आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय ४ था ज्ञाकर्मसंन्यासयोगः
शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 4 : Karmasannyas Yoga:
Sartha Dnyaneshwari Adhyay 4 Karmasannyas:
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
अध्याय चवथा:- ज्ञाकर्मसंन्यासयोगः
एकून श्लोक : ४२
एकूण ओव्या : २२५
॥ॐ सार्थ ज्ञानेश्वरी: भावार्थदीपिका ॐ॥
। अथ चतुर्थोऽध्यायः – अध्याय चवथा ॥ ज्ञाकर्मसंन्यासयोगः ।
सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
। अथ चतुर्थोऽध्यायः – अध्याय चवथा ॥ ज्ञाकर्मसंन्यासयोगः ।
अध्याय चवथा
1-4
आजि श्रवणेंद्रिया पाहले । जे येणे गीतानिधान देखिले । आता स्वप्नचिहे तुकले । साचा सरिसे ॥1-1॥
आज कानांना उजाडले, म्हणजे त्यांचा भाग्योदय झाला; कारण यथार्थ गीता श्रवण होणे बहुतेक स्वप्नवत आहे. असा गीतेचा ठेवा आज त्यांनी पाहिला, ऐकला. आणि प्रथमच स्वप्न खरे आहे असे म्हटले तर ते चूक नाहीच.
2-4
आधीचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी । आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥2॥
आधीच ही आत्मविचाराची गोष्ठ आणि ती सांगणारे भगवान श्रीकृष्ण आणि ऐकायला भक्त शिरोमणी अर्जुनासारखा श्रोता. म्हणजे एक उत्तम पर्वणीच.
3-4
जैसा पंचमालापु सुगंधु । की परिमळु आणि सुस्वादु । तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥3॥
पंचम स्वर, त्यातच उत्तम सुवास व गोडी या तिन्हीचा ऐक्यभाव असता जसा आनंद होईल तसा प्रकार या गीतारूपी कथामृताचा आहे. म्हणजे यात सर्व इंद्रियांनाआनंद होईल अशी गोडी आहे.
4-4
कैसी आगळिक दैवाची । जे गंगा जोडली अमृताची । हो का जपतपे श्रोतयांची । फळा आली ॥4॥
दैवाची थोरवी काय वर्णावी की ज्यामुळे श्रोत्यांची जपतपे फळास येऊन अमृतरूपी गंगाच त्यांना प्राप्त झाली.
5-4
आता इंद्रियजात आघवे । तिही श्रवणाचे घर रिघावे । मग संवादसुख भोगावे । गीताख्य हे ॥5॥
म्हणून आता सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून श्रवणाचे ठिकाणी जाऊन रहावे आणि कृष्णार्जुन संवादरूपी गीतेचे सुख घ्यावे.
6-4
हा अतिसो अतिप्रसंगे । सांडूनि कथाचि ते सांगे । जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥6॥
तेव्हा संतमंडळी ज्ञानेश्वरांस म्हणाली की, आता हे पाल्हाळिक बोलणे थांबवून श्रीकृष्णार्जुन जे बोलत होते ती कथा आम्हाला सांगावी.
7-4
ते वेळी संजयो रायाते म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणे । जे अतिप्रीति श्रीनारायणे । बोलतु असे ॥4-7॥
त्यावेळी संजय धृतराष्ट्राला सांगतो की, दैवीसंपत्तीने युक्त असलेल्या अर्जुनास श्रीकृष्ण अतीप्रेमाने म्हणाले,
8-4
जे न संगेचि पितया वसुदेवासी । जे न संगेचि माते देवकीसी । जे न संगेचि बंधु बळिभद्रासी । ते गुह्य अर्जुनेशी बोलत ॥4-8॥
जे गुह्य श्रीकृष्णांनी आपला पिता वसुदेव, माता देवकी व बंधु बलराम ह्यांसही सांगितले नाही, ते अर्जुनास सांगितले.
9-4
देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । परी तेही न देखे या प्रेमाचे सुख । आजि कृष्णस्नेहाचे पीक । यातेचि आथी ॥4-9॥
लक्ष्मीदेवी इतकी नेहमी सन्निध राहणारी पण तिलाही ज्याप्रेमसुखाचा अनुभव लाभला नाही, त्याकृष्णप्रेमाचे पात्र आज अर्जुन झाला आहे.
10-4
सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा । परी त्याही येणे माने यशा । येतीचिना ॥4-10॥
सनकादिक त्याची खूप दिवसापासून इच्छा करित होते, पण त्यांनाही इतक्या योग्यतेचे ते प्रेम प्राप्त झाले नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-4
या जगदीश्वराचे प्रेम । एथ दिसतसे निरुपम । कैसे पार्थे येणे सर्वोत्तम । पुण्य केले ॥11॥
या जगदीश्वराचे प्रेम या अर्जुनावर अगदी निरुपम दिसत आहे. अर्जुनाने हे सर्वोत्तम पुण्य कसे प्राप्त केले बरे ?
12-4
हो का जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती । मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥12॥
अर्जुनाच्या प्रेमामुळे श्रीकृष्ण हा निराकार असूनही साकार झाला. अर्जुनाची त्या देवाशी झालेली एकरूपता मला आवडली आहे.
13-4
एर्हवी हा योगिया नाडळे । वेदार्थासी नाकळे । जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥13॥
एरव्ही हा श्रीकृष्ण परमात्मा योग्यांनाही सापडत नाही, वेदांना याचे वर्णन करता आले नाही, ध्यानानेही याला जाणता येत नाही, (ध्यानाचीहि नजर जेथे पर्यंत पोचत नाही)
14-4
ते हा निजस्वरूप । अनादि निष्कंप । परी येणे माने सकृप । जाहला असे ॥14॥
तो हा आत्मस्वरूप, उत्पत्तीरहित हा श्रीकृष्ण, मूळचाच अचल आहे; परंतु कोणत्या कारणामुळे अर्जुनावर कृपावंत झाला आहे, हे समजत नाही.
15-4
हा त्रैलोक्यपटाचि घडी । आकाराची पैलथडी । कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥15॥
हा त्रैलोक्यरूपी वस्त्राची घडी आहे. हा सर्व प्रकारच्या आकाराच्या पलीकडचा आहे; पण अर्जुनाच्या निःस्वार्थ प्रेमाने या अनंताला आपल्या आटोक्यात आणले आहे.
श्रीभगनानुवाच:
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥4. 1॥
भावार्थ :-
श्रीकृष्ण भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सृष्टीच्या आरंभी सूर्याला सांगितला, सूर्याने तो मनूला सांगितला आणि मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला सांगितला.
16-4
मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्ही विवस्वता । कथिला परी ते वार्ता । बहुवा दिवसांची ॥16॥
मग देव म्हणाले, अरे अर्जुना ! हाच योग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार दिवसापूर्वीची आहे.
17-4
मग तेणे विवस्वते रवी । हे योगस्थिति आघवी । निरूपिली बरवी । मनूप्रती ॥17॥
मग त्या विवस्वानं सूर्याने (रवीने) या योगाची संपूर्ण माहिती उत्तम प्रकारे मनूला सांगितली.
18-4
मनूने आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली । ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥18॥
मनूने स्वतः त्या योगाचे आचरण केले आणि मग आपला पुत्र इक्ष्वाकू यास उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आली आहे.
एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥4. 2॥
भावार्थ :-
या प्रकारे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षीनी जाणला; परंतु हे अर्जुना ! दीर्घकालानंतर तो योग या लोकी लुप्त झाला.
19-4
मग आणिकही या योगाते । राजर्षि जाहले जाणते । परी तेथोनि आता सांप्रते । नेणिजे कोणी ॥19॥
इक्ष्वाकूनंतर आणखी काही राजर्षी ह्या निष्काम कर्मयोगाला जाणणारे होऊन गेले; पण तेंव्हापासून आजपर्यंत या योगाला कोणी जाणत नाही. (कोणाला ठाऊक नाही)
20-4
जे प्राणिया कामी भरू । देहाचिवरी आदरु । म्हणोनि पडला विसरु । आत्मबोधाचा ॥20॥
याचे कारण म्हणजे प्राणिमात्राचा सगळा भर ” काम ” या विषयावर होता (पडला) आणि ते देहालाच सत्य मानत होते. देहावरच प्रेम करत असल्यामुळे त्यांना आत्मज्ञाना चा विसर पडला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-4
अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि । जीवु तैसा उपाधि । आवडे लोका ॥21॥
आत्मबोधाची बुद्धीच आडमार्गाकडे जाऊ लागल्यामुळे लोकांना विषयातच आत्त्यंतीक सुख वाटू लागले आणि देहाचेच विचार प्राणांप्रमाणे प्रिय झाले.
22-4
एर्हवी तरी खवणेयांच्या गावी । पाटाऊवे काय करावी । सांगे जात्यंधा रवी । काय आथी ॥22॥
ज्या गावात वस्त्रे घालीत नाहीत, त्या गावात उंची वस्त्रांचा काय उपयोग ? किंवा जन्मापासून अंध असणाऱ्याला सूर्याचा काय उपयोग ? सांग बरे.
23-4
का बहिरयांचा आस्थानी । कवणे गीताते मानी । की कोल्हेया चांदणी । आवडी उपजे ॥23॥
किंवा बहिऱ्याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देईल काय ? किंवा कोल्हयाच्या मनात चांदण्याची आवड कधी निर्माण होईल काय ?
24-4
पै चंद्रोदया आरौते । जयांचे डोळे फुटती असते । ते काऊळे केवी चंद्राते । ओळखती ॥24॥
चंद्राचा उदय होण्यापूर्वी ज्यांचे डोळे मिटतात, ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखतील ? ?
25-4
तैसे वैराग्याची शिव न देखती । जे विवेकाची भाषा नेणती । ते मूर्ख केवी पावती । मज ईश्वराते ॥25॥
त्याप्रमाणे ज्यांनी वैराग्याची सीमादेखील पाहिली नाही, विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहित नाही, (सत्य व असत्य याची भाषा ज्यांना समजत नाही), ते अज्ञानी, महामुर्ख लोकांना माझी ईश्वराची प्राप्ती कशी बरे होईल ? ? (ते अज्ञानी ईश्वराला कसे बरे प्राप्त होतील. )
26-4
कैसा नेणो मोहो वाढीनला । तेणे बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणोनि योगु हा लोपला । लोकी इये ॥26॥
असा हा अज्ञानाचा मोह कसा वाढला,हे काही कळत नाही. त्यामुळे बहुतेक काळ हा योगपरंपरेपासून व्यर्थ गेला, म्हणून या लोकी हा निष्काम कर्मयोग लुप्त झाला.
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥4. 3॥
भावार्थ :-
तू माझा भक्त व सखा आहेस, म्हणून तोच पुरातन योग, मी तुला सांगितला आहे. कारण हे सर्व रहस्यातील उत्तम रहस्य आहे.
27-4
तोचि हा आजि आता । तुजप्रती कुंतीसुता । सांगितला आम्ही तत्वता । भ्रांति न करी ॥27॥
हे कुंतीसुता ! तोच (श्रेष्ठ ज्ञानरहस्यरूप असा) योग आम्ही तुला यथार्थ पणाने कथन केला आहे. याविषयी मनात कोणत्याही प्रकारची (संशय,) भ्रांती बाळगू नकोस.
28-4
हे जीवीचे निज गुज । परी केवी राखो तुज । जे पढियेसी तू मज । म्हणऊनिया ॥28॥
हा योग म्हणजे माझ्या हृदयातील विशेष गुह्य आहे. पण तुझ्यापासून हा योग कसा बरे चोरून ठेऊ ? कारण तू तर माझा अगदी लाडका आहेस.
29-4
म्हणून मी तुला तो सांगितला आहे. तू प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ॥29॥
हे अर्जुना ! तू जणू काही प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहेस; जिवलग मित्रत्वरुपी चैतन्याचा अंश आहेत. (सख्याची जीवनकला आहेत).
30-4
तू अनुसंगाचा ठावो । आता तुज काय वंचू जावो । जरी संग्रामारूढ आहो । जाहलो आम्ही ॥30॥
जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहोत, तरी हे अर्जुना ! तुझा आणि माझा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे तुझ्यापासून काही लपवून ठेवता येईल काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-4
तरी नावेक हे सहावे । गाजाबज्यही न धरावे । परी तुझे अज्ञानत्व हरावे । लागे आधी ॥31॥
तरी काही काळ हा युद्धाचा प्रसंग बाजूला ठेव. आमचे प्रथम कर्तव्य म्हणजे तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे.
अर्जुन उवाच:
अपरं भवतो जन्मं परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद् विजानीया त्वमादौ प्रोक्तवानिति ॥4. 4॥
भावार्थ :-
अर्जुन म्हणाला, हे देवा ! आपला जन्म हा अलीकडचा, आणि सूर्याचा जन्म आपल्या फार पूर्वीचा आहे. असे असताना तू सुरुवातीला हा योग त्याला सांगितलास, हे मी कसे बरे जाणावे ? ?
32-4
तव अर्जुन म्हणे हरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी । एथ विस्मो काय अवधारी । कृपानिधी ॥32॥
तेंव्हा अर्जुन म्हणाला, हे कृपानिधी श्रीहरी ! आई आपल्या मुलावर प्रेम करते, यात नवल (आश्चर्य) ते काय ?
33-4
तू संसारश्रांतांची साऊली । अनाथ जीवांची माऊली । आमुते कीर प्रसवली । तुझीच कृपा ॥33॥
आणि तू तर संसारतापाने दमलेल्या जीवांची सावली आहेस, अनाथ जीवांची आई आहेस आणि खरोखर तुझ्या कृपेच्या वर्षावानेच (तुझ्या कृपेमुळेच) जन्म झाला आहे.
34-4
देवा पांगुळ एकादे विईजे । तरी जन्मोनि जोजारू साहिजे । हे बोलो काय तुझे । तुजचि पुढा ॥34॥
हे देवा ! आईच्या पोटी एखाद्या पांगळ्या मुलाचा जन्म झाला, तर त्याच्या जन्मापासून आईला त्रास सोसावा लागतो. हे सर्व आपण जाणता, तर मग ह्या सर्व गोष्टी तुझ्यासमोर काय बोलाव्या ? ?
35-4
आता पुसेन जे मी काही । तेथ निके चित्त देई । तेवीचि देवे कोपावे ना काही । बोला एका ॥35॥
देवा ! आता तुला मी जे विचारणार आहे, त्याच्याकडे उत्तम प्रकारे लक्ष दे. माझ्या या प्रश्नांचा (बोलण्याचा) मुळीच राग धरू नकोस. ही विनंती.
36-4
तरी मागील जे वार्ता । तुवा सांगितली होती अनंता । ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥36॥
हे अनंता ! पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस, ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही.
37-4
जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसे हे वडिला ठाऊवे नाही । तरी तुवाचि केवी पाही । उपदेशिला ॥37॥
पाहा, विवस्वानं म्हणजे कोण, याची आपल्या वाडवडिलांनासुद्धा ठाऊक नाही, तर पाहा तू त्याला उपदेश केलास, हे कसे बरे शक्य आहे. ? ?
38-4
तो तरी आइकिजे बहुता काळांचा । आणि तू तव कृष्ण सांपेचा । म्हणोनि गा इये मातुचा । विसंवादु ॥38॥
तो सूर्य तर फार प्राचीन काळातला आहे, असे आम्ही ऐकतो; आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळाचा (अलीकडच्या काळात जन्माला आला आहात. ). म्हणून तुझ्या बोलण्यामध्ये विसंगती दिसत आहे.
39-4
तेवीचि देवा चरित्र तुझे । आपण काही काय जाणिजे । हे लटिके केवी म्हणिजे । एकिहेळा ॥39॥
हे देवा ! तुझे चरित्र आम्हास काही कळत नाही. तर मग आपण जे बोलता, ते एकदम खोटे आहे, असे तरी कसे म्हणावे. ? ?
40-4
परी हेचि मातु आघवी । मी परियेसे तैशी सांगावी । जे तुवाचि तया रवी केवी । उपदेशु केला ॥40॥
तेंव्हा प्राचीन काळी सूर्याला तू जो उपदेश केलास, तीच सगळी गोष्ट मला उत्तम प्रकारे समजू शकेल, अशा पद्धतीने सांगावी.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
श्री भगवानुवाच:
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥4. 5॥
भावार्थ :-
श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत. त्या सर्वाना मी जाणतो. हे अर्जुना, तू मात्र ते जाणत नाहीस.
41-4
तव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जै होता । तै आम्ही नसो ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥41॥
त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! जेंव्हा तो विवस्वानं होता, त्याकाळी आम्ही नव्हतो, अशी जर तुझ्या मनामध्ये भ्रांती निर्माण झाली असेल,
42-4
तरी तू गा हे नेणसी । पै जन्मे आम्हा तुम्हासी । बहुते गेली परी तिये न स्मरसी । आपली तू ॥42॥
तर तुला हे माहित नाही की, माझे आणि तुझे आजपर्यंत पुष्कळ जन्म झाले आहेत; परंतु तुला आपल्या गतजन्माचे स्मरण नाही.
43-4
मी जेणे जेणे अवसरे । जे जे होऊनि अवतरे । ते समस्तही स्मरे । धनुर्धरा ॥43॥
हे धनुर्धरा ! ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन मी अवतरलो, त्या सर्व अवतारांचे मला स्मरण आहे.
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतामामिश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥4. 6॥
भावार्थ :-
मी अविनाशीस्वरूप अजन्मा असूनदेखील, सर्व भूतमात्रांचा ईश्वर असूनसुद्धा आपल्या प्रकृतीला वश करून मी योगमायेने प्रकट होत असतो.
44-4
म्हणोनि आघवे । मज मागील आठवे । मी अजुही परि संभवे । प्रकृतिसंगे ॥44॥
म्हणून मला मागील सर्व गोष्टींचे स्मरण होते. मी जन्मरहित आहे, तरीपण मायेच्या योगाने मी अवतार धारण करत असतो.
45-4
माझे अव्ययत्व तरी न नसे । परी होणे जाणे एक दिसे । ते प्रतिबिंबे मायावशे । माझाचि ठायी ॥45॥
माझा अविनाशपणा कधीही नाहीसे होत नाही; परंतु अवतार घेणे व संपविणे, हा जो प्रकार दिसतो, तो माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी मायेमुळे भासमान होतो.
46-4
माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे । तेही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एर्हवी नाही ॥46॥
माझे स्वातंत्र्य तर कधीही नष्ट होत नाही. मी कर्माच्या अधीन आहे, असे जे दिसते, ते भ्रांतीमुळे (आज्ञान) दिसते; परंतु खरोखर तसे नाही.
47-4
की एकचि दिसे दुसरे । ते दर्पणाचेनि आधारे । एर्हवी काय वस्तुविचारे । दुजे आहे ॥47॥
जसे आरशामूळे एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात; एरवी वस्तुस्थितीचा सूक्ष्म विचार केला, तर दुसरी वस्तू आहे काय ? ?
48-4
तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जै अधिष्ठी । तै साकारपणे नटे नटी । कार्यालागी ॥48॥
हे अर्जुना ! तसा मी निराकारच आहे. परंतु ज्यावेळी मी प्रकृतीचा (मायेचा) आश्रय घेतो, त्यावेळी काही विशेष कार्यासाठी (धर्मकार्याकरिता) मी सगुण रूपाच्या वेषाने नटतो.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥4. 7॥
भावार्थ :-
हे भरतवंशी अर्जुना ! जेंव्हा जेंव्हा धर्माची ग्लानी होते, आणि अधर्म बळावू लागतो (वाढतो) तेंव्हा मी स्वतःला जन्मास घालतो. (मी अवतार घेतो)
49-4
जे धर्मजात आघवे । युगायुगी म्या रक्षावे । ऐसा ओघु हा स्वभावे । आद्य असे ॥49॥
कारण की, धर्माच्या संपूर्ण स्वरूपाचे (हा जो धर्मचा विचार आहे) प्रत्येक युगात मी रक्षण करावे, असा हा क्रम (प्रवाह) स्वभावतः अगदी मुळापासून (जगाच्या आरंभापासून) चालत आलेला आहे.
50-4
म्हणोनि अजत्व परते ठेवी । मी अव्यक्तपणही नाठवी । जे वेळी धर्माते अभिभवी । अधर्मु हा ॥50॥
म्हणून ज्या ज्या वेळी अधर्म हा धर्माचा ऱ्हास (पराभव) करू लागतो, त्या वेळी मी माझा जन्मरहितपणा बाजूला ठेवतो आणि माझ्या अव्यक्तपणाची आठवणही न ठेवता मी अवतार धारण करतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥4. 8॥
भावार्थ :-
सज्जनांच्या रक्षणाकरिता, दुर्जनांच्या नाशाकरिता व धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी युगा-युगात प्रकट होत असतो.
51-4
ते वेळी आपुल्याचेनि कैवारे । मी साकारु होऊनि अवतरे । मग अज्ञानाचे आंधारे । गिळूनि घाली ॥51॥
त्या वेळी माझ्या भक्तांच्या कैवारासाठी मी देह धारण करून अवतरतो; आणि मग हा अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो.
52-4
अधर्माचि अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ॥52॥
अधर्माची मर्यादा तोडून टाकतो, दोषाने (उत्कर्षासंबंधी) लिहिलेले लिखाण फाडून टाकतो आणि सज्जनांकडून (त्यांच्या हातून) सुखाची ध्वजा उभारवितो.
53-4
दैत्यांची कुळे नाशी । साधूंचा मानू गिंवशी । धर्मासी नीतीशी । शेज भरी ॥53॥
दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुनः मिळवून देतो आणि धर्म व नीतीची सांगड घालतो.
54-4
मी अविवेकाची काजळी । फेडूनी विवेकदीप उजळी । तै योगिया पाहे दिवाळी । निरंतर ॥54॥
मी विवेक दिपाला आलेली अविचाराची काजळी नाहीशी करतो आणि विवेकदीप प्रज्वलित करतो. त्या वेळी योगी लोकांना अखंड आनंदाच्या दिवाळीचा अनुभव येतो.
55-4
स्वसुखे विश्व कोंदे । धर्मचि जगी नांदे । भक्ता निघती दोंदे । सात्विकाची ॥55॥
तेंव्हा सर्व जग हे आत्मसुखाने भरून जाते. फक्त धर्मच जगात नांदत असतो. भक्तांच्या हृदयात सात्विकतेचे भरते येते.
56-4
तै पापाचा अचळु फिटे । पुण्याची पहाट फुटे । जै मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥56॥
हे अर्जुना, ज्या वेळी मी अवताररूपाने प्रकट होतो, त्यावेळी पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याची पहाट होते.
57-4
ऐसेया काजालागी । अवतरे मी युगी युगी । परि हेचि वोळखे जो जगी । तो विवेकिया ॥57॥
अशा या कार्यासाठी मी प्रत्येक युगांत अवतार घेतो, माझे हे कार्य जो जाणतो, तो या जगात खरा विवेकी होय.
जन्म कर्म च ने दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥4. 9॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! या प्रमाणे माझे दिव्य जन्म व कर्म जो यथार्थपणे जाणतो, तो पुरुष देहत्यागानंतर पुनः जन्मास येत नाही, तर मला येऊन मिळतो.
58-4
माझे अजत्वे जन्मणे । अक्रियताचि कर्म करणे । हे अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥58॥
मी उत्पत्तीरहित असूनही माझे जन्म घेणे आणि निष्क्रिय असूनही कर्म करणे, हे अविकारस्वरूप जो जाणतो, तो परममुक्त आहे. (तोच श्रेष्ठ प्रतीचा मुक्त आहे. )
59-4
तो चालिला संगे न चळे । देहीचा देहा नाकळे । मग पंचत्वी तव मिळे । माझाचि रूपी ॥59॥
तो इंद्रियाने कर्म करीत असला, तरी कोणत्याही प्रकारच्या आसक्तीने बांधला जात नाही. (व्यवहारात वागला तरी आसक्तीने, अहंकार वृत्तीने वागत नाही असा तो) देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही. (देहभावाने बध्द होत नाही). त्याचा (असा जो आहे त्याचा) देह ज्यावेळी पंचतत्वांत विलीन होतो, त्या वेळी तो माझ्या स्वरूपी एकरूप होतो. (माझ्यात रूपात येऊन मिळतो)
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥4. 10॥
भावार्थ :-
आसक्ती, भय व क्रोध ही ज्याच्यापासून निघून गेली आहेत, माझाच आश्रय घेतलेले, असे तप व ज्ञान यांनी पवित्र झालेले अनेक अनन्यभक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत.
60-4
एर्हवी परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती । वाटा केवेळी न वचती । क्रोधाचिया ॥60॥
एरव्ही जे आपल्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल शोक करीत नाहीत, ज्यांचे मन वासनारहित झालेले असते, (त्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात). जे केंव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-4
जे सदा मियाचि आथिले । माझिया सेवा जियाले । का आत्मबोधे तोषले । वीतराग जे ॥61॥
जे माझ्या भावनेने सदैव संपन्न असतात, माझ्या सेवेसाठी ज्यांचे जगणे असते, (माझ्या सेवेसाठीच जन्म झाला आहे असे मानुन जे जगतात), आत्मज्ञानाने जे संतुष्ट असतात; आणि ज्यांची विषय- आसक्ती नष्ट झालेली असते,
62-4
जे तपोतेजाचिया राशी । का एकायतन ज्ञानासी । जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप ॥62॥
जे तपरूपी तेज्याच्या राशी आहेत, जे ज्ञानाचे एकमेव ठिकाण आहे, जे तीर्थानादेखील पवित्र करणारे तिर्थरूपच आहेत,
63-4
ते मद्भावा सहजे आले । मी तेचि ते होऊनि ठेले । जे मज तया उरले । पदरु नाही ॥63॥
ते सहजच माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. जे मीच होऊन राहतात. त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाचा पडदा राहत नाही.
64-4
सांगे पितळेची गंधिकाळिक । जै फिटली होय निःशेख । तै सुवर्ण काई आणिक । जोडू जाईजे ॥64॥
सांग बरे, हिणकस सोन्यामधील असलेला पितळेचा गंज आणि काळेपणा हे दोन दोष पूर्णपणे नाहीसे झाले, तर शुद्ध असे सोने काही वेगळे मिळवावे लागते काय ? ?
65-4
तैसे यमनियमी कडसले । ते तपोज्ञानी चोखाळले । मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा ॥65॥
त्याप्रमाणे जे यम-नियमांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने आचरण करतात, जे तपाने आणि ज्ञानाने शुद्ध झाले आहेत, ते आणि मी एकरूप झालो आहोत, यामध्ये संशय तो कसला ? ?
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥4. 11॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! जे लोक मला जसे भजतात, मीही त्यांना तसाच भजतो. हे तत्व जाणून ज्ञानी लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गाचे अनुकरण करतात.
66-4
एर्हवी तरी पाही । जे जैसे माझा ठाई । भजती तया मीही । तैसाचि भजे ॥66॥
दुसरे असे पाहा की, जे लोक माझी अनन्य भावाने जशी भक्ती करतात, त्याप्रमाणे मीही त्यांच्यावर प्रेम करतो.
67-4
देखे मनुष्यजात सकळ । हे स्वभावता भजनशीळ । जाहले असे केवळ । माझा ठायी ॥67॥
पाहा, जेवढे म्हणून मनुष्यप्राणी आहेत, तेवढ्या सर्वाच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो.
68-4
परी ज्ञानेवीण नाशिले । जे बुद्धिभेदासि आले । तेणेचि या कल्पिले । अनेकत्व ॥68॥
परंतु ज्ञान नसल्यामुळे बुद्धीच्या ठिकाणी अनेक भेद निर्माण होतात. वास्तविक मी जो एक आहे, त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात.
69-4
म्हणऊनि अभेदी भेदु देखती । यया अनाम्या नामे ठेविती ॥ देवी देवो म्हणती । अचर्चाते ॥69॥
म्हणून वास्तविक जे अभेद आहे तेथे ते भेद पाहतात. मी नामरहित असताना मला अनेक प्रकारची नावे देतात. मी चर्चेचा विषय नसताना मला देव-देवी म्हणतात.
70-4
जे सर्वत्र सदा सम । तेथे विभाग अधमोत्तम । मतिवशे संभ्रम । विवंचिती ॥70॥
भेदबुद्धीने संभ्रमित झालेले लोक, मी (परमात्मा) सर्वत्र सम प्रमाणात (सर्व ठिकाणी) सारखा आहे, त्याच्या ठिकाणी ते चांगला व वाईट असे भेद करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
काङक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥4. 12॥
भावार्थ :-
कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची उपासना करतात. कारण, या मनुष्यलोकात कर्मापासून सिद्धी लवकर प्राप्त होत असते.
71-4
मग नानाहेतुप्रकारे । यथोचिते उपचारे । मानिली देवतांतरे । उपासिती 71॥
मग नाना प्रकारचे हेतू मनामध्ये धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देव-देवतांची योग्य उपचारांनी विधिपूर्वक उपासना करतात.
72-4
तेथ जे जे अपेक्षित । ते तैसेचि पावति समस्त । परी ते कर्मफळ निश्चित । वोळख तू ॥72॥
मग जे जे (त्यांच्या) मनात असते, (ज्या फळाची अपेक्षा ठेऊन ते कार्य करतात), ते ते सगळे (फळे) त्यांना प्राप्त होतात; परंतु ही त्यांनी केलेल्या कर्माची फळे आहेत, हे तू निश्चितपूर्वक जाण.
73-4
वाचूनि देते घेते आणिक । निभ्रांत नाही सम्यक । एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकी ॥73॥
खरे पाहता देणारा किंवा घेणारा कर्माशिवाय दुसरा कोणीही नसून या मनुष्यलोकात कर्मापासूनच फलप्राप्ती होते.
74-4
जैसे क्षेत्री जे पेरिजे । ते वाचूनि आन न निपजे । का पाहिजे तेचि देखिजे । दर्पणाधारे ॥74॥
शेतामध्ये आपण जे पेरतो, तेच उगवत असते; त्याशिवाय दुसरे काही उगवत नाही. अथवा आरशात जे पाहावे, ते आरशाच्या उपाधीमुळेच दिसत असते.
75-4
ना तरी कडेयातळवटी । जैसा आपुलाचि बोलु किरीटी । पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगे ॥75॥
किंवा अर्जुना ! पर्वताच्या कड्याच्या तळाशी आपण जे मोठयाने बोलतो, तेंव्हा त्या कड्याच्याच निमित्तमात्राने बोलण्याचा प्रतिध्वनी निर्माण होत असतो.
76-4
तैसा समस्ता या भजना । मी साक्षिभूतु पै अर्जुना । एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥76॥
त्याप्रमाणे अर्जुना, मी या सर्व उपसकाचा साक्षी आहे. येथे प्रत्येकाच्या भावनेप्रमाणे ज्याला-त्याला फळाची प्राप्ती होत असते.
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विध्यकर्तारमव्यम् ॥4. 13॥
भावार्थ :-
गुण आणि कर्म यांच्या भेदाप्रमाणे मी चार वर्ण निर्माण केले आहेत. या कर्माचा मी व्यवहारदृष्टीने मी जरी कर्ता असलो, तरी मी परमार्थतः अकर्ता व अव्यय (अविनाशी) आहे.
77-4
आता याचिपरी जाण । चार्ही आहेती हे वर्ण । सृजिले म्या गुण – । कर्मभागे ॥77॥
आता याप्रमाणे तू जाण की, जे चार वर्ण आहेत, ते गुण व कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केले आहेत.
78-4
जे प्रकृतीचेनि आधारे । गुणाचेनि व्यभिचारे । कर्मे तदनुसारे । विवंचिली ॥78॥
त्या चारही वर्णाच्या कर्माची आपआपल्या प्रकृतिधर्माने आणि गुणांच्या तारतम्याने योजना केली आहे.
79-4
एथ एकचि हे धनुष्यपाणी । परी जाहले गा चहू वर्णी । ऐसी गुणकर्मी कडसणी । केली सहजे ॥79॥
अर्जुना ! हे सर्व लोक वस्तुतः एकच असून गुण आणि कर्म यांच्या योगाने चार वर्णाची व्यवस्था सहजच झाली आहे.
80-4
म्हणोनि आईके पार्था । हे वर्णभेदसंस्था । मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागी ॥80॥
म्हणून हे अर्जुना ! ऐक. ही वर्णभेदाची व्यवस्था अशा प्रकारची असल्यामुळे मी त्याचा कर्ता मुळीच नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥4. 14॥
भावार्थ :-
कर्माच्या फळामध्ये माझी आसक्ती नसते, म्हणून कर्मे मला लिप्त करू शकत नाहीत, असे जो मला तत्वतः जाणतो, तोसुद्धा कर्माने बध्द होत नाही.
81-4
हे मजचिस्तव जाहले । परी म्या नाही केले । ऐसे जेणे जाणितले । तो सुटला गा ॥81॥
हे सर्व व्यवस्थापन माझ्यापासून झाले आहे, परंतु हे मी केलेले नाही; अरे अर्जुना, हे ज्याने जाणले तत्वतः ओळखले, तो कर्मबंधनापासून मुक्त झाला.
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥4. 15॥
भावार्थ :-
मी कर्म करून देखील अकर्ता आहे, असे जाणून पूर्वीच्या मुमुक्षूनी कर्म केले आहे. म्हणून तूदेखील पूर्वीच्या लोकांप्रमाणे कर्म कर.
82-4
मागील मुमुक्षु जे होते । तिही ऐशियाचि जाणोनि माते । कर्मे केली समस्ते । धर्नुधरा ॥82॥
हे अर्जुना ! पूर्वीच्या काळी जे मुमुक्षु होते, त्यांनी मी अकर्ता आहे, हे जाणले आणि त्यानुसारच सर्व कर्मे केली.
83-4
परी ते बीजे जैसी दग्धली । नुगवतीचि पेरली । तैशी कर्मेचि परि तया जाहली । मोक्षहेतु ॥83॥
परंतु भाजलेले बी जरी पेरले, तरी ते उगवत नाही; त्याप्रमाणे ती कर्मे खरी; परंतु त्याना कर्मबंधनातून सोडविण्याला तीच कारण झाली.
84-4
एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना । आपुलिये चाडे सज्ञाना । योग्य नोहे ॥84॥
या बाबतीत अर्जुना, आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, हा कर्माकर्माचा विचार विद्वान मनुष्याने देखील आपल्या इच्छेप्रमाणे करणे योग्य नाही. (जाणत्या विद्वान पुरूषासदेखील आपल्या बुध्दीने करता येईल असा नाही.
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥4. 16॥
भावार्थ :-
कर्म कोणते आणि अकर्म कोणते, या विषयात विद्वान लोक देखील मोहित होतात. ते कर्मतत्व मी तुला उत्तम प्रकारे सांगेन. ते जाणून तू संसारातील दुखापासून मुक्त होशील.
85-4
मर्म म्हणिजे ते कवण । अथवा अकर्मा काय लक्षण । ऐसे विचारिता विचक्षण । गुंफोनि ठेले ॥85॥
कर्म ज्याला म्हणतात, ते कोणते ? अथवा अकर्माचे लक्षण काय ? असा विचार करीत असताना विद्वान लोकदेखील भ्रमामध्ये गुंतून गेले.
86-4
जैसे का कुडे नाणे । खर्याचेनि सारखेपणे । डोळ्यांचेहि देखणे । संशयी घाली ॥86॥
ज्याप्रमाणे खोटे नाणे हे खऱ्या नाण्यासारखे भासत असल्यामुळे संशय निर्माण होतो. वस्तुतः डोळ्याला होणारे ज्ञान प्रत्येक्ष यथार्थ असते, तरीपण ते संशय निर्माण करते.
87-4
तैसे नैष्कर्म्यतेचेनि भ्रमे । गिंवसिजत आहाति कर्मे । जे दुजी सृष्टि मनोधर्मे । करू शकती ॥87॥
त्याप्रमाणे फक्त मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य अंगी असलेले महापुरुषदेखील ” आम्ही कर्मातीत झालो आहोत ” अशा भ्रमाणे युक्त होऊन बरोबर कर्माच्या पाशामध्ये सापडले जातात.
88-4
वाचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी । म्हणोनि आता तेचि परियेसी । सांगेन तुज ॥88॥
कर्मा – अकर्मा विषयी चांगले चांगले विद्वान दूरदर्शी देखील मूढ बनतात. तर मग मूळचेच अज्ञानी आहे, त्या बिचाऱ्या मूर्खाची काय कथा ? म्हणूनच मी तुला आता तोच विषय सांगतो, तरी त्याचे श्रवण कर.
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥4. 17॥
भावार्थ :-
कर्म, विकर्म, अकर्म (सामान्य, विशेष किंवा विहित, व निषिद्ध कर्म) म्हणजे काय, हे जाणले पाहिजे. कारण कर्माची गती गहन आहे.
89-4
तरी कर्म म्हणजे स्वभावे । जेथ विश्वाकारु संभवे । ते सम्यक आधी जाणावे । लागे एथ ॥89॥
तर ज्याच्या योगाने स्वभावतः (आपोआप) या विश्वाला आकार निर्माण होतो, त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी त्याच कर्माचे प्रारंभी यथार्थ ज्ञान करन घेतले पाहिजे.
90-4
मग वर्णाश्रमासि उचित । जे विशेष कर्म विहित । तेही वोळखावे निश्चित । उपयोगेसी ॥90॥
मग वर्ण व आश्रम यांना जे कर्मविशेष म्हणून सांगितले आहे, त्याची देखील उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-4
पाठी जे निषिद्ध म्हणिपे । तेही बुझावे स्वरूपे । येतुलेनि येथ काही न गुंफे । आपैसेचि ॥91॥
नंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात, त्याचेही यथार्थ स्वरूप समजून घ्यावे. याप्रमाणे कर्माचे स्वरूप जाणून घेतले, म्हणजे माणूस कर्माने बध्द होत नाही.
92-4
एर्हवी जग हे कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परि ते असो आइके चिन्ह । प्राप्ताचे गा ॥92॥
एरवी हे जग कर्माच्या अधीन आहे. असा कर्माचा विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना, ते राहू दे, आता ब्रम्हज्ञानी (कृतकृत्य) पुरुषाची लक्षणे सांगतो, ती ऐक.
कर्मण्य कर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥4. 18॥
भावार्थ :-
जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि जो अकर्मात कर्म पाहतो, तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी व सर्व कर्मे करणारा आहे.
93-4
जो सकळकर्मी वर्तता । देखे आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगे निराशता । फळाचिया ॥93॥
सर्व कर्मे करीत असताना आपण कर्मे करीत नाही, हे जो जाणतो आणि कर्माच्या फळाची अपेक्षा धरत नाही,
94-4
आणि कर्तव्यतेलागी । जया दुसरे नाही जगी । ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी । बोधला असे ॥94॥
आपल्याखेरीज कर्तव्य करण्याला जगात दुसरे काहीचं नाही, अशा नैष्कम्यर्यतेचा खरा बोध ज्याला झालेला असतो,
95-4
परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तरी तो इही चिन्ही जाणावा । ज्ञानिया गा ॥95॥
तरी तो उत्कृष्टपणे कर्माचे आचरण करीत असताना दिसतो, तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे, असे जाणावे.
96-4
जैसा का जळापाशी उभा ठाके । तो जरी आपणपे जळामाजि देखे । तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहे ॥96॥
जसे एखादा मनुष्य जलाशया जवळ उभा राहिलेला असतो, (पाण्यातील आपले स्वतः चे प्रतिबिंब) जरी आपण पाण्यात आहोत; असे पाहत असतो. तरी पण आपण त्या प्रतिबिंबापेक्षा वेगळा आहे (आपण पाण्यात नाही), असे तो निश्चितपणे जाणतो,
97-4
अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जाता देखे वेगे । तेचि साचोकारे जो पाहो लागे । तव रुख म्हणे अचळ ॥97॥
अथवा नावेत बसून मनुष्य जात असतो, त्याला किनाऱ्यावरील झाडे भरभर चालली आहेत,असे दिसते; पण खरी वस्तुस्थिती तो ज्या वेळी पाहतो, त्यावेळी झाडे स्थिर आहेत, असे तो म्हणतो.
98-4
तैसे सर्व कर्मी असणे । ते फुडे मानूनि वायाणे । मग आपणपे जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥98॥
त्याप्रमाणे आपले सर्व कर्मात असणे, हे निश्चितच मिथ्या आहे. (आपले आचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे, हे जाणुन), हे मानून मग आपण कर्मरहित आहोत हे तो जाणतो.
(ब्रम्हज्ञानी पुरुष)
99-4
आणि उदोअस्ताचेनि प्रमाणे । जैसे न चलता सूर्याचे चालणे । तैसे नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मीचि असता ॥99॥
आणि सूर्य उदय व अस्त पावतो, या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो स्थिर आहे, चालत / फिरत नाही.
त्याप्रमाणे कर्म करीत असताना ते (मी कर्म करीत आहे, ही भावना समूळ पणे नष्ट पावणे) कर्म आपण करीत नाही, असे जो जाणतो, तो आपले नैष्कम्यर्य जाणतो.
100-4
तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे । जैसे जळी जळामाजी न बुडे । भानुबिंब ॥100॥
ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले दिसते, पण त्यावरून (सूर्य) बिंब पाण्यात बुडाले असे होत नाही. त्याप्रमाणे वरून तो मनुष्यासारखा दिसतो; परंतु आतून परब्रम्हाशी एकरूप झालेला असतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-4
तेणे न पाहता विश्व देखिले । न करिता सर्व केले । न भोगिता भोगिले । भोग्यजात ॥101॥
त्याप्रमाणे चर्मचक्षुने विश्व पहिले नसले, तरी दिव्य चक्षुने तो सर्व काही पाहत असतो. तो काही न करताही सर्व कर्मे केल्याप्रमाणे आहे आणि भोग्य वस्तूंचा उपभोग न घेतासुद्धा त्याने भोगल्याप्रमाणेच आहेत.
102-4
एकेचि ठायी बैसला । परि सर्वत्र तोचि गेला । हे असो विश्व जाहला । आंगेचि तो ॥102॥
तो एके ठिकाणी तो बसून असला, तरी आतून सर्वत्र संचार करीत असतो. त्याच्याबद्दल आणखीन काय सांगावे ? तो सम्पूर्ण विश्वचैतन्याशी एकरूप झालेला असतो.
यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ॥4. 19॥
भावार्थ :-
ज्याची सर्व कर्मे कर्तृत्व अहंकार रहित आणि फलाच्या इच्छेरहित आहेत आणि ज्ञानरूपी अग्नीने ज्याची कर्मे भस्म झालेली आहेत, अशा पुरुषाला ज्ञानी लोक पंडित असे म्हणतात.
103-4
जया पुरुषाचा ठायी । कर्माचा तरी खेदु नाही । परी फळापेक्षा कही । संचरेना ॥103॥
ज्या पुरुषाच्या मनामध्ये कर्म करण्यासंबधी कोणत्याही प्रकारचा खेद नसतो, अतिशय तत्परतेने तो कर्म करीत असतो; त्यांच्या मनामध्ये फलाची इच्छा चुकून केंव्हाही प्रवेश करीत नाही;
104-4
आणि हे कर्म मी करीन । अथवा आदरिले सिद्धी नेईन । येणे संकल्पेही जयाचे मन । विटाळेना ॥104॥
आणि हे कर्म मी करीन, अथवा आरंभिलेले कर्म सिद्धीस नेईन, ह्या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळले जात नाही,
105-4
ज्ञानाग्निचेनि मुखे । जेणे जाळिली कर्मे अशेखे । तो ब्रह्मचि मनुष्यवेखे । वोळख तू ॥105॥
ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्येक्ष परब्रम्हच आहे, असे तू जाण.
त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः ॥4. 20॥
भावार्थ :-
जो कर्माच्या फळाची इच्छा संपूर्णपणे सोडून देतो आणि ब्रह्मनंदामध्ये नित्य तृप्त असतो, जो कोणत्याही गोष्टीचा आश्रय (निराश्रय) करीत नाही, तो बाह्यतः सर्व कर्मे करीत असला, तरी वस्तुतः काहीचं करत नाही.
106-4
जो शरीरी उदासु । फळभोगी निरासु । नित्यता उल्हासु । होऊनि असे ॥106॥
जो शरीराविषयी उदास असतो, (मनात शरीराबद्दल कसलाही अहंकार नसणे), फळाच्या (उपभोगा विषयी) प्राप्तीविषयी जो निरिच्छ असतो व सत्- चित् – आनंदरूप होऊन राहिलेला असतो,
107-4
जो संतोषाचां गाभारा । आत्मबोधाचिया वोगरा । पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगिता ॥107॥
अर्जुना, जो संतोषाच्या गाभाऱ्यात बसून ब्रम्हरसाचे भोजन करीत असताना ‘ पुरे ‘ असे कधीच म्हणत नाही,
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिशम् ॥4. 21॥
भावार्थ :-
ज्याने आपले शरीर व अंतःकरण वश केलेले आहे व ज्याने सर्व भोगांच्या सामग्रीचा त्याग केलेला आहे, असा तो आशारहित पुरुष केवळ देहस्थितील उपयोगी असे कर्म करीत असला, तरी तो पापाला प्राप्त होत नाही.
यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः ।
सम सिद्धावसिद्धौच कृत्वाऽपि न निबध्यते ॥4. 22॥
भावार्थ :-
सहजपणे जे काही प्राप्त होईल, त्यातच संतुष्ट असणारा, हर्ष, शोक इत्यादी द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला, ईर्ष्यारहित सिद्धी व असिद्धीमध्ये समभाव ठेवणारा पुरुष कर्मे करूनदेखील बंधनात गुंतून राहत नाही.
108-4
कैसा अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी । सांडोनिया आशा कुरोंडी । अहंभावेसी ॥108॥
तो अहंकाराला सुद्धा आशेची ओवाळणी करतो आणि ब्रम्हानंदाची गोडी अधिक प्रमाणात चाखत असतो.
109-4
म्हणोनि अवसरे जे जे पावे । तेणेचि तो सुखावे । जया आपुले आणि परावे । दोन्ही नाही ॥109॥
म्हणून, ज्या वेळेस जे जे प्राप्त होईल, त्यातच तो सुख मानत असतो. त्याच्या मनात हा परका व हा आपला, अशा प्रकारचा कोणताही भेदभाव नसतो.
110-4
तो दिठी जे पाहे । ते आपणचि होऊनि जाये । आइके ते आहे । तोचि जाहाला ॥110॥
तो डोळ्यांनी जे जे पाहतो, ते दृश्य आपण स्वतः होऊन जातो. आणि तो जे ऐकतो तेच तो झालेला असतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-4
चरणी हन चाले । मुखे जे जे बोले । ऐसे चेष्टाजात तेतुले । आपणचि जो ॥111॥
तो पायांनी चालत असतो, तोंडाने बोलत असतो आणि शरीराने जे जे कर्म करीत असतो, ते सर्व आपणच बनतो.
112-4
हे असो विश्व पाही । जयासि आपणपेवाचूनि नाही । आता कवण ते कर्म कायी । बाधी तयाते ॥112॥
हे असो; संपूर्ण विश्व ज्याला आपल्या स्वरूपावाचून वेगळे दिसत नाही, (विश्व आपल्याहून वेगळे दिसत नाही) आता त्याला कर्म ते कसले व ते त्याला बाधा काय करणार ? ?
113-4
हा मत्सरु जेथ उपजे । तेतुले नुरेचि जया दुजे । तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ॥113॥
मी आणि विश्व वेगळे मानले, तर द्वैत निर्माण होतो आणि मत्सर प्रकट होतो. ज्याच्या हृदयात द्वैतच नाही, तो पुरुष निर्मत्सर आहे, असे शब्दाने बोलून दाखवण्याची आवश्यकता आहे काय ? ? (अर्थातच नाही)
114-4
म्हणोनि सर्वापरी मुक्तु । तो सकर्मुचि तो कर्मरहितु । सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाही ॥114॥
म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे; कर्म करीत असताहि कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनहि गुणातीत आहे; ह्यात शंका (संशय) नाही.
{ बाह्यतः कर्म करीत असला, तरी आतून कर्मरहित असणे. देहाने सगुण असला, तरी ब्रम्हरूपाने गुणातीत असणे,}
गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित्चेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥4. 23॥
भावार्थ :-
ज्याची कर्मफलाविषयी आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो मुक्त झाला आहे, ज्याचे चित्त ब्रह्मज्ञानात स्थिर झाले आहे, जो यज्ञाकरिता कर्म करणारा आहे, त्याचे ते सर्व कर्म (त्याच्याच ठिकाणी फलासह) लय पावते.
115-4
तो देहसंगे तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे । पाहता परब्रह्माचेनि कसे । चोखाळु भला ॥115॥
तो देहधारी असला, तरी (निर्गुण) चैतन्यरूप दिसतो. परब्रह्मच्या कसोटीने त्याला जाणून घेतले असता, तो अगदी शुद्ध दिसतो. (शुद्ध आहे असे आढळून येते. )
116-4
ऐसाही परी कौतुके । जरी कर्मे करी यज्ञादिके । तरी तिये लया जाती अशेखे । तयाचाचि ठायी ॥116॥
असे असूनही त्याने जर कौतुकाने कर्मे केली, तिरीपण ती कर्म त्याच्या ब्रम्हस्वरूपामध्ये लीन होऊन जातात.
117-4
अकाळीची अभ्रे जैसी । उर्मीविण आकाशी । हारपती आपैशी । उदयली सांती ॥117॥
आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता (वृष्टी), आले, तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात;
118-4
तैशी विधीविधान विहिते जरी आचरे तो समस्ते । तरी तिये ऐक्यभावे ऐक्याते । पावतीचि गा ॥118॥
त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानांचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो, तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात. (त्याच्या ठिकाणी दुजाभाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी लय पावतात. )
ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥4. 24॥
भावार्थ :-
होमाची सर्व प्रकारची साधना, होम द्रव्य, अग्नी आणि हवनक्रिया ही त्या ब्रम्ह जाणाऱ्या पुरुषाच्या दृष्टीने ब्रम्हच आहेत. सर्व कर्माच्या ठिकाणी ज्याची दृष्टी ब्रम्हस्वरूप झाली आहे, त्या ज्ञानाकडून प्राप्त करून घ्यावयाचे फलही ब्रम्हच आहे.
119-4
जे हे हवन मी होता । का इये यज्ञी हा भोक्ता । ऐसीया बुद्धीसि नाही भंगता । म्हणऊनिया ॥119॥
ही हवनक्रिया आहे, मी हवन करणारा आहे, तसेच या यज्ञामध्ये ईश्वर हा भोक्ता आहे, अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा भेद ब्रम्हज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी नसतो. म्हणून
120-4
जे इष्टयज्ञ यजावे । ते हविर्मंत्रादि आघवे । तो देखतसे अविनाशभावे । आत्मबुद्धि ॥120॥
जे जे इष्ट यज्ञ तो करतो, त्यातील होमद्रवे व मंत्र इत्यादी सर्व ब्रम्हस्वरूप आहेत, असे जो समजतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-4
म्हणऊनि ब्रह्म तेचि कर्म । ऐसे बोधा आले जया सम । तया कर्तव्य ते नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥121॥
म्हणून ब्रम्ह तेच कर्म, अशी समत्वबुद्धी ज्याच्या अंतःकरणात स्थिर झाली, त्याने कर्म केले, तरी नैष्कर्म्य होय.
122-4
आता अविवेककुमारत्वा मुकले । जया विरक्तीचे पाणिग्रहण जाहले । मग उपासन जिही आणिले । योगाग्नीचे ॥122॥
ज्याचे अविवेकरूपी बालपण संपून गेले आणि विवेकरूपी तारुण्याचे वैभव ज्याला प्राप्त झाले, ज्याचे विरक्तिरूपी वधुशी लग्न झाले आणि ज्याने योगरूप अग्नीची उपासना सुरु केली.
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥4. 25॥
भावार्थ :-
अन्य योगी लोक भगवत-अर्पणरूपी यज्ञानेच अनुष्ठान करतात आणि कित्येक योगी लोक ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणी यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात.
संदर्भित अन्वयार्थ
अपरे = दुसरे, योगिनः = योगी लोक, दैवम् = देवतांचे पूजनरूपी, यज्ञम् एव = यज्ञाचेच, पर्युपासते = चांगल्याप्रकारे अनुष्ठान करीत राहतात, अपरे = दुसरे (योगी लोक), ब्रह्माग्नौ = परब्रह्म परमात्मरूप अग्नीमध्ये, यज्ञेन एव = (अभेद दर्शनरूपी) यज्ञाच्या द्वारेच, यज्ञम् = आत्मरूप यज्ञाचे, उपजुह्वति = हवन करतात ॥४-२५॥
दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात. तर इतर योगी परब्रह्म परमात्मारूपी अग्नीत अभेददर्शनरूप यज्ञाच्या द्वारेच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात. ॥४-२५॥
123-4
जे यजनशील अहर्निशी । जिही अविद्या हविली मनेसी । गुरुवाक्यहुताशी । हवन केले ॥123॥
ते रात्रंदिवस ज्ञानयज्ञ करणारे आत्मज्ञानी लोक आहेत आणि त्यांनी गुरुबोधरूपी अग्नीत मनासह अज्ञानाचे हवन केले आहे.
124-4
तिही योगाग्निकी यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे । जेणे आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥124॥
अशाप्रकारे योगरूप अग्निमध्ये जे हवन करतात, त्याला ” दैवयज्ञ ” असे म्हणतात. हे अर्जुना ! त्या दैवयज्ञाने आत्मसुख प्राप्त होते.
125-4
दैवास्तव देहाचे पाळण । ऐसा निश्चयो परिपूर्ण । जो चिंतीना देहभरण । तो महायोगी जाण दैवयोगे ॥125॥
देहाचे पालन हे प्रारब्धाप्रमाणे होत असते, असा ज्याचा दृढनिश्चय असतो, तो देहाच्या पोषणकरता मनात चिंता करत नाही. तो दैवयोगाने महायोगी आहे, असे तू जाण.
126-4
आता अवधारी सांगेन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक । तयाते यज्ञेचि यज्ञु देख । उपासिजे ॥126॥
दुसरा प्रकार आता तुला सांगतो, ऐक. जे ब्राम्हरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत, ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात. (स्वकर्माने ईश्वराची आराधना करतात
श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन् विषयानन्य । इंद्रियाग्निषु जुह्वति ॥4. 26॥
भावार्थ :-
काही योगी श्रोत्र आदि करून ज्ञानेंद्रियांचा संयमरूप अग्निमध्ये होम करतात, म्हणजे ज्ञानेंद्रियांचा निरोध करतात. काही योगी शब्दादी पंचविषयांचे हवन इंद्रियरूपी अग्नीत करतात.
127-4
एथ संयमाग्निहोत्री । जे युक्तित्रयांच्या मंत्री । यजन करिती पवित्री । इंद्रियद्रव्यी ॥127॥
धारणा, ध्यान, समाधीरूप संयम हे अग्निहोत्र, त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक तीन बंधरुपी मंत्राच्या द्वारे इंद्रिरूपी पवित्र अशा द्रव्यांनी यज्ञ करतात.
128-4
एका वैराग्यरवि विवळे । तव संयती विहार केले । तेथ अपावृत्त जाहले । इंद्रियानळ ॥128॥
दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवल्यावर संयमरुपी कुंडाची रचना करतात. मग त्या कुंडामध्ये इंद्रिरूपी अग्नी प्रकट होतो.
129-4
तिही विरक्तीची ज्वाळा घेतली । तव विकारांची इंधने पळिपली । तेथ आशाधूमे सांडिली । पांचही कुंडे ॥129॥
त्या इंद्रिय- अग्नीने विरक्तीच्या ज्वाला जेंव्हा वाढतात, त्यावेळी कामक्रोधाधी लाकडे पेटू लागतात. त्या वेळी कामक्रोधाधी लाकडे पेटू लागतात. त्या इंद्रिय – अग्नीच्या पाच कुंडातून आशारूपी धूर निघून गेलेला असतो.
130-4
मग वाक्यविधीचिया निरवडी । विषयआहुति उदंडी । हवन केले कुंडी । इंद्रियाग्नीचा ॥130॥
मग वेदांत सांगितलेल्या विधीच्या पद्धतीने इंद्रियरुप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप आहुती देऊन ते यज्ञ करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥4. 27॥
भावार्थ :-
दुसरे कोणी ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या मनोनिग्रहरूपी अग्निमध्ये सर्व इंद्रियांची आणि प्राणांची कर्मे हवन करतात म्हणजे इश्वराशिवाय कशाचेही चिंतन करत नाहीत.
131-4
एकी ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा । आणिकी हृदयारणी मंथा । विवेकु केला ॥131॥
हे अर्जुना ! अनेक साधकांनी विविध प्रकारचे यज्ञ करून आपल्या चित्तातील दोष नाहीसे केले आहेत. दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात.
132-4
तो उपशमे निहटिला । धैर्ये वरी दाटिला । गुरुवाक्ये काढिला । बळकटपणे ॥132॥
तो धैर्यरूपी भाराने दाबून शांतिरुप रज्जूने घसळून गुरुवाक्यरूपी मंत्राने त्याचे मंथन करतात.
133-4
ऐसे समरसे मंथन केले । तेथ झडकरी काजा आले । जे उज्जीवन जहाले । ज्ञानाग्नीचे ॥133॥
समरसतेने मंथन केले असता त्याचा त्वरित उपयोग होतो आणि ज्ञानाग्नि प्रकट होतो.
134-4
पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु । मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ॥134॥
त्यावेळी रिद्धी- सिद्धीचा मोह हाच उत्पन्न झालेला धूर नाहीसा होऊन जातो. मग सूक्ष्म अशी अग्नीची ठिणगी उत्पन्न होते.
135-4
मन तयाचे मोकळे । तेचि पेटवण घातले । जे यमदमी हळुवारले । आइते होते ॥135॥
यम नियमांच्या अभ्यासाने वाळून हलके असे झालेले मन, हे त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटवन घालतात.
136-4
तेणे सादुकपणे ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा । स्नेहेसी नानाविधा । जाळिलिया ॥136॥
त्याच्या आधारे ज्वाला प्रज्वलित होतात. मग त्यामध्ये विविध प्रकारच्या वासनारूप समिधा मोहरूपी तुपासह जळतात.
137-4
तेथ सोहंमंत्रे दीक्षिती । इंद्रियकर्माचिया आहुती । तिये ज्ञानानळी प्रदीप्ती । दिधलिया ॥137॥
यज्ञ करणारा पुरुष मी ब्रम्हरूप आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रियकर्माच्या आहुती देतो.
138-4
पाठी प्राणक्रिचेनि स्रुवेनिशी । पूर्णाहुती पडली हुताशी । तेथ अवभृत समरसी । सहजे जाहले ॥138॥
प्राणाच्या श्वासादी क्रियारूपी स्रुवापात्रासह ज्ञानाग्नित पूर्णाहुती पडली असता सहजपणे निर्बीज अशा समाधीच्या ऐक्यामध्ये त्या यज्ञकर्त्या पुरुषाचे अवभूत स्नान झालेले असते.
139-4
मग आत्मबोधीचे सुख । जे संयमाग्नीचे हुतशेष । तोचि पुरोडाशु देख । घेतला तिही ॥139॥
संयम अग्निमध्ये होमद्रव्याचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख, तोच पुरोडाश मग ते सेवन करतात.
140-4
एक ऐशिया इही यजनी । मुक्त ते जाहले त्रिभुवनी । या यज्ञक्रिया तरी आनानी । परि प्राप्य ते एक ॥140॥
अशा प्रकारचा यज्ञ करून अनेक लोक या त्रिभुवनात मुक्त झाले आहेत. या पुरुषांच्या यज्ञक्रिया जरी भिन्न-भिन्न असल्या; तरीपण त्या सर्वाचे प्राप्तव्य एकच आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥4. 28॥
भावार्थ :-
त्याचप्रमाणे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योग्यज्ञ, वाग्ययज्ञ, व ज्ञानयज्ञ असे पाच प्रकारचे यज्ञ आहेत. तीक्ष्ण व्रते आचरण करणारे यतीच हे यज्ञ करतात.
141-4
एक द्रव्ययज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रिया निपजती । एक योगयागुही आहाती । जे सांगितले ॥141॥
त्यापैकी एकाला द्रव्ययज्ञ, एकाला तापोयज्ञ तर अष्टांग साधनेने साधलेल्या यज्ञाला योगयज्ञ असे म्हणतात.
142-4
एकी शब्दी शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे । ज्ञाने ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ॥142॥
ज्यामध्ये शब्दाने शब्दांचा होम केला जातो, अर्थात विधीप्रमाणे वेदांचे अध्ययन केले जाते, त्याला वाग्यज्ञ म्हणतात आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रम्हाशी एकरूपता प्राप्त होते, त्याला ज्ञानयज्ञ असे म्हणतात.
143-4
हे अर्जुना सकळ कुवाडे । जे अनुष्ठिता अतिसांकडे । परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशे ॥143॥
हे अर्जुना ! हे सर्व यज्ञ करणे अतिशय कठीण आहे; कारण यांचे अनुष्ठान करणे अतिशय अवघड आहे. परंतु ज्यांनी आपली इंद्रिय जिंकली आहेत, त्यांना मात्र ते करण्याची योग्यता प्राप्त होते आणि त्याचे आचरण घडते.
144-4
ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धी आथिले । म्हणोनि आपणपा तिही केले । आत्महवन ॥144॥
ते यज्ञंकर्मामध्ये प्रवीण असतात आणि साधनसमृद्धीने संपन्न असतात; म्हणून त्यांनी आपल्या जीवाचे आत्म्याच्या ठिकाणी हवन केलेले असते.
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपाऽनं तथापरे ।
प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥4. 29॥
भावार्थ :-
कोणी अपानवायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात, यास पूरक म्हणतात. कोणी प्राणवायूच्या ठिकाणी अपानवायूचे हवन करतात, यास रेचक म्हणतात. काही प्राणायामामध्ये तत्पर असणारे प्राणवायू आणि अपानवायू या दोन्हीचा विरोध करतात, म्हणजे कुंभक करतात.
145-4
मग अपाग्नीचा मुखी । प्राणद्रव्ये देखी । हवन केले एकी । अभ्यासयोगे ॥145॥
कित्येक योगी अभ्यासाने अपानवायुरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात, म्हणजे पूरक नावाचा प्राणायाम करतात.
146-4
एकु अपानु प्राणी अर्पिती । एक दोहीतेही निरुंधिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ॥146॥
हे अर्जुना ! काही साधक प्राणवायूच्या ठिकाणी शरीरात असलेल्या अपानवायूला बाहेर सोडून हवन करतात. याला रेचक म्हणतात. कित्येक योगी प्राण आणि अपान या दोघाच्याही गतीचा निरोध करतात. त्यांना प्राणायामी म्हणतात.
अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति ।
सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥4. 30॥
भावार्थ :-
दुसरे काही योगी आहाराचे नियमन करतात आणि प्राणाचा प्राणवायूत होम करतात. हे सर्वही यज्ञ जाणणारे योगी यज्ञाने पापाचा नाश करून टाकतात.
147-4
एक वज्रयोगक्रमे । सर्वाहारसंयमे । प्राणी प्राणु संभ्रमे । हवन करिती ॥147॥
कित्येक योगी वज्रसनाच्या मुळंबंधाच्या पद्धतीचे सर्व आहाराचे संयमन करून, प्रयत्नाने प्राणांचे प्राणाच्या ठिकाणी हवन करतात.
148-4
ऐसे मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ । ही यज्ञद्वारा मनोमळ । क्षाळण केले ॥148॥
याप्रमाणे हे सर्व यज्ञ करणारे मोक्षाची इच्छा करतात. यज्ञ करणे, हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी यज्ञाच्या आधारे मनातील सर्व प्रकारचे दोष घालविले असतात.
149-4
जया अविद्याजात जाळिता । जे उरले निजस्वभावता । जेथ अग्नि आणि होता । उरेचिना ॥149॥
त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे स्वाभाविकपणेच मूळचे शुद्ध स्वरूप शिल्लक राहते तेथे अग्नी व यज्ञकर्ता हा कोणत्याही प्रकारचा द्वैतभाव शिल्लक राहत नाही.
150-4
जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचे विधान सरे । मागुते जेथूनि वोसरे । क्रियाजात ॥150॥
ज्या ठिकाणी यज्ञ करांनाऱ्याची इच्छा पूर्ण होते आणि यज्ञाक्रिया संपून जातात आणि जेथून क्रिया या मागे परतून ओसरून (नाहीशा होतात) जातात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
151-4
विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे । जे द्वैतदोषसंगे । सिंपेचिना ॥151॥
ज्या ठिकाणी कोणत्याही विचारांचा प्रवेश होत नाही, कोणत्याही इच्छेचा प्रवेश होत नाही, जे द्वैत दोषाच्या संगतीने कधीही लिप्त होत नाही,
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥4. 31॥
भावार्थ :-
यज्ञाचा परिणाम ज्ञानरूपी अमृत, त्याचे सेवन करणारे योगीजन सनातन परब्रम्हाला प्राप्त होतात. जो कोणाचाच यज्ञ करत नाही त्याला ऐहिक सुख मिळत नाही, मग त्याचा परलोक सुखदायक कसा होणार ? ?
152-4
ऐसे अनादिसिद्ध चोखट । जे ज्ञान यज्ञावशिष्ट । ते सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रे ॥152॥
असे जे अनदीसिद्ध, परिशुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञामध्ये शिल्लक राहीलेले ब्रम्ह असते, त्या ब्रम्हाचे ब्राम्हनिष्ठ लोक हे ‘अहं ब्रमास्मि ‘ मी ब्रम्ह आहे, या मंत्राचे सेवन करतात म्हणजे ब्राम्हशी एकरूप होतात.
153-4
ऐसे शेषामृते धाले । की अमर्त्यभावा आले । म्हणोनि ब्रह्म ते जहाले । अनायासे ॥153॥
याप्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरुप अमृत प्राशन करून जे तृप्त होऊन अमर होतात, ते सहजच ब्राम्हत्व पावतात.
154-4
येरा विरक्ति माळ न घालीचि । जया संयमाग्नीची सेवा न घडेचि । जे योगयागु न करितीचि । जन्मले सांते ॥154॥
जन्माला येऊन ज्यांना संयमरुपी अग्नीची उपासना घडत नाही आणि जे योग-यज्ञही करत नाहीत, त्या लोकांना विरक्ती माळ घालत नाही.
155-4
जया ऐहिक धड नाही । तयांचे परत्र पुससी काई । म्हणोनि सांगो का वाई । पंडुकुमरा ॥155॥
हे अर्जुना ! ज्यांचे इहलोकामध्ये आचार, विचार, उच्चार सात्विक नाहीत, त्यांना परलोक मिळेल काय ? म्हणून त्यांच्या विषयी बोलणे नको.
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान् विद्धि तान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे ॥4. 32॥
भावार्थ :-
असे विविध प्रकारचे यज्ञ वेदवाणीतून विस्तार पावले आहेत. ते सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत, असे तू जाण. असे जाणल्याने निष्काम कार्मयोगाच्या द्वारे तू संसारबंधनातून मुक्त होशील.
156-4
ऐसे बहुती परी अनेग । जे सांगितले तुज का याग । ते विस्तारुनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥156॥
अशा प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले, त्यांच्याबद्दल वेदांत उत्तम तऱ्हेने वर्णन केलेले आहे.
457-4
परि तेणे विस्तारे काय करावे । हेचि कर्मसिद्ध जाणावे । येतुलेनि कर्मबंधु स्वभावे । पावेल ना ॥157॥
परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे ? ते सर्व यज्ञ शरीर, मन व इंद्रिय यांच्या क्रियांनी उत्पन्न होतात. ते सर्व यज्ञ फलाच्या इच्छेने केल्यास बंधन प्राप्त होते. ते सूत्र जाणले, की कर्मबंधन प्राप्त होणार नाही.
श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञान् ज्ञानयज्ञः परंतप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥4. 33॥
भावार्थ :-
हे अर्जुना, सर्व प्रकारच्या द्रव्यसाधनांनी साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ” ज्ञानयज्ञ ” हा श्रेष्ठ आहे. सर्व प्रकारची कर्मे शेवटी ज्ञानामध्येच समाप्त होत असतात.
158-4
अर्जुना वेदु जयांचे मूळ । जे क्रियाविशेषे स्थूळ । जया नव्हाळियेचे फळ । स्वर्गसुख ॥158॥
हे अर्जुना, ज्याचा मूळ आधार वेद आहे आणि ज्यामध्ये अनेक कर्मे सांगितली आहेत, तसेच ज्यापासून केवळ स्वर्गसुखाचे फळ प्राप्त होते,
159-4
ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैशी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशी ॥159॥
ते द्रव्यादी यज्ञ आहे, परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेज लोपले जाते, त्याप्रमाणे सर्व यज्ञ ज्ञानयज्ञाची बरोबरी करू शकत नाहीत.
160-4
देखे परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन । जे न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्री ॥160॥
परमात्म – सुखाचा ठेवा प्राप्त करण्यासाठी साधक हे बुद्धीच्या डोळ्यामध्ये जे अंजन घालण्यास कधीही विसरत नाहीत,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-4
जे धावतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यबोधाची खाणी । जे भुकेलिया धणी । साधनाची ॥161॥
ते ज्ञान चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे. जे कर्मातीत बोधाची खाण आहे आणि आत्मज्ञानाची भूक लागलेल्या साधकांच्या तृप्तीचे स्थान आहे.
162-4
जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली । जेणे इंद्रिये विसरली । इंद्रियसंगु ॥162॥
ज्याच्या ठीकाणी प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी नाहीशी होते, ज्याच्या योगाने सर्व इंद्रिय विषयसंग विसरून जातात,
163-4
मनाचे मनपण गेले । जेथ बोलाचे बोलपण ठेले । जयामाजि सांपडले । ज्ञेय दिसे ॥163॥
ज्या ठिकाणी मनाचे मनपन संपून जाते, शब्दाची धाव थांबली जाते, ज्यामध्ये जाणवयाची वस्तू ब्रम्ह, हे प्रत्येक्ष अनुभवास येते,
164-4
जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे । जेथ न पाहता सहज भेटे । आपणपे ॥164॥
जेथे वैराग्याचे दारिद्र संपून जाते, विवेकाची हाव बंद पडते आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता सहजपणे ब्रह्मची अनुभूती येते,
तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ॥4. 34॥
भावार्थ :-
साष्टांग नमस्कार करून, मनोभावे त्यांची सेवा करून, निष्कपट भावनेने त्यांना प्रश्न विचारून ते ज्ञान तू समजून घे. ते तत्व जाणणारे ज्ञानी पुरुष तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील.
165-4
ते ज्ञान पै गा बरवे । जरी मनी आथि आणावे । तरी संता या भजावे । सर्वस्वेशी ॥165॥
ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावे असे मनात असेल, तर संतांना सर्वभावाने भजावे.
166-4
जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा । तू स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥166॥
हे संत म्हणजे ज्ञानाचे घर आहे आणि सेवा हा त्यांच्या घराचा उंबरठा आहे. हे अर्जुना ! संतांची मनोभावे सेवा करून त्यांना आपलेसे कर.
167-4
तरी तनुमनुजीवे । चरणासी लागावे । आणि अगर्वता करावे । दास्य सकळ ॥167॥
शरीराने, मनाने आणि जीवाने त्यांच्या चरणी लागावे. सर्व प्रकारचा अभिमान सोडून त्यांचे दास्य करावे.
168-4
मग अपेक्षित जे आपुले । तेही सांगती पुसिले । जेणे अंतःकरण बोधले । संकल्पा न ये ॥168॥
ज्या आत्मज्ञानासंबंधी आपणास अपेक्षा असते, त्यासंबंधी आपण प्रश्न केला, तर त्याचे उत्तर संत सांगतात, ते ज्ञान आपल्या अंतःकरणात बिंबले जाते आणि मनात संकल्प निर्माण होत नाहीत.
यज् ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥4. 35॥
भावार्थ :-
हे पांडुपुत्रा ! ते ज्ञान प्राप्त झाले म्हणजे तुला पुनः भेदरूपी मोह होणार नाही. मी आत्मस्वरूप असून माझ्या ठिकाणी सर्व भूतमात्र आहेत, असे तू या ज्ञानाने जाणशील.
169-4
जयाचेनि वाक्यउजिवडे । जाहले चित्त निधडे । ब्रह्माचेनि पाडे । निःशंकु होय ॥169॥
संतांच्या उपदेशरूपी उजेडाने निर्भय झालेले चित्त ब्रम्हाप्रमाणे शंकारहीत होईल.
170-4
ते वेळी आपणपेया सहिते । इये अशेषेही भूते । माझा स्वरूपी अखंडिते । देखसी तू ॥170॥
त्यावेळी तू आपल्यासह ही सर्व भुते माझ्या स्वरूपात निरंतर पाहशील.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-4
ऐसे ज्ञानप्रकाशे पाहेल । तै मोहांधकारू जाईल । जै गुरुकृपा होईल । पार्था गा ॥171॥
हे पार्था ! अशाप्रकारे सद्गुरूंची कृपा होईल, त्यावेळी तुझ्या अंतःकरणात ज्ञानप्रकाश उदयाला येईल आणि मोहरूप अंधकार नाहीसा होईल.
अपि चेदसी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥4. 36॥
भावार्थ :-
तू सर्व पापी लोकांच्या पेक्षाही अधिक पापी असलास, तरी ज्ञानरूपी नौकेच्या आधाराने पापरूपी सागरातून अनायासे तरुण जाशील.
172-4
जरी कल्मषांचा आगरु । तू भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । होऊनि अससी ॥172॥
तू पातकांचे आगर (खाण), भ्रमाचा सागर किंवा संशयाचा मोठा डोंगर जरी असलास,
173-4
तरी ज्ञानशक्तीचेनि पाडे । हे आघवेची गा थोकडे । ऐसे सामर्थ्य असे चोखडे । ज्ञानी इये ॥173॥
तरी ज्ञानशक्तीच्या पुढे हे सर्व लहान आहे, इतके या ज्ञानामध्ये सर्व दोषांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे.
174-4
देखे विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कवडसा । तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ॥174॥
निराकार परब्रम्हाची पडछाया म्हणून असणारा हा जो विश्वाचा पसारा, तो ज्ञानाच्या प्रकाशाला पुरेसा पडत नाही. म्हणजे ज्ञान झाले असता संपूर्ण विश्वभ्रम नाहीसा होऊन जातो.
175-4
तया कायसे हे मनोमळ । हे बोलताचि अति किडाळ । नाही येणे पाडे हे ढिसाळ । दुजे जगी ॥175॥
त्या दिव्य ज्ञानाच्या पुढे मनातील दोष घालविणे म्हणजे काय आहे ? पण अशी तुलना करणेही योग्य नाही. कारण, या जगात याच्यासारखे महान असे दुसरे काही नाही.
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ॥4. 37॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी लाकडांना भस्मसात् करतो, त्याप्रमाणे परमात्मज्ञानस्वरूप दिव्य अग्नी हा सर्व प्रकारचे कर्मबंध जाळून टाकतो.
176-4
सांगे भुवनत्रयाची काजळी । जे गगनामाजि उधवली । तिये प्रळयीचे वाहुटळी । काय अभ्र पुरे ॥176॥
प्रलकाळची वावटळ ही त्रैलोक्याची राख आकाशात उडवून देणारी असते. तिच्यापुढे अभ्र काय बरे टिकणार, तूच सांग ?
177-4
की पवनाचेनि कोपे । पाणियेचि जो पळिपे । तो प्रळयानळु दडपे । तृणे काष्ठे काइ ॥177॥
अथवा वाऱ्याच्या क्षोभाने जो प्रलयकाळचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो (पाणीसुद्धा जाळू टाकतो) तो अग्नी, गवत आणि काष्ठे यांनी दडपला जाईल काय ?
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥4. 38॥
भावार्थ :-
या जगामध्ये परमात्मज्ञानानासारखे पवित्र दुसरे काही नाही. ते ज्ञान कर्मयोगी योग्य काळाने स्वतःच्या ठिकाणी स्वतःच मिळवितो.
178-4
म्हणोनि असे हे न घडे । ते विचारिताचि असंगडे । पुढती ज्ञानाचेनि पाडे । पवित्र न दिसे ॥178॥
असो, हे बोलणे पुरे ! ज्ञानाने दोष नाहीसे होतात अथवा नाहीसे होत नाहीत, हा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्ञानाचा जो जो विचार करावा, तो तो असे दिसून येते की, ज्ञानाच्या योग्यतेची परमपवित्र वस्तू दुसरी कोणतीही नाही.
179-4
एथ ज्ञान हे उत्तम होये । आणिकही एक तैसे के आहे । जैसे चैतन्य का नोहे । दुसरे गा ॥179॥
या जगात ज्ञान हे उत्तम आहे, अरे, ज्याप्रमाणे दुसरे चैत्यन्य नाही, त्याप्रमाणे (ज्ञानाशिवय जगात) उत्तम दुसरे कोठे आहे ?
180-4
या महातेजाचेनि कसे । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे । का गिंवसिले गिंवसे । आकाश हे ॥180॥
सूर्याच्या कसोटीला लावून पाहता, त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे दिसून येईल किंवा आकाशाला आपल्या कवळ्यात कवटाळता येऊ शकेल;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-4
ना तरी पृथ्वीचेनि पाडे । कांटाळे जरी जोडे । तरी उपमा ज्ञानी घडे । पंडुकुमरा ॥181॥
अथवा, योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही मिळेल. तरच अर्जुना, ज्ञानाला उपमा सापडेल.
182-4
म्हणूनी बहुती परी पाहता । पुढतपुढती निर्धारिता । हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानीचि आथि ॥182॥
म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला असता ज्ञानाची पवित्रता ही ज्ञानाच्या ठिकाणीच आहे, हे सिद्ध होते.
183-4
जरी अमृताचि चवी निवडिजे । तरी अमृतासारखी म्हणिजे । तैसे ज्ञान हे उपमिजे । ज्ञानेसीचि ॥183॥
अमृताची चव ही इतर रसाहून निवडून पहिली असता ती अमृतासारखीच आहे, असे म्हणावे लागते, त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानानीच उपमा देणे भाग पडते.
184-4
आता यावरि जे बोलणे । ते वाया वेळु फेडणे । तव साचचि जी हे पार्थु म्हणे । जे बोलत असा ॥184॥
आता यापेक्षा ज्ञानाचे अधिक महत्व सांगणे म्हणजे व्यर्थ वेळ घालविणे होय, यावर अर्जुन म्हणाला महाराज (हे कृष्ण), आपण जे बोलत आहात ते खरेच आहे;
185-4
परि तेचि ज्ञान केवी जाणावे । ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे । जाणितले ॥185॥
पण तेच ज्ञान कसे जाणून घ्यावे ? असे अर्जुन विचारणार होता आणि त्याचे मनोगत देवाने जाणले.
186-4
मग म्हणतसे किरीटी । आता चित्त देयी गोठी । सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपाय तुज ॥186॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आता मी सांगतो त्यागोष्टीकडे चित्त दे. ज्ञानप्राप्तीचा उपाय मी तुला आता सांगणार आहे.
श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परा शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥4. 39॥
भावार्थ :-
श्रद्धावान इंद्रिय जिंकलेल्या, ज्ञानसाधनात तत्पर असलेल्या पुरुषाला ज्ञान प्राप्त होते आणि त्या वेळी त्याला भगवत-प्राप्तीरूप परम शांती लाभते.
187-4
तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो का सकळ विषया । जया ठायी इंद्रिया । मानु नाही ॥187॥
एकदा का आत्मसुखाची अमृतधुर गोडी निर्माण झाली, की मन सर्व इंद्रिया संबंधीविटून जाते आणि इंदर्यांचे महत्व राहत नाही.
188-4
जो मनाचि चाड न सांगे । जो प्रकृतीचे केले नेघे । जो श्रद्धेचेनि संभोगे । सुखिया जाहला ॥188॥
जो मनातील इच्छा इंद्रियांना सांगत नाही, प्रकृतीने केलेल्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, ज्याचे हृदय श्रद्धेने भरून गेलेले असते, तो सुखी झालेला असतो.
189-4
तयातेचि गिंवसित । हेहे ज्ञान पावे निश्चित । जयामाजि अचुंबित । शांति असे ॥189॥
ज्या ज्ञानात अखंड शांती असते, ते ज्ञान त्याला शोधीत येऊन निश्चित प्राप्ती होत असते.
190-4
ते हृदयी प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे । मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ॥190॥
ते ज्ञान हृदयात स्थिर होते आणि त्यापासून शांतीचा अंकुर उमलू लागतो. मग आत्मज्ञानाची वेल मोठया प्रमाणात प्रगट होऊ लागते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-4
मग जेऊति वास पाहिजे । तेऊति शांतीचि देखिजे । तेथ अपारा पारु नेणिजे । निर्धारिता ॥191॥
मग जिकडे पाहावे तिकडे परमशांतीच दिसू लागते, आप-पर भाव संपून जातो आणि विचारकरून देखील शांतीची पैलतीरे समजू शकत नाहीत.
192-4
ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु । सांगता असे अपारु । परि असो आता ॥192॥
असा हा उत्तरोत्तर वाढत राहणारा ज्ञानबीजाचा विस्तार आहे. त्याचे वर्णन करू लागलो, तर तो अपार आहे. परंतु हे सांगणे आता पुरे.
अज्ञाश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥4. 40॥
भावार्थ :-
आत्मज्ञान प्राप्त न झालेला अज्ञानी, श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य नाश पावतो. त्याला इहलोक साधत नाही आणि परलोकही मिळत नाही, तसेच, त्याला आत्मसुखाची प्राप्तीही लाभत नाही.
193 -4
ऐके जया प्राणियाचा ठायी । इया ज्ञानाची आवडी नाही । तयाचे जियाले म्हणो काई । वरी मरण चांग ॥193॥
हे बघ, ज्यप्राण्याच्या अंतःकरणात अध्यात्माची आवड नाही, त्याच्या जिवंत राहण्यात तरी काय अर्थ आहे ? (त्याच्या जगण्याला काय म्हणावे) ?, त्यापेक्षा मरण बरे.
194-4
शून्य जैसे गृह । का चैतन्येवीण देह । तैसे जीवित ते संमोह । ज्ञानहीना ॥194॥
एखादे सामसूम घर किंवा प्राणावाचून जसे शरीर, त्याप्रमाणे आत्मज्ञान नसलेल्या माणसाचे जीवन भ्रममय असते.
195-4
अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी वाहे । तरी तेथ जिव्हाळा काही आहे । प्राप्तीचा पै ॥195॥
आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नसली, तरीपण त्या ज्ञानाची मनात इच्छा निर्माण झाली, तरी ते ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते.
196-4
वाचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परी ते आस्थाही न धरी मानसी । तरी तो संशयरूप हुताशी । पडिला जाण ॥196॥
उलट ज्ञानाची गोष्ट कशाला करायची ? जो मनुष्य आत्मज्ञानाची इच्छादेखील बाळगत नाही, तो संशयरुपी अग्नी मध्ये पडला, असे समज.
197-4
जे अमृतही परि नावडे । ऐसे सावियाचि आरोचकु जै पडे । तै मरण आले आले असे फुडे । जाणो ये की ॥197॥
एखाद्या रोग्याला अमृतही आवडत नाही, अशी अवस्था ज्यावेळी निर्माण होते, त्यावेळी त्याला निश्चित मरण आले आहे, असे समजावे.
198-4
तैसा विषयसुखे रंजे । जो ज्ञानसीचि माजे । तो संशये अंगीकारिजे । एथ भ्रांति नाही ॥198॥
त्याप्रमाणे जो विषयसुखात रंगून गेलेला असतो, ऐहिक ज्ञानाने जो उन्मत्त असतो, तो संशयाच्या चक्रात सापडला जातो, यात शंका नाही.
199-4
मग संशयी जरी पडला । तरी निभ्रांत जरी नासला । ति ऐहिकपरत्रा मुकला । सुखासी गा ॥199॥
अशा प्रकारे जो संशयाच्या चक्रात गुंतून गेला, त्याच्या जीवनाचा निश्चितपणे घात झाला, असे समजावे. त्याला ऐहिक व परलौकिक सुखे प्राप्त होत नाहीत.
200-4
जया काळज्वरु आंगी बाणे । तो शीतोष्णे जैशी नेणे । आगी आणि चांदिणे । सरिसेचि मानी ॥200॥
ज्या माणसाला विषमज्वर झालेला असतो, त्याला शीत – उष्ण यातील फरक कळत नाही, तो अग्नी आणि चांदणे समान मानतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
201-4
तैसे साच आणि लटिके । विरुद्ध आणि निके । संशयी तो नोळखे । हिताहित ॥201॥
त्याप्रमाणे खरे खोटे, अनुकूल आणि प्रतिकूल, हित आणि अहित हे काहीचं संशयी माणूस जाणत नाही.
202-4
हा रात्रिदिवसु पाही जैसा । जात्यंधा ठाउवा नाही । तैसे संशयी असता काही । मना न ये ॥202॥
जन्मापासून आंधळ्या असणाऱ्या व्यक्तीला ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस कळत नाही, त्याप्रमाणे संशयात अडकलेल्या माणसाला काही पटत नाही.
203-4
म्हणऊनि संशयाहुनि थोर । आणिक नाही पाप घोर । हा विनाशाची वागुर । प्राणियासी ॥203॥
म्हणून संशयासारखे दुसरे मोठे पाप नाही; कारण हा संशय प्राण्यांना सर्वनाशाचे जाळे आहे.
204-4
येणे कारणे तुवा त्यजावा । आधी हाचि एकु जिणावा । जो ज्ञानाचिया अभावा- । माजी असे ॥204॥
एवढ्याकरिता तू या संशयाचा त्याग कर. जेथे आत्मज्ञानाचा अभाव असतो, तेथेच हा संशय असतो. प्रारंभी त्याला जिंकावे.
205-4
जै अज्ञानाचे गडद पडे । तै हा बहुवस मनी वाढे । म्हणोनि सर्वथा मागु मोडे । विश्वासाचा ॥205॥
जेंव्हा अज्ञानाचा गाढ अंधकार पसरलेला असतो, तेंव्हा हा संशय मनामध्ये वाढत जातो; म्हणून परमेश्वरावरील परम श्रद्धेचा मार्ग बंद पडतो.
206-4
हृदयी हाचि न समाये । बुद्धीते गिंवसूनि ठाये । तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥206॥
हा फक्त हृदय व्यापून राहतो, असे नाही; तर तो बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी त्याला तिन्ही लोक संशयात्मक दिसू लागतात.
योगसंन्यस्तकर्माणि ज्ञानसंछिन्नसंशयम् ।
आत्मवंतं न कर्माणि निबध्नन्ति धनंजयः ॥4. 41॥
भावार्थ :-
हे धनंजया ! ज्याने निष्काम कर्मयोगाने आपली सर्व कर्मे भगवंताला अर्पण केली आहेत, आत्मज्ञानाने ज्याचे सर्व संशय नाश पावले आहेत, अशा आत्मज्ञानी परमात्मपरायण पुरुषाला कर्मे बंधन करत नाहीत.
207-4
ऐसे जरी थोरावे । तरी उपाये एके आंगवे । जरी हाती होय बरवे । ज्ञानखड्ग ॥207॥
संशय एवढा जरी वाढला गेला, तरी तो एका उपायाने जिंकला जातो. उत्तम प्रकारचे ज्ञानरूप खड्ग जर हाती असेल,
208-4
तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे । निखळु हा निवटे । मग निःशेष खता फिटे । मानसीचा ॥208॥
तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण (संशय) नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ निःशेष नाहीसा होतो. (मग मनातील इतर दोषही नाहीसे होतात)
तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥4. 42॥
भावार्थ :-
म्हणून हे भरतवर्षा अर्जुना ! अज्ञानापासून उत्पन्न झालेला हा हृदयातील संशय ज्ञानरूपी शस्त्राने नाहीसा करून ईश्वरार्पण भावनेने कर्म कर आणि युध्दासाठी उभा रहा.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥4॥
209-4
याकारणे पार्था । उठी वेगी वरौता । नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥209॥
एवढ्याकरिता अर्जुना अंतःकरणात असलेल्या सर्व संशयाचा नाश करून, तू लवकर युध्दासाठी ऊठ.
210-4
ऐसे सर्वज्ञानाचा बापु । जो कृष्ण ज्ञानदीपु । तो म्हणतसे सकृपु । ऐके राया ॥210॥
संजय धृतराष्ट्रस म्हणाला, राजा ऐक, सर्वज्ञाचे जनक, जे ज्ञानदीप भगवान श्रीकृष्ण, अशा प्रकारे मोठ्या कृपेने अर्जुनास म्हणाले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-4
तव या पूर्वापर बोलाचा । विचारुनि कुमरु पंडूचा । कैसा प्रश्नु हन अवसरीचा । करिता होईल ॥211॥
तेंव्हा भगवान श्रीकृष्णाच्या आताच्या व मागील बोललेल्या तत्त्वज्ञानाचा विचार करून अर्जुन हा समयोचित प्रश्न विचारील.
212-4
ते कथेची संगति । भावाची संपत्ति । रसाचि उन्नति । म्हणिपेल पुढा ॥212॥
ती एकसंध (संगतवार) कथा अनुभवाच्या संपत्तीने व रसाच्या उत्कर्षाने पुढे सांगण्यात येईल.
213-4
जयाचिया बरवेपणी । कीजे आठा रसांची ओवाळणी । सज्जनाचिये आयणी । विसावा जगी ॥213॥
ज्याच्या सात्विकपणावरून विविध प्रकारच्या आठही रसांची ओवाळणी करावी आणि जो या जगतामध्ये सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांतीस्थान आहे.
214-4
तो शांतुचि अभिनवेल । ते परियेसा मऱ्हाठे बोल । जे समुद्राहूनि खोल । अर्थभरित ॥214॥
तो शांतीरस पुढील कथेमध्ये नाविन्यपूर्ण भावाने प्रकट होईल. जे अर्थपूर्ण व समुद्रपेक्षाही गंभीर आहे, असे मराठी बोल ऐका.
215-4
जैसे बिंब तरी बचके एवढे । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडे । शब्दाची व्याप्ती तेणे पाडे । अनुभवावी ॥215॥
जसे सूर्यबिंब आकाशात छोटे जरी दिसले, तरी त्याच्या प्रकाशाला त्रैलोक्यदेखील अपुरे पडते, त्याप्रमाणे मराठी शब्दांची व्याप्ती महान आहे, याचा अनुभव येईल.
216-4
ना तरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा । बोल व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावे ॥216॥
किंवा कल्पवृक्ष जसा माणसाच्या मनातील इच्छा पूर्ण करतो, तसे हे बोल अंतिम सत्य जाणण्याची इच्छा पूर्ण करणारे आहेत. यासाठी या शब्दांकडे एकाग्रतेने लक्ष द्यावे.
217-4
हे असो काय म्हणावे । सर्वज्ञु जाणती स्वभावे । तरी निके चित्त द्यावे । हे विनंती माझी ॥217॥
श्रोते हो ! यासंबंधी अधिक काय सांगावे ? आपण सर्वज्ञ आहात; म्हणून एकाग्रतेने लक्ष द्यावे, ही माझी आज्ञा नसून विनंती आहे.
218-4
जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती । जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥218॥
जशी एखादी स्त्री लावण्य, गुण आणि कुळ यांनी संपन्न व पतिव्रता असावी, त्याप्रमाणे या बोलण्याचा पद्धतीमध्ये सर्व अलंकार व शांती भरलेली दिसेल.
219-4
आधीचि साखर आवडे । आणि तेचि जरी ओखदी जोडे । तरी सेवावी ना का कोडे । नावानावा ॥219॥
आधीच साखर आवडते आणि तीच जर औषधांच्या रूपाने मिळाली, तर ती आवडीने पुनः पुनः का सेवन करू नये ?
220-4
सहजे मलयानिळु मंद सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु । आणि तेथेचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥220॥
मलय पर्वतावरील वारा सहजच मंद व सुगंधी असा वाहत असतो. त्याला जर अमृताची गोडी प्राप्त झाली आणि त्याठिकाणी जर सुमधुर स्वर दैवगतीने लाभला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-4
तरी स्पर्शे सर्वाग निववी । स्वादे जिव्हेते नाचवी । तेवीचि कानाकरवी । म्हणवी बापु माझा ॥221॥
तर तो वारा आपल्या शरीराला स्पर्शाने शांत करतो, गोडीने जिभेला संतोष लाभतो आणि सुमधुर स्वर श्रवण केल्यावर कानाकडून धन्य माझा बाप अशी वाहवा मिळवितो.
222-4
तैसे कथेचे इये ऐकणे । एक श्रवणासि होय पारणे । मग संसारदुःख मूळवणे । विकृतीविणे ॥222॥
त्याप्रमाणे या गीताकथेच्या श्रवणाने होणार आहे. एक तर कानाचे पारणे फिटेल आणि दुसरे म्हणजे अनायासे संसारातील दुःख पूर्णपणे नाहीसे होईल.
223-4
जरी मंत्रेचि वैरी मरे । तरी वायाचि का बांधावी कटारे । रोग जाये दुधे साखरे । तरी निंब का पियावा ॥223॥
मंत्राने जर मृत्यू पावत असेल, तर कमरेला काट्यारी का बरे बांधाव्यात ? दुधाने व साखरेने रोग नाहीसा होत असेल, तर कडूलिंबाच्या रस का बरे घ्यावा. ? ?
224-4
तैसा मनाचा मारु न करिता । आणि इंद्रिया दुःख न देता । एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजी ॥224॥
त्याप्रमाणे मनाचा विरोध न करता, इंद्रियांना कोंडून दुःख न देता, केवळ एकाग्रतेने श्रवण केल्यामुळे आयताच मोक्ष प्राप्त होतो.
225-4
म्हणोनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका । ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तीदासु ॥225॥
म्हणून उत्कंठतेने मन एकाग्र करून अर्थ श्रवण करावा, असे निवृत्तींनाथांचे शिष्य श्रीज्ञानदेव म्हणतात.
॥ इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकाया – ज्ञानकर्मसंन्यासयोगोनाम्
चतुर्थोऽध्यायः ॥4॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 42 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 225 ॥
-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम
सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक


















