जेथिची ॥505॥
अरे अर्जुना, सगळ्या मार्गानी शोध घेतला तरी, मृत्युच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही. जेथील पुराणे म्हणजे असंख्य जन मेलेल्यांच्या गोष्टींनी भरलेली आहेत.
506-9
जेथीचिये अनित्यतेची थोरी । करितया ब्रह्मयाचे आयुष्यवेरी । कैसे नाही होणे अवधारी । निपटूनिया 506॥
जेथील नाशवंताचे वर्णन जरी कोणी ब्रम्हदेवाच्या आयुष्या एवढ्या दिर्घकाळपर्यंत करीत बसला तरी सर्वार्थाने कळनार नाही.
507-9
ऐसी लोकीची जिये नांदणूक । तेथ जन्मले आथि जे लोक । तयांचिये निश्चिंतीचे कौतुक । दिसत असे ॥507॥
अशा तर्हेने या लोकीची क्षणभंगुर स्थिती आहे, तेथे जन्मलेल्या लोकांनी निश्चिंत राहावे. ही नवलाईची गोष्ट आहे.
508-9
पै दृष्टादृष्टीचिये जोडी । लागी भांडवल न सुटे कवडी । जेथ सर्वस्वे हानि तेथ कोडी । वेचिती गा ॥508॥
अरे ऐहिक(क्षणिक)पारलौकीक लाभासाठी भांडवलातील एक कवडी सुद्धा ज्यांच्या हातुन सुटत नाही पंरतु (ते) जेथे सर्वस्वाचा नाश आहे, तेथे कोट्यावधी रुपये खर्च करतात.
509-9
जो बहुवे विषयविलासे गुफे । तो म्हणती उवाये पडिला सापे । जो अभिलाषभारे दडपे । तयाते सज्ञान म्हणती ॥509॥
जो विषयविलासात गुंतुन राहिला आहे. तो सध्या सुखात आहे असे म्हणतात. जो वासनेच्या भाराने दडपुन गेला आहे, त्याला ज्ञानी म्हणतात.
510-9
जयाचे आयुष्य धाकुटे होय । बळ प्रज्ञा जिरौनि जाय । तयाचे नमस्कारिती पाय । वडिल म्हणुनि ॥510॥
ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे, बळ बुद्बी कमी झाली आहे, त्यालाच वडील समजुन त्याच्याच पायावर लोटांगणे घालतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
511-9
जव जव बाळ बळिया वाढे । तव तव भोजे नाचती कोडे । आयुष्य निमाले आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाही 511॥
जसे जसे मुल वाढते तसतसे आईबाप कौतुकाने नाचतात. परंतु त्याची वाढ होत असताना आयुष्याची दोरी कुमकुवत होते. या बद्दल त्यांना खेद माहितच नसतो.
512-9
जन्मलिया दिवसदिवसे । हो लागे काळाचियाचि ऐसे । की वाढती करिती उल्हासे । उभविती गुढिया ॥512॥
मुल जन्मल्यावर, ते दिवसेंदिवस तो काळाचा घास होऊ लागते. तरीही हौसेने वाढदिवस साजरा करतात व गुढ्या उभारतात.
513-9
अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असते जात न गणिती । गहिंसपणे ॥513॥
अरे अर्जुना कोणी तु मर हा शब्द सहन करीत नाहीत. मेल्यावर तरी रडतात, पण आपले आयुष्य कमी कमी होत चालले आहे. हे त्यांना मुर्खपणाने समजत नाही,
514-9
दर्दुर सापे गिळिजतु आहे उभा । की तो मासिया वेटाळी जिभा । तैसे प्राणिये कवणा । वाढविती तृष्णा ॥514॥
सापाकडुन उभा गिळला जात असताना देखील बेडुक उडत असलेल्या माशीला पकडण्यासाठी जीभ बाहेर काढुन वेटाळीत असतो. अशाप्रकारे कोणत्या लोभासाठी हे प्राणी(विषयाची)ताहन वाढवित असतात कोण जाणे ?
515-9
अहा कटा हे वोखटे । मृत्युलोकीचे उफराटे । एथ अर्जुना जरी अवचटे । जन्मलासी तू ॥515॥
अरेरे!हे वाईट आहे! मृत्युलोकातील सर्वच न्याय उफराटा आहे. अर्जुना ज्या अर्थी तु येथे दैवयोगाने जन्मला आहे.
516-9
तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ॥516॥
तरी या मृत्युलोकाच्या राहाटीतुन सर्व झटकुन मोकळा हो, आणि या भक्तिच्या मार्गाला असा लाग की, त्यायोगे तुला माझ्या निर्दोष स्वरुपाच्या पदाचा लाभ घडेल.
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः ॥9. 34॥
॥इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्य योगोनाम नवमोऽध्यायः ॥9॥
। ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।
517-9
तू मन हे मीचि करी । माझा भजनी प्रेम धरी । सर्वत्र नमस्कारी । मज एकाते ॥517॥
तु आपले मन मद्रुप कर, माझ्या भजनाबद्दल प्रेम बाळग, सर्व ठिकानी माझे अस्तित्व जाणुन मला वंदन कर.
518-9
माझेनि अनुसंधाने देख । संकल्पु जाळणे निःशेख । मद्याजी चोख । याचि नांव ॥518॥
माझ्या अखंड ध्यानाने सर्व संकल्प पुर्णपणे जाळतो, त्याला स्पष्टपणे मद्दाची(यजनकर्ता) असे नांव द्दावे.
519-9
ऐसा मिया आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरुपा पावसी । हे अंतःकरणीचे तुजपासी । बोलिजत असे ॥519॥
तू जेव्हा माझ्या ध्यासाने संप्पन्न होशील, तेव्हाच माझ्या स्वरुपाला पावशील ही माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट तुला मी सांगत आहे
520-9
अगा आवघिया चोरिया आपुले । जे सर्वस्व आम्ही असे ठेविले । ते पावोनि सुख संचले । होऊनि ठासी ॥520॥
अरे आम्ही आमचे सर्वस्व पुर्ण चातुर्याने राखुन ठेविले आहे. ते लाभुन तु सुखाने ओतप्रोत भरुन जाशील.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
521-9
ऐसे सांवळेनिपरब्रह्मे । भक्तकामकल्पद्रुमे । बोलिले आत्मारामे । संजयो म्हणे ॥521॥
अशा प्रमाने भक्तांची इच्छा पुर्ण करणार्या ब्रम्हस्वरुप सावळ्या श्रीकृष्णांनी अर्जुनास बोध केला, असे संजय बोलले.
522-9
अहो ऐकिजत असे की अवधारा । तव इया बोला निवांत म्हातारा । जैसा म्हैसा नुठी का पुरा । तैसा उगाचि असे ॥522॥
ज्ञानेश्वर महाराज जणास (श्रोत्यांना) सांगतात. ऐका, म्हातारा धृतराष्ट्र हे बोल ऐकत शांत राहिला. एखादा आळशी, ऐदी पाण्यात बसल्यावर रेडा जसा हालत नाही. तसा तो मुकाट्याने बसला.
523-9
तेथ संजये माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला । की हा एथ असतुचि गेला । सेजिया गावा ॥523॥
तेव्हा संजयाने मान डोलावली व स्वःताशी म्हणाला, हा हा हा ! आज अमृताची वृष्टी झाली. पण हा म्हातारा येथे असुन शेजारच्या गावी गेल्यासारखा आहे.
524-9
तऱ्ही दातारु हा आमुचा । म्हणोनि हे बोलता मैळेल वाचा । काइ झाले ययाचा । स्वभावोचि ऐसा ॥524॥
परंतु हा आमचा अन्नदाता आहे. स्पष्ट बोलुन वाचेला दोष लागेल. याला इलाज नाही कारण याचा स्वभावच असा आहे.
525-9
परि बाप भाग्य माझे । जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजे । कैसा रक्षिलो मुनिराजे । श्रीव्यासदेवे ॥525॥
परंतु धन्य माझे भाग्य की, महामुनी श्री व्यासमहाराजांनी रणवृतांत सांगण्याच्या निमित्ताने मला निर्भय राखले आहे.
526-9
येतुले हे वाडे सायासे । जव बोलत असे दृढे मानसे । तव न धरवेचि आपुलिया ऐसे । सात्विके केले ॥526॥
अशा रितीने मोठ्या प्रयासाने मन घट्ट करुन संजय मनातल्या मनात बोलत आहे, तोच अष्टसात्विकभाव आवरुन धरवेनात व त्याला सावरता येईनात. (अशी अवस्था अष्ट सात्विक भावांनी केली)
527-9
चित्त चाकाटले आटु घेत । वाचा पांगुळली जेथिची तेथ । आपादकंचुकित । रोमांच आले ॥527॥
त्याच्या चित्ताला(मनाला)चकीत झाले, चक्कर आली, जीभ लुळी पडली, व सर्वागावर रोमांचा उभे राहिले.
528-9
अर्धोन्मीलित डोळे । वर्षताति आनंदजळे । आंतुलिया सुखोर्मीचेनि बळे । बाहेरि कापे ॥528॥
अर्धे उघडलेले डोळे आनंदाश्रुचा वर्षाव करु लागले. व अंतर्यामी उसळनार्या आंनदाच्या लाटाच्या प्रभावाने शरिर थरथर कापु लागले.
529-9
पै आघवाचि रोममूळी । आली स्वेदकणिका निर्मळी । लेइला मोतियांची कडियाळी । आवडे तैसा ॥529॥
सर्व रोमांच्या मुळाशी निर्मळ घामाचे थेंब आले, त्यामुळे त्याने अंगावर मोत्याच्या जाळीचा अंगरखाच घातला आहे. असा तो दिसु लागला.
530-9
ऐसा महासुखाचेनि आर्तिरसे । जेथ आटणी होईल जीवदशे । तेथे निरोविले व्यासे । ते नेदीच हो ॥530॥
अशाप्रकारे महासुखाच्या उत्कर्षाने, जेथे जिवाचे भान विरुन गेल्यामुळे रणवृत्तांत सांगण्याची श्रीव्यासांनी केलेली आज्ञा ती पुर्णपणे पाळली जाईना.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
531-9
आणि कृष्णार्जुनाचे बोलणे । घो करी आले श्रवणे । की देहस्मृतीचा तेणे । वापसा केला ॥531॥
आणि त्यावर कृष्णार्जुनाचे बोलणे धो धो आवाज करीत संजयाच्या कानी आले. त्याने संजयाला पून्हा भानावर आणले. व रणवृत्तांत सांगण्यास प्रवृत्त केले
532-9.
तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी । सर्वागीचा स्वेदु परिमार्जी । तेवीचि अवधान म्हणे हो जी । धृतराष्ट्राते ॥532॥
तेंव्हा डोळ्यातील आंनदाश्रु पुसुन, अंगावरील घामही पुसला आणि तो धृतराष्ट्राला म्हणाला महाराज आता लक्ष द्दा.
533-9
आता कृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्विकाचा बिवडु । म्हणोनि श्रोतया होईल सुरवाडु । प्रमेयपिकाचा ॥533॥
आता श्रीकृष्णाच्या वेचक वाक्यांची उत्तम बिजे आणि त्यास संजय ही अष्टसात्विक भावरुपी पिकाच्या दुसर्या पेरणीकरिता तयार झालेली जमीन. त्यामुळे श्रोत्यांना सिद्धांतरुपी पिकाची सुगीच होईल. यात तिळमाञ शंका नाही.
534-9
अहो अळुमाळु अवधान देयावे । येतुलेनि आनंदाचेराशी वर बैसावे । बापश्रवणेद्रिया दैवे । घातली माळ ॥534॥
श्रोते हो, या कथानकाकडे लक्ष द्दावे व एवढ्यानेच आंनदाच्या राशीवर बसावे. तुमच्या कानाच्या भाग्याने तुम्हास माळ घातली आहे.
535-9
म्हणोनि विभूतीचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो । तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥535॥
तेव्हा आज सिद्धराज श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ईश्वरी विभुतीचे स्थान निरुपण करतील. ते आपण श्रवण करा, अशी या निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेवांची विनंती आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगोनाम नवमोऽध्यायः ॥9॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 34 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 535 ॥
। ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।
-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम
सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक


















