शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय १८ वा मोक्षसंन्यासयोग:

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 18 MOKSHYASANYASYOG
Sartha Dnyaneshwari Adhyay 18 MOKSHYASANYASYOG:
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
॥ सार्थ श्रीज्ञानेश्वरी: ::॥ अथ अष्टादशोऽध्यायः अध्याय अठरावा ॥ मोक्षसंन्यासयोग ॥

सूची :- शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी

॥ सार्थ श्रीज्ञानेश्वरी: ::॥ अथ अष्टादशोऽध्यायः अध्याय अठरावा ॥ मोक्षसंन्यासयोग ॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

अध्याय अठरावा
1-18
जयजय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ । जन्मजराजलदजाळ । प्रभंजन ॥1॥
हे देवा ! तुम्ही निर्मळ असून आपल्या भक्तांचे सर्वथैव मंगल करणारे आहा. आणि जन्म व वार्धक्य एतद्रूपी मेघांचा नाश करणारे वायूच आहा. तुमचा जयकार असो. ॥1॥
2-18
जयजय देव प्रबळ । विदळितामंगळकुळ । निगमागमद्रुमफळ । फलप्रद ॥2॥
देवा ! तुम्ही सर्वात बलवान असून दुःखाचा समूळ नाश करणारे आहा. वेद व शास्त्ररुपी वृक्षांचे फळ असून लाभदायक आहा. तुमचा जयजयकार असो. ॥2॥
3-18
जयजय देव सकल । विगतविषयवत्सल । कलितकाळकौतूहल । कलातीत ॥3॥
देवा ! तुम्ही सम्पूर्ण असून ज्यांनी विषयाचा त्याग केला आहे, त्याच्यावर कृपा करणारे आहा व लीलेने कालाच्या क्रीडेस आपण कारण असून कालातीत असे पूर्ण आहा, तुमचा जयजयकार असो. ॥3॥
4-18
जयजय देव निश्चळ । चलितचित्तपानतुंदिल । जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय ॥4॥
देवा, तुम्ही अचल असून चंचल चित्ताच्या प्राशनाने तुमचे दोंद वाढले आहे आणि वरचेवर जग उत्पन्न करून क्रिया करण्याची तुम्हास आवड आहे, तुमचा जयजयकार असो. ॥4॥
5-18
जयजय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्यनिरस्ताखिलमळ । मूळभूत ॥5॥
देवा, तुमचे रूप निव्वळ शुद्ध असून तुम्ही आनंदाला स्फूर्ती देणारे व सर्व पापांचे निरसन करणारे आहा व सर्व जगाला कारणीभूत आहा, तुमचा जयजयकार असो. ॥5॥


6-18
जयजय देव स्वप्रभ । जगदंबुदगर्भनभ । भुवनोद्भवारंभस्तंभ । भवध्वंस ॥6॥
हे देवा, तुम्ही स्वयंप्रकाश आहा; तसेच जगद्रूप मेघांचे धारण करणारे आकाशच आहा; तसेच जगद्रूप उत्त्पतीचे मूळस्तंभ असून संसाराचा नाश करणारे आहा, तुमचा जयजयकार असो. ॥6॥
7-18
जयजय देव विशुद्ध । विदुदयोद्यानद्विरद । शमदममदनमदभेद । दयार्णव ॥7॥
हे देवा ! उपाधिरहित आहा व अविद्यारुपी बागेचा नाश करणारे हत्तीच आहा आणि शमदमेकरून काममदाचा नाश करणारे व दयेचा समुद्रच आहा, तुमचा जयजयकार असो. ॥7॥
8-18
जयजय देवैकरूप । अतिकृतकंदर्पसर्पदर्प । भक्तभावभुवनदीप । तापापह ॥8॥
हे देवा ! तुमचे एकच रूप असून तुम्ही कामरूपी सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणारे आहा व भाविक भक्तांचे चित्तरुपी मंदिरातील दीप आहा आणि संसारतापाचा नाश करणारे आहा, तुमचा जयजयकार असो. ॥8॥
9-18
जयजय देव अद्वितीय । परीणतोपरमैकप्रिय । निजजनजित भजनीय । मायागम्य ॥9॥
हे देवा ! तुमची असून तुमचे रूप अद्वितीय असून तुम्ही पूर्ण नम्र झालेल्या मनुष्यावर प्रेम करणारे आहा; व भजभक्ताधीन असून भजनास योग्य व मायेस अगम्य आहा, तुमचा जयजयकार असो. ॥9॥
10-18
जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो । स्वसंविद्रुमबीजप्ररो । हणावनी ॥10॥
हे देवा गुरुराया, तुम्ही कल्पनातीत वस्तूंचे कल्पवृक्ष आहा व आपल्या ज्ञानवृक्षाच्या बीजाचे उत्पत्ती स्थान, आहा, तुमचा जयजयकार असो ॥10॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


11-18
हे काय एकैक ऐसैसे । नानापरीभाषावशे । स्तोत्र करू तुजोद्देशे । निर्विशेषा ॥11॥
याप्रमाणे अनेक प्रकारच्या प्रत्यायांनी विशेषणे देण्यास योग्य नाही, असे जे सर्वविशेष भावरहित तुम्ही. त्या तुमची स्तुती किती काय ? ॥11॥
12-18
जिही विशेषणी विशेषिजे । ते दृश्य नव्हे रूप तुझे । हे जाणे मी म्हणौनि लाजे । वानणा इही ॥12॥
ज्या विशेषणाने तुमची स्तुती करावी, ते तुमचे स्पष्ट रूप नव्हे, हे मी जाणतो, म्हणून तुमच्या ह्या वर्णाची लाज वाटते. ॥12॥
13-18
परी मर्यादेचा सागरु । हा तवचि तया डगरु । जव न देखे सुधाकरु । उदया आला ॥13॥
परंतु समुद्राला, मर्यादा आहे, असा जो ज्याचा लौकिक आहे तो जो पर्यंत चंद्र उगवला नाही तोपर्यंतच. ॥13॥
14-18
सोमकांतु निजनिर्झरी । चंद्रा अर्घ्यादिक न करी । ते तोचि अवधारी । करवी की जी ॥14॥
सोमकांत मणी हा आपल्या स्वतःच्या उदकाने चंद्रास अर्घ्य देत नाही. तर चंद्रच त्याच्याकडून करवितो. ॥14॥
15-18
नेणो कैसी वसंतसंगे । अवचितिया वृक्षाची अंगे । फुटती तै हे तयाहि जोगे । धरणे नोहे ? ॥15॥
वसंत ऋतू सुरु झाल्याबरोबर वृक्षास एकदम पालवी कशी फुटते, हे समजत नाही, त्या प्रमाणे माझी हि स्थिती झाली असे का समजू नये ? ॥15॥


16-18
पद्मिनी रविकिरण । लाहे मग लाजे कवण ? । का जळे शिवतले लवण । आंग भुले ॥16॥
सूर्यविकासिनी कमल सूर्यकिरण पडताक्षणीच लज्जा सोडून प्रफुल्लीत होतो, किंवा मीठ पाण्यात घातल्यावर तद्रूप होते. ॥16॥
17-18
तैसा तूते जेथ मी स्मरे । तेथ मीपण मी विसरे । मग जाकळिला ढेकरे । तृप्तु जैसा ॥17॥
तसा जेंव्हा मी तुमचे स्मरण करतो, तेंव्हा आपले स्वरूप विसरून जातो. मग भोजनापासून तृप्त झालेला मनुष्य इच्छेवाचून जसा ढेकारावर ढेकर देतो. ॥17॥
18-18
मज तुवा जी केले तैसे । माझे मीपण दवडूनि देशे । स्तुतिमिषेच पा पिसे । बांधले वाचे ॥18॥
तसे, हे श्रीगुरुराया माझ्या मीपणात देशांतराला दडवून म्हणजे नाहीसा करून स्तुतीच्या रूपाने माझ्या वाचेला वेड लावले आहे, अशी माझी स्थिती केली. ॥18॥
19-18
ना येऱ्हवी तरी आठवी । राहोनि स्तुति जै करावी । तै गुणागुणिया धरावी । सरोभरी की ॥19॥
किंवा जर मी आपल्या आठवणीने स्तुती करावी, तर तुमचे गुण व तुम्ही याची निवड केली पाहिजे. ॥19॥
20-18
तरी तू जी एकरसाचे लिंग । केवी करू गुणागुणी विभाग । मोती फोडोनि सांधिता चांग । की तैसेचि भले ॥20॥
तर हे प्रभो, तुम्ही एक रसाचेच बनलेले लिंग आहा, त्या आपले ठिकाणी गुणागुणी विभाग कसा करू ? हे पहा, मोती फोडून ते सांधीत बसण्यापेक्षा ते मूळचे अखंड असलेले चांगले नव्हे काय ?. ॥20॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


21-18
आणि बाप तू माय । इही बोली ना स्तुति होय । डिंभोपाधिक आहे । विटाळु तेथे ॥21॥
आणि तुम्ही मायबापा आहा असे म्हटले तर या बोलण्याने स्तुती तर होणार नाहीच, पण माझ्या लेकुरपणाच्या उपाधीने आपल्या ठिकाणी भेदाचा विटाळ लागतो. ॥21॥
22-18
जी जालेनि पाइके आले । ते गोसावीपण केवी बोले ? । ऐसे उपाधी उशिटले । काय वर्णू ॥22॥
मी तुमचा चाकर होईन असे म्हटले तर तुम्हास धनी म्हणून कसे म्हणून अशा रीतीने आपल्या उपाधीच्या योगाने उष्टे झालेले रूप त्याचे काय वर्णन करू ?. ॥22॥
23-18
जरी आत्मा तू एकसरा । हेही म्हणता दातारा । तरी आंतुल तू बाहेरा । घापतासी ॥23॥
हे प्रभु तुम्ही जगदात्मा आहात असे जर एकदम तुम्हाला म्हटले तर माझ्या अंतर्यामी वास करणार्‍या तुम्हाला मी बाहेर काढल्याप्रमाणे होते. ॥23॥
24-18
म्हणौनि सत्यचि तुजलागी । स्तुति न देखो जी जगी । मौनावाचूनि लेणे आंगी । सुसीना मा ॥24॥
म्हणून खरोखर पाहू गेले असता या जगात तुमची स्तुती करता येत नाही आणि मौनाशिवाय तुमच्या अंगावर इतर दागिने चढविता येत नाहीत. ॥24॥
25-18
स्तुति काही न बोलणे । पूजा काही न करणे । सन्निधी काही न होणे । तुझ्या ठायी ॥25॥
तर काही न बोलणे हीच आपली स्तुती काही न करणे हीच आपली पूजा आणि वेगळेपणाने न होणे या गोष्टी तुमच्या ठिकाणी संभवतात. ॥25॥
26-18
तरी जिंतले जैसे भुली । पिसे आलापु घाली । तैसे वानू ते माऊली । उपसाहावे तुवा ॥26॥
तर तसा एखादा मनुष्य भ्रांतीयुक्त होऊन वेडेपणाने बडबड करितो त्याच प्रकारचे माझे वर्णन आहे तर हे गुरुमाऊली तुम्ही ते सहन करावे. ॥26॥
27-18
आता गीतार्थाची मुक्तमुदी । लावी माझिये वाग्वृद्धी । जे माने हे सभासदी । सज्जनांच्या ॥27॥
आता तुम्ही माझ्या वाणी कडून गीतार्थ वाढेल म्हणून जे स्पष्ट होईल अशी मुद्रा (शिक्का) लावा म्हणजे मी सांगितलेला अर्थ या सज्जनांचे सभेत मान्य होईल. ॥27॥
28-18
तेथ म्हणितले श्रीनिवृत्ती । नको हे पुढतपुढती । परीसी लोहा घृष्टी किती । वेळवेळा कीजे गा ॥28॥
तेव्हा श्री निवृत्ति महाराज म्हणाले की, “तू अशी वारंवार आमची विनंती करू नको अरे लोखंडाचे सुवर्ण करण्याकरिता परी सावरते लोखंड वरचेवर का घालावे लागते” ॥28॥
29-18
तव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो का जी पसावो । तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आता ॥29॥
तेंव्हा ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली की महाराज आपला हाच प्रसाद व्हावा की, मी जो आता गीतेचा अर्थ सांगणार आहे त्याकडे देवांनी लक्ष द्यावे. ॥29॥
30-18
जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा । सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊ जो ॥30॥
गीताग्रंथ हे रत्नखचित देवालय असून त्याचा कळस अर्थरूपी चिंतामणीचा आहे, तो असा की, ज्याचे दर्शनाने गीतेच्या दर्शनाचे फळ मिळते. ॥30॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


31-18
लोकी तरी आथी ऐसे । जे दुरूनि कळसु दिसे । आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥31॥
जगात रूढीही अशीच आहे की कळसाचे दुरून दर्शन घेतले असता देवालयातील देवतेच्या भेटीचे फळ प्राप्त होते. ॥31॥
32-18
तैसेचि एथ ही आहे । जे एकेचि येणे अध्याये । आघवाचि दृष्ट होये । गीतागमु हा ॥32॥
तसाच येथेही प्रकार आहे की जो एकच अध्याय वाचला असता सर्व गीता शास्त्रच वाचल्याचे श्रेय येते ॥32॥
33-18
मी कळसु याचि कारणे । अठरावा अध्यायो म्हणे । उवाइला बादरायणे । गीताप्रासादा ॥33॥
याच कारणास्तव मी या अठराव्या अध्यायास कशाची कळसाची उपमा दिली आहे कारण जो कळस वेदव्यासांनी गीतारूपी देवालयावर बसविला आहे, ॥33॥
34-18
नोहे कळसापरते काही । प्रासादी काम नाही । ते सांगतसे गीता ही । संपलेपणे ॥34॥
देवालयावर कळस चढविल्यावर मग त्याचे जसे कोणतेही काम करावयाचे उरत नाही तसेच हा अठरावा अध्याय गीता संपविली असे दर्शवितो. ॥34॥
35-18
व्यासु सहजे सूत्री बळी । तेणे निगमरत्नाचळी । उपनिषदार्थाची माळी- । माजी खांडिली ॥35॥
व्यास हे स्वभावताच श्रेष्ठ त्यांनी मोठ्या कुशलतेने सूत्रे रचली आणि वेदरूपी रत्नाच्या पर्वतावर उपनिषदार्थाच्या माळ जमिनीत खणती केली. ॥35॥
36-18
तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु । तो महाभारतप्राकारु । भोवता केला ॥36॥
त्या माळ जमिनीत धर्म, अर्थ व काम एतदृपी भिन्नभिन्न आकाराचे पुष्कळ गडगळ गोटे निघाले, त्या धोंड्यांचा महाभारतरुपी देवालयाचे भोवती तट बांधला. ॥36॥
37-18
माजी आत्मज्ञानाचे एकवट । दळवाडे झाडूनि चोखट । घडिले पार्थवैकुंठ- । संवाद कुसरी ॥37॥
नंतर आत्मज्ञानरुपी एकसारखे उत्तम चिरे कृष्णार्जुन संवादरूपी चातुर्याने घडले. ॥37॥
38-18
निवृत्तिसूत्र सोडवणिया । सर्व शास्त्रार्थ पुरवणिया । आवो साधिला मांडणिया । मोक्षरेखेचा ॥38॥
मग निवृत्तीरूपी दोरीने आणखी करून सर्व शास्त्राची पुरणी घालून मोक्षमार्यादेचा आकार साधाला. ॥38॥
39-18
ऐसेनि करिता उभारा । पंधरा अध्यायात पंधरा । भूमि निर्वाळलिया पुरा । प्रासादु जाहला ॥39॥
याप्रमाणे देवालयाची रचना करीता करीता पंधरा अध्यायापर्यंत पंधरा थर होऊन गाभाऱ्याच्या भिंती डेऱ्यापर्यंत येवून ठेपल्या. ॥39॥
40-18
उपरी सोळावा अध्यायो । तो ग्रीवघंटेचा आवो । सप्तदशु तोचि ठावो । पडघाणिये ॥40॥
पुढे सोळावा अध्याय हा गळमण्याचा आकार असून. सतरावा अध्याय पडघानी कळसाची बैठक होय. ॥40॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


41-18
तयाहीवरी अष्टादशु । तो अपैसा मांडला कळसु । उपरि गीतादिकी व्यासु । ध्वजे लागला ॥41॥
त्यात पडघाणीवर अठरावा अध्यायरुपी सहजच कळस उत्तम रीतीने बसवून त्यावर व्यासकृत गीता हा ध्वज उभारला आहे ॥41॥
42-18
म्हणौनि मागील जे अध्याये । ते चढते भूमीचे आये । तयांचे पुरे दाविताहे । आपुल्या आंगी ॥42॥
म्हणून मागचे जे अध्याय ते एकावर एक चढते थर असून त्यांचे आपल्या योगाने पूर्णता झाली, हे हा अठरावा अध्याय दाखवतो ॥42॥
43-18
जालया कामा नाही चोरी । ते कळसे होय उजरी । तेवी अष्टादशु विवरी । साद्यंत गीता ॥43॥
कोणतेही पुरे झालेले काम चोरून न ठेवता कळसाच्या योगाने स्पष्ट दृष्टीस पडते, तसे अठराव्या अध्यायात साद्यंतगीतेचे वर्णन आहे ॥43॥
44-18
ऐसा व्यासे विंदाणिये । गीताप्रासादु सोडवणिये । आणूनि राखिले प्राणिये । नानापरी ॥44॥
याप्रमाणे व्यासांनी कुशलतेने गीतारूपी देवालय तयार करून प्राणीमात्रांचा नानाप्रकारे उद्धार केला ॥44॥
45-18
एक प्रदक्षिणा जपाचिया । बाहेरोनि करिती यया । एक ते श्रवणमिषे छाया । सेविती ययाची ॥45॥
कोणी बाहेरून प्रदक्षिणा करून जप करितात, (गीतेचा पाठ करितात) कोण श्रवणरूप छायेत देवालयाचे भिंतीस टेकून बसतात ॥45॥
46-18
एक ते अवधानाचा पुरा । विडापाऊड भीतरा । घेऊनि रिघती गाभारा । अर्थज्ञानाच्या ॥46॥
कोणी अवधानरुपी विडा व पैसा घेऊन देवळाच्या अर्थ ज्ञानरूपी गाभार्‍यात शिरतात ॥46॥
47-18
ते निजबोधे उराउरी । भेटती आत्मया श्रीहरी । परी मोक्षप्रासादी सरी । सर्वाही आथी ॥47॥
ते आत्मबोधाच्या योगाने जगदात्मा श्रीहरीची सत्वर भेट घेतात; परंतु मोक्षरुपी देवालयात सर्वाची योग्यता सारखीच आहे ॥47॥
48-18
समर्थाचिये पंक्तिभोजने । तळिल्या वरील्या एकचि पक्वान्ने । तेवी श्रवणे अर्थे पठणे । मोक्षुचि लाभे ॥48॥
समर्थांचे घरी भोजनास गेले असता पंगतीत वरच्या खालच्या पानावर ज्याप्रमाणे एक सारखीच पक्वाने असतात (पंक्तीभेद नसतो) त्याप्रमाणे गीता श्रवण करणारास, अर्थ जाणणारास, व पठण करणारास, मोक्ष प्राप्त होतो ॥48॥
49-18
ऐसा गीता वैष्णवप्रासादु । अठरावा अध्याय कळसु विशदु । म्या म्हणितला हा भेदु । जाणोनिया ॥49॥
असो; गीता ग्रंथ हा विष्णूचे देवालय असून अठरावा अध्याय हा त्यावरील उघड कळस आहे, असा भेद मी जाणूनबुजून केला ॥49॥
50-18
आता सप्तदशापाठी । अध्याय कैसेनि उठी । तो संबंधु सांगो दिठी । दिसे तैसा ॥50॥
आता सतराव्या अध्यायापर्यंत सर्व अध्यायांची कशी उभारणी झाली आहे ते तुमच्या दृष्टीस पडेल असे समजून सांगतो ॥50॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


51-18
का गंगायमुना उदक । वोघबगे वेगळिक । दावी होऊनि एक । पाणीपणे ॥51॥
प्रयागास गंगा व यमुना यांचे संगमाचे ठिकाणी उदक जरी ओघाच्या बळाने निराळे दिसले, तरी पाणी या भावनेने ते एकच आहे. ॥51॥
52-18
न मोडिता दोन्ही आकार । घडिले एक शरीर । हे अर्धनारी नटेश्वर- । रूपी दिसे ॥52॥
अर्धनारीनटेश्वराचे रूपात जसे स्त्री व पुरुष यांचे आकार कायम असून एकच शरीर दिसते ॥52॥
53-18
नाना वाढिली दिवसे । कळा बिंबी पैसे । परी सिनाने लेवे जैसे । चंद्री नाही ॥53॥
शुद्ध पक्षात चंद्राची कला जशी रोज वाढलेली दिसते, परंतु चंद्राचे दृष्टीने पाहू गेले असता तो पूर्णच आहे. त्याच्यावर निराळे थर नाहीत ॥53॥
54-18
तैसी सिनानी चारी पदे । श्लोक तो श्लोकावच्छेदे । अध्यावो अध्यायभेदे । गमे कीर ॥54॥
तसेच श्लोक चार जणांनी वेगळे वेगळे दिसतात व अध्याय अध्याय यामुळे वेगळे भासतात खरे; ॥54॥
55-18
परी प्रमेयाची उजरी । आनान रूप न धरी । नाना रत्नमणी दोरी । एकचि जैसी ॥55॥
परंतु अर्थाच्या दृष्टीने त्यात भेद नाही जशी पुष्कळ रत्ने धारण करणारी दोरी एकच असते ॥55॥
56-18
मोतिये मिळोनि बहुवे । एकावळीचा पाडु आहे । परी शोभे रूप होये । एकचि तेथ ॥56॥
पुष्कळ मोती मिळून एकावळीची माळ तयार होते, परंतु सर्वाशी कांती एकच असते ॥56॥
57-18
फुलांफुलसरा लेख चढे । द्रुती दुजी अंगुळी न पडे । श्लोक अध्याय तेणे पाडे । जाणावे हे ॥57॥
माळेत फुले ओवण्यास लागल्यावर फुलांची संख्या वाढते; परंतु त्याचा सुगंध घेऊ गेले असता संख्येकरीता दुसरे बोट घालावे लागत नाही म्हणजे सारखाच सुगंध असतो त्याचप्रमाणे श्लोक व अध्याय हे जरी पुष्कळ असले तरी त्यातील अर्थ एकच आहे ॥57॥
58-18
सात शते श्लोक । अध्याया अठरांचे लेख । परी देवो बोलिले एक । जे दुजे नाही ॥58॥
गीतेचे श्लोक सातशे असून अध्याय अठरा आहेत, परंतु देवाने या सर्वात एकाच तत्वाचे विवेचन केले आहे. दुसरे काही वर्णन केले नाही ॥58॥
59-18
आणि म्यांही न सांडूनि ते सोये । ग्रंथ व्यक्ति केली आहे । प्रस्तुत तेणे निर्वाहे । निरूपण आइका ॥59॥
आणि मीही देवांचा मार्ग न सोडता ग्रंथांचे स्पष्टीकरण केले आहे, तूर्त या समजुतीने मी अठरावा अध्याय सांगतो तो ऐका. ॥59॥
60-18
तरी सतरावा अध्यावो । पावता पुरता ठावो । जे संपता श्लोकी देवो । बोलिले ऐसे ॥60॥
तर सतराव्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की ॥60॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-18
अर्जुना ब्रह्मनामाच्याविखीं । बुद्धि सांडूनि आस्तिकी । कर्मे कीजती तितुकी । असंते होती ॥61॥
अर्जुना ब्रम्हनामाच्या विषयी श्रद्धा सोडून जितकी कर्मे करशील तितकी व्यर्थ होत ॥61॥
62-18
हा ऐकोनि देवाचा बोलु । अर्जुना आला डोलु । म्हणे कर्मनिष्ठा मळु । ठेविला देखो ॥62॥
असे देवाचे बोलणे ऐकून अर्जुनास मोठा आनंद झाला आणि तो म्हणाला की, देवानी कर्मावर श्रद्धा ठेवणारास दोष ठेवला आहे. ॥62॥
63-18
तो अज्ञानांधु तव बापुडा । ईश्वरुचि न देखे एवढा । तेथ नामचि एक पुढा । का सुझे तया ॥63॥
तो बिचारा ज्ञानामुळे अंध झालेला असल्यामुळे सर्व जगतात ईश्वर भरलेला आहे, हे त्यास समजले नाही; मग तो प्रत्यक्ष त्याच्यापुढे असूनही ब्रह्मनामश्रद्धेचे वर्म त्यास कसे समजेल ? ॥63॥
64-18
आणि रजतमे दोन्ही । गेलियावीण श्रद्धा सानी । ते का लागे अभिधानी । ब्रह्माचिये ? ॥64॥
रज व तम दोन्ही गुणांच्या नाश झाल्याशिवाय जी श्रद्धा असते, ती ब्रम्हाच्या ब्रम्हश्रद्धेच्यानावासकशी पात्र होईल ? ॥64॥
65-18
मग कोता खेंव देणे । वार्तेवरील धावणे । सांडी पडे खेळणे । नागिणीचे ते ॥65॥
मग, शस्त्राला आलिंगन देणे अथवा दोरीवर धावत सुटणे व नागिणीला हातात धरुण खेळणे. या गोष्टी जशा मरणास कारण होतात. ॥65॥
66-18
तैसी कर्मे दुवाडे । तया जन्मांतराची कडे । दुर्मेळावे येवढे । कर्मामाजी ॥66॥
तशी कर्मे कठीण असून ती जन्ममरण देण्यास कारणीभूत होतात, असे कर्माचे दुष्ट धर्म आहेत. ॥66॥
67-18
ना विपाये हे उजू होये । तरी ज्ञानाची योग्यता लाहे । येऱ्हवी येणेचि जाये । निरयालया ॥67॥
कदाचित कर्मे यथासांग झाली तर त्याना ज्ञानाची योग्यता येते व ते कर्म यथासांग न झाल्यास नरक प्राप्ति कारण होते ॥67॥
68-18
कर्मी हा ठायवरी । आहाती बहुवा अवसरी । आता कर्मठा कै वारी । मोक्षाची हे ॥68॥
आजवर कर्म करण्यामध्ये पुष्कळ काळ घालविला पण त्यापासून मोक्ष मिळाला नाही, आता यापुढे कर्मठांना मोक्षाची पाळी केव्हा येणार ? ॥68॥
69-18
तरी फिटो कर्माचा पांगु । कीजो अवघाचि त्यागु । आदरिजो अव्यंगु । संन्यासु हा ॥69॥
तर कर्माचे दैन्य फिटून व त्याचा सर्व त्याग करून अव्यंग असा जो कर्मसंन्यास त्याचा आदर करावा ॥69॥
70-18
कर्मबाधेची कही । जेथ भयाची गोठी नाही । ते आत्मज्ञान जिही । स्वाधीन होय ॥70॥
ज्याच्या योगाने कर्माच्या बाधेपासून भीती नसते व आत्मज्ञान प्राप्त होते ॥70॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-18
ज्ञानाचे आवाहनमंत्र । जे ज्ञान पिकते सुक्षेत्र । ज्ञान आकर्षिते सूत्र । तंतु जे का ॥71॥
व जो कर्मसंन्यास आणि कर्मत्याग हे ज्ञानाला आमंत्रण करण्याचे मंत्र, अथवा ज्ञान पिकवण्याचे क्षेत्र अथवा ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्राचे तंतू होत, ॥71॥
72-18
ते दोनी संन्यास त्याग । अनुष्ठूनि सुटे जग । तरी हेचि आता चांग । व्यक्त पुसो ॥72॥
ते दोन्ही संन्यास व त्याग यांचे अनुष्ठान करून जग मुक्त होवो, तर हेच आता उघड रीतीने सांगा असे देवास पुसावे ॥72॥
73-18
ऐसे म्हणौनि पार्थे । त्यागसंन्यासव्यवस्थे । रूप होआवया जेथे । प्रश्नु केला ॥73॥
असे पार्थाने मनात आणून त्याग व संन्यास यांचे स्पष्टीकरण व्हावे म्हणून प्रश्न केला ॥73॥
74-18
तेथ प्रत्युत्तरे बोली । श्रीकृष्णे जे चावळिली । तया व्यक्ति जाली । अष्टादशा ॥74॥
तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनास प्रत्युत्तर देण्यासाठी जे भाषण केले तोच हा अठरावा अध्याय व्यक्त झाला ॥74॥
75-18
एवं जन्यजनकभावे । अध्यावो अध्यायाते प्रसवे । आता ऐका बरवे । पुसिले जे ॥75॥
याप्रमाणे कार्यकारणभावाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायास कारणीभूत होतो, आता अर्जुनाने काय प्रश्न केला, तो ऐका ॥75॥
76-18
तरी पंडुकुमरे तेणे । देवाचे सरते बोलणे । जाणोनि अंतःकरणे । काणी घेतली ॥76॥
सतराव्या अध्यायात देवांनी जो शेवटचा श्लोक सांगितला त्याचे अंतःकरणात मनन करून अर्जुनाने अशी शंका घेतली ॥76॥
77-18
येऱ्हवी तत्वविषयी भला । तो निश्चितु असे कीर जाहला । परी देवो राहे उगला । ते साहावेना ॥77॥
एरवी त्याला देवांनी सांगितलेले तत्व पूर्ण समजले होते परंतु देव काही न बोलता स्वस्थ बसले ते त्याला बरे वाटेना ॥77॥
78-18
वत्स धालयाही वरी । धेनू न वचावी दुरी । अनन्य प्रीतीची परी । ऐसी आहे ॥78॥
वासराचे पोट भरल्यावरहि गायीने त्याचेपासून दूर न व्हावे असे एकनिष्ठ प्रेमाचे लक्षण आहे ॥78॥
79-18
तेणे काजेवीणही बोलावे । ते देखीले तरी पाहावे । भोगिता चाड दुणावे । पढियंतयाठायी ॥79॥
आपल्या जो मनुष्य परम प्रिय असतो त्याने काही कारण नसतानाही आपल्याशी बोलावे व आपल्याकडे पाहिल्यावरही आपल्याकडेच पाहत राहावे असे प्रीतीचे लक्षण आहे. ॥79॥
80-18
ऐसी प्रेमाची हे जाती । आणि पार्थ तव तेचि मूर्ती । म्हणौनि करू लाहे खंती । उगेपणाची ॥80॥
अशी प्रेमाची जात असून पार्थ तर श्रीकृष्णाच्या प्रेमाची मूर्तीच आहे, म्हणून भगवान स्वस्थ बसल्यामुळे पार्थास अवघड वाटले ॥80॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-18
आणि संवादाचेनि मिषे । जे अव्यवहारी वस्तु असे । ते भोगिजे की जैसे । आरिसा रूप ॥81॥
आणि संवादाच्या योगाने पारमार्थिक वस्तू जे ‘ब्रह्म ” ते आरश्यात पाहिल्यावर जसे आपले रूप स्पष्ट दिसते तसे भोगिता येते ॥81॥
82-18
मग संवादु तोही पारुखे । तरी भोगिता भोगणे थोके । हे का साहवेल सुखे । लांचावलेया ? ॥82॥
मग संवाद बंद पडल्यावर ब्रह्मप्राप्ती बंद होते ही गोष्ट सुखप्राप्तीला (सवकलेल्या) सकवलेल्या अर्जुनाला कशी सहन होईल ॥82॥
83-18
यालागी त्याग संन्यास । पुसावयाचे घेऊनि मिस । मग उपलविले दुस । गीतेचे ते ॥83॥
म्हणून त्याग व संन्यास म्हणजे काय हे पुसण्याच्या निमित्ताने गीतारूपी वस्त्राची अर्जुनाने पुन: घडी उकलली. ॥83॥
84-18
अठरावा अध्यावो नोहे । हे एकाध्यायी गीताचि आहे । जै वांसरुचि गाय दुहे । तै वेळु कायसा ॥84॥
तर हा अठरावा अध्याय नसून एकाध्यायी गीताच आहे. पहा कि जेंव्हा वासरुंच गाईस पान्हा आणते तेव्हा वेळअवेळ याचा गाईस विचार असतो काय.
85-18
तैसी संपता अवसरी । गीता आदरविली माघारी । स्वामी भृत्याचा न करी । संवादु काई ? ॥85॥
त्याप्रमाणे गीता संपण्याचे वेळी पुन्हा: गीतेच्या पूर्वपदावर अर्जुन आला तेंव्हा सेवकाने प्रश्न केल्यावर स्वामी त्याचे उत्तर कसे देणार नाहीत ? ॥85॥
86-18
परी हे असो ऐसे । अर्जुने पुसिजत असे । म्हणे विनंती विश्वेशे । अवधारिजो ॥86॥
परंतु ही गोष्ट राहु द्या; अर्जुनाने कृष्णाची विनंती करून म्हटले की भगवंतानी आता माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावे.
अर्जुन उवाच ।
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् ।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ॥18. 1॥
87-18
हा जी संन्यासु आणि त्यागु । इया दोही एक अर्थी लागु । जैसा सांघातु आणि संघु । संघातेचि बोलिजे ॥87॥
हे प्रभो संन्यास आणि त्याग या दोहोंचा एकाच अर्थाशी संबंध आहे जसा ‘संघात ” आणि ‘संघ ” या दोन्ही शब्दांचा निर्देश संघात या शब्दानेच करितात ॥87॥
88-18
तैसेचि त्यागे आणि संन्यासे । त्यागुचि बोलिजतु असे । आमचेनि तव मानसे । जाणिजे हेचि ॥88॥
तसाच त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांनी त्यागाचाच बोध होतो आमच्या मनाला तरी असे वाटते ॥88॥
89-18
ना काही आथी अर्थभेदु । तो देवो करोतु विशदु । तेथ म्हणती श्रीमुकुंदु । भिन्नचि पै ॥89॥
मग जर त्यांच्या अर्थात काही भेद असेल तर तो देवाने स्पष्ट करून सांगावा “तेव्हा” श्री मुकुंद म्हणाले अरे हे दोन्ही शब्द भिन्नच आहेत ॥89॥
90-18
तरी अर्जुना तुझ्या मनी । त्याग संन्यास दोनी । एकार्थ गमले हे मानी । मीही साच ॥90॥
तथापि अर्जुना त्याग व संन्यास हे दोन्ही शब्द एकार्थीच आहेत असे जे तुझ्या मनाला वाटले, ते बरोबर आहे असे मी म्हणतो, ॥90॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-18
इही दोही कीर शब्दी । त्यागुचि बोलिजे त्रिशुद्धी । परी कारण एथ भेदी । येतुलेचि ॥91॥
खरोखर या दोन्ही शब्दांनी एक त्यागाचाच निर्देश होतो, हे खरे आहे, पण त्यांच्या अर्थांमध्ये भेद होण्याचे कारण एवढेच आहे की, ॥91॥
92-18
जे निपटूनि कर्म सांडिजे । ते सांडणे संन्यासु म्हणिजे । आणि फलमात्र का त्यजिजे । तो त्यागु गा ॥92॥
जे सर्वथैव कर्म सोडणे, त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात आणि अर्जुना, कर्म कर्तृत्वाचा अभिमान व फल ह्यांचा त्याग करणे, त्याला त्यागा असे म्हणतात, ॥92॥
93-18
तरी कोणा कर्माचे फळ । सांडिजे कोण कर्म केवळ । हेही सांगो विवळ । चित्त दे पा ॥93॥
तर कोणत्या कर्माचे फळ टाकावे व कोणते कर्म मुळीच टाकावे, हेही स्पष्ट करून सांगतो, ते चित्त देऊन ऐक,
94-18
तरी आपैसी दांगे डोंगर । झाडे डाळती अपार । तैसे लांबे राजागर । नुठिती ते ॥94॥
ज्याप्रमाणे अरण्यात डोंगरावर पुष्कळ झाडे आपोआप उगवतात, त्याप्रमाणे लांबीचे भात, व बागेतील झाडे, आपोआप उगवत नाहीत.
95-18
न पेरिता सैंघ तृणे । उठती तैसे साळीचे होणे । नाही गा राबाउणे । जियापरी ॥95॥
पेरल्याशिवाय गवत हवे तेवढे उगवते तसेच शेतात राब घातल्याशिवाय साळीचे पिक होत नाही ॥95॥
96-18
का अंग जाहले सहजे । परी लेणे उद्यमे कीजे । नदी आपैसी आपादिजे । विहिरी जेवी ॥96॥
अथवा शरीर जरी सहज झालेले आहे, तरी दागिने उद्योग करूनच करावी लागतात, किंवा नदीचे पाणी सहज प्राप्त होते, पण विहीर खणावी लागते ॥96॥
97-18
तैसे नित्य नैमित्तिक । कर्म होय स्वाभाविक । परी न कामिता कामिक । न निफजे जे ॥97॥
त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म हे स्वाभाविक आहे, परंतु काम्यकर्मे इच्छा केल्याशिवाय उत्पन्न होत नाही ॥97॥

श्रीभगवानुवाच ।
काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥18. 2॥
98-18
का कामनेचेनि दळवाडे । जे उभारावया घडे । अश्वमेधादिक फुडे । याग जेथ ॥98॥
किंवा येथे कामनेच्या जोराने उत्पन्न होणारे यथासांग अश्वमेधादी याग ॥98॥
99-18
वापी कूप आराम । अग्रहारे हन महाग्राम । आणीकही नाना संभ्रम । व्रतांचे ते ॥99॥
पुष्करणी, विहिरी, इत्यादी बांधणे, बागा लावणे, अग्रहार देणे, व एखादी ठिकाणी शहर बसविणे व आणखी पुष्कळ प्रकारची व्रते ॥99॥
100-18
ऐसे इष्टापूर्त सकळ । जया कामना एक मूळ । जे केले भोगवी फळ । बांधोनिया ॥100॥
असे सर्व इष्टापुर्त कर्म ज्याला कामना मूळ कारण आहे आणि त्याचे आचरण केले असता ते करणारास बद्ध करून फळ भोगण्यास लावते ॥100॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-18
देहाचिया गावा अलिया । जन्ममृत्यूचिया सोहळिया । ना म्हणो नये धनंजया । जियापरी ॥101॥
अर्जुना, देहरूप गावास आल्यावर जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही, ॥101॥
102-18
का ललाटीचे लिहिले । न मोडे गा काही केले । काळेगोरेपण धुतले । फिटो नेणे ॥102॥
किंवा नशिबात लिहिलेली काही टळत नाही, अथवा काळेपण व गोरेपण कितीही धुतले तरी नाहीसे होत नाही. ॥102॥
103-18
केले काम्य कर्म तैसे । फळ भोगावया धरणे बैसे । न फेडिता ऋण जैसे । वोसंडीना ॥103॥
तसे काम्यकर्मे केले असता, ऋण फेडल्या वाचून ज्याप्रमाणे सुटका होत नाही, त्याप्रमाणे ते फळ भोगाविण्याकरिता दारात धरणे घेऊन बसते ! ॥103॥
104-18
का कामनाही न करिता । अवसांत घडे पंडुसुता । तरी वायकांडे न झुंजता । लागे जैसे ॥104॥
अथवा अर्जुना इच्छा न करिता काम्यकर्म अकस्मात घडले तरी, केवळ करमणुकीकरिता वाय बाणांनी युद्ध करीत असता तो मर्मस्थली लागला तर जसा जीव घेण्यास कमी करत नाही, ॥104॥
105-18
गूळ नेणता तोंडी । घातला देचि गोडी । आगी मानूनि राखोंडी । चेपिला पोळी ॥105॥
गुळ न समजून जरी तोंडात घातला तरी तो गोडच लागतो किंवा अग्नीस राखोंडी समजून जरी त्यावर पाय दिला तरी तो भाजतोच. ॥105॥
106-18
काम्यकर्मी हे एक । सामर्थ्य आथी स्वाभाविक । म्हणौनि नको कौतुक । मुमुक्षु एथ ॥106॥
त्याप्रमाणे, काम्यकर्माचे ठिकाणी फळ भोगविण्याचे स्वाभाविक सामर्थ्य आहे, म्हणून मुमुक्षूने कौतुकानेही त्याचे आचरण करू नये. ॥106॥
107-18
किंबहुना पार्था ऐसे । जे काम्य कर्म गा असे । ते त्यजिजे विष जैसे । वोकूनिया ॥107॥
किंबहुना बा पार्था, असे जे काम्यकर्म आहे ते, विष पोटात गेले म्हणजे ओकुन टाकतात, तसे टाकून द्यावे ॥107॥
108-18
मग तया त्यागाते जगी । संन्यासु ऐसया भंगी । बोलिजे अंतरंगी । सर्वद्रष्टा ॥108॥
मग ज्याच त्याला जगात संन्यास असे म्हणतात, असे सर्वातर साक्षी भगवान श्रीकृष्ण बोलिले ॥108॥
109-18
हे काम्य कर्म सांडणे । ते कामनेतेचि उपडणे । द्रव्यत्यागे दवडणे । भय जैसे ॥109॥
मग म्हणतात:- ज्याप्रमाणे आपल्या जवळील द्रव्ये टाकून दिली म्हणजे त्यापासून उत्पन्न होणारे भय नाहीसे होते, त्याप्रमाणे ह्या काम्यकर्मांचा त्याग करणे म्हणजे मनातील वासना समूळ नाहीतशा करणे होय ॥109॥
110-18
आणि सोमसूर्यग्रहणे । येऊनि करविती पार्वणे । का मातापितरमरणे । अंकित जे दिवस ॥110॥
आणि चंद्रग्रहण ह्या पर्वणीच्या दिवशी किंवा माता पितरांच्या श्राद्ध तिथीस, ॥110॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-18
अथवा अतिथी हन पावे । हे ऐसैसे पडे जै करावे । तै ते कर्म जाणावे । नौमित्तिक गा ॥111॥
अथवा काकबळी टाकण्याचे समयास अतिथी प्राप्त झाला असता, जी जी कर्मे करावी लागतात ति नैमित्तिक कर्मे होतं ॥111॥
112-18
वार्षिया क्षोमे गगन । वसंते दुणावे वन । देहा श्रृंगारी यौवन- । दशा जैसी ॥112॥
वर्षाकाळी जसे आकाश भरून येवून मेघांची गर्जना होते, वसंत ऋतूच्या योगाने वनास पालवी फुटून दुप्पट शोभा येते, अथवा शरीराला यौवनदशा शोभा आणते. ॥112॥
113-18
का सोमकांतु सोमे पघळे । सूर्ये फांकती कमळे । एथ असे तेचि पाल्हाळे । आन नये ॥113॥
किंवा सोमकांत मणी चंद्राच्या किरणांनी द्रवतो व सूर्याचे किरणांनी सुर्यविकाशिनी कमळे प्रफुल्लीत होतात; या ठिकाणी, जे मुळचे असते तेच वाढते, निराळे काही उत्त्पन्न होत नाही. ॥113॥
114-18
तैसे नित्य जे का कर्म । तेचि निमित्ताचे लाहे नियम । एथ उंचावे तेणे नाम । नैमित्तिक होय ॥114॥
त्याच प्रमाणे जे नित्य कर्म आहे, त्यालाच निमिताचे नियम लागले कि, नैमित्तिक हे मोठे नांव त्याला प्राप्त होते. ॥114॥
115-18
आणि सायंप्रातर्मध्यान्ही । जे का करणीय प्रतिदिनी । परी दृष्टि जैसी लोचनी । अधिक नोहे ॥115॥
आणि दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी जे कर्म करावे लागतात; परंतु ज्या डोळ्यातील दृष्टी अधिक होत नाही. ॥115॥
116-18
का नापादिता गती । चरणी जैसी आथी । नातरी ते दीप्ती । दीपबिंबी ॥116॥
अथवा गतीचा स्वीकार ती जशी पायात आपोआपच आहे; किंवा दिव्याचे ठिकाणीच जसे त्याचे सहज तेज आहे, ॥116॥
117-18
वासु नेदिता जैसे । चंदनी सौरभ्य असे । अधिकाराचे तैसे । रूपचि जे ॥117॥
चंदनास वरून वास लावल्या शिवाय जसा अंगाचा सुगंध असतो तसे अधिकाराचे लक्षण होय. ॥117॥
118-18
नित्य कर्म ऐसे जनी । पार्था बोलिजे ते मानी । एवं नित्य नैमित्तिक दोन्ही । दाविली तुज ॥118॥
त्या कर्मास पार्था, जगात नित्य कर्म म्हणतात, असे समज. या प्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक हि दोन्ही कर्मे दाखविली. ॥118॥
119-18
हेचि नित्य नैमित्तिक । अनुष्ठेय आवश्यक । म्हणौनि म्हणो पाहती एक । वांझ ययाते ॥119॥
हेच नित्यनैमित्तिक कर्म अवश्य केले पाहिजे. म्हणून काही लोक या कर्मास निष्फळ कर्म असे म्हणू पाहतात. ॥119॥
120-18
परी भोजनी जैसे होये । तृप्ति लाहे भूक जाये । तैसे नित्यनैमित्तिकी आहे । सर्वांगी फळ ॥120॥
परंतु, भोजनापासून जशी तृप्ती प्राप्त होवून क्षुधा नष्ट होते, तशी या नित्यनैमित्तिक कर्मापासून सर्व प्रकारे फळ प्राप्ती होते. ॥120॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-18
कीड आगिठा पडे । तरी मळु तुटे वानी चढे । यया कर्मा तया सांगडे । फळ जाणावे ॥121॥
ज्या प्रमाणे हिणकस सोने अग्नीत घातल्यावर त्याचा हिणकसपणा जाऊन त्याचा कस वाढतो, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मापासून फळ प्राप्ती होते. (चित्त शुद्धी होते) ॥121॥
122-18
जे प्रत्यवाय तव गळे । स्वाधिकार बहुवे उजळे । तेथ हातोफळिया मिळे । सद्गतीसी ॥122॥
कारण, या कर्माच्या आचरणाने दोष नाहीतसे होवून आपला अधिकार जास्त वाढतो आणि असे झाल्यावर हातोहात सद्गती प्राप्त होते. ॥122॥
123-18
येवढेवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकी आहे फळ । परी ते त्यजिजे मूळ । नक्षत्री जैसे ॥123॥
नित्यनैमित्तिक कर्मापासून जरी एव्हढी मोठी फळ प्राप्ती होते, तरी मूळ नक्षत्रावर उपजलेल्या मुलांप्रमाणे, त्याच्या फळाचा त्याग करावा. ॥123॥
124-18
लता पिके आघवी । तव च्यूत बांधे पालवी । मग हात न लावित माधवी । सोडूनि घाली ॥124॥
वसंत ऋतूच्या योगाने जरी सर्व वेल वाढले व आम्रवृक्षास पालवी फुटली, तरी जसा तो त्यास हात न लाविता टाकून जातो. ॥124॥
125-18
तैसी नोलांडिता कर्मरेखा । चित्त दीजे नित्यनैमित्तिका । पाठी फळा कीजे अशेखा । वांताचे वानी ॥125॥
तसे नित्यनैमित्तिक कर्मांचे चित्त देवून यथाविधी आचरण कारावे; पण त्यापासून निष्पन्न होण्याऱ्या सर्व फलांचा वांती (उलटी, वमन) प्रमाणे त्याग करवा. ॥125॥
126-18
यया कर्म फळत्यागाते । त्यागु म्हणती पै जाणते । एवं त्याग संन्यास तूते । परीसविले ॥126॥
अशा रीतीने नित्यनैमित्तिक कर्मांचे फळांचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष ‘त्याग ” असे म्हणतात. याप्रमाणे त्याग व संन्यास हे त्यांची फोड करून तुला सांगतील. ॥126॥
127-18
हा संन्यासु जै संभवे । तै काम्य बाधू न पावे । निषिद्ध तव स्वभावे । निषेधे गेले ॥127॥
या प्रमाणे जेंव्हा संन्यास घडतो, तेंव्हा काम्य कार्मापासून बाधा होवू शकत नाही. आणि निषिद्ध कर्म तर निषेधांच्या योगे स्वभावत:च नाहीसे होते; ॥127॥
128-18
आणि नित्यादिक जे असे । ते येणे फलत्यागे नसे । शिर लोटलिया जैसे । येर आंग ॥128॥
आणि ज्याप्रमाणे शीर कापल्यावर धड आपोआप निर्जीव होवून खाली पडते, त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्माच्या फलांचा आता सांगितल्या रीतीने त्याग केला असता, त्यापासून बाधा होत नाही. ॥128॥
129-18
मग सस्य फळपाकांत । तैसे निमालिया कर्मजात । आत्मज्ञान गिंवसीत । अपैसे ये ॥129॥
मग धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ खुंटते, तसा सर्व कर्माचा क्षय झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होवून शोधीत येते. ॥129॥
130-18
ऐसिया निगुती दोनी । त्याग संन्यास अनुष्ठानी । पडले गा आत्मज्ञानी । बांधती पाटु ॥130॥
अश्या युक्तीने नित्यनैमित्तिक कर्मांच्या फलांचा त्याग व काम्यकर्मांचा संन्यास जे करतात, ते आत्मज्ञानाचे प्राप्तीला योग्य होतात. ॥130॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-18
नातरी हे निगुती चुके । मग त्यागु कीजे हाततुके । तै काही न त्यजे अधिके । गोवीचि पडे ॥131॥
किंवा हि युक्ती चुकून जर कोणी अटकळीने त्याग करू म्हणतील तर, कर्माचा त्याग न होता ते अधिक घोटाळ्यात पडतात. ॥131॥
132-18
जे औषध व्याधी अनोळख । ते घेतलिया परते विख । का अन्न न मानिता भूक । मारी ना काय ? ॥132॥
रोगाची चिकित्सा न करिता घेतलेले भलतेच औषध विषतुल्य होते, अथवा अन्नाचे सेवन केले नाही तर मरणार नाही काय ? ॥132॥
133-18
म्हणौनि त्याज्य जे नोहे । तेथ त्यागाते न सुवावे । त्याज्यालागी नोहावे । लोभापर ॥133॥
म्हणून ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले आहे, तिचा त्याग करू नये व ज्या गोष्टीचा त्याग करावा असे सांगितले आहे, तिचे आचरण करण्याचा लोभ धरू नये. ॥133॥
134-18
चुकलिया त्यागाचे वेझे । केला सर्वत्यागुही होय वोझे । न देखती सर्वत्र दुजे । वीतराग ते ॥134॥
त्याग करण्याची युक्ती चुकली तर कर्मत्याग करूनही मनुष्य कर्मबंधांत सापडतो, म्हून वैराग्यसंपन्न जे आहेत, ते केव्हाही त्याज्य गोष्टीचे आचरण करीत नाहीत. ॥134॥
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः ।
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ॥18. 3॥
135-18
एका फळाभिलाष न ठके । ते कर्मांते म्हणती बंधके । जैसे आपण नग्न भांडके । जगाते म्हणे ॥135॥
कित्येकास फालाभिलाषा सोडवत नाही, म्हणून ‘कर्म बंध आहे. ” असे ते म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य नग्न असून त्यास नग्न म्हटले असता जग भांडखोर आहे असे तो म्हणतो. ॥135॥
136-18
का जिव्हालंपट रोगिया । अन्ने दूषी धनंजया । आंगा न रुसे कोढिया । मासिया कोपे ॥136॥
किंवा हे धनजंया, जिव्हेचा अधीन झालेला रोगी पाहिजे ते खातो, आणि ते पचले नाही म्हणजे अन्नास दोष देतो, किंवा कुष्ठरोगी आपल्या शरीरावर न रुसता त्यावर बसणाऱ्या माशांवर रागावतो, ॥136॥
137-18
तैसे फळकाम दुर्बळ । म्हणती कर्मचि किडाळ । मग निर्णयो देती केवळ । त्यजावे ऐसा ॥137॥
त्याप्रमाणे कर्मफळत्यागाविषयी अशक्त आहेत म्हणून कर्मच वाईट असे ते म्हणतात आणि मग कर्मत्याग करवा असा सिद्धांत ठरवितात. ॥137॥
138-18
एक म्हणती यागादिक । करावेचि आवश्यक । जे यावाचूनि शोधक । आन नसे ॥138॥
कोणी असे म्हणतात कि, यज्त्रयागादी हे अवश्य केलेच पाहिजे, कारण त्यावाचून चित्तशुद्धी होण्यास दुसरा उपायच नाही. ॥138॥
139-18
मनशुद्धीच्या मार्गी । जै विजयी व्हावे वेगी । तै कर्म सबळालागी । आळसु न कीजे ॥139॥
जर चित्तशुद्धी लवकर व्हावी अशी इच्छा असेल, तर कर्माचे आचरण करण्यास आळस करू नये. ॥139॥
140-18
भांगार आथी शोधावे । तरी आगी जेवी नुबगावे । का दर्पणालागी सांचावे । अधिक रज ॥140॥
सोनी शुध्द करावयाचे असेल, तर ते अग्नीत घालण्याविषयी जसा कंटाळा करू नये, किंवा आरशात पहावयाचे असल्यास त्यावरील मळ काढण्याकरिता चुना लावून तो साफ करावा लागतो; ॥140॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-18
नाना वस्त्रे चोख होआवी । ऐसे आथी जरी जीवी । तरी संवदणी न मनावी । मलिन जैसी ॥141॥
अथवा वस्त्रे स्वच्छ निघावी अशी जर इच्छा असेल, तर ती परटाच्या गलिच्छ सतेल्यात घालण्याविषयी मनात शंका बाळगू नये; ॥141॥
142-18
तैसी कर्मे क्लेशकारे । म्हणौनि न न्यावी अव्हेरे । का अन्नलाभे अरुवारे । रांधितिये उणे ॥142॥
किंवा उत्तम अन्न हवे असेल तर ते तयार केल्याशिवाय कसे प्राप्त होईल त्याप्रमाणे कर्मे क्लेशदायक आहेत, म्हणून त्यांची हेळसांड करू नये. ॥142॥
143-18
इही इही गा शब्दी । एक कर्मी बांधिती बुद्धी । ऐसा त्यागु विसंवादी । पडोनि ठेला ॥143॥
याप्रकारचे सिद्धांत ठरवून कोणी कर्म करण्यास तयार होतात व कोणी कर्म टाकावे म्हणतात; अशा प्रकारे कर्म त्यागाविषयी वाद पडला आहे, ॥143॥
144-18
तरी विसंवादु तो फिटे । त्यागाचा निश्चयो भेटे । तैसे बोलो गोमटे । अवधान देई ॥144॥
तर ह्या वादाचा निकाल करून, कर्मचा त्याग कसा करावा ते तुला उत्तम रितीने सांगतो तिकडे लक्ष दे. ॥144॥
निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम ।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ॥18. 4॥
145-18
तरी त्यागु एथे पांडवा । त्रिविधु पै जाणावा । तया त्रिविधाही बरवा । विभाग करू ॥145॥
तर अर्जुना, असे पहा की, हा त्याग तीन प्रकारचा आहे समजलास ? आता तिन्ही प्रकार निट वर्णन करून सांगतो; ॥145॥
146-18
त्यागाचे तीन्ही प्रकार । कीजती जरी गोचर । तरी तू इत्यर्थाचे सार । इतुले जाण ॥146॥
त्यागाचे तीन प्रकार जरी स्पष्ट सांगितले तरी त्याचे तात्पर्य एव्हढेच आहे असे तु समज. ॥146॥
147-18
मज सर्वज्ञाचिये बुद्धी । जे अलोट माने त्रिशुद्धी । निश्चयतत्व ते आधी । अवधारी पा ॥147॥
मज सर्वज्ञाच्याही बुद्धीला जे खरे वाटते, आणि ज्याविषयी माझे मनाचा निश्चय ठरला आहे, तो निश्चय कोणता तो एक. ॥147॥
148-18
तरी आपुलिये सोडवणे । जो मुमुक्षु जागो म्हणे । तया सर्वस्वे करणे । हेचि एक ॥148॥
संसारापासून आपली सुटका व्हावी म्हणून जो मुमुक्षु दक्ष असतो, त्याने सर्व प्रकारे हेच एक करावे; त्यागाचे खरे स्वरूप ओळखून तो करावा. ॥148॥

यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ॥18. 5॥
149-18
जिये यज्ञदानतपादिके । इये कर्मे आवश्यके । तिये न सांडावी पांथिके । पाउले जैसी ॥149॥
पांथिकाने ज्याप्रमाणे पावले टाकण्याचे (मार्ग चालण्याचे) सोडता कामा नये, त्याप्रमाणे, यज्ञ, दान व तप हि जी आवश्यक कर्मे ती सोडू नये. ॥149॥
150-18
हारपले न देखिजे । तव तयाचा मागु न सांडिजे । का तृप्त न होता न लोटिजे । भाणे जेवी ॥150॥
हरवलेला जिन्नस सापडेपर्यंत जसा त्याचा मार्ग सोडता येत नाही; अथवा पोट भरल्याशिवाय जसे आपल्या पुढील पान दूर सारता येत नाही. ॥150॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
151-18
नाव थडी न पवता । न खांडिजे केळी न फळता । का ठेविले न दिसता । दीपु जैसा ॥151॥
किंवा नाव नदीचे काठास पोहोचल्या खेरीज मध्येच सोडता येत नाही, अथवा केळी आल्याशिवाय केळीचे झाड कापता येत नाही; किंवा ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू सापडल्या शिवाय दिवा मालविता येत नाही. ॥151॥
152-18
तैसी आत्मज्ञानविखी । जव निश्चिती नाही निकी । तव नोहावे यागादिकी । उदासीन ॥152॥
त्याप्रमाणे आत्मज्ञाना विषयी दृढ निश्चय झाला नाही, तोपर्यंत यागादिक कर्मे करण्याविषयी उदासीन होऊ नये. ॥152॥
153-18
तरी स्वाधिकारानुरुपे । तिये यज्ञदाने तपे । अनुष्ठावीचि साक्षेपे । अधिकेवर ॥153॥
तर आपल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ, दान व तप याचे यथाविधी वरचेवर आचरण केलेच पाहिजे. ॥153॥
154-18
जे चालणे वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशयो आहे । नैष्कर्म्यालागी ॥154॥
जो चालण्याची त्वरा करतो, त्याला तीच त्वरा विसावा घेण्यास उपयोगी पडे, तसे कर्माचे अधिक आचरण करणे हे कर्मत्यागास उपयोगी पडते. ॥154॥
155-18
अधिके जव जव औषधी । सेवनेची मांडी बांधी । तव तव मुकिजे व्याधी । तयाचिये ॥155॥
एखादा रोगी औषध घेण्याविषयी जो जो अधिकाधिक तयार होतो, तो तो तो रोगापासून मुक्त होत जातो ॥155॥
156-18
तैसी कर्मे हातोपाती । जै कीजती यथानिगुती । तै रजतमे झडती । झाडा देऊनी ॥156॥
त्याप्रमाणे जो जो कर्मे विधिपूर्वक लवकर लवकर करावी, तो तो रज व तम हे गुण समूळ नाहीतसे होतात; ॥156॥
157-18
का पाठोवाटी पुटे । भांगारा खारु देणे घटे । तै कीड झडकरी तुटे । निर्व्याजु होय ॥157॥
अथवा सोन्यास एकामागून एक जेव्हा खाराची पुटे द्यावी तेव्हा त्याचा हिणकसपणा जाऊन ते शुद्ध होते. ॥157॥
158-18
तैसे निष्ठा केले कर्म । ते झाडी करूनि रजतम । सत्वशुद्धीचे धाम । डोळा दावी ॥158॥
तसे निष्ठेने कर्माचे आचरण केले असता; ते रज व तम याचा नाश करून सत्तशुद्धीचे दर्शन करून देते. ॥158॥
159-18
म्हणौनिया धनंजया । सत्वशुद्धी गिंवसितया । तीर्थांचिया सावाया । आली कर्मे ॥159॥
म्हणून अर्जुना, सत्तशुद्धी प्राप्त होण्यास सत्कर्मे हीच तीर्थाची योग्यता पावतात. ॥159॥
160-18
तीर्थे बाह्यमळु क्षाळे । कर्मे अभ्यंतर उजळे । एवं तीर्थे जाण निर्मळे । सत्कर्मेचि ॥160॥
तीर्थांनी बाह्य मलाचे क्षालन होते आणि कर्मांच्या योगे अंतर्मल नाहीसा होता. एवंच सत्कर्मे हीच चीत्तशुद्धीस तीर्थे होत ॥160॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-18
तृषार्ता मरुदेशी । झळे अमृते वोळली जैसी । की अंधालागी डोळ्यासी । सूर्यु आला ॥161॥
तहान लागलेल्या मनुष्यास मारवाड देशात जसा एखादा अमृताचा, पाण्याचा झरा सापडावा किंवा आंधळ्यांच्या डोळ्यात सूर्याचे तेज यावे, ॥161॥
162-18
बुडतया नदीच धाविन्नली । पडतया पृथ्वीच कळवळिली । निमतया मृत्यूने दिधली । आयुष्यवृद्धी ॥162॥
बुडणाऱ्यास तारण्याकरिता नदीनेच धावावे, पडणाराला जसे पृथ्विनेच झेलावे अथवा मारणारास मृत्यूनेच आयुष्यवृद्धी द्यावी, ॥162॥
163-18
तैसे कर्मे कर्मबद्धता । मुमुक्षु सोडविले पंडुसुता । जैसा रसरीति मरता । राखिला विषे ॥163॥
त्याप्रमाणे कर्मापासून मुमुक्षुस होणारी पिडा कर्मानीच दूर करावी; अथवा हे अर्जुना, रसायन करण्याची ज्यास युत्क्ती माहित आहे, तो वैद्द ज्याप्रमाणे विष शुद्ध करून त्याचे अमृत करून मरणाचे रक्षणकरतो, ॥163॥
164-18
तैसी एके हातवटिया । कर्मे कीजती धनंजया । बंधकेचि सोडवावया । मुख्ये होती ॥164॥
त्याप्रमाणे धनंजया, युक्तीने कर्मे केली असता ती बाधक असून ही मुक्त करण्यास कारणीभूत होतात ॥164॥
165-18
आता तेचि हातवटी । तुज सांगो गोमटी । जया कर्माते किरीटी । कर्मचि रुसे ॥1॥165॥
तर अर्जुना, जिच्यायोगे कर्मापासूनच कर्माचा नाश होतो, ती युक्ती कोणती ती तुला उत्तम रीतीने सांगतो ॥165॥
एतान्यपि तु कर्माणि संगं त्यक्त्वा फलानि च ।
कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥18. 6॥
166-18
तरी महायागप्रमुखे । कर्मे निफजताही अचुके । कर्तेपणाचे न ठाके । फुंजणे आंगी ॥166॥
तर पंचमहायज्ञादि प्रमुख कर्मे यथाविधी घडत असता जो कर्तुत्वचा अभिमान बाळगीत नाही, ॥166॥
167-18
जो मोले तीर्था जाये । तया मी यात्रा करितु आहे । ऐसिये श्लाघ्यतेचा नोहे । तोषु जेवी ॥167॥
जो मोलाने (दुसऱ्याजवळून पैसे घेऊन )तीर्थयात्रा करतो, त्याला मी यात्रा करीत आहे अशा मोठेपणाचा हर्ष होत नाही; ॥167॥
168-18
का मुद्रा समर्थाचिया । जो एकवटु झोंबे राया । तो मी जिणता ऐसिया । न येचि गर्वा ॥168॥
किंव्हा राजशिक्कयाच्या बळावर जो एकटा राजासही पकडून आणतो त्याला मी या राजस जिंकले, असा गर्व होत नाही; ॥168॥
169-18
जो कासे लागोनि तरे । तया पोहती ऊर्मी नुरे । पुरोहितु नाविष्करे । दातेपणे ॥169॥
जो दुसऱ्यास कासेस लागून नदी उतरून पलीकडे जातो, त्याला मी पोहणारा आहे, असा गर्व होत नाही; किंवा ज्याप्रमाणे राजाचे उपाध्यास राजाकरिता दुसऱ्यास आपल्या हाताने दिलेल्या दानाबद्दल अभिमान वाटत नाही, ॥169॥
170-18
तैसे कर्तृत्व अहंकारे । नेघोनि यथा अवसरे । कृत्यजातांचे मोहरे । सारीजती ॥170॥
त्याचप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान न बाळगिता ज्या ज्या वेळी जी जी कर्मे करावयाची ती ती यथाविधी जी करितो; ॥170॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-18
केल्या कर्मा पांडवा । जो आथी फळाचा यावा । तया मोहरा हो नेदावा । मनोरथु ॥171॥
हे पांडवा, केलेल्या कर्माची जी फळ प्राप्ती व्हावयाची तिच्याविषयी जो आपल्या मनात इच्छा उत्पन्न होवू देत नाही. ॥171॥
172-18
आधीचि फळी आस तुटिया । कर्मे आरंभावी धनंजया । परावे बाळ धाया । पाहिजे जैसे ॥172॥
हे धनंजया, प्रथम फळाची आशा सोडून निष्काम कर्मास आरंभ करावा; ज्याप्रमाणे दुसऱ्याचे लेकरू पाहून त्याच्या ठिकाणी प्रीती नित्यनैमित्तिक ठेवता नुसता संतोष मानवा. ॥172॥
173-18
पिंपरुवाचिया आशा । न शिंपिजे पिंपळु जैसा । तैसिया फळनिराशा । कीजती कर्मे ॥173॥
पिंपराच्या आशेने जसा कोणी पिंपळास पाणी घालत नाही तशी फळाची आशा सोडून कर्मे करावे. ॥173॥
174-18
सांडूनि दुधाची टकळी । गोवारी गावधेनु वेटाळी । किंबहुना कर्मफळी । तैसे कीजे ॥174॥
गुराखी दुधाची आशा सोडून जसा गावातील गाई वळतो, तसे कर्मफलाविषयी निरिच्छ असावे. ॥174॥
175-18
ऐसी हे हातवटी । घेऊनि जे क्रिया उठी । आपणा आपुलिया गाठी । लाहेची तो ॥175॥
या युक्तीने जो कर्मांचे आचरण करितो, त्याला आपल्याजवळच असलेल्या आत्मस्वरूपाची भेट होते. ॥175॥
176-18
म्हणौनि फळी लागु । सांडोनि देहसंगु । कर्मे करावी हा चांगु । निरोपु माझा ॥176॥
म्हणून फलाविषयी आशा सोडून व मी कर्ता हा अभिमान सोडून कर्मे करावी, अशी उत्तम प्रकारची माझी आज्ञा आहे. ॥176॥
177-18
जो जीवबंधीं शिणला । सुटके जाचे आपला । तेणे पुढतपुढती या बोला । आन न कीजे ॥177॥
जो जन्ममृत्युचा येरझारा करिता करीता त्रासून गेला आहे व आपली त्यापासून सुटका कशी होईल, या काळजीत आहे त्याला वारंवार सांगणे आहे कि. त्याने या आज्ञेचे उल्लंघन करू नये. ॥177॥

नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते ।
मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः ॥18. 7॥
178-18
नातरी आंधाराचेनि रोखे । जैसी डोळा रोविजती नखे । तैसा कर्मद्वेषे अशेखे । कर्मेचि सांडी ॥178॥
एखादा मनुष्य अंधारातून चालत असता धक्का बसल्यावर त्याबद्दलचा राग डोळ्यांवर काढून डोळ्यात नखे बोचतो, त्याप्रमाणे कर्मे जन्मबंधास कारण आहे, म्हणून त्यांच्यावर रागावून जो ती सर्व कून देतो, ॥178॥
179-18
तयाचे जे कर्म सांडणे । ते तामस पै मी म्हणे । शिसाराचे रागे लोटणे । शिरचि जैसे ॥179॥
॥त्याच्या त्याच्या कर्मत्यागस मी तामस त्याग म्हणतो याप्रमाणे अर्धशिशी उठल्यावर रागाने आपले शिरच कापतो. ॥179॥
180-18
हा गा मार्गु दुवाडु होये । तरी निस्तरितील पाये । की तेचि खांडणे आहे । मार्गापराधे ॥180॥
अरे, वाट जरी वाईट असली तरी पायांनीच चालून संपवली पाहिजे, पण त्या वाटेच्या वाईट पणाबद्दल पाय तोडावी की काय ? ॥180॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-18
भुकेलियापुढे अन्न । हो का भलतैसे उन्ह । तरी बुद्धी न घेता लंघन । भाणे पापरा हल्या ॥181॥
भूक लागलेल्या मनुष्यापुढे अति कढत अन्न ठेवले आणि त्याला ते सहन न होऊन त्याने त्याने ते लाथेने झुगारून दिले, तर त्याला लंगनच करावे लागणार ! ॥181॥
182-18
तैसा कर्माचा बाधु कर्मे । निस्तरीजे करितेनि वर्मे । हे तामसु नेणे भ्रमे । माजविला ॥182॥
त्याप्रमाणे कर्माचे युक्तीने आचरण केले असता कर्माचा दोष नाहीसा होतो. हे तो तामस मनुष्य भ्रमिष्ट झाला असल्यामुळे त्याला समजत नाही. ॥182॥
183-18
की स्वभावे आले विभागा । ते कर्मचि वोसंडी पै गा । तरी झणे आतळा त्यागा । तामसा तया ॥183॥
तो आपल्या धर्माप्रमाणे आपल्यास करावयाची जे कर्म ते टाकून देतो, तेव्हा तु त्या तामस मनुष्याप्रमाणे कर्म त्यागाच्या स्वाधीन होऊ नको, ॥83॥
दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत् ।
स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत् ॥18. 8॥
184-18
अथवा स्वाधिकारु बुझे । आपले विहितही सुजे । परी करितया उमजे । निबरपणा ॥184॥
अथवा, आपला अधिकार काय आहे हे जाणतो व आपली विहित कर्म कोणतेही त्यास माहीतच आहे परंतु ती कर्मे करण्याच्या क्लेशास भिऊन जो त्यांजविषयी कंटाळा करतो; ॥184॥
185-18
जे कर्माची ऐलीकड । नावेक दिसे दुवाड । जे वाहतिये वेळे जड । शिदोरी जैसी ॥185॥
कर्माचा आरंभ क्षणभर कठीण दिसतो खरा जशी शिदोरी नेते वेळेस जड लागते. ॥185॥
186-18
जैसा निंब जिभे कडवटु । हिरडा पहिले तुरटु । तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय ॥186॥
जसा लिंब खाताना जिभेला कडू लागतो व हिरडा तुरट लागतो, तसा कर्माच आरंभ कठीण वाटतो; ॥186॥
187-18
का धेनु दुवाड शिंग । शेवंतीये अडव आंग । भोजनसुख महाग । पाकु करिता ॥187॥
किंवा काय मारकट असली, शेवंतीच्या झाडाला काटे आहेत स्वयंपाक करतेवेळेस भोजनाचे सुख नसते ॥187॥
188-18
तैसे पुढतपुढती कर्म । आरंभीच अति विषम । म्हणौनि तो ते श्रम । करिता मानी ॥188॥
तसे कर्म आरंभी तेवढेच अतिकठोर असते, म्हणून ते करण्याचे श्रम होतात; असे तो समजतो. ॥188॥
189-18
येऱ्हवी विहितत्वे मांडी । परी घालिता असुरवाडी । तेथ पोळला ऐसा सांडी । आदरिलेही ॥189॥
बाकी कर्माचा आरंभ यथाविधि करतो; पण कढत वस्तू हातात घेऊन हात भाजतात ती टाकून द्यावी, त्याप्रमाणे त्या कर्माचरणापासून श्रम होऊ लागल्यावर ती कर्मे मध्येच टाकतो; ॥189॥
190-18
म्हणे वस्तु देहासारिखी । आली बहुती भाग्यविशेखी । मा जाचू का कर्मादिकी । पापिया जैसा ? ॥190॥
आणि म्हणतो की, भाग्य म्हणून माझे महतभाग्य म्हणून देहासारखी उत्तम वस्तू लाभली असता, पाप्यायाप्रमाणे कर्माचे आचरण करू मी आपल्याच त्रास का करून घ्यावा ? ॥190॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-18
केले कर्मी जे द्यावे । ते झणे मज होआवे । आजि भोगू ना का बरवे । हातीचे भोग ? ॥191॥
कर्माचे आचरण करून त्यापासून मिळणारे जे भोग त्यांची गरज नाही; तर आज जे आपल्यास ऐश्वर्य प्राप्त झाले आहे, त्याचा उपभोग का घेऊ नये ? ॥191॥
192-18
ऐसा शरीराचिया क्लेशा । भेणे कर्मे वीरेशा । सांडी तो परीयेसा । राजसु त्यागु ॥192॥
अशाप्रकारे अर्जुना, शरीरास क्लेश होतील या भीतीने जो कर्मे टाकून देतो, त्याला राजस त्याग असे म्हणतात, ॥192॥
193-18
येऱ्हवी तेथही कर्म सांडे । परी तया त्यागफळ न जोडे । जैसे उतले आगी पडे । ते नलगेचि होमा ॥193॥
त्याठिकाणी ही कर्मत्याग होतो; परंतु त्याला कर्म त्यागाचे फळ मिळत नाही, ज्याप्रमाणे उतू आलेले तूप आगीत पडले, तरी त्याला होमाची योग्यता प्राप्त होत नाही. ॥93॥
194-18
का बुडोनि प्राण गेले । ते अर्धोदकी निमाले । हे म्हणो नये जाहले । दुर्मरणचि ॥194॥
किंवा एखाद्याचा पाण्यात बुडून प्राण गेला असता त्याने जलसमाधी घेतली असे म्हणता येत नाही, तर त्याचे ते अपघाताचे मरण असे म्हटले पाहिजे, ॥194॥
195-18
तैसे देहाचेनि लोभे । जेणे कर्मा पाणी सुभे । तेणे साच न लभे । त्यागाचे फळ ॥195॥
त्याप्रमाणे देहावर प्रीती ठेवून ज्याने कर्मांवर पाणी सोडले, त्याला कर्म त्यागाचे फळ खास मिळत नाही. ॥195॥
196-18
किंबहुना आपुले । जै ज्ञान होय उदया आले । तै नक्षत्राते पाहले । गिळी जैसे ॥196॥
किंबहुना ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे, त्याला सुर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे नक्षत्राचे तेच लोपते, ॥196॥
197-18
तैशा सकारण क्रिया । हारपती धनंजया । तो कर्मत्यागु ये जया । मोक्षफळासी ॥197॥
त्याप्रमाणे अर्जुना, ज्या कर्मत्याग पासून ज्ञानासह क्रियांचा लोप होतो, त्यापासून मोक्षप्राप्ती होते ॥197॥
198-18
ते मोक्षफळ अज्ञाना । त्यागिया नाही अर्जुना । म्हणौनि तो त्यागु न माना । राजसु जो ॥198॥
अर्जुना, ती मोक्षप्राप्ती अज्ञानाने कर्माचा त्याग केला असता होत नाही, म्हणून तो खरा कर्मत्याग नसून राजस त्याग होय. ॥198॥
199-18
तरी कोणे पा एथ त्यागे । ते मोक्षफळ घर रिघे । हेही आइक प्रसंगे । बोलिजेल ॥199॥
तर कोणत्या त्यागा पासून मोक्षप्राप्ती आपल्या घरी चालत येते, तेही प्रसंगानुरोधाने तुला सांगतो, ते ऐक. ॥199॥

कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियतेऽर्जुन ।
सङ्गं त्यक्त्वा फलं चैव स त्यागः सात्त्विको मतः ॥18. 9॥
200-18
तरी स्वाधिकाराचेनि नांवे । जे वांटिया आले स्वभावे । ते आचरे विधिगौरवे । शृंगारोनि ॥200॥
तर आपल्या अधिकारानुरूप जे सहज आपल्या वाट्यास आलेली कर्म, ते साहित्यासह गौरवाने यथाविधि आचरण करितो; ॥200॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
201-18
परी हे मी करितु असे । ऐसा आठवु त्यजी मानसे । तैसेचि पाणी दे आशे । फळाचिये ॥201॥
परंतु हे कर्म मी करीत आहे, अशी मनात आठवणही होवू देत नाही; तसेच फळाच्या आशेवर ही पाणी सोडतो. ॥201॥
202-18
पै अवज्ञा आणि कामना । मातेच्या ठायी अर्जुना । केलिया दोनी पतना । कारण होती ॥202॥
अर्जुना, असे पहा कि, मातेची अवज्ञा केली व तिच्याविषयी मनात कामवासना उत्पन्न होऊ दिली, तर या दोन्ही गोष्टी नरक प्राप्तीस कारण होतात.
203-18
तरी दोनी ये त्यजावी । मग माताची ते भजावी । वाचूनि मुखालागी वाळावी । गायचि सगळी ? ॥203॥
तर या दोन्ही वर्ज्य करून मातेची सेवा करावी. गाईचे तोंड अपवित्र असले म्हणून गाईच्या सर्वागाचा त्याग करावयाचा की काय ?
204-18
आवडतियेही फळी । असारे साली आंठोळी । त्यासाठी अवगळी । फळाते कोण्ही ? ॥204॥
आपल्यास आवडते जे फळ (आंबा) त्याची साल व कोय यामध्ये रस नाही, हे दोन दुर्गुण त्याच्या ठिकाणी आहेत, म्हणून तो आंबा कोणी टाकून देईल काय ?
बंध म्हणजे काय ?.
205-18
तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहीचे नांव बंधु । कर्माचा की ॥205॥
त्याप्रमाणे कर्म केल्याचा अभिमान आणि कर्मफळाची इच्छा या दोहोसच बंध असे नाव आहे.
206-18
तरी या दोहीच्या विखी । जैसा बापु नातळे लेकी । तैसा हो न शकेदुःखी । विहिता क्रिया ॥206॥
म्हणून बाप ज्याप्रमाणे आपल्या कन्येविषयी इच्छा बाळगत नाही, त्याप्रमाणे विहित कर्माचे आचरण करून जो या दोहोविषयी इच्छा करीत नाही, त्याला दुःख होऊ शकत नाही.
207-18
हा तो त्याग तरुवरु । जो गा मोक्षफळे ये थोरु । सात्विक ऐसा डगरु । यासीच जगी ॥207॥
हा त्याग रूप वृक्ष सर्व वृक्षांत श्रेष्ठ असून, यालाच मोक्षरूप मोठाली फळे येतात म्हणून सर्व जगात सात्विक त्याग अशी प्रसिद्धी आहे.
208-18
आता जाळूनि बीज जैसे । झाडा कीजे निर्वंशे । फळ त्यागूनि कर्म तैसे । त्यजिले जेणे ॥208॥
आता, झाडाचे बीज जाळून झाडास जशी निर्वंश करावे, तसे फळाचा त्याग करून जो कर्माचा त्याग करतो.
209-18
लोह लागतखेवो परीसी । धातूची गंधिकाळिमा जैसी । जाती रजतमे तैसी । तुटली दोन्ही ॥209॥
ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श होताक्षणीच लोखंडाचा कलंक व रंगही बदलतात, त्याप्रमाणे कर्म कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफळाची इच्छा या दोन गोष्टीचा त्याग केल्यावर रज व तम हे दोन्ही त्याग नाहीतसे होतात.
210-18
मग सत्वे चोखाळे । उघडती आत्मबोधाचे डोळे । तेथ मृगांबु सांजवेळे । होय जैसे ॥210॥
मग शुद्ध सत्वाने आत्मबोधाच्या उजेड होउन जसे संध्याकाळी मृगजळ आपोआप नाहितसे होते,
211-18
तैसा बुद्ध्यादिकांपुढा । असतु विश्वाभासु हा येवढा । तो न देखे कवणीकडा । आकाश जैसे ॥211॥
किंवा आकाश (पोकळी) जसे कोणीकडे दिसत नाही, तसा ज्ञानाच्या पुढे जगाचा मोठा मिथ्याभास दिसत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

न द्वेष्ट्यकुशलं कर्म कुशले नानुषज्जते ।
त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्नसंशयः ॥18. 10॥
212-18
म्हणौनि प्राचिनाचेनि बळे । अलंकृते कुशलाकुशले । तिये व्योमाआंगी आभाळे । जिराली जैसी ॥212॥
म्हणून पूर्वकर्मानुरोधाने जी बरी वाईट कर्मे प्राप्त होतील ती, आकाशात जसे ढग उत्पन्न होऊन मावळतात.
213-18
तैसी तयाचिये दिठी । कर्मे चोखाळली किरीटी । म्हणौनि सुखदुःखी उठी । पडेना तो ॥213॥
तशी अर्जुना, त्याच्या दृष्टीने सर्व कर्मे निर्दोष असतात. म्हणून त्यापासून होणार्‍या सुखदुःखांची उठाठेव तो करीत नाही.
214-18
तेणे शुभकर्म जाणावे । मग ते हर्षे करावे । का अशुभालागी होआवे । द्वेषिया ना ॥214॥
शुभ कर्म असे समजून तो ते हर्षाने करीत नाही, किंवा हे अशुभ म्हणून त्याचा द्वेष करीत नाही.
215-18
तरी इयाविषयींचा काही । तया एकुही संदेहो नाही । जैसा स्वप्नाच्या ठायी । जागिन्नलिया ॥215॥
ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर स्वप्नात पाहिलेल्या गोष्टीची कोणी सुखदुःख मानीत नाही, त्याप्रमाणे शुभ किंवा अशुभ याविषयी त्याच्या मनात शंकाच येत नाही.
216-18
म्हणौनि कर्म आणि कर्ता । या द्वैतभावाची वार्ता । नेणे तो पंडुसुता । सात्विक त्यागु ॥216॥
म्हणून अर्जुना, हे कर्म आणि कर्ता यात द्वैतभावाची वार्ता तो जाणतहि नाही, त्याला सात्त्विक त्याग असे म्हणतात.
217-18
ऐसेनि कर्मे पार्था । त्यजिली त्यजिती सर्वथा । अधिके बांधिती अन्यथा । सांडिली तरी ॥217॥
पार्था, अशाप्रकारे कर्माचा त्याग केला तरच कर्माचा त्याग होतो; पण या व्यतिरिक्त अन्य प्रकारे कर्माचा त्याग केला, तर ती उलटी अधिकच बंधनात पाडतात.
न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः ।
यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ॥18. 11॥
218-18
आणि हा गा सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गावंढे गा ॥218॥
आणि अर्जुना, जो देह प्राप्त झाला असता कर्म करण्याचा कंटाळा करतात, ते मूर्ख होत. ॥18॥
219-18
मृत्तिकेचा वीटु । घेऊनि काय करील घटु ? । केउता ताथु पटु । सांडील तो ? ॥219॥
मातीचा कंटाळा करून घट काय करील ? आणि वस्त्राला तंतूचा संबंध कसा तोडता येईल ? ॥19॥
220-18
तेवीचि वन्हित्व आंगी । आणि उबे उबगणे आगी । की तो दीपु प्रभेलागी । द्वेषु करील काई ? ॥220॥
तसेच अग्नीत्व अंगी असलेल्या आगीला उष्णतेचा कंटाळा करता येईल का ? किंवा दिवा आपल्या प्रभेचा द्वेष करील काय ? ॥220॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-18
हिंगु त्रासिला घाणी । तरी कैचे सुगंधत्व आणी ? । द्रवपण सांडूनि पाणी । के राहे ते ? ॥221॥
हिंगाला जरी आपल्या घाणीचा त्रास आला तरी त्याने चांगला वास कुठून आणावा ? किंवा पातळपणा टाकून पाणी कोठे राहणार ? ॥21॥
222-18
तैसा शरीराचेनि आभासे । नांदतु जव असे । तव कर्मत्यागाचे पिसे । काइसे तरी ? ॥222॥
त्याप्रमाणे शरीराचे अवस्थेमध्ये जोपर्यंत मनुष्य नांदत आहे, तोपर्यंत कर्म त्यागाचे वेड काय उपयोगी पडेल ? ॥22॥
223-18
आपण लाविजे टिळा । म्हणौनि पुसो ये वेळोवेळा । मा घाली फेडी निडळा । का करू ये गा ? ॥223॥
आपण लावलेले गंध वाकडे लागले, तर ते वरचेवर पुसता येते; परंतु कपाळ जर वाकडे असेल, तर ते कसे नीट करता येईल ? ॥23॥
224-18
तैसे विहित स्वये आदरिले । म्हणौनि त्यजू ये त्यजिले । परी कर्मचि देह आतले । ते का सांडील गा ? ॥224॥
त्याप्रमाणे ज्या विहित कर्माचा आपणच स्वतः आदर केला आहे, त्याचा त्याग करावयाचा म्हटले तर करिता येईल; पण त्यायोगे काही कर्मत्याग होणार नाही. कारण शरीर हे कर्म रूपच असल्यामुळे कर्म कसे टाकता येणार ? ॥24॥
225-18
जे श्वासोच्छ्वासवरी । होत निजेलियाहीवरी । काही न करणेयाचि परी । होती जयाची ॥225॥
का की, मनुष्य निजला असला तरी श्वासोश्वास रूपाने कर्म हे घडतेच, अर्थात आपण काही एक न करिता त्याची उभारणी होते, ॥25॥
226-18
या शरीराचेनि मिसके । कर्मची लागले असिके । जिता मेलया न ठाके । इया रीती ॥226॥
या शरीराच्या निमित्ताने कर्म हे पाठीस लागले आहेच आणि याप्रमाणे ते जिवंतपणी व मेल्यावरही कर्म करण्याचे राहत नाही. ॥26॥
227-18
यया कर्माते सांडिती परी । एकीचि ते अवधारी । जे करिता न जाइजे हारी । फळशेचिये ॥227॥
हे बघ, या कर्मचा त्याग करण्याचा एकच प्रकार आहे. तो असा की, कर्म करीत असतात फलेच्छेच्या आधीन होऊ नये. ॥27॥
228-18
कर्मफळ ईश्वरी अर्पे । तत्प्रसादे बोधु उद्दीपे । तेथ रज्जुज्ञाने लोपे । व्याळशंका ॥228॥
कर्माचे फळ ईश्वरास अर्पण केले, म्हणजे त्याच्या प्रसादाने ज्ञान उत्पन्न होते आणि मग दोरीचे यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यावर जशी सर्पाची शंका दूर होते, ॥28॥
229-18
तेणे आत्मबोधे तैसे । अविद्येसी कर्म नाशे । पार्था त्यजिजे जै ऐसे । तै त्यजिले होय ॥229॥
तसा या आत्मबोधाने अज्ञाना सह कर्माचा नाश होतो. पार्था, जेव्हा कर्माचा अशा रीतीने त्याग करावा, तेव्हाच तो खरा त्याग होय. ॥29 ।
230-18
म्हणौनि इयापरी जगी । कर्मे करिता मानू त्यागी । येर मुर्छने नांव रोगी । विसावा जैसा ॥230॥
म्हणून जगामध्ये सात्विक त्यागाच्या हातोटीने कर्म करतो, त्यालाच आम्ही कर्म त्यागी असे मानू. एरवी रोग्याला मुर्छा आली असता ज्याप्रमाणे त्याला विश्रांती मिळाली असे लोक समजतात, ॥230॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-18
तैसा कर्मी शिणे एकी । तो विसांवो पाहे आणिकी । दांडेयाचे घाय बुकी । धाडणे जैसे ॥231॥
त्याप्रमाणे तो कर्म करताना कंटाळतो, तो विसावा घ्यावा म्हणून दुसरे कर्म सुरू करतो. ती असे की, याप्रमाणे दांड्याच्या घावाच्या वेदना बुक्क्यांनी कमी करावयाच्या तसाच हा प्रकार आहे. ॥31॥
232-18
परी हे असो पुढती । तोचि त्यागी त्रिजगती । जेणे फळत्यागे निष्कृती । नेले कर्म ॥232॥
परंतु ही असो; ज्याने फळत्याग करून कर्माला निष्कर्मत्व आणिले तोच या त्रिभुवनात त्यागी होय. ॥32॥
अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलम् ।
भवत्यत्यागिना प्रेत्य न तु संन्यासिना क्वचित् ॥18. 12॥
233-18
येऱ्हवी तरी धनंजया । त्रिविधा कर्मफळा गा यया । समर्थ ते की भोगावया । जे न सांडितीचि आशा ॥233॥
एरवी तरी अर्जुना, जे कर्मफळाची अशा सोडीत नाहीत तिच्या तीन प्रकारच्या कर्मफळाचा भोग घेण्यास समर्थ असतात. ॥33॥
234-18
आपणचि विऊनि दुहिता । की न मम म्हणे पिता । तो सुटे की प्रतिग्रहीता । जावई शिरके ॥234॥
आपण कन्येस जन्म दिला असूनही ‘ती माझी नाही’ असे म्हणून पिता जेव्हा कन्यादानाचे उदक सोडतो, तेव्हा त्याची तिजवरील माया सुटून पाणि ग्रहण करणारा जावाई तिच्या मायापाशांत पडतो. ॥34॥
235-18
विषाचे आगरही वाहती । ते विकिता सुखे लाभे जिती । येर निमाले जे घेती । वेचोनि मोले ॥235॥
जे विषाच्या (बचनाग वगैरेच्या) बागा किंवा व्यापार करितात, ते त्याची विक्री करून त्याजवर नफा मिळवून सुखाने प्रपंच करतात, पण जे त्याचे सेवन करतात, ते द्रव्य खर्चूनही मरण पावतात ! ॥35॥
236-18
तैसे कर्ता कर्म करू । अकर्ता फळाशा न धरू । एथ न शके आवरू । दोहीते कर्म ॥236॥
त्याप्रमाणे कर्तेपणाचा अभिमान धरू कर्म करो, किंवा मी कर्ता नाही, असे समजून फळाची आशा सोडून कर्म करो, तरी दोघांनाही कर्म करणे चुकत नाही. ॥36॥
237-18
वाटे पिकलिया रुखाचे । फळ अपेक्षी तयाचे । तेवी साधारण कर्माचे । फळ घे तया ॥237॥
रस्त्यावरील पिकलेल्या (आम्र) वृक्षाच्या फळाची जो इच्छा करील त्याचे ते फल असते (म्हणजे त्यास ते फळ बंधनकारक होते.
238-18
परी करूनि फळ नेघे । तो जगाच्या कामी न रिघे । जे त्रिविध जग अवघे । कर्मफळ हे ॥238॥
वाटेवरील वृक्षांच्या पिकलेल्या फळांचा इच्छा करितो, त्यासच ती बाधक होते; परंतु कर्म करून तो फळाची आशा करीत नाही, जन्ममृत्यूच्या सपाट्यात सापडत नाही. कारण, हे तीन प्रकारचे जग कर्माचे फळ आहे. ॥38॥
239-18
देव मनुष्य स्थावर । यया नांव जगडंबर । आणि हे तव तिन्ही प्रकार । कर्मफळाचे ॥239॥
देव, मनुष्य व स्थावर याला जग असे म्हणतात, आणि हे तिन्ही प्रकार तर कर्मफळाचेच आहेत. ॥39॥
240-18
तेचि एक गा अनिष्ट । एक ते केवळ इष्ट । आणि एक इष्टानिष्ट । त्रिविध ऐसे ॥240॥
ते कर्म एक अनिष्ट (प्रतिकूल), एक केवळ इष्ट (अनुकूल) आणि एक इष्टानिष्ट (मिश्र) असे तीन प्रकारचे आहे; ॥40॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-18
परी विषयमंती बुद्धी । आंगी सूनि अविधी । प्रवर्तती जे निषिद्धी । कुव्यापारी ॥241॥
परंतु जे विषयासक्त आहेत, ते अविधीचा अंगीकार करून निषिद्ध अशा कर्माची ठिकाणी प्रवृत्त होतात; ॥241॥
242-18
तेथ कृमि कीट लोष्ट । हे देह लाहती निकृष्ट । तया नाम ते अनिष्ट । कर्मफळ ॥242॥
आणि त्यायोगे कृमी, कीटक अथवा माती वाईट देह पावतात, त्याला कर्मफळ असे म्हणतात ॥42॥
243-18
का स्वधर्मा मानु देता । स्वाधिकारु पुढा सूता । सुकृत कीजे पुसता । आम्नायाते ॥243॥
किंवा स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारनुरूप वेदात सांगितल्याप्रमाणे जेव्हा सुकृत करतात, ॥43॥
244-18
तै इंद्रादिक देवांची । देहे लाहिजती सव्यसाची । तया कर्मफळा इष्टाची । प्रसिद्धि गा ॥244॥
तेव्हा अर्जुना, तेव्हा इंद्रादीक देवतांचे देह प्राप्त होतात; त्या कर्म फळाला पुण्यकर्म असे म्हणतात; ॥44॥
245-18
आणि गोड आंबट मिळे । तेथ रसांतर फरसाळे । उठी दोंही वेगळे । दोही जिणते ॥245॥
आणि गोड व आंबट ही एकत्र केली असता ज्याप्रमाणे या दोहो वरचढ असा निराळ्या रुचीचा मधुर रस उत्पन्न होतो, ॥45॥
246-18
रेचकुचि योगवशे । होय स्तंभावयादोषे । तेवी सत्यासत्य समरसे । सत्यासत्यचि जिणिजे ॥246॥
किंवा प्राणवायू योगाभ्यासाने कुंभक होतो, त्याप्रमाणे सत्य व असत्य यांचे ऐक्य झाल्यावर ते त्या दोहोंनाही जिंकण्यास कारण होते. ॥46॥
247-18
म्हणौनि समभागे शुभाशुभे । मिळोनि अनुष्ठानाचे उभे । तेणे मनुष्यत्व लाभे । ते मिश्र फळ ॥247॥
म्हणून शुभ व अशुभ कर्मे समभाग मिळून जे कर्म घडते, मनुष्यदेह याचा लाभ हेच मिश्र फळ होय. ॥47॥
248-18
ऐसे त्रिविध यया भागी । कर्मफळ मांडलेसे जगी । हे न सांडी तया भोगी । जे सूदले आशा ॥248॥
या जगात तीन प्रकारचे कर्मफळ आहे; या कर्मफळाची अशा टाकत नाहीत, ते जन्म-मरणाचे फेऱ्यात पडतात. ॥48॥
249-18
जेथे जिव्हेचा हातु फाटे । तव जेविता वाटे गोमटे । मग परीणामी शेवटे । अवश्य मरण ॥249॥
ज्या जेवणाऱ्याला सहन होईल इतके तिखट पदार्थ खाऊन समाधान होते. त्याला त्यायोगे परिणामी अवश्य मरण प्राप्त होते. ॥49॥
250-18
संवचोरमैत्री चांग । जव न पविजे ते दांग । सामान्या भली आंग । न शिवे तव ॥250॥
जोपर्यंत अरण्य लाभले नाही, तोपर्यंतच संवचोराची मैत्री बरी, किंवा वेश्येचा जोपर्यंत स्पर्श झाला नाही तोपर्यंतच ती बरी असते. ॥250॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
251-18
तैसी कर्मे करिता शरीरी । लाहती महत्त्वाची फरारी । पाठी निधनी एकसरी । पावती फळे ॥251॥
त्याप्रमाणे देहात आहे तोपर्यंत कर्म करीत असता कर्तेपणाचा गर्व वाहवत, मरणानंतर एकसारखी त्यांना फळे भोगावीच लागतात. ॥51॥
252-18
तैसा समर्थु आणि ऋणिया । मागो आला बाइणिया । न लोटे तैसा प्राणिया । पडे तो भोगु ॥252॥
जसा समर्थ असून त्याचजवळ ऋण काढले आणि तो वायद्याच्या मुदतीस मागणी करू लागला, तर त्याला जसे नाही म्हणवत नाही, त्याप्रमाणे प्राणिमात्राला कर्माचे फळ भोगणे भाग पडते ( कर्मफल चुकत नाही). ॥52॥
253-18
मग कणिसौनि कणु झडे । तो विरूढला कणिसा चढे । पुढती भूमी पडे । पुढती उठी ॥253॥
मग कणसातून दाणा खाली पडल्यावर तो उगवला म्हणजे पुन्हा त्याला कणीस येते व त्याचे दाणे भूमीवर पडले म्हणजे दाण्याचे कणीस व कणसाचे दाणे असा क्रम सुरू होतो ॥53॥
254-18
तैसे भोगी जे फळ होय । ते फळांतरे वीत जाय । चालता पावो पाय । जिणिजे जैसा ॥254॥
त्याप्रमाणे उपभोगाचे फळ जे शरीर ते फळाच्याशेवटी जन्म घेते, जसा वाट चालणारा मनुष्य एकेक पाऊल टाकून वाट वन बसतो लोकसभा जिंकतो;
255-18
उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी । तेवी न मुकीजती वोढी । भोग्याचिये ॥255॥
होडी एका तीराहून दुसऱ्या तीरास गेली असता तिला प्रत्येक तीर अलिकडला होय, कारण प्रत्येक तीरास तिला पलीकडेपणा आहेच, म्हणून वाहून न्यावे लागते. तसा फळाच्या उपभोगाला शेवट नाही. ॥255॥
256-18
पै साध्यसाधनप्रकारे । फळभोगु तो पसरे । एवं गोविले संसारे । अत्यागी ते ॥256॥
हे बघ, साध्य व साधन अशा क्रमाने फळ व फळाचा भोग वाढतात, फळेच्छेचा त्याग न करणारे, याप्रमाणे संसारात गोवले जातात. ॥256॥
257-18
येऱ्हवी जाईचिया फुला फांकणे । त्याचि नाम जैसे सुकणे । तैसे कर्ममिषे न करणे । केले जिही ॥257॥
एऱ्हवी जाईचे फूल ज्याप्रमाणे प्रफुल्लित होताक्षणी सुकते, त्याप्रमाणे कर्माचा आरंभ करूनही फक्त अभिमान सोडून ते न केल्याप्रमाणे फळा पासून अलिप्त असतात; ॥257॥
258-18
बीजचि वरोसि वेचे । तेथ वाढती कुळवाडी खाचे । तेवी फळत्यागे कर्माचे । सारिले काम ॥258॥
बिजा करिता ठेवलेले धान्य जर दररोजच्या खर्चास खाऊन टाकले, तर मग पुढे पेरण्याचा प्रकार जसा बंद होतो, तसे फळाच्या त्यागाने कर्मापासून प्राप्त होणारे जन्म मृत्यू बाजूस राहतात. ॥258॥
259-18
ते सत्वशुद्धि साहाकारे । गुरुकृपामृत तुषारे । सासिन्नलेनि बोधे वोसरे । द्वैतदैन्य ॥259॥
शुद्ध सत्वाच्या साह्याने गुरुकृपारुपी अमृताच्या तुषाराने सिद्ध झालेला जो आत्मबोध द्वैताचे दैन्य नाहीतसे होते. ॥259॥
260-18
तेव्हा जगदाभासमिषे । स्फुरे ते त्रिविध फळ नाशे । एथ भोक्ता भोग्य आपैसे । निमाले हे ॥260॥
मग ज्या तीन प्रकारच्या फळापासून जग उत्पन्न होते, ते आपोआप नाश पावून भोक्ता व भोग्यवस्तू याही आपोआप लयास जातात. ॥260॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-18
घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा । संन्यासु जया वीरेशा । तेचि फलभोग सोसा । मुकले गा ॥261॥
हे विरेशा, त्यांच्या हातून अशा प्रकारच्या कर्माचा ज्ञानप्रमुख संन्यास होतो, त्यांनाच फळाच्या भोगापासून होणारे दुःख होत नाही; ॥261॥
262-18
आणि येणे कीर संन्यासे । जै आत्मरूपी दिठी पैसे । तै कर्म एक ऐसे । देखणे आहे ? ॥262॥
आणि या संन्यासाने खरोखर जेव्हा आत्मरुपी दृष्टी पोहोचते, तेव्हा कर्म निराळे आई असे दिसते काय ? ॥262॥
263-18
पडोनि गेलिया भिंती । चित्रांची केवळ होय माती । का पाहालेया राती । आंधारे उरे ? ॥263॥
चित्रे काढलेली भिंत पडल्यावर चित्रे मातीस मिळतात अथवा उजाडल्यावर रात्रीचा अंधार दिसतो काय ? ॥263॥
264-18
जै रूपचि नाही उभे । तै साउली काह्याची शोभे ? । दर्पणेवीण बिंबे । वदन के पा ? ॥264॥
जर आकृतीच नसली, तर आपल्या मुखाचे प्रतिबिंब कोठे पडेल ? ॥264॥
265-18
फिटलिया निद्रेचा ठावो । कैचा स्वप्नासि प्रस्तावो ? । मग साच का वावो । कोण म्हणे ? ॥265॥
झोप पुरी झाल्यावर स्वप्न कुठून पडणार ? आणि मग त्याला खरे अथवा खोटे कोण म्हणेल ? ॥265॥
266-18
तैसे गा संन्यासे येणे । मूळ अविद्येसीचि नाही जिणे । मा तियेचे कार्य कोणे । घेपे दीजे ? ॥266॥
त्याप्रमाणे कर्मफळाचा संन्यास केला असता मूळच्या अविद्येंच थारा मिळत नाही; मग तिच्या पासून होणारे जे फळ, त्याचा कोण उपभोग घेईल व देईल ॥66॥
267-18
म्हणौनि संन्यासी ये पाही । कर्माची गोठी कीजेल खई । परी अविद्या आपुलाम् देही । आहे जै का ॥267॥
म्हणून संन्यास केल्यावर कर्माची गोष्ट कुठून बोलता येणार ? परंतु जर आपल्या देहात अज्ञान वास करीत असेल; ॥267॥
268-18
जै कर्तेपणाचेनि थांवे । आत्मा शुभाशुभी धावे । दृष्टि भेदाचिये राणिवे । रचलीसे जै ॥268॥
जेव्हा कर्तेपणाच्या बळाने आत्मा चांगले व वाईट कर्मे करण्यास प्रवृत्त होतो व दृष्टीही भेदाच्या ऐश्वर्याने जेव्हा युक्त असते, ॥268॥
269-18
तै तरी गा सुवर्मा । बिजावळी आत्मया कर्मा । अपाडे जैसी पश्चिमा । पूर्वेसि का ॥269॥
तेव्हा हे सुवर्मा अर्जुना, आत्मा व कर्म यांचे ठिकाणी पूर्व व पश्चिम या प्रमाणे द्वैत विशेष असते. ॥269॥
270-18
नातरी आकाशा का आभाळा । सूर्या आणि मृगजळा । बिजावळी भूतळा । वायूसि जैसी ॥270॥
आकाश व आभाळ, सूर्य आणि मृगजळ व पृथ्वी आणि वायू यांच्यात संबंध जरी दिसला, तरी ते फार दूर आहेत. ॥270॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-18
पांघरौनि नईचे उदक । असे नईचिमाजी खडक । परी जाणिजे का वेगळिक । कोडीची ते ॥271॥
नदीचे पाणी पांघरूण नदीत खडक असतो परंतु त्या दोहोंत जशी एक कोटपट अंतर असते;
272-18
हो का उदकाजवळी । परी सिनानीचि ते बाबुळी । काय संगास्तव काजळी । दीपु म्हणो ये ? ॥272॥
पाण्यावर असलेले शेवाळ हे पाणी यापासून वेगळे असते; काजळाचा दिव्याची संबंध आहे, म्हणून त्या काजळाला दीप म्हणता येईल काय ?
273-18
जरी चंद्री जाला कलंकु । तरी चंद्रेसी नव्हे एकु । आहे दृष्टी डोळ्या विवेकु । अपाडु जेतुला ॥273॥
जरी चंद्राला कलंक लागला आहे, तरी त्यांचे चंद्राची ऐक्य नाही, तसेच दृष्टी व डोळे यामध्ये जितका भेद आहे;
274-18
नाना वाटा वाटे जातया । वोघा वोघी वाहातया । आरसा आरसा पाहातया । अपाडु जेतुला ॥274॥
अथवा वाट व तिजवरून चालणारा वाटसरु, ओघ व ओघांत वाहणारे पाणी आणि आरसा व आरशात पाहणारा मनुष्य यांच्यात जितका भेद आहे,
275-18
पार्था गा तेतुलेनि माने । आत्मेनिसी कर्म सिने । परी घेवविजे अज्ञाने । ते कीर ऐसे ॥275॥
तितक्याच मानाने आत्म्यापासून कर्म भिन्न आहे; परंतु अर्जुना, अज्ञानामुळे ती दोन्ही एकच आहेत, असे वाटते.
276-18
विकाशे रवीते उपजवी । द्रुती अलीकरवी भोगवी । ते सरोवरी का बरवी । अब्जिनी जैसी ॥276॥
जशी सरोवरातील कमळे आपल्या बोलण्याने फुलंण्याने रवीचा उदय झाला असे कळवितात व आपल्यातील मकरंदचा भ्रमरांकडून कडून उपभोग घेववितात.
277-18
पुढतपुढती आत्मक्रिया । अन्यकारणकाचि तैशिया । करू पाचाही तया । कारणा रूप ॥277॥
तशी आत्म्याच्या ठिकाणी असलेली कर्मे अन्य कारणाने वारंवार उत्पन्न होतात. ती कारणे पाच आहेत. त्यांची लक्षणे तुला सांगतो.

पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे ।
साण्‌ख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् ॥18. 13॥
278-18
आणि पांचही कारणे तिये । तूंही जाणसील विपाये । जे शास्त्रे उभऊनी बाहे । बोलती तयाते ॥278॥
ती पाच कारणे तू ही कदाचित जाणार असशील कारण ज्याविषयी शास्त्राने ऊंच हात करून वर्णन केलेले आहे
279-18
वेदरायाचिया राजधानी । सांख्यवेदांताच्या भुवनी । निरूपणाच्या निशाणध्वनी । गर्जती जिये ॥279॥
ती वेदराजाच्या राज्याच्या राजधानीत सांख्य वेदात मंदिरात निरूपणरुपी नौबदीने प्रसिद्ध आहेत.
280-18
जे सर्वकर्मसिद्धीलागी । इयेचि मुद्दले हो जगी । तेथ न सुवावा अभंगी । आत्मराजु ॥280॥
कारण सर्व कर्माची सिद्धी होण्याकरिता या जगात हीच मुख्य अवश्य आहेत, तर त्यांचे ठिकाणी आत्म्यास कारणीभूत मानू नको.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-18
ह्या बोलाचि डांगुरटी । तिये प्रसिद्धीचि आली किरीटी । म्हणौनि तुझ्या हन कर्णपुटी । वसो हे काज ॥281॥
अर्जुना, अशी दवंडी पिटल्याने त्यांची चहूकडे प्रसिद्धी झालेली आहे, म्हणून तुलाही ठाऊक असू दे, उपयोग होईल;
282-18
आणि मुखातरी आइकिजे । तैसे कायसे हे ओझे । मी चिद्रत्न तुझे । असता हाती ॥282॥
आणि मी ज्ञानरूपी रत्न तुझे हाती असल्यावर, दुसऱ्याचे तोंडातून तू ही गोष्ट ऐकावीस, इतकी अडचण तुला कशास पाहिजे ?
283-18
दर्पणु पुढा मांडलेया । का लोकांचिया डोळया । मानु द्यावा पहावया । आपुले निके ॥283॥
आपल्यासमोर आरसा असल्यावर आपले रुप पाहण्यात लोकांना माझे रूप कसे दिसते ते मला सांगा, अशी विनंती का करावी ?
284-18
भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ ते तेचि होत जाये । तो मी तुझे जाहालो आहे । खेळणे आजी ॥284॥
भक्त ज्या स्थितीत जिकडे पाहिल, त्या ठिकाणी ती वस्तू मी त्यांच्या दृष्टीस पडतो, तो मी आज तुझे खेळणे झालो आहे. (हस्तगत झालो आहे. )
285-18
ऐसे हे प्रीतीचेनि वेगे । देवो बोलता से नेघे । तव आनंदामाजी आंगे । विरतसे येरु ॥285॥
असे प्रेमाच्या भरात देव बोलत असता त्यांना आठवण राहिली नाही, तो इकडे पार्था आनंदात निमग्न होऊन गेला.
286-18
चांदिणियाचा पडिभरु । होता सोमकांताचा डोंगरु । विघरोनि सरोवरु । हो पाहे जैसा ॥286॥
पौर्णिमेच्या चांदण्यात सोमकांत मण्याचा डोंगर जरी असला, तरी तो पाझरून त्याचे सरोवर बनावे.
287-18
तैसे सुख आणि अनुभूती । या भावांची मोडूनि भिंती । आतले अर्जुनाकृति । सुखचि जेथ ॥287॥
त्याप्रमाणे सुख व त्याचा अनुभव या भावांचा पडदा नाहीसा होऊन सुखच अर्जुनाच्या आकृतीचे दिसू लागले;
288-18
तेथ समर्थु म्हणौनि देवा । अवकाशु जाहला आठवा । मग बुडतयाचा धावा । जीवे केला ॥288॥
तेव्हा देव समर्थ असल्यामुळे त्यास आठवण होऊन त्यांनी सुखाचे समुद्रात बुडणार्‍या अर्जुनास वर काढले
289-18
अर्जुना येसणे धेंडे । प्रज्ञा पसरेंसी बुडे । आले भरते एवढे । ते काढूनि पुढती ॥289॥
अर्जुनासारखा थोर असूनही तो बुद्धीच्या प्रसारासह बुडू लागला, एवढे प्रेमाचे भरते आले असून ते बाजूला सारून,
290-18
देवो म्हणे हा गा पार्था । तू आपणपे देख सर्वथा । तव श्वासूनि येरे माथा । तुकियेला ॥290॥
देव म्हणाले, ” पार्था तू आपले स्वरूप पाहून शुद्धीवर ये. ” तेव्हा उसासा टाकून अर्जुनाने मान डोलावली;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-18
म्हणे जाणसी दातारा । मी तुजशी व्यक्तिशेजारा । उबगला आजी एकाहारा । येवो पाहे ॥291॥
आणि तो म्हणाला की, हे प्रभो, जो मी तुमच्या सान्निध्यास (द्वैतभावस त्रासून आज तुमच्या ऐक्यास येऊ पाहत आहे,
292-18
तयाही हा ऐसा । लोभे देतसा जरी लालसा । तरी का जी घालीतसा । आड आड जीवा ? ॥292॥
आणि असेच बोलून तुला जी आम्ही भीती दाखवतो; तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रितीस जास्ती बळ येते, अशी ही प्रीती होय.
293-18
तेथ श्रीकृष्ण म्हणती निके । अद्यापि नाही मा ठाऊके । वेडया चंद्रा आणि चंद्रिके । न मिळणे आहे ? ॥293॥
तेव्हा श्रीकृष्णश्रीकृष्ण म्हणतात की, अरे वेड्या, खरोखर तुला अजून कसे माहीत नाही, की चंद्र आणि प्रभा यांचा वियोग घडतो का ?
294-18
आणि हाही बोलोनि भावो । तुज दाऊ आम्ही भिवो । जे रुसता बांधे थांवो । ते प्रेम गा हे ॥294॥
आणि असेच बोलून तुला जी आम्ही भीती दाखवतो; तिने तू रुसलास म्हणजे आमच्या प्रितीस जास्ती बळ येते, अशी ही प्रीती होय.
295-18
एथ एकमेकांचिये खुणे । विसंवादु तवचि जिणे । म्हणौनि असो हे बोलणे । इयेविषयींचे ॥295॥
या ठिकाणी एकमेकांची खूणेने परस्परास जे बोलणे तेच आपल्या वाचण्यास कारण होय, म्हणून याविषयी वादविवाद पुरे.
296-18
मग कैशी कैशी ते आता । बोलत होतो पंडुसुता । सर्व कर्मा भिन्नता । आत्मेनिसी ॥296॥
मग अर्जुना, आपण काय बरे बोलत होतो की, सर्व कर्मे आत्म्यापासून भिन्न आहेत, असेच ना ?
297-18
तव अर्जुन म्हणे देवे । माझिये मनीचेचि स्वभावे । प्रस्ताविले बरवे । प्रमेय ते जी ॥297॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, ” देवा, माझ्या मनातील तात्पर्य सांगण्यास तुम्ही होऊन आरंभ केला.
298-18
जे सकळ कर्माचे बीज । कारणपंचक तुज । सांगेन ऐसी पैज । घेतली का ॥298॥
सर्व कर्मास कारणीभूत अशी पाच कारणे तुला सांगेन अशी जी तुम्ही प्रतिज्ञा केली;
299-18
आणि आत्मया एथ काही । सर्वथा लागु नाही । हे पुढारलासि ते देई । लाहाणे माझे ॥299॥
आणि आत्म्याचा कर्माची काही संबंध नाही असे जे तुम्ही बोलला होता, ते माझे आवडते मला द्या, “
300-18
यया बोला विश्वेशे । म्हणितले तोषे बहुवसे । इयेविषयी धरणे बैसे । ऐसे के जोडे ? ॥300॥
हे बोलणे ऐकून भगवान अति संतोष आणि म्हणाले, ” याविषयी तू धरणे घेऊन बसलास, असा विचारणारा आम्हाला कुठे मिळतो आहे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
301-18
तरी अर्जुना निरूपिजेल । ते कीर भाषेआंतुल । परी मेचु ये होईजेल । ऋणिया तुज ॥301॥
तर अर्जुना, तुला खरोखर सिद्धांत सांगतो. कारण मी तुझा ऋणी असल्यामुळे तुला मोठा नमून आहे “
302-18
तव अर्जुन म्हणे देवो । काई विसरले मागील भावो ? । इये गोठीस की राखत आहो । मी तू पण जी ? ॥302॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा, तुम्ही मागील गोष्टींचा अभिप्राय विसरलास काय ? आणि मी व तू हे द्वैत आपल्या भाषणात का आणता ?
303-18
एथ श्रीकृष्ण म्हणती हो का । आता अवधानाचा पसरु निका । करूनिया आइका । पुढारलो ते ॥303॥
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर, आता मी जी गोष्ट तुला सांगण्यास सुरुवात केली होती, ती सांगतो, सावधान चित्ताने ऐक.
304-18
तरी सत्यचि गा धनुर्धरा । सर्वकर्मांचा उभारा । होतसे बहिरबाहिरा । करणी पांचे ॥304॥
तर हे धनुर्धरा, खरोखरच सर्व कर्माची उभारणी या पांच कारणांनी परभारे होते.
305-18
आणि पांच कारण दळवाडे । जिही कर्माकारु मांडे । ते हेतुस्तव घडे । पांच आथी ॥305॥
आणि ज्या या पांच कारणांच्या योगाने जो कर्माचा पसारा होतो, तीच पांच कारणे त्या कर्मास हेतू असतात.
306-18
येर आत्मतत्त्व उदासीन । ते ना हेतु ना उपादान । ना ते अंगे करी संवाहन । कर्मसिद्धीचे ॥306॥
दुसऱ्या जो आत्मा, उदासीन असून कर्माला निमित्तकारण किंवा उपादानकारण नसतो, अथवा तो स्वत: कर्माला करीत नाही
307-18
तेथ शुभाशुभी अंशी । निफजती कर्मे ऐसी । राती दिवो आकाशी । जियापरी ॥307॥
त्याचे ठिकाणी शुभ किंवा अशुभ करणे अशा रीतीने होतात की, रात्र व दिवस आकाशात उत्पन्न झाली तरी आकाश त्याहून जसे वेगळे असते;
308-18
तोय तेज धूमु । यया वायूसी संगमु । जालिया होय अभ्रागमु । व्योम ते नेणे ॥308॥
पाणी व तेज यापासून उत्पन्न होणाऱ्या वाफेचा वायूशी संबंध झाला म्हणजे आकाशात जाऊन तिचे ढग बनतात, परंतु आकाशास जशी ही गोष्ट माहीत नसते;
309-18
नाना काष्ठी नाव मिळे । ते नावाडेनि चळे । चालविजे अनिळे । उदक ते साक्षी ॥309॥
पुष्कळ लाकडे एकत्र जोडून तयार केलेली नाव वाऱ्याच्या जोराने नावाडी पाण्यावर चालवितो; परंतु त्या ठिकाणी उदक जसे काहीएक न करिता साक्षीभूत असते;
310-18
का कवणे एके पिंडे । वेचिता अवतरे भांडे । मग भवंडीजे दंडे । भ्रमे चक्र ॥310॥
किंवा मातीचा गोळा घेऊन चक्रावर ठेवून दांड्याने चाक हलविल्यावर त्याचे मातीपण जाऊन भांडे तयार होते; 310
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-18
आणि कर्तृत्व कुलालाचे । तेथ काय ते पृथ्वीयेचे । आधारावाचूनि वेचे । विचारी पा । ॥311॥
तर याठिकाणी कुंभाराच्या ठिकाणी कुंभाराच्या कसबा शिवाय भांड्यात कसबाशिवाय भांड्यास आधारावाचून पृथ्वीचे दुसरे कोणते सहाय्य मिळते याचा विचार कर. 311
312-18
हेहि असो लोकांचिया । राहाटी होता आघविया । कोण काम सवितया । आंगा आले ? ॥312॥
हेही असो; परंतु जगात लोकांचे सर्व व्यापार सूर्यप्रकाशाने चालत असता ही सूर्य ज्याप्रमाणे त्यापासून अलिप्त असतो, 312
313-18
तैसे पांचहेतुमिळणी । पांचेचि इही कारणी । कीजे कर्मलतांची लावणी । आत्मा सिना ॥313॥
त्याचप्रमाणे पाच कारणे मिळाल्याने सर्व करमणूक वेलाची मांडणूक होते व आत्मा हा वेगळाच असतो. 313
314-18
आता तेचि वेगळाली । पांचही विवंचू गा भली । तुकोनि घेतली । मोतिये जैसी ॥314॥
आता ती पाच कारणे चांगल्या प्रकारे वेगवेगळाली वर्णन करून सांगतो. मोत्ये ज्याप्रमाणे वजन करून घ्यावी लागतात. 314

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् ।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ॥18. 14॥
315-18
तैसी यथा लक्षणे । आइके कर्म-कारणे । तरी देह हे मी म्हणे । पहिले एथ ॥315॥
त्याचप्रमाणे, कर्माचा कारणांची सर्व यथार्थ लक्षणे तुला सांगतो ती एक. तर देह पहिले कारण होय, असे मी म्हणतो. 315
316-18
ययाते अधिष्ठान ऐसे । म्हणिजे ते याचि उद्देशे । जे स्वभोग्येसी वसे । भोक्ता येथ ॥316॥
या देहाला अधिष्ठान म्हणण्याचे प्रयोजन इतकेच की, भोग जे विषय, त्यासहवर्तमान भोक्ता या ठिकाणी राहतो. 316
317-18
इंद्रियांच्या दाहे हाती । जाचोनिया दिवोराती । सुखदुःखे प्रकृती । जोडीजती जिये ॥317॥
इंद्रियांच्या दहा हातांनी रात्रंदिवस कष्ट सोसून प्रकृतीच्या योगाने जी सुखे व दुःख उत्पन्न होतात, 317
318-18
तिये भोगावया पुरुखा । आन ठावोचि नाही देखा । म्हणौनि अधिष्ठानभाखा । बोलिजे देह ॥318॥
ती भोगण्याकरिता दुसरे ठिकाणच नाही, म्हणून देहाला अधिष्ठान असे म्हणतात.
319-18
हे चोविसाही तत्वाचे । कुटुंबघर वस्तीचे । तुटे बंधमोक्षाचे । गुंथाडे एथ ॥319॥
हे चोवीस तत्त्वाचे वस्तीस्थान असून बंध व मोक्ष यांचा उलगडा या ठिकाणी होतो. 319
320-18
किंबहुना अवस्थात्रया । हे अधिष्ठान धनंजया । म्हणौनि देहा यया । हेचि नाम ॥320॥
फार काय ? परंतु जागृती, स्वप्न व सुषुप्ती याचे हे मुख्य ठिकाण होय, म्हणून धनंजया, या देहाला अधिष्ठान हेच नाव योग्य आहे. 320
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-18
आणि कर्ता हे दुजे । कर्माचे कारण जाणिजे । प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचे जे ॥321॥
आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे होय आणि यालाच चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव असे म्हणतात. 321
322-18
आकाशचि वर्षे नीर । ते तळवटी बांधे नाडर । मग बिंबोनि तदाकार । होय जेवी ॥322॥
आकाशातून पाऊस पडल्यावर त्याचे पृथ्वीवर डबके होते आणि मग त्यात आकाशाचे प्रतिबिंब पडल्यावर त्याप्रमाणे ते प्रतिबिंब त्याचेच आकाराचे होते; 322
323-18
का निद्राभरे बहुवे । राया आपणपे ठाउवे नव्हे । मग स्वप्नीचिये सामावे । रंकपणी ॥323॥
किंवा निद्रेच्या भारत राजा आपले ऐश्वर्या विसरून स्वप्नात भिकारी झालो आहो असे समजतो 323
324-18
तैसे आपुलेनि विसरे । चैतन्यचि देहाकारे । आभासोनि आविष्करे । देहपणे जे ॥324॥
तसेच चैतन्य आपले स्वरूप विसरून देहाच मी असे मानून देहरूपाने प्रगट होते. 324
325-18
जया विसराच्या देशी । प्रसिद्धि गा जीवु ऐसी । जेणे भाष केली देहेसी । आघवाविषयी ॥325॥
ज्यात देहात आत्मरुपाचा विसर पडतो, तेथे चैतन्य ‘ जीव’ या नावाने प्रसिद्ध आहे व त्या जीवाने देहाला मी तुझा अभिमान कधीही सोडणार नाही, असे वचन दिले आहे. की ही 325
326-18
प्रकृति करी कर्मे । ती म्या केली म्हणे भ्रमे । येथ कर्ता येणे नामे । बोलिजे जीवु ॥326॥
देहाकडून जी जी कर्मे होतात, ती मीच केली असे भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवाला कर्माचा कर्ता आहे असे म्हणतात. 326
327-18
मग पातेयांच्या केशी । एकीच उठी दिठी जैसी । मोकळी चवरी ऐसी । चिरीव गमे ॥327॥
मग दृष्टी ही एकच असून ज्याप्रमाणे पापण्यांच्या केसांमुळे चवरीच्या केसांप्रमाणे चिरल्यासारखी दिसते; 327
328-18
का घराआंतुल एकु । दीपाचा तो अवलोकु । गवाक्षभेदे अनेकु । आवडे जेवी ॥328॥
अथवा घरात असलेला एकच दिवा पाहिला असता, जसे त्याचे पुष्कळ दिवे दिसतात; 328
329-18
का एकुचि पुरुषु जैसा । अनुसरत नवा रसा । नवविधु ऐसा । आवडो लागे ॥329॥
किंवा एकच पुरुष असून शृंगार, वीर, करुण, इत्यादी नवरसांचे अविर्भाव दाखवू लागला, म्हणजे तो जसा नऊ प्रकारचा वाटू लागतो, 329
330-18
तेवी बुद्धीचे एक जाणणे । श्रोत्रादिभेदे येणे । बाहेरी इंद्रियपणे । फाके जे का ॥330॥
तसे बुद्धीचे एकच ज्ञान असून ते नेत्रादि इंद्रियांच्या निराळीपणाने बाहेर येऊ लागते. 330
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-18
ते पृथग्विध करण । कर्माचे इया कारण । तिसरे गा जाण । नृपनंदना ॥331॥
हे नृपनंदना, ती निरनिराळी इंद्रिये हे कर्माचे तिसरे कारण होय, असे समज; 331
332-18
आणि पूर्वपश्चिमवाहणी । निघालिया वोघाचिया मिळणी । होय नदी नद पाणी । एकचि जेवी ॥332॥
आणि पूर्व-पश्चिम वाहिनी नद्या वहात वहात समुद्रास मिळाल्यावर त्या जशा पाण्याच्या रूपाने एकत्र होतात 332
333-18
तैसी क्रियाशक्ति पवनी । असे जे अनपायिनी । ते पडिली नानास्थानी । नाना होय ॥333॥
तशी रजोगुणाची कर्तृत्वशक्ती जी संपादनकेल्या शिवाय प्राणवायूत मूळचीच आहे, ती निरनिराळया अवयवांत निरनिराळी भासते. 333
334-18
जै वाचे करी येणे । तै तेचि होय बोलणे । हाता आली तरी घेणे । देणे होय ॥334॥
जेव्हा ती वाच्याद्वारे बाहेर पडते, तेव्हा तिला बोलणे असे आपण म्हणतो हस्ताद्वारे बाहेर पडल्यावर घेण्या देण्याचा व्यापार असे म्हणतात. 334
335-18
अगा चरणाच्या ठायी । तरी गति तेचि पाही । अधोद्वारी दोही । क्षरणे तेचि ॥335॥
अरे, जी पायात आली असता गती असे म्हणतात व मलमूत्राद्वारे आली असता क्षालन असे म्हणतात, 335
336-18
कंदौनि हृदयवरी । प्रणवाची उजरी । करिता तेचि शरीरी । प्राणु म्हणिजे ॥336॥
नाभीपासून हृदयापर्यंत ॐकाराची शरीरात वृद्धी बुद्धी करते, तिलाच प्राण असे म्हणतात. 336
337-18
मग उर्ध्वींचिया रिगानिगा । पुढती तेचि शक्ति पै गा । उदानु ऐसिया लिंगा । पात्र जाहली ॥337॥
मग वर जो श्वासोश्वास जातो; त्यात शक्तीला उदान (कंठस्थ वायु) असे नाव प्राप्त होते; 337
338-18
अधोरंध्राचेनि वाहे । अपानु हे नाम लाहे । व्यापकपणे होये । व्यानु तेचि ॥338॥
व गुदद्वाराने आणि बाहेर येऊ लागली म्हणजे अपान (गुदस्थ वायु) हे नाव प्राप्त होते, आणि सर्व शरीरास व्यापक झाली असता (व्यान) (शरीरस्थ वायु) असे म्हणतात. 338
339-17
आरोगिलेनि रसे । शरीर भरी सरिसे । आणि न सांडिता असे । सर्वसंधी ॥339॥
खाल्लेल्या अन्नाचा रस सर्व शरीरात पसरून जी सर्व सांध्यात भरलेली असते; 339
340-18
ऐसिया इया राहटी । मग तेचि क्रिया पाठी । समान ऐसी किरीटी । बोलिजे गा ॥340॥
अर्जुना, अशा सर्व क्रिया होत असून ह्या शक्तीस नंतर समान म्हणजे (नाभिस्थ वायु) असे म्हणतात. 340
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-18
आणि जांभई शिंक ढेकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादि होय ॥341॥
आणि जांभई, शिंक, ढेकर वगैरे जे वायूचे व्यापार होतात ते नाग, कूर्म, कृकर, इत्यादी उपप्राणांचे होतं. 341
342-18
एवं वायूची हे चेष्टा । एकीचि परी सुभटा । वर्तनास्तव पालटा । येतसे जे ॥342॥
हे सुभटा, याप्रमाणे सर्व वायूंचे खेळ असून त्यांच्या त्यांच्या वर्तनात प्रमाणे नावात बदल होतो. 342
343-18
ते भेदली वृत्तिपंथे । वायुशक्ति गा एथे । कर्मकारण चौथे । ऐसे जाण ॥343॥
अशी जी आपापल्या व्यापाराने वायूंची शक्ती निरनिराळी होते, ते कर्माचे चौथे कारण होय, असे समज. 343
344-18
आणि ऋतु बरवा शारदु । शारदी पुढती चांदु । चंद्री जैसा संबंधु । पूर्णिमेचा ॥344॥
आणि शरद ऋतू सारखा उत्तम ऋतू असून त्यात चंद्रोदय व्हावा व तशात पौर्णिमेचा योग असावा; 344
345-18
का वसंती बरवा आरामु । आरामीही प्रियसंगमु । संगमी आगमु । उपचारांचा ॥345॥
अथवा वसंत ऋतु असून त्यात उत्तम बाग असावी व बागेत प्रिय मनुष्यांचा सहवास आणि तशा अवस्थेत इतर सर्व उपचारांची अनुकूलता असावी; 345
346-18
नाना कमळी पांडवा । विकासु जैसा बरवा । विकासीही यावा । परागाचा ॥346॥
अथवा अर्जुना, कमळ असून ते उमलावे व मग त्यात पुष्परेणूंचा उद्भव व्हावा; 346
347-18
वाचे बरवे कवित्व । कवित्वी बरवे रसिकत्व । रसिकत्वी परतत्व । स्पर्शु जैसा ॥347॥
एखाद्याचे वाणीत कवित्व असावे, त्या कवितेत रसिकता असावी आणि त्या रसिकतेत आत्मतत्वाची भर पडावी, 347
348-18
तैसी सर्ववृत्तिवैभवी । बुद्धिचि एकली बरवी । बुद्धिही बरव नवी । इंद्रियप्रौढी ॥348॥
तसेच, सर्व वृत्तीच्या ऐश्वर्याने युक्त जी बुद्धी, ती उत्तम प्रकारची असून तशांत सर्व इंद्रिये ही तिला अनुकूल असावी; 348
349-18
इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकुचि निर्मळा । जै अधिष्ठात्रिया का मेळा । देवतांचा जो ॥349॥
आणि सर्व इंद्रियांना भूषण देणारा त्या इंद्रियांच्या देवतांचा मेळा तोही त्यात अनुकूल असावा, 349
350-18
म्हणौनि चक्षुरादिकी दाहे । इंद्रिया पाठी स्वानुग्रहे । सूर्यादिका का आहे । सुरांचे वृंद ॥350॥
म्हणूनच चक्षुरादी दहा इंद्रियांच्या ठिकाणी सूर्यादि देवांच्या समुदायाचा अनुग्रह, 350
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
351-18
ते देववृंद बरवे । कर्मकारण पांचवे । अर्जुना एथ जाणावे । देवो म्हणे ॥351॥
तेच दैव म्हणजे देवांचा समुदाय हे या कर्माचे पाचवे कारण आहे. देव म्हणतात:- समजलास अर्जुना ? 351
352-18
एवं माने तुझिये आयणी । तैसी कर्मजातांची हे खाणी । पंचविध आकर्णी । निरूपिली ॥352॥
याप्रमाणे तुझ्या बुद्धीस कळेल अशा रीतीने कर्माची पाच प्रकारची कारणे तुला सांगितली ती ऐकलीस ना ? 352
353-18
आता हेचि खाणी वाढे । मग कर्माची सृष्टि घडे । जिही ते हेतुही उघडे । दाऊ पांचै ॥353॥
आता या हेतूंच्या योगे ही कर्म घडतात, ते पाच हेतू तुला उघड करून सांगतो. 353
शरीरवाण्‌मनोभिर्यत्कर्म प्रारभते नरः ।
न्याय्यं वा विपरीतं वा पञ्चैते तस्य हेतवः ॥18. 15॥
354-18
तरी अवसात आली माधवी । ते हेतु होय नवपल्लवी । पल्लव पुष्पपुंज दावी । पुष्प फळाते ॥354॥
तर अकस्मात वसंत ऋतु प्राप्त झाला असता त्याच्या योगाने झाडास नवी पालवी फुटते, पालवी फुटल्यावर फुलांचे घोस येतात आणि फुलांपासून फळी निर्माण होतात; 354
355-18
का वार्षिये आणिजे मेघु । मेघे वृष्टिप्रसंगु । वृष्टीस्तव भोगु । सस्यसुखाचा ॥355॥
अथवा पावसाळ्यात मेघ उत्पन्न होतात, मेघांपासून पर्जन्यवृष्टी होते आणि पर्जन्यवृष्टी पासून धान्य उत्पन्न होते; 355
356-18
नातरी प्राची अरुणाते विये । अरुणे सूर्योदयो होये । सूर्ये सगळा पाहे । दिवो जैसा ॥356॥
किंवा पूर्वेस अरुणोदय होतो, अरुणोदय झाल्यावर सूर्य उगवतो आणि सूर्याचा पूर्ण प्रकार झाला म्हणजे दिवस होतो, 356
357-18
तैसे मन हेतु पांडवा । होय कर्मसंकल्पभावा । तो संकल्पु लावी दिवा । वाचेचा गा ॥357॥
त्याप्रमाणे अर्जुना, मन हे कर्माचा संकल्प होण्याच कारण आहे आणि तोच संकल्प झाला म्हणजे वाचेने बाहेर पडतो, 357
358-18
मग वाचेचा तो दिवटा । दावी कृत्यजाताचिया वाटा । तेव्हा कर्ता रिगे कामठा । कर्तृत्वाच्या ॥358॥
मग वाणीच्या उजेडाने कर्माची वाट स्पष्ट दिसू लागते, तेव्हा कर्ता कर्म करण्यास लागतो, 358
359-18
तेथ शरीरादिक दळवाडे । शरीरादिका हेतुचि घडे । लोहकाम लोखंडे । निर्वाळिजे जैसे ॥359॥
तेव्हा शरीरादिक सर्व इंद्रिये कर्माला कारण होतात. लोखंडाचा एखादा जिन्नस तयार करणे झाल्यास त्याप्रमाणे तो लोखंडाच्या हत्यारांनीच तयार करावा लागतो, 359
360-18
का तांथुवाचा ताणा । तांथु घालिता वैरणा । तो तंतुचि विचक्षणा । होय पटु ॥360॥
अथवा तंतूंच्या मागांत (मार्गात) तंतू आडवे घातले म्हणजे त्या तंतूंचे वस्त्र होते; 360
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
361-18
तैसे मनवाचादेहाचे । कर्म मनादि हेतुचि रचे । रत्नी घडे रत्नाचे । दळवाडे जेवी ॥361॥
जसे हिऱ्याला पैलू पाडावयाचे ते हिर्‍यानेच पाडावे लागतात, तसे मन, वाचा व देह यांच्या कर्मास मनच कारण आहे. 361
362-18
एथ शरीरादिके कारणे । तेचि हेतु केवी हे कोणे । अपेक्षिजे तरी तेणे । अवधारिजो ॥362॥
या ठिकाणी, कर्माची शरीरादिक कारणे, तीच त्यांना हेतू कशी होतील. अशी जर कोणी शंका घेईल, तर सांगतो, ऐक. 362
363-18
आइका सूर्याचिया प्रकाशा । हेतु कारण सूर्युचि जैसा । का ऊसाचे कांडे ऊसा । वाढी हेतु ॥363॥
हे पहा, सूर्याच्या प्रकाशास जसा सूर्यच हेतू व कारण आहे, किंवा उसाचे कांडे हेच उसाच्या वाढीस हेतू आहे; 363
364-18
नाना वाग्देवता वानावी । तै वाचाचि लागे कामवावी । का वेदा वेदेचि बोलावी । प्रतिष्ठा जेवी ॥364॥
अथवा सरस्वतीची स्तुती करणे असल्यास जसे वाणीलाच श्रम करावे लागतात, किंवा वेदांची थोरवी वर्णन करावयाची असल्यास ती वेदांनीच करावी लागते, 364
365-18
तैसे कर्मा शरीरादिके । कारण हे कीर ठाउके । परी हेचि हेतु न चुके । हेही एथ ॥365॥
तसे कर्माला शारीरादि हीच कारणे होत. हे सर्वास माहीत आहे; परंतु या ठिकाणी शारीरादिकच कर्मास हेतूही आहेत यात शंका नाही. 365
366-18
आणि देहादिकी कारणी । देहादि हेतु मिळणी । होय जया उभारणी । कर्मजाता ॥366॥
आणि देहादिक अधिष्ठानाला देहादिकच हेतू आहेत व ज्यामुळे सर्व कर्मांची उभारणी होते, 366
367-18
ते शास्त्रार्थे मानिलेया । मार्गा अनुसरे धनंजया । तरी न्याय तो न्याया । हेतु होय ॥367॥
ते कर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर केले, तर हे धनंजया, ते पुण्यकर्म होय व त्यालाच न्यायकर्म म्हणतात; आणि त्याचा हेतूही न्यायच होय. 367
368-18
जैसा पर्जन्योदकाचा लोटु । विपाये धरी साळीचा पाटु । तो जिरे परी अचाटु । उपयोगु आथी ॥368॥
जसे पर्जन्याचे पाणी अवचित साळीला लावले, तर ते जमिनीत जिरते, परंतु त्यापासून पुष्कळ उपयोग होतो; 368
369-18
का रोषे निघाले अवचटे । पडिले द्वारकेचिया वाटे । ते शिणे परी सुनाटे । न वचिती पदे ॥369॥
अथवा कोणी एखादा मनुष्य रागावून घरातून निघाला व सहज द्वारकेच्या वाटेस लागला, तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे, परंतु त्याचे एक पाऊलही व्यर्थ जाणार नाही, 369
370-18
तैसे हेतुकारण मेळे । उठी कर्म जे आंधळे । ते शास्त्राचे लाहे डोळे । तै न्याय म्हणिपे ॥370॥
तशी हेतू व कारण यांच्या योगाने जे आंधळे कर्म घडते, तेच जर सशास्त्र होईल; तर त्यालाच पुण्यकर्म म्हणावे. 370
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-18
ना दूध वाढिता ठावो पावे । तव उतोनि जाय स्वभावे । तोही वेचु परी नव्हे । वेचिले ते ॥371॥
अथवा एका भांड्यात दूध ब्राह्मणास वाटून संपले णि दुसर्‍या पात्रातील दूध आपोआप उतू जाऊन संपले, तर त्या दोन्ही पात्रातील दूध खर्च झाले खरे, तथापि उतू गेले दूध खर्च झाले, (कारणी लागले) असे म्हणता येत नाही, 371
372-18
तैसे शास्त्रसाह्येवीण । केले नोहे जरी अकारण । तरी लागो का नागवण । दानलेखी ॥372॥
तसे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्म केले तर ते जर व्यर्थ होणार नाही, तर दरवड्या गेलेले द्रव्य दान केले असे का समजू नये ? 372
373-18
अगा बावन्ना वर्णापरता । कोण मंत्रु आहे पंडुसुता । का बावन्नही नुच्चारिता । जीवु आथी ? ॥373॥
अर्जुना, बावन्न वर्णविरहित कोणता मंत्र आहे ? अथवा बावन्न वर्णा पैकी एकाचा तरी उच्चार न करणारा असा कोण प्राणी सापडेल ? 373
374-18
परी मंत्राची कडसणी । जव नेणिजे कोदंडपाणी । तव उच्चारफळ वाणी । न पवे जेवी ॥374॥
परंतु अर्जुना, जो पर्यंत मंत्राची युक्ती समजली नाही, तोपर्यंत त्या बावन्न अक्षरांच्या उच्चारास मंत्रोचाराची फलप्राप्ती होणार नाही, 374
375-18
तेवी कारणहेतुयोगे । जे बिसाट कर्म निगे । ते शास्त्राचिये न लगे । कासे जव ॥375॥
त्या प्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे सामान्य कर्म घडते, ते जेव्हा यथाशास्त्र घडत नाही, 375
376-18
कर्म होतचि असे तेव्हांही । परी ते होणे नव्हे पाही । तो अन्यायो गा अन्यायी । हेतु होय ॥376॥
तेव्हाही कर्म हे घडतच असते; पण बाबा रे, ते घडणे नव्हे; ते पाप कर्म असून पापकर्माला हेतू आहे. 376

तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं तु यः ।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्न स पश्यति दुर्मतिः ॥18. 16॥
377-18
एवं पंचकारणा कर्मा । पांचही हेतु हे सुमहिमा । आता एथे पाहे पा आत्मा । सापडला असे ? ॥377॥
अशा प्रकारे, हे सुमहिमा, कर्माच्या पांच कारणास पांच हेतू आहेत. तर आता या ठिकाणी आत्मा हा कर्मास कारण आहे काय, सांग बरे ? 377
377-18
भानु न होनि रूपे जैसी । चक्षुरूपाते प्रकाशी । आत्मा न होनि कर्मे तैसी । प्रकटित असे गा ॥378॥
ज्याप्रमाणे सूर्य हा स्वत: विषय न होता नेत्रादी पांच इंद्रियांचे विषय प्रगट करतो, त्याप्रमाणे आत्मा कर्मे न होता करणाराकडून ती ती प्रकाशित करतो; 378
379-18
पै प्रतिबिंब आरिसा । दोन्ही न होनि वीरेशा । दोहीते प्रकाशी जैसा । न्याहाळिता तो ॥379॥
हे बघ अर्जुना, आरसा व प्रतिबिंब ही दोन्ही आपण न होता पाहणारा जसा दोहिला प्रकाशित करतो; 379
380-18
का अहोरात्र सविता । न होनि करी पंडुसुता । तैसा आत्मा कर्मकर्ता । न होनि दावी ॥380॥
किंवा हे पंडुसुता, सूर्य हा दिवस व रात्र यास कारणीभूत असून ज्याप्रमाणे त्यापासून अलित असतो, त्याप्रमाणे आत्म्याच्या अधिष्ठानावर जरी कर्म होते, तरी तो कर्मकर्ता नाही असे दाखवितो. 380
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-17
परी देहाहंमान भुली । जयाची बुद्धि देहीचि आतली । तया आत्मविषयी जाली । मध्यरात्री गा ॥381॥
परंतु मीपणाच्या भ्रमाने ज्याची बुद्धी देह हाच मी अशी पक्की खात्री झाली आहे, त्याला आपल्या स्वरूपाची मध्यरात्र झाली आहे. 381
382-18
जेणे चैतन्या ईश्वरा ब्रह्मा । देहचि केले परमसीमा । तया आत्मा कर्ता हे प्रमा । अलोट उपजे ॥382॥
ज्याने चैतन्य, ईश्वर व ब्रह्म हे सर्व देहालाच मानले आहे, त्याला आत्म कर्ता आहे अशी बुद्धी होणे अगदी साहजिक आहे. 382
383-18
आत्माचि कर्मकर्ता । हाही निश्चयो नाही तत्वता । देहोचि मी कर्मकर्ता । मानितो साचे ॥383॥
आत्मा हा कर्म कर्ता आहे असाही पक्का निश्चय जो करीत नाही, तो खरोखरच देहालाच कर्मकर्ता असे मानतो. 383
384-18
जे आत्मा मी कर्मातीतु । सर्वकर्मसाक्षिभूतु । हे आपुली कही मातु । नायकेचि कानी ॥384॥
कारण मी आत्मा कर्मातीत असून सर्व कर्मांना साक्षीभूत आहे, अशी स्वस्वरूपाची गोष्ट तो कारणानेही कवी ऐकत नाही; 384
385-18
म्हणौनि उमपा आत्मयाते । देहचिवरी मविजे एथे । विचित्र काई रात्रि दिवसाते । डुडुळ न करी ? ॥385॥
म्हणून सर्वव्यापक असा जो आत्मा, तो देहच होय असे तो मानतो. काय चमत्कार पहा, की घुबड हे आपले डोळे झाकून घेऊन दिवसालाच रात्र म्हणत नाही काय ? 385
386-18
पै जेणे आकाशीचा कही । सत्य सूर्यु देखिला नाही । तो थिल्लरींचे बिंब काई । मानू न लाहे ? ॥386॥
हे पहा, ज्याने आकाशातील खऱ्या सूर्यास कधी पाहिले नाही, तो डबक्यातील पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबास सूर्य समजत नाही काय ? 386
387-18
थिल्लराचेनि जालेपणे । सूर्यासि आणी होणे । त्याच्या नाशी नाशणे । कंपे कंपू ॥387॥
डबक्‍यात पाणी साचले म्हणजे सूर्य जन्मास आला असे म्हणतो, तेच पाणी वाऱ्याने हालले म्हणजे सूर्यास कंप सुटला असे म्हणतो आणि डबके कोरडे पडले म्हणजे सूर्याचा नाश झाला असे समजतो, 387
388-18
आणि निद्रिस्ता चेवो नये । तव स्वप्न साच हो लाहे । रज्जु नेणता सापा बिहे । विस्मो कवण ? ॥388॥
आणि निजलेला जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत त्याला स्वप्न खरे भासते; यालाही दोरी आहे हे कळत नाही, तो तिला समजून भितो, यात नवल ते कोणते ? 388
388-18
जव कवळ आथि डोळा । तव चंद्रु देखावा की पिवळा । काय मृगीही मृगजळा । भाळावे नाही ? ॥389॥
जोपर्यंत काळी झालेली आहे, तोपर्यंत चंद्राचा रंग पिवळा दिसतो. अरे, मृगजलाला भुलू नये, तर मग कोणी भुलावे ? 389
390-18
तैसा शास्त्रगुरूचेनि नांवे । जो वाराही टेको नेदी सिवे । केवळ मौढ्याचेनिचि जीवे । जियाला जो ॥390॥
त्याप्रमाणे शास्त्र व गुरू याची नावे उच्चारल्याबरोबर तो त्याचा वाराही आपल्या शिवेस लागू देत नाही. कारण तो मूर्खपणाच्या जोरावर वाचलेला असतो, 390
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
391-18
तेणे देहात्मदृष्टीमुळे । आत्मया घापे देहाचे जाळे । जैसा अभ्राचा वेगु कोल्हे । चंद्री मानी ॥391॥
अभ्रे चालत असली म्हणजे ज्याप्रमाणे कोल्हे हे चंद्र चालतो असा त्याचेवर आरोप करतात, त्याप्रमाणे त्याने देहात आत्मा आहे, अशा दृष्टीने आत्म्याला देहरूप जाळे घातले आहे. 391
392-18
मग तया मानणयासाठी । देहबंदीशाळे किरीटी । कर्माच्या वज्रगाठी । कळासे तो ॥392॥
मग अर्जुना, त्याच्या या समजुतीने देहरूपी बंदीशाळेत कर्माच्या बळकट गाठीने तो बंदिवान होतो
393-18
पाहे पा बद्ध भावना दृढा । नळियेवरी तो बापुडा । काय मोकळेयाही पायाचा चवडा । न ठकेचि पुंसा । ॥393॥
अरे, हे पहा, बिचारा राघो (पोपट) नळीवर वर बसलेला असतो, तो मी बांधला गेलो आहे, अशा दृढ कल्पनेने आपल्या मोकळ्या पायाचा पंजा मोकळा असूनही ती नळी सोडत नाही,
394-18
म्हणौनि निर्मळा आत्मस्वरूपी । तो प्रकृतीचे केले आरोपी । तो कल्पकोडीच्या मापी । मवीचि कर्मे ॥394॥
म्हणून निर्मळ अशा आत्मस्वरूपावर जो देहाने केलेल्या कर्माचा आरोप करतो, तो कल्प कोटीपर्यंत कर्मातच गुंडाळला जातो. येथून पुढच्या श्लोकास अवतरण देतात.
395-18
आता कर्मामाजी असे । परी तयाते कर्म न स्पर्शे । वडवानळाते जैसे । समुद्रोदक ॥395॥
आता कर्म करीत असूनही ज्याला कर्माचा स्पर्श होत नाही, जसा वडवानळ हा समुद्रात असूनही त्याला समुद्र स्पर्श करीत नाही,
396-18
तैसेनि वेगळेपणे । जयाचे कर्मी असणे । तो कीर वोळखावा कवणे । तरी सांगो ॥396॥
तसे जो अलिप्तपणे कर्म करीत असतो, तो खरोखर कसा ओळखावा, ते सांगतो. 396
397-18
जे मुक्ताते निर्धारिता । लाभे आपलीच मुक्तता । जैसी दीपे दिसे पाहता । आपली वस्तु ॥397॥
मुक्ताच्या स्वरूपाविषयी विचार करू लागले असता आपली स्वाभाविक असणारी मुक्तता आपल्यास प्राप्त होते. जसे दिव्याच्या उजेडाने पाहू लागल्यावर आपली वस्तू आपल्याला दिसते; 397
398-18
नातरी दर्पणु जव उटिजे । तव आपणपया आपण भेटिजे । का तोय पावता तोय होईजे । लवणे जेवी ॥398॥
अथवा आरसा स्वच्छ करू लागले असता आपले स्वरूप त्यात आपणास दिसते किंवा मिठ पाण्यात घातले असते त्याचे पाणी होते; 398
399-18
हे असो परतोनि मागुते । प्रतिबिंब पाहे बिंबाते । तव पाहणे जाउनी आयिते । बिंबचि होय ॥399॥
फार काय; प्रतिबिंब मागे परतून आपल्या बिंबाला जो पाहू लागते तो त्याचे पाहणेपणही जाऊन ते सहजच बिंबच बनते. 399
400-18
तैसे हारपले आपणपे पावे । तै संतांते पाहता गिंवसावे । म्हणौनि वानावे ऐकावे । तेचि सदा ॥400॥
तसे संतांच्या स्थितीचा विचार केला असता आपले हरवलेले स्वरूप आपल्यास मिळते; म्हणून संतांचे नेहमी वर्णन करावे व त्यांचेच गुण नेहमी श्रवण करावे. 400
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
401-18
परी कर्मी असोनि कर्मे । जो नावरे समें=विषमे । चर्मचक्षूंचेनि चामे । दृष्टि जैसी ॥401॥
परंतु कर्म करीत असून जो कर्माच्या वाईट अथवा चांगल्या परिणामाने लिप्त होत नाही, जशी चर्मचक्षूंच्या चर्माने खरी दृष्टी लोपत नाही; 401
402-18
तैसा सोडवला जो आहे । तयाचे रूप आता पाहे । उपपत्तीची बाहे । उभऊनि सांगो ॥402॥
तसा तो कर्मातीत झाला आहे; त्याची लक्षणे तुला युक्तीने बाहू उभारुन सांगतो. 402
यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते ।
हत्वाऽपि स इमाण्ल्लोकान्न हन्ति न निबध्यते ॥18. 17॥
403-18
तरी अविद्येचिया निदा । विश्वस्वप्नाचा हा धांदा । भोगीत होता प्रबुद्धा । अनादि जो ॥403॥
तरीही प्रबुद्धा अर्जुना, जो अज्ञानाच्या निद्रेत विश्वरूपी स्वप्नाचा अनुभव पुष्कळ वर्षे घेत होता, 403
404-18
तो महावाक्याचेनि नांवे । गुरुकृपेचेनि थांवे । माथा हातु ठेविला नव्हे । थापटिला जैसा ॥404॥
तो ” तत्त्वमसि ” हे महावाक्य कानी पडून गुरुकृपेच्या बलाने मस्तकावर नुसता हात ठेवणे नव्हे, तर जसा थापटून जागा केला आहे, 404
405-18
तैसा विश्वस्वप्नेसी माया । नीद सांडूनि धनंजया । सहसा चेइला अद्वया- । नंदपणे जो ॥405॥
तसा अर्जुना, जगद्रुपी स्वप्न व अज्ञानरूपी निद्रा टाकून सहज निजस्वरूपाचे दर्शनाने जागा झाला, 405
406-18
तेव्हा मृगजळाचे पूर । दिसते एक निरंतर । हारपती का चंद्रकर । फांकता जैसे ॥406॥
तेव्हा चंद्र उगवल्यावर मृगजळाचे दिसणारे पुर आपोआप नाहीसे होतात
407-18
का बाळत्व निघोनि जाय । तै बागुला नाही त्राय । पै जळालिया इंधन न होय । इंधन जेवी ॥407॥
किंवा बाल्यदशा निघून गेल्यावर बागुलबुवाला जशी कोणी भीत नाही, किंवा लाकूड जळल्यावर त्यात जसा लाकूडपणा राहत नाही, 407
408-18
नाना चेवो आलिया पाठी । तै स्वप्न न दिसे दिठी । तैसी अहं ममता किरीटी । नुरेचि तया ॥408॥
अथवा जागृत झाल्यावर स्वप्ने दृष्टीस पडत नाही, तसा अर्जुना, त्याला मी व माझे हा अभिमान राहत नाही, 408
409-18
मग सूर्यु आंधारालागी । रिघो का भलते सुरंगी । परी तो तयाच्या भागी । नाहीचि जैसा ॥409॥
मग अंधार पाहण्याकरिता जरी सूर्य वाटेल त्या भुयारात शिरला, तरी तेथे जसा अंधार राहत नाही, 409
410-18
तैसा आत्मत्वे वेष्टिला होये । तो जया जया दृश्याते पाहे । ते दृष्य द्रष्टेपणेसी होत जाये । तयाचेचि रूप ॥410॥
तसा मी आत्मा आहे, अशी ज्याची पूर्ण समजूत झाली, तो ज्या वस्तूकडे पाहील ती वस्तू व त्याची दृष्टी ही त्याला आत्मरुपीच दिसतील. 410
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
411-18
जैसा वन्हि जया लागे । ते वन्हिचि जालिया आंगे । दाह्यदाहकविभागे । सांडिजे ते ॥411॥
अग्नि ज्या पदार्थास लागतो तो पदार्थ जसा अग्निरूप होतो व मग जसा दाह्य व दाहक हा भेद शिल्लक राहत नाही, 411
412-18
तैसा कर्माकारा दुजेया । तो कर्तेपणाचा आत्मया । आळु आला तो गेलिया । काही बाही जे उरे ॥412॥
तसे कर्माचे ठिकाणी द्वैत मानून ते कर्म करण्याचा आत्म्यावर आळ आलेला नाहीसा झाल्यावर जे काही उरते, 412
413-18
तिये आत्मस्थितीचा जो रावो । मग तो देही इये जाणेल ठावो ? । काय प्रलयांबूचा उन्नाहो । वोघु मानी ? ॥413॥
त्या आत्मस्थितीत राहणारा जो श्रेष्ठ पुरुष तो हा देह माझा आहे व मी देहाहून निराळा आहे असे मानेल काय ? हे पहा, प्रलयकाळी जलाची वृद्धी होऊन सर्व जलमय झाल्यावर त्यात लहान लहान ओघाला आपल्याहून निराळे ठेवीत नाही, 413
414-18
तैसी ते पूर्ण अहंता । काई देहपणे पंडुसुता । आवरे काई सविता । बिंबे धरिला ? ॥414॥
त्याप्रमाणे अर्जुना, ब्रह्माचे ठिकाणी अहंता उत्पन्न झाली असता म्हणजे ब्रह्मच मी आहे, असा आगाध बोध झाला असता तो ब्रह्मरूप झालेला अहंकार देहा पुरता कसा आवरला जाईल ? हे पहा सूर्याचे प्रतिबिंब धरल्याने सूर्य का आपल्या हाती लागणार आहे ? नाही. 414
415-18
पै मथूनि लोणी घेपे । ते मागुती ताकी घापे । तरी ते अलिप्तपणे सिंपे । तेणेसी काई ? ॥415॥
ताक घुसळून लोणी काढल्यावर ते पुन: ताकांत घातले तर ते पूर्वीप्रमाणे ताकाची एकरूप होईल का ? 415
416-18
नाना काष्ठौनि वीरेशा । वेगळा केलिया हुताशा । राहे काष्ठाचिया मांदुसा । कोंडलेपणे ? ॥416॥
अथवा हे वीरेशा, लाकडात स्वभावात:च गुप्त असलेला अग्नी घर्षणादि उपायाने प्रगट केल्यास तो लाकडाच्या पेटीत कोंडून ठेवल्यावर राहील का ? 416
417-18
का रात्रीचिया उदराआंतु । निघाला जो हा भास्वतु । तो रात्री ऐसी मातु । ऐके कायी ? ॥417॥
किंवा रात्रीच्या अंधारातून जो सूर्य बाहेर निघाला आहे, तो ” रात्र ” अशी गोष्ट कानांनी ऐकल तरी का ! 417
418-18
तैसे वेद्य वेदकपणेसी । पडिले का जयाचे ग्रासी । तया देह मी ऐसी । अहंता कैची ? ॥418॥
ज्याप्रमाणे जाणण्याची वस्तू व जाणणारा ही ज्याचे बोधांत नाहीशी झाली आहेत, त्याला मी देह आहे अथवा देहात आत्मा आहे, असा गर्व कुठून असणार ? 418
419-18
आणि आकाशे जेथे जेथुनी । जाइजे तेथ असे भरोनी । म्हणौनि ठेले कोंदोनी । आपेआप ॥419॥
आणि, आकाशाने जेथून ज्या ठिकाणी जावे, त्याठिकाणी ते भरलेले असल्यामुळे सहजच ते सर्व ठिकाणी व्याप्त आहे, 419
420-18
तैसे जे तेणे करावे । तो तेचि आहे स्वभावे । मा कोणे कर्मी वेष्टावे । कर्तेपणे ? ॥420॥
तसे तो जे जे करितो, ते आत्मस्वरूप आहे; मग कोणत्या क्रमाने तो आपलेकडे कर्तेपणा घेईल ? 420
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
421-18
नुरेचि गगनावीण ठावो । नोहेचि समुद्रा प्रवाहो । नुठीचि ध्रुवा जावो । तैसे जाहाले ॥421॥
गगनाशिवाय कोणतेही ठिकाण नाही, समुद्राला प्रवाह नाही व ध्रुव नक्षत्राला कुठेही जाता येत नाही, तशी या मनुष्याची स्थिती झाली आहे. 421
422-18
ऐसेनि अहंकृतिभावो । जयाचा बोधी जाहला वावो । तऱ्ही देहा जव निर्वाहो । तव आथी कर्मे ॥422॥
अशाप्रकारे ज्याला आत्मज्ञानाच्या योगे कर्माचा कर्तेपणाचा अभिमान बाधित म्हणजे मित्र आहे; तथापि त्याचा देह आहे, तोपर्यंत त्याच्याकडून करणे होणारच; 422
423-18
वारा जरी वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखी उरे । का सेंदे द्रुति राहे कापुरे । वेचलेनी ॥423॥
वारा वाहण्याचा जरी बंद झाला, तरी झाडाचे हालने बंद होत नाही अथवा कापूर जरी संपला, तरी करंड्यात वास शिल्लक असतो; 423
424-18
का सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु । भूमी लोळोनि गेलिया अंबु । वोल थारे ॥424॥
अथवा गाण्याचा समारंभ संपला, तरी गाणी ऐकून मनास झालेल्या आनंदाचा भर जसा कमी होत नाही, किंवा पाण्याने जमीन ओली होऊन पाणी कमी झाले असता जशी त्याची ओल मागे राहते; 424
425-18
अगा मावळलेनि अर्के । संध्येचिये भूमिके । ज्योतिदीप्ति कौतुके । दिसे जैसी ॥425॥
अरे, सूर्य मावळल्यावर संध्याकाळी पश्चिमेकडे आकाशात सूर्य ज्योतिचे तेज (संधी प्रकाश) जसे दिसते, 425
426-18
पै लक्ष भेदिलियाहीवरी । बाण धावेचि तंववरी । जव भरली आथी उरी । बळाची ते ॥426॥
तसेच निशान मारल्यावरही बाण जसा त्यातील शक्ती कमी होईपर्यंत पुढेच जातो; 426
427-18
नाना चक्री भांडे जाले । ते कुलाले परते नेले । परी भ्रमेंचि ते मागिले । भोवंडिलेपणे ॥427॥
अथवा कुंभाराच्या चाकावर तयार झालेले भांडे कुंभाराने काढून घेतल्यावरही पूर्वी दिलेल्या गतीने चाक फिरतच असते, 427
428-18
तैसा देहाभिमानु गेलिया । देह जेणे स्वभावे धनंजया । जाले ते अपैसया । चेष्टवीच ते ॥428॥
तसा आहे धनंजया, देहाचा अभिमान नाहीसा झाल्यावरही, ज्या कर्मांनी देह उत्पन्न झाला आहे, ते कर्म त्या देहाकडून चेष्टा करविलच, त्याचे चेष्टा याचा इच्छेवर अवलंबून नसतात. 428
429-18
संकल्पेवीण स्वप्न । न लाविता दांगीचे बन । न रचिता गंधर्वभुवन । उठी जैसे ॥429॥
संकल्पा शिवाय स्वप्न दिसते, न लावता जशी अरण्यात झाडे उत्पन्न होतात व रचना केल्या शिवाय आकाशात जशी गंधर्व नगरे दृष्टीस पडतात, 429
430-18
आत्मयाचेनि उद्यमेवीण । तैसे देहादिपंचकारण । होय आपणया आपण । क्रियाजात ॥430॥
तशी आत्म्याच्या संकल्पाशिवाय देहादि पांच कारणे मागे सांगितली, ती क्रिया करण्यास कारणीभूत होतात. 430
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
431-18
पै प्राचीनसंस्कारवशे । पांचही कारणे सहेतुके । कामवीजती गा अनेके । कर्माकारे ॥431॥
परंतु पूर्वजन्मीच्या संस्काराने पाचही कारणे व हेतू अनेक क्रिया करितात. 431
432-18
तया कर्मामाजी मग । संहरो आघवे जग । अथवा नवे चांग । अनुकरो ॥432॥
त्या कर्मात मग सर्व जगाचा संहार होवो, अथवा नवे जग उत्पन्न होवो; 432
433-18
परी कुमुद कैसेनि सुके । कैसे ते कमळ फाके । ही दोन्ही रवी न देखे । जयापरी ॥433॥
परंतु, कुमुद कसे झुकते व कमळांची प्रभा कशी फाकते, हे आपल्या पासून होणारे दोन्ही परिणाम सूर्यास माहीत नसतात; 433
434-18
का वीजु वर्षोनि आभाळ । ठिकरिया आतो भूतळ । अथवा करू शाड्वळ । प्रसन्नावृष्टी ॥434॥
किंवा आकाशातून विज पडून जरी ठिकर्‍या ठिकर्‍या उडाल्या किंवा पाऊस पडून जरी जमीन हिरवीगार झाली, 434
435-18
तरी तया दोहीते जैसे । नेणिजेचि का आकाशे । तैसा देहीच जो असे । विदेहदृष्टी ॥435॥
तरी या दोन्हीलाही जसे आकाश जाणत नाही, तसा तो देहाभिमान रहित देहातच वास करतो, 435
446-18
तो देहादिकी चेष्टी । घडता मोडता हे सृष्टी । न देखे स्वप्न दृष्टी । चेइला जैसा ॥436॥
तो, तसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्न पहात नाही, तसा देहादीका पासून सृष्टीचा उद्भव झाला किंवा लय झाला, तरी जाणत नाही. 436
437-18
येऱ्हवी चामाचे डोळेवरी । जे देखती देहचिवरी । ते कीर तो व्यापारी । ऐसेचि मानिती ॥437॥
एरवी, हा देही आहे असे जे चर्मचक्षूंनी पाहतात, ते त्यालाच कर्म करणारा असे मानतात. 437
438-18
का तृणाचा बाहुला । जो आगरामेरे ठेविला । तो साचचि राखता कोल्हा । मानिजे ना ? ॥438॥
अथवा, गवताचे बुजगावणे करून ते शेताच्या कडेने उभे केले, म्हणजे कोल्हा त्याला खरा रखवालदार समजत नाही काय ? 438
439-18
पिसे नेसले का नागवे । हे लोकी येऊनि जाणावे । ठाणोरियांचे मवावे । आणिकी घाय ॥439॥
वेडा मनुष्य वस्त्र नेसलेल्या आहे, किंवा नागवा आहे हे जसे लोकांनी जाणावे लागते किंवा रणात पडलेल्या मनुष्याच्या अंगावरचे घाव जसे दुसऱ्यांनी मोजावे लागतात, 439
440-18
का महासतीचे भोग । देखे कीर सकळ जग । परी ते आगी ना आंग । ना लोकु देखे ॥440॥
अथवा एखादी महासती सती जाते वेळेस न्हाणे, माखणे, मळवट भरणे इत्यादी सौभाग्यशृंगार जरी करीत आहे असे लोकास दिसले तरी तिला अग्नी दिसत नाही, स्वतःच्या शरीराचे तिला भान नसते किंवा लोकांकडेही तिचे लक्ष नसते, तर ती पती स्वरूपी तल्लीन झालेली असते, 440
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
441-18
तैसा स्वस्वरूपे उठिला । जो दृश्येसी द्रष्टा आटला । तो नेणे काय राहटला । इंद्रियग्रामु ॥441॥
त्याप्रमाणे आत्मस्वरूप प्राप्तीच्या योगे जो द्रष्टा द्रष्ट्यासह नष्ट झाला, (पाहणारा व पाहण्याची वस्तू हा भाव नाहीसा झाला), तो इंद्रिय समुदायाने काय कर्म केले हे जाणत नाही 441
442-18
अगा थोरी कल्लोळी कल्लोळ साने । लोपता तिरीचेनि जने । एकी एक गिळिले हे मने । मानिजे जऱ्ही ॥442॥
अरे, समुद्राचे तीरावर असलेल्या लोकास जरी असे वाटले की थोरल्या लाटेने धाकट्या लाटास एकदम गिळून टाकले आहे, 442
443-18
तऱ्ही उदकाप्रति पाही । कोण ग्रसितसे काई । तैसे पूर्णा दुजे नाही । जे तो मारी ॥443॥
तरी उदकाच्या दृष्टीने पाहू गेले असता कोणती लाट कोणत्या लाटे खाऊन टाकते ? त्याप्रमाणे जो आत्मस्वरूपास मिळाला त्यास कर्म टाकावे असे कर्माविषयी तो द्वैत रहात नाही. 443
444-18
सुवर्णाचिया चंडिका । सुवर्णशूळेचि देखा । सुवर्णाचिया महिखा । नाशु केला ॥444॥
पहा, सोन्याच्या देवीने, सोन्याच्या त्रिशुळाने सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला, 444
445-18
तो देवलवसिया कडा । व्यवहारु गमला फुडा । वाचूनि शूळ महिष चामुंडा । सुवर्णचि ते ॥445॥
हा सर्व प्रकार भक्तांच्या दृष्टीने खरा असा भासतो, परंतु या दृष्टीने त्रिशूळ, महिषासुर व देवी हे सर्व सोनेच आहे; 445
446-18
पै चित्रीचे जळ हुतांशु । तो दृष्टीचाचि आभासु । पटी आगी वोलांशु । दोन्ही नाही ॥446॥
तसेच भिंतीवर काढलेल्या चित्रात एक तलाव व एक अग्निकुंड हा फक्त दृष्टीचाच भेद आहे; परंतु त्या दोहोस वस्त्र लावले असता ते भिजत नाही व जळतही नाही; 446
447-18
मुक्ताचे देह तैसे । हालत संस्कारवशे । ते देखोनि लोक पिसे । कर्ता म्हणती ॥447॥
त्याप्रमाणे जो ज्ञानी आहे त्याच्या देहाचा व्यवहार पूर्व कर्मानुसार असतो, परंतु हे न समजता वेडे लोक त्याला कर्मकर्ता असे म्हणतात; 447
448-18
आणि तया करणेया आंतु । घडो तिही लोका घातु । परी तेणे केला हे मातु । बोलो नये ॥448॥
आणि जो कर्म करीत असता जरी त्यायोगे त्रैलोक्याचा घात झाला, तरी त्याने केला असे म्हणू नये. 448
449-18
अगा अंधारुचि देखावा तेजे । मग तो फेडी हे बोलिजे । तैसे ज्ञानिया नाही दुजे । जे तो मारी । ॥449॥
अरे, सूर्याने अंधार पहावा आणि मग त्याला दूर करा, असे म्हणावे, त्याप्रमाणे ज्ञानाला अशी काही दुसरी वस्तू नाही की, जिचा तो नाश करील. त्याचे ठिकाणचा द्वैतभाव जाऊन सर्व जग त्याला स्वस्वरूप झालेले असते; 449
450-18
म्हणौनि तयाचि बुद्धी । नेणे पापपुण्याची गंधी । गंगा मीनलिया नदी । विटाळु जैसा ॥450॥
म्हणून त्याच्या बुद्धीला पाप व पुण्य याचा गंधही नसतो. जशी एखादी नदी गंगेस मिळाली असता तिचा अपवित्रपणा नाहीसा होतो. 450
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
451-18
आगीसी आगी झगटलिया । काय पोळे धनंजया । की शस्त्र रुपे आपणया । आपणचि ॥451॥
अर्जुना, अग्नी वर अग्नि पडला तर तो भाजतो का ? किंवा शास्त्र आपणच आपल्याला कधी रुतेल काय ? 451
452-18
तैसे आपणपयापरते । जो नेणे क्रियाजाताते । तेथ काय लिंपवी बुद्धीते । तयाचिये ॥452॥
त्याप्रमाणे, आपल्या स्वरूपाहून कोणतेही कर्म भिन्न नाही असे जो समजतो, तिथे कोणत्या पदार्थाने त्याची बुद्धी लिप्त होईल ? 452
453-18
म्हणौनि कार्य कर्ता क्रिया । हे स्वरूपचि जाहले जया । नाही शरीरादिकी तया । कर्मी बंधु ॥453॥
म्हणून तो कार्य, कर्ता व क्रिया ही त्रिपुटी आपणच झाला आहे, तो शरीरादिका पासून होणाऱ्या कर्मापासून बद्ध होत नाही. 453
454-18
जे कर्ता जीव विंदाणी । काढूनि पांचही खाणी । घडित आहे करणी । आउती दाहे ॥454॥
कारण जीवात्मा हा मोठेपणाने आपल्या कर्ता समजून दहा इंद्रियांच्या साधनांने पांच हेतू धारण करतो; 454
445-18
तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभविता न लवी खेवो । कर्मभुवने ॥455॥
आणि त्या ठिकाणी न्याय किंवा अन्याय अशी दोन प्रकारची कर्मे करून एका क्षणात कर्माची भुवने तयार करतो. 455
456-18
या थोराडा कीर कामा । विरजा नोहे आत्मा । परी म्हणसी हन उपक्रमा । हातु लावी ॥456॥
पण या मोठ्या कृत्यात आत्मा हा सह्यकर्ता नाही व तो आरंभ करतो असेही म्हणू नको. 456
457-18
तो साक्षी चिद्रूपु । कर्मप्रवृत्तीचा संकल्पु । उठी तो का निरोपु । आपणचि दे ? ॥457॥
तो साक्षीभूत व ज्ञानस्वरूप आहे; तेव्हा कर्मप्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो, त्याला तो का आज्ञा देईन ? 457
458-18
तरी कर्मप्रवृत्तीहीलागी । तया आयासु नाही आंगी । जे प्रवृत्तीचेही उळिगी । लोकुचि आथी ॥458॥
तर जी जी कर्मे करण्याकरिता सर्व लोक श्रम करीत असतात, ती ती कर्मे करण्याविषयी त्यांच्या शरीरासआयास पडत नाहीत, 458
459-18
म्हणौनि आत्मयाचे केवळ । जो रूपचि जाहला निखिळ । तया नाही बंदिशाळ । कर्माचि हे ॥459॥
म्हणून जो केवळ शुद्ध आत्मरुपी झाला आहे, त्याला ही कर्माची बंदिशाळा नाही. 459
460-18
परी अज्ञानाच्या पटी । अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी । तेथ चितारणी हे त्रिपुटी । प्रसिद्ध जे का ॥460॥
परंतु अज्ञानाच्या पटावर जो दैवज्ञानाचे चित्र काढतो तो तेथे चित्र, चित्र काढणारा व चित्रपट ही त्रिपुटी स्पष्ट आहे, ती तुला सांगतो. 460
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना ।
करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः ॥18. 18॥
461-18
जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय । हे जगाचे बीज त्रय । ते कर्माची निःसंदेह । प्रवृत्ति जाण ॥461॥
कारण ज्ञान, ज्ञाता व ज्ञेय ही त्रिपुटी जगास कारणीभूत असून, इच्यापासून कर्माची नि:संशय प्रवृत्ती होते, असे समज. 461
462-18
आता ययाचि गा त्रया । व्यक्ति वेगळालिया । आइके धनंजया । करू रूप ॥462॥
हे धनंजया, आता ह्याच त्रिपुटी ची निरनिराळी स्वरूपी उघड करून सांगतो, ती ऐक 462
463-18
तरी जीवसूर्यबिंबाचे । रश्मी श्रोत्रादिके पांचे । धावोनि विषयपद्माचे । फोडिती मढ ॥463॥
तर जीव रुपी सूर्यबिंबाचे ज्ञानेन्द्रियादी पंचेंद्रियरुपी किरण विषयरुपी कमळाचे कळीवर पडून ती उमलवितात; 463
464-18
की जीवनृपाचे वारु उपलाणे । घेऊनि इंद्रियांची केकाणे । विषयदेशीचे नागवणे । आणीत जे ॥464॥
अथवा जीवरूपी राजा, हा शरीररूपी रुपी उपलाणी म्हणजे खोगीराशिवाय घोड्यावर बसून हातात इंद्रियरुपी भाले घेऊन विषयरुपी देशातून लूट आणतात 464
465-18
हे असो इही इंद्रियी राहाटे । जे सुखदुःखेसी जीवा भेटे । ते सुषुप्तिकाली वोहटे । जेथ ज्ञान ॥465॥
फार काय, जो या इंद्रियात वागत असून जीवाला सुख व दुःख भोगावयास देते व जे ज्ञान गाढ झोपेत जेथे नाहीसे होते, 465
466-18
तया जीवा नांव ज्ञाता । आणि जे हे सांगितले आता । तेचि एथ पंडुसुता । ज्ञान जाण ॥466॥
त्या जीवाला अर्जुना, ज्ञाता असे म्हणतात, आणि जे आता सांगितले त्यालाच ज्ञान असे म्हणतात, असे तू समज. 466
467-18
जे अविद्येचिये पोटी । उपजतखेवो किरीटी । आपणयाते वाटी । तिही ठायी ॥467॥
अर्जुना, जे अज्ञानाच्या पोटात उपजताक्षणी आपल्यास तीन ठिकाणी वाटून घेते, 467
468-18
आपुलिये धावे पुढा । घालूनि ज्ञेयाचा गुंडा । उभारी मागिलीकडा । ज्ञातृत्वाते ॥468॥
आपल्या वृत्ती पुढे जाणावयाचा विषयरुप ज्ञेयाचा दगड घालून आपल्या मार्गाचे बाजूस ज्ञात्याला उभे करते, 468
469-18
मग ज्ञातया ज्ञेया दोघा । तो नांदणुकेचा बगा । माजी जालेनि पै गा । वाहे जेणे ॥469॥
मग ज्ञाता ज्ञेय या दोघांच्या मधील व्यवहार होत असताना जे ज्ञानामध्ये राहते. 469
470-18
ठाकूनि ज्ञेयाची शिव । पुरे जयाची धाव । सकळ पदार्था नांव । सूतसे जे ॥470॥
ज्ञेयाला जाऊन पोचल्यावर ज्याची धाव खुंटते व जे सर्व पदार्थांना नाव ठेवते. 470
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
471-18
ते गा सामान्य ज्ञान । या बोला नाही आन । ज्ञेयाचेही चिन्ह । आइक आता ॥471॥
त्याला सामान्य ज्ञान असे म्हणतात, यात संशय नाही. आता ज्ञेयाची लक्षणे सांगतो ती ऐक. 471
472-18
तरी शब्दु स्पर्शु । रूप गंध रसु । हा पंचविध आभासु । ज्ञेयाचा तो ॥472॥
तर शब्द, स्पर्श, रूप, रस, व गंध हे ज्ञेयाचे पाच प्रकारचे धर्म आहेत. 472
473-18
जैसे एकेचि चूतफळे । इंद्रिया वेगवेगळे । रसे वर्णे परीमळे । भेटिजे स्पर्शे ॥473॥
जसा एकच आंबा दृष्टीस पडल्यावर पाच इंद्रियांना निरनिराळ्या प्रकाराने भासतो; म्हणजे आंबा या शब्दाने कानात समजतो, रसाने जिभेस समजतो, रंगाने डोळ्यात समजतो, वासाने नाकास समजतो, आणि स्पर्शाने त्वचेस समजतो. 473
474-18
तैसे ज्ञेय तरी एकसरे । परी ज्ञान इंद्रियद्वारे । घे म्हणौनि प्रकारे । पांचे जाले ॥474॥
तसेच ज्ञेय तर एकच आहे, परंतु आपल्या इंद्रियांच्या द्वाराने त्यांजविषयी निरनिराळे ज्ञान उत्पन्न होते, म्हणून ते पाच प्रकारचे झाले आहे. 474
475-18
आणि समुद्री वोघाचे जाणे । सरे लाणीपासी धावणे । का फळी सरे वाढणे । सस्याचे जेवी ॥475॥
समुद्रास मिळाल्यावर नदीचा ओघ संपतो, मुक्कामास गेल्यावर चालणे संपते, अथवा फळ आल्यावर ज्याप्रमाणे धान्याची वाढ खुंटते; 475
476-18
तैसे इंद्रियांच्या वाहवटी । धावतया ज्ञाना जेथ ठी । होय ते गा किरीटी । विषय ज्ञेय ॥476॥
ज्याप्रमाणे अर्जुना, इंद्रियांच्या मार्गात धावत असलेल्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो त्या विषयालाच ज्ञेय असणे असे म्हणतात. 476
477-18
एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया । तिही रूप केले धनंजया । हे त्रिविध सर्व क्रिया- । प्रवृत्ति जाण ॥477॥
याप्रमाणे धनंजया, ज्ञाता; ज्ञान व ज्ञेय यांची लक्षणे तुला सांगितली. ही त्रिपुटी तीन प्रकारच्या सर्व कर्मांचा कारणीभूत आहे. 477
478-18
जे शब्दादि विषय । हे पंचविध जे ज्ञेय । तेचि प्रिय का अप्रिय । एकेपरीचे ॥478॥
कारण शब्दादि पाच विषय हेच ज्ञेय होय आणि तेच प्रिय किंवा अप्रिय यापैकी कोणतीतरी एक असते. 478
479-18
ज्ञान मोटके ज्ञातया । दावी ना जव धनंजया । तव स्वीकारा की त्यजावया । प्रवर्तेचि तो ॥479॥
हे धनंजया, ज्ञान हे ज्ञात्याला ज्ञेय पदार्थ किंचित दाखवित आहे, तोच त्याचा स्वीकार किंवा त्याग करण्याविषयी ज्ञाता उद्युक्त होतो, 479
480-18
परी मीनाते देखोनि बकु । जैसा निधानाते रंकु । का स्त्री देखोनि कामुकु । प्रवृत्ति धरी ॥480॥
परंतु, माशाला पाहताच जसा बगळा त्यास धरावयास लावतो, अथवा द्रव्याचा ठेवा पाहताच क्षणी तो घेण्यात दरिद्री धावतो, किंवा स्त्री पाहताच जसा कामिक पुरुष तिची प्राप्ती करून घेण्याविषयी प्रवृत्त होतो; 480
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
481-18
जैसे खालारा धावे पाणी । भ्रमर पुष्पाचिये घाणी । नाना सुटला सांजवणी । वत्सुचि पा ॥481॥
जसे पाणी उतरत्या जमिनीकडे राहते, भ्रमर पुष्पाचा वास घेण्यास जातो अथवा धार काढण्याचे वेळी वासरू सोडल्यावर ते गायीकडे धावत जाते; 481
482-18
अगा स्वर्गींची उर्वशी । ऐकोनि जेवी माणुसी । वारत्या लावीजती आकाशी । यागांचिया ॥482॥
अरे, स्वर्गातील उर्वशी नामक अप्सरेचे वर्णन ऐकून ती उपभोगास मिळावी म्हणून जसे लोक आकाशात यज्ञरुपी शिड्या लावतात; 482
483-18
पै पारिवा जैसा किरीटी । चढला नभाचिये पोटी । पारवी देखोनि लोटी । आंगचि सगळे ॥483॥
अथवा अर्जुना, पारवा आकाशात फिरत असता पारवीस पाहतांच एकदम सगळे अंग टाकून तीज जवळ येतो; 483
484-18
हे ना घनगर्जनासरिसा । मयूर वोवांडे आकाशा । ज्ञाता ज्ञेय देखोनि तैसा । धावचि घे ॥484॥
इतकेच नव्हे, तर मेघांची गर्जना होताक्षणीच मोर जसा आपल्यास आकाशावरून ओवाळून टाकतो, तसा ज्ञाता हा ज्ञेयास (विषयास) पाहून उडी घालतो. 484
485-18
म्हणौनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पंडुसुता । होयचि कर्मा समस्ता । प्रवृत्ति येथ ॥485॥
म्हणून हे पंडुसुता, ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता ही त्रिपुटी सर्व कर्मे करण्यास कारणीभूत होते; 485
486-18
परी तेचि ज्ञेय विपाये । जरी ज्ञातयाते प्रिय होये । तरी भोगावया न साहे । क्षणही विलंबु ॥486॥
आणि कदाचित तोच विषय जर ज्ञात्यास आवडता असला, तर मग तो भोगण्याविषयी त्याला एका क्षणाचाही विलंब खपत नाही. 486
487-18
नातरी अवचटे । तेचि विरुद्ध होऊनि भेटे । तरी युगांत वाटे । सांडावया ॥487॥
अथवा अवचित तोच विषय जर नावडता असला, तर त्याचा त्याग करण्याविषयी एकेक क्षण त्याला युगांप्रमाणे भासतो, 487
488-18
व्याळा का हारा । वरपडा जालेया नरा । हरिखु आणि दरारा । सरिसाचि उठी ॥488॥
सर्प असून नीलमण्यांचा हार आहे, या भावनेने हर्ष होतो व त्यास हात लावताक्षणीच सर्प आहे असे लक्षात येऊन लागलीच भीती उत्पन्न होते, 488
489-18
तैसे ज्ञेय प्रियाप्रिये । देखिलेनि ज्ञातया होये । मग त्याग स्वीकारी वाहे । व्यापाराते ॥489॥
त्याप्रमाणे प्रिय किंवा अप्रिय हे पाहिल्यावर ज्ञात्याची स्थिती होते; आणि मग त्याचा त्याग किंवा स्वीकार करण्याबद्दल कर्म उत्पन्न होते. 489
490-18
तेथ रागी प्रतिमल्लाचा । गोसावी सर्वदळाचा । रथु सांडूनि पायांचा । होय जैसा ॥490॥
जो कुस्तीचा षोकी आहे, त्याने दुसरा मल्ल समोर पाहिल्यावर, तो जरी सर्वसैन्याचा अधिपती असला तरी रथ सोडून पादचारी होतो. 490
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
491-18
तैसे ज्ञातेपणे जे असे । ते ये कर्ता ऐसिये दशे । जेविते बैसले जैसे । रंधन करू ॥491॥
तसा ज्ञाता म्हणून असतो, तो विषयासक्त झाला म्हणजे आपल्या कर्ता असे म्हणवितो. ते त्याचे कर्तेपणास येणे, ज्याप्रमाणे पानावर बसून आयते जेवणार्‍या मनुष्याने ते सुख सोडून स्वयंपाकाचे कष्ट करण्यास तयार व्हावे; 491
492-18
का भंवरेचि केला मळा । वरकलुचि जाला अंकसाळा । नाना देवो रिगाला देऊळा- । चिया कामा ॥492॥
किंवा आपल्यास पुष्परेणू खाण्यास मिळावे म्हणून भ्रमराने जशी बाग् लावण्याची खटपट करावी अथवा कसोटीने आपले ऐश्वर्य तुच्छ मानून धातू हावे, देवांनी देवळात स्वस्थ बसणे सोडून देऊळ बांधण्यास प्रवृत्त व्हावे 492
493-18
तैसा ज्ञेयाचिया हावा । ज्ञाता इंद्रियांचा मेळावा । राहाटवी तेथ पांडवा । कर्ता होय ॥493॥
तसे विषयांच्या इच्छेने ज्ञाता जेथे इंद्रियांचे लाड पुरवतो, तेथे अर्जुना, त्याला कर्ता असे नाव प्राप्त होते. 493
494-18
आणि आपण होऊनी कर्ता । ज्ञाना आणी करणता । तेथे ज्ञेयचि स्वभावता । कार्य होय ॥494॥
आणि आपण जो ज्ञाता, तो कर्ता होऊन ज्ञानाला कारण(साधन) करतो, मग येथे ज्ञेय हे सहज कार्य होते. 494
495-18
ऐसा ज्ञानाचिये निजगति । पालटु पडे गा सुमति । डोळ्याची शोभा राती । पालटे जैसी ॥495॥
हे सुमते, ज्ञानाच्या स्वरूपगतीस अशा रीतीने पालट पडतो जसे नेत्राचे तेज रात्री उपयोगी पडत नाही; 495
496-18
का अदृष्ट जालिया उदासु । पालटे श्रीमंताचा विलासु । पुनिवेपाठी शीतांशु । पालटे जैसा ॥496॥
किंवा दैव प्रतिकूल झाल्यावर श्रीमंताचे विलास बदलतात; अथवा पौर्णिमा झाल्यावर ज्याप्रमाणे चंद्र एकेक कलेने कमी होत जातो- 496
497-18
तैसा चाळिता करणे । ज्ञाता वेष्टिजे कर्तेपणे । तेथीची तिये लक्षणे । ऐक आता ॥497॥
त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड पुरवीत असता ज्ञाता हा कर्तेपणाचा अभिमानात गुंततो नातं, त्यावेळची त्याची लक्षणे आता तुला सांगतो, ती ऐक. 497
498-18
तरी बुद्धि आणि मन । चित्त अहंकार हन । हे चतुर्विध चिन्ह । अंतःकरणाचे ॥498॥
तर बुद्धी, मन, चित्त व अहंकार हे या अंतःकरणाचे चतुर्विध चिन्ह आहे; (अंत:करणाच्या ह्या चार आवृत्ती आहेत; ) 498
499-18
बाह्य त्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण । हे पंचविध जाण । इंद्रिये गा ॥499॥
आणि त्वचा, कान, डोळे, जिव्हा व नाक अशी पाच प्रकारची इंद्रिय आहेत. 499
500-18
तेथ आंतुले तव करणे । कर्ता कर्तव्या घे उमाणे । मग तै जरी जाणे । सुखा येते ॥500॥
त्याठिकाणी अंतकरणाच्या वृत्तीच्या योगे जिवाच कर्म करण्यास विषयी स्फुरण येते; मग या कर्मापासून सुख प्राप्ती होईल असे वाटू लागले. 500
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
501-18
तरी बाहेरीले तियेही । चक्षुरादिके दाहाही । उठौनि लवलाही । व्यापारा सूये ॥501॥
तर नेत्रादि दहाही बाह्येन्द्रियांना उठवून त्यांना तो व्यापार करावयास लावतो; 501
502-18
मग तो इंद्रियकदंबु । करविजे तव राबु । जव कर्तव्याचा लाभु । हातासि ये ॥502॥
नंतर त्या इंद्रिय समुदायाला तोपर्यंत राबवितो, की जोपर्यंत कर्माचे फळ हाती आले नाही ! 502
503-18
ना ते कर्तव्य जरी दुःखे । फळेल ऐसे देखे । तो लावी त्यागमुखे । तिये दाहाही ॥503॥
किंवा जर त्या कर्मापासून दुःख होईल असे दिसले, तर त्या कर्माचा त्याग करण्याकरिता त्या दहाही इंद्रियांची योजना करितो. 503
504-18
मग फिटे दुःखाचा ठावो । तव राहाटवी रात्रिदिवो । विकणवाते का रावो । जयापरी ॥504॥
मग जसा एखादा राजा वसूल करण्याकरिता आपल्या सेवकांना रात्रंदिवस राबवितो तसा तो ते दुःख नाहीसे होईपर्यंत रात्रंदिवस खटपट करतो. 504
505-18
तैसेनि त्याग स्वीकारी । वाहाता इंद्रियांची धुरी । ज्ञातयाते अवधारी । कर्ता म्हणिपे ॥505॥
अशाप्रकारे कर्माचा त्याग अथवा स्वीकार करण्याकरिता इंद्रियांचे पुढारीपण ज्ञात्याने घेतले, म्हणजे त्यालाच कर्ता असे म्हणतात; 505
506-18
आणि कर्तयाच्या सर्व कर्मी । आउताचिया परी क्षमी । म्हणौनि इंद्रियाते आम्ही । करणे म्हणो ॥506॥
आणि कर्ता हा कर्म करण्याकरिता आऊता प्रमाणे सर्व इंद्रियांना खपवतो. म्हणून आम्ही त्यास करणे म्हणजे क्रियेची साधने असे म्हणतो.
507-18
आणि हेचि करणेवरी । कर्ता क्रिया ज्या उभारी । तिया व्यापे ते अवधारी । कर्म एथ ॥507॥
आणि हे करण्याकरीता कर्ता ज्या ज्या क्रिया उत्पन्न करतो, त्यांनी जे व्यापिले जाते त्यास कर्म असे म्हणतो. 507
508-18
सोनाराचिया बुद्धि लेणे । व्यापे चंद्रकरी चांदणे । का व्यापे वेल्हाळपणे । वेली जैसी ॥508॥
सोनाराच्या बुद्धीने जसे दागिने व्यापिले जातात, चंद्राच्या किरणांनी जसे चांदणे व्यापले जाते, किंवा विस्ताराने जसा वेल व्यापला जातो, 508
509-18
नाना प्रभा व्यापे प्रकाशु । गोडिया इक्षुरसु । हे असो अवकाशु । आकाशी जैसा ॥509॥
अथवा सूर्याच्या प्रभेने जसा सूर्यप्रकाश व्यापला जातो व गोडीने जसा उसाचा रस व्यापला जातो, हे असो, अवकाशाने जसे आकाश व्यापले जाते, 509
510-18
तैसे कर्तयाचिया क्रिया । व्यापले जे धनंजया । ते कर्म गा बोलावया । आन नाही ॥510॥
तसे अर्जुना, कर्त्याच्या क्रियांनी जे व्यापले जाते ते कर्म होय यात शंका नाही. 510
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
511-18
एवं कर्म कर्ता करण । या तिहीचेही लक्षण । सांगितले तुज विचक्षण- । शिरोमणी ॥511॥
याप्रमाणे अर्जुना, तुला कर्म, कर्ता व करण या तिघांची लक्षणे सांगितली. 511
512-18
एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय । हे कर्माचे प्रवृत्तित्रय । तैसेचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो ॥512॥
तर ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी कर्मप्रवृत्ती कारक आहे. तसेच कर्ता, करण व कार्य ही त्रिपुटी हा कर्मसंचय आहे. 512
513-18
वन्ही ठेविला असे धूमु । आथी बीजी जेवी द्रुमु । का मनी जोडे कामु । सदा जैसा ॥513॥
विस्तवात जसा धूर ठेवलेलाच असतो, अथवा मनात जशी नेहमीच इच्छा असते, 513
514-18
तैसा कर्ता क्रिया करणी । कर्माचे आहे जिंतवणी । सोने जैसे खाणी । सुवर्णाचिये ॥514॥
आणि सोने जसे सुवर्णाच्या खाणीत सापडते- तसा कर्ता क्रिया व करणे(इंद्रिये) ही त्रिपुटी कर्माचा जिव्हाळाच (उत्पत्तिस्थानच) आहे. म्हणून 514
515-18
म्हणौनि हे कार्य मी कर्ता । ऐसे आथि जेथ पंडुसुता । तेथ आत्मा दूरी समस्ता । क्रियांपासी ॥515॥
हे पंडुसुता, अमुक कार्याचा मी कर्ता, जसा जीवाने कर्तेपणा धारण केला, म्हणजे सर्व क्रिया जवळ येतात व आत्मा या सर्व क्रियापासून दूर असतो. 515
516-18
यालागी पुढतपुढती । आत्मा वेगळाचि सुमती । आता असो हे किती । जाणतासि तू ॥516॥
यास्तव हे सुभते, कर्मापासून आत्मा वेगळाच आहे, हे तुला वारंवार काय सांगावे ? कारण हे तू जाणतच आहेस. 516
ज्ञानं कर्म च कर्ताच त्रिधैव गुणभेदतः ।
प्रोच्यते गुणसण्‌ख्याने यथावच्छृणु तान्यपि ॥18. 19॥
517-18
परी सांगितले जे ज्ञान । कर्म कर्ता हन । ते तिन्ही तिही ठायी भिन्न । गुणी आहाती ॥517॥
पण तुला जे ज्ञान, कर्म व कर्ता म्हणून सांगितले, ती तिन्ही गुणांनी निरनिराळी आहेत. 517
518-17
म्हणौनि ज्ञाना कर्मा कर्तया । पातेजो नये धनंजया । जे दोनी बांधती सोडावया । एकचि प्रौढ ॥518॥
म्हणून अर्जुना, ज्ञान, कर्म व कर्ता यांच्यावर विश्वास ठेवू नको. कारण यातील रज व तम या दोन गुणांपासून मनुष्य बद्ध होतो व फक्त सत्त्वगुणच सुटका करण्यास समर्थ आहे. 518
519-18
ते सात्विक ठाऊवे होये । तो गुणभेदु सांगो पाहे । जो सांख्यशास्त्री आहे । उवाइला ॥519॥
तो सात्त्विक गुणांचा भेद ज्याविषयी संख्याशास्त्रात विवेचन केलेले आहे तो तुला समजेल असा सांगतो. 519
520-18
जे विचारक्षीरसमुद्र । स्वबोधकुमुदिनीचंद्र । ज्ञानडोळसा नरेंद्र । शास्त्रांचा जे ॥520॥
जे संख्यशास्त्र विचाररूपी क्षीर समुद्रच आहे, आत्मबोधरुपी कमलास प्रफुल्लित करणारा चंद्रच आहे व ज्ञान उत्पन्न करणारे शास्त्रात श्रेष्ठ आहे. 520
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
521-18
की प्रकृतिपुरुष दोनी । मिसळली दिवोरजनी । तिये निवडिता त्रिभुवनी । मार्तंडु जे ॥521॥
किंवा प्रकृती व पुरुष ही दोन्ही दिवस व रात्र याप्रमाणे अहर्निश एकमेकांत मिसळली आहेत. त्यांना पृथक करून दाखविणारा या त्रिभुवनात सूर्यच आहे. 521
522-18
जेथ अपारा मोहराशी । तत्वाच्या मापी चोविसी । उगाणा घेऊनि परेशी । सुरवाडिजे ॥522॥
जे अपार अशा मोहाचा चोवीस तत्त्वांनी ठाव घेऊन परतत्त्वाची प्राप्ती करून देऊन सुख भोगावयास लावते. 522
523-18
अर्जुना ते सांख्यशास्त्र । पढे जयाचे स्तोत्र । ते गुणभेदचरित्र । ऐसे आहे ॥523॥
अर्जुना, असे जे सांख्यशास्त्र, ते ज्या गुणांचे स्तवन करिते, त्यात तीन गुणांचे वर्णन असे आहे. 523
524-18
जे आपुलेनि आंगिके । त्रिविधपणाचेनि अंके । दृश्यजात तितुके । अंकित केले ॥524॥
या गुणांनी आपल्या बळाने तीन प्रकारचे शिक्के देऊन द्रव्यपदार्थ स्वाधीन करून घेतले आहेत, 524
525-18
एवं सत्वरजतमा । तिहीची एवढी असे महिमा । जे त्रैविध्य आदी ब्रह्मा । अंती कृमी ॥525॥
याप्रमाणे सत्व, रज व तम या तीन गुणांचे एवढे सामर्थ्य आहे की, त्यांनी ब्रह्मदेवापासून किटका पर्यंत तीन भेद केले आहेत. 525
526-18
परी विश्वींची आघवी मांदी । जेणे भेदलेनि गुणभेदी । पडिली ते तव आदी । ज्ञान सांगो ॥526॥
परंतु हे सर्व विश्व ज्याच्या योगाने या तीन गुणांच्या सपाट्यात सापडले ते ज्ञान तुला अगोदर सांगतो. 526
527-18
जे दिठी जरी चोख कीजे । तरी भलतेही चोख सुजे । तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे । सर्वही शुद्ध ॥527॥
कारण दृष्टी शुद्ध झाली म्हणजे पाहिजे त्या पदार्थाचे स्वरूप समजते; त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता सर्व पदार्थाचे शुद्ध स्वरूप कळते. 527
528-18
म्हणौनि ते सात्विक ज्ञान । आता सांगो दे अवधान । कैवल्यगुणनिधान । श्रीकृष्ण म्हणे ॥528॥
म्हणून सात्त्विक ज्ञान आता तुला सांगतो, लक्ष दे, असे कैवल्यगुणनिधान भगवान श्रीकृष्ण म्हणाले. 528

सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते ।
अविभक्तं विभक्तेषु तज्ञानं विद्धि सात्त्विकम् ॥18. 20॥
529-18
तरी अर्जुना गा ते फुडे । सात्विक ज्ञान चोखडे । जयाच्या उदयी ज्ञेय बुडे । ज्ञातेनिसी ॥529॥
तर अर्जुना, तेच खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय की, ज्याचा उदय झाल्याबरोबर त्यामध्ये ज्ञेय हे ज्ञात्यासह लीन होते. 529
530-18
जैसा सूर्य न देखे अंधारे । सरिता नेणिजती सागरे । का कवळिलिया न धरे । आत्मछाया ॥530॥
ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला पाहू शकत नाही, समुद्राला नद्यांची ओळखही नसते, अथवा आपल्या पडछायेस धरू लागले असता सापडत नाही. 530
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
531-18
तयापरी जया ज्ञाना । शिवादि तृणावसाना । इया भूतव्यक्ति भिन्ना । नाडळती ॥531॥
त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून गवता पर्यंत सर्व व्यक्तीत भिन्नपणा दिसत नाही; 531
532-18
जैसे हाते चित्र पाहाता । होय पाणिये मीठ धुता । का चेवोनि स्वप्ना येता । जैसे होय ॥532॥
भिंतीवरील चित्रे सावरून पाहिले असता, किंवा मीठ धुतले असता जसे होते अथवा जागृत झाल्यावर स्वप्नाची जशी स्थिती होते 532
533-18
तैसे ज्ञाने जेणे । करिता ज्ञातव्याते पाहाणे । जाणता ना जाणणे । जाणावे उरे ॥533॥
तसेच ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने ज्ञेय पाहू गेले असता ज्ञाता, व ज्ञेय ही त्रिपुटी नाहीशी होते; 533
534-18
पै सोने आटूनि लेणी । न काढिती आपुलिया आयणी । का तरंग न घेपती पाणी । गाळूनि जैसे ॥534॥
परंतु ज्ञात्यास जसे सोन्याची परीक्षा करण्याकरिता आपल्या बुद्धीने दागिने आटवून त्यातील सोने काढावे लागत नाही किंवा पाणी घ्यावयाचे असल्यास त्यावरील लाटा गाळून ते घेत नाहीत, 534
535-18
तैसी जया ज्ञानाचिया हाता । न लगेचि दृश्यपथा । ते ज्ञान जाण सर्वथा । सात्विक गा ॥535॥
तसा सर्व दृश्य वस्तूंच्या ठिकाणी ज्या ज्ञानाला भेद दिसत नाही, त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असे म्हणतात. 535
536-18
आरिसा पाहो जाता कोडे । जैसे पाहातेचि का रिगे पुढे । तैसे ज्ञेय लोटोनि पडे । ज्ञाताचि जे ॥536॥
आरसा पाहू गेले असता जसे पहाणाराचेच प्रतिबिंब त्यात दिसते, तसेच ज्ञेय लोटून प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी ज्ञाता आपले स्वरूपच पाहतो. 536
537-18
पुढती तेचि सात्विक ज्ञान । जे मोक्षलक्ष्मीचे भुवन । हे असो ऐक चिन्ह । राजसाचे ॥537॥
हेच सातवी ज्ञान मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. हे असो; आता तुला ‘राजस’ ज्ञानाची लक्षणे सांगतो, ती ऐक. 537

पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान्पृथग्विधान् ।
वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ञानं विद्धि राजसम् ॥18. 21॥
538-18
तरी पार्था परीयेस । ते ज्ञान गा राजस । जे भेदाची कास । धरूनि चाले ॥538॥
तर पार्था, तेज ज्ञान राजस होय, की जे भूतमात्रांच्या भेदभाव मानून चालते, समजलास ? 538
539-18
विचित्रता भूताचिया । आपण आंतोनि ठिकरिया । बहु चकै ज्ञातया । आणिली जेणे ॥539॥
ज्या ज्ञानाने भूतमात्रांच्या ठिकाणी अनेकत्व मानून आपल्या ठीकर्‍या(वेगळेपणा) करून घेतल्या आहेत ज्ञात्याला चकवून सोडले आहे; 539
540-18
जैसे साचा रूपाआड । घालूनि विसराचे कवाड । मग स्वप्नाचे काबाड । ओपी निद्रा ॥540॥
ज्याप्रमाणे निद्रा ही स्वरूपाचे आड ज्ञानाचा पडदा घालून मग स्वप्नातील कष्टमय सिथ्ती आणते, 540
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
541-18
तैसे स्वज्ञानाचिये पौळी । बाहेरि मिथ्या मही खळी । तिही अवस्थांचिया वह्याळी । दावी जे जीवा ॥541॥
त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या मंदिराभोवतुन मायेचा पसारा घालून जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांच्या थापा मारून जे जीवास फसविते, 541
542-18
अलंकारपणे झाकले । बाळा सोने का वाया गेले । तैसे नामी रूपी दुरावले । अद्वैत जया ॥542॥
लहान मुलाला दागिन्यांच्या रूपाने सोने दाखविले असता सोन्याची ओळख नसते, तसे नामरुपाच्या भेदामुळे ज्या ज्ञानाला अद्वैत दुरावते; 542
543-18
अवतरली गाडग्या घडा । पृथ्वी अनोळख जाली मूढा । वन्हि जाला कानडा । दीपत्वासाठी ॥543॥
अज्ञान मनुष्याला मातीपासून केलेली मडकी व घागरी ही दाखविली असता त्यास जशी मूळ मातीची ओळख नसते, 543
544-18
का वस्त्रपणाचेनि आरोपे । मूर्खाप्रति तंतु हारपे । नाना मुग्धा पटु लोपे । दाऊनि चित्र ॥544॥
किंवा मूर्ख मनुष्याला वस्त्र दाखविले असता तंतूंची ओळख पटत नाही, अथवा त्यास पडद्यावरील चित्रे दाखविली असता पडद्याची ओळख नसते, 544
545-18
तैशी जया ज्ञाना । जाणोनि भूतव्यक्ती भिन्ना । ऐक्यबोधाची भावना । निमोनि गेली ॥545॥
तसे भूतमात्र भिन्नभिन्न आहे, या समजुतीने ज्या ज्ञानाची ऐक्य बोधाची भावना नाश पावली आहे. 545
546-18
मग इंधनी भेदला अनळु । फुलांवरी परीमळु । का जळभेदे शकलु । चंद्रु जैसा ॥546॥
मग लाकडे पेटल्यावर त्यांच्या आकाराप्रमाणे अग्नी निरनिराळा आहे, चंद्राचा प्रकाश पाण्यात पडल्यामुळे ते हालल्यावर चंद्राचे तुकडे झाले आहेत, 546
547-18
तैसे पदार्थभेद बहुवस । जाणोनि लहानथोर वेष । आतले ते राजस । ज्ञान येथ ॥547॥
तसा नाना प्रकारच्या पदार्थात पुष्कळ भिन्नपणा आहे, अथवा वेषा वरून लहान व मोठा हा भेद आहे या समजुतीने जे भरलेले ज्ञान, ते राजस ज्ञान होय. 547
548-18
आता तामसाचेही लिंग । सांगेन ते वोळख चांग । डावलावया मातंग- । सदन जैसे ॥548॥
आता, गावाबाहेर असणाऱ्या मांगाचे घर टाळण्याकरता जसे वाटसरास जसे बजावून सांगावे लागते, तशी तामस ज्ञानाची लक्षणे तुला सांगतो, ती पूर्ण ध्यानात ठेव.

यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम् ।
अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम् ॥18. 22॥

548
549-18
तरी किरीटी जे ज्ञान । हिंडे विधीचेनि वस्त्रेहीन । श्रुति पाठमोरी नग्न । म्हणौनि तया ॥549॥
तर अर्जुना, जे ज्ञान विधी रुपी वस्त्र पांघरल्याशिवाय संचार करिते आणि म्हणूनच ते नग्न असल्यामुळे, सर्व शास्त्रांची ‘माता’ जी श्रुती तिला पाठमोरी असते; 549
550-18
येरींही शास्त्र बटिकरी । जे निंदेचे विटाळवरी । बोळविलेसे डोंगरी । म्लेंच्छधर्माच्या ॥550॥
इतर शास्त्रांनीही त्या ज्ञानात बट्टा लावून त्याची निंदा केली असता आपल्यास विटाळ होईल, म्हणून म्लेंच्छ धर्मरूपी डोंगराकडे ज्यांची बोलवण केली, (त्याला वाळीत टाकले.); 550
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
551-18
जे गा ज्ञान ऐसे । गुणग्रहे तामसे । घेतले भवे पिसे । होऊनिया ॥551॥
जे ज्ञान तमोगुणरुपी ब्रह्मराक्षसाचा संचार झाल्यामुळे वेड्याप्रमाणे फिरते; 551
552-18
जे सोयरिके बाधु नेणे । पदार्थी निषेधु न म्हणे । निरोविले जैसे सुणे । शून्यग्रामी ॥552॥
जे शरीरसंबंधाची अडचण बाळगीत नाही; व पदार्थाच्या ठिकाणी निषेधपणा ओळखत नाही; जसे ओसाड गावात सोडले कुत्रे स्वेच्छेने वागते; 552
553-18
तया तोंडी जे नाडळे । का खाता जेणे पोळे । तेचि येक वाळे । येर घेणेचि ॥553॥
त्याच्या तोंडात सापडत नाही अथवा जे खाल्ले असता तोंड भाजते तीच वस्तू ते टाकते, बाकी सर्व वस्तू त्याजपाशी खपतात, 553
554-18
पै सोने चोरिता उंदिरु । न म्हणे थरुविथरु । नेणे मांसखाइरु । काळे गोरे ॥554॥
उंदीर सोन्यासारखी पदार्थ नाश करीत असता चांगले अथवा वाईट हे तो जाणत नाही, अथवा मांस खाणारा हा मांसाचे ठिकाणी काळे व गोरे हा भेद जाणत नाही; 554
555-18
नाना वनामाजी बोहरी । कडसणी जेवी न करी । का जीत मेले न विचारी । बैसता माशी ॥555॥
किंवा रानास वनवा लागल्यावर त्यास जसा कसलाच विचार राहात नाही अथवा प्राणी जिवंत मेलेला याचा विचार न करता माशी वाटेल त्यावर बसते; 555
556-18
अगा वांता का वाढिलेया । साजुक का सडलिया । विवेकु कावळिया । नाही जैसा ॥556॥
अरे कावळ्यास जसे अन्न ओकलेले किंवा वाढलेले, साजूक किंवा सडलेले हा विचार नसतो, 556
557-18
तैसे निषिद्ध सांडूनि द्यावे । का विहित आदरे घ्यावे । हे विषयांचेनि नांवे । नेणेचि जे ॥557॥
तसे अपवित्र वस्तूचा त्याग करावा, अथवा शास्त्रांत सांगितलेल्या गोष्टींचा आदराने स्वीकार करावा, हे विषयांच्या भरात जे ज्ञान जाणत नाही, 557
558-18
जेतुले आड पडे दिठी । तेतुले घेचि विषयासाठी । मग ते स्त्री-द्रव्य वाटी । शिश्नोदरा ॥558॥
जी जी वस्तू दृष्टीस पडेल, त्या त्या वस्तूचा उपभोग घेते; आणि मग स्त्री असल्यास शिश्नास व द्रव्य असल्यास उदरास वाटून देते; 558
559-18
तीर्थातीर्थ हे भाख । उदकी नाही सनोळख । तृषा वोळे तेचि सुख । वाचूनिया ॥559॥
उदकाच्या ठिकाणी हे तीर्थ किंवा हे अपवित्र ही ज्यास ओळख नसते, परंतु त्यापासून तहान भागते एवढेच सुख जे मानते, 559
560-18
तयाचिपरी खाद्याखाद्य । न म्हणे निंद्यानिंद्य । तोंडा आवडे ते मेध्य । ऐसाचि बोधु ॥560॥
त्याचप्रमाणे भक्ष्य व निंद्यानिंद्य यांचा जे विचार करीत नाही, परंतु आपल्यास जे आवडेल तेच पवित्र आहे, असा ज्याचा निश्चय झालेला असतो, 560
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
561-18
आणि स्त्रीजात तितुके । त्वचेंद्रियेचि वोळखे । तियेविषयी सोयरिके । एकचि बोधु ॥561॥
आणि स्त्रीजात म्हणून जेवढी आहे तीजविषयी भोग्य विषय एवढीच त्याची ओळख आहे व तिच्या ठिकाणी आप्तपणा करण्याविषयी जे तत्पर असते; 561
562-18
पै स्वार्थी जे उपकरे । तयाचि नाम सोयिरे । देहसंबंधु न सरे । जिये ज्ञानी ॥562॥
हे पहा, आपल्याला जे उपयोगी पडतील तेच आपले सोयरे आहेत, व देह संबंध ज्यांच्याशी झालेले आहेत, ते सोयरे आहेत असा बोध नाही, अशी ज्या ज्ञानाची समजूत असते, 562
563-18
मृत्यूचे आघवेचि अन्न । आघवेचि आगी इंधन । तैसे जगचि आपले धन । तामसज्ञाना ॥563॥
मृत्यूला सगळेच आपले खाद्य आहे असे वाटते, अग्नीला सगळेच इंधन वाटते, तसे या तामस ज्ञानाला सर्व जगत हे आपले धन आहे असे वाटते. 563
564-18
ऐसेनि विश्व सकळ । जेणे विषयोचि मानिले केवळ । तया एक जाण फळ । देहभरण ॥564॥
याप्रमाणे सर्व जग हे उपभोगाकरिताच निर्माण केले आहे अशी ज्या ज्ञानाची समजूत झालेली आहे, त्यास भरणा शिवाय दुसरा पुरुषार्थच नसतो; 564
565-18
आकाशपतिता नीरा । जैसा सिंधुचि येक थारा । तैसे कृत्यजात उदरा- । लागिचि बुझे ॥565॥
आकाशातून पडलेल्या पाण्यास समुद्र हा एक जसा थारा आहे, त्याप्रमाणे जे ज्ञान कोणतेही कृत्य केले तरी ते पोटासाठीच आहे असे समजते; 565
566-18
वाचूनि स्वर्गु नरकु आथी । तया हेतु प्रवृत्ति निवृत्ती । इये आघवियेचि राती । जाणिवेची जे ॥566॥
स्वर्ग किंवा नरक यांच्या प्राप्तीकरीता विहित व निषिद्ध आचरण हेच कारण होय, या जाणिवेची ज्या ज्ञानाला मुळीच ओळख नसते; 566
567-18
जे देहखंडा नाम आत्मा । ईश्वर पाषाणप्रतिमा । ययापरौती प्रमा । ढळो नेणे ॥567॥
देहाच्या तुकड्यासच आत्मा हे नाव आहे व ईश्वर ही दगडाचीच मूर्ती आहे यापलीकडे ज्याच्या बुद्धीची धाव नसते; 567
568-18
म्हणे पडिलेनि शरीरे । केलेनिसी आत्मा सरे । मा भोगावया उरे । कोण वेषे । ॥568॥
आणि ते असे म्हणते की, हे शरीर पडल्यावर आत्मा केलेल्या कर्मा सह नाश पावतो; मग कर्माची फळे भोगावयास या मृत्यूलोकी कोणत्या रूपाने आत्मा राहातो ? 568
569-18
ना ईश्वरु पाहाता आहे । तो भोगवी हे जरी होये । तरी देवचि खाये । विकूनिया ॥569॥
किंवा पाहू गेल्यास ईश्वर आहे असे दिसत नाही, तथापि तो कर्माची फळे भोगवीतो म्हणून जर म्हणावे, तर एखादा देवाच्या सोन्यारूप्याच्या मूर्ती विकून खातो त्याची वाट काय ? 569
570-18
गावीचे देवळेश्वर । नियामकचि होती साचार । तरी देशीचे डोंगर । उगे का असती ? ॥570॥
गावातील प्रमुख देव जर कर्माबद्दल शासन करतील म्हणावे, तर त्या मूर्तीच्या ज्या डोंगरातील दगडांच्या तयार केलेल्या असतात, ते डोंगर स्वस्थ का बसतात. 570
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
571-18
ऐसा विपाये देवो मानिजे । तरी पाषाणमात्रचि जाणिजे । आणि आत्मा तव म्हणिजे । देहातेचि ॥571॥
याप्रमाणे कदाचित देव आहे असे मानले, तरी तो दगडाचीच मूर्ती आहे असे समजते आणि आत्मा म्हणजे देहच आहे असे समजते. 571
572-18
येरे पापपुण्यादिके । ते आघवेचि करोनि लटिके । हित मानी अग्निमुखे । चरणे जे का ॥572॥
याशिवाय पाप किंवा पुण्य ही सर्व लटकी आहेत अग्नि पेटल्यावर पुढे येणार्‍या सर्व जिनसांचे भक्षण करतो, त्याप्रमाणे जी जी गोष्ट भोगण्यास मिळेल, तिचा भोग घेण्यातच हित आहे असेही समजते 572
573-18
जे चामाचे डोळे दाविती । जे इंद्रिये गोडी लाविती । तेचि साच हे प्रतीती । फुडी जया ॥573॥
चर्मचक्षूंनी जे जे पदार्थ दृष्टीस पडतील व इंद्रिये ज्या विषयांची गोडी लावतील, त्याच गोष्टी खर्‍या आहेत असा त्याचा पक्का अनुभव आहे, 573
574-18
किंबहुना ऐसी प्रथा । वाढती देखसी पार्था । धूमाची वेली वृथा । आकाशी जैसी ॥574॥
किंबहुना पार्था, आकाशात धुराचे लोट व्यर्थ जातात, त्याप्रमाणे ज्याची बुद्धी अशा रीतीने वाढतच जाते; 574
575-18
कोरडा ना वोला । उपेगा आथी गेला । तो वाढोनि मोडला । भेंडु जैसा ॥575॥
बरुंतील भेंड कोरडे किंवा ओले असले तरी मोठे वाढल्यावरही कशाच्या उपभोगास येत नाही, 575
576-18
नाना उंसांची कणसे । का नपुंसके माणुसे । वन लागले जैसे । साबरीचे ॥576॥
अथवा उसास आलेली कणसे किंवा नपुंसक मनुष्य अथवा निवडुंगाचे वन, ही सर्व जशी निरुपयोगी आहेत; 576
577-18
नातरी बाळकाचे मन । का चोराघरीचे धन । अथवा गळास्तन । शेळियेचे ॥577॥
अथवा बालकाचे मन जसे चंचल असते किंवा चोरांनी चोरून आणलेली धन जसे त्याला राजरोस वापरता येत नाही, अथवा शेळीचे गळ्यात असणारी स्तन जसे निरुपयोगी असतात, 577
578-18
तैसे जे वायाणे । वोसाळ दिसे जाणणे । तयाते मी म्हणे । तामस ज्ञान ॥578॥
तसे ते निरर्थक व ओशाळलेले ज्ञान त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो. 578
579-18
तेही ज्ञान इया भाषा । बोलिजे तो भावो ऐसा । जात्यंधाचा का जैसा । डोळा वाडु ॥579॥
त्यालाही ज्ञानाचा शब्दाने वर्णन करण्याचा अभिप्राय हाच कि, मनुष्य जन्मांध असला तरी त्याच्या डोळ्यांचे वर्णन करू लागले असता त्याचे डोळे मोठे आहेत, असे विरुद्ध आर्थाने म्हणतो 579
580-18
का बधिराचे नीट कान । अपेया नाम पान । तैसे आडनांव ज्ञान । तामसा तया ॥580॥
किंवा बहिऱ्याचे कान काय मोठे आहेत, असे त्यास ऐकू येत नसतानाही वाखाणतो अथवा न पिण्याच्या अपवित्र वस्तूस आपण पान (पिण्याची वस्तू) असे म्हणतो, तसे या तामस ज्ञानाला ज्ञान हे आडनाव होय ! 580
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
581-18
हे असो किती बोलावे । तरी ऐसे जे देखावे । ते ज्ञान नोहे जाणावे । डोळस तम ॥581॥
हे असो; आणखी किती वर्णन करावे तर ? तर असे हे ज्ञान त्यास ज्ञान न समजता प्रत्यक्ष डोळस तमोगुणच समजावे. 581
582-18
एवं तिही गुणी । भेदले यथालक्षणी । ज्ञान श्रोतेशिरोमणी । दाविले तुज ॥582॥
याप्रमाणे, हे श्रोतृश्रेष्ठा, तीन गुणांनी भेद पावलेले जे ज्ञान, त्याची यथार्थ लक्षणे तुला सांगितली. 582
583-18
आता याचि त्रिप्रकारा । ज्ञानाचेनि धनुर्धरा । प्रकाशे होती गोचरा । कर्तयाच्या क्रिया ॥583॥
हे धनुर्धरा, आता याच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया उघड दिसतात. 583
584-18
म्हणौनि कर्म पै गा । अनुसरे तिही भागा । मोहरे जालिया वोघा । तोय जैसे ॥584॥
म्हणून पाण्याला जिकडे लावावे तिकडे जसे ते जाते, तसे कर्म हे ज्ञानाच्या तीन भागांनी निरनिराळे घडते. 584
585-18
तेचि ज्ञानत्रयवशे । त्रिविध कर्म जे असे । तेथ सात्विक तव ऐसे । परीसे आधी ॥585॥
तेच ज्ञानाच्या अनुरोधाने जे तीन प्रकारचे कर्म होते, त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे प्रथम ऐक. 585

नियतं संगरहितमरागद्वेषतः कृतम् ।
अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥18. 23॥
586-18
तरी स्वाधिकाराचेनि मार्गे । आले जे मानिले आंगे । पतिव्रतेचेनि परीष्वंगे । प्रियाते जैसे ॥586॥
तर पतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पतीस जसे आलिंगन देते, तसे आपल्या अधिकारानुरूप आपल्यास उक्त असेल, ते कर्म जो आचरण करितो; 586
587-18
सांवळ्या आंगा चंदन । प्रमदालोचनी अंजन । तैसे अधिकारासी मंडण । नित्यपणे जे ॥587॥
सावळ्या रंगाच्या शरीरास जसे चंदन शोभते व स्त्रियांच्या नेत्रास जसे अंजन शोभा देते, तसेच अधिकारानुरूप नित्य आचरण केले असता भूषण होय, 587
588-18
ते नित्य कर्म भले । होय नैमित्तिकी सावाइले । सोनयासि जोडले । सौरभ्य जैसे ॥588॥
ते नित्य कर्म करीत असून त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली असता, सोन्याच्या दागिन्यास सुगंधाने शोभा येते, त्याप्रमाणे होय 588
589-18
आणि आंगा जीवाची संपत्ती । वेचूनि बाळाची करी पाळती । परी जीवे उबगणे हे स्थिती । न पाहे माय ॥589॥
जशी शरीराने, जीवन व संपत्ती ने माता आपल्या बालकाचे रक्षण करते, तरी तिला कंटाळा आला असे कधी वाटत नाही, 589
590-18
तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी । परी फळ न सूये दिठी । उखिती क्रिया पैठी । ब्रह्मीचि करी ॥590॥
तसे सर्वपरि कर्माचे अनुष्ठान फळाची इच्छा न धरिता करितो व ते सर्व कर्म ब्रह्मार्पण करितो; 590
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
591-18
आणि प्रिय आलिया स्वभावे । शंबळ उरे वेचे ठाउवे । नव्हे तैसे सत्प्रसंगे करावे । पारुषे जरी ॥591॥
आणि आपला प्रिय पती घरी आल्यावर त्याच्या भोजनाच्या समयी आपल्यास जिन्नस उरेल किंवा संपेल हे जसे पतीव्रतेच्या लक्षात सुद्धा येत नाही, तसे कर्म करीत असता साधुजन घरी आल्यावर त्याचे आदरातिथ्य करण्यात वेळ मोडून जरी कर्म राहिले, 591
592-18
तरी अकरणाचेनि खेदे । द्वेषाते जीवी न बांधे । जालियाचेनि आनंदे । फुंजो नेणे ॥592॥
तरी तो कर्म करण्याचे राहिले, असा खेद मनास होऊ देत नाही व रागावत नाही, ते कर्म शेवटास गेले असतानाही जो आनंदाने गर्व मानीत नाही; 592
593-18
ऐसेऐसिया हातवटिया । कर्म निफजे जे धनंजया । जाण सात्विक हे तया । गुणनाम गा ॥593॥
या युक्तीने जे कर्म होते, त्याला अर्जुना, सात्विक कर्म म्हणतात, हे नाव त्यांच्या गुणामुळे त्यास प्राप्त होते, असे समज. 593
594-18
ययावरी राजसाचे । लक्षण सांगिजेल साचे । न करी अवधानाचे । वाणेपण ॥594॥
यापुढे राजस कर्माचे खरे स्वरूप तुला सांगतो, ते ऐकण्यास हयगय करू नको. 594

यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः ।
क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् ॥18. 24॥
595-18
तरी घरी मातापितरा । धड बोली नाही संसारा । येर विश्व भरी आदरा । मूर्खु जैसा ॥595॥
तर घरी मातापितरे असून त्यांच्याशी जो संसारात गोड भाषणही करत नाही, परंतु मुर्खाप्रमाणे जगातील सर्व लोकांचे आदरातिथ्य करितो; 595
596-18
का तुळशीचिया झाडा । दुरूनि न घापे सिंतोडा । द्राक्षीचिया तरी बुडा । दूधचि लाविजे ॥596॥
किंवा तुळसीच्या झाडास दुरून शिंतोडा पडू देत नाही, कारण त्यापासून फळ किंवा पुष्प यांची प्राप्ती नाही; परंतु द्राक्षाच्या झाडास दुध घालतो, 596
597-18
तैसी नित्यनैमित्तिके । कर्मे जिये आवश्यके । तयांचेविषयी न शके । बैसला उठू ॥597॥
त्याप्रमाणे आवश्यक अशी जी नित्यनैमित्तिक कर्मे, त्यांचे आचरण करण्याविषयी जो बसल्या जागेवरून उठत सुद्धा नाही, 597
598-18
येरा काम्याचेनि तरी नांवे । देह सर्वस्व आघवे । वेचितांही न मनवे । बहु ऐसे ॥598॥
एऱ्हवी काम्यकर्माविषयी सर्व देह जरी झिजला, तरी त्यास शीण येत नाही. (थोडकेच केले असे मानतो). 598
599-18
अगा देवढी वाढी लाहिजे । तेथ मोल देता न धाइजे । पेरिता पुरे न म्हणिजे । बीज जेवी ॥599॥
अरे, वाढीदिढीच्या व्यापारांत पैसे करण्यास ज्याची तृप्ती होत नाही व जमिनीत धान्य पेरू लागल्यावर कितीही पेरले तरी त्याला पुरेसे वाटत नाही; 599
600-18
का परीसु आलिया हाती । लोहालागी सर्वसंपत्ती । वेचिता ये उन्नती । साधकु जैसा ॥600॥
किंवा परीस हाती आल्यावर तो लोखंडाचे सोने करण्याकरीता तयार केलेले सोने विकून लोखंडच खरेदी करतो, 600
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
601-18
तैसी फळे देखोनि पुढे । काम्यकर्मे दुवाडे । करी परी ते थोकडे । केलेही मानी ॥601॥
त्याप्रमाणे फलावर आशा ठेवून कठीण अशी काम्यकर्मे पुष्कळ करतो. परंतु ती थोडीच केली असे मानतो. 601
602-18
तेणे फळकामुके । यथाविधी नेटके । काम्य कीजे तितुके । क्रियाजात ॥602॥
याप्रमाणे फळाची इच्छा धरून, काम्यकर्मे जितकी असतील, इतकी यथाविधि करतो 602
603-18
आणि तयाही केलियाचे । तोंडी लावी दौंडीचे । कर्मी या नांवपाटाचे । वाणे सारी ॥603॥
आणि केलेल्या कर्माची आपल्या तोंडाने वाखाणणी करीतो व ‘ मी मोठा कर्मठ आहे ‘ या नावाची ख्याती चोहीकडे पसरवितो. 603
604-18
तैसा भरे कर्माहंकारु । मग पिता अथवा गुरु । ते न मनी काळज्वरु । औषध जैसे ॥604॥
त्या पुरुषांमध्ये असा कर्म अहंकार भरतो की, काळ ज्वर जसा कोणत्याच औषधाला जुमानीत नाही, तसा तो पिता आणि गुरू यांचीही पर्वा करीत नाही. 604
605-18
तैसेनि साहंकारे । फळाभिलाषिये नरे । कीजे गा आदरे । जे जे काही ॥605॥
तशा कर्माभिमानी फळाभिलाशी पुरुषाकडून हे जे काही कर्म मोठ्या आदराने केले जाते, 605
606-18
परी तेही करणे बहुवसा । वळघोनि करी सायासा । जीवनोपावो का जैसा । कोल्हाटियांचा ॥606॥
ते ते पुष्कळ आयासानेही केलेले कर्म कोल्हाट्याच्या उपजीविकेसाठी केलेल्या कर्माप्रमाणे नुसते कष्टाला कारण होते. 606
607-18
एका कणालागी उंदिरु । आसका उपसे डोंगरु । का शेवाळोद्देशे दर्दुरु । समुद्रु डहुळी ॥607॥
एका कणाकरिता उंदीर जसा डोंगर पोखरतो, अथवा शेवाळाच्या प्राप्तीकरीता बेडूक समुद्र ढवळतो; 607
608-18
पै भिकेपरते न लाहे । तऱ्ही गारुडी सापु वाहे । काय कीजे शीणुचि होये । गोडु येका ॥608॥
भिक्षे शिवाय दुसरी काही प्राप्ति न होता गारुडी जसे सापाचे ओझी वाहतो; काय करावे ! या लोकांना खटपटत प्रिय आहे. 608
609-18
हे असो परमाणूचेनि लाभे । पाताळ लंघिती वोळंबे । तैसे स्वर्गसुखलोभे । विचंबणे जे ॥609॥
हे असो; एका कणाच्या आशेकरिता वाळवी ही पाताळापर्यंत खोल खणते, त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या प्राप्तीकरीता जे श्रम करणे. 609
610-18
ते काम्य कर्म सक्लेश । जाणावे येथ राजस । आता चिन्ह परिस । तामसाचे ॥610॥
तेच क्लेशयुक्त काम्यकर्म राजस आहे असे जाणावे. आता तामस कर्माचे लक्षण सांगतो, ते ऐक. 610
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

अनुबन्धं क्षयं हिंसामनपेक्ष्य च पौरुषम् ।
मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥18. 25॥
611-18
तरी ते गा तामस कर्म । जे निंदेचे काळे धाम । निषेधाचे जन्म । सांच जेणे ॥611॥
जे निंदेचे काळे(पापमय) घराच होय आणि ज्याच्या योगे निषेधाच्या जन्माचे सार्थक झाले आहे, ते तामस कर्म होय. 611
612-18
जे निपजविल्यापाठी । काहीच न दिसे दिठी । रेघ काढलिया पोटी । तोयाचे जेवी ॥612॥
जशी पाण्यावर काढलेली रेघ दुसऱ्याचक्षणी दिसत नाही, त्याप्रमाणे जे कर्म केल्यानंतर उत्तरक्षणी त्याचे काहीच स्वरूप दिसत नाही, 612
613-18
का कांजी घुसळलिया । का राखोंडी फुंकलिया । काही न दिसे गाळिलिया । वाळुघाणा ॥613॥
किंवा ताकाची निवळ घुसळली असता जसे लोणी निघत नाही, किंवा सोनाराच्या घरातल्या राखेशिवाय इतर ठिकाणची राख फुंकत बसले असता जसे सोन्याचे कण वगैरे काही सापडत नाहीत, अथवा वाळू घाण्यात घातली असता जसे तिजपासून तेल किंवा पेंड काहीच उत्पन्न होत नाही, 613
614-18
नाना उपणिलिया भूंस । का विंधिलिया आकाश । नाना मांडिलिया पाश । वारयासी ॥614॥
अथवा भूस उपणपने किंवा आकाशात बाण मारीत बसणे अथवा वाऱ्यास धरण्याकरिता फांस टाकणे, 614
615-18
हे आवघेंचि जैसे । वांझे होऊनि नासे । जे केलिया पाठी तैसे । वायाचि जाय ॥615॥
या गोष्टी ज्याप्रमाणे करून निष्फळ आहेत, त्याप्रमाणे ज्या कर्माचे आचरण करूनही व्यर्थ होते; 615
616-18
येऱ्हवी नरदेहाही येवढे । धन आटणीये पडे । जे कर्म निफजविता मोडे । जगाचे सुख ॥616॥
एऱ्हवी नरदेह एवढेही अमूल्य धन खर्ची पडून जे कर्म होते, त्याच्या योगाने जगाला सुख न देता दुःख मात्र होते. 616
617-18
जैसा कमळवनी फांसु । काढिलिया कांटसु । आपण झिजे नाशु । कमळा करी ॥617॥
ज्याप्रमाणे कमळे काढण्याकरिता त्यावर काट्यांचा फास टाकून ओढला असता आपल्यास श्रम होऊन कमळाचाहि नाश होतो; 617
618-18
का आपण आंगे जळे । आणि नागवी जगाचे डोळे । पतंगु जैसा सळे । दीपाचेनि ॥618॥
किंवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करून त्यावर झडप घालतो आणि स्वतः नाश पाहून जगालाही अंधार करितो, 618
619-18
तैसे सर्वस्व वाया जावो । वरी देहाही होय घावो । परी पुढिलां अपावो । निफजविजे जेणे ॥619॥
त्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया जाऊन देहाला श्रम जरी झाले, तरी दुसऱ्यास ज्या कर्मापासून अपाय होतो, 619
620-18
माशी आपणयाते गिळवी । परी पुढीला वांती शिणवी । ते कश्मळ आठवी । आचरण जे ॥620॥
माशी ही स्वतःला गीळविते, (पोटात जाऊन स्वतः मरते) पण दुसऱ्याला वांति करून शिणविते, तशा प्रकारचे जे आचरण ते सदोष आहे असे तू लक्षात ठेव. 620
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
621-18
तेही करावयो दोषे । मज सामर्थ्य असे की नसे । हेही पुढील तैसे । न पाहता करी ॥621॥
बरे, तेही कर्म करण्याचे आपल्यात सामर्थ्य आहे किंवा नाही, यापुढील विचार तर करावा पण तसे काही न करता कर्म करू लागतो; 621
622-18
केवढा माझा उपावो । करिता कोण प्रस्तावो । केलियाही आवो । काय येथ ॥622॥
माझा केवढा प्रयत्न व त्याचा मी केवढा पसारा मांडला आहे, आणि तो केल्यापासून मला काय प्राप्ती होणार आहे, 622
623-18
इये जाणिवेची सोये । अविवेकाचेनि पाये । पुसोनिया होये । साटोप कर्मी ॥623॥
या विचाराला अविवेकाच्या पायाखाली तुडवून टाकतो, आणि त्या कर्माबद्दल अभिमान बाळगतो; 623
624-18
आपला वसौटा जाळुनी । बिसाटे जैसा वन्ही । का स्वमर्यादा गिळोनि । सिंधु उठी ॥624॥
अग्नि ज्या वेळूपासून उत्पन्न होतो, ती आपली रहाण्याची जागा (वेळूंचे बेट) जाळून पसरतो, अथवा आपली मर्यादा सोडून समुद्र वाढला, 624
625-18
मग नेणे बहु थोडे । न पाहे मागे पुढे । मार्गामार्ग येकवढे । करीत चाले ॥625॥
म्हणजे मग लहान किंवा मोठी वस्तू यांचा विचार न करिता व मागेपुढे न पाहता पवित्र व अपवित्र वस्तू एकत्र करून चालतो; 625
626-18
तैसे कृत्याकृत्य सरकटित । आपपर नुरवित । कर्म होय ते निश्चित । तामस जाण ॥626॥
तसे योग्य-अयोग्य एके ठिकाणी रगडून आपले व दुसऱ्याचे हा भेद असे उरू देत नाही, ते तामस कर्म असे समज. 626
627-18
ऐसी गुणत्रयभिन्ना । कर्माची गा अर्जुना । हे केली विवंचना । उपपत्तीसी ॥627॥
याप्रमाणे अर्जुना, गुणांच्या भिन्नपणाने कर्म तीन प्रकारचे कसे झाले हे तुला दाखवल्यास स्पष्ट करून सांगितले. 627
628-18
आता ययाचि कर्मा भजता । कर्माभिमानिया कर्ता । तो जीवुही त्रिविधता । पातला असे ॥628॥
आता या कर्माचा अभिमान बाळगून त्याचे आचरण करणारा जो जीव, तो याचे योगाने तीन प्रकारचा झाला आहे. 628
629-18
चतुराश्रमवशे । एकु पुरुषु चतुर्धा दिसे । कर्तया त्रैविध्य तैसे । कर्मभेदे ॥629॥
ज्याप्रमाणे, एकाच पुरुषावर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, व संन्यास या चार आश्रमांच्या योगे चार अवस्था दिसतात, त्याचप्रमाणे कर्माचा भेदाने कर्त्याला तीन अवस्था येतात. 629
630-18
तरी तया तिही आंतु । सात्विक तव प्रस्तुतु । सांगेन दत्तचित्तु । आकर्णी तू ॥630॥
तर त्या तिहींपैकी सात्विक अवस्थेचे प्रथम वर्णन करतो, ते पूर्ण लक्ष देऊन ऐक. 630
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

मुक्त सङ्गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः ।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥18. 26॥
631-18
तरी फळोद्देशे सांडिलिया । वाढती जेवी सरळिया । शाखा का चंदनाचिया । बावन्नया ॥631॥
ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील चंदनाच्या फांद्या फळाची इच्छा न धरिता सरळ वाढतात, तथापि त्या झाडाच्या सर्व भागांस उत्तम सुवासच असतो; 631
632-18
का न फळताही सार्थका । जैसिया नागलतिका । तैसिया करी नित्यादिका । क्रिया जो का ॥632॥
किंवा नागवेल न फळताही सार्थकी लागतो, नागवेल लाजरी फळ येत नाही तरी तिची पानेच उपयोगी पडतात, त्याप्रमाणे जी सर्वतोपरी उत्तम आहेत, त्या नित्यनैमित्तिक कर्मांच्या फळांची इच्छा न धरता जो त्यांचे आचरण करतो, 632
633-18
परी फळशून्यता । नाही तया विफळता । पै फळासीचि पंडुसुता । फळे कायिसी । ॥633॥
पण त्याला फळशून्य असे म्हणू नये; कारण त्या कर्माला विफलता नाहीच म्हणून अर्जुना, फळाला फळे कुठून येणार ? 633
634-18
आणि आदरे करी बहुवसे । परी कर्ता मी हे नुमसे । वर्षाकाळीचे जैसे । मेघवृंद ॥634॥
आणि ती कर्मे आदराने करितो पण कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाहीत; ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ समुदाय काही गर्जना न करिता वृष्टी करितात, 634
635-18
तेवीचि परमात्मलिंगा । समर्पावयाजोगा । कर्मकलापु पै गा । निपजावया ॥635॥
त्याप्रमाणे परमात्म्याला अर्पण करण्यास योग्य होतील अशी कर्मे करण्याकरिता, 635
636-18
तया काळाते नुलंघणे । देशशुद्धिही साधणे । का शास्त्रांच्या वाती पाहणे । क्रियानिर्णयो ॥636॥
काळाची मर्यादा न सोडता, देहशुद्धी साधून कर्माच्या योग्यायोग्यतेचा निर्णय शास्त्ररूप दिव्याने पाहतो- कर्माच्या योग्यायोग्यतेचा निर्णय शास्त्रानुरोधे करितो. 636
637-18
वृत्ति करणे येकवळा । चित्त जावो न देणे फळा । नियमांचिया सांखळा । वाहणे सदा ॥637॥
इंद्रिये व वृत्ती यांचे ऐक्य करून फळाकडे चित्तास न जाऊ देता, जो नियमांची बेडी पायात बाळगतो, 637
638-18
हा निरोधु साहावयालागी । धैर्याचिया चांगचांगी । चिंतवणी जिती आंगी । वाहे जो का ॥638॥
ही अट सहन करण्याकरिता उत्तम प्रकारचे धैर्य आपल्या अंगी असावे, अशा विषयी जो आपल्या मनात जिवंत चिंता वाहतो, ( अहोरात्र त्याजविषयी विचार करीत असतो, ) 638
639-18
आणि आत्मयाचिये आवडी । कर्मे करिता वरपडी । देहसुखाचिये परवडी । येवो न लाहे ॥639॥
आणि आत्म्याचे प्राप्तीविषयी कर्म करीत असता देह सुखाच्या नाश याची पर्वा करीत नाही, 639
640-18
आळसा निद्रा दुऱ्हावे । क्षुधा न बाणवे । सुरवाडु न पावे । आंगाचा ठावो ॥640॥
तो आळस व झोप टाकून देतो त्याला भुकेचीही आठवण होत नाही आणि त्यायोगे जो जो सुख आवस्था दूर दूर पळते, 640
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
641-18
तव अधिकाधिक । उत्साहो धरी आगळीक । सोने जैसे पुटी तुक । तुटलिया कसी ॥641॥
तो तो, सोने ज्याप्रमाणे आंचीत घातल्यावर वजनास कमी भरले तरी कसाच जास्त लागते, त्याप्रमाणे कर्म करण्याविषयी नाना प्रकारे अधिकाधिक उत्साह धरतो. 641
642-18
जरी आवडी आथी साच । तरी जीवितही सलंच । आगी घालिता रोमांच । देखिजती सतिये । ॥642॥
जेथे खरोखर प्रीती आहे तेथे जीवितही तुच्छ असते. सहगमन करताना अग्नीत उडी टाकिते समयीही पती प्रेमामुळे पतिव्रता स्त्री च्या अंगावर रोमांच उभे राहतात ! 642
643-18
मा आत्मया येवढीया प्रिया । वालभेला जो धनंजया । देहही सिदता तया । काय खेदु होईल ? ॥643॥
मग अर्जुना आत्मप्राप्ती सारखी प्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला इच्छा झाली आहे, त्याचे शरीरास जरी कष्ट झाले तरी याच खेद होईल काय ? 643
644-18
म्हणौनि विषयसुरवाडु तुटे । जव जव देहबुद्धि आटे । तव तव आनंदु दुणवटे । कर्मी जया ॥644॥
म्हणून विषय सुखेच्छा नाहीशी होऊन जो जो देहाविषयी अभिमान कमी होतो, तो तो कर्म करण्याविषयी त्याला दुप्पट आनंद होतो. 644
645-18
ऐसेनि जो कर्म करी । आणि कोणे एके अवसरी । ते ठाके ऐसी परी । वाहे जरी ॥645॥
याप्रमाणे कर्म करीत असता एखादेवेळी ते कर्म जरी बंद पडले, तरी 645
646-18
तरी कडाडी लोटला गाडा । तो आपणपे न मनी अवघडा । तैसा ठाकलेनिही थोडा । नोहे जो का ॥646॥
गाडा डोंगरावरून आपोआप खाली पडून त्याचे तुकडे झाले तरी जसे त्याला त्याबद्दल अवघड वाटत नाही, तसे कर्म राहिले असता तो यत्किंचितही खेद मानीत नाही, 646
647-18
नातरी आदरिले । अव्यंग सिद्धी गेले । तरी तेही जिंतिले । मिरवू नेणे ॥647॥
अथवा आरंभिलेले कर्म सिद्धीस गेले असतानाही त्याबद्दल प्रतिष्ठा मिरवू जाणत नाही, 647
648-18
इया खुणा कर्म करिता । देखिजे जो पंडुसुता । तयाते म्हणिपे तत्त्वता । सात्विकु कर्ता ॥648॥
अर्जुना, कर्माचे आचरण करीत असता, ही लक्षणे ज्याचे ठिकाणी आढळतील, त्याला निश्चयाने सात्त्विक कर्ता म्हणावे. 648
649-18
आता राजसा कर्तेया । वोळखणे हे धनंजया । जे अभिलाषा जगाचिया । वसौटा तो ॥649॥
हे धनंजया, आता राजस कर्त्याची चिन्हे तुला सांगतो. कारण, जगातील सर्व अभिमानांचे ही माहेरघरच होय. 649

रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः ।
हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ॥18. 27॥
450-18
जैसा गावीचिया कश्मळा । उकरडा होय येकवळा । का स्मशानी अमंगळा । आघवयांची ॥650॥
ज्याप्रमाणे गावातील सर्व घाणेरडे पदार्थ टाकण्याची उकिरडा हे ठिकाण असते, अथवा सर्व अमंगल पदार्थ जसे स्मशानात टाकतात, 650
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
651-18
तया परी जो अशेषा । विश्वाचिया अभिलाषा । पायपाखाळणिया दोषा । घरटा जाला ॥651॥
त्याप्रमाणे वस्तूत: पाहिले असता ही जगांतील सर्व कामाची पाय धुण्याची जागा होय, 651
652-18
म्हणौनि फळाचा लागु । देखे जिये असलगु । तिये कर्मी चांगु । रोहो मांडी ॥652॥
म्हणून ज्या कर्मापासून इच्छित फलप्राप्ती होईल ते कर्म करण्याकडे रोख ठेवतो, 652
653-18
आणि आपण जालिये जोडी । उपखो नेदी कवडी । क्षणक्षणा कुरोंडी । जीवाची करी ॥653॥
आणि संपादन केलेल्या पदार्थांपैकी एका कवडीही खर्च करीत नाही व क्षणोक्षणी त्या पदार्थांवरून आपला जीव ओवाळून टाकतो. 653
654-18
कृपणु चित्ती ठेवा आपुला । तैसा दक्षु पराविया माला । बकु जैसा खुतला । मासेयासी ॥654॥
कृपण मनुष्य आपल्या ठेवीवर जसे नेहमी लक्ष ठेवतो, तसा हा दुसऱ्याचे पदार्थ मिळविण्याविषयी दक्ष असतो. जसा बगळा मासा धरण्याविषयी मोठा तत्पर असतो, 654
655-18
आणि गोवी गेलिया जवळी । झगटलिया अंग फाळी । फळे तरी आंतु पोळी । बोरांटी जैसी ॥655॥
आणि बोरीचे झाड जशी जवळ गेले असता वस्त्र अडकून गुंतविते, दांडगाईने काढू लागल्यावर अंगास ओरखडते व तिची फळे पाहू गेले असता त्यात काही सार नाही, 655
656-18
तैसे मने वाचा काये । भलतया दुःख देतु जाये । स्वार्थु साधिता न पाहे । पराचे हित ॥656॥
तसे काया-वाचा-मने करून जो दुसऱ्यास दुःख देतो व आपले हित साधण्याकरिता दुसऱ्याचे हिताकडे लक्ष देत नाही; 656
657-18
तेवीचि आंगे कर्मी । आचरणे नोहे क्षमी । न निघे मनोधर्मी । अरोचकु ॥657॥
तसेच स्वतः जे कर्म आरंभिले ते निरंतर चालविण्याचा नेम नसतो व त्या कर्माविषयी ज्याच्या मनात कंटाळा येत नाही, 657
658-18
कनकाचिया फळा । आंतु माज बाहेरी मौळा । तैसा सबाह्य दुबळा । शुचित्वे जो ॥658॥
धोत्र्याच्या फळास जशी आतून भूल व बाहेरून काटे असतात, तसा जो शुचित्वाविषयी अंतर्बाह्य दरिद्री असतो; 658
659-18
आणि कर्मजात केलिया । फळ लाहे जरी धनंजया । तरी हरिखे जगा यया । वांकुलिया वाये ॥659॥
आणि अर्जुना, केलेल्या कर्माची फळ प्राप्ती झाली असता त्या आनंदाच्या भरात दुसऱ्यासं वेडावून दाखवितो, 659
660-18
अथवा जे आदरिले । हीनफळ होय केले । तरी शोके तेणे जिंतिले । धिक्कारो लागे ॥660॥
अथवा आरंभिलेले कर्म फलद्रूप न झाले म्हणजे शोकाने त्या कर्माचा धिक्कार करतो; 660
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
661-18
कर्मी राहाटी ऐसी । जयाते होती देखसी । तोचि जाण त्रिशुद्धीसी । राजस कर्ता ॥661॥
अशा रीतीने कर्माविषयी ज्याची वागणूक दृष्टीस पडेल तो राजस कर्ता होय, असे खचित खचित समज. 661
662-18
आता यया पाठी येरु । जो कुकर्माचा आगरु । तोही करू गोचरु । तामस कर्ता ॥662॥
आता यानंतर वाईट कर्माची खाणच असा जो तामस कर्ता, याची लक्षणे तुला कळतील, अशी सांगतो. 662

अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः ।
विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ॥18. 28॥
663-18
तरी मिया लागलिया कैसे । पुढील जळत असे । हे नेणिजे हुताशे । जियापरी ॥663॥
आपल्या स्पर्शामुळे समोर येणारी जिन्नस कसे जळतात हे जसे अग्नीस समजत नाही, 663
664-18
पै शस्त्रे मिया तिखटे । नेणिजे कैसेनि निवटे । का नेणिजे काळकूटे । आपुले केले ॥664॥
अथवा आपल्या धारेने दुसऱ्याचा जीव कसा जातो, हे जसे शस्त्राला समजत नाही; किंवा आपल्या योगे दुसऱ्याचा नाश कसा होतो हे काळकुट विषाला समजत नाही, 664
665-18
तैसा पुढीलया आपुलया । घातु करीत धनंजया । आदरी वोखटिया । क्रिया जो का ॥665॥
तसा हे धनंजया, ज्या क्रियेने आपला व दुसऱ्याचा नाश होईल, अशा वाईट क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो; 665
666-18
तिया करिताही वेळी । काय जाले हे न सांभाळी । चळला वायु वाहटुळी । चेष्टे तैसा ॥666॥
ज्याप्रमाणे वावटळ सुटल्यावर वायू हवा तसा वाहतो, त्याप्रमाणे ती कर्मे करतेवेळी, यात काय लाभ झाला याची तो काळजी बाळगीत नाही, 666
667-18
पै करणिया आणि जया । मेळु नाही धनंजया । तो पाहुनी पिसेया । कैची त्राय ? ॥667॥
हे बघ अर्जुना, ज्याच्या कृतीला व इच्छेला काही मिळत नसतो, असल्या तामस कर्त्याला पाहून त्याचे पुढे वेड्याची काय किंमत आहे ? 667
668-18
आणि इंद्रियांचे वोगरिले । चरोनि राखे जो जियाले । बैलातळी लागले । गोचिड जैसे ॥668॥
आणि बैलाचे कासरे गोचीड अगदी चिटकून राहतात, तसे इंद्रियांनी दिलेले भोग भोगून जो आपले जीवित रक्षण करतो, 668
669-18
हांसया रुदना वेळु । नेणता आदरी बाळु । राहाटे उच्छृंखळु । तयापरी ॥669॥
ज्याप्रमाणे लहान मुलास हासण्यास व रडण्यास वेळ लागत नाही, त्याप्रमाणे ज्याचा कृतीत काही मिळत नसतो; 669
670-18
जो प्रकृती आंतलेपणे । कृत्याकृत्यस्वादु नेणे । फुगे केरे धालेपणे । उकरडा जैसा ॥670॥
प्रकृतीचे आधीन असल्यामुळे काय करावे व काय न करावे याविषयी ज्याला ज्ञान नसते व केराने जसा उकिरडा फुगतो, तसा जो कुकर्माचा तृप्तीने फुगलेला असतो; 670
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
671-18
म्हणौनि मान्याचेनि नांवे । ईश्वराही परी न खालवे । स्तब्धपणे न मनवे । डोंगरासी ॥671॥
म्हणून गर्वाच्या भरांत ईश्वरास ही नम्र होत नाही व ताठ्याने डोंगराला ही तुच्छ करतो; 671
672-18
आणि मन जयाचे विषकल्लोळी । राहाटी फुडी चोरिली । दिठी कीर ते वोली । पण्यांगनेची ॥672॥
ज्याचे मन म्हणजे केवळ विषयांच्या लाटा होत; ज्याचे आचरण नेहमी चोरटे, वरकांती दिसण्यात चांगले पण अंतर्यामी दुसऱ्याचा घात करणारे आणि दृष्टी केवळ वेश्यांच्या मालिकेप्रमाणे दिसण्यात गोड पण दुसऱ्याचे सर्वस्व हरण करणारी होय; 672
673-18
किंबहुना कपटाचे । देहचि वळिले तयाचे । ते जिणे की जुंवाराचे । टिटेघर ॥673॥
किंबहुना ज्याचा सर्व देह कपटाचाच बनलेला आहे, व त्याचे आयुष्य जुगाराचे वाईट कृत्याचे माहेरघरच होय; 673
674-18
नोहे तयाचा प्रादुर्भावो । तो साभिलाष भिल्लांचा गावो । म्हणौनि नये येवो जावो । तया वाटा ॥674॥
त्याची प्रसन्नता म्हणजे केवळ अभिलाषरूप भिल्लाचे गावच होय म्हणून त्या वाटेने कोणीही जाऊ नये. 674
675-18
आणि आणिकांचे निके केले । विरु होय जया आले । जैसे अपेय पया मिनले । लवण करी ॥675॥
आणि दुसर्‍याचे चांगले झालेले पाहून ज्या स्वैर उत्पन्न होते, ज्याप्रमाणे दुधात मीठ मिळाले असता ते पिण्यास अयोग्य होते; 675
676-18
का हींव ऐसा पदार्थु । घातलिया आगीआंतु । तेचि क्षणी धडाडितु । अग्नि होय ॥676॥
अथवा कितीही थंड पदार्थ जर अग्नित घातला तर तो अग्नी उलट त्याच क्षणी धडाडतो, 676
677-18
नाना सुद्रव्ये गोमटी । जालिया शरीरी पैठी । होऊनि ठाती किरीटी । मळुचि जेवी ॥677॥
किंवा अर्जुना, कितीही उत्तम पदार्थ असेल तरी त्याप्रमाणे ते पोटात गेले म्हणजे त्यांचा मलच होतो, 677
678-18
तैसे पुढिलाचे बरवे । जयाच्या भीतरी पावे । आणि विरुद्धचि आघवे । होऊनि निगे ॥678॥
त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले याने ऐकिले केले किंवा पाहिले तर ते त्याला सहन न होऊन तो उलट निंदा करू लागतो. (त्याला वाईट वाटते) 678
679-18
जो गुण घे दे दोख । अमृताचे करी विख । दूध पाजलिया देख । व्याळु जैसा ॥679॥
सर्पास दूध पाजले तरी ज्याप्रमाणे त्याचे विषच होते, त्याप्रमाणे दुसऱ्याचे गुण ऐकल्याबरोबर जो त्याच दुर्गुण मानतो; 679
980-18
आणि ऐहिकी जियावे । जेणे परत्रा साच यावे । ते उचित कृत्य पावे । अवसरी जिये ॥680॥
आणि इहलोकी कीर्ती होवून ज्याचे योगाने परलोक ही मिळेल असे कृत्य ज्यावेळेस प्राप्त होईल; 680
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
681-18
तेव्हा जया आपैसी । निद्रा ये ठेविली ऐसी । दुर्व्यवहारी जैसी । विटाळे लोटे ॥681॥
त्यावेळेस त्याला हटकून झोप ठेवल्याप्रमाणे येते; आणि वाईट कर्माचे वेळेस तीच झोप विटाळशी सारखी दूर राहते. 681
682-18
पै द्राक्षरसा आम्ररसा । वेळे तोंड सडे वायसा । का डोळे फुटती दिवसा । डुडुळाचे ॥682॥
हे पहा, द्राक्षांच्या किंवा आंब्याच्या दिवसात ज्याप्रमाणे कावळ्यास मुखरोग होतो, किंवा घुबडाचे डोळे ज्याप्रमाणे दिवसात फुटतात, 682
683-18
तैसा कल्याणकाळु पाहे । तै तयाते आळसु खाये । ना प्रमादी तरी होये । तो म्हणे तैसे ॥683॥
त्याप्रमाणे कल्याण होण्याची वेळ आली असता म्हणजे सत्संगती किंवा सत्शास्त्र अशी वेळ आली असता श्रवणाची वेळ आली असता त्याच्यावरच लोटतो, आणि अन्यायाचे कर्म करण्याचे वेळी तोच आळस त्याचे हुकुमात वागतो. 683
684-18
जेवीचि सागराच्या पोटी । जळे अखंड आगिठी । तैसा विषादु वाहे गाठी । जिवाचिये जो ॥684॥
जसा समुद्राची पोटात अग्नी(वडवानळ) अखंड जळत असतो, तसा याच्या अंतकरणात दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही, असा विशाद असतो. 684
685-18
लेंडोराआगी धूमावधि । का अपाना आंगी दुर्गंधि । तैसा जो जीवितावधि । विषादे केला ॥685॥
लेंड्यांचे विस्तवात जसा धूरच असतो किंवा अपानद्वाराने निघणारा वायू जसा दुर्गंधयुक्त असतो, तशी जन्मभर विषादाची गाठ ज्याच्या जीवाशी असते (विषयात मनात बाळगतो) 685
686-18
आणि कल्पांताचिया पारा । वेगळेही जो वीरा । सूत्र धरी व्यापारा । साभिलाषा ॥686॥
आणि अर्जुना, कल्पांताच्याही पलीकडे, लाभ होईल, अशा कल्पनेने व्यापाराला आरंभ करतो; 686
687-18
अगा जगाही परौती । शुचा वाहे पै चित्ती । करिता विषी हाती । तृणही न लगे ॥687॥
अरे, जगातील जे लोक व्यापार करीत नाहीत, ते करण्याविषयी मनात इच्छा धरून कर्म करतो, परंतु ज्यापासून तृणाचाही लाभ त्यास होत नाही, 687
688-18
ऐसा जो लोकाआंतु । पापपुंजु मूर्तु । देखसी तो अव्याहतु । तामसु कर्ता ॥688॥
असा जो लोकांमध्ये मूर्तिमंत पापाची राशीत होय, तो नि:संशय तामस कर्त जाण. 688
689-18
एवं कर्म कर्ता ज्ञान । या तिहीचे त्रिधा चिन्ह । दाविले तुज सुजन । चक्रवर्ती ॥689॥
याप्रमाणे अर्जुना, तुला कर्म, कर्ता व ज्ञान या तिन्हीची त्रिविध लक्षणे सांगितली. 689

बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु ।
प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ॥18. 29॥
690-18
आता अविद्येचिया गावी । मोहाची वेढूनि मदवी । संदेहाची आघवी । लेऊनि लेणी ॥690॥
आता अज्ञानरूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयरुपी सर्व अलंकार घालून, 690
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
691-18
आत्मनिश्चयाची बरव । जया आरिसा पाहे सावयव । तिये बुद्धीचीही धाव । त्रिधा असे ॥691॥
आत्मनिश्चयाचा चांगलेपणाचा ज्या बुद्धीरूप आरशात स्पष्ट दिसतो, त्या बुद्धीचे तीन प्रकार आहेत, 691
692-18
अगा सत्वादि गुणी इही । कायी एक तिही ठायी । न कीजेचि येथ पाही । जगामाजी ॥692॥
अर्जुना, अरे ! या सत्व-रज-तम गुणांनी जगांतील कोणत्या वस्तूचे तीन प्रकार केले नाहीत ? 692
693-18
आगी न वसता पोटी । कवण काष्ठ असे सृष्टी । तैसे ते कैचे दृश्यकोटी । त्रिविध जे नोहे ॥693॥
पोटात अग्नी नाही असे या सृष्टीत कोणते लाकूड आहे ? त्याप्रमाणे जिचे तीन प्रकार नाहीत, अशी दृश्य वस्तुत कोणती वस्तू आहे ? 693
694-18
म्हणौनि तिही गुणी । बुद्धी केली त्रिगुणी । धृतीसिही वांटणी । तैसीचि असे ॥694॥
म्हणून या तीन गुणांनी बुद्धीचे तीन प्रकार केले आहेत. तसेच बुद्धीचेही तीन भेद झालेले आहेत. 694
695-18
तेचि येक वेगळाले । यथा चिन्ही अळंकारले । सांगिजैल उपाइले । भेदलेपणे ॥695॥
तेच निरनिराळे भेद त्यांच्या चिन्हासहवर्तमान विस्तारपूर्वक सांगतो. 695
696-18
परी बुद्धि धृति इया । दोही भागामाजी धनंजया । आधी रूप बुद्धीचिया । भेदासि करू ॥696॥
परंतु हे धनंजया, बुद्धी व धृत्ति या दोहोंपैकी अगोदर बुद्धीच्या भेदाची कारणे सांगतो. 696
697-18
तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा । संसारासि गा सुभटा । प्राणिया येतिया वाटा । तिनी आथी ॥697॥
तर हे सुभटा, मनुष्याला या संसारांत येण्यास उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे तीन मार्ग आहेत. 697
698-18
जे अकरणीय काम्य निषिद्ध । ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध । संसारभये सबाध । जीवा यया ॥698॥
ते तीन मार्ग म्हणजे अकरणीय, काम्य व निषिद्ध कर्म हे प्रसिद्ध आहेत आणि प्राणिमात्राला यांच्यापासून संसार भय प्राप्त असते. 698

प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये ।
बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥18. 30॥
699-18
म्हणौनि अधिकारे मानिले । जे विधीचेनि वोघे आले । ते एकचि येथ भले । नित्य कर्म ॥699॥
याकरिता, या लोकी अधिकारसमंत व विधीच्या ओघाने प्राप्त झालेले जे कर्म, ते नित्यकर्म एक उत्तम होय, 699
700-18
तेचि आत्मप्राप्ति फळ । दिठी सूनि केवळ । कीजे जैसे का जळ । सेविजे ताहने ॥700॥
तेच नित्यकर्म आत्मप्राप्ती रूप फळावर दृष्टी ठेवून, तृषा क्रांत मनुष्य जसे अत्यंत आदराने पाणी पितो तसे करावे. 700
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
701-18
येतुलेनि ते कर्म । सांडी जन्मभय विषम । करूनि दे उगम । मोक्षसिद्धि ॥701॥
अशा युक्तीने नित्य कर्म केले असता ते दुस्तर अशा जन्म भयापासून सोडविते आणि मोक्षप्राप्ती सुलभ करून देते. 701
702-18
ऐसे करी तो भला । संसारभये सांडिला । करणीयत्वे आला । मुमुक्षुभागा ॥702॥
अशा रीतीने जो सुज्ञ पुरुष कर्म करतो, तो संसार भयापासून मुक्त होतो वया आचरणाने मुमुक्षत्वाच्या पायरीला येऊन पोहोचतो. (मोक्षमार्गास लागतो) 702
703-18
तेथ जे बुद्धि ऐसा । बळिया बांधे भरवसा । मोक्षु ठेविला ऐसा । जोडेल येथ ॥703॥
या नित्यकर्म वर भरवसा ठेवून ती बुद्धी त्याच्या आचरणात विषयी निश्चय करते, तेथे मोक्षप्राप्ती ठेवलेली आहे, 703
704-18
म्हणौनि निवृत्तीची मांडिली । सूनि प्रवृत्तितळी । इये कर्मी बुडकुळी । द्यावी की ना ? ॥704॥
म्हणून ज्याची निवृत्तीचे पायावर प्रवृत्तीची उभारणी आहे अशा या कर्मांत बुडी का न मारावी ? 704
705-18
तृषार्ता उदके जिणे । का पुरी पडलिया पोहणे । अंधकूपी गति किरणे । सूर्याचेनि ॥705॥
तहानलेल्या मनुष्यास पाणी असल्यावर, पुरात पडलेल्यास पोहता येत असतांना, अंधकारात सूर्याच्या प्रकाशाचे साह्य असल्यावर, 705
706-18
नाना पथ्येसी औषध लाहे । तरी रोगे दाटलाही जिये । का मीना जिव्हाळा होये । जळाचा जरी ॥706॥
अथवा पथ्यासह औषध घेतली असता जसा रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य वाचतो, किंवा माशाला जर पाण्याचा आश्रय असला, 706
707-18
तरी तयाच्या जीविता । नाही जेवी अन्यथा । तैसे कर्मी इये वर्तता । जोडेचि मोक्षु ॥707॥
तर त्याच्या जिवासी असे भय नाही, तसे ह्या नित्य कर्माचे आज केले असता मोक्षप्राप्ती होतेच होते, 707
718-18
हे करणीयाचिया कडे । जे ज्ञान आथी चोखडे । आणि अकरणीय हे फुडे । ऐसे जाण ॥708॥
हे नित्यकर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते, आणि हे बघ, खरोखरच योग्य नव्हतं, 708
709-18
जी तिथे काम्यादिके । संसारभयदायके । अकृत्यपणाचे आंबुखे । पडिले जया ॥709॥
अशी जी काम्यादिक कर्मे, जी संसारभय उत्पन्न करतात व ज्यांच्यावर निषिद्ध पणाचा शिक्का आहे, 709
710-18
तिये कर्मी अकार्यी । जन्ममरणसमयी । प्रवृत्ति पळवी पायी । मागिलीचि ॥710॥
त्या अनाचारणीय व जन्ममरणदायक अशा वाईट कर्मांपासून जो आपली प्रवृत्ती मागल्या पायीच पळवितो; 710
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
711-18
पै आगीमाजी न रिघवे । अथावी न घालवे । धगधगीत नागवे । शूळ जेवी ॥711॥
अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, खोल पाण्यात जशी उडी घालवत नाही, व तापून लाल झालेला सूळ जसा हातात धरवत नाही, 711
712-18
का काळियानाग धुंधुवातु । देखोनि न घालवे हातु । न वचवे खोपेआंतु । वाघाचिये ॥712॥
अथवा फुसकारे टाकीत असलेला काळा नाग दिसत असला म्हणजे त्यास हात घालवत नाही व ज्याप्रमाणे वाघाच्या जाळीत कोणी जाऊ शकत नाही, 712
713-18
तैसे कर्म अकरणीय । देखोनि महाभय । उपजे निःसंदेह । बुद्धी जिये ॥713॥
त्याप्रमाणे निषिद्ध कर्म पाहूनच ज्या बुद्धीत निश्चयकरून भय उत्पन्न होते, 713
714-18
वाढिले रांधूनि विखे । तेथे जाणिजे मृत्यु न चुके । तेवी निषेधी का देखे । बंधाते जे ॥714॥
विष घालून तयार केलेले अन्न खाल्ले असता मरण चूकता नाही, असे निषिद्ध कर्मांचे आचरण केले असता जन्ममृत्यू चुकत नाही. 714
715-18
मग बंधभयभरिती । तिये निषिद्धी प्राप्ती । विनियोगु जाणे निवृत्ती । कर्माचिये ॥715॥
मग निषिद्ध कर्मांचे आचरण केले असता जन्म मृत्यूचे भय प्राप्त होते असे समजून जी बुद्धी त्याचा त्याग करते; 715
716-18
ऐसेनि कार्याकार्यविवेकी । जे प्रवृत्ति निवृत्ति मापकी । खरा कुडा पारखी । जियापरी ॥716॥
रत्नपारखी खऱ्याखोट्याचा निर्णय करितो, तसा कार्य व अकार्य यांच्याविषयी प्रवृत्तीनिवृत्ती रुप मापाने जी निर्णय करिते; 716
717-18
तैसी कृत्याकृत्यशुद्धी । बुझे जे निरवधी । सात्विक म्हणिपे बुद्धी । तेचि तू जाण ॥717॥
तसेच, ज्या बुद्धीला चांगले व वाईट हे स्पष्ट समजते, ती सात्त्विक बुद्धी होय असे समज. 717

यया धर्ममधर्मं च कार्यं चाकार्यमेव च ।
अयथावत्प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी ॥18. 31॥
718-18
आणि बकाच्या गावी । घेपे क्षीरनीर सकलवी । का अहोरात्रींची गोवी । आंधळे नेणे ॥718॥
आणि बगळ्यांच्या गावात जसे दूध व पाणी एकत्र घेतले जाते; किंवा आंधळा ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांच्यामधील भेद जाणत नाही; 718
719-18
जया फुलाचा मकरंदु फावे । तो काष्ठे कोरू धावे । परी भ्रमरपणा नव्हे । अव्हांटा जेवी ॥719॥
ज्या भ्रमराला अतिशय कोमल अशा फुलांचा मकरंद सेवन करता येतो; तोच लाकूडही करण्यास प्रवृत्त होतो; परंतु याचा भ्रमर पणा काही नष्ट होत नाही, 719
720-18
तैसी इये कार्याकार्ये । धर्माधर्मरूपे जिये । तिये न चोजविता जाये । जाणती जे का ॥720॥
त्याप्रमाणे धर्म-अधर्म रूपाने असणारी जी कार्याकार्ये, त्यांची निवड न करिता जी बुद्धि त्यांचे आचरण करीते, 720
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
721-18
अगा डोळांवीण मोतिये । घेता पाडु मिळे विपाये । न मिळणे ते आहे । ठेविले तेथे ॥721॥
अरे, परीक्षेशिवाय मोती घेतला असता किंचित चांगली मिळतीलच असा नेम नाही; पण चांगली मिळणार नाहीत ही गोष्ट मात्र निश्चित आहे; 721
722-18
तैसे अकरणीय अवचटे । नोडवे तरीच लोटे । येऱ्हवी जाणे एकवटे । दोन्ही जे का ॥722॥
तसे निषिद्ध कर्म सहाजिकपणे प्राप्त न झाले तरच रहाते, एरवी जेथे चांगले व वाईट ही दोन्ही कर्मे सरसकटच मानले जातात; 722
723-18
ते गा बुद्धि चोखविषी । जाण येथ राजसी । अक्षत टाकिली जैसी । मांदियेवरी ॥723॥
जसे सर्व समाजात योग्य व अयोग्य यांचा विचार न करता आमंत्रण द्यावे, तसे चांगल्या व वाईट कर्माविषयी जी अंध बुद्धी ती राजस बुद्धी होय. 723

अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता ।
सर्वार्थान्विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी ॥18. 32॥
724-18
आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडव होये । का राक्षसा दिवो पाहे । राती होऊनि ॥724॥
आणि राजा ज्या मार्गांनी जातो, ते चोरास जसे आडमार्ग होत, (राजमार्ग जसे चोरांच्या उपयोगी नाहीत, ) तेव्हा राक्षसाला रात्री जसे उजाडते; 724
725-18
नाना निधानचि निदैवा । होये कोळसयाचा उडवा । पै असते आपणपे जीवा । नाही जाले ॥725॥
अथवा धनाचा ठेवा असून भाग्यहीनाला जशी ती कोळशांची रास दिसते; म्हणून धन जवळ असतांना त्याला नाही सारखे होते, 725
726-18
तैसे धर्मजात तितुके । जिये बुद्धीसी पातके । साच ते लटिके । ऐसेचि बुझे ॥726॥
तसे, शास्त्रांत सांगितलेल्या सर्व मार्गांचे आचरण करणे हे ज्या बुद्धीला घातक वाटते व खऱ्या गोष्टी खोट्या भासतात; 726
727-18
ते आघवेचि अर्थ । करूनि घाली अनर्थ । गुण ते ते व्यवस्थित । दोषचि मानी ॥727॥
जी शास्त्रांचा खरा अर्थ टाकून उलट अर्थ करिते व जे गुण म्हणून आहेत, त्या सर्वास दोष मानते; 727
728-18
किंबहुना श्रुतिजाते । अधिष्ठूनि केले सरते । तेतुलेही उपरते । जाणे जे बुद्धी ॥728॥
किंबहुना श्रुतीस मान्य असलेल्या ज्या गोष्टी त्याही सर्व बुद्धीला विपरीत भासतात; 728
729-18
ते कोणातेही न पुसता । तामसी जाणावी पंडुसुता । रात्री काय धर्मार्था । साच करावी । ॥729॥
त्या बुद्धीला अर्जुना, कोणालाही न विचारता, बेलाशक तामसी म्हणावे. हे पहा, दानधर्माला रात्र उचित आहे काय ? 729
730-18
एवं बुद्धीचे भेद । तिन्ही तुज विशद । सांगितले स्वबोध- । कुमुदचंद्रा ॥730॥
याप्रमाणे आत्मज्ञानरुप कमळाला विकसित करणाऱ्या चंद्रा अर्जुना, तुला बुद्धीचे तीन भेद स्पष्ट करून सांगितले. 730
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
731-18
आता ययाचि बुद्धिवृत्ती । निष्टंकिला कर्मजाती । खांदु मांडिजे धृती । त्रिविधा तया ॥731॥
आता, याच बुद्धीला कर्म करण्याविषयी जेव्हा निश्चय होतो, तेव्हा तिला धृती अशी संज्ञा प्राप्त होते व तिचे तीन प्रकार आहेत. 731
732-18
तिये धृतीचेही विभाग । तिन्ही यथालिंग । सांगिजती चांग । अवधान देई ॥732॥
त्या धृतीच्याही तीन प्रकारांची लक्षणे स्पष्टपणे सांगतो तिकडे लक्ष दे. 732

धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः ।
योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥18. 33॥
733-18
तरी उदेलिया दिनकरु । चोरीसि थोके अंधारु । का राजाज्ञा अव्यवहारु । कुंठवी जेवी ॥733॥
सूर्योदय होताच जसा चौर्यकर्मासह अंधकार नाहीसा होतो, किंवा राजाज्ञा झाली असता कुव्यवहार बंद पडतो, 733
734-18
नाना पवनाचा साटु । वाजीनलिया नीटु । आंगेसी बोभाटु । सांडिती मेघ ॥734॥
किंवा वारा एकसारखा सपाट्याने वाहू लागला म्हणजे मेघ हे आपल्या गर्जनासह नाहीतसे होतात, 734
735-18
का अगस्तीचेनि दर्शने । सिंधु घेऊनि ठाती मौने । चंद्रोदयी कमळवने । मिठी देती ॥735॥
अथवा अगस्ती ऋषीं च्या दर्शनाने समुद्राच्या गर्जना बंद पडतात, किंवा चंद्रोदय झाल्यावर सूर्य विकासिनी कमळे आपोआप मिटतात; 735
736-18
हे असो पावो उचलिला । मदमुख न ठेविती खाला । गर्जोनि पुढा जाला । सिंहु जरी ॥736॥
फार काय सांगावे ? गर्जना करून सिंह पुढे आला मदोन्मत्त हत्तीलादेखील उचललेला पायाखाली ठेवण्याचे सुचत नाही, 736
737-18
तैसा जो धीरु । उठलिया अंतरु । मनादिके व्यापारु । सांडिती उभी ॥737॥
तसे सात्विक धैर्य उत्पन्न झाले असता मन prअnअv, प्राण व इंद्रिये यांचे व्यापार जागच्याजागी बंद पडतात, 737
738-18
इंद्रिया विषयांचिया गाठी । अपैसया सुटती किरीटी । मन मायेच्या पोटी । रिगती दाही ॥738॥
अर्जुना, इंद्रिये व विषय यांचा स्नेह आपोआप सुटतो आणि ती घाबरून आपली आई जे मन त्याच्या पोटात शिरतात. 738
739-18
अधोर्ध्व गूढे काढी । प्राण नवांची पेंडी । बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजी ॥739॥
प्राणाचे जी 9 प्रकारचे भेद आहेत, ते सर्व मोडून व एकत्र करून त्यात सुषुम्ना नाडीच्या कोठडीत अडकवून टाकिते; 739
740-18
संकल्पविकल्पांचे लुगडे । सांडूनि मन उघडे । बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे ॥740॥
मनाचे संकल्प-विकल्प रुपी वस्त्र फेडून मन उघडे करिते आणि मग बुद्धी मनाच्या मागे स्वस्त बसते, 740
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
741-18
ऐसी धैर्यराजे जेणे । मन प्राण करणे । स्वचेष्टांची संभाषणे । सांडविजती ॥741॥
याप्रमाणे जो धैर्यराज, मन, प्राण व इंद्रिये यांच्या स्वकीय चेष्ठांची भाषणे बंद पाडितो; 741
742-18
मग आघवीचि सडी । ध्यानाच्या आंतुल्या मढी । कोंडिजती निरवडी । योगाचिये ॥742॥
मग सर्वाचा घेऊन त्यास व्यानाच्या आतल्या कोठडीत युक्तीने कोंडून टाकतो; 742
743-18
परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जव हाती । तव लांचु न घेता धृती । धरिजती जिया ॥743॥
परंतु चक्रवर्ती जो परमात्मा, त्याच्या ताब्यात त्यात देईपर्यंत त्याजपासून लांच न घेता त्यांना जो धैर्यराज सोडीत नाही. 743
744-18
ते गा धृती येथे । सात्विक हे निरुते । आईक अर्जुनाते । श्रीकांतु म्हणे ॥744॥
लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात; असे जे धैर्य, ते केवळ सात्विक धैर्य होय, असे समज. 744

यया तु धर्मकामार्थान्धृत्या धारयतेऽर्जुन ।
प्रसङ्गेन फलाकाङ्क्षी धृतिः सा पार्थ राजसी ॥18. 34॥
745-18
आणि होऊनिया शरीरी । स्वर्गसंसाराच्या दोही घरी । नांदे जो पोटभरी । त्रिवर्गोपाये ॥745॥
आणि शरीर हेच माझे स्वरूप असे मानून जो स्वर्ग व संसार या दोहोत धर्म, अर्थ व काम या तीन उपायांनी आनंदाने वास करतो; 745
746-18
तो मनोरथांच्या सागरी । धर्मार्थकामाच्या तारुवावरी । जेणे धैर्यबळे करी । क्रिया-वणिज ॥746॥
तो मनोरथ सागरात धर्मार्थकामरूपी नौकेवर ज्या धैर्यबळाने कर्माचा व्यापार करीत, 746
747-18
जे कर्म भांडवला सूये । तयाची चौगुणी येती पाहे । येवढे सायास साहे । जया धृती ॥747॥
जे कर्मरुपी भांडवल घातले असता त्याचा चौपट फायदा येतो असे मानून ज्या धैर्याने सहास कर्म करतो, 747
748-18
ते गा धृती राजस । पार्था येथ परीयेस । आता आइक तामस । तिसरी जे का ॥748॥
त्या धैर्यास अर्जुना, राजस धैर्य असे म्हणतात. ता तिसर्‍या तामस धैर्याची लक्षणे सांगतो ती ऐक. 748

यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च ।
न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी ॥18. 35॥
749-18
तरी सर्वाधमे गुणे । जयाचे का रूपा येणे । कोळसा काळेपणे । घडला जैसा ॥749॥
जसा कोळसा हा काळेपणाने घडलेला असतो, त्याप्रमाणे त्याचे स्वरूप सर्व अधम गुणांनी भरलेले असते अधर्म. 749
750-18
अहो प्राकृत आणि हीनु । तयाही की गुणत्वाचा मानु । तरी न म्हणिजे पुण्यजनु । राक्षसु काई ? ॥750॥
अहो, प्राकृत (जड) आणि हीन असा असूनही त्याला गुण हे मोठे नाव देण्याचे प्रयोजन काय ? 750
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
751-18
पै ग्रहांमाजी इंगळु । तयाते म्हणिजे मंगळु । तैसा तमी धसाळु । गुणशब्दु हा ॥751॥
सर्व ग्रहात जो इंगळ (निखाऱ्याप्रमाणे ताप देणारा) त्यालाही मंगळ म्हणत नाहीत काय ? तसा तमाला गुण हा ढसाळ हा (साधरण) शब्द आहे. 751
752-18
जे सर्वदोषांचा वसौटा । तमचि कामऊनि सुभटा । उभारिला आंगवठा । जया नराचा ॥752॥
हे सुभटा अर्जुना, सर्व दोषांचे वसतिस्थान जो तमोगुण, तो कमवून त्या नराची मूर्ती बनवली आहे: 752
753-18
तो आळसु सूनि असे कांखे । म्हणौनि निद्रे कही न मुके । पापे पोषिता दुःखे । न सांडिजे जेवी ॥753॥
ज्याप्रमाणे पापांचे पोषण केले असता दुःख सोडीत नाही, त्याप्रमाणे तो काखेत आळस बाळगून असतो; म्हणून निद्रा त्याला कधी सोडत नाही, 753
754-18
आणि देहधनाचिया आवडी । सदा भय तयाते न सांडी । विसंबू न सके धोंडी । काठिण्य जैसे ॥754॥
आणि ज्याप्रमाणे दगडापासून कठीणपणा कधी दूर होत नाही, त्याप्रमाणे देहरूप धनावर त्याची नेहमी अत्यंत प्रीति असल्यामुळे त्याला भव्य सोडत नाही; 754
755-18
आणि पदार्थजाती स्नेहो । बांधे म्हणौनि तो शोके ठावो । केला न शकेपाप जावो । कृतघ्नौनि जैसे ॥755॥
आणि कृतघ्न मनुष्याचे पाप जाण्याविषयी कितीही खटपट केली असता जसे ते जात नाही, तसे पदार्थमात्राच्या ठिकाणी; प्रीती ठेवल्यामुळे तो शोकाचे राहण्याचे ठिकाण होतो; 755
756-18
आणि असंतोष जीवेसी । धरूनि ठेला अहर्निशी । म्हणौनि मैत्री तेणेसी । विषादे केली ॥756॥
आणि रात्रंदिवस असंतोष आपल्या जीवाशी बांधून ठेवला असल्यामुळे विषादाने ज्याच्याशी मैत्री केली आहे 756
757-18
लसणाते न सांडी गंधी । का अपथ्यशीळाते व्याधी । तैसी केली मरणावधी । विषादे तया ॥757॥
लसुनाची घाण जशी त्याजपासून दूर होत नाही, किंवा कुपथ्य करणाऱ्या मनुष्याला व्याधी सोडीत नाही, त्याप्रमाणे विषादाने त्याचबरोबर आजन्म मैत्री केलेली असते; 757
758-18
आणि वयसा वित्तकामु । ययाचा वाढवी संभ्रमु । म्हणौनि मदे आश्रमु । तोचि केला ॥758॥
आणखी तारुण्य, वित्त व काम यांचा जो गर्व वाहतो, म्हणून त्याच्या ठिकाणी मदही वास करतो; 758
759-18
आगीते न सांडी तापु । सळाते जातीचा सापु । का जगाचा वैरी वासिपु । अखंडु जैसा ॥759॥
अग्नीला जशी तप्तता सोडीत नाही, जातिवंत साप जसा आपला डाव धरण्याचा स्वभाव सोडत नाही अथवा भय हे जसे सर्व जगाचे वैरी असून त्याला सोडत नाही; 759
760-18
नातरी शरीराते काळु । न विसंबे कवणे वेळु । तैसा आथी अढळु । तामसी मदु ॥760॥
अथवा काळ हा शरीराला कधीही विसरत नाही, तसा तमोगुणाच्या ठिकाणी मद अखंड असतो. 760
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
761-18
एवं पांचही हे निद्रादिक । तामसाच्या ठाई दोख । जिया धृती देख । धरिले आहाती ॥761॥
याप्रमाणे निद्रा, भय, शोक, विशाद व मद हे पाच तमाचे दोष ज्या धैर्याने धारण केले आहेत, 761
762-18
तिये गा धृती नांवे । तामसी येथ हे जाणावे । म्हणितले तेणे देवे । जगाचेनी ॥762॥
त्याला धैर्याला तामस धैर्य असे म्हणतात, असे जगन्नायक भगवान श्रीकृष्ण बोलले. 762
763-18
एवं त्रिविध जे बुद्धि । कीजे कर्मनिश्चयो आधि । तो धृती या सिद्धि । नेइजो येथ ॥763॥
याप्रमाणे तीन प्रकारच्या बुद्धीने जो कर्माचा निश्चय केला. तो धैर्य शेवटास नेते. 763
764-18
सूर्ये मार्गु गोचरु होये । आणि तो चालती कीर पाये । परी चालणे ते आहे । धैर्ये जेवी ॥764॥
सूर्य उगवल्यावर मार्ग दिसू लागला त्यावरून मनुष्य पायांनी चालतो, परंतु चालनाराणे आणि धैर्य धारण केल्याशिवाय चालणे होत नाही, 764
765-18
तैसी बुद्धि कर्माते दावी । ते करणसामग्री निफजवी । परी निफजावया होआवी । धीरता जे ॥765॥
त्याप्रमाणे बुद्धी ही कर्माला दाखविते ते कर्म इंद्रिये उत्पन्न करितात, परंतु उत्पन्न होण्याला जे धैर्य लागते, 765
766-18
ते हे गा तुजप्रती । सांगीतली त्रिविध धृती । यया कर्मत्रया निष्पत्ती । जालिया मग ॥766॥
ते धैर्य तुला तीन प्रकारांनी सांगितले; आणि त्याच धैर्यामुळे तीन प्रकारचे कर्म उत्पन्न झाले. 766
767-18
येथ फळ जे एक निफजे । सुख जयाते म्हणिजे । तेही त्रिविध जाणिजे । कर्मवशे ॥767॥
मग त्याला जे फळ येते व ज्याला सुख अशी संज्ञा आहे, तेही कर्माप्रमाणे तीन प्रकारचे आहे, 767
768-18
तरी फळरूप ते सुख । त्रिगुणी भेदले देख । विवंचू आता चोख । चोखी बोली ॥768॥
तर फळरूप जे सुख, ते तीन गुणांनी निरनिराळे केलेले आहे. त्याचा आता स्पष्ट भाषणांनी विचार करू. 768
769-18
परी चोखी ते कैसी सांगे । पै घेवो जाता बोलबगे । कानीचियेही लागे । हातीचा मळु ॥769॥
ते स्पष्ट असे सांगेन म्हणशील तर शब्दाच्या मार्गाने सांगण्यास गेले असता शब्दांचा मळ त्याला लागतो व कर्ण द्वारा श्रवण केले असता, कर्णरोग हाताचा मळ त्याला लागतो. 669
770-18
म्हणौनि जयाचेनि अव्हेरे । अवधानही होय बाहिरे । तेणे आइक हो आंतरे । जीवाचेनि जीवे ॥770॥
म्हणून शब्दाचा व अवधानाचा अव्हेर करुन ते केवळ अंत:करणाने श्रवण कर. 770
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
771-18
ऐसे म्हणौनि देवो । त्रिविधा सुखाचा प्रस्तावो । मांडला तो निर्वाहो । निरूपित असे ॥771॥
असे बोलून देवांनी त्रिविध सुखाचे वर्णन करण्या विषयी प्रस्तावना केली, तीच व्यवस्था मी सांगतो, 771

सुखं त्विदानी त्रिविधं शृणु मे भरतर्षभ ।
अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छति ॥18. 36॥
772-18
म्हणे सुखत्रयसंज्ञा । सांगो म्हणौनि प्रतिज्ञा । बोलिलो ते प्राज्ञा । ऐक आता ॥772॥
भगवान म्हणतात:- हे बुद्धिमंता अर्जुना, सुखाचे तीन रूपे गुणांच्या योगाने आहेत म्हणून तुला जे म्हटले होते ती सांगतो, ऐक. 772
773-18
तरी सुख ते गा किरीटी । दाविजेल तुज दिठी । जे आत्मयाचिये भेटी । जीवासि होय ॥773॥
हे किरीटी, जीवाला आत्म्याची भेट होती त्यावेळेस जो आनंद होतो, त्याला सुख असे म्हणावे. ते सुख तुला समजेल असे सांगतो. 773
774-18
परी मात्रेचेनि मापे । दिव्यौषध जैसे घेपे । का कथिलाचे कीजे रुपे । रसभावनी ॥774॥
जसे उत्तम औषध मात्रेच्या प्रमाणाने सेवन करावे अथवा रसाचे पुटे देऊन जसे कथलाचे रूपे करावे 774
775-18
नाना लवणाचे जळु । होआवया दोनि चार वेळु । देऊनि सांडिजती ढाळु । तोयाचे जेवी ॥775॥
किंवा मिठाचे पाणी करणे असल्यास ज्याप्रमाणे त्याजवर दोन-चारवेळ पाणी घालावे लागते, 775
776-18
तेवी जालेनि सुखलेशे । जीवु भाविलिया अभ्यासे । जीवपणाचे नासे । दुःख जेथे ॥776॥
त्याप्रमाणे सुखाचा यत्किंचित लाभ झाला असता तोचा अभ्यास पुढे वाढवून जीवदशेचे दुःख जेथे नाहीसे होते; 776
777-18
ते येथ आत्मसुख । जाले असे त्रिगुणात्मक । तेही सांगो एकैक । रूप आता ॥777॥
ते आत्मसुखहि गुणांच्या योगाने तीन प्रकारचे झाले आहे, त्या एकेकाची लक्षणे तुला सांगतो. 777

यत्तदग्रे विषमिव परिणामेऽमृतोपमम् ।
तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥18. 37॥
778-18
आता चंदनाचे बूड । सर्पी जैसे दुवाड । का निधानाचे तोंड । विवसिया जेवी ॥778॥
आता चंदनाचे बुड सर्पामुळे जसे भयंकर झालेले दिसते अथवा द्रव्याच्या ठेव्यावर जसा ब्रह्मराक्षसादिकाचा प्रतिबंध असतो; 778
779-18
अगा स्वर्गीचे गोमटे । आडव यागसंकटे । का बाळपण दासटे । त्रासकाळे ॥779॥
अरे, स्वर्गीचे उत्तम भोग मिळविण्यास प्रथम जसे यज्ञाचे महत्त्व कट महत्संकट आहे, किंवा बालदशेमध्ये मुलांचा सर्वस्वी त्रास सहन करावा लागतो 779
780-18
हे असो दीपाचिये सिद्धी । अवघड धू आधी । नातरी तो औषधी । जिभेचा ठावो ॥780॥
हे राहो, पण दिवा लावणे झाल्यास प्रथम विस्तव पेटविण्यास जसा धुराचा त्रास सोसावा लागतो, किंवा औषधाचा कडवटपणा जिभेस सोसावा लागतो, 780
781-18
तयापरी पांडवा । जया सुखाचा रिगावा । विषम तेथ मेळावा । यमदमांचा ॥781॥
त्याप्रमाणे अर्जुना, आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्याकरिता यमदामादिक साधनांचे दुःख सोसावे लागते. 781
782-18
देत सर्वस्नेहा मिठी । आगी ऐसे वैराग्य उठी । स्वर्ग संसारा काटी । काढितचि ॥782॥
देहादिकांवरील प्रीतीचा त्रास करणारे असे अग्नीप्रमाणे तीव्र वैराग्य जेव्हा उत्पन्न होईल, तेव्हा ते स्वर्ग व संसार यांचे कुंपण उपटून टाकते. 782
783-18
विवेकश्रवणे खरपुसे । जेथ व्रताचरणे कर्कशे । करिता जाती भोकसे । बुद्ध्यादिकांचे ॥783॥
तीव्र अशा ज्ञानाचे श्रवण व कठोर व्रताचरण करताना जिथे बुद्धी इत्यादिकांचे वाभाडे निघतात; 783
784-18
सुषुम्नेचेनि तोंडे । गिळिजे प्राणापानाचे लोंढे । बोहणियेसीचि येवढे । भारी जेथ ॥784॥
सुषुम्ना नाडीच्या तोंडाने प्राण व अपान या वायूचा रोध करावा लागतो. याप्रमाणे सुरवातीस देते महत्कष्ट आहेत; 784
785-18
जे सारसांही विघडता । होय वोहाहूनि वस्त काढिता । ना भणंगु दवडिता । भाणयावरुनी ॥785॥
चक्रवाक पक्षांच्या जोड्याची ताटातूट केली असता अथवा गाईला पान्हा फुटल्यावर कासेपासून वासरास माघारी ओढले असता, किंवा क्षुधितांस (भुकेलेला) पानावरून उठवून लावले असता; 785
786-18
पै मायेपुढौनि बाळक । काळे नेता एकुलते एक । होय का उदक । तुटता मीना ॥786॥
अथवा आई पुढून एकुलते एक लेकरू काळाने ओढून नेले असता किंवा माशास पाण्यातून काढिले असतात जसे दुःख होते, 786
787-18
तैसे विषयांचे घर । इंद्रिया सांडिता थोर । युगांतु होय ते वीर । विराग साहाती ॥787॥
तसे विषयांचे घर सोडते वेळेस इंद्रियांना युगांत ओढवल्याप्रमाणे दुःख होते; परंतु वैराग्यसंपन्न शूर तेही दुःख सहन करतात. 787
788-18
ऐसा जया सुखाचा आरंभु । दावी काठिण्याचा क्षोभु । मग क्षीराब्धी लाभु । अमृताचा जैसा ॥788॥
असा ज्या सुखाचा आरंभ कष्टमय आहे, तो जो सहन करील, त्याला जसा क्षिराब्धीचे मंथन करतेवेळेस ज्यांनी दुःख सहन केले त्यांना अमृताचा लाभ झाला तसा परमसुखाचा लाभ होतो. 788
789-18
पहिलया वैराग्यगरळा । धैर्यशंभु वोडवी गळा । तरी ज्ञानामृते सोहळा । पाहे जेथे ॥789॥
प्रथम वैराग्यरूप गरळ ज्यात निघेल ते प्राशन करण्यास सात्विकधैर्यरुपी शंभू जेव्हा आ करील, तेव्हा परिणामी ज्ञानरूप अमृताचा सोहळा भोगावयास सांपडतो. 789
790-18
पै कोलिताही कोपे ऐसे । द्राक्षांचे हिरवेपण असे । ते परीपाकी का जैसे । माधुर्य आते ॥790॥
हे पहा द्राक्षांचा आंबटपणा कच्चेपणी कोलीतासही मागतो सारतो, परंतु तीच पिकल्यावर मधुर लागतात. 790
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
791-18
ते वैराग्यादिक तैसे । पिकलिया आत्मप्रकाशे । मग वैराग्येंसीही नाशे । अविद्याजात ॥791॥
वैराग्य आत्मप्राशनाने पूर्णतेस आल्यावर मग तेथे वैराग्यादीक सर्व दुःखांचा नाश होतो. 791
792-18
तेव्हा सागरी गंगा जैसी । आत्मी मीनल्या बुद्धि तैसी । अद्वयानंदाची आपैसी । खाणी उघडे ॥792॥
समुद्राला गंगा मिळाल्यावर जशी सुस्वरूप व होते, बुद्धी आत्म्याचे ठिकाणी मिळाली असता तिला अद्वयानंदरुपी सुखाची खाण उघडते. 792
793-18
ऐसे स्वानुभवविश्रामे । वैराग्यमूळ जे परिणमे । ते सात्विक येणे नामे । बोलिजे सुख ॥793॥
याप्रमाणे ज्या सुखास वैराग्य हे मूळ असून आत्मानंदप्राप्ती हा ज्याचा परिणाम होय, त्या सुखाला सात्विक सुख असे म्हणतात. 793

विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम् ।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥18. 38॥
794-18
आणि विषयेंद्रिया । मेळु होता धनंजया । जे सुख जाय थडिया । सांडूनि दोन्ही ॥794॥
आणि अर्जुना, विषय व इंद्रिये यांचा संबंध झाला म्हणजे दुथडी भरून जो सुखाचा पूर येतो; 794
795-18
अधिकारिया रिगता गावो । होय जैसा उत्साहो । का रिणावरी विवाहो । विस्तारिला ॥795॥
अधिकारी आपल्या अधिकाराच्या गावी गेला असता जसा उत्सव होतो; किंवा ऋण काढून लग्नाचा जसा समारंभ करावा; 795
796-18
नाना रोगिया जिभेपासी । केळे गोड साखरेसी । का बचनागाची जैसी । मधुरता पहिली ॥796॥
अथवा रोग्याला साखर, केळी ही कुपथ्य असूनही जशी गोड लागतात; किंवा बचनाग खाते वेळेस जसा गोड लागतो; 796
797-18
पहिले संवचोराचे मैत्र । हाटभेटीचे कलत्र । का लाघवियाचे विचित्र । विनोद ते ॥797॥
संवचोराची मैत्री जशी प्रथम गोड असते किंवा बाजारातील स्त्रियांचे (वेश्यांदिकांचे) आचरण प्रथम सुखकर वाटते; किंवा नटाचे आविर्भाव जसे आल्हादकारक वाटतात. 797
798-18
तैसे विषयेंद्रियदोखी । जे सुख जीवाते पोखी । मग उपडिला खडकी । हंसु जैसा ॥798॥
तसे विषय व इंद्रिये यांच्या संबंधाने जीवाला जे सुख होते, ते परिणामी दुःखदायक असते. खडकावर साचलेल्या पाण्यात शुक्रादि चांदण्यांचे प्रतिबिंब पडलेले पाहून ती रत्ने आहेत. अशा भ्रमाने हंसाने त्यावर उडी घातली असता, रत्न प्राप्ति न होता तसा तो प्राणास मुकतो, 798
799-18
तैसी जोडी आघवी आटे । जीविताचा ठाय फिटे । सुकृताचियाही सुटे । धनाची गाठी ॥799॥
तशी ज्यायोगे सुकृत्याने मिळवलेल्या सुखाची जोड नाहीशी होते; आणि विषय सुख मिळण्याकरिता संपादिलेल्या सर्व पुण्य रुपी धनाचाहि नाश होतो; 799
800-18
आणिक भोगिले जे काही । ते स्वप्न तैसे होय नाही । मग हानीच्याचि घाई । लोळावे उरे ॥800॥
आणि भोगलेले जे विषय तेही स्वप्नाप्रमाणे नाहीतसे होतात. मग दुःखाच्या राशीत लोळणे; हीच त्याच्या वाट्यास राहते. 800
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
801-18
ऐसे आपत्ती जे सुख । ऐहिकी परिणमे देख । परत्री कीर विख । होऊनि परते ॥801॥
इहलोकी प्राप्त झालेले जे सुख, त्याचा हा अशा प्रकारचा परिणाम होतो; आणि ते परलोकही खरोखर विषरूपानेच फलप्रद होते. 801
802-18
जे इंद्रियजाता लळा । दिधलिया धर्माचा मळा । जाळूनि भोगिजे सोहळा । विषयांचा जेथ ॥802॥
जे इंद्रियांचे लाड पुरविण्याकरिता धर्मरूपी मळा त्याचे स्वाधीन करतात, ते धर्म जाळून इंद्रियाकडून विषयाचा सोहळा भोगवितात. 802
803-18
तेथ पातके बांधिती थावो । तिये नरकी देती ठावो । जेणे सुखे हा अपावो । परत्री ऐसा ॥803॥
मग पातकास थारा मिळून ती बलवान होतात व नरक प्राप्ती करून देतात. ज्या इहलोकाच्या लोकांच्या सुखाने परलोकी हा असा घात होतो; 803
804-18
पै नामे विष महुरे । परी मारूनि अंती खरे । तैसे आदि जे गोडिरे । अंती कडू ॥804॥
हे पहा, जसे विष हे शब्दाने मात्र मधुर परंतु परिणामी प्राणनाशक करणारे आहे, तसे इहालोकिंचे सुख आरंभी गोड असून परिणामी कडू आहे. 804
805-18
पार्था ते सुख साचे । वळिले आहे रजाचे । म्हणौनि न शिवे तयाचे । आंग कही ॥805॥
पार्था, हे सुख केवळ रजोगुणांचेच बनलेले (राजस) आहे; म्हणून त्याला तू कधीही स्पर्श करू नको. 805

यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः ।
निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥18. 39॥
806-18
आणि अपेयाचेनि पाने । अखाद्याचेनि भोजने । स्वैरस्त्रीसंनिधाने । होय जे सुख ॥806॥
आणि अपेय पानाने, अभक्ष्य भक्षणने, व स्वैरिणीस्त्रीच्या संयोगाने उत्पन्न होणारे सुख 806
807-18
का पुढिलांचेनि मारे । नातरी परस्वापहारे । जे सुख अवतरे । भाटाच्या बोली ॥807॥
किंवा दुसऱ्याचा आघात करून अथवा दुसऱ्याचे सर्वस्व हरण करून किंवा भाटाच्या स्तुतिपाठाने जे सुख होते; 807
808-18
जे आलस्यावरी पोखिजे । निद्रेमाजी जे देखिजे । जयाच्या आद्यंती भुलिजे । आपुली वाट ॥808॥
जे आळसाने किंवा निद्रेने वाढते आणि ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आपल्या कल्याणाचे शुद्धी नसते. 808
809-18
ते गा सुख पार्था । तामस जाण सर्वथा । हे बहु न सांगोचि जे कथा । असंभाव्य हे ॥809॥
जे सुख अर्जुना, तामस असे जाण. ही कथा मी विस्ताराने सांगत बसत नाही कारण, ती असंभाव्य आहे. 809
810-18
ऐसे कर्मभेदे मुदले । फळसुखही त्रिधा जाले । ते हे यथागमे केले । गोचर तुज ॥810॥
अशाप्रकारे मूळ कर्माच्या भेदाने फळरुप सुख हे तीन प्रकारचे झाले आहे, ते तुला यथाशास्त्र सांगितले. 810
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
811-18
ते कर्ता कर्म कर्मफळ । ये त्रिपुटी येकी केवळ । वाचूनि काहीचि नसे स्थूल । सूक्ष्मी इये ॥811॥
सर्व जगतांत लहान व मोठ्या वस्तू ज्या आहेत, त्यात एकही वस्तू कर्ता कर्म व फळ या त्रिपुटीशिवाय सापडणार नाही. 811
812-18
आणि हे तव त्रिपुटी । तिही गुणी इही किरीटी । गुंफिली असे पटी । तांतुवी जैसी ॥812॥
आणि अर्जुना, पट जसा तंतूंनी तयार केला आहे, तशी ही त्रिपुटी पाहू गेले असता तीन गुणांनी भरलेली आहे. 812

न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः ।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥18. 40॥
813-18
म्हणौनि प्रकृतीच्या आवलोकी । न बंधिजे इही सत्वादिकी । तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी । आथी वस्तु ॥813॥
म्हणून तू हे लक्षात ठेव की, प्रकृतीच्या गुणांनी बद्ध झालेली अशी कोणतीही वस्तू या यालोकी अथवा स्वर्गलोकी नाही. 813
814-18
कैचा लोवेवीण कांबळा । मातियेवीण मोदळा । का जळेवीण कल्लोळा । होणे आहे ? ॥814॥
लोकरी वाचून कांबळा व माती वाचून गोळा कसा होणार ? अथवा पाण्यावाचून लाटा कशा होतील ? 814
815-18
तैसे न होनि गुणाचे । सृष्टीची रचना रचे । ऐसे नाहीचि गा साचे । प्राणिजात ॥815॥
त्याप्रमाणे जीवमात्र, गुणाच्या रचनेवाचून या सृष्टीत मोकळे नाहीत, 815
816-18
यालागी हे सकळ । तिही गुणांचेचि केवळ । घडले आहे निखिळ । ऐसे जाण ॥816॥
यास्तव, हे सर्व जगांतील पदार्थ तीन गुणांनी केवळ रचलेले आहेत, असे समज. 816
817-18
गुणी देवा त्रयी लाविली । गुणी लोकी त्रिपुटी पाडिली । चतुर्वर्णा घातली । सिनानी उळिगे ॥817॥
या तीन गुणांची शक्ती इतकी अचाट आहे की, त्यांनी एका देवाचे तीन देव गेले आणि लोकांचे 3 लोक (स्वर्ग, मृत्यू व पाताळ) गुणांनीच केले आहेत आणि चार वर्ण व त्यांची कर्मे आहेत. 817

ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणा च परन्तप ।
कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ॥18. 41॥
818-18
तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण । तरी जया मुख्य ब्राह्मण । धुरेचे का ॥818॥
हे चार वर्ण कोणते, असे पुसशील, तर त्यात अग्रभागी ब्राह्मण आहेत. 818
819-18
येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी । जे ते वैदिकविधानी । योग्य म्हणौनि ॥819॥
दुसरे क्षत्रिय व वैश्य हे दोन वर्ण वैदिक कर्म करण्याचे अधिकारी असल्यामुळे ते ब्राह्मणांचाच बरोबरीचे मानावे. 19
820-18
चौथा शूद्रु जो धनंजया । वेदी लागु नाही तया । तऱ्ही वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ॥820॥
हे धनंजया, चौथा जो शूद्र वर्ण, त्याला वेदाचा अधिकार नाही, तर त्याची सेवावृत्ती तीन वर्णांच्या आधीन आहे. 820
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
821-18
तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिका । शूद्रही की देखा । चौथा जाला ॥821॥
त्या ब्राह्मणादि तीन वर्णांच्या सेवा वृत्तीच्या सानिध्याने शूद्रालाही चौथ्या वर्णात गणले. 821
822-18
जैसा फुलाचेनि सांगाते । तांतु तुरंबिजे श्रीमंते । तैसे द्विजसंगे शूद्राते । स्वीकारी श्रुती ॥822॥
जसा फुलांच्या संगतीने असलेल्या दोऱ्याला ही श्रीमंत धारण करतात तशी श्रुती द्विजांच्या संगतीने शूद्रांचा त्यांचा स्वीकार करते. 822
823-18
ऐसैसी गा पार्था । हे चतुर्वर्णव्यवस्था । करू आता कर्मपथा । यांचिया रूपा ॥823॥
पार्था, आता अशा चार प्रकारांनी या चार वर्णांची व्यवस्था झालेली आहे. तर त्या त्या वर्णांची कर्मे कोणती हे भेद तुला सांगतो. 823
824-18
जिही गुणी ते वर्ण चारी । जन्ममृत्यूंचिये कातरी । चुकोनिया ईश्वरी । पैठे होती ॥824॥
ज्या गुणांनी ते चारी वर्ण जन्ममृत्यूचे संकट चुकवून ईश्वराप्रत प्राप्त होतात; 824
825-18
जिये आत्मप्रकृतीचे इही । गुणी सत्त्वादिकी तिही । कर्मे चौघा चहू ठाई । वांटिली वर्णा ॥825॥
आत्म्याची जी प्रकृती, तिच्या सत्वादी गुणांनी चार वर्णाला चार ठिकाणी कर्मे वाटून दिली आहेत; 825
826-18
जैसे बापे जोडिले लेका । वांटिले सूर्ये मार्ग पांथिका । नाना व्यापार सेवका । स्वामी जैसे ॥826॥
ज्याप्रमाणे बापाने मिळविलेली संपत्ती मुलांना वाटून देतात, किंवा सूर्य वाटसरूस त्यांचे त्यांचे मार्ग दाखवून देतो, अथवा स्वामी सेवकास भिन्नभिन्न व्यवहार सांगतो, 826
827-18
तैसी प्रकृतीच्या गुणी । जया कर्माची वेल्हावणी । केली आहे वर्णी । चहू इही ॥827॥
त्याप्रमाणे, प्रकृतीचे जे गुण, त्यांनी कर्मांचा विस्तार करून त्यांची चार वर्णांचे ठिकाणी वाटणी केली; 827
828-18
तेथ सत्त्वे आपल्या आंगी । समीन-निमीन भागी । दोघे केले नियोगी । ब्राह्मण क्षत्रिय ॥828॥
त्याठिकाणी सत्वगुणाने आपल्या सम विषम मार्गाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोन वर्ण उत्पन्न केले; 828
829-18
आणि रज परी सात्त्विक । तेथ ठेविले वैश्य लोक । रजचि तमभेसक । तेथ शूद्र ते गा ॥829॥
आणि रजोगुण व सत्वगुण यांच्या मिश्रणाने वैश्य वर्ण उत्पन्न झाला; 829
830-18
ऐसा येकाचि प्राणिवृंदा । भेदु चतुर्वर्णधा । गुणींचि प्रबुद्धा । केला जाण ॥830॥
अशाप्रकारे हे प्रबुद्धा, एकरूपच असा प्राणीमात्रांचा गुणांनी चार प्रकारचा भेद केला आहे, असे समज. 830
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
831-18
मग आपुले ठेविले जैसे । आइतेचि दीपे दिसे । गुणभिन्न कर्म तैसे । शास्त्र दावी ॥831॥
मग आपली ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या उजेडाने सहज दिसते, तसे गुणांनी वेगळे झालेले कर्म शास्त्रांत स्पष्ट सांगितले आहे; 831
832-18
तेचि आता कोण कोण । वर्णविहिताचे लक्षण । हे सांगो ऐक श्रवण- । सौभाग्यनिधी ॥832॥
हे भाग्यवंता, कोणत्या वर्णाला कोणती विहित कर्म तेच तुला आता सांगतो. ते ऐक. 832

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च ।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥18. 42॥
833-18
तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती । घेऊनि आपुल्या हाती । बुद्धि आत्मया मिळे येकांती । प्रिया जैसी ॥833॥
(शम:) प्रिया ज्याप्रमाणे आपल्या पतीशी एकांती भेटते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातात घेऊन जी बुद्धी आत्मस्वरूपी मिळते; 833
834-18
ऐसा बुद्धीचा उपरमु । तया नाम म्हणिपे शमु । तो गुण गा उपक्रमु । जया कर्माचा ॥834॥
आता जो बुद्धीचा लीनपणा, त्याला ‘ शम’ असे म्हणतात, तो सर्व गुणांमध्ये प्रथम असून त्याजपासून सर्व कर्मांचा आरंभ होतो. 83
835-18
आणि बाह्येंद्रियांचे धेंडे । पिटूनि विधीचेनि दंडे । नेदिजे अधर्माकडे । कहीचि जावो ॥835॥
(दम) आणि जो बाह्य इंद्रियांना विधीचा दंड करून अधर्माच्या मार्गाला कधीही जाऊ देत नाही, 835
836-18
तो पै गा शमा विरजा । दमु गुण जेथ दुजा । आणि स्वधर्माचिया वोजा । जिणे जे का ॥836॥
तो शमाला साह्यकर्ता असा दुसरा, ‘दम’ गुण होय. तो इंद्रियांना स्वधर्माने चालवितो. 836
837-18
सटवीचिये राती । न विसंबिजे जेवी वाती । तैसा ईश्वरनिर्णयो चित्ती । वाहणे सदा ॥837॥
(तप:) जसे षष्ठीपूजनाचे रात्री दिव्याला विसंबत नाहीत, तसे सर्वकाळ चित्तांत ईश्वर स्वरूपाचा विचार करणे, 837
838-18
तया नाम तप । ते तिजया गुणाचे रूप । आणि शौचही निष्पाप । द्विविध जेथ ॥838॥
त्याला ‘तप’ असे म्हणतात; आणि हा ब्राह्मण कर्माचा तिसरा गुण आहे. (शौचम्) आणखी शौच म्हणजे पवित्रपणा. हा निष्पाप असून दोन प्रकारचा आहे. 838
839-18
मन भावशुद्धी भरले । आंग क्रिया अळंकारिले । ऐसे सबाह्य जियाले । साजिरे जे का ॥839॥
मन हे शुद्ध भावाने भरलेले असून सर्व शरीर सत्कर्माने सुशोभित आहे, तसा अंतर्बाह्य शुचिपणा भरलेला आहे. 839
840-18
तया नाम शौच पार्था । तो कर्मी गुण जये चौथा । आणि पृथ्वीचिया परी सर्वथा । सर्व जे साहाणे ॥840॥
त्याला पार्था, ‘शौच’ असे म्हणतात व तो ब्रह्म कर्मापैकी चौथा गुण होय. (क्षाती) आणि पृथ्वीप्रमाणे नेहमी सर्व दुःखे सहन करणे. 840
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
841-18
ते गा क्षमा पांडवा । गुण जेथ पांचवा । स्वरांमाजी सुहावा । पंचमु जैसा ॥841॥
त्याला अर्जुना, ‘क्षान्तिक्षमा’ असे म्हणतात सप्तस्वरात पंचमस्वर जसा अति मधुर आहेत असा ब्राह्मण कर्मातील हा पाचवा गुण होय. 8041
842-18
आणि वांकडेनी वोघेसी । गंगा वाहे उजूचि जैसी । का पुटी वळला ऊसी । गोडी जैसी ॥842॥
(आर्जवम्) आणि गंगेचा ओघ जरी वाकडा असला, तरी तो ज्याप्रमाणे सरळच आहे; किंवा उसाची पेरी जरी वाकडी असली, तरी त्याची गोडी ज्याप्रमाणे सारखीच असते, 842
843-18
तैसा विषमांही जीवां- । लागी उजुकारु बरवा । ते आर्जव गा साहावा । जेथीचा गुण ॥843॥
त्याप्रमाणे आपल्यास त्रास देणाऱ्या जीवावरही अत्यंत प्रीति असणे यास आर्जवम् असे म्हणतात; व हा ब्राह्मणकर्मापैकी सहावा गुण होय. 843
844-18
आणि पाणिये प्रयत्ने माळी । अखंड जचे झाडामुळी । परी ते आघवेचि फळी । जाणे जेवी ॥844॥
(ज्ञानम्) आणि -माळी कष्ट करून झाडाचे मुळास पाणी लावतो, त्याचे श्रम जसे फळे आल्यावर सार्थकी लागतात. 844
845-18
तैसे शास्त्राचारे तेणे । ईश्वरुचि येकु पावणे । हे फुडे जे का जाणणे । ते येथ ज्ञान ॥845॥
तसे शास्त्रोक्त आचरणाने ईश्वरप्राप्तीच व्हायची हे ज्यांना समजते, ते ज्ञान होय. 845
846-818
ते गा कर्मी जिये । सातवा गुण होये । आणि विज्ञान हे पाहे । एवंरूप ॥846॥
ते ज्ञान ब्रह्मकर्मापैकी सातवा गुण होय; आणि त्याचप्रमाणे विज्ञानाचे लक्षण असे आहे. 846
847-18
तरी सत्वशुद्धीचिये वेळे । शास्त्रे का ध्यानबळे । ईश्वरतत्त्वीचि मिळे । निष्टंकबुद्धी ॥847॥
(विज्ञान) तर शास्त्रविचाराने व ध्यानाचा अभ्यासाने ईश्वरस्वरूपी जी बुद्धी, सप्तशुद्धीच्या वेळी निश्चयाने मिळते, 847
848-18
हे विज्ञान बरवे । गुणरत्न जेथ आठवे । आणि आस्तिक्य जाणावे । नववा गुण ॥848॥
तिला विज्ञान असे म्हणतात व ते ब्रह्मकर्मापैकी आठवे गुणरत्न होय. (आस्तिक्यम्) आणि आस्तिक्य नववा गुण असे समज. 848
849-18
पै राजमुद्रा आथिलिया । प्रजा भजे भलतया । तेवी शास्त्रे स्वीकारिलिया । मार्गमात्राते ॥849॥
हे पहा, राजमुद्राकित मनुष्य कोणीही असला, तरी त्याची सर्व लोक सेवा करतात, त्याप्रमाणे शास्त्राने जे मार्ग स्वीकारले आहेत, 849
850-18
आदरे जे का मानणे । ते आस्तिक्य मी म्हणे । तो नववा गुण जेणे । कर्म ते साच ॥850॥
ते मार्ग आदराने मानून त्याप्रमाणे आचरण करणे, यालाआस्तिक्य असे मी म्हणतो. तो ब्राह्मणकर्मापैकी नववा गुण होय व याच गुणाने ब्राह्मणकर्म सर्व खरे होते. 850
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
851-18
एवं नवही शमादिक । गुण जेथ निर्दोख । ते कर्म जाण स्वाभाविक । ब्राह्मणाचे ॥851॥
याप्रमाणे शमादिक नऊ गुण जेये निर्दोष दृष्टीस पडतात, ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म आहे, असे समज. 851
852-18
तो नवगुणरत्नाकरु । यया नवरत्नांचा हारु । न फेडीत ले दिनकरु । प्रकाशु जैसा ॥852॥
ज्याप्रमाणे सूर्य स्वभावतःच प्रकाशरूप असतो, त्याप्रमाणे ब्राह्मणाचा हा नवगुणरूपी रत्नांचा हार स्वाभाविक आहे; 852
853-18
नाना चांपा चांपौळी पूजिला । चंद्रु चंद्रिका धवळला । का चंदनु निजे चर्चिला । सौरभ्ये जेवी ॥853॥
चाफ्याचा वृक्ष त्याच्याच फुलांनी जसा सुशोभित दिसतो, अथवा चंद्र आपल्या प्रभेनेच जसा प्रकाश असतो, किंवा चंदन आपल्याच परीमळाने जसा चर्चित असतो, 853
854-18
तेवी नवगुणटिकलग । लेणे ब्राह्मणाचे अव्यंग । कहीचि न संडी आंग । ब्राह्मणाचे ॥854॥
तसे नवगुणरूपी दागिने हे ब्राम्हणाचे अव्यंग लेणे आहे; व हे ब्राम्हणाचे अंग सोडून कधीच रहात नाहीत. 854
855-18
आता उचित जे क्षत्रिया । तेही कर्म धनंजया । सांगो ऐक प्रज्ञेचिया । भरोवरी ॥855॥
आता हे धनंजया, क्षत्रियांना उचित जे कर्म, ते मी सांगतो. ते तू आपल्या बुद्धीसर्वस्वाने ऐक. 855

शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् ।
दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ॥18. 43॥
856-18
तरी भानु हा तेजे । नापेक्षी जेवी विरजे । का सिंहे न पाहिजे । जावळिया ॥856॥
(शौर्य) सूर्य हा प्रकाश पाडण्याकरिता दुसऱ्याच्या त्याची अपेक्षा करत नाही, किंवा सिंह आपल्या पराक्रमाला सोबत्याच्या मदतीची गरज बाळगीत नाही. 856
857-18
ऐसा स्वयंभ जो जीवे लाठु । सावायेंवीण उद्भटु । ते शौर्य गा जेथ श्रेष्ठु । पहिला गुण ॥857॥
आता असाह्य ते वाचून जो स्वयंभू, बलवान व शूर तो क्षात्र प्रकृतीचा पहिला गुण ‘शौर्य’ होय.
558-18
आणि सूर्याचेनि प्रतापे । कोडिही नक्षत्र हारपे । ना तो तरी न लोपे । सचंद्री तिही ॥858॥
(तेज:) आणि सूर्याच्या प्रकाशाने कोट्यावधी नक्षत्रे नाहीत अशी होऊन जातात; परंतु चंद्रासह वर्तमान सर्व नक्षत्रे सूर्याचा लोप करण्याविषयी समर्थ होत नाहीत,
859-18
तैसेनि आपुले प्रौढीगुणे । जगा या विस्मयो देणे । आपण तरी न क्षोभणे । कायसेनही ॥859॥
तसे आपल्या महत्वाच्या गुणाने सर्व जगाला आश्चर्य करण्यास लावतात व कसलाही प्रसंग आला तरी आपण घाबरत नाहीत, 859
860-18
ते प्रागल्भ्यरूप तेजा । जिये कर्मी गुण दुजा । आणि धीरु तो तिजा । जेथीचा गुण ॥860॥
असा जो प्रसंशनीय गुण ‘ तेज’ तो त्या क्षात्र प्रवृत्तीचा दुसरा गुण होय. (धृतिः) व ‘धीर’ हा त्याच प्रतीचा तिसरा गुण होय. 860
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
861-18
वरिपडलिया आकाश । बुद्धीचे डोळे मानस । झांकी ना ते परीयेस । धैर्य जेथे ॥861॥
आकाशही कोसळून पडले; तरी ज्याच्या बुद्धीचे डोळे-मन हे झाकले जात नाही, त्याचे नाव ‘धैर्य’ होय. 861
862-18
आणि पाणी हो का भलतेतुके । परी ते जिणौनि पद्म फाके । का आकाश उंचिया जिंके । आवडे तयाते ॥862॥
(दाक्ष्यम्) आणि पाणी कितीही खोल असले तरी कमळ हे पाण्याला खाली टाकून वर येते, किंवा आकाशी उंची विषयी सर्व पदार्थ जिंकते 862
863-18
तेवी विविध अवस्था । पातलिया जिणौनि पार्था । प्रज्ञाफळ तया अर्था । वेझ देणे जे ॥863॥
तशी नाना प्रकारचे प्रसंग प्राप्त झाले तरी पार्था, फलरूप जो अर्थ त्याला बुद्धी जिंकते. 863
864-18
ते दक्षत्व गा चोख । जेथ चौथा गुण देख । आणि झुंज अलौकिक । तो पांचवा गुण ॥864॥
याप्रमाणे सावधगिरी ठेवणे त्याला ‘दक्षता’ म्हणतात व तो क्षात्र प्रकृतीचा चौथा गुन्हा होय. (युध्दे आपलायानम) आणि’ अलौकिक युद्ध पराक्रम’ हा त्याच प्रकृतीचा पाचवा गुण होय. 864
865-18
आदित्याची झाडे । सदा सन्मुख सूर्याकडे । तेवी समोर शत्रूपुढे । होणे जे का ॥865॥
सूर्य कमळे जशी नेहमी सूर्याच्या सन्मुख असतात, तसे शत्रूंच्या समोर नेहमी असणे. 865
866-18
माहेवणी प्रयत्नेसी । चुकविजे सेजे जैसी । रिपू पाठी नेदिजे तैसी । समरांगणी ॥866॥
गरोदर स्त्री पती समागमास जशी प्रयत्न करून चुकविते, तसे शत्रूला रणांगणात पाठ दाखविण्यात येतो चुकवितो. 866
867-18
हा क्षत्रियाचेया आचारी । पांचवा गुणेंद्रु अवधारी । चहू पुरुषार्था शिरी । भक्ति जैसी ॥867॥
चार पुरुषार्थ ‘ भक्ती’ हा पुरुषार्थ जास्त आहे, तसा क्षात्र प्रकृतीच्या गुणांमध्ये हा पाचवा गुण इन्द्राप्रमाणे श्रेष्ठ आहे असे समज. 867
468-18
आणि जालेनि फुले फळे । शाखिया जैसी मोकळे । का उदार परीमळे । पद्माकरु ॥868॥
(दानम्) आणि वृक्ष आपली पाने, फुले व फळे ही जशी याचकांसअर्पण करण्यास तयार असतो, अथवा परिमला विषयी कमळ जसे उदार असते; 868
869-18
नाना आवडीचेनि मापे । चांदिणे भलतेणे घेपे । पुढिलांचेनि संकल्पे । तैसे जे देणे ॥869॥
अथवा त्याला जितकी आवड असेल तितके त्याने चांदण्याचे सुख घ्यावे, तसे याचकास त्याच इच्छेप्रमाणे देणे, 869
870-18
ते उमप गा दान । जेथ सहावे गुणरत्न । आणि आज्ञे एकायतन । होणे जे का ॥870॥
याला ‘अमर्याद दान’ असे म्हणतात. ते क्षात्र प्रकृतीचे सहावे गुणरत्न होय. (ईश्वरभाव:) आणि आज्ञेचे राहण्याचे एका स्थान क्षत्रीय होय. 870
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
871-18
पोषूनि अवयव आपुले । करविजती मानविले । तेवी पालणे लोभविले । जग जे भोगणे ॥871॥
आपल्या हस्तपादिक अवयवाचे चांगले पोषण केले असता त्याजकडून वाटेल ते काम करून घेता येते, त्याप्रमाणे प्रजेचे प्रेमाने पालन केले असता प्रजेचा उपभोग राजाला वाटेल तसा घेता येतो. 870
872-18
तया नाम ईश्वरभावो । जो सर्वसामर्थ्याचा ठावो । तो गुणांमाजी रावो । सातवा जेथ ॥872॥
जो सर्व सामर्थ्याचा आधार लागलाच ‘ईश्वरभाव’ असे म्हणतात, तो या क्षात्र प्रकृतीच्या सर्व गुणांचा राजा असा सातवा गुण होय. 872
873-18
ऐसे जे शौर्यादिकी । इही सात गुणविशेखी । अळंकृत सप्तऋखी । आकाश जैसे ॥873॥
अशा शौर्य आदिकरून सात गुणांनी जो पुरुष विशेष अलंकृत आहे, तो सप्तर्षींच्या सात चांदण्यांनी जसे आकाशी शोभते, त्याप्रमाणे शोभतो; 873
874-18
तैसे सप्तगुणी विचित्र । कर्म जे जगी पवित्र । ते सहज जाण क्षात्र । क्षत्रियाचे ॥874॥
अशा प्रकारे, या सात पवित्र गुणांनी या जगात जे कर्म पवित्र झालेले असते, ते क्षात्र प्रकृतीचे स्वभावीक कर्म आहे; 874
875-18
नाना क्षत्रिय नव्हे नरु । तो सत्त्वसोनयाचा मेरु । म्हणौनि गुणस्वर्गा आधारु । साता इया ॥875॥
अथवा असा जो पुरुष क्षत्रिय नसून स्वरूप सोन्याचा मेरूच होय. म्हणून तो सत्वगुणरुपी समुद्रांनी स्वर्गाला धारण करतो, 875
876-18
नातरी सप्तगुणार्णवी । परीवारली बरवी । हे क्रिया नव्हे पृथ्वी । भोगीतसे तो ॥876॥
किंवा सत्वगुणरुपी समुद्रांनी वेष्टित केलेली ही क्षात्रप्रकृतीरूप पृथ्वी होय. 876
877-18
का गुणांचे सातांही ओघी । हे क्रिया ते गंगा जगी । तया महोदधीचिया आंगी । विलसे जैसी ॥877॥
अथवा सप्तगुणरूपी ओघांनी क्षात्रक्रियारुपी गंगा ही क्षात्रप्रकृती धारण करणार्‍या ह्या महोदधिला मिळवून शोभते. 877
878-18
परी हे बहु असो देख । शौर्यादि गुणात्मक । कर्म गा नैसर्गिक । क्षात्रजातीसी ॥878॥
या सर्व गोष्टी राहू दे. क्षात्र प्रकृतीची शौर्याधिक गुणात्मक कर्मे ही स्वाभाविक आहेत. 878
879-18
आता वैश्याचिये जाती । उचित जे महामती । ते ऐके गा निरुती । क्रिया सांगो ॥879॥
आता हे महामते, वैश्य जातीला जे योग्य कर्म आहे ते तुला सांगतो, ऐक. 879

कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् ।
परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॥18. 44॥
880-18
तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलाचा आधारु । घेऊनि लाभु अपारु । मेळवणे जे ॥880॥
(कृषी) शेत, बीज, नांगर इत्यादी साहित्य मिळवून त्यांच्यायोगे पुष्कळ नफा मिळविणे, 880
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
881-18
किंबहुना कृषी जिणे । गोधने राखोनि वर्तणे । का समर्घीची विकणे । महर्घीवस्तु ॥881॥
किंबहुना कृषिकर्म करून अथवा (गोरक्ष्य) गाईचं संरक्षण करून किंवा (वाणिज्य) सवंग वस्तू घेऊन महाग दराने विकणे, 881
882-18
येतुलाचि पांडवा । वैश्याते कर्माचा मेळावा । हा वैश्यजातीस्वभावा । आंतुला जाण ॥882॥
अर्जुना, वैश्य जातीने ह्या तीन प्रकारे कर्म करून निर्वाह करणे, हाच त्यांचा स्वाभाविक धर्म होय. 882
883-18
आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । हे द्विजन्मे तिन्ही वर्ण । ययाचे जे शुश्रूषण । ते शूद्रकर्म ॥883॥
आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण या तिन्ही वर्णास द्विज हे नाव आहे व यांची सेवा करणे हाच शूद्र वर्णाचा स्वाभाविक धर्म आहे. 883
884-18
पै द्विजसेवेपरौते । धावणे नाही शूद्राते । एवं चतुर्वर्णोचिते । दाविली कर्मे ॥884॥
परंतु द्वीजांच्या सेवे वाचून शूद्रांना दुसरे कर्मच नाही. या प्रकारे करून चारी वर्णांची कर्मे तुला सांगितली. 884

स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः ।
स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु ॥18. 45॥
885-18
आता इयेचि विचक्षणा । वेगळालिया वर्णा । उचित जैसे करणा । शब्दादिक ॥885॥
आता, या चार वर्णांची निरनिराळी उचित कर्मे तुला स्पष्ट करून सांगतो. ज्याप्रमाणे कर्मादि इंद्रियांना शब्दादिक विषयच योग्य उचित होत, 885
886-18
नातरी जळदच्युता । पाणिया उचित सरिता । सरितेसी पंडुसुता । सिंधु उचितु ॥886॥
अथवा मेगा पासून पडलेल्या उदकास योग्य स्थान नदीच होय. आणि अर्जुना नदीस उचित स्थान समुद्र, 886
887-18
तैसे वर्णाश्रमवशे । जे करणीय आले असे । गोरेया आंगा जैसे । गोरेपण ॥887॥
तसे वर्णाश्रमधर्माप्रमाणे जे आवश्यक कर्म, ते केले असता, गौर अंगास जसे गोरेपण शोभा देते, तशी त्या वर्णांला अत्यंत शोभा येते. 887
888-18
तया स्वभावविहिता कर्मा । शास्त्राचेनि मुखे वीरोत्तमा । प्रवर्तावयालागी प्रमा । अढळ कीजे ॥888॥
हे विरोतमा त्या स्वभावजन्य कर्माचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी आपली बुद्धी निश्चित करावी. 888
889-18
पै आपुलेचि रत्न थिते । घेपे पारखियाचेनि हाते । तैसे स्वकर्म आपैते । शास्त्रे करावी ॥889॥
परंतु आपल्याजवळ असलेले रत्न जसे रत्न पाख्याच्या हातून पारखून घ्यावे लागते, तसे आपले स्वकर्म शास्त्राच्या आधाराने समजून घ्यावे. 889
890-18
जैसी दिठी असे आपुलिया ठायी । परी दीपेवीण भोग नाही । मार्गु न लाहता काई । पाय असता होय ? ॥890॥
जशी आपल्याजवळ दृष्टी असूनही दिव्यावाचून तिचा उपयोग होत नाही आणि मार्ग न सापडला तर पाय असताही त्याचा काय उपयोग ? 890
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
891-18
म्हणौनि ज्ञातिवशे साचारु । सहज असे जो अधिकारु । तो आपुलिया शास्त्रे गोचरु । आपण कीजे ॥891॥
म्हणून जातीप्रमाणे जो जो योग्य अधिकार असेल, तो आपण आपल्या शास्त्राप्रमाणे समजून घ्यावा. 891
892-18
मग घरींचाचि ठेवा । जेवी डोळ्या दावी दिवा । तरी घेता काय पांडवा । आडळु असे ? ॥892॥
मग अर्जुना, दिवा जसा आपल्या घरातील ठेवा आपल्या डोळ्यास दाखवितो, तेव्हा तो घेण्याविषयी प्रतिबंध असतो काय ? 892
893-18
तैसे स्वभावे भागा आले । वरी शास्त्रे खरे केले । ते विहित जो आपुले । आचरे गा ॥893॥
तसे स्वभावतः आपल्या वाट्यास आलेले व शास्त्राने खरे केलेले असे जे विहित कर्म त्यांचे जो आचरण करतो; 893
894-18
परी आळसु सांडुनी । फळकाम दवडुनी । आंगे जीवे मांडुनी । तेथेचि भरु ॥894॥
पण आळस सोडून व फलेच्छा टाकून मोठ्या हौसेने शरीराने जीव लावून त्या ठिकाणी जो आपला सर्वकाळ घालवितो; 894
895-18
वोघी पडिले पाणी । नेणे आनानी वाहणी । तैसा जाय आचरणी । व्यवस्थौनी ॥895॥
पाणी ओघात पडल्यावर जसे भलतीकडेच जात नाही तसे त्याचे आचरण यथाशास्त्र होते; 895
896-18
अर्जुना जो यापरी । ते विहित कर्म स्वये करी । तो मोक्षाच्या ऐलद्वारी । पैठा होय ॥896॥
अर्जुना, याप्रमाणे जो विहित कर्मांचे स्वतः आचरण करितो, तो पुरुष मोक्षाच्या अलीकडले दार वैराग्य तेथे प्राप्त होतो. 896
897-18
जे अकरणा आणि निषिद्धा । न वचेचि काही संबंधा । म्हणौनि भवा विरुद्धा । मुकला तो ॥897॥
जो अकरण व निषिद्ध या कर्मांचा संबंध होऊ देत नाही, म्हणून आत्मप्राप्ती विरुद्ध जो संसार, त्याच्या भयापासून मुक्त होतो; 897
898-18
आणि काम्यकर्मांकडे । न परतेचि जेथ कोडे । तेथ चंदनाचेही खोडे । न लेचि तो ॥898॥
तसेच चंदनाचाही खोडा पायात घालण्यास आणिला तरी पाय अडकवून घेत नाही, तसे काम्य कर्माकडे जो कौतुकानेहि पहात नाही; 898
899-18
येर नित्य कर्म तव । फळत्यागे वेचिले सर्व । म्हणौनि मोक्षाची शीव । ठाकू लाहे ॥899॥
आणि दुसरे जे नित्यकर्म, त्याचा फलत्याग् केल्यामुळे तेही तो संपवितो; त्यामुळे तो मोक्षाचा शिवेजवळ प्राप्त होतो. 899
900-18
ऐसेनि शुभाशुभी संसारी । सांडिला तो अवधारी । वौराग्यमोक्षद्वारी । उभा ठाके ॥900॥
अशा युक्तीने कर्माचे निरसन करून शुभाशुभ संसारापासून तो सुटतो व मोक्षाचे द्वार जे वैराग्य तेथे येऊन उभा राहतो. 900
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
901-18
जे सकळ भाग्याची सीमा । मोक्षलाभाची जे प्रमा । नाना कर्ममार्गश्रमा । शेवटु जेथ ॥901॥
जे वैराग्य सकळ भाग्याची सीमा होय व मोक्षलाभाचा निश्चय अथवा कर्ममार्गाचे श्रमपरिहार होण्याचे स्थान होय; 901
902-18
मोक्षफळे दिधली वोल । जे सुकृततरूचे फूल । तये वैराग्यी ठेवी पाऊल । भंवरु जैसा ॥902॥
ज्याला मोक्षफल जामीन झालेले आहे किंवा जे सत्कर्म रूप वृक्षांचे फुलच होय, त्या वैराग्याचे ठिकाणी साधक पुरुष भ्रमराप्रमाणे पाऊल ठेवतो. 902
903-18
पाही आत्मज्ञानसुदिनाचा । वाधावा सांगतया अरुणाचा । उदयो त्या वैराग्याचा । ठावो पावे ॥903॥
हे पहा सूर्योदयाची वार्ता सांगणारा जसा अरुणोदय आहे, त्याप्रमाणे या आत्मज्ञान रूप सुदिनाचा उदय सुचविणारे हे वैराग्य आहे. 903
904-18
किंबहुना आत्मज्ञान । जेणे हाता ये निधान । ते वैराग्य दिव्यांजन । जीवे ले तो ॥904॥
किंबहुना आत्मज्ञान रूप जे निधान ते ज्या वैराग्यरूप दिव्य अंजनाने हातात येते, ते जो जीवेभावे करून बुद्धी रूप डोळ्यात घालतो 904
905-18
ऐसी मोक्षाची योग्यता । सिद्धी जाय तया पंडुसुता । अनुसरोनि विहिता । कर्मा यया ॥905॥
अर्जुना, अशाप्रकारे विहित कर्माला अनुसरून आचरण केले असता, त्याला मोक्षप्राप्तीची योग्यता प्राप्त होते. 905
906-18
हे विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा । आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ॥906॥
हे पांडवा, विहित कर्म हा आपल्या कल्याणाचा जिव्हाळा होय. त्याचं आचरण करणे हीच मज सर्वात्मक ईश्वराची परम सेवा होय. 906
907-18
पै आघवाचि भोगेंसी । पतिव्रता क्रीडे प्रियेसी । की तयाची नामे जैसी । तपे तिया केली ॥907॥
संपूर्ण भोगे करून पतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पतीबरोबर क्रीडा करते त्या तिच्या आचरणास ‘तप’ असे म्हणावे 907
908-18
का बाळका एकी माये । वाचोनि जिणे काय आहे । म्हणौनि सेविजे की तो होये । पाटाचा धर्मु ॥908॥
किंवा बाळाला आई वाचून जगायला दुसरे साधन नाही, म्हणून तिची सेवा केली असता त्याचे कल्याण होते, त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण करणे हाच मुख्य धर्म होय. 908
909-18
नाना पाणी म्हणौनि मासा । गंगा न सांडिता जैसा । सर्व तीर्थ सहवासा । वरपडा जाला ॥909॥
अथवा केवळ पाणी समजून गंगेत राहिलेल्या माशाला तेथे राहिल्याने जसा सर्व तीर्थांचा सहज लाभ होतो, 909
910-18
तैसे आपुलिया विहिता । उपावो असे न विसंबिता । ऐसा कीजे की जगन्नाथा । आभारु पडे ॥910॥
तसे आपल्या विहित कर्मांचे आचरण केल्यावाचून दुसरा उपायच नाही व अशा निश्चयाने त्याचे आराधन केले असता जगन्नाथ जो ईश्वर त्यावर आपले ओझे पडते, 910
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
911-18
अगा जया जे विहित । ते ईश्वराचे मनोगत । म्हणौनि केलिया निभ्रांत । सापडेचि तो ॥911॥
अरे ज्याचे जे विहित कर्म नेमलेले आहे, ते त्याने करणे हेच ईश्वराचे मनोगत आहे, म्हणूनच ते कर्म केले असता नि:संशय ईश्वर प्राप्त होतो. 911
912-18
पै जीवाचे कसी उतरली । ते दासी की गोसावीण जाली । सिसे वेचि तया मविली । वही जेवी ॥912॥
दासी असूनही जर राजाच्या कसोटीस उतरली, तर तीच सर्वाची स्वामिनी होते; किंवा स्वामी कार्यार्थ जो आपले डोके देणारा त्याला स्वामी जसा इनामपत्र करून देऊन आपले दप्तरी दाखल ठेवतो, 912
913-18
तैसे स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेचि परमसेवा । येर ते गा पांडवा । वाणिज्य करणे ॥913॥
तसे ईश्वराच्या मनोभावे प्रमाणे वागणे हीच त्याची परम सेवा होय व यावाचून हे दुसरे कृत्य करणे, ते अर्जुना, वाणिज्य कर्माप्रमाणे आहे. 913

यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥18. 46॥
914-18
म्हणौनि विहित क्रिया केली । नव्हे तयाची खूण पाळिली । जयापसूनि का आली । आकारा भूते ॥914॥
म्हणून विहित कर्म केले म्हणजे ते कर्म केले असे नव्हे, तर ज्या परमात्म्यापासून सर्व भूते उत्पन्न झाली आहेत, त्यांचे मनोगतच आपण पाळीले ! 914
915-18
जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया । खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जू ॥915॥
जो परमात्मा अज्ञानरूपी चिंध्या गुंडाळून जीवरुपी बाहुल्या तयार करतो, आणि सत्व-रज-तम अशा तीन पदरी अहंकाररूप सूत्राने त्यांना खेळवितो. 915
916-18
जेणे जग हे समस्त । आत बाहेरी पूर्ण भरित । जाले आहे दीपजात । तेजे जैसे ॥916॥
दिवा जसा तेजाने अंतर्बाह्य भरलेला असतो तसे ज्या परमात्म्याने हे सर्व जग अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले आहे; 916
917-18
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागी ॥917॥
वीरा अर्जुना, त्या सर्वात्मका ईश्वराची स्वकर्मरुपी पुष्पांनी पूजा केली असता, ती पूजा त्याला परमसंतोष कारक होते. 917
918-18
म्हणौनि तिये पूजे । रिझलेनि आत्मराजे । वैराग्यसिद्धि देईजे । पसाय तया ॥918॥
म्हणून त्या पूजेच्या योगाने आत्मराज प्रसन्न होऊन भक्ताला वैराग्य उत्पन्न करतो. हाच त्याच्या भक्तांवर खरोखर प्रसाद ! 918
919-18
जिये वैराग्यदशे । ईश्वराचेनि वेधवशे । हे सर्वही नावडे जैसे । वांत होय ॥919॥
जी वैराग्य दशा प्राप्त झाली असता ईश्वराचा छंद लागून हा सर्व संसार वमनप्राय भासतो, 919
920-18
प्राणनाथाचिया आधी । विरहिणीते जिणेही बाधी । तैसे सुखजात त्रिशुद्धी । दुःखचि लागे ॥920॥
ज्याप्रमाणे आपल्या प्रिय पतीच्या वियोगाने विरहिणी स्त्रीस जिवंत राहणे देखील नकोसे होते, त्याप्रमाणे संसारातील सर्व सुखे त्याला खरोखर दु:खवत भासतात. 920
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
921-18
सम्यक्‌ज्ञान नुदैजता । वेधेचि तन्मयता । उपजे ऐसी योग्यता । बोधाची लाहे ॥921॥
ईश्वराचे अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होण्याचे पूर्वी त्याच्या ध्यासाने तन्मयता प्राप्त होते, अशी बोधाची योग्यता आहे. 921
922-18
म्हणौनि मोक्षलाभालागी । जो व्रते वाहातसे आंगी । तेणे स्वधर्मु आस्था चांगी । अनुष्ठावा ॥922॥
यास्तव ज्याच्या मनात मोक्ष प्राप्त व्हावा, अशी इच्छा असेल, त्याने स्वधर्माचे परम आस्थेनेआचरण करावे. 922

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥18. 47॥
923-18
अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणी जरी विषमु । तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणे ॥923॥
अरे, आपला धर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी चे फल प्राप्त होणार त्यावर लक्ष ठेविले पाहिजे. 923
924-18
जै सुखालागी आपणपया । निंबचि आथी धनंजया । तै कडुवटपणा तयाचिया । उबगिजेना ॥924॥
हे धनंजया, कडुलिंबाचे सेवन केले असता जर आपल्याला सुख होत असेल, तर त्याच्याकडून कडूपणास कंटाळू नये 924
925-18
फळणया ऐलीकडे । केळीते पाहाता आस मोडे । ऐसी त्यजिली तरी जोडे । तैसे के गोमटे ॥925॥
केळविण्याचे पूर्वी तिच्याकडे पाहून निराश होते; आणि तशा स्थितीतच जर ती तोडून टाकिली, तर तीच पासून उत्तम फळे कोठून प्राप्त होणार ? 925
926-18
तेवी स्वधर्मु सांकडु । देखोनि केला जरी कडु । तरी मोक्षसुरवाडु । अंतरला की ॥926॥
त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे असे म्हणून जर त्याचा त्याग केला तर तो मोक्षसुखाला अंतरलाचकी की ? 926
927-18
आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे । तरी जीये ते नोहे । स्नेह कुऱ्हे की ॥927॥
आणि आपली आई जरी कुरूप असली तरी ज्या तीच्या प्रेमामुळे आपण जगतो, ते तिचे प्रेम काही वाकडे नाही. 927
928-18
येरी जिया पराविया । रंभेहुनि बरविया । तिया काय कराविया । बाळके तेणे ? ॥928॥
एरव्ही दुसऱ्या स्त्रिया जरी रंभेहून सुस्वरूप असल्या तरी बालकाला त्या काय करावयाच्या आहेत ? 928
929-18
अगा पाणियाहूनि बहुवे । तुपी गुण कीर आहे । परी मीना काय होये । असणे तेथ ॥929॥
अरे, पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत, हे खरे; पण माशाला तुपात ठेवले असतो जगेल का ? 929
930-18
पै आघविया जगा जे विख । ते विख किडियाचे पीयूख । आणि जगा गूळ ते देख । मरण तया ॥930॥
हे पहा, जो बचनाग सर्व जगाला विष आहे, तोच त्यातील किड्याला अमृत आहे; आणि गुळ जो साऱ्या जगाला गोड आहे, तोच त्या किड्याला मृत्यु आहे ! 930
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
931-18
म्हणौनि जे विहित जया जेणे । फिटे संसाराचे धरणे । क्रिया कठोर तऱ्ही तेणे । तेचि करावी ॥931॥
म्हणून ज्याला जे विहित कर्म सांगितले आहे की, ज्याच्या आचरणाने संसाराची बंधन तुटते, ते कितीही कष्टसाध्य असले तरी त्याने त्याचे आचरण करावे. 931
932-18
येरा पराचारा बरविया । ऐसे होईल टेंकलया । पायांचे चालणे डोइया । केले जैसे ॥932॥
पण तोच दुसऱ्याचा धर्म उत्तम म्हणून जर त्याचे आचरण केले तर, पायाने चालण्याचे काम डोक्याने केल्याप्रमाणे होऊन उलट ते दु:खाला मात्र कारण होईल. 932
933-18
यालागी कर्म आपुले । जे जातिस्वभावे असे आले । ते करी तेणे जिंतिले । कर्मबंधाते ॥933॥
याकरिता आपल्या जातीस्वभावानुसार आपल्या वाट्यास जे कर्म आलेले आहे, त्याचे जो आचरण करतो, त्याने कर्मबंधला जिंकले; (तो कर्मबंधापासून मुक्त झाला) 933
934-18
आणि स्वधर्मुचि पाळावा । परधर्मु तो गाळावा । हा नेमुही पांडवा । न कीजेचि पै गा ? ॥934॥
आणि म्हणूनच अर्जुना, पर धर्माचा त्याग करून स्वधर्माचेच आचरण करण्याविषयी नियम नको का करावयाला ? 934
935-18
तरी आत्मा दृष्ट नोहे । तव कर्म करणे का ठाये ? । आणि करणे तेथ आहे । आयासु आधी ॥935॥
तर आत्मा जोपर्यंत दृष्ट झाला नाही, तोपर्यंत कर्म करण्याचे राहील काय ? नाही, ते अवश्य केलेच पाहिजे, आणि कर्म करावयाचे म्हटले म्हणजे प्रथम कष्ट आहेत. 935
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।
सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥18. 48॥
936-18
म्हणौनि भलतिये कर्मी । आयासु जऱ्ही उपक्रमी । तरी काय स्वधर्मी । दोषु । सांगे ? ॥936॥
याचकरिता, कोणतेही कर्म केले तरी जर प्रारंभी आयास पडतात, तर स्वधर्माचे आचरण केले असता दोष का लागेल सांगा बरे ? 936
937-18
आगा उजू वाटा चालावे । तऱ्ही पायचि शिणवावे । ना आडराने धावावे । तऱ्ही तेचि ॥937॥
अरे, सरळ वाटेने चालावयाचे झाले, तरी पायालाच शीण द्यावयाचा, आणि आडरानात भटकावयाचे झाले, तरी तीच स्थिती ! 937
938-18
पै शिळा का सिदोरिया । दाटणे एक धनंजया । परी जे वाहता विसांवया । मिळिजे ते घेपे ॥938॥अर्जुना, हे बघ, वाटेने जाताना पदरात शिळा किंवा शिदोरी(फराळाचे) ही दोन्ही जरी बांधली तरी ओझे सारखेच होते; परंतु हे विसाव्याचे (मुक्कामाचे) ठिकाणी सुखकर होईल, तेच घ्यावे.

939-18
येऱ्हवी कणा आणि भूसा । कांडितांही सोसु सरिसा । जेंचि रंधन श्वान मांसा । तेचि हवी ॥939॥
बाकी धान्य आणि भुस कांडताना श्रम सारखेच पडतात; अथवा श्वानाचे मास खाण्याचे किंवा होमाकरिता मास शिजविण्याचे श्रम सारखेच आहेत, 939
940-18
दधी जळाचिया घुसळणा । व्यापार सारिखेचि विचक्षणा । वाळुवे तिळा घाणा । गाळणे एक ॥940॥
हे विचक्षणा, दही किंवा पाणी यांच्या घुसळण्याचे श्रम सारखेच; अथवा वाळू किंवा तिळ घाण्यात गाळण्याचे श्रम सारखेच, 940
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
941-18
पै नित्य होम देयावया । का सैरा आगी सुवावया । फुंकिता धू धनंजया । साहणे तेचि ॥941॥
हे बघ, अर्जुना, नित्य होम देण्याकरिता किंवा एरव्ही विस्तव पेटविण्याचे वेळी धुर हा दोघासही सोसावा लागतोच; 941
942-18
परी धर्मपत्नी धांगडी । पोसिता जरी एकी वोढी । तरी का अपरवडी । आणावी आंगा ? ॥942॥
अथवा लग्नाची बायको किंवा एखादी ठेवलेली स्त्री या दोघींचेही पोषण करण्यास जर सारखाच खर्च लागतो, तर मग एखादी स्त्री जवळ ठेवून अपकीर्तीचा डाग का लावून घ्यावा ? 942
943-18
हा गा पाठी लागला घाई । मरण न चुकेचि पाही । तरी समोरला काई । आगळे न कीजे ? ॥943॥
अरे, पाठीकडच्या बाजूला घाव लागून जर मरण चुकत नाही, तर शत्रुसमोर युद्ध करून मेलो असता मरणाहून अधिक वर्गाची प्राप्ति होणार नाही का ? 43
944-18
कुलस्त्री दांड्याचे घाये । परघर रिगालीहि जरी साहे । तरी स्वपतीते वाये । सांडिले की । ॥944॥
कुलस्त्री दुसऱ्याच्या घरात शिरूनहि जर तिला दांडक्याचा मार, सोसावा लागतो, तर तिने आपला पति व्यर्थ सोडला असे नाही का होत ? 44
945-18
तैसे आवडतेही करणे । न निपजे शिणल्याविणे । तरी विहित बा रे कोणे । बोले भारी ? ॥945॥
त्याप्रमाणे पाहिजे ते कर्म केले असताहि जर दुःख सोसावे लागतं तर बापा, स्वधर्माचरण कठीण असे कोणत्या तोंडाने म्हणता येईल ? 45
946-18
वरी थोडेचि अमृत घेता । सर्वस्व वेचो का पंडुसुता । जेणे जोडे जीविता । अक्षयत्व ॥946॥
हे पंडुसुता, ज्या अमृतसेवनाते अमरत्व प्राप्त होते, त्याच्या अल्प प्राप्तीकरिता हि सर्वत्र का खर्च करू नये ? 46
947-18
येर काह्या मोले वेचूनि । विष पियावे घेऊनि । आत्महत्येसि निमोनि । जाइजे जेणे ॥947॥
आणि ज्या विषाचे सेवन केले असता सर्व सुखांचा नाश होऊन आत्महत्येचे पातकं लागते, ते विकत घेऊन का प्यावे ? 47
948-18
तैसे जाचूनिया इंद्रिये । वेचूनि आयुष्याचेनि दिये । सांचले पापी आन आहे । दुःखावाचूनि ? ॥948॥
त्याप्रमाणे इंद्रियांना शीण देऊन आयुष्याचे दिवस खर्च करून पापाचा संचय केला असता दुःखावाचुन दुसरे फल आहे काय ? 48
949-18
म्हणौनि करावा स्वधर्मु । जो करिता हिरोनि घे श्रमु । उचित देईल परमु । पुरुषार्थराजु ॥949॥
म्हणून स्वधर्माचेच आचरण करावे. तो आपल्या श्रमांचा परिहार करून, उचित अशा परमपुरुषार्थाची—सर्वश्रेष्ठ मोक्षाची प्राप्ति करून देईल49
950-18
याकारणे किरीटी । स्वधर्माचिये राहाटी । न विसंबिजे संकटी । सिद्धमंत्र जैसा ॥950॥
या करिता, ज्याप्रमाणे संक्रटसमयी सिद्धमंत्र विसरु नये, त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण सोडू नये. 950
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
951-18
का नाव जैसी उदधी । महारोगी दिव्यौषधी । न विसंबिजे तया बुद्धी । स्वकर्म येथ ॥951॥
अथवा समुद्रांत पडलेल्याने नाव सोडू नये ? किंवा महारोग्याने दिव्यौषधीचा त्याग करू नये, त्याप्रमाणे स्वकर्माचे आचरण सोडू नये. 51
952-18
मग ययाचि गा कपिध्वजा । स्वकर्माचिया महापूजा । तोषला ईशु तमरजा । झाडा करुनी ॥952॥
मग हे कपिध्वजा; याच सत्कर्मरूप महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर, तम व रज या गुणांचा नाश करून 12
953-18
शुद्धसत्त्वाचिया वाटा । आणी आपुली उत्कंठा । भवस्वर्ग काळकूटा । ऐसे दावी ॥953॥
आपल्या उत्कंठेला शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला लावितो; आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषाप्रमाणे आहेत, असे वाटावयास लावतो. नंतर 53
954-18
जिये वैराग्य येणे बोले । मागा संसिद्धी रूप केले । किंबहुना ते आपुले । मेळवी खागे ॥954॥
पूर्वी वैराग्य या शब्दाने संसिद्धि या शब्दाचे जे वर्णन केले ते आपले वैराग्यरूप स्थान तो मिळवितो. 54
955-18
मग जिंतिलिया हे भोये । पुरुष सर्वत्र जैसा होये । का जालाही जे लाहे । ते आता सांगो ॥955॥
मग ही वैराग्यभूमिका जिंकल्यावर ती त्याची योग्यता होते किंवा पूर्णत्वास पावलेल्या त्या पुरुषाला कशाचा लाभ होतो, ते आता सांगतो. 55

असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः ।
नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ॥18. 49॥
956-18
तरी देहादिक हे संसारे । सर्वही मांडलेसे जे गुंफिरे । तेथ नातुडे तो वागुरे । वारा जैसा ॥956॥
वारा जसा पारध्याच्या जाळ्यात इकडून तिकडे जातांना अडकत नाही, तसा देह आदिकरून जे संसार पाश त्यात तो असून हि सांपडत नाही. 56
957-18
पै परिपाकाचिये वेळे । फळ देठे ना देठु फळे । न धरे तैसे स्नेह खुळे । सर्वत्र होय ॥957॥
हे पहा, पिकलेले फळ जसे देठाला धरीत नाही, किंवा देठहि त्याला धरीत नाही, तसे संसारादिकांवरील सर्व प्रेम निर्जीव होते. (लुळे पडते. ) 57
958-18
पुत्र वित्त कलत्र । हे जालियाही स्वतंत्र । माझे न म्हणे पात्र । विषाचे जैसे ॥958॥
ज्याप्रमाणे विषाचे पात्र माझे आहे असे कोणी म्हणत नाही, त्याप्रमाणे पुत्र, वित्त व स्त्री ही जरी आपल्या इच्छेप्रमाणे वागत असली तरी ती माझी आहेत असे म्हणत नाही. 58
959-18
हे असो विषयजाती । बुद्धि पोळली ऐसी माघौती । पाउले घेऊनि एकांती । हृदयाच्या रिगे ॥959॥
फार काय सांगावे, कढत पदार्थाच्या योगे हातालाः चटका बसतांच जसा हात मनुष्य माग घेतो, तशी त्याची बुद्धि विषयांपासून मागे परतून आत्मविचाराकडे लागते. 59
960-18
ऐसया अंतःकरण । बाह्य येता तयाची आण । न मोडी समर्था भेण । दासी जैसी ॥960॥
ज्याप्रमाणे दासी स्वामीच्या भीतीने त्याची आज्ञा मोडीत नाही, त्याप्रमाणे अंतःकरण विषयाकडे बाहेर येऊन आम्याची शपथ मोडीत नाही. 960
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
961-18
तैसे ऐक्याचिये मुठी । माजिवडे चित्त किरीटी । करूनि वेधी नेहटी । आत्मयाच्या ॥961॥
तसे अर्जुना, ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून त्याला आत्म्याच्या छंदास लावतो; 61
962-18
तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे । निमणे जालेचि आहे । आगी दडपलिया धुये । राहिजे जैसे ॥962॥
त्या वेळेस, जसा अग्नी राखेत पुरला म्हणजे धूर आपोआप राहतो, तशी इहपर विषयांची इच्छा सहजच नष्ट होते. 62
963-18
म्हणौनि नियमिलिया मानसी । स्पृहा नासौनि जाय आपैसी । किंबहुना तो ऐसी । भूमिका पावे ॥963॥
म्हणून मनाचा निग्रह झाला म्हणजे इच्छा आपोआप नाहीशी होते. फार सांगून काय करावयाचे आहे ? अशी भूमिका साधकाला प्राप्त होते. 63
964-18
पै अन्यथा बोधु आघवा । मावळोनि तया पांडवा । बोधमात्रीचि जीवा । ठावो होय ॥964॥
हे बघ अर्जुन, विपरीत बोध सगळा मावळून त्याला खरा बोधच प्राप्त होतो. 64
965-18
धरवणी वेचे सरे । तैसे भोगे प्राचीन पुरे । नवे तव नुपकरे । काहीचि करू ॥965॥
जसे सांचविलेले पाणी रोज खर्च केले म्हणजे ते सरते, तसे प्रारब्धकर्म हे भोगांती सरते आणि अहंकर्तृत्वभावना नसत्यामुळे नवीन कर्म उपन्न होत नाही. 65
966-18
ऐसी कर्मे साम्यदशा । होय तेथ वीरेशा । मग श्रीगुरु आपैसा । भेटेचि गा ॥966॥
अर्जुन, अशाप्रकारे सर्व कर्माची क्षीणदशा झाली म्हणजे मग श्रीगुरूंची आपोआप भेट होते. 66
967-18
रात्रीची चौपाहरी । वेचलिया अवधारी । डोळ्या तमारी । मिळे जैसा ॥967॥
हे पहा, रात्रीचे चार प्रहर संपले म्हणजे अंधकाराचा नाश करणारा जो सूर्य दृष्टीस पडतो 67
968-18
का येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु । श्रीगुरु भेटोनि करी पाडु । बुभुत्सु तैसा ॥968॥
अथवा, फळाचा घड येऊन तो ज्याप्रमाणे केळीची वाढ खुंटवितो, त्याप्रमाणे श्रीगुरु हे भेट्न जिज्ञासूची कर्मकर्तृत्ववाची खटपट बंद करतात. 68
969-18
मग आलिंगिला पूर्णिमा । जैसा उणीव सांडी चंद्रमा । तैसे होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ॥969॥
मग पौर्णिमा प्राप्त झाली म्हणजे ज्याप्रमाणे चंद्राचे ठिकाणी कलेचा कमीपणा मुळीच राहात नाही, त्याप्रमाणे, हे श्रेष्ठवीरा, गुरुकृपा झाली म्हणजे जिज्ञासूला कोणतीहि उणीव राहात नाही. 69
970-18
तेव्हा अबोधुमात्र असे । तो तव तया कृपा नासे । तेथ निशीसवे जैसे । आंधारे जाय ॥970॥
त्या वेळी अज्ञान म्हणून जेवढे असते, तेव्हढे तर त्यांच्या कृपेनेच नष्ट होते, आणि रात्र गेल्यावर अंधार नहीसा होतो, 970
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
971-18
तैसी अबोधाचिये कुशी । कर्म कर्ता कार्य ऐशी । त्रिपुटी असे ते जैसी । गाभिणी मारिली ॥971॥
याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे त्याच्या पोटात जी कर्ता, कर्म आणि कार्य ही त्रिपुटी आहे तीहि नाश पावते. जशी गर्भिणी मारली म्हणजे पोटातला गर्भ निराळा मारावा लागत नाही, तो आपोआपच मरतो. 71
972-18
तैसेचि अबोधनाशासवे । नाशे क्रियाजात आघवे । ऐसा समूळ संभवे । संन्यासु हा ॥972॥
तसा अज्ञानाचा नाश झाला म्हणजे सर्व कर्मांचा नाश होतो. अशा प्रकारे सर्व कमचा समूळ नाश होणे यालाच संन्यास म्हणतात तोच त्याला प्राप्त होतो. 72
973-18
येणे मुळाज्ञानसंन्यासे । दृश्याचा जेथ ठावो पुसे । तेथ बुझावे ते आपैसे । तोचि आहे ॥973॥
त्यामुळे ज्ञानाच्या त्यागाने सर्व दृश्य पदार्थ नष्ट झाले म्हणजे मग जाणावयाचे जे ते तो आपण स्वतःच आहे. 73
974-18
चेइलियावरी पाही । स्वप्नीचिया तिये डोही । आपणयाते काई । काढू जाइजे ? ॥974॥
असे पहा, मनुष्य झोपेतून जागा झाल्यानंतर आपण डोहांत बुडत असल्याच जो त्याला स्वप्नात भ्रम झाला होता, तो ! सत्य मानून त्यातून आपल्याला काढण्याविषयी तो खटपट करील काय ?
975-18
तै मी नेणे आता जाणेन । हे सरले तया दुःस्वप्न । जाला ज्ञातृज्ञेयाविहीन । चिदाकाश ॥975॥
त्याप्रमाणे मला कळत नाही, मी आता समजून घेईन, हे त्याचे दुःस्वप्त नष्ट होते; आणि • ज्ञेय व ज्ञाता हे जाऊन तो केवळ चिदाकाश म्हणजे ज्ञानमात्र होतो. 75
976-18
मुखाभासेसी आरिसा । परौता नेलिया वीरेशा । पाहातेपणेवीण जैसा । पाहाता ठाके ॥976॥
अर्जुना, प्रतिबिंबासहित आरसा दूर नेल्यावर ज्याप्रमाणे पहाणारा हा पहातेपणाशिवाय असतो, 76
977-18
तैसे नेणणे जे गेले । तेणे जाणणेही नेले । मग निष्क्रिय उरले । चिन्मात्रचि ॥977॥
त्याप्रमाणे अज्ञान जे जाते ते एकटे न जाता ज्ञानालाहि घेऊन जाते मग केवळ निष्क्रिय असे ज्ञान मात्र उरतें. 77
978-18
तेथ स्वभावे धनंजया । नाही कोणीचि क्रिया । म्हणौनि प्रवादु तया । नैष्कर्म्यु ऐसा ॥978॥
अर्जुना, या नैष्कर्म्यभूमिकेच्या ठिकाणी स्वभावतः कोणतीच क्रिया नाही, म्हणून त्या स्थितीला नैष्कर्म्यसिद्धि असे म्हणतात. 78
979-18
ते आपुले आपणपे । असे तेचि होऊनि हारपे । तरंगु का वायुलोपे । समुद्रु जैसा ॥979॥
ते आपले स्वरूप असून नसणेपणाच्या ज्ञानामुळे जो असणेपणा येतो तोहि जाऊन केवळ असणेपणा राहातो, तसा वायूच्या उपाधीमुळे उत्पन्न होणाऱ्या लाटा वायु नाहीसा झाला म्हणजे आपोआप पाण्याशी ऐक्य पावतात79
980-18
तैसे न होणे निफजे । ते नैष्कर्म्यसिद्धि जाणिजे । सर्वसिद्धीत सहजे । परम हेचि ॥980॥
तसे कोणतेहि कर्म न होणे अशी जी स्थिति तिला नैष्कर्यसिद्धि म्हणतात आणि हीच साहजिकतः सर्व सिद्धीत मुख्य होय. 980
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
981-18
देउळाचिया कामा कळसु । उपरम गंगेसी सिंधु प्रवेशु । का सुवर्णशुद्धी कसु । सोळावा जैसा ॥981॥
कळस बसल्यावर देवळाच्या कामाचा शेवट होतो; अथवा गंगा समुद्रांत पावली म्हणजे जसे पुढे तिचे नांव रहात नाही; किंवा सोने शुद्ध करीत असता सोळा आणे कस लागला म्हणजे शुद्ध करण्याची क्रिया बंद होते, 81
982-18
तैसे आपुले नेणणे । फेडिजे का जाणणे । तेहि गिळूनि असणे । ऐसी जे दशा ॥982॥
त्याप्रमाणे आपले अज्ञान ज्या ज्ञानाने नाहिसे केले, ते ज्ञानहि जेव्हा नाहिसे होईल, अशी जी स्थिति, 82
983-18
तियेपरते काही । निपजणे आन नाही । म्हणौनि म्हणिपे पाही । परमसिद्धि ते ॥983॥
तिच्यापेक्षां दुसरे काही प्राप्त होणे राहात नाही; म्हणूनतिला परमसिद्धि असे म्हणतात. 83

सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे ।
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥18. 50॥
984-18
परी हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि । श्रीगुरुकृपालब्धि- । काळी पावे ॥984॥
पण जो कोणी एखादा मोठा भाग्यवान् असतो त्याला श्रीगुरूच्या कृपेची जेव्हा प्राप्ति होते तेंव्हा हीच आत्मसिद्धि प्राप्त होते. 84
985-18
उदयताचि दिनकरु । प्रकाशुचि आते आंधारु । का दीपसंगे कापुरु । दीपुचि होय ॥985॥
सूर्य उगवतांच जसा अंधकाराचाच प्रकाश होतो, किंवा दिव्याच्या ज्योतीस कापुर लागतांच तो दिवा होतो, 85
986-18
तया लवणाची कणिका । मिळतखेवो उदका । उदकचि होऊनि देखा । ठाके जेवी ॥986॥
अथवा मिठाचा खडा जसा पाण्यात मिळवितांच जसा जलरूप होऊन राहतो; 86
987-18
का निद्रितु चेवविलिया । स्वप्नेसि नीद वाया । जाऊनि आपणपया । मिळे जैसा ॥987॥
किंवा निजलेल्या मनुष्यास जागे केल्यावर मिथ्या स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो आपल्या मूळस्वरूपाप्रत प्राप्त = होतो, 87
988-18
तैसे जया कोण्हासि दैवे । गुरुवाक्यश्रवणाचि सवे । द्वैत गिळोनि विसंवे । आपणया वृत्ती ॥988॥
तशी दैवयोगाने ज्या कोणीची वृत्ति गुरुवाक्यश्रवणाबरोबर भेदाचा नाश करून स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, 88
989-18
तयासी मग कर्म करणे । हे बोलिजैलचि कवणे । आकाशा येणे जाणे । आहे काई ? । ॥989॥
मग त्याला काही एक कर्म करण्याचे उरते असे कोण म्हणेल ? पहा की, आकाश सर्वत्र भरलेले असल्यामुळे त्याला इकडून तिकडे व तिकडून इकडे येणे जाणे घडते का ? 89
990-18
म्हणौनि तयासि काही । त्रिशुद्धि करणे नाही । परी ऐसे जरी हे काही । नव्हे जया ॥990॥
म्हणून ज्यास आमसिद्धि प्राप्त झाली आहे, त्याला खरोखरच काही एक कर्तव्य उरत नाही, 990
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
991-18
कानावचनाचिये भेटी- । सरिसाचि पै किरीटी । वस्तु होऊनि उठी । कवणि एकु जो ॥991॥
परंतु ज्या कोणी एखाद्या भाग्यवानला गुरूचे वचन कानावर येतांक्षणीच आत्मसाक्षात्कार होते, 91
992-18
येऱ्हवी स्वकर्माचेनि वन्ही । काम्यनिषिद्धाचिया इंधनी । रजतमे कीर दोन्ही । जाळिली आधी ॥992॥
अशा अधिकारी पुरुषाला सोडून एखाद्या मंदाधिकारी साधकांनी स्वकर्मरूप अग्नीमध्ये काम्यकर्म व निषिद्धकर्म या इंधनाने रज व तम हे गुण अगोदर जाळून टाकले, –92
993-18
पुत्र वित्त परलोकु । यया तिहीचा अभिलाखु । घरी होय पाइकु । हेही जाले ॥993॥
नंतर पुत्र, वित्त ( द्रव्य, ) स्वर्गादि लोक या तिहीचा काम (इच्छा ) हा ज्याच्या स्वाधीन देऊन घर सेवक झाला; 93
994-18
इंद्रिये सैरा पदार्थी । रिगता विटाळली होती । तिये प्रत्याहार तीर्थी । न्हाणिली कीर ॥994॥
भिन्न भिन्न निषिद्ध विषयांचे ठायी प्रवेश केल्यामुळे इंद्रिये जी विटाळली होती, ती अष्टांगयोगांतील प्रत्याहाररूपी तीर्थात स्नान घालून पवित्र केली; 94
995-18
आणि स्वधर्माचे फळ । ईश्वरी अर्पूनि सकळ । घेऊनि केले अढळ । वैराग्यपद ॥995॥
आणखी स्वधर्माच्या आचरणाने प्राप्त होणारे फल ईश्वरास अर्पण करून त्याच्या प्रसादाने नाश न पावणारे वैराग्य प्राप्त करून घेतले. 95
996-18
ऐसी आत्मसाक्षात्कारी । लाभे ज्ञानाची उजरी । ते सामुग्री कीर पुरी । मेळविली ॥996॥
अशाप्रकारे, आत्मसाक्षात्काररूप जे ज्ञान, ते होण्याला जी साधने पाहिजेत, ती सर्व सामुग्री मिळविली; 96
997-18
आणि तेचि समयी । सद्गुरु भेटले पाही । तेवीचि तिही काही । वंचिजेना ॥997॥
आणि तशात सद्गुरूंची गाठ पडली व त्यांनीहि प्रतारणा न करिता सम्यग्ज्ञानाचा उपदेश केला; 97
998-18
परी वोखद घेतखेवो । काय लाभे आपला ठावो ? । का उदयजताचि दिवो । मध्यान्ह होय ? ॥998॥
परंतु औषध घेतांक्षणीच तत्काळ रोगाची निवृत्ति होऊन, आपले मूळचे प्रकृतीची स्थिति प्राप्त होते काय ? अथवा प्रातःकाळी सूर्य उगवतांच मध्यान्हकाळ होतो काय ? 98
999-18
सुक्षेत्री आणि वोलटे । बीजही पेरिले गोमटे । तरी आलोट फळ भेटे । परी वेळे की गा ॥999॥
उत्तम जमीन असून पर्जन्यवृष्टि झाली व त्यात उत्तम बीजहि पेरले, म्हणजे त्यास पुष्कळ पीक येते; परंतु अर्जुना, त्याला वेळ लागतो की नाही ? 99
1000-18
जोडला मार्गु प्रांजळु । मिनला सुसंगाचाही मेळु । तरी पाविजे वाचूनि वेळु । लागेचि की ॥1000॥
उत्तम मार्ग असून त्यात सुसंगतीचाहि लाभ झाला, तरी सुद्धां ज्या ठिकाणी आपल्यास जावयाचे असेल त्या ठिकाणी जाण्यास वेळ हा लागावयाचाच, 1000
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1001-18
तैसा वैराग्यलाभु जाला । वरी सद्गुरुही भेटला । जीवी अंकुरु फुटला । विवेकाचा ॥1001॥
त्याप्रमाणे वैराग्यहि प्राप्त झाले, त्यात सद्गुरुंचीही भेट झाली व ज्ञानप्राप्ति करून घेण्याचीही अंत:करणात इच्छा झाली; 1
1002-18
तेणे ब्रह्म एक आथी । येर आघवीचि भ्रांती । हेही कीर प्रतीती । गाढ केली ॥1002॥
मग त्यांच्या उपदेशानं ब्रह्म एक सत्य आहे व त्यावाचून इतर सर्व प्रपंच भ्रांतिरूप आहे, हे ऐकून साधकाचाहि त्याप्रमाणे दृढनिश्चय झाला; 2
1003-18
परी तेचि जे परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम । मोक्षाचेही काम । सरे जेथ ॥1003॥
परंतु असे जे सर्वव्यापक व सर्वोत्तम परब्रह्म, ज्या ठिकणी मोक्ष शब्दहि नाहीसा होतो; 3
1004-18
यया तिन्ही अवस्था पोटी । जिरवी जे गा किरीटी । तया ज्ञानासिही मिठी । दे जे वस्तु ॥1004॥
अर्जुना, साध्य, साधक व साधन ही त्रिपुटी ज्या ज्ञानाने नाहींशी होते असे जे ज्ञान ते ज्या ब्रह्माच्या ठिकाणी लय पावते, 4
1005-18
ऐक्याचे एकपण सरे । जेथ आनंदकणुही विरे । काहीचि नुरोनि उरे । जे काही गा ॥1005॥
जेथे ऐक्याचा एकपणाहि उरत नाही व जेथे आनंदसुखाचा लेशहि उरत नाही व जेथे । काही न उरवून जे उरते, 5
1006-18
तिये ब्रह्मी ऐक्यपणे । ब्रह्मचि होऊनि असणे । ते क्रमेचि करूनि तेणे । पाविजे पै ॥1006॥
असे जे ब्रह्म, त्याब्रम्हाच्या ठिकाणी ऐक्य पावून राहणे ते त्याला मंदाधिकत्वामुळे क्रमानेच प्राप्त होते. 6
1007-18
भुकेलियापासी । वोगरिले षड्रसी । तो तृप्ति प्रतिग्रासी । लाहे जेवी ॥1007॥
क्षुधितापुढे षड्रस अन्नाचे ताट वाहून ठेवलेले असले तरी तो एकदम तृप्त न होता प्रत्येक घासाने तृप्ति वाढत वाढता शेवटल्या घासाला पूर्ण तृप्त होतो, 7
1008-18
तैसा वैराग्याचा वोलावा । विवेकाचा तो दिवा । आंबुथिता आत्मठेवा । काढीचि तो ॥1008॥
त्याप्रमाणे तो साधक वैराग्याच्या आश्रयाने व विवेकरूप दीपाच्या प्रकाशाने आमस्वरूपी ठेव्यास प्राप्त होतो. 8
1009-18
तरी भोगिजे आत्मऋद्धी । येवढी योग्यतेची सिद्धी । जयाच्या आंगी निरवधी । लेणे जाली ॥1009॥
तर आमरूप ऐश्वर्य भोगण्याची ज्या साधकाच्या अंगी खरोखर योग्यता प्राप्त झाली, 9
1010-18
तो जेणे क्रमे ब्रह्म । होणे करी गा सुगम । तया क्रमाचे आता वर्म । आईक सांगो ॥1010॥
तो ज्या क्रमाने ब्रह्मप्राप्ति सुलभ करून घेतो, त्या क्रमाचे वर्म तुला सांगतो, ऐक. 10
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च ।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥18. 51॥
1011-18
तरी गुरु दाविलिया वाटा । येऊन विवेकतीर्थतटा । धुऊनिया मळकटा । बुद्धीचा तेणे ॥1011॥
श्रीगुरुन दाखविलेल्या वाटेने विवेकतीर्थाच्या तीरावर येऊन बुद्धीचा मळ त्याने धुवून टाकतो. 11
1012-18
मग राहूने उगळिली । प्रभा चंद्रे आलिंगिली । तैसी शुद्धत्वे जडली । आपणया बुद्धि ॥1012॥
मग ज्याप्रमाणे राहूने ग्रासलेली चंद्राची प्रभा त्याने सोडल्यावर ती चंद्रास आलिंगन देते, त्याप्रमाणे बुद्धीचा शुद्धपणा जो नानाप्रकाच्या दुर्वासनांनी भ्रष्ट झाला होता, तो शुद्ध होऊन ती आपल्या मूळच्या स्थितीस प्राप्त होते. 12
1013-18
सांडूनि कुळे दोन्ही । प्रियासी अनुसरे कामिनी । द्वंद्वत्यागे स्वचिंतनी । पडली तैसी ॥1013॥
कुलस्त्री जशी दोन्ही कुळांचा अभिमान टाकून केवळ आपल्या प्रियपतीलाच अनुकूल असते, तशी बुद्धि ही द्वैतभावना सोडून आत्मचिंतनांतच रत होते. 13
1014-18
आणि ज्ञान ऐसे जिव्हार । नेवो नेवो निरंतर । इंद्रियी केले थोर । शब्दादिक जे ॥1014॥
ज्ञानासारखी जिव्हाळ्याची वस्तु निरंतर बाहेर विषयाकडे नेउन इंद्रियांनी शब्दादि विषयांची थोरवी वाढविली आहे; 14
1015-18
ते रश्मिजाळ काढलेया । मृगजळ जाय लया । तैसे वृत्तिरोधे तया । पाचाही केले ॥1015॥
पण सूर्याचे किरण नाहीतसे झाले म्हणजे मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते, तसे धैर्याने इंद्रियांच्या वृत्तीचा निरोध केला असता पांचहि विषय आपोआप नाही होतात. 15
1016-18
नेणता अधमाचिया अन्ना । खादलिया कीजे वमना । तैसी वोकविली सवासना । इंद्रिये विषयी ॥1016॥
भ्रष्टाचे अन्न न कळत खाल्यास ते जसे ओकून टाकावे, त्याप्रमाणे ज्याने वासनांसह विषय इंद्रियाकडून ओकविले, 16
1017-18
मग प्रत्यगावृत्ती चोखटे । लाविली गंगेचेनि तटे । ऐसी प्रायश्चित्ते धुवटे । केली येणे ॥1017॥
मग प्रत्यगाभ्याकडे त्यांना लावून आमरूप गंगेच्या तीरावर त्यांच्याकडून उत्तम प्रायश्चित्ते करविली 17
1018-18
पाठी सात्विके धीरे तेणे । शोधारली तिये करणे । मग मनेसी योगधारणे । मेळविली ॥1018॥
नंतर सात्विक धैर्याने ती सर्व इंद्रिये शुद्ध केली आणि मनाला योगाभ्यास करण्यास लावले. 18
1019-18
तेवीचि प्राचीने इष्टानिष्टे । भोगेंसी येउनी भेटे । तेथ देखिलियाही वोखटे । द्वेषु न करी ॥1019॥
त्याचप्रमाणे पूर्वकर्माच्या योगाने चांगले किंवा वाईट भोग प्राप्त झाले असता त्यातील वाईट भोगाविषयी द्वेष करीत नाही; 19
1020-18
ना गोमटेचि विपाये । ते आणूनि पुढा सूये । तयालागी न होये । साभिलाषु ॥1020॥
अथवा सहज चांगला भोग भोगण्याचा समय आला असता त्याविषयी अभिलाष धरीत नाही. 1020
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1021-18
यापरी इष्टानिष्टी । रागद्वेष किरीटी । त्यजूनि गिरिकपाटी । निकुंजी वसे ॥1021॥
(विविक्तसेवी) – ह्याप्रमाणे अर्जुना, इष्टानिष्ट भोगां-विषयींचा रागद्वेष सोडून तो पर्वताच्या गुहेत अथवा निर्जन अशा एकांतस्थानी वास करितो 21

विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥18. 52॥
1022-18
गजबजा सांडिलिया । वसवी वनस्थळिया । अंगाचियाचि मांदिया । एकलेया ॥1022॥
जेथे मुळीच गलबला नाही अशा निर्जन वनांत, केवळ स्वतःचे शरीर हाच एक सोबती असा तो रहातो. 22
1023-18
शमदमादिकी खेळे । न बोलणेचि चावळे । गुरुवाक्याचेनि मेळे । नेणे वेळु ॥1023॥
इंद्रियांचा शमदम करणे हीच त्याची क्रीडा; मौन धारण करून असणे हाच त्याचा वाग्व्यवहार; असे असून गुरुपदेश चितनांत वेळ कसा व केव्हा गेला हेही त्यास समजत नाही. 23
1024-18
आणि आंगा बळ यावे । नातरी क्षुधा जावे । का जिभीचे पुरवावे । मनोरथ ॥1024॥
(लघ्वाशी) शरीर बलिष्ठ व्हावे किंवा क्षुधा अल्पही राहू नये, किंवा जिभेचे लाड पुरवावे; 24
1025-18
भोजन करितांविखी । यया तिहीते न लेखी । आहारी मिती संतोषी । माप न सूये ॥1025॥
ह्या तिन्ही गोष्टींकडे त्याचे लक्ष नसते; संतोष रहावा (समाधानभंग होऊ नये) हेच त्याचे आहाराचे प्रमाण; अमुक खावेच असे त्याचे माप नसते. 25
1026-18
अशनाचेनि पावके । हारपता प्राणु पोखे । इतुकियाचि भागु मोटके । अशन करी ॥1026॥
जठराग्नि शांत असला (क्षधा निवारण झाली) म्हणजे प्राणांचे रक्षण किंवा समाधान असते इतक्याच बेताने त्याचा आहार असतो. 26
1027-18
आणि परपुरुषे कामिली । कुळवधू आंग न घाली । निद्रालस्या न मोकली । आसन तैसे ॥1027॥
(यतवाक्कायमानसः) आणि परपुरुषाने इच्छा दर्शविली असता कुलवधू जशी त्यास केव्हांही वश होत नाही, तसे ज्याचे आसन (बैठक) निद्रा व आलस्य यांच्या केव्हांही ताब्यात जात नाही. 27
1028-18
दंडवताचेनि प्रसंगे । भुयी हन अंग लागे । वाचूनि येर नेघे । राभस्य तेथ ॥1028॥
नमस्कार करण्याच्या प्रसंगींच (साष्टांग) ज्याचे शरीर भुईला लागते; एऱ्हवी वाटेल त्या प्रसंगी अविचाराने जो कधीही आडवा होत नाही. 28
1029-18
देहनिर्वाहापुरते । राहाटवी हातांपायाते । किंबहुना आपैते । सबाह्य केले ॥1029॥
देहधारण अथवा निर्वाह ह्यांना आवश्यक इतकाच हातापायांचा करितो किंबहुना कमेंद्रिये, मन आदि सर्व त्याने स्वाधीन ठेविली आहेत. 29
1030-18
आणि मनाचा उंबरा । वृत्तीसी देखो नेदी वीरा । तेथ के वाग्व्यापारा । अवकाशु असे ? ॥1030॥
आणि अर्जुना, ज्याच्या वृत्तीला मनाच्या उंबऱ्यापर्यंतही (हद्दीपर्यंतही) येण्याची बोली नाही, (सोय) तेथे बोलणे चालणे वगैरे व्यापारांन अवकाश कोठचा असणार ? 1030
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1031-18
ऐसेनि देह वाचा मानस । हे जिणौनि बाह्यप्रदेश । आकळिले आकाश । ध्यानाचे तेणे ॥1031॥
(ध्यान) अशाप्रकारे शरीर, वाचा व मन ह्यांच्या बाह्य व्यापारांस जिंकून ज्याने ध्यान आपल्या स्वाधीन करून घेतले. 31
1032-18
गुरुवाक्ये उठविला । बोधी निश्चयो आपुला । न्याहाळी हाती घेतला । आरिसा जैसा ॥1032॥
गुरुवाक्योपदेशाने झालेला आत्मनिश्चय, आरशांत मुख पहावे त्याप्रमाणे, त्यांच्याच बोधवाक्यरूप आरशांत पडताळून पहातो. 32
1033-18
पै ध्याता आपणचि परी । ध्यानरूप वृत्तिमाझारी । ध्येयत्वे घे हे अवधारी । ध्यानरूढी गा ॥1033॥
ध्यान करणारा आपणच असूनही आपल्या ध्यानरूप वृत्तीमध्ये ध्येयत्वाने आपल्याच पुढे घेतो, असा त्याच्या ध्यानाचा प्रकार असतो. 33
1034-18
तेथ ध्येय ध्यान ध्याता । यया तिही एकरूपता । होय तव पंडुसुता । कीजे ते गा ॥1034॥
ते ध्यान अर्जुना, ध्याता, ध्यान आणि ध्येय ह्या त्रिपुटीचा लय होऊन त्यांना एकरूपता येईतोपर्यंत ते करावे लागत. 34
1035-18
म्हणौनि तो मुमुक्षु । आत्मज्ञानी जाला दक्षु । परी पुढा सूनि पक्षु । योगाभ्यासाचा ॥1035॥
(योगपरः) म्हणून (अशाप्रकारच्या ध्यानसिद्धीसाठीं) तो आत्मज्ञाना विषयी दक्ष असणारा मुमुक्षु योगाभ्यासाचा आश्रय करितो. 35
1036-18
अपानरंध्रद्वया । माझारी धनंजया । पार्ष्णी पिडूनिया । कांवरुमूळ ॥1036॥
अर्जुना, गुद व उपस्थ या दोन द्वारांमधील जी शिवण आहे तिचा मध्य, टांचेने दाबून मूळबंध करितो. 36
1037-18
आकुंचूनि अध । देऊनि तिन्ही बंध । करूनि एकवद । वायुभेदी ॥1037॥
अधोभाग आकुंचन करून, व मूळबंधादि तिन्ही बंध देऊन, आणि प्राणापानादि निरनिराळे वायु एकत्र करून, 37
1038-18
कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकाशूनि । आधारादि भेदूनि । आज्ञावरी ॥1038॥
कुंडलिनी जागी करून, सुषुम्ना नाडीचा विकास करून, आधारचक्रापासून तो आज्ञाचक्रापर्यंत चक्रांचे भेदन करून ऊर्ध्व जातो 38
1039-18
सहस्त्रदळाचा मेघु । पीयुषे वर्षोनि चांगु । तो मूळवरी वोघु । आणूनिया ॥1039॥
मग ब्रह्मरंध्रांतील सहस्रदलकमलरूपी मेघांपासून अमृतवृष्टि होते, तो अमृतवर्षाव मूलाधारचक्रापर्यंत आणून, 39
1040-18
नाचतया पुण्यगिरी । चिद्भैरवाच्या खापरी । मनपवनाची खीच पुरी । वाढूनिया ॥1040॥
आज्ञाचक्ररूपी पर्वतावर संचार करणाच्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षापात्रांत मन व प्राण ह्यांची ऐक्यरूपी खिचडी वाढून. 1040
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1041-18
जालिया योगाचा गाढा । मेळावा सूनि हा पुढा । ध्यान मागिलीकडा । स्वयंभ केले ॥1041॥
अशाप्रकारे हा योगसाधनांचा बळकट मेळावा पुढे करून त्यायोगे ध्यान निश्चित करितो. 41
1042-18
आणि ध्यान योग दोन्ही । इये आत्मतत्वज्ञानी । पैठा होआवया निर्विघ्नी । आधीचि तेणे ॥1042॥
(वैराग्य) आणि ध्यान योग हे दोन्ही निविघ्नपणे आत्मतत्त्वज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याच्या अगोदर, 42
1034-18
वीतरागतेसारिखा । जोडूनि ठेविला सखा । तो आघवियाचि भूमिका- । सवे चाले ॥1043॥
जो वैराग्यासारखा मित्र जोडून ठेविला असतो तो सर्व भूमिकांवर साधकाचा सांगाती असतो. 43
1044-18
पहावे दिसे तंववरी । दिठीते न संडी दीप जरी । तरी के आहे अवसरी । देखावया ॥1044॥
पहावयाची असलेली वस्तु दिसेपर्यंत जर दिव्याचे सहाय्य असेल तर ती वस्तु प्राप्त होण्यास कितीसा अवकाश लागणार ? 44
1045-18
तैसे मोक्षी प्रवर्तलया । वृत्ती ब्रह्मी जाय लया । तव वैराग्य आथी तया । भंगु कैचा । ॥1045॥
त्याप्रमाणे मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करणाच्या साधकाची वृत्ति ब्रह्मवस्तूमध्ये लय पावेपर्यंत तिला वैराग्याची जोड असेल, तर त्याच्या मोक्षप्राप्तीला प्रतिबंध कसला ? 45
1046-18
म्हणौनि सवैराग्यु । ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु । करूनि जाला योग्यु । आत्मलाभा ॥1046॥
म्हणून, जो भाग्यवान् वैराग्यासह ज्ञानाभ्यासाला लागला, तो आत्मलाभाला योग्य होतो. 46
1047-18
ऐसी वैराग्याची आंगी । बाणूनिया वज्रांगी । राजयोगतुरंगी । आरूढला ॥1047॥
असे वैराग्याचे मजबूत कवच अंगावर घेऊन जो राजयोगरूपी अश्वावर आरोहण करितो. 47
1048-18
वरी आड पडिले दिठी । साने थोर निवटी । ते बळी विवेकमुष्टी । ध्यानाचे खांडे ॥1048॥
शिवाय, जे दृश्य दृष्टीस पडेल, त्यातील लहान, थोर असा भेद निवारण करण्यासाठी विवेकरूप मुष्टींत ध्यानरूप तीक्ष्ण खड्ग घेतो. 48
1049-18
ऐसेनि संसाररणाआंतु । आंधारी सूर्य तैसा असे जातु । मोक्षविजयश्रीये वरैतु । होआवयालागी ॥1049॥
ह्याप्रमाणे, अंधकारांत जसा सूर्याने प्रवेश करावा, तसा मोक्षरूपी विजयश्रीला माळ घालण्यासाठी हा साधक संसाररूपी रणांगणात (निःशंक) प्रवेश करितो. 49

अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥18. 53॥
1050-18
तेथ आडवावया आले । दोषवैरी जे धोपटिले । तयांमाजी पहिले । देहाहंकारु ॥1050॥
(अहंकार) तो अशा विश्वासाने चालला असता, त्याला अडविण्यासाठी जे दोषरूप शत्रू मध्ये आले, त्यांचा त्याने समाचार घेतला; त्यातील पहिला वैरी देहाहंकार हा होय. 1050
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1051-18
जो न मोकली मारुनी । जीवो नेदी उपजवोनि । विचंबवी खोडा घालुनी । हाडांचिया ॥1051॥
जो अहंकार, मनुष्याला मारूनही टाकीत नाही किंवा सुखाने जगू ही देत नाही; तर, देहरूपी अस्थिपंजरांत जीवाला अडकवून त्याची कुचंबणा मात्र करितो. 51
1052-18
तयाचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि घेतला तो वीरा । आणि बळ हा दुसरा । मारिला वैरी ॥1052॥
त्या अहंकाराचे वसतिस्थान जो देहरूप किल्ला तो हस्तगत करून घेतो, (देहबुद्धिबाधित करितो) व दुसरा वैरी जो (बल) त्याचाही नाश करतो. 52
1053-18
जो विषयाचेनि नांवे । चौगुणेही वरी थांवे । जेणे मृतावस्था धावे । सर्वत्र जगा ॥1053॥
जो बलरूप शत्रु, विषयाचे नुसते नांव घेतांच चौपटीपेक्षां वाढतो, व ज्याच्या योगे सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते. 53
1054-18
तो विषय विषाचा अथावो । आघविया दोषांचा रावो । परी ध्यानखड्गाचा घावो । साहेल कैचा ? ॥1054॥
तो बलरूपी शत्रु विषयरूपी विषांचा डोह असून सर्व दोषांचा राजा आहे, तरीही ध्यानरूपी तलवारीचा वार सहन करण्याचे त्याला सामर्थ्य कोठले असणार ? 54
1055-18
आणि प्रिय विषयप्राप्ती । करी जया सुखाची व्यक्ती । तेचि घालूनि बुंथी । आंगी जो वाजे ॥1055॥
आणि (दर्प) आवडीच्या विषयाची प्राप्ति झाली म्हणजे त्याला जे सुख होते, त्या सुखाचीच खोळ अंगावर घेऊन जो बढाई मारू लागतो. 55
1056-18
जो सन्मार्गा भुलवी । मग अधर्माच्या आडवी । सूनि वाघा सांपडवी । नरकादिका ॥1056॥
ज्याने सन्मार्गाचे आकलन होऊ शकत नाही व जो अधर्माच्या अरण्यात नेऊन नरकरूपी व्याघ्रांच्या जबड्यात अचुक नेऊन घालतो, 56
1057-18
तो विश्वासे मारिता रिपु । निवटूनि घातला दर्पु । आणि जयाचा अहा कंपु । तापसांसी ॥1057॥
असा विश्वास देऊन घात करणारा वैरी जो दर्प त्याचे निर्दालन केले; आणि (काम) ज्याचे नांव ऐकताच तपस्व्यांनाही भीतीने कंप सुटतो. 57
1058-18
क्रोधा ऐसा महादोखु । जयाचा देखा परिपाकु । भरिजे तव अधिकु । रिता होय जो ॥1058॥
व ज्या कामाचे पर्यवसान अखेर क्रोधासारख्या महादोषांत होते व ज्याचा स्वभाव असा आहे की त्याची जो जो पूर्ती करावी तो तो त्याची तृष्णा वाढतच जाते. 58
1059-18
तो कामु कोणेच ठायी । नसे ऐसे केले पाही । की तेचि क्रोधाही । सहजे आले ॥1059॥
अशा त्या कामाचे ज्याने समूळ निर्दालन केले आहे व ज्या कारणनाशामुळे त्याचे कार्य जो क्रोध त्याचीही सहज तीच गति झाली. 59
1060-18
मुळाचे तोडणे जैसे । होय का शाखोद्देशे । कामु नाशलेनि नाशे । तैसा क्रोधु ॥1060॥
वृक्षाचं मूळ तोडण्यात शाखांनी मरावे हा हेतु असतो. तसा कामाच्या नाशाने त्याच्या शाखेसारखा असलेला क्रोधही नाश पावतो. 1060
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1061-18
म्हणौनि काम वैरी । जाला जेथ ठाणोरी । तेथ सरली वारी । क्रोधाचीही ॥1061॥
म्हणून जेथे काम ह्या शत्रूचा नाश होऊन गेला, तेथे क्रोधाची येरझार सहजच बंद पडणार. 61
1062-18
आणि समर्थु आपुला खोडा । शिसे वाहवी जैसा होडा । तैसा भुंजौनि जो गाढा । परीग्रहो ॥1062॥
(परिग्रह) आणि ज्याप्रमाणे खोड्याची शिक्षा ज्याला द्यावयाची असेल, त्याजकडूनच डोक्यावर तो खोडा अधिकारी निश्चयैकरून वाहवितात, त्याप्रमाणे जीवांना भोग देऊनच पुन्हा त्या भोगेच्छेच्या पायी त्यांना संकटांत टाकणारा असा परिग्रह हा गाढा शत्रु आहे. 62
1063-18
जो माथांचि पालाणवी । अंगा अवगुण घालवी । जीवे दांडी घेववी । ममत्वाची ॥1063॥
त्याप्रमाणे हा परिग्रह आपले खोगीर जीवांच्या माथ्यावर ठेवून, त्याच्यात अनेक अवगुण उत्पन्न करितो व त्यांना हातात ममत्वाची काठी टेक्यासाठी घ्यावयास लावित. 63
1064-18
शिष्यशास्त्रादिविलासे । मठादिमुद्रेचेनि मिसे । घातले आहाती फांसे । निःसंगा जेणे ॥1064॥
हा शिष्य समुदाय माझा, हे ग्रंथ माझे, असा अभिनिवेशाचा खेळ खेळून, त्याचप्रमाणे, हा मठ माझा येथे योगाभ्यास होतो, वगैरे मिशानी हा परिग्रहशत्रु निःसंग अशा वैराग्यशील जीवांनाही फशी पाडतो. 64
1065-18
घरी कुटुंबपणे सरे । तरी वनी वन्य होऊनि अवतरे । नागवीयाही शरीरे । लागला आहे ॥1065॥
कुटुंबीयांच्या त्यागने तेथील परिग्रहादि व्यवहार संपला, तरी वनांत गेल्यावर वन्य पदार्था विषय ममत्व उत्पन्न करितो. अशाप्रकारेंत्याने अगद उघडचा नागड्या लोकांनाही सोडले नाही. 65
1066-18
ऐसा दुर्जयो जो परीग्रहो । तयाचा फेडूनि ठावो । भवविजयाचा उत्साहो । भोगीतसे जो ॥1066॥
अस दुर्जय जो परिग्रह शत्रू त्याचा पार नायनाट करून ज्याने संसार अजूवर विजय मिळविण्याचा उत्साह चित्तांत धरिला आहे. 66
1067-18
तेथ अमानित्वादि आघवे । ज्ञानगुणाचे जे मेळावे । ते कैवल्यदेशीचे आघवे । रावो जैसे आले ॥1067॥
अशा स्थितांत, त्याच्या भेटीला अमानित्वादि ज्ञानगुणांचे समुदाय हेच कोणी जणु मोक्षदेशाचे मांडलिक राजे त्याजपाशी येतात. 67
1068-18
तेव्हा सम्यक्‌ज्ञानाचिया । राणिवा उगाणूनि तया । परिवारु होऊनिया । राहत आंगे ॥1068॥
व त्या साधकाला यथार्थ ब्रह्मात्मैक्यज्ञान हेच एक सार्वभौमराज्य अर्पण करून अमानित्वादि गुण आपण स्वतः त्याचे सेवक होऊन रहातात. 68
1069-18
प्रवृत्तीचिये राजबिदी । अवस्थाभेदप्रमदी । कीजत आहे प्रतिपदी । सुखाचे लोण ॥1069॥
तो साधक प्रवृत्तीच्या राजमार्गाने आक्रमण करीत असता, जाग्रदादि तीन अवस्थारूपी प्रमदा (तरुण स्त्रिया) त्याजवरून पदोपदी सुखाचे निबलोण उतरून टाकितात. 69
1070-18
पुढा बोधाचिये कांबीवरी । विवेकु दृश्याची मांदी सारी । योगभूमिका आरती करी । येती जैसिया ॥1070॥
अशा त्या साधक सार्वभौमापुढे, विवेकरूप चोपदार हातातील बोधरूप दंडाने दृश्याची गर्दी मोडीत चालतो. (दृश्याचा बाध करितो) व योगभूमिका जणू त्यास आरती घेऊनच सामोऱ्या येतात. 1070
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1071-18
तेथ ऋद्धिसिद्धींची अनेगे । वृंदे मिळती प्रसंगे । तिये पुष्पवर्षीं आंगे । नाहातसे तो ॥1071॥
त्याप्रसंगी, ऋद्धिसिद्धींचे अनेक समुदाय तेथे प्राप्त होतात व त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीने तो जणू काही स्नानच करीत असतो. 71
1072-18
ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखे । स्वराज्य येता जवळिके । झळंबित आहे हरिखे । तिन्ही लोक ॥1072॥
ह्याप्रमाणे, ब्रम्हैक्यज्ञानासारखा स्वराज्यप्राप्तीच योग जवळ येत असता त्याचा हर्ष त्रिभुवनात मावत नाही. 72
1073-18
तेव्हा वैरिया का मैत्रिया । तयासि माझे म्हणावया । समानता धनंजया । उरेचिही ना ॥1073॥
तशा स्थितीत हा माझा शत्रु, हा माझा मित्र, किंवा दोघे सारखेच इतके म्हणण्यापुरतेही त्याच्यापुढे द्वैत उरत नाही. 73
1074-18
हे ना भलतेणे व्याजे । तो जयाते म्हणे माझे । ते नोडवेचि का दुजे । अद्वितीय जाला ॥1074॥
इतकेच नव्हे तर, कोणत्याही निमित्ताने त्याने ज्याला “माझे “ असे म्हणावे, एवढे देखील द्वैतपणाने (सत्यत्वाने) त्याच्यापुढे उरत नाही. कारण, तो अद्वितीय ब्रह्मरूपच झालेला असतो. 74
1075-18
पै आपुलिया एकी सत्ता । सर्वही कवळूनिया पंडुसुता । कही न लगती ममता । धाडिली तेणे ॥1075॥
त्याच्या सर्वात्मभावापुढे विश्वाला पृथक् अशी सत्ताच उरत नसल्याने ममत्वाला कोठे अवसरच नसतो; मग ममता उरणारच कशी ? 75
1076-18
ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु । अपमानिलिया हे जगु । अपैसा योगतुरंगु । स्थिर जाला ॥1076॥
ह्याप्रमाणे शत्रुसमुदायाला (अहंकारादि) जिंकून, सर्वात्मभावाने जगताचा पारमार्थिक अभाव पटल्यावर त्याच्या राजयोगरूप अश्वाची धाव सहजच थांबते 76
1077-18
वैराग्याचे गाढले । अंगी त्राण होते भले । तेही नावेक ढिले । तेव्हा करी ॥1077॥
(संसारशत्रूशी झुंजण्यासाठी) अंगांत जे वैराग्याचे मजबूत चिलखत घातलेले होते तेही (आत्म-बोधानंतर ) क्षणभर ढिले केले जातं. (अगर होते) 77
1078-18
आणि निवटी ध्यानाचे खांडे । ते दुजे नाहीचि पुढे । म्हणौनि हातु आसुडे । वृत्तीचाही ॥1078॥
आणि ज्या ध्यानखड्गाने द्वैत नाश करण्याचे योजिले होते, ते द्वैतच बोधोत्तर पुढे येत नसल्यामुळे त्या ध्यानाच्या वृत्तीलाही मांद्य येते. 78
1079-18
जैसे रसौषध खरे । आपुले काज करोनि पुरे । आपणही नुरे । तैसे होतसे ॥1079॥
जसे खरे रसायन रोगबीज नष्ट करून आपणही शरीरत उरत नाही, तशी (साधनांची) स्थिति होते. 79
1080-18
देखोनि ठाकिता ठावो । धावता थिरावे पावो । तैसा ब्रह्मसामीप्ये थावो । अभ्यासु सांडी ॥1080॥
मुक्कामाचे ठिकाण जवळ आलेले दिसतांच, जलद पडणारे जसे पाऊल मंदावते, त्याप्रमाणे ब्रह्मसामीप्यस्थितीची जाणीव होताच तत्प्राप्त्यर्थ चाललेले) सर्व अभ्यास ढिले पडतात1080
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1081-18
घडता महोदधीसी । गंगा वेगु सांडी जैसी । का कामिनी कांतापासी । स्थिर होय ॥1081॥
समुद्राची भेट झाल्यावर जसा गंगेचा प्रवाह थांबतो किंवा कांतसमागमांत कामिनी जशी अचल (शांत) होते. 81
1082-18
नाना फळतिये वेळे । केळीची वाढी मांटुळे । का गावापुढे वळे । मार्गु जैसा ॥1082॥
केळ व्याली (फलवती झाली) म्हणजे तिची वाढ जशी खुंटते किवा गाव आला म्हणजे मार्ग जसा संपतो. 82
1083-18
तैसा आत्मसाक्षात्कारु । होईल देखोनि गोचरु । ऐसा साधनहतियेरु । हळुचि ठेवी ॥1083॥
याप्रमाणे, आत्मसाक्षात्कार होण्याचा समय जाणतांच, साधनरूप हत्यारे हळूच बाजूस सारतो. 83
1084-18
म्हणौनि ब्रह्मेंसी तया । ऐक्याचा समो धनंजया । होतसे तै उपाया । वोहटु पडे ॥1084॥
म्हणून, अर्जुना, त्याला ब्रह्मस्थिति बाणू लागण्याच्या वेळी, साधनांना ओहोटी लागते. (शिथिल, कमी होतात. ) 84
1085-18
मग वैराग्याची गोंधळुक । जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य । योगफळाचाही परिपाक । दशा जे का ॥1085॥
मग, वैराग्याची सांजवेळ, (मावळती दशा) ज्ञानाभ्यासाची वृद्धावस्था, (दृढपणा) योगफलाची परिपूर्णावस्था, अशी स्थिति, 85
1086-18
ते शांति पै गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा । तै ब्रह्म होआवया जोगा । होय तो पुरुषु ॥1086॥
जी शान्ति, ती हे अर्जुना, त्याचे ठिकाणी संपूर्णतया बाणते, व मग तो साधक ब्रह्मरूप होण्याच्या योग्यतेचा होतो. 86
1087-18
पुनवेहुनी चतुर्दशी । जेतुले उणेपण शशी । का सोळे पाऊनि जैसी । पंधरावी वानी ॥1087॥
तेव्हां, पौणिमेचा पूर्ण चंद्र व चतुर्दशीचा चंद्र ह्यांच्या कलांत जितका फरक असतो, अथवा सोळाकशी सोन्यापेक्षां पंधराकशी सोने जितक्या अंशाने कमी भावचे असते. 87
1088-18
सागरीही पाणी वेगे । संचरे ते रूप गंगे । येर निश्चळ जे उगे । ते समुद्रु जैसा ॥1088॥
गंगेने समुद्रात प्रवेश केल्यावर, तिचा वेग दृष्टीला अगर स्पर्शाला जेथवर जाणवतो तेथवर तिला गंगापण आहे; जेथे अस फरक जाणवत नाही तेथे ती समुद्र झाली असे समजावे. 88
1089-18
ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये । योग्यते तैसा पाडु आहे । तेचि शांतीचेनि लवलाहे । होय तो गा ॥1089॥
याप्रमाणे ब्रह्मरूप झालेला व ब्रह्मरूप होण्याच्या स्थितीत असलेला ह्यात अंतर आहे; ते अंतर शांतीच्या योगे तो तोडतो. 89
1090-18
पै तेचि होणेनवीण । प्रतीती आले जे ब्रह्मपण । ते ब्रह्म होती जाण । योग्यता येथ ॥1090॥
कारण, ब्रह्म व्हावयाचे नसते, तर, ब्रह्मरूपच आपण केव्हाही आहो व मुळचे होतो अशी जी प्रतीति, तीच त्याची ब्रह्म होण्याची योग्यता असे तू समज. 1090
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति ।
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ॥18. 54॥
1091-18
ते ब्रह्मभावयोग्यता । पुरुषु तो मग पंडुसुता । आत्मबोधप्रसन्नता- । पदी बैसे ॥1091॥
अर्जुना, ती ब्रह्मभावाची योग्यता पावलेला पुरुष, आत्मबोधप्रसन्नतेच्या पदावर सहजच आरूढ होतो. 91
1092-18
जेणे निपजे रससोय । तो तापुही जै जाय । तै ते का होय । प्रसन्न जैसी ॥1092॥
ज्या अग्निसहाय्याने पाकसिद्ध होते, ती उष्णता मुरली म्हणजे ते अन्न जसे रुचीस व प्रसन्नतेस कारण होते. 92
1093-18
नाना भरतिया लगबगा । शरत्काळी सांडिजे गंगा । का गीत रहाता उपांगा । वोहटु पडे ॥1093॥
किंवा शरद् ऋतूत, गंगेचा पावसाळयातील चढ उतार जसा थांबतो अथवा गायनसमाप्तीनंतर, तत्प्रीत्यर्थ आणलेल उपकरणे जशी आपोआप बाजूस रहातात 93
1094-18
तैसा आत्मबोधी उद्यमु । करिता होय जो श्रमु । तोही जेथे समु । होऊनि जाय ॥1094॥
त्याचप्रमाणे आत्मज्ञानप्राप्तीकरिता केलेल्या साधनादि उद्योगाने जो श्रम होतो त्याचाही त्या प्रसन्नतेमुळे परिहार होतो. 94
1095-18
आत्मबोधप्रशस्ती । हे तिये दशेची ख्याती । ते भोगितसे महामती । योग्यु तो गा ॥1095॥
अशा स्थितीलाच आत्मबोधाची प्रसन्नता असे म्हणतात; व ती भोगण्याची असा जो योगी साधक, त्याचीच अर्जुना, योग्यता आहे. 95
1096-18
तेव्हा आत्मत्वे शोचावे । काही पावावया कामावे । हे सरले समभावे । भरिते तया ॥1096॥
ज्याची वृत्ति साम्यभावाने (विषमता-रहित) परिपूर्ण आहे, असा तो योगी, अमुक एक गोष्ट माझी होती म्हणून तिजबद्दल शोक करील अगर अमुक एक गोष्ट मला असावी असे इच्छील, ह्या दोन्ही गोष्टी संभवत नाहीत. (संपतात) 96
1097-18
उदया येता गभस्ती । नाना नक्षत्रव्यक्ती । हारवीजती दीप्ती । आंगिका जेवी ॥1097॥
सूर्योदय होताच, नाना नक्षत्रे आपापले तेज जसे टाकतात ( निस्तेज होतात). 97
1098-18
तेवी उठतिया आत्मप्रथा । हे भूतभेदव्यवस्था । मोडीत मोडीत पार्था । वास पाहे तो ॥1098॥
त्याप्रमाणे अपरोक्ष आत्मानुभवाच्या उदयाबरोबर, त्याच्या दृष्टीने भूतांतील भेदभाव लयास जाऊन, त्याला सर्वत्र आत्मदर्शनच होत असते. 98
1099-18
पाटियेवरील अक्षरे । जैसी पुसता येती करे । तैसी हारपती भेदांतरे । तयाचिये दृष्टी ॥1099॥
पाटीवरील अक्षरे जशी हाताने पुसली जातात, तसा, त्याच्या दृष्टीने वस्तूवस्तूंमधील भेदभाव नाहीसा होतो. 99
1100-18
तैसेनि अन्यथा ज्ञाने । जिये घेपती जागरस्वप्ने । तिये दोन्ही केली लीने । अव्यक्तामाजी ॥1100॥
त्याप्रमाणे, अज्ञानाच्या विक्षेपशक्तीने दाखविलेल्या ज्या जागर व स्वप्न ह्या अवस्था त्या त्यांचे कारण जे अव्यक्त (अज्ञान) त्यात प्रथम लीन होतात. 1100
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1101-18
मग तेही अव्यक्त । बोध वाढता झिजत । पुरला बोधी समस्त । बुडोनि जाय ॥1101॥
मग ते आज्ञानही जशी जशी बोधाची स्पष्टता व दृढत होईल तसे क्षीण होत जाऊन अखेर पूर्णबोधकाळी नाहीसे होते. 1
1102-18
जैसी भोजनाच्या व्यापारी । क्षुधा जिरत जाय अवधारी । मग तृप्तीच्या अवसरी । नाहीच होय ॥1102॥
भोजन करू लागले असता, प्रत्येक ग्रासाबरोबर क्षुधा जशी हरत जाते व अखेर तृप्ति झाल्यावर नाहीशीच होते 2
1103-18
नाना चालीचिया वाढी । वाट होत जाय थोडी । मग पातला ठायी बुडी । देऊनि निमे ॥1103॥
किंवा, आपण जितकी मजल चालावी तितकी वाट कमी कमी होऊन अखेर प्राप्तस्थानावर जशी मुळीच खुंटते. 3
1104-18
का जागृति जव जव उद्दीपे । तव तव निद्रा हारपे । मग जागीनलिया स्वरूपे । नाहीच होय ॥1104॥
किंवा जसा जसा जागा होत जाईल, तसे तसे निद्रेचे आवरण कमी होते व पूर्ण जागृति आल्यावर ती निद्रा मुळीच जाते. 4
1105-18
हे ना आपुले पूर्णत्व भेटे । जेथ चंद्रासी वाढी खुंटे । तेथ शुक्लपक्षु आटे । निःशेषु जैसा ॥1105॥
हे दृष्टांत राहूद्या; पौणिमेला चंद्र पूर्णकलायुक्त झाला म्हणजे त्याची वाढ संपते व तेथे शुक्लपक्षही जसा निःशेष संपतो. 5
1106-18
तैसा बोध्यजात गिळितु । बोधु बोधे ये मज आंतु । मिसळला तेथ साद्यंतु । अबोधु गेला ॥1106॥
त्याप्रमाणे, सकलदश्याचा (सकलदृश्याचा) ग्रास करणारे ज्ञान, पुढील अज्ञानकार्यं दृश्य नाहीसे झाल्यामुळे जेव्हा, ज्ञानस्वरूप जो मी, त्या मजशी ऐक्य पावत तेव्हा अबोध किंवा अज्ञान समूळ नाहीसे होते. 6
1107-18
तेव्हा कल्पांताचिये वेळे । नदी सिंधूचे पेंडवळे । मोडूनि भरले जळे । आब्रह्म जैसे ॥1107॥
कल्पांतकाळच्या जलमय स्थितींत, समुद्र, नदी, नाले वगैरे भेद जसा समूळ नाहीसा होऊन आब्रह्मस्तंबपर्यंत जसे जल मात्र असते. 7
1108-18
नाना गेलिया घट मठ । आकाश ठाके एकवट । का जळोनि काष्ठे काष्ठ । वन्हीचि होय ॥1108॥
किंवा घटमठादि उपाधींच नाश झाल्यावर जसे आकाश एकरूपच असते, अथवा काष्ठे जाळून टाकून अग्नि जसा स्वस्वरूपात लीन होतो. 8
1109-18
नातरी लेणियांचे ठसे । आटोनि गेलिया मुसे । नामरूप भेदे जैसे । सांडिजे सोने ॥1109॥
किंवा अलंकार मुशीत आटल्यावर त्यांचे नामरूपादि भेद सोन्याला सोडून जातात (व आपण सुवर्णरूपाने उरतात. ) 9
1110-18
हेही असो चेइलया । ते स्वप्न नाही जालया । मग आपणचि आपणया । उरिजे जैसे ॥1110॥
हेही असो. मनुष्य जागा होऊन पडलेले स्वप्न नाहीसे झाल्यावर जसा केवळ आपण एकटाच असतो. 1110
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1111-18
तैसी मी एकवाचूनि काही । तया तयाहीसकट नाही । हे चौथी भक्ति पाही । माझी तो लाहे ॥1111॥
याप्रमाणे तू व मी विवर्जित असा जो मी शुद्ध परमात्मा त्यावाचून, आपणासकट अन्यत् काहीही नाही अशी शास्त्रकारानी वर्णिलेली चौथी भक्ति (सर्वं खल्विदं ब्रह्म) त्याला प्राप्त होते. 11
1112-18
येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी । हे भजती जिये पंथी । ते तिन्ही पावोनी चौथी । म्हणिपत आहे ॥1112॥
एऱ्हवी ह्या परमात्मैक्यज्ञानाला आम्ही ‘चौथी भक्ति ‘ असे जे औपचारिकरीत्या म्हटले आहे, ते आर्त, जिज्ञासु व द्रव्यादि प्राप्त्यर्थं जगात चालू असलेल्या तीन भक्तींच्या अपेक्षेनेच होय. 12
1113-18
येऱ्हवी तिजी ना चौथी । हे पहिली ना सरती । पै माझिये सहजस्थिती । भक्ति नाम ॥1113॥
वस्तुतः ह्या स्थितीला (भक्तीला) तिसरी, चौथी, पहिली किवा अखेरची असा क्रम लावणे शक्य नसून माझी जी सहजस्वरूपस्थिति तिलाच भक्ति असा आम्ही उपचार केला आहे. 13
1114-18
जे नेणणे माझे प्रकाशूनि । अन्यथात्वे माते दाऊनि । सर्वही सर्वी भजौनि । बुझावीतसे जे ॥1114॥
प्रथम मजविषयक अज्ञानालाही जे प्रकाशित करून नंतर माझे अयथार्थ (विपरीत) दर्शन करवून, आपापल्या कल्पनेप्रमाणे सर्वाकडून माझी भक्ति करवून जे सर्वाची समजूत पाडते. 14
1115-18
जो जेथ जैसे पाहो बैसे । तया तेथ तैसेचि असे । हे उजियेडे का दिसे । अखंडे जेणे ॥1115॥
मग मत्स्वरूपविषयक अज्ञानकाली जो पुरूष मला जेथे जसा पाहील, तसा (त्याच्या कल्पनेप्रमाणे) मी तेथे अनिर्वचनीय स्वरूपाने असतो; (दिसतो) पण ह्या सर्व व्यवहाराला मूल आधार माझे जे अखंड रूप तेच होय. 15
1116-18
स्वप्नाचे दिसणे न दिसणे । जैसे आपलेनि असलेपणे । विश्वाचे आहे नाही जेणे । प्रकाशे तैसे ॥1116॥
स्वप्न दिसो अगर न दिसो; ते पडले अगर पडले नाही असे म्हणण्याच्या दोन्ही व्यवहारांना जसे आपले अस्तित्व अबाधित मानावे लागते, तसा विश्वाचा उदय व अस्त हे दोन्ही ज्याने प्रकाशित होतात. 16
1117-18
ऐसा हा सहज माझा । प्रकाशु जो कपिध्वजा । तो भक्ति या वोजा । बोलिजे गा ॥1117॥
अर्जुना, असा जो माझा सहजस्वरूप प्रकाश तो बाणणे ही खरी भक्ति होय. 17
1118-18
म्हणौनि आर्ताच्या ठायी । हे आर्ति होऊनि पाही । अपेक्षणीय जे काही । ते मीचि केला ॥1118॥
म्हणून आर्त भक्तांच्या उत्कटभक्तीचा जो इच्छित विषय तोही मीच असतो अथवा बनतों. 18
1119-18
जिज्ञासुपुढा वीरेशा । हेचि होऊनि जिज्ञासा । मी का जिज्ञास्यु ऐसा । दाखविला ॥1119॥
त्याच प्रमाणे अर्जुन, जिज्ञासूची भक्ति जिज्ञासारूपाने मलाच जिज्ञास्य (जाणण्याचा विषय) करिते. 19
1120-18
हेचि होऊनि अर्थना । मीचि माझ्या अर्थी अर्जुना । करूनि अर्थाभिधाना । आणी माते ॥1120॥
द्रव्यार्थी जनांची भक्तीही मलाच प्राप्तव्यविषय करून मजविषयींचीच याचना करिते. 1120
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1121-18
एवं घेऊनि अज्ञानाते । माझी भक्ति जे हे वर्ते । ते दावी मज द्रष्टयाते । दृश्य करूनि ॥1121॥
याप्रमाणे अज्ञानावस्थीत केली जाणारी जी ही माझी भक्ति, ती दृङ्मात्र (ज्ञानस्वरूप) जो मी, त्या मला ज्ञेयत्वाला आणिते. 21
1122-18
येथे मुखचि दिसे मुखे । या बोला काही न चुके । तरी दुजेपण हे लटिके । आरिसा करी ॥1122॥
मुखालाच मुखाचे दर्शन होते असे म्हणण्यात काहीही चूक नाही; पण (ही अशक्य गोष्ट) आरशाने मुखावर आणिलेल्या लटक्या दुजेपणामुळे संभवते. 22
1123-18
दिठी चंद्रचि घे साचे । परी येतुले हे तिमिराचे । जे एकचि असे तयाचे । दोनी दावी ॥1123॥
चंद्र हाच दृष्टीचा खरा विषय असतो, पण तो एक असता दोन आहेत असे जे वाटते तो तिच्यातील ‘ तिमिर ” दोषाचा प्रभाव होय. 23
1124-18
तैसा सर्वत्र मीचि मिया । घेपतसे भक्ति इया । परी दृश्यत्व हे वाया । अज्ञानवशे ॥1124॥
त्याप्रमाणे ह्या तिन्ही भक्तिद्वारा (वस्तुतः) मीच माझी प्राप्ति करून घेत असतों; परंतु, अज्ञान उपाधीमुळे मजवर लटका प्राप्यप्रापकभाव आला आहे. 24
1125-18
ते अज्ञान आता फिटले । माझे दृष्टृत्व मज भेटले । निजबिंबी एकवटले । प्रतिबिंब जैसे ॥1125॥
अर्जुना, चौथा भक्त (माझा आत्मा) जो तू, त्या तुझ्या दर्शनाने, सर्व अज्ञानाची वार्ता संपून, प्रतिबिंबाने आपल्या बिंबापाशी जसे ऐक्य पावावे (अथवा एकरूपते असावे) त्याप्रमाणे, माझे द्रष्टस्वरूप मला आज भेटले 25
1126-18
पै जेव्हाही असे किडाळ । तेव्हांही सोनेचि अढळ । परी ते कीड गेलिया केवळ । उरे जैसे ॥1126॥
मिश्रित सोने देखील केव्हांही स्वरूपतः सोनेपणात कमी नसतेच, पण त्यातील कीट गेले म्हणजे जसे त्याचे शुद्ध स्वरूपदर्शन होते. 26
1127-18
हा गा पूर्णिमे आधी कायी । चंद्रु सावयवु नाही ? । परी तिये दिवशी भेटे पाही । पूर्णता तया ॥1127॥
अरे, पौणिमेच्यापूर्वी कोणत्याही तिथीस चंद्र काय संपूर्ण नसतो ? परंतु त्याच्या पूर्णत्वचा व्यवहार मात्र पौणिमेच्याच दिवशी होतो. 27
1128-18
तैसा मीचि ज्ञानद्वारे । दिसे परी हस्तांतरे । मग दृष्टृत्व ते सरे । मियाचि मी लाभे ॥1128॥
त्याप्रमाणे, ज्ञानाचा व्यवहार करणाऱ्या अंतःकरणाला होणारे सर्व दर्शन हे माझेच दर्शन होय; पण ते अप्रत्यक्ष किंवा परोक्ष होय, खरे नव्हे; पण जेव्हा माझी मला यथार्थदर्शन होते, त्यावेळी द्रष्टा दृश्यत्वादि सर्व व्यवहार लोपतो. 28
1129-18
म्हणौनि दृश्यपथा- । अतीतु माझा पार्था । भक्तियोगु चवथा । म्हणितला गा ॥1129॥
म्हणून अर्जुना, हा जो माझा चौथा ज्ञानरूप भक्तियोग, तो कोणत्याही दृष्टीच्या टप्यात न येणारा (पलीकडील) आहे असे आम्ही सांगितले. 29

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥18. 55॥
1130-18
या ज्ञान भक्ति सहज । भक्तु एकवटला मज । मीचि केवळ हे तुज । श्रुतही आहे ॥1130॥
ह्या सहज ज्ञानभक्तीने माझा भक्त मजपाशी ऐक्य पावतो-नव्हे-तो केवळ मद्रूपच होतो. हे तूही ऐकिले आहेसच. 1130
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1131-18
जे उभऊनिया भुजा । ज्ञानिया आत्मा माझा । हे बोलिलो कपिध्वजा । सप्तमाध्यायी ॥1131॥
कारण, अर्जुना, (सातव्या अध्यायात) + “ ज्ञानी हा माझा आत्माच होय ” असे आम्ही बाहु उभारून प्रतिपादिले आहे. 31
1132-18
ते कल्पादी भक्ति मिया । श्रीभागवतमिषे ब्रह्मया । उत्तम म्हणौनि धनंजया । उपदेशिली ॥1132॥
म्हणूनच, त्या उत्तम भक्तीचा कल्पारंभीं मी भागवतरूपाने ब्रह्मदेवास उपदेश केला. 32
1133-18
ज्ञानी इयेते स्वसंवित्ती । शैव म्हणती शक्ती । आम्ही परम भक्ती । आपुली म्हणो ॥1133॥
हिलाच ज्ञानी ” स्वसंविति ” असे म्हणतात, तर शैव “ शक्ति ” असे म्हणतात; व आम्ही ही आमची ‘ परमभक्ति ” होय असे म्हणतो. 33
1134-18
हे मज मिळतिये वेळे । तया क्रमयोगिया फळे । मग समस्तही निखिळे । मियाचि भरे ॥1134॥
त्या क्रमयोग्यांना, माझ्याशी ऐक्य पावते वेळी, ही भक्ति फलद्रूप होते व मग सर्व जग मद्रूपच आहे असे त्यांच्या प्रत्ययास येते. 34
1135-18
तेथ वैराग्य विवेकेसी । आटे बंध मोक्षेसी । वृत्ती तिये आवृत्तीसी । बुडोनि जाय ॥1135॥
अशा स्थितीत वैराग्य विवेकासह व बंध हा मोक्षाच्या कल्पनेसह नाहीसा होतो; आणि वृत्ति ब्रह्माचिंतनादि अभ्यासासह लोप पावते. 35
1136-18
घेऊनि ऐलपणाते । परत्व हारपे जेथे । गिळूनि चाऱ्ही भूते । आकाश जैसे ॥1136॥
पण आकाशस्वरूपात जसे एकही भूत नाही अथवा यातील एकाहो भूताशी त्याचा जसा संबंध नाही, त्या-प्रमाणे श्रेष्ठ (परत्व), कनिष्ठ (ऐलपण) भावांचा संबंध जेथे पोंचू शकत नाही, म्हणजे हारपतो. 36
1137-18
तया परी थडथाद । साध्यसाधनातीत शुद्ध । ते मी होऊनि एकवद । भोगितो माते ॥1137॥
त्याप्रमाणे, अलीकडील अगर पलीकडील साधनांनी प्राप्त न होणारे असे जे माझे शुद्ध साध्यस्वरूप, हे आपण होऊन, हा चौथ्या भक्तीचा अधिकारी माझा भोग घेतो. (मद्रूप असतो) 37
1138-18
घडोनि सिंधूचिया आंगा । सिंधूवरी तळपे गंगा । तैसा पाडु तया भोगा । अवधारी जो ॥1138॥
समुद्राला मिळेपर्यंत गंगापणाने असणारी गंगा, जशी समुद्राला मिळाल्यावर भिन्न न राहता प्रकारचा सागरपणा भोगते, तशाच प्रकारचा त्याचा हा भोग होय असे समज. 38
1139-18
का आरिसयासि आरिसा । उटूनि दाविलिया जैसा । देखणा अतिशयो तैसा । भोगणा तिये ॥1139॥
किंवा एका आरशासमोर दुसरा आरसा स्वच्छ करून ठेविला, तर, त्याने दृश्याःपेक्षां द्रष्टेपणाच्याच भोगांत भर पडल्यासारखे होते. (कारण दोघेही प्रतिबिंबग्राहक द्रष्टेच आहेत ) (तसा नित्यात्मदर्शी दोन व्यक्तींच्या भेटीचा भोग समजावा) 39
1140-18
हे असो दर्पणु नेलिया । तो मुख बोधुही गेलिया । देखलेपण एकलेया । आस्वादिजे जेवी ॥1140॥
हा दृष्टान्त असो; समोरील आरस नेल्याने त्यातील मुखप्रतिबिंबही जरी गेले, तरी, त्याच्या द्वारे झालेल्या आपल्याच मुखाच्या दर्शनाचा भोग जसा एक आपल्याच ठिकाणी भोगीत असतो. 1140
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1141-18
चेइलिया स्वप्न नाशे । आपले ऐक्यचि दिसे । ते दुजेनवीण जैसे । भोगिजे का ॥1141॥
जागे झाल्यावर स्वप्नातील द्वैतव्यवहार नाहीसा होऊन आपल्या एकपणाचा भोग जसा द्वैतप्रतीतीवाचून आपणच भोगतो. 41
1142-18
तोचि जालिया भोगु तयाचा । न घडे हा भावो जयांचा । तिही बोले केवी बोलाचा । उच्चारु कीजे ॥1142॥
भोक्ताच जर भोग्य झाला तर भोग कसा घडणार, अशी ज्यांना शंका असेल त्यांना आम्ही असे विचारतो की, तुम्ही ” शब्द ” ह्या शब्दाचा शब्दानेच कसा बोध अगर उच्चार करितां ? 42
1143-18
तयाच्या नेणो गावी । रवी प्रकाशी हन दिवी । की व्योमालागी मांडवी । उभिली तिही ॥1143॥
त्यांच्या गावी सूर्योदय झाल्याचे दिव्याच्या सहाय्याने ठरवितात की काय न कळे; अथवा आकाश कोसळू नये म्हणून ते कदाचित् मांडवही घालीत असतील. 43
1144-18
हा गा राजन्यत्व नव्हता आंगी । रावो रायपण काय भोगी ? । का आंधारु हन आलिंगी । दिनकराते ? ॥1144॥
अहो, ज्याला राजेपणाचे कधी स्वप्नही पडत नाही, त्याला राजेपणाच्या भोगाची काय कल्पना येणार ? अंधकाराला कधी सूर्यदर्शन घडत असते का ? 44
1145-18
आणि आकाश जे नव्हे । तया आकाश काय जाणवे ? । रत्नाच्या रूपी मिरवे । गुंजांचे लेणे ? ॥1145॥
आकाश नसलेला पदार्थ आकाशाची सर्वव्यापकता कशी जाणणार ? गुंजांच्या दागिन्यांना कधी रत्नांच्या दागिन्यांची सर येईल काय ? 45
1146-18
म्हणौनि मी होणे नाही । तया मीचि आहे केही । मग भजेल हे कायी । बोलो कीर ॥1146॥
म्हणून मद्रूप नसणाराला जर माझाच ठावठिकाणा नसतो, तर तो माझे भजन करील ही भाषाच कशी बोलता यावी ? 46
1147-18
यालागी तो क्रमयोगी । मी जालाचि माते भोगी । तारुण्य का तरुणांगी । जियापरी ॥1147॥
अरे ज्याप्रमाणे तरुण स्त्रीच्या आंगच्या तारुण्याचा तिलाच भोग घडत असतो, तसा, ह्या क्रमयोग्याला मद्रूप होऊनच माझा भोग घडत असतो. 47
1148-18
तरंग सर्वांगी तोय चुंबी । प्रभा सर्वत्र विलसे बिंबी । नाना अवकाश नभी । लुंठतु जैसा ॥1148॥
(औपाधिक भेदांतील भोग असा असतो) तरंगाला जशी सर्वागानं अगर सर्व पाण्यांची भेट असते, प्रभा सर्वत्र बिंबरूपानेच मिरवत असते, अथवा आकाशाने लोळण घेणे झाल्यास आकाशांतच जसे ते घेतले पाहिजे. 48
1149-18
तैसा रूप होऊनि माझे । माते क्रियावीण तो भजे । अलंकारु का सहजे । सोनयाते जेवी ॥1149॥
त्याप्रमाणे तो मद्रुप होऊन कोणतीही क्रिया न करिता, त्याला माझ भजन घडतें; अरे, अलंकार ही जसा नित्यच सुवर्णाचे भजन करीत असतो म्हणजे त्याच्याशी अनन्य असतो. 49
1150-18
का चंदनाची द्रुती जैसी । चंदनी भजे अपैसी । का अकृत्रिम शशी । चंद्रिका ते ॥1150॥
किवा चंदनाच्या सुगंधाला जसे आपोआप चंदनाचे भजन घडत असते, किंवा चंद्रप्रभा सहजच चंद्ररूप असते. 1150
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1151-18
तैसी क्रिया कीर न साहे । तऱ्ही अद्वैती भक्ति आहे । हे अनुभवाचिजोगे नव्हे । बोलाऐसे ॥1151॥
त्याप्रमाणे, अद्वैतबोधांत क्रियेला काडीचा अवसर नसला तरी, भक्ति संभवते; पण बोलून दाखविता येण्यासारखी हि गोष्ट नाही, ती स्वतःच्या अनुभवानेच पटणारी आहे 51
1152-18
तेव्हा पूर्वसंस्कार छंदे । जे काही तो अनुवादे । तेणे आळविलेनि वो दे । बोलता मीचि ॥1152॥
अशा पुरुषाच्या शारीरक्रिया पूर्वसंस्कारानुरूप सुरू असता त्या भरात ज्या नांवाने मला हाक मारील ती माझीच भक्ति होय असे समजून मो त्याच्या हाकेला उभा रहातो; पण बोलणार तोही मजवाचून अन्य कोणी नसतो. 52
1153-18
बोलतया बोलताचि भेटे । तेथे बोलिले हे न घटे । ते मौन तव गोमटे । स्तवन माझे ॥1153॥
बोलणारा आपणच; व ज्याच्यापाशी बोलला तोही आपणच; ह्या व्यवहाराला ‘बोलणे झालें ” असे म्हणता येत नाही; अशा प्रकारचे जे मौन हे माझे उत्तम स्तवन होय (अद्वैती भक्ति आहे). 53
1154-18
म्हणौनि तया बोलता । बोली बोलता मी भेटता । मौन होय तेणे तत्वता । स्तवितो माते ॥1154॥
म्हणून तो बोलणारा व त्याच्या बोलांत त्याला बोलविणारा जो मी तोच त्याला भेटणारा, अशा स्थितीला तत्त्वदृष्टया मौनस्थितीच म्हणतात; त्या तात्त्विक मौनाने तो माझे स्तवन करितो 54
1155-18
तैसेचि बुद्धी का दिठी । जे तो देखो जाय किरीटी । ते देखणे दृश्य लोटी । देखतेचि दावी ॥1155॥
त्याचप्रमाणे अर्जुन, त्याची बुद्धि अगर दृष्टि ज्या ज्या दृश्याकडे जाईल, त्या त्या ठिकाणचा दृश्यत्वधर्म नाहीसा होऊन त्या रूपाने द्रष्टा जो आपण, त्याचेच दर्शन त्याला घडतं. (इतका त्याचा सर्वात्मभाव दृढ असतो. ) 55
1156-18
आरिसया आधी जैसे । देखतेचि मुख दिसे । तयाचे देखणे तैसे । मेळवी द्रष्टे ॥1156॥
आरसा पुढे येण्यापूर्वी मुख दृष्टिरूपच असते, पण तेथवर त्याला द्रष्टेपणा नसतो; तो द्रष्टेपणा, आरसा ह्या उपाधीने आला म्हणजे त्याचेच त्याला जसे पुन्हा दर्शन होते, त्याप्रमाणे, दृश्याच्या मिषाने (वरील ओवीतील) द्रष्ट्याचेच द्रष्ट्याला दर्शन होते. 56
1157-18
दृश्य जाउनिया द्रष्टे । द्रष्टयासीचि जै भेटे । तै एकलेपणे न घटे । द्रष्टेपणही ॥1157॥
दृश्यावरील दृश्यत्व कल्पनेचा निरास होऊन जेव्हा तद्वारा द्रष्टाच द्रष्टयाला भेटतो, तेव्हा तेथे द्वैतव्यवहाराचे अभावी तोच कायतो एकटा असतो व अशा स्थितीत तो पहाणारा नसून ‘ पहाणेरूप ” असतो. 57
1158-18
तेथ स्वप्नीचिया प्रिया । चेवोनि झोंबो गेलिया । ठायिजे दोन्ही न होनिया । आपणचि जैसे ॥1158॥
स्वप्नातील स्त्रीला जागा होऊन आलिंगन देउ गेल्यास तेथे दोन व्यक्ति नसून आपणच एकटे एक असल्याचा जसा प्रत्यय येतो, 58
1159-18
का दोही काष्ठाचिये घृष्टी- । माजी वन्हि एक उठी । तो दोन्ही हे भाष आटी । आपणचि होय ॥1159॥
किवा दोन काष्ठांच्या घर्षणाने उत्पन्न होणारा अग्नि त्यांचा दोन्हीपणा खाऊन आपणच जसा तद्रूप होतो 59
1160-18
नाना प्रतिबिंब हाती । घेऊ गेलिया गभस्ती । बिंबताही असती । जाय जैसी ॥1160॥
अथवा सूर्य आपले प्रतिबिंब ग्रहण करण्यासाठी खाली अवतरला तर प्रतिबिंबाबरोबर जशी त्याची बिंबताही उरणार नाही. 1160
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1161-18
तैसा मी होऊनि देखते । तो घेऊ जाय दृश्याते । तेथ दृश्य ने थिते । द्रष्टृत्वेसी ॥1161॥
त्याप्रमाणे जो द्रष्टा मद्रूप होऊन दृश्य पाहू जातो, त्याला दृश्य म्हणून काही वेगळे आढळत नाहीच, पण त्याचा द्रष्टेपणाही दृश्याबरोबर मावळतो. 61
1162-18
रवि आंधारु प्रकाशिता । नुरेचि जेवी प्रकाश्यता । तेवी दृश्यी नाही द्रष्टृता । मी जालिया ॥1162॥
सूर्योदयाबरोबर अंधारच प्रकाशरूप होत असल्याने मुळे जसा त्यांचा प्रकाश्य प्रकाशक भाव उरत नाही, तसे, दृश्य, द्रष्टा जो मी तद्रूप झाले असता, त्याच्या ठिकाणचे दृश्यत्वही उरत नाही. (माझे द्रष्टेपणही न उरून केवल दृङमात्र मी असतों) 62
1163-18
मग देखिजे ना न देखिजे । ऐसी जे दशा निपजे । ते ते दर्शन माझे । साचोकारे ॥1163॥
यानंतर पाहणे न पाहणे इत्यादि व्यवहारापलीकडील जी सहजस्थिति, तेच माझे खरे दर्शन होय. 63
1164-18
ते भलतयाही किरीटी । पदार्थाचिया भेटी । द्रष्टृदृश्यातीता दृष्टी । भोगितो सदा ॥1164॥
अर्जुना, कोणत्याही पदार्थाच्या भेटीनंतरही, द्रष्टा, दृश्य व दर्शन ह्या व्यवहारातीत असलेल्या अखंड दर्शनस्थि तिचा त्या क्रमयोग्याला आपल्या स्वरूपात भोग घडत असतो. 64
1165-18
आणि आकाश हे आकाशे । दाटले न ढळे जैसे । मिया आत्मेन आपणपे तैसे । जाले तया ॥1165॥
आणि आकाशने स्वस्वरूपानेच सर्व जगत् अंतर्बाह्य गच्च व्यापून टाकल्यामुळे जसे त्याचे चलनवलन संभवत नाही, तसा सर्वात्मक जो मी तद्रूप झालेला तो योगी कोणत्याही क्रियेने लिप्त होणे शक्य नाही. 65
1166-18
कल्पांती उदक उदके । रुंधिलिया वाहो ठाके । तैसा आत्मेनि मिया येके । कोंदला तो ॥1166॥
सर्व जलमय ‘कल्पांतीच्या उदकाला वाहण्यास जसा कोठे वावच नसतो, तसा सर्वव्यापक, एक, शुद्ध परमात्मा जो मी, तद्रूपच तो झाला असल्यामुळे त्याच्यावाचूनही कोठे रिता ठाव नाही. 66
1167-18
पावो आपणपया वोळघे ? । केवी वन्हि आपणपया लागे ? । आपणपा पाणी रिघे । स्नाना कैसे ? ॥1167॥
पायानेच पायावर चढणे, अग्नीनेच अग्नील पोळणे, किवा जलानेच स्नानासाठी जाणे ह्या गोष्टी घडणे शक्य आहे काय ? 67
1168-18
म्हणौनि सर्व मी जालेपणे । ठेले तया येणे जाणे । तेचि गा यात्रा करणे । अद्वया मज ॥1168॥
म्हणून, बोध दृष्ट्या, जो सर्वथैव मद्रूप झाल्यामुळे ज्याचे येणे जाणे संपले (कर्तव्यबुद्धीने ) व म्हणूनच, ती स्थिति हीच माझ्या अद्वयस्वरूपाची त्याला यात्रा घडली असे समज. 68
1169-18
पै जळावरील तरंगु । जरी धाविन्नला सवेगु । तरी नाही भूमिभागु । क्रमिला तेणे ॥1169॥
जलावरील लाट कितीही वेगाने आली तरी जलाश्रयावाचून स्वतंत्रतया तिने भूभाग आक्रमण केल्याचे दिसत नाही. 69
1170-18
जे सांडावे का मांडावे । जे चालणे जेणे चालावे । ते तोयचि एक आघवे । म्हणौनिया ॥1170॥
कारण, तिची मोडतोड येणे जाणे हे सर्व एका पाण्याचेच खेळ असतात. 1170
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1171-18
गेलियाही भलतेउता । उदकपणे पंडुसुता । तरंगाची एकात्मता । न मोडेचि जेवी ॥1171॥
अर्जुना, ती (भिन्न दिसणारी) लाट वाटेल तेथवर जावो, उदक ह्या दृष्टीने तिचा असलेला एकात्मभाव कधींही भंग पावत नाही. 71
1172-18
तैसा मीपणे हा लोटला । तो आघवेयाचि मजआंतु आला । या यात्रा होय भला । कापडी माझा ॥1172॥
तसा माझ्यावर सर्वस्वे येऊन पडला म्हणजे अनन्य झाला, असा जो हा, तो सर्व मरूपच झाला. ह्याच त्याच्या पुण्यरूप यात्रेने तो माझा खरा यात्रेकरू होय 72.
1173-18
आणि शरीर स्वभाववशे । काही येक करू जरी बैसे । तरी मीचि तो तेणे मिषे । भेटे तया ॥1173॥
आणि शरीरस्वभावाप्रमाणे, तो काहीही जरी करू लागला, तरी त्या त्या रूपाने (व त्या या स्थितीत) त्याला माझे सर्वात्मकाचेच दर्शन होत असते. 73
1174-18
तेथ कर्म आणि कर्ता । हे जाऊनि पंडुसुता । मिया आत्मेनि मज पाहता । मीचि होय ॥1174॥
त्या त्याच्या कृतींत अर्जुना, हे कर्म आणि हा मी कर्ता, असे भाव जिवंत नसतात, (मृतवत् असतात) तर त्याचा आत्मा जो मी त्यानेच व तो मला ध्यात असतो व म्हणूनच तो मद्रूपच होतो 74
1175-18
पै दर्पणाते दर्पणे । पाहिलिया होय न पाहणे । सोने झांकिलिया सुवर्णे । ना झाके जेवी ॥1175॥
हे पहा, आरशाने आरशाला पाहणे म्हणजे कोणी कोणाला न पाहिल्यासारखेच आहे किंवा सुवर्णाच्याच पदार्थाने सुवर्ण झाकणे म्हणजे सुवर्ण उघढे ठेवणेच होय. 75
1176-18
दीपाते दीपे प्रकाशिजे । ते न प्रकाशणेचि निपजे । तैसे कर्म मिया कीजे । ते करणे कैचे ? ॥1176॥
दिव्यानेच दिव्याला प्रकाशिले ही जशी केवळ भाषा, वास्तवता नव्हे, तसे मद्रूप स्थितीत केल्या गेलेल्या कर्माला कर्म कसे म्हणता येईल ? 76
1177-18
कर्मही करितचि आहे । जै करावे हे भाष जाये । तै न करणेचि होये । तयाचे केले ॥1177॥
तो कर्म करीतच असतो किवा त्याजकडून कर्म होणारच, ‘पण हे मी करावे आणि हे मी करू नये ” अशी विधिकिकरता जेथे अस्त पावलेली असते, त्याने केलेल्या कर्माची न केल्यातच शास्त्र गणना करिते. 77
1178-18
क्रियाजात मी जालेपणे । घडे काहीचि न करणे । तयाचि नांव पूजणे । खुणेचे माझे ॥1178॥
मद्रूपता आली की जी जी काही क्रिया घडेल ती ती न केल्यासारखीच होते व माझी खरी खुणेची पूजा ती हीच होय 78
1179-18
म्हणौनि करीतयाही वोजा । ते न करणे हेचि कपिध्वजा । निफजे तिया महापूजा । पूजी तो माते ॥1179॥
म्हणून अर्जुना, तो आस्थापूर्वक जे कर्म करितो तेही न करण्यातच पडतें; हीच त्याने मला बांधलेली महापूजा होय. 79
1180-18
एवं तो बोले ते स्तवन । तो देखे ते दर्शन । अद्वया मज गमन । तो चाले तेचि ॥1180॥
सारांश, तो बोलेल ते माझे स्तवन, तो पाहील ते माझे दर्शन, व तो जिकडे जिकडे जाईल तिकडे त्याला माझा अद्वय परमात्म्याची यात्रा घडते. 1180
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1181-18
तो करी तेतुली पूजा । तो कल्पी तो जपु माझा । तो असे तेचि कपिध्वजा । समाधी माझी ॥1181॥
अर्जुना, त्याची सर्व कृति ही माझी पूजा होय, तो कल्पना करील तोच माझा जप; व तो असेल तीच माझी समाधि होय 81
1182-18
जैसे कनकेसी कांकणे । असिजे अनन्यपणे । तो भक्तियोगे येणे । मजसी तैसा ॥1182॥
सुवर्णपाशी त्याचाच अलंकार जे कांकण हे नेहमीच जसे अनन्य (एकरूप) असते त्याप्रमाणे ह्या भक्तियोगेकरून तो माझ्याशी अनन्य असतो. 82
1183-18
उदकी कल्लोळु । कापुरी परीमळु । रत्नी उजाळु । अनन्यु जैसा ॥1183॥
पाण्याशी लाट कापुरापाशी परिमळ । व रत्नाशी जसे त्याचे तेज अनन्य असते, 83
1184-18
किंबहुना तंतूंसी पटु । का मृत्तिकेसी घटु । तैसा तो एकवटु । मजसी माझा ॥1184॥
किंबहुना, तंतूशी पट, मृत्तिकेपाशी घट हे जसे एकरूप असतात तसा तो माझा भक्त मजपाशी एकवट म्हणजे मद्रूप असतो. 84
1185-18
इया अनन्यसिद्धा भक्ती । या आघवाचि दृश्यजाती । मज आपणपेया सुमती । द्रष्टयाते जाण ॥1185॥
या स्वयंसिद्ध अभेद भक्तीने दृश्यमात्राकडे, जो भक्त, त्यावरील नामरूपात्मक दृश्यत्वाचा पडदा बाजूस सारून, अधिष्ठान द्रष्टा जो मी, तदेकदृष्टीने पहातो. 85
1186-18
तिन्ही अवस्थांचेनि द्वारे । उपाध्युपहिताकारे । भावाभावरूप स्फुरे । दृश्य जे हे ॥1186॥
जागृति, स्वप्न व सुषुप्ति ह्या तीन अवस्थांद्वारां, उपहित अधिष्ठान व नामरूपादि उपाधि ह्यांच्या द्वारा, अभावरूपाने स्फुरणारे ( प्रत्ययास येणारें) जे काही ते दृश्य होय. 86
1187-18
ते हे आघवेचि मी द्रष्टा । ऐसिया बोधाचा माजिवटा । अनुभवाचा सुभटा । धेंडा तो नाचे ॥1187॥
ते, जे हे सारे दृश्य त्याचा तात्विक (अंतापयंत ) विचार करून, त्याचे खरे स्वरूप, अधिष्ठानरूप परमात्मा जो मी किंवा पहाणाराचा आत्मा तेच आहे, असा त्या योग्याच्या अपरोक्षानुभवाचा धेडा नाचू लागतो. 87
1188-18
रज्जु जालिया गोचरु । आभासता तो व्याळाकारु । रज्जुचि ऐसा निर्धारु । होय जेवी ॥1188॥
रज्जुस्वरूपदर्शनाने तिजवर दिसलेला जो सर्पाचा आकार तोही तेव्हा रज्जुस्वरूपच होता असा निश्चय जसा व्हावा. 88
1189-18
भांगारापरते काही । लेणे गुंजहीभरी नाही । हे आटुनिया ठायी । कीजे जैसे ॥1189॥
सुवर्णालंकारांत, अलंकाराला गुंजभरही पृथक् सत्ता नसते, हे विचाराने किंवा अलंकार आटुनही जसे पहात येईल. 89
1190-18
उदका येकापरते । तरंग नाहीचि हे निरुते । जाणोनि तया आकाराते । न घेपे जेवी ॥1190॥
एका उदकावाचून लाट म्हणून काही स्वतंत्र वस्तूच नाही हे जाणणारा जसा तिच्या आकाराने फसत नाही. 1190
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1191-18
नातरी स्वप्नविकारा समस्ता । चेऊनिया उमाणे घेता । तो आपणयापरौता । न दिसे जैसा ॥1191॥
किंवा जागा झाल्यावर सकलस्वप्नव्यवहाराची मोजदाद करू पहाणाराला आपल्या शिवाय जसे दुसरे तेथे काहीच आळत नाहीं, 91
1192-18
तैसे जे काही आथी नाथी । येणे होय ज्ञेयस्फुर्ती । ते ज्ञाताचि मी हे प्रतीती । होऊनि भोगी ॥1192॥
तसा जगात ” “आहे, नाही, ” असा जो काही ज्ञानाचा व्यवहार चालतो, तो सर्व माझ्याच ज्ञानस्वरूपाचा विलास होय, असा त्याचा अपरोक्षानुभव असतो. 92
1193-18
जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु । अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥1193॥
मी जन्मरहित, वार्धक्यरहित, नाशरहित, व्ययहित, अपूर्व आणि अनंत व आनंदरूप असे जो जागतो. 93
1194-18
अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु । आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥1194॥
मी. अचल, अच्युत, अनंत, अद्वैत, आद्य, निराकार, व साकारही आहे असे जो समजतो. 94
1195-18
ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु । अभय मी आधारु । आधेय मी ॥1195॥
नियम्य मी, नियामक मी, अनादि, अमर, अभय, आधार व आधारावर असलेला मी आहे. 95
1196-18
स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु । सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥1196॥
मी नित्य स्वामी (धनी) आहे; सहज व सतत आहे; मी सर्व व सर्वव्यापक आहे व मी. सर्वात न सापडणारा असा त्यांच्या पलीकडील स्वरूपाचा आहे. 96
1197-18
नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु । स्थुलु मी अणु । जे काही ते मी ॥1197॥
मी, नवा, जुना, शून्य, संपूर्ण, स्थूल, सूक्ष्म, जे काही दिसते ते मी आहे. 97
1198-18
अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु । व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥1198॥
अक्रिय, एक, असंग, अशोक, व्याप्य, व्यापक, पुरुषोत्तम मी आहे. 98
1199-18
अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु । समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥1199॥
अशब्द (शब्दरहित), श्रोत्ररहित, अरूप, अगोत्र, सम, स्वतंत्र व परब्रम्ह्स्वरूप आहे. 99
1200-18
ऐसे आत्मत्वे मज एकाते । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुते । आणि याही बोधा जाणते । तेही मीचि जाणे ॥1200॥
याप्रमाणे, मला एकाला या अद्वैयभक्तीने योग्यरीतीने जाणतो व याही बोधाचे अधिष्ठान जे शुद्ध परमात्मतत्व तेच माझे स्वरूप होय असाही त्याचा स्पष्ट बोध असतो. 1200
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1201-18
पै चेइलेयानंतरे । आपुले एकपण उरे । तेही तोवरी स्फुरे । तयाशीचि जैसे ॥1201॥
किंवा जागे झाल्यावर आपण एकटेच असतो, व हे एकटेपणाचे स्फुरणही जो वर असते तो वर ते त्याला एकट्यालाच असते. 1201
1202-18
का प्रकाशता अर्कु । तोचि होय प्रकाशकु । तयाही अभेदा द्योतकु । तोचि जैसा ॥1202॥
सूर्य प्रकाशु लागला म्हणजे आपला प्रकाशकही तोच असतो व आपण व आपला प्रकाश (प्रकाश्य प्रकाशक ) यातील अभेदही त्याच्याच मुळे समजतो 1202
1203-18
तैसा वेद्यांच्या विलयी । केवळ वेदकु उरे पाही । तेणे जाणवे तया तेही । हेही जो जाणे ॥1203॥
त्याप्रमाणे वेद्य वस्तुच्या लोपानंतर केवळ त्यांचा वेदकमात्र उरतो; तो आपण आपल्याला जाणीत असतो ह्याची व ते ज्यायोगे (सत्तेवर) जाणतो त्याचीही ह्याला जाणीव असते. 1203
1204-18
तया अद्वयपणा आपुलिया । जाणती ज्ञप्ती जे धनंजया । ते ईश्वरचि मी हे तया । बोधासि ये ॥1204॥
ते आपले आपल्या ठिकाणी ते स्फुरद्रूप असणारे आपले अद्वयपण ज्या ज्ञप्तिमात्र स्वरूपाच्या सत्तेवर प्रत्ययाला येते, ते जे ज्ञप्तिस्वरूप, तोच ईश्वर व मीही तोच, असे त्याला कळून येते. 1204
1205-18
मग द्वैताद्वैतातीत । मीचि आत्मा एकु निभ्रांत । हे जाणोनि जाणणे जेथ । अनुभवी रिघे ॥1205॥
मग, द्वैताद्वैतातीत, नि:संदेह मीच एक आत्मा सगळीकडे भरलेला आहे असे सर्वात्मज्ञान होऊन तेही जाणणे स्वरूपानुभवांत लीन होते. 1205
1206-18
तेथ चेइलिया येकपण । दिसे जे आपुलया आपण । तेही जाता नेणो कोण । होईजे जेवी ॥1206॥
स्वप्नातून जागे झाल्यावर काही काळ, स्वप्नातील द्वैतव्यवहाराच्या स्मृतिमुळे, आपले एकपण आपल्यास स्फुरत असते, पण पूर्ण जागृति आल्यावर आपण कोण असतो ह्याचे जसे भान नसते. 1206
1207-18
का डोळा देखतिये क्षणी । सुवर्णपण सुवर्णी । नाटिता होय आटणी । अळंकाराचीही ॥1207॥
सुवर्णालंकार डोळयांनी पहातांच, “जर” हे सर्व सुवर्ण आहे ” अशा दृष्टीचा उदय झाला, तर न आटतांच अलंकाराचे अलंकारपण संपले. 1207
1208-18
नाना लवण तोय होये । मग क्षारता तोयत्वे राहे । तेही जिरता जेवी जाये । जालेपण ते ॥1208॥
किंवा मिठाचे पाणी झाले तर क्षारता जलरूपाने असते, पण ते पाणी झालेले मीठही जेव्हा पृथ्वींत समरस होते, तेव्हा “ हे मीठ” असा मिठाचा वेगळेपणा उरत नाही किंवा भासतही नाही. 1208
1209-18
तैसा मी तो हे जे असे । ते स्वानंदानुभवसमरसे । कालवूनिया प्रवेशे । मजचिमाजी ॥1209॥
त्याप्रमाणे ” मी ” “ तो ” हा जो व्यवहार असतो तो आत्मानंदानुभवांत एकत्र करून, तो, तेच आनंदरूप, जे माझे स्वरूप, त्यामध्ये प्रवेश करितो. 1209
1210-18
आणि तो हे भाष जेथ जाये । तेथे मी हे कोण्हासी आहे । ऐसा मी ना तो तिये सामाये । माझ्याचि रूपी ॥1210॥
मग, ” तो ” ही भाषा संपल्यावर, त्याच्या अपेक्षेनी नांदणारे जे ” मी ” ते तरी कोणावर स्थापावयाचे ? असा ‘तू व मी ” विवर्जित जे माझे स्वरूप त्याच्याशी तो ऐक्य पावतो. 1210
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1211-18
जेव्हा कापुर जळो सरे । तयाचि नाम अग्नि पुरी । मग उभयतातीत उरे । आकाश जेवी ॥1211॥
कापुराच्या जळण्याची समाप्ति तीच अग्नीची समाप्ति होय. मग तेथे कापूरही नसतो व अग्नीही नसतो; केवळ आकाश असते. 1211
1212-18
का धाडलिया एका एकु । वाढे तो शून्य विशेखु । तैसा आहे नाहीचा शेखु । मीचि मग आथी ॥1212॥
एकांतून एक वजा केला की खाली शून्य उरते, तसे “आहे नाही ” ह्या व्यवहार लोपानंतरही तद्व्यवहार सिद्धि ज्यावर होते असे जे शेष (अवधिभूत ) वस्तु ते मीच होय. 1212
1213-18
तेथ ब्रह्मा आत्मा ईशु । यया बोला मोडे सौरसु । न बोलणे याही पैसु । नाही तेथ ॥1213॥
अशा स्थितीत ब्रह्म, आत्मा, ईश, अशी भाषा बोलण्याने तिचे स्वारस्य किंवा महत्त्व नष्ट झाल्यासारखे होते; व तद्विषयक मौनाचा निश्चयही अयुक्तच होय (अशी बोलाबोलातीत ती वस्तु आहे) 1213
1214-14
न बोलणेही न बोलोनी । ते बोलिजे तोंड भरुनी । जाणिव नेणिव नेणोनी । जाणिजे ते ॥1214॥
म्हणून, न बोलण्याचाही निश्चय सोडून त्याजबद्दल तोंड भरून चर्चा करावी; पण ते जाणले जाते किंवा जाणले जात नाही असा निश्चय न करिता या दोन्ही कल्पनाहून अतीत ( स्वसंवेद्य ) आहे असे जाण. 14
1215-18
तेथ बुझिजे बोधु बोधे । आनंदु घेपे आनंदे । सुखावरी नुसधे । सुखचि भोगिजे ॥1215॥
त्या स्थितीत बोधरुपालाच बोध होतो, आनंदालाच आनंद व सुखालाच सुखाचा भोग घडत असतो. 15
1216-18
तेथ लाभु जोडला लाभा । प्रभा आलिंगिली प्रभा । विस्मयो बुडाला उभा । विस्मयामाजी ॥1216॥
तेथे लाभालाच लाभ; प्रभेलाच प्रभेची भेट, अशी स्थिति असून, विस्मय विस्मयातच समूळ बुडतो. 16
1217-18
शमु तेथ सामावला । विश्रामु विश्रांति आला । अनुभवु वेडावला । अनुभूतिपणे ॥1217॥
तेथे समत्व साम्याला आले, विश्राम विश्रांतीला आला व अनुभवालाच अनुभूतित्वरूप येऊन तोही वेडावला ! (नाहीसा झाला) 17
1218-18
किंबहुना ऐसे निखळ । मीपण जोडे तया फळ । सेवूनि वेली वेल्हाळ । क्रमयोगाची ते ॥1218॥
क्रमयोगरूप वेलीचे पाणिग्रहण करणाऱ्या त्या योग्याला असे जे माझे निखळ (असंग) स्वरूप त्याची प्राप्ति होते. 18
1219-18
पै क्रमयोगिया किरीटी । चक्रवर्तीच्या मुकुटी । मी चिद्रत्न ते साटोवाटी । होय तो माझा ॥1219॥
अर्जुना, ह्या सार्वभौम क्रमयोग्याने माझी आपल्या मुकुटावर चिद्रत्न म्हणून योजना केली आहे, तो व्यवहार मोबदल्याचा आहे. (बदला मी त्याला माझ्या हृदयात आत्मत्वाने स्थान दिले आहे) 19
1220-18
की क्रमयोगप्रासादाचा । कळसु जो हा मोक्षाचा । तयावरील अवकाशाचा । उवावो जाला तो ॥1220॥
किंवा, त्या क्रमयोगरूपी मंदिरावर जो हा मोक्षरूपी कळस बसविला जाणार त्या कलशाची बैठक किंवा आतील (घुमटीतील) पोकळी हा होतो. 1220
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1221-18
नाना संसार आडवी । क्रमयोग वाट बरवी । जोडिली ते मदैक्यगावी । पैठी जालीसे ॥1221॥
अथवा ह्या भवारण्यातील क्रमयोग हा राजरस्ताच होय; ह्याने गेले असता मद्पता ” हा जो सीमाप्रांत त्याला योगी मोजका येतो 21
1222-18
हे असो क्रमयोगबोधे । तेणे भक्तिचिद्गांगे । मी स्वानंदोदधी वेगे । ठाकिला की गा ॥1222॥
अथवा हेही असो; ह्या क्रमयोगरूपी ओघांतून वाहणारी ही भक्तिचिद्गंगा, वेगाने, निजानंदसागर जो मी, त्या मला येऊन गांठते व मद्रुप होते. 22
1223-18
हा ठायवरी सुवर्मा । क्रमयोगी आहे महिमा । म्हणौनि वेळोवेळा तुम्हा । सांगतो आम्ही ॥1223॥
अर्जुना, हा क्रमयोग अखेरपर्यंत पोंचविणारा आहे, असा ह्याचा महिमा आहे; व म्हणूनच आम्ही त्याचे वारंवार वर्णन केले. 23
1224-18
पै देशे काळे पदार्थे । साधूनि घेइजे माते । तैसा नव्हे मी आयते । सर्वाचे सर्वही ॥1224॥
कारण, देशविशेषांत, कालविशेषांत अथवा साधनविशेषाने होणारी अशी माझी प्राप्ति नसून, मी सर्वाचा आत्माच असल्याने सर्वाना सर्वदा सहजच प्राप्त आहे. 24
1225-18
म्हणौनि माझ्या ठायी । जाचावे न लगे काही । मी लाभे इये उपायी । साचचि गा ॥1225॥
म्हणून, माझ्या प्राप्त्यर्थे कोणतेही सायास करावे लागत नाहीत. ह्या वरील क्रमयोगाने मी निश्चयाने सहज प्राप्त होतो 25
1226-18
एक शिष्य एक गुरु । हा रूढला साच व्यवहारु । तो मत्प्राप्तिप्रकारु । जाणावया ॥1226॥
एक गुरु, एक शिष्य, असा जो संप्रदाय लोकात रूढ आहे, तो मत्प्राप्तीचे योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून होय 26
1227-18
अगा वसुधेच्या पोटी । निधान सिद्ध किरीटी । वन्हि सिद्ध काष्ठी । वोहा दूध ॥1227॥
अरे, पूर्वीच्या पोटात अनंत ठेवे, काष्ठांत अग्नि व कासेंत दुध, नित्य सिद्ध आहेतच. 27
1228-18
परी लाभे ते असते । तया कीजे उपायाते । येर सिद्धचि तैसा तेथे । उपायी मी ॥1228॥
परंतु, ते सिद्ध असलेले पदार्थच प्राप्त करून घेण्यास काही उपाय करावे लागतात; त्याप्रमाणे नित्यसिद्ध असलेल्या माझ्या प्राप्तीचेही उपाय करावे लागतात. 28
1229-18
हा फळहीवरी उपावो । का पा प्रस्तावीतसे देवो । हे पुसता परी अभिप्रावो । येथिचा ऐसा ॥1229॥
स्वतःच्या प्राप्तीचे उपाय मागे सांगितले असता, पुन्हा त्याच विषयाची देव प्रस्तावना का करीत आहेत असे कोणास वाटल्यास येथे देवांच्या मनातील अभिप्राय असा आहे, 29
1230-18
जे गीतार्थाचे चांगावे । मोक्षोपायपर आघवे । आन शास्त्रोपाय की नव्हे । प्रमाणसिद्ध ॥1230॥
की, सर्व गीताशास्त्र, हे स्वतःप्रमाण वेदांचे सार असून मोक्षोपायदर्शक आहे; अन्यशास्त्रोपाय असले तरी, ते प्रमाण सिद्ध असतीलच असे सांगता येत नाही. 1230
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1231-18
वारा आभाळचि फेडी । वाचूनि सूर्याते न घडी । का हातु बाबुळी धाडी । तोय न करी ॥1231॥
माझी प्राप्ति म्हणजे असा प्रकार असतो. वारा फक्त सूर्याच्या आड असलेले ढग दूर लोटतो, सूर्य काही नवा आणीत नाही; किंवा हाताने पाण्यावरील फक्त गोंडाळ दूर केली जाते; पाणी पहिलेच असते. 31
1232-18
तैसा आत्मदर्शनी आडळु । असे अविद्येचा जो मळु । तो शास्त्र नाशी येरु निर्मळु । मी प्रकाशे स्वये ॥1232॥
त्याप्रमाणे आत्मदर्शनाला प्रतिबंध करणारा जो अज्ञानाचा पडदा मध्ये असतो, तेवढाच शास्त्र दूर करितें; त्याचे आत मी असंग, स्वप्रकाश, नित्य आहेच. त्याचे दर्शन सहज होतें; 32
1233-18
म्हणौनि आघवीचि शास्त्रे । अविद्याविनाशाची पात्रे । वाचोनि न होती स्वतंत्रे । आत्मबोधी ॥1233॥
म्हणून, सर्व शास्त्रांची मर्यादा अगर कामगिरी अविद्येचा नाश करणे येथ वरच आहे; त्यांच्यात स्वतःसिद्ध आत्मबोध (साक्षात्) करून देण्याचे सामर्थ्य नाही. 33
1234-18
तया अध्यात्मशास्त्रांसी । जै साचपणाची ये पुसी । तै येइजे जया ठायासी । ते हे गीता ॥1234॥
अध्यात्मविषयावरील जी इतर शास्त्रे त्यास, त्यांच्या विधानाच्या सत्यत्वाला प्रमाण काय असे विचारले तर, ती प्रमाण म्हणून ज्याच्याकडे बोट करितात ते हे गीताशास्त्र होय. (येवढी ह्याची थोरवी आहे. ) 34
1235-18
भानुभूषिता प्राचिया । सतेजा दिशा आघविया । तैसी शास्त्रेश्वरा गीता या । सनाथे शास्त्रे ॥1235॥
सूर्य उदयाने. पूर्वदिशा अलंकृत करितो खरी, पण, लगेच इतर सर्व दिशा सतेज होतात, तसे सर्व अध्यात्मशास्त्रांचा राजा अशी ही गीता तिच्यावर शास्त्राचे सर्व सनाथत्व अगर सौभाग्य अवलंबून आहे. 35
1236-18
हे असो येणे शास्त्रेश्वरे । मागा उपाय बहुवे विस्तारे । सांगितला जैसा करे । घेवो ये आत्मा ॥1236॥
हे असो; ह्या गीताशास्त्रेश्वराने मागे पुष्कळ विस्तारपूर्वक आत्म-प्राप्तीचा उपाय सांगितला आहे की ज्यायोगे तळहातावरील वस्तूप्रमाणे आत्मदर्शन व्हावे. 36
1237-18
परी प्रथमश्रवणासवे । अर्जुना विपाये हे फावे । हा भावो सकणवे । धरूनि श्रीहरी ॥1237॥
पण प्रथम श्रवणा- बरोबर अर्जुनाच्या चित्तांत ते आरूढ होईल न होईल अशी देवांनी कळकळ बाळगून 37
1238-18
तेचि प्रमेय एक वेळ । शिष्यी होआवया अढळ । सांगतसे मुकुल । मुद्रा आता ॥1238॥
तोच अर्थ अगर तेच प्रमेय शिष्याच्या चित्तांत ठसावे म्हणून पुन्हा स्पष्ट करून कथन केले. 38
1239-18
आणि प्रसंगे गीता । ठावोही हा संपता । म्हणौनि दावी आद्यंता । एकार्थत्व ॥1239॥
आणि गीताग्रंथाच्या समाप्तीचाही प्रसंग असल्यामुळे गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय एकच आहे हे तिच्या उपक्रमाच्या व उपसंहाराच्या एकार्थत्वाने दाखवितात. 39
1240-18
जे ग्रंथाच्या मध्यभागी । नाना अधिकारप्रसंगी । निरूपण अनेगी । सिद्धांती केले ॥1240॥
ग्रंथाच्या मधील अध्यायात अधिकार भेदाने भिन्न भिन्न सिद्धान्त सांगितले आहेत. 1240
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1241-18
तरी तेतुलेही सिद्धांत । इये शास्त्री प्रस्तुत । हे पूर्वापर नेणत । कोण्ही जै मानी ॥1241॥
त्यामुळे ह्या गीताशास्त्रांत अनेक सिद्धान्त सांगितले आहेत असे पूर्वापर संबंध न जर जाणणाराला वाटेल तर- 41
1242-18
तै महासिद्धांताचा आवांका । सिद्धांतकक्षा अनेका । भिडऊनि आरंभु देखा । संपवीतु असे ॥1242॥
मुख्य सिद्धान्ताच्या पोटात अनेक उपसिद्धान्त त्याची कक्षा म्हणून सांगावे लागतात, हे या उपसिद्धांताची मुख्य सिद्धान्तापाशी जुळणी करून दाखवून आरंभिलेली गीता, देव संपुर्ण करितात. 42
1243-18
एथ अविद्यानाशु हे स्थळ । तेणे मोक्षोपादान फळ । या दोही केवळ । साधन ज्ञान ॥1243॥
अविद्येचा नाश करून त्यायोगे आत्मरूप मोक्षफल जीवांच्या पदरात पाडणे व ह्या दोन्ही गोष्टीचे साधन म्हणजे केवळ यथार्थ आत्मज्ञान हेच होय, हे जीवांस पटविणे हाच गीतेचा महासिद्धान्त होय. 43
1244-18
हे इतुलेचि नानापरी । निरूपिले ग्रंथविस्तारी । ते आता दोही अक्षरी । अनुवादावे ॥1244॥
हे इतकेच सांगण्यासाठी, प्रसंगतः ग्रंथांत कर्म उपासनादि विस्तार करून सांगितले; पण त्या मुख्य सिद्धान्ताचा थोडक्यात अनुवाद करावा ह्या हेतूने 44
1245-18
म्हणौनि उपेयही हाती । जालया उपायस्थिती । देव प्रवर्तले ते पुढती । येणेचि भावे ॥1245॥
म्हणून उपेय म्हणजे ज्याच्यासाठी उपाय करावे ते फल प्राप्त झाले असतांही त्याचे उपाय सांगण्यात देव पुन्हा प्रवृत्त झाले. 45

सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः ।
मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ॥18. 56॥
1246-18
मग म्हणे गा सुभटा । तो क्रमयोगिया निष्ठा । मी होऊनी होय पैठा । माझ्या रूपी ॥1246॥
देव म्हणतात, अर्जुना, असा तो क्रमयोगी निष्ठेने मद्रूप होऊन माझ्या स्वरूपात रहातो. 46
1247-18
स्वकर्माच्या चोखौळी । मज पूजा करूनि भली । तेणे प्रसादे आकळी । ज्ञाननिष्ठेते ॥1247॥
स्वकर्माचरणरूप पुष्पांनी माझे पूजन करून त्यायोगे होणाऱ्या माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो 47
1248-18
ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे । तेथ भक्ति माझी उल्लासे । तिया भजन समरसे । सुखिया होय ॥1248॥
ती ज्ञाननिष्ठा ज्याने हस्तगत केली तेथे माझी भक्ति उत्कर्ष पावते व तिच्या भजनांत समरस होऊन तो सुखी होतो. 48
1249-18
आणि विश्वप्रकाशितया । आत्मया मज आपुलिया । अनुसरे जो करूनिया । सर्वत्रता हे ॥1249॥
आणि सर्व विश्वाला प्रकाशित करणारा असा जो मी, त्याचा आत्मा त्याला तो सर्वथैव अनुसरतो. 49
1250-18
सांडूनि आपुला आडळ । लवण आश्रयी जळ । का हिंडोनि राहे निश्चळ । वायु व्योमी ॥1250॥
आपले काठिण्य सोडून मीठ जसा जलाचा आश्रय करिते किंवा सर्व दिशांत संचार करून वायु जसा आकाशाचे पोटात शान्त होतो. 1250
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1251-18
तैसा बुद्धी वाचा काये । जो माते आश्रऊनि ठाये । तो निषिद्धेंही विपाये । कर्मे करू ॥1251॥
त्याप्रमाणे, काया, वाचा, मनेंकरून जो माझा आश्रय करून राहिला आहे, तो क्वचित् निषिद्धही कर्म करो. 51
1252-18
परी गंगेच्या संबंधी । बिदी आणि महानदी । येक तेवी माझ्या बोधी । शुभाशुभांसी ॥1252॥
पण, गंगाप्रवेश झाल्या वर ओहोळ आणि महानदी हा जसा भेद उरत नाही त्याप्रमाणे, ज्याला माझ्या स्वरूपाचे ज्ञान झाले आहे त्याला शुभ व अशुभ दोन्ही कर्मे तुल्य असतात 52
1253-18
का बावने आणि धुरे । हा निवाडु तवचि सरे । जव न घेपती वैश्वानरे । कवळूनि दोन्ही ॥1253॥
हा अस्सल चंदन आहे व हा धुर करणारा निंब आहे असा विचार, ती दोन्ही काष्ठे अग्नींत टाकली नाहीत तोपर्यंतच असतो. 53
1254-18
ना पांचिके आणि सोळे । हे सोनया तवचि आले । जव परिसु आंगमेळे । एकवटीना ॥1254॥
पांचकशी व सोळाकशी, असा भेद सोन्यात तोंवरच असतो, की जपर्यंत हलक्या सोन्याला परिसाचा संबंध घडत नाही. (तो जडल्याबर हिणकट धातूचे उत्तम सुवर्ण होणारच). 54
1255-18
तैसे शुभाशुभ ऐसे । हे तंवचिवरी आभासे । जव येकु न प्रकाशे । सर्वत्र मी ॥1255॥
सर्वत्र माझा एकाचच प्रकाश (व्याप्ति) आहे अशा बोधाचा जोंवर उदय झाला नाही तोवर शुभ व अशुभ असे भेद बुद्धिपुढे उभे रहातात. 55
1256-18
अगा रात्री आणि दिवो । हा तवचि द्वैतभावो । जव न रिगिजे गावो । गभस्तीचा ॥1256॥
अरे, रात्र आणि दिवस हा दैतभाव, ती दोघे, सूर्याच्या गावाला गेली नाहीत तोंवरच नांदतो (तेथे रात्रही नाही व तत्सापेक्ष दिवसही नाही) 56
1257-18
म्हणौनि माझिया भेटी । तयाची सर्व कर्मे किरीटी । जाऊनि बैसे तो पाटी । सायुज्याच्या ॥1257॥
म्हणून, अर्जुना, माझ्या यथार्थस्वरूप प्रकाशापुढे, त्याच्या शुभाशुभ सर्व कर्माचेभस्म होऊन तो सायुज्यपदावर बसतो. 57
1258-18
देशे काळे स्वभावे । वेचु जया न संभवे । ते पद माझे पावे । अविनाश तो ॥1258॥
देशाने, कालाने अगर निसर्गतः ज्याचा कधीही नाश संभवत नाही असे जे माझे अविनाशपद (सायुज्यपद) हे त्याला प्राप्त होते. 58
1259-18
किंबहुना पंडुसुता । मज आत्मयाची प्रसन्नता । लाहे तेणे न पविजता । लाभु कवणु असे ॥1259॥
किंबहुना, अर्जुना, मी जो परमात्मा त्याची प्रसन्नता अथवा त्याचा प्रसाद त्याला प्राप्त होतो; आणखी कोणता असा लाभ असणार की, जो या प्रसादानंतरही मिळणे बाकी आहे ? 59
चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः ।
बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥18. 57॥
1260-18
याकारणे गा तुवा इया । सर्व कर्मा आपुलिया । माझ्या स्वरूपी धनंजया । संन्यासु कीजे ॥1260॥
यास्तव, धनंजया, तू आपली सर्वं कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण कर. 1260
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1261-18
परी तोचि संन्यासु वीरा । करणीयेचा झणे करा । आत्मविवेकी धरा । चित्तवृत्ति हे ॥1261॥
परंतु अर्जुना, तो कर्मसंन्यास अकृत्रिम असून चित्तवृत्ति आत्मविचाराकडे असू दे. 61
1262-18
मग तेणे विवेकबळे । आपणपे कर्मावेगळे । माझ्या स्वरूपी निर्मळे । देखिजेल ॥1262॥
मग त्या आत्म- विचाराच्या सामर्थ्याने. तुला, कर्माहून अत्यंत वेगळे असलेल्या अशा आपल्या निर्मळ स्वरूपाचे माझ्या स्वरूपात दर्शन होईल. 62
1263-18
आणि कर्माचि जन्मभोये । प्रकृति जे का आहे । ते आपणयाहूनि बहुवे । देखसी दूरी ॥1263॥
आणि कर्माचे जन्मस्थान जी प्रकृति किंवा अविद्या तिचा व आपला काहीही संबंध नाही हे तुझ्या ध्यानी येईल. 63
1264-18
तेथ प्रकृति आपणया । वेगळी नुरे धनंजया । रूपेवीण का छाया । जियापरी ॥1264॥
( विचारा अंती तुला असेही कळून येईल कि) रूपावाचून छाया म्हणून जसा स्वतंत्र पदार्थ नसतो, त्याप्रमाणं स्वात्मसत्तेहून प्रकृतीला पृथक् सत्ताच नसल्यामुळे ती आपल्याहून वेगळीही नाही, असें, अर्जुना तुझ्या ध्यानात येईल. 64
1265-18
ऐसेनि प्रकृतिनाशु । जालया कर्मसंन्यासु । निफजेल अनायासु । सकारणु ॥1265॥
अशा अनिर्वचनीय स्वरूपाविष्करणाने प्रकृतीचा नाश (मिथ्यात्व) झाला म्हणजे, तीच कर्माचे जन्मस्थान किंवा कारण असल्यामुळे, कर्माचा कारणासहवर्तमान सहजच संन्यास होतो. 65
1266-18
मग कर्मजात गेलया । मी आत्मा उरे आपणपया । तेथ बुद्धि घापे करूनिया । पतिव्रता ॥1266॥
अशा रीतीने सर्वकर्मसंन्यास झाला असता, मी आत्मा सहजच नित्य स्थित आहे. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तुझी बुद्धि पवित्रतेप्रमाणे सदैव स्थिर असू दे. 66
1267-18
बुद्धि अनन्य येणे योगे । मजमाजी जै रिगे । तै चित्त चैत्यत्यागे । मातेचि भजे ॥1267॥
बुद्धि अनन्यभावाने मत्स्वरूपी रत आली म्हणजे चित्तही अन्य चिंतनाच्या विषयांच्या त्यागाने माझ्याच भजनी लागेल. 67
1268-18
ऐसे चैत्यजाते सांडिले । चित्त माझ्या ठायी जडले । ठाके तैसे वहिले । सर्वदा करी ॥1268॥
याप्रमाणे विषय त्याग झालेले चित्त माझ्या स्वरूप नित्य जडून राहील असे सत्वर कर. 68
मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि ।
अथ चेत्त्वमहंकारान्न श्रोष्यसि विनण्‌क्ष्यसि ॥18. 58॥
1269-18
मग अभिन्ना इया सेवा । चित्त मियाचि भरेल जेधवा । माझा प्रसादु जाण तेधवा । संपूर्ण जाहला ॥1269॥
मग अशा प्रकारच्या अभेद सेवेने तुझे चित्त जेव्हा मद्रूप होईल, तेव्हांच तुझ्यावर माझा पूर्ण प्रसाद झाला असे समज. 69
1270-18
तेथ सकळ दुःखधामे । भुंजीजती जिये मृत्युजन्मे । तिये दुर्गमेचि सुगमे । होती तुज ॥1270॥
ह्या प्रसादाने जन्मापासून मृत्यूपर्यंत जेवढी दुर्गम दुःखे भोगावी लागतात ती सर्व तुला सुतर (सुगम) होतील. (भोगावी लागणार नाहीत) 1270
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1271-18
सूर्याचेनि सावाये । डोळा सावाइला होये । तै अंधाराचा आहे । पाडु तया ? ॥1271॥
सूर्य प्रकाशाचे सहाय्य असलेला डोळा काय अधंकाराला भिणार आहे ? 71
1272-18
तैसा माझेनि प्रसादे । जीवकणु जयाचा उपमर्दे । तो संसाराचेनी बाधे । बागुले केवी ? ॥1272॥
त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची जीवदशा उपमर्दित (नष्ट, बाधित) झाली आहे, त्याला संसाररूप बागुलाची (मिथ्या वस्तूची) कशी भीति वाटेल ? 72
1273-18
म्हणौनि धनंजया । तू संसारदुर्गती यया । तरसील माझिया । प्रसादास्तव ॥1273॥
म्हणून अर्जुना, माझ्या प्रसादाने तू हा इतरास दुस्तर असलेला संसार सहज तरून जाशील. (तरून जाणं आहे इतकेंही सत्यत्व त्याचे ठिकाणी उरणार नाही) 73
1274-18
अथवा हन अहंभावे । माझे बोलणे हे आघवे । कानामनाचिये शिवे । नेदिसी टेको ॥1274॥
अथवा, सर्वज्ञतेच्या किंवा अभिमानाच्या तोऱ्यात तू हे माझे बोलणे नुसते ऐकणारही नाहींस किंवा मनावरही घेणार नाहीस. 74
1275-18
तरी नित्य मुक्त अव्ययो । तू आहासि ते होऊनि वावो । देहसंबंधाचा घावो । वाजेल आंगी ॥1275॥
तर, वस्तुतः तू नित्यमुक्त व अविनाशी आहेस ते सर्व व्यर्थ होऊन, देहसंबधाने होणारे सर्व दुःखाघात तुला सोसावे लागतील. 75
1276-18
जया देहसंबंधा आंतु । प्रतिपदी आत्मघातु । भुंजता उसंतु । कहीचि नाही ॥1276॥
ह्या देहात्मबुद्धीने पावलो पावली, आत्मघात होत असतो व विसावा म्हणून कसा तो क्षणभरही मिळत नाही. 76
1277-18
येवढेनि दारुणे । निमणेनवीण निमणे । पडेल जरी बोलणे । नेघसी माझे ॥1277॥
माझ्या भाषणाकडे तू दुर्लक्ष केलेस तर, वस्तुतः तू अमर असूनही तुला मरणासारखे दारुण दुःख भोगावे लागेल. 77
यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे ।
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वा नियोक्ष्यति ॥18. 59॥
1278-18
पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु । का दीपद्वेषिया अंधकारु । विवेकद्वेषे अहंकारु । पोषूनि तैसा ॥1278॥
पथ्य मोडणारा ज्वराला व दीप फोडणारा अंधकारला, तसा विचार सोडणारा अहंकाराला पुष्ट करितो. 78
1279-18
स्वदेहा नाम अर्जुनु । परदेहा नाम स्वजनु । संग्रामा नाम मलिनु । पापाचारु ॥1279॥
आपला देह तो अर्जुन, दुसऱ्यांचे देह ते स्वजन, आणि त्यांच्याबरोबर युद्ध म्हणजे पापकर्म. 79
1280-18
इया मती आपुलिया । तिघा तीन नामे यया । ठेऊनिया धनंजया । न झुंजे ऐसा ॥1280॥
ह्या तीन गोष्टींना आपल्या, बुद्धीप्रमाणे अशी तीन नांवे देऊन, अर्जुना, मी युद्ध करणार नाही असा-1280
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
128-18
जीवामाजी निष्टंकु । करिसी जो आत्यंतिकु । तो वाया धाडील नैसर्गिकु । स्वभावोचि तुझा ॥1281॥
चित्तांत दृढनिश्चय करून जरी तू बसला असलास तरी तुझा नैसर्गिक म्हणजे जन्मजात, स्वभाव तुझा तो निश्चय टिकू देणार नाही. 81
1282-18
आणि मी अर्जुन हे आत्मिक । यया वधु करणे हे पातक । हे मायावाचूनि तात्त्विक । काही आहे ? ॥1282॥
आणि विचार करून पाहिले तर, ” मी अर्जुना, हे माझे ह्यांचा वध करणे म्हणजे पातक ” इत्यादि समजूत, म्हणजे तत्त्वदृष्टया केवळ भ्रमावाचून दुसरे काही आहे काय ? 82
1283-18
आधी जुंझार तुवा होआवे । मग झुंजावया शस्त्र घेयावे । का न जुंझावया करावे । देवांगण ॥1283॥
अरे, प्रथम तूच युद्धाला तयार झालास त्याकरिता शस्त्रही धारण केलेस व आता ऐन प्रसंग मी युद्ध करणार नाही अशी प्रतिज्ञा करतोस ? 83
1284-18
म्हणौनि न झुंजणे । म्हणसी ते वायाणे । ना मानू लोकपणे । लोकदृष्टीही ॥1284॥
म्हणून, झुंजणार नाही असे जे म्हणत आहेस ते व्यर्थ होय. आम्हाला तर ते खरे वाटत नाहीच, पण लोकही हे खरे आहे असे मानणार नाहीत. 84
1285-18
तऱ्ही न झुंजे ऐसे । निष्टंकीसी जे मानसे । ते प्रकृति अनारिसे । करवीलचि ॥1285॥
तरी युद्ध करू नये असा जो चित्तांत सारखा विचार सुरू आहे, तो तुझा क्षात्रस्वभावच अन्यथा करील. (फिरवील) 85
स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा ।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोपि तत् ॥18. 60॥
1286-18
पै पूर्वे वाहता पाणी । पव्हिजे पश्चिमेचे वाहणी । तरी आग्रहोचि उरे ते आणी । आपुलिया लेखा ॥1286॥
अहो, पूर्वदिशेकडे पाणी वाहत असता, कोणी पश्चिमेकडे तोंड करून पोहू लागला, त्याचा आग्रह मात्र उरणार; पाणी त्यास आपल्या ओघाकडे आणणारच. 86
1287-18
का साळीचा कणु म्हणे । मी नुगवे साळीपणे । तरी आहे आन करणे । स्वभावासी ? ॥1287॥
साळीच्या बीयाने साळीपणाने न उगविण्याचे ठरविले तर ही अस्वाभाविक गोष्ट शक्य आहे काय ? 87
1288-18
तैसा क्षात्रंस्कारसिद्धा । प्रकृती घडिलासी प्रबुद्धा । आता नुठी म्हणसी हा धांदा । परी उठवीजसीचि तू ॥1288॥
त्याप्रमाणे, जन्मतः क्षात्रसंस्कारसिद्ध प्रकृतीने घडलेला किंवा बनलेला बनलेला जो तूं, तो ह्या क्षणी युद्ध करणार नाही असे जरी म्हणालास तरी ते व्यर्थ होय; ती तुझी प्रकृति तुला उठविणारच. 88
1289-18
पै शौर्य तेज दक्षता । एवमादिक पंडुसुता । गुण दिधले जन्मता । प्रकृती तुज ॥1289॥
अर्जुना, तेज, शौर्य, दक्षता आदि तुझ्या अंगचे गुण प्रकृतिसिद्ध किंवा जन्मजात आहेत. 89
1290-18
तरी तयाचिया समवाया- । अनुरूप धनंजया । न करिता उगलिया । नयेल असो ॥1290॥
तर, त्या गुणानुरूप न वागता तु स्वस्थ बसू म्हणशील तर प्रकृति तुला तसे करू देणार नाही. 1290
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1291-18
म्हणौनिया तिही गुणी । बांधिलासि तू कोदंडपाणी । त्रिशुद्धी निघसी वाहणी । क्षात्राचिया ॥1291॥
अर्जुना, त्या गुणांनी तू जन्मतः बांधलेला आहेस. अखेर ते तुला क्षात्र वळणावर नेणारच. 91
1292-18
ना हे आपुले जन्ममूळ । न विचारीतचि केवळ । न झुंजे ऐसे अढळ । व्रत जरी घेसी ॥1292॥
अथवा आपला जन्म कोणत्या कुलांत आहे. ह्याचा काहींएक विचार न करिता नुसता लढणार नाही असा निश्चय करून बसशील. 92
1293-18
तरी बांधोनि हात पाये । जो रथी घातला होये । तो न चाले तरी जाये । दिगंता जेवी ॥1293॥
तरी, हातपाय बांधून रथीत घातलेला मनष्य स्वतः न चालतांही जसा रथाबरोबर देशांतराला पोचतो 93
1294-18
तैसा तू आपुलियाकडुनी । मी काहीच न करी म्हणौनि । ठासी परी भरवसेनि । तूचि करिसी ॥1294॥
त्याप्रमाणे आपण काही करणार नाही अशा निश्चयाने तू जरी असलास तरी, खात्रीने तूच ते करणार. 94
1295-18
उत्तरु वैराटीचा राजा । पळता तू का निघालासी झुंजा ? । हा क्षात्रस्वभावो तुझा । झुंजवील तुज ॥1295॥
विराट नगराचा राज उत्तर, युद्धांतून पळू लागला, तेव्हा तू रे का ते युद्ध केलेस ? हा तुझा क्षात्रस्वभाव तुला युद्ध करू लावणारच. 95
1296-18
महावीर अकरा अक्षौहिणी । तुवा येके नागविले रणांगणी । तो स्वभावो कोदंडपाणी । झुंजवील तूते ॥1296॥
अर्जुना, त्या युद्धांत अकरा अक्षौहिणी महावीर तू एकटयानं पराजित करून त्यांची वस्त्रे हिराऊन घेतलीस, तो तुझा क्षत्रियाचा स्वभाव तुला झुंजविणारच. 96
1297-18
हा गा रोगु कायी रोगिया । आवडे दरिद्र दरिद्रिया ? । परी भोगविजे बळिया । अदृष्टे जेणे ॥1297॥
अरे, रोग्याला रोगाची किंवा निर्धनाला निर्धनत्वाची काय आवड असते ? पण बलवान अदृष्ट तसे भोग देतेच. 97
1298-18
ते अदृष्ट अनारिसे । न करील ईश्वरवशे । तो ईश्वरुही असे । हृदयी तुझ्या ॥1298॥
ईश्वराधीन असलेले ते अदृष्ट अन्यथा काहीही करू शकत नाही; व तो ईश्वरही तुझ्याच हृदयाच्या ठिकाण आहे, 98
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥18. 61॥
1299-18
सर्व भूतांच्या अंतरी । हृदय महाअंबरी । चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरी । उदयला असे जो ॥1299॥
भूतमात्रांच्या अंतःकरणरूपी महाकाशांत, जो ज्ञानवृत्तिरूप अनंत किरणांनी उदय पावला आहे 99
1300-18
अवस्थात्रय तिन्ही लोक । प्रकाशूनि अशेख । अन्यथादृष्टि पांथिक । चेवविले ॥1300॥
व जो जीवांच्या जागृति, स्वप्न व सुषुप्ति ह्या तिन्ही अवस्थारूप लोकास प्रकाशून, देहात्मबुद्धीच्या विपरीत ज्ञानाने सन्मार्गच्युत झालेल्या त्या जीवरूपी पांथिकांना ( वाटसरूंना जागे करितो. 1300
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1301-18
वेद्योदकाच्या सरोवरी । फांकता विषयकल्हारी । इंद्रियषट्पदा चारी । जीवभ्रमराते ॥1301॥
व जो दृश्यपदार्थ हेच आहे उदक ज्यात, अशा सरोवरांत पंचविषयरूप कमले प्रफुल्लीतझाली असता, पंचज्ञानेंद्रिये व मन हे आहेत सहा पाय ज्या जीवभ्रमरांना, त्यांजकडून तो कमलगंध सेवन करवितो. 1301
1302-18
असो रूपक हे तो ईश्वरु । सकल भूतांचा अहंकारु । पांघरोनि निरंतरु । उल्हासत असे ॥1302॥
हे रूपक असो; असा समष्टिभूतांच्या अहंकाराचा अभिमान निरंतरधारण करून जो मिरवत असतो. तो ईश्वर होय. 1302
1303-18
स्वमायेचे आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र । बाहेरी नटी छायाचित्र । चौऱ्यांशी लक्ष ॥1303॥
आपल्या शुद्ध स्वरूपाच्या आपल्याच मायेचा पडदा लावून, एकटा सर्व दोरी हलवून, बाहेर चौऱ्यांंशी लक्ष विचित्र छायाचित्रे नाचवितो. 1303
1304-18
तया ब्रह्मादिकीटांता । अशेषांही भूतजाता । देहाकार योग्यता । पाहोनि दावी ॥1304॥
तो, ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत अशेष भूतमात्रांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार देह देतो. 1304
1305-18
तेथ जे देह जयापुढे । अनुरूपपणे मांडे । ते भूत तया आरूढे । हे मी म्हणौनि ॥1305॥
त्यावेळी, ज्या भूतापुढे जो देह त्याला योग्य किंवा अनरूप म्हणून मांडवा, त्या देहांत ते भूत, ‘ हा मी ” अशा बुद्धीने प्रवेश करिते. 1305
1306-18
सूत सूते गुंतले । तृण तृणचि बांधले । का आत्मबिंबा घेतले । बाळके जळी ॥1306॥
सुताने सूत गुंतवावे, गवतानेच गवत बांधावे, किंवा बालकाने पाण्यातील आपले प्रतिबिंब घेऊ पहावे. 1306
1307-18
तयापरी देहाकारे । पापियाचा आपणपेचि दुसरे । देखोनि जीव आविष्करे । आत्मबुद्धि ॥1307॥
त्याप्रमाणे पुढे दिसणारी देहाकृति ही आपणच आहो असे भ्रमाने मानून जीव तेथे आत्मबुद्धीने आविर्भूत होतो. 1307
1308-18
ऐसेनि शरीराकारी । यंत्री भूते अवधारी । वाहूनि हालवी दोरी । प्राचीनाची ॥1308॥
ह्याप्रमाणे देहाकार यंत्रांवर भूतांना घालून, त्यांच्या प्रारब्धकर्मानुसार ईश्वर सूत्र चाळवतो. 1308
1309-18
तेथ जया जे कर्मसूत्र । मांडूनि ठेविले स्वतंत्र । ते तिये गती पात्र । होचि लागे ॥1309॥
तेथे ज्या ज्या भूताचे (जीवाचे) जे जे स्वतंत्र (निराळे) प्रारब्धसूत्र मांडलेले असते त्या त्या गतीला ते ते भूत प्राप्त होऊ लागले. 1309
1310-18
किंबहुना धनुर्धरा । भूतांते स्वर्गसंसारा । -माजी भोवंडी तृणे वारा । आकाशी जैसा ॥1310॥
किंबहुना अर्जुना, वारा गवताच्या काड्या जशा आकाशात इतस्ततः उडवितो, तसे हे जीवाचे प्रारब्धकर्म त्यांना स्वर्गा पासून मृत्युलोकापर्यंत इतस्ततः फिरविते. 1310
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1311-18
भ्रामकाचेनि संगे । जैसे लोहो वेढा रिगे । तैसी ईश्वरसत्तायोगे । चेष्टती भूते ॥1311॥
लोहचुंबकाच्या सान्निध्याने लोखंडाला जशी गति प्राप्त होते, ती ईश्वरसत्तेच्या योगाने भूते व्यवहार करतात. 11
1312-18
जैसे चेष्टा आपुलिया । समुद्रादिक धनंजया । चेष्टती चंद्राचिया । सन्निधी येकी ॥1312॥
ज्या प्रमाणे एका चंद्राच्या सान्निध्याने समुद्रादिकांच्या ठीकाणी हालचाल (चेष्टा) चालू होते. 12
1313-18
तया सिंधू भरिते दाटे । सोमकांता पाझरु फुटे । कुमुदांचकोरांचा फिटे । संकोचु तो ॥1313॥
या चेष्टा अशा-समुद्राला भरती येते, सोमकांत मण्याला पाझर फुटतो; चंद्रविकासिनी कमले फुलतात व व चकोर पक्षांस आनंद होतो. 13
1314-18
तैसी बीजप्रकृतिवशे । अनेके भूते येके ईशे । चेष्टवीजती तो असे । तुझ्या हृदयी ॥1314॥
त्याप्रमाणे मूलप्रकृतीच्या अनुरोधाने ईश्वर अनेक भूतमात्र एकसमयावच्छेदैकरून चाळवितो, तो तुझ्या हृदयामध्ये वास करून आहेच. 14
1315-18
अर्जुनपण न घेता । मी ऐसे जे पंडुसुता । उठतसे ते तत्वता । तयाचे रूप ॥1315॥
अर्जुनाच्या भावनेला स्पर्श न करिता ” केवल मी (अस्तितामात्र) असे जे नित्यस्फुरद्रूप चैतन्य ते त्या ईश्वराचे (परमात्मा) तात्विकरूप होय, 15
1316-18
यालागी तो प्रकृतीते । प्रवर्तवील हे निरुते । आणि ते झुंजवील तूते । न झुंजशी जऱ्ही ॥1316॥
म्हणून तो ईश्वर, प्रकृतीला प्रवृत्त करून तिच्या द्वारे झुंजणार ही असा निश्चय करून बसलेल्या तुला लढवील हे निश्चित होय. 16
1317-18
म्हणौनि ईश्वर गोसावी । तेणे प्रकृती हे नेमावी । तिया सुखे राबवावी । इंद्रिये आपुली ॥1317॥
म्हणून, सर्व व्यवहाराचा ईश्वर हा मी आहे तो प्रकृतीचे नियमन करितो व तिच्या द्वारा आपली सर्व इंद्रिये आपपला व्यवहार सुखाने किंवा सूरळीत करितात. 17
1318-18
तू करणे न करणे दोन्ही । लाऊनि प्रकृतीच्या मानी । प्रकृतीही का अधीनी । हृदयस्था जया ॥1318॥
म्हणून तू, करणे न करणे वगैरे सर्व गोष्टी प्रकृतीवर सोपवून तीही ज्या हृदयस्थ ईश्वराच्या अधीन आहे. 18
तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत ।
तत्प्रसादात्परा शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥18. 62॥
1319-18
तया अहं वाचा चित्त आंग । देऊनिया शरण रिग । महोदधी का गांग । रिगाले जैसे ॥1319॥
त्याला, गंगानदी जशी महासागराला शरण जाते (मिळते) तसा काया, वाचा, करून शरण हो. (अनन्य, तद्रूप) 19
1320-18
मग तयाचेनि प्रसादे । सर्वोपशांतिप्रमदे । कांतु होऊनिया स्वानंदे । स्वरूपींचि रमसी ॥1320॥
मग त्याच्या प्रसादाने, सर्वाचे खऱ्या विश्रांतीचे स्थान जी शान्ति स्त्री तिचा तू स्वामी होऊन निजानंदस्वरूपात रममाण होशील 1320
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1321-18
संभूति जेणे संभवे । विश्रांति जेथे विसंवे । अनुभूतिही अनुभवे । अनुभवा जया ॥1321॥
जे उत्पत्ति स्थिति, लयाचे आदिकारण, (अधिष्ठान) विश्रांतीचे विश्रामस्थान व अनुभवाचाही अनुभव असे आहे. 21
1322-18
तिये निजात्मपदींचा रावो । होऊनि ठाकसी अव्यवो । म्हणे लक्ष्मीनाहो । पार्था तू गा ॥1322॥
या स्वात्मस्वरूपपदाचा राजा होऊन, अर्जुना, तेथून तू कधीही च्युत होणार नाहीस बरें, असे लक्ष्मीपति भगवान श्रीकृष्ण म्हणाले. 22
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥18. 63॥
1323-18
हे गीता नाम विख्यात । सर्ववाङ्गमयाचे मथित । आत्मा जेणे हस्तगत । रत्न होय ॥1323॥
शब्दराशि सर्व वाङ्मयरूप जो वेद त्याच्या मंथनाने काढलेले हे प्रसिद्ध गीतामृत होय; ह्याच्या सेवनाने करतलावरील रत्नाप्रमाणे आत्मस्वरूप हस्तगत (अपरोक्ष) 23
1324-18
ज्ञान ऐसिया रूढी । वेदांती जयाची प्रौढी । वानिता कीर्ति चोखडी । पातली जगी ॥1324॥
ह्या गीताशास्त्राचे, वेदान्तांत ज्याची अत्यंत थोरवी गाइली आहे असे ज्ञान हे रूढनाम आहे; ‘तिच्या; वर्णनाने शास्त्रे जगात कीर्ती पावली 24
1325-18
बुद्ध्यादिके डोळसे । हे जयाचे का कडवसे । मी सर्वद्रष्टाही दिसे । पाहला जया ॥1325॥
ज्या ज्ञानाच्यापुढे बुद्धयादिक म्हणून गणली गेलेली डोळस ज्ञाने ही केवळ अणुमात्र होत; व ज्याच्या उदयाने सर्वद्रष्टा जो मी, त्याचे दर्शन होते. 25
1326-18
ते हे गा आत्मज्ञान । मज गोप्याचेही गुप्त धन । परी तू म्हणौनि आन । केवी करू ? ॥1326॥
अरे, ते हे आत्मज्ञान, सर्वाना गूढ असणारा जो मी त्या माझेही गुप्तधन होय; परंतु, तूच म्हणून ते कसे चोरून ठेवावे ? 26
1327-18
याकारणे गा पांडवा । आम्ही आपुला हा गुह्य ठेवा । तुज दिधला कणवा । जाकळिलेपणे ॥1327॥
ह्याचकरिता अर्जुना, तुजवर संतुष्ट होऊन तुझ्याविषयींच्या कळकळीने आम्ही आपला हा गुप्त ठेवा तुला दिला 27
1328-18
जैसी भुलली वोरसे । माय बोले बाळा दोषे । प्रीति ही परी तैसे । न करूचि हो ॥1328॥
मातेच्या अंतःकरणातील स्नेह जसा तिला बालकापाशी बोलवितो, तीच स्थिति, तुजविषयींचे आमच्या अंतःकरणातील प्रेम, आमची का करणार नाही ? 28
1329-18
येथ आकाश आणि गाळिजे । अमृताही साली फेडिजे । का दिव्याकरवी करविजे । दिव्य जैसे ॥1329॥
येथे आकाश जसे गाळून घ्यावे, अमृताचीही साल काढावी, किंवा प्रतिज्ञेनेच जशी प्रतिज्ञा करावी. 29
1330-18
जयाचेनि अंगप्रकाशे । पाताळीचा परमाणु दिसे । तया सूर्याहि का जैसे । अंजन सूदले ॥1330॥
ज्याच्या तेजाने पाताळींचे परमाणुही दिसतात, त्या सूर्याच्या डोळ्यातच जसे अंजन घालवे, 1330
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1331-18
तैसे सर्वज्ञेही मिया । सर्वही निर्धारूनिया । निके होय ते धनंजया । सांगितले तुज ॥1331॥
त्याप्रमाणे, सर्वज्ञही जो मी, त्या मी सर्व गोष्टींचा निर्णय करून, जे सत्यातले सत्य ठरले ते अर्जुना, तुला सांगितले. 31
1332-18
आता तू ययावरी । निके हे निर्धारी । निर्धारूनि करी । आवडे तैसे ॥1332॥
आता, यापुढे, तू आपला तूच काय तो निश्चय कर; आणि निश्चय ठरला म्हणजे जे तुझ्या इच्छेस येईल ते कर (मुक्तीचे शुद्ध स्वरूप). 32
1333-18
यया देवाचिया बोला । अर्जुनु उगाचि ठेला । तेथ देवो म्हणती भला । अवंचकु होसी ॥1333॥
असे देवाचे भाषण चालू असता अर्जुन स्तब्ध बसला; हे पाहून देव म्हणाले, ” खरा मतलबी आहेस रे. ” 33
1334-18
वाढतयापुढे भुकेला । उपरोधे म्हणे मी धाला । तै तोचि पीडे आपुला । आणि दोषुही तया ॥1334॥
वाढणारा पुढे, भुकेला मनुष्य भिडेनं पुरेपुरे ” म्हणाला तर भुकेची पीडा त्यालाच होणार व त्या पीडेचा दोषही त्यालाच आहे. 34
1335-18
तैसा सर्वज्ञु श्रीगुरु । भेटलिया आत्मनिर्धारु । न पुसिजे जै आभारु । धरूनिया ॥1335॥
त्याप्रमाणे, सर्वज्ञ श्रीगुरूची गाठ पडूनही, आत्मनिश्चयाविषयींचा प्रश्न मनातील संकोच वृत्तीमुळे केला नाही. 35
1336-18
तै पापियाचा आपणपेचि वंचे । आणि पापही वंचनाचे । आपणयाचि साचे । चुकविले तेणे ॥1336॥
तर, आपणच आपल्याला ठकविल्यासारखे होऊन त्या वंचनेचा दोषही त्याच्याकडेच येतो; व आपले सत्स्वरूप त्याचे त्यानेच दुराविले असे होते. 36
1337-18
पै उगेपणा तुझिया । हा अभिप्रावो की धनंजया । जे एकवेळ आवांकुनिया । सांगावे ज्ञान ॥1337॥
अर्जुना, तुझ्या उगेपणावरून तुझा असा भाव दिसतो की, आम्ही पुन्हा एकदां पूर्णपणे आत्मज्ञानाची उजळणी करावी. 37
1338-18
तेथ पार्थु म्हणे दातारा । भले जाणसी माझिया अंतरा । हे म्हणो तरी दुसरा । जाणता असे काई ? ॥1338॥
तेव्हा पार्थ म्हणाला, प्रभो बरोबर माझे मन ओळखिलें; पण इतकेंही म्हणण्याचे कारण नाहीं; देवा, आपल्यावाचून अंतर्यामी जाणणारा दुसरा कोण आहे ? 38
1339-18
येर ज्ञेय हे जी आघवे । तू ज्ञाता एकचि स्वभावे । मा सूर्यु म्हणौनि वानावे । सूर्याते काई ? ॥1339॥
कारण, सर्व विश्व तूझे ज्ञेय असून त्याचा स्वभावसिद्ध ज्ञाता तूच एक आहेस; सूर्याची तुम्ही सूर्य म्हणून कोणी स्तुति करितो काय ? 39
1340-18
या बोला श्रीकृष्णे । म्हणितले काय येणे । हेचि थोडे गा वानणे । जे बुझतासि तू ॥1340॥
या अर्जुनाच्या भाषणावर देव म्हणाले, अरे, आम्ही सांगितलेले तू समजतोस, हे काय आमचे थोडे वर्णन आहे ? 1340
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः ।
इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ॥18. 64॥
1341-18
तरी अवधान पघळ । करूनियाम् आणिक येक वेळ । वाक्य माझे निर्मळ । अवधारी पा ॥1341॥
तूझ्या मनातच आहे तर, पुन्हा एकवेळ मोकळ्या मनाने माझे निर्मळ भाषण श्रवण कर. 41
1342-18
हे वाच्य म्हणौनि बोलिजे । का श्राव्य मग आयिकिजे । तैसे नव्हे परी तुझे । भाग्य बरवे ॥1342॥
वाणीचा विषय म्हणून बोलावे किंवा श्रवणाचा विषय म्हणून हे ऐकावे असा हा विषय नाही; पण तुझे भाग्यच थोर म्हणावे लागते 42
1343-18
कूर्मीचिया पिलिया । दिठी पान्हा ये धनंजया । का आकाश वाहे बापिया । घरीचे पाणी ॥1343॥
अर्जुना, कांसवीच्या पिलांचे तिच्या दृष्टीच्या पान्ह्याने रक्षण होते; किंवा (जे आपल्यामध्ये केव्हांही काही सांठवीत नाही) ते आकाशही आपल्या अवकाशांत चातकासाठी जल धारण करतें. 43
1344-18
जो व्यवहारु जेथ न घडे । तयाचे फळचि तेथ जोडे । काय दैवे न सापडे । सानुकूळे ? ॥1344॥
जी वस्तु, कोणत्याही व्यवहाराचा विषय नसते (अव्यवहार्य ती वस्तु, जेव्हा जोडली जाते तेव्हा एकदम ‘फल’ ) म्हणूनच जोडली जाते (साध्यसाधनरूपाने नव्हे); दैव सानुकूल असल्यावर काय प्राप्त होणार नाही ?44
1345-18
येऱ्हवी द्वैताची वारी । सारूनि ऐक्याच्या परीवरी । भोगिजे ते अवधारी । रहस्य हे ॥1345॥
एऱ्हवी पाहता, सर्व द्वैतप्रपंचाचा निरास करून, केवल ऐक्याच्या दालनात, अनुभव, अनुभविता, अनुभाव्य अशा त्रिपुटीद्वारा नव्हे तर केवल अनुभूतित्वाने ज्याचा भोग असतो असे हे रहस्य (गौप्य) आहे हे लक्ष्यात असूदे. 45
1346-18
आणि निरुपचारा प्रेमा । विषय होय जे प्रियोत्तमा । ते दुजे नव्हे की आत्मा । ऐसेचि जाणावे ॥1346॥
अर्जुना, निरुपचार म्हणजे निर्निमित्त प्रेमाचा जो विषय, किंवा जे स्थान, ते दुसरे तिसरे काहीही नसून आत्मा होय असेच समज. 46
1347-18
आरिसाचिया देखिलया । गोमटे कीजे धनंजया । ते तया नोहे आपणया । लागी जैसे ॥1347॥
अर्जुना, आरशांत चांगले प्रतिबिंब दिसावे म्हणून तो स्वच्छ करितात आरशाकरिता नव्हे तर ते आपल्यासाठीच जसे असते, 47
1348-18
तैसे पार्था तुझेनि मिषे । मी बोले आपणयाचि उद्देशे । माझ्या तुझ्या ठाई असे । मी तू पण गा ॥1348॥
तसे तुझ्या निमित्ताने, पण स्वतःसाठींच, मी हे बोलत आहें; अरे, तुझ्यामाझ्यामध्ये तू आणि मी असा भेद आहे काय ? 48
1349-18
म्हणौनि जिव्हारीचे गुज । सांगतसे जीवासी तुज । हे अनन्यगतीचे मज । आथी व्यसन ॥1349॥
म्हणून, अगदी जिव्हाळयाची गुप्त गोष्ट तू माझा जो प्राण त्या तुला सांगितली; अरे, अनन्य भक्तांचे मला असे व्यसनच (छंद) आहे 49
1350-18
पै जळा आपणपे देता । लवण भुलले पंडुसुता । की आघवे तयाचे होता । न लजेचि ते ॥1350॥
जलाला स्वत्व अर्पण करितांना मिठाला स्वत:चे जसे स्मरण रहात नाही किंवा आपण सर्व जलरूप होतांना ते लाजत नहीं. 1350
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1351-18
तैसा तू माझ्या ठाई । राखो नेणसीचि काही । तरी आता तुज काई । गोप्य मी करू ? ॥1351॥
त्याप्रमाणे तू ही मद्रूप होतांना आपण म्हणून निराळा काही रहातच नाहींस; मग तुझ्यापन काही गौप्य लपवावे हे, मी तरी कसे करणार ? 51
1352-18
म्हणौनि आघवीचि गूढे । जे पाऊनि अति उघडे । ते गोप्य माझे चोखडे । वाक्य आइक ॥1352॥
म्हणून, ज्या माझ्या गुप्त ठेव्या पुढे जगांतील इतर गौप्य ही उघडया बाजारासारखी ठरतात ते मझ शुद्ध रहस्यवाक्य श्रवण कर. 52
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥18. 65॥
1353-18
तरी बाह्य आणि अंतरा । आपुलिया सर्व व्यापारा । मज व्यापकाते वीरा । विषयो करी ॥1353॥
अर्जुना, तुझ्या अंतर्बाह्य (मानसिक व कायिक ) सर्व क्रिया मी जो सर्वव्यापक त्याला विषय करून म्हणजे त्याच्या उद्देशाने कराव्या. 53
1354-18
आघवा आंगी जैसा । वायु मिळोनि आहे आकाशा । तू सर्व कर्मी तैसा । मजसीचि आस ॥1354॥
वायु सर्वागाने जसा आकाशामध्ये लीन असतो, तसा सर्व कर्मे करितांना तु मद्रूप बुद्धि ठेव. 54
1355-18
किंबहुना आपुले मन । करी माझे एकायतन । माझेनि श्रवणे कान । भरूनि घाली ॥1355॥
किंबहुना स्वत:चे मन हे माझे रहाण्याचेच एक स्थान कर, आणि श्रवणांनाही मद्गुणश्रवणानेच भरून काढ. 55
1356-18
आत्मज्ञाने चोखडी । संत जे माझी रूपडी । तेथ दृष्टि पडो आवडी । कामिनी जैसी ॥1356॥
शुद्ध आत्म-ज्ञानयुक्त ज्या संतमूर्ती ती माझीच रूपे आहेत अशा भावनेने, कामुकाची कामिनीविषयी जशी दृष्टि असते, त्याप्रमाणेच, तुझी त्यांच्या चरणाविषयी आवड असावी. 56
1357-18
मी सर्व वस्तीचे वसौटे । माझी नामे जिये चोखटे । तिये जियावया वाटे । वाचेचिये लावी ॥1357॥
सर्वाधिष्ठान जो मी, त्या माझी शुद्ध व गोड नामें, त्यांचा जिव्हेला सराव व्हावा म्हणून ती वाणीत धारण कर. 57
1358-18
हातांचे करणे । का पायांचे चालणे । ते होय मजकारणे । तैसे करी ॥1358॥
हातांची क्रिया की पायांचा संचार हा सर्व माझ्या उद्देशाने होत असावा 58
1359-18
आपुला अथवा परावा । ठायी उपकरसी पांडवा । तेणे यज्ञे होई बरवा । याज्ञिकु माझा ॥1359॥
स्वकीय अथवा परकीय यांवर जो उपकार तू करशील तो मदर्पण करून माझा याज्ञिक हो. 59
1360-18
हे एकैक शिकऊ काई । पै सेवके आपुल्या ठाई । उरूनि येर सर्वही । मी सेव्यचि करी ॥1360॥
अशी एकेक गोष्ट काय शिकवावी ? सर्व जग मद्रूप आहे अशी भावना करून व स्वतः सेवकभाव पत्करून तु सेवा कर. 1360
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1361-18
तेथ जाऊनिया भूतद्वेषु । सर्वत्र नमवैन मीचि एकु । ऐसेनि आश्रयो आत्यंतिकु । लाहसी तू माझा ॥1361॥
ह्याने सर्व भूतांविषय द्वेष नाहीसा होऊन सर्वत्र नमन करण्याला मीच एक भरलो आहे असे वाटून तुला माझे अत्यंत सान्निध्य प्राप्त होईल. 61
1362-18
मग भरलेया जगाआंतु । जाऊनि तिजयाची मातु । होऊनि ठायील एकांतु । आम्हा तुम्हा ॥1362॥
मग ह्या सर्व जगात तिसरेपणा नाहीसा होऊन तुझा वा माझा असा एकांतच आढळून येईल. 62
1363-18
तेव्हा भलतिये आवस्थे । मी तूते तू माते । भोगिसी ऐसे आइते । वाढेल सुख ॥1363॥
मग वाटेल त्या स्थितीत तुला माझा व मला तुझा एकांतिक भोग घडत राहून सहजच सुखाची वृद्धि होईल 63
1364-18
आणि तिजे आडळ करिते । निमाले अर्जुना जेथे । ते मीचि म्हणौनि तू माते । पावसी शेखी ॥1364॥
आणि अर्जुना, सुखप्राप्तीच्या आड असणारी जी तिसऱ्याची म्हणजे जगदाभासाची निवृत्ति झाल्यावर तुलाही अखेर मद्रूप आहेस असे वाटून माझी प्राप्ति होईल. 64
1365-18
जैसी जळीची प्रतिभा । जळनाशी बिंबा । येता गाभागोभा । काही आहे ? ॥1365॥
याला उदाहरण- जलांतील प्रतिबिंबाला जल ह्या उपाधीच्या नाशानंतर मुख्य बिंबास ऐक्य पावण्यास काही श्रम का पडतात ? (ते नेहमीच बिंबरूप असते. ) 65
1366-18
पै पवनु अंबरा । का कल्लोळु सागरा । मिळता आडवारा । कोणाचा गा ? ॥1366॥
तसेच वारा आकाशास मिळण्यास किंवा लाटेला समुद्राला भेटण्यास काही कोणाचा प्रतिबंध असतो काय ? 66
1367-18
म्हणौनि तू आणि आम्ही । हे दिसताहे देहधर्मी । मग ययाच्या विरामी । मीचि होसी ॥1367॥
म्हणून तू व आम्ही असा हा भेद देहोपाधीमुळे दिसत आहे, त्यांच्या निरासाने तू मद्रूपच होशील. (विचाराने आतांही आहेस. ) 67
1368-18
यया बोलामाझारी । होय नव्हे झणे करी । येथ आन आथी तरी । तुझीचि आण ॥1368॥
ह्या माझ्या बोलण्याविषयीं ” असेल नसेल’ अशी शंका धरू नको; ह्यात अक्षरही अन्यथा नाही हे तुझीच शपथ घेऊन सांगतो. 68
1369-18
पै तुझी आण वाहणे । हे आत्मलिंगाते शिवणे । प्रीतीची जाति लाजणे । आठवो नेदी ॥1369॥
तुझी शपथ वाहणे म्हणजे आत्म्याचीच शपथ घेण्यासारखे आहे; (वास्तविक हे अयोग्य होय ) पण प्रेमाची जातीच अशी असते की, योग्यायोग्य, लाज, शंका ही बंधने तिला आठवत नाहीत. 69.
1370-18
येऱ्हवी वेद्यु निष्प्रपंचु । जेणे विश्वाभासु हा साचु । आज्ञेचा नटनाचु । काळाते जिणे ॥1370॥
वस्तुतः विचार केला तर जो ज्ञानस्वरूप, निष्प्रपंच (भेदभावरहित) असून, ज्याच्या सत्तेमुळे विश्वाला सत्यस्व आले आहे व ज्याच्या आज्ञेचे सामर्थ्य काळाला जिंकते असे आहे. 1370
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1371-18
तो देवो मी सत्यसंकल्पु । आणि जगाच्या हिती बापु । मा आणेचा आक्षेपु । का करावा ? ॥1371॥
असा जो मी सत्यसंकल्प ईश्वर, व जगाच्या कल्याणाविषयी तत्पर असणारा, त्या मी शपथ, वाहणेचे कारणच काय ? 71
1372-18
परी अर्जुना तुझेनि वेधे । मिया देवपणाची बिरुदे । सांडिली गा मी हे आधे । सगळेनि तुवा ॥1372॥
अर्जुना परंतु, तू मला इतके वेड लाविले आहेस की, मी देव म्हणून कोणी आहे ह्याचे मला भानही नाही (खरेसांगू का ?) माझे अर्धसत्व नष्ट होऊन माझ्या ठिकाणी तुझीच सर्वस्वी स्थापना होऊन अदलाबदल झाल्यासारखी आहे. 72
1373-18
पै काजा आपुलिया । रावो आपुली आपणया । आण वाहे धनंजया । तैसे हे की ॥1373॥
किंवा आपल्या कार्यासाठी राजा जशी आपली स्वतःचीच शपथ घेतो तसाच काहीसा हा प्रकार होय. 73
1374-18
तेथ अर्जुनु म्हणे देवे । अचाट हे न बोलावे । जे आमचे काज नांवे । तुझेनि एके ॥1374॥
त्यावर अर्जुन म्हणाला, देवा, असे भलतेच नका हो बोलू; अहो, आमची सर्व कार्यं नुसत्या तुमच्या नाममात्राने सिद्धीस जातात. 74
1375-18
यावरी सांगो बैससी । का सांगता भाषही देसी । या तुझिया विनोदासी । पारु आहे जी ? ॥1375॥
असे असूनही, तूच आम्हाला आमच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगतोस आणि त्याही शपथ वाहून ! देवा ! तुमच्या ह्या विनोदाला काही सीमा आहे का ? 75
1376-18
कमळवना विकाशु । करी रवीचा एक अंशु । तेथ आघवाचि प्रकाशु । नित्य दे तो ॥1376॥
अंशतः सूर्यप्रकाशानेही कमलवने विकसित होतात पण तो त्यांना आपला सर्वच प्रकाश नित्य देतो. 76
1377-18
पृथ्वी निवऊनि सागर । भरीजती येवढे थोर । वर्षे तेथ मिषांतर । चातकु की ॥1377॥
पृथ्वी शांत होऊन समुद्रही भरतील इतकी अफाट; वृष्टी मेघ करितात खरे पण त्याचे निमित्त अनन्यशरण चातकाची तृषा हरण करणे असते. 77
1378-18
म्हणौनि औदार्या तुझेया । मज निमित्त ना म्हणावया । प्राप्ति असे दानीराया । कृपानिधी ॥1378॥
त्याच न्यायाने, हे दानशूर, दयानिधे देवा, तुझ्या ज्ञानदानरूपी औदार्याला नाही म्हणावयास मी निमित्त झालो हे खरे, पण त्यात सर्व जगाचे कल्याण अगर उद्धार आपण केला; 78
1379-18
तव देवो म्हणती राहे । या बोलाचा प्रस्तावो नोहे । पै माते पावसी उपाये । साचचि येणे ॥1379॥
तेव्हा देव म्हणाले, अर्जुना, आता ही प्रस्तावना राहु दे; ( आपण मूळ गोष्टीवर येऊ) हे पहा; ह्या उपायाने तू मला निश्चयैकरून येऊन मिळशील. 79
1380-18
सैंधव सिंधू पडलिया । जो क्षणु धनंजया । तेणे विरेचि की उरावया । कारण कायी ? ॥1380॥
अर्जुन, ज्याक्षणी मिठाचा खडा पाण्यात पडतो त्याच क्षणी तो विरतोच; वेगळे रहाण्याचे कारणच काय ? 1380
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1381-18
तैसे सर्वत्र माते भजता । सर्व मी होता अहंता । निःशेष जाऊनि तत्वता । मीचि होसी ॥1381॥
त्याप्रमाणे, सर्वत्र असलेली माझी व्याप्ति जाणून भजन केले असता व सर्व मीच आहे अशा दृष्टीचा उदय झाला असता, अहंता निःशेष नाहीशी होऊन तू तत्त्वतः मद्रूपच होशील. 81
1382-18
एवं माझिये प्राप्तीवरी । कर्मालागोनि अवधारी । दाविली तुज उजरी । उपायांची ॥1382॥
ह्याप्रमाणे कर्मापासून ब्रह्मात्म्यैक्यज्ञानपर्यंतचे माझ्या प्राप्तीचे सर्व उपाय तुला स्पष्ट करून सांगितले. 82
1383-18
जे आधी तव पंडुसुता । सर्व कर्मे मज अर्पिता । सर्वत्र प्रसन्नता । लाहिजे माझी ॥1383॥
थोडक्यात असें-अर्जुना, प्रथम सर्व कर्म मला अर्पण करावी म्हणजे सर्वत्र माझी प्रसन्नता प्राप्त होते. 83
1384-18
पाठी माझ्या इये प्रसादी । माझे ज्ञान जाय सिद्धी । तेणे मिसळिजे त्रिशुद्धी । स्वरूपी माझ्या ॥1384॥
अशा प्रसन्नतेनंतर, मत्प्राप्त्यर्थं केलेला ज्ञानविचार सिद्धीस जाऊन, तो निश्चयेकरून मद्रूप होतो. 84
1385-18
मग पार्था तिये ठायी । साध्य साधन होय नाही । किंबहुना तुज काही । उरेचि ना ॥1385॥
अशी स्थिति झाल्यावर, अर्जुना, साध्य-साधनादि व्यवहाराचा वाचा लोप होऊन, तुला काहीही कर्तव्य उरणार नाही. 85
1386-18
तरी सर्व कर्मे आपली । तुवा सर्वदा मज अर्पिली । तेणे प्रसन्नता लाधली । आजि हे माझी ॥1386॥
पार्था, तुजवर मी जो आज प्रसन्न आलो आहे, त्याचे कारण, तू सर्वदा सर्वं कर्म मदर्पणबुद्धीने केलीस. 86
1387-18
म्हणौनि येणे प्रसादबळे । नव्हे झुंजाचेनि आडळे । न ठाकेचि येकवेळे । भाळलो तुज ॥1387॥
म्हणून हा युद्धाचा प्रसंग आहे; आतांच नको; पुढे पाहुं; वगैरे काहीही विचार न करिता मी ह्या प्रसादबळाने तुला भाळलों. (वश झालो) 87
1388-18
जेणे सप्रपंच अज्ञान जाये । एकु मी गोचरु होये । ते उपपत्तीचेनि उपाये । गीतारूप हे ॥1388॥
ज्यायोगे, कार्यासह अज्ञाननिवृत्ति होऊन अद्वितीय एक असा जो मी, त्या माझे आत्मत्वाने अपरोक्ष होईल, ते माझे गीतारूप ज्ञान अनेक युक्तीच्या उपायांनी, 88
1389-18
मिया ज्ञान तुज आपुले । नानापरी उपदेशिले । येणे अज्ञानजात सांडी वियाले । धर्माधर्म जे ॥1389॥
मी तुला माझ्या आत्मज्ञानाचा नाना प्रकारे उपदेश केला; त्याने, जे धर्माधर्मादि व्याले आहे अशा अज्ञानमात्राचा त्याग कर. 89
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥18. 66॥
1390-18
आशा जैसी दुःखाते । व्याली निंदा दुरिते । हे असो जैसे दैन्याते । दुर्भगत्व ॥1390॥
आशा दुःखाची, निंदा पापाची, किंवा हेअसो, दुर्दैव जशी दैन्याची जननी आहे, 1390
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1391-18
तैसे स्वर्गनरकसूचक । अज्ञान व्याले धर्मादिक । ते सांडूनि घाली अशेख । ज्ञाने येणे ॥1391॥
याप्रमाणे, स्वर्गनरक प्राप्तीची साधने जे धर्माधर्म, त्यांची अज्ञान ही जननी आहे, त्याचा ह्या ज्ञानाने निःशेष नाश कर. 91
1392-18
हाती घेऊन तो दोरु । सांडिजे जैसा सर्पाकारु । का निद्रात्यागे घराचारु । स्वप्नींचा जैसा ॥1392॥
दोर हाती आल्यावर त्यावर पूर्वी भासलला सर्प जसा नष्ट होतो, किंवा जागे झाल्यावर स्वप्नातील सर्व व्यवहार जसा लोपतो. 92
1393-18
नाना सांडिलेनि कवळे । चंद्रींचे धुये पिवळे । व्याधित्यागे कडुवाळे- । पण मुखाचे ॥1393॥
कावीळ नाहींशी झाली, म्हणजे चंद्राच्या ठिकाणी दिसणारा पिवळेपण जसा नाहीसा होतो किंवा व्याधिनाशाने मुखाचा कडवटपणा जसा जातो; 93
1394-18
अगा दिवसा पाठी देउनी । मृगजळ घापे त्यजुनी । का काष्ठत्यागे वन्ही । त्यजिजे जैसा ॥1394॥
दिवस मावळतांच मृगजळ नाहीसे होते, किंवा काष्ठत्यागाने जस वन्हित्यागही केलासा होतो. 94
1395-18
तैसे धर्माधर्माचे टवाळ । दावी अज्ञान जे का मूळ । ते त्यजूनि त्यजी सकळ । धर्मजात ॥1395॥
त्याप्रमाणे धर्माधर्माचा बाऊ वाटविणारे मूळ कारण जे अज्ञान, त्याचा त्याग करून सर्व धर्माधर्मापासून मुक्त हो. 95
1396-18
मग अज्ञान निमालिया । मीचि येकु असे अपैसया । सनिद्र स्वप्न गेलया । आपणपे जैसे ॥1396॥
निद्रा दोषासह स्वप्ननाश झाल्यावर जसा आपला आपणच एकटा असतो, तसा अज्ञाननाशानंतर एकटा मीच आपोआप सहज उरतो 96
1397-18
तैसा मी एकवाचूनि काही । मग भिन्नाभिन्न आन नाही । सोऽहंबोधे तयाच्या ठायी । अनन्यु होय ॥1397॥
एक माझ्या सत्तेवाचून, जगात कोणत्याही पदार्थाला भिन्न किवा अभिन्नत्वाने नांदण्याइतकी स्वतंत्र सत्ता नाही, असे जे माझी सर्वव्यापक स्वरूप, त्याच्याशी माझेही वस्तुतः तेच स्वरूप आहे अशा शुद्ध बोधाने अनन्य हो. (वेगळा उरू नको. ) 97
1398-18
पै आपुलेनि भेदेविण । माझे जाणिजे जे एकपण । तयाचि नांव शरण । मज यीणे गा ॥1398॥
आपण स्वतः वेगळेपणाने न उरता, सर्वत्र मीच एकटा एक आहे असे ज्याने नि:संदेहपणे जाणिले, तोच एक, अर्जुना, मला खरा शरण झाला. 98
1399-18
जैसे घटाचेनि नाशे । गगनी गगन प्रवेशे । मज शरण येणे तैसे । ऐक्य करी ॥1399॥
घट ह्या उपाधीच्या नाशाने, जसे घटाकाश जणू महाकाशांत प्रवेश करिते, त्याचप्रमाणे मला शरण येऊन माझ्याशी एकरूप हो. 99
1400-18
सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळु जैसा पाणिया । तैसा मज धनंजया । शरण ये तू ॥1400॥
सोन्याचा मणि जसा सोन्याशी व लाट जशी जलाशी नित्य अनन्य असते, तसेच, अर्जुना, तु मला शरण असावे. 1400
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1401-18
वाचूनि सागराच्या पोटी । वडवानळु शरण आला किरीटी । जाळूनि ठाके तया गोठी । वाळूनि दे पा ॥1401॥
दुसराही शरण येण्याचा प्रकार आहे; समुद्राला वडवानल शरण येऊन त्याच्या
अंतरात राहिला खरा; पण तो तेथेही दाहरूपाने आहे; तशी शरणागति नको हो ! 1
1402-18
मजही शरण रिघिजे । आणि जीवत्वेचि असिजे । धिग् बोली यिया न लजे । प्रज्ञा केवी ॥1402॥
मलाही शरण आलेला आहे आणि पुन्हा आपल्याला जीवच समजतो; धिक्कार असो ह्या भाषेला ! असे म्हणतांना त्याची बुद्धि लाजत कशी नाही ? 2
1403-18
अगा प्राकृताही राया । आंगी पडे जे धनंजया । ते दासिरूंहि की तया । समान होय ॥1403॥
अरे, पृथ्वीवरील एखाद्या राजाने अगदी सामान्य दासीचाही जर अंगिकार केला तरती राणीपद पावते. 3
1404-18
मा मी विश्वेश्वरु भेटे । आणि जीवग्रंथी न सुटे । हे बोल नको वोखटे । कानी लाऊ ॥1404॥
तर मग विश्वाचा स्वामी जो मी, त्याची भेट होऊनहि पुन्हा जीवदशा तशीच कायम आहे, असे ओंगळ बोल नुसते ऐकण्यासही आमचे कान तयार नाहीत, 4
1405-18
म्हणौनि मी होऊनि माते । सेवणे आहे आयिते । ते करी हाता येते । ज्ञाने येणे ॥1405॥
म्हणून, मद्रूप झालास की माझी अनायासे (सहज) सेवा घडते; ते मद्रूप होणे साध; ती सिद्धि या मी सांगितलेल्या ज्ञानानं प्राप्त होते; 5
1406-18
मग ताकौनिया काढिले । लोणी मागौते ताकी घातले । परी न घेपेचि काही केले । तेणे जेवी ॥1406॥
दधिमंथनाने ताकांतून लोणी निराळे केले, आणि मग ते पुन्हा ताकत टाकिले तरी जसे काही केल्या त्याच्याशी एकरूप होत नाही. 6
1407-18
तैसे अद्वयत्वे मज । शरण रिघालिया तुज । धर्माधर्म हे सहज । लागतील ना ॥1407॥
त्याप्रमाणे, शुद्ध अद्वयबोधाने मला शरण आलास (मद्रूप झालास) म्हणजे सहजच धर्माधर्माचा तुला स्पर्श होणार नाही. 1407
1408-18
लोह उभे खाय माती । ते परीसाचिये संगती । सोने जालया पुढती । न शिविजे मळे ॥1408॥
लोखंड मातीत असले तर, ती त्याला खाऊन टाकते, पण तेच परिसाच्या स्पर्शाने सोने झाल्यावर पुन्हा मातीत ठेवले तर तिचा त्याला यत्किंचींतही उपद्रव होत नाही. 8
1409-18
हे असो काष्ठापासोनि । मथूनि घेतलिया वन्ही । मग काष्ठेही कोंडोनी । न ठके जैसा ॥1409॥
हे असू द्या; काष्ठांच्या घर्षणाने उत्पन्न केलेला अग्नी, मग जसा काष्ठांनीही झांकला जात नाही. 9
1410-18
अर्जुना काय दिनकरु । देखत आहे अंधारु । की प्रबोधी होय गोचरु । स्वप्नभ्रमु । ॥1410॥
अर्जुना, सूर्याला कधी अंधार भेटतो का ? किंवा जागृतीत, स्वप्नात कल्पिलेले व्यवहार आढळतात काय ? 1410
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1411-18
तैसे मजसी येकवटलेया । मी सर्वरूप वाचूनिया । आन काही उरावया । कारण असे ? ॥1411॥
त्याप्रमाणे मजपाशी ऐक्य पावल्यावर व मी सर्वत्र एकरूपाने भरलेला असल्याने म । झ्यावांचुन अन्य पदार्थ उरण्याचे कारणच काय ? 11
1412-18
म्हणौनि तयाचे काही । चिंती न आपुल्या ठायी । तुझे पापपुण्य पाही । मीचि होईन ॥1412॥
म्हणून आपल्या ठिकाणच्या पापपुण्यांची काहीही चिता करू नकोस. (ती जबाबदारी मी घेतो) कारण ती दोन्ही मीच होईन. 12
1413-18
तेथ सर्वबंधलक्षणे । पापे उरावे दुजेपणे । ते माझ्या बोधी वायाणे । होऊनि जाईल ॥1413॥
असे झाल्यावर, माझ्याहून वेगळेपणे उरणे हेच जे पापाचे म्हणजे सर्व संसारबंधाच्या कारणाचे लक्षण, तेच माझ्या सर्वात्मैक्यज्ञानात मिथ्या ठरून जाईल. 13
1414-18
जळी पडिलिया लवणा । सर्वही जळ होईल विचक्षणा । तुज मी अनन्यशरणा । होईन तैसा ॥1414॥
जलात पडलेल्या मिठाला जशी सर्वागाने जलरूपता, त्याप्रमाणे, अर्जुना, माझ्या ठिकाणी अनन्यभावाने शरण आलेल्या तुला मद्रूपता येते येईल. 14
1415-18
येतुलेनि आपैसया । सुटलाचि आहसी धनंजया । घेई मज प्रकाशोनिया । सोडवीन तूते ॥1415॥
असे झाले म्हणजे धनंजया, तू सहज मुक्त आहेसच; पण माझ्या यथार्थ स्वरूपाचा प्रकाश (बोध) अंत:करणवृत्तीवर रूढ करून घे, म्हणजे आपण मुक्त आहोच अथवा मी तुला सोडविले असा (औपचारिक) प्रयय तुला येईल. 15
1416-18
याकारणे पुढती । हे आधी न वाहे चित्ती । मज एकासि ये सुमती । जाणोनि शरण ॥1416॥
यास्तव इतःपर ही मुक्तीची चिता मनात वाहू नको; अर्जुना, सर्वव्यापक एकच एक जो मी, त्या मला ओळखून (अर्थात् तत्त्वतः तद्रूप होऊन) शरण ये. (येथे गीताशास्त्र समाप्त झाले. ) 16
1417-18
ऐसे सर्वरूपरूपसे । सर्वदृष्टिडोळसे । सर्वदेशनिवासे । बोलिले श्रीकृष्णे ॥1417॥
सर्व, रूपवान् पदार्थ ज्याच्यामुळे रूपवान आहेत, दृष्टीचाही जो डोळा आहे सर्व, स्थानांचेही जो अधिष्ठान आहे तो श्रीकृष्ण परमात्मा असे म्हणाला. 17
1418-18
मग सावळा सकंकणु । बाहु पसरोनि दक्षिणु । आलिंगिला स्वशरणु । भक्तराजु तो ॥1418॥
मग शामसुंदर भगवंतांनी आपला दिले. कंकणयुक्त उजवा हात पुढे करून, आपल्या अनन्यशरण आलेल्या भक्तश्रेष्ठ अर्जुनाला आलिंगन दिले. 18
1419-18
न पवता जयाते । काखे सूनि बुद्धीते । बोलणे मागौते । वोसरले ॥1419॥
ज्या वस्तू पर्यंत पोचणे अशक्य होऊन वाणी मनासहवर्तमान परत फिरली व मौनावली. 19
1420-18
ऐसे जे काही येक । बोला बुद्धीसिही अटक । ते द्यावया मिष । खेवाचे केले ॥1420॥
वाणीला व बुद्धीला अगम्य असे जे काही एक वस्तु ते स्वभक्ताला अर्पण करण्याकरिता देवांनी आलिंगनाचे निमित्तकेले. 1420
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1421-18
हृदया हृदय येक जाले । ये हृदयीचे ते हृदयी घातले । द्वैत न मोडिता केले । आपणाऐसे अर्जुना ॥1421॥
हृदयाला हृदयभिडले, ह्या अंतःकरणातील त्या अंतःकरणात (मूळ ठिकाणचे नाहीसे न होता) साठविले, व औपाधिक द्वैतभंग न करिता अर्जुनाला स्वपदावर बसविलें; 21
1422-18
दीपे दीप लाविला । तैसा परीष्वंगु तो जाला । द्वैत न मोडिता केला । आपणपे पार्थु ॥1422॥
एका दिव्याने दुसरा दिवा लावावा असाच जणू त्या आलिंगनाचा प्रकार घडला; देवभक्तादि द्वैताला धका न लावता पार्थाला आत्मरूप केला. 22
1423-18
तेव्हा सुखाचा मग तया । पूरु आला जो धनंजया । तेथ वाडु तऱ्ही बुडोनिया ॥ ठेला देवो ॥1423॥
वेळी अर्जुनाला सुखाचे जे भरते लोटले त्यात, देव एवढे मोठे खरे, पण तेही बुडाले ! 23
1424-18
सिंधु सिंधूते पावो जाये । ते पावणे ठाके दुणा होये । वरी रिगे पुरवणिये । आकाशही ॥1424॥
समुद्राला समुद्र मिळू गेला तर मिळण्याची गोष्ट बाजूसच राहून जलसंचयच दुप्पट होतो व तेवढा आकाशांतील भाग आणखी व्यापावा लागतो. 24
1425-18
तैसे तया दोघांचे मिळणे । दोघा नावरे जाणावे कवणे । किंबहुना श्रीनारायणे । विश्व कोंदले ॥1425॥
अर्जुनाच्या व देवांच्या संगमाची तशी स्थिति होऊन त्यांचे प्रेम अनावरपणे वाढले, ते कोण जाणू शकणार ? किंबहुना, नारायणस्वरूपाने (त्या ऐक्यानें) सर्वं विश्व कोंडून गेले. 25
1426-18
एवं वेदाचे मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र । श्रीकृष्णे गीताशास्त्र । प्रकट केले ॥1426॥
ह्याप्रमाणे, वेदाचे मूलसूत्र व सर्वाना जेथे सारखाच अधिकार आहे असे हे पवित्र गीताशास्त्र देवांनी प्रकट केले. 26॥
1427-18
येथ गीता मूळ वेदा । ऐसे केवी पा आले बोधा । हे म्हणाल तरी प्रसिद्धा । उपपत्ति सांगो ॥1427॥
गीता ही वेदांचेही मूळ आहे, हे तुम्ही कसे जाणले. असे जर कोणी म्हणेल तर त्याची प्रसिद्ध उपपति आम्ही सांगतो. 27
1428-18
तरी जयाच्या निःश्वासी । जन्म झाले वेदराशी । तो सत्यप्रतिज्ञ पैजेसी । बोलला स्वमुखे ॥1428॥
ती अशी- (केवळ) ज्याच्या श्वासोच्छवासापासून शब्दराशि (भांडार) जो वेद, तो जन्म पावला, असा जो सत्यप्रतिज्ञ भगवान, त्याने साक्षात् मुखावाटे सांगितलेले प्रतिज्ञा वचन ते हे, गीताशास्त्र होय. 28
1429-18
म्हणौनि वेदा मूळभूत । गीता म्हणो हे होय उचित । आणिकही येकी येथ । उपपत्ति असे ॥1429॥
म्हणून, गीता हे, वेदांचेही मूळ आहे असे जे आम्ही म्हटले ते योग्यच होय; ह्याला आणखीही एक उपपत्ति आहे. 29
1430-18
जे न नशतु स्वरूपे । जयाचा विस्तारु जेथ लपे । ते तयांचे म्हणिपे । बीज जगी ॥1430॥
जी वस्तु स्वरूपेकरून नष्ट न होता तिचे स्थूल स्वरूप जेथे (पूर्वी व नंतर) सूक्ष्मरूपाने दडून असते, ती वस्तु या स्थूल आकाराचे बीज असे लौकिकांत म्हणतात. 1430
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1431-18
तरी कांडत्रयात्मकु । शब्दराशी अशेखु । गीतेमाजी असे रुखु । बीजी जैसा ॥1431॥
मग, कांडत्रयात्मक शब्दराशि जो वेदवृक्ष तो, बीजांत वृक्ष असावा, तसा गीतेमध्ये सूक्ष्मरूपाने आहे. 31
1432-18
म्हणौनि वेदांचे बीज । श्रीगीता होय हे मज । गमे आणि सहज । दिसतही आहे ॥1432॥
म्हणून श्रीमद्भगवद्गीता हे वेदांचे बीज होय असे मला वाटते, व कोणालाही ते सहज दिसण्यासारखे आहे. 32
1433-18
जे वेदांचे तिन्ही भाग । गीते उमटले असती चांग । भूषणरत्नी सर्वाग । शोभले जैसे ॥1433॥
कर्म, उपासना व ज्ञान हे जे वेदाचे तीन भाग, त्यांचे गीतेमध्ये उत्तम रीतीने प्रतिपादन आहे; किंबहुना, त्यांनी रत्नालंकाराप्रमाणे तिचे सर्वाग शोभविले आहे. 33
1434-18
तियेचि कर्मादिके तिन्ही । कांडे कोणकोणे स्थानी । गीते आहाति ते नयनी । दाखऊ आईक ॥1434॥
ती, कर्मादि तिन्ही कांडे गीतेमध्ये कोठे कोठे आहेत ते तुला स्पष्ट सांगतो, श्रवण कर. 34
1435-18
तरी पहिला जो अध्यावो । तो शास्त्रप्रवृत्तिप्रस्तावो । द्वितीयी साङ्ख्यसद्भावो । प्रकाशिला ॥1435॥
पहिला अध्याय हा गीताशास्त्राची प्रवृत्ति का व कशी झाली ह्याच्या प्रस्तावनेपर आहे, दुसऱ्यात सांख्यविचार (ज्ञान) प्रकट केला आहे. 35
1436-18
मोक्षदानी स्वतंत्र । ज्ञानप्रधान हे शास्त्र । येतुलाले दुजी सूत्र । उभारिले ॥1436॥
हे गीता शास्त्र ज्ञानप्रधान आहे व ज्ञान हे, अन्यसाधननिरपेक्ष स्वतंत्रपणे मोक्ष देण्यास समर्थ आहे, अशी सूत्रभूत उभारणी दुस-यात केली आहे. 36
1437-18
मग अज्ञाने बांधलेया । मोक्षपदी बैसावया । साधनारंभु तो तृतीया- । ध्यायी बोलिला ॥1437॥
जे अज्ञ म्हणून बद्ध आहेत, त्यांना मोक्षप्राप्ति होणे तर आरंभाचे साधन कोणते हे, तिसऱ्या अध्यायात सांगितले. 37
1438-18
जे देहाभिमान बंधे । सांडूनि काम्यनिषिद्धे । विहित परी अप्रमादे । अनुष्ठावे ॥1438॥
जे देहात्मबुद्धिमान् आहेत, त्यांनी काम्य व निषिद्ध कर्मे, सोडून विहित कर्माचरण बिनचूक (नियमितपणे) करावे. 38
1439-18
ऐसेनि सद्भावे कर्म करावे । हा तिजा अध्यावो जो देवे । निर्णय केला ते जाणावे । कर्मकांड येथ ॥1439॥
अशा भावनायुक्त अंतःकरणाने कर्म करावे असा देवांनी तिसऱ्या अध्यायात निर्णय केला आहे ते कर्मकांड समजावे. 39
1440-18
आणि तेचि नित्यादिक । अज्ञानाचे आवश्यक । आचरता मोचक । केवी होय पा ॥1440॥
त्या नित्यनैमित्तिक कर्माच्या आचरणाने, ती अज्ञाननाशक कशी होतील, 1440
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1441-18
ऐसी अपेक्षा जालिया । बद्ध मुमुक्षुते आलिया । देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया । सांगितली ॥1441॥
अशी इच्छा होऊन बद्धांपैकी एखादा मुमुक्षतेच्या हद्दीपर्यंत आल्यास ती कर्मे, ब्रह्मार्पणबुद्धीने कशी करावी हेही सांगितले. 41
1442-18
जे देहवाचामानसे । विहित निपजे जे जैसे । ते एक ईश्वरोद्देशे । कीजे म्हणितले ॥1442॥
ते असे–कायावाचामने-करून जे विहित कर्म जसे घडेल ते सर्व ईश्वरप्राप्त्यर्थं करावे. 42
1443-18
हेचि ईश्वरी कर्मयोगे । भजनकथनाचे खागे । आदरिले शेषभागे । चतुर्थाचेनी ॥1443॥
ह्या कर्मयोगाने, भजनकीर्तनदिकांप्रमाणे ईश्वरोपासना कशी घडते हे, चौथ्याच्या अखेरीस सांगावयास आरंभिले आहे. 43
1444-18
ते विश्वरूप अकरावा । अध्यावो संपे जव आघवा । तव कर्मे ईशु भजावा । हे जे बोलिले ॥1444॥
कर्माते ईश्वर भजावा हे जे वर सांगितले आहे तेच निरूपण विश्वरूपदर्शनाच्या अकराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंत आहे. 44
1445-18
ते अष्टाध्यायी उघड । जाण येथे देवताकांड । शास्त्र सांगतसे आड । मोडूनि बोले ॥1445॥
चौथ्या अध्यायापासून तो अकराव्याच्या अखेरपर्यंतच्या आठ अध्यायात तेच देवताकांड (उपासनाकांड) आहे हे गीताशास्त्र पडदा न ठेवता स्वतः सांगत आहे. 45
1446-18
आणि तेणेचि ईशप्रसादे । श्रीगुरुसंप्रदायलब्धे । साच ज्ञान उद्बोधे । कोवळे जे ॥1446॥
आणि ह्याच उपासनेने ईशप्रसाद व श्रीगुरुसंप्रदाय यांची प्राप्ति होऊन अंतःकरणात खरे ज्ञान उद्भूत होते (प्रकाशते) व ते प्रथम कोवळे असते. 46
1447-18
ते अद्वेष्टादिप्रभृतिकी । अथवा अमानित्वादिकी । वाढविजे म्हणौनि लेखी । बारावा गणू ॥1447॥
ते कोवळे ज्ञान बाराव्यातील अद्वेष्टादि श्लोकांनी किंवा तेराव्यातील अमानित्वादि श्लोलोकांनी दृढ कसे करावे हे सांगितले आहे म्हणून बारावा ज्ञानकांडांतच आम्ही गणतों. 47
1448-18
तो बारावा अध्याय आदी । आणि पंधरावा अवधी । ज्ञानफळपाकसिद्धी । निरूपणासी ॥1448॥
बाराव्या अध्यायापासून तो पंधराव्याच्या अखेरपर्यंत ज्ञानाचे फल व त्याचा परिपाक ह्याचे निरूपण आहे. 48
1449-18
म्हणौनि चहूही इही । ऊर्ध्वमूळांती अध्यायी । ज्ञानकांड ये ठायी । निरूपिजे ॥1449॥
म्हणून, ऊर्ध्वमूल ह्या पंधराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंतच्या चार अध्यायनी ज्ञानकांड निरूपिले आहे. 49
1450-18
एवं कांडत्रयनिरूपणी । श्रुतीचि हे कोडिसवाणी । गीतापद्यरत्नांची लेणी । लेयिली आहे ॥1450॥
ह्याप्रकारें, कर्म, उपासना व ज्ञान ह्या वेदाच्या कांडत्रयाचे संक्षेपतः वर्णन करणारी गीता ही लघुश्रुतिच असून गद्याऐवजी पद्यरूप रत्नालंकार तिने, धारण केले आहेत. 1450
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1451-18
हे असो कांडत्रयात्मक । श्रुति मोक्षरूप फळ येक । बोभावे जे आवश्यक । ठाकावे म्हणौनि ॥1451॥
हे असो, ही कांडत्रयाचे सार जी गीतारूप श्रुति, ती, सर्व साधनांचा हेतु. मोक्ष रूप जे अखेरचे फल ते जीवांनी अवश्य प्राप्त करून घ्यावे अशी गर्जना करून सांगतें. 51
1452-18
तयाचेनि साधन ज्ञानेसी । वैर करी जो प्रतिदिवशी । तो अज्ञानवर्ग षोडशी । प्रतिपादिजे ॥1452॥
त्या मोक्षाचे अंतिम साधन जे ज्ञान त्याच्याशी प्रत्यही शत्रुत्व करणारा जो अज्ञानवर्ग त्याचे सोळाव्या अध्यायात प्रतिपादन केले. 52
1453-18
तोचि शास्त्राचा बोळावा । घेवोनि वैरी जिणावा । हा निरोपु तो सतरावा । अध्याय येथ ॥1453॥
शास्त्राच्या सहाय्याने तो अज्ञानशत्रू जीवांनी जिंकावा असा त्यांना सतराव्या अध्यायात गीतेचा आदेश आहे. 53
1454-18
ऐसा प्रथमालागोनि । सतरावा लाणी करूनी । आत्मनिश्वास विवरूनी । दाविला देवे ॥1454॥
पहिल्या अध्यायापासून तो सतराव्याच्या अंतापर्यंत देवांनी, आत्मनिःश्वासरूपी जो वेद त्याचे मनोगत विशद करून गीतेत दर्शविले. 54
1455-18
तया अर्थजाता अशेषा । केला तात्पर्याचा आवांका । तो हा अठरावा देखा । कलशाध्यायो ॥1455॥
या सतराही अध्यायातील सर्व अर्थाच्या तात्पर्याच ज्यात विचार केला आहे तो हा अठरावा अध्याय होय; तो गीताशास्त्र समाप्तीचा अध्याय असल्यामुळे त्याला कलशाध्याय अशी अलंकारिक संज्ञा आहे 55
1456-18
एवं सकळसंख्यासिद्धु । श्रीभागवद्गीता प्रबंधु । हा औदार्ये आगळा वेदु । मूर्तु जाण ॥1456॥
ह्याप्रमाणे, सातशे पद्य (श्लोक ) संख्येने युक्त असलेला हा गीताप्रबंध म्हणजे अधिक औदार्यसंपन्न होऊन अवतरलेला मूर्तीमंत वेदच होय. 56
1457-18
वेदु संपन्नु होय ठाई । परी कृपणु ऐसा आनु नाही । जे कानी लागला तिही । वर्णांच्याचि ॥1457॥
वेद गर्भश्रीमंत तर खराच; पण त्याच्याइतका कृपणही दुसरा कोण नाही कारण त्याने आपल्या संपन्नतेचा साक्षात् उपभोग घेण्याचा अधिकार तीन वर्णांनाच दिला आहे. 57
1458-18
येरा भवव्याथा ठेलिया । स्त्रीशूद्रादिका प्राणिया । अनवसरू मांडूनिया । राहिला आहे ॥1458॥
(तीन वरचे सोडून राहिलेले) जे । संसारदुःखपीडित इतर स्त्रीशूद्रादिक प्राणी, त्यांना माझ्या उपदेशाचा अधिकार नाही असा निर्बंध घालून तो स्वस्थ आहे. 58
1459-18
तरी मज पाहता ते मागील उणे । फेडावया गीतापणे । वेदु वेठला भलतेणे । सेव्य होआवया ॥1459॥
महाराज म्हणतात- मला वाटते, हा मागील दोष धुवून टाकावा म्हणून, वाटेल त्याने आपली सेवा करावी असे वेषांतर करून, वेद गीतेच्या रूपाने अवतरला आहे. 59
1460-18
ना हे अर्थु रिगोनि मनी । श्रवणे लागोनि कानी । जपमिषे वदनी । वसोनिया ॥1460॥
इतकेच नव्हे; तर अर्थद्वारा मनात प्रवेश करून, श्रवणरूपाने कर्णात शिरून व जपाच्या मिषाने वाणीत राहून- 1460
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1461-18
ये गीतेचा पाठु जो जाणे । तयाचेनि सांगातीपणे । गीता लिहोनि वाहाणे । पुस्तकमिषे ॥1461॥
किंवा जो गीता पाठ करितो, (पठण) किंवा जो त्या पाठकाच्या संगतींत असतो, अथवा जो गीताग्रंथ लिहून बाळगतो वा इतरास अर्पण करतो. 61
1462-18
ऐसैसा मिसकटा । संसाराचा चोहटा । गवादी घालीत चोखटा । मोक्षसुखाची ॥1462॥
वेदाने अशा अनेक मिषांनीं, भर संसाराच्या बाजारात मोक्षसुखाचे सत्र उघडले आहे. 62
1463-18
परी आकाशी वसावया । पृथ्वीवरी बैसावया । रविदीप्ति राहाटावया । आवारु नभ ॥1463॥
परंतु, अंतरिक्षांत संचार करणे, पृथ्वीवर बसणे अथवा सूर्यकिरणांनी प्रकाशन करणे ह्या सर्वाना आकाशाचा जसा सारखाच आधार असतो. 63
1464-18
तेवी उत्तम अधम ऐसे । सेविता कवणातेही न पुसे । कैवल्यदाने सरिसे । निववीत जगा ॥1464॥
त्याप्रमाणे आपली सेवा करणारा मध्ये, उत्तम, अधम, असा भेदाभेद न करिता, गीता सर्वाना सारखेच कैवल्यदान करून शांत करिते. 64
1465-18
यालागी मागिली कुटी । भ्याला वेदु गीतेच्या पोटी । रिगाला आता गोमटी । कीर्ति पातला ॥1465॥
म्हणून, आपल्या मागील निंदेला भिऊन वेदाने गीतेच्या उदरात प्रवेश केला (व तिच्याद्वारे सर्वाशी संवाद केला). त्यामुळे, आता मात्र त्याच धवल कीर्ति झाली आहे. 65
1466-18
म्हणौनि वेदाची सुसेव्यता । ते हे मूर्त जाण श्रीगीता । श्रीकृष्णे पंडुसुता । उपदेशिली ॥1466॥
म्हणून, वेदाच्या उत्तम सेवेचे फल देणारी अशी ही मूर्तीमंत गीता भगवान श्रीकृष्णांनी पंडुसुत अर्जुनास उपदेशिली. 66
1467-18
परी वत्साचेनि वोरसे । दुभते होय घरोद्देशे । जाले पांडवाचेनि मिषे । जगदुद्धरण ॥1467॥
परंतु वत्साच्या स्नेहाने गाईने दिलेल्या दुधाने जसे घरादाराला सुकाळ दुभते होते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने सांगितलेल्या गीतेने सर्व जगाचा उद्धार झाला. 67
1468-18
चातकाचिये कणवे । मेघु पाणियेसि धावे । तेथ चराचर आघवे । निवाले जेवी ॥1468॥
चातका विषयींच्या दयेने मेघ जलासह धाव घेतो, त्यात चराचर जगताची जशी सहजच शान्ति होते. 68
1469-18
का अनन्यगतिकमळा- । लागी सूर्य ये वेळोवेळा । की सुखिया होईजे डोळा । त्रिभुवनींचा ॥1469॥
किंवा अनन्यशरण असलेल्या कमलां करिता सूर्य रोज उदय पावतो, त्याने जगांतील सर्व दृष्टींना सहजच सुख होते 69
1470-18
तैसे अर्जुनाचेनि व्याजे । गीता प्रकाशूनि श्रीराजे । संसारायेवढे थोर ओझे । फेडिले जगाचे ॥1470॥
त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी गीता प्रकट करून, जगांतील सर्व लोकांच्या शिरावरील संसारासारखे थोर ओझे दूर देणारा केले. 1470
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1471-18
सर्वशास्त्ररत्नदीप्ती । उजळिता हा त्रिजगती । सूर्यु नव्हे लक्ष्मीपती । वक्त्राकाशीचा ॥1471॥
सर्व शास्त्ररूपी रत्नांच्या एकत्रित झालेल्या तेजाप्रमाणे त्रैलोक्याला प्रकाश देणाराहा गीता ग्रंथ म्हणजे भगवान् लक्ष्मीपतींच्या मुखाकाशातील सूर्यच म्हणू नये काय ? 71
1472-18
बाप कुळ ते पवित्र । जेथिचा पार्थु या ज्ञाना पात्र । जेणे गीता केले शास्त्र । आवारु जगा ॥1472॥
धन्य ते पवित्र कुल की ज्यात, जन्माला आलेला पार्थ, अशा ज्ञानाचा अधिकारी होऊन त्याच्याकरिता निर्माण झालेले गीताशास्त्र हे साऱ्या जगाचे रक्षणकर्ता झाले ! 72
1473-18
हे असो मग तेणे । सद्गुरु श्रीकृष्णे । पार्थाचे मिसळणे । आणिले द्वैता ॥1473॥
हे असो; मग सद्गुरू श्रीकृष्णांनी आपल्याशी एकरूप होणाऱ्या पार्थाला पुन्हा भानावर आणिलें. 73
1474-18
पाठी म्हणतसे पांडवा । शास्त्र हे मानले की जीवा । तेथ येरु म्हणे देवा । आपुलिया कृपा ॥1474॥
आणि म्हणाले, अर्जुना, माझा उपदेश पटला ना ? तेव्हा अर्जुनाने उत्तर दिले देवा, हो, देवा, हे सारे आपल्या कृपेचे फळ. 74
1475-18
तरी निधान जोडावया । भाग्य घडे गा धनंजया । परी जोडिले भोगावया । विपाये होय ॥1475॥
अर्जुना, ऐश्वर्यप्राप्तीचे भाग्यही कोठे कोठे दिसते, पण जोडलेल्या ऐश्वर्याचा त्याला भोग घडावा असे भाग्य क्वचितच असते. 75
1476-18
पै क्षीरसागरायेवढे । अविरजी दुधाचे भांडे । सुरा असुरा केवढे । मथिता जाले ॥1476॥
क्षीरसागराएवढं न विरजले जाणाऱ्या दुधाच्या भांडयाच्या मंथनाने देवांना व दैत्यांना कितीतरी श्रम पडले 76
1477-18
ते सायासही फळा आले । जे अमृतही डोळा देखिले । परी वरिचिली चुकले । जतनेते ॥1477॥
त्या श्रमांनाही फल आले; त्यातून निघालेले अमृतही दृष्टीने पाहिले; पण ते जतन करण्याची दैत्यांची हातोटी चुकली. 77
1478-18
तेथ अमरत्वा वोगरिले । ते मरणाचिलागी जाले । भोगो नेणता जोडले । ऐसे आहे ॥1478॥
ज्याची अमर व्हावे म्हणून प्राप्ति करून घेतली तेच त्यांच्या मरणाला कारण झाले. भोग कसा घ्यावा हे ज्ञान नसले म्हणजे असा विपरीत परिणाम होतो, 78
1479-18
नहुषु स्वर्गाधिपति जाहला । परी राहाटी भांबावला । तो भुजंगत्व पावला । नेणसी कायी ? ॥1479॥
नहुष स्वर्गाचा राजा झाला, पण राजेपणाची रहाटी माहित नसल्यामुळे तेथून च्युत होऊन सर्पत्व पावला, हे तुला माहीत नाही काय ? 79
1480-18
म्हणौनि बहुत पुण्य तुवा । केले तेणे धनंजया । आजि शास्त्रराजा इया । जालासि विषयो ॥1480॥
अर्जुना, तुझी मागली फार मोठी पुण्याई ! म्हणूनच सर्व शास्त्रांचा राजा जे गीताशास्त्र त्याचा तू आज अधिकारी झालास. 1480
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1481-18
तरी ययाचि शास्त्राचेनि । संप्रदाये पांघुरौनि । शास्त्रार्थ हा निकेनि । अनुष्ठी हो ॥1481॥
तरी ह्याच शास्त्राचे संप्रदायपूर्वक निष्ठेने अनुष्ठान (विचार) कर हो ! 81
1482-18
येऱ्हवी अमृतमंथना- । सारिखे होईल अर्जुना । जरी रिघसी अनुष्ठाना । संप्रदायेवीण ॥1482॥
एऱ्हवी, अर्जुना, संप्रदाय सोडून जर तू अनुष्ठान करशील तरअमृतमंथनाची गति होईल हो ! 82
1483-18
गाय धड जोडे गोमटी । ते तैचि पिवो ये किरीटी । जै जाणिजे हातवटी । सांजवणीची ॥1483॥
अर्जुना, चांगली दुभती गाय मिळाली आहे खरी, पण तिचे दोहन करण्याची कला माहीत असेल तेव्हांच दुधाची प्राप्ति होणार. 83
1484-18
तैसा श्रीगुरु प्रसन्न होये । शिष्य विद्याही कीर लाहे । परी ते फळे संप्रदाये । उपासिलिया ॥1484॥
त्याप्रमाणे श्रीगुरु प्रसन्न झाले. शिष्याला विद्याही प्राप्त झाली, तरी संप्रदायपूर्वक तिची उपासना घडेल तेव्हांच ती फलदायी होईल. 84
1485-18
म्हणौनि शास्त्री जो इये । उचितु संप्रदायो आहे । तो ऐक आता बहुवे । आदरेसी ॥1485॥
म्हणून ह्या शास्त्राचा जो उचित संप्रदाय आहे, तो आता बहुत आदरपूर्वक श्रवण कर. 85
इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन ।
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥18. 67॥
1486-18
तरी तुवा हे जे पार्था । गीताशास्त्र लाधले आस्था । ते तपोहीना सर्वथा । सांगावे ना हो ॥1486॥
तरी, पार्थ, तुझ्या आस्थेमुळे तुला प्राप्त झालेले हे गीताशास्त्र, ते तपोहीन पुरुषाला तू मुळीच सांगू नको हो ! 86
1487-18
अथवा तापसुही जाला । परी गुरूभक्ती जो ढिला । तो वेदी अंत्यजु वाळिळा । तैसा वाळी ॥1487॥
अथवा एखादा तपी असूनही जर त्याची गुरुनिष्ठा यथातथाच असेल, तरीही, वेदाने अंत्यजाला अस्पृश्य म्हणून गणिले आहे तसा तूही त्याला ह्या शास्त्रापुरता बाजूस सार. 87
1488-18
नातरी पुरोडाशु जैसा । न घापे वृद्ध तरी वायसा । गीता नेदी तैसी तापसा । गुरुभक्तिहीना ॥1488॥
अथवा, कावळा वृद्ध असला तरीही त्याला जसा पुरोडाश (यज्ञाचा अवशिष्ट भाग) घालीत नाहीत, याप्रमाणे, तापसी असूनही गुरुभक्तिहीन असेल अशाला गीताशास्त्र सांगू नको 88
1489-18
का तपही जोडे देही । भजे गुरुदेवांच्या ठायी । परी आकर्णनी नाही । चाड जरी ॥1489॥
किंवा देहाने तपही चालू गुरु देवतांचेही जो भजन करितो, परंतु ज्याला श्रवणाची चाड म्हणजे भक्ति किंवा इच्छा नाही. 89
1490-18
तरी मागील दोन्ही आंगी । उत्तम होय कीर जगी । परी या श्रवणालागी । योग्यु नोहे ॥1490॥
तरीही आहे वरील दोन गोष्टींच्या दृष्टीने तो लोकात उत्तम म्हणून गणला असला तरी, तो गीता श्रवणाचा अधिकारी नाही. 1490
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1491-18
मुक्ताफळ भलतैसे । हो परी मुख नसे । तव गुण प्रवेशे । तेथ कायी ? ॥1491॥
मोती वाटेल तितके चांगले असो, पण जर त्याला वेज नसेल तर हे सूत्र ओवण्याच्या लायकीचे आहे काय ? 91
1492-18
सागरु गंभीरु होये । हे कोण ना म्हणत आहे । परी वृष्टि वाया जाये । जाली तेथ ॥1492॥
समुद्र गंभीर असतो, हे कोण नाकबूल करितो ? त्यात होणारी वृष्टि ही व्यर्थ आहे तरीही, असेच म्हणावे लागते. 92
1493-18
धालिया दिव्यान्न सुवावे । मग जे वाया धाडावे । ते आर्ती का न करावे । उदारपण ॥1493॥
तृप्त असलेल्यांना आग्रहाने उत्तम अन्न वाढून फुकट दवडण्यापेक्षा ते क्षुधार्ताना (भुकेल्याला) देण्याचे औदार्य का न करावे ? 93
1494-18
म्हणौनि योग्य भलतैसे । होतु परी चाड नसे । तरी झणे वानिवसे । देसी हे तया ॥1494॥
म्हणून इतर गोष्टींनी वाटेल तितके योग्य असोत, पण श्रवणाची चाड नसेल तर चुकून अगर कौतुकानेही त्यांना हे, गीतशास्त्र देऊ नको हो ! 94
1495-18
रूपाचा सुजाणु डोळा । वोढवू ये कायि परिमळा ? । जेथ जे माने ते फळा । तेथचि ते गा ॥1495॥
डोळयाचा रूपविषयात पूर्ण अधिकार असला म्हणून तो काय परिमळाच्या परीक्षेच्या कामी येईल ? म्हणून जे जेथे योग्य तेथेच त्याला फल प्राप्ति होते 95
1496-18
म्हणौनि तपी भक्ति । पाहावे ते सुभद्रापती । परी शास्त्रश्रवणी अनासक्ती । वाळावेचि ते ॥1496॥
म्हणून, हे सुभद्रापते, ज्यांना गीता, सांगावयाची ते तपी, निष्ठावान भक्त आहेत किंवा कसे हे, तर पहावेच, पण, तरीही, शास्त्रश्रवणाविषयी ते अनासक्त किंवा उदासीन असतील तर ते वजं करावेच. 96
1497-18
नातरी तपभक्ति । होऊनि श्रवणी आर्ति । आथी ऐसीही आयती । देखसी जरी ॥1497॥
अथवा तप, भक्ति यांनी युक्त असून श्रवणाविषयीही तीव्र इच्छा आहे अशी व्यक्ति जरी आढळली 97
1498-18
तरी गीताशास्त्रनिर्मिता । जो मी सकळलोकशास्ता । तया माते सामान्यता । बोलेल जो ॥1498॥
तरी, गीताशास्त्राचा निर्मात व सकललोकाचा शास्ता असा जो मी, त्या मला जो सामान्य मनुष्याप्रमाणे लेखील, 98
1499-18
माझ्या सज्जनेंसि माते । पैशुन्याचेनि हाते । येक आहाती तयाते । योग्य न म्हण ॥1499॥
किंवा माझ्या सज्जनांची (भक्तांची) व माझी दुष्ट वचनांनी निंदा करणारे जे कोणी असतील तेही या शास्त्राला योग्य असे समजू नको. 99
1500-18
तयांची येर आघवी । सामग्री ऐसी जाणावी । दीपेवीण ठाणदिवी । रात्रीची जैसी ॥1500॥
त्यांची इतर सर्व सामग्री म्हणजे रात्री ज्योतीवाचून नुसती तेल व वातीची तयारी करून ठेवलेल्या ठाणदिवीप्रमाणे व्यर्थ होय असे समज. 1500
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1501-18
अंग गोरे आणि तरुणे । वरी लेईले आहे लेणे । परी येकलेनि प्राणे । सांडिले जेवी ॥1501॥
शरीर गोरे आहे, तरुण आहे, अलंकारभूषित आहे, पण फक्त प्राण मात्र त्यात जसा नसावा. 1
1502-18
सोनयाचे सुंदर । निर्वाळिले होय घर । परी सर्पांगना द्वार । रुंधले आहे ॥1502॥
किंवा सोन्याचे सुंदर बांधलेले घर आहे, पण नागिणीने प्रवेशद्वार रोखून ठेविले आहे. 2
1503-18
निपजे दिव्यान्न चोखट । परी माजी काळकूट । असो मैत्री कपट- । गर्भिणी जैसी ॥1503॥
किंवा उत्तम स्वच्छ अन्न तयार करून आत जर जालीम विष असेल किंवा वरून मैत्री असून पोटात कपट असेल तर ते जसे व्यर्थ. 3
1504-18
तैसी तपभक्तिमेधा । तयाची जाण प्रबुद्धा । जो माझयांची का निंदा । माझीचि करी ॥1504॥
त्याप्रमाणे, जो माझी किंवा माझ्या भक्तांची निंदा करितो, त्याचे तप, भक्ति, बुद्धि ही व्यर्थ होत असे ध्याना असू दे. 4
1505-18
याकारणे धनंजया । तो भक्तु मेधावी तपिया । तरी नको बापा इया । शास्त्रा आतळो देवो ॥1505॥
यास्तव, अर्जुना, तो जरी भक्त, बुद्धिमान व तपी असला तरी त्याला ह्या गीताशास्त्राचा स्पर्श होऊ देऊ नको. 5
1506-18
काय बहु बोलो निंदका । योग्य स्रष्टयाहीसारिखा । गीता हे कवतिका- । लागीही नेदी ॥1506॥
फार काय सांगावे ? त्याची ब्रह्मदेवासारखी योग्यता असूनही जर तो निंदक असेल, तर कौतुकाखातरही त्याला गीता सांगू नको. 6
1507-18
म्हणौनि तपाचा धनुर्धरा । तळी दाटोनि गाडोरा । वरी गुरुभक्तीचा पुरा । प्रासादु जो जाला ॥1507॥
म्हणून अर्जुना, ज्याने तपोरूप पाषाणांचा तळांत दृढपाया भरून, त्यावर जो स्वतः पूर्णं गुरुभक्तिरूप मंदिर बनला आहे. 7
1508-18
आणि श्रवणेच्छेचा पुढा । दारवंटा सदा उघडा । वरी कलशु चोखडा । अनिंदारत्नांचा ॥1508॥
आणि ज्याचे श्रवणेच्छारूप प्रवेशद्वार नित्य उघडे आहे व ज्या मंदिरावर अनिंदारूप रत्नांचा उत्तम कळस शोभतो आहे. 8
य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति ।
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥18. 68॥
1509-18
ऐशा भक्तालयी चोखटी । गीतारत्नेश्वरु हा प्रतिष्ठी । मग माझिया संवसाटी । तुकसी जगी ॥1509॥
अश्या शुद्ध भक्तरुपी देवालयात ह्या गीतारत्नेश्वराची स्थापना कर. म्हणजे जगात तु योग्यतेला पावशील, 9
1510-18
का जे एकाक्षरपणेसी । त्रिमात्रकेचिये कुशी । प्रणवु होता गर्भवासी । सांकडला ॥1510॥
कारण, जो प्रणव म्हणजे ॐकार एक अक्षराच्या रूपाने त्रिमात्रा ज्या अ, उ, म ह्यांच्या पोटात गर्भवासामध्ये होता-1510
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1511-18
तो गीतेचिया बाहाळी । वेदबीज गेले पाहाळी । की गायत्री फुलीं फळी । श्लोकांच्या आली ॥1511॥
असा वेदाचे बीज जो ॐकार तो गीतारूप वृक्षाच्या फांद्यांनी दूरवर विस्तारला; किंवा गायत्रीरूप (बीजत्व ने) असलेला हाच ॐकार, गीतेतील लोकांच्या रूपाने जणू फुलांफळांस आला. 11
1512-18
ते हे मंत्ररहय गीता । मेळवी जो माझिया भक्ता । अनन्यजीवना माता । बाळका जैसी ॥1512॥
ती प्रणवमंत्राचे रहस्य असलेली ही गीता, अनन्यजीवन बाळकाला आई भेटावी, त्याप्रमाणे, जो माझ्या भक्तांस भेटवितो- (उपदेशितो) 12
1513-18
तैसी भक्ता गीतेसी । भेटी करी जो आदरेसी । तो देहापाठी मजसी । येकचि होय ॥1513॥
त्याचप्रमाणे भक्तांची जो गीतेपाशी आदराने ग्रंथि घालून देतो तो देहपातानंतर मलाच प्राप्त होतो. (मद्रूपच होतो). 13
न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः ।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥18. 69॥
1514-18
आणि देहाचेही लेणे । लेऊनि वेगळेपणे । असे तव जीवेप्राणे । तोचि पढिये ॥1514॥
आणि असा भक्त देहरूपी अलंकाराच्या उपाधीच्या योगाने माझ्याहून वेगळेपणाने असला, तरी मला तो जीव की प्राण असा प्रिय आहे. 14
1515-18
ज्ञानिया कर्मठा तापसा । यया खुणेचिया माणुसां- । माजी तो येकु गा जैसा । पढिये मज ॥1515॥
ज्ञानाभ्यासी, कर्मठ, तापसी अशी भिन्न भिन्न अधिकारची माणसे असली तरी, त्यामध्ये तो एक जसा मला आवडतो. 15
1516-18
तैसा भूतळी आघवा । आन न देखे पांडवा । जो गीता सांगे मेळावा । भक्तजनांचा ॥1516॥
तसा, सर्व जगांत, अर्जुना, मला अन्य कोणीही आवडत नाही; असा कोण म्हणून विचारशील तर, जो भक्तजनांच्या मेळाव्यामध्ये गीतेचे प्रवचन करितो तो होय. 16
1517-18
मज ईश्वराचेनि लोभे । हे गीता पढता अक्षोभे । जो मंडन होय सभे । संताचिये ॥1517॥
मज ईश्वराच्या प्रेमाखातर ज्याचा स्थिर चित्ताने गीतापाठ सुरू असतो, तो संतसभेला भूषणभूत होतो. 17
1518-18
नेत्रपल्लवी रोमांचितु । मंदानिळे कांपवितु । आमोदजळे वोलवितु । फुलांचे डोळे ॥1518॥
नवपल्लवांप्रमाणे अंतःकरणे रोमांचित करणारा (प्रेमकथांनी), मंदवायूने वृक्ष डोलावे तसा श्रोत्समुदाय आनंदाने डोलविणारा, फुले सुगंधित जलबिंदुयुक्त असावी त्याप्रमाणे श्रोत्यांचे नेत्र आनंदाश्रूंनी पाझरू लावणारा, 18
1519-18
कोकिळा कलरवाचेनि मिषे । सद्गद बोलवीत जैसे । वसंत का प्रवेशे । मद्भक्त आरामी ॥1519॥
व कोकिलांप्रमाणे मधुर कंठाने श्रोत्यांच्या मुखातून भगवन्नामगजर करविणारा असा हा गीताप्रवचनकार, म्हणजे मद्भक्तरूपी उद्यानत प्रवेश करणारा जणू वसंत तसा शोभतो. 19
1520-18
का जन्माचे फळ चकोरा । होत जै चंद्र ये अंबरा । नाना नवघन मयूरा । वो देत पावे ॥1520॥
किंवा आकाशात चंद्रोदय झाला म्हणजे चकोरांना जन्माचे सार्थक झालेसे वाटते, अथवा वर्षाकाळ मेघांनी मयूरकेकेला (ध्वनि) जसे ” ओ ” देत प्रसन्न व्हावे 1520
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1521-18
तैसा सज्जनांच्या मेळापी । गीतापद्यरत्नी उमपी । वर्षे जो माझ्या रूपी । हेतु ठेऊनि ॥1521॥
त्याप्रमाणे केवळ माझ्या उद्देशाने संतसमुदायांमध्ये जो गीताश्लोक रूपी रत्नांचा व्याख्यानद्वारा उमाप (पुष्कळ) वर्षाव करितो. 21
1522-18
मग तयाचेनि पाडे । पढियंते मज फुडे । नाहीचि गा मागेपुढे । न्याहाळिता ॥1522॥
त्याच्या इतके मला प्रिय असणारे असे पूर्वीही काही नव्हते व विचार केला तर पुढेही काही असणे शक्य नाही. 22
1523-18
अर्जुना हा ठायवरी । मी तयाते सूये जिव्हारी । जो गीतार्थाचे करी । परगुणे संता ॥1523॥
अर्जुना, संतसज्जनांना गीतामृताची मेजबानी घालणाऱ्या ह्या माझ्या भक्ताला मी सर्वतोपरी माझ्या अंतःकरणांतच स्थान देतों. 23
अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ।
ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥18. 70॥
1524-18
पै माझिया तुझिया मिळणी । वाढिनली जे हे कहाणी । मोक्षधर्म का जिणी । आलासे जेथे ॥1524॥
अरे, तुझ्या माझ्या भेटींत जी ही गीता कथा वाढली, व जिचा मोक्ष धर्मानेही जीवनार्थ (जिवंत रहावे म्हणून ) आश्रय केला 24
1525-18
तो हा सकळार्थप्रबोधु । आम्हा दोघांचा संवादु । न करिता पदभेदु । पाठेचि जो पढे ॥1525॥
तो हा सकलार्थाचे ज्ञान करून देणारा आपला दोघांचा संवाद, जो अर्थासाठी पदच्छेद न करिता केवल पाठ म्हणून पठण करितो. 25
1526-18
तेणे ज्ञानानळी प्रदीप्ती । मूळ अविद्येचिया आहुती । तोषविला होय सुमती । परमात्मा मी ॥1526॥
तो, प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये मूल अविद्येची आहुती देऊन मला परमात्म्याला संतुष्ट करितो. 26
1527-18
घेऊनि गीतार्थ उगाणा । ज्ञानिये जे विचक्षणा । ठाकती ते गाणावाणा । गीतेचा तो लाहे ॥1527॥
गीतार्थाचा ठाव घेऊन ” बुद्धिमान ज्ञानी लोकांना जी फलप्राप्ति होते, तीच गीतेचे गायन पठण करणारांनाही शेवट होते 27
1528-18
गीता पाठकासि असे । फळ अर्थज्ञाचि सरिसे । गीता माउलियेसि नसे । जाणे तान्हे ॥1528॥
म्हणून अर्थज्ञाला जे फल तेच फल पाठकालाही अखेर आहे; गीता सर्वाची माउली असल्यामुळे तिच्यापाशी तान्हा व मोठा असा भेद नाही. 28
श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः ।
सोऽपि मुक्तः शुभाण्ल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ॥18. 71॥
1529-18
आणि सर्वमार्गी निंदा । सांडूनि आस्था पै शुद्धा । गीताश्रवणी श्रद्धा । उभारी जो ॥1529॥
आणि सर्व प्रकारची निंदा सोडून जो शुद्ध आदराने गीताश्रवणाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवील. 29
1530-18
तयाच्या श्रवणपुटी । गीतेची अक्षरे जव पैठी । होतीना तव उठाउठी । पळेचि पाप ॥1530॥
त्याच्या कानांत गीतेची अक्षरे प्रवेश करितात न करितात तोच पाप तेथून पाय काढते ! 1530
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1531-18
अटवियेमाजी जैसा । वन्हि रिघता सहसा । लंघिती का दिशा । वनौके तिये ॥1531॥
अरण्याला वणवा लागला असता वनांतील प्राणी जसे दाही दिशांकडे पळून जातात. 31
1532-18
का उदयाचळकुळी । झळकता अंशुमाळी । तिमिरे अंतराळी । हारपती ॥1532॥
किंवा उदयगिरीवर सूर्य येतांच अंधकार जसा आकाशांतच नाहीसा होतो 32
1533-18
तैसा कानाच्या महाद्वारी । गीता गजर जेथ करी । तेथ सृष्टीचिये आदिवरी । जायचि पाप ॥1533॥
याप्रमाणे ज्याच्या कर्णरूपी महाद्वारांत गीतेचा घोष चालू आहे, त्याची पूर्वीची सर्वं पापे नष्ट होतात. 33
1534-18
ऐसी जन्मवेली धुवट । होय पुण्यरूप चोखट । याहीवरी अचाट । लाहे फळ ॥1534॥
याप्रमाणे त्याचे सर्व कुल पावन होऊन तो शुद्ध पुण्यमूर्ती होतो; व याहीपेक्षां त्याला अलौकिक फल मिळतें. 34
1535-18
जे इये गीतेची अक्षरे । जेतुली का कर्णद्वारे । रिघती तेतुले होती पुरे । अश्वमेध की ॥1535॥
गीतेची जितके अक्षरे त्याच्या श्रवणात प्रवेश करतील तितक्या अश्वमेधांचे पुण्य त्याला जोडते. 35
1536-18
म्हणौनि श्रवणे पापे जाती । आणि धर्म धरी उन्नती । तेणे स्वर्गराज संपत्ती । लाहेचि शेखी ॥1536॥
गीता श्रवणाते पापे नष्ट होतात; धर्माची वृद्धि होते व त्यायोगे अखेर स्वर्गाचे राज्य त्याला प्राप्त होते 36
1537-18
तो पै मज यावयालागी । पहिले पेणे करी स्वर्गी । मग आवडे तव भोगी । पाठी मजचि मिळे ॥1537॥
मज कडे यावयास निघालेला तो पुरुष, पहिला मुक्काम स्वर्गात करून तेथील सुख इच्छला येईल तोपर्यंत भोगून अखेर माझी प्राप्ति त्याला होते. 37
1538-18
ऐसी गीता धनंजया । ऐकतया आणि पढतया । फळे महानंदे मिया । बहु काय बोलो ॥1538॥
अर्जुना, श्रवण करणाराला व पठण करणाराला गीता ह्याप्रमाणे फलदात्री होते; महानंद रूप जो मी, त्याने तुला आणखी काय सांगावे ? 38
1539-18
याकारणे हे असो । परी जयालागी शास्त्रातिसो । केला ते तव तुज पुसो । काज तुझे ॥1539॥
यास्तव ह्या गोष्टी असोत; पण ज्या कार्यासाठी एवढा शास्त्रीय ऊहापोह केला त्याने तुझी समजूत कितपत झाली आहे हे, तुला प्रथम विचारतों. 39
कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा ।
कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ॥18. 72॥
1540-18
तरी सांग पा पांडवा । हा शास्त्रसिद्धांतु आघवा । तुज एकचित्ते फावा । गेला आहे ? ॥1540॥
तरी, अर्जुना, हा सर्व शास्त्रसिद्धांत तुला विचारपूर्वक पटला आहे ना ? 1540
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1541-18
आम्ही जैसे जया रीती । उगाणिले कानांच्या हाती । येरी तैसेचि तुझ्या चित्ती । पेठे केले की ? ॥1541॥
तुला आम्ही जे श्रवण करविले ते तसेच्या तसेच तुझ्या कर्णांनी तुझ्या अंतःकरणापर्यंत पोचविले ना ? 41
1542-18
अथवा माझारी । गेले सांडीविखुरी । किंवा उपेक्षेवरी । वाळूनि सांडिले । ॥1542॥
किंवा मध्येच काही मजकूर सांडलोटीवर गेला, किंवा उपेक्षाबुद्धीने त्यांनी गाळून टाकिला ? 42
1543-18
जैसे आम्ही सांगितले । तैसेचि हृदयी फावले । तरी सांग पा वहिले । पुसेन ते मी ॥1543॥
कर्णांनी, जसे आम्ही सांगितले तसेच्या तसे जर हे श्रवण अंतःकरणापर्यंत पोचविले असेल तर मी तुला विचारतो त्याचे उत्तर दे पाहू. 43
1544-18
तरी स्वाज्ञानजनिते । मागिले मोहे तूते । भुलविले तो येथे । असे की नाही ? ॥1544॥
तरी स्वस्वरूपाच्या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या ज्या मोहाने तुला भ्रमांत पाडले तो मोह आता शिल्लक आहे की नाही ? 44
1545-18
हे बहु पुसो काई । सांगे तू आपल्या ठायी । कर्माकर्म काही । देखतासी ? ॥1545॥
इतके तरी कशाला विचारु ? तू आपल्याला कर्ता समजतोस की अकर्ता ते सांग पाहू ? 45
1546-18
पार्थु स्वानंदैकरसे । विरेल ऐसा भेददशे । आणिला येणे मिषे । प्रश्नाचेनि ॥1546॥
अर्जुन, स्वात्मानंदात विसरून जाण्याचा संभव होता, ह्या प्रश्नाच्या मिषाने देवांनी त्यास पुन्हा देहभानावर आणिले 46
1547-18
पूर्णब्रह्म जाला पार्थु । तरी पुढील साधावया कार्यार्थु । मर्यादा श्रीकृष्णनाथु । उल्लंघो नेदी ॥1547॥
आतांच जरी हा पूर्ण ब्रह्म झाला, तरी आपला पुढील कार्यभाग साधण्यासाठी देवांनी त्याच्या (आभासिक भेददशेची मर्यादा त्याला उल्लंघू दिली नाही. (समाधींतून माघे ओढले. ) 47
1548-18
येऱ्हवी आपुले करणे । सर्वज्ञ काय तो नेणे ? । परी केले पुसणे । याचि लागी ॥1548॥
एऱ्हवी आपल्या उपदेशाचा पार्थावर काय परिणाम झाला हे सर्वज्ञ भगवंतांना काय माहीत नव्हतें ? पण, म्हणूनच त्यांनी मुद्दाम असा प्रश्न केला. 48
1549-18
एवं करोनिया प्रश्न । नसतेचि अर्जुनपण । आणूनिया जाले पूर्णपण । ते बोलवी स्वये ॥1549॥
असा प्रश्न करून, बाधित झालेल्या अगर विरत चाललेल्या अर्जुनपणावर त्याला पुन्हा आणून, त्याला बाणलेले पूर्णपण (ब्रह्मत्व) त्याजकडून पुन्हा वदविलें. 49
1550-18
मग क्षीराब्धीते सांडितु । गगनी पुंजु मंडितु । निवडे जैसा न निवडितु । पूर्णचंद्रु ॥1550॥
मग क्षीरसागरापासून निघालेला पूर्णचंद्र आकाशात तेजोगोल म्हणून, वस्तुतः क्षीरसागराच्या संपत्तीपैकीच तो एक भाग असूनही (वेगळा नसूनही) वेगळेपणाने शोभतो. 1550
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1551-18
तैसा ब्रह्म मी हे विसरे । तेथ जगचि ब्रह्मत्वे भरे । हेही सांडी तरी विरे । ब्रह्मपणही ॥1551॥
त्याप्रमाणे, प्रथम असलेली ” मी ब्रह्म ही वृत्ति सुटून जो जगाकडे पहातो तेव्हां, त्याला तेही ब्रह्मरूप दिसावे व त्या वृत्तीच्या लयाने ब्रह्मपणाही स्वरूपात विरावा. 51
1552-18
ऐसा मोडतु मांडतु ब्रह्मे । तो दुःखे देहाचिये सीमे । मी अर्जुन येणे नामे । उभा ठेला ॥1552॥
असा त्याचा ब्रह्मस्थितीशी, कधी आपलेपणे तर कधी जगद्रूपाने आनंदविलास सुरू असता (देवांच्या ह्या प्रश्नानें) मी अर्जुन अशा प्रकारे देहबुद्धीवर येतांना त्याला कष्ट झाले. 52
1553-18
मग कापता करतळी । दडपूनि रोमावळी । पुलिका स्वेदजळी । जिरऊनिया ॥1553॥
व मग कंप पावणाऱ्या करतलाने अंगावरील रोमांच बसवून व घामबिंदु जिरवून 53
1554-18
प्राणक्षोभे डोलतया । आंगा आंगचि टेंकया । सूनि स्तंभु चाळया । भुलौनिया ॥1554॥
व कष्टामुळे होणाऱ्या दीर्घ श्वासोच्छवासान डोलणारे शरीर त्याच्याच आतील आधाराने सांवरून हालचाल बंद होत्साता स्तब्ध उभा राहिला. 54
1555-18
नेत्रयुगुळाचेनि वोते । आनंदामृताचे भरिते । वोसंडत ते मागुते । काढूनिया ॥1555॥
दोन्ही नेत्रांच्या कडांनी वाहणारे आनंदाश्रूचे भरते पुसून टाकुन 55
1556-18
विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कंठी । ते करूनिया पैठी । हृदयामाजी ॥1556॥
नाना प्रकारची चित्ताची उत्सुकता कंठ भरून आणित होती; पण तिला आंतल्याआंत जिरवून 56
1557-18
वाचेचे वितुळणे । सांवरूनि प्राणे । अक्रमाचे श्वसणे । ठेऊनि ठायी ॥1557॥
अव्यवस्थितपणे व होणारे श्वासाचे व्यापार व विस्कळित झालेली वाचा ह्यांना त्याने नित्याच्या स्थितीवर आणिलें. 57
अर्जुन उवाच ।
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥18. 73॥
1558-18
मग अर्जुन म्हणे काय देवो । पुसताति आवडे मोहो । तरी तो सकुटुंब गेला जी ठावो । घेऊनि आपला ॥1558॥
आणि अर्जुन म्हणाला, देवा, माझा मोह आहे की गेला असे मला विचारले ना ? तर त्याने माझ्या चित्तांतील आपले बिऱ्हाड सकुटुंब (कारणाज्ञानासह) हालविले आहे. 58
1559-18
पासी येऊनि दिनकरे । डोळ्याते अंधारे । पुसिजे हे कायि सरे । कोणे गावी ? ॥1559॥
सूर्याने डोळयाच्या जवळ येऊन अंधार भासतो काय ? असा प्रश्न करावा असे कोठेतरी झाले आहे काय ? 59
1560-18
तैसा तू श्रीकृष्णराया । आमुचिया डोळया । गोचर हेचि कायिसया । न पुरे तव ॥1560॥
त्याप्रमाणे, हे श्रीकृष्णराया, आमच्या नेत्रांना तुझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर, त्याने कोणती गोष्ट होऊ शकणार नाही ? 1560
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1561-18
वरी लोभे मायेपासूनी । ते सांगसी तोंड भरूनी । जे कायिसेनिही करूनी । जाणू नये ॥1561॥
त्यातही मातेपेक्षाही अधिक प्रेमाने (कळवळ्यानें) जे कोणाच्याही मुखातून श्रवण होणे शक्य नाही असे ज्ञान तोंड भरून (विस्तरशः) आम्हास सांगितल्यावर (मग हा प्रश्न ?) 61
1562-18
आता मोह असे की नाही । हे ऐसे जी पुससी काई । कृतकृत्य जाहलो पाही । तुझेपणे ॥1562॥
आता, मोह आहे की नष्ट झाला असे जे आपण विचारले, त्याचे उत्तर इतकंच की, देवा, त्वद्रूप झाल्यामुळे (अद्वैतस्थितीमुळे) मी आता कृत्य कृत्य झालो. (मला आता काहीही कर्तव्य म्हणून उरले नाही) 62
1563-18
गुंतलो होतो अर्जुनगुणे । तो मुक्त जालो तुझेपणे । आता पुसणे सांगणे । दोन्ही नाही ॥1563॥
‘मी अर्जुन ” अशी भेदबुद्धि होती तोवर बद्ध होतो खराच; पण त्या माझे तुझ्या स्वरूपाशी तात्त्विक ऐक्य झाल्यावर मी केव्हांही मुक्त होतो व आहेहीं; असा निश्चय झाला, त्यामुळे आता तुम्ही विचारणे व मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत. 63
1564-18
मी तुझेनि प्रसादे । लाधलेनि आत्मबोधे । मोहाचे तया कांदे । नेदीच उरो ॥1564॥
तुझ्या कृपाप्रसादाने अभिव्यक्त झालेल्या आत्मबोधाने माझ्या चित्तांत तो मोह अगर त्याचे मूळ काहीही उरू दिले नाही. 64
1565-18
आता करणे का न करणे । हे जेणे उठी दुजेपणे । ते तू वाचूनि नेणे । सर्वत्र गा ॥1565॥
आता, ” करू की नको करू ” हा विचार ज्या द्वैतभावावर नांदतो तो द्वैतभावच तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लीन झाल्यामुळे तुझ्यावाचून मला सर्वत्र काहीही दिसत नाही. 65
1566-18
ये विषयी माझ्या ठायी । संदेहाचे नुरेचि काही । त्रिशुद्धि कर्म जेथ नाही । ते मी जालो ॥1566॥
ह्याविषयी माझ्या अंतःकरणात तिळमात्र संदेह नाही; कारण जेथे कर्माचा कालत्रयी संबंध होणे शक्य नाही अशी ” नैष्कम्यं ” स्थिति । (ब्रह्मास्थिति ) मी लाधलो आहें. 66
1567-18
तुझेनि मज मी पावोनी । कर्तव्य गेले निपटूनी । परी आज्ञा तुझी वाचोनि । आन नाही प्रभो ॥1567॥
देवा, आपल्या कृपेने मला माझ्या यथार्थस्वरूपाचे दर्शन होऊन, आता माझे म्हणून वाटणारे सर्व कर्तव्य निपटून नाहीसे झाले आहे; उरलेच असेल तर, देवा, आपली आज्ञा प्रमाण ” ह्यावाचून अन्य काहीही नाही. 67
1568-18
का जे दृश्य दृश्याते नाशी । जे दुजे द्वैताते ग्रासी । जे एक परी सर्वदेशी । वसवी सदा ॥1568॥
कारण ज्या दृश्याच्या (तुझ्या व्यक्त मूर्तीच्या) दर्शनाने आपल्यासह दृश्यमात्र लयास जातं, तसेच ज्याचे दर्शन द्वैताची वार्ता उरू देत नाही, व जे व्यक्त एक असे असले तरी सर्वव्यापक आहे. 68
1569-18
जयाचेनि संबंधे बंधु फिटे । जयाचिया आशा आस तुटे । जे भेटलया सर्व भेटे । आपणपाचि ॥1569॥
ज्याच्या समागमाने बंधापासून मुक्त होतो व ज्याच्या प्राप्तीने अन्य कशाचीही आशा उरत नाही, 69
1570-18
ते तू गुरुलिंग जी माझे । जे येकलेपणीचे विरजे । जयालागी वोलांडिजे । अद्वैतबोधु ॥1570॥
असे जे देवा, तुम्ही माझे गुरु-स्थान (पद) की ज्याच्या सहाय्याने माझे अद्वितीय एकपण प्रकट झाले, व म्हणूनच ज्याच्याविषयींच्या आदराने तो अद्वैतबोधही बाजूस सारून ज्याच्या दर्शनाची इच्छा होते 1570
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1571-18
आपणचि होऊनि ब्रह्म । सारिजे कृत्याकृत्यांचे काम । मग कीजे का निःसीम । सेवा जयाची ॥1571॥
व ज्याच्या कृपेने आपले असलेले ब्रह्मत्व आपल्यास पटून कृत्याकृत्यांचे सर्व ओझे ( विधिकिर्करत्व) नाहीसे होते व ह्या खऱ्या कृतज्ञतेचे चिन्ह म्हणजे अशा गुरुमाउलीची निःसीम सेवा करणे एवढे एकच कर्तव्य भक्ताला उरतें. 71
1572-18
गंगा सिंधू सेवू गेली । पावताचि समुद्र जाली । तेवी भक्ता सेल दिधली । निजपदाची ॥1572॥
गंगा, सागराच्या भेटीस गेली की तेणे सागररूपच होते, त्याप्रमाणे तुम्ही आपल्या भक्ताल निजपदाची जोड करून देतां. 72
1573-18
तो तू माझा जी निरुपचारु । श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु । मा ब्रह्मतेचा उपकारु । हाचि मानी ॥1573॥
देवा, तुम्ही माझे ब्रह्मत्व मला दिले ह्याबद्दल उतराई होणे म्हणजे माझ्या स्वाधीन असणारी एकच गोष्ट आहे की, मी अशा माझ्या सद्गुरूची अकृत्रिमपणे आजन्म सेवा करावी. 73
1574-18
जे मज तुम्हा आड । होते भेदाचे कवाड । ते फेडोनि केले गोड । सेवासुख ॥1574॥
जो तुमच्या व माझ्यामध्ये भेदाचा प्रतिबंध होता त्याचा परिहार केल्याने आता हे सेवासुख निरुपम होय. 74
1575-18
तरी आता तुझी आज्ञा । सकळ देवाधिदेवराज्ञा । करीन देई अनुज्ञा । भलतियेविषयी ॥1575॥
तरी हे सकल देवाधिदेवराया, तू आता वाटेल ती आज्ञा कर, ते करीनच. 75
1576-18
यया अर्जुनाचिया बोला । देवो नाचे सुखे भुलला । म्हणे विश्वफळा जाला । फळ हा मज ॥1576॥
ह्या अर्जुनाच्या भाषणाने, देवांना सुखाचे भरते येऊन ते आनंदाने नाचू लागले, व म्हणाले विश्वांत अत्यंत मोठी फलप्राप्ति जर असेल तर असा शिष्य मिळणे हि होय. 76
1577-18
उणेनि उमचला सुधाकरु । देखुनी आपला कुमरु । मर्यादा क्षीरसागरु । विसरेचिना ? ॥1577॥
आपला पुत्र जो चंद्र त्याचे कलाहीनत्व नष्ट होऊन, त्याला पूर्णता आलेली पाहून, सागरालाही नित्य मर्यादेचा विसर पडावा असे भरते येत नाही काय ? (मग देव नाचू लागले तर नवल काय ?) 77
1578-18
ऐसे संवादाचिया बहुला । लग्न दोघांचिया आंतुला । लागले देखोनि जाला । निर्भरु संजयो ॥1578॥
ह्याप्रमाणे संवादरूपी बहुल्यांवर श्रीकृष्णार्जुनांच्या चित्तवृत्तीचे लग्न लागत असलेले (ऐक्य होत असलेले) पाहून संजयालाही प्रेमपूर येऊन तो तल्लीन झाला. 78
1579-18
तेणे म्हणतसे संजयो । बाप कृपानिधी रावो । तो आपुला मनोभावो । अर्जुनेसी केला ॥1579॥
त्या वृत्तीच्या भरांत संजय, राजा धृतराष्ट्रास म्हणला, महाराज, केवढे आपले दोघांचे थोर भाग्य ! श्रीमद्व्यासांनीच आपले आज रक्षण केले 1579
1580-18
तेणे उचंबळलेपणे । संजय धृतराष्ट्राते म्हणे । जी कैसे बादरायणे । रक्षिलो दोघे ? ॥1580॥
त्या वृत्तीच्या भरांत संजय, राजा धृतराष्ट्रास म्हणला, महाराज, केवढे आपले दोघांचे थोर भाग्य ! श्रीमद्व्यासांनीच आपले आज रक्षण केले. 1580
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1581-18
आजि तुमते अवधारा । नाही चर्मचक्षूही संसारा । की ज्ञानदृष्टिव्यवहारा आणिलेती ॥1581॥
आज तुम्हाला चर्मचक्षु तर नाहीतच, की ज्याने तुम्ही काही व्यवहार करू शकला असता; पण, तुमच्याकडून ज्ञान दृष्टीचा व्यवहार व्हावा अशी संधि प्राप्त झाली 81
1582-18
आणि रथीचिये राहाटी । घेई जो घोडेयासाठी । तया आम्हा या गोष्टी । गोचरा होती ॥1582॥
आणि माझी स्वतःची गोष्ट सांगणे झाल्यास, ज्या मला रथांच्या घोड्यांच्या परीक्षेसाठी म्हणून ठेवले, त्या मला श्रीकृष्णार्जुन संवादाचा व्यासकृपेने प्रत्यक्ष लाभ झाला. 82
1583-18
वरी जुंझाचे निर्वाण । मांडले असे दारुण । दोही हारी आपण । हारपिजे जैसे ॥1583॥
त्यातही, असा घोर व निर्वाणीचा युद्धप्रसंग सुरू आहे की दोहोंपैकी कोणताही पक्ष हरला तरी आपलाच पराजय झाला असे दोघांनाही म्हणण्याची वेळ आहे. (एककुलत्वात् )83
1584-18
येवढा जिये सांकडा । कैसा अनुग्रहो पै गाढा । जे ब्रह्मानंदु उघडा । भोगवीतसे ॥1584॥
महाराजांच्या कृपेला पारावार नाही; अशा संकटकालामध्येही मूर्त ब्रह्मानंद आपण भोगावा असा त्यांचा आपल्यावर अनुग्रह आहे. 84
1585-18
ऐसे संजय बोलिला । परी न द्रवे येरु उगला । चंद्रकिरणी शिवतला । पाषाणु जैसा ॥1585॥
संजय असे आनंदभरात बोलत होता खरा; पण, तो वृद्ध धृतराष्ट्र, चंद्रकिरणांचा पाषाणावर जसा काहीही परिणाम होत नाही. तसा त्या संवादकाली स्तब्ध होता. 85
1586-18
हे देखोनि तयाची दशा । मग करीचिना सरिसा । परी सुखे जाला पिसा । बोलतसे ॥1586॥
राजाची अशी स्थिति पाहून संजयाने आपले भाषण संपविले, पण त्या संवादसुखाने तो असा वेडावला होता की त्याला बोलल्यावाचून रहावेच ना 86
1587-18
भुलविला हर्षवेगे । म्हणौनि धृतराष्ट्रा सांगे । येऱ्हवी नव्हे तयाजोगे । हे कीर जाणे ॥1587॥
हर्षातीरेकाने- तो भानावर नव्हता म्हणूनच राजाशी बोलला एवढेच, नाहीतर हा संवाद धृतराष्ट्राच्या योग्यतेचा नाही हे तो जाणत होता. 87
सञ्जय उवाच ।
इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः ।
संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥18. 74॥
1588-18
मग म्हणे पै कुरुराजा । ऐसा बंधुपुत्र तो तुझा । बोलिला ते अधोक्षजा । गोड जाले ॥1588॥
संजय मग म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, तुझा पुतण्या अर्जुन, त्याचे ते भाषण ऐकून भगवान श्रीकृष्णांना अत्यंत आनंद झाला. 88
1589-18
अगा पूर्वापर सागर । यया नामसीचि सिनार । येर आघवे ते नीर । एक जैसे ॥1589॥
अहो, पूर्वसमुद्र व पश्चिमसमुद्र हा जसा नाममात्र भेद आहे, सागरत्व पहाता समानच; 89
1590-18
तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे । हे आंगाचिपासी दिसे । मग संवादी जी नसे । काहीचि भेदु ॥1590॥
तसे पार्थिव देहदृष्टि ठेविली म्हणजे त्या दोन व्यक्ति म्हणाव्या इतकेच; विचारदृष्टया त्या दोघात काहीही भेद नाही. 1590
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1591-18
पै दर्पणाहूनि चोखे । दोन्ही होती सन्मुखे । तेथ येरी येर देखे । आपणपे जैसे ॥1591॥
किंवा, दर्पणापेक्षांही स्वच्छ असे दोन पदार्थ एकासमोर एक आले तर, ह्याचे त्यात किंवा त्याचे ह्यात होणारे दर्शन हे भिन्न नसून स्वतःचेच दर्शन होते असे म्हणावे लागते. 91
1592-18
तैसा देवेसी पंडुसुतु । आपणपे देवी देखतु । पांडवेसी देखे अनंतु । आपणपे पार्थी ॥1592॥
त्याप्रमाणे दर्पणाहूनही स्वच्छ वृत्तीच्या पांडवानी तितक्याच स्वच्छवृत्तीच्या देवाकडे पाहिले, तेव्हा त्याला तेथे आपलेच दर्शन झाले व तसेच देवांनींही पांडवांकडे पाहता त्यासही तेथे आपलेच दर्शन. 92
1593-18
देव देवो भक्तालागी । जिये विवरूनि देखे आंगी । येरु तियेचेही भागी । दोन्ही देखे ॥1593॥
देवाधिदेव भक्तस्वरूपाचा आपल्या ठिकाणी विचार करीत होता. तर तिकडे अर्जुनही आपल्या स्वरूपामध्ये दोघांच्या स्वरूपाचा विचार करीत होता. 93
1594-18
आणिक काहीच नाही । म्हणौनि करिती काई । दोघे येकपणे पाही । नांदताती ॥1594॥
पण काय करणार, त्यांना स्वस्वरूपाहून अन्य काहीच आढळेना; तेव्हा दोघेही अद्वैतभावाने नांदू लागले. 94
1595-18
आता भेदु जरी मोडे । तरी प्रश्नोत्तर का घडे ? । ना भेदुचि तरी जोडे । संवादसुख का ? ॥1595॥
आता भेद नाहीसा झाला, तर प्रश्नोत्तरे कशी होतील व भेद जर सत्य असेल तर ऐक्याचे संवाद सुख कसे प्राप्त होणार ? 95
1596-18
ऐसे बोलता दुजेपणे । संवादी द्वैत गिळणे । ते ऐकिले बोलणे । दोघांचे मिया ॥1596॥
अशाप्रकारे कृष्णार्जुनांचे आभासिक द्वैतभावांत भाषण चालले असता, संवादा तही द्वैतांचा ग्रास कसा होऊ शकतो ते बोलणे मी ऐकिले असे संजय म्हणाला 96
1597-18
उटूनि दोन्ही आरिसे । वोडविलीया सरिसे । कोण कोणा पाहातसे । कल्पावे पा ? ॥1597॥
दोन आरसे स्वच्छ करून समोरासमोर आणिले असता, कोणकोणाला पहातो हे काय सांगणार ? 97
1598-18
का दीपासन्मुखु । ठेविलया दीपकु । कोण कोणा अर्थिकु । कोण जाणे ॥1598॥
किंवा दिव्यासमोर दुसरा दिवा आणून ठेविला तर, कोणकोणाला प्रकाशित आहे हे कोणी सांगावे ? 98
1599-18
नाना अर्कापुढे अर्कु । उदयलिया आणिकु । कोण म्हणे प्रकाशकु । प्रकाश्य कवण ? ॥1599॥
अथवा असे समजा, एका सूर्यापुढे दुसरा सूर्य उगवला तर, त्यातील प्रकाश्य कोण व प्रकाशक कोण हे कोण सांगणार ? 99
1600-18
हे निर्धारू जाता फुडे । निर्धारासि ठक पडे । ते दोघे जाले एवढे । संवादे सरिसे ॥1600॥
वरील गोष्टींच निर्णय करू गेल्यास निर्णय करणाराला जसे हातच टेकले पाहिजेत, तसे त्या दोघांचे त्या संवादात ऐक्य झाले. . 1600
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1601-18
जी मिळता दोन्ही उदके । माजी लवण वारू ठाके । की तयासींही निमिखे । तेचि होय ॥1601॥
दोन जलप्रवाह एकत्र होत असता त्यांना जर मीठ बांधासारखे आडवे, तर तेही क्षणात जसे जलरूप होते 1
1602-18
तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही । संवादले ते मनी । धरिता मजही वानी । तेचि होतसे ॥1602॥
त्याप्रमाणे त्या दोघांच्या संगमांत व तेथील संवादात जे ऐकिले त्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की माझीही त्यांच्यासारखीच स्थिति झाली ! 2
1603-18
ऐसे म्हणे ना मोटके । तव हिरोनि सात्विके । आठव नेला नेणो के । संजयपणाचा ॥1603॥
इतके तो म्हणत आहे तोच अष्टसात्विकभाव प्रादुर्भूत होऊन त्याच्या संजयपणची स्मृति त्यांनी कोठे नाहींशी केली ते काही कळेना. 3
1604-18
रोमांच जव फरके । तव तव आंग सुरके । स्तंभ स्वेदांते जिंके । एकला कंपु ॥1604॥
आंगावर जो जो रोमांच उभे राहिले तो तो शरीर संकुचित झाले व स्तब्धता व घामबिंदू ह्यांना एकट्या शरीरकंपानेच जणु जिकले. 4
1605-18
अद्वयानंदस्पर्शे । दिठी रसमय जाली असे । ते अश्रु नव्हती जैसे । द्रवत्वचि ॥1605॥
अद्वयानंदाच्या आविर्भावाने नेत्र प्रेमाश्रूंनी भरून आले; इतके कि कोणाला वाटावे ते अश्न नसून पाझरच लागले आहेत. 5
1606-18
नेणो काय न माय पोटी । नेणो काय गुंफे कंठी । वागर्था पडत मिठी । उससांचिया ॥1606॥
पोटात काहीही सांठविणेस जागा नव्हती ते कशाने झाले न कळे; कंठ कशानेदाटला तेही कळेना व दीर्घश्वासामुळे वाणीही कार्यक्षम होईना, अशी स्थिति झाली. 6
1607-18
किंबहुना सात्विका आठा । चाचरु मांडता उमेठा । संजयो जालासे चोहटा । संवादसुखाचा ॥1607॥
किंबहुना, अष्टसात्विक भाव प्रगट होऊन संजयाची वाणी चाचरू लागली व तो कृष्णार्जुनसंवादाचा चव्हाटाच झाला. 7
1608-18
तया सुखाची ऐसी जाती । जे आपणचि धरी शांती । मग पुढती देहस्मृती । लाधली तेणे ॥1608॥
त्या सुखाची जातीच अशी आहे की, त्याचे भरते आपोआप शमतें; म्हणून त्यायोगे संजय सहजच देहभानावर आला. 8
व्यासप्रसादाच्छ्रुतवानेतद्गुह्यमहं परम् ।
योगं योगेश्वरात्कृष्णात्साक्षात्कथयतः स्वयम् ॥18. 75॥
1609-18
तेव्हा बैसतेनि आनंदे । म्हणे जी जे उपनिषदे । नेणती ते व्यासप्रसादे । ऐकिले मिया ॥1609॥
मग आनंदाचे भरते ओसरू लागल्यावर, संजय म्हणाला, उपनिषदांमध्येही उपलब्ध न होणारे श्रवण मला व्यासांच्या कृपेने घडले. 9
1610-18
ऐकताचि ते गोठी । ब्रह्मत्वाची पडिली मिठी । मी तू पणेसी दृष्टी । विरोनि गेली ॥1610॥
ते श्रवण घडतांच मला ब्रह्मस्थिति प्राप्त होऊन मीतुंपणासह सर्व विश्व मावळून गेले. 1610
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1611-18
हे आघवेचि का योग । जया ठाया येती मार्ग । तयाचे वाक्य सवंग । केले मज व्यासे ॥1611॥
सर्व, योगादि मार्ग ज्या ठिकाणाला येऊन समाप्ति पावतात असे भगवंतांचे वाक्य श्रीव्यासकृपेने मला अनायासे प्राप्त झाले. 11
1612-18
अहो अर्जुनाचेनि मिषे । पापियाचा आपणपेचि दुजे ऐसे । नटोनि आपणया उद्देशे । बोलिले जे देव ॥1612॥
अहो, अर्जुनाला निमित्त करून भगवान श्रीकृष्ण त्यारूपाने आपणच अवतरूनआपण आपल्याला जो उपदेश करून घेतला. 12
1613-18
तेथ की माझे श्रोत्र । पाटाचे जाले जी पात्र । काय वानू स्वतंत्र । सामर्थ्य श्रीगुरुचे ॥1613॥
केवळ अशा परिस्थितीत जर माझे श्रोत्र त्या श्रवणाचे अधिकारी झाले, तर श्रीगुरुच्या स्वतंत्र सामर्थ्याची योग्यता मी कशी वर्णन करू शकेन ? 13
राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्भुतम् ।
केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥18. 76॥
1614-18
राया हे बोलता विस्मित होये । तेणेचि मोडावला ठाये । रत्नी की रत्नकिळा ये । झांकोळित जैसी ॥1614॥
रत्नकांति जशी फांकल्यामुळे त्याच्या आकारादि स्वरूपाला झांकते (त्याच्या आकाराची प्रथम कल्पना येऊ देत नाही. ) त्याप्रमाणे, राजा धृतराष्ट्राला ते वृत्त सांगत असता संजयाचे बसल्या जागीच देहभान जाऊन तो समाधिस्थ झाला. 14
1615-18
हिमवंतींची सरोवरे । चंद्रोदयी होती काश्मीरे । मग सूर्यागमी माघारे । द्रवत्व ये ॥1615॥
हिमालयातील सरोवरे चंद्रोदयाच्या वेळी गोठून जशी स्फटिक मण्याप्रमाणे दिसतात व सूर्योदयाला पुन्हा त्यांना द्रवत्व येते. 15
1616-18
तैसा शरीराचिया स्मृती । तो संवादु संजय चित्ती । धरी आणि पुढती । तेचि होय ॥1616॥
त्याप्रमाणे देहभानावर आला की, तो संवाद स्मरावा व पुन्हा त्या स्मरणाने त्याचा स्वरूपसमाधि लागावा असे होई. 16
तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः ।
विस्मयो मे महान् राजन्हृष्यामि च पुनः पुनः ॥18. 77॥
1617-18
मग उठोनि म्हणे नृपा । श्रीहरीचिया विश्वरूपा । देखिलया उगा का पा । असो लाहसी ? ॥1617॥
मग हर्षभरांत उठून म्हणाला, राजा, श्रीहरीचे विश्वरूपदर्शन होऊनही, तू जागच्या जागी स्वस्थ कसा राहू शकतोस ? 17
1618-18
न देखणेनि जे दिसे । नाहीपणेचि जे असे । विसरे आठवे ते कैसे । चुकऊ आता । ॥1618॥
न पहातांही जे दिसते, जे नाही म्हटले तरी (नास्तित्व सिद्ध करणाराच्या रूपाने) असते; व विसरू जावे तर तोच त्याचा आठव; मग त्याला कसे टाळत येईल ? 18
1619-18
देखोनि चमत्कारु । कीजे तो नाही पैसारु । मजहीसकट महापूरु । नेत आहे ॥1619॥
ते विश्वरूप पाहून, काय हा चमत्कार असे म्हणण्यालाही अवसर नाही तोच त्या आनंदाच्या महापुरांत मीही वाहून गेलों. (मला माझे भान उरले नाही. ) 19
1620-18
ऐसा श्रीकृष्णार्जुन- । संवाद संगमी स्नान । करूनि देतसे तिळदान । अहंतेचे ॥1620॥
ह्याप्रमाणे श्रीकृष्णार्जुन संगमांत स्नान करून संजयाने अहंकाराची तिलांजली दिली. 620
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1621-18
तेथ असंवरे आनंदे । अलौकिकही काही स्फुंदे । श्रीकृष्ण म्हणे सद्गदे । वेळोवेळा ॥1621॥
त्या प्रसंगी अनावर आनंदाने तो काही अलौकिक भाषणही करी व सद्गदित कंठाने वारंवार कृष्णनामोच्चारण चालत असे. 21
1622-18
या अवस्थांची काही । कौरवाते परी नाही । म्हणौनि राये ते काही । कल्पावे जव ॥1622॥
संजयाच्या चित्ताच्या ह्या स्थितीची राजा धृतराष्ट्राला जर काहीच वार्ता नव्हती तर त्याला त्याची नुसती कल्पना तरी कशी येणार ? 22
1623-18
तव जाला सुखलाभु । आपणया करूनि स्वयंभु । बुझाविला अवष्टंभु । संजये तेणे ॥1623॥
तेव्हा झालेला सुखलाभ संजयाने आपल्याच ठिकाणी स्थिर करून अष्टसात्विक भावाचा कुंज जिरविला. 23
1624-18
तेथ कोणी येकी अवसरी । होआवी ते करूनि दुरी । रावो म्हणे संजया परी । कैसी तुझी गा ? ॥1624॥
धृतराष्ट्र म्हणाला, संजया, युद्धांत कोणत्या वेळी काय घडते (ते सांगण्यासाठी तुला येथे ठेविला असतां) हे सांगण्याचे सोडून हा अन्य प्रकार काय सांगत बसला आहेस ? 24
1625-18
तेणे तूते येथे व्यासे । बैसविले कासया उद्देशे । अप्रसंगामाजी ऐसे । बोलसी काई ? ॥1625॥
त्या व्यासांनी तुला येथे कोणत्या उद्देशाने ठेविले, आणि ह्या अप्रासंगिक (भलत्याच) गोष्टी तू काय सांगत बसला आहेस ? 25
1626-18
रानींचे राउळा नेलिया । दाही दिशा मानी सुनिया । का रात्री होय पाहलया । निशाचरा ॥1626॥
एखादा जंगलांत राहाणारा मनुष्य राजमंदिरांत नेला तर त्याला तेथे दाही दिशा जशा उदास दिसतात, अथवा सूर्योदय झाला की निशाचरांची रात्र उजाडते. 26
1627-18
जो जेथिचे गौरव नेणे । तयासि ते भिंगुळवाणे । म्हणौनि अप्रसंगु तेणे । म्हणावा की तो ॥1627॥
ज्याला ज्या गोष्टीचे महत्व समजण्याची बुद्धि नाही त्याला ते बेचव वाटणारच; मग धतराष्ट्राने कृष्णार्जुनसंवादकथनाला अप्रसंग म्हटले तर ते योग्यच होय. 27
1628-18
मग म्हणे सांगे प्रस्तुत । उदयलेंसे जे उत्कळित । ते कोणासि बा रे जैत । देईल शेखी ? ॥1628॥
मग धृतराष्ट्र म्हणाला. सध्या जे युद्ध चालले आहे त्यात अखेर कोणाचा रे जय होणार ? 28
1629-18
येऱ्हवी विशेषे बहुतेक । आमुचे ऐसे मानसिक । जे दुर्योधनाचे अधिक । प्रताप सदा ॥1629॥
एऱ्हवी, आमचा होरा तर असा धावतो की, दुर्योधनाचा पक्ष अधिक पराक्रम आहे. 29
1630-18
आणि येरांचेनि पाडे । दळही याचे देव्हडे । म्हणौनि जैत फुडे । आणील ना ते ? ॥1630॥
आणि सैन्याच्या बाजूने पहातांही पांडवापेक्षां त्याचे (दुर्योधनाचे) सैन्य दीढी आहे; मग ते शेवटी जिकणार नाही काय ? 1630
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1631-18
आम्हा तव गमे ऐसे । मा तुझे ज्योतिष कैसे । ते नेणो संजया असे । तैसे सांग पा ॥1631॥
आम्हाला तर असे वाटते, संजया, तुझे ज्योतिष काय आहे हे आम्हाला माहीत नाही; असेल तसे सांग पाहू ? 31
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥18. 78॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसंन्यासयोगो नामाष्टादशोऽध्यायः ॥18॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील मोक्षसंन्यासयोग नावाचा हा अठरावा अध्याय समाप्त झाला. ॥18॥
1632-18
यया बोला संजयो म्हणे । जी येरयेरांचे मी नेणे । परी आयुष्य तेथे जिणे । हे फुडे की गा ॥1632॥
राजाच्या ह्या भाषणाला संजयाने उत्तर दिले; “ कोण बलवान की कोणाचे सैन्य अधिक ते मला काही समजत नाही; (मला एक कळतें) की ज्याच्या आयुष्याची दोरी मजबूत असेल तोच जगणार. ” 32
1633-18
चंद्रु तेथे चंद्रिका । शंभु तेथे अंबिका । संत तेथे विवेका । असणे की जी ॥1633॥
चंद्र तेथे चांदणे, शंकर तेथे पार्वती, संत तेथे विचार, ह्या गोष्टी असावयाच्याच. 33
1634-18
रावो तेथे कटक । सौजन्य तेथे सोयरीक । वन्हि तेथे दाहक । सामर्थ्य की ॥1634॥
राजा तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध, अग्नि तेथे दाहकता असणारच. 38
1635-18
दया तेथे धर्मु । धर्मु तेथे सुखागमु । सुखी पुरुषोत्तमु । असे जैसा ॥1635॥
आणि दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखप्राप्ति व सुखप्राप्तींत पुरुषोत्तम जसा असतो. 35
1636-18
वसंत तेथे वने । वन तेथे सुमने । सुमनी पालिंगने । सारंगांची ॥1636॥
वसंत तेथे वनश्री, वनश्री तेथे पुष्पे, आणि पुष्पे तेथे भ्रमरसमुदाय 36
1637-18
गुरु तेथ ज्ञान । ज्ञानी आत्मदर्शन । दर्शनी समाधान । आथी जैसे ॥1637॥
सद्गुरू तेथे ज्ञान, ज्ञान तेथे किंवा तेच आत्मदर्शन व आत्मदर्शन म्हणजेच समाधान हा जसा नियम. 37
1638-18
भाग्य तेथ विलासु । सुख तेथ उल्लासु । हे असो तेथ प्रकाशु । सूर्य जेथे ॥1638॥
श्रीमंती तेथे सुखभोग, सुखभोग तेथे उल्हास किंवा जेथे सूर्य तेथे जसा प्रकाश, 38
1639-18
तैसे सकल पुरुषार्थ । जेणे स्वामी का सनाथ । तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी ॥1639॥
त्याप्रमाणे, धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ ज्याच्या योगे सनाथ आहेत, तो भगवान श्रीकृष्ण जेथे असणार तेथे लक्ष्मीही असावयाचीच 39
1640-18
आणि आपुलेनि कांतेसी । ते जगदंबा जयापासी । अणिमादिकी काय दासी । नव्हती तयाते ? ॥1640॥
आणि, आपल्या पतीसहवर्तमान ती जगन्माता ज्याच्याकडे नांदते, त्याच्या अणिमादि सिद्धि काय दासी असणार नाहीत ? 1640
1641-18
कृष्ण विजयस्वरूप निजांगे । तो राहिला असे जेणे भागे । तै जयो लागवेगे । तेथेचि आहे ॥1641॥
श्रीकृष्ण म्हणजे मूर्तीमंत विजय; तो ज्याच्या पक्षाल असेल, त्या पक्षाला निश्चयैकरून जय आहेच. 41
1642-18
विजयो नामे अर्जुन विख्यातु । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु । श्रियेसी विजय निश्चितु । तेथेचि असे ॥1642॥
अर्जुन स्वतः “ विजय ” ह्या नांवानेच प्रसिद्ध आहे विजय स्वरूप श्रीकृष्ण भगवान त्याच्या बाजूला आहेत; भगवान तेथे विजयश्री आहेच; व जेथे विजयश्री तेथे निश्चयाने यश हे, ठेवलेलेच आहे. 42
1643-18
तयाचिये देशीच्या झाडी । कल्पतरूते होडी । न जिणावे का येवढी । मायबापे असता ? ॥1643॥
ज्याला ( अर्जुनाला ) लक्ष्मीनारायणासारखे समर्थ मायबाप आहेत त्याच्या गावची सामान्य झाडेही कल्पतरूला पैजणे का जिकणार नाहीत ? 43
1644-18
ते पाषाणही आघवे । चिंतारत्ने का नोहावे ? । तिये भूमिके का न यावे । सुवर्णत्व ? ॥1644॥
तेथील सर्व पाषाणही चिंतामणि का न होतील ? ती सर्व भूमि सुवर्णमय का होणार नाही ?44
1645-18
तयाचिया गावींचिया । नदी अमृते वाहाविया । नवल कायि राया । विचारी पा ॥1645॥
राजा, थोडा विचार कर; अरे, त्याच्या गावच्या सर्व नद्याही अमृतवाहिन्या झाल्या, तर त्यात नवल ते काय ? 45
1646-18
तयाचे बिसाट शब्द । सुखे म्हणो येती वेद । सदेह सच्चिदानंद । का न व्हावे ते ? ॥1646॥
तो भक्त जे काही बोलेल, ते शब्द वेदतुल्य खुशाल समजावे व तो देहधारी आहे तेथवर सच्चिदानंदाची साकार मूर्ती म्हणून का न म्हणावा ? 46
1647-18
पै स्वर्गापवर्ग दोन्ही । इये पदे जया अधीनी । तो श्रीकृष्ण बाप जननी । कमळा जया ॥1647॥
कारण, स्वर्ग व मुक्ति ही ज्याच्या हातात आहेत तो श्रीकृष्ण भगवान ज्याचा पिता व देवी लक्ष्मी ही ज्याची जननी आहे. 47
1648-18
म्हणौनि जिया बाही उभा । तो लक्ष्मीयेचा वल्लभा । तेथे सर्वसिद्धी स्वयंभा । येर मी नेणे ॥1648॥
म्हणून ज्या पक्षाच्या बाजूने तो लक्ष्मीवल्लभ उभा आहे तेथे सर्व सहजच सिद्धि आहेत इतके मला समजते. दुसरे तिसरे मी काहीही ओळखत नाही. 48
1649-18
आणि समुद्राचा मेघु । उपयोगे तयाहूनि चांगु । तैसा पार्थी आजि लागु । आहे तये ॥1649॥
आणि समुद्रापासून जन्म पावणारा मेघ हा समुद्रापेक्षाही अधिक उपयोगी पडतो, त्याप्रमाणे आज त्या अर्जुनाचाच महिमा अधिक वाटतो. 49
1650-18
कनकत्वदीक्षागुरू । लोहा परिसु होय कीरू । परी जगा पोसिता व्यवहारु । तेचि जाणे ॥1650॥
लोहाला सुर्वणत्व देण्याचे सामर्थं परिसाचेच ह्यात वाद नाही; पण जगाच्या व्यवहाराचे पोषण, परिसने नव्हे, तर सुवर्णानेच होत असते 1650
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1651-18
येथ गुरुत्वा येतसे उणे । ऐसे झणे कोण्ही म्हणे । वन्हि प्रकाश दीपपणे । प्रकाशी आपुला ॥1651॥
ह्या दृष्टांतांनी गुरूकडे कमी-पणा येतो असे प्रथमतः कोणाला वाटेल; पण तसे नाहीं; कारण, अग्नि हाच दीपद्वारा मोठा प्रकाश देतो; ( तेव्हा लोक त्याला दीपप्रकाश म्हणाले तर अग्नीला कमीपणा कसा ?) 51
1652-18
तैसा देवाचिया शक्ती । पार्थु देवासीचि बहुती । परी माने इये स्तुती । गौरव असे ॥1652॥
(दीपमहिमा हा अग्नि-प्रसाद होय ) त्याप्रमाणे, देवांच्या शक्तीच्या प्रसादानेच पार्थं देवापेक्षां मोठा वाटतो; पण तशी भक्तस्तुति करणे हाही वस्तुतः देवांचाच गौरव होय. 52
1653-18
आणि पुत्रे मी सर्व गुणी । जिणावा हे बापा शिराणी । तरी ते शारङ्गपाणी । फळा आली ॥1653॥
आणि पुत्राने सर्व, गुणात आपल्यावर ताण करावी अशी पित्याची इच्छा असते, तीच शिष्याच्या उत्कर्षाने सद्गुरू भगवान श्रीकृष्णांना पहाण्याचे भाग्य लाभले. 53
1654-18
किंबहुना ऐसा नृपा । पार्थु जालासे कृष्णकृपा । तो जयाकडे साक्षेपा । रीति आहे ॥1654॥
राजा, फार काय सांगावे ? अशाप्रकारची कृष्ण कृपा ज्यावर झाली आहे तो पार्थ, ज्या पक्षाचा अभिमान धरून उभा आहे, 54
1655-18
तोचि गा विजयासि ठावो । येथ तुज कोण संदेहो ? । तेथ न ये तरी वावो । विजयोचि होय ॥1655॥
तेच विजयस्थान होय; ह्यात तुला संदेह कसला ? अरे, तेथे नसणारा विजय तो विजयच नव्हे असे जाण. 55
1656-18
म्हणौनि जेथ श्री तेथे श्रीमंतु । जेथ तो पंडूचा सुतु । तेथ विजय समस्तु । अभ्युदयो तेथ ॥1656॥
म्हणून. जेथे श्री तेथे श्रीमंत श्रीपति, जेथे तो पंडुपुत्र तेथे सर्व जय आणि उत्कर्षही तेथेच. 56
1657-18
जरी व्यासाचेनि साचे । धिरे मन तुमचे । तरी या बोलाचे । ध्रुवचि माना ॥1657॥
श्रीव्यासांच्या बोलण्यावर जर तुमचा विश्वास असेल तर मी सांगितले हे, निश्चित होय. असे समजा 57
1658-18
जेथ तो श्रीवल्लभु । जेथ भक्तकदंबु । तेथ सुख आणि लाभु । मंगळाचा ॥1658॥
जेथे तो श्रीवल्लभ, जेथे तो भक्तश्रेष्ठ अर्जुन, तेथे सर्व मंगल, सुख आणि लाभ असणारच 58
1659-18
या बोला आन होये । तरी व्यासाचा अंकु न वाहे । ऐसे गाजोनि बाहे । उभिली तेणे ॥1659॥
हे माझे बोल जर अन्यथा होतील तर मी व्यासांचा शिष्यच नव्हे अशी बाहु उभारून संजयाने गर्जना केली. 59
1660-18
एवं भारताचा आवांका । आणूनि श्लोका येका । संजये कुरुनायका । दिधला हाती ॥1660॥
ह्याप्रमाणे सर्व भारताचे सार एका श्लोकात संजयाने, कौरवपति धृतराष्ट्र ह्याला ऐकविलें. 1660
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1661-18
जैसा नेणो केवढा वन्ही । परी गुणाग्री ठेऊनी । आणिजे सूर्याची हानी । निस्तरावया ॥1661॥
अग्निस्वरूप केवढे आहे हे सांगता न आले (न कळलें) तरी तो वातीच्या अग्रभागी स्थापित केला म्हणजे सूर्यास्ताने होणारी अडचण दूर करितो. 61
1662-18
तैसे शब्दब्रह्म अनंत । जाले सवालक्ष भारत । भारताचे शते सात । सर्वस्व गीता ॥1662॥
शब्दब्रह्म जे वेद ते अनंत आहेत; त्याचे सार सवालक्ष (श्लोक ) भारतांत आणिलें; आणि त्याचेही सर्व सार म्हणजे गीतेचे सातशे श्लोक हे होय. 62
1663-18
तयांही साता शतांचा । इत्यर्थु हा श्लोक शेषींचा । व्यासशिष्य संजयाचा । पूर्णोद्गारु जो ॥1663॥
त्या सातशे श्लोकाचाही व्यासशिष्य संजय ह्याचा निश्चयाचा उद्गाररूप असणारा जो हा अखेरचा श्लोक तो सारभूत होय. 63
1664-18
येणे येकेचि श्लोके । राहे तेणे असके । अविद्याजाताचे निके । जिंतले होय ॥1664॥
ह्या एकच श्लोकाला चिकटून त्याचे मनन जो करील त्याने सर्व अविद्याजात जिकल्या सारखेच होईल. 64
1665-18
ऐसे श्लोक शते सात । गीतेची पदे आंगे वाहत । पदे म्हणो की परमामृत । गीताकाशींे ॥1665॥
याप्रमाणे, सातशे श्लोक हे गीतेतील पदांनी (शब्दांनीं) धारण केले आहेत (वाहिले आहेत) ह्या पदांना पदे ” म्हणावे की गीतारूप आकाशांतील अमृतवृष्टि म्हणावे हेच कळत नाही. 65
1666-18
की आत्मराजाचिये सभे । गीते वोडवले हे खांबे । मज श्लोक प्रतिभे । ऐसे येत ॥1666॥
किंवा, आत्मराजाच्या गीतारूपी सभामंडपाचे हे सातशे श्लोक म्हणजे जणू तेवढे खांबच होत असे वाटते. 66
1667-18
की गीता हे सप्तशती । मंत्रप्रतिपाद्य भगवती । मोहमहिषा मुक्ति । आनंदली असे ॥1667॥
किंवा श्लोक रूपी सातशे मंत्रांनी जिचे प्रतिपादन केले आहे, अशी गीता ही देवी भगवतीच होय; व मोहमहिषासुर-वधाने ती आनंदित आहे. 67
1668-18
म्हणौनि मने काये वाचा । जो सेवकु होईल इयेचा । तो स्वानंदासाम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥1668॥
म्हणून काया, वाचा, मने करून जो तिचा सेवक होईल त्याला ती स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती करील. 68
1669-18
की अविद्यातिमिररोखे । श्लोक सूर्याते पैजा जिंके । ऐसे प्रकाशिले गीतामिषे । राये श्रीकृष्णे ॥1669॥
किंवा अविद्यारूपी अंधकाराचा नाश करून गीतेचा एकेक श्लोक ही सूर्याला पैजेने जिंकील, असे सातशे श्लोक देवांनी गीतेच्या मिषाने प्रकाशित केले. 69
1670-18
की श्लोकाक्षरद्राक्षलता । मांडव जाली आहे गीता । संसारपथश्रांता । विसंवावया ॥1670॥
किंवा संसारपथ. आक्रमण करीत असता दमल्या भागल्या जीवांना विसावा घेण्यासाठी, श्लोकाक्षररूपी द्राक्षवल्लींनी युक्त असा मांडवच गीता स्वत:झाली आहे. 1670
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1671-18
की सभाग्यसंती भ्रमरी । केले ते श्लोक कल्हारी । कृष्णाख्यसरोवरी । सासिन्नली हे ॥1671॥
किंवा भ्रमरप्रमाणे ज्या भाग्यवान साधुसंतांनी ह्या गीतेच्या श्लोक रूपी कमलांचा आस्वाद (मकरंद) लुटला आहे अशा श्रीकृष्णनामक सरोवरांतील भरास आलेल्या ह्या कमलिनीच होत. 71
1672-18
की श्लोक नव्हती आन । गमे गीतेचे महिमान । वाखाणिते बंदीजन । उदंड जैसे ॥1672॥
किंवा मला वाटते हे श्लोक नसून गीतेचे अखंड महिमान वर्णन करणारे हे भाटच (स्तुति पाठक) होत. 72
1673-18
की श्लोकांचिया आवारा । सात शते करूनि सुंदरा । सर्वागम गीतापुरा । वसो आले ॥1673॥
किंवा सातशे श्लोकाचा जणू रक्षणार्थं सुंदर कोट बांधून सर्व वेदशास्त्रे ह्या गीतानगरीत वास करण्यास आले आहेत. 73
1674-18
की निजकांता आत्मया । आवडी गीता मिळावया । श्लोक नव्हती बाह्या । पसरु का जो ॥1674॥
किंवा आपला कांत जो आत्मा त्याला आवडीने आलिंगन देण्यासाठी त्याची कांतारूप असलेली गीता ही सातशे श्लोक रूपी बाह्या पसरूनच जणू आली आहे ! 74
1675-18
की गीताकमळींचे भृंग । की हे गीतासागरतरंग । की हरीचे हे तुरंग । गीतारथींचे ॥1675॥
किंवा हे श्लोक म्हणजे गीताकमळावरील भृंगच होत; अथवा गीतासागरावरील हे तरंग म्हणा किंवा अशीही कल्पना करावी किं श्रीहरीच्या गीतारथाचे हे श्लोक हे अश्वच होत. 75
1676-18
की श्लोक सर्वतीर्थ संघातु । आला श्रीगीतेगंगे आंतु । जे अर्जुन नर सिंहस्थु । जाला म्हणौनि ॥1676॥
किंवा, नर जो अर्जुन हाच जणु सिंहस्थ पर्वणीचा योग म्हणून गीतागंगेला मिळण्यासाठी हा श्लोक रूपी सर्वतीर्थमेळाच आला आहे ! 76
1677-18
की नोहे हे श्लोक श्रेणी । अचिंत्यचित्तचिंतामणी । की निर्विकल्पा लावणी । कल्पतरूंची ॥1677॥
किंवा ही श्लोक पंक्ति नसून अचिंत्य वस्तूची चित्ताला प्राप्ति करून देणारा हा चिंतामणीच होय, अथवा निर्विकल्प ब्रह्मप्राप्ति करून देणारे हे कल्पतरूच होत. 77
1678-18
ऐसिया शते सात श्लोका । परी आगळा येकयेका । आता कोण वेगळिका । वानावा पा । ॥1678॥
असे एकापेक्षां एक बहारीचा असे सातशे श्लोक आहेत तेव्हा त्यातील कोणता एकच श्लोक पुढे घेऊन त्याची प्रशंसा करावी ?78
1679-18
तान्ही आणि पारठी । इया कामधेनूते दिठी । सूनि जैसिया गोठी । कीजती ना ॥1679॥
कामधेनु म्हटल्यावर मग, तान्ही की पारठी ही दृष्टि ठेवून जशा कोणीही तिच्या गोष्टी बोलत नाही. 79
1680-18
दीपा आगिलु मागिलु । सूर्यु धाकुटा वडीलु । अमृतसिंधु खोलु । उथळु कायसा । ॥1680॥
दिवा पहिला कोणता व मागील कोणता, सूर्य धाकटा की वडील, अमृतसागर खोल का उथळ ह्या चौकशीचा उपयोग काय ? 1680
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1681-18
तैसे पहिले सरते । श्लोक न म्हणावे गीते । जुनी नवी पारिजाते । आहाती काई ? ॥1681॥
त्याप्रमाणे हे पहिले, (उत्तम) हे अखेरचे, (सामान्य) असा गीतेच्या श्लोकाचा श्रेष्ठाश्रेष्ठतेचा क्रम लावणे शक्य नाही; स्वर्गतरू पारिजाताची नवीजुनी पुष्पे असा भेद असतो काय ? 81
1682-18
आणि श्लोका पाडु नाही । हे कीर समर्थु काई । येथ वाच्य वाचकही । भागु न धरी ॥1682॥
आणि इलोकांमध्ये न्यूनाधिक भाव नाही हे काय सिद्ध केले पाहिजे ? शिवाय तिच्यात वाच्य व वाचक असा भेदभाव म्हणण्यासही अवसर नाही. 82
1683-18
जे इये शास्त्री येकु । श्रीकृष्णचि वाच्य वाचकु । हे प्रसिद्ध जाणे लोकु । भलताही ॥1683॥
कारण ह्या शास्त्रांत श्रीकृष्णच वाच्य व श्रीकृष्णच वाचक आहेत हे सामान्य जनही जाणतात. 83
1684-18
येथे अर्थे तेचि पाठे । जोडे येवढेनि धटे । वाच्यवाचक येकवटे । साधिते शास्त्र ॥1684॥
गीतेच्या अर्थाने जे फल जोडते तेच पाठानेही जोडते; ह्या फलाच्या एकाच मापावरूनही वाच्य व वाचक ह्यांचे ऐक्य गीताशास्त्रानेच सिद्ध केले आहे. 84
1685-18
म्हणौनि मज काही । समर्थनी आता विषय नाही । गीता जाणा हे वाङ्ग्मयी । श्रीमूर्ति प्रभूचि ॥1685॥
म्हणून ते आता मी सिद्ध करण्याचे कारण नाहीं; ही गीता म्हणजे दुसरे कोणी नसून प्रभूची वाङमयीमूर्ती होय असे निश्चित समजा. 85
1686-18
शास्त्र वाच्ये अर्थे फळे । मग आपण मावळे । तैसे नव्हे हे सगळे । परब्रह्मचि ॥1686॥
कोणतेही शास्त्र वाच्यपद व नंतर त्याचा अर्थ असे फलद्रूप होऊन मग आपण मावळतें; गीताशास्त्राची तशी गोष्ट नाही. हे सर्व परब्रह्मस्वरूपच आहे. 86
1687-18
कैसा विश्वाचिया कृपा । करूनि महानंद सोपा । अर्जुनव्याजे रूपा । आणिला देवे ॥1687॥
प्रभूने विश्वकरुणत्व काय सांगावे ? अर्जुनाच्या निमित्ताने लोकांना महानंदाची (ब्रह्मानंदाची) सहज प्राप्ति व्हावी म्हणन त्या निर्गुणालाही गीतेच्या रूपाने रूपास आणिले आहे. 87
1688-18
चकोराचेनि निमित्ते । तिन्ही भुवने संतप्ते । निवविली कळांवते । चंद्रे जेवी ॥1688॥
चकोरांच्या निमित्ताने पूर्णकलायुक्त चंद्राने तिन्ही संतप्तलोक जसे शांत करावे; 88
1689-18
का गौतमाचेनि मिषे । कळिकाळज्वरीतोद्देशे । पाणिढाळु गिरीशे । गंगेचा केला ॥1689॥
किंवा गौतम मुनींच्या निमित्ताने कलिकाळदोष ज्वरयुक्त जीवांच्या उद्धारार्थ शंकरांनी गंगा मृत्युलोक आपल्या जटांपासून सोडली. 89
1690-18
तैसे गीतेचे हे दुभते । वत्स करूनि पार्थाते । दुभिन्नली जगापुरते । श्रीकृष्ण गाय ॥1690॥
त्या प्रमाणे, ही श्रीकृष्णधेनु आपले वत्स जो पार्थ त्याच्यासाठी पण जगाला पुरून उरेल अशा गीतारूपी दुग्धाचा पान्हा सोडती झाली. 1690
1691-18
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
येथे जीवे जरी नाहाल । तरी हेचि कीर होआल । नातरी पाठमिषे तिंबाल । जीभचि जरी ॥1691॥
ह्या ग्रंथांत जीवाभावाने बुडी द्याल तर तद्रूपच (मोक्षरूप) व्हाल अथवा पठणाच्या निमित्ताने नुसत्या जिभेला जरी श्रम द्याल, 91
1692-18
तरी लोह एके अंशे । झगटलिया परीसे । येरीकडे अपैसे । सुवर्ण होय ॥1692॥
तरी, लोखंड एका अंगाने परिसाला लागले तरी जसे सर्वागाने आपोआप सुवर्णत्व पावते. 92
1693-18
तैसी पाठाची ते वाटी । श्लोक पाद लावा ना जव वोठी । तव ब्रह्मतेची पुष्टी । येईल आंगा ॥1693॥
त्याप्रमाणे, श्लोकाच्या पठणाची वाटी नुसती ओंठाला लावता न लावता तोच अंगाला ब्रह्मतेची पुष्टि येईल. (आंगे ब्रह्म व्हाल) 93
1694-18
ना येणेसी मुख वांकडे । करूनि ठाकाल कानवडे । तरी कानीही घेता पडे । तेचि लेख ॥1694॥
किंवा पठण न करण्याच्या उद्देशाने तोंड मिटून धरून नुसते एक कुशीवर पडून रहाल तरीही, (दुसऱ्याने म्हटलेली) गीतेची नुसती अक्षरे कानावर आली तरी हेच म्हणजे पठनाचे फल मिळेल. 94
1695-18
जे हे श्रवणे पाठे अर्थे । गीता नेदी मोक्षाआरौते । जैसा समर्थु दाता कोण्हाते । नास्ति न म्हणे ॥1695॥
कारण, समर्थ दाता जसा कोणाही याचकाला नकार देत नाही, त्याप्रमाणे, तिचे श्रवण घडो, पठण घडो अथवा अर्थ व्युत्पत्ति होवो, मोक्षाच्या अलीकडील फल देण्याचे गीतेला माहीतच नाही. 95
1696-18
म्हणौनि जाणतया सवा । गीताचि येकी सेवा । काय कराल आघवा । शास्त्री येरी ॥1696॥
म्हणून, जाणत्यासुद्धां सर्वानी (जाणत्या नेणत्यांनी) एक गीतेचीच सेवा करावी; दुसरी सर्व शास्त्रे घेऊन करावयाचे आहे काय ? 96
1697-18
आणि कृष्णार्जुनी मोकळी । गोठी चावळिली जे निराळी । ते श्रीव्यासे केली करतळी । घेवो ये ऐसी ॥1697॥
आणि कृष्णार्जुनांनी मोंकळेपणे ज्या स्वैर गोष्टी केल्या या जणू करतलावर घेता याव्या इतक्या व्यासमहर्षींनी सोप्या करून ठेवल्या. 97
1698-18
बाळकाते वोरसे । माय जै जेवऊ बैसे । तै तया ठाकती तैसे । घास करी ॥1698॥
माता बाळाला प्रेमाने जेऊ घालू बसली, की त्याच्या बेताचेच जसे घास करिते. 98
1699-18
का अफाटा समीरणा । आपैतेपण शाहाणा । केले जैसे विंजणा । निर्मूनिया ॥1699॥
किंवा अमर्याद वायुरूपाचा आपल्या पुरता भोग घडावा म्हणून चतुर मनुष्य जसा पंखा निर्माण करितो. 99
1700-18
तैसे शब्दे जे न लभे । ते घडूनिया अनुष्टुभे । स्त्रीशूद्रादि प्रतिभे । सामाविले ॥1700॥
त्याप्रमाणे, विस्तृत व सुट्या शब्दांनी जो बोध होणे कठीण, तो स्त्रीशूद्रादिकांच्या बुद्धीत सहज आरूढ व्हावा अशा प्रकारची सुटसुटित अनुष्टुभ छंदात श्रीव्यासांनी त्या शब्दांची रचना केली. 1700
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1701-18
स्वातीचेनि पाणिये । न होती जरी मोतिये । तरी अंगी सुंदरांचिये । का शोभिती तिये ? ॥1701॥
स्वातीनक्षत्राचे पाणी जर मोत्यांच्या आकाराला न येते तर, त्याला सुंदर स्त्रियांच्या अंगावरील शोभा कशी प्राप्त झाली असती ? 1701
1702-18
नादु वाद्या न येता । तरी का गोचरु होता । फुले न होता घेपता । आमोदु केवी ? ॥1702॥
ध्वनि (नाद) जर वाद्यांचा आश्रय न करिता तर, श्रवण प्रत्यक्षता त्याला कशी येती ? किंवा आमोद (सुगंध) फुलांचे रूप धारण न करिता तर त्याचा व्यक्तिगत भोग कसा घडता ? 1702
1703-18
गोडी न होती पक्वान्ने । तरी का फावती रसने ? । दर्पणावीण नयने । नयनु का दिसे ? ॥1703॥
गोडी पक्वान्नाच्या रूपाने अवतरती ना तर रसनेला तिचा भोग कसा घडता ? किंवा आरशावाचून डोळ्याला डोळा कसा दिसता ?
1704-18
द्रष्टा श्रीगुरुमूर्ती । न रिगता दृश्यपंथी । तरी का ह्या उपास्ती । आकळता तो ? ॥1704॥
ब्रह्म (द्रष्टा) श्रीगुरूचे रूप घेऊन जर आकारास आले नसते तर त्याची उपासना कशी करिता आली असती ? तसे अगणित जे ब्रह्मवस्तु ते सातशे श्लोक रूपाने (गीतारूपानें) प्रकट न होते तर त्याची जगात लोकांना कशी प्राप्ति होती ? 4
1705-18
तैसे वस्तु जे असंख्यात । तया संख्या शते सात । न होती तरी कोणा येथ । फावो शकते ? ॥1705॥
तसे अगणित जे ब्रम्ह ते गीतेच्या सातशे श्लोकांच्या रूपाने जर प्रगट झाले नसते, तर कोणाला तरी जाणता आले असते काय ?1705-18
1706-18
मेघ सिंधूचे पाणी वाहे । तरी जग तयातेचि पाहे । का जे उमप ते नोहे । ठाकते कोण्हा ॥1706॥
मेघांतील पाणी समुद्राचेच असते, पण लोकांची दृष्टि (आशा) तद्विषयकच असते. कारण जे अमर्याद ते (समुद्रस्वरूप) कोणालाही व्यवहारोपयोगी नसते. 6
1707-18
आणि वाचा जे न पवे । ते हे श्लोक न होते बरवे । तरी काने मुखे फावे । ऐसे का होते ? ॥1707॥
आणि वाणी जेथे पोंचू शकत नाही असे ते ब्रह्मवस्तु ह्या उत्तम श्लोकांचे रूप न घेते तर, श्रवणांना व वाणीला त्यांचा भोग कसा घेता आला असता ?1707
1708-18
म्हणौनि श्रीव्यासाचा हा थोरु । विश्वा जाला उपकारु । जे श्रीकृष्ण उक्ती आकारु । ग्रंथाचा केला ॥1708॥
म्हणून श्रीकृष्णार्जुनसंवादाला गीताग्रंथाचे रूप देऊन ठेवण्यात महर्षी व्यासांनी जगावर महान उपकार करून ठेविले आहेत. 8
1709-18
आणि तोचि हा मी आता । श्रीव्यासाची पदे पाहता पाहता । आणिला श्रवणपथा । मऱ्हाठिया ॥1709॥
आणि तोच श्रीव्यासजींचा ग्रंथ त्यातील पदांच्या अर्थाकडे लक्ष्य पोचवून, प्राकृत श्रोत्यांच्या श्रवणाला योग्य असा मराठी भाषेत आज लिहिला आहे. 9
1710-18
व्यासादिकांचे उन्मेख । राहाटती जेथ साशंक । तेथ मीही रंक येक । चावळी करी ॥1710॥
व्यासादिकांसारखे थोर ज्ञानीही (आत्मवेत्ते) जेथे वर्णनाच्या व्यवहारांत क्वचित् साशंक असतात (अवर्णनीय वस्तु वर्णानांत आणू गेल्यामुळे) तेथे मीही एक गरीब वाङ्मयसेवा करीत आहें. 1710
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1711-18
परी गीता ईश्वरु भोळा । ले व्यासोक्तिकुसुममाळा । तरी माझिया दुर्वादळा । ना न म्हणे की ॥1711॥
(कारण, मला पूर्ण विश्वास आहे) की हा गीतेश्वर अत्यंत भोळा आहे; व्यासोक्ति रूप सुमनांच्या माळा त्याने गळ्यात जरी धारण केल्या असल्या, तरी माझ्या रंकाच्या दूर्वादळाचाही तो अव्हेर करणार नाही 11
1712-18
आणि क्षीरसिंधूचिया तटा । पाणिया येती गजघटा । तेथ काय मुरकुटा । वारिजत असे ? ॥1712॥
पहा की, क्षीरसागराच्या किनाऱ्यावर हत्तीचे कळप पाण्यासाठी येत असले तरी मशकाला तेथे काय मज्जाव असतो ? 12
1713-18
पांख फुटे पांखिरू । नुडे तरी नभीच स्थिरू । गगन आक्रमी सत्वरू । तो गरुडही तेथ ॥1713॥
नूतन पंख फुटणारे पांखरू फार उडू शकले नाही तरी त्याला आकाशाचाच आश्रय असतो (आकाशांतच असतं) व भरारी सरसे (सत्वर) गगन आक्रमण करणारा गरुड घेतला तरी त्यालाही विश्रांतिस्थल आकाशच असते 13
1714-18
राजहंसाचे चालणे । भूतळी जालिया शाहाणे । आणिके काय कोणे । चालावेचिना ? ॥1714॥
जगात राजहंसाची गति श्रेष्ठ ठरली असली तरी तेवढयासाठी, इतरांनी काय चालूच नये ? 14
1715-18
जी आपुलेनि अवकाशे । अगाध जळ घेपे कलशे । चुळी चूळपण ऐसे । भरूनि न निघे ? ॥1715॥
कलशांत अधिक पाणी राहिले तरी आधार कलशाकाशाच असतो; तसेच चुळीत कमी पाणी असले तरी आधार मुखाकाशाचाच असतो (यात विशेष ते काय ? ) 15
1716-18
दिवटीच्या आंगी थोरी । तरी ते बहु तेज धरी । वाती आपुलिया परी । आणीच की ना ? ॥1716॥
मशाल मोठी असली तर प्रकाश अधिक असतो व वात जरी लहान असली तरी ती आपल्या मानाने प्रकाशच देते नव्हे काय ?16
1717-18
जी समुद्राचेनि पैसे । समुद्री आकाश आभासे । थिल्लरी थिल्लराऐसे । बिंबेचि पै ॥1717॥
समुद्राच्या व्याप्ती प्रमाणं समुद्रांत आकाश प्रतिबिंबित झाले तर डबक्याच्या व्याप्तीच्या मानाने तेथेही ते तितकेच प्रतिबिंबित होते, 17
1718-18
तेवी व्यासादिक महामती । वावरो येती इये ग्रंथी । मा आम्ही ठाको हे युक्ति । न मिळे कीर ? ॥1718॥
त्याप्रमाणे व्यासांसारख्या महान बुद्धिमंतांनी ह्या ग्रंथाचा उहापोह केला असला तरी, आम्हीही आमच्या शक्तीप्रमाणे तसे करावे ह्याला वरील दृष्टांत मिळत नाहीत काय ? 18
1719-18
जिये सागरी जळचरे । संचरती मंदराकारे । तेथ देखोनि शफरे येरे । पोहो न लाहती ? ॥1719॥
ज्या समुद्रामध्ये मंदरपर्वतसारखी थोर जलचरे संचार करितात, तेणे ते पाहून लहान माशांनी काय पोहूच नये ? 19
1720-18
अरुण आंगाजवळिके । म्हणौनि सूर्याते देखे । मा भूतळीची न देखे । मुंगी काई ? ॥1720॥
सन्निध्या मुळे अरुण तेवढा सुर्याला पहातो असे म्हणावे तर पृथ्वीवरील मुंगीही काय त्याला पहात नाही ? 1720
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1721-18
यालागी आम्हा प्राकृता । देशिकारे बंधे गीता । म्हणणे हे अनुचिता । कारण नोहे ॥1721॥
यास्तव आम्ही प्राकृतजनांनी देशभाषेत गीताप्रबंध आणिला तर ते अनुचित होय असे म्हणता येणार नाही. 21
1722-18
आणि बापु पुढा जाये । ते घेत पाउलाची सोये । बाळ ये तरी न लाहे । पावो कायी ? ॥1722॥
आणि पिता पुढे जात असून त्याच्याच मार्गे बालक चालत असले तर शेवटी ते तेथेच पोचणार नाही काय ? 22
1723-18
तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकाराते वाट पुसतु । अयोग्यही मी न पवतु । के जाईन ? ॥1723॥
व्यासांच्या मागोव्याने व भाष्यकार श्रीशंकराचार्यांना वाट विचारीत जाणारा माझ्या सारखा त्याप्रमाणे अल्पमतीही तेथेच पोचणार नाही तर कोठे जाईल ? 23
1724-18
आणि पृथ्वी जयाचिया क्षमा । नुबगे स्थावर जंगमा । जयाचेनि अमृते चंद्रमा । निववी जग ॥1724॥
आणि ज्याच्या सामर्थ्याने पृथ्वी स्थावरजंगम भूतांचा भार सहन करिते व ज्याच्या आधारावर अमृताच्या चंद्र जगाची शांति करितो, 24
1725-18
जयाचे आंगिक असिके । तेज लाहोनि अर्के । आंधाराचे सावाइके । लोटिजत आहे ॥1725॥
ज्याच्या अंगचे असलेले तेज घेऊन सूर्य अंधाराचा प्रतिबंध दूर करितो. 25
1726-18
समुद्रा जयाचे तोय । तोया जयाचे माधुर्य । माधुर्या सौंदर्य । जयाचेनि ॥1726॥
समुद्राला ज्याच्या सत्तेने पाणी आहे, पाण्याला ज्याच्यायोगे माधुर्य आहे व माधुर्याला ज्याच्यामुळे शोभा आहे; 26
1727-18
पवना जयाचे बळ । आकाश जेणे पघळ । ज्ञान जेणे उज्वळ । चक्रवर्ती ॥1727॥
वाऱ्याच्या अंगचे सामर्थ्य ज्याचे आहे, आकाश ज्याच्या सत्तेवर व्यापक आहे, ज्ञानालाही ज्याचा प्रकाश आहे व ज्याच्यामुळेच त्याला सर्वश्रेष्ठता आहे. 27
1728-18
वेद जेणे सुभाष । सुख जेणे सोल्लास । हे असो रूपस । विश्व जेणे ॥1728॥
ज्याच्य सत्तेने वेद हितवचनी आहेत, सुखाला सुखपणा ज्याचा आहे, हे राहो ! ज्याच्यायोगे विश्वाला रूप आहे. 28
1729-18
तो सर्वोपकारी समर्थु । सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथु । राहाटत असे मजही आंतु । रिघोनिया ॥1729॥
त्या सर्वोपकारी श्रीगुरु निवृत्तिनाथांचा माझ्या अंतःकरणात प्रवेश असून ते तेथे वास करीत आहेत. 29
1730-18
आता आयती गीता जगी । मी सांगे मऱ्हाठिया भंगी । येथ के विस्मयालागी । ठावो आहे ॥1730॥
तेव्हां, जगात पूर्वीच आयती प्रसिद्ध असलेली गीता मी मराठी भाषेत सांगितली, तर त्यात आश्चर्य वाटण्या सारखे काय आहे ? 1730
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1731-18
श्रीगुरुचेनि नांवे माती । डोंगरी जयापासी होती । तेणे कोळिये त्रिजगती । येकवद केली ॥1731॥
ज्याचे श्रीगुरु म्हणजे केवळ डोंगरच्या मातीची मूर्ति, त्या एकलव्य कोळ्यानेही त्या अचेतन गुरूपासून धनुविद्य प्राप्त करून घेऊन त्रैलोक्यात सर्व मान्यता मिळविली. 31
1732-18
चंदने वेधली झाडे । जाली चंदनाचेनि पाडे । वसिष्ठे मांनिली की भांडे । भानूसी शाटी ॥1732॥
चंदनाच्या भोवतालचे वृक्ष चंदनासारखे सुगधित झाले व वसिष्ठ मुनींची छाटीही तेजाने सूर्याची बरोबरी करू शकली. 32
1733-18
मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला । जो दिठीवेनि आपुला । बैसवी पदी ॥1733॥
मग मी तर सचेतन मनुष्य आणि केवळ कृपादृष्टीने शिष्याला निजपदप्राप्ति करून देणारे असे श्रीसद्गुरू माझे स्वामी. ? 33
1734-18
आधीचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी । तै न दिसे ऐसी गोठी । केही आहे ? ॥1734॥
आधीच निर्दोष नेत्र, त्यात सूर्याची मदत, मग दिसणार नाही अशी गोष्ट कोठे होईल काय. 34
1735-18
म्हणौनि माझे नित्य नवे । श्वासोश्वासही प्रबंध होआवे । श्रीगुरुकृपा काय नोहे । ज्ञानदेवो म्हणे ॥1735॥
म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे नित्य व नवे वाहणारे श्वासोच्छ्वासही गीता प्रबंध होऊ शकतील; कारण, श्रीगुरुकृपेमे जगात काय होणार नाही ? 35
1736-18
याकारणे मिया । श्रीगीतार्थु मऱ्हाठिया । केला लोका यया । दिठीचा विषो ॥1736॥
याकरिता मी मराठींत श्रीगीतार्थ केला; तो असा की, सर्व लोकांना तो विषय सहज ग्रहण व्हावा. 36
1737-18
परी मऱ्हाठे बोलरंगे । कवळिता पै गीतांगे । तै गातयाचेनि पांगे । येकाढता नोहे ॥1737॥
परंतु, माझ्या मराठी शृंगाराच्या भाषेने कोणी गीतार्थाचे आकलन करू गेला, तरी मूळगीतेच्या वक्त्याच्या अभावी त्यात एकदेशित्व अथवा अपूर्णता मुळीच रहाणार नाही. 37
1738-18
म्हणौनि गीता गावो म्हणे । ते गाणिवे होती लेणे । ना मोकळे तरी उणे । गीताही आणित ॥1738॥
म्हणून कोणी गीतेचा वक्ता असेल, तर माझा मराठी अर्थ त्याच्या वक्तृवाला अलंकारच होईल; किंवा कोणी सुटा मराठी अर्थ (माझा) सांगितला तरीही मुळावरून सांगितल्या जाणान्या अर्थाला तो उणेपणा आणील ? (म्हणजे सरस ठरेल) 38
1739-18
सुंदर आंगी लेणे न सूये । तै तो मोकळा शृंगारु होये । ना लेइले तरी आहे । तैसे के उचित ? ॥1739॥
सुंदर अंगावर अलंकार घातला नाही तरी, तो आपल्या सुटधा स्थितींतही श्रृंगार रूपाने असतोच, अथवा सुंदर शरीरावर तो घातला तर त्याच्यासारखी योग्य गोष्ट आणखी कोणती ? 39
1740-18
का मोतियांची जैसी जाती । सोनयाही मान देती । नातरी मानविती । अंगेंचि सडी ॥1740॥
किंवा मोती ही जातच अशी आहे की ती सुवर्णापाशी सहकार करून त्यालाही शोभा देतात, किंवा सुटी असली तरी आपल्या अंगानेच शोभतात. 1740
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1741-18
नाना गुंफिली का मोकळी । उणी न होती परीमळी । वसंतागमीची वाटोळी । मोगरी जैसी ॥1741॥
अथवा वसंत ऋतूच्या आरंभीची वाटोळी मोगऱ्याची फुले, हारात असोत की सुटी असोत, त्यांच्या सुगंधांत फरक पडत नाही. 41
1742-18
तैसा गाणिवेते मिरवी । गीतेवीणही रंगु दावी । तो लाभाचा प्रबंधु ओवी । केला मिया ॥1742॥
त्याप्रमाणे, गीतेवरील वक्तृत्वाला शोभा देणारा, स्वतंत्रपणेही रंग भरविणारा, असा माझ्या अवडीचा हा ओवीबद्ध प्रबंध मी रचिला आहे (असे महाराज म्हणतात). 42
1743-18
तेणे आबालसुबोधे । ओवीयेचेनि प्रबंधे । ब्रह्मरससुस्वादे । अक्षरे गुंथिली ॥1743॥
त्या प्रबंधांत अबालवृद्धांस समजण्या सारख्या ओव्यांनी ब्रह्मरसाचा आस्वाद घेता यावा, अशा प्रकारे अक्षररचना केली आहे. 43
1744-18
आता चंदनाच्या तरुवरी । परीमळालागी फुलवरी । पारुखणे जियापरी । लागेना की ॥1744॥
चंदनतरूपाशी गेल्यावर त्याला फुले येईपर्यंत सुगंधासाठी जशी वाट पहाणे पडत नाही. 44
1745-18
तैसा प्रबंधु हा श्रवणी । लागतखेवो समाधि आणी । ऐकिलियाही वाखाणी । काय व्यसन न लवी ? ॥1745॥
त्याप्रमाणे ह्या प्रबंधाचे नुसते श्रवण घडताच जर समाधि लागते, तर, त्याचे व्याख्यानपूर्वक श्रवण झाल्यावर तो काय व्यसन लाविल्यावाचून राहील 45
1746-18
पाठ करिता व्याजे । पांडित्ये येती वेषजे । तै अमृताते नेणिजे । फावलिया ॥1746॥
पठणाच्या निमित्ताने आवृत्ति सुरू केली, तरी प्रसादाने आपोआप पांडित्य (अर्थविषयक) स्फुरते व मग त्या गोडीपुढे अमृताचा लाभही तुच्छ वाटतो. 46
1747-18
तैसेनि आइतेपणे । कवित्व जाले हे उपेणे । मनन निदिध्यास श्रवणे । जिंतिले आता ॥1747॥
तसे हे आयते प्राप्त झालेले (अमृताहून गोड) असे कवित्व विश्रांतिस्थान होऊन, त्याच्या श्रवणानेच मनन व निदिध्यासन ह्यांची आवश्यकता उरली नाही. 47
1748-18
हे स्वानंदभोगाची सेल । भलतयसीचि देईल । सर्वेंद्रिया पोषवील । श्रवणाकरवी ॥1748॥
हे श्रवण वाटेल त्या मनुष्यालाही आत्मानंदाचा शेलका भोग घडवील व त्याच्या सर्वेन्द्रियांना टवटवी देईल. 48
1749-18
चंद्राते आंगवणे । भोगूनि चकोर शाहाणे । परी फावे जैसे चांदिणे । भलतयाही ॥1749॥
आपल्या आगच्या सामर्थ्याने चकोरांना चंद्रकिरणांच्या ठिकाणच अमृताचा भोग घडो; पण जगांतील कोणालाही चांदण्याचा भोग घडतोच. 49
1750-18
तैसे अध्यात्मशास्त्री यिये । अंतरंगचि अधिकारिये । परी लोकु वाक्चातुर्ये । होईल सुखिया ॥1750॥
त्याप्रमाणे ह्या अध्यात्मशास्त्रांत अंतमखवृत्तीचे पुरुषच अधिकारी आहेत हे खरे असले तरी, ईतर लोक केवल माझ्या ग्रंथरचनेच्या चातुर्यानेही (मोहकपणाने) आनंदित होतील. 1750
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1751-18
ऐसे श्रीनिवृत्तिनाथाचे । गौरव आहे जी साचे । ग्रंथु नोहे हे कृपेचे । वैभव तिये ॥1751॥
असा श्रीगुरुनिवृत्तिनाथांचा महिमा आहे; हा माझा ग्रंथ नसून हे त्यांच्या कृपेचेच केवळ ऐश्वर्य होय. 51
1752-18
क्षीरसिंधु परिसरी । शक्तीच्या कर्णकुहरी । नेणो कै श्रीत्रिपुरारी । सांगितले जे ॥1752॥
क्षीरसिंधूच्या सन्निध, देवी पार्वतीच्या कानांत त्रिपुरारि श्रीशंकरांनी जे ज्ञान केव्हा सांगितले ते नकळे. 52
1753-18
ते क्षीरकल्लोळाआंतु । मकरोदरी गुप्तु । होता तयाचा हातु । पैठे जाले ॥1753॥
पण, ते ज्ञान, क्षीरसागराच्या लाटांमध्ये माशाच्या पोटात गुप्त असलेले (भगवान् विष्णु) (श्रीमत्स्येंद्रनाथ) यांना प्राप्त झाले. 53
1754-18
तो मत्स्येंद्र सप्तशृंगी । भग्नावयवा चौरंगी । भेटला की तो सर्वांगी । संपूर्ण जाला ॥1754॥
ते मत्स्येंद्रनाथ सप्तशृंगीपर्वतावर संचार करीत गेले असता त्यांच्या दर्शनाने तेथे असलेला अवयव तुटलेल चौरंगीनाथ हा एकदम सर्वावयवपूर्ण झाला. 54
1755-18
मग समाधि अव्युत्थया । भोगावी वासना यया । ते मुद्रा श्रीगोरक्षराया । दिधली मीनी ॥1755॥
मग स्वतःप्रमाणे अव्युत्थित (अखंड) समाधि भोगता यावी म्हणून ती ज्ञानमुद्रा मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांस दिली. 55
1756-18
तेणे योगाब्जिनीसरोवरु । विषयविध्वंसैकवीरु । तिये पदी का सर्वेश्वरु । अभिषेकिला ॥1756॥
त्या मुद्रादानाने, मत्स्येंद्रनाथांनी, योगरूपी कमलिनींचे सरोवर व विषयविध्वंस करणारा महाशूर, अशा जणु सर्वेश्वरालाच त्या योगमुद्राऐश्वर्यपदावर स्थापून अभिषेक केला. 56
1757-18
मग तिही ते शांभव । अद्वयानंदवैभव । संपादिले सप्रभव । श्रीगहिनीनाथा ॥1757॥
मग त्या गोरक्षनाथांनी श्रीशंकरापासून परंपरेने प्राप्त झालेल्या अद्वयानंदैश्वर्याचा सामर्थ्यासहवर्तमान श्रीगहिनीनाथांवर कृपा प्रसाद केला. 57
1758-18
तेणे कळिकळितु भूता । आला देखोनि निरुता । ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा । दिधली ऐसी ॥1758॥
ते गहिनीनाथ कलिकाल पीडित जीवांकडे पाहून, श्रीनिवृत्तिनाथांपाशी येऊन त्यांना अशी आज्ञा करिते झाले, 58
1759-18
ना आदिगुरु शंकरा- । लागोनि शिष्यपरंपरा । बोधाचा हा संसरा । जाला जो आमुते ॥1759॥
की आदिगुरु श्रीशंकरांपासून अशाप्रकारच्या गुरुशिष्यपरंपरेने बोधाचा जो उपदेश आमच्यापर्यंत आला आहे. 59
1760-18
तो हा तू घेऊनि आघवा । कळी गिळितया जीवा । सर्व प्रकारी धावा । करी पा वेगी ॥1760॥
त्या सर्वाचे ग्रहण करून कलिपीडित जे जीव असतील त्यांच्या उद्धारार्थं सत्वर धावून जा. 60
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1761-18
आधीच तव तो कृपाळु । वरी गुरुआज्ञेचा बोलू । जाला जैसा वर्षाकाळू । खवळणे मेघा ॥1761॥
श्रीनिवृत्तिनाथ स्वभावानेच कृपाळू होते, त्यात अशी गुर्वाज्ञा झाल्यावर, तो कृपाळू स्वभाव वर्षाकाळच्या मेघांप्रमाणे जागृत होऊन जीवांवर कृपावर्षाव करू लागला. 1761
1762-18
मग आर्ताचेनि वोरसे । गीतार्थग्रंथनमिसे । वर्षला शांतरसे । तो हा ग्रंथु ॥1762॥
मग आर्तजनांचा कळवळा येऊन, श्रीनिवृत्तिनाथांच्या कृपेने, गीतार्थग्रंथाच्या मिषाने जीवांवर जो कल्याणार्थ शांत रसाचा वर्षाव केला, तोच हा ज्ञानेश्वरी ग्रंथ होय. 1762
1763-18
तेथ पुढा मी बापिया । मांडला आर्ती आपुलिया । की यासाठी येवढिया । आणिलो यशा ॥1763॥
श्रीगुरूच्या कृपा मेघापुढे मी आपल्या चातकासारखा अनन्य होतोच, व त्या माझ्या अनन्यतेमुळेच गुरुप्रसादाने मला एवढे ग्रंथ यश प्राप्त झाले.
1764-18
एवं गुरुक्रमे लाधले । समाधिधन जे आपुले । ते ग्रंथे बोधौनि दिधले । गोसावी मज ॥1764॥
असे गुरुपरंपरेने प्राप्त झालेले आपले जे समाधिधन (नीजधन) ते श्रीगुरूनी ग्रंथरूप रचना करून माझ्या स्वाधीन केले. 64
1765-18
वाचूनि पढे ना वाची । ना सेवाही जाणे स्वामीची । ऐशिया मज ग्रंथाची । योग्यता के असे ? ॥1765॥
एऱ्हवी, न पढलेला, न बहुश्रुत, किंवा स्वामीसेवेचेही ज्ञान नसलेल्या माझ्यासारख्याला ह्या ग्रंथरचनेची योग्यता कोठून असणार ?
1766-18
परी साचचि गुरुनाथे । निमित्त करूनि माते । प्रबंधव्याजे जगाते । रक्षिले जाणा ॥1766॥
परंतु, माझ्या श्रीगुरूनी मला निमित्त करून गीताप्रबंधाच्या योगाने सर्व जगाचे रक्षण केले हेच खरे 66
1767-18
तऱ्ही पुरोहितगुणे । मी बोलिलो पुरे उणे । ते तुम्ही माउलीपणे । उपसाहिजो जी ॥1767॥
तरी पुरोहिताच्या नात्याने मी जे काही न्यूनाधिक बोललो असेन, ते आपण मातेसमान संतसज्जनांनी मानून घ्यावे अशी प्रार्थना आहे. 67
1768-18
शब्द कैसा घडिजे । प्रमेयी कैसे पा चढिजे । अळंकारु म्हणिजे । काय ते नेणे ॥1768॥
शब्दरचना कशी करावी, प्रमेय कसे व्यक्त वा सिद्ध करावे, किंवा भाषालंकार कशाला म्हणतात हे मला स्वतःला काही ज्ञान नाही ! 68
1769-18
सायिखडेयाचे बाहुले । चालवित्या सूत्राचेनि चाले । तैसा माते दावीत बोले । स्वामी तो माझा ॥1769॥
परंतु, कळसूत्री बाहुले जसे सूत्रधार हलवील तसे हलते, त्याप्रमाणे माझ्या स्वामींनी मला जशी स्फूर्ती दिली तसे मी बोललों. 1769
1770-18
यालागी मी गुणदोष- । विषी क्षमाविना विशेष । जे मी संजात ग्रंथलो देख । आचार्ये की ॥1770॥
यास्तव, ग्रंथाच्या गुणदोषाविषयी मी फारसे माफी, क्षमा मागणे करीत नाही; कारण मी ” आचार्यं संजात ” म्हणजे श्रीगुरुनी प्रकट केलेल्या अर्थाचे नुसते ग्रथन (गुंफणें) केले आहे. 1770
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1771-18
आणि तुम्हा संताचिये सभे । जे उणीवेसी ठाके उभे । ते पूर्ण नोहे तरी तै लोभे । तुम्हासीचि कोपे ॥1771॥
शिवाय, आपणासारख्या संतसभेमध्ये जर आश्रय करणारा जो मी, त्याच्या ठिकाणी काही उणेपणा राहिला तर मी लडिवाळपणे तुमच्यावर व रुसेन. 71
1772-18
सिवतलियाही परीसे । लोहत्वाचिये अवदसे । न मुकिजे आयसे । तै कवणा बोलु । ॥1772॥
परिसाचा स्पर्श झाल्यावरही जर लोखंडाचा लोहत्वाचा विटाळ फिटला नाही तर तो दोष कोणाचा ? (अर्थात् परिसाचाच) 72
1773-18
वोहळे हेचि करावे । जे गंगेचे आंग ठाकावे । मगही गंगा जरी नोहावे । तै तो काय करी ? ॥1773॥
ओहोळावर इतकीच जबाबदारी आहे की त्याने वाटेल त्या मार्गाने गंगा गांठावी; इतके करूनही तो गंगात्व न पावेल तर त्याचा तो दोष नव्हेच. 73
1774-18
म्हणौनि भाग्ययोगे बहुवे । तुम्हा संतांचे मी पाये । पातलो आता के लाहे । उणे जगी । ॥1774॥
म्हणून, परम पुण्याईने, तुम्हा संतांच्या चरणांपाशी मी प्राप्त झालो आहे. आता मला या जगात काय कमी असणार ?74
1775-18
अहो जी माझेनि स्वामी । मज संत जोडुनि तुम्ही । दिधलेति तेणे सर्वकामी । परीपूर्ण जालो ॥1775॥
अहो, माझ्या गुरुमाउलीने मला आपणा संत चरणांची जोड करून दिली आहे, त्यायोगे माझ्या सर्व इच्छा परिपूर्ण झाल्या आहेत. 75
1776-18
पाहा पा माते तुम्हा सांगडे । माहेर तेणे सुरवाडे । ग्रंथाचे आळियाडे । सिद्धी गेले ॥1776॥
पहा की, आपल्यासारखे माहेर मला प्राप्त झाल्यामुळे माझा ग्रंथविषयक बुद्धींतील आग्रह सुखाते सिद्धीस गेला. 76
1777-18
जी कनकाचे निखळ । वोतू येईल भूमंडळ । चिंतारत्नी कुळाचळ । निर्मू येती ॥1777॥
अहो, सर्व पृथ्वीगोल सुवर्णाचा करिता येईल, चिंतामणीचे पर्वत निर्माण करिता येतील, 77
1778-18
सातांही हो सागरांते । सोपे भरिता अमृते । दुवाड नोहे तारांते । चंद्र करिता ॥1778॥
सप्तही सागर अमृताने सहज भरिता येतील किंवा जितक्या चांदण्या आहेत त्यांचे चंद्र बनविणेही कठीण नाही. 78
1779-18
कल्पतरूचे आराम । लाविता नाही विषम । परी गीतार्थाचे वर्म । निवडू न ये ॥1779॥
कल्पतरूंच्या बागा लावणे कठीण नाही; (हे सर्वं संभवेल) पण, गीतार्थाचे रहस्य समजणार नाही. 79
1780-18
तो मी येकु सर्व मुका । बोलोनि मऱ्हाठिया भाखा । करी डोळेवरी लोका । घेवो ये ऐसे जे ॥1780॥
मनुष्याने सर्व लोकांना उघडया डोळ्यांनी ग्रहण करिता येईल असा मराठी भाषेत लिहावा. 1780
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1781-18
हा ग्रंथसागरु येव्हढा । उतरोनि पैलीकडा । कीर्तिविजयाचा धेंडा । नाचे जो का ॥1781॥
हा एवढा मोठा ग्रंथसागर उतरून जाऊन पलीकडे जो कीर्तीविजयध्वज फडकत आहे81
1782-18
गीतार्थाचा आवारु । कलशेसी महामेरु । रचूनि माजी श्रीगुरु- । लिंग जे पूजी ॥1782॥
अशाप्रकारे गीतेच्या अर्थरूप मंदिराची रचना करून अखेरचा कळस किंवा शिखर म्हणून अठराव्या अध्यायाची योजना करून त्यात श्रीगुरूरूपी शिवलिंग स्थापून त्याची मी पूजा करितो. 82
1783-18
गीता निष्कपट माय । चुकोनि तान्हे हिंडे जे वाय । ते मायपूता भेटी होय । हा धर्म तुमचा ॥1783॥
गीता ही निष्कपट प्रेम करणारी माउली होय; तिची चुकामुक होऊन जो मी तान्ह्या मुलाप्रमाणे व्यर्थं भटकत होतो त्या मायलेकांची गाठ घालून दिलीत ही आपली कृपा होय. 83
1784-18
तुम्हा सज्जनांचे केले । आकळुनी जी मी बोले । ज्ञानदेव म्हणे थेंकुले । तैसे नोहे ॥1784॥
तुम्हा सज्जनांच्या कृपेने जसे गीतार्थाचे आकलन झाले, तसे मी बोललो असलो तरी ती काही सामान्य कृति नव्हे. 84
1785-18
काय बहु बोलो सकळा । मेळविलो जन्मफळा । ग्रंथसिद्धीचा सोहळा । दाविला जो हा ॥1785॥
उपकार किती म्हणून सांगावे ? आपल्या कृपेने ग्रंथ सिद्धीस जाऊन जो हा सोहळा मी पहात आहें, त्याने माझ्या जन्माचे साफल्य झाले आहे. 85
1786-18
मिया जैसजैसिया आशा । केला तुमचा भरवसा । ते पुरवूनि जी बहुवसा । आणिलो सुखा ॥1786॥
तुम्हा सज्जनांवर पूर्ण भरवसा ठेवून ज्या ज्या कृपेची मी आशा धरून राहिलो ती सर्व आपण सफल करून मला सुखी केले आहे 86
1787-18
मजलागी ग्रंथाची स्वामी । दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही । ते पाहोनि हांसो आम्ही । विश्वामित्रातेही ॥1787॥
महाराज, मजलागी म्हणजे माझ्याकडून ही ग्रंथरूपी दुसरी सृष्टि जी तुम्ही निर्माण केली, ती पाहून आम्हाला विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीचेही कौतुक वाटत नाही. 87
1788-18
जे असोनि त्रिशंकुदोषे । धातयाही आणावे वोसे । ते नासते कीजे की ऐसे । निर्मावे नाही ॥1788॥
ती नश्वर सृष्टि त्रिशंकू राजाच्या उद्देशाने व ब्रह्मदेवाला कमीपणा आणण्याच्या हेतूने त्यांनी निर्माण केली; पण आपली कृति निर्हेतुक व शाश्वत आहे 88
1789-18
शंभू उपमन्युचेनि मोहे । क्षीरसागरूही केला आहे । येथ तोही उपमे सरी नोहे । जे विषगर्भ की ॥1789॥
शंकरांनी भक्त उपमन्यूसाठी क्षीरसागर उत्पन्न केला, पण तीही उपमा आपल्या कृपेला अपुरी पडते, कारण, त्या सागराच्या पोटात विष आहे. 89
1790-18
अंधकारु निशाचरा । गिळिता सूर्ये चराचरा । धावा केला तरी खरा । ताउनी की तो ॥1790॥
अंधकाररूपी राक्षस चराचराला त्रास देत असता त्या चरचराचा धावा, सूर्याने ताऊन पुरविला (अंधकार नाशिला); पण त्यात उष्णतेच ताप झाला. 1790
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1791-18
तातलियाही जगाकारणे । चंद्रे वेचिले चांदणे । तया सदोषा केवी म्हणे । सारिखे हे ॥1791॥
चंद्राने आपल्या चांदण्याला खर्ची घालून जगाचा ताप शान्त केला हे खरे, पण त्या कलंकयुक्त चंद्राची उपमा ह्या ग्रंथाला कशी द्यावी ? 1791
1792-18
म्हणौनि तुम्ही मज संती । ग्रंथरूप जो हा त्रिजगती । उपयोग केला तो पुढती । निरुपम जी ॥1792॥
म्हणून, तुम्ही संतांनी मजकडून त्रैलोक्याला उपयोग व्हावा असा जो ग्रंथ निर्मिला तो निरुपम होय. 92
1793-18
किंबहुना तुमचे केले । धर्मकीर्तन हे सिद्धी नेले । येथ माझे जी उरले । पाईकपण ॥1793॥
किंबहुना, माझे हे गीताधर्म कीर्तन सिद्धीस गेले हे केवळ आपल्या कृपेचे फल होय; मी आता करण्यासारखे एकच काम मजकडे उरले आहे; ते म्हणजे आपली सेवा हे होय. 93
1794-18
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥1794॥
आता, सर्व विश्वाचा आत्मा जो परमेश्वर याने ह्या माझ्या वाग्यज्ञरूप सेवेने प्रसन्न होऊन मजवर हा प्रसाद करावा. 94
1795-18
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूता परस्परे पडो । मैत्र जीवाचे ॥1795॥
खलजनांच्या दुष्ट बुद्धीला पालट पडून त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न व्हावी व सर्व भूतांच्या ठिकाणी परस्पराबद्दल मित्रभाव नांदावा. 95
1796-18
दुरिताचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥1796॥
पातकरूप अंधकाराचा नाश होऊन जगात धर्मरूप सूर्याच उदय असो व प्राणिमात्रांच्या सदिच्छा फलद्रूप होवोत. 96
1797-18
वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूता ॥1797॥
ईश्वरनिष्टांचा समुदाय भूतलावर सकल मंगलांचा अखंड वर्षाव करीत असलेला सर्व भेटो. 97
1798-18
चला कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचे गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥1798॥
ती संतमंडळी म्हणजे चालते कल्पतरूचे बाग चेतन चिंतामणीचे गाव व अमृताचे बोलते समुद्रच होत. 98
1799-18
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ॥1799॥
निष्कलंक चंद्र, अतापदायी सूर्य, असे जे सज्जन ते सर्व लोकांच्या प्रेमाचे स्थान असो. 99
1800-18
किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिही लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥1800॥
किंबहुना, त्रैलोक्य सुखी होऊन त्यांनी विश्वपालक जो आदिपुरुष त्याचे अखंड भजन करावे. 1800
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1801-18
आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये । दृष्टादृष्ट विजये । होआवे जी ॥1801॥
आणि विशेषत: येथे हाच ग्रंथ ज्यांनी आपले उपजीव्य मानिले आहे (सर्वाधार, तारक) त्यांना दृष्ट व अदृष्ट विजयसुखाचा लाभ घडत जावा. 1801
1802-18
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥1802॥
तेव्हा सद्गुरू निवृत्तिनाथ प्रसन्न होऊन म्हणाले, ” तथास्तु ‘; तुझी ही इच्छा सफल होईल असा तुला प्रसाद आहे; त्यायोगे ज्ञानेश्वर महाराज सुखी झाले. 2
1803-18
ऐसे युगी परी कळी । आणि महाराष्ट्रमंडळी । श्रीगोदावरीच्या कूली । दक्षिणलिंगी ॥1803॥
याप्रमाणे कलियुगांत, महाराष्ट्र देशांत, गोदावरीच्या दक्षिण तीरावर, 3
1804-18
त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र । जेथ जगाचे जीवनसूत्र । श्रीमहालया असे ॥1804॥
त्रिभुवनात पवित्र असलेले अनादि पंचक्रश क्षेत्र (नेवासे) येथे सर्व जगाचे जीवनसूत्र श्रीमहालय (मोहनीराज) आहे. 4
1805-18
तेथ यदुवंशविलासु । जो सकळकळानिवासु । न्यायाते पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्रु ॥1805॥
त्या क्षेत्रांत यदुवंशाला भूषणभूत व सकलकलांचे स्थान असा न्यायनिष्ठ रामराजा होता. 5
1806-18
तेथ महेशान्वयसंभूते । श्रीनिवृत्तिनाथसुते । केले ज्ञानदेवे गीते । देशीकार लेणे ॥1806॥
तेथे श्रीशंकरांपासून ज्यांची परपरा चालत आलेली आहे असे श्रीनिवृत्तिनाथ महाराज ह्यांचा शिष्य ज्ञानेश्वर ह्याने गीतेला देशी भाषेचा अलंकार चढविला. (रूप दिले) 6
1807-18
एवं भारताच्या गावी । भीष्मनाम प्रसिद्ध पर्वी । श्रीकृष्णार्जुनी बरवी । गोठी जे केली ॥1807॥
ह्याप्रमाणे, भारतांतील प्रसिद्ध भीष्मपर्वात श्रीकृष्णार्जुनांचा जो गोड संवाद झाला. 7
1808-18
जे उपनिषदांचे सार । सर्व शास्त्रांचे माहेर । परमहंसी सरोवर । सेविजे जे ॥1808॥
जो उपनिषदांचे सार व शास्त्रांचे आद्यस्थान (माहेरघर) व परमहंसांचे क्रीडासरोवरच होय, 8
1809-18
तिये गीतेचा कलशु । संपूर्ण हा अष्टादशु । म्हणे निवृत्तिदासु । ज्ञानदेवो ॥1809॥
निवृत्तिनाथशिष्य ज्ञानदेव महाराज म्हणतात, त्या गीतेचा. अठरावा अध्याय हा कलश म्हणजे शेवटचा अध्याय होय. 9
1810-18
पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती । सर्वसुखी सर्वभूती । संपूर्ण होईजे ॥1810॥
ह्या ग्रंथाच्या पुण्यरूपसंपत्तीने सर्व जीवमात्रांना उत्तरोत्तर संपूर्ण सुखप्राप्ति होवो. 10
1811-18
शकेबाराशते बारोत्तरे । तै टीका केली ज्ञानेश्वरे । सच्चिदानंदबाबा आदरे । लेखकु जाहला ॥1811॥
शके1212 मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ही टीका केली ती सच्चिदानंद बाबांनी आदरपूर्वक लिहिली. 1811
॥ इति श्रीज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां मोक्षसंन्यासयोगोनाम अष्टादशोऽध्यायः ॥18॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :-78॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 1810॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ संशोधन केल्यानंतर ज्ञानेश्वरी संबंधाने केलेल्या ओव्या.


श्रीशकेपंधराशे साहोत्तरी । तारणनामसंवत्सरी । एकाजनार्दने अत्यादरी । गीता-ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली ॥1॥
शके1506 तारणनाम संवत्सरामध्ये श्रीजनार्दन महाराजांचे शिष्य एकनाथ महाराज ह्यांनी गीता ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. 1
ग्रंथ पूर्वींच अतिशुद्ध । परी पाठांतरी शुद्ध अबद्ध । तो शोधूनिया एवंविध । प्रतिशुद्ध सिद्धज्ञानेश्वरी ॥2॥
ग्रंथ मूळचाच अतिशुद्ध होता. परंतु लोकातील पाठभेदाने क्वचित् शुद्धतेला बाध आला होता. तो पाठभेद शुद्ध करून आता ह्याप्रमाणे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध झाली आहे. 2
नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका । जयाची गीतेची वाचिता टीका । ज्ञान होय लोका । अतिभाविका ग्रंथार्थिया ॥3॥
ज्यांची गीतेवरील टीका (ज्ञानेश्वरी) वाचली असता, गीतार्थाच्या अर्थाविषयी आर्त असलेल्या भाविक लोकांना ज्ञानप्राप्ति होते, त्या अतिपवित्र ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार असो 3
बहुकाळपर्वणी गोमटी । भाद्रपदमास कपिलाषष्ठी । प्रतिष्ठानी गोदातटी । लेखनकामाठी संपूर्ण जाली ॥4॥
फार वर्षांनी येणान्या भाद्रपद महिन्यातील कपिलाषष्ठीच्या पर्वणीचे सुयोगावर गोदातीर पैठणक्षेत्रांत प्रत शुद्ध करणे समाप्त झाले. 4
ज्ञानेश्वरीपाठी । जो ओवी करील मऱ्हाटी । तेणे अमृताचे ताटी । जाण नरोटी ठेविली ॥5॥
ज्ञानेश्वरीच्या मूळच्या पाठात जो पदरची ओवी प्रक्षिप्त करील (मराठी भाषेत) त्याने अमृताच्या ताटांत नरोटी (करवटी) ठेवण्या सारखेच होय. 5
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ शुभं भवतु ॥
॥ श्री परमात्मने नमः ॥ ॥ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥
-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम

सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक

सार्थ ज्ञानेश्वरी सर्व अध्याय

वारकरी ग्रंथ सूची

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading