शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय १६ वा दैवासुरसंपत्तिविभागयोगः

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 16: DAIVASURSAMPATTI YOG:
Sartha Dnyaneshwari Adhyay 16 DAIVASURSAMPATTI YOG:
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
सार्थ श्रीज्ञानेश्वरी: :: ॥ अथ षोडशोऽध्यायः ॥ दैवासुरसंपत्तिविभागयोगः॥
सार्थ ज्ञानेश्वरी : :: ॥ अध्याय सोळावा ॥ दैवासुरसंपत्तिविभागयोगः ॥

सूची :- शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी

अध्याय सोळावा
ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ । अथ षोडशोशोऽध्यायः – अध्याय सोळावा॥। दैवासुरसंपत्तिविभागयोगः ।
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1-16
मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु । अद्वयाब्जिनीविकाशु । वंदू आता ॥16a1॥
महाराज, अध्यायाच्या आरंभी श्रीसद्गुरूचे बोधरूपी सूर्याची उपमा देऊन नमन करितात ते असे. ज्या सूर्याच्या उदयानी, अद्वयकमलिनी विकास पाऊन प्रकट असलेले विश्वदर्शन मावळन जाते, असा विलक्षण प्रकार बडतो; त्या ज्ञानरूप सूर्यास नमस्कार असो. 1
2-16
जो अविद्याराती रुसोनिया । गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया । जो सुदिनु करी ज्ञानिया । स्वबोधाचा ॥16a2॥
ज्याच्या उदयाने अविद्यारूप रात्र संपून ज्ञानाज्ञानरूपाने त्या रात्रींत चमकणाऱ्या चांदिण्या रात्री बरोबर निस्तेज होतात व जो उदय म्हणजे ज्ञानीजनांना आत्मबोधाचा मंगल दिन होय. 2
3-16
जेणे विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे । सांडिती देहाहंतेची अविसाळे । जीवपक्षी ॥16a3॥
ज्याच्या प्रभातकाळी जीवरूप पक्षांचे आत्मज्ञाननेत्र प्रकाशित होऊन ते देहात्मबुद्धिची घरटी सोडून बाहेर पडतात. 3
4-16
लिंगदेहकमळाचा । पोटी वेचु तया चिद्भ्रमराचा । बंदिमोक्षु जयाचा । उदैला होय ॥16a4॥
ज्याच्या उदयानं लिंगदेहरूप कमलाच्या विकासाने त्यात गुंतून पडलेला जीवचैतन्यरूप भ्रमर मुक्त होतो. 4
5-16
शब्दाचिया आसकडी । भेद नदीच्या दोही थडी । आरडाते विरहवेडी । बुद्धिबोधु ॥16a5॥
शास्त्रांतील विरूद्ध वचनांची एकवाक्यता न झाल्यामुळे, अज्ञानरूप अंधकाराचे साम्राज्य पसरून, भेदसत्यत्व निश्चय होऊन, तीच कोणी एक नदी तिच्या दोन तीरांवर त्या अज्ञान रात्रीमुळे बुद्धिरूप (मादी) व बोधरूप (नर) चक्रवाक पक्षांची तटातूट होऊन (बुद्धीला परमात्मज्ञान न होऊन) ते जोडपे विरहदुःखाने ओरडत बसले आहे. 5
6-16
तया चक्रवाकांचे मिथुन । सामरस्याचे समाधान । भोगवी जो चिद्गगन । भुवनदिवा ॥16a6॥
चिदाकाशामध्ये ब्रह्मांडाला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूप सूर्याचा उदय होऊन ते विरही चक्रवाक जोडपे (जीव व परमात्मा) ह्यांचे ऐक्य होऊन समाधान. 6
7-16
जेणे पाहालिये पाहाटे । भेदाची चोरवेळ फिटे । रिघती आत्मानुभववाटे । पांथिक योगी ॥16. 7॥
ज्या ज्ञानभानूच्या उदयाच्या किंचित् पूर्वीच (पहाटें) भेदरूपो चोर मागल्या पायाने जातात, व योगी जनरुपी पांथस्थ आत्मानुभवाची वाट आक्रमण करतात. 7
8-16
जयाचेनि विवेककिरणसंगे । उन्मेखसूर्यकांतु फुणगे । दीपले जाळिती दांगे । संसाराची ॥16a8॥
ज्या ज्ञानसूर्याच्या विचाररूप किरणांच्या योगे वृत्तिज्ञानरूप सूर्यकांतमणि प्रदीप्त होऊन संसाररूपी वने जाळून टाकितो. 8
9-16
जयाचा रश्मिपुंजु निबरु । होता स्वरूप उखरी स्थिरु । ये महासिद्धीचा पूरु । मृगजळ ते ॥16a9॥
ज्याचा तीव्र किरणसमूहप्रकाश जीवररूपी अज्ञानाच्या माळजमिनीवर स्थिर असतांना विश्वरूपी महासिद्धींचा पूर येतो. 9
10-16
जो प्रत्यग्बोधाचिया माथया । सोऽहंतेचा मध्यान्ही आलिया । लपे आत्मभ्रांतिछाया । आपणपा तळी ॥16 a10॥
जो सूर्य “प्रत्यगात्मबोधरूप ” सोऽहं ” भावाच्या माध्यान्हकाली माथ्यावर आला असता, आत्मस्वरूपविषयक भ्रांतिरूप छाया पायातळी येऊन नाहीशी होते. 10
11-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


ते वेळी विश्वस्वप्नासहिते । कोण अन्यथामती निद्रेते । सांभाळी नुरेचि जेथे । मायाराती ॥16a11॥
ज्याच्या उदयाने मूळमायारात्रीचाच नाश होतो, तेथे विपरीत विश्वादि स्वप्नदर्शनाची जननी जी अज्ञाननिद्रा तिचा कसा पत्ता असणार ? 11
12-16
म्हणौनि अद्वयबोधपाटणी । तेथ महानंदाची दाटणी । मग सुखानुभूतीची घेणी देणी । मंदावो लागती ॥16a12॥
मग अद्वयबोधरूपी नगरांत सगळीकडेच महानंदाची गर्दी उसळून, त्यामुळे सुखानुभवाची देवघेवही मंदावू लागते. 12
13-16
किंबहुना ऐसैसे । मुक्तकैवल्य सुदिवसे । सदा लाहिजे का प्रकाशे । जयाचेनि ॥16a13॥
किंबहुना, ज्या ज्ञानसूर्याच्या तेजाला मुक्ति किंवा कैवल्य ह्या मंगल दिवसाशिवाय अन्य वेळच माहीत नाही 13
14-16
जो निजधामव्योमींचा रावो । उदैलाचि उदैजतखेंवो । फेडी पूर्वादि दिशांसि ठावो । उदोअस्तूचा ॥16a14॥
जो बोध सूर्य आत्मस्वरूपाकाशाचा राजा असून नित्य उदितच आहे; तरीही, अज्ञानप्रतिबंध दूर होऊन पुन्हा उदित झाल्यासारखा वाटतांच, पूर्वपश्चिमादि सर्व दिशा एकरूप करून उदय व अस्त ह्याचे नांवही उरू देत नाही. 14
15-16
न दिसणे दिसणेंनसी मावळवी । दोही झाकिले ते सैंघ पालवी । काय बहु बोलो ते आघवी । उखाचि आनी ॥16a15॥
समजणे व न समजणे हे ज्ञानाज्ञानाचे दोन्ही व्यवहार ज्या स्वरूपज्ञानाच्या टेक्यावर चालतात, ते यथार्थत्वाने प्रकट झाले असता त्या उषःकालाची काही अलौकिकच थोरवी आहे ती बोलून कशी वर्णन करवेल ? 15
16-16
तो अहोरात्रांचा पैलकडु । कोणे देखावा ज्ञानमार्तंडु । जो प्रकाश्येवीण सुरवाडु । प्रकाशाचा ॥16a16॥
रात्र व दिवस अशा लौकिक भेदाला अवसर नसून त्याच्याही पलीकडला असा तो ज्ञानसूर्य तो कोणाच्या ज्ञानाचा होणार ? ज्याच्या स्वरूपप्रकाशपुढे प्रकाश्य असा अन्यपदार्थच नाही असा तो केवळ प्रकाशरूप आहे. 16
17-16
तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती । आता नमो म्हणो पुढतपुढती । जे बाधका येइजतसे स्तुती । बोलाचिया ॥16a 7॥
असे चैतन्यसूर्य जे श्रीनिवृत्तिनाथ महाराज, त्यांना माझे वारंवार नमन असो; त्या अवाङ्मनमनसगोचरस्वरूपाची स्तुति करणे म्हणजे ही त्याला शब्दाची बाधा अगर विटाळ करू पहाणे होय. 17
18-16
देवाचे महिमान पाहोनिया । स्तुति तरी येइजे चांगावया । जरी स्तव्यबुद्धीसी लया । जाईजे का ॥16a 18॥
श्रीगुरूंच्या महात्म्यांच्या दृष्टीने विचार केला असता जर स्तवन करणारा स्तव्यबुद्धी सह लयाला जाईल (स्तवन करणारा अद्वैत-भूमिकेवर येईल) तेव्हांच श्रीगुरूची खरी किंवा आवडणारी स्तुति होते. 18
19-16
जो सर्वनेणिवा जाणिजे । मौनाचिया मिठीया वानिजे । काहीच न होनि आणिजे । आपणपया जो ॥16a19॥
जो सर्व लयाचाही साक्षी किंवा प्रकाशक आहे. त्याच्या स्वरूपवर्णनाविषयी मौन धारण करणे हीच त्याची खरी स्तुति होय, व अशेषविशेष भाव लयास जाऊन सहज स्थितीत असणे हीच ज्याची प्राप्ती होय. 19
20-16
तया तुझिया उद्देशासाठी । पश्यंती मध्यमा पोटी । सूनि परेसीही पाठी । वैखरी विरे ॥16a20॥
त्या तुमच्या स्वरूपाची स्तुति करू पहाणारी वैखरीवाणी, पश्यंती व मध्यमावाणींच्या पोटांत प्रवेश करून अखेर परावाणी सह लय पावते. 20
21-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


तया तूते मी सेवकपणे । लेववी बोलकेया स्तोत्राचे लेणे । हे उपसाहावेही म्हणता उणे । अद्वयानंदा ॥21॥
हे अद्वयानंद गुरुमूर्ते, अशा आपल्या स्वरूपाचे, सेवकभावाने मी केलेले स्तुतिस्तोत्र रूप भूषण आपण स्वीकारावे असे म्हणणंही वस्तुतः न शोभणारे आहे. 21
22-16
परी रंके अमृताचा सागरु । देखिलिया पडे उचिताचा विसरु । मग करू धावे पाहुणेरु । शाकाचा तया ॥22॥
एकाद्या दरिद्रयाने, अमृतसिंधु पाहुण आलेला पाहून, आपण काय करीत आहो त्याच्या औचित्याचे भान न राहून जसा त्याला भाजीपाल्यांचा पाहुणचार केला असता. 22
23-16
तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा । तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा । उजळोनि दिव्यतेजा हातिवा । ते भक्तीचि पाहावी ॥23॥
त्याच्या आनंदाचा वेग पाहून तो शाकपाहुणचारही मोठा म्हणावा लागतो, किंवा सूर्याला निरांजनाने ओवाळिले असता प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष करून कर्त्याचा भावच जसा लक्षात घेणे योग्य होय. 23
24-16
बाळा उचित जाणणे होये । तरी बाळपणचि के आहे ? । परी साचचि येरी माये । म्हणौनि तोषे ॥24॥
बालवयात उचित अनुचित कळू लागले तर मग बालपण ते काय ! म्हणून त्याच्या कोणत्याही गोष्टीचे माता कौतुक मानून संतोष पावते. 24
25-16
हा गा गावरसे भरले । पाणी पाठी पाय देत आले । ते गंगा काय म्हणितले । परते सर ? ॥25॥
अहो; गावचा ओढा गावातील घाणीसह गंगेत प्रवेश करू लागला असता तू मागे फिर असे का गंगा त्याला म्हणेल ? 25
26-16
जी भृगूचा कैसा अपकारु । की तो मानूनि प्रियोपचारु । तोषेचिना शारङ्गधरु । गुरुत्वासी ? ॥26॥
पाहू गेले तर, भृगूने केवढा अपराध केला ? पण त्याने केलेला लत्ताप्रहार हा गुरुप्रसादच समजून, भगवंतांनी संतुष्ट होऊन ते प्रसादचिन्ह म्हणून हृदयावर धारण केले. 26
27-16
की आंधारे खतेले अंबर । झालेया दिवसनाथासमोर । तेणे तयाते पऱ्हा सर । म्हणितले काई ? ॥27॥
किंवा अंधकाराने गच्च भरलेले व्योम सूर्यासमोर आले असता, त्याने, तू असे मजसमोर येऊ नको असे त्यास कधी म्हटले आहे काय ? 27
28-16
तेवी भेदबुद्धीचिये तुळे । घालूनि सूर्यश्लेषाचे काटाळे । तुकिलासि ते येकी वेळे । उपसाहिजो जी ॥28॥
तसेच तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नसलेला भेद उत्पन्न करून त्या तराजूमध्ये एका अंगाला सूर्य व एका अंगाला आपण अशी आपली तुला करु गेलो त्याची श्रीगुरो, मला क्षमा असावी. 28
29-16
जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी । वेदादि वाचा वानिलासी । जे उपसाहिले तयासी । ते आम्हाही करी ॥29॥
(तू ध्यानाचा विषय नसतां) ज्यांनी तुझे ध्यान केले, ज्या वेदांदिकांनी वाणीने तुझे स्तवन केले, ते आपण जसे सहन केले, तीच दृष्टि माझ्याबद्दलही असावी. 29
30-16
परी मी आजि तुझ्या गुणी । लांचावलो अपराधु न गणी । भलते करी परी अर्धधणी । नुठी कदा ॥30॥
परंतु, तुमचे अखंड गुणगान करावे ह्याची मला अत्यंत हौस वाटते किंवा ही मला खोडच लागली आहे; म्हणून, तो अपराध असे गणू नये; आपण काय वाटेल ते करा; मी मात्र माझी सर्व इच्छा पूर्ण झाल्यावाचून येथून हालणार नाही. 30
31-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


मिया गीता येणे नांवे । तुझे पसायामृत सुहावे । वानू लाधलो ते दुणेन थावे । दैवलो दैवे ॥31॥
मी, गीतानामक आपले प्रसादामृत सेवू लागलो तों, मला आपल्या यशोवर्णनाचे दुप्पट बळ चढले व माझ्या नशिबाचेही नशीब उघडले. 31
32-16
माझिया सत्यवादाचे तप । वाचा केले बहुत कल्प । तया फळाचे हे महाद्वीप । पातली प्रभु ॥32॥
हे प्रभो, मला वाटते अनंत कल्प माझ्या वाणीला सत्यभाषणाचे तपाचरण घडले आहे. त्याचेच फल म्हणून मला ह्या गीतारूप महाद्वीपाचा लाभ झाला आहे. 32
33-16
पुण्ये पोशिली असाधरणे । तिये तुझे गुण वानणे । देऊनि मज उत्तीर्णे । जाली आजी ॥33॥
मी आजवर असामान्य पुण्याई संपादन केली त्याचा मोबदला म्हणून तुझे गुणवर्णन करण्याचे तिने मला सामर्थ्य देऊन ती आज माझी उतराई झाली आहे. 33
34-16
जी जीवित्वाच्या आडवी । आतुडलो होतो मरणगावी । ते अवदसाची आघवी । फेडिली आजी ॥34॥
देहबुद्धीमुळे मी जीवदशेच्या घोर अरण्यात गुंतून जन्ममृत्युच्या कचाट्यात आड्कलो होतो, ती माझी अवदशा, माझी जीवदशाच आज संपल्यामुळे, सर्व नष्ट झाली आहे. 34
35-16
जे गीता येणे नांवे नावाणिगी । जे अविद्या जिणोनि दाटुगी । ते कीर्ती तुझी आम्हाजोगी । वानावया जाली ॥35॥
जी गीता ह्या नांवाने ख्यातनाम्नी (प्रसिद्ध) असून अविवेचा पाडाव करून जिने आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे, अशा आपल्या गीतेचे म्हणजे आपले यश आम्ही वर्णन करणच योग्य होय. 3
36-16
पै निर्धना घरी वानिवसे । महालक्ष्मी येऊनि बैसे । तयाते निर्धन ऐसे । म्हणो ये काई ? ॥36
कल्पना करा, की दरिद्रयाच्या घरी महालक्षमीने एकाएक प्रवेश केला तरीही त्याला मग दरिद्री म्हणता येईल काय ? 36
37-16
का अंधकाराचिया ठाया । दैवे सुर्यु आलिया । तो अंधारुचि जगा यया । प्रकाशु नोहे ? ॥37॥
किंवा जेथे अंधकार आहे त्या स्थली दैववशात् सूर्य पातला, तर तो अंधकारच ह्या जगाला प्रकाशरूप होत नाही काय ? 37
38-16
जया देवाची पाहता थोरी । विश्व परमाणुही दशा न धरी । तो भावाचिये सरोभरी । नव्हेचि काई ? ॥38॥
ज्या परमात्मस्वरूपाचे महिमान पाहू गेले असता विश्वाला परमाणुइतकेही स्थान अगर इतकीही सत्ता नाही तो भक्तिभावाच्या बळावर काय करणार नाही ? अगर होणार नाही ? 38
39-16
तैसा मी गीता वाखाणी । हे खपुष्पाची तुरंबणी । परी समर्थे तुवा शिरयाणी । फेडिली ते ॥39॥
त्याप्रमाणे मी टीका व्याख्यान करावे, ही वस्तुतः आकाशपुष्पाचा सुगंध घेण्यासारखी अशक्य गोष्ट होय; परंतु आपणा समर्थाच्या कृपेने माझी तीही इच्छा पूर्ण केली. 39
40-16
म्हणौनि तुझेनि प्रसादे । मी गीतापद्ये अगाधे । निरूपीन जी विशदे । ज्ञानदेवो म्हणे ॥40॥
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या प्रसादाच्या योगे गीतेच्या श्लोकांचे मूळच्या खोल आर्थाप्रमाणे विवरण करीन. 40
41-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


तरी अध्यायी पंधरावा । श्रीकृष्णे तया पांडवा । शास्त्रसिद्धांतु आघवा । उगाणिला ॥41॥
देवांनी, पंधराव्या अध्यायात अर्जुनाला सकलशास्त्र-सिद्धांत कथन केला आहे. 41
42-16
जे वृक्षरूपक परीभाषा । केले उपाधि रूप अशेषा । सद्वैद्ये जैसे दोषा । अंगलीना ॥42॥
उत्तम वैद्याने अंगांत मुरलेल्या दुखण्याची चिकित्सा करावी त्याप्रमाणे ब्रह्म बस्तूच्या ठिकाणी झालेल्या अनादि अनिर्वचनीय माया ह्या उपाधीच्या संबंधाने, ही त्रैलोक्यरचना कीशी निर्माण झाली हे वृक्षाच्या रूपकाने देवांनी दाखविले. 42
43-16
आणि कूटस्थु जो अक्षरु । दाविला पुरुषप्रकारु । तेणे उपहिताही आकारु । चैतन्या केला ॥43॥
आणि कूटस्थ (मायारूप उपाधि ज्याला आहे असा) अक्षर पुरुषाचा प्रकार म्हणून जो दाखविला व त्याचबरोबर तदुपहितचैतन्याचेही वर्णन केले. 43
44-16
पाठी उत्तम पुरुष । शब्दाचे करूनि मिष । दाविले चोख । आत्मतत्त्व ॥44॥
नतर उत्तमपुरुष शब्दाच्या वर्णनाच्या निमित्ताने केवल शुद्ध जे आत्मतत्त्व (ब्रह्म) त्याचे स्पष्टीकरण केले 44
45-16
आत्मविषयी आंतुवट । साधन जे आंगदट । ज्ञान हेही स्पष्ट । चावळला ॥45॥
व आत्मप्राप्तीचे श्रेष्ठ अंतरंग साधन जे ज्ञान याचेही कथन केले. 45
46-16
म्हणौनि इये अध्यायी । निरूप्य नुरेचि काही । आता गुरुशिष्या दोही । स्नेहो लाहणा ॥46॥
म्हणून ह्या अध्यायात निरूपण करण्यासारखे काही उरले नाही, परंतु गुरुशिष्यांच्या प्रेमसंवादाचा अनुवाद करू. 46
47-16
एवं इयेविषयी कीर । जाणते बुझावले अपार । परी मुमुक्षु इतर । साकांक्ष जाले ॥47॥
याप्रमाणे पंधराव्या अध्यायाने अनेक बुद्धिमंताची योग्य समज पडली तरी इतर जे मुमुक्षु त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले नाही. 47
48-16
त्या मज पुरुषोत्तमा । ज्ञाने भेटे जो सुवर्मा । तो सर्वज्ञु तोचि सीमा । भक्तीचीही ॥48॥
असा जो मी “पुरुषोत्तम ” त्या माझे वर्म जाणून जो ज्ञानद्वारा मल भेटतो (मद्रूप होतो) तोच सर्वज्ञ होय व त्याची मजविषयींची भक्ति हीच सीमेची (कडेची) भक्ति होय. 48
49-16
ऐसे हे त्रैलोक्यनायके । बोलिले अध्यायात श्लोके । तेथे ज्ञानचि बहुतेके । वानिले तोषे ॥49॥
असे जे त्रैलोक्यनाथ भगवंतांनी पंधराव्या अध्यायाच्या शेवटी संतोषपूर्वक कथन केले आहे त्यात प्रायःज्ञानाचीच थोरवी सांगितली आहे. 49
50-16
भरूनि प्रपंचाचा घोटु । कीजे देखताचि देखतया द्रष्टु । आनंदसाम्राज्यी पाटु । बांधिजे जीवा ॥50॥
प्रपंचाचा ग्रास करून ब्रह्मदर्शन होतांच, द्रष्टयाला दृश्यही आत्मस्वरूपाने दिसू लागते (सर्वात्मभाव होतो) व त्यायोगे जीवाला ब्रह्मात्मभाव येऊन तो आनंदसाम्राज्याचा स्वामी होतो. 50
51-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
येवढेया लाठेपणाचा उपावो । आनु नाहीचि म्हणे देवो । हा सम्यक्‌ज्ञानाचा रावो । उपायांमाजी ॥51॥
ब्रह्मप्राप्तीला इतके बलवत्तर दुसरे साधनच नाही; सर्व उपायांमध्ये सम्यक् ज्ञान हाच राजा होय असे देवांनी सांगितले. 51
52-16
ऐसे आत्मजिज्ञासु जे होते । तिही तोषलेनि चित्ते । आदरे तया ज्ञानाते । वोवाळिले जीवे ॥52॥
इतक्या अधिकाराचे जे आत्मजिज्ञासू होते, त्यांनी संतुष्टचित्त होऊन, त्या ज्ञानोपायावरून आपले प्राण ओवाळन टाकिले. 52
53-16
आता आवडी जेथ पडे । तयाचि अवसरी पुढे पुढे । रिगो लागे हे घडे । प्रेम ऐसे ॥53॥
ज्याला ज्या विषयाची अत्यंत आवड असते, त्याची त्या विषयात पुढे पुढे गति असते हे प्रेमाचे लक्षणच आहे. 53
54-16
म्हणौनि जिज्ञासूंच्या पैकी । ज्ञानी प्रतीती होय ना जव निकी । तव योग क्षेमु ज्ञानविखी । स्फुरेलचि की ॥54॥
व प्राप्त झाले असता कसे टिकेल अशी जिज्ञासा सहजच होणार. 54
55-16
म्हणौनि तेचि सम्यक् ज्ञान । कैसेनि होय स्वाधीन । जालिया वृद्धियत्‌न । घडेल केवी ॥55॥
म्हणून ते सम्यक् ज्ञान कसे हस्तगत (अपरोक्षत्वाने) होईल व झाल्यास त्याच्या वृद्धीचा यत्न कोणता करावा. 55
56-16
का उपजोचि जे न लाहे । जे उपजलेही अव्हांटा सूये । ते ज्ञानी विरुद्ध काय आहे । हे जाणावे की ॥56॥
किंवा, ज्या कारणास्तव मे ज्ञान उत्पन्नच न व्हावे, अथवा झाले तरी आडमार्गाने व्यर्थ जावे, अशी ज्ञानाला प्रतिबंधक कोणती गोष्ट आहे ते कळावे. 56
57-16
मग जाणतया जे विरू । तयाची वाट वाहती करू । ज्ञाना हित तेचि विचारू । सर्वभावे ॥57॥
म्हणजे त्यायोगे तो ज्ञानाला विघ्न करणारा मार्ग सोडून देऊन, त्याला हितकर असेल त्याच मार्गाचा सर्वभावे आदर करू 57
58-16
ऐसा ज्ञानजिज्ञासु तुम्ही समस्ती । भावो जो धरिला असे चित्ती । तो पुरवावया लक्ष्मीपती । बोलिजेल ॥58॥
तुम्हा सर्व जिज्ञासूंच्या मनात हे कळावे असा जो भाव आहे तो पुरविण्यासाठी लक्ष्मीपति भगवान् पुढे सांगतील. 58
59-16
ज्ञानासि सुजन्म जोडे । आपली विश्रांतिही वरी वाढे । ते संपत्तीचे पवाडे । सांगिजेल दैवी ॥59॥
जिच्या पोटी उत्तम ज्ञान जन्माला यावे व आत्मविश्रांतीही लाभावी, त्या दैवी संपत्तीचे वर्णन देव आता करितील. 59
60-16
आणि ज्ञानाचेनि कामाकारे । जे रागद्वेषांसि दे थारे । तिये आसुरियेहि घोरे । करील रूप ॥60॥
आणि ज्ञानप्राप्तीच्या मिषाने रागद्वेषांदिकांना आश्रय देणारी जी घोर आसुरी संपत्ति तिचेही देव वर्णन करितील. 60
61-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
सहज इष्टानिष्टकरणी । दोघीचि इया कवतुकिणी । हे नवमाध्यायी उभारणी । केली होती ॥61॥
ह्या दैवी व आसुरी संपत्तीने इष्ट व अनिष्ट गोष्टी कशा घडतात, हे सांगण्याचा उपक्रम नवव्या अध्यायात केला होता. 61
62-16
तेथ साउमा घेयावया उवावो । तव वोडवला आन प्रस्तावो । तरी तया प्रसंगे आता देवो । निरूपीत असे ॥62॥
तेथे त्यांचा समग्र विचार करावयाचा होता, पण दुसराच प्रसंग (विषय) पुढे येऊन ते तसेच राहिले, म्हणून देव आता त्या राहिलेल्या प्रसंगाचे पुढे निरूपण करितील. 62
63-16
तया निरूपणाचेनि नांवे । अध्याय पद सोळावे । लावणी पाहता जाणावे । मागिलावरी ॥63॥
अध्यायाच्या अनुक्रमाने पहाता हे निरूपण सोळाव्यात पडते हे खरे; पण तो मागील विषयाचाच विस्तार होय. 63
64-16
परी हे असो आता प्रस्तुती । ज्ञानाच्या हिताहिती । समर्था संपत्ती । इयाचि दोन्ही ॥64॥
पण हे आता असो; ज्ञानाला हितकारिणी व अहितकारिणी अशा ह्या दोनच संपत्ति समर्थ आहेत. 64
65-16
जे मुमुक्षुमार्गींची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी । ते आधी तव दैवी । संपत्ती ऐका ॥65॥
जी मुमुक्षुला मोक्षापर्यंत सोबत करणारी व मोहांधकारांतून प्रवास करतांना दिव्याप्रमाणे वाट दाखविणारी, ती दैवी संपत्ति प्रथम श्रवण करा. 65
66-16
जेथ एक एकाते पोखी । ऐसे बहुत पदार्थ येकी । संपादिजती ते लोकी । संपत्ति म्हणिजे ॥66॥
जेथे एक पदार्थ दुसऱ्याला पोषक असतो असे अनेक पदार्थ एकत्र जमले म्हणजे त्याला संपत्ति असे म्हणतात. 66
67-16
ते दैवी सुखसंभवी । तेथ दैवगुणे येकोपजीवी । जाली म्हणौनि दैवी । संपत्ति हे ॥67॥
दैवयोगाने, अशी सुखप्राप्ति करून देणारी साधने एकत्र झाली म्हणजे ती दैवी संपत्ति होय. 67
68-16
श्री भगवानुवाच ।
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितः ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवं ॥16. 1॥
आता तयाचि दैवगुणा- । माजी धुरेचा बैसणा । बैसे तया आकर्णा । अभय ऐसे ॥68॥
आता ह्या दैवी संपत्तीमध्ये ज्याला प्रमुखस्थान लाधले आहे त्याला ‘अभय ” अशी संज्ञा आहे. 68
69-16
तरी न घालूनि महापुरी । न घेपे बुडणयाची शियारी । का रोगु न गणिजे घरी । पथ्याचिया ॥69॥
जो महापुरांत उडी घेत नाही त्याला जसे बुडण्याचे भय नसते, किंवा जो नित्य पथ्य पाळितो त्याला रोग जसा गांठीत नाही. 69
70-16
तैसा कर्माकर्माचिया मोहरा । उठू नेदूनि अहंकारा । संसाराचा दरारा । सांडणे येणे ॥70॥
त्याचप्रमाणे कर्म करणे अगर न करणे ह्यांविषयी जो अत:करनात अहंकार उठू देत नाही त्याने संसाराचे भय बाळगण्याचे कारण नाही. 70
71-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अथवा ऐक्यभावाचेनि पैसे । दुजे मानूनि आत्मा ऐसे । भयवार्ता देशे । दवडणे जे ॥71॥
अथवा ज्याचा सर्वात्मभाव अशाप्रकारे विस्तारला आहे की जे काही दिसेल ते आत्मस्वरूपच आहे, त्याला भयाचा गंधही असणे शक्य नाही. 71
72-16
पाणी बुड{ऊ} ये मिठाते । तव मीठचि पाणी आते । तेवी आपण जालेनि अद्वैते । नाशे भय ॥72॥
पाणी मिठाला बुडवू लागले तर, मीठच जलरूप होते, त्याप्रमाणे सर्वत्र अद्वैतभावना झाल्यावर (म्हणजे भय कारण जे द्वितीयत्व हे नाहीसे झाल्यावर) भयाला अवसरच कसा असणार ? (ते नष्टच होते) 72
73-16
अगा अभय येणे नांवे । बोलिजे ते हे जाणावे । सम्यक्‌ज्ञानाचे आघवे । धावणे हे ॥73॥
अरे, अभय असे म्हणतात ते ह्याप्रकारे जाणावे; सम्यक् ज्ञानाशिवाय ते साध्य होत नाही. 73
74-16
आता सत्त्वशुद्धी जे म्हणिजे । ते ऐशा चिन्ही जाणिजे । तरी जळे ना विझे । राखोंडी जैसी ॥74॥
आता ज्याला सत्वशुद्धि म्हणतात ती ह्या चिन्हांवरून ओळखावी; जशी राखोंडी जळतही नाही किंवा विझविणेचेही कारण नसते. 74
75-16
का पाडिवा वाढी न मगे । अंवसे तुटी सांडूनि मागे । माजी अतिसूक्ष्म अंगे । चंद्रु जैसा राहे ॥75॥
किंवा अमावस्येच्या क्षयाची समाप्ति झाली व पाडव्याच्या वृद्धीस आरंभ नाही, अशा स्थितीत चंद्राचे जसे अतिसूक्ष्मरूप असते. 75
76-16
नातरी वार्षिया नाही मांडिली । ग्रीष्मे नाही सांडिली । माजी निजरूपे निवडली । गंगा जैसी ॥76॥
किंवा, वर्षाऋतु संपून गेला आहे व ग्रीष्मऋतूस आरंभ नाही ह्या मधल्या कालांत गंगा जशी स्वत:च्या नित्यशुद्ध स्वरूपाने असते. 76
77-16
तैसी संकल्पविकल्पाची वोढी । सांडूनि रजतमाची कावडी । भोगिता निजधर्माची आवडी । बुद्धि उरे ॥77॥
त्याप्रमाणे, संकल्प व विकल्प ह्यांची ओढ व रज, तम, गुण, ह्यांची वस्ती ज्या बुद्धींतून । पार नाहीशी होऊन जिला निजधर्माची म्हणजे स्वस्वरूपाची आवड उत्पन्न झाली आहे. 77
78-16
इंद्रियवर्गी दाखविलिया । विरुद्धा अथवा भलीया । विस्मयो काही केलिया । नुठी चित्ती ॥78॥
इष्ट अगर अनिष्ट अशा कोणत्याही गोष्टीचे इंद्रियवर्गाने दर्शन करविले तरी ज्याचे चित्त चलित होत नाही. 78
79-16
गावा गेलिया वल्लभु । पतिव्रतेचा विरहक्षोभु । भलतेसणी हानिलाभु । न मनी जेवी ॥79॥
पतीच्या परदेश गमनामुळे विरहदुःखाने पीडित पतिव्रता जशी प्रापंचिक इतर लहानमोठी हानि मनावरही घेत नाही. 79
80-16
तेवी सत्स्वरूप रुचलेपणे । बुद्धी जे ऐसे अनन्य होणे । ते सत्त्वशुद्धी म्हणे । केशिहंता ॥80॥
तशी सत्वरूपाची आवड उत्पन्न जी बुद्धि त्या ठिकाण (सत्स्वरूपी) अनन्य होते तिला सत्वशुद्धि असे म्हणावे असे केशी दैत्यहन्त्या भगवंतांनी सांगितले. 80
81-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
आता आत्मलाभाविखी । ज्ञानयोगामाजी एकी । जे आपुलिया ठाकी । हावे भरे ॥81॥
आता, आत्मलाभासाठी ज्ञान अथवा योग ह्या दोन साधनांपैकी आपली बुद्धि ज्यावर स्थिर होईल. 81
82-16
तेथ सगळिये चित्तवृत्ती । त्यागु करणे या रीती । निष्कामे पूर्णाहुती । हुताशी जैसी ॥82॥
निष्काम यज्ञकर्म करणाराने अग्नीमध्ये जशी पूर्णाहुति द्यावी त्याप्रमाणे सर्व चित्तवृत्तीचा त्या आवडीच्या साधनाच्या ठिकाणी लय करावा. 82
83-16
का सुकुळीने आपुली । आत्मजा सत्कुळीचि दिधली । हे असो लक्ष्मी स्थिरावली । मुकुंदी जैसी ॥83॥
किंवा कुलीन गृहस्थाने सत्कुलांत अर्पण केलेली आपली कन्या जशी त्या कुळात अनन्य होते अथवा लक्ष्मी जशी श्रीमुकुंदचरण अनन्य आहे. 83
84-16
तैसे निर्विकल्पपणे । जे योगज्ञानीच या वृत्तिक होणे । तो तिजा गुण म्हणे । श्रीकृष्णनाथु ॥84॥
त्याचप्रमाणे, योग अथवा ज्ञान ह्यापैकी एका विषयाविषयी विकल्परहितत्वाने अनन्य असणे हा तिसरा गुण होय, असे भगवान् श्रीकृष्ण म्हणतात. 84
85-16
आता देहवाचाचित्ते । यथासंपन्ने वित्ते । वैरी जालियाही आर्ताते । न वंचणे जे का ॥85॥
आता कायावाचामने व शक्यनुसार धनी, आपला शत्रूही जर आर्त होऊन (अडून) पुढे आला तर त्याला विन्मुख न करणे असा जो गुण, 85
86-16
पत्र पुष्प छाया । फळे मूळ धनंजया । वाटेचा न चुके आलिया । वृक्षु जैसा ॥86॥
वाटेवरील वृक्षाची आलेल्या वाटसरूला, आपल्या फल, मूल, छाया वगैरेंचा उपभोग घेण्याला जशी कधी ना नसते. 86
87-16
तैसे मनौनि धनधान्यवरी । विद्यमाने आल्या अवसरी । श्रांताचिये मनोहारी । उपयोगा जाणे ॥87॥
त्याचप्रमाणे, असलेल्या धनधान्यादिकाचा आलेल्या याचकाला अथवा अतिथीला त्याच्या मनाप्रमाणे उपभोग घेऊ देऊन त्याचे समाधान करणे, 87
88-16
तया नांव जाण दान । जे मोक्षनिधानाचे अंजन । हे असो आइक चिन्ह । दमाचे ते ॥88॥
ह्याला ” दान ” असे म्हणतात व मोक्षरूप ठेवा दिसण्याचे ते एक अंजनच होय; आता “दम” म्हणजे काय त्याचे लक्षण ऐक. 88
89-16
तरी विषयेंद्रिया मिळणी । करूनि घापे वितुटणी । जैसे तोडिजे खड्गपाणी । पारकेया ॥89॥
शस्त्रधारी ज्याप्रमाणे शत्रूचा संबंध त्याच्या नाशाने तोडून टाकतो त्याचप्रमाणे, विषय व इंद्रिये यांचे सान्निध्य झाले असता जो त्याची ताटातुट करितो. 89
90-16
तैसा विषयजातांचा वारा । वाजो नेदिजे इंद्रियद्वारा । इये बांधोनि प्रत्याहारा । हाती वोपी ॥90॥
तसाच विषयमात्राचा उपद्रव इंद्रियद्वारा स्वतःला होऊ देत नाही व त्यांना (इंद्रियांना) प्रत्याहाराचे बंधन घालितो. 90
91-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
आंतुला चित्ताचे अंगवरी । प्रवृत्ति पळे पर बाहेरी । आगी सुयिजे दाहीहि द्वारी । वैराग्याची ॥91॥
दशेंद्रियांच्या द्वारांवर वैराग्यरूप अग्नि घातल्यामुळे चित्ताच्या आत दडून असलेली विषयविषयक प्रवृत्ति बाहेर पळून जाते. 91
92-16
श्वासोश्वासाहुनी बहुवसे । व्रते आचरे खरपुसे । वोसंतिता रात्रिदिवसे । नाराणुक जया ॥92॥
योग्याच्या प्राण निरोधनापेक्षांही कठीण अशी व्रते रात्रंदिवस आचरीत असल्याने ज्याला दुसरी सवडच नसते. 92
93-16
पै दमु ऐसा म्हणिपे । तो हा जाण स्वरूपे । यागार्थुही संक्षेपे । सांगो ऐक ॥93॥
ज्याला दम असे म्हणतात. त्यांचे हे स्वरूप होय. आता यज्ञ तो काय संक्षेपाने सांगतो ते श्रवण कर. 93
94-16
तरी ब्राह्मण करूनि धुरे । स्त्रियादिक पैल मेरे । माझारी अधिकारे । आपुलालेनि ॥94॥
तरी ब्राह्मणांपासून आरंभ करून स्त्रियांदिकापर्यंत आपापल्या अधिकारा प्रमाणे, 94
95-16
जया जे सर्वोत्तम । भजनीय देवताधर्म । ते तेणे यथागम । विधी यजिजे ॥95॥
ज्याला जे उचित असे भजनपूजनादि देवताधर्म शास्त्रविहित असतील, ते त्या आज्ञेप्रमाणे त्याने आचरावे. 95
96-19
जैसा द्विज षट्कर्मे करी । शूद्र तयाते नमस्कारी । की दोहीसही सरोभरी । निपजे यागु ॥96॥
उदाहरणार्थ, ब्राह्मणाने षट्कर्माचरण करावे व शूद्राने त्याला नुसता नमस्कार करावा, तरी दोघासही यज्ञाचे पुण्य घडते. 96
97-16
तैसे अधिकारपर्यालोचे । हे यज्ञ करणे सर्वाचे । परी विषय विष फळाशेचे । न घापे माजी ॥97॥
ह्याप्रमाणे आपापला अधिकार पाहून सर्वानी यज्ञाचरण करावे, पण, त्यापासून अमुक फलप्राप्ति व्हावी असे आशेचे विष मात्र पोटांत नसावे. 97
98-16
आणि मी कर्ता ऐसा भावो । नेदिजे देहाचेनि द्वारे जावो । ना वेदाज्ञेसि तरी ठावो । होइजे स्वये ॥98॥
आणि ह्या यज्ञाचा मी कर्ता आहे असा देहबुद्धिद्वारा भाव उत्पन्न न होऊ देतांही वेदांज्ञा यथासांग पाळावी. 98
99-16
अर्जुना एवं यज्ञु । सर्वत्र जाण साज्ञु । कैवल्यमार्गींचा अभिज्ञु । सांगाती हा ॥99॥
अर्जुना, ह्याप्रमाणे यज्ञ हा सर्वत्र शास्त्राज्ञेप्रमाणेच असावा लागतो. (अथवा तसा असेल तोच यज्ञ होय) हा मोक्षमार्गातील एक उत्तम सोबती होय. 99
100-16
आता चेंडुवे भूमी हाणिजे । नव्हे तो हाता आणिजे । की शेती बी विखुरिजे । परी पिकी लक्ष ॥100॥
कोणीही भूईवर चेंडू आपटतो तो पुन्हा आपल्याच हाती यावा ह्या उद्देशानेच होय (इतस्ततः जावा म्हणून नव्हे) अथवा शेतात जे बी पेरतात ते पिकाकडे लक्ष देऊनच होय. 100
101-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
नातरी ठेविले देखावया । आदर कीजे दिविया । का शाखा फळे यावया । सिंपिजे मूळ ॥101॥
अंधारांतील जिन्नस सांपडावा म्हणून दिव्याला जपतात; किंवा मुळांना पाणी घालतात ते मुळांसाठी नसून खाद्यांना (फांद्याना) फळे यावी म्हणून होय. 1
102-16
हे बहु असो आरिसा । आपणपे देखावया जैसा । पुढतपुढती बहुवसा । उटिजे प्रीती ॥102॥
किंवा हे असो, आपले स्वच्छ प्रतिबिंब दिसावे म्हणून आरसा जसा वारंवार साफ करितात. 2
103-16
तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु । तो होआवयालागी गोचरु । श्रुतीचा निरंतरु । अभ्यासु करणे ॥103॥
त्याप्रमाणे वेदांनीच ज्याचे प्रतिपादन केले आहे, अस जो ईश्वर त्याचे दर्शन (प्राप्ति) होण्यासाठी जो निरंतर श्रुत्यर्थाचा अभ्यास करितो. 3
104-16
तेचि द्विजांसीच ब्रह्मसूत्र । येरा स्तोत्र का नाममंत्र । आवर्तवणे पवित्र । पावावया तत्त्व ॥104॥
द्विजांनी हा अभ्यास ब्रह्मसूत्रद्वारा करावा व इतरांनी स्तोत्र नाममंत्रादिकांच्या आवर्तनाने करावा म्हणजे त्यांना तत्त्वज्ञान होईल. 4
105-16
पार्था गा स्वाध्यावो । बोलिजे तो हा म्हणे देवो । आता तप शब्दाभिप्रावो । आईक सांगो ॥105॥
पार्था, ज्याला स्वाध्याय म्हणतात, तो देवांनी ह्याप्रमाणे सांगितला आहे. आता तप शब्दाचा अभिप्राय सांगतो तो श्रवण कर. 5
106-16
तरी दाने सर्वस्व देणे । वेचणे ते व्यर्थ करणे । जैसे फळोनि स्वये सुकणे । इंद्रावणी जेवी ॥106॥
आपले सर्वस्व दान करण्यात खर्च करणे ते दान होय; नुसते वाटेल तसे द्रव्य खर्च करणे ते दान न होता व्यर्थ हानि होय. कसे तर, कडूवृंदावन वृक्ष वाटेल तेवढा फळांनी लादूनही व्यर्थ सुकून जातो. त्याप्रमाने 6
107-16
नाना धूपाचा अग्निप्रवेशु । कनकी तुकाचा नाशु । पितृपक्षु पोषिता ऱ्हासु । चंद्राचा जैसा ॥107॥
अथवा धूपाचा व कनकाचा अग्निप्रवेश हा जसा गुणविकासामुळे त्यांचा एकप्रकारचा उत्कर्ष होय किंवा चंद्र कलांकलांनी कृश झाला तरी पितृपक्षाचे वनस्पतीचे जसे पोषण होते. 7
108-16
तैसा स्वरूपाचिया प्रसरा – । लागी प्राणेंद्रियशरीरा । आटणी करणे जे वीरा । तेचि तप ॥108॥
त्याप्रमाणे, अर्जुना, स्वस्वरूप (ब्रह्म) प्राप्तीसाठी, प्राण, इंद्रिये, व शरीर ह्यांचा वेच करणे तेच तप होय. 8
109-16
अथवा अनारिसे । तपाचे रूप जरी असे । तरी जाण जेवी दुधी हंसे । सूदली चांचू ॥109॥
अथवा याहून अन्य असे गणले गेलेले जे तप, ती शुद्ध तप नसल्यामुळे त्यातील शुद्धाशुद्धतेला हंसक्षीरन्याय लावणं प्राप्त आहे. 9
110-16
तैसे देहजीवाचिये मिळणी । जो उदयजत सूये पाणी । तो विवेक अंतःकरणी । जागवीजे ॥110॥
म्हणून देह व जीव ह्यांचे तादात्म्य जन्मतःच तोडून टाकण्याकरिता ज्या विवेकाची आवश्यकता आहे तो विवेक अंतःकरणात जागा असू दे. 110
111-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
पाहता आत्मयाकडे । बुद्धीचा पैसु सांकडे । सनिद्र स्वप्न बुडे । जागणी जैसे ॥111॥
जागृतीत निद्रेसह जसा स्वप्नाचा लय होतो, त्याचप्रमाणे अंतर्मुखतेने बुद्धि आत्म्याकडे वळली असता तिची विषयाकडील धाव सहजच कुंठित होते. 11
112-16
तैसा आत्मपर्यालोचु । प्रवर्ते जो साचु । तपाचा हा निर्वेचु । धनुर्धरा ॥112॥
त्याचप्रमाणे आत्मप्राप्तीच्या इच्छेने ज्याची बुद्धि ह्याप्रमाणे प्रवृत्त होते, ते, अर्जुना, तप असे म्हणतात. 12
113-16
आता बाळाच्या हिती स्तन्य । जैसे नानाभूती चैतन्य । तैसे प्राणिमात्री सौजन्य । आर्जव ते ॥113॥
आता स्तन्य (आईचे अथवा गाईचे दूध) जसे बालाचे व चैतन्य जसे भूतमात्राचे कल्याण होय, त्याचप्रमाणे, सर्व प्राणिमात्रांच्याविषयी ज्याच्या ठिकाणी सौजन्य असते ते “आर्जव” होय. 13
अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥16. 2॥
114-16
आणि जगाचिया सुखोद्देशे । शरीरवाचामानसे । राहाटणे ते अहिंसे । रूप जाण ॥114॥
आणि सर्व जगाला जेणकरून सुख होईल, असा कायावाचामने ज्याचा सर्व व्यापार सुरू असतो ते ‘अहिसेचे रूप ” होय असे समज. 14
115-16
आता तीख होऊनि मवाळ । जैसे जातीचे मुकुळ । का तेज परी शीतळ । शशांकाचे ॥115॥
आता कमलकळिका जशी पाण्याचा भेद करते म्हणून तीक्ष्ण व स्पर्शाला पहावे तर अत्यंत मृदु असते किंवा प्रकाश देऊनही चंद्राचे तेज शीतल असते. 15
116-16
शकेदाविताचि रोग फेडू । आणि जिभे तरी नव्हे कडु । ते वोखदु नाही मा घडू । उपमा कैची ॥116॥
ज्याच्या दर्शनानेच रोगनिवृत्ति होते व जे सेवन केले असता कटु अगर अरोचक नसते असे औषधच दिसत नाही; मग ती उपमा कशी द्यावी ? 16
117-16
तरी मऊपणे बुबुळे । झगडतांही परी नाडळे । एऱ्हवी फोडी कोंराळे । पाणी जैसे ॥117॥
आणि मृदुपणा पाहू गेले तर जे डोळयाच्या बुबुळालाही खुपणार नाही असे असून कठोरता पाहू गेले तर पर्वताचे कडे फोडून बाहेर पडणाऱ्या पाण्यासारखे आहे. 17
118-16
तैसे तोडावया संदेह । तीख जैसे का लोह । श्राव्यत्वे तरी माधुर्य । पायी घाली ॥118॥
त्याचप्रमाणे संदेहनिवृत्तिमध्ये जे लोखंडाच्या हत्याराप्रमाणे तीक्ष्ण असून, माधुर्यालाहि मागे टाकील असे श्रवण करितांना गोड वाटते. 18
119-16
ऐको ठाता कौतुके । कानाते निघती मुखे । जे साचारिवेचेनि बिके । ब्रह्मही भेदी ॥119॥
ज्याचे कौतुकाने ही श्रवण केले असता कानाला अधिक सेवनाची इच्छा होऊन जणू मुखेच फुटतात व सत्यत्वाच्या सामर्थ्याच्या दृष्टीने जे ब्रह्मालाही मागे टाकील अथवा हार जाणार नाही. 19
120-16
किंबहुना प्रियपणे । कोणातेही झक{ऊं} नेणे । यथार्थ तरी खुपणे । नाही कवणा ॥120॥ झकऊ
किंबहुना, प्रियपणाच्या दृष्टीने पाहू गेले त्याचे शब्द कोणालाही फसविणारे नसतात व यथार्थ असूनही ते कोणालाही खुपण्यासारखे नसतात. 120
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-16
एऱ्हवी गोरी कीर काना गोड । परी साचाचा पाखाळी कीड । आगीचे करणे उघड । परी जळो ते साच ॥121॥
नाहीतर, फांसेपारध्याचे गायन अगर ध्वनि कानास गोड लागतो खरा; पण त्यात सत्याच लेश नसतो; किंवा अग्नि आपले कर्म चोरून नव्हे तर उघडपने करितो, पण त्या उघड अगर सत्य कर्माला काय आग लावावयाची आहे ? 21
122-16
कानी लागता महूर । अर्थे विभांडी जिव्हार । ते वाचा नव्हे सुंदर । लांवचि पा ॥122॥
वरून कानारा गोड वाटणारे, पण, अर्थदृषष्ठया काळजाला घर पाडणारे भाषण सुंदर न म्हणत ती शुद्ध मायावी राक्षसीच म्हणावी. 22
123-16
परी अहिती कोपोनि सोप । लालनी मऊ जैसे पुष्प । तिये मातेचे स्वरूप । जैसे का होय ॥123॥
परंतु अहितापासून रक्षण करण्याकरिता वरून रागाचा आव आणणारी, पण, अंतःकरणात रक्षणाविषयी पुष्पाप्रमाणे मृदु असणारी अशी आई असते. 23
124-16
तैसे श्रवणसुख चतुर । परीणमोनि साचार । बोलणे जे अविकार । ते सत्य येथे ॥124॥
तसे ऐकतांना मधुर व कौतुकास्पद, परिणामी सत्य व कोणाचेही वर्म न दुखविणारे जे भाषण ते ” सत्य ” असे म्हणतात. 24
125-16
आता घालिताही पाणी । पाषाणी न निघे आणी । का मथिलिया लोणी । कांजी नेदी ॥125॥
किंवा दगडावर पाणी घातले तरी जसा अंकुर फुटणे शक्य नाही किंवा कांजी घुसळली असता जसे लोणी निघणे शक्य नसते. 25
126-16
त्वचा पाये शिरी । हालेयाही फडे न करी । वसंतीही अंबरी । न होती फुले ॥126॥
सर्पाच्या कांतेच्या शिरावर पाय दिला असता ती जशी फडा वर करीत नाही, किंवा वसंत ऋतु प्राप्त झाला तरीही आकाशात जशी पुष्पे निर्माण होत नाहीत. 26
127-16
नाना रंभेचेनिही रूपे । शुकी नुठिजेचि कंदर्पे । का भस्मी वन्हि न उद्दीपे । घृतेही जेवी ॥127॥
अथवा, रंभेचे लावण्यही जसे शुकाच्या चित्तांत विषयवासना उत्पन्न करू शकले नाही, किंवा भस्मात तूप घातले तरीही जशी अग्निज्वाला उत्पन्न होत नाही. 27
128-16
तेवीचि कुमारु क्रोधे भरे । तैसिया मंत्राची बीजाक्षरे । तिये निमित्तेही अपारे । मीनलिया ॥128॥
त्याचप्रमाणे लहान मुलालाही राग येईल अशा शेलक्या शिव्या जरी कोणी दिल्या अथवा आणखींही अशी काही कारणे घडलीं. 28
129-16
परी धातयाही पाया पडता । नुठी गतायु पंडुसुता । तैसी नुपजे उपजविता । क्रोधोर्मी गा ॥129॥
किंवा, अर्जुना, जो मृत झाला आहे तो, जसा ब्रह्मदेवाच्या पाया पडले तरी उठत नाही. तसा काहीही प्रयत्न केला तरी ज्याच्या चित्तांत ऋोध उत्पन्न होत नाही. 29
130-16
अक्रोधत्व ऐसे । नांव ते ये दशे । जाण ऐसे श्रीनिवासे । म्हणितले तया ॥130॥
अशी जी चित्ताची स्थिति तिला अक्रोधत्व असे म्हणावे असे भगवंतांनी सांगितले आहे. 130
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-16
आता मृत्तिकात्यागे घटु । तंतुत्यागे पटु । त्यजिजे जेवी वटु । बीजत्यागे ॥131॥
आता मृत्तिकेच्या त्यागाने, तंतुत्यागाने, किंवा बीजत्यागाने जसा अनुक्रमे घट, पट व वृक्ष त्याग सहज व केल्या सारखा होतो. 31
132-16
का त्यजुनि भिंतिमात्र । त्यजिजे आघवेचि चित्र । का निद्रात्यागे विचित्र । स्वप्नजाळ ॥132॥
किंवा भिंत त्यागिली असता तिजवरील चित्र जसे सहजच टाकल्यासारखे होते, किंवा निद्राभंगाने स्वप्न सहजच नष्ट होते. 32
133-16
नाना जळत्यागे तरंग । वर्षात्यागे मेघ । त्यजिजती जैसे भोग । धनत्यागे ॥133॥
किंवा जलत्यागाने तरंग, वर्षाऋतूच्या अंताने जसे मेघ किंवा धन त्यागाने भोग जसे आपोआपच नष्ट होतात. 33
134-16
तेवी बुद्धिमंती देही । अहंता सांडूनि पाही । सांडिजे अशेषही । संसारजात ॥134॥
त्याप्रमाणे विचारी पुरुषाने देहाच्या ठिकाणचा अहंभाव त्यागिला अथवा बाधित केला असता, त्याचा सर्व संसार त्यक्तप्राय होतो. 34
135-16
तया नांव त्यागु । म्हणे तो यज्ञांगु । हे मानूनि सुभगु । पार्थु पुसे ॥135॥
अशा स्थितीला ” त्याग” म्हणावे असे यज्ञभोक्ता भगवान् श्रीकृष्ण परमात्मा ह्यांनी सांगितले. ते ऐकून भाग्यवान अर्जुना पुन्हा विचारिता झाला. 35
136-16
आता शांतीचे लिंग । ते व्यक्त मज सांग । देवो म्हणती चांग । अवधान देई ॥136॥
देवा, शांति कशाला म्हणावे ते मला स्पष्ट करून सांग; तेव्हा देव म्हणाले, सांगतो, लक्ष देऊन श्रवण कर. 36
137-16
तरी गिळोनि ज्ञेयाते । ज्ञाता ज्ञानही माघौते । हारपे निरुते । ते शांति पै गा ॥137॥
ज्ञात्याने प्रथम सर्व ज्ञेयमात्राचा (त्याला स्वस्वरूपाहून पृथक् सत्ता नाही अशा बोधाने) ग्रास करून क्रमप्राप्त असे ज्ञातृत्व व ज्ञान हेही पाठोपाठ जेथे लय पावते अशी जी वस्तु (ब्रह्मवस्तु) तीच शुद्ध शांति होय. 37
138-16
जैसा प्रळयांबूचा उभडु । बुडवूनि विश्वाचा पवाडु । होय आपणपे निबिडु । आपणचि ॥138॥
ज्याप्रमाणे प्रलयकालाचे जळ वाढू लागले म्हणजे, विश्वचा थांगपत राहू न देता, सर्व दिशा आपणच व्यापून आपल्याच स्वरूपाने केवल स्थित असते. 38
139-16
मग उगम ओघ सिंधु । हा नुरेचि व्यवहारभेदु । परी जलैक्याचा बोधु । तोही कवणा ? ॥139॥
व मग, उगम, प्रवाह, अगर विश्रांतिस्थान जो सागर इत्यादि व्यवहारभेद सर्व लोपून जातात, तेथे, ” सर्व जलमय आहे ” असा बोध होण्यासारखा तरी अन्य कोणता पदार्थ आहे की त्यास तो व्हावा ? 39
140-16
तैसी ज्ञेया देता मिठी । ज्ञातृत्वही पडे पोटी । मग उरे तेचि किरीटी । शांतीचे रूप ॥140॥
त्याप्रमाणे, अर्जुना, सर्व ज्ञेय आटून गेले असता (बाधित झाले असता ) ज्ञातृत्वही आपोआपच आपल्याच ठिकाणी लयाला जाऊन केवळ ज्ञप्तिमात्र (ज्ञानमात्र) असणारी जी वस्तु, तेच शान्तीचे खरे स्वरूप होय. 140
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-16
आता कदर्थवीत व्याधी । बळीकरणाचिया आधी । आपपरु न शोधी । सद्वैद्यु जैसा ॥141॥
आता व्याधिग्रस्त रोग्याला आरोग्य प्राप्त करून देण्याच्या कामी सद्वैद्य जसा आपपर भाव बाळगीत नाही. 41
142-16
का चिखली रुतली गाये । धडभाकड न पाहे । जो तियेचिया ग्लानी होये । कालाभुला ॥142॥
किंवा चिखलांत रुतलेली गाय पाहून ज्याचे अंत:करण व्यथित होते तो जसा तिचा उद्धार करतांना ती दुभती आहे की भाकड आहे ह्याचा विचार करीत बसत नाही. 42
143-16
नाना बुडतयाते सकरुणु । न पुसे अंत्यजु का ब्राह्मणु । काढूनि राखे प्राणु । हेचि जाणे ॥143॥
किंवा बुडणाऱ्या मनुष्याची करुणा येणारा समर्थ मनुष्य जसा तो अंत्यज आहे की ब्राह्मण आहे ह्याचा विचार न करिता त्याला तीराला पोंचवून त्याचा प्राण रक्षण करणे एवढेच आपले कर्तव्य समजतो. 43
144-16
की माय वनी पापिये । उघडी केली विपाये । ते नेसविल्यावीण न पाहे । शिष्टु जैसा ॥144॥
किंवा पाप्यांनी एखादी गरीब अबला अरण्यात उघडीनागडी केलेली दिसतांच तिचे शरीर आच्छादित केल्याशिवाय कोणीही शिष्ट स्वस्थ असत नाही. 44
145-16
तैसे अज्ञानप्रमादादिकी । का प्राक्तनहीन सदोखी । निंदत्वाच्या सर्वविखी । खिळिले जे ॥145॥
त्याप्रमाणे जे अज्ञान व घोर चुका ह्यांनी युक्त असून, पूर्वकर्मामुळे दुःखित आहेत व सर्वथैव निदेला पात्र आहेत. 45
146-16
तया आंगीक आपुले । देऊनिया भले । विसरविजती सले । सलती तिये ॥146॥
त्यांना स्वतःसहाय्य होऊन त्यांच्या त्या दुःखाचा विसर पाडून सुखविण्याचा प्रयत्न करतात. 46
147-16
अगा पुढिलाचा दोखु । करूनि आपुलिये दिठी चोखु । मग घापे अवलोकु । तयावरी ॥147॥
अरे, पुढील म्हणजे गाठ पडणाच्या अंगी जर काही दोष दिसले तर ते वर्ज्य करून, मग त्याच्यापाशी तो सलगी करितो. 47
148-16
जैसा पुजूनि देवो पाहिजे । पेरूनि शेता जाइजे । तोषौनि प्रसादु घेइजे । अतिथीचा ॥148॥
ज्याप्रमाणे देव पूजेनं सुशोभित करून मग प्रसन्नचित्ताने पहावा, शेतात पेरणी करून मग फलाशेने तिकडे जावे, किंवा अतिथीला संतुष्ट करून मग त्याचा आशिर्वाद घ्यावा. 48
149-16
तैसे आपुलेनि गुणे । पुढिलाचे उणे । फेडुनिया पाहणे । तयाकडे ॥149॥
त्याप्रमाणे, आपल्या आंगच्या गुणांनी अगर साधनांनी पुढील व्यक्तींतील उणीव भरून काढून मग त्यांच्याकडे (आदराने) अवलोकन करावे. 49
150-16
वाचूनि न विंधिजे वर्मी । नातुडविजे अकर्मी । न बोलविजे नामी । सदोषी तिही ॥150॥
इतकेच नव्हे तर, त्यांना झोंबतील असे शब्द बोलू नये, त्यांच्या अनाचाराचा उल्लेख करू नये किंवा त्यांच्या पापाचाराचा उच्चार करून त्यांना खेद होईल असेही करू नये, 150
151-16
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
वरी कोणे एके उपाये । पडिले ते उभे होये । तेच कीजे परी घाये । नेदावे वर्मी ॥151॥
तर, जो कोणी पतित असेल तो ज्या उपायाने उभा राहील म्हणजे सुधारेल ते उपाय योजून त्याचा मर्मच्छेद करू नये. 51
152-16
पै उत्तमाचियासाठी । नीच मानिजे किरीटी । हे वाचोनि दिठी । दोषु न घेपे ॥152॥
किंवा, अर्जुना, एखाद्या उत्तम किंवा पुरुषाची तुलना मनात आणून त्यामानाने हा कनिष्ठ आहे असे मनात न आणिता जो त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करितो. 52
153-16
अगा अपैशून्याचे लक्षण । अर्जुना हे फुडे जाण । मोक्षमार्गींचे सुखासन । मुख्य हे गा ॥153॥
अर्जुना, ” अपैशुन्याचे ” अथवा सुजनतेने हे लक्षण होय व मोक्षमार्गातील हे एक सुखसाधन आहे. 53
154-16
आता दया ते ऐसी । पूर्णचंद्रिका जैसी । निवविता न कडसी । साने थोर ॥154॥
आता दया म्हणजे काय विचारशील, तर ती अशी असावी की, पूर्णचंद्र परतापहरण करितांना जसा भेदाभेद राखीत नाही, तशी ती प्राणिमात्राच्या ठिकाणी सारखी असावी. 54
155-16
तैसे दुःखिताचे शिणणे । हिरता सकणवपणे । उत्तमाधम नेणे । विवंचू गा ॥155॥
म्हणून कोणाही दुःखितांचे दुःख पाहून, त्याचा उत्तमपणा अगर अधमपणा मनात न आणिता त्याची करुणा करावी. 55
156-16
पै जगी जीवनासारिखे । वस्तु अंगवरी उपखे । परी जाते जीवित राखे । तृणाचेहि ॥156॥
किंवा जगात जीवनासारखी (जलासारखी) दुसरी कोणती वस्तु आहे की जी आपला सर्वस्व वेच करून घेऊनही गवतासारख्याचेही जीवित रक्षण करिते. 56
157-16
तैसे पुढिलाचेनि तापे । कळवळलिये कृपे । सर्वस्वेसी दिधलेहि आपणपे । थोडेचि गमे ॥157॥
त्याप्रमाणे दुःखातं पाहून ज्याला कृपेने कळवळा येतो व जो त्याच्या सहाय्यार्थं आपले सर्वस्व देऊनही काहीच दिले नाही असे चित्तांत मानतो. 57
158-16
निम्न भरलियाविणे । पाणी ढळोचि नेणे । तेवी श्रांता तोषौनि जाणे । सामोरे पा ॥158॥
सखल प्रदेश पूर्ण भरल्याशिवाय पाणी जसे वाहू लागतच नाही, त्याप्रमाणे ज्याला समोरील पीडिताचे दुःख निवारण केल्याशिवाय अन्य काहीही करणे सुचत नाही. 58
159-16
पै पायी काटा नेहटे । तव व्यथा जीवी उमटे । तैसा पोळे संकटे । पुढिलांचेनि ॥159॥
किंवा पायात मोडलेला काटा असेपर्यंत जसे जीवाला त्याचे दुःख होते, त्याप्रमाणे पुढीलाचे संकट पाहून जो नित्य पाळतो. 59
160-16
का पावो शीतळता लाहे । की ते डोळ्याचिलागी होये । तैसा परसुखे जाये । सुखावतु ॥160॥
किंवा पावलाला शीतलोपचार केले तर त्यांचा जसा त्यांच्यापेक्षा डोळ्यांनाच अधिक उपयोग होतो, त्याप्रमाणे जो दुसऱ्यायाचे सुख पाहूनच मनात सुखी होतो. 160
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-16
किंबहुना तृषितालागी । पाणी आरायिले असे जगी । तैसे दुःखितांचे सेलभागी । जिणे जयाचे ॥161॥
किंबहुना, तृषितांची तृषा हरण व्हावी म्हणूनच जस जगात पाण्याचा जन्म आहे, त्याप्रमाणे दुःखितांचे दुःख हरण करावे हेच ज्याच्या जीवनाचे मुख्य कर्तव्य आहे. 61
162-16
तो पुरुषु वीरराया । मूर्तिमंत जाण दया । मी उदयजताचि तया । ऋणिया लाभे ॥162॥
अर्जुना, असा जो पुरुष तो दयेची केवळ मूर्तींच होय; तो जन्मत:च मला ऋणी करून ठेवितो. 62
163-16
आता सूर्यासि जीवे । अनुसरलिया राजीवे । परी ते तो न शिवे । सौरभ्य जैसे ॥163॥
आता, कमल जरी, सूर्यापाशी जीवे भावे अनन्य असले तरी, तो जसा त्याच्या सुगंधाला स्पर्शही करीत नाही, 63
164-16
का वसंताचिया वाहाणी । आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी । ते न करीतुचि घेणी । निगाला तो ॥164॥
किंवा वसंतऋतूच्या आगमनाने सर्व वनश्री जरी पत्र, पुष्प, फल युक्त ऐश्वर्याला धारण करते तरी, तो त्या ऐश्वर्याकडे ढंकूनही न पहाता जसा सरळ निघून जातो. 64
165-16
हे असो महासिद्धीसी । लक्ष्मीही आलिया पाशी । परी महाविष्णु जैसी । न गणीच ते ॥165॥
किंवा, ही राहो, सर्व सिद्धींसह लक्ष्मी पायाशी आली असतांही श्रीमहाविष्णु जसे तिला मुळीच महत्त्व देत नाही. 65
166-16
तैसे ऐहिकीचे का स्वर्गीचे । भोग पाईक जालिया इच्छेचे । परी भोगावे हे न रुचे । मनामाजी ॥166॥
त्याप्रमाणे ऐहिक किंवा पारत्रिक भोग ह्याच्या इच्छेचे दास होऊन पुढे आले तरी, त्यांच्या भोगाविषयी ज्याला यत्किंचितही इच्छा होत नाही. 66
167-16
बहुवे काय कौतुकी । जीव नोहे विषयाभिलाखी । अलोलुप्‌त्वदशा ठाउकी । जाण ते हे ॥167॥
बहुत काय सांगावे ? कौतुकाखातरही ज्याला कधी विषयसेवनाची इच्छा होत नाही. अशी जी दशा ते “अलोलुप्त्व” होय. 67
168-16
आता माशिया जैसे मोहळ । जळचरा जेवी जळ । का पक्षिया अंतराळ । मोकळे हे ॥168॥
आता, मधमाशांना जसे मोहोळ किंवा जलचरांना जसे जल, किंवा पक्षांना जसे आकाश नित्यप्रिय असते. 68
169-16
नातरी बाळकोद्देशे । मातेचे स्नेह जैसे । का वसंतीच्या स्पर्शे । मऊ मलयानिळु ॥169॥
किंवा, बालकाविषयी मातेचे चित्त जसे नित्य प्रेमयुक्त असते अथवा मलयागिरीवरून वसंतात येणारा वारा जसा मधुर व कोमल असतो. 69
170-16
डोळ्या प्रियाची भेटी । का पिलिया कूर्मीची दिठी । तैसी भूतमात्री राहटी । मवाळ ते ॥170॥
पतिव्रतेला पतिदर्शन, किंवा कांसवीच्या पिलांना मातृदृष्टि, ह्याप्रमाणे भूतमात्राविषयी ज्याच्या अंतःकरणात नित्यप्रेम व मार्दव असते. 170
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-16
स्पर्शे अतिमृदु । मुखी घेता सुस्वादु । घ्राणासि सुगंधु । उजाळु आंगे ॥171॥
स्पर्श केला तर मृदु, सेवन केला तर रुचकर, वास घेतला तर सुगंधित, व रूपाने शुभ्र असा जो कापूर. 71
172-16
तो आवडे तेवढा घेता । विरुद्ध जरी न होता । तरी उपमे येता । कापूर की ॥172॥
तो वाटेल तेवढा सेवन करून जर बाधा न करिता, तर, त्याची उपमा देता आली असती. 72
173-16
परी महाभूते पोटी वाहे । तेवीचि परमाणूमाजी सामाये । या विश्वानुसार होये । गगन जैसे ॥173॥
परंतु ज्याच्या पोटांत पंचमहाभूतांचा समावेश होऊनही जे परमाणूमध्येही प्रविष्ट असते व जे विश्वाचा आकार धारण करिते असे जे गगन. 73
174-16
काय सांगो ऐसे जिणे । जे जगाचेनि जीवे प्राणे । तया नांव म्हणे । मार्दव मी ॥174॥
फार काय सांगावे ! याचे जिणे म्हणजे केवळ जगाच्या कल्याणार्थच असते त्याला ‘मार्दव ” असे मी म्हणतों74
175-16
आता पराजये राजा । जैसा कदर्थिजे लाजा । का मानिया निस्तेजा । निकृष्टास्तव ॥175॥
आता पराभव पावलेला राजा जसा लज्जेने व्यथित होतो, किंवा मानी पुरुष निकृष्ट स्थिति प्राप्त झाली असता जसा निस्तेज होतो. 75
176-16
नाना चांडाळ मंदिराशी । अवचटे आलिया संन्याशी । मग लाज होय जैसी । उत्तमा तया ॥176॥
किंवा एखादा संन्यासी आकस्मिकपणे चांडाळगृह आला असता या श्रेष्ठ पुरुषाला जशी लज्जा उत्पन्न होते. 76
177-16
क्षत्रिया रणी पळोनि जाणे । ते कोण साहे लाजिरवाणे । का वैधव्ये पाचारणे । महासतियेते ॥177॥
रणांतून पळून जाणे ही लाजिरवाणी गोष्ट कोणता जातिवंत क्षत्रिय सहन करील ? किंवा महापतिव्रतेला वैधव्यबोधक शब्द लावणे कोणास आवडेल ? 77
178-16
रूपसा उदयले कुष्ट । संभाविता कुटीचे बोट । तया लाजा प्राणसंकट । होय जैसे ॥178॥
देखण्या व्यक्तीला अंगावर कोड उठावे, किंवा एखाद्या सन्माननीय गृहस्थावर वेडावांकडा आळ यावा हे जसे प्राणसंकटासारखे होते. 78
179-16
तैसे औटहातपणे । जे शव होऊनि जिणे । उपजो उपजो मरणे । नावानावा ॥179॥
त्याप्रमाणे साडेतीन हात प्रेतरूप शरीर त्याच्या आधारावर स्वतःचे जगणे अथवा आस्तित्व मानून पुनःपुन्हा जन्माला यावे व मरावे. 79
180-16
तिये गर्भमेदमुसे । रक्तमूत्ररसे । वोतीव होऊनि असे । ते लाजिरवाणे ॥180॥
व त्या गर्भाशयरूप मुशीत (सांच्यात) रक्तमूत्रादि रसांची ओतीव मूर्ति होऊन राहणे हा जो लाजिरवाणा भोग. 180
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-16
हे बहु असो देहपणे । नामरूपासि येणे । नाही गा लाजिरवाणे । तयाहूनी ॥181॥
फार काय सांगावे ! देहपणाने नामरूपाला येऊन मिरवणे ह्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. 81
182-16
ऐसैसिया अवकळा । घेपे शरीराचा कंटाळा । ते लाज पै निर्मळा । निसुगा गोड ॥182॥
स्वतःला अशा हीन दशेला आणणान्या शरीराचे धारण करण्याचा भोग वांटयास यावा ह्याची साधुपुरुषांना लाज व खंती वाटते; परंतु निर्लज्जाला तेच गोड वाटते. 82
183-16
आता सूत्रतंतु तुटलिया । चेष्टाचि ठाके सायखडिया । तैसे प्राणजये कर्मेंद्रिया । खुंटे गती ॥183॥
आता चलन देणारी दोरी तुटल्यावर कळसूत्री बाहुल्यांच्या सर्व चेष्टा जशा बंद पडतात, त्याप्रमाणे प्राणांचा जय (योग) केला असता सर्व कमेंद्रियांच्या चेष्टा बंद पडतात. 83
184-16
की मावळलिया दिनकरु । सरे किरणांचा प्रसरु । तैसा मनोजये प्रकारु । ज्ञानेंद्रियांचा ॥184॥
किंवा सूर्यास्ताबरोबर सर्व किरणांचा पसारा जसा संपतो त्याप्रमाणे मनोजय केला असता ज्ञानेंद्रियांचे व्यापार बंद होतात. 84
185-16
एवं मनपवननियमे । होती दाही इंद्रिये अक्षमे । ते अचापल्य वर्मे । येणे होय ॥185॥
ह्याप्रमाणे प्राणजय व मनोजय केल्याने दशेंद्रियांच्या सर्व चेष्टा थांबून ती स्तब्ध होतात त्यालाच ” अचापल्य” असे म्हणतात. 85
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत ॥16. 3॥
186-16
आता ईश्वरप्राप्तीलागी । प्रवर्तता ज्ञानमार्गी । धिंवसेयाचि आंगी । उणीव नोहे ॥186॥
आता ईश्वरप्राप्तीसाठी ज्ञानमार्गाकडे प्रवृत्ति झाली असता धैर्याची उणीव भासत नाही. 86
187-16
वोखटे मरणा{ऐ}से । तेही आले अग्निप्रवेशें । परी प्राणेश्वरोद्देशे । न गणीचि सती ॥187॥ ऐसे
मरणासारखा अत्यंत अप्रिय प्रसंग, व तोही जिवंतपणी अग्निप्रवेश करून येणार; पण, प्राणपतीच्या उद्देशाने तो ओढवून घेतांना पतिव्रता सतीला त्याचे काहीच वाटत नाही. 87
188-16
तैसे आत्मनाथाचिया आधी । लाऊनि विषयविषाची बाधी । धावो आवडे पाणधी । शून्याचिये ॥188॥
त्याप्रमाणे ज्याला आत्मप्राप्तीची तळमळ लागली आहे, तो, विषयांचा विषवत् त्याग करून, आवश्यक तर, प्राणनिरोधनाने शून्यसमाधीसारखे कठीण साधनही करण्यास तयार होतो. 88
189-16
न ठाके निषेधु आड । न पडे विधीची भीड । नुपजेचि जीवी कोड । महासिद्धीचे ॥189॥
विधिनिषेधाचे भान रहात नाही किंवा महासिद्धीसारखी प्राप्ति झाली असतांही त्याला तिचे कौतुक वाटत नाही. 89
190-16
ऐसे ईश्वराकडे निज । धावे आपसया सहज । तया नांव तेज । आध्यात्मिक ते ॥190॥
ज्याच्या वृत्तीचा स्वाभाविक ईश्वर प्राप्तीकडे असा ओढा असतो, त्याला अध्यात्मिक (शारीरिक) तेज असे म्हणतात. 190
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-16
आता सर्वही साहातिया गरिमा । गर्वा न ये तेचि क्षमा । जैसे देह वाहोनि रोमा । वाहणे नेणे ॥191॥
आता येईल तो घोर किंवा थोर प्रसंग सहन करूनही ज्याला, देहाला आपण अनंत रोम धारण केले आहेत ह्याचे जसे भानही नसते त्याप्रमाणे, मुळीच गर्व अगर स्वतःच्या सहनशीलतेचे भानही नसते ती “ क्षमा” होय. 91
192-16
आणि मातलिया इंद्रियांचे वेग । का प्राचीने खवळले रोग । अथवा योगवियोग । प्रियाप्रियांचे ॥192॥
आणि इंद्रियांच्या वृत्ति अनावर झाल्या असता, किंवा अदृष्टाने रोगादि भोग उभे राहिले असता, अथवा प्रिय किंवा अप्रिय वस्तूंचा योग किंवा वियोग घडला असता. 92
193-16
यया आघवियांचाचि थोरु । एके वेळे आलिया पूरु । तरी अगस्त्य का होऊनि धीरु । उभा ठाके ॥193॥
किंवा हे प्रसंग पृथक् पणे न येता एकाच वेळ ह्या सर्वाचा पूर आला तरी जो अगस्ति ऋषीप्रमाणे ह्या सर्वाचा एकदम ग्रास करून टाकतो व अकंप असतो. 93
194-16
आकाशी धूमाची रेखा । उठिली बहुवा आगळिका । ते गिळी येकी झुळुका । वारा जेवी ॥194॥
आकाशात धुराचा केवढाही स्तंभ उंच गेला असला तरी, वाऱ्याची एकच झळूक तो जसा मोडून टाकते. 94
195-16
तैसे अधिभूताधिदैवा । अध्यात्मादि उपद्रवा । पातलेया पांडवा । गिळुनि घाली ॥195॥
त्याप्रमाणे अर्जुना, आध्यात्मिक, आधिभौतिक अथवा आधिदैविक वगैरे पीडा उत्पन्न झाल्या असता, त्या सर्व जो गिळून जातो. 95
196-16
ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी । उचलूनि धैर्या जे चांगावे करी । धृति म्हणिपे अवधारी । तियेते गा ॥196॥
अशा चित्तक्षोभाच्या प्रसंगांत ज्याचे धैर्य टिकून राहते त्याला धृति म्हणतात, हे लक्षात असूदे. 96
197-16
आता निर्वाळूनि कनके । भरिला गांगे पीयूखे । तया कलशाचियासारिखे । शौच असे ॥197॥
आता सुवर्णकलश स्वच्छ करून आत शुद्ध गंगोदक भरावे, त्याप्रमाणे ” शौच ” म्हणजे शुद्धतेचे स्वरूप आहे. 97
198-16
जे आंगी निष्काम आचारु । जीवी विवेकु साचारु । तो सबाह्य घडला आकारु । शुचित्वाचाचि ॥198॥
ज्याचे आचरण निष्काम असून, चित्तांत विवेक नित्य जागा असतो, तो सबाह्य शुचित्वाची मूर्तीच होय असे समज. 98
199-16
का फेडित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप । गंगेचे जैसे ॥199॥ तीरीचे
समुद्राकडे वाहणारे गंगोदक जसे स्नान करणान्यांच्या पापाचा व तापाचा नाश करून तीरावर असलेल्या वृक्षांचे सहज पोषण करिते. 99
200-16
का जगाचे आंध्य फेडितु । श्रियेची राउळे उघडितु । निघे जैसा भास्वतु । प्रदक्षिणे ॥200॥
किंवा सूर्य नित्याच्या फेरीला निघाला असता जगांतील अंधकाराचा नाश करून सर्व व्यवहार व्यापार प्रकट करितो. 200
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
201-16
तैसी बांधिली सोडिता । बुडाली काढिता । सांकडी फेडिता । आर्ताचिया ॥201॥
त्याप्रमाणे बद्धांना मुक्त करणारा, बुडणारांचा उद्धार करणारा, व संकटग्रस्तांचे संकट निवारण करणारा. 1
202-16
किंबहुना दिवसराती । पुढिलांचे सुख उन्नति । आणित आणित स्वार्थी । प्रवेशिजे ॥202॥
किंबहुना स्वार्थाच्या व्यापारांत रत असतांनाही सभोवारच्या जीवांच्या सुखाचे व उन्नतीचे ज्याच्या चित्तांत नित्य चिंतन चालू असते. 2
203-16
वाचूनि आपुलिया काजालागी । प्राणिजाताच्या अहितभागी । संकल्पाचीही आडवंगी । न करणे जे ॥203॥
किंवा आपला कार्यभाग साधण्यासाठी दुसऱ्यांचे यत्किंचितही अहित करावे असा नुसता संकल्पही ज्याला शिवत नाही. 3
204-16
पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी । ऐकसी जिया किरीटी । ते सांगितले हे दिठी । पाहो ये तैसे ॥204॥
अर्जुना, अशी वागणूक जेथे दिसेल अगर ऐकू येईल ते “अद्रोहत्व” होय असे तुला पटण्यासारखे सांगितले. 4
205-16
आणि गंगा शंभूचा माथा । पावोनि संकोचे जेवी पार्था । तेवी मान्यपणे सर्वथा । लाजणे जे ॥205॥
आणि, अर्जुना, गंगेला शंकरांनी आपल्या जटेत धारण करून जिरविल्यावर तिच्या स्वतःच्या वेगाचा गर्व जसा हरण झाला व ती जशी लज्जित झाली, तसा लोकांनी अतिशय मानमान्यता केली असता जो चित्तांत संकोच पावतो. 5
206-16
ते हे पुढत पुढती । अमानित्व जाण सुमती । मागा सांगितलेसे किती । तेचि ते बोलो ॥206॥
इत्यादि जे वर्तन हेच अमानित्व होय; अर्जुना मागे ह्याचे दिग्दर्शन आले आहेच; पुन्हा तेच ते सांगणे कशाला ? 6
207-16
एवं इही सव्विसे । ब्रह्मसंपदा हे वसत असे । मोक्षचक्रवर्तीचे जैसे । अग्रहार होय ॥207॥
ह्याप्रमाणे सव्वीस प्रकारची ही दैवी किंवा ब्रह्मसंपत्ति आहे व ती मोक्षसम्राटांचे जणू वतनच होय. 7
208-16
नाना हे संपत्ति दैवी । या गुणतीर्थांची नीच नवी । निर्विण्णसगरांची दैवी । गंगाचि आली ॥208॥
किंवा, नित्य नवे वाटावे अशा ह्या सव्वीस पवित्र गुणरूपांची ही दैवी संपत्ति म्हणजे वैराग्यरूपी सगरपुत्रांचा उद्धार करण्यासाठी जणू गंगाच अवतरली आहे ! 8
209-16
की गणकुसुमांची माळा । हे घेऊनि मुक्तिबाळा । वैराग्यनिरपेक्षाचा गळा । गिंवसीत असे ॥209॥
किंवा ही मुक्ति नवरी ह्या सव्वीस गुणरूपी पुष्पांची माला घेऊन वैराग्यादि साधनांनी संपन्न असलेल्या वराच्या गळ्यात ती घालावी म्हणून जणू त्याचा शोधच करीत आहे ! 9
210-16
की सव्विसे गुणज्योती । इही उजळूनि आरती । गीता आत्मया निजपती । नीरांजना आली ॥210॥
किंवा ह्या सव्वीस गुणरूप ज्योतींनी युक्त अशी आरती घेऊन; आपला पति जो आत्मराज त्याला ओवाळण्यासाठ गीता ते ताट घेऊन पुढे आली आहे. 210
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-13
उगळिते निर्मळे । गुण इयेचि मुक्ताफळे । दैवी शुक्तिकळे । गीतार्णवीची ॥211॥
गीतारूप समुद्रांतील शिंपल्यातून ही दैवीसंपत्तिरूप मुक्ताफळेच जणु बाहेर पडली आहेत. 11
212-16
काय बहु वानू ऐसी । अभिव्यक्ती ये अपैसी । केले दैवी गुणराशी । संपत्तिरूप ॥212॥
ह्या दैवीसंपत्तीरूप गुणराशीचे अधिक स्पष्ट असे स्वरूप बोलून किती म्हणून वर्णन करावे ? 12
213-16
आता दुःखाची आंतुवट वेली । दोषकाट्यांची जरी भरली । तरी निजाभिधानी घाली । आसुरी ते ॥213॥
आता, अंतर्बाह्य दुःखरूप असलेली व दोषादि कंटकांनी युक्त असलेली अशी जरी आसुरी संपत्ति असली तरी, तीही तुला माहीत असू दे. 13
214-16
पै त्याज्य त्यजावयालागी । जाणावी जरी अनुपयोगी । तरी ऐका ते चांगी । श्रोत्रशक्ती ॥214॥
कारण, ती त्याज्य व निरुपयोगी अशी जरी असली तरी जिचा त्याग करावयाचा तिची लक्षणेही चांगल्या प्रकारे ऐकलेली पाहिजेतच. 14
215-16
तरी नरकव्यथा थोरी । आणावया दोषीघोरी । मेळु केला ते आसुरी । संपत्ति हे ॥215॥
तरी जीवांना घोर नरकव्यथा प्राप्त करून देण्यासाठी जे घोर दोष एकत्र जमून त्यांचा मेळावा झाला, ती ही “आसुरी” संपत्ति होय. 15
216-16
नाना विषवर्गु एकवटु । तया नांव जैसा बासटु । आसुरी संपत्ती हा खोटु । दोषांचा तैसा ॥216॥
जगांतील सर्व विषांचे एकीकरण म्हणजे एक “कालकूट” विष म्हणावे त्याप्रमाणे जगांतील सर्व दोषांचे एकत्रीकरण ती ही आसुरी संपत्ति होय. 16
दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥16. 4॥
217-16
तरी तयाचि असुरा । दोषांमाजी जया वीरा । वाडपणाचा डांगोरा । तो दंभु ऐसा ॥217॥
तरी, अर्जुना, ह्या दोषयुक्त आसुर संपत्तीमध्ये जो प्रमुख म्हणून गणला जातो असा जो दंभ तो असा असतो. 17
218-16
जैसी आपुली जननी । नग्न दाविलिया जनी । ते तीर्थचि परी पतनी । कारण होय ॥218॥
आपल्या जननीचे स्मरण केव्हांही पवित्रच होय; पण, तेच जनांत तिच्या आंगच्या दोषाविष्करणाच्या निमित्ताने केले असता जसे पतनाला कारण होते. 18
219-16
का विद्या गुरूपदिष्टा । बोभाइलिया चोहटा । तरी इष्टदा परी अनिष्टा । हेतु होती ॥219॥
किंवा गुरूपासून प्राप्त झालेली गुह्यविद्या चव्हाट्यावर उघडी मांडली असता, ती मूळची हितकारिणी खरी, पण तीच अनिष्टाला कारणीभूत होते. 19
220-16
पै आंगे बुडता महापूरी । जे वेगे काढी पैलतीरी । ते नांवचि बांधिलिया शिरी । बुडवी जैसी ॥220॥
जिचे स्वतःचे बहुतेक अंग पुरांत अगर पाण्यात बुडालेले असते तरी जी वेगाने पैलतीराला पोंचविते ती नावच डोक्यावर घेऊन पाण्यात शिरणारा जसा निश्चित बुडणार. 220
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-16
कारण जे जीविता । ते वानिले जरी सेविता । तरी अन्नचि पंडुसुता । होय विष ॥221॥
जीवन रक्षण करणारे म्हणून अन्न सेवनसमयी स्तुतियोग्य असले, तरी अर्जुना, तेच प्रमाणाबाहेर सेवन केले असता विषाप्रमाणे बाधक होते. 21
222-16
तैसा दृष्टादृष्टाचा सखा । धर्मु जाला तो फोकारिजे देखा । तरी तारिता तोचि दोखा- । लागी होय ॥222॥
त्याचप्रमाणे इहपरलोकींचा सखा असा जो स्वधर्म घडेल त्याची चव्हाटयावर टिमकी वाजविल्यास तोच पतनाला कारणीभूत होतो. 22
223-16
म्हणौनि वाचेचा चौबारा । घातलिया धर्माचा पसारा । धर्मुचि तो अधर्मु होय वीरा । तो दंभु जाणे ॥223॥
म्हणून आचरलेल्या धर्माचा स्वत:च्या वाचेने डांगोरा अगर प्रसिद्धि करीत बसले असता त्यालाच अधर्माचे फल प्राप्त होतें; व अर्जुना, दंभ म्हणतात तो हाच होय. 23]
224-16
आता मूर्खाचिये जिभे । अक्षरांचा आंबुखा सुभे । आणि तो ब्रह्मसभे । न रिझे जैसा ॥224॥
आता, मुर्खाला चार अक्षरे येत झाली की तो जसा ब्रह्मसभेलाही तुच्छ लेखतो ! 24
225-16
का मादुरी लोकाचा घोडा । गजपतिही मानी थोडा । का कांटियेवरिल्या सरडा । स्वर्गुही नीच ॥225॥
किंवा एखाद्या शिलेदाराला आपला घोडा गजराजापेक्षाही श्रेष्ठ आहे असे वाटावे, किंवा, काट्यांच्या वईवरील सरडयाला आपण आकाश पायांखाली आणिले असे वाटावे, 25
226-16
तृणाचेनि इंधने । आगी धावे गगने । थिल्लरबळे मीने । न गणिजे सिंधु ॥226॥
गवताच्या मोळीचा जाळ जसा तात्काळ आकाशात उंचवर जातो, किंवा डबक्यातील माशाला जसा सागर तुच्छ वाटतो. 26
227-16
तैसा माजे स्त्रिया धने । विद्या स्तुती बहुते माने । एके दिवसीचेनि परान्ने । अल्पकु जैसा ॥227॥
एखादे दिवशी मिळणाऱ्या परान्नावर जसे दारिद्रयाने मातावे त्याप्रमाणे, स्त्री, धन, विद्या, स्तुति, मान वगैरे क्षणिक अनुकूल गोष्टींनी जो उन्मत्त होतो. 27
228-16
अभ्रच्छायेचिया जोडी । निदैवु घर मोडी । मृगांबु देखोनि फोडी । पणियाडे मूर्ख ॥228॥
अभ्रांच्या छायेच्या प्राप्तीवर विश्वासून निदैव्याने आपले घर मोडावे, किंवा, मृगजलाची नदी पाहून मुर्खाने आपले जलसंचय फोडावे. 28
229-16
किंबहुना ऐसैसे । उतणे जे संपत्तिमिसे । तो दर्पु गा अनारिसे । न बोले घेई ॥229॥
किंबहुना, संपत्तीच्या वगैरे योगाने अशा प्रकारे डोळ्यांवर जो धूर चढतो तो दर्प म्हणावा, हे वचन मुळीच अन्यथा नव्हे. 29
230-16
आणि जगा वेदी विश्वासु । आणि विश्वासी पूज्य ईशु । जगी एक तेजसु । सूर्युचि हा ॥230॥
आणि सर्व लोकाचा वेदांच्या ठिकाणी विश्वास असून ते ईश्वर हीच जगात पूज्य वस्तु आहे, असे विश्वासाने मानितात, व जगात सर्वात तेजिष्ठ व्यक्ते एक सूर्यच होय. 230
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-16
जगस्पृहे आस्पद । एक सार्वभौमपद । न मरणे निर्विवाद । जगा पढिये ॥231॥
जगांतील लोकांच्या इच्छेची सीमा म्हणजे एक सार्वभौम, (पृथ्वीची मालकी) पद हीच होय; तसेच केव्हांही मरण येऊ नये हीच सर्वाची नित्य इच्छा असते. 31
232-16
म्हणौनि जग उत्साहे । याते वानू जाये । की ते आइकोनि मत्सरु वाहे । फुगो लागे ॥232॥
वगैरे कारणांस्तव वेदाची व ईश्वराची थोरवी कोणी वर्णन करू गेल्यास ज्याच्या चित्तांत मत्सर उत्पन्न होऊन जो स्वतःबद्दलच्या प्रतिष्ठेच्या बुद्धीने फुगतो. 32
233-16
म्हणे ईश्वराते खाये । तया वेदा विष सूये । गौरवामाजी त्राये । भंगीत असे ॥233॥
आणि म्हणतो-ईश्वर वगैरे आम्ही गिळून बसलो आहो, वेद वगैरे आम्ही मारून टाकले आहेत, व श्रेष्ठांतील श्रेष्ठ रक्षण करणाराचाही आम्ही पराभव करू. 33
234-16
पतंगा नावडे ज्योती । खद्योता भानूची खंती । टिटिभेने आपांपती । वैरी केला ॥234॥
पतंग ज्याप्रमाणे दीपज्योतीचा द्वेष करितो, काजवा जसा सूर्यप्रकाशाचा तिटकारा करितो, किंवा टिटवीने जसा समुद्राशी वैरभाव जोडावा. 34
235-16
तैसा अभिमानाचेनि मोहे । ईश्वराचेही नाम न साहे । बापाते म्हणे मज हे । सवती जाली ॥235॥
त्याप्रमाणे अभिमानाच्या भरी भरून ज्याला ईश्वराचे नांव घेतलेलेही (सामर्थ्यवान् म्हणून) सहन होत नाही किंवा जो स्वत:च्या पित्यालाही हा जेथे तेथे एक सवतीप्रमाणे प्रतिबंधच आहे असे मानितो. 35
236-16
ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु । तो अभिमानी परमलंडु । रौरवाचा रूढु । मार्गुचि पै ॥236॥
असा फाजील मानाच्या भावनेने खुंटयाप्रमाणे ताठ झालेला व अभिमानाने कोणासही न लेखणारा जो, तो खरोखर नरक प्राप्तीचा सीधा रस्ताच होय. 36
237-16
आणि पुढिलांचे सुख । देखणियाचे होय मिख । चढे क्रोधाग्नीचे विख । मनोवृत्ती ॥237॥
आणि दुसरा सुखी आहे असे पहातांच ज्याचे मन क्रोधाग्निविषाने संतप्त होते. 37
238-16
शीतळाचिये भेटी । तातला तेली आगी उठी । चंद्रु देखोनि जळे पोटी । कोल्हा जैसा ॥238॥
उकळणारे तेलांत थंड पाणी टाकले असता जसा भडका उडतो किंवा चंद्रोदय पाहून कोल्हा जसा मनात तडफडतो. 38
239-16
विश्वाचे आयुष्य जेणे उजळे । तो सूर्यु उदैला देखोनि सवळे । पापिया फुटती डोळे । डुडुळाचे ॥239॥
ज्याच्या उदयानं सर्वं विश्वाचे व्यापार सुरू होतात, तो प्रातःकाळ येतांच पापी घुबडाचे जसे डोळे फुटतात ! (त्यास दिसेनासे होते ) 39
240-16
जगाची सुखपहांट । चोरा मरणाहूनि निकृष्ट । दुधाचे काळकूट । होय व्याळी ॥240॥
रात्रीच्या विश्रांतीनंतर पहाटेचा काळ साऱ्या जगास सुखकर वाटतो खरा; पण तोच चोरांना प्राणसंकटाचा वाटतो किंवा, दुधा सारखा पवित्र व मिष्ट पदार्थही सापास पाजिला असता जसे विष बनते. 240
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-16
अगाधे समुद्रजळे । प्राशिता अधिक जळे । वडवाग्नी न मिळे । शांति कही ॥241॥
अगाध अशा सागराच्या पोटांतही वडवानल अधिकच भडकतो व त्याला जशी कधी शांति लाभत नाही. 41
242-16
तैसा विद्याविनोदविभवे । देखे पुढिलांची दैवे । तव तव रोषु दुणावे । क्रोधु तो जाण ॥242॥
त्याप्रमाणे दुसऱ्याचे विद्या, विनोद, ऐश्वर्य व सौभाग्य जो जो दृष्टीस पडेल तो तो ज्याचा राग वाढतो तो “क्रोध” होय असे समज. 42
243-16
आणि मन सर्पाची कुटी । डोळे नाराचांची सुटी । बोलणे ते वृष्टी । इंगळांची ॥243॥
ज्याचे मन म्हणजे जणु सर्पाचे वसतिस्थान होय, ज्याची दृष्टि बाणाग्रांसारखी तीक्ष्ण (असहिष्णु) व ज्याचे भाषण जणु अग्निवर्षाव होय. 43
244-16
येर जे क्रियाजात । ते तिखयाचे कर्वत । ऐसे सबाह्य खसासित । जयाचे गा ॥244॥
ज्याच्या इतर क्रिया म्हणजे पोलादी करवताप्रमाणे कांपणाऱ्या, असे ज्याचे अंतर्बाह्य व्यापार दुसऱ्याला झोंबणारे असतात. 44
245-16
तो मनुष्यात अधमु जाण । पारुष्याचे अवतरण । आता आइक खूण । अज्ञानाची ॥245॥
तो पारुष्याची (काठिण्य) मूर्ती असून मनुष्यातील अधम मनुष्य होय असे जाण. आता अज्ञानाची लक्षणे सांगतो, ती श्रवण कर. 45
246-16
तरी शीतोष्णस्पर्शा । निवाडु नेणे पाषाणु जैसा । का रात्री आणि दिवसा । जात्यंधु तो ॥246॥
तरी शीत किंवा उष्ण स्पर्शाची दगडाला जशी भिन्नत्वाते जाण नसते किंवा रात्र आणि दिवस हा भेद जात्यंधाला जसा ज्ञात नसतो. 46
247-16
आगी उठिला आरोगणे । जैसा खाद्याखाद्य न म्हणे । का परिसा पाडु नेणे । सोनया लोहा ॥247॥
अग्नि भडकल्यावर त्याला जसा भक्ष्य काय किंवा अभक्ष्य काय हा विचार नसतो किंवा सोने व लोखंड हा भेद जसा परिसाला माहित नसतो. (भेद पहाण्यासाठी स्पर्श होतांच लोह लोहत्वाला मुकते म्हणून). 47
248-16
नातरी नानारसी । रिघोनि दर्वी जैसी । परी रसस्वादासी । चाखो नेणे ॥248॥
किंवा अनेक प्रकारच्या रसांत प्रवेशूनही पळी जशी त्यातील एकाहि रसाची चव जाणत नाही. 48
249-16
का वारा जैसा पारखी । नव्हेचि गा मार्गामार्गविखी । तैसे कृत्याकृत्यविवेकी । अंधपण जे ॥249॥
किंवा वाऱ्याला वाहतांना मार्गाच्या योग्यायोग्यतेची जशी परीक्षा नसते, तसे कर्तव्य काय की अकर्तव्य काय इत्यादि विवेक ज्याला कधीही शिवत नाही असा अंध असतो. 49
250-16
हे चोख हे मैळ । ऐसे नेणोनिया बाळ । देखे ते केवळ । मुखीचि घाली ॥250॥
हे चांगलं, हे घाणेरडे वगैरे काहीही न जाणता बालक जसे हाताला लागेल ते तोंडात घालते. 250
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
251-16
तैसे पापपुण्याचे खिचटे । करोनि खाता बुद्धिचेष्टे । कडु मधुर न वाटे । ऐसी जे दशा ॥251॥
त्याप्रमाणेपापपुण्य इत्यादि भेदाभेद न मानता त्याची खिचडी (एकत्र) करून ज्याच्या सर्व क्रिया चालतात, व ज्याला इष्टानिष्ट भोग अशी काही कल्पनाही नसते, अशी जी स्थिति, 51
252-13
तिये नाम अज्ञान । या बोला नाही आन । एवं साही दोषांचे चिन्ह । सांगितले ॥252॥
त्याला अज्ञान असे म्हणावे ह्यात शंका नाहीं; ह्याप्रमाणे सहाही दोषांची लक्षणे आम्ही सांगितली. 52
253-16
इहीच साही दोषांगी । हे आसुरी संपत्ति दाटुगी । जैसे थोर विषय सुभगे अंगी । अंग साने ॥253॥
हे सहाच दोष खरे, पण, त्यांनीच ती फार बलिष्ठ झाली आहे. (सव्वीस गुण असलेल्या देवी संपत्तीपेक्षांही) (कारण पराक्रम संख्येवर अगर आकारावर नसतो). भुजंगी म्हणजे नागीण अंगाने दोरीप्रमाणे लहान असली तरी तिचे विष सर्व विषांत श्रेष्ठ असते. 53
254-16
का तिघा वन्हीच्या पांती । पाहता थोडे ठाय गमती । परी विश्वही प्राणाहुती । करू न पुरे ॥254॥
तीन प्रकारचे अग्नि (प्रलयाग्नि, विद्युदग्नि, वडवाग्नि ) ही संख्या लहान खरी, पण त्यांच्या प्राणाहुतीला विश्वही पुरे पडत नाही. 54
255-16
धातयाही गेलिया शरण । त्रिदोषी न चुके मरण । तया तिहीची दुणी जाण । साही दोष हे ॥255॥
त्रिदोष झाल्यावर ब्रह्मदेवाला शरण गेल्यानेही मरण चुकत नाही; हे सहा दोष म्हणजे त्या. तीन दोषांची सर्व बाजूनी दुप्पट आहे असे समज. 55
256-16
इही साही दोषी संपूर्णी । जाली इयेचि उभारणी । म्हणौनि आसुरी उणी । संपदा नव्हे ॥256॥
ह्या संपूर्ण सहा दोषांनी आसुरी संपत्तीची उभारणी झाली असली म्हणून काही ती आसुरी संपत्ति पराक्रमांत कमी नाही. 56
257-16
परी क्रूरग्रहांची जैसी । मांदी मिळे एकेचि राशी । का येती निंदकापासी । अशेष पापे ॥257॥
किंवा सर्व पापग्रहांची एकाच राशीवर एकेवेळी दृष्टि यावी, किंवा निंदकापाशी (पदरात) जशी अशेष पापे येतात. 57
258-16
मरणाराचे आंग । पडिघाती अवघेचि रोग । का कुमुहूर्ती दुर्योग । एकवटती ॥258॥
मरणाराच्या शरीराला जसे सर्व रोग व्यापतात किंवा कुमुहूर्तावर सर्वच कुयोग एकत्र येतात. 58
259-16
विश्वासला आतुडवीजे चोरा । शिणला सुइजे महापुरा । तैसे दोषी इही नरा । अनिष्ट कीजे ॥259॥
चोराला त्याच्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य सांपडावा, शिणलेला मनुष्य महापुरांत लोटावा, त्याप्रमाणे, ह्या सहा दोषांनी जीवाचे अत्यंत अहित होते. 59
260-16
का आयुष्य जातिये वेळे । शेळिये सातवेउळी मिळे । तैसे साही दोष सगळे । जोडती तया ॥260॥
किंवा मरण ओढवले म्हणजे शेळीला जशी सात नाग्यांची इंगळी चावावी तसे हे साही दोष ज्याचे वाटोळे व्हावयाचे आहे त्याच्या वाट्यास येतात. 260
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-16
मोक्षमार्गाकडे । जै यांचा आंबुखा पडे । तै न निघे म्हणौनि बुडे । संसारी तो ॥261॥
मोक्ष म्हणजे काय ह्याचे ह्याला मुळीच ज्ञान नसल्यामुळे, जो अखंड संसारसागरांत बुडलेलाच असतो. 61
262-16
अधमा योनींच्या पाउटी । उतरत जो किरीटी । स्थावरांही तळवटी । बैसणे घे ॥262॥
आणि अर्जुना, एकापेक्ष एक नीच योनीच्या क्रमाने घसरत घसरत जो अखेर स्थावर योनींतीलही शेवटची पायरी गांठतो. 62
263-16
हे असो तयाच्या ठायी । मिळोनि साही दोषी इही । आसुरी संपत्ति पाही । वाढविजे ॥263॥
हे असो; हे सहाही दोष एकत्र होऊन त्याच्या ठिकाणी ह्या आसुरी संपत्तीची अत्यंत वाढ करितात. 63
264-16
ऐसिया या दोनी । संपदा प्रसिद्धा जनी । सांगितलिया चिन्ही । वेगळाल्या ॥264॥
अशा जगात प्रसिद्ध असलेल्या ह्या दोन संपत्तींची लक्षणे आम्ही वेगवेगळाली सांगितली. 64

दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ।
मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥16. 5॥
265-16
इया दोन्हीमाजी पहिली । दैवी जे म्हणितली । ते मोक्षसूर्ये पाहली । उखाचि जाण ॥265॥
ह्या दोन संपत्तीपैकी पहिली जी दैवसंपत्ति, तो मोक्षसूर्याचा उषःकालच समज. 65
266-16
येरी जे दुसरी । संपत्ति का आसुरी । ते मोहलोहाची खरी । सांखळी जीवा ॥266॥
दुसरी जी आसुरी संपत्ति, ती जीवाला बद्ध करणारी मोहरूपी लोहबेडीच होय. 66
267-16
परी हे आइकोनि झणे । भय घेसी हो मने । काय रात्रीचा दिने । धाकु धरिजे ॥267॥
पण हे ऐकून तु कदाचित् मनात कचरशील हो ! अरे, रात्र गांठील अशी सूर्याला कधी भीति पडली आहे काय ? 67
268-16
हे आसुरी संपत्ति तया । बंधालागी धनंजया । जो साही दोषा यया । आश्रयो होय ॥268॥
जो ह्या सहाही दोषांचे आश्रयस्थान असतो, त्यालाच ही आसुरी संपत्ति बंधनाला कारण होते. 68
269-16
तू तव पांडवा । सांगितलेया दैवा । गुणनिधी बरवा । जन्मलासी ॥269॥
अर्जुना, तु तर वर सांगितलेल्या दैवी संपत्तीची जणू खाणच जन्माला आला आहेस. 69
270-16
म्हणौनि पार्था तू या । दैवी संपत्ती स्वामिया । होऊनि यावे उवाया । कैवल्याचिया ॥270॥
म्हणून पार्था, ह्या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन कैवल्यरूप सुखाचा धनी हो. 270
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च ।
दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे श्रुणु ॥16. 6॥
271-16
आणि दैवा आसुरा । संपत्तिवंता नरा । अनादिसिद्ध उजगरा । राहाटीचा आहे ॥271॥
अरे, ह्या दैवी आणि आसुरी संपत्तींनी युक्त असलेल्या मनुष्यांचे जे अनादिसिद्ध असे रुळलेले मार्ग आहेत. 71
272-16
जैसे रात्रीच्या अवसरी । व्यापारिजे निशाचरी । दिवसा सुव्यवहारी । मनुष्यादिकी ॥272॥
ज्याप्रमाणे, निशाचरादिकांचे व्यवहार रात्रीच्या वेळी चालतात व दिवसा मनुष्यादिकांचे सरळ व्यापार सुरू असतात. 72
273-16
तैसिया आपुलालिया राहाटी । वर्तती दोन्ही सृष्टी । दैवी आणि किरीटी । आसुरी येथ ॥273॥
त्याप्रमाणे, पार्था, या जगात आपापल्या अधिकाराप्रमाणे दैवी व असुरी संपत्तीचे लोक ठरलेल्या भिन्न भिन्न मार्गानी रहाटत असतात. 73
274-16
तेवीचि विस्तारूनि दैवी । ज्ञानकथनादि प्रस्तावी । मागील ग्रंथी बरवी । सांगितली ॥274॥
त्याच प्रमाणे, मागे ज्ञानकथनप्रसंग (9 अध्यायात ) दैवी संपत्तीचे विस्ताराने आम्ही वर्णन केले आहे. 74
275-16
आता आसुरी जे सृष्टी । तेथिची उपलऊ गोठी । अवधानाची दिठी । दे पा निकी ॥275॥
आता जी आसुरीसृष्टि किंवा संपत्ति तिचे तुला अधिक कथन करितों; तिकडे नीट अवधान ठेव. 75
276-16
तरी वाद्येंवीण नादु । नेदी कवणाही सादु । का अपुष्पी मकरंदु । न लभे जैसा ॥276॥ वाद्ये
अरे, वाद्यादि साधनांशिवाय नाद जसा श्रवणाचा विषय होऊ शकत नाही, किंवा जेथे पुष्पादि पदार्थ नाहीत, तेथे जसा सुगंध येत नाही. 76
277-16
तैसी प्रकृति हे आसुर । एकली नोहे गोचर । जव एकाधे शरीर । माल्हातीना ॥277॥
तशी ही आसुरी संपत्ति, एखाद्या शरीराचा आश्रय केल्याशिवाय स्वतंत्रतया दृष्टिगोचर होण्यासारखी नाही. 77
278-16
मग आविष्कारला लांकुडे । पावकु जैसा जोडे । तैसी प्राणिदेही सांपडे । आटोपली हे ॥278॥
काष्ठाचा आश्रय केलेला अग्नि जसा स्पष्टपणे दिसतो, त्याप्रमाणे, प्राणिदेहाच्या आश्रयाने राहणारी ही आसुरी संपत्ति नजरेस येते. 78
279-16
ते वेळी जे वाढी ऊसा । तेचि आंतुला रसा । देहाकारु होय तैसा । प्राणियांचा ॥279॥ उसा
उसाच्या वाढीबरोबर जशी त्यातील रसाचीही वाढ होत असते, त्याप्रमाणे, प्राण्यांच्या देहाच्या वाढीबरोबर त्याच्या आश्रयाने असणाच्या ह्या आसुरी संपत्तीचीही वाढ होत असते. 79
280-16
आता तयाचि प्राणिया । रूप करू धनंजया । घडले जे आसुरीया । दोषवृंदी ॥280॥
आता अर्जुना, अशा ह्या दोषयुक्त आसुरी संपत्तीने घडलेले जे प्राणी आहेत, त्यांचेच वर्णन करू. 280
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः ।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥16. 7॥
281-16
तरी पुण्यालागी प्रवृत्ती । का पापाविषयी निवृत्ती । या जाणणेयाची राती । तयांचे मन ॥281॥
तरी पुण्याचरणाविषयी प्रवृत्ति असावी व पापमार्गापासून निवृत्त व्हावे ह्या जाणीवेचा ज्याच्या मनात पूर्ण अंधार आहे. 81
282-16
निगणेया आणि प्रवेशा । चित्त नेदीतु आवेशा । कोशकिटु जैसा । जाचिन्नला पै ॥282॥
निर्गमन व प्रवेश करण्याला द्वार आहे की नाही ह्याचा विचार न करता आवेशाने घरटे बांधणारा कोशकीटक जसा आत कोंडून जाऊन संकटांत पडतो. 82
283-16
का दिधले मागुती येईल । की न ये हे पुढील । न पाहाता दे भांडवल । मूर्ख चोरा ॥283॥
किंवा दिलेले पुढे येईल की नाही हा विचार न करता जो मूर्ख चोरांना भांडवल देतो. 83
284-16
तैसिया प्रवृत्ति निवृत्ति दोनी । नेणिजती आसुरी जनी । आणि शौच ते स्वप्नी । देखती ना ते ॥284॥
त्याप्रमाणे, आसुरी संपत्तीच्या लोकांना प्रवृत्ति किंवा निवृत्ति ह्या दोन्ही गोष्टींचा गंधही नसतो व शुद्धतेचे तर त्यांना कधी स्वप्नही पडत नाही. 84
285-16
काळिमा सांडील कोळसा । वरी चोखी होईल वायसा । राक्षसही मांसा । विटो शके॥285॥
कदाचित् कोळसाही आपली काळिमा टाकील, कावळाही कदाचित् शुभ्र होईल, किंवा राक्षसांनाही कदाचित् मांसाचा वीट येईल ! 85
286-16
परी आसुरा प्राणिया । शौच नाही धनंजया । पवित्रत्व जेवी भांडिया । मद्याचिया ॥286॥
परंतु मद्याने भरलेले भांडे जसे केव्हांही पवित्र म्हणण्याची सोय नाही, त्याप्रमाणे, अर्जुना, आसुरी संपत्तीचे प्राणी कधीही शुद्ध असण्याची गोष्टच नको ! 86
287-16
वाढविती विधीची आस । का पाहाती वडिलांची वास । आचाराची भाष । नेणतीचि ते ॥287॥
कारण, विधीचे पालन करणे, वाडवडिलांची चालरीत पहाणे, शुद्धाचाराची चाड राखणे वगैरे भाषाही त्यांचे गावी नसते. 87
288-16
जैसे चरणे शेळियेचे । का धावणे वारियाचे । जाळणे आगीचे । भलतेउते ॥288॥
शेळीच्या चरण्यात जशी वगळावगळ नसते, वारा जसा कोठेही वाहतो कि वा आग जशी सांपडेल तो भाग जाळीत सुटते 88
289-16
तैसे पुढा सूनि स्वैर । आचरती ते गा आसुर । सत्येसि कीर वैर । सदाचि तया ॥289॥
त्याप्रमाणे, आसुरी संपत्तीचे लोक इच्छेला प्राधान्य देऊन स्वैराचार करतात व सत्याचे व त्यांचे हटकून नित्य वैर असते 89
290-16
जरी नांगिया आपुलिया । विंचू करी गुदगुलिया । तरी साचा बोली बोलिया । बोलती ते ॥290॥
आपल्या नांगीने लोकांना विंचू गुदगुल्या करितो हे जितके खरे. तितकीच ते सत्य बोलतात हे खरे समजावे ! 290
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-16
आपानाचेनि तोंडे । जरी सुगंधा येणे घडे । तरी सत्य तया जोडे । आसुरांते ॥291॥
अपानवायु ( गुदद्वारचा वास ) सुगंधी असतो असे कधी घडले. असेल तर तो कधीतरी सत्य बोलला असेल ही तितकेच शक्य आहे. 91
292-16
ऐसे ते न करिता काही । आंगेचि वोखटे पाही । आता बोलती ते नवाई । सांगिजैल ॥292॥
अरे, त्यांनी काहीही क्रिया केली नाही तरी ते स्वभावतः किंवा आंगानेच टाकाऊ असतात; आता त्यांच्या बोलण्याचा चमत्कार तुला सांगतो. 92
293-16
एऱ्हवी करेयाच्या ठायी चांग । ते तयासि कैचे नीट आंग । तैसा आसुरांचा प्रसंग । प्रसंगे परीस ॥293॥
उंटाच्या शरीराचा कोणता भाग असा आहे की, तो सरळ आहे असे म्हणता येईल ? असुरांची गोष्ट तशीच आहे. त्यांचे काय चांगले आहे असे म्हणावे ? पण प्रसंगाने सांगतों; श्रवण कर. 93
294-16
उधवणीचे जेवी तोंड । उभळी धुंवाचे उभड । हे जाणिजे तेवी उघड । सांगो ते बोल ॥294॥
यांच्या बोलाचे उघड वर्णन करणे म्हणजे, धुराडाच्या तोंडातून धुराच्या लोटाशिवाय दुसरे काय निघणार आहे ? तसेच ते ठरेल हे लक्षात असू दे. 94
असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् ।
अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहैतुकम् ॥16. 8॥
295-16
तरी विश्व हा अनादि ठावो । येथ नियंता ईश्वररावो । चावडिये न्यावो अन्यावो । निवडी वेदु ॥295॥
तरी विश्व हे अनादि असून त्याचा सर्वाधीश ईश्वर नियंता आहे व त्याच्या दरबारात धर्म्यक अधर्म्य ( न्याय की अन्याय ) हा निवाडा वेदनिर्णयावर अवलंबून असतो. 95
296-16
वेदी अन्यायी पडे । तो निरयभोगे दंडे । सन्यायी तो सुरवाडे । स्वर्गी जिये ॥296॥
वेदाज्ञेप्रमाणे जो अन्यायी असेल, त्याला नरकादि भोगांचा दंड भोगणे पडेल व न्यायी असेल त्याला सुखाने स्वर्गप्राप्ति होईल. 96
297-16
ऐसी हे विश्वव्यवस्था । अनादि जे पार्था । इयेते म्हणती ते वृथा । अवघेचि हे ॥297॥
अशी ही जी विश्वाची अनादि व्यवस्था अथवा घडी आहे, ती अर्जुना, हे सर्व लोक झुट किंवा व्यर्थ आहे असे म्हणतात. 97
298-16
यज्ञमूढ ठकिले यागी । देवपिसे प्रतिमालिंगी । नागविले भगवे योगी । समाधिभ्रमे ॥298॥
यज्ञाच्या व्यसनाने वेडे झालेले यागाने ठकले, देवाचे वेड लागलेले प्रतिमादिकांनी ठकले, व समाधिभ्रमाने अणवी वस्त्रे परिधान केलेल्या योग्यांना नागविलें. 98
299-16
येथ आपुलेनि बळे । भोगिजे जे जे वेटाळे । हे वाचोनि वेगळे । पुण्य आहे ? ॥299॥
ह्या जगात आपल्या सामर्थ्यावर जे जे भोगता येण्यासारखे असेल ते ते भोगण्यावाचून दुसरे कसले पुण्य आहे ? 99
300-16
ना अशक्तपणे आंगिके । वेगळवेटाळी न टके । ऐसा गादिजेवीण विषयसुखे । तेचि पाप ॥300॥
किंवा अंगच्या नेभळे पणामुळे विषयसुख साधने एकत्र करता न येऊन किंवा भोगता न येऊन जो दुःख भोगतो तेच पाप होय. 300
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
301-16
प्राण घेपती संपन्नांचे । ते पाप जरी साचे । तरी सर्वस्व हाता ये तयांचे । हे पुण्यफळ की ? ॥301॥
श्रीमान् लोकांचे प्राण घेणे हे जर पापच असेल तर त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते हेही पुण्यफळ मानावयास नको काय ? 1
302-16
बळी अबळाते खाय । हेचि बाधित जरी होय । तरी मासया का न होय । निसंतान ? ॥302॥
सामर्थ्यवानाणे दुर्बळाला खावे हे जर खरोखर पाप असेल तर, माशांचे आजवर निसंतान का झाले नाही ? 2
303-16
आणि कुळे शोधूनि दोन्ही । कुमारेचि शुभलग्नी । मेळवीजती प्रजासाधनी । हेतु जरी ॥303॥
आणि कुलशील पाहून कुमार व कुमारी यांचा शुभमुर्हुतावर विवाह करणे हे जर प्रजाप्राप्ती चे साधन असेल. 3
304-16
तरी पशुपक्षादि जाती । जया मिती नाही संतती । तया कोणे प्रतिपत्ती । विवाह केले ? ॥304॥
तर- ज्यांच्या प्रजेला गणित नाही असे पशुपक्षादिकार्य विवाह कोणत्या मुहूर्तावर व कोणी लाविले होते ? 4
305-16
चोरियेचे धन आले । तरी ते कोणासि विष जाले ? । वालभे परद्वार केले । कोढी कोणी होय ? ॥305॥
चोरीने मिळविलेले धन विषाप्रमाणे कोणास बांधिले आहे ? अथवा प्रेमाखातर केलेल्या परस्त्रीगमनाते कोणाच्या अंगावर कुष्ठ उठले आहे सांगा ! 305
306-16
म्हणौनि देवो गोसावी । तो धर्माधर्मु भोगवी । आणि परत्राच्या गावी । करी तो भोगी ॥306॥
म्हणून ईश्वर हा सर्वसत्ताधीश असून तो जीवांना धर्माधर्माचे फल भोगवितो व येथील शुभकर्माचे भोग त्यांना परलोकी (स्वर्गत) देतो. 6
307-16
परी परत्र ना देवो । न दिसे म्हणौनि ते वावो । आणि कर्ता निमे मा ठावो । भोग्यासि कवणु ? ॥307॥
असे म्हणावे तर, परलोक किंवा देव हे केवळ परोक्ष किंवा प्रत्ययाला कधीही न येणारे असल्याने सर्व व्यर्थ आहेत, आणि शुभाशुभकर्मे करणाराच जर नाहीसा होऊन जातो तर भोग्य भोगणार तरी कोण ? 307
308-16
येथ उर्वशिया इंद्र सुखी । जैसा का स्वर्गलोकी । तैसाचि कृमिही नरकी । लोळतु श्लाघे ॥308॥
उर्वशीच्या उपभोगाने इंद्र जर स्वर्गात सुखी आहे असे म्हणाल किंवा म्हणावे तर येथे प्रत्यक्ष नरकांतील कीटकही तशा तऱ्हेचे स्त्रीसुख भोगून संतुष्ट आहेत ! 308
309-16
म्हणौनि नरक स्वर्गु । नव्हे पापपुण्यभागु । जे दोही ठायी सुखभोगु । कामाचाचि तो ॥309॥
म्हणून नरकलोक किंवा स्वर्ग, तसेच पाप व पुण्य वगैरे काहीही नसून दोहीकडे कामतृप्तीनेच सुखभोग सारखा घडतो. 309
310-16
याकारणे कामे । स्त्रीपुरुषयुग्मे । मिळती तेथ जन्मे । आघवे जग ॥310॥
म्हणून कामेच्छेने जेणे स्त्री व पुरुष ही एकत्रसंलग्न होतात तेथे जगांतील सर्व प्राण्यांची सहजच उत्पत्ति होते. 310
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-16
आणि जे जे अभिलाषे । स्वार्थालागी हे पोषे । पाठी परस्परद्वेषे । कामचि नाशी ॥311॥
आणि स्वार्थाच्या इच्छेने आपण जे जे काही जोडतों, त्याचा वीट आल्यावर अगर द्वेष उत्पन्न झाला असता, आपली इच्छाच नाश करिते. 11
312-16
एवं कामावाचूनि काही । जगा मूळचि आन नाही । ऐसे बोलती पाही । आसुर गा ते ॥312॥
ह्या प्रमाणे सर्व लोकव्यवहाराला त्यांच्या इच्छेवाचून अन्य कहीही कारण नाही, असे आसुरीसंपत्तिमानांचे म्हणणे आहे. 12
313-16
आता असो हे किडाळ । बोली न करू पघळ । सांगताचि सफोल । होतसे वाचा ॥313॥
आता ह्या निंद्य कथा पुरेत; त्यांची अधिक चर्चा नको; कारण तसे करणे म्हणजे वाचा व्यर्थ शिणविण्यासारखे होय. 313

एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः ।
प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥16. 9॥
314-16
आणि ईश्वराचिया खंती । नुसधियाचि करिती चांथी । हेही नाही चित्ती । निश्चयो एकु ॥314॥
आणि ईश्वराच्या नास्तित्वाबद्दल नुसती वायफळ बडबड करितात इतकेच नसून त्यांच्या चित्ताचही तसाच निश्चय असतो. 14
315-16
किंबहुना उघड । आंगी लाऊनिया पाखांड । नास्तिकपणाचे हाड । रोविले जीवी ॥315॥
किंबहुना, असा उघडपणे अभिमानाने पाखांड मताचा स्वीकार करणारे हे लोक म्हणजे हा नास्तिकाचा बाजार आहे, हे दाखविण्यासाठी त्यांच्या हद्दीवर पुरलेले नास्तिकतेचे हाडुकच होय. 15
316-16
ते वेळी स्वर्गालागी आदरु । का नरकाचा अडदरु । या वासनांचा अंकुरु । जळोनि गेला ॥316॥
अशा स्थितींत, स्वर्गाविषयी आदर, किंवा नरकाविषयी भय वगैरे चित्तांतील सर्व अंकुर जळून गेलेले असतात. 16
317-16
मग केवळ ये देहखोडा । अमेध्योदकाचा बुडबुडा । विषयपंकी सुहाडा । बुडाले गा ॥317॥
मग, अर्जुना, हे आसुरी संपत्तीचे जन देहरूप खोड्यात गुंतून पडून, अपवित्र जलांतील बुडबुड्याप्रमाणे विषयरूप चिखलात बुडून राहातात. 17
318-16
जै आटावे होती जळचर । तै डोही मिळती ढीवर । का पडावे होय शरीर । तै रोगा उदयो ॥318॥
जलचरांचे निःसंतान होण्याचा योग आला की, त्या जलाशयापाशी कोळयांची गर्दी होते किंवा शरीरक्षय होण्याचा काल आला की, रोगोद्भव होत असतो. 18
319-16
उदैजणे केतूचे जैसे । विश्वा अनिष्टोद्देशे । जन्मती ते तैसे । लोका आटू ॥319॥
धूमकेतूचा उदय म्हणजे जगावर कोसळणया अरिष्टाचे जसे पूर्वचिन्ह होय, त्याप्रमाणे असुरी संपत्तीच्या लोकाचा उदय किंवा भरणा म्हणजे लोकक्षयाचेच लक्षण होय. 19
320-16
विरूढलिया अशुभ । फुटती तै ते कोंभ । पापाचे कीर्तिस्तंभ । चालते ते ॥320॥
जसे पेरावे तसे उगवतो ह्या न्यायाने अशुभ पेरणीला अशुभच अकुर येतात तसेच हे लोक म्हणजे पापाचा डंका पिटणारे चालते जाहिरातीचे खांबच होत. 320
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-16
आणि मागांपुढा जाळणे । वाचूनि आगी काही नेणे । तैसे विरुद्धचि एक करणे । भलतेया ॥321॥
आणि आग पुढे व मागे जे सांपडेल ते जसे जाळीत सुटते तशी ह्यांची कोणतीही कृति म्हणजे विरुद्ध अथवा करू नये तीच नेमकी असावयाची, 21
322-16
परी तेचि गा करणे । आदरिती संभ्रमे जेणे । तो आइक पार्था म्हणे । श्रीनिवासु ॥322॥
परंतु तीच त्यांची क्रिया कशा तयारीने होत असते ते अर्जुना, तू श्रवण कर असे भगवान् म्हणाले. 22
काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः ।
मोहाद् गृहीत्वाऽसद्ग्रहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥16. 10॥
323-16
तरी जाळ पाणिये न भरे । आगी इंधन न पुरे । तया दुर्भरांचिये धुरे । भुकाळु जो ॥323॥
अरे, जाळे पाण्याने भरले असे कधी होत नाही, किंवा अग्नीला काष्ठे पुरे झाली असेही कधी होत नाही; ह्या दुर्भर पदार्थाप्रमाणे ज्याची क्षुधा कधी शान्त नसते. 23
324-16
तया कामाचा वोलावा । जीवी धरुनिया पांडवा । दंभमानाचा मेळावा । मेळविती ॥324॥
मनामध्ये काम किंवा इच्छा यास आश्रय देऊन, अर्जुना, जे त्यांना दंभ व मान ह्यांची आणखी जोड देतात. 24
325-16
मातलिया कुंजरा । आगळी जाली मदिरा । तैसा मदाचा ताठा तव जरा । चढता आंगी ॥325॥
आधीच माज आलेल्या हत्तीला आणखी दारू पाजावी त्याप्रमाणे हे जसेजसे वृद्ध होतात, तसा तसा त्यांच्या अंगात उन्मत्तपणा वाढत जातो. 25
326-16
आणि आग्रहा तोचि ठावो । वरी मौढ्या{ऐ}सा सावावो । मग काय वानू निर्वाहो । निश्चयाचा ॥326॥ ऐसा
मुळात आग्रही स्वभाव आणि त्यात मूर्खपणाची भर, मग अशा स्थितीत होणाऱ्या दुराग्रही निश्चयाचे कोठवर वर्णन करावे ? 26
327-16
जिही परोपतापु घडे । परावा जीवु रगडे । तिही कर्मी होऊनि गाढे । जन्मवृत्ती ॥327॥
ज्याने दुसऱ्याला पीडा होईल किंवा ज्यांच्या जीवाला धोका पोचेल अशा कर्माविषयी ज्यांची जन्मत:च प्रवृत्ति असते. 27
328-16
मग आपुले केले फोकारिती । आणि जगाते धिक्कारिती । दाही दिशी पसरिती । स्पृहाजाळ ॥328॥
मग आपल्या कृत्यांची चहूकडे बढाई मिरवितात आणि साऱ्या जगाला तुच्छ लेखतात आणि आपल्या इच्छा दाही दिशांकडे मोकळ्या सोडतात. 28
329-16
ऐसेनि गा आटोपे । थोरिये आणती पापे । धर्मधेनु खुरपे । सुटले जैसे ॥329॥
देवाप्रीत्यर्थ मोकळी सोडलेली गाय जशी निष्प्रतिबंध वाटेल तिकडे चरते, त्याप्रमाणे अशा अभिमानाच्या वृत्तीने आपली पापे वाढवीत जातात. 29
चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः ।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥16. 11॥
330-16
याचि एका आयती । तयाचिया कर्मप्रवृत्ती । आणि जिणियाही परौती । वाहती चिंता ॥330॥
अशाच प्रकारच्या पापसाधनांनी त्यांची सर्व कर्मप्रवृत्ति असते आणि ज्यांचे चित्त मरेपर्यंत (परौती-पर्यंत) असंख्य चिंतांनी व्याप्त असते. 330
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-16
पाताळाहूनि निम्न । जियेचिये उंचीये साने गगन । जे पाहाता त्रिभुवन । अणुही नोहे ॥331॥
या चिंतेचे स्वरूप पाहू जाता ते पाताळाहून खोल व गगनापेक्षाही उंच असून तिच्यापुढे विश्वाला अणूचीही उपमा शोभत नाही. (इतकी ती मोठी असते) 31
332-16
ते योगपटाची मवणी । जीवी अनियम चिंतवणी । जे सांडू नेणे मरणी । वल्लभा जैसी ॥332॥
संन्यासाच्या योगपट दीक्षेस नियम व माप आहे; पण ह्यांची ही भोगपट चिंता हिला नियम नाही व मापही नाही; पतिव्रता स्त्री पतीला जशी कधीही अंतर देत नाही, तशी ही चिंता ह्यांना मरणापर्यंत सोडीत नाही. 32
333-16
तैसी चिंता अपार । वाढविती निरंतर । जीवी सूनि असार । विषयादिक ॥333॥
तसेच, असार अशा विषयांदिकांची मनात लालसा धरून त्यांच्या प्राप्तीविषयींची अपार चिंता हे नित्य वाढवितात. 33
334-16
स्त्रिया गाइले आइकावे । स्त्रीरूप डोळा देखावे । सर्वेंद्रिये आलिंगावे । स्त्रियेतेचि ॥334॥
स्त्रीचे गाणे ऐकावे, तिचे सौंदर्य पाहावे. व सर्वागाने तिलाच आलिंगन द्यावे. 34
335-16
कुरवंडी कीजे अमृते । ऐसे सुख स्त्रियेपरौते । नाहीचि म्हणौनि चित्ते । निश्चयो केला ॥335॥
ज्यावरून अमृतही ओवाळून टाकावे अशा स्त्रीच्या भोगापरते दुसरे सुखच नाही असा त्यांच्या मनाचा निश्चय झालेला असतो. 35
336-16
मग तयाचि स्त्रीभोगा- । लागी पाताळ स्वर्गा । धावती दिग्विभागा । परौतेही ॥336॥
मग त्याच स्त्रीभोग प्राप्तीसाठी, स्वर्ग, पाताळ किंवा वाटेल त्या दिशेला धावण्याची त्यांची तयारी असते. 36
आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायाणाः ।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान् ॥16. 12॥
337-16
आमिषकवळु थोरी आशा । न विचारिता गिळी मासा । तैसे कीजे विषयाशा । तयासि गा ॥337॥
मोठया आशेने गळाला लावलेले आमिष काहीही विचार न करता मासा गिळतो व नाश पावतो, तशी विषयांची आशा ह्या जीवांची स्थिति करिते. 37
338-16
वांछित तव न पवती । मग कोरडियेचि आशेची संतती । वाढऊ वाढऊ होती । कोशकिडे ॥338॥
त्यांना इच्छित विषय तर कधी प्राप्त होत नाहीतच, पण नुसत्या कोरडया आशेचे मनोरे रचून कोशकीटकाप्रमाणे बंधन मात्र पावतात. 38
339-16
आणि पसरिला अभिलाषु । अपूर्णु होय तोचि द्वेषु । एवं कामक्रोधांहूनि अधिकु । पुरुषार्थु नाही ॥339॥
आणि केलेली अभिलाषा अपूर्ण राहिली की त्यामुळेच चित्तांत द्वेष उत्पन्न होतो; एवंच काम आणि क्रोध ह्यावाचून अधिक कोणताच पुरुषार्थ त्यांच्या पदरात पडत नाही. 39
340-16
दिहा खोलणे रात्री जागोवा । ठाणांतरीया जैसा पांडवा । अहोरात्रीही विसावा । भेटेचिना ॥340॥
अर्जुना, ठाणेदाराला ज्याप्रमाणे दिवसा कामगिरी व रात्री पहारा, मिळून अहोरात्र विसावा मिळतच नाही. 340
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-16
तैसे उंचौनि लोटिले कामे । नेहटती क्रोधाचिये ढेमे । तरी रागद्वेष प्रेमे । न माती केही ॥341॥
तसेच, मोठमोठया आशेच्या पर्वतांवरून खाली क्रोधाच्या टेकडयांवर आदळले (निराशेने क्रोधाविष्ट झाले) तरी, विषयांविषयींचे प्रेम इतके अनावर असते की त्या विषयीचे रागद्वेष कोठेही मावत नाहीत. 41
342-16
तेवीचि जीवीचिया हावा । विषयवासनांचा मेळावा । केला तरी भोगावा । अर्थे की ना ? ॥342॥
त्याचप्रमाणे मनात वाटेल तेवढे विषयभोगाचे बेत जुळविले तरी ते भोगणेकरिता तर द्रव्य पाहिजे की नको ? 42
343-16
म्हणौनि भोगावयाजोगा । पुरता अर्थु पै गा । आणावया जगा । झोंबती सैरा ॥343॥
म्हणून त्या वांच्छित भोगास लागणारे द्रव्य मिळविणेसाठी मग ते जगांतील लोकांना उपद्रव देण्यास सुरवात करतात. 43
344-16
एकाते साधूनि मारिती । एकाचि सर्वस्वे हरिती । एकालागी उभारिती । अपाययंत्रे ॥344॥
एखाद्याला खिंडीत गाठून मारतात, एखाद्याला फसवून त्याचे सर्वस्व लांबवितात, व एखाद्याच्या घातासाठी अघोरी मंत्रादि उपायही योजितात. 44
345-16
पाशिके पोती वागुरा । सुणी ससाणे चिकाटी खोंचारा । घेऊनि निघती डोंगरा । पारधी जैसे ॥345॥
पारधी रानात शिकारीसाठी जातांना ज्याप्रमाणे बरोबर पाश, पोती, जाळी, शिकारी कुत्रे, ससाणे, घोरपडी व भाले वगैरे घेतात. 45
346-16
ते पोसावया पोट । मारूनि प्राणियांचे संघाट । आणिती ऐसे निकृष्ट । तेही करिती ॥346॥
आणि आपले पोट भरण्यासाठी ते जसे अनेक प्राणी ठार मारितात, तसलेच दुष्ट कृत्य हे आसुरी संपत्तीचे लोकही (द्रव्यप्राप्तीसाठी) करितात. 46
347-16
परप्राणघाते । मेळविती वित्ते । मिळाल्या चित्ते । तोषणे कैसे ॥347॥
आणि ह्याप्रमाणे दुसऱ्यांचा प्राणघात करून मिळविलेल्या द्रव्याने चित्ताचे कसे समाधान करून घेतात म्हणशील तर असे. 47

इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥16. 13॥
348-16
म्हणे आजि मिया । संपत्ति बहुतेकांचिया । आपुल्या हाती केलिया । धन्यु ना मी ? ॥348॥
तो म्हणतो, ” आज मी कित्येकांचे द्रव्य आपल्या हाती हस्तगत करून घेतले आहे, तेव्हा बरोबर मी धन्य नाही काय ? ” 48
349-16
ऐसा श्लाघो जव जाये । तव मन आणीकही वाहे । सवेचि म्हणे पाहे । आणिकांचेही आणू ॥349॥
अशी स्वतःपाशीच प्रौढीची भाषा चालू असतांना त्याच्या मनात दुसरे असे विचार येतात की, असेच इतरांचेही आणखी द्रव्य मिळवून आणावे. 49
350-16
हे जेतुले असे जोडिले । तयाचेनि भांडवले । लाभा घेईन उरले । चराचर हे ॥350॥
आजवर जेवढे मिळविले आहे, त्या भांडवलावर आणखी जेवढे स्थावरजंगम मिळविता येण्यासारखे उरले असेल तेवढे जोडीन. 350
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
351-16
ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया । मग दिठी पडे तया । उरो नेदी ॥351॥
ह्याप्रमाणे जगांतील सर्व संपत्तीचा मीच स्वामी होईन; मग ज्याच्यावर माझी दृष्टि पडेल तो उरणारच नाही ! 51

असौ मया हतः शत्रुऱनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी ॥16. 14॥
352-16
हे मारिले वैरी थोडे । आणीकही साधीन गाढे । मग नांदेन पवाडे । येकलाचि मी ॥352॥
आतांपर्यंत मारले हे शत्रू काहीच नाहीत, आणखी जे पराक्रमी आहेत त्यांनाही मारून मग एकटा मीच सर्व मालक अशा थाटाने राहीन. 52
353-16
मग माझी होतील कामारी । तियेवाचूनि येरे मारी । किंबहुना चराचरी । ईश्वरु तो मी ॥353॥
माझे दास होतील तेवढे ठेवीन; बाकी सर्वाचा नाश करीन; किंबहुना ह्या चराचराचा मालक ईश्वर म्हणून जो म्हणतात, तो मीच होय. अन्य कोणी नाही. 53
354-16
मी भोगभूमीचा रावो । आजि सर्वसुखासी ठावो । म्हणौनि इंद्रुही वावो । माते पाहुनि ॥354॥
सर्व भोग्यसृष्टीचा मी राजा असून सर्व सुखांचाही मीच आधार व भोक्ता होय; म्हणून माझे ऐश्वर्य पाहून मनात इंद्रही लज्जित होईल. 54
355-16
मी मने वाचा देहे । करी ते कैसे नोहे । के मजवाचूनि आहे । आज्ञासिद्ध आन ? ॥355॥
मग मी कायावाचा मनाने जे करीन ते कसे घडणार नाही ? माझ्या आज्ञेवाचून दुसरी कोणती गोष्ट सिद्धीस जाणार आहे ? 55
356-16
तवचि बळिया काळु । जव न दिसे मी अतुर्बळु । सुखाचा कीर निखिळु । रासिवा मीचि ॥356॥
अतुल पराक्रमी जो मी, त्या मला पाहिले नाही तोंवरच काळाच्या सामर्थ्याची प्रतिष्ठा ! अरे, सर्व सुखांची मी केवळ रास आहे. 56

आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥16. 15॥
357-16
कुबेरु आथिला होये । परी तो नेणे माझी सोये । संपत्ती मजसम नव्हे । श्रीनाथाही ॥357॥
कुबेर श्रीमंत असे म्हणतात खरे; पण त्याला माझी बरोबरी येणार नाही; श्रीविष्णू ही माझ्याइतका श्रीमंत नाहीं ! 57
358-16
माझिया कुळाचा उजाळू । का जातिगोतांचा मेळू । पाहता ब्रह्माही हळू । उणाचि दिसे ॥358॥
माझ्या कुळाचा नांवलौकिक व आप्तेष्टांचा समुदाय पहाता, ब्रह्मदेवालाही ती सर येणार नाही; 58
359-16
म्हणौनि मिरविती नांवे । वाया ईश्वरादि आघवे । नाही मजसी सरी पावे । ऐसे कोण्ही ॥359॥
म्हणून ईश्वरादिकांची थोरवी लोक गातात ती व्यर्थच होय; माझा बरोबरी करील असे कोणीही नाही. 59
360-16
आता लोपला अभिचारु । तया करीन मी जीर्णोद्धारु । प्रतिष्ठीन परमारु । यागवरी ॥360॥
सांप्रत अभिचार (जारणमारण) मंत्राचा लोप झाला आहे त्याचा मी जीर्णोद्धार करीन व लोकाचा उच्छेद करणारे याग त्यांचे अनुष्ठान करीन. 360
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
361-16
माते गाती वानिती । नटनाचे रिझविती । तया देईन मागती । ते ते वस्तु ॥361॥
माझे स्तुतिस्तोत्र गातील, माझे नटनाचादिकांनी रंजन करितील, त्यांचे इच्छित ते ते त्यांना देईन. 61
362-16
माजिरा अन्नपानी । प्रमदांच्या आलिंगनी । मी होईन त्रिभुवनी । आनंदाकारु ॥362॥
अन्नपानादिकांनी मत्त होऊन तरुणींच्या भोगालिंगनादिकांनी मी जगतांत आनंदरूप होऊन राहीन. 62
363-16
काय बहु सांगो ऐसे । ते आसुरीप्रकृती पिसे । तुरंबिती असोसे । गगनौळे तिये ॥363॥
आसुरी संपत्तीने पिसे झालेले ते लोक असे काय काय बरळतात म्हणून सांगावे ? अरे, गगनकुसुमांचा वास घेण्यासारख्या गोष्टींचे मनोरे ते रचीत असतात. 63

अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः ।
प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥16. 16॥
364-16
ज्वराचेनि आटोपे । रोगी भलतैसे जल्पे । चावळती संकल्पे । जाण ते तैसे ॥364॥
तापाच्या भरात रोगी वाटेल ते जसे बरळतो, त्याप्रमाणे, हे लोक मुखाने वाटेल ते संकल्प बरळत असतात असे समज. 64
365-16
अज्ञान आतुले धुळी । म्हणौनि आशा वाहटुळी । भोवंडीजती अंतराळी । मनोरथांच्या ॥365॥
यांच्या आशेच्या वावटळीने (माट्या) चित्तांतील अज्ञानरूप धुळीचे मनोराज्यरूप स्तंभ आकाशात गरगर फिरत असतात. 65
366-16
। का समुद्रोर्मी अभंग । तैसे कामिती अनेग । अखंड काम ॥366॥
आषाढांत ढगावर ढग यावे, किंवा समुद्राच्या लाटांना जसा खंड नसतो, त्याप्रमाणे त्यांच्या वैषयिक इच्छांची अखंड रांग चालू असते. 66
367-16
मग पै कामनाचि तया । जीवी जाल्या वेलरिया । वोरपिली कांटिया । कमळे जैसी ॥367॥
मग मनोरथरूपी वेलींचे जाळे त्यांच्या चित्तांत पसरल्यावर, कांटयावरून जशी कमळे ओढावीं. 67
368-16
का पाषाणाचिया माथा । हांडी फुटली पार्था । जीवी तैसे सर्वथा । कुटके जाले ॥368॥
किंवा दगडावर पडून मातीच्या हांडीचे शतशः तुकडे व्हावे, त्याप्रमाणे, अर्जुना, त्यांच्या मनोरथांची दशा होते, 68
369-16
तेव्हा चढतिये रजनी । तमाची होय पुरवणी । तैसा मोहो अंतःकरणी । वाढोचि लागे ॥369॥
त्यायोगे, रात्रीच्या वाढीबरोबर जसा अंधकारही वाढतो, तसा, त्यांच्या अंतःकरणात मोह वाढत जातो. 69
370-16
आणि वाढे जव जव मोहो । तव तव विषयी रोहो । विषय तेथ ठावो । पातकासी ॥370॥
आणि जसा जसा मोह वाढेल तशी तशी वैषयिक इच्छा वाढत जाते; आणि विषय म्हटले की, पातकाचे मूळ कारणच होय. 370
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-16
पापे आपलेनि थांवे । जव करिती मेळावे । तव जिताचि आघवे । येती नरका ॥371॥
पापांचा जोर होत होत ती जशी वाढतील तसा त्यास (आसुरी लोकास) जीवंतपणींच नरकयातनांचा भोग घडतो. 71
372-16
म्हणौनि गा सुमती । जे कुमनोरथा पाळिती । ते आसुर येती वस्ती । तया ठाया ॥372॥
म्हणून, अर्जुना, ज्यांच्या चित्तांत कुवासना नांदतात ते असुर लोक त्या ठिकाणी जन्माला येतात. 72
373-16
जेथ असिपत्रतरुवर । खदिरांगाराचे डोंगर । तातला तेली सागर । उतताती ॥373॥
जेथील वृक्षांची तलवारी-प्रमाणे तीक्ष्ण धारेचे पाने असतात, खैराच्या इंगळाचे डोंगर व तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत असतात. 73
374-16
जेथ यातनांची श्रेणी । हे नित्य नवी यमजाचणी । पडती तिये दारुणी । नरकलोकी ॥374॥
जेणे यातनांना खंड नसून नित्य नवी यमजाचणी असते अशा घोर नरकलोकींचा वास त्यास घडतो. 74
375-16
ऐसे नरकाचिये शेले । भागी जे जे जन्मले । तेही देखो भुलले । यजिती यागी ॥375॥
असे शेलक्या नरक भोगाचे अधिकारी जे जे जन्माला येतात तेही, पाहू गेले असता, यज्त्रयागादिकांच्या भरीस भरतात. 75
376-16
एऱ्हवी यागादिक क्रिया । आहाण तेचि धनंजया । परी विफळती आचरोनिया । नाटकी जैसी ॥376॥
अर्जुना, एऱ्हवी पाहू गेले असता, त्या यागादिक क्रिया खऱ्या, पण दंभानं नांटक्यासारख्या आचरल्या गेल्यामुळे त्या व्यर्थ होतात. 76
377-16
वल्लभाचिया उजरिया । आपणयाप्रति कुस्त्रिया । जोडोनि तोषिती जैसिया । अहेवपणे ॥377॥
आपल्या यजमानाच्या आश्रयावर, वेश्या ज्याप्रमाणे स्वतःस सौभाग्यवती समजून समाधान मानीत असतात, तसेच हे होय. 77

आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः ।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥16. 17॥
378-16
तैसे आपणया आपण । मानिता महंतपण । फुगती असाधारण । गर्वे तेणे ॥378॥
आपली प्रतिष्ठा आपणच मानिता मानिता जे असामान्य गर्वाने फुगून जातात. 78
379-16
मग लवो नेणती कैसे । आटिवा लोहाचे खांब जैसे । का उधवले आकाशे । शिळाराशी ॥379॥
मग ओतीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ते कोणापुढेही नम्र न होता सदा ताठ असतात किंवा आकाशात उंच गेलेले पर्वत जसे सदा ताठ असतात तसेच हे होत. 79
380-16
तैसे आपुलिये बरवे । आपणचि रिझता जीवे । तृणाहीहूनि आघवे । मानिती नीच ॥380॥
त्याचप्रमाणे, आपल्या मोठेपणाचे आपणच मनात कौतुक करून रमता रमता त्यास आजूबाजूचे जग तृणापेक्षांही हलके वाहू लागले. 380
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-16
वरी धनाचिया मदिरा । माजूनि धनुर्धरा । कृत्याकृत्यविचारा । सवते केले ॥381॥
मग अर्जुना, संपत्तिमदाने माजून जाऊन कर्तव्य अकर्तव्य वगैरे विवेकास पार फाटा देतात. 81
382-16
जया आंगी आयती ऐसी । तेथ यज्ञाची गोठी कायसी । तरी काय काय पिसी । न करिती गा ? ॥382॥
अरे, ज्याची वृत्ति अशी बनलेली आहे त्याला यज्ञाची काय प्रतिष्ठा वाटणार आहे ? पण, पिसाट लोक काय करतील किंवा न करितील कोणी सांगावे ? 82
383-16
म्हणौनि कोणे एके वेळे । मौढ्यमद्याचेनि बळे । यागाचींही टवाळे । आदरिती ॥383॥
म्हणून, लहरीखातर एखादे वेळी मूर्खपणाच्या मदिरेच्या भरांत यज्ञादिक सोंगेही आरंभितात. 83
384-16
ना कुंड मंडप वेदी । ना उचित साधनसमृद्धी । आणि तयांसी तव विधी । द्वंद्वचि सदा ॥384॥
त्यात त्यांना कुंड, मंडप, वेदी आणि तदनुषंगाने लागणारी अन्यसामग्री काही लागत नाही, आणि विधिविषयी बोलावे तर त्यांचे त्याच्याशी सदैवच वैर असते. 84
386-16
देवा ब्राह्मणांचेनि नांवे । आडवारेनहि नोहावे । ऐसे आथी तेथ यावे । लागे कवणा ? ॥385॥
देव, ब्राह्मण इत्यादिकांच्या नुसत्या नांवाचाही वारा त्यांना सोसत नाही, मग त्यांच्या येण्याची गोष्टच कशाला ? 85
386-16
पै वासरुवाचा भोकसा । गाईपुढे ठेवूनि जैसा । उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत ॥386॥
परंतु धूर्तलोक गाईपुढे मेलेल्या वासराची पेंढा वगैरे भरून रक्षण केलेली आकृति ठेवून जसे तिचे दूध काढून घेतात. 86
387-16
तैसे यागाचेनि नांवे । जग वाऊनि हावे । नागविती आघवे । अहेरावारी ॥387॥
त्याप्रमाणे यज्ञाचा आव घालून तन्निमित्त इतरांना आमंत्रणे देऊन, त्यांच्याकडून सांपडेल तो आहेर घेऊन त्यांना फसवितात. 87
388-16
ऐशा काही आपुलिया । होमिती जे उजरिया । तेणे कामिती प्राणिया । सर्वनाशु ॥388॥
त्याप्रमाणे यज्ञाचा दंभ माजवून ते प्राण्यांच्या सर्वनाशाची इच्छा करितात. 88

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधम् च संश्रिताः ।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥16. 18॥
389-16
मग पुढा भेरी निशाण । लाउनी ते दीक्षितपण । जगी फोकारिती आण । वावो वावो ॥389॥
मग स्वत:पुढे डंका, ध्वज वगैरे लाऊन आपल्या यज्ञदीक्षिततेची लोकात व्यर्थ प्रसिद्धि करितात. 89
390-16
तेव्हा महत्त्वे तेणे अधमा । गर्वा चढे महिमा । जैसे लेवे दिधले तमा । काजळाचे ॥390॥
अशा वृथा महत्त्वाने, त्या नीच जनांस अधिकच गर्व चढतो, व जणू काही अंधकाराला काजळाची पुटं द्यावी त्या प्रमाणे 390
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
391-16
तैसे मौढ्य घणावे । औद्धत्य उंचावे । अहंकारु दुणावे । अविवेकुही ॥391॥
त्यांचा मूर्खपणा अधिकच घट्ट होतो, उद्धटपणा वाढतो, आणि अहंकार व अविवेकही दुणावतो. 91
392-16
मग दुजयाची भाष । नुरवावया निःशेष । बळीयेपणा अधिक । होय बळ ॥392॥
मग आपल्यापेक्षा दुसरा कोणी अधिक बलवान् आहे अशी कोणी भाषाही काढू नये असे त्याला बळ चढते. 92
393-16
ऐसा अहंकार बळा । जालिया एकवळा । दर्पसागरु मर्यादवेळा । सांडूनि उते ॥393॥
ह्याप्रमाणे सामर्थ्य व अहंकार ह्यांचे ऐक्य झाल्यावर दर्परूपी समुद्राच्या लाह्या मर्यादा सोडून उचंबळू लागतात. 93
394-16
मग वोसंडिलेनि दर्पे । कामाही पित्त कुरुपे । तया धगी सैंघ पळिपे । क्रोधाग्नि तो ॥394॥
वर्षाची अशी वाढ झाली म्हणजे कामाचेही पित्त खवळते व त्या धगीने क्रोधाग्नीही भडकतो. 94
395-16
तेथ उन्हाळा आगी खरमरा । तेलातुपाचिया कोठारा । लागला आणि वारा । सुटला जैसा ॥395॥
मग उन्हाळघांत प्रखर अग्नि तेलातुपाच्या कोठारास लागून त्यातच आणखी जसा वारा सुटावा. 95
396-16
तैसा अहंकारु बळा आला । दर्पु कामक्रोधी गूढला । या दोहीचा मेळु जाला । जयांच्या ठायी ॥396॥
त्याप्रमाणे, बलवान असा अहंकार व कामक्रोध ह्यांनी गुफुटून गेलेला उन्मतपणा ह्या दोघांचे ऐक्य ज्यांच्या ठायी होते. 96
397-16
ते आपुलिया सवेशा । मग कोणी कोणी हिंसा । या प्राणियाते वीरेशा । न साधती गा ? ॥397॥
ते आपल्या इच्छेखातर किंवा इच्छेप्रमाणे कोणत्या प्राण्यांची हिंसा करणार नाहीत ? 97
398-16
पहिले तव धनुर्धरा । आपुलिया मांसरुधिरा । वेचु करिती अभिचारा- । लागोनिया ॥398॥
अर्जुना, अभिचारमंत्रसिद्धीकरिता हे प्रथम आपल्या अंगांतील रक्तमांस खर्च करितात. 98
399-16
तेथ जाळिती जिये देहे । यामाजी जो मी आहे । तया आत्मया मज घाये । वाजती ते ॥399॥
असा ते आपल्या देहास जो त्रास करून घेतात, त्यामध्ये आत्मरूपाने वास करणारा जो मी यालाच हे चटके बसतात. 99
400-16
आणि अभिचारकी तिही । उपद्रविजे जेतुले काही । तेथ चैतन्य मी पाही । सीणु पावे ॥400॥
आणि त्या अभिचारक मंत्रांनी ज्यांना ज्यांना उपद्रव द्यावयाचा असतो त्यांच्या ठिकाणी जीवचैतन्यरूपाने वास करणारा जो मी, त्या मलाच ते चटके बसतील; 400
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
401-16
आणि अभिचारावेगळे । विपाये जे अवगळे । तया टाकिती इटाळे । पैशून्याची ॥401॥
आणि कोणी कदाचित् ह्या अभिचारांतून गळले तर त्यांच्यावर नीचतेचे आरोप करितात. (आणि त्यास छळतात) 1
402-16
सती आणि सत्पुरुख । दानशीळ याज्ञिक । तपस्वी अलौकिक । संन्यासी जे ॥402॥
सती, सत्वशील पुरुष, दानशूर पुरुष, याज्ञिक, अलौकिक तपी असे संन्यासी जे असतील. 2
403-16
का भक्त हन महात्मे । इये माझी निजाची धामे । निर्वाळली होमधर्मे । श्रौतादिकी ॥403॥
किंवा भक्त आणि महात्मे, ही माझी श्रौतादि यज्त्रयागाने शुद्ध झालेली निवास संस्थानेच होत. 3
404-16
तया द्वेषाचेनि काळकूटे । बासटोनि तिखटे । कुबोलांची सदटे । सूति कांडे ॥404॥
अशा पवित्र जनांवर व्देषरूपी कालकूट विषाचे जे तीक्ष्ण वाग्बाण, यांचा वर्षाव करितात. 4

तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् ।
क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥16. 19॥
405-16
ऐसे आघवाचि परी । प्रवर्तले माझ्या वैरी । तया पापिया जे मी करी । ते आइक पा ॥405॥
याप्रकारे जे सर्व प्रकारांनी मजपाशी वैर करण्यास प्रवृत्त होतात, त्या पाप्याना मी जे शासन करितों, तो ऐक. 5
406-16
तरी मनुष्यदेहाचा तागा । घेऊनि रुसती जे जगा । ते पदवी हिरोनि पै गा । ऐसे ठेवी ॥406॥
तरी, जगात मनुष्याच्या जन्माला येऊन जे त्या देहाची कर्तव्ये मात्र करीत नाहीत, त्यांचा तो देह हरण करून अशा स्थितीत ठेवितो, 6
407-16
जे क्लेशगावीचा उकरडा । भवपुरीचा पानवडा । ते तमोयोनि तया मूढा । वृत्तीचि दे ॥407॥
क जी योनि अत्यंत क्लेशदायक, घाणेरडी, जन्ममरणरूप यातनेची पायवाट असून अंधकारमय (अज्ञानरूप) असते तशी योनि त्यांना देतों. 7
408-16
मग आहाराचेनि नांवे । तृणही जेथ नुगवे । ते व्याघ्र वृश्चिक आडवे । तैसिये करी ॥408॥
मग क्षुधा लागली तर गवतही उपयोगी पडू नये अशा व्याघ्र वृश्चिकादि जातींचा त्यास अरण्यात जन्म देतों. 8
409-16
तेथ क्षुधादुःखे बहुते । तोडूनि खाती आपणयाते । मरमरो मागुते । होतचि असती ॥409॥
तेथे अत्यंत क्षुधित झाले असता, आपल्याच शरीराचे लचके तोडून खाण्याची पाळी येते आणि मरून पुनःपुनः त्याच योनीत जन्म घेतात. 9
410-16
का आपुला गरळजाळी । जळिती आंगाची पेंदळी । ते सर्पचि करी बिळी । निरुंधला ॥410॥
किंवा ज्याचा आपल्या विषाच्याच दाहाने साऱ्या अंगाचा दाह होतो अशा सर्पयोनीत घालून त्यास बिळात कोंडून ठेवितो. 410
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
411-16
परी घेतला श्वासु घापे । येतुलेनही मापे । विसावा तया नाटोपे । दुर्जनांसी ॥411॥
परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यास जितका थोडा वेळ लागतो तितकीही मी त्यास विश्रांति लाभू देत नाही. 11
412-16
ऐसेनि कल्पांचिया कोडी । गणितांही संख्या थोडी । तेतुला वेळु न काढी । क्लेशौनि तया ॥412॥
अशा अगणित कल्पांच्या कोडीच्या कोडी लोटेपर्यंत मी त्यास त्या योनींतून बाहेर काढीत नाही. 12
413-16
तरी तयांसी जेथ जाणे । तेथिचे हे पहिले पेणे । ते पावोनि येरे दारुणे । न होती दुःखे ॥413॥
तरी त्यांना पुढे जेथे जावयाचे आहे त्यातील हा पहिला मुक्काम होय; तर मग त्यापुढील योनीत दारुण दुःखे होणार नाहीत काय ? 13

आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि ।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥16. 20॥
414-16
हा ठायवरी । संपत्ति ते आसुरी । अधोगती अवधारी । जोडिली तिही ॥414॥
त्या आसुरी संपत्तीच्या योगाने त्यांना अशी दुर्दशा प्राप्त होत असते हे लक्ष्यात ठेव. 14
415-16
पाठी व्याघ्रादि तामसा । योनी तो अळुमाळु ऐसा । देहाधाराचा उसासा । आथी जोही ॥415॥
पण, व्याघ्रादि तामस योनींमध्येही देहाच्या आधाराने त्यास अधूनमधून तरी थोडी विश्रांति मिळते. 15
416-16
तोही मी वोल्हावा हिरे । मग तमचि होती एकसरे । जेथे गेले आंधारे । काळवंडैजे ॥416॥
तेवढी थोडी विश्रांतीही हिरावून घेऊन जेणे अंधारही काळिमेच्या दृष्टीने कमी पडेल अशा केवल तमोरूप योनीमध्ये मी त्यांना घालतो. 16
417-16
जयांची पापा चिळसी । नरक घेती विवसी । शीण जाय मूर्च्छी । सिणे जेणे ॥417॥
ज्या तमोयोनीचा पापालाही किळस येतो किंवा नरकही जिला भितो, किंवा जेथे श्रमही श्रमून मूर्च्छित होतो. 17
418-16
मळु जेणे मैळे । तापु जेणे पोळे । जयाचेनि नांवे सळे । महाभय ॥418॥
जेथे मलही मलिन होतो, तपालाही ताप होतो, किंवा ज्या योनीचे नुसते नांव घेतले असता महाभयही भयभीत होते. 18
419-16
पापा जयाचा कंटाळा । उपजे अमंगळ अमंगळा । विटाळुही विटाळा । बिहे जया ॥419॥
जेथे पापही कंटाळते, अमंगलव देखील अमंगल होते व विटाळही आपण विटाळू अशी भीत बाळगतो. 19
420-16
ऐसे विश्वाचेया वोखटेया । अधम जे धनंजया । ते ते होती भोगूनिया । तामसा योनी ॥420॥
अर्जुना, साऱ्या विश्वांत अधमांतील अधम अशी जी ही तामस योनी तिच्यात त्यांची अशा भोगांनी अशी दुर्दशा होते. 420
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
421-16
अहा सांगता वाचा रडे । आठविता मन खिरडे । कटारे मूर्खी केवढे । जोडिले निरय ॥421॥
तिचे वर्णन करितांना वाणीला कष्ट होतात, मन कच खाते आणि असे वाटते की केवढा रे घोर अनर्थ ह्यांनी ओढवून घेतला ! 21
422-16
कायिसया ते आसुर । संपत्ति पोषिती वाउर । जिया दिधले घोर । पतन ऐसे ॥422॥
जिच्यामुळे असा घोर पतनप्रसंग प्राप्त होतो ती आसुरी संपत्ति हे मूर्ख कशाला रे अशी वाढवितात असे वाटू लागले. 22
423-16
म्हणौनि तुवा धनुर्धरा । नोहावे गा तिया मोहरा । जेउता वासु आसुरा । संपत्तिवंता ॥423॥
म्हणून, अर्जुना, तू त्या संपत्तीकडे किंवा जेथे आसुरी संपत्तिमान वास करतात त्या योनीकडे नुसते ढुंकूनही पाहू नको. की त्यांचे नांवही घेऊ नको. 23
424-16
आणि दंभादि दोष साही । हे संपूर्ण जयांच्या ठायी । ते त्यजावे हे काई । म्हणो कीर ? ॥424॥
मग, दंभादि सहा दोषांची खाण जी आसुरी संपत्ति तिच तू त्याग कर, हे काय निराळे सांगावयाची आवश्यकता आहे ? 24
नरकाचे तीन दरवाजे
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत् त्रयं त्यजेत् ॥16. 21॥
425-16
परी काम क्रोध लोभ । या तिहीचेही थोंब । थांवे तेथे अशुभ । पिकले जाण ॥425॥
परंतु, काम, क्रोध आणि लोभ ह्यांच्या एकीचा वृक्ष जेथे जोरावतो जेथे शुभफलनिष्पत्ति होत असते हे लक्षात असू दे. 25
426-16
सर्व दुःखा आपुलिया । दर्शना धनंजया । पाढाऊ हे भलतया । दिधले आहाती ॥426॥
ज्याला सर्व दुःखांचा अनुभव यावा असे वाटेल, अशा वाटेल त्याला हे जणू वाटाडेच आहेत, हे अर्जुना, ध्यानात असावे. 26
427-16
का पापिया नरकभोगी । सुवावयालागी जगी । पातकांची दाटुगी । सभाचि हे ॥427॥
किंवा पापी लोकास नरकभोग घडविण्यासाठी पातकांची ही एक मोठी सभाच होय. 27
428-16
ते रौरव गा तंवचिवरी । आइकिजती पटांतरी । जव हे तिन्ही अंतरी । उठती ना ॥428॥
जोपर्यंत काम, क्रोध व लोभ ह्या तीन दोषांचा चित्तांत उद्भव झाला नाही तोपर्यंतच पुराणांती वर्णलेल्या रौरव नरकादिकांच्या गोष्टी ऐकाव्या. 28
429-16
अपाय तिही आसलग । यातना इही सवंग । हाणी हाणी नोहे हे तिघ । हेचि हाणी ॥429॥
ह्यांनी अपाय प्राप्ति त्वरित होते, यातनाही सवंग होतात व ह्यांनी हानि होते असे म्हणण्यापेक्षा हे तिघे म्हणजेच ” मूर्त हानि ” होत. 29
430-16
काय बहु बोलो सुभटा । सांगितलिया निकृष्टा । नरकाचा दारवंटा । त्रिशंकु हा ॥430॥
अर्जुना, तुला फार काय सांगावे ! वर वर्णीलेल्या निकृष्टस्थितिरूप नरकाचे जे प्रवेशद्वार त्याच्या हे तीन दोष म्हणजे उंबरठाच होत. 430
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
431-16
या कामक्रोधलोभा- । माजी जीवे जो होय उभा । तो निरयपुरीची सभा । सन्मानु पावे ॥431॥
ह्या कामक्रोधलोभांना जो जीवे वाहिला तो नरकपुरीच्या सभेत सन्मानाचे पद पावेल. 31
432-16
म्हणौनि पुढत पुढती किरीटी । हे कामादि दोष त्रिपुटी । त्यजावीचि गा वोखटी । आघवा विषयी ॥432॥
म्हणून अर्जुना, सर्वप्रयत्ने करून ही कामादि दोषांची त्रिपुटी अत्यंत घातक म्हणून तिचा त्याग करच. 32

एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् 16. 22॥
433-16
धर्मादिका चौही आंतु । पुरुषार्थाची तैचि मातु । करावी जै संघातु । सांडील हा ॥433॥
पुरुषार्थाची सीमा जे धर्म, अर्थ, काम व मोक्ष त्यांची गोष्ट तेव्हांच बोलता की येईल ज्यावेळी हे दोषत्रय जीवांच्या पदरी नसेल. 33
434-16
हे तिन्ही जीवी जव जागती । तंववरी निकियाची प्राप्ती । हे माझे कान नाइकती । देवोही म्हणे ॥434॥
हे तीन दोष जीवाच्या ठिकाणी जो वर जागे आहेत, तोपर्यंत या चार पुरुषार्थापैकी एकाची तरी प्राप्ति जीवास होईल हे ऐकण्यास माझे कान धजत नाहीत असे देवही म्हणाले. 34
435-16
जया आपणपे पढिये । आत्मनाशा जो बिहे । तेणे न धरावी हे सोये । सावधु होईजे ॥435॥
ज्याला आपल्या हिताची इच्छा आहे व जो आत्मनाशाला भितो त्याने ह्या त्रयीचा संग सोडावा; सावध असा बरें. 35
436-16
पोटी बांधोनि पाषाण । समुद्री बाही आंगवण । का जियावया जेवण । काळकूटाचे ॥436॥
पोटाशी पाषाण बांधून बाहुंनी समुद्रतरण करू पहाणे किंवा जीवन जगविण्याकरिता काळकूट अन्न सेवन करणे. 36
437-16
इही कामक्रोधलोभेसी । कार्यसिद्धि जाण तैसी । म्हणौनि ठावोचि पुसी । ययाचा गा ॥437॥
ह्याप्रमाणे ह्या कामक्रोधलोभांनी कार्यसिद्धि साधण्यासारखी आहे, म्हणून त्यांच्या वाटेलाही जाऊ नकोस हो ! 37
438-16
जै कही अवचटे । हे तिकडी सांखळ तुटे । तै सुखे आपुलिये वाटे । चालो लाभे ॥438॥
जेव्हा केव्हा अकस्मात् ही तीन दुव्यांची (पायातील) सांखळी तुटेल, तेव्हा सुखाने आपले मार्गक्रमण करणे शक्य होईल. 38
439-16
त्रिदोषी सांडिले शरीर । त्रिकुटी फिटलिया नगर । त्रिदाह निमालिया अंतर । जैसे होय ॥439॥
वात, पित्त, कफ, ह्या तीन दोषांपासून मुक्त असलेले शरीर, तीन कुटाळक्या ( चोरी, चहाडी, शिंदळकी ? ) मुक्त असलेले नगर व त्रिविध तापांपासून (आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक) मुक्त असलेले अंतःकरण जसे सुखी असते. 39
440-16
तैसा कामादिकी तिघी । सांडिला सुख पावोनि जगी । संगु लाहे मोक्षमार्गी । सज्जनांचा ॥440॥
त्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ ह्या तिघांपासून मुक्त असलेला जगात सुखी होऊन मोक्षमार्गदायी सज्जन संगतीचा त्यास लाभ होतो. 440
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
441-16
मग सत्संगे प्रबळे । सच्छास्त्राचेनि बळे । जन्ममृत्यूची निमाळे । निस्तरे राने ॥441॥
मग सत्संगतीच्या जोरावर, सच्छास्त्राच्या सहाय्याने जन्ममृत्युरूप अरण्याची बिकट वाट तो चुकवू शकतो. 41
442-16
ते वेळी आत्मानंदे आघवे । जे सदा वसते बरवे । ते तैसेचि पाटण पावे । गुरुकृपेचे ॥442॥
अशा प्रकारे आत्मानंदाचे जे नित्य निजस्थान अशी जी गुरुकृपा, ती त्याला प्राप्त होते. 42
443-16
तेथ प्रियाची परमसीमा । तो भेटे माउली आत्मा । तये खेवी आटे डिंडिमा । सांसारिक हे ॥443॥
व तिच्या योगे परमानंदतेची अखेरची सीमा अशी जी आत्मराज माउली तिचे अपरोक्ष (आविर्भाव) होऊन त्याचक्षणी “ आपण संसारी आहो ” अशा असलेल्या त्याच्या भ्रमाचा निरास होतो. 43
444-16
ऐसा जो कामक्रोधलोभा । झाडी करूनि ठाके उभा । तो येवढिया लाभा । गोसावी होय ॥444॥
ह्याप्रमाणे, कामक्रोधलोभ यांची झाडणी करून जो सिद्ध होतो, तोच अशा लाभाचा धनी होत असतो, 44
यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारत ।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥16. 23॥
445-16
ना हे नावडोनि काही । कामादिकांच्याचि ठायी । दाटिली जेणे डोई । आत्मचोरे ॥445॥
किंवा हे न आवडून जो आत्मवंचक कामादिकांच्या ठिकाणी डोके देऊन व्यवहरतो; 45
446-16
जो जगी समान सकृपु । हिताहित दाविता दीपु । तो अमान्यु केला बापु । वेदु जेणे ॥446॥
ज्याची सर्व जगावर समान कृपादृष्टि आहे, हित काय व अहित काय ह्यांचे मार्गदर्शन करणारा जो जणू दीपस्तंभ आहे असा जो वेद, तो ज्यांनी अप्रमाण केला. 46
447-16
न धरीचि विधीची भीड । न करीचि आपली चाड । वाढवीत गेला कोड । इंद्रियांचे ॥447॥
विधिनिषेधाची पर्वा न करिता, आपल्या हिताकडे दुर्लक्ष्य करून जो केवळ इंद्रियांचे लळे पुरे करितो. 47
448-16
कामक्रोधलोभांची कास । न सोडीच पाळिली भाष । स्वैराचाराचे असोस । वळघला रान ॥448॥
काम क्रोधादिकांची कास न सोडता जो त्यांच्या तंत्राप्रमाणे चालतो व स्वैराचाराच्या अरण्यात संचार करितो. 48
449-16
तो सुटकेचिया वाहिणी । मग पिवो न लाहे पाणी । स्वप्नीही ते कहाणी । दूरीचि तया ॥449॥
त्याला त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर आपण यावे अशी इच्छा होणे शक्य नाही, इतकेंच नव्हे, तर त्याला तसे नुसते स्वप्न पडणेही शक्य नाही. 49
450-16
आणि परत्र तव जाये । हे कीर तया आहे । परी ऐहिकही न लाहे । भोग भोगू ॥450॥
आणि संसारबंध सुटून परलोकप्राप्ति होईल ही गोष्ट तर राहो; पण त्याला येथील भोगही सुखाने भोगत येत नाहीत. 450
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
451-16
तरी माशालागी भुलला । ब्राह्मण पाणबुडा रिघाला । की तेथही पावला । नास्तिकवादु ॥451॥
ब्राह्मण, माशांच्या आशेने पाणबुडा (कोळ्यांच्या जातींत) शिरला, पण असला नास्तिक आम्हाला नको, म्हणून तेही त्याला आपल्या जातीत घेईनात, तात्पर्य तो आपल्या व परक्या जातीस मुकला ! 51
152-16
तैसे विषयांचेनि कोडे । जेणे परत्रा केले उबडे । तव तोचि आणिकीकडे । मरणे नेला ॥452॥
त्याप्रमाणे विषयांच्या लालचीने त्याने परलोक तर लाथाडलाच; पण विषयभोग तरी घडेल म्हणावे तर इतक्यात त्यास मृत्यूने गाठले ! ( सारांश, दोन्ही अंतरला ! ) 52
453-16
एवं परत्र ना स्वर्गु । ना ऐहिकही विषयभोगु । तेथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो ? ॥453॥
ह्याप्रमाणे, परलोक किंवा स्वर्ग नाही व ऐहिक विषयभोगही नाही, अशा स्थितीत मोक्षाची गोष्टच कशाला पाहिजे ? 53
454-16
म्हणौनि कामाचेनि बळे । जो विषय सेवू पाहे सळे । तया विषयो ना स्वर्गु मिळे । ना उद्धरे तो ॥454॥
म्हणून कामाच्या नादी लागून जो विषयांचे बळाने सेवन करू पाहतो, त्याला विषयही नाही व स्वर्गही नाही असे होते; उद्धार तर. 54

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहाऱसि ॥16. 24॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः ॥16॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील दैवासुरसंपद्विभागयोग नावाचा हा सोळावा अध्याय समाप्त झाला. ॥16॥
455-16
याकारणे पै बापा । जया आथी आपुली कृपा । तेणे वेदांचिया निरोपा । आन न कीजे ॥455॥
म्हणून अर्जुना, ज्याला आपल्या स्वतःवरच कृपा करणे असेल त्याने वेदाज्ञेचे उल्लंघन करू नये. 55
456-16
पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता । अनायासे आत्महिता । भेटेचि ते ॥456॥
पतीच्या मनोगताप्रमाणे वागल्याचे श्रेय जोडून त्यातच पतिव्रता जसे आत्मकल्याणही साधिते. 56
457-16
नातरी श्रीगुरुवचना । दिठी देतु जतना । शिष्य आत्मभुवना- । माजी पैसे ॥457॥
किंवा श्रीगुरुवचनाकडे लक्ष्य देऊन त्याचे काळजीपूर्वक जतन (चिंतन) करणारा शिष्य जसा आत्मभुवनामध्ये म्हणजे स्वरूपच्या ठिकाणी स्थित होतो. 57
458-16
हे असो आपुला ठेवा । हाता आथी जरी यावा । तरी आदरे जेवी दिवा । पुढा कीजे ॥458॥
हेही असो; आपलाच ठेवा खरा; पण सांपडावा असे वाटत असेल तर जसे दीपाचे सहाय्य घ्यावे लागतं, 58
459-16
तैसा अशेषांही पुरुषार्था । जो गोसावी हो म्हणे पार्था । तेणे श्रुतिस्मृति माथा । बैसणे घापे ॥459॥
तसे, अशेष पुरुषार्थाचा धनी होण्याची ज्याची इच्छा असेल त्याने श्रुति व स्मृति ह्यांच्या आज्ञा शिरसावंद्य मानाव्या. 59
460-16
शास्त्र म्हणेल जे सांडावे । ते राज्यही तृण मानावे । जे घेववी ते न म्हणावे । विषही विरु ॥460॥
शास्त्र ज्याचा निषेध करील ती राज्यासारखी वस्तूही तृणवत् मानावी व ज्याचा स्वीकार कर असे शास्त्रवचन असेल ती वस्तु विषाप्रमाणे असली तरीही आपला वैरी अहितकारी आहे असे म्हणू नये. 460
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
461-16
ऐसिया वेदैकनिष्ठा । जालिया जरी सुभटा । तरी के आहे अनिष्टा । भेटणे गा ? ॥461॥
अर्जुना, अशा वैदिकनिष्ठ पुरुषाला कधीतरी अनिष्टाची गाठ पडेल काय ? 61
462-16
पै अहितापासूनि काढिती । हित देऊनि वाढविती । नाही गा श्रुतिपरौती । माउली जगा ॥462॥
हे पहा; अहितापासून रक्षण करणारी व हितबोध करून वाढविणारी अशी श्रुतीसारखी साऱ्या जगाची माउली कोणी नाहीच नाही. 62
463-16
म्हणौनि ब्रह्मेशी मेळवी । तव हे कोणे न सांडावी । अगा तुवांही ऐसीचि भजावी । विशेषेसी ॥463॥
म्हणून जिच्या योगे ब्रह्मप्राप्ति होते अशा ह्या श्रुतीची कोणीही करू अवज्ञा नये आणि अर्जुना, तू तर तिचे विशेषच पालन कर. 63
464-16
जे आजि अर्जुना तू येथे । करावया सत्य शास्त्रे सार्थे । जन्मलासि बळार्थे । धर्माचेनि ॥464॥
कारण अर्जुना, शास्त्र सत्य व सार्थ आहे हे लोकांना स्पष्टपणे पटवून देण्याकरिता म्हणून महान् पूर्वपुण्याचरणाने तुझा येथे जन्म झाला आहे. 64
465-16
आणि धर्मानुज हे ऐसे । बोधेचि आले अपैसे । म्हणौनि आनारिसे । करू नये ॥465॥
आणि सहज ओघाने तु धर्मानुजहि आहेस; म्हणूनही तुझा त्याबद्दल विशेष आदर असावा. 65
466-16
कार्याकार्यविवेकी । शास्त्रंचि करावी पारखी । अकृत्य ते कुडे लोकी । वाळावे गा ॥466॥
कार्य काय व अकार्य काय हा विचार किंवा निर्णय शास्त्राज्ञे प्रमाणेच करावा व जे अकृत्य ते अनिष्ट मानून त्याचा त्याग करावा. 66
467-16
मग कृत्यपणे खरे निगे । ते तुवा आपुलेनि आंगे । आचरोनि आदरे चांगे । सारावे गा ॥467॥
व जे कर्तव्य असे ठरेल, ते आदरपूर्वक तू जातीने आचरून पुरे करावे. 67
468-16
जे विश्वप्रामाण्याची मुदी । आजि तुझ्या हाती असे सुबुद्धी । लोकसंग्रहासि त्रिशुद्धी । योग्यु होसी ॥468॥
कारण तुझे शुद्ध बुद्धि असून, तुझा आचार लोकांनी प्रमाणभूत मानावा, असा तुझा व्यावहारिक अधिकारही आहे; व म्हणूनच लोकसंग्रहदृष्टयाही तु निःसंशय योग्य आहेस. 68
469-16
एवं आसुरवर्गु आघवा । सांगोनि तेथिचा निगावा । तोहि देवे पांडवा । निरूपिला ॥469॥
ह्याप्रमाणे आसुरी संपत्ति व तिचे परिणाम ह्यांचे देवांनी अर्जुनास निरूपण केले. 69
470-16
इयावरी तो पंडूचा । कुमरु सद्भावो जीवीचा । पुसेल तो चैतन्याचा । कानी ऐका ॥470॥
ह्यापुढे तो पंडुकुमर जे काही सद्भावपूर्वक विचारील ते सावधान चित्ते ऐकावे. 470
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
471-16
संजये व्यासाचिया निरोपा । तो वेळु फेडिला तया नृपा । तैसा मीहि निवृत्तिकृपा । सांगेन तुम्हा ॥471॥
श्रीव्यासाचे आज्ञे प्रमाणे संजयाने ह्या निरोपाने राजा धृतराष्ट्राचा जसा कालक्षेप केला तसा मीही तुमचा करीन. 71
472-16
तुम्ही संत माझिया कडा । दिठीचा कराल बहुडा । तरी तुम्हा माने येवढा । होईन मी ॥472॥
तुम्ही संतजन जर मजवर आपला कृपावर्षाव कराल तर तुम्हाला मान्य व्हावा अगर पटावा असा (व्याख्यान करणारा) मी ही होईन. 72
473-16
म्हणौनि निज अवधान । मज वोळगे पसायदान । दीजो जी सनाथु होईन । ज्ञानदेवो म्हणे ॥473॥
म्हणून महाराज संतांस म्हणतात, आपले अवधान देऊन मज शिष्यावर प्रसाद व्हावा म्हणजे मी अनाथ राहाणार नाही. 473
॥ इति श्रीज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां दैवासुरसंपद्विभागयोगोनाम षोडशोऽध्यायः ॥16॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :-24॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 473॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत



-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम

सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.

सार्थ ज्ञानेश्वरी सर्व अध्याय

वारकरी ग्रंथ सूची

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading