शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय ३ रा कर्मयोगः

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 3 : karma Yoga:

सूची :- शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी

Sartha Dnyaneshwari Adhyay 3 karmaYoga:
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
॥ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
। अथ तृतीयोऽध्यायःअध्याय तीसरा । । कर्मयोगः ।
गीता श्लोक :- 43 ज्ञानेश्वरी ओव्या :- 276

अध्याय तीसरा
1-3
अर्जुन उवाच:
ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥3.1॥
भावार्थ :-
अर्जुन म्हणाला, ” हे जनार्दना ! कर्मा पेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे असे तुमचे मत आहे, तर मग हे केशवा, मला हे घोर कर्म का करावयास सांगता. ? “
मग आइका अर्जने म्हणितले । देवा तुम्ही जे वाक्य बोलिले । ते निके म्या परिसले । कमळापती ॥1
(ज्ञानोबाराय म्हणतात, अर्जुनाने कोणत्या प्रकारे शंका विचारली ते आता ऐकावे,) मग अर्जुन म्हणाला, ” हे देवा ! तूम्ही जे काही बोललात, ते, हे कमलापति, मी लक्षपूर्वक (चांगले) ऐकले.
2-2
तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहता । ऐसे मत तुझे अनंता । निश्चित जरी ॥2॥
श्रीअनंता, (भगवंतांनी या पूर्वीचे सांगितलेले आत्मज्ञानाचा विचार केला) तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पहिला असता त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा कर्ता, हे उरतच नाहींत व हेच जर तुझे मत निश्चित असेल,
3-3
तरी माते केवी हरी । म्हणसी पार्था संग्रामु करी । इये लाजसीना महाघोरी । कर्मी सुता ॥3॥
तर मग श्रीकृष्णा, ‘मला का म्हणता की, ” पार्था तू युद्ध कर ” .या भयंकर कर्मात मला घालताना तुला काहीच वाटत नाही काय ?
4-3
हा गा कर्म तूचि अशेष । निराकारासी निःशेष । तरी मजकरवी हे हिंसक । का करविसी तू ॥4॥
अरे, तूच जर सर्व कर्माचा निषेध करतोस, तर मग माझ्याकडून हे हिंसात्मक कर्म का करवुन घेतोस ? (घेत आहेस. देवा हे योग्य आहे का ?)
5-3
तरी हेचि विचारी हृषीकेशा । तू मानु देसी कर्मलेशा । आणि येसणी हे हिंसा । करवित अहासी ॥5॥
हे ऋषीकेशा ! याचा तू विचार करून पाहा कीं, आत्मज्ञानापुढे तू अल्पशा कर्मालादेखील मान देतोस आणि माझ्याकडुन एवढी मोठी हिंसा करवून घेत आहेस;(या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालावा.)
6-3
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥3.2॥

भावार्थ :-
आपल्या या घोटाळ्याच्या, दुपट्टी वचनामुळे माझ्या बुद्धीला भ्रम झाला आहे. तरी तू ज्याच्या योगाने (जे केल्याने) मला हित प्राप्त होईल असे एक निश्चित वचन सांग.
देवा तुवांचि ऐसे बोलावे । तरी आम्ही नेणती काय करावे । आता संपले म्हणे पा आघवे । विवेकाचे ॥6॥
देवा ! तुम्हीच जर असे संदेह उत्पन्न होणारे विचार बोलू लागलात, तर आमच्या सारख्या अज्ञानी लोकांनी काय करावे ? तर मग आता विवेकाची गोष्टच संपली, असच म्हणाव लागेल ?
7-3
हा गा उपदेशु जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा । आता पुरला आम्हा धिंवसा । आत्मबोधाचा ॥7॥
अहो ! यालाच जर (अज्ञान नाशाचा) उपदेश म्हणावे, तर मग याहून भ्रम (उत्पन्न करणारे) तो निराळा कोणता ? आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पूर्ण झाली म्हणावयाची.
8-3
वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसेनि जिये । सांगे मज ॥8॥
वैद्य हा (प्रथम रोग्याला औषध देऊन त्याने) काय खावे, काय खाऊ नये, हे पथ्य सांगून, मग नंतर जर त्याच वैद्याने रोग्यास (खाण्यासाठी) विष दिले तर तो रोगी कसा वाचावा हे मला सांग बरे !
9-3
जैसे आंधळे सुईजे आव्हांटा । का माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हा ॥9॥
जसे एखाद्या आंधळ्याला आडमार्गाला लावावे किंवा माकडाला मादक पदार्थ पिण्यास द्यावा, तसा हा तूझा उपदेश आम्हा अज्ञानी लोकांना चांगलाच लाभला आहे.
10-3
मी आधीचि काही नेणे । वरी कवळिलो मोहे येणे । कृष्णा विवेकु या कारणे । पुसिला तुज ॥10॥
अहो ! मला आधीच काही समजेनासे झाले आहे, त्यात मी या मोहाच्या चक्रात आडकलो आहे, म्हणून हे कृष्णा ! खरे काय आणि खोटे काय, ही गोष्ट तुला विचारली आहे. (हा सारासार विचारले आहे.)
11-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तव तुझी एकेकी नवाई । एथ उपदेशामाजी गावाई । तरी अनुसरलिया काई । ऐसे कीजे ॥11
तो तुझे एकेक पहावे, ते सर्वच आश्चर्य ! इकडे उपदेश करतोस आणि त्यात आम्हाला (अज्ञानी) घोटाळ्यात घालतोस ! आम्ही तुला शरण आलो, तुझे विचार ऐकतो; तर तु शरणांगताशी असे वागावे का ?
12-3
आम्ही तनुमनुजीवे । तुझिया बोला वोटंगावे । आणि तुवांचि ऐसे करावे । तरी सरले म्हणे ॥12॥
आम्ही शरीराने, मनाने व जीवाभावाने तुझ्यावर विश्वास ठेवावा (त्या नुसार जगावे) आणि तूच जर असे वागू (भ्रम निर्माण करणारे बोलू लागलास असे अर्जुन म्हणतोय) लागलास तर सगळे काही संपलेच, असे म्हणावे लागेल.
13-3
आता ऐसियापरी बोधिसी । तरी निके आम्हा करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥13॥
” आता आशाच प्रकारे उपदेश करणार असशील, तर मग आमचे चांगले कल्याण करतोस म्हणावयाचे ! अर्जुन येथे (उपहासाने म्हणाला) आता येथे ज्ञान मिळण्याची आशा कशाची ? “
14-3
तरी ये जाणिवेचे कीर सरले । परी आणिक एक असे जाहले । जे थिते हे डहुळले । मानस माझे ॥14
ज्ञान मिळविण्याची गोष्ट तर खरोखरीच संपली, पण यात आणखी एक असे झाले की, माझे स्थिर असलेले मन घोटाळ्यात पडले ! (संशयाने गोंधळून गेले)
15-3
तेवीचि कृष्णा हे तुझे । चरित्र काही नेणिजे । जरी चित्त पाहसी माझे । येणे मिषे ॥15॥
पुन्हा अर्जुन (जास्तच बोलला अस वाटुन चपापला आणि स्वर बदलून बोलू लागला) त्याप्रमाणे हे श्रीकृष्णा
! तुझे अलौकिक चरित्र मला समजत नाही.(तुझी लिला मला काही कळत नाही,) कदाचित या उपदेशाच्या निमित्ताने तू माझी परीक्षा घेत आहेस काय ?


16-3
ना तरी झकवितु आहासी माते । की तत्वचि कथिले ध्वनिते । हे अवगमता निरुते । जाणवेना ॥16॥
किंवा तू आम्हाला भ्रमित करत आहेस, का गूढ शब्दांनी तत्वज्ञान सांगत आहेस, याचा सूक्ष्म विचार केला, तरी मला निश्चित असे काही कळत नाही.
17-3
म्हणोनि आइके देवा । हा भावार्थु आता न बोलावा । मज विवेकु सांगावा । मर्‍हाटा जी ॥17॥
म्हणूण हे देवा ! आपण माझे ऐकावे. हा उपदेश असा गुढार्थाने सांगू नकोस. महाराज, मला तो विचार माझ्या भाषेत, मला समजेल असा सोपा करून सांगावा. (आडाण्यालाही समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगा)
18-3
मी अत्यंत जड असे । परी ऐसाही निके परियसे । कृष्णा बोलावे तुवा तैसे । एकनिष्ठ ॥18॥
हे श्रीकृष्णा ! मी अतिशय मंदबुद्धी आहे, पण अशाहि मला उत्तम प्रकारे समजेल,असे निश्चयात्मक सांग.
19-3
देखे रोगाते जिणावे । औषध तरी द्यावे । परी ते अतिरुच्य व्हावे । मधुर जैसे ॥19॥
हे पाहा, रोग नाहिसा होण्यासाठी वैद्याने औषध तर द्यावे; परंतु ते मधुर व रुचकर असावे; (रोगी ते आनंदाने पिला पाहिजे)
20-3
तैसे सकळार्थभरित । तत्व सांगावे उचित । परी बोधे माझे चित्त । जयापरी ॥20॥
त्याप्रमाणे अर्थाने परिपूर्ण व आचरणास उचित योग्य असे तत्व तर सांगावे, पण ते असे सांगावे की, जेणेकरून माझ्या मनाला निःसंशय कळेल. (त्याचा निःसंदिग्धपणे पूर्ण बोध होईल.)
21-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
देवा तुज ऐसा निजगुरु । आणि आर्तीधणी का न करू । एथ भीड कवणाची धरू । तू माय आमुची ॥21॥
हे देवा, तुमच्यासारखा सद्गुरू आज लाभला आहे, तर मी माझ्या मनाची इच्छा तृप्त का बरे करून घेऊ नये ? तू आमची आई आहेस (तर मग) येथे भीड का बरे धरावी ?
22-3
हा गा कामधेनूचे दुभते । देवे जाहले जरी आपैते । तरी कामनेची का तेथे । वानी कीजे ॥22॥
अहो, दैवयोगाने कामधेनुचे दुभते जर प्राप्त झाले, तर तशा प्रसंगी हवे ते मागण्यास संकोच का करावे ?
23-3
जरी चिंतामणि हाता चढे । तरी वांछेचे कवण सांकडे । का आपुलेनि सुरवाडे । इच्छावे ना ॥23॥
किंवा चिंतामणी जर हाती लागला, तर आपणास इच्छित वस्तू मागण्याची अडचण का वाटावी ? आपणास हवी तशी इच्छा का करू नये ?
24-3
देखे अमृतसिंधूते ठाकावे । मग तहाना जरी फुटावे । मग सायासु का करावे । मागील ते ॥24॥
असे पाहा की, अमृताच्या सागराजवळ यावे, आणि अमृताचे प्राशन न करता तहानेने व्याकुळ व्हावे, तर मग (अमृत सागराजवळ) येथे येण्याचे कष्ट तरी का बरे घ्यावेत ?
25-3
तैसा जन्मांतरी बहुती । उपासिता लक्ष्मीपती । तू दैवे आजि हाती । जाहलासी जरी ॥25॥
त्याचप्रमाणे हे कमळापती ! तुझी जन्मोजन्मी मनोभावे उपासना केली, (अर्थात निष्काम सेवा केल्यामुळे) त्यामुळे आज दैवयोगाने तू आम्हाला लाभला आहेस.
26-3
तरी आपुलेया सवेसा । का न मगावासी परेशा । देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥26॥
तर मग हे परमेश्वरा ! माझ्या इच्छेप्रमाणे मी का बरे तुझ्याकडे (हट्ट धरू नये) मागू नये ? देवा, माझ्या मनातील हेतू (इच्छा) पूर्ण सफल होण्याची ही वेळ आली आहे.(तो दिवस प्रकाशीत झाला आहे)
27-3
देखे सकळार्तीचे जियाले । आजि पुण्य यशासि आले । हे मनोरथ जहाले । विजयी माझे ॥27॥
पाहा, माझ्या सर्व मनोकामना परिपूर्ण झाल्या. आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले माझ्या मनातील हेतू आज तडीस गेले.
28-3
जी जी परममंगळधामा । देवदेवोत्तमा । तू स्वाधीन आजि आम्हा । म्हणऊनिया ॥28॥
कारण, अहो महाराज, सर्वोकृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवांत श्रेष्ठ असलेल्या देवा, तू आमच्या ताब्यात (सोबत आहेस) आला आहेस, म्हणून.
29-3
जैसा मातेचा ठायी । अपत्या अनवसरु नाही । स्तन्यालागूनि पाही । जियापरी ॥29॥
पाहा, जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईसाठी कोणतीच वेळ ही अवेळ नसते,
30-3
तैसे देवा तूते । पुसिजतसे आवडे ते । आपुलेनि आर्ते । कृपानिधि ॥30॥
त्याप्रमाणे हे कृपानिधी देवा, मी माझ्या (मनातील निर्माण झालेला भ्रम दूर करण्यासाठी) इच्छेप्रमाणे वाटेल ते तुला विचारणार आहे.


31-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तरी पारत्रिकी हित । आणि आचरिता तरी उचित । ते सांगे एक निश्चित । पार्थु म्हणे ॥31॥
तर मग परलोकात कल्याणकारक आणि इहलोकामध्ये आचरण करण्यास उचित असे जे एक निश्चित स्वरूपाचे आहे, ते मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला.
32-3

श्रीभगवानुवाच:
लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ ।
ज्ञानयोगेन सांख्याना कर्मयोगेन योगिनां ॥3.3॥

भावार्थ :-
श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पाप अर्जुना ! या लोकात पूर्वी मी दोन प्रकारचे मार्ग सांगितले आहेत.पहिला मार्ग :- ज्ञानयोगाच्या आधारे आत्मज्ञानी सांख्याचा. दुसरा मार्ग :- निरपेक्ष कार्मयोगाच्या आधारे कर्म करण्याचा. (सिद्धी व असिद्धी विषयी समबुद्धी ठेवण्याचा)

या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥32॥
अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण आश्चर्याने म्हणाले, हे अर्जुना ! आम्ही तुला थोडक्यात मतलब सांगितला.(माझ्या बोलण्याचा अभिप्राय काही प्रमाणात गूढ आहे.)
33-3
जे बुद्धियोगु सांगता । सांख्यमतसंस्था । प्रकटिली स्वभावता । प्रसंगे आम्ही ॥33॥
कारण की, निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही (ज्ञानमार्गाची व्यवस्था) सांख्याना मान्य अशा योगाची निष्ठा सांगितली.
34-3
तो उद्देशु तू नेणसी । म्हणोनि क्षोभलासि वायाचि । तरी आता जाण म्यांचि । उक्त दोन्ही ॥34॥
तो उद्देश तू जाणला नाहीस; म्हणून तुला व्यर्थ राग आला आहे. तर आता ध्यानांत ठेव की हे दोनही मार्ग (ज्ञानयोग आणि कर्मयोग) मीच सांगितले आहेत.
35-3
अवधारी वीरश्रेष्ठा । ये लोकी या दोन्ही निष्ठा । मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥35॥
हे विरश्रेष्ठा अर्जुना ऐक ! हे दोन्ही मार्ग अनादि काळापासून आहेत, आणि (हे मार्ग)माझ्यापासून प्रकट झालेल्या आहेत.(या लोकी व्यक्त झाल्या आहेत हे जाण)
36-3
एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यी अनुष्ठीजे । जेथ ओळखीसवे पाविजे । तद्रूपता ॥36॥
या पैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात, त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात. त्यामुळे आत्मतत्वाची जाणीव होऊन तद्रुपता प्राप्त होते.
37-3
एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण । होवूनिया निर्वाण । पावती वेळे ॥37॥
(आणि) दुसरा मार्ग म्हणजे कर्मयोग होय. कर्ममार्गाचे लोक समत्वभाव ठेवण्याविषयी निष्णात असतात आणि काही काळाने त्यांना मोक्ष प्राप्त होतो.
38-3
हे मार्गु तरी दोनी । परि एकवटती निदानी । जैसे सिद्धसाध्यभोजनी । तृप्ति एकी ॥38॥
असे हे दोन मार्ग असले, तरी ते एकाच चैतन्याच्या ठिकाणी (परंतु शेवटी एकाच ठिकाणी) एकरूप होतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते.
39-3
का पूर्वापर सरिता । भिन्ना दिसती पाहता । मग सिंधूमिळणी ऐक्यता । पावती शेखी ॥39॥
किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगळ्या दिसतात, मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात;
40-3
तैसी दोनी ये मते । सूचिती एका कारणाते । परी उपास्ति ते योग्यते – । आधीन असे ॥40॥
त्याप्रमाणे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे जरी दोन मार्ग असले, तरी ते एकाच साध्याला सुचवितात. परंतु त्याचे आचरण करणे, करणाऱ्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे.
41-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
देखे उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगे नरु केवी तैसा । पावे वेगा ॥41॥
असे पाहा की, ज्याप्रमाणे पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल ? सांग बरें.
42-3
तो हळूहळू ढाळेढाळे । केतुकेनि एके वेळे । मार्गाचेनि बळे । निश्चित ठाकी ॥42॥
तो मनुष्य एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर हळूहळू जात असतो आणि काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत निश्चित पोहोचतो.
43-3
तैसे देख पा विहंगममते । अधिष्ठूनि ज्ञानाते । सांख्य सद्य मोक्षाते । आकळिती ॥43॥
पाहा. (वरील दृष्टांतातील पक्षाप्रमाणे) त्याचप्रमाणे ज्ञानमार्गाचे जे वाटचाल करतात, ते ज्ञानी विहंगम मार्गाने तत्काळ मोक्षाची प्राप्ती करून घेतात.
44-3
येर योगिये कर्माधारे । विहितेचि निजाचारे । पूर्णता अवसरे । पावते होती ॥44॥
दुसरे जे कर्मयोगी आहेत, ते कार्मयोगाच्या आधारे शास्त्राप्रमाणे आपला आचारच करून, काही काळाने मोक्षाला प्राप्त होतात.

45-3
न कर्मणामनारभान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति ॥3.4॥

भावार्थ :-
मनुष्य कर्म न करण्याने निष्कर्मतेला प्राप्त होत नाही. तसेच, प्राप्त कर्माच्या त्यागाने परमेश्वर- साक्षात्काररूप सिद्धी प्राप्त करू शकत नाही.

वाचोनि कर्मारंभ उचित । न करिताचि सिद्धवत । कर्महीना निश्चित । होईजेना ॥45॥
कर्माचा आरंभ केल्याशिवाय, योग्य असे कर्म न करता कर्महीन पुरुषाला सिद्ध पुरुषांप्रमाणे निष्कर्म नक्कीच होता येणार नाही.
46-3
का प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्या होईजे । हे अर्जुना वाया बोलिजे । मूर्खपणे ॥46॥
अर्जुना ! (अधिकारानुसार आपल्या भागाला आलेले) विहित कर्म टाकून द्यावे व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे, हे बोलणे व्यर्थ व मूर्खपणाचे आहे.

47-3
सांगे पैलतीरा जावे । ऐसे व्यसन का जेथ पावे । तेथ नावेते त्यजावे । घडे केवी ॥47॥
पूर्ण भरलेल्या नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर कसे जावे, असे संकट जेंव्हा निर्माण होते, तेथे नावेचा त्याग करून कसे चालेल ? सांग बरे.
48-3
ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे । की सिद्धुही न सेविजे । केवी सांगे ॥48॥
अथवा, जर भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर स्वयंपाक न करून कसे चालेल ? किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसे चालेल ? सांग बरे.
49-3
जव निरार्तता नाही । तव व्यापारु असे पाही । मग संतुष्टीचा ठायी । कुंठे सहजे ॥49॥
जोपर्यंत निरिच्छ अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत कर्म केले पाहिजे.असे समज. एकदा का आत्मसंतुष्ठ अवस्था प्राप्त झाली, की कर्म सहजच थांबले जाते.
50-3
म्हणोनि आइके पार्था । जया नैष्कर्म्यपदी आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥50॥
म्हणून हे अर्जुना ! ऐक. ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र अशी इच्छा आहे, त्याने आपली आपली उचित विहित कर्माचा त्याग करणे योग्य होणार नाही.
51-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
आणि आपुलालिया चाडे । आपादिले हे मांडे । की त्यजिले हे कर्म सांडे । ऐसे आहे ॥51॥
आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला म्हणजे ते घडते आणि कर्माचा त्याग केला म्हणजे कर्मसंन्यास घडतो, असे आहे का ?
52-3
हे वायाचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखो पाहिजे । परी त्यजिता कर्म न त्यजे । निभ्रांत मानी ॥52॥
हे उगीच काहीतरी (अयोग्य) बोलणे आहे. याचा नीट विचार करून पाहिले, तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे ते टाकले जात नाही, हे तू निःसंशय समज.

53-3
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैगुणैः ॥3.5॥

भावार्थ :-
कारण कोणीहि (काहीतरी) कर्म न करता क्षणभारदेखील केंव्हाही राहत नाही, प्रत्येकजण प्रकृतिजन्य गुणांच्या अधीन असल्यामुळे ते गुण प्रत्येकाकडून कर्म करवीतच असतात.(करवून घेत असतात)

जव प्रकृतीचे अधिष्ठान । तव सांडी मांडी हे अज्ञान । जे चेष्टा गुणाधीन । आपैसी असे ॥53॥
जोपर्यँत जीवाला शरीराचा, प्रकृतीचा आश्रय आहे तोपर्यन्त मी कर्माचा त्याग करीन अथवा कर्म करीन असे म्हणणे अज्ञानपणाचे आहे. कारण, जेवढे म्हणून कर्म घडत असते, तेवढे स्वभावतः (सात्विक, राजस, तामस) प्रकृतीक गुणांच्या अधीन असते.

54-3
देखे विहित कर्म जेतुले । ते सळे जरी वोसंडिले । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥54॥
पाहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहे, तेवढे जरी करावयाचे सोडून दिले, तरी इंद्रियांचे स्वभाव नष्ट झाले आहे काय ?

55-3
सांगे श्रवणी ऐकावे ठेले । की नेत्रीचे तेज गेले । हे नासारंध्र बुझाले । परिमळु नेघे ॥55॥
सांग, कानांनी ऐकण्याचे बंद झाले आहे काय ? अथवा, डोळ्यातील पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे काय ? या नाकपुड्या बुजून वास येईनासा झाला आहे काय ?

56-3
ना तरी प्राणापानगति । की निर्विकल्प जाहली मति । की क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥56॥
किंवा प्राण व अपान, या दोन्ही वायूच्या क्रिया थांबल्या आहेत काय ? किंवा बुद्धीचा कल्पना विलास थांबला आहे काय ? किंवा भूक-तहान लागणे इत्यादी पीडा थांबल्या आहेत काय ?

57-3
हे स्वप्नावबोधु ठेले । की चरण चालो विसरले । हे असो काय निमाले । जन्ममृत्यू ॥57॥
स्वप्न व जागृत अवस्था बंद पडल्या आहेत का ? अथवा पाय चालणे विसरले काय ? हे सर्व असु दे. जन्म आणि मरण संपली आहेत काय ?
58-3
हे न ठकेचि जरी काही । तरी सांडिले ते कायी । म्हणोनि कर्मत्यागु नाही । प्रकृतिमंता ॥58॥
हे जर काहीचं बंद पडले नाही, तर मग कर्मत्याग कसला ? म्हणून प्रकृतीच्या अधीन असलेल्या पुरुषाला कर्म त्याग करता येत नाही.
59-3
कर्म पराधीनपणे । निपजतसे प्रकृतिगुणे । येरी धरी मोकली अंतःकरणे । वाहिजे वाया ॥59॥
मनुष्य प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे (सत्व, रज, तम्) शरीरातील सत्वादि प्रकारचे गुण त्याच्याकडून कर्म घडवीतच असतात; म्हणून एखाद्याने मी हे कर्म करतो अथवा या कर्माचा त्याग करतो, असा अंतःकरणात अभिमान बाळगणे, हे व्यर्थ आहे.
60-3
देखे रथी आरूढिजे । मग निश्चळा बैसिजे । मग चळा होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥60॥
पाहा, एखादा मनुष्य रथावर आरूढ झाला, काही न करता स्तब्ध झाला (स्वस्थ बसला), तरी तो मनुष्य (रथावर बसलेला) रथाच्या अधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्याचाहि प्रवास हा घडतोच.
61-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
का उचलिले वायुवशे । चळे शुष्क पत्र जैसे । निचेष्ट आकाशे । परिभ्रमे ॥61॥
एखादे वाळलेले झाडाचे पान काही न करता पडलेले असते; परंतु जोरात वारा सुटला, की ते वाऱ्यामुळे (स्वतः हालचाल न करता) आकाशात इकडे तिकडे फिरत(उडत) असते.
62-3
तैसे प्रकृतिआधारे । कर्मेंद्रियविकारे । मिष्कर्म्युही व्यापारे । निरंतर ॥62॥
त्याप्रमाणे प्रकृतीच्या आधारे (कर्मातीत अवस्थेस प्राप्त झालेला मनुष्य) आणि कर्मेंद्रियांच्या विकाराने निष्काम माणूसही नेहमी कर्म करीत असतो.
63-3
म्हणऊनि संगु जव प्रकृतिचा । तव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करू म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ॥63॥
म्हणून जो पर्यंत प्रकृतीचा (जो पर्यंत शरीराशी) संबंध आहे, तोपर्यन्त कर्माचा त्याग करणे शक्य नाही, असे असूनही जे कर्माचा त्याग करू म्हणतात, त्यांचा तो केवळ बोलण्याचा आग्रह असतो.
64-3
कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उचयते ॥3.6॥
भावार्थ :-
जो केवळ कर्मेंद्रियांना जबरदस्तीने ताब्यात घेतो आणि मनात विषयांचे चिंतन करीत असतो, त्याला अज्ञानी किंवा ढोंगी असे म्हणतात.
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊ पाहती । परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधूनि ॥64॥
जे उचित (आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म) कर्माचा त्याग करतात आणि कर्मेंद्रियप्रवृत्तीचा निरोध करूनच नैष्कर्म्य होऊ पाहतात, (कर्मातीत अवस्थेला पोहचू पाहतात),

65-3
तया कर्मत्यागु न घडे । जे कर्तव्य मनी सापडे । वरी नटती ते फुडे । दरिद्र जाण ॥65॥
त्यांना कर्माचा त्याग घडत नसतो; कारण त्यांच्या अंतःकरणात कर्तव्यबुद्धी (म्हणजे विष्यप्राप्तीचे कर्तव्य) दडलेली असते. त्यामुळे कर्मत्यागाचे त्याचे सोंग वरवरचे असते; आणि ते कर्मत्यागाचे दारिद्रच असते, असे समज.

66-3
ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा । वोळखावे तत्वता । येथ भ्रांति नाही ॥66॥
हे अर्जुना ! असे ते लोक खरोखरच विषयासक्त (विषयाची आसक्ती) असतात. त्यांचा विषयाच्या आसक्तीबद्दल काही संशय घेण्याचे काही कारण नाही.

67-3
आता देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन । या नैराश्याचे चिन्ह । धनुर्धरा ॥67॥
हे अर्जुना ! प्रसंग आला आहे,म्हणून निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो. इकडे तू लक्ष दे.
68-3

यस्तित्वंद्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः न विशिष्यते ॥3.7॥
भावार्थ :-
पण हे अर्जुना ! जो पुरुष मनाने सर्व इंद्रियांना ताब्यात घेऊन (नियमन करून), (आसक्त न होता) अनासक्त बनून कर्मेंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय.(कर्मेंद्रिय कर्मात राबवतो)

जो अंतरी दृढु । परमात्मरूपी गूढु । बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥68॥
जो अंतःकरणात सात्विक निश्चयाने दृढ असतो आणि परमात्म्याच्या स्वरूपात रंगून गेलेला असतो; तथापि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करत असतो;
69-3
तो इंद्रिया आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी । प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जे जे ॥69॥
तो इंद्रियांना आज्ञा करीत नाही. विषय त्यास बाधा करतील अशी भीती (त्याच्या मनात) नसते आणि ज्यावेळी जी कर्मे करायची असतात, त्या वेळी त्या कर्माचा त्याग करीत नाही
70-3.
(अधिकारानुसार प्राप्त झालेली विहित कर्माचा त्याग न करणारा)
तो कर्मेंद्रिये कर्मी । राहाटता तरी न नियमी । परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना ॥70॥
कर्मेंद्रिय कर्म करीत असताना तो पुरुष त्यांना आवरीत नाही, परंतु त्यामुळे निर्माण होणाऱ्या विकारांच्या बंधनात तो सापडत नाही.
71-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
(उत्पन्न होणाऱ्या विचारांनी तो लिप्त होत नाही)
तो कामनामात्रे न घेपे । मोहमळे न लिंपे । जैसे जळी जळे न शिंपे । पद्मपत्र ॥71॥
ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने भिजत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही व अविवेकरूपी (किंवा मोहरूपी) मळाने मालिन होत नाही.
72-3
तैसा संसर्गामाजि असे । सकळांसारिखा दिसे । जैसे तोयसंगे आभासे । भानुबिंब ॥72॥
(त्या कमळाप्रमाणे) त्याप्रमाणे तो प्रपंचामध्ये राहतो. तो दिसण्यास सामान्य लोकांप्रमाणे दिसतो; पण मनाने असंग असतो, जसे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनहि, पाण्याच्या संगतीत राहताना दिसतो.
73-3
तैसा सामन्यत्वे पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । येरवी निर्धारिता नेणिजे । सोय जयाची ॥73॥
त्याप्रमाणे वरवर पहिले तर, तो सामान्य माणसासारखा दिसतो. त्याच्या संबंधी निश्चित विचार करू लागलो, तर त्याचे वास्तव स्वरूप काही कळू शकत नाही.(कल्पना करता येत नाही.)
74-3
ऐसा चिन्ही चिन्हितु । देखसी तोचि तरी मुक्तु । आशापाशरहितु । वोळख पा ॥74॥
अशा लक्षणांनी युक्त असलेला (मनुष्य) जो तुला दिसेल, तो आशा-पाशरहित व मुक्त आहे, असे तू जण.
75-3
अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगी । म्हणोनि ऐसा होय यालागी । म्हणिपे तूते ॥75॥
हे अर्जुना ! तोच खरा कर्मयोगी होय. या जगात त्याचीच स्तुती होत असते. म्हणून, तू असा कर्मयोगी हो, असे मी तुला म्हणत आहे.
76-3
तू मानसा नियमु करी । निश्चळु होय अंतरी । मग कर्मेंद्रिये ही व्यापारी । वर्ततु सुखे ॥76॥
तू आपल्या मनाचा निग्रह कर आणि अंतःकरणात स्थिर हो; मग ही कर्मेंद्रिय आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत.
77-3
नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिध्येदकर्मणः ॥3.8॥
भावार्थ :-
तू शास्त्रविधीने नियत केलेले कर्तव्यकर्म कर (म्हणजेच आपले विहित असे जे कर्म आहेत ते तू करीत जा). कारण, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ (अधिक चांगले) होय. तसेच, कर्मच जर केले नाहीस, तर तुझा शरीरनिर्वाहही (शरीराची जी कार्य आहेत, यात्रा आहे) उत्तम प्रकारे सिद्ध होऊ शकणार नाही.
म्हणशी नैष्कर्म्य होआवे । तरी एथ ते न संभवे । आणि निषिद्ध केवी राहाटावे । विचारी पा ॥77॥
कर्माचा त्याग करून कर्मातीत व्हावे म्हणशील (विहित कर्म करणे टाकून), तर ते मानवास संभवत नाही, मग शास्त्रविरुद्ध आचरण का करावे, याचा तूच विचार कर.
78-3
म्हणोनि जे जे उचित । आणि अवसरेंकरून प्राप्त । ते कर्म हेतुरहित । आचर तू ॥78॥
म्हणून जे जे कर्म उचित असेल आणि प्रसंगाने प्राप्त झाले असेल, ते ते तू फळाची इच्छा न ठेवता आचरणात आण. (ते कर्म करीत जा)
79-3
पार्था आणिकही एक । नेणसी तू हे कवतिक । जे ऐसे कर्म मोचक । आपैसे असे ॥79॥
अर्जुना ! आणखी एक म्हणजे, या निष्काम कर्माचे कौतुक तू जाणत नाहीस. ते हे की, निष्काम कर्म हे प्राण्यांना (सहजपणे) कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते.
80-3
देखे अनुक्रमाधारे । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणे व्यापारे । निश्चित पावे ॥80॥
पाहा, जो वर्णाश्रमधर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो, त्यास त्या आचरणाने मोक्षाची निश्चित प्राप्ती होते.
81-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः ।
तदर्थे कर्म कौंतेय मुक्तसङगः समाचरः ॥3.9॥
भावार्थ :-
ईश्वरार्पण बुद्धिवाचून फळाच्या इच्छेने केलेल्या कर्माने मनुष्य बांधला जातो. म्हणून हे अर्जुना ! तू कर्तेपणाचा अभिमान सोडून ईश्वरार्पण बुध्दीने कर्म कर.
स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पा । म्हणोनि वर्तता तेथ पापा । संचारु नाही ॥81॥
अरे बाबा, आपला जो धर्म आहे, तोच नित्य यज्ञ होय, असे समज. म्हणून त्याचे आचरण करीत असताना त्यात पाप प्रवेश करत नाही.
82-3
हा निजधर्मु जै सांडे । कुकर्मी रति घडे । तैंचि बंधु पडे । संसारिकु ॥82॥
स्वधर्मचा त्याग केला, तर वाईट कर्म करण्याची इच्छा निर्माण होते आणि वाईट कर्म केले, की माणूस जन्म-मरणाच्या चक्रात सापडतो.
83-3
म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । ते अखंड यज्ञयाजन । जो करी तया बंधन । कहीच नाही ॥83॥
म्हणून स्वधर्माचे आचरण करणे म्हणजे नित्य यज्ञ-याजन करण्यासारखे आहे. जो असे स्वधर्माचे आचरण करतो, त्याला काहीसुद्धा बंधन होत नाही.
84-3
हा लोकु कर्मे बांधिला । जो परतंत्रा भुतला । तो नित्ययज्ञाते चुकला । म्हणोनिया ॥84॥
जो माणूस आपल्या नित्य यज्ञाला चुकला; तो कर्माने बध्द होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन होऊन पापकर्माने बांधला जातो.
85-3
आता येचिविशी पार्था । तुज सांगेन एकी मी कथा । जै सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनि केली ॥85॥
पार्था ! या विषयी मी तुला एक कथा सांगतो.ती अशी की, ब्रम्हदेवाने उत्पत्ती, स्थिती, लय असा सृष्टीचा आकार निर्माण केला.
86-3
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥3.10॥
भावार्थ :-
प्रजापती ब्रम्हदेवाने कल्पाच्या आरंभी (यज्ञासह) प्रजा उत्पन्न करून त्या प्रजेला म्हटले की, तुम्ही स्वधर्मरूप यज्ञाचे आचरण करा, म्हणजे हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करील.
ते नित्ययागसहिते । सृजिली भूते समस्ते । परी नेणतीचि तिये यज्ञाते । सूक्ष्म म्हणऊनी ॥86॥
त्यावेळी प्राणी आणि नित्य आचरणाचे धर्म ही दोन्ही गोष्टी त्यांनी बरोबर उत्पन्न केली. परंतु लोक या यज्ञाला जाणत नव्हते. कारण, स्वधर्मरूप यज्ञाचे स्वरूप आहे.
87-3
ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा । देवा आश्रयो काय एथ आम्हा । तव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥87॥
त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रम्हदेवाला विनंती केली की, देवा, या लोकात आम्हाला आधार काय ? त्यावेळी (कमळापासून ज्याची उत्पत्ती झाली) असा तो ब्रम्हदेव लोकांना म्हणाला,
88-3
तुम्हा वर्णविशेषवशे । आम्ही हा स्वधर्मुचि विहिला असे । याते उपासा मग आपैसे । काम पुरती ॥88॥
तुम्हाला वर्णानुसार असा हा स्वधर्म सांगितला आहे. त्याचे आचरण करावे, म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा सहजपणे पूर्ण होतील.
89-3
तुम्ही व्रते नियमु न करावे । शरीराते न पीडावे । दुरी केंही न वचावे । तीर्थासी गा ॥89॥
याशिवाय तुम्हाला व्रत- नियम करण्याची काही आवश्यकता नाही. अवघड साधना करून शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही. तसेच, दूर कोठे तीर्थयात्रेस जाण्याची जरुरी नाही.
90-3
योगादिक साधने । साकांक्ष आराधने । मंत्रयंत्रविधाने । झणी करा ॥90॥
योग वगैरे साधने, सकाम उपासना तसेच, मंत्रतंत्रादिक अनुष्ठाने करण्याची गरज नाही.
91-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
देवतांतरा न भजावे । हे सर्वथा काही न करावे । तुम्ही स्वधर्मयज्ञीं यजावे । अनायासे ॥91॥
स्वधर्म सोडून इतर देवतांची पूजा अर्चा करण्याचे कारण नाही. हे सर्व करण्याचे मुळीच कारण नाही; तुम्ही सहजपणे प्राप्त झालेल्या स्वधर्माचरणरूप यज्ञाचे आचरण करावे.
92-3
अहेतुके चित्ते । अनुष्ठां पा ययाते । पतिव्रता पतीते । जियापरी ॥92॥
ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री निष्काम बुद्धीने आपल्या पतीची सेवा करते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण करा.
93-3
तैसा स्वधर्मरूप मखु । हाचि सेव्य तुम्हा एकु । ऐसे सत्यलोकनायकु । म्हणता जहाला ॥93॥
अशा प्रकारे तुम्हाला हाच एक स्वधर्मरूप यज्ञ आचरण्यास योग्य आहे, असे सत्य लोक अधिपती ब्रम्हदेव म्हणाले.
94-3
देखा स्वधर्माते भजाल । तरी कामधेनु हा होईल । मग प्रजाहो न संडील । तुमते सदा ॥94॥
जर, तुम्ही स्वधर्माचे आचरण कराल, तर हा धर्म कामधेनुप्रमाणे इच्छा पुरविणारा होईल. प्रजाजन हो, मग हा स्वधर्म (स्वधर्मरूपी कामधेनू) तुम्हाला कधीही सोडणार नाही.
95-3
देवान् भावयतानेन ते देवाः भावयंतु वः ।
परस्परं भावयंतः श्रेयः परमवाप्स्यच ॥3.11॥
भावार्थ :-
स्वधर्मरूप यज्ञाच्या आचरणाने तुम्ही देवाचे पूजन केले असता ते देव तुम्हाला प्रसन्न होतील, याप्रमाणे तुम्ही परस्पराना संतुष्ट करून आपले कल्याण करून घ्याल.
जे येणेचिकरूनि समस्ता । परितोषु होईल देवता । मग ते तुम्हा ईप्सीता । अर्थांते देती ॥95॥
कारण या स्वधर्माच्या आचरणाने सर्व देवतांना संतोष होईल; आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छित भोग देतील.
96-3
या स्वधर्मपूजा पूजिता । देवतागणा समस्ता । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥96॥
या स्वधर्मरूपी पूजेने सर्व देवतागणांची पूजा केली असता ते देव तुमचा योगक्षेम निश्चितपूर्वक चालवतील.
97-3
तुम्ही देवतांते भजाल । देव तुम्हा तुष्टितील । ऐसी परस्परे घडेल । प्रीति तेथ ॥97॥
तुम्ही स्वधर्माद्वारा देवांची भक्ती कराल, तर देव तुमच्यावर संतुष्ट होतील. असे एकमेकांचे एकमेकांवर जेंव्हा प्रेम जडेल,
98-3
तेथ तुम्ही जे करू म्हणाल । ते आपैसे सिद्धी जाईल । वांछितही पुरेल । मानसींचे ॥98॥
तेंव्हा तुम्ही जे करू म्हणाल, ते सहजच सिद्धीस जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
99-3
वाचासिद्धी पावाल । आज्ञापक होआल । म्हणिये तुमते मागतील । महाऋद्धि ॥99॥
तुम्हाला वाचासिद्धी प्राप्त होईल (तुम्ही बोलाल ते खरे होईल म्हणजेच वाचासिद्धी). आणि तुम्हीच आज्ञा करणारे व्हाल. तुम्ही महासिद्धीला (महाऋषी) काही मागून घेण्याएवजी, ही महासिद्धीचं तुम्हाला हवे ते मागतील.(महाऋषीच तुम्हाला तुमची इच्छा विचारतील)
100-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
जैसे ऋतुपतीचे द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार । लावण्येंसी ॥100॥
(ऋतूपती) वसंत ऋतूचे द्वारात ज्याप्रमाणे वनशोभा ही आपल्या फळपुष्पभाराच्या लावण्याने सदैव वास करीत असते,
101-3
इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यंते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङक्ते स्तेन एव सः ॥3.12॥
भावार्थ :-
स्वधर्माचे आचरण केल्याने (यज्ञाने) तृप्त झालेले देव तुम्हाला प्रिय व हितकर भोग्य वस्तू देतील. त्यांनी दिलेल्या भोग्य वस्तू देवाला समर्पण न करता जो त्याचा उपभोग घेतो (घेईल), तो चोर समजावा.
तैसे सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हापांठी ॥101॥
पाहा, त्याप्रमाणे सर्वसुखासह मूर्तिमंत भाग्यच तुमचा मार्ग शोध करीत-करीत तुमच्या पाठीमागे येईल.
102-3
ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त । जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा ॥102॥
अशा रीतीने बाबांनो, जर तुम्ही एकनिष्टपणाने स्वधर्माचे आचरण कराल, तर सर्व ऐश्वर्याने तृप्त होऊन तुमच्या मनात विषयांची इच्छा राहणार नाही.
103-3
का जालिया सकल संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनिया स्वादां । विषयांचिया ॥103॥
याउलट, सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊन देखील जो विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन उन्मत्त इंद्रियांच्या सांगण्याप्रमाणे वागेल; आणि
104-3
तिही यज्ञभाविकी सुरी । जे हे संपत्ति दिधली पुरी । तया स्वमार्गी सर्वेश्वरी । न भजेल तो ॥104॥
यज्ञानी संतुष्ट झालेल्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे, त्या संपत्तीच्या द्वारा जो स्वधर्माने ईश्वराला भजणार नाही,
105-3
अग्निमुखी हवन । न करील देवतापूजन । प्राप्त वेळे भोजन । ब्राह्मणांचे ॥105॥
जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही, देवतापूजन करणार नाही, यथाकाळी परमार्थाच्या मार्गावरून वाटचाल करणाऱ्यास (ब्राम्हनांस) जो भोजन देणार नाही,
106-3
विमुखु होईल गुरुभक्ती । आदरु न करील अतिथी । संतोषु नेदील ज्ञाती । आपुलिये ॥106॥
जो गुरुभक्ती करणार नाही, अंतःकरणापासून अतिथींचा आदर करणार नाही, मानवजातीला संतोष देणार नाही,
107-3
ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणे प्रमत्तु । केवळ भोगासक्तु । होईल जो ॥107॥
अशा प्रकारे जो स्व धर्माचे आचरण करणार नाही, जो सम्पन्नतेमुळे उन्मत्त होऊन केवळ विषयभोगांमध्ये आसक्त होईल,
108-3
तया मग अपावो थोरु आहे । जेणे ते हातीचे सकळ जाये । देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगू ॥108॥
त्याला मोठमोठे अपाय होतील. त्यामुळे त्याच्याजवळ असलेले सर्व ऎश्वर्य नाहीसे होईल. त्याला प्राप्त असलेले भोगही तो भोगू शकणार नाही.
109-3
जैसे गतायुषीं शरीरी । चैतन्य वासु न करी । का निदैवाचां घरी । न राहे लक्ष्मी ॥109॥
जसे आयुष्य संपलेल्या शरीरात जीवात्मा राहत नाही किंवा दैवहीन माणसाच्या घरात लक्ष्मी राहत नाही,
110-3
तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला । जैसा दीपासवे हरपला । प्रकाशु जाय ॥110॥
ज्याप्रमाणे दिवा मालविला की प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे स्वधर्म जर लोप पावला, तर सुखाचा प्रकाश नाहीसा होऊन दुःखाचा अंधकार पसरतो.
111-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हे फुडे । विरंचि म्हणे ॥111॥
याप्रमाणे जो स्वधर्मचा त्याग करतो, त्याचे स्वातंत्र्य नष्ट होते. प्रजाजन हो ! हे नीट ऐका (समजून घ्या), असे ब्रम्हदेव म्हणाले.
112-3
म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयाते काळु दंडील । चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयांचे ॥112॥
म्हणून स्वधर्मचा जो त्याग करील, त्याला काळच शिक्षा करील आणि हा चोर आहे, असे जाणून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल.
113-3
मग सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयाते । रात्रिसमयी स्मशानाते । भूते जैशी ॥113॥
रात्र झाली की, ज्याप्रमाणे पिशाच्य स्मशान व्यापून टाकतात, त्याप्रमाणे सर्व पापे अशा माणसाला पछाडतात.
114-3
तैशी त्रिभुवनींची दुःखे । आणि नानाविध पातके । दैन्यजात तितुके । तेथेचि वसे ॥114॥
त्याप्रमाणे त्रिभुवनातील विविध दुःखे, नाना तऱ्हेची पातके, सर्व दारिद्रे त्या स्वधर्माने न वागणाऱ्या माणसाजवळ राहतात.
115-3
ऐसे होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापां रुदता । परी कल्पांतीही सर्वथा । प्राणिगण हो ॥115॥
प्रजाजन हो ! याप्रमाणे त्या उन्मत्त माणसाला दुःख भोगावे लागते. बाबांनो ! त्याने कितीही आक्रोश केला, तरी कल्पाच्या अंतापर्यंतदेखील (युगा) त्याची त्यातून सुटका होत नाही.
116-3
म्हणोनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रिये बरळो नेदावी । ऐसे प्रजांते शिकवी । चतुराननु ॥116॥
म्हणून स्वधर्म आचरण सोडू नये आणि इंद्रियांना भलत्याच मार्गाने जाऊ देऊ नये. याप्रमाणे ब्रम्हदेव प्रजेला समजावून सांगू लागले.
117-3
जैसे जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणी मरण मांडे । हा स्वधर्मु तेणे पाडे । विसंबों नये ॥117॥
ज्याप्रमाणे एखाद्या (जलचर प्राणी) माश्याला पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मरण येते त्यप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो, म्हणून त्याने स्वधर्म कधीहि सोडू नये.
118-3
म्हणोनि तुम्ही समस्ती । आपुलालिया कर्मी उचिती । निरत व्हावे पुढतपुढती । म्हणिपत असे ॥118॥
म्हणून तुम्ही सर्वानी आपल्या स्वधर्माप्रमाणे निरंतर कर्मे करावीत, हे मी पुनः पुनः सांगत आहे, असे ब्रम्हदेव म्हणाले.
119-3
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यते सर्वकिल्बिषैः ।
भुङजते ते त्वघं पापा ये पचंत्यात्मकारणात् ॥3.13॥
भावार्थ :-
यज्ञातील शेष राहिलेले अन्न खाणारे महान पुरुष सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतात. आणि जे पापी लोक आपल्या शरीर पोषणाकरताच भोजन करतात, ते तर अन्नाच्या रूपाने केवळ पापच भक्षण करत असतात.
देखा विहित क्रियविधी । निर्हेतुका बुद्धी । जो असतिये समृद्धी । विनियोगु करी ॥119॥
पाहा, जो विहित कर्म अनासक्त बुद्धीने करतो आणि आपल्या संपत्तीचा विनियोग स्वधर्मासाठी करतो,
120-3
गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरी भजे द्विजी । निमितादिकी यजी । पितरोद्देश ॥120॥
जो गुरूंची मनोभावे सेवा करतो, स्वगोत्रातील लोकांवर उपकार करतो, अग्नीची पूजा करतो, योग्य प्रसंगी ब्राम्हणांची सेवा करतो आणि पितरांच्या करिता श्राद्धादि नैमित्तिक कर्मे करतो;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-3
या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशी हवन करिता । हुतशेष स्वभावतः । उरे जे जे ॥121॥
या सर्व विहित, उचित अशा यज्ञाकर्माच्या रूपाने यज्ञभोक्ता ईश्वराच्या ठिकाणी हवन करून जे जे यज्ञशेष सहज राहील,
122-3
ते सुखे आपुला घरी । कुटुंबेसी भोजन करी । की भोग्यचि ते निवारी । कल्मषाते ॥122॥
ते सुखा-समाधानाने जो कुटुंबासह सेवन करतो; त्या सेवणामुळेच त्याची सर्व पापे नाहीसे होतात.
123-3
ते यज्ञावशिष्ट भोगी । म्हणोनि सांडिजे तो अधीं । जयापरी महारोगी । अमृतसिद्धी ॥123॥
ज्याप्रमाणे अमृताच्या सेवनाने महारोग नाहीसे होतात, त्याप्रमाणे यज्ञातील अवशेष जो भोगतो (किंवा त्याचे सेवन जो करतो) त्याची सर्व पातके (दुःख) नाहीसे होतात.
124-3
का तत्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥124॥
अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ माणसाला भ्रांतीपासून यत्किंचितही बाधा होत नाही, त्याप्रमाणे यज्ञशेष सेवन करणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही.(करणाऱ्यास दोष लागत नाही)
125-3
म्हणोनि स्वधर्मे जे अर्जे । ते स्वधर्मेचि विनियोगिजे । मग उरे ते भोगिजे । संतोषेंसी ॥125॥
म्हणून स्वधर्माच्या आचरणाने जे मिळेल, त्याचा विनियोग (खर्च करावे) स्वधर्मासाठीच करावा. मग जे शिल्लक राहील, त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा.
126-3
हे वाचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा । ऐसी आद्य ही कथा । मुरारी सांगे ॥126॥
हे अर्जुना ! अशा या नियमाशिवाय (वागण्याखेरीज) दुसऱ्या तऱ्हेने वागू नये (अन्य आचरण करू नये). अशी ही पुरातन काळापासूनची कथा भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. (किंवा सांगितली आहे)
127-3
जे देहचि आपणपे मानिति । आणि विषयाते भोग्य म्हणती । यापरते न स्मरती । आणिक काही ॥127॥
आपण म्हणजे देह आहोत असे जे मानतात आणि विषयांना हे भोग्य समजतात आणि ज्यास यापलीकडे दुसरी काहीचं कल्पना नसते (काहीच जाणत नाहीत),
128-3
हे यज्ञोपकरण सकळ । नेणसांते बरळ । अहंबुद्धी केवळ । भोगू पाहती ॥128॥
ते बहकलेले लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असे न समजता, त्या सर्व संपत्तीचा केवळ (देहाच्या ठिकाणी अहंकार बुद्धी ठेऊन) स्वतःसाठी भोग घेण्यास प्रवृत्त होतात,
129-3
इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके । ते पापिये पातके । सेविती जाण ॥129॥
इंद्रियांना आवडणारे चविष्ट पदार्थ तयार करतात आणि त्याचे सेवन करतात, ते पापी लोक जणू काही (वस्तुतः या पदार्थाच्या रूपाने) पातकांचेच सेवन करत असतात.असे समज.
130-3
जे संपत्तिजात आघवे । हे हवनद्रव्य मानावे । मग स्वधर्मयज्ञे अर्पावे । आदिपुरुषी ॥130॥
वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे, ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी सामग्री आहे, असे समजावे. मग ती संपत्ती स्वधर्मयज्ञाने आदिपुरुषाला अनासक्त भावनेने अर्पण करावी.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-3
हे सांडोनिया मूर्ख । आपणपेयांलागी देख । निपजविती पाक । नानाविध ॥131॥
हे सर्व न जाणता अज्ञानी लोक स्वतःच्या भोगाकरिता नाना प्रकारचे अन्नाचे पदार्थ निर्माण करतात.
131-3
जिही यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये । ते हे सामान्य अन्न न होये । म्हणोनिया ॥132॥
ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीस जातो आणि परमेश्वरही संतोष पावतो, ते हे अन्न कमी योग्यतेचे नाही. म्हणून,
132-3
हे न म्हणावे साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । जे जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥133॥
या अन्नाला साधारण, सामान्य समजू नये. अन्न हे ब्रम्हरूप आहे असे समज; कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे.
अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नस्संभवः ।
यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥3.14॥
भावार्थ :-
अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात, अन्नाची उत्पत्ती पावसापासून होते, पाऊस हा यज्ञापासून उत्पन्न होतो आणि तो यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारा आहे.
133-3
अन्नस्तव भूते । प्ररोह पावति समस्ते । मग वरिषु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे ॥134॥
अन्नपासून सर्व प्राणिमात्रांची वाढ होत असते आणि पावसापासून सर्व ठिकाणी अन्न निर्माण होत असते.
134-3
त्या पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञाते प्रगटी कर्म । कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥135॥
त्यापावसाची उत्पत्ती यज्ञापासून होते. तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो; कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रम्हापासून होते.
कर्म ब्रह्मोद्बभवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं ।
तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं ॥3.15॥
भावार्थ :-
कर्म हे वेदांपासून उत्पन्न झालेले आहे, हे जाण. वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत; म्हणून सर्वव्यापी परमात्मा सदैव यज्ञामध्ये प्रतिष्टीत असतो.
135-3
मग वेदांते परापर । प्रसवतसे अक्षर । म्हणऊनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥136॥
ह्या वेदांची उत्पत्ती अविनाशी अशा ब्रह्मपासून होते; म्हणून हे चराचर विश्व ब्रह्ममध्ये सामावलेले आहे.
136-3
परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुती । ऐके सुभद्रापती । अखंड गा ॥137॥
हे सुभद्रापती अर्जुना ! ऐक. कर्माचे मूर्त स्वरूप जो यज्ञ, या यज्ञामध्ये सर्व वेद तात्पर्यरूपाने निरंतर राहत असतात.
137-3
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवती ॥3.16॥
भावार्थ :-
हे अर्जुना, परमेश्वरापासून सुरु झालेल्या त्या स्वधर्मरूप चक्राला अनुसरून जो वागत नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय. तो विषयांच्या ठिकाणी रममाण होऊन आपले आयुष्य व्यर्थ घालवितो.
138-3
ऐशी आदि हे परंपरा । संक्षेपे तुज धनुर्धरा । सांगितली या अध्वरा । लागौनिया ॥138॥
हे धनुर्धरा ! याप्रमाणे ही मुळातील कार्यकारण परंपरा तुला या स्वधर्म- यज्ञाकरता संक्षेपाने सांगितली.
139-3
म्हणून समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकी इये ॥139॥
म्हणून जो उन्मत्त असलेला मनुष्य या लोकांमध्ये उचित अशा या स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही,
140-3
तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी॥जो कुकर्मे इंद्रियांसी । उपेगा गेला ॥140॥
जो वाईट कर्माचे आचरण करून इंद्रियांचे लाड पुरवितो, तो केवळ पापांच्या राशी असून भूमीला केवळ भार आहे, असे समज.
141-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ते जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसे का अभ्रपटळ । अकाळींचे ॥141॥
जसे भलत्याच वेळेला आलेली ढगांची फळी (आकाशात जमलेले ढग) निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे हे अर्जुना ! त्या उन्मत्त मनुष्याचे जन्म व कर्म सर्व निष्फळ असतात.
142-3
का गळा स्तन अजेचे । तैसे जियाले देखे तयाचे । जया अनुष्ठान स्वधर्माचे । घडेचिना ॥142॥
किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे (स्वधर्माचे) आचरण होत नाही त्याचे जगणे म्हणजे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज.
143-3
म्हणोनि ऐके पांडवा । हा स्वधर्मु कवणे न संडावा । सर्वभावे भजावा । हाचि एकु ॥143॥
म्हणून पांडवा ! ऐक. हा स्वधर्म कोणीही सोडू नये. सर्व भावाने (भावाने :- काया,वाचा,मना पासून) स्वधर्माचे आचरण करावे.
144-3
हा गा शरीर जरी जाहले । तरी कर्तव्य वोघें आले । मग उचित का आपुले । वोसंडावे ॥144॥
असे पाहा की, शरीर जरी आपणास मिळाले आहे, तरी ते पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे (म्हणजेच त्यामागे कर्तव्यकर्म आलेच असा अर्थ), तर मग आपणास विहित असलेले कर्म आपण का बरे त्यागावे ? ?
145-3
परिस पा सव्यसाची । मूर्ती लाहोनि देहाचि । खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ॥145॥
हे अर्जुना ! मनुष्यशरीर प्राप्त झाले असता, जे लोक कर्म करण्याचा कंटाळा करतात, ते लोक अज्ञानी आहेत.
146-3
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते ॥3.17॥
भावार्थ :-
परंतु जो मनुष्य आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेला असतो, तो आत्मनंदाने तृप्त व संतुष्ट असतो, त्याला कोणतेही कर्तव्य कर्म राहत नाही.
देखे असतेनि देहकर्मे । एथ तोचि एकु न लिंपे कर्मे । जो अखंडित रमे । आपणपांचि ॥146॥
जो आत्मस्वरूपामध्ये (निरंतर आपल्या स्वरूपामध्ये गढलेला) अखंड रममाण असतो, तो आपल्या देह-इंद्रियांचे स्वाभाविक कर्म चालू असताना देखील त्यामध्ये लिप्त होत नाही.
147-3
जे तो आत्मबोधे तोषला । तरी कृतकार्यु देखे जाहला । म्हणोनि सहजे सांडवला । कर्मसंगु ॥147॥
कारण कि, पाहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो; म्हणून त्याचा कर्माशी संबंध सुटलेला असतो.
148-3
नैव तस्य कृतेनार्थो माकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥3.18॥
भावार्थ :-
या लोकी त्याला कर्म केल्याने अथवा न केल्याने काही लाभ नाही. त्याला कोणत्याही प्राण्यापासून काही लाभ साधवयाचा नसतो.
तृप्ती झालिया जैसी । साधने सरती आपैसी । देखे आत्मतुष्टी तैसी । कर्मे नाही ॥148॥
पाहा, ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप आपोआप संपतो, त्याप्रमाणे आनंदस्वरूप आत्मतत्वाशी एकरूप झाल्यावर कर्म करण्याचे प्रयोजनच शिल्लक राहत नाही.
149-3
जंववरी अर्जुना । तो बोध भेटेना मना । तवचि यया साधना । भजावे लागे ॥149॥
हे अर्जुना ! जोपर्यँत आत्मज्ञान प्राप्त होत नाही, तो पर्यंत कर्मादी साधने करावी लागतात.
तस्मादसक्तः सततं कार्य कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन् कर्म पमाप्नोति पुरूषः ॥3.19॥
भावार्थ :-
म्हणून कर्मफळाविषयी सदैव अनासक्त राहून उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म कर. अनासक्त राहून कर्म करणारा पुरुष परमात्म्याला प्राप्त होतो.(मोक्षपद मिळवितो)
150-3
म्हणऊनि तू नियतु । सकळ कामरहितु । होऊनिया उचितु । स्वधर्मे रहाटे ॥150॥
म्हणून सदैव फळाची आशा त्यागून तू उचित अशा आपल्या स्वधर्माचे आचरण कर.
151-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
जे स्वकर्मे निष्कामता । अनुसरले पार्था । कैवल्य पर तत्वता । पातले जगी ॥151॥
हे पार्था ! जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात, ते श्रेष्ठ अशा कैवल्यपदाला प्राप्त होतात.
152-3
कर्मणैव हि संसिद्धीमास्थिता जनकादयः ।
लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि ॥3.20॥
भावार्थ :-
कारण, आसक्ती रहित कर्म करूनच जनकादिकांना सिद्धी प्राप्त झाली. यासाठी तू सुद्धा लोकसंग्रहाकडे (लोकहिताकडे) लक्ष देऊन कर्मच करणे योग्य आहे.
देखे पा जनकादिक । कर्मजात अशेख । न सांडिता मोक्षसुख । पावते जाहले ॥152॥
असे पाहा की, कर्माचा मुळीच त्याग न करता, जनकादिकांना मोक्षाचे सुख प्राप्त झाले.
153-3
याकारणे पार्था । होआवी कर्मी आस्था । हे आणिकाही एका अर्था । उपकारेल ॥153॥
हे अर्जुना ! यासाठी कर्म करण्याविषयी तू आस्था ठेव. कारण त्या आस्थेपासुन आणखी एक उपयोग होणार आहे.
154-3
जे आचरता आपणपेया । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेचि ॥154॥
त्या कर्माचे आचरण केले असता या लोकांना तसे आचरण करण्याची सवय लागेल, आणि कर्मलोपाने होणारी दुःखे सहजच नाहीशी होतील.
155-3
देखे प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरले । लोकालागी ॥155॥
असे पाहा की, जे कृतकृत्य झाले आहेत आणि निष्काम स्थितीला पोहचले आहेत, (म्हणजे मिळवायचे ते ज्यांनी मिळविले व निरिच्छ झाले), त्या महान पुरुषांनादेखील लोकांना सदाचाराच्या मार्गाकडे आणण्यासाठी कर्म करावे लागते.
156-3
मार्गी अंधासरिसा । पुढे देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनि ॥156॥
आंधळ्या माणसाला सांभाळून नेणारा डोळस माणूस हा आंधळ्या माणसाप्रमाणे सावकाश चालत असतो, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाने सादाचाराने आणि धर्माचे आचरण करून अज्ञानी माणसास मार्ग दाखवावा.
157-3
हा गा ऐसे जरी न कीजे । तरी अज्ञाना काय वोजे । तिही कवणेपरी जाणिजे । मार्गांते या ॥157॥
ज्ञानी माणसाने धर्माचे आचरण करून धर्माचा मार्ग सांगितला नाही, तर अज्ञानी माणसाला कसे बरे समजेल ? त्यांनी कोणत्या मार्गाने या धर्माला जाणावे ?
(आपल्याला योग्य असलेला मार्ग त्यांना कसे बरे समजेल)
यद् यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥3.21॥
भावार्थ :-
श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, त्याचेच अनुकरण इतर लोक करतात. तो पुरुष जे काही प्रमाण मानतो, लोकदेखील त्याला अनुसरून वर्तन करतात.
158-3
एथ वडील जे जे करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥158॥
या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात; आणि इतर सामान्य लोक त्याचेच आचरण करतात.
159-3
हे ऐसे असे स्वभावे । म्हणोनि कर्म न संडावे । विशेषे आचरावे । लागे संती ॥159॥
जगाचा असा स्वभावच आहे. म्हणून श्रेष्ठ लोकांनी (ज्ञानी पुरुषाने) कर्माचा त्याग करू नये. एवढेच नाही, तर संतांनी तर त्यांचे आचरण जगाच्या कल्याणासाठी विशेष काळजीने केले पाहिजे.
न मे पार्थस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥3.22॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! या त्रैलोक्या मध्ये मला कर्तव्य असे काही नाही, किंवा प्राप्त न झालेली अशी गोष्ट मला प्राप्त करावयाची राहिलेली नाही, तरीपण मी कर्म करतच आहे.
160-3
आता आणिकाचिया गोठी । तुज सांगो काय किरीटी । देखे मीचि इये राहाटी । वर्तत असे ॥160॥
हे अर्जुना ! आता आणखी गोष्टी (दुसऱ्याच्या गोष्टी) तुला कशाला सांगू ? मी देखील कर्ममार्गाने वागतो, हे प्रत्येक्ष बघ.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-3
काय सांकडे काही माते । की कवणे एके आर्ते । आचरे मी धर्माते । म्हणसी जरी ॥161॥
मला काही कमी आहे किंवा कोणत्या एखाद्या फळाची इच्छा धरून मी धर्माचे आचरण करत आहे, असे जर म्हणशील,
162-3
तरी पुरतेपणालागी । आणिकु दुसरा नाही जगी । ऐसी सामुग्री माझा अंगी । जाणसी तू ॥162॥
तर पूर्णतेच्या दृष्टीने पहिले असता माझ्यासारखा दुसरा जगात कोणीही नाही; किंवा सर्व प्रकारचे सामर्थ्य माझ्यामध्ये वसलेले आहे, हे तू जाणतोस.
163-3
मृत गुरूपुत्र आणिला । तो तुवा पवाडा देखिला । तोही मी उगला । कर्मी वर्ते ॥163॥
मी आपल्या (संदीपनी) गुरूचा मेलेला मुलगा परत आणून दिला, तो पराक्रम तू पहिला आहेस. तो मी इतका सामर्थ्य संपन्न असूनही कर्ममार्गाचे आचरण करतो.
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तंते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥3.23॥
भावार्थ :-
हे पार्था ! जर मी सावधपणे कर्मे केले नाहीत, तर लोक देखील माझ्या वागण्याचे आचरण करतील.
164-3
परी स्वधर्मी वर्ते कैसा । साकांक्षु का होय जैसा । तयाचि एका उद्देशा – । लागोनिया ॥164॥
जसा सकाम पुरुष केवळ एका फळाच्या उद्देशानेच तत्पर असतो, त्या तत्परतेने मी स्वधर्म आचरण करीत असतो.
165-3
जे भूतजात सकळ । असे आम्हाचि आधीन केवळ । ते न व्हावे बरळ । म्हणोनिया ॥165॥
कारण सर्व प्राणीसमूह आमच्या आधीन आहेत. मी जसे कर्म करतो, तेही करतात. तरी हे लोक कर्मभ्रष्ट होऊ नयेत; म्हणून मी सदैव कर्ममार्ग आचरीत असतो.
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्या कर्म चेदहम् ।
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥3.24॥
भावार्थ :-
जर मी कर्म करणार नाही, तर हे सर्व लोक भ्रष्ट होतील; आणि मी वर्णसंकर करणारा होईन, व या लोकाचा नाश करण्यास मी कारण होईन.
166-3
आम्ही पूर्णकाम होऊनी । जरी आत्मस्थिती राहुनी । तरी हे प्रजा कैसेनि । निस्तरेल ॥166॥
जर आम्ही निरिच्छ होऊन आत्मस्थितीत शांतपणे बसून राहिलो, तर ही प्रजा भवसागरातून कशी पार पडेल ? ?
167-3
इही आमुची वास पाहावी । मग वर्तती परी जाणावी । ते लौकिक स्थिती अवघी । नासिली होईल ॥167॥
प्रजेने आमच्या मार्गाकडे पाहावे आणि आचरणाची पद्धत समजून घ्यावी, असा प्रकार असल्यामुळे आम्ही जर कर्माचा त्याग केला, तर लोकांचे जीवन सर्व प्रकारे बिघडून जाईल.
168-3
म्हणोनि समर्थु जो एथे । आथिला सर्वज्ञते । तेणे सविशेषे कर्माते । त्यजावे ना ॥168॥
म्हणून या लोकी जो समर्थ आहे आणि सर्वज्ञान संपन्न आहे, त्याने विशेष करून कर्माचा त्याग कधी करू नये.
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वंति भारत ।
कुर्याद्विवांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकलोसंग्रहम् ॥3.25॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! ज्याप्रमाणे अज्ञानी लोक कर्माच्या ठिकाणी आसक्त होऊन कर्म करतात, त्याप्रमाणे लोकसंग्रहांची इच्छा करणाऱ्या ज्ञानी पुरुषाने अनासक्त होऊन कर्मे करावीत.
169-3
देखे फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा । कर्मी बहरु होआवा तैसा । निराशाही ॥169॥
असे पाहा की, फळाच्या आशेने सकाम पुरुष जेवढ्या उत्सहाने कर्माचे आचरण करतो, तेवढ्या उत्सहाने फलाशा नसलेल्या पुरुषांनीही कर्मे केली पाहिजेत.
170-3
जे पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणऊनिया ॥170॥
कारण अर्जुना ! लोकांचे हे आचरण सर्व प्रकारे नेहमी जतन करून ठेवणे योग्य असते. म्हणून,
171-3
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
मार्गाधारे वर्तावे । विश्व हे मोहरे लावावे । अलौकिक नोहावे । लोकांप्रति ॥171॥
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्ममार्गाचे आचरण करून सर्वाना सन्मार्ग दाखवावा आणि आपण सामान्य लोकांप्रमाणे राहून आपले जीवन आचरावे.आपले अलौकिकत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये.
न बुद्धिभेदं जनयेदज्ञाना कर्मसंगिनाम् ।
जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन् ॥3.26॥
भावार्थ :-
ज्ञानी पुरुषाने कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकाचा बुद्धिभेद करू नये; तर आपण स्वतः परमेश्वराशी एकरूप होऊन सर्व कर्मे उत्तम प्रकारे करावीत आणि अज्ञानी लोकांकडूनही तशीच करवून घ्यावीत.
172-3
जे सायासे स्तन्य सेवी । ते पक्वान्ने केवी जेवी । म्हणोनि बाळका जैशी नेदावी । धनुर्धरा ॥172॥
लहान बालक मोठ्या प्रयत्नाने आईचे दूध पिते, तो पक्वान्ने कसे बरे खाईल ? ? म्हणून अर्जुना ! ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलांना देऊ नयेत;
173-3
तैशी कर्मी जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळता । आदिकरूनी ॥173॥
त्याप्रमाणे ज्याच्या अंगी कर्मे चांगल्या तऱ्हेने करण्याची योग्यता नाही (शास्त्रात सांगितल्या प्रमाणे कर्मे न करणाऱ्या), त्याना कौतुकानेदेखील नैष्कर्म्यता सांगू नये.
174-3
तेथे सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मींही दावावी । आचरोनि ॥174॥
त्यांना योग्य कर्माची वागणूक लावून देणे हे योग्य आहे. त्यांच्याजवळ सतक्रियेची स्तुती करावी आणि निष्काम पुरुषाने सतकर्माचे आचरण करून दाखवावे.
175-3
तया लोकसंग्रहालागी । वर्तता कर्मसंगी । तो कर्मबंधु आंगी । वाजेलना ॥175॥
सत्पुरुषाने लोकांच्या कल्याणासाठी जरी कर्मे केली, तरी त्याला कर्माचे बंधन लागत नाही.
176-3
जैसी बहुरूपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाही मनी । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥176॥
बहुरुप्याने जरी राजा-राणीची सोंगे घेतली, तरीपण त्याच्या मनात स्त्री आणि पुरुष हा भाव मुळीच नसतो. लोकांची समजूत मात्र ते तसेच असल्याची होते. त्याप्रमाणे लोक कल्याणासाठी निष्काम पुरुष जरी कर्म करीत असला, तरी त्याला कर्माचे कोणतेही बंधन लागत नाही.
प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहंकारविमूढात्मा कर्ताहं इति मन्यते ॥3.27॥
भावार्थ :-
सर्व कर्मे प्रकृतीच्या (सात्विक, राजस, तामस) गुणांकडून केली जातात; परंतु अहंकाराने ज्याचे मन (अंतःकरण) अज्ञानी झाले असा पुरुष या कर्माचा ” मीच कर्ता ” असे मानतो.
177-3
देखे पुढिलाचे वोझे । जरी आपुला माथा घेईजे । तरी सांगे का न दाटिजे । धनुर्धरा ॥177॥
हे धनुर्धरा ! असे पाहा की, दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले, तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का ? तूच सांग.
178-3
तैसी शुभाशुभे कर्मे । जिये निफजति प्रकृतिधर्मे । तिये मूर्ख मतिभ्रमे । मी कर्ता म्हणे ॥178॥
त्याचप्रमाणे प्रकृतीच्या गुणाने जी बरी-वाईट कर्मे निर्माण होतात, ती अज्ञानी मनुष्य, बुद्धीभ्रंशामुळे, ” मी करतो ” असे म्हणत असतो.
179-3
ऐसा अहंकाराधिरूढ । एकदेशी मूढ । तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥179॥
अशा अहंकाराच्या घोडयावर आरूढ झालेल्या आणि स्वतःला मर्यादित समजणारा जो अज्ञानी आहे, त्याच्या बुद्धीला हे गूढ तत्वज्ञान सांगू नये.
180-3
हे असो प्रस्तुत । सांगिजेल तुज हित । ते अर्जुना देऊनि चित्त । अवधारी पा ॥180॥
अर्जुना ! सध्या हा विषय इथेच राहू दे. आता तुला मी हिताची गोष्ट सांगणार आहे. तरी चित्त एकाग्र करून त्याचे श्रवण कर.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तत्ववित् तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणाः गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥3.28॥
भावार्थ :-
परंतु हे महाबाहो अर्जुना ! गुणविभाग व कर्मविभाग यांचे तत्व रहस्य जाणणारा (गुण व तत्व हे विभाग आपल्याहून भिन्न आहेत, असे जाणणारा) आत्मज्ञानी पुरुष सर्व गुण (इंद्रिय) गुंणाच्या (विषयांच्या) ठिकाणी प्रवृत्त होतात, असे समजून आसक्त होत नाही.
181-3
जे तत्वज्ञियांचा ठायी । तो प्रकृतिभावो नाही । जेथ कर्मजात पाही । निपजत असे ॥181॥
ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे निर्माण होतात, तो प्रकृतीचा विकार आत्मज्ञानी पुरुष्याच्या ठिकाणी असत नाही.
182-3
ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्मे वोलांडुनी । साक्षिभूत होऊनी । वर्तती देही ॥182॥
तो आत्मज्ञानी देहाचा अभिमान टाकून, गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी कर्मे यांना ओलांडून देहाच्या ठिकाणी साक्षीत्वाने राहतात.
183-3
म्हणूनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नाकळती । जैसा का भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥183॥
सूर्य ज्याप्रमाणे प्राणीमत्र्यांच्या बऱ्या-वाईट व्यवहाराने लिप्त होऊन जात नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषाने देह धारण केला असला, तरी तो देहकर्मानी बध्द होत नाही.
प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥3.29॥
भावार्थ :-
प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेला पुरुष गुण व कर्म यात आसक्त होत असतात. अशा अज्ञानी लोकाचा आत्मज्ञानी पुरुषाने बुद्धिभेद करू नये.
184-3
एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमे घेपे । प्रकृतिचेनि आटोपे । वर्ततु असे ॥184॥
या जगामध्ये जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागत असतो, तो कर्मात बध्द होतो.
185-3
इंद्रिये गुणाधारे । राहाटती निजव्यापारे । ते परकर्म बलात्कारे । आपादी जो ॥185॥
गुंणाच्या योगाने इंद्रिय आपआपली कर्मे करतात. त्यागुणांनी (सात्विक, तामस, राजस) केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळेच आपल्याकडे घेतो, कर्मामध्ये बध्द होऊन राहतो.
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याद्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगत्ज्वरः ॥3.30॥
भावार्थ :-
चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेऊन सर्व कर्मे मला समर्पण करून आशारहित, ममतारहित होऊन आणि शोकरहित होऊन युद्ध कर.
186-3
परी उचिते कर्मे आघवी । तुवा आचरोनि मज अर्पावी । परी चित्तवृत्ती न्यासावी । आत्मरूपी ॥186॥
सर्व विहित कर्म उत्तम प्रकारे करून ती मला अर्पण कर; परंतु चित्तवृत्ती मात्र सदैव आत्मस्वरूपी स्थिर कर.
187-3
हे कर्म मी कर्ता । का आचरेन या अर्था । ऐसा अभिमानु झणे चित्ता । रिगो देसी ॥187॥
‘मी या कर्माचा कर्ता आहे’ अमुक एक कारणसाठी (फळासाठी) मी हे कर्म करीत आहे, असा अभिमान कदाचित तुझ्या मनात येईल, तर तू येऊ देऊ नकोस.
188-3
तुवा शरीरपरा नोहावे । कामनाजात सांडावे । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥188॥
तू शरीराच्या स्वाधीन राहू नकोस. सर्व इच्छांचा त्याग कर आणि योग्य वेळी सर्व भोगांचा उपभोग घे.
189-3
आता कोदंड घेऊनि हाती । आरूढ पा इये रथी । देई आलिंगन वीरवृत्ती । समाधाने ॥189॥
आता तू आपल्या हातात धनुष्य घे रथावर आरूढ हो आणि समाधानाने विरवृत्तीचा स्वीकार कर.
190-3
जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानु वाढवी । मग भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥190॥
या जगामध्ये तू आपली कीर्ती रूढ कर, स्वधर्मचा मान वाढव; आणि या पृथ्वीला दुष्टांचा भारापासून तू सोडव.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-3
आता पार्था निःशंकु होई । या संग्रामा चित्त देई । एथ हे वाचूनि काही । बोलो नये ॥191॥
हे अर्जुना ! आता तू सर्व प्रकारचे संशय टाकून या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस.
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥3.31॥
भावार्थ :-
जे श्रद्धावान व मत्स्यरहित होऊन माझ्या या मताप्रमाणे आचरण करतील, ते देखील सर्व कर्मापासून मुक्त होतील.
192-3
हे अनुपरोध मत माझे । जिही परमादरे स्वीकारिजे । श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥192॥
हे धनुर्धरा ! या माझ्या निश्चित स्वरूपाच्या मताचा जे आदराने स्वीकार करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात,
193-2
तेही सकळ कर्मी वर्ततु । जाण पा कर्मरहितु । म्हणोनि हे निश्चितु । करणीय गा ॥193॥
ते सर्व कर्म करीत असले तरी, ते कर्मराहित असतात असे तू जाण. म्हणून माझे हे मत दृढ निश्चयाने आचरण करण्यास योग्य आहे.
ये त्वेतत्दभ्यसूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टानचेतसः ॥3.32॥
भावार्थ :-
पण जे मत्सरी लोक माझे हे मत अनुसरत नाहीत, ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ, अविवेकी आणि भ्रष्ट आहेत, असे जाणावे. त्यांचे पतन होते.
194-3
नातरी प्रकृतिमंतु होऊनी । इंद्रिया लळा देऊनी । जे हे माझे मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥194॥
जी लोक प्रकृतीच्या अधीन होऊन व इंद्रियांचे लाड पुरवून माझ्या या मताचा तिरस्कार करून त्याग करतात, (ते टाकून देतात),
195-3
जे सामान्यत्वे लेखिती । अवज्ञा करूनि देखिती । का हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणे ॥195॥
जे माझ्या मताला सामान्य समजतात, त्याचाकडे अनादर भावाने पाहतात किंवा जे वाचाळपणाने याला सामान्य वाणी म्हणतात,
196-3
ते मोहमदिरा भ्रमले । विषयविखे घारले । अज्ञानपंकी बुडाले । निभ्रांत मानी ॥196॥
ते लोक मोहरूपी अमली पदार्थाचे सेवन करून भूललेले व विष्यरूपी विषाने व्यापलेले आहेत आणि अज्ञानरूपी चिखलामध्ये फसलेले आहेत, असे निःसंशय समज.
197-3
देखे शवाचां हाती दिधले । जैसे का रत्न वाया गेले । नातरी जात्यंधा पाहले । प्रमाण नोहे ॥197॥
प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे वाया जाते अथवा जो जन्मापासून आंधळा आहे, त्याने पाहिलेले प्रमाण मानले जात नाही.
198-3
का चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा । मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥198॥
किंवा चंद्राचा उदय कावळ्याच्या उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी लोकांना हा विचार रुचनार नाही.
199-3
तैसे ते पार्था । जे विमुख या परमार्था । तयांसी संभाषण सर्वथा । करावे ना ॥199॥
हे पार्था ! जे लोक परमार्थाच्या विरुद्ध आहेत, त्यांच्याशी आत्मज्ञानासंबंधी काही बोलू नये.
200-3
म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करू लागती । सांगे पतंग काय साहती । प्रकाशाते ॥200॥
ज्याप्रमाणे पतंग कीटक दिव्याच्या प्रकाशाला सहन करू शकत नाही, त्याप्रमाणे हे लोक या उपदेशाला तर मानीत नाहीतच आणि उलट, त्याची निंदादेखील करू लागतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
201-3
पतंगा दीपी आलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण । तेवी विषयाचरण । आत्मघाता ॥201॥
पतंगाने जर दिव्याला आलिंगन दिले, तर त्याचक्षणी त्याला अचूक मरण येते, त्याप्रमाणे विषयांचा उपभोग घेणे, हे माणसाच्या नाशाला कारणीभूत होते.
(विषयाला आलिंगन देणे, त्याचा उपभोग घेण्याचा विचार सुद्धा उत्पनं होणे)
सदृश्यं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥3.33॥
ज्ञानी आपल्या स्वभावाला अनुसरून वागत असतात. महाभूते देखील आपल्या स्वभावाला अनुसरून वागतात. मग या विषयात कोणाचा हट्ट काय करेल ? ?
202-3
म्हणोनि इंद्रिये एके । जाणतेनि पुरुखे । लाळावी ना कौतुके । आदिकरूनि ॥202॥
म्हणून जाणकार,कोणीहि शहाण्या मनुष्याने या इंद्रियांचे मौजेने देखील लाड करू नयेत.
203-3
हा गा सर्पेंसी खेळो येईल । की व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल । सांगे हाळाहाळ जिरेल । सेविलिया ॥203॥
अरे, विषारी सर्पबरोबर कधी खेळता येईल काय ? किंवा वाघाशी ठेवलेली संगत काधि निटपणे शेवटास जाईल काय ? ? तूच सांग आता. हलाहल विष प्राशन केले, तर ते पचेल काय ? ?
204-3
देखे खेळता अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला । तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥204॥
सहज खेळता खेळता आग लागली आणि ती भडकली (ज्वाला भडकल्या) तर ती अटोपत नाही, (सावरता येत नाही), त्याप्रमाणे इंद्रियांना विषयांचा लळा जर लागला (त्यांचे लाड केले), तर त्याचा परिणाम कधीहि चांगला होत नाही.
205-3
एर्‍हवी तरी अर्जुना । या शरीरा पराधीना । का नाना भोगरचना । मेळवावी ॥205॥
हे अर्जुना ! एरव्ही सहज विचार करून पहिले, तर शरीर हे प्रकृतीच्या अधीन असलेले दिसून येते (परतंत्र असलेल्या शरीराकरिता). तर मग या शरीराकरिता नाना प्रकारचे भोग का म्हणून जमवावेत ? ?
206-3
आपण सायासेंकरूनि बहुते । सकळहि समृद्धिजाते । उदोअस्तु या देहाते । प्रतिपाळावे का ॥206॥
आपण अतिशय कष्ट करून मिळवलेली सर्व संपत्ती, समृद्धी खर्च करून (उत्पत्ती व नाश) नाश पावणाऱ्या या शरीराचे पालन का बरे करावे ? ?
207-3
सर्वस्वे शिणोनि एथे । अर्जवावी संपत्तिजाते । तेणे स्वधर्मु सांडुनी देहाते । पोखावे काई ॥207॥
देहाला नाना प्रकारचे कष्ट देऊन, दमून – भागून संपत्ती मिळवावी आणि स्वधर्मचा त्याग करून, नाश पावणाऱ्या या देहाचे पोषण करीत राहावे, हे योग्य आहे काय ? ?
208-3
मग हे तव पांचमेळावा । शेखी अनुसरेल पंचत्वा । ते वेळी केला के गिंवसावा । शीणु आपुला ॥208॥
हे शरीर पंचमहाभूते एकत्र येऊन तयार झाले आहे व ते शेवटी पंचमहाभूतातच विलीन होणार आहे. त्यावेळी आपण केलेले एव्हढे कष्ट कोठे बरे शोधून काढावेत ? ?
209-3
म्हणूनि केवळ देहभरण । ते जाणे उघडी नागवण । यालागी एथ अंतःकरण । देयावे ना ॥209॥
म्हणून फक्त देहाचे पोषण करणे, हे उघड उघड आपले मोठे नुकसान आहे (हे शरीर नश्वर आहे हे जाणून सुद्धा), याकरिता (मनुष्याने) तू देहाच्या पोषणाकडेच अंतःकरणापासून लक्ष देऊ नकोस.
इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ ॥3.34॥
भावार्थ :-
प्रत्येक इंद्रियांची अनुकूल-प्रतिकूल विषयाविषयी (आवड – नावड) राग – द्वेष ही ठरलेली आहेत. मनुष्याने त्या राग – द्वेषाच्या अधीन होऊ नये (ताब्यात जाऊ नये). कारण ते परमार्थाच्या मार्गात विघ्न आणणारे शत्रू आहेत.
210-3
एर्‍हवी इंद्रियाचिया अर्था – । सारिखा विषयो पोखिता । संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥210॥
एरव्ही, इद्रियांच्या इच्छेप्रमाणे सेवन केले (आचरण केले), तर मनाला संतोष प्राप्त होतो, हे खरे;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-3
परी तो संवचोराचा संगु । जैसा नावेक स्वस्थु । जव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥211॥
परंतु तो संतोष म्हणजे बाहेरून सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे; तो चोर गावाची सीमा पार करेपर्यंत गप्प असतो आणि वनात (एकटे आहोत असे समजता क्षणी) घात करून पैसे काडून घेतो.
212-3
बापा विषाची मधुरता । झणे आवडी उपजे चित्ता । परी तो परिणाम विचारिता । प्राणु हरी ॥212॥
बाबारे ! विष वरून मधुर वाटेल, मनात ते प्राशन करण्याची इच्छा सुद्धा निर्माण होईल; परंतु त्याच्या परिणामाचा विचार केला तर ते प्राणघातक आहे.
213-3
देखे इंद्रियी कामु असे । तो लावी सुखदुराशे । जैसा गळी मीनु आमिषे । भुलविजे गा ॥213॥
पाहा, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला बरोबर भुलविते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची तीव्र लालसा मनुष्यास खोट्या सुखाच्या आशेकडे प्रवृत्त करत असते.
214-3
परी तयामाजि गळु आहे । जो प्राणाते घेऊनि जाये । तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें ॥214॥
परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळ आहे, तो आपला नाश करेल, हे त्या माशाला (आमिषाने तो गळ झाकला गेल्यामुळे) ज्याप्रमाणे कळत नाही,
215-3
तैसे अभिलाषे येणे कीजेल । जरी विषयाची आशा कीजेल । तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ॥215॥
त्याप्रमाणे विषयांची लालसा निर्माण झाली, की मानवाची तशीच अवस्था होते. जर विषयांची तीव्र इच्छा धरली, तर मानवाला क्रोधरूपी अग्नीत पडावे लागते.
216-3
जैसा कवळोनिया पारधी । घातेचिये संधी । आणि मृगाते बुद्धीं । साधावया ॥216॥
ज्याप्रमाणे कुशाग्र बुद्धीचा पारधी हा हरिणाचा घात करण्यासाठी त्याला चारी बाजूने घेरून एके ठिकाणी बरोबर आणत असतो, (मराच्या कचाटीत)
217-3
एथ तैसीची परी आहे । म्हणूनि संगु हा तुज नोहे । पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणे ॥217॥
विषयांच्या सुखाचा देखील प्रकार असाच आहे. म्हणून तू विषयांची संगती करू नकोस. पार्था ! विषयांच्या मागे लागलास तर काम, क्रोध निर्माण होतात आणि हे दोन्ही (परमार्थाच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे आहेत) घात करणारे आहेत.
218-3
म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा । मनींही आठवो न धरावा । एकु निजवृत्तीचा वोलावा । नासो नेदी ॥218॥
म्हणून विषय इच्छेला थाराच देऊ नये. त्यांची मनातही आठवण आणू नये. स्वधर्माची जाणीव कधीही नष्ट होऊ देऊ नकोस.
श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनम् श्रेयः परधर्मो भयावहः ॥3.35॥
भावार्थ :-
सुलभ पद्धतीने आचरिलेल्या परम धर्मापेक्षा, स्वधर्म दिसण्यास कमी प्रतीचा (आचरण्यास कठीण) असला, तरी स्वधर्मच कल्याणप्रद होय. परधर्म हा भीतीदायक आहे, स्वधर्मात मरण आले; तरी चांगले.
219-3
अगा स्वधर्मु हा आपुला । जरि का कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखे ॥219॥
असे पाहा की, आपला स्वधर्म जरी आचरण्यास कठीण असला, तरी त्याचेच आचरण करणे चांगले होय.
220-3
येरू आचारु जो परावा । तो देखता कीर बरवा । परि आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥220॥
दुसऱ्याचा धर्म जरी दिसावयास चांगला असला, तरी आचरण करणार्यांनी आपल्या विहित कर्माचेच आचरण करावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-3
सांगे शूद्रघरी आघवी । पक्वाने आहाति बरवी । ती द्विजे केवी सेवावी । दुर्बळु जरी जाहला ॥221॥
(स्वधर्माचे आचरण करणारा) ब्रम्हज्ञान जाणणारा मनुष्य जरी गरीब असला, तरी त्याने दुसऱ्याच्या घरची पक्वान्ये कशी बरे सेवन करावीत. ? सांग.
222-3
हे अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवी इच्छिजे । अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारी पा ॥222॥
असे अनुचित कर्म कसे बरे करावे ? जे ग्रहण करण्यास योग्य नाही, त्याची (त्या अन्नाची) इच्छा कशी करावी ? अथवा इच्छा केलेला विषय प्राप्त जरी झाला, तरी त्याचे सेवन करावे का ? याचा तू विचार कर.
223-3
तरी लोकांची धवळारे । देखोनिया मनोहरे । असती आपुली तणारे । मोडावी केवी ॥223॥
दुसऱ्याची पांढरीशुभ्र मनोहर घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात ? ?
224-3
हे असो वनिता आपुली । कुरुप जरी जाहली । तरी भोगिता तेचि भली । जियापरी ॥224॥
हे असू दे. आपली धर्मपत्नी रूपाने जरी थोडी कमी असली तरी, ज्याप्रमाणे तिच्याबरोबर सुखाने संसार करावा हे चांगले;
225-3
तेवी आवडे सांकडु । आचरता जरी दुवाडु । तरी स्वधर्मचि सुरवाडु । पारत्रिकीचा ॥225॥
त्याप्रमाणे आपला स्वधर्म करण्यास कठीण जरी असला, तसेच करताना कितीही आपत्ती आली, तरी आपला स्वधर्मच परलोकी सुख देणारा आहे.
226-3
हा गा साकर आणि दूध । हे गौल्य कीर प्रसिद्ध । परी कृमीदोषीं विरुद्ध । घेपे केवीं ॥226॥
दूध आणि साखर याची गोडी सर्वाना ठाऊकच आहे, परंतु जंतांच्या रोगात (पोटाचा आजार, कृमिदोष) त्यांचा वाईट परिणाम होत असल्यामुळे, असा रोग असणाऱ्या मनुष्याने ते पदार्थ कसे बरे सेवन करावेत. ? ?
227-3
ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते आळुकीची उरेल । जे ते परिणामी पथ्य नव्हेल । धनुर्धरा ॥227॥
अर्जुना ! असे असूनही रोग्याने त्याचे सेवन केले, तर त्याचा तो हट्टच ठरेल; कारण परिणामी ते पदार्थ हितकारी होणार नाहीत.
228-3
म्हणोनि आणिकासी जे विहीत । आणि आपणपेया अनुचित । ते नाचरावे जरी हित । विचारिजे ॥228॥
म्हणून इतरांना जे विहित पण आपणास जे अयोग्य कर्म आहे, त्याचे आचरण करू नये. (हिताचा विचार केला असता त्याचे आचरण करू नये)
229-3
या स्वधर्माते अनुष्ठिता । वेचु होईल जीविता । तोहि निका वर उभयता । दिसतसे ॥229॥
स्वधर्मचे आचरण करीत असताना आपला जीव जरी अर्पण करावा लागला, तरी तो यालोकी (मृत्युलोकात) आणि परलोकात हा धर्म श्रेष्ठ मानला जातो.
230-3
ऐसे समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशार्ङगपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥230॥
सर्व देवांत श्रेष्ठ असलेले देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण ज्या वेळी असे बोलले, त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा ! माझी एक विनंती ऐका.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-3
हे जे तुम्ही सांगितले । ते सकळ कीर म्या परिसले । परी आता पुसेन काही आपले । अपेक्षित ॥231॥
तुम्ही जे सर्व आतापर्यंत सांगितले ते मी सर्व बरोबर ऐकले आहे, पण आता माझी काही विचारायची इच्छा आहे ते मी विचारतो. ॥231॥
अर्जुन उवाच:
अथ केन प्रयुकोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥3.36 ॥
232-3
तरी देवा हे ऐसे कैसे । जे ज्ञानियांचीही स्थिति भ्रंशे । मार्गु सांडुनि अनारिसे । चालत देखो ॥232॥
तरी देवा! हे आश्चर्यच आहे की ज्ञानी जे म्हणवितात ते देखिल विहित मार्ग सोडून भलत्या मार्गाने चाललेले व विहित मार्गापासून भ्रष्ट झालेले दिसतात. ॥232॥
233-3
सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती । तेही परधर्मे व्यभिचरति । कवणे गुणे ॥233॥
जे सर्वज्ञ आहेत व जे आपल्या कल्याणाचा मार्ग जाणतात तेहि स्वधर्म सोडून परधर्माने वागतांना जे दिसतात ते कशामुळे ? ॥233॥
234-3
बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणे जेसा । नावेक देखणाही तैसा । बरळे का पा ॥234॥
बी आणि कोंडा यांचा निवाडा अंधळ्याला करता येणार नाही, पण केव्हा केव्हा क्षणभर डोळस पुरुषही चुकतो ते कां ? ॥234॥
235-3
जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करिता न धाती । वनवासीही सेविती । जनपदाते ॥235॥
जे पुरुष, असलेला आप्तेष्टांचा संग सोडून दुसर्‍याचा संसर्ग लावून घेतांना पुरे म्हणत नाहीत, लोकसंसर्ग सोडून जंगलात राहायला गेलेले पुरुषही पुनः लोकातच राहू इच्छितात. ॥235॥
236-3
आपण तरी लपती । सर्वस्वे पाप चुकविती । परी बळात्कारे सुइजती । तयाचि माजी । । 236 । ।
पाप कर्मे चुकविण्यासाठी लपून बसतात (त्यापासून दूर पळतात) तेच पुन्हा पापाचरणाला वृत्त होतात. । । 236 । ।
237-3
जयांची जीवे घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जिवेसी । चुकविती ते गिंवसी । तयातेचि । । 237 । ।
ज्या पापाचा मनापासून तिटकारा करतात, त्याचाच ध्यास घेऊन बसतात. आणि ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा, तेच आपल्याला नेमके शोधीत येते. । । 237 । ।
238-3
ऐसा बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे । हे बोलावे ह्रषिकेशें । पार्थु म्हणे । । 238 । ।
अशा प्रकारे पापाचरण करण्याविषयी ज्ञानी पुरुषावर बळजोरी केली जाते, तर हा कोणाचा आग्रह आहे ? ” ते श्रीकृष्णा, कृपा करून मला सांग ” असे अर्जुन म्हणाला. । । 238 । ।
श्रीभगवानुवाच:
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥3.37 ॥
239-3
तंब ह्रदयकमळ आरामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक । । 239 । ।
ह्रदयरूपी कमलात राहणारा, योग्याच्या निष्काम मनातील कामना असलेला श्रीकृष्ण म्हणाला, ” अर्जुना, तुला ह्या प्रशनाचे समाधान करणारे उत्तर सांगतो ते ऐक. । । 239 । ।
240-3
तरी हे काम क्रोधु पाही । जयाते कृपेची साठवण नाही । हे कृतांताचां ठायी । मानिजती । । 240 । ।
तर असे पहा, हे काम-क्रोध असे आहेत की, ज्याच्या ठिकाणी अंशमात्रसुद्धा दयाबुद्धी नाही. ते केवळ काळाप्रमाणे निष्ठुर आहेत. । । 240 । ।
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-3
हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ । भजनमार्गीचे मांग । मारक जे ॥241॥
हे ज्ञानरूपी संपत्तीवर बसलेले विषारी महासर्प आहेत, विषयरूपी पर्वताच्या गुहेत राहणारे महाभयानक वाघ आहेत आणि भजनमार्गाचे ते मारेकरी आहेत.
242-3
हे देहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामीचे कोंड । यांचे व्यामोहादिक बंड । जगामाजि ॥242॥
हे देहरूपी डोंगरी किल्याचे मोठाले दगड आहेत, इंद्रियरूपी गावाच्या भोवती असलेले तट आहेत; आणि सर्व जगामध्ये भ्रम, अविचार इत्यादी उत्पन्न करण्यात ते प्रबळ आहेत.
243-3
हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे । धायपण ययांचे । अविद्या केले ॥243॥
हे मनात असलेल्या (काम, क्रोध) रजोगुणाचे परिणाम आहेत व मुळापासूनच आसुरी संपत्तीचे आहेत; यांचे पालन पोषण अविद्येने केले आहे.(अविद्येने यांना जन्म दिला आहे)
244-3
हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले । तेणे निजपद या दिधले । प्रमादमोह ॥244॥
हे रजोगुणापासून उत्पन्न झाले असले, तरी ते तमोगुणाला हे अत्यन्त प्रिय आहेत; म्हणून तमोगुणाने प्रमाद व मोह हे आपले निजपद यांना बहाल केली आहेत.
245-3
हे मृत्यूचां नगरी । मानिजति निकियापरी । जे जीविताचे वैरी । म्हणऊनियां ॥245॥
हे मानवाच्या जीवाचे मोठे शत्रू आहेत; म्हणून मृत्यूच्या नगरीत हे श्रेष्ठ मानले जातात.
246-3
जयासि भुकेलिया आमिषा । हे विश्व न पुरेचि घांसा । कुळवाडी यांची आशा । चाळित असे ॥246॥
यांना भूक लागली असता हे संपूर्ण विश्व त्यांच्या एका घासालादेखील पुरेसे पडत नाही (एक घासाचेही हे विश्व नाही). उपभोगांची इच्छा म्हणजे आशा ही त्यांची (काम, क्रोधांचा) नाशकारक व्यवहार चालवीत असते. (या व्यापाऱ्यांवर देखरेख आशा करते)
247-3
कौतुके कवळिता मुठी । जिये चौदा भुवने थेंकुटी । ते भ्रांति तिये धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥247॥
जी आपल्या लीलेने चौदा भुवने मुठीत धरू शकते, हिच्या मुठीपेक्षा चौदा भुवणेदेखील लहान आहेत, अशी ही भ्रांती या आशेची आवडती लहान बहीण आहे.
248-3
जे लोकत्रयाचे भातुके । खेळताचि खाय कवतिके । तिच्या दासीपणाचेनि बिके । तृष्णा जिये ॥248॥
ही भ्रांती खेळता खेळता तिन्ही लोक सहज खाऊन टाकते, त्या भ्रांतीच्या दासीपणाचे बळावर इच्छारुपी तृष्णा ही जगत असते.
249-3
हे असो मोहे मानिजे । याते अहंकार घेपे दीजे । जेणे जग आपुलेनि भोजे । नाचवित असे ॥249॥
हे असो, या काम क्रोधाना मोहाच्या घरी खूप मान आहे. जो अहंकार आपल्या इच्छेप्रमाणे जगाला नाचवीत असतो, तो अहंकार यांच्याशी देवाण घेवाण करतो.
250-3
जेणे सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला । तो दंभु रूढविला । जगी इही ॥250॥
ज्याने सत्याचा कोथळा फाडून त्यात असत्याचा पेंढा भरला, तो दंभ, या कामक्रोधानी जगात प्रसिद्धीस आणला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
251-0
साध्वी शांती नागवली । मग माया मांगी शृंगारिली । तियेकरवी विटाळविली । साधुवृंदे ॥251॥
या काम क्रोधाने पतिव्रता असलेल्या शांती हिला वस्त्रहीन केले; आणि मायारूपी स्त्रीला वस्त्रे अलंकारांनी सजविले. मग अशा या मायेने साधूंचा समुदाय काम क्रोधाच्या लहरीनी भ्रष्ट करून टाकला.
252-3
इही विवेकाची त्राय फेडिली । वैराग्याची खाली काढिली । जितया मान मोडिली । उपशमाची ॥252॥
यांनी विवेकाचे बळ नाहीसे केले, वैराग्याचा विचार नाहीसा केला; आणि शम-दमांची मान जिवंतपणीच मुरगळून टाकली.
253-3
इही संतोषवन खांडिले । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिले । उपडूनिया ॥253॥
यांनी मनातील संतोषरूपी वन तोडून टाकले, धैर्यरूपी किल्ले जमीनदोस्त केले व आनंदरूपी कोवळी रोपे उपटून टाकली.
254-3
इही बोधाची रोपे लुंचिली । सुखाची लिपी पुसली । जिव्हारी आगी सूदली । तापत्रयाची ॥254॥
यांनी ज्ञानाची (बोधरूपी) रोपे खुडून टाकली, सुखाची सर्व अक्षरेच पुसून टाकली; आणि माणसाच्या हृदयात विविध तापांचे निखारे प्रज्वलित केले.
255-3
हे आंगा तव घडले । जीवींचि आथी जडले । परी नातुडती गिंवसले । ब्रह्मादिका ॥255॥
काम क्रोध हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत. ते जिवाबरोबरच (चिकटून) जडलेले आहेत. या काम क्रोधाचा आतमध्ये (अंतःकरनात) शोध केला, तर ब्रह्मदिकांना देखील ते सापडत नाहीत.
256-3
हे चैतन्याचे शेजारी । वसती ज्ञानाचां एका हारी । म्हणोनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ॥256॥
हे काम क्रोध जिवात्म्याच्या जवळ असतात. ज्ञानाच्या पंक्तीला ते राहत असतात. याच्या लहरी हल्ला करायला उसळल्या, की त्या कोणालाही सावरता येत नाहीत.
257-3
हे जळेंवीण बुडविती । आगीविण जाळिती । न बोलता कवळिती । प्राणियाते ॥257॥
हे जलाशिवाय माणसाला बुडवून टाकतात, अग्नीशिवाय हे जाळून टाकतात आणि मानवाला काही समजू न देता ग्रासून टाकतात.
258-3
हे शस्त्रेविण साधिती । दोरेविण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेऊनि ॥258॥
कोणत्याही शस्त्रावाचून ठार करतात. दोरावाचून बांधतात आणि स्वतःला ज्ञानी म्हणणाऱ्या व्यक्तीला तर पैजेचा विडा उचलून ते ठार करतात
259-3
चिखलेंवीण रोविती । पाशिकेंवीण गोंविती । हे कवणाजोगे न होती । आंतौटेपणे ॥259॥
हे चिखलाशिवाय माणसाला पुरून टाकतात. कोणत्याही जाळ्यावाचून अडकवून टाकतात. हे शरीरात सूक्ष्मरूपाने राहत असल्यामुळे सर्वसाधारणपणे कोणाच्या अधीन होत नाहीत.(आटोक्यात येत नाहीत)
धूमेनाऽव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च ।
येथोल्बेनावृत्तो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥3.38॥
भावार्थ :-
ज्याप्रमाणे धुराने अग्नी आच्छादित होतो किंवा मळाने आरसा झाकून जातो अथवा वारेने गर्भ वेष्टित असतो, त्याप्रमाणे कामाने हे ज्ञान आच्छदिलेले आहे.
260-3
जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनी घेपे व्याळी । ना तरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥260॥
जसे चंदनाच्या मुळीला सर्प वेढे घालून बसलेले असतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टनाची गवसणी असते. (काम क्रोध जिवात्म्याला ग्रासलेले असतात.)
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-3
का प्रभावीण भानु । धूमेंवीण हुताशनु । जैसा दर्पण मळहीनु । कहीच नसे ॥261॥
जसा सूर्य कधी प्रकाशवाचून नसतो, धुरावाचून अग्नी असत नाही किंवा मळाशिवाय आरसा असू शकत नाही.(धुळीच्या कणांवाचून),
262-3
तैसे इहीविण एकले । आम्ही ज्ञान नाही देखिले । जैसे कोंडेनि पा गुंतले । बीज निपजे ॥262॥
ज्याप्रमाणे बी कोंड्याने आच्छादलेले असते (बी कोंड्यासकट उत्पन्न होते), त्याप्रमाणे कामक्रोधाशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेस आले नाही.

आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणतलेन च ॥3.39॥

भावार्थ :-
अर्जुना ! ज्ञानी पुरुषांचा नित्य वैरी, ज्याची पूर्तता होणे कठीण आहे, असा जो कामरूपी अग्नी त्याने ज्ञान आच्छादिले आहे.
263-3
तैसे ज्ञान तरी शुद्ध । परी इही असे प्ररुद्ध । म्हणोनि ते अगाध । होऊनि ठेले ॥263॥
वस्तुतः ज्ञान हे शुद्धच आहे; परंतु या काम-क्रोधाने हे झाकले गेले आहे. म्हणून ते प्राप्त होण्यास कठीण झाले आहे.
264-3
आधी याते जिणावे । मग ते ज्ञान पावावे । तव पराभवो न संभवे । रागद्वेषा ॥264॥
प्रारंभी साधनेने काम-क्रोधाना जिंकावे, म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होते. परंतु सामान्य माणसाकडून या काम क्रोधाचा पराभव होऊ शकत नाही
265-3.
याते साधावयालागी । जे बळ जाणिजे अंगी । ते इंधन जैसे आगी । सावावो होय ॥265॥
काम-क्रोधाना जिकण्यासाठी अंगामध्ये बळ (सामर्थ्य) आणावे, तर अग्नीला इंधन पुरवावे, तसे अग्नी अधिकच प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे अंगातील बळ काम क्रोधाना उलट साहाय्य करणारे होते.

इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैरविमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥3.40॥

भावार्थ :-
इंद्रिये, मन व बुद्धी ही (काम, क्रोध) यांचे निवासस्थान आहे असे म्हणतात. आणि मन, बुद्धी, इंद्रिये यांचे द्वारा हा काम ज्ञाना आच्छादित करतो आणि जिवात्म्याला मोहात गुंतवितो.
266-3
तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे । म्हणोनि हटियाते जिणिजे । इहीचि जगी ॥266॥
अशा रीतीने जे जे उपाय करावेत, ते सर्व उपाय ह्या काम – क्रोधांनाच साहाय्य करीत असतात; म्हणून या जगामध्ये ते हठयोग्याना सुद्धा जिंकतात.
267-3
ऐसियाही सांकडा बोला । एक उपायो आहे आहे भला । तो करिता जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥267॥
असे हे काम-क्रोध जिंकण्याला कठीण जरी असले/म्हंटले, असे बोलले जरी जात असले, तरी त्यांना जिंकण्याचा एक चांगला उपाय आहे; तो उपाय तुझ्याकडून होणार असेल,तर तुला सांगतो.

तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रहि ह्येनं ज्ञान्विज्ञाननाशनम् ॥3.41॥
भावार्थ :-
हे भरतश्रेष्ठ अर्जुना ! तू प्रारंभी इंद्रियांचे नियमन करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या पापरूपी कामाचा त्याग कर.
268-3
यांचा पहिला कुरुठा इंद्रिये । एथूनि प्रवृत्ति कर्माते विये । आधी निर्दळूनि घाली तिये । सर्वथैव ॥268॥
या काम क्रोधांचे वास्तव्य इंद्रियांच्या ठिकाणी आहे इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होते; म्हणून प्रारंभी या इंद्रियांवर विजय मिळवं.
इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धियोर् बुद्धेः परतस्तु सः ॥3.42॥
भावार्थ :-
स्थूल देहापेक्षा इंद्रिये सूक्ष्म व श्रेष्ठ आहेत. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे. मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. बुद्धीच्याही पलीकडे तो परमात्मा आहे, असे ज्ञानी म्हणतात.
269-3
मग मनाची धाव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेनि थारा मोडेल । या पापियांचा ॥269॥
असे झाले असता, मनाची विषयांकडे धावण्याची क्रिया बंद पडेल आणि बुद्धितील सर्व प्रकारचे भ्रम नाहीसे होतील.(बुद्धी मोकळी होईल). यामुळे या पाप्यांचा आश्रय नाहीसा होईल.

एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥3.43॥

भावार्थ :-
अशा प्रकारे बुद्धीतून श्रेष्ठ स्वयंप्रकाशमान परमेश्वराला जाणून, बुद्धीच्या द्वारा मनाला वश करून हे महाबाहो ! दुर्जन अशा कामरूपी शत्रूचा तू नाश कर.
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥3॥
270-3
हे अंतरीहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले । जैसे रश्मीवीण उरले । मृगजळ नाही ॥270॥
हे काम क्रोध अंतःकरणातून नष्ट झाले, तर निःसंशय गेले असे जण. ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ राहत नाही;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-3
तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले । मग तो भोगी सुख आपुले । आपणचि ॥271॥
हे काम क्रोध जर नाहीसे झाले, तर ब्रम्हरूपी स्वराज्याची प्राप्ती होते आणि तो पुरुष आपल्या शुद्ध अंतःकरणामुळे सुखाच्या राशींचा अनुभव स्वतःच घेऊ शकतो.
272-3
जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गाठी । तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणे काळी ॥272॥
हीच सद्गुरू आणि शिष्यांची गुह्य अशी गोष्ट आहे, हे जीव – ब्रम्हचे ऐक्य आहे. त्या ठिकाणी स्थिर राहून तेथून तो कधीही ढळत नाही.
273-3
ऐसे सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । राया ऐक देवदेवो । बोलता जाहला ॥273॥
संजय म्हणाला, ” हे धृतराष्ट्रा राजा ! ऐक.असे सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती, देवांचा देव जो श्रीकृष्ण तो याप्रमाणे म्हणाला.
274-3
आता पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु । सांगेल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥274॥
आता भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा सांगतील. ती कथा ऐकून अर्जुन काही प्रश्न विचारील.
275-3
तया बोलाचा हन पाडु । का रसवृत्तीचा निवाडु । येणे श्रोतया होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥275॥
या अनमोल बोलण्याची योग्यता,(भगवंताच्या बोलण्यातून स्पष्ट अनुभवास येणारे शांतादि रस) त्यातील रसवृत्ती या सर्व कारणांनी श्रोत्यांना श्रवनसुखाची समृद्धी होईल.
276-3
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा । मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोग बापा ॥276॥
निवृत्ती महाराजांचे शिष्य श्रीज्ञानेश्वर महाराज श्रोत्याना म्हणतात, शुद्ध बुद्धीने प्रतिभेचा चंद्र प्रकाशित करून श्रीकृष्ण-अर्जुनाचा हा सुखसंवाद श्रवण करा.
॥ इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकाया – कर्मयोगोनाम्
तृतीयोऽध्यायः ॥3॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 43 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 276 ॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम

सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक

सार्थ ज्ञानेश्वरी सर्व अध्याय

वारकरी ग्रंथ सूची

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading