आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय ११ वा विश्वरूपदर्शनयोगः
शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 11 : VISHWARUPDARSHN YOGA:
Sartha Dnyaneshwari Adhyay 11 VISHWARUPDARSHNYOGA:
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
सार्थ श्रीज्ञानेश्वरी: ::॥अथ एकादशोऽध्यायः- अध्याय अकरावा ॥ विश्वरूपदर्शनयोगः॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 55 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 708 ॥
सार्थ श्रीज्ञानेश्वरी: ::॥अथ एकादशोऽध्यायः- अध्याय अकरावा ॥ विश्वरूपदर्शनयोगः॥
अध्याय अकरावा
1-11
आता यावरी एकादशी । कथा आहे दोही रसी । येथ पार्था विश्वरूपेसी । होईल भेटी ॥1॥
यानंतर आता जेथे अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे, त्या अकराव्या अध्यायातील कथाभागात दोन रस मुख्यतः व्यक्त झालेले आहेत
2-11.
जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । आणि येरांही रसा पांतिकरा । जाहला मानु ॥2॥
याप्रमाणे या अध्यायात शांतरसाच्या घरी, अद्भूतरस हा पाहूणचाराला आला आहे, असे दिसेल आणि इतरहि रसांना त्यांच्यापक्तीस पाहूणचाराचा मान मिळणार आहे.
3-11
अहो वधुवरांचिये मिळणी । जैशी वराडिया लुगडी लेणी । तैसे देशियेच्या सुखासनी । मिरविले रस ॥3॥
अहो ! ज्याप्रमाणे मुलामुलीच्या लग्नात आलेले पाहुणे वस्रालंकारांनी सुशोभित होऊन मिरवतात, त्याप्रमाणे या मराठी भाषेच्या पालखीत बसून हे सर्व रस मिरवतील.
4-11
परी शांताद्भुत बरवे । जे डोळियांच्या अंजुळी घ्यावे । जैसे हरिहर प्रेमभावे । आले खेंवा ॥4॥
पण ज्याप्रमाणे हरिहरांना प्रेमाने अलिंगन द्यावे, त्याप्रमाणे शांत व अद्भूत हे दोन रस मात्र डोळ्यांच्या ओंजळीने म्हणजे स्पष्टपणे घेता येतील.
5-11
ना तरी अंवसेच्या दिवशी । भेटली बिंबे दोनी जैशी । तेवी एकवळा रसी । केला एथ ॥5॥
किंवा अमावास्येच्या दिवशी, ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब ही दोन्ही बिंबे मिळून जातात, त्याप्रमाणे या अध्यायात दोन रस एकत्र मिळालेले आहेत
6-11.
मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसे रसा जाहले प्रयाग । म्हणौनि सुस्नात होत जग । आघवे एथ ॥6॥
किंवा ज्याप्रमाणे गंगायमुना यांचे प्रवाह प्रयागाचे ठिकाणी एकत्र झाले, त्याप्रमाणे हा अध्याय शांत व अद्भूत या रसांचे प्रयागस्थळ झाले आहे; म्हणून सर्व जग प्रयागक्षेत्राप्रमाणे येथे स्नान करून पवित्र होईल.
7-11
माजी गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त । यालागी त्रिवेणी हे उचित । फावली बापा ॥7॥
ज्याप्रमाणे प्रयागाचे ठिकाणी गंगा यमुना यांच्या संगमांत गुप्तपणे सरस्वतीचा संगम होऊन, प्रयाग हे त्रिवेणी संगमाचे स्थान झाले आहे, त्याप्रमाणे या अध्यायातहि शांत व अद्भूत या दोन रसांचे प्रगट प्रवाह असून त्यामध्ये भगवंताची गीतारूप रसाळवाणीरूपी सरस्वति नदीचा गुप्त प्रवाह असल्यामुळे, बापहो ! हा अध्याय म्हणजे योग्य त्रिवेणी संगमच झाला आहे.
8-11
एथ श्रवणाचेनि द्वारे । तीर्थी रिघता सोपारे । ज्ञानदेवो म्हणे दातारे । माझेनि केले ॥8॥
श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, स्वामी निवृत्तिनाथांनी मला निमित्त करून या त्रिवेणीक्षेत्रात जाण्याकरिता श्रवणाचा सोपा मार्ग करून दिला.
9-11
तीरे संस्कृताची गहने । तोडोनि मऱ्हाठिया शब्दसोपाने । रचिली धर्मनिधाने । श्रीइनिवृत्तिदेवे ॥9॥
संपूर्ण धर्माची ठेव अशा निवृत्तिनाथांनी या संगमाच्या तीरावरील मूळची संस्क त भाषेची दुर्गम अरण्ये तोडून मराठी शब्दरूपी पायर्या बांधल्या.
10-11
म्हणौनि भलतेणे एथ सद्भावे नाहावे । प्रयागमाधव विश्वरूप पहावे । येतुलेनि संसारासि द्यावे । तिळोदक ॥10॥
म्हणून कोणीहि येथे सद्भाव धरून स्नान करावे व या प्रयागांतील माधव जे विश्वरूप त्याचे दर्शन घ्यावे. एवढ्यानेच त्यांना संसाराचा निरास करता येईल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-11
हे असो ऐसे सावयव । एथ सासिन्नले आथी रसभाव । तेथ श्रवणसुखाची राणीव । जोडली जगा ॥11॥
असे हे सावयव रूपकाचे निरूपण पुरे. या अध्यायात रसभाव भरास आलेले आहेत आणि येथे सर्व जगाला श्रवणाच्या आनंदाचे राज्यच प्राप्त होईल. (श्रवणापासून परमसुख प्राप्त होईल असा अर्थ. )
12-11
जेथ शांताद्भुत रोकडे । आणि येरा रसा पडप जोडे । हे अल्पचि परी उघडे । कैवल्य एथ ॥12॥
जेथे केवळ शांतरस व अद्भूतरस हे स्पष्ट आहेत आणि बाकीच्या रसांनाही शोभा म्हणजे मान प्राप्त झाला आहे. हे थोडे असले तरी उघड मोक्ष करून देणारे आहेत.
13-11
तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपे विसंवता ठावो । परी अर्जुन सदैवांचा रावो । जो एथही पातला ॥13॥
तो हा अकरावा अध्याय म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या विश्रांतिच्या ठिकानांचे निरूपण करणारा होय. पण अर्जुन मात्र सर्व भाग्यवानांमध्ये थोर भाग्यवान आहे, कारण तो येथेहि प्राप्त झाला. (जो देवाचा अपणपे विसंबता ठावो – भगवंताचा सगुण साकार चतुर्भुजादि मूर्त्याविष्कार या विश्वरूपापासूनच होतो व तेथेच पुनः अंतर्धान पावतो असा अर्थ)
14-11
एथ अर्जुनचि काय म्हणो पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला । जे गीतार्थु हा आला । मऱ्हाठिये ॥14॥
एकट्या अर्जुनालाच हा लाभ प्राप्त झाला असे का म्हणावे ? गीतार्थ हा आता मराठी भाषेत आला असल्यामुळे, वाटेल त्याला सहज प्राप्त होण्याजोगा झाला आहे.
15-11
याचिलागी माझे । विनविले आइकिजे । तरी अवधान दीजे । सज्जनी तुम्ही ॥15॥
म्हणूनच तुम्ही संतजनांनी एकाग्र चित्त द्यावे व माझी विनंति ऐकावी.
16-11
तेवीचि तुम्हा संताचिये सभे । ऐसी सलगी कीर करू न लभे । परी मानावे जी तुम्ही लोभे । अपत्या मज ॥16॥
त्याचप्रमाणे तुमच्यासारख्या संत समाजांमध्ये मी असा धीटपणा करणे खरोखर बरे नाही, पण तुम्ही आईबापांनी माझ्यासारख्या लेंकरांच्या विनंतीला पुत्रलोभाने मान द्यावा.
17-11
अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे । का करविलेनि चोजे न रिझे । बाळका माय ॥17॥
अहो ! राघूला आपणच शिकवावे व शिकून राघू बोलू लागला म्हणजे आपणच आनंदाने मान डोलवावी किंवा लेंकरांकडून एखादी कौतुकाची गोष्ट करवून, ती पाहून आई आपणच आनंदी होत नाही काय ?
18-11
तेवी मी जे जे बोले । ते प्रभु तुमचेचि शिकविले । म्हणौनि अवधारिजो आपुले । आपण देवा ॥18॥
त्याप्रमाणे मी जे जे बोलतो ते ते, महाराज ! तुम्ही शिकविलेलेच बोलतों, म्हणून देवा ! तुम्ही शिकविलेलेंच तुम्ही ऐका.
19-11
हे सारस्वताचे गोड । तुम्हीचि लाविले जी झाड । तरी आता अवधानामृते वाड । सिंपोनि कीजे ॥19॥
हे ललितवाङ्गमयाचे मधूर झाड तुम्हीच लाविले, तेव्हा आता त्यावर अवधानरूपी अमृताचे सिंचन करून त्याचे पालन पोषन करावे.
20-11
मग हे रसभाव फुली फुलेल । नानार्थ फळभारे फळा येईल । तुमचेनि धर्मे होईल सुरवाडु जगा ॥20॥
मग हे झाड, नानरसभावरूपी फुलाने फुलून जाईल आणि अनेक अर्थरूपी फळभाराने ते फलद्रूप होईल. तुमच्या या परोपकाररूपी धर्माने सर्व जगाला सुखाचा लाभ होईल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-11
या बोला संत रिझले । म्हणती तोषलो गा भले केले । आता सांगै जे बोलिले । अर्जुने तेथ ॥21॥
श्रीज्ञानेश्वर माउलिच्या या बोलण्याने संतांना फार समाधान झाले व ते म्हणाले, बाबा ! फार चांगले बोललास ! आम्हाला संतोष झाला आता पुढे अर्जुन काय म्हणाला ते सांगा.
22-11
तव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनांचे बोलणे । मी प्राकृत काय सांगो जाणे । परी सांगवा तुम्ही ॥22॥
तेव्हा निवृत्तिदासांचे दास श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो महाराज ! श्रीकृष्णार्जुनाचे पुढे काय बोलणे झाले, हे मज अज्ञानी लेंकराला सांगता येईल ? परंतु तुम्हीच मजकडून बोलवा.
23-11
अहो रानीचिया पालेखाइरा । नेवाणे करविले लंकेश्वरा । एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई ॥23॥
अहो ! जंगलांतील झाडाचा पाला खाऊन राहणार्या वानरांकडून लंकेश्वर जो रावण त्याचा पराभव श्रीरामांनी करवीला. एकटा अर्जुन, पण त्याने कौरवाचे अक्रोड अक्षौहिणी सैन्य जिंकले नाही काय ?
24-11
म्हणौनि समर्थ जे जे करी । ते न हो न ये चराचरी । तुम्ही संत तयापरी । बोलवा माते ॥24॥
म्हणून समर्थ जे करू म्हणतील ते जगात घडून येणार नाही असे होत नाही. त्याप्रमाणे आपण संतजनांनीहि माझ्याकडून बोलवावे.
25-11
आता बोलिजतसे आइका । हा गीताभाव निका । जो वैकुंठनायका- । मुखौनि निघाला ॥25
श्रीवैकुंठीचा स्वामी जो भगवान श्रीकृष्ण, त्याच्या मुखातून जो उत्तम गीतोपदेश निघाला तो मी सागतों, ऐका.
26-11
बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदी प्रतिपाद्य देवता । तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथी ॥26
धन्य धन्य हा गीता ग्रंथ ! कारण संपूर्ण वेदांनी ज्यांचे वर्णन केले; तोच भगवान श्रीकृष्ण साक्षात् हा ग्रंथ सांगत आहे.
27-11
तेथिचे गौरव कैसे वानावे । जे श्रीशंभूचिये मती नागवे । ते आता नमस्कारिजे जीवेभावे । हेचि भले ॥27॥
ज्या गीताग्रंथाची थोरवी, साक्षात् श्रीशंकरालाहि कळलि नाही, त्याची थोरवी मी कशी वर्णन करणार ? तेव्हा मनोभावे तिला नमस्कार करावा, हेच उत्तम.
28-11
मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपी दिठी । पहिली कैसी गोठी । करिता जाहला ॥28॥
मग विश्वरूपदर्शनाचे ठिकाणी लक्ष ठेऊन, त्या अर्जुनाने भगवंताशी बोलण्याला सुरुवात केली, ते ऐका.
29-11
हे सर्वही सर्वेश्वरु । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु । तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनासी ॥29॥
हे सर्व चराचर जग, भगवानच नटला आहे असा बुध्दिंत अनुभवाचा जो अविष्कार झाला, तो बाहेर डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा
30-11
हे जिवाआंतुली चाड । परी देवासि सांगता सांकड । का जे विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावे ? ॥30॥
अशी त्याच्या अंतःकरणात इच्छा उत्पन्न झाली; पण ही इच्छा देवाला सांगणे कठीन वाटले कारण जे विश्वरूप, भगवान अत्यंत गुप्त ठेवतात, कोणाला दाखवत नाहीत, ते दाखवा म्हणून आपण कसे म्हणावे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-11
म्हणे मागा कवणी कही । जे पढियंतेने पुसिले नाही । ते सहसा कैसे काई । सांगा म्हणो ? ॥31॥
अर्जुन मनात म्हणतो, पूर्वी कधी कोणी अत्यंत आवडत्या भक्तांनीहि जे विचारले नाही, ते मला सांगा, असे एकदम कसे म्हणूं
32-11
मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहूनी अंतरंगु । परी तेही हा प्रसंगु । बिहाली पुसो ॥32॥
मी जरी अत्यंत प्रेमांतील असलो, तरी आई लक्ष्मीपेक्षा जवळचा कसा होईन ? पण तीहि विश्वरूपदर्शनाची गोष्ट काढण्यास भ्याली.
33-11
माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरी काय होईल गरुडाचिया येतुली ? । परी तोही हे बोली । करीचिना ॥33॥
मी वाटेल तशी भगवंताची सेवा केली असली, तरी ती गरूडाच्या सेवेची बरोबरी करील काय ? पण त्यानेहि ही गोष्ट काढली नाही.
34-11
मी काय सनकादिकांहूनि जवळा । परी तयांही नागवेचि हा चाळा । मी आवडेन काय प्रेमळा । गोकुळींचिया ऐसा ? ॥34॥
मी काय सनकादिकांपेक्षाहि जवळचा निकटवर्ती आहे ? पण त्यांनाही ही इच्छा धरता आली नाही. प्रेमळ गोकुळवासी जनांसारखा मी भगवंताला आवडतो काय ?
35-11
तयातेही लेकुरपणे झकविले । एकाचे गर्भवासही साहिले । परी विश्वरूप हे राहविले । न दावीच कवणा ॥35॥
पण त्यांनाहि बाळपणाने, आपले सामर्थ्य झांकून टाकून फसविले. आपल्या अंबरीष भक्ताचे गर्भवास आपण सोसले, पण आपले विश्वरूप गुप्तच ठेवले, कोणासच दाखिवले नाही.
36-11
हा ठायवरी गुज । याचिये अंतरीचे हे निज । केवी उराउरी मज । पुसो ये पा ? ॥36॥
इतके हे अत्यंत गुप्त ठेवलेले व भगवंतांनी अंतःकरणात माझे मूळरूप होय असे ज्याला मानले, ते हे विश्वरूप एकदम मला कसे विचारता येईल ?
37-11
आणि न पुसेचि जरी म्हणे । तरी विश्वरूप देखिलियाविणे । सुख नोहेचि परी जिणे । तेही विपाये ॥37॥
आणि जाऊ द्या, विचारूच नये ! असे म्हणून सोडून द्यावे, तर विश्वरूप पाहिल्यावाचून मनाची तळमळ जाऊन सुख होणार नाही. एवढेच नाही, तर तळमळीमुळे वाचणेहि कठीण आहे.
38-11
म्हणौनि आता पुसो अळुमाळसे । मग करू देवा आवडे तैसे । येणे प्रवर्तला साध्वसे । पार्थु बोलो ॥38॥
म्हणून सहजगत्या थोडेसे विचारून पाहावे; मग देव वाटेल ते करोत, असा विचार करून भीत भीत अर्जुनाने बोलायला सुरुवात केली.
39-11
परी तेचि ऐसेनि भावे । जे एका दो उत्तरांसवे । दावी विश्वरूप आघवे । झाडा देउनी ॥39॥
पण तेच विचारणे अशा प्रेमभावाने केले, की अर्जुनाचे मुखातून एक दोन शब्द निघतात न निघतात, तोच भगवंतांनी आपले झाडून संपूर्ण विश्वरूप दाखविले.
40-11
अहो वासरू देखिलियाचिसाठी । धेनु खडबडोनि मोहे उठी । मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा धरे ? ॥40॥
अहो ! वासरू पाहिल्या बरोबर गाय, प्रेमाने एकदम खडबडून उठते मग वांसराचे तोंड तिच्या स्तनाला लागल्यावर पान्हा धरवेल काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-11
पाहा पा तया पांडवाचेनि नांवे । जो कृष्ण रानीही प्रतिपाळू धावे । तयाते अर्जुने जव पुसावे । तव साहील काई 41॥
असे पहा की, ज्या पांडवाचे संरक्षण करण्यासाठी श्री कृष्ण भगवान रानावनांतही धावले, त्यांना अर्जुन जे विचारील ते सांगताना राहवेल का.
42-11
तो सहजेचि स्नेहाचे अवतरण आणि येरु स्नेहा घातले आहे माजवण । ऐसिये मिळवणी वेगळेपण । उरे हेचि बहु ॥42॥
श्रीकृष्ण भगवान हे मूर्तीमंत स्नेहच होय त्यांना अर्जुन रुपी भक्ष्य मिळाल्याने या दोघांच्या ऐक्यभावात यांच्या दोन वेगळ्या मूर्ती दिसतात हाच चमत्कार होय.
43-11
म्हणौनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरूप होईल आपैसा । तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजे तरी ॥43॥
म्हणून अर्जुनाने विचारल्यावर देव आपोआप विश्वरूप धारण करतील. तरी आता आरंभीचा तो प्रसंग ऐकावा
अर्जुन उवाच:
मदनुग्रहायपरमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम्
यत्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयंविगतो मम ॥11. 1॥
44-11
मग पार्थु देवाते म्हणे । जी तुम्ही मजकारणे । वाच्य केले जे न बोलणे । कृपानिधे ॥44॥
मग पार्थ देवाला म्हणाला, ” हे कृपानिधी, तुम्ही माझ्या करीता शब्दातील जे गुह्य ते बोलून दाखवले.
45-11
जै महाभूते ब्रह्मी आटती । जीव महदादींचे ठाव फिटती । तै जे देव होऊनि ठाकती । ते विसवणे शेषींचे ॥45॥
जेंव्हा पंचमहाभूते ब्रम्हामध्ये लीन होतात आणि जीव व माया लय पावतात, त्यावेळेस परमात्मा जे रूप धारण करून राहतात, ते शेवटचे स्वरूप.
46-11
होते हृदयाचिये परिवरी । रोविले कृपणाचिये परी । शब्दब्रह्मासही चोरी । जयाची केली ॥46॥
कृपन मनुष्याप्रमाणे जे ह्रदयमंदिरांत लपवून ठेवले होते आणि शब्दब्रह्मापासून म्हणजे वेदापासून जे चोरून ठेवले होते – म्हणजे वेद देखील या स्वरूपाला जाणू शकला नाही. (या स्वरूपाचा अनुभव नुसत्या ज्ञान्याला येत नाही. हा अनुभव भक्तांनाच येतो. )
47-11
ते तुम्ही आजि आपुले । मजपुढा हिये फोडिले । जया अध्यात्मा वोवाळिले । ऐश्वर्य हरे ॥47॥
ते तुम्ही आज माझ्यापुढे आपले ह्रदय उघडे केले, या अध्लात्मस्वरूपावरून शंकराने कैसासाचे राज्य ओवाळून टाकले व स्मशानांत वास केला. (शुध्द आत्मस्वरूपाला धरून जेंवढे असते, त्याला अध्यात्म म्हणतात, भगवंताचे निर्गुणस्वरूप स्वाभाविक असल्यामुळे जसे ते अध्यात्म म्हटले जाते, तसेच विश्वरूपहि स्वाभाविक असल्यामूळे, येथे त्यालाही अध्यात्म म्हटले आहे. )
48-11
ते वस्तु मज स्वामी । एकिहेळा दिधली तुम्ही । हे बोलो तरी आम्ही । तुज पावोनि कैचे ॥48॥
ती अध्यात्मवस्तु, प्रभो ! मला एकदम तुम्ही दिली असे म्हणावे, तर आम्ही तुझ्यापासून निराळे आहो कोठे ?
49-11
परी साचचि महामोहाचिये पुरी । बुडालेया देखोनि सीसवरी । तुवा आपणपे घालोनि श्रीहरी । मग काढिले माते ॥49॥
पण खरोखरीच मी या संसाररूपी महामोहाच्या पुरांत डोक्यापर्यंत बुडालो आहे, हे पाहून देवा ! आपण स्वतः त्यात उडी टाकून मला बाहेर काढलें.
50-11
एक तू वाचूनि काही । विश्वी दुजियाची भाष नाही । की आमुचे कर्म पाही । जे आम्ही आथी म्हणो ॥50
अद्वैतदृष्टिने पाहता, तिन्ही काळी एका तुझ्यावाचून या संपूर्ण विश्वांत दुसर्या वस्तुची गोष्ट देखील नाही; पण ‘आम्ही आहो’ असे म्हणतों, हे आमचे दुर्दैव पहा कसे आहे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
51-11
मी जगी एक अर्जुनु । ऐसा देही वाहे अभिमानु । आणि कौरवाते इया स्वजनु । आपुले म्हणे ॥51॥
या जगात मी एक कोणी अर्जुन आहे, असा या देहाच्या ठिकाणी मी अभिमान वागवित होतो व हे कौरव माझे सोयरे आहेत असे म्हणत होतो.
52-11
याहीवरी याते मी मारीन । म्हणे तेणे पापे के रिगेन । ऐसे देखत होतो दुःस्वप्न । तो चेवविला प्रभु ॥52॥
यावरहि आणखि मी यांना मारीन, तर त्या पापामुळे माझी काय गति होईल असे खोटेच स्वप्न पाहत होतो; पण भगवंता ! तू मला जागे केलेस.
53-11
देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालो लक्ष्मीपती । होतो उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ॥53॥
हे देवा ! खरी वस्ती सोडून आकाशांतील गंधर्वनगराकडे जायला निघालो. पाणी पिण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतो.
54-11
जी किरडू तरी कापडाचे । परी लहरी येत होतिया साचे । ऐसे वाया मरतया जीवाचे । श्रेय तुवा घेतले ॥54॥
खरोखर कापडाचा केलेला साप, पण तो सत्य मानल्यामुळे त्याच्या विषाची बाधा होऊन लहरी येऊ लागल्या होत्या आणि आता मी मरणार अशी व्यर्थ कल्पना करणार्या जीवाला वांचविण्याचे श्रेय तुम्ही घेतले.
55-11
आपुले प्रतिबिंब नेणता । सिंह कुहा घालील देखोनि आता । ऐसा धरिजे तेवी अनंता । राखिले माते ॥55॥
आपलेच प्रतिबिंब आहे असे न जाणता (हा दुसरा सिंह आहे असे जाणून त्याच्याशी लढण्याकरिता आता) हा सिंह उडी टाकतो असे पाहून त्याला मागे जसे धरून ठेवावे, त्याप्रमाणे देवा ! तुम्ही माझे रक्षण केले.
56-11
एऱ्हवी माझा तरी येतुलेवरी । एथ निश्चय होता अवधारी । जे आताची ️सातांही सागरी एकत्र मिळिजे ॥56॥
नाही तर, पहा देवा ! माझा असा पक्का निश्चय होता की आतांच सातही समुद्र एकत्र मिळून –
57-11
हे जगचि आघवे बुडावे । वरी आकाशहि तुटोनि पडावे । परी झुंजणे न घडावे । गोत्रजेशी मज ॥57॥
सर्व जग बुडो की आकाश तुटून पडो, पण काही झाले तरी आपल्यांच स्वजनांशी लढू नये.
58-11
ऐसिया अहंकाराचिये वाढी । मिया आग्रहजळी दिधली होती बुडी । चांगचि तू जवळा एऱ्हवी काढी । कवणु माते ॥58॥
अशा प्रबळ अहंकाराने मी आग्रहरूपी जळांत बुडी मारून बसलो होतो, पण इतके फार चांगले झाले की तू जवळच होतास, नाही तर कोणी मला त्यातून काढीले असते ?
59-11
नाथिले आपण पा एक मानिले । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविले । थोर पिसे होते लागले । परि राखिले तुम्ही ॥59॥
मी कोणी निराळा नसतांना, मी कोणी एक आहे अशी कल्पना केली आणि माझ्याहून कोणी निराळा नसतांना निराळे मानून त्याला गोत्रज हे नांव ठेवलें. असा विलक्षण भ्रम झाशा होता, पण तू माझे रक्षण केलेस.
60-11
मागा जळत काढिले जोहरी । तै ते देहासीच भय अवधारी । आता हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट ॥60॥
पूर्वी जळत असलेल्या लाक्षागृहांतून आम्हाला वांचविलेस, मात्र त्यावेळी देहालाच भीति होती, पण ही दुसरी लाक्षागृहाची भीति चैतन्यासह देहाला प्राप्त झाली.
(लौकिक अग्नि देहाचा नाश करतो; पण अविवेकरूपी अग्नि चैतन्यासहित देहांच्या नाशाची भीति उत्पनान करतो, असा अर्थ. )
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-11
दुराग्रह हिरण्याक्षे । माझी बुद्धि वसुंधरा सूदली काखे । मग माहार्णव गवाक्षे । रिघोनि ठेला ॥61॥
मी युध्द करणार नाही, या दुराग्रहरूपी हिरण्याक्षाने माझी बुध्दिरूपी पृथ्वी आपल्या काखेंत घालून अविवेकरूपी समुद्राच्या भगदाडांतून तो पाताळांत जाऊन राहिला होता – (म्हणजे काही झाले तरी मी युध्द करणारच नाही अशा अट्टाहासामुळे माझी बुध्दि विचारहीन होऊन अविवेकाने कौरव हे माझे स्वजन आहेत या मोहात सापडली होती. )
62-11
तेथे तुझेनि गोसावीपणे । एकवेळ बुद्धीचिया ठाया येणे । हे दुसरे वराह होणे । पडिले तुज ॥62॥
येथे तुझ्यासारखा समर्थ स्वामी मिळाल्यामुळे, माझी बुध्दि एकदांची विवेकरूपी आपल्या मूळ ठिकाणावर आली. माझ्या बुध्दिचा उध्दार करण्याकरिता तुला दुसर्यांदा हे असे वराह व्हावे लागले.
63-11
ऐसे अपार तुझे केले । एकी वाचा काय मी बोले । परी पांचही पालव मोकलिले । मजप्रती ॥63॥
देवा ! तुझे असे उपकार मी या एका वाचेने काय सांगणार ? पण एवढे मात्र खरे की तू माझ्या ठिकाणी आपले पंचप्राण अर्पण केले आहेस.
64-11
ते काही न वचेचि वाया । भले यश फावले देवराया । जे साद्यंत माया । निरसिली माझी ॥64॥
देवा ! तू माझ्याकरिता श्रम केलेस, ते काही वाया गेले नाहीत; कारण तू माझा संपूर्ण अज्ञानभ्रम नाहीसा केलास असे थोर यश तुला प्राप्त झाले.
65-11
आजी आनंदसरोवरीची कमळे । तैसे हे तुझे डोळे । आपुलिया प्रसादाची राउळे । जयालागी करिती ॥65॥
परमानंदरूपी सरोवरांतील जणू काय कमळेच, असे हे तुझे डोळे, ज्याच्यावर कृपेचे मंदिर करतील-
66-11
हा हो तयाही आणि मोहाची भेटी । हे कायसी पाबळी गोठी ? । केउती मृगजळाची वृष्टी । वडवानळेसी ॥66॥
अशा त्याच्याशी मोहाची किंवा अविवेकाची गाठ पडणे, ही अगदीच दुर्घट गोष्ट कशी असणार ? जो वडवानळ समुद्राचे पाण्याने विझत नाही, त्याला मृगजळाच्या वृष्टीने काय होईल –
67-11
आणि मी तव दातारा । ये कृपेचिये रिघोनि गाभारा । घेत आहे चारा । ब्रह्मरसाचा ॥67॥
आणि प्रभो ! कृपासागरा ! मी तर तुमच्या कृपेच्या गाभार्यातच बसून ब्रह्मानंदाचा अस्वाद घेत आहे.
68-11
तेणे माझा जी मोह जाये । एथ विस्मो काही आहे ?तरी उद्धरलो की तुझे पाने शिवतले आहाती ॥68॥
त्यामुळे माझे मोहरूपी अज्ञान नाहीसे झाले त्यात काय आश्चर्य आहे ? पण आपल्या कृपेने माझा उध्दार झाला हे मी आपल्या पायावर हात ठेवून सांगतो.
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥11. 2॥
69-11
पै कमलायतडोळसा । सूर्यकोटितेजसा । मिया तुजपासोनि महेशा । परिसिले आजी ॥69॥
हे कमळाला आश्रय होणारे ज्याचे डोळे आहेत अशा व कोटी सूर्यांचे तेजाप्रमाणे ज्यांची अंगकांति अशा सर्वेश्वरा ! मी तुझ्यापासून आज ऐकीले.
70-11
इये भूते जयापरी होती । अथवा लया हन जैसेनि जाती । ते मजपुढा प्रकृती । विवंचिली देवे ॥70॥
ही सर्व भूतसृष्टि ज्या प्रकृतिपासून उत्पन्न होते व जी मध्ये पुनः लय पावते, त्या प्रकृतीचे संपूर्ण विवेचन माझ्यासमोर केले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-11
आणि प्रकृती कीर उगाणा दिधला । वरि पुरुषाचाही ठावो दाविला । जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौता वेद 71॥
आणि माझ्या प्रकृतीचे झाडून विवेचन केले तसेंच ज्याचे कीर्तिरूप वस्र पांघरून वेद सवस्र झाला, त्या परमात्म्याची स्वरूपस्थितिहि सांगितली.
72-11
जी शब्दराशी वाढे जिये । का धर्मा{ऐ}शिया रत्नांते विये । ते एथिचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणौनि ॥72॥
अहोजी महाराज ! शब्दराशीरूप वेदाचा जो एवढा विस्तार झाला आहे व टिकून राहिला आहे किंवा धर्मासारख्या रत्नाला ज्यांनी जो जन्म दिला, तो आपल्या सामर्थ्यरूप पायाचा आश्रय केला म्हणूनच होय.
73-11
ऐसे अगाध माहात्म्य । जे सकळमार्गैकगम्य । जे स्वात्मानुभवरम्य । ते इयापरी दाविले ॥73॥
असे आपले सर्व मार्गाच्या ऐक्यतेने कळणारे व स्वानुभवालाहि रमविणारे जे तुझे अगाध माहात्म्य मला तुम्ही दाखविले.
74-11
जैसा केरु फिटलिया आभाळी । दिठी रिगे सूर्यमंडळी । का हाते सारूनि बाबुळी । जळ देखिजे ॥74॥
ज्याप्रमाणे आकाशांत आलेले ढग निहीसे झाले असता सूर्यमंडलाचे ठिकाणी दृष्टि जाते किंवा हाताने शेवाळ बाजुला सारूणच पाणी पाहता येते.
75-11
नातरी उकलतया सापाचे वेढे । जैसे चंदना खेंव देणे घडे । अथवा विवसी पळे मग चढे । निधान हाता ॥75॥
किंवा सर्पाचे वेढे दूर केले असताच चंदनाच्या झाडाला मिठी मारता येते अथवा द्रव्यावर बसलेले पिशाच्च पळाले की ते द्रव्य आपल्या हाती येते.
76-11
तैसी प्रकृती हे आड होती । ते देवेचि सारोनि परौती । मग परतत्त्व माझिये मती । शेजार केले ॥76॥
त्याप्रमाणे माझ्या व आत्मस्वरूपाच्या मध्ये जो अज्ञानप्रकृतिचा पडदा होता, तो आपण देवा ! दूर सारला आणि माझ्या बुध्दी परतत्वाचे शय्याघर केले.
77-11
म्हणौनि इयेविषयींचा मज देवा भरवसा कीर जाहला जीवा । परी आणीक एक हेवा । उपनला असे ॥77॥
म्हणून या आत्मस्वरूपाविषयी आता माझा दृढ विश्वास झाला आहे; पण आणखी एक उत्कट इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली आहे.
78-11
तो भिडा जरी म्हणो राहो । तरी आना कवणा पुसो जावो । काय तुजवाचोनि ठावो । जाणत आहो आम्ही ? ॥78॥
भिडेने ती इच्छा बोलून दाखवत नाही असे म्हणावे. , तर दुसर्या कोणाला मी तिच्याविषयी विचारणार ? तुझ्यावाचून आम्ही दुसरे ठिकाण जाणतो काय ?
79-11
जळचरु जळाचा आभारु धरी । बाळक स्तनपानी उपरोधु करी । तरी तया जिणया श्रीहरी । आन उपायो असे ? ॥79॥
पाण्यात राहणार्या प्राण्यांनी पाण्यात राहण्याचा संकोच केला किंवा लहान मुलाने आईच्या स्तनपानाविषयी भीड धरली, तर त्याच्या जगण्याला दुसरा उपाय काय आहे ?
80-11
म्हणौनि भीड सांकडी न धरवे । जीवा आवडे तेही तुजपुढा बोलावे । तव राहे म्हणितले देवे । चाड सांगै ॥80॥
म्हणून भीड किंवा संकोच धरू नये व आपल्या मनाला वाटते ते खुशाल तुमच्यासमोर बोलावे, असे वाटते. तेव्हा भगवान म्हणाले, अर्जुना ! बोलू नकोस. मनातली इच्छा सांग
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
एवमेतद्यथाऽऽत्थ त्वमात्मानं परमेश्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥11. 3॥
81-11
मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्ही केली जे गोठी । तिया प्रतीतीची दिठी । निवाली माझी ॥81॥
त्यावर तो अर्जुन बोलला; अर्जुन म्हणतो, देवा ! तुम्ही आपल्या परमेश्वरस्वरूपाविषयी जे निरूपण केले, त्यायोगे आता माझ्या बौध्दिक अनुभवदृष्टिने समाधान झालें.
82-11
आता जयाचेनि संकल्पे । हे लोकपरंपरा होय हारपे । जया ठायाते आपणपे । मी ऐसे म्हणसी ॥82॥
आता ज्याच्या संकल्पाने ही सृष्टिपरंपरा होते व लय पावते व ज्या स्वरूपाला ‘ते स्वतः मी आहे’ असे म्हणतोस.
83-11
ते मुद्दल रूप तुझे । जेथूनि इये द्विभुजे हन चतुर्भुजे सुरकार्याचेनि व्याजे । घेवो घेवो येसी ॥83॥
जेथून तू द्विभूज किंवा चतुर्भुज रूप धारण करून देवादिकांचे कार्य करण्याकरिता वारंवार जगात प्रगट होतोस, ते तुझे मुळचे रूप
84-11
पै जळशयनाचिया अवगणिया । का मत्स्य कूर्म इया मिरवणिया । खेळु सरलिया तू गुणिया । सांठविसी जेथ ॥84॥
क्षीराब्धींतील जलावर शयन करणारे सोंग असो किंवा मत्स्य, कुर्म इत्यादिरूपाने मिरवणे असो, हे खेळ करणार्या गारूड्या ! हे तुझे खेळ संपले की ही तुझी रूपे ज्याठिकाणी सांठविली जातात
(येथे ‘खेळ’ या शब्दाचा अर्थ ” खोटा ” असा अर्थ नसून ” लिलेने विग्रह धरणे ” असा आहे. या ओवीत भगवंताच्या क्षीराब्धिजळशायीरूप व मत्स्यादिरूपे घेण्याला खेळ म्हटले आहे; म्हणून ती रूपे मिथ्या असे समजता येत नाहीत. कारण वेदान्तदृष्टिने एक अविद्येचे कार्यच मिथ्या व नाशीवंत आहे. ” नित्याविद्यानिवृत्तत्वात् ” भगवान नित्य अविद्यारहित आहे असे वेदान्तांत मानले असल्यामुळे भगवंताचे कोणतेहि रूप अविद्याजन्य नसते. अर्थात् ‘भगवंताची ही रूपे हा खेळ आहे’ या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, भगवंताची ही सर्व रूपे व विश्वरूपहि पूर्ण सच्चिदानंद स्वरूप राहूनच, ती सहज लिलेने घेतली जातात. त्यात विश्वरूप हे पहिले लीलाविग्रहीरूप असून क्षीराब्धिजळशायी किंवा मत्स्यकूर्मादि ही विश्वरूपाची लीलाविग्रही रूपे आहेत. अर्थात जडविनाशी, कल्पित अशा अविद्येच्या अपेक्षेने विद्योपाधि ही संज्ञा असलेल्या ज्ञानप्रधान विद्यावृत्तीने ही सर्व रूपे भगवान घेत असल्यामुळे व विद्यावृत्तीनेच त्यांचा अनुभव येत असल्यामुळे, ती खोटी, विनाशी म्हणता येत नाहीत. )
85-11
उपनिषदे जे गाती । योगिये हृदयी रिगोनि पाहाती । जयाते सनकादिक आहाती । पोटाळुनिया ॥85॥
उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगीलोक अंतर्मुखदृष्टि करून जे पाहतात आणि सनकादिक ज्या स्वरूपाला नेहमी मिठी मारून आहेत.
86-11
ऐसे अगाध जे तुझे । विश्वरूप कानी ऐकिजे । ते देखावया चित्त माझे । उतावीळ देवा ॥86॥
असे अतर्क्य जे तुझे विश्वरूप नुसते कानांनी ऐकतो, ते डोळ्यांनी पाहण्याकरिता मी फार उतावीळ झालो आहे.
87-11
देवे फेडूनिया सांकड । लोभे पुसिली जरी चाड । तरी हेचि एकी वाड । आर्ती जी मज ॥87॥
देवांनी माझ्या मनातील संकोच नाहीसा करून, काय इच्छा आहे ती सांग, असे मोठ्या प्रेमाने विचारलें. म्हणून सांगतो की माझ्या मनात हीच एक भारी इच्छा आहे.
88-11
तुझे विश्वरूपपण आघवे । माझिये दिठीसि गोचर होआवे । ऐसी थोर आस जीवे । बांधोनि आहे ॥88॥
तुझे संपूर्ण विश्वरूप माझ्या दृष्टिस दिसावे अशी तीव्र इच्छा मी मनात धरून आहे
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयाऽत्मानमव्ययम् ॥11. 4॥
89-11
परी आणीक एक एथ शारङ्गी । तुज विश्वरूपाते देखावयालागी । पै योग्यता माझिया आंगी । असे की नाही ॥89॥
पण देवा ! येथे आणखी एक गोष्ट आहे, तुझ्या विश्वरूपाला पाहण्याकरिता लागणारी योग्यता माझ्या अंगी आहे किंवा नाही
90-11
हे आपले आपण मी नेणे । ते का नेणसी जरी देव म्हणे । तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचे ? ॥90॥
हे मी आपले आपणच जाणू शकत नाही. तुझी योग्यता आहे किंवा नाही, हे तू का जाणू शकत नाहीस असे जर, देवा ! तुम्ही म्हणाल, तर रोगी आपल्या रोगाचे निदान जाणतो काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-11
आणि जी आर्तीचेनि पडिभरे । आर्तु आपुली ठाकी पै विसरे । जैसा तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज ॥91॥
आणि ज्याप्रमाणे अत्यंत तहानलेला पुरुष जसा मला समुद्रहि पुरेसा होत नाही असे म्हणतो, त्याप्रमाणे महाराज ! इच्छा करणार्या पुरुषाची इच्छा अत्यंत वाढली असता त्याला आपल्या योग्यतेचा विसर पडतो.
92-11
ऐशा सचाडपणाचिये भुली । न सांभाळवे समस्या आपुली । यालागी योग्यता जेवी माउली । बालकाची जाणे 92॥
अशाप्रकारे अत्यंत इच्छेच्या वेगामुळेच भूल पडून, माझ्याने आपली योग्यता सांभाळली जात नाही; म्हणून आई जशी आपल्या मुलाला काय व किती पचेल, हे जाणतें.
93-11
तयापरी श्रीजनार्दना । विचारिजो माझी संभावना । मग विश्वरूपदर्शना । उपक्रम कीजे ॥93॥
त्याप्रमाणे, जनार्दना ! माझ्या योग्यतेचा विचार करा व मग विश्वरूपच दाखविण्याला प्रारंभ करा.
94-11
तरी ऐसी ते कृपा करा । एऱ्हवी नव्हे हे म्हणा अवधारा । वाया पंचमालापे बधिरा । सुख केउते देणे ? ॥94॥
म्हणून योग्यता असेल, तर विश्वरूप दाखविण्याची कृपा करा, नाहीतर विश्वरूपच पाहण्याची तुझी योग्यता नाही, असे म्हणा. बहिर्याला व्यर्थ कोमल स्वराचे काय सुख द्यायचें ? (त्याप्रमाणे माझी योग्यता नसतांना आपण विश्वरूप दाखविले तरी मला काय त्याचे सुख होणार ?)
95-11
एऱ्हवी येकले बापियाचे तृषे । मेघ जगापुरते काय न वर्षे ? । परी जहालीही वृष्टि उपखे । जऱ्ही खडकी होय ॥95॥
नाही तरी एका भाग्यवान चातकाकरिता वर्षाव करतांना मेघ सर्व पृथ्वीवरच पडत नाहीत काय ? पण पृथ्वीवर वर्षाव झाला तरी खडकावर झालेला वर्षाव व्यर्थच जातो.
96-11
चकोरा चंद्रामृत फावले । येरा आण वाहूनि काय वारिले ? । परी डोळ्यांवीण पाहले । वाया जाय ॥96॥
पूर्ण चंद्राच्या प्रकाशांत चकोरांना अमृतकण मिळतात आणि बाकीच्यांना चंद्राने आपल्याप्रकाशांतील अमृतकण वेचायला शपथपूर्वक मनाई केली आहे काय ? पण चकोराची अमृतकण पाहण्याची दृष्टि इतरांना नसल्यामुळे, नुसता चंद्राचा प्रकाश पाहण्याने तो लाभ होत नाही.
97-11
म्हणौनि विश्वरूप तू सहसा । दाविसी कीर हा भरवसा । का जे कडाडा आणि गहिंसा- । माजी नीत्य नवा तू की ॥97॥
म्हणून म्हटल्याबरोबर तू एकदम विश्वरूप दाखविशील हा मला पक्का विश्वास आहे; कारण उताविळपणे व अविचाराने देणार्यांमध्ये तुझे देणे नेहमीच अपूर्व असते.
98-11
तुझे औदार्य जाणो स्वतंत्र । देता न म्हणसी पात्रापात्र । पै कैवल्या ऐसे पवित्र । जे वैरियांही दिधले ॥98॥
तुझे औदार्य निरपेक्ष आहे. हे मी जाणतों; पण देतांना तू पात्रापात्रातेचा विचार करीत नाहीस. मोक्षासारखी शुध्द अशी स्थिति तू आपल्या शत्रुलाहि दिलीस.
99-11
मोक्षु दुराराध्यु कीर होय । परी तोही आराधी तुझे पाय । म्हणौनि धाडिसी तेथ जाय । पाइकु जैसा ॥99॥
खरोखरच मोक्षाची आराधना करणे (मोक्ष प्राप्त करून घेणे. ) अत्यंत कठीण आहे; पण तोहि तुझ्या पायाची आराधना करतो म्हणजे तो तुझ्या पायाच्या आश्रयानेच मिळतो – म्हणून तू जेथे त्याला पाठवितोस, तेथे तो सेवकाप्रमाणे जातो.
100-11
तुवा सनकादिकांचेनि माने । सायुज्यी सौरसु दिधला पूतने । जे विषाचेनि स्तनपाने । मारू आली 100॥
विषाने स्तन भरून तूझा प्राण घेण्याकरिता आलेल्या पुतनेलाहि, भगवंता ! त्वां सनकादिकांच्या प्रमाणे आपल्या सायुज्यमुक्तीचे सुख दिले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-11
हा गा राजसूय यागाचिया सभासदी । देखता त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्भाग्य । शब्दी निस्तेजिलासी ॥101॥
त्याचप्रमाणे दुसरा प्रसंग पहा ! पांडवांच्या राजसूययज्ञामध्ये सर्व सभासदांच्या समोर, त्रैलोक्यातील समुदाय जमला असतांना, त्या शिशुपालाकडून हजारो अपशब्दांनी तुमचा कसा पाणउतारा केला गेला
102-11
ऐशिया अपराधिया शिशुपाळा । आपणपे ठावो दिधला गोपाळा । आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदी चाड ? ॥102॥
तसा घोर अपराध करणार्याशिशुपालाला देखील गोपाळा ! तुम्ही आपल्यात मिळवून घेतले आणि उत्तानपादराजाच्या मुलाला ध्रुवाला काय ध्रुवपदाच्या प्राप्तीची इच्छा होती ?
103-11
तो वना आला याचिलागी । जे बैसावे पितयाचिया उत्संगी । की तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगी । श्लाघ्यु केला 103॥
पित्याच्या मांडीवर बसावे याच उद्देशाने तपश्चर्या करण्याकरिता तो अरण्यात आला होता, पण तुम्ही त्याला चंद्रसूर्यापेक्षाहि श्रेष्ठ केला.
104-11
ऐसा वनवासिया सकळा । देता एकचि तू धसाळा । पुत्रा आळविता अजामिळा । अपणपे देसी ॥104॥
अशा रीतीने तुझ्या करिता वनवास करणार्यांना तूच एक विचार न करता देणारा आहेस. अजामेळ पुत्राला प्रेमाने बोलावित असता तुम्ही त्याला आपलीच प्राप्ति करून दिली.
105-11
जेणे उरी हाणितलासि पांपरा । तयाचा चरणु वाहासी दातारा । अझुनी वैरियांचिया कलेवरा । विसंबसीना 105
ज्याने तुमच्या वक्षस्थलावर लाथ मारली, त्याच्या चरणाचा ठसा, अजून तुम्ही वक्षस्थलावर धारण केला आहे. अजूनहि आपल्या (शंखासूर या) शत्रूच्या शरीराला (म्हणजे शंखाला) आपण दूर करीत नाहीत.
106-11
ऐसा अपकारिया तुझा उपकारु । तू अपात्रींही परी उदारु । दान म्हणौनि दारवंठेकरु । जाहलासी बळीचा ॥106॥
असे तुम्ही अपकार करणार्यावरहि उपकार करणारे आहांत. दानाला अयोग्य असणार्यावरहि आपण उदार होऊन दान दिले आहे, बळीने सर्व पृथ्वीचे दान केले म्हणून आपण त्याचे द्वाररक्षक झालांत.
107-11
तूते आराधी ना आयके । होती पुंसा बोलावित कौतुके । तिये वैकुंठी तुवा गणिके । सुरवाडु केला ॥107॥
नामस्मरणाने तुझी आराधना करीत नव्हती किंवा तुझे नांव ऐकतहि नव्हती. कौतुकाने राघुला रामकृष्ण म्हणून बोलविण्यास शिकवित होती; पण त्या वेश्येला आपण वैकुंठसुख दिले. (गणिका महानंदा पाळलेल्या राघूला ‘राम कृष्ण हरि’ हे शब्द केवळ बोलण्याला शिकवित होती, त्यात आपण नामस्मरण करून भगवंताची आराधना करावी किंवा राघूच्या मुखातून आपण भगवंताचे नाव ऐकावे असा काही एक उद्देश तिने धरला नव्हता; तरीपण कोणत्याहि निमित्ताने भगवंताचे नाव मुखी आले असता मनुष्य उध्दरला जातो, अशा नामाच्या माहात्म्यामुळे व भगवंताच्या नामांतच रंगून तिची पापप्रवृत्ति बंद पडल्यामुळे, ती तात्काळ उध्दरली गेली. )
108-11
ऐसी पाहूनि वायाणी मिषे । आपणपे देवो लागसी वानिवसे । तो तू का अनारिसे । मजलागी करिसी ॥108॥
असे काही तरी फोल निमित्त पाहून जो तू आपली कौतुकाने प्राप्ति करून दूतोस, तो तू इतका उदार, मी विश्वरूप दाखव म्हटल्यानंतर भलतेच कसे करशील ?
109-11
हा गा दुभतयाचेनि पवाडे । जे जगाचे फेडी सांकडे । तिये कामधेनूचे पाडे । काय भुकेले ठाती ? ॥109॥
दुभत्याच्या प्रभावाने – म्हणजे इच्छिले ते देण्यास समर्थ असल्यामुळे – जी कामधेनू सर्व जगाचे दुःख नाहीसे करते, त्या कामधेनूचेच वासरू भुकेले राहील काय ?
110-11
म्हणौनि मिया जे विनविले काही । ते देव न दाखविती हे कीर नाही । परी देखावयालागी देई । पात्रता मज ॥110॥
म्हणून मी जे आपल्याला विनंति करून विश्वरूप दाखवा म्हटले, ते आपण दाखविणार नाही असे मुळींच नाही; पण ते विश्वरूप पाहण्याची पात्रता मला द्या.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-11
तुझे विश्वरूप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे । तरी आर्तीचे डोहळे । पुरवी देवा ॥111॥
माझ्या या दोन्ही डोळ्यांनी विश्वरूप पाहण्याजोगे आहे, असे जर आपणांला वाटत असेल, तर देवा ! माझी विश्वरूपदर्शनाची इच्छा पूर्ण करा.
112-11
ऐसी ठायेठावो विनंती । जव करू सरला सुभद्रापती । तव तया षड्गुणचक्रवर्ती । साहवेचिना ॥112॥
सुभद्रापती अर्जुन अशी यथायोग्य विनंति जेव्हा करू लागला तेव्हा षड्गुणैश्वर्याचा सार्वभौम राजा – म्हणजे अमर्याद षड्गुणैश्वर्यसंपन्न – जो भगवान श्रीकृष्ण, त्याला धीर धरवला नाही.
श्रीभगवानुवाच ।
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ 11. 5॥
113-11
तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळा आला वर्षाकाळु । नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ॥113॥
कारण भगवान श्रीकृष्ण, कृपारूपी अमृताने वळून आलेला जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा अत्यंत जवळ येऊन ठेपलेला पावसाळा होता किंवा श्रीकृष्ण कोकिळपक्षी होता व अर्जुन वसंतऋतु होता.
114-11
नातरी चंद्रबिंब वाटोळे । देखोनि क्षीरसागर उचंबळे । तैसा दुणेही वरी प्रेमबळे । उल्लसितु जाहला ॥114॥
किंवा वाटोळे पूर्णबिंब पाहून जसा क्षीरसागर उचंबळतो, त्याप्रमाणे अर्जुनावरील द्विगुणित झालेल्या प्रेमाने भगवान अत्यंत आनंदित झाले.
115-11
मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपे । गाजोनि म्हणितले सकृपे । पार्था देख देख अमुपे । स्वरूपे माझी ॥115॥
मग त्या प्रसन्नचित्ताच्या आवेशाने भगवान श्रीकृष्ण गर्जना करून व दयार्द्र होऊन म्हणाले, अर्जुना ! माझी असंख्य स्वरूपे पहा ! पहा !
116-11
एक विश्वरूप देखावे । ऐसा मनोरथु केला पांडवे । की विश्वरूपमय आघवे । करूनि घातले ॥116॥
एकच विश्वरूप पहावे अशी अर्जुनाने इच्छा केली होती; पण भगवंतांनी सर्व विश्वरूपमय करून टाकले
117-11
बाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु । असे सहस्रवरी देतु । सर्वस्व आपुले ॥117॥
धन्य आहे हा अमर्याद उदार परमात्मा ! याचकाची इच्छा पूर्ण करण्यास हा सिध्द असतो आणि याचकाच्या मागण्याच्या सहस्रपट देतो किंवा आपले सर्वस्वहि देतो
118-11
अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागी झकविले । लक्ष्मीयेही राहविले । जिव्हार जे ॥118॥
अहो, जे विश्वरूप अत्यंत गुह्य म्हणून शेषाच्या डोळ्यालाहि दिसू दिले नाही, वेदाला कळू दिले नाही व लक्ष्मीलाही ज्यापासून दूर ठेविले
119-11
ते आता प्रकटुनी अनेकधा । करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा । बाप भाग्या अगाधा । पार्थाचिया ॥119॥
असे विश्वरूप आता त्या धन्य व थोर भाग्यवान अर्जुनासाठी अनेकप्रकारे प्रगट करून, भगवान विश्वरूपदर्शनाचा खटाटोप करीत आहेत
120-11
जो जागता स्वप्नावस्थे जाये । तो जेवी स्वप्नींचे आघवे होये । तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे । आपणचि जाहला 120॥
जो जागा असलेला पुरूष, पुढे स्वप्नांत जातो व तो मग स्वप्नांत जेवढे काही दिसते, ते सर्व आपणच होतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान, आपणच अनंतब्रह्मांडरूप झाले.
(येथे भगवंताच्या विश्वरूपाने प्रगट होण्यास जो स्वप्नांचा दृष्टांत दिसला, तो एकच पुरुष अनेकरूप कसि होतो हे जीवाला स्वप्न दृष्टांतावरूनच समजत असल्यामुळे दिला आहे.
स्वप्न जसे भ्रमजन्य काल्पनिक खोटे असते, तसे भगवंताचे हे विश्वरूप भ्रमजन्य काल्पनिक खोटे आहे, हे सांगण्याकरितिं दिला नाही. भगवंताचे हे स्वरूप तसे ‘अज्ञानजन्य, काल्पनिक, खोटे असते, तर स्वप्नांत जसा मनुष्य, एक मीच अनेकरूपे झालो आहो हे जाणत नाही, तसे भगवंतांनीहि आपले एकवस्तुत्व व अद्वैतत्व जाणले नसते आणि अर्जुनालाहि विश्वरूपदर्शनांत भगवंताचे एक अद्वैतवस्तुत्व अनुभवाला आले नसते व त्याला पाहण्याकरिता दिव्यदृष्टीची अवश्यकता लागली नसती.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-11
ते सहसा मुद्रा सोडिली । आणि स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली । किंबहुना उघडिली । योगऋद्धी ॥121॥
आपल्या मर्यादित श्रीकृष्णस्वरूपाचा आकार एकदम लुप्त केला आणि ज्या अज्ञानजन्य स्थूलदृष्टीने भगवंताचे श्रीकृष्णस्वरूप व जगत् निरनिराळे पांचभौतिक स्थूल दिसत होते, त्या स्थूलदृष्टीचा पडदा दूर केला; किंबहुना भगवंताने आपले परमैश्वर्य प्रगट केले.
(स्थूलदृष्टीची जवनिका फेडिली — स्थूल दृष्टि — संपूर्ण नामरूपात्मकदृश्य, नाना, जडविनाशी व पांचभौतिक वस्तुरूप आहे असे समजणे, याला स्थूलदृष्टि म्हणतात. ही स्थूलदृष्टि अज्ञानदशेंत सर्वाच्या ठिकाणी असते.
जवनिका – ही दृष्टि, विश्वरूपाच्या दर्शनाला प्रतिबंधक आहे हे ” जवनिका ” शब्दाने सुचविले आहे. फेडिली – भगवंताने आपल्या सामर्थ्याने ती नाहीशी केली.
122-11
परी हा हे देखेल की नाही । ऐसी सेचि न करी काही । एकसरा म्हणतसे पाही । स्नेहातुर ॥122॥
पण हा अर्जुन हे पाहील किंवा नाही याची भगवंताला आठवण झाली नाही. प्रेमाने उतावीळ होऊन, अर्जुना ! विश्वरूप पहा, असे एकसारखे भगवान म्हणू लागले.
श्रीभगवानुवाच ।
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥11. 5॥
123-11
अर्जुना तुवा एक दावा म्हणितले । आणि तेचि दावू तरी काय दाविले । आता देखे आघवे भरिले । माझ्याचि रूपी ॥123॥
भगवान म्हणतात, अर्जुना ! तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस; आणि मी एकच विश्वरूप दाखविले, तर मी आपले पूर्ण विश्वरूप दाखविले असे होणार नाही म्हणून जेवढे काही आहे, ते सर्व माझ्याच रूपाने भरले आहे पहा !
(आता देखे आघवे भरिले । माझ्याचि रूपी — भगवान श्रीकृष्णांनी, आपल्या श्रीकृष्णस्वरूपाचे ठिकाणीच अनंत ब्रह्मांडे दाखविली. अनंत ब्रह्मांडाला आधार असणारे श्रीकृष्णस्वरूप, भक्तांना प्रेमवृत्तिमुळे व इतरांना अज्ञानामुळे एकदेशीय दिसत असले, तरी ते व्यापकच असते. त्याची व्यापकता ज्ञानीभक्त विसरत नसतात. )
124-11
एके कृशे एके स्थूळे । एके ऱ्हस्वे एके विशाळे । पृथुतरे सरळे । अप्रांते एके ॥124॥
एक रोड तर एक स्थूल, एक ठेंगणे तर एक उंच, एक जाड पसरलेले तर एक सरळ, एक अमर्याद.
125-11
एके अनावरे प्रांजळे । सव्यापारे एके निश्चळे । उदासीने स्नेहाळे । तीव्रे एके ॥125॥
एक न आवरण्याजोगें, तर एक सुलभ आहे. एक व्यापार करीत असलेले, तर एक निश्चळ आहे. काही उदासींन रूपे, तर काही प्रेमळ रूपे आहेत व काही तीव्र वाटत आहेत.
126-11
एके घूर्णिते सावधे । असलगे एके अगाधे । एके उदारे अतिबद्धे । क्रुद्धे एके ॥126॥
काही रूपे धुंदीत असलेली, तर काही सावध दिसत आहेत. काही सूक्ष्म दिसतात, तर काही रूपे फार मोठी आहेत. काही रूपे उदार, काही कृपण व काही क्रुध्द आहेत.
127-11
एके शांते सन्मदे । स्तब्धे एके सानंदे । गर्जिते निःशब्दे । सौम्ये एके ॥127॥
काही रूपे शांत दिसत आहेत, तर काही मदयुक्त दिसत आहेत. काही स्तब्ध, काही आनंदयुक्त, काही रूपे गर्जना करीत असलेलीं, तर काहीच्या तोंडून एक शब्दहि निघतांना दिसत नाही व काही अत्यंत सौम्य आहेत.
128-11
एके साभिलाषे विरक्ते । उन्निद्रिते एके निद्रिते । परितुष्टे एके आर्ते । प्रसन्ने एके ॥128॥
काही रूपांचे ठिकाणी अभिलाष दिसून येतो, तर काही निरिच्छ आहेत. काही रूपे जागी, तर काही रूपे निजलेंली, काही रूपे अत्यंत संतोषयुक्त, तर काही रूपे सवासन आहेत व काही प्रसन्न आहेत.
129-11
एके अशस्त्रे सशस्त्रे । एके रौद्रे अतिमित्रे । भयानके एके पवित्रे । लयस्थे एके ॥129॥
काही रूपे शस्ररहित दिसतात, तर काही शस्रसहित दिसतात. काही रूपे अति भयंकर आहेत, तर काही रूपे अत्यंत मित्राप्रमाणे भासतात आणि काही रूपे विक्राळ आहेत तर काही विचित्र आहेत व काही रूपे सर्व वृत्तींचा लय करून समाधिस्थ झालेली दिसत आहेत.
130-11
एके जनलीलाविलासे । एके पालनशीले लालसे । एके संहारके सावेशे । साक्षिभूते एके ॥130॥
काही रूपे प्रजोत्पत्तिरूप लीला करीत आहेत, तर काही रूपांचे ठिकाणी प्रजा पालनाची इच्छा दिसून येते. काहीच्या ठिकाणी सर्व सृष्टीचा संहार करण्याचा आवेश दिसून येतो, तर काही रूपे केवळ साक्षीरूपाने दिसत आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-11
एवं नानाविधे परी बहुवसे । आणि दिव्यतेजप्रकाशे । तेवीचि एक{ए}का ऐसे । वर्णेही नव्हे ॥131॥
अशा रितीने नानाप्रकारची अनंत रूपे दिसतात, तरी ती असंख्य आहेत आणि त्या सर्वाचे तेजही अपरिमित आहे. त्याचप्रमाणे त्या सर्व रूपांचे वर्णही एकसारखे नाहीत.
132-11
एके तातले साडेपंधरे । तैसी कपिलवर्णे अपारे । एके सर्वागी जैसे सेंदुरे । डवरले नभ ॥132॥
तापलेल्या सोन्याप्रमाणे लालसर अशी काही रूपे अमर्याद आहेत व आकाशाला शेंदूर फासावा, त्याप्रमाणे काहीचे सर्वाग शेंदरी रंगाचे आहे.
133-11
एके सावियाचि चुळुकी । जैसे ब्रह्मकटाह खचिले माणिकी । एके अरुणोदयासारिखी । कुंकुमवर्णे ॥133
माणिकांनी जडविलेल्या ब्रह्मांडाप्रमाणे कित्येक स्वाभाविकपणे सुंदर व चमकणारी आहेत. काही रूपे अरूणोदयासारखी कुंकुमवर्णाची आहेत.
134-11
एके शुद्धस्फटिकसोज्वळे । एके इंद्रनीळसुनीळे । एके अंजनवर्णे सकाळे । रक्तवर्णे एके ॥134॥
कित्येक शुध्द स्फटिकाप्रमाणे पांढरी आहेत. कित्येक नीलमण्यासारखी नीलवर्ण आहेत. कित्येक काजळासारखी काळीकुट्ट आहेत, तर कित्येक लाल रंगाची आहेत.
135-11
एके लसत्कांचनसम पिवळी । एके नवजलदश्यामळी । एके चांपेगौरी केवळी । हरिते एके ॥135॥
कित्येक रूपे चमकणार्या सोन्यासारखी पिवळी, कित्येक नवमेघाप्रमाणे श्यामवर्ण, कित्येक चाफ्याच्या फुलासारखी गौरवर्ण आहेत व कित्येक केवळ हिरवी आहेत.
136-11
एके तप्तताम्रतांबडी । एके श्वेतचंद्र चोखडी । ऐसी नानावर्णे रूपडी । देखे माझी ॥136॥
कित्येक पातविलेल्या तांब्याप्रमाणे तांबडी, तर कित्येक पांढर्या चंद्राप्रमाणे पांढरी आहेत. अशा प्रकारे नाना प्रकारच्या वर्णांची माझी रूपे पहा.
137-11
हे जैसे का आनान वर्ण । तैसे आकृतीही अनारिसेपण । लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसी सुंदरे एके ॥137॥
हे जसे नानाप्रकारचे वर्ण आहेत, तसेच आकृतीतही नाना प्रकार आहेत. काही रूपे, अत्यंत सुंदर आहेत की, मदनही लाजेने शरण जाईल.
138-11
एके अतिलावण्यसाकारे । एके स्निग्धवपु मनोहरे । शृंगारश्रियेची भांडारे । उघडिली जैसी ॥138॥
श्रृंगारसंपत्तीची भांडारे उघडल्याप्रमाणे, काही रूपे, अत्यंत सौंदर्य साकार व्हावे, अशी होती, तर काही मनोहर तुकतुकीत शरीराची होती.
139-11
एके पीनावयवमांसाळे । एके शुष्के अति विक्राळे । एके दीर्घकंठे विताळे । विकटे एके ॥139॥
कित्येकांचे अवयव मांसल व पुष्ट आहेत, तर कित्येकांचे देह शुष्क रोड व अती विक्राळ दिसतात. कित्येक देह लांब मान व मोठी डोकी असलेले आहेत, तर कित्येक वाकड्या तिकड्या आकाराचे आहेत.
140-11
एवं नानाविधाकृती । इया पाहता पारु नाही सुभद्रापती । ययांच्या एकेकी अंगप्रांती । देख पा जग ॥140॥
या प्रकारे नानाप्रकारच्या आकृती पाहता, अर्जुना ! अंत सापडणार नाही आणि या एकएकाच्या अवयवावर एक एक जग दिसत आहे, पहा
पश्यादित्यान्वसून्रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा ।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥11. 6॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
141-11
जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी । पुढती निमीलनी मिठी । देत आहाती ॥141॥
ज्या विश्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी उघडल्या बरोबर सर्व बाराही आदित्यांची उत्पत्ती होते व लावल्याबरोबर त्यांचा लोप होतो.
142-11
वदनींचिया वाफेसवे । होत ज्वाळामय आघवे । जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचा ॥142॥
तोंडातून निघणार्या वाफेबरोबर सर्व ज्वालामयच होऊन जाते व त्यातच अग्नी इत्यादि सर्व वसूंचा समूह दिसू लागतो.
143-11
आणि भ्रूलतांचे शेवट । कोपे मिळो पाहती एकवट । तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखे ॥143॥
आणि जेथे क्रोधाने भृकुटींचे शेवट एकत्र होऊ पाहत आहेत, तेथे रुद्रगणांचा समूह उत्पन्न होत आहे, पहा.
144-11
पै सौम्यतेचा बोलावा । मिती नेणिजे अश्विनौदेवा । श्रोत्री होती पांडवा । अनेक वायु ॥144॥
माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी, जेथे सौम्यपणाचा थोडा थंडावा दिसेल, तेथे असंख्य अश्विनौ देव उत्पन्न झालेले दिसतील आणि कानाच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न झालेले आहेत, पहा.
145-11
यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांची कुळे । ऐसी अपारे आणि विशाळे । रूपे इये पाही ॥145॥
याप्रमाणे एका एका माझ्या रूपाच्या या लीलेमध्ये अनेक देव, सिध्द यांची कुळे जन्माला येतात. अशी माझी ही अनंत व विशाल रूपे पहा.
146-11
जयाते सांगावया वेद बोबडे । पहावया काळाचेही आयुष्य थोडे धातयाही परी न सांपडे । ठाव जयांचा ॥146॥
ज्या विश्वरूपाचे वर्णन करता करता वेदाची बोबडी वळली, ज्याला पाहण्याकरिता काळाचे आयुष्य अपुरे पडते म्हणजे जेथे काळाचाही अंत होतो व ब्रह्मदेवालाही ज्याचा पत्ता लागत नाही,
147-11
जयाते देवत्रयी कधी नायके । तिये इये प्रत्यक्ष देख अनेके । भोगी आश्चर्याची कवतिके । महासिद्धी ॥147॥
ज्या स्वरूपाची गोष्ट तिन्ही वेदांना देखील ऐकायला कधी मिळत नाही, ती माझी रूपे तू आता प्रत्यक्ष पहा व आश्चर्याचे कौतुक किंवा आनंद हीच कोणी महासिध्दि, तिचे सुख भोग.
इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्दृष्टुमिच्छसि ॥11. 7॥
148-11
इया मूर्तीचिया किरीटी । रोममूळी देखे पा सृष्टी । सुरतरुतळवटी । तृणांकुर जैसे ॥148॥
ज्याप्रमाणे कल्पतरूच्या बुडाशी गवताचे अंकुर वाढावे, त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या रोमरोमांच्या ठिकाणी तुला सृष्टी दिसेल, पहा.
149-11
चंडवाताचेनि प्रकाशे । उडत परमाणु दिसती जैसे । भ्रमत ब्रह्मकटाह तैसे । अवयवसंधी ॥149॥
एखाद्या गवाक्षातून आलेल्या सूर्याच्या किरणात परमाणू उडत असलेले दिसतात, त्याप्रमाणे माझ्या विश्वरूपाच्या अवयवसंधीत अनेक ब्रह्मांडे फिरत असलेली दिसतील.
150-11
एथ एकैकाचिया प्रदेशी । विश्व देख विस्तारंशी । आणि विश्वाही परौते मानसी । जरी देखावे वर्ते ॥150॥
येथे एका एका अवयवप्रदेशावर सर्व विस्तृत ब्रह्मांडरचना आहे, पहा ! आणि ब्रह्मांडाच्या पलीकडेही पाहण्याची जर इच्छा असेल,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
151-11
तरी इयेही विषयींचे काही । एथ सर्वथा सांकडे नाही । सुखे आवडे ते माझिया देही । देखसी तू ॥151॥
तर त्याबद्दल हि काही संकट वाटण्याचे कारण नाही, या माझ्या शरीरात जे तुला आवडेल ते सुखाने पाहून घे.
152-11
ऐसे विश्वमूर्ती तेणे । बोलिले कारुण्यपूर्णे । तव देखत आहे की नाही न म्हणे । निवांतुचि येरु ॥152॥
या प्रमाणे ते विश्वरूप श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर, अर्जुन आपले रूप पहात आहे किंवा नाही म्हणून पाहू लागले, तर तो स्वस्थ बसलेला त्यांच्या दृष्टीस पडला.
153-11
एथ का पा हा उगला ? । म्हणौनि श्रीकृष्णे जव पाहिला । तव आर्तीचे लेणे लेइला । तैसाचि आहे ॥153॥
पहात असताना भगवंताच्या लक्षात आले की, अर्जुन विश्वरूप पाहण्याच्या आहेत जसा गुंगलेला होता तसाच दृष्टीस पडला.
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥11. 8॥
अर्थ केवळ या तुझ्या दृष्टीने मला पहाण्यास तू समर्थ नाहीस. याकरता मी तुला दिव्य दृष्टि देतो. आता माझे ईश्वरी सामर्थ्य पहा. ॥11-8॥
(ज्ञानदृष्टि पुढे चालू)
154-11
मग म्हणे उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे । परी दाविले ते फुडे । नाकळेचि यया ॥154॥
मग मनात म्हणतात, याची उत्कंठा अजून कमी झालेली नाही व याला विश्वरूपदर्शनाने आनंदही झालेला नाही, कारण त्याला दाखवलेले विश्वरूप दिसलेच नाही.
155-11
हे बोलोनि देवो हासिले । हासोनि देखणियाते म्हणितले । आम्ही विश्वरूप तरी दाविले । परी न देखसीच तू ॥155॥
असे म्हणून देव हसले आणि अर्जुनाला म्हणाले, ” आम्ही तुला विश्वरूप दाखविले, परंतु तू तर ते पहातच नाहीस. “
156-11
यया बोला येरे विचक्षणे । म्हणितले हा जी कवणासी ते उणे ? । तुम्ही बकाकरवी चांदिणे । चरऊ पहा मा ॥156॥
वया भगवंताच्या बोलण्याला त्या बुध्दिमान अर्जुनाने असे उत्तर दिले की, अहो देवा ! हा उणेपणाचा दोष कुणाकडे आहे ? तुम्ही बगळ्याकडून चंद्राच्या प्रकाशांतील अमृतकण चरवू पाहता काय ?
157-11
हा हो उटोनिया आरसा । आंधळिया दाऊ बैसा । बहिरियापुढे हृषीकेश गाणीव करा ॥157॥
अहो ह्रषीकेशा ! तुम्ही आरसा स्वच्छ करून तो आंधळ्याला दाखवू पाहतिं किंवा बहिर्यापुढे गायन करता !
158-11
मकरंदकणाचा चारा । जाणता घालूनि दर्दुरा । वाया धाडा शारङ्गधरा । कोपा कवणा ॥158॥
फुलांतील मधाचा चारा जाणूनबुजून बेडकाला घालून वाया घालविता ! मग हे शारंगधरा ! कोणावर रागावतां ?
159-11
जे अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिले । केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटले । ते तुम्ही चर्मचक्षूंपुढे सूदले । मी कैसेनि देखे ॥159
जे विश्वरूप इंद्रियाने दिसण्याजोगे नाही, केवळ ज्ञानदृष्टीच्या आटोक्यातील आहे, असे शास्राचे म्हणने आहे, ते विश्वरूप तुम्ही माझ्या चर्मचक्षुंपुढे मांडले, मग मी कसा पाहणार ?
160-11
परी हे तुमचे उणे न बोलावे । मीचि साहे तेचि बरवे । एथ आथि म्हणितले देवे । मानू बापा ॥160
पण तुमचा दोष काढू नये. तो मी आपल्याकडे घेणे बरें. या अर्जूनाच्या बोलण्यावर भगवान म्हणतात, बा अर्जुना ! तुझे म्हणणे मला मान्य आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-11
साच विश्वरूप जरी आम्ही दावावे । तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे । परी बोलत बोलत प्रेमभावे । धसाळ गेलो ॥161॥
खरेच आहे, जर आम्ही तुला विश्वरूप दाखवायचे, तर आगोदर विश्वरूप पाहण्याचे सामर्थ्य तुला द्यायला पाहिजे; पण अर्जुना ! प्रेमाच्या अवेशात विचार सुचला नाही.
162-11
काय जाहले न वाहता भुई पेरिजे । तरी तो वेलु विलया जाइजे । तरी आता माझे निजरूप देखिजे । ते दृष्टी देवो तुज ॥162॥
काही झाले तरी मशागत न करता जमिनींत पेरलेला वेल नाश पावतो, असो. आता ज्या दृष्टीने तुला माझे विश्वरूप पाहता येईल, ती दृष्टि देतों.
163-11
मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा । देखोनिया अनुभवा । माजिवडा करी ॥163॥
मग त्या दृष्टीच्या सहाय्याने माझा संपूर्ण ऐश्वर्ययोग पाहून तो अनुभवांत दृढ कर.
164-11
ऐसे तेणे वेदांतवेद्ये । सकळ लोक आद्ये । बोलिले आराध्ये । जगाचेनि ॥164॥
वेदान्तविचाराने कळणारा, सर्व सृष्टीच्या पूर्वी कारणरूपाने असणारा व सर्व जगाचे आराध्य दैवत असा जो परमात्मा, तो याप्रमाणे बोलला.
संजय उवाच
एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः ।
दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥11. 9॥
अर्थ संजय म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा, महायोगैश्वर्यसंपन्न हरि याप्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला आपले ऐश्वर्ययुक्त उत्कृष्ट रूप दाखवता झाला. ॥11-9॥
(संजय म्हणाला अर्जुन दैववान 165-)
165-11
पै कौरवकुलचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती । जे श्रियेहूनि त्रिजगती । सदैव असे कवणी ? ॥165
संजय म्हणतो, हे कौरवांच्या कुळात उत्पन्न झालेल्या सार्वभौमराजा धृतराष्ट्रा ! मला वारंवार याचेच आश्चर्य वाटते की, या त्रैलोक्यात श्रीलक्ष्मीपेक्षा भाग्यवान दुसरी कोणती स्री आहे ?
166-11
ना तरी खुणेचे वानावयालागी । श्रुतीवाचूनि दावा पा जगी । ना सेवकपण तरी आंगी । शेषाच्याचि आथी ॥166॥
किंवा आत्मस्वरूपाची खुणेने ओळख पटवून देणारा वेदाशिवाय जगात दुसरा कोण आहे ? किंवा खरे सेवकपण भगवंताची अखंड शय्या होऊन राहणार्या शेषाच्याच ठिकाणी आहे.
167-11
हा हो जयाचेनि सोसे । शिणत आठही पहार योगी जैसे । अनुसरले गरुडा{ऐ}से । कवण आहे ? ॥167॥
ज्याचा ध्यास लागून योग्याप्रमाणे आठहि प्रहर अविश्रान्त सेवा करणारा गरूडासारखा दुसरा कोण आहे ?
168-11
परी ते आघवेचि एकीकडे ठेले । सापे कृष्णसुख एकंदरे जाहले । जिये दिवूनि जन्मले । पांडव हे ॥168॥
पण ते सर्व बाजूला राहिले आणि सांप्रत पांडव जन्मले त्या दिवसापासून यांचेच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे संपूर्ण सुख एकवटून राहिलें.
169-11
परी पाचाही आंतु अर्जुना । श्रीकृष्ण सावियाचि जाहला अधीना । कामुक का जैसा अंगना । आपैता कीजे ॥169॥
जसा कामासक्त पुरुष स्रियेच्या स्वाधीन होतो, तसा श्रीकृष्ण हा, त्या पांचांहि पांडवांमध्ये खरोखर अर्जुनाच्या सर्वस्वी स्वाधीन झाला.
170-11
पढविले पाखरू ऐसे न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले । कैसे दैव एथे सुरवाडले । ते जाणो न ये ॥170॥
तसा शिकविलेला पक्षीही शिकवणार्यांचे स्वाधीन होऊन बोलणार नाही किंवा करमणुकीकरतिं पाळलेले हरिणहि असे स्वाधीन होऊन चालणार नाही. अर्जुनाचे थोर भाग्य कसे उदयाला आले ते समजत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-11
आजि हे परब्रह्म सगळेच । भोगावया सदैव याचेचि डोळे । कैसे वाचेनि हन लळे । पाळीत असे ॥171॥
श्रीकृष्णरूपाने प्रगट झालेले संपुर्ण परब्रह्म सर्वदा भोगण्याकरिता याचेच डोळे होते. अर्जुनाच्या बोलण्याचे भगवान कसे लळे पाहतो, पहा !
172-11
हा कोपे की निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये । नवल पिसे लागले आहे । पार्थाचे देवा ॥172॥
अर्जुन रागावला तर भगवान मुकाट्याने सहन करतत, अर्जुन रुसला तर स्वतः भगवान त्याला समजवितात, असे काही अर्जुनाचे विलक्षण वेड श्रीभगवंताला लागले आहे.
173-11
एऱ्हवी विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले । ते विषयोचि वानिता जाहले । भाट ययाचे ॥173॥
संपूर्ण विषयवासना जिंकून जन्माला आले, असे जे समर्थ शुकादिक मुनी, ते देखील या भगवंताच्या विषयभोगादि लीलांचे वर्णन करणारे भाट झाले.
174-11
हा योगियांचे समाधिधन । की होऊनि ठेले पार्थाआधीन । यालागी विस्मयो माझे मन । करीतसे राया ॥174॥
खरोखर योगियांचा समाधिरूप ठेवा होय, पण तोच अर्जुनाच्या स्वाधिन होऊन राहिला; म्हणून राजा धृतराष्ट्रा ! माझ्या मनाला याचेच वारंवार आश्चर्य वाटते.
(योगी जो निर्गुण, निराकार स्वरूपाचे ठिकाणी अत्यंत कष्टाने चित्त स्थिर करून, समाधि साधतात, तेच स्वरूप, भक्ताच्या परमप्रेमामुळे सगुण साकार होऊन, भक्ताच्याच सर्वस्वी स्वाधीन होऊन राहते. असे परमप्रेमरूपभक्तीचे आश्चर्यकारक कौतुक आहे, असा भाव माऊलींनी सूचित केला आहे. )
175-11
तेवीचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथे कौरवेशा । श्रीकृष्णे स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ॥175॥
पुनः संजय आपणच म्हणतो, हे कौरवांच्या स्वामी धृतराष्ट्रा ! येथे आश्चर्य करण्याचे कारणच नाही. भगवान श्रीकृष्णांनी आपला म्हणून ज्याचा अंगीकार केला, त्याचा भाग्योदय होत असतो.
176-11
म्हणौनि तो देवांचा रावो । म्हणे पार्थाते तुज दृष्टि देवो । जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तू ॥176॥
म्हणून तो देवांचाहि देव भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, ज्या दृष्टिने माझ्या विश्वरूपाचा ठाव घेशील, अशी दृष्टि तुला देतो.
177-11
ऐसी श्रीमुखौनि अक्षरे । निघती ना जव एकसरे । तव अविद्येचे आंधारे । जावोचि लागे ॥177॥
श्रीकृष्णाच्या मुखातून अशी अक्षरे निघाल्याबरोबर एकदम अविद्यारूपी अंधकार नाहीसा झाला.
(सर्वाच्या अंतःकरणात ज्या परमेश्वराचा अखंड वास आहे व ज्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करावयाचा असतो, तोच परमात्मा अर्जुनाला बाहेर सद्गुरुरूपाने प्राप्त झाला, तर त्या सत्यसंकल्प परमेश्वराने दिव्यदृष्टि देतो असा संकल्प केल्याबरोबर अविद्या अंधकार नाहीसा व्हावा यात आश्चर्य नाही. तोच अंतर्यामी परमात्मा आत्मज्ञानाच्या रूपाने प्रगट होतो व भक्ताच्या अंतःकरणातील अविद्या अंधकार नाहीसा करतो. अविद्या अंधःकार नाहीसा होऊन ज्ञानदृष्टीने पाहिले जाणारे विश्वरूपहि अर्थातच खोटे असणे शक्य नाही. )
178-11
ती अक्षरे नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका । अर्जुनालागी चित्कळिका । उजळलिया श्रीकृष्णे ॥178॥
श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवंताचे मुखातून ” मी तुला दिव्यदृष्टि देतो ” ही जी अक्षरे निघाली ती अक्षरे नव्हती, ती ब्रह्मस्वरूपाचे साम्राज्य दाखविणारी ज्योती होती. ती ज्ञानज्योती अर्जुनाकरिता भगवंतांनी उजळली होती.
(भगवंतानी अर्जुनाला जी दिव्य दृष्टि दिली, ती ” चित्कळिका ” म्हणजे चैतन्याची ज्योती होती आणि ती ” ब्रह्मसाम्राज्यदीपिका ” म्हणजे परब्रह्माचा संपूर्ण नामरूपात्मक आविष्कार सच्चिदानंदस्वरूप आहे असा प्रत्यय आणून देणारी होती, हे श्री ज्ञानेश्वरमाऊलींनीच येथे स्पष्ट केले आहे. )
179-11
मग दिव्यचक्षुप्रकाशु प्रगटला । तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला । ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुले ॥179॥
मग (भगवंतांनी म्हटल्याबरोबर) अज्ञानांधःकार नाहीसा होऊन चैतन्याचा प्रकाश झाल्यामुळे, त्याला सर्वत्र एक अस्फुट अद्वैत श्रीकृष्णवस्तुच आहे, अशी ज्ञानदृष्टि प्राप्त झाली. या प्रमाणे भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप ऐश्वर्य दाखविले.
180-11
हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रीचे का कल्लोळ । विश्व हे मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥180॥
संपूर्ण अवतार हे त्या समुद्राचे तरंग असून जग त्याच्या वृत्तिरूप किरणामुळे दिसणारे मृगजळ आहे.
(भगवंताचा सगुण साकार विग्रह व सगुण साकार जगत् या दोहोंमध्ये असा फरक आहे, हे या ओवीतून माऊलिंनी दाखविले आहे. सर्व कैवल्यद्वैतवादी आचार्य व श्रीज्ञानेश्वर महाराजादि संत यांनी सच्चिदानंदपरब्रह्माहून भिन्न भासणारे जीव, जगत्, परमात्मा, अवतार यांचे परब्रह्माशी ऐक्य आहे हे सांगण्यांकरिता, परब्रह्माचे ठिकाणी हे निवर्तरूप आहे असे मानले आहे. )
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-11
जिये अनादिभूमिके निटे । चराचर हे चित्र उमटे । आपणपे श्रीवैकुंठे । दाविले तया ॥181॥
सच्चिदानंदनामरूपाने नटलेल्या ज्या विश्वरूप अनादि भूमिकेवर हे चराचरविश्वाचे चित्र उमटते, ते विश्वरूप आपणच आहो असे भगवंतांनी अर्जुनाला दाखविले.
182-11
मागा बाळपणी येणे श्रीपती । जै एक वेळ खादली होती माती । तै कोपोनिया हाती । यशोदा धरिला । 182
मागे एकदां जेव्हा भगवंतांनी बाळपणी माती खाल्ली होती, तेव्हा यशोदेने रागावून त्यांना हाताप धरलें.
183-11
मग भेणे भेणे जैसे । मुखी झाडा द्यावयाचेनि मिसे । चवदाही भुवने सावकाशे । दाविली तिये ॥183॥
तेव्हा मग भगवान श्रीकृष्णाने ‘भ्यालो’असे दाखवून ‘मी माती खाल्ली नाही’ हे दाखविण्याकरिता. तोंड उघडले असता, आपल्या तोंडात चौदाहि भुवनाची सृष्टि यशोदेला दाखविली
184-11
ना तरी मधुवनी ध्रुवासि केले । जैसे कपोल शंखे शिवतले । आणि वेदांचियेही मती ठेले । ते लागला बोलो ॥184॥
किंवा मधुवनांत तपःश्चर्या करीत असलेल्या व भगवंताची स्तुति करू इच्छिणार्या ध्रुवाचे गालाला आपल्या हातातील शंखाचा स्पर्श केल्याबरोबर जे वेदालाहि अगम्य, ते तो बोलू लागला.
185-11
तैसा अनुग्रहो पै राया । श्रीहरी केला धनंजया । आता कवणेकडेही माया । ऐसी भाष नेणेचि तो ॥185॥
संजय म्हणतो. राजा धृतराष्ट्रा ! भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनावर तशीच कृपा केली. त्यामुळे माया व तिचा कार्यपसारा या शब्दांचे देखील त्याला ज्ञान होत नव्हते.
186-11
एकसरे ऐश्वर्यतेजे पाहले । तया चमत्काराचे एकार्णव जाहले । चित्त समाजी बुडोनि ठेले । विस्मयाचिया ॥186॥
एकसारखे जिकडे तिकडे ऐश्वर्यतेजच प्रकाशमान झालेले दिसू लागले. तो आश्चर्याचा सर्वत्र समुद्रच पसरलेला आहे. असे पाहू लागला आणि त्याचे चित्त त्या आश्चर्याच्या समुदायात बुडून गेले.
187-11
जैसा आब्रह्म पूर्णोदकी । पव्हे मार्कंडेय एकाकी । तैसा विश्वरूप कौतुकी । पार्थु लोळे ॥187॥
ब्रह्मलोकांपर्यंत संपूर्ण ब्रह्मांड जलमय झाले असता, ज्याप्रमाणे एकटे मार्कंडेय ऋषीच त्या जलात पोहत असतात, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या दर्शनाने झालेल्या विस्मयसमुद्रावर अर्जुनहि लोळू लागला.
188-11
म्हणे केवढे गगन एथ होते । ते कवणे नेले पा केउते । ती चराचर महाभूते । काय जाहली ? ॥188॥
अर्जुन म्हणतो. (मी विश्वरूप पाहण्यापूर्वी) येथे केवढे मोठे आकाश होते, ते आता कोणी कोठे नेले समजत नाही आणि त्या आकाशांत दिसणारी भूतसृष्टिही काय झाली कोणाला माहित
189-11
दिशांचे ठावही हारपले । आधोर्ध्व काय नेणो जाहले । चेइलिया स्वप्न तैसे गेले । लोकाकार ॥189॥
दिशांचा ठावठिकाण राहिला निही. खाली-वर या दिशाहि काय झालं समजत नाही ?ज्याप्रमाणे जागे झाल्यावर संपूर्ण स्वप्न मावळते, तसे संपूर्ण लोकालोकाचा प्रत्यय नाहीसा झाला.
190-11
नाना सूर्यतेजप्रतापे । सचंद्र तारांगण जैसे लोपे । तैसी गिळिली विश्वरूपे । प्रपंचरचना ॥190॥
किंवा सूर्य उगवल्याबरोबर, त्याच्या प्रखर तेजाने, ज्याप्रमाणे चंद्रासह सर्व नक्षत्रे त्याच्यात लोपून जातात, त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनाने सर्व प्रपंचभाव नाहीसा झाला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-11
तेव्हा मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपे न सांवरे । इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ॥191॥
(अशी विश्वरूपाने सर्व प्रपंचरचना गिळलेली पाहून) अर्जुनाच्या मनाचे मनपण स्फुरत नव्हतें- म्हणजे मनाचा बाह्यविषयाविषयी होणारा संकल्पविकल्पात्मक व्यापार बंद पडला. बुध्दि निश्चयाचा व्यापार करीनाशी झाली व इंद्रियांच्या प्रवृत्ति माघार्या होऊन ह्रदयाच्या ठिकाणी एकवटल्या
192-11
तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिले । टकासी टक लागले । जैसे मोहनास्त्र घातले । विचारजाता ॥192॥
जणूंकाय मोहनास्र घालून संपूर्ण विचार बंद पडावे, त्याप्रमाणे ताटस्थहि तटस्थ राहिले- म्हणजे साक्षित्वहिं आठवेनासे झाले – एकसारखे टक लावून विश्वरूपाकडे पाहणे हेहि विसरला.
193-11
तैसा विस्मितु पाहे कोडे । तव पुढा होते चतुर्भुज रूपडे । तेचि नानारूप चहूकडे । मांडोनि ठेले ॥193॥
असा आश्चर्यकारक होऊन कौतुकाने तो पाहू लागला, तेंव्हि त्याला असे दिसले की आपल्यासमोर भगवान श्रीकृष्णाची तीच सर्वत्र अनेक नामरूपात्मक झाली.
194-11
जैसे वर्षाकाळीचे मेघौडे । का महाप्रळयीचे तेज वाढे । तैसे आपणावीण कवणीकडे । नेदीचि उरो ॥194॥
ज्याप्रमाणे वर्षाऋतुत जिकडे तिकडे मेघच मेघ दिसतात किंवा प्रलयात वाढलेले तेज जिकडे तिकडे दिसते, त्याप्रमाणे भगवंतानी आपल्यावाचून कोठेच काही उरू दिले नाही सर्वत्र नामरूपाने एक परमात्मा श्रीकृष्णच अनुभवाला येत होता, असा अर्थ.
195-11
प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन । सवेचि उघडी लोचन । तव विश्वरूप देखे ॥195॥
प्रथम अर्जुन आपल्या सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या प्राप्तीने पूर्ण समाधान पावला व मग लगेच डोळे उघडून पाहतो तो त्याला विश्वरूप दिसू लागले.
196-11
इहीचि दोही डोळा । पाहावे विश्वरूपा सकळा । तो श्रीकृष्णे सोहळा । पुरविला ऐसा ॥196॥
याच दोन्ही डोळ्यांनी मी संपूर्ण विश्व पाहावे, अशी जी अर्जुनाची इच्छा होती, ती भगवान श्रीकृष्णांनी, पुढे सांगितल्याप्रमाणे पूर्ण केली.
अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् ।
अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥11. 10॥
अर्थ ज्यामधे अनेक मुखे व नयन होते, ज्यामधे अनेक आश्चर्यकारक देखावे होते, अनेक दिव्य अलंकारांनी युक्त, अनेक दिव्य आयुधे धारण केलेले (विश्वरूप दर्शनाचा अर्जुनाच्या मनावरील प्रथदर्शनी परिणाम, मुखे, हात, दागिने डोळे पहातो – 195)
197-11
मग तेथ सैंघ देखे वदने । जैसी रमानायकाची राजभुवने । नाना प्रगटली निधाने । लावण्यश्रियेची ॥197॥
वैकुंठासारखे किंवा सौंदर्यलक्ष्मीचे ठेवेच पसरल्याप्रमाणे भगवंताची तोंडे जिकडे तिकडे दिसत होती.
198-11
की आनंदाची वने सासिन्नली । जैसी सौंदर्या राणीव जोडली । तैसी मनोहरे देखिली । हरीची वक्त्रे ॥198॥
किंवा आनंदाची वनेच भरास आली अथवा संपूर्ण सौंदर्याचे राज्य दिसावे- म्हणजे निःसीम सौंदर्यवान अशी ती, भगवान विश्वरूपाची अत्यंत मनोहर मुखे अर्जुनाने पाहिली.
199-11
तयांही माजी एकैके । सावियाचि भयानके । काळरात्रीची कटके । उठवली जैसी ॥199॥
तेथेच पुनः काही मुखे काळरात्रीच्या सैन्याने उठाव केल्याप्रमाणे खरोखर अत्यंत भयानक अशी होती.
200-11
की मृत्यूसीचि मुखे जाहली । हो का जे भयाची दुर्गे पन्नासिली । की महाकुंडे उघडली । प्रळयानळाची ॥200॥
किंवा मृत्युलाच मुखे प्राप्त झाली किंवा भयंकर भीतिचे किल्लेच पसरलेले आहेत किंवा प्रलयकालाच्या अग्नीची कुंडे उघडी केली जावीं.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
201-11
तैसी अद्भुते भयासुरे । तेथ वदने देखिली वीरे । आणिके असाधारणे साळंकारे । सौम्ये बहुते ॥201॥
त्याप्रमाणे भगवंताची अत्यंत भ्यासुर मुखे अर्जुनाने पाहिली आणखी काही अप्रतिम अलंकारांनी अलंकृत केलेली व सौम्य अशी पुष्कळशी तोंडे पाहिली,
202-11
पै ज्ञानदृष्टीचेनि अवलोके । परी वदनांचा शेवटु न टके । मग लोचन ते कवतिके । लागला पाहो ॥202॥
परंतु (अर्जुन) ज्ञानदृष्टीने पाहत होता, तरी त्या मुखांचा शेवट व अंत त्याला लागत नव्हता; भगवंताचे डोळे कोणीकडे आहेत, हे तो कौतुकाने पाहू लागला.
(अर्जुन ज्ञानदृष्टिने पाहत होता, तरी तोंडाचा अंत त्याला लागला नाही, या माऊलिंच्या वचनावरून विश्वरूप हा अमर्याद अशा सच्चिदानंद परब्रह्माचाच नामरूपात्मक अविष्कार असल्यामुळे, परब्रह्माप्रमाणेच त्याचा व त्याच्या एका एका अवयवाचा देखील शेवट दिसत नव्हता, हे साहजिकच आहे. )
203-11
तव नानावर्णे कमळवने । विकासिली तैसे अर्जुने । डोळे देखिले पालिंगने । आदित्यांची ॥203॥
तेव्हा अनेक रंगांच्या कमळाची वने प्रफुल्लित झालेली दिसावी व सूर्यांच्या रांगा लागाव्या, त्याप्रमाणे अर्जुनाने देवांच्या डोळ्यांच्या रांगा पाहिल्या,
204-11
तेथेचि कृष्णमेघांचिया दाटी- । माजी कल्पांत विजूंचिया स्फुटी । तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळी ॥204
तेथेच ज्याप्रमाणे प्रलयकाली पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांच्या गर्दीत विजा चमकाव्या, त्याप्रमाणे भुवयाखाली भगवंताची अग्निसारखी पिंगटदृष्टि अर्जुन पाहू लागला.
205-11
हे एकैक आश्चर्य पाहता । तिये एकेचि रूपी पंडुसुता । दर्शनाची अनेकता । प्रतिफळली ॥205॥
असे एक एक अश्चर्य पाहता पाहता, एका विश्वरूपाचे ठिकाणीच अर्जुनाला अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे दर्शन होऊ लागले.
206-11
मग म्हणे चरण ते कवणेकडे । केउते मुकुट के दोर्दंडे । ऐसी वाढविताहे कोडे । चाड देखावयाची ॥206॥
मग अर्जुन म्हणतो, देवाचे चरण कोठे आहेत ? देवाचा मुकुट कोठे आहे व बाहूकोठे आहेत ? अशाप्रमाणे भगवंताचे निरनिराळे अवयव पाहण्याची, अर्जुन इच्छा वाढवू लागला.
207-11
तेथ भाग्यनिधि पार्था । का विफलत्व होईल मनोरथा । काय पिनाकपाणीचिया भाता । वायकांडी आहाती ? ॥207॥
संपूर्ण भाग्याचा सांठा अशा अर्जुनाचे मनोरथ कसे व्यर्थ जातील ? पिनाक धनुष्य धारण करणार्या शंकराच्या भात्यात निष्फळ होणारे बाण राहतील काय ?
208-11
ना तरी चतुराननाचिये वाचे । काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे ? म्हणौनि साद्यंतपण अपारांचे । देखिले तेणे ॥208॥
किंवा ब्रह्मदेवाच्या वाणीत अर्थहीन अक्षरांचे सांचे राहू शकतात काय ? म्हणूनच त्या भाग्यवान अर्जुनाने अपार अशा विश्वरूपालाहि संपूर्ण पाहिले.
209-11
जयाची सोय वेदा नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे । अर्जुनाचे दोन्ही डोळे । भोगिते जाहले ॥209॥
ज्या विश्वरूपाची स्थिती वेदालाही अगम्य आहे, त्या विश्वरूपाचे सर्व अवयव अर्जुन दोन्ही डोळ्यांनी एकदमच पाहू लागला.
210-11
चरणौनि मुकुटवरी । देखत विश्वरूपाची थोरी । जे नाना रत्न अळंकारी । मिरवत असे ॥210॥
नाना प्रकारच्या रत्नालंकारांनी सुशोभित झालेले विश्वरूपचे वैभव, अर्जुन पायापासून मस्तकापर्यंत पाहू लागला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-11
परब्रह्म आपुलेनि आंगे । ल्यावया आपणचि जाहला अनेगे । तिये लेणी मी सांगे । काइसयासारिखी ॥211॥
परमात्मा आपल्या अनेक अंगावर घालण्याकरिता आपणच अनेक अलंकाररूप झाला होता. ते अलंकार कशासारखे होते, ते मी सांगतो.
212-11
जिये प्रभेचिये झळाळा । उजाळु चंद्रादित्यमंडळा । जे महातेजाचा जिव्हाळा । जेणे विश्व प्रगटे ॥212॥
ज्याच्या प्रभेच्या कांतीने चंद्रमंडळ व सूर्यमंडळ यांना तेज प्राप्त झाले आहे आणि जे महातेजाचाही जिव्हाळा असून, ज्यामुळे हे विश्व म्हणजे हा नामरूपाचा पसारा प्रगट होतो,
213-11
तो दिव्यतेज शृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु । देव पापियाचा आपणपेचि लेइले ऐसे वीरु । देखत असे ॥213॥
त्या दिव्यतेजरूप श्रृंगाराचे कोणाच्या बुध्दीला आकलन होऊ शकेल ? देवाने आपणच अलंकाररूप होऊन, आपणच ते अलंकार घातले आहेत, असे वीर अर्जुन पाहात होता.
214-11
मग तेथेचि ज्ञानाचिया डोळा । पहात करपल्लवा जव सरळा । तव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा । तैसी शस्त्रे झळकत देखे ॥214॥
पुनः तेथेच अर्जुन ज्ञानदृष्टीने, सरळ अशा हिताकडे पाहात असता, त्या हाताच्या ठिकाणी कल्पांतीच्या अग्नीच्या ज्वाळा तोडणारी तेजस्वी शस्रे झळकत असलेली तो पाहू लागला.
215-11
आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हतियार । आपण जीव आपण शरीर । देखे चराचर कोंदले देवे ॥215॥
भगवान आपणच अंग व आपणच अलंकार झाले. आपणच हात असून, आपणच हातातील हत्यारही झाले. आपणच जीव असून, आपणच शरीर झाले. अशी संपूर्ण चराचरसृष्टी देवानेच व्यापली आहे, असे अर्जुन पाहू लागला.
216-11
जयाचिया किरणांचे निखरपणे । नक्षत्रांचे होत फुटाणे । तेजे खिरडला वन्हि म्हणे । समुद्री रिघो ॥216॥
ज्या शस्रांच्या तेजस्वी किरणांच्या प्रखरतेमुळे नक्षत्रांचेदेखील फुटाणे फुटत होते आणि ज्या तेजाने संतप्त झालेला अग्नीदेखील, दाह शमविण्याकरिता समुद्रात शिरण्याची इच्छा करीत होता.
217-11
मग कालकूटकल्लोळी कवळिले । नाना महाविजूंचे दांग उमटले । तैसे अपार कर देखिले । दितायुधी ॥217॥
मग जणू काय समुद्राच्या लाटांनी संपूर्ण काळकूट विषच भरून घ्यावे किंवा प्रलयसमयीच्या विजांचे समुदाय प्रगट व्हावेत, त्याप्रमाणे नानाप्रकारची आयुधे धारण केलेले भगवंतांचे अनंत हात अर्जुन पाहू लागला.
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥11. 11॥
अर्थ दिव्य पुष्पे व वस्त्रे धारण केलेले, दिव्य गंधांची ज्यास उटी केली होती, सर्व आश्चर्यांनी युक्त अनंत सर्वतोमुख व दिव्य असे ते रूप होते. ॥11-11॥
218-11
की भेणे तेथूनि काढिली दिठी । मग कंठमुगुट पहातसे किरीटी । तव सुरतरूची सृष्टी । जयांपासोनि का जाहली ॥218॥
अर्जुनाने भीतीने आपली दृष्टी तेथून काढली व भगवंताच्या कंठाकडे व मुकुटाकडे अर्जुन पाहू लागला, तेव्हा इंद्राच्या नंदनवनातील सर्व पुष्पवृक्षांची ज्यापासून उत्पत्ती झाली असे म्हणता येईल,
219-11
जिये महासिद्धींची मूळपीठें । शिणली कमळा जेथ वावटे । तैसी कुसुमे अति चोखटे । तुरंबिली देखिली ॥219॥
ज्यापासून महासिध्दि प्राप्त होतात व लक्ष्मीलाही आपला शीण भागविण्याकरिता विश्रांती घेता येईल, अशी सुंदर व सुगंधित फुले, ज्याच्या कंठातील माळांत व मुकुटाच्या ठिकाणी खोवलेली दिसत होती.
220-11
मुगुटावरी स्तबक । ठायी ठायी पूजाबंध अनेक । कंठी रुळताति अलौकिक । माळादंड ॥220॥
मुकुटावर फुलांचे गुच्छ खोवले आहेत, ठिकठिकाणी अनेक प्रकारच्या पूजा बांधल्या आहेत, गळ्यात अनेक दिव्य फुलांचे हार रुळतांना दिसत आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
221-11
स्वर्गे सूर्यतेज वेढिले । जैसे पंधरेने मेरूते मढिले । तैसे नितंबावरी गाढिले । पीतांबरु झळके ॥221॥
जणू स्वर्गाने सूर्याचे तेज वेढल्याप्रमाणे किंवा सोन्याने मेरु पर्वताला मढविल्याप्रमाणे भगवंताच्या कमरेभोवंती घट्ट नेसलेला पिवळा पीतांबर झळकत होता.
222-11
श्रीमहादेवो कापुरे उटिला । का कैलासु पारजे डवरिला । नाना क्षीरोदके पांघरविला । क्षीरार्णवो जैसा 222॥
धवलवर्ण महादेवाला कापराची उटी लावावी किंवा कैलास पर्वताला पार्याचा लेप लावावा अथवा क्षीरसमुद्राला दुग्धरूपी उदकाचेच पांघरूण घालावे.
223-11
जैसी चंद्रमयाची घडी उपलविली । मग गगनाकरवी बुंथी घेवविली । तैसी चंदनपिंजरी देखिली । सर्वागी तेणे 223॥
किंवा ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून त्याचे पांघरूण आकाशाकडून घेववावे, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वागावर शुभ्रचंदनाची उटी लावलेली पाहिली.
224-11
जेणे स्वप्रकाशा कांती चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे । जयाचेनि सौरभ्ये जीवित जोडे । वेदवतीये ॥224॥
ज्या दिव्य सुगंधयुक्त चंदनाच्या उटीने सच्चिदानंदरूप भगवंताच्या स्वप्रकाशरूप चिन्मय देहालाहि विशेष कांति प्राप्त होऊन शोभा येते व ब्रह्मानंदाचाच विग्रह अशा भगवंताचा ग्रीष्मऋतूंतील तापहि नाहीसा होतो व ज्याच्या दिव्य सुगंधामुळे चित्तवेधक गुणालाहि आयुष्य लाभतें.
225-11
जयाचे निर्लेप अनुलेपु करी । जे अनंगुही सर्वागी धरी । तया सुगंधाची थोरी । कवण वानी ? ॥225॥
अलिप्त परमात्मा, ज्या चंदनाच्या उटीचा आपल्या अंगाला लेप करतो, स्वतः सर्वागसुंदर असा मदनहिं आपल्या सर्वागावर धारण करतो, त्या चंदनाच्या सुगंधाचे वर्णन कोण करू शकेल.
226-11
ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहता अर्जुन जातसे क्षोभा । तेवीचि देवो बैसला की उभा । का शयालु हे नेणवे ॥226॥
अशा रीतीने विश्वरूपाची एक एक सौंदर्य शोभा पाहतं असता, अर्जुन अगदी भांबावून गेला. तसेच देव बसले आहेत, उभे आहेत, की निजले आहेत हे त्याला काहीच कळेना.
227-11
बाहेर दिठी उघडोनि पाहे । तव आघवे मूर्तिमय देखत आहे । मग आता न पाहे म्हणौनि उगा राहे । तरी आंतुही तैसेचि ॥227॥
अर्जुन दृष्टि उघडून बाहेर पाहू लागला, तेव्हा त्याला सर्व मूर्तीमय दिसू लागले आणि आता बाहेर दृष्टि उघडून पाहत नाही असे म्हणून तो डोळे मिटून स्तब्ध राहिला, तर आतहि त्याला तसेच मूर्तीमय दिसू लागले.
228-11
अनावरे मुखे समोर देखे । तयाभेणे पाठीमोरा जव ठाके । तव तयाहीकडे श्रीमुखे । करचरण तैसेचि ॥228॥
दृष्टिसमोर विश्वरूपाची असंख्य विशाल मुखे पाहून, भीतीने अर्जुन विश्वरूपाकडे पाठ करून उभा राहिला असता, तिकडेहि त्याला तशीच विश्वरूपाची असंख्य व विशाल मुखे व करचरणादिक दिसू लागले.
229-11
अहो पाहता कीर प्रतिभासे । एथ नवलावो काय असे ? । परि न पाहतांही दिसे । चोज आइका ॥229॥
अहो ! दृष्टीने पाहत असतांना अर्जुनाला विश्वरूप दिसावे यात आश्चर्य काय आहे, पण तो पाहत नसतांना देखील त्याला विश्वरूप दिसत होते, हे नवल ऐका !
230-11
कैसे अनुग्रहाचे करणे । पार्थाचे पाहणे आणि न पाहणे । तयाही सकट नारायणे । व्यापूनि घेतले ॥230॥
भगवंताच्या कृपेचे करणे कसे आहे, पहा ! अर्जुनाचे पाहणे व न पाहणे या दोहोलाहि भगवंतांनी व्यापून घेतले.
(जेवढे काही पांचभौतिक जडविनाशी पदार्थ आहेत, ते सर्व देश, काल, वस्तु या तिन्ही मर्यादेने मर्यादित असल्यामुळे ते ज्ञानाने, आहेत असे करतात, तेव्हाच ते असतात. जेव्हा त्यांचे ज्ञान होत नाही — म्हणजे ते आहेत असे कळत नाही – तेव्हा ते नसतात; पण परब्रह्म, अद्वैत, एक जिनसी व त्याच्याहून दुसर्या वस्तूंचे अस्तित्वच मानता येत नाही, इतके व्यापक असल्यामुळे व त्याची ज्ञानदृष्टिहि तशीच नित्य अविनाशी असल्यामुळे, ज्याप्रमाणे त्या परब्रह्माचे अस्तित्व व निस्तित्व पाहण्यावर किंवा न पाहण्यावर अबलंबून नसते; त्याप्रमाणेच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथील विश्वरूपाचे अस्तित्व व नास्तित्व अर्जुनाचे पाहण्यावर किंवा न पाहण्यावर अवलंबून नव्हते, असे विधान करून, परमेश्वराचे नामरूपरहित असणारे साकारस्वरूपदेखील, परमेश्वराच्या नामरूपरहित निराकार स्वरूपाप्रमाणेंच शुध्द व नित्य असते, असे दाखविले आहे. )
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-11
म्हणौनि आश्चर्याच्या पुरी एकी । पडिला ठायेठाव थडी ठाकी । तव चमत्काराचिया आणिकी । महार्णवी पडे ॥231॥
म्हणून एका आश्चर्याच्या पुरांत पडलेला अर्जुन, त्या आश्चर्याच्या पुरांतून बाहेर पडून थडीला लागतो तोंच, तो तेथल्या तेथे दुसर्या चमत्काराच्या समुद्रांत पडत असे.
232-11
तैसा अर्जुनु असाधारणे । आपुलिया दर्शनाचेनि विंदाणे । कवळूनि घेतला तेणे । अनंतरूपे ॥232॥
याप्रमाणे अलौकिक अशी अनंत रूपे धारण करणार्या विश्वरूप परमेश्वराने आपल्या विश्वरूपाची लीला दाखवून, अर्जुनाला संपूर्ण व्यापून टाकले.
233-11
तो विश्वतोमुख स्वभावे । आणि तेचि दावावयालागी पांडवे । प्रार्थिला आता आघवे । होऊनि ठेला ॥233॥
भगवान श्रीकृष्ण स्वभावतःच सर्वव्यापी व सर्वतोमुख आहे आणि अर्जुनाने तो स्वभावतःच सर्वतोमुख सर्वव्यापी कसा आहे, हेच पाहण्याची इच्छा करून, तसे विश्वरूप दाखविण्याची भगवंताला प्रार्थना केली व भगवान तात्काळ त्याच्या समोर विश्वरूप होऊन राहिले.
234-11
आणि दीपे का सूर्ये प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेचि खुंटे । तैसी दिठी नव्हे जे वैकुंठे । दिधली आहे ॥234॥
भगवंतांनी विश्वरूप पाहण्याकरिता अर्जुनाला जी दृष्टि दिली ती दिव्याच्या किंवा सूर्याच्या सहाय्याने पाहू शकणारी किंवा ती ” मिटली असता पाहणेच होणार नाही ” अशी नव्हती.
235-11
म्हणौनि किरीटीसि दोही परी । ते देखणे देखे अंधारी । हे संजयो हस्तिनापुरी । सांगतसे राया ॥235॥
म्हणून अर्जुन, डोळे मिटून व डोळे उघडे ठेवून, अशा दोन्ही प्रकाराने आंधारी म्हणजे दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशावाचून विश्वरूप पाहात होता; असे हस्तिनापुरी संजय धृतराष्ट्राला सांगु लागला.
236-11
म्हणे किंबहुना अवधारिले । पार्थे विश्वरूप देखिले । नाना आभरणी भरले । विश्वतोमुख ॥236॥
संजय म्हणतो, किंबहुना नाना अलंकाराने अलंकृत झालेले व सर्वत्र मुखे असलेले, असे विश्वरूप अर्जुनाने पाहिले, हे आपण ऐकले ना ?
दिवि सूर्य सहस्रस्यभवेद्युगपदुत्थिता ।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥11. 12॥
अर्थ आकशामधे सहस्रावधी सूर्यांची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती त्या महात्म्या श्रीहरीच्या प्रभे सारखी होईल ॥11-12॥
237-11
तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसया ऐसा सांगावा । कल्पांती एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ॥237॥
महाराजा धृतराष्ट्रा ! विश्वरूपाच्या अंगाचे तेज कशासारखे होते ते सांगू गेल्यास, कल्पांतसमयी बारा आदित्यांचा समुदाय एकत्र होतो.
238-11
तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी । जरी उदयजती का एकेचि अवसरी । तऱ्ही तया तेजाची थोरी । उपमू नये ॥238॥
असे ते हजारो दिव्यसूर्य जरी एकाचवेळी उदय पावले, तरी त्यांच्या त्या एकत्रित झालेल्या तेजांच्या थोरवीचीदेखील विश्वरूपाच्या तेजाला उपमा देता येणार नाही.
239-11
आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे । तेवीचि दशकुही मेळविजे । महातेजांचा ॥239॥
त्यातच संपूर्ण विजांचा प्रकाश एकत्र करून आणि प्रलयातील अग्नीची संपूर्ण सामग्री बरोबरी करू शकेल; पण ते तंतोतंत विश्वरूपाच्या तेजासारखे कधीच होणार नाही.
240-11
तऱ्ही तिये अंगप्रभेचेनि पाडे । हे तेज काही काही होईल थोडे । आणि तया ऐसे कीर चोखडे । त्रिशुद्धी नोहे ॥240॥
असे महात्म्या विश्वरूप श्रीहरीच्या सर्वागाच्या ठिकाणी असणारे साहजिक तेज होते, ते भगवान व्यासमुनींच्या कृपेने मीही पाहू शकलो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-11
ऐसे महात्म्य या श्रीहरीचे सहज फांकतसे सर्वागीचे तेज । ते मुनिकृपा जी मज । दृष्ट जाहले ॥241॥
असे महात्म्या विश्वरूप श्रीहरीच्या सर्वागाच्या ठिकाणी असणारे साहजिक तेज होते, ते भगवान व्यासमुनींच्या कृपेने मीही पाहू शकलो.
(भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन झाले व संजयला श्रीगुरु व्यासांच्या कृपेने त्याच विश्वरूपाचे दर्शन झाले. यावरून श्रीगुरूच्या कृपेनेही विश्वरूपाचे दर्शन होते, असे स्पष्ट दिसते. )
तत्रैकस्थं जगत्कृत्स्नम् प्रविभक्तमनेकधा॥
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा ॥11. 13॥
अर्थ देव, पितर, मनुष्य इत्यादि) अनेक भिन्न) रूपांनी विभाग पावलेले हे सर्व जग त्यावेळी देवाधिदेवाच्या त्या शरीरामधे (एका बाजूला) एका ठिकाणी स्थित असे अर्जुनाने पाहिले. ॥11-13॥
242-11
आणि तिये विश्वरूपी एकीकडे । जग आघवे आपुलेनि पवाडे । जैसे महोदधीमाजी बुडबुडे । सिनाने दिसती ॥242॥
आणि महासमुद्राच्या ठिकाणी, जसे निरनिराळे बुडबुडे दिसतात, तसे त्या विश्वरूपात एका बाजूशा संपूर्ण जग आपल्या विस्ताराने भासत होते.
(येथून आपल्या विश्वरूपाच्या ठिकाणीच जगाची उत्पत्ती, स्थिती, लय कसे होतात, हे भगवंतांनी अर्जुनाला दाखवावयास सुरुवात केली आहे.
सर्व नामरूपाने एक भगवान नटला आहे, असे ज्ञान नसलेल्या अज्ञानी जीवांना, सर्व नामरूपाचा पसारा, भ्रमाने जगद्रूप व सत्य भासत असतो; पण भगवंताच्या अद्वैतस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर मात्र, तो संपूर्ण जगत्पसारा भ्रमजन्य भास आहे, असा अनुभव येतो. )
243-11
का आकाशी गंधर्वनगर । भूतळी पिपीलिका बांधे घर । नाना मेरुवरी सपूर । परमाणु बैसले ॥243॥
आकाशात गंधर्वनगर दिसावे किंवा जमिनीवर मुंग्यांनी वारूळ उभारावे अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरले असावेत,
244-11
विश्व आघवेचि तयापरी । तया देवचक्रवर्तीचिया शरीरी । अर्जुन तिये अवसरी । देखता जाहला ॥244॥
त्याप्रमाणे त्यावेळी भगवंताच्या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी, अर्जुन संपूर्ण जगदाभास पाहता झाला.
ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः ।
प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जिलिरभाषित ॥11. 14॥
अर्थ तेव्हा तो आश्चर्ययुक्त व रोमांचयुक्त झालेला अर्जुन आपल्या मस्तकाने देवाला वंदन करून हात जोडून म्हणाला – ॥11-14॥
(संजयकृत अर्जुनाचे वर्णन = 246)
245-11
तेथ एक विश्व एक आपण । ऐसे अळुमाळ होते जे दुजेपण । तेही आटोनि गेले अंतःकरण । विराले सहसा ॥245॥
तेथे जग ही एक वस्तू असून तिला पाहणारा तिच्याहून निराळा मीही एक आहे, असे जे थोडेसे द्वैत सत्य वाटत होते, ते नाहीसे होऊन अंतःकरण एकाएकी विरून गेले.
246-11
आंतु आनंदा चेइरे जाहले । बाहेरि गात्रांचे बळ हारपोनि गेले । आपाद पा गुंतले । पुलकांचले ॥246॥
आतील महानंद प्रगट झाला, बाहेर शरीराच्या अवयवाचे ठिकाणी जे बळ होते, ते नाहीसे झाले व पायापासून मस्तकापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले.
247-11
वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलांचे सर्वाग जैसे । विरूढे कोमलांकुरी तैसे । रोमांच जाहले ॥247॥
वर्षाऋतूच्या आरंभीं, ज्याप्रमाणे पर्वताच्या अंगावरून पावसाचे पाणी वाहून गेल्यानंतर, गवताचे कोवळे अंकुर फुटतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
248-11
शिवतला चंद्रकरी । सोमकांतु द्रावो धरी । तैसिया स्वेदकणिका शरीरी । दाटलिया ॥248॥
सोमकांतमण्याशी चंद्राच्या किरणांचा स्पर्श झाला असता, तो सोमकांत मणी जसा पाझरतो, तसे अर्जुनाच्या सर्व शरीरावर धर्मबिंदु दाटून आले.
249-11
माजी सापडलेनि अलिकुळे । जळावरी कमळकळिका जेवी आंदोळे । तेवी आंतुलिया सुखोर्मीचेनि बळे । बाहेरि कांपे ॥249॥
पाण्यावरील कमळाच्या कळींत सापडलेल्या भ्रमराच्या समुदायाने, ज्याप्रमाणे कमळाची कळी हालू लागते, त्याप्रमाणे आत उठणार्या सखाच्या उमाळ्यामुळे बाहेर अर्जुनाचे अंग कापूं लागले.
250-11
कर्पूरकर्दळीची गर्भपुटे । उकलता कापुराचेनि कोंदाटे । पुलिका गळती तेवी थेंबुटे । नेत्रौनि पडती ॥250॥
कापूर उत्पन्न करणार्या कापूरकेळीत कापूर दाटला असता ज्याप्रमाणे त्या कापूरकेळीची सोपटे उकलली जाऊन, त्यातून कापराचे कण गळू लागतात, त्याप्रमाणे अर्जुनाच्या नेत्रांतून जलबिंदु पडू लागले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
251-11
उदयलेनि सुधाकरे । जैसा भरलाचि समुद्र भरे । तैसा वेळोवेळा उर्मिभरे । उचंबळत असे ॥251॥
पौर्णिमेला पूर्णचंद्राचा उदय झाला असता, ज्याप्रमाणे भरलेल्या समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे आत वेळोवेळी उठत असलेल्या आनंदाच्या उर्मीमुळे अर्जुन वारंवार उचंबळू लागला.
252-11
ऐसा सात्त्विकाही आठा भावा । परस्परे वर्ततसे हेवा । तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली ॥252॥
याप्रमाणे अर्जुनाचे ठिकाणी प्रगट झालेल्या आष्टसात्विकभावांत परस्पर स्पर्धा होऊ लागली असता, अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले.
253-11
तैसाचि तया सुखानुभवापाठी । केला द्वैताचा सांभाळु दिठी । मग उसासौनि किरीटी । वास पाहिली ॥253॥
तसेंच त्या ब्रह्मसुखानुभवानंतर पुनः देहावर येऊन व द्वैतसृष्टीचा अंगीकार करून, अर्जुनाने एक उसासा टाकला व विश्वरूपाकडे दृष्टि केली.
254-11
तेथ बैसला होता जिया सवा तियाचिया कडे मस्तक खालविला देवा । जोडूनि करसंपुट बरवा । बोलतु असे ॥254॥
तेथे अर्जुन जिकडे बसला होता, तिकडेच अर्जुनाने आपले मस्तक वाकवून देवाला नमस्कार केला व दोन्ही हात जोडून देवाशी प्रेमाने बोलू लागला.
अर्जुन उवाच ।
पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वास्तथा भूतविशेषसंघान् ।
ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्चसर्वानुरगांश्च दिव्यान् ॥11. 15॥
अर्थ हे देवा, तुझ्या देहामधे (सर्व) देव, (स्थावरजंगमादि) भूतविशेषांचे सर्व समुदाय, ब्रह्मदेव, विष्णु, शंकर, सर्व ऋषि व दिव्य नाग मी पहात आहे. ॥11-15॥(अर्जुनाने केलेले विश्वरूपाचे वर्णन = 255)
255-11
म्हणे जयजयाजी स्वामी । नवल कृपा केली तुम्ही । जे हे विश्वरूप की आम्ही । प्राकृत देखो ॥255॥
अर्जुन म्हणतो, देवा ! तुमचा जयजयकार असो. आपण माझ्यावर विलक्षण कृपा केली, त्यामुळे मी सामान्यपुरुष देखील तुमचे हे विश्वरूप पाहात आहे.
156-11
परि साचचि भले केले गोसाविया । मज परितोषु जाहला साविया । जी देखलासि जो इया । सृष्टीसी तू आश्रयो ॥256॥
हे स्वामी भगवंता ! खरोखरच त्वां माझ्या इच्छेप्रमाणे केलेस आणि मला त्यामुळे अत्यंत संतोष झाला. या संपूर्ण सृष्टीला तूंच आश्रय आहेस, हे मी आज पाहिले.
257-11
देवा मंदराचेनि अंगलगे । ठायी ठायी श्वापदांची दांगे । तैसी इये तुझ्या देही अनेगे । देखतसे भुवने ॥257॥
देवा ! ज्याप्रमाणे मंदार पर्वताचे अंगावर श्वापदांचे कळप असावे, त्याप्रमाणे या तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी अनेक भुवने मी पाहत आहे.
258-11
अहो आकाशचिये खोळे । दिसती ग्रहगणांची कुळे । का महावृक्षी अविसाळे । पक्षिजातीची ॥258॥
अहो देवा आकाशाच्या पोटांत ज्याप्रमाणे ग्रहांचे समुदाय दिसावे किंवा एखाद्या मोठ्या वृक्षाचे ठिकाणी पक्षांची घरटी असावींत.
259-11
तयापरी श्रीहरी । तुझिया विश्वात्मकी इये शरीरी । स्वर्गु देखतसे अवधारी । सुरगणेंसी ॥259॥
त्याप्रमाणे भगवंता ! या तुझ्या विश्वरूप शरीराचे ठिकाणी सर्व देवसमुदायासह मी स्वर्गलोक पाहत आहे.
260-11
प्रभु महाभूतांचे पंचक । येथ देखत आहे अनेक । आणि भूतग्राम एकेक । भूतसृष्टीचे ॥260॥
प्रभो ! येथे पंचमहाभूतांचे अनेक समुदाय मी पाहत असून, एक एक सृष्टीचे जारज अंडजादि प्राणीसमुदायहि पाहत आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-11
जी सत्यलोकु तुजमाजी आहे । देखिला चतुराननु हा नोहे ? । आणि येरीकडे जव पाहे । तव कैलासुही दिसे ॥261॥
भगवंता ! तुझ्याठिकाणीच सत्यलोक आहे. पाहिलेला हा ब्रह्मदेव नव्हे काय ! आणि दुसरीकडे जो मी पाहतो तो तुझ्याठिकाणी कैलासहि दिसू लागला.
262-11
श्रीमहादेव भवानियेशी । तुझ्या दिसतसे एके अंशी । आणि तूतेही गा हृषीकेशी । तुजमाजी देखे ॥262॥
पार्वतीसहवर्तमान भगवान शंकर तुझ्या एका अंशावर दिसत असून, भगवंता ! तुझे चतुर्भुजरूपहि मी तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी पाहत आहे.
263-11
पै कश्यपादि ऋषिकुळे । इये तुझिया स्वरूपी सकळे । देखतसे पाताळे । पन्नगेशी ॥263॥
त्याचप्रमाणे कश्यपादि संपूर्ण ऋषींची कुळें, या तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी मी पाहत असून, नागासहवर्तमान अनेक पाताळलोकहि तुझ्या ठिकाणी पाहत आहे.
264-11
किंबहुना त्रैलोक्यपती । तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती । इये चतुर्दशभुवने चित्राकृती । अंकुरली जाणो ॥264॥
हे त्र्यैलोक्यनाथा ! किंबहुना तुझ्या एक एक अवयवरूप भितीचे ठिकाणी चवदा लोकांच्या चित्रांची आकृति चितारलेली दिसत आहे.
265-11
आणि तेथिचे जे जे लोक । ते चित्ररचना जी अनेक । ऐसे देखतसे अलोकिक । गांभीर्य तुझे ॥265॥
आणि त्या चवदा लोकातील संपूर्ण प्राणी म्हणजे अनेक चित्रांची रचनाच होय. अशी तुझी असामान्य थोरवी पाहत आहे.
अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनंतरूपम् ।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् ॥11. 16॥
अर्थ मी तुला अनेक हात, उदरे, मुखे व नेत्र असलेला व सर्वत्र अंतरहित रूपे धारण करणारा व विश्वरूप असा पहात आहे. हे विश्वेश्वरा, तुझा आरंभ, मध्य अथवा अंत यापैकी मला काहीच दिसत नाही. ॥11-16॥
266-11
त्या दिव्यचक्षूंचेनि पैसे । चहुकडे जव पाहात असे । तव दोर्दंडी का जैसे । आकाश कोंभैले ॥266॥
हे देवा ! तुवा दिलेल्या ज्ञानदृष्टीचा संपूर्ण विकास करून चोहोंबाजूला मी जो पाहू लागलों, तो जणू काय कोंभ फुटावे असे तुझे दोन बाहु दिसत आहेत.
267-11
तैसे एकचि निरंतर । देवा देखत असे तुझे कर । करीत आघवेचि व्यापार । एकेचि काळी ॥267॥
त्याचप्रमाणे तुझा एक एक हात एकाचवेळी अखंड सर्व व्यापार करीत आहे असे मी पाहात आहे.
(जीवाच्या मर्यादित स्वरूपामुळे व अल्पशक्ति मुळें, जीवाच्या ठिकाणी कर्माचा किंवा व्यापाराचा आरंभादि क्रम दिसून पडतो आणि त्याच्या अल्पज्ञतेमुळे त्याचे ज्ञान भूत, भविष्य वर्तमान असे तिन्ही कलांनी विभागले जातें. पण परमेश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान व सर्वव्यापक असल्यामुळे त्याचे ठिकाणी सर्व व्यापार व सर्व ज्ञाने एकदम एका वर्तमानकालीच असतात. परमेश्वराच्या शक्तिव्यापाराला व ज्ञानाला भूत, भविष्य, वर्तमान अशी कलांची मर्यादा नसते. )
268-11
मग महाशून्याचेनि पैसारे । उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे । तैसी देखतसे अपारे । उदरे तुझी ॥268॥
परब्रह्म जेवढे अमर्याद आहे, तेवढेच त्याच्यावर भासणार्या तुझ्या विश्वरूपाची उदरे, जणू काय अपार ब्रम्हांडाची भांडारे उघडल्याप्रमाणे दिसत आहेत.
269-11
जी सहस्रशीर्षयाचे देखिले । कोडीवरी होताति एकीवेळे । की परब्रह्मचि वदनफळे । मोडोनि आले ॥269॥
आहो जी देवा ! तुम्ही सहस्रशीर्ष आहांत, याची एकाचवेळी कोट्यावधी प्रत्यंतरे येत आहेत किंवा जणु काय परब्रह्मच मुखरूपी फळाने भरभरारून आले.
270-11
तैसी वक्त्रे जी जेउती तेउती । तुझी देखितसे विश्वमूर्ती । आणि तयाचिपरी नेत्रपंक्ती । अनेका सैंघ ॥270॥
अशीं, ही विश्वरूपा ! तुझी मुखे मी जिकडे तिकडे पाहांत आहे; त्याप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक रांगा मी सर्वत्र पाहात आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-11
हे असो स्वर्ग पाताळ । की भूमी दिशा अंतराळ । हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसे ॥271॥
हे असू दे, पण हा सर्व स्वर्ग, हे पाताळ किंवा ही भूमी, ह्या दिशा, हे आकाश, ही निरनिराळी भाषा वापरण्याची देखील सोय राहीली नाही. तुला संपूर्ण मूर्तीरूप मी पाहात आहे.
(मूढ मृगांना, मृगजळ हे पाणीच वाटते; म्हणून मनुष्य त्याला मृगजळ म्हणत असला, तरी त्याला ते जसे सूर्य प्रकाशाचे कंपन वाटते, त्याप्रमाणे अज्ञानी जीवांना, भगवंताचे विश्वरूप अनेक प्रकारच्या वस्तूंनी भरलेले जगत वाटत असले, तरी ज्ञानभक्ताला एक भगवानच सर्व वस्तुरूपाने दिसतो. )
272-11
हे तुजवीण एकादियाकडे । परमाणूहि एतुला कोडे । अवकाशु पाहतसे परि न सांपडे । ऐसे व्यापिले तुवा ॥272॥
तू नाहीस अशी परमाणु इतकी सूक्ष्म तरी पोकळी कोठे आहे काय, हे मी कौतुकाने पाहत आहे, पण ती कोठे सापडत नाही असे तुवा व्यापिले आहे.
273-11
इये नानापरी अपरिमिते । जेतुली साठविली होती महाभूते । तेतुलाहि पवाडु तुवा अनंते । कोंदला देखतसे ॥273
ही नानाप्रकारची. जेवढी अपरिमीत महाभूते ब्रह्मांडांत सांठविली दिसत होती, तेवढाहि संपूर्ण विस्तार, अनंता ! एका तुझ्यानेच भरलेला आहे असे मी पाहत आहे.
274-11
ऐसा कवणे ठायाहूनि तू आलासी । एथ बैसलासि की उभा आहासि । आणि कवणिये मायेचिये पोटी होतासी । तुझे ठाण केवढे ॥274॥
असा तू विश्वव्यापक कोणत्या ठिकाणाहून आलास ? येथे तू बसला आहेस की उभा आहेस ? तू कोणत्या मातेच्या पोटी होतिस ? तुझे ते स्थान केवढे आहे ?
275-11
तुझे रूप वय कैसे । तुजपैलीकडे काय असे । तू काइसयावरी आहासि ऐसे । पाहिले मिया ॥275॥
तुझे रूप व वय कसे आहे ? तुझे पलीकडे काय आहे ? तू कशावर आहेस ? हे मी संपूर्ण निरखून पाहिले.
276-11
तव देखिले जी आघवेचि । तरि आता तुज ठावो तूचि । तू कुणाचा नव्हेसि ऐसाचि । अनादि आयता ॥276॥
हे संपूर्ण मी पाहिले, तेव्हा कळून आले की तुझे स्थान तूंच आहेस — म्हणजे तुझ्याहून स्थान निराळे नाही. तू कोणाचाहि नव्हेस – म्हणजे तू कोणापासून उत्पन्न झालेला नाहीस असा तू अनादि व सिध्द आहेस.
(विश्वरूपाचे ठिकाणी विश्वरूपाहून दुसर्या पदार्थाचा अनुभवच नाही, म्हणून दुसर्या कोणापासून त्याची उत्पत्ती मानता येत नाही. अर्थात् ” अनादि आयता ” म्हणजे विश्वरूप हे उत्पत्तीरहित स्वतःसिध्द वस्तुस्वरूप आहे असा अर्थ. )
277-11
तू उभा ना बैठा । दिघडु ना खुजटा । तुज तळी वरी वैकुंठा । तूचि आहासी ॥277॥
तू उभा नाहीस किंवा बसला नाहीस. तू उंच नाहीस, ठेंगणा नाहीस. भगवंता ! तुझ्या खाली वर सर्वत्र एक तूंच भरला आहेस.
278-11
तू रूपे आपणयांचि ऐसा । देवा तुझी तूचि वयसा । पाठी पोट परेशा । तुझे तू गा ॥278॥
देवा ! तू रूपाने आपल्यासारखाच आहेस – म्हणजे तू जसा अपरिमित तसे तुझे रूपहि अपरिमित आहे. तूंच तुझे वय आहेस – म्हणजे तुला जशी मर्यादा नाही व तुझे पाठ पोट तूंच आहेस तुझे पाठ पोटयुक्त इत्यादि अवयवयुक्त शरीर तूंच आहेस.
279-11
किंबहुना आता । तुझे तूचि आघवे अनंता । हे पुढत पुढती पाहता । देखिले मिया ॥279॥
किंबहुना आता सर्व तूच आहेस म्हणजे तू जसा सच्चिदानंद स्वरूप तसे तुझे अवयवयुक्त शरीर सच्चिदानंदस्वरूप आहे असेच मी वारंवार पाहिले आहे.
280-11
परि या तुझिया रूपाआंतु । जी उणीव एक असे देखतु । जे आदि मध्य अंतु । तिन्ही नाही ॥280॥
पण या विश्वरूपात एकच मला उणीव दिसत आहे, ती म्हणजे तुझ्या विश्वरूपाचे ठिकाणी आदि, मध्य, अंत हे तिन्ही नाहीत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
281-11
एऱ्हवी गिंवसिले आघवा ठायी । परि सोय न लाहेचि कही । म्हणौनि त्रिशुद्धी हे नाही । तिन्ही एथ ॥281॥
तुला आदि, मध्य, अंत कोठे आहेत, हे सर्व ठिकाणी निरखून पाहिले, परंतु कोठे थांग लागत नाही; म्हणून हे तिन्ही तुझ्या ठिकाणी नाहीत हे त्रिवार सत्य आहे.
282-11
एवं आदिमध्यातरहिता । तू विश्वेश्वरा अपरिमिता । देखिलासि जी तत्त्वता । विश्वरूपा ॥282॥
हे आदिमध्यान्तरहिता ! हे सर्व ब्रह्मांडाच्या नियंत्या ! हे अमर्यादरूपा ! हे विश्वरूपा ! याप्रमाणे तू खरोखर आहेस, हे मी पाहिले.
283-11
तुज महामूर्तीचिया आंगी । उमटलिया पृथक् मूर्ती अनेगी । लेइलासी वानेपरींची आंगी । ऐसा आवडतु आहासी ॥283॥
तुझ्या विश्वरूप महामूर्तीच्या अंगावर ज्या अनेक निरनिराळ्या मूर्ती प्रगट झाल्या आहेत त्या पाहता, तू नाना प्रकारची आंगडी घातली आहेस, असा वाटतोस.
284-11
नाना पृथक् मूर्ती तिया द्रुमवल्ली । तुझिया स्वरूपमहाचळी । दिव्यालंकार फुली फळी । सासिन्नलिया ॥284॥
किंवा नाना प्रकारच्या निरनिराळ्या मूर्ती ह्याच कोणी निरनिराळ वृक्षे वेली असून, त्या तुझ्या विश्वरूपी महापर्वताचे ठिकाणी दिव्य अलंकाररूपी फळा फुलांनी भरास आल्या आहेत.
285-11
हो का जे महोदधी तू देवा । जाहलासि तरंगमूर्ती हेलावा । की तू एक वृक्षु बरवा । मूर्तिफळी फळलासी ॥285॥
किंवा देवा ! असेहि वाटते की तू महासमुद्र असून, मूर्ती ह्या तुझे तरंगरूप हेलकावे आहेत किंवा तू एक सुंदर वृक्ष असून मूर्तीरूप फळांनी फलद्रूप झाला आहेस.
286-11
जी भूती भूतळ मांडिले । जैसे नक्षत्री गगन गुढले । तैसे मूर्तिमय भरले । देखतसे तुझे रूप ॥286॥
अहो जी देवा ! जशी पृथ्वी भूतांनी व्यापिली आहे किंवा आकाश नक्षत्रांनी भरले आहे, त्याप्रमाणे तुझे विश्वरूप मूर्तीने भरलेले मी पाहात आहे.
287-11
जी एकेकीच्या अंगप्रांती । होय जाय हे त्रिजगती । एवढियाही तुझ्या आंगी मूर्ती । की रोमा जालिया ॥287॥
देवा ! काय सांगू ! तुझ्या अंगावर दिसणार्या एका एका मूर्तीच्या एका एका अवयवावर हे त्रैलोक्य, उत्पन्न व नष्ट होत असून, एवढ्याहि मूर्ती तुझ्या अंगाचे ठिकाणी रोमाप्रमाणे दिसत आहेत.
288-11
ऐसा पवाडु मांडूनि विश्वाचा । तू कवण पा एथ कोणाचा । हे पाहिले तव आमुचा । सारथी तोचि तू ॥288॥
असा हा विश्वरूपाचा विस्तार मांडून राहिलेला तू कोण व कोणाचा हे मी पाहिले, तेव्हा आमचा जो सारथी श्रीकृष्ण, तोच तू आहेस, असे दिसून आले.
(आपल्या सारथी श्रीकृष्णाच्या एकदेशीयस्वरूपाचे ठिकाणीच अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होत होते, असे माऊलिंचे म्हणणे आहे, अर्थात श्रीकृष्णस्वरूप व विश्वरूप असा या दोन्ही स्वरूपांचा प्रत्यय अर्जुनाला विश्वरूप दर्शनांत येत होता असे स्पष्ट दिसतें. यावरून भगवंताच्या एकदेशीय श्रीकृष्णस्वरूपाचा व विश्वरूपाचा केव्हाच विरोध नसतो व बीजवृक्षाप्रमाणे एकदेशीय श्रीकृष्णस्वरूपाचे ठिकाणी संपूर्ण विश्वरूप व विश्वरूपात श्रीकृष्णस्वरूप समाविष्ट असते, असेच सिध्द होतें, )
289-11
तरी मज पाहता मुकुंदा । तू ऐसाचि व्यापकु सर्वदा । मग भक्तानुग्रहे तया मुग्धा । रूपाते धरिसी ॥289॥
भगवंता ! मला असे वाटते की तू असाच सदासर्वदा व्यापक आहेस, पण भक्तांवर प्रेमवृध्दिरूप अनुग्रह करण्याकरिता तू सुंदर गोजिरवाणे एकदेशीय श्रीकृष्णस्वरूप धारण करतोस.
(समुद्राचे कांठी उभे राहून समुद्राकडे पाहिले असता, जसा तो विस्तीर्ण समुद्र मनुष्याच्या मर्यादित दृष्टीने मर्यादित पाहिला जातो, तरीपण, समुद्र विस्तीर्ण आहे, हे तो विसरत नसतो, त्याप्रमाणे भगवान सदा सर्वदा व्यापक असतो तरी भक्ताच्या प्रेमवृत्तीच्या मर्यादेमुळे, तो भक्ताकडून एकदेशीय घेतला जातो, तरीपण भक्त भगवंताची व्यापकता विसरत नसतो, ” प्रेम गली अती साकली तामे दो न समाये ” प्रेमाची गल्ली अत्यंत अरूंद असल्यामुळे भगवंताचे सगुणसाकारस्वरूपच, प्रेमाचा विषय होऊ शकते, व्यापकस्वरूप होऊ शकत नाही; हेच माउलिंनी या ओवीत सांगितले आहे. )
290-11
कैसे चहू भुजांचे सांवळे । पाहता वोल्हावती मन डोळे । खेंव देऊ जाइजे तरी आकळे । दोहीचि बाही ॥290॥
तुझे ते चतुर्भुजरूप कसे सुंदर व गोजिरवाणे आहे की जे पाहतांक्षणी मनाची व डोळ्यांची तृप्ति होते आणि प्रेमाणे आलिंगन देऊ म्हटल्यास आम्हाला आपल्या दोन हातांनी ते कवटाळता येते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-11
ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी ना विश्वरूपा । अमुचियाचि दिठी सलेपा । जे सामान्यत्वे देखिती ॥291॥
हे विश्वरूप भगवंता ! याप्रकारे आम्हा भक्तांवर कृपा करून, अशी ही गोजिरवाणी सगुण सांवळी मूर्ति धारण करतोस, पण आमची दृष्टिच अविद्येने दूषित असल्यामुळे आम्ही त्या तुझ्या सगुणरूपाला सामान्य मनुष्याप्रमाणेच पांचभौतिक लेखतो.
(भगवंताच्या सगुण श्रीकृष्णस्वरूपाला सामान्यत्वाने – म्हणजे इतर अज्ञानी जीवाच्या शरीराप्रमाणे पांचभौतिक जडविनाशी समजणार्यांची दृष्टि अविद्यादोषाने दूषितच असते असे माउलिंचे स्पष्ट म्हणणे आहे. )
292-11
तरी आता दिठीचा विटाळु गेला । तुवा सहजे दिव्यचक्षू केला । म्हणौनि यथारूपे देखवला । महिमा तुझा ॥292॥
परंतु देवा ! तुम्ही सहज माझ्यावर कृपा करून जी ज्ञानदृष्टि दिली, त्या ज्ञानदृष्टिने माझ्या पूर्वदृष्टींतील अविद्येचा दोष नाहीसा झाल्यामुळे तुझ्या सगुणसाकारस्वरूपाचे यथार्थ ज्ञान होऊन, त्या सगुणस्वरूपाचा खरा महिमा आता मला कळून आला.
293-11
परी मकरतुंडामागिलेकडे । तोचि होतासि तू एवढे । रूप जाहलासि हे फुडे । वोळखिले मिया ॥293॥
आणि मकराच्या तोंडाच्या आकाराप्रमाणे असलेल्या जुवांच्या मागच्या बाजूला जे तुम्ही बसलां होता, त्याच तुम्ही एवढे विश्वरूप धारण केले, हे मी पक्के ओळखलें.
किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।
पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्11. 17॥
अर्थ मुकुट, गदा व सुदर्शन चक्र धारण करणारा, तेजाची राशी, सर्वत्र प्रभायुक्त, ज्याच्याकडे एकसारखे पहाणे देखील अशक्य आहे असा दीप्तिमान् अग्नी, सूर्य यांच्या प्रभेसारखी ज्याची प्रभा समन्ताद्भागी पसरलेली आहे असा व अमर्याद असा तुला मी पहात आहे. ॥11-17॥
294-11
नोहे तोचि हा शिरी ? । मुकुट लेइलासि श्रीहरी । परी आताचे तेज आणि थोरी । नवल की बहु हे ॥294॥
श्रीहरी भगवंता ! तुझ्या चतुर्भुजमूर्तीच्या मस्तकावर जो मुकुट घातला जात असे, तोच हा आता घातलेला मुकुट नव्हे काय ? पण आता त्या मुकुटाचे तेज थोरवी काही अपूर्व आहे, हे नवल आहे.
295-11
तेचि हे वरिलियेचि हाती । चक्र परिजितया आयती । सांवरितासि विश्वमूर्ती । ते न मोडे खूण ॥295॥
(हे विश्वरूप भगवंता ! ) शत्रूच्या वधार्थ फिरविण्याकरिता जे चक्र तुझ्या वरच्या हातात सज्ज असते, तेच तू सांवरून धरीत आहेस, ती खूण नाहीशी झाली नाही.
296-11
येरीकडे तेचि हे नोहे गदा । आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा । वागोरे सांवरावया गोविंदा । संसरिलिया ॥296
हे गोविंदा ! दुसरीकडे जी गदा आहे ती, तीच नव्हे काय ? आणि शस्ररहित असलेल्या खालच्या दोन्ही भुजा घोड्याचा लगाम धरण्याकरिता पुढे सरसाविल्या आहेत.
297-11
आणि तेणेचि वेगे सहसा । माझिया मनोरथासरिसा । जाहलासि विश्वरूपा विश्वेशा । म्हणौनि जाणे ॥297॥
आणि माझ्या इच्छेबरोबर हे विश्वेशा ! आपण ” तेणेचि ” म्हणजे त्याच सगुण श्रीकृष्णस्वरूपाने एकदम विश्वरूप झालांत, हे मलां कळून आले.
298-11
परी कायसे बा हे चोज । विस्मयो करावयाहि पाडू नाही मज । चित्त होऊनि जातसे निर्बुज । आश्चर्ये येणे ॥298॥
पण कसे आश्चर्य आहे पहा की या विश्वरूपाच्या दर्शनाने माझे चित्त दिङ्मूढ होऊन गेले आहे आणि मला आश्चर्य करण्यापुरतीहि योग्यता राहिली नाही.
299-11
हे एथ आथि का येथ नाही । ऐसे श्वसोही नये काही । नवल अंगप्रभेची नवाई । कैसी कोंदली सैंघ ॥299॥
हे विश्वरूप येथे आहे किंवा नाही, याचा माझे मन विचार करू शकत नाही, तुझ्या अंगप्रभेचे विलक्षण अपूर्वत्व असून, ती कशी सर्वत्र भरली आहे, पहा.
300-11
एथ अग्नीचीही दिठी करपत । सूर्य खद्योतु तैसा हारपत । ऐसे तीव्रपण अद्भुत । तेजाचे यया ॥300॥
या प्रभेपुढे अग्नीची दृष्टि देखील होरपळून जाईल, सूर्याचे तेज देखील काजव्याच्या तेजाप्रमाणे या तेजात लोपून जाईल, असे या तुझ्या अद्भुत तेजाचे तीव्रपण आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
301-11
हो का महातेजाचिया महार्णवी । बुडोनि गेली सृष्टी आघवी । की युगांतविजूंच्या पालवी । झाकले गगन ॥301॥
असे वाटते जणू काय या तुझ्या महा तेजाच्या समुद्रांत सर्व सृष्टि बुडून गेली आहे किंवा कल्पांतसमयीच्या विजांच्या वस्रांनी सर्व आकाश झांकून टाकले आहे
302-11.
नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचू बांधला अंतराळा । आता दिव्य ज्ञानाचिया डोळा । पाहवेना । 302
किंवा सर्व सृष्टिचा प्रलयकारी संहार करणार्या ज्वाळा तोडून जणू काय आकाशांत माळाच बांधला; म्हणूनच आता ह्या माझ्या दिव्यदृष्टिनेहि ते तेज पाहवत नाही.
303-11
उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत आहे अतिदाहसु । पडत दिव्यचक्षुंसही त्रासु । न्याहाळिता ॥303॥
ते तेज अधिकाधिक फार वाढून अत्यंत दाहक होत आहे व ते पाहतांना माझ्या दिव्यचक्षुलाहि त्रास होत आहे.
304-11
हो का जे महाप्रळयींचा भडाडु । होता काळाग्निरुद्राचिया ठायी गूढु । तो तृतीयनयनाचा मढू । फुटला जैसा ॥304॥
असे वाटते की महाप्रलयातील महातेजाचा भडका, काळाग्निरूद्राच्या ठिकाणी जो गुप्त होता, तो तृतीय नेत्ररूप तेजाचा सांठाच जणु काय बाहेर पडला.
305-11
तैसे पसरलेनि प्रकाशे । सैंघ पांचवनिया ज्वाळाचे वळसे । पडता ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती ॥305॥
अशा त्या सर्वत्र पसरलेल्या तेजाने संपूर्ण पांचही अग्नीच्या (गार्हपत्य, आहवनीय, दाक्षिणाग्नि, सम्य आणि आवसथ्य असे पांच अग्नि) ज्वाळाचे वेढे पडल्यामुळे सर्व ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत.
306-11
ऐसा अद्भुत तेजोराशी । जन्मा नवल म्या देखिलासी । नाही व्याप्ती आणि कांतीसी । पारु जी तुझिये ॥306॥
याप्रमाणे जणु काय तेजाची राशीच असा अत्यंत आश्चर्यकारक, जन्मापासून आजच पाहत आहे. या तुझ्या व्याप्तीला व कान्तीला मर्यादाच नाही.
त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥11. 8॥
अर्थ वेदांकडून जाणण्याला योग्य असे अविनाशी ब्रह्म तू आहेस. या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस. अव्यय व शाश्वत अशा धर्माचा रक्षण करणारा आणि सनातन असा पुरुष तू आहेस असे मला वाटते. ॥11-18॥
307-11
देवा तू अक्षर । औटाविये मात्रेसि पर । श्रुती जयाचे घर । गिंवसीत आहाती ॥307॥
देवा ! वेद ज्या तुझ्या ठिकाणाचा शोध करीत आहे, तो तू अविनाशी असून ओंकाराच्या साडेतीन मात्रेच्या पलीकडे आहेस – म्हणजे ॐ कारालाहि तू अगम्य आहेस.
308-11
जे आकाराचे आयतन । जे विश्वनिक्षेपैकनिधान । ते अव्यय तू गहन । अविनाश जी ॥308॥
तू सर्व आकारांचा आश्रय आहेस म्हणजे सर्व नामरूपे तुझ्यावरच भासतात. संपूर्ण विश्व सांठविण्याचे एकमेव, नाश न पावणारे असे अविनाशी व अपार असे स्थान तूंच आहेस.
309-11
तू धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तू नित्य नवा । जाणे मी सदतिसावा । पुरुष विशेष तू ॥309॥
तू धर्माचे जीवन असून, तू अनादि, स्वतःसिध्द व नित्य नूतन आहेस. प्रकृतिजन्य छत्तीस तत्वांच्या पलीकडे सदतिसावा विशेष पुरुष म्हणून जो सांगितला आहे, तो तू आहेस, हे मी आता जाणलें.
(सांख्यशास्राच्या मते पुरूष सोडून, कार्यप्रपंच म्हणून जी चोविस तत्वे सांगितली आहेत, त्यांचा थोडा विस्तार करून, माउलिंनी छत्तीस तत्वे मानली आहेत. ती छत्तीस तत्वे पुढे तेराव्या अध्यायात क्षेत्रांचे वर्णन करतांना सांगितली आहेत. आणि सांख्यात जसा चोविस तत्वांव्यतिरिक्त पंचविसावा पुरूष मानला आहे, तसा येथे छत्तीस तत्वाव्यतिरिक्त सदतिसावा पुरूष म्हणून, विश्वरूपाला मानले आहे. या प्रतिपादनाने भगवंताची सगुण व निर्गुन ही दोन्ही रूपे छत्तीस तत्वांच्या पलिकडे असल्यामुळे ती त्रिगुणात्मक मायारहित किंवा अविद्यारहित आहेत, असे सुचविले आहे. )
अनादिमध्यान्तमनन्तवीर्यं अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् ।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥11. 19॥
अर्थ ज्याला आदि नाही, मध्य नाही व अंत नाही, ज्याच्या पराक्रमाला अंत नाही, ज्याचे बाहु अनंत आहेत, चंद्र, सूर्य ज्याचे नेत्र आहेत, दीप्तिमान अग्नी ज्याचे मुख आहे व आपल्या तेजाने जो या विश्वाला जणुकाय गिळून टाकत आहे असा तुला मी पहात आहे. ॥11=19॥
310-11
तू आदिमध्यातरहितु । स्वसामर्थ्ये तू अनंतु । विश्वबाहु अपरिमितु । विश्वचरण तू ॥310॥
तुला आदि, मध्य, अंत नाहीत. स्वतःच्या सामर्थ्याच्या दृष्टीने तू अनंत आहेस – म्हणजे तुझे सामर्थ्य अपरिमित आहे. सर्वत्र अपरिमित असे तुझे बाहु व चरण आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-11
पै चंद्र चंडांशु डोळा । दावितासि कोपप्रसाद लीळा । एका रुससी तमाचिया डोळा । एका पाळितोसि कृपादृष्टी 311॥
तू आपल्या सूर्य व चंद्र या डोळ्यांनी कोप व अनुग्रह अशी लिला दाखवतोस. सूर्यरूपी क्रुध्द (तीक्ष्ण) डोळ्यांने रूसून नाश करतोस, तर चंद्ररूपी डोळ्याने कोणावर कृपा करून त्यांचे संरक्षण करतोस.
312-11
जी एवंविधा तूते । मी देखतसे हे निरुते । पेटले प्रळयाग्नीचे उजिते । तैसे वक्त्र हे तुझे ॥312॥
भगवंता ! याप्रमाणेच खरोखर मी तुला पाहत आहे. जणु काय प्रलयातील पेटलेल्या अग्नीचा लखलखाटच, असे हे तुझे मुख दिसत आहे.
313-11
वणिवेनि पेटले पर्वत । कवळूनि ज्वाळाचे उभड उठत । तैसी चाटीत दाढा दात । जीभ लोळे ॥313॥
जंगलांत लागलेल्या अग्नीने पर्वत पेटून जशा सर्व ज्वाळा मिळून त्यांचा एकच भडका उठावा, त्याप्रमाणे दात व दाढा चाटीत जीभ तोंडात सारखी फिरत आहे.
314-11
इये वदनींचिया उबा । आणि जी सर्वागकांतीचिया प्रभा । विश्व तातले अति क्षोभा । जात आहे ॥314॥
या तुझ्या मुखातील ज्वाळांच्या उष्णतेने आणि तुझ्या सर्वागाच्या अद्भूत तेजाने संपूर्ण विश्व होरपळून गेले असून अत्यंत व्याकूळ होत आहे.
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।
दृष्ट्वाऽद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥11. 20
अर्थ स्वर्ग व पृथ्वी यांच्यामधील हा सर्व प्रदेश तू एकट्याने व्यापला आहेस. सर्व दिशाही तू एकट्याने व्यापल्या आहेस. हे विश्वरूपा, हे तुझे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे. ॥11-20॥
(विश्वरूपाची भीती व ती वाटण्याचे अर्जुनानाच्या मते कारण =)
315-11
का जे द्यौर्लोक आणि पाताळ । पृथिवी आणि अंतराळ । अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र ॥315॥
कारण स्वर्ग, पाताळ पृथ्वी आणि अंतराळ अथवा दशदिशासहित संपूर्ण दिङ्मंडळ,
316-11
हे आघवेचि तुवा एके । भरले देखत आहे कौतुके । परि गगनाहीसट भयानके । आप्लविजे जेवीं ॥316॥
आकाशासहित हे संपूर्ण विश्व बुडवून टाकावे, त्याप्रमाणे तू आपल्या एका भयंकर मुखात सहज भरले आहेस असे मी आश्चर्यचकित होऊन पाहत आहे.
317-11
नातरी अद्भुतरसाचिया कल्लोळी । जाहली चवदाही भुवनांसि कडियाळी । तैसे आश्चर्यचि मग मी आकळी । काय एक ? ॥317॥
किंवा अद्भुतरसाच्या कल्लोळांनी चवदाहि भुवनाला जसा वेढा दिला तसेच मीहि एक काय ते आश्चर्यच अनुभवित आहे. (एका आश्चर्याशिवाय मला काही दिसत नाही असा अर्थ).
318-11
नावरे व्याप्ती हे असाधारण । न साहवे रूपाचे उग्रपण । सुख दूरी गेले परि प्राण । विपाये धरीजे ॥318॥
कि️ तुझा हा असामान्य व्यापकपणा आकलन होत नाही व तुझ्या रूपाचे उग्रपणहि सहन करवत नाही. सुख होणे तर दूरच राहिलें; पण जगाला प्राण धारण करणे देखील कठीण झाले आहे.
319-11
देवा ऐसे देखोनि तूते । नेणो कैसे आले भयाचे भरिते । आता दुःखकल्लोळी झळंबते । तिन्ही भुवने ॥319॥
देवा ! ! तुझ्या अशा विश्वस्वरूपाला पाहून अशी भयंकर भीति का वाटत आहे हे सांगवत नाही; पण हे संपूर्ण त्रिभुवन या दुःखाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात आहे.
320-11
एऱ्हवी तुज महात्मयाचे देखणे । तरि भयदुःखासि का मेळवणे ? । परि हे सुख नव्हेचि जेणे गुणे । ते जाणवत आहे मज ॥320॥
खरोखर पाहता, तुज महात्म्याच्या दर्शनाने भीतिरूप दुःखाची प्राप्ति का व्हावी ? पण ज्या गुणामुळे याविश्वरूपदर्शनाचे सुख होत नाही, तो गुण मलाहि कळून येत आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-11
जव तुझे रूप नोहे दिठे । तव जगासि संसारिक गोमटे । आता देखिलासि तरी विषयविटे । उपनला त्रासु ॥321॥
जोपर्यंत तुझे हे विश्वरूप दृष्टीस पडत नाही, तोपर्यंत जीवांना संसारसुखच गोड वाटते आणि आता तुझ्या विश्वरूपदर्शनाने विषयसुखाचा वीट येऊन विषयांचा कंटाळा उत्पन्न झाला आहे.
322-11
तेवीचि तुज देखिलियासाठी । काय सहसा तुज देवो येईल मिठी । आणि नेदी तरी शोकसंकटी । राहो केवी ? ॥322॥
त्याचप्रमाणे तुझ्या भयंकर रूपाला पाहिल्यानंतर एकदम तुला प्रेमाने मिठी मारता येईल काय ? आणि प्रेमाने मिठी मारता येणार नाही, तर त्यावाचून विरहशोकसंकटात तरी कसे राहायचे !
323-11
म्हणौनि मागा सरो तव संसारु । आडवीत येतसे अनिवारु । आणि पुढा तू तव अनावरु । न येसि घेवो ॥323
म्हणून तुजपासून मागे सरावे, तर हा अनिवार संसार मागे फिरू देत नाही आणि समोर तुझे अनिवार स्वरूप आकलन करतिं येत नाही.
324-11
ऐसा माझारलिया सांकडा । बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा । हा ध्वनि जी फुडा । चोजवला मज । 324॥
याप्रमाणे संसारांचे भय आणि विश्वरूपाचे भय या दोन संकटाच्या कात्रींत सांपडलेल्या बिचार्या त्रैलोक्याचा होरपळा होत आहे, असा आशय स्पष्ट मला कळला आहे.
325-11
जैसा आरंबळला आगी । तो समुद्रा ये निवावयालागी । तव कल्लोळपाणियाचिया तरंगी । आगळा बिहे ॥325॥
ज्याप्रमाणे अग्नीने होरपळलेला मनुष्य, शरीराचा दाह नाहीसा करण्याकरिता, समुद्रावर जातो आणि त्या समुद्रावर उठणार्या भयंकर लाटांना पाहून, तो अत्यंत भितो,
326-11
तैसे या जगासि जाहले । तूते देखोनि तळमळित ठेले । यामाजी पैल भले । ज्ञानशूरांचे मेळावे ॥326॥
त्याप्रमाणे या संपूर्ण त्रैलोक्याला झाले असून, तुला पाहून, ते अत्यंत तळमळत आहे. यामध्ये पलीकडे मोठमोठे ज्ञानियांचे मेळावेहि आहेत.
अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति
केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति ।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः
स्तुवन्ति त्वां सुतिभिः पुष्कलाभिः ॥11. 21
अर्थ हे देवाचे समुदाय तुझ्यामधे प्रवेश करीत आहेत, कोणी भयभीत होत्साते अंजलि करून तुझे स्तवन करत आहेत. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय ‘स्वस्ति ” असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करत आहेत. ॥11-21॥
327-11
हे तुझेनि आंगिके तेजे । जाळूनि सर्व कर्मांची बीजे । मिळत तुज आंतु सहजे । सद्भावेसी ॥327॥
हे देवाचे समुदाय, तुझ्या अंगाच्या तेजाने आपल्या सर्व कर्माची बीजे जळून आपल्या सद्भावाने तुझ्यात मिळत आहेत.
(चैतन्य प्रकाशरूप परमेश्वराचे ठिकाणी, त्यावाचून कर्म म्हणून दुसरी वस्तुच नाही, या ज्ञानाने किंवा कर्मरूपानेहि परमेश्वरच भासतो, या ज्ञानाने भगवाज्ञा समजून भगवत्प्रित्यर्थ निष्काम कर्मयोगानुष्ठान करून आपले कर्मकर्तृत्व निःशेष नाहीसे करतात. )
328-11
आणिक एक सावियाचि भयभीरु । सर्वस्वे धरूनि तुझी मोहरु । तुज प्रार्थिताति करु । जोडोनिया ॥328॥
आणि कित्येक खरोखरच भयभीत होऊन व सर्वस्वी तुझ्याकडे दृष्टि देऊन, हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत की,
329-11
देवा अविद्यार्णवी पडिलो । जी विषयवागुरे आंतुडलो । स्वर्गसंसाराचिया सांकडलो । दोही भागी ॥329॥
देवा ! आम्ही तुला निःशेष विसरलो आहो व विषयसक्तिरूप जाळ्यात सांपडलो आहो. त्यामुळे स्वर्गसुख व संसारसुख या दोहोंच्या कात्रींत अडकून पडलो आहो.
330-11
ऐसे आमुचे सोडवणे । तुजवाचोनि कीजेल कवणे ? । तुज शरण गा सर्वप्राणे । म्हणत देवा ॥330॥
अशा आमची, येथून सुटका आता तुझ्यावाचून कोण करणार ? देवा ! आम्ही तुलाच पंचप्राण समर्पण करून शरण आलो आहो, असे म्हणत आहे
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-11
आणि महर्षी अथवा सिद्ध । का विद्याधरसमूह विविध । हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन ॥331॥
आणि महर्षि अथवा सिध्द, तसेच नानाविध विद्याधरांचे समुदाय ” तुझे कल्याण असो ” असे म्हणून तुझे स्तवन करीत आहेत.
रुद्रादित्या वसवो ये च साध्या
विश्वेऽश्विनौ मरुतश्चोश्मपाश्च ।
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा
वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥22॥
अर्थ अकरा रुद्र, बारा आदित्य, अष्ट वसु, साध्य, विश्वेदेव, अश्विनीकुमार, वायु, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पहात आहेत. ॥11-22॥
332-11
हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे । अश्विनौ देव विश्वेदेव विभवे । वायुही हे जी ॥332॥
अकरा रुद्रांचा समूह, बारा सूर्याचा समूह, आठ वसू, सर्वसाध्य, अश्विनुकुमार, वैभवाने युक्त असे विश्वदेव, तसेच वायु
333-11
अवधारा पितर हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व । जी महेंद्रमुख्य देव । का सिद्धादिक ॥333॥
पहा ! पितर, गंधर्व, पलीकडे असलेले यक्षराक्षसगण, इंद्रादिदेव आणि सिध्दादिक
334-11
हे आघवेचि आपुलालिया लोकी । सोत्कंठित अवलोकी । हे महामूर्ती दैविकी । पाहात आहाती ॥334॥
हे सर्वच आपआपल्या लोकांमध्ये अंत उत्कंठित होऊन तुझ्या या दैवी महामूर्तीकडे पाहात आहेत, हे पहा.
335-11
मग पाहात पाहात प्रतिक्षणी । विस्मित होऊनि अंतःकरणी । करित निजमुकटी वोवाळणी । प्रभुजी तुज ॥335॥
मग पाहत पाहत क्षणोक्षणी अंतःकरणात आश्चर्यचकित होऊन, आपल्या शिरावर असलेल्या मुकुटांची तुझ्यावरून ओवाळणी करीत आहेत.
336-11
ते जय जय घोष कलरवे । स्वर्ग गाजविताती आघवे । ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ॥336॥
ते मंजुळ शब्दांनी तुझा जयघोष करून, संपूर्ण स्वर्ग दुमदुमून टाकीत आहेत आणि सुंदर जोडलेले हात ते मस्तकावर ठेवित आहेत.
337-11
तियेविनयद्रुमाचिये आरवी । सुरवाडे सात्त्विकांची माधवी । म्हणौनि करसंपुटपल्लवी । तू होतासिफळ ॥337॥
त्या अत्यंत नम्रतारूप वृक्षाच्या अरण्यात सात्विक गुणांच्या वसंतऋतूंचे ऐश्वर्य प्रगट झालें; म्हणून त्यांच्या जोडलेल्या हस्तरूपी पदरांत फळरूपाने तू प्राप्त होतोस.
रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं
महाबाहो बहुबाहूरुपादम् ।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं
दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाऽहम् ॥11. 23॥
अर्थ हे महाबाहो, अनंत मुखे व नेत्र असलेले अनंत बाहू, मांड्या व पाय असलेले, अनंत उदरे असलेले, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून तसाच मी देखील व्याकुळ झालो आहे. ॥11-23॥
338-11
जी लोचना भाग्य उदेले । मना सुखाचे सुयाणे पाहले । जे अगाध तुझे देखिले । विश्वरूप इही ॥338॥
अहो जी भगवंता ! मन व डोळे यांनी जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले, ते डोळ्यांचे भाग्य उदयाला आले व मनाने सुखाचा सुकाळ पाहिला.
339-11
हे लोकत्रयव्यापक रूपडे । पाहता देवांही वचक पडे । याचे सन्मुखपण जोडे । भलतयाकडुनी ॥339॥
हे तिन्ही लोकांना व्यापून असणारे तुझे विश्वरूप पाहतांना देवांनाहिं धाक उत्पन्न होतो आणि कोणालाहि ते सन्मुखच वाटते.
340-11
ऐसे एकचि परी विचित्रे । आणि भयानके वक्त्रे । बहुलोचन हे सशस्त्रे । अनंतभुजा ॥340॥
याप्रमाणे हे तुझे विश्वरूप एकच पण विचित्र आणि भयानक अशा भयानक अशा असंख्य मुखांनी नेत्रांनी व शस्रयुक्त अनंत भुजांनी युक्त आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-11
अनंत चारु बाहु चरण । बहूदर आणि नानावर्ण । कैसे प्रतिवदनी मातलेपण । आवेशाचे ॥341॥
या विश्वरूपाचे ठिकाणी असंख्य उर, बाहू व चरण असून बहु उदरे आणि नाना वर्ण आहेत आणि प्रत्येक मुखाचे ठिकाणी खाण्याच्या आवेशाचा माज कसा दिसून येतो, पहा !
342-11
हो का महाकल्पाचिया अंती । तवकलेनि यमे जेउततेउती । प्रळयाग्नीची उजिती । आंबुखिली जैसी भीम ॥342॥
जणु काय महाकल्पाच्या शेवटी क्रुध्द झालेल्या यमाने जिकडे तिकडे प्रलयकालच्या अग्नीच्या होळ्याच पहरल्या आहेत.
343-11
नातरी संहारत्रिपुरारीची यंत्रे । की प्रळयभैरवाची क्षेत्रे । नाना युगांतशक्तीची पात्रे । भूतखिचा वोढविली ॥343॥
किंवा सृष्टि संहार करणार्या शंकराची शस्रास्रेंच. की प्रलयकालच्या भैरवाची शरीरेंच आणि युगाचा अंत करणार्या शक्तीची सोंगे भूतांचा नाश करण्याकरिता प्राप्त झाली.
344-11
तैसी जियेतियेकडे । तुझी वक्त्रे जी प्रचंडे । न समाती दरीमाजी सिंव्हाडे । तैसे दशन दिसती रागीट ॥344॥
त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी असलेली भयंकर मुखे मावत नाहीत आणि तसेंच त्यातील दात दरीतील क्रुध्द सिंहाप्रमाणे रागीट दिसतात.
345-11
जैसे काळरात्रीचेनि अंधारे । उल्हासत निघती संहारखेंचरे । तैसिया वदनी प्रळयरुधिरे । काटलिया दाढा ॥345॥
ज्याप्रमाणे प्रलयकाळाच्या गडद अंधाराचा आश्रय करून प्राण्यांचा नाश करणारी पिशाच्चे अत्यंत उल्हासाने वावरतात, त्याप्रमाणे तुमच्या मुखातील दाढा, जणू काय प्रलयकाली संहार पावणार्या प्राण्यांच्या रक्ताने माखलेल्या आहेत.
346-11
हे असो काळे अवंतिले रण । का सर्व संहारे मातले मरण । तैसे अतिभिंगुळवाणेंपण । वदनी तुझिये ॥346॥
हे असो, काळानेच युध्दाला आमंत्रण दिल्याप्रमाणे किंवा सर्व प्राण्यांचा संहार करून मरणाने माजावे, त्याप्रमाणे तुझ्या या मुखांचा देखावा अत्यंत भयंकर दिसत आहे.
347-11
हे बापुडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी । आणि दुःखकालिंदीचिया तटी । झाड होऊनि ठेली ॥347॥
ही बिचारी सृष्टि, तू सहज दृष्टिने पाहिलीस आणि ती दुःखरूपी यमुनानदीच्या तीरावरील कालियासर्पाच्या विषाने करपलेल्या वृक्षाप्रमाणे होऊन राहिली आहे.
348-11
तुज महामृत्यूचिया सागरी । आता हे त्रैलोक्य जीविताची तरी । शोकदुर्वातलहरी आंदोळत असे ॥348॥
तुझ्या या महामृत्युच्या सागरांत, त्रैलोक्याच्या आयुष्याची नौका, दुःखरूपी वादळांतील लाटांनी हेलकावे खात आहे.
349-11
एथ कोपोनि जरी वैकुंठे । ऐसे हन म्हणिपैल अवचटे । जे तुज लोकांचे काई वाटे ? । तू ध्यानसुख हे भोगी ॥349॥
या माझ्या म्हणण्याचा राग येऊन, भगवंता ! आपण जर कदाचित असे म्हणाल की, तुलाया लोकांचे काय उगीच वाईट वाटत आहे ! तू माझ्या विश्वरूप ध्यानाचे सुख भोग.
350-11
तरी जी लोकांचे कीर साधारण । वाया आड सूतसे वोडण । केवी सहसा म्हणे प्राण । माझेचि कापती ॥350॥
पण खरोखरदेवा ! भीतीने माझ्या जीवाचा थरकाप झाला आहे, असेमी एकदम कसे म्हणूं ?म्हणूनच मी, व्यर्थ लोकांच्या दुःखांचे सामान्य निमित्त पुढे करीत आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
351-11
ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणे मृत्यु लपे । तो मी एथे अहाळबाहळी कांपे । ऐसे तुवा केले ॥351॥
ज्या मला सृष्टीचा संहार करणारा रूद्र भितो, ज्या मला भिऊन मृत्युदेखील तोंड लपवितो. त्या मलाही अत्यंत थरकाप सुटावा, असा विश्वरूप तू झाला आहेस.
352-11
परि नवल बापा हे महामारी । इया नाम विश्वरूप जरी । हे भ्यासुरपणे हारी । भयासि आणी ॥352॥
पण याला विश्वरूप हे जरी नाव आहे, तरी भगवंता ! ही विलक्षण महामारी आहे. हे विश्वरूप, आपल्या भयंकर विक्राळ स्वरूपामूळे साक्षात भयालाही हार खायला लावणारे आहे.
नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥11. 24॥
अर्थ हे विष्णो, गगनाला स्पर्श करणारा, दीप्रिमान, अनेक रंगांनी युक्त, जबडा पसरलेला, दीप्तिमान व विशाल नेत्र असलेला, अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकूळ झाला आहे असा मी धैर्य धारण करू शकत नाही व शांति देखील धरू शकत नाही. ॥11-24॥
353-11
ठेली महाकाळेंसि हटेतटे । तैसी किती{ए}के मुखे रागिटे । इही वाढोनिया धाकुटे । आकाश केले ॥353॥
तुझी कित्येक क्रुध्द मुखें, जणुंकाय महाकाळाशी पैज मारून आहेत, तशु रागीट आहेत, त्यांनी आपल्या विस्तृतपणाने आकाशालाहि लहान केले आहे.
354-11
गगनाचेनि वाडपणे नाकळे । त्रिभुवनीचियाही वारिया न वेटाळे ययाचेनि वाफा आगी जळे । कैसे धडाडीत असे ॥354॥
ही अफाट वाढलेली मुखे एवढ्या विस्तीर्ण आकाशांतहि सामावत नाहीत. त्रिभुवनांत वाहणारा वारादेखील त्यांना वेटाळू शकत नाही. त्यांच्या वाफेने अग्निदेखील जळू शकेल, अशी प्रज्वलित आहेत.
355-11
तेवीचि एकसारिखे एक नोहे । एथ वर्णावर्णाचा भेदु आहे । हो का जे प्रळयी सावावो लाहे । वन्ही ययाचा ॥355॥
त्याचप्रमाणे सर्व मुखे एकसारखी नसून त्यांचे वर्णहि भिन्न भिन्न आहेत, जणु काय प्रलकाली आग्नीला याचेच सहाय्य मिळते.
356-11
जयाचिये आंगीची दीप्ती येवढी । जे त्रैलोक्य कीजे राखोंडी । की तयाही तोंडे आणि तोंडी । दात दाढा ॥356॥
ज्यांच्या अंगाचे तेज एवढे भयंकर आहे की, जे त्रैलोक्याची राखरांगोळी करील. त्यातहि आणखी तोंडे असून, त्या तोंडात भयंकर दाढा दात आहेत.
357-11
कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र की महापुरी पडिला । विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥357॥
जणु काय वार्याला धनुर्वात झाला किंवा समुद्र महापुरांत पडला अथवा विषरूपी अग्नि, समुद्रात असलेल्या वडवाग्नीला मिळून, मारण्याला प्रवृत्त झाला.
358-11
हळाहळ आगी पियाले । नवल मरण मारा प्रवर्तले । तैसे संहारतेजा या जाहले । वदन देखा ॥358॥
किंवा अग्नीने हलाहल विष प्राशन केले किंवा स्वतः मरणच मारायला प्रवृत्त झालें. त्याप्रमाणे या सृष्टिचा संहार करणार्या या अंगाच्या तेजाला, तुझी मुखे आणखी सहाय्यभूत झाली आहेत.
359-11
परी कोणे माने विशाळ । जैसे तुटलिया अंतराळ । आकाशासि कव्हळ । पडोनि ठेले ॥359॥
पण ही तुझी मुखे कशाप्रमाणे अशी विशाल पसरलेली आहेत, असे म्हणशील, तर ज्याप्रमाणे अंतराळ तुटून आकाशांत जणु काय भगदाड पडले आहे.
360-11
नातरी काखे सूनि वसुंधरी । जै हिरण्याक्षु रिगाला विवरी । तै उघडले हाटकेश्वरी । जेवी पाताळकुह र ॥360॥
किंवा जेंव्हा हिरण्याक्ष राक्षस, पृथ्वी खाकेत मारून पाताळांत जाण्याकरिता समुद्राच्या विवराने शिरला, तेव्हा, ज्याप्रमाणे पाताळांतील हिटकेश्वराने पाताळाचे विवर खुले केले
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
361-11
तैसा वक्त्रांचा विकाशु । माजी जिव्हांचा आगळाचि आवेशु । विश्व न पुरे म्हणौनि घासु । न भरीचि कोंडे ॥361॥
त्याप्रमाने तोंडे पसरलेली आहेत व त्यामधे जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहेत. त्यांचा घासास विश्वानेही पूर्तता येणार नाही. म्हणून हे विश्वरूप या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही.
362-11
आणि पाताळव्याळांचिया फूत्कारी । गरळज्वाळा लागती अंबरी । तैसी पसरलिये वदनदरी । माजी हे जिव्हा ॥362॥
आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या फुत्काराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात, त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा ही (प्रत्येक) वदनरूपी दरीत पसरली आहे.
363-11
काढूनि प्रळयविजूंची जुंबाडे । जैसे पन्नासिले गगनाचे हुडे । तैसेआवाळुवांवरी आंकडे । धगधगीत दाढांचे ॥363॥
प्रलयकाळाच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत, तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत.
364-11
आणि ललाटपटाचिये खोळे । कैसे भयाते भेडविताती डोळे । हो का जे महामृत्यूचे उमाळे । कडवसा राहिले ॥364॥
आणि ललाटारूप वस्त्रांच्या खोळीत असलेले डोळे, हे जसे भयासच भेडसावित आहेत, अथवा ते डोळे, महामृत्यूचे लोटच असून (भिवयांच्या) अंधारात राहिले आहेत.
365-11
ऐसे वाऊनि भयाचे भोज । एथ काय निपजवू पाहातोसि काज । ते नेणो परी मज । मरणभय आले ॥365॥
असे हे महाभयाचे (मृत्यूचे) कौतुक धारण करून (म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून) या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पहातोस ते मला कळत नाही. परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे.
366-11
देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलो प्रतिफळे । बापा देखिलासि आता डोळे । निवावे तैसे निवाले ॥366॥
अहो देवा, विश्वरूप पहाण्याचे डोहाळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा, तुमचे विश्वरूप पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसे झाले आहे.
367-11
अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे । परि आता चैतन्य माझे विपाये । वाचे की न वाचे ॥367॥
अहो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चयेकरून नाश पावणारच. त्याची काळजी कोणी केली आहे ? परंतु आता माझे चैतन्यच कदाचित वाचेल की नाही असे मला वाटू लागले आहे.
368-11
एऱ्हवी भयास्तव आंग कांपे । नावेक आगळे तरी मन तापे । अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे ॥368॥
भयामुळे खरोखर अंग कापावयास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले की मनाला ताप होतो अथवा बुद्धि दचकते आणि अभिमान विगलित होतो.
369-11
परी येतुलियाही वेगळा केवळ आनंदैककळा । तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली ॥369॥ ।
जो परंतु या सर्वाहून वेगळा, जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा, त्या शांत अंतरात्म्याला देखील भयाने शहारे आले.
370-11
बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु । हा गुरुशिष्यसंबंधु । विपाये नांदे ॥370॥
काय आश्चर्य आहे ? विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता ? त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडी केले. असा गुरुशिष्यसंबंध क्वचितच असेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
371-11
देवा तुझ्या ये दर्शनी । जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणी । ते सावरावयालागी गंवसणी । धैर्याची करितसे ॥371॥
देवा ! या तुझ्या विश्वरूप दर्शनाने माझ्या मनात जी काही व्याकुळता उत्पन्न झाली, ती सावरण्याकरिता मी धैर्याची खोळ करण्याचा प्रयत्न करीत आहे.
372-11
तव माझेनि नामे धैर्य हारपले । की तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहले । हे असो परि मज भले आतुडविले । उपदेशा इया ॥372॥
तेव्हा माझ्या ‘अर्जुन’ या नावाचे धैर्य नाहीसे झालें; कारण विश्वरूपाचे दर्शन धैर्याच्या मर्यादांपेक्षाही श्रेष्ठ झाले हे असो, पण तुम्ही मला या उपदेशाने-म्हणजे विश्वरूप दर्शनाने-बरे संकटांत टाकलें.
373-11
जीव विसंवावयाचिया चाडा । सैंघ धावाधावी करितसे बापुडा । परि सोयही कवणेकडा । न लभे एथ ॥373॥
बापडा माझा जीव निर्धास्त होऊन विश्रांती मिळावी म्हणून सर्वत्र धावाधाव करीत आहे; पण या विश्वरूपात तशी सोय कोठेहि प्राप्त होत नाही.
374-11
ऐसे विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेले आहे चराचरी । जी न बोले तरि काय करी । कैसेनि राहे ? ॥374॥
याप्रमाणे या विश्वरूपाच्या महामारींत सर्व स्थावरजंगम जीवाचे जीवित्व नाहिसे झाले आहे. देवा ! हे बोलू नये, पण काय करू बोलण्यावाचून राहवत नाही.
दंष्ट्राकरालानि च ते मुखानि
दृष्ट्वैव कालानलसन्निभानि ।
दिशो न जाने न लभे च शर्म
प्रसीद देवेश जगन्निवास ॥11. 25॥
अर्थ दाढांच्या योगाने विक्राळ आणि प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे (दिसणारी) तुझी मुखे पाहून (मी इतका गर्भगळित झालो आहे की) मला दिशाभूल झाली आहे, मला काही समाधान वाटत नाही, हे देवाधिदेवा, जगन्निवासा, (आता) प्रसन्न हो. ॥11-25॥
375-11
पै अखंड डोळ्यांपुढे । फुटले जैसे महाभयाचे भांडे । तैशी तुझी मुखे वितंडे । पसरली देखे ॥375॥
महाभय सांठविलेले भांडे फुटल्याप्रमाणे तुझी विक्राळ मुखे मी अखंड डोळ्यांसमोर पसरलेली पाहत आहे.
376-11
असो दात दाढांची दाटी । न झांकवे मा दो दो वोठी । सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ॥376॥
हे असो संपूर्ण प्रलयकालच्या शस्रांचे दाट कुंपण लागावे, त्याप्रमाणे तुझ्या मुखातील दांतदाढांची असलेली दाटी दोन्ही ओठांनी झाकली जात नाही.
377-11
जैसे तक्षका विष भरले । हो का जे काळरात्री भूत संचरले । की आग्नेयास्त्र परजिले । वज्राग्नि जैसे ॥377॥
जणु काय विषारी तक्षकाचे ठिकाणी विष भरले, प्रलयकालच्या रात्री भूतांचा संचार झाला किंवा प्रलयाग्नीने पुनः अग्नेयास्र हातात घेतले.
378-11
तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे । वरि आवेश हा बाहेरी वोसंडे । आले मरणरसाचे लोंढे । आम्हावरी ॥378॥
त्याप्रमाणे तुझी ही प्रचंड भयंकर मुखे असून त्यातहि पुनः त्यांचा आवेश बाहेर प्रगट होत आहे. असे वाटते की त्यातून आम्हावर मरणरूपी रसांचे लोंढे आले आहेत. चंडा
379-11
संहारसमयींचा निळु । आणि महाकल्पांत प्रळयानळु । या दोही जै होय मेळु । तै काय एक न जळे ? ॥379॥
देवा ! प्रलयकाळचा भयंकर वायु व महिकल्पाच्या वेळचा प्रलयाग्नि, हे दोन्ही मिळाले असता काय जळणार नाही ?
380-11
तैसी संहारके तुझी मुखे । देखोनि धीरु का आम्हा पारुखे ? । आता भुललो मी दिशा न देखे । आपणपे नेणे ॥380॥
त्याप्रमाणेच तुझी सर्व ब्रह्मांडाचा संहार करणारी मुखे पाहून, धैर्य आम्हाला स्पर्श करील काय ?आता मी भ्रमिष्ट दिङ्मूढ झालो व मला माझेंहि भान राहिले नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
381-11
मोटके विश्वरूप डोळा देखिले । आणि सुखाचे अवर्षण पडिले । आता जापाणी जाणारी । आपुले अस्ताव्यस्त हे ॥381॥
तुझे विश्वरूप डोळ्यांनी पाहिले मात्र, तोच सुखाचा दुष्काळ पडला; म्हणून आपले हे अवाढव्य पसरलेले विश्वरूप आता आवरा आवरा.
382-11
ऐसे करिसी म्हणौनि जरी जाणे । तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे । आता एक वेळ वांचवी जी प्राणे । या स्वरूपप्रळयापासोनि ॥382॥
(हे आपले भयंकर विश्वरूप दाखवून आम्हाला) अशाप्रकारे अत्यंत भयभीत करशील असे जर मला माहित असते, तर विश्वरूप दाखवा, असे मी कशाला म्हटले असते ? तरी आता देवा ! एकवेळ प्राणदान देऊन, या माझ्या जीवाच्या होऊ पाहणार्या स्वरूपप्रलयापासून -म्हणजे माझी संपूर्ण स्थूळ सूक्ष्मतत्वे अव्यक्तांत मिळू पाहत आहेत त्यापासून -प्राणाने मला वांचवा म्हणजे माझे प्राण जीवंत ठेवा.
383-11
जरी तू गोसावी आमुचा अनंता । तरी सुई वोडण माझिया जीविता । सांटवी पसारा हा मागुता । महामारीचा ॥383॥
भगवंता ! जर तू आमचा स्वामी म्हणवितोस, तर माझ्या, जीवितावर आडपडदा घालून माझे संरक्षण कर व हा महामारीचा पसारा पुनः फिरून आपले ठिकाणी सांठवून घें.
384-11
आइके सकळ देवांचिया परदेवते । तुवा चैतन्ये गा विश्व वसते । ते विसरलासी हे उपरते । संहारू आदरिले ॥384॥
हे सर्व देवांच्याहि परम देवा ! माझे म्हणने ऐक. तूंच चैतन्यस्वरूपाने सर्व विश्वांत वास करतोस, हे तू विसरलास आणि उलट सर्व विश्वाचा संहार करावयास उठलास.
385-11
म्हणौनि वेगी प्रसन्न होई देवराया । संहरी संहरी आपुली माया । काढी माते महाभया- । पासोनिया ॥385॥
म्हणून देवा ! त्वरित प्रसन्न होऊन या आपल्या मायेचा, येथून उपसंहार कर व या महाभयापासून मला सोडवं.
386-11
हा ठायवरी पुढतपुढती । तूते म्हणिजे बहुवा काकुळती । ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलो ॥386॥
अशाप्रकारे वारंवार तुला अत्यंत काकूळती येऊन म्हणावे, इतका मी, विश्वरूपा भगवंता ! अत्यंत भित्रा झालो आहे.
387-11
जै अमरावतीये आला धाडा । तै म्या एकलेनि केला उवेडा । जो मीकाळाचियाही तोंडा । वासिपु न धरी ॥387॥
जेव्हा इंद्राच्या अमरावती राजधानी वर राक्षसांची धाड पडली, तेव्हि ज्या मी एकट्यानेच त्यांचा पराभव केला, कारण मी मृत्यूच्या तोंडाचेही भय बाळगीत नाही.
388-11
परी तया आंतुल नव्हे हे देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा । तुवा आमुचाचि घोटू भरावा । या सकळ विश्वेसी ॥388॥
पण देवा ! हे तुझे विश्वरूप त्यापैकी दिसत नाही. येथे मृत्युवरहि ताण करून सर्व ब्रह्मांडासह आमचा घास घ्यावा असे तू केलेस.
389-11
कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखा तूचि मिनलासि काळु । बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ॥389॥
खरोखर हा सृष्टिच्या प्रलयाचा काल नसतांना मध्येच कसा तू काळ होऊन प्राप्त झालास ?पहा ! बिचारे हे संपूर्ण ब्रह्मांड अल्पायुषि झाले आहे.
390-11
अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिले शांत करिता । कटाकटा विश्व गेले आता । तू लागलासि ग्रासू ॥390॥
आहारे माझ्या दुर्दैवा ! विश्वरूप सुखप्राप्ति व्हावी म्हणून मी प्रयत्न करीत असता, हे विघ्न उत्पन्न झाले हाय ! तू ग्रासू लागल्यामुळे आता हे विश्व नाहीसे होणार !
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
391-11
हे नव्हे मा रोकडे । सैंघ पसरूनिया तोंडे । कवळितासि चहूकडे । सैन्ये इये ॥391॥
जिकडे तिकडे मुखे पसरून या दोन्ही सैन्याला चहूंकडून आपल्या तोंडात टाकीत आहेस, हे स्पष्ट दिसत नाही काय ?
अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः
सर्वे सहैवावनिपालसङ्घैः ।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथाऽसौ
सहास्मदीयैरपि योधमुख्यैः । 11. 26 ।
अर्थ हे धृतराष्ट्राचे पुत्र, राजांच्या समुदायांसह वर्तमान, भीष्म, द्रोण, तसाच कर्ण, त्याप्रमाणेच आमच्या पक्षाच्या देखील मुख्य योद्ध्यांसह ॥26॥
392-11
नोहेति ? हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर । हे गेले गेले सहपरिवार । तुझिया वदनी ॥392॥
हे कौरव कुळांतील वीर आणि आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र नव्हेत काय ? हे सर्व आपल्या परिवारासह तुझ्या मुखात शिरलेत.
393-11
आणि जे जे यांचेनि सावाये । आले देशोदेशीचे राये । तयांचे सांगावया जावो न लाहे । ऐसे सरकटित आहासी ॥393॥
आणि युध्दात यांचे सहाय्य करण्याकरिता इतर देशीचे जे जे राजे आले आहेत, त्यांची मृत्युवार्ता सांगायलाहि कोणी उरणार नाही. अशा रितीने सरसकट सर्वाना गिळीत आहेस.
394-11
मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटा । आरणी हन थाटा । देतासि मिठी ॥394॥
मदोन्मत्त हत्तींच्या समुदायांना तोंडात घटघट ओतीत आहेस व त्याचप्रमाणे युध्दात थाटलेल्या संपूर्ण सैन्यरचनेला मिठी मारत आहेस.
395-11
जंत्रावरिचील मार । पदातीचे मोगर । मुखाआंत भार । हारपताति मा ॥395॥
तोफादिक यंत्राचा मारा करणारे व पायदळाचे मुख्य यांच्या झुंडीच्या झुंडी तुझ्या मुखात गडप होत आहेत ना ?
396-11
कृतांताचिया जावळी । जे एकचि विश्वाते गिळी । तिये कोटीवरी सगळी । गिळितासि शस्त्रे ॥396॥
एकच शस्र संपूर्ण विश्वाचा संहार करते व म्हणून मृत्यूचे भावंड होय, अशी कोट्यावधी शस्रे तू गिळीत आहेस.
397-11
चतुरंगा परिवारा । संजोडिया रहंवरा । दात न लाविसी मा परमेश्वरा । कसा तुष्टलासि बरवा ॥397॥
हत्ती, घोडे, रथ, पायदळ अशा चतुरंग सेनेचा संपूर्ण परिवार व घोडे जोडलेले रथ यांना भगवंता ! कसा प्रसन्न झाला आहेस पहा की, यांना तू दात लागू न देता गिळून टाकीत आहेस.
398-11
हा गा भीष्मा{ऐ}सा कवणु । सत्यशौर्यनिपुणु । तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा ॥398॥
देवा ! भीष्माचार्यासारखा सत्यवचनी व शौर्यात निपून असा कोण आहे ? पण अरेरे ! त्याला व द्रोणाचार्यासारख्या ब्राम्हणालाही ग्रासून टाकलेस.
399-11
अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु । आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखे । 399 ।
हाय ! हाय ! सूर्यपुत्र जो महायोध्दा कर्ण, तोही तुझ्या मुखात गेला आणि आमच्या सर्वाचाकेरळच्या नाहीसा केलास, असे मी पाहत आहे.
400-11
कटकटा धातया । कैसे जाहले अनुग्रहा यया । मिया प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिले मरण ॥400॥
अरेरे ब्रह्मदेवा ! विश्वरूप दर्शनाचा अनुग्रह कसा फळला पहा ! मी विश्वरूपदर्शनाकरिता भगवंताची प्रार्थनाकरून बिचार्या जगा वरमरणाचा प्रसंग आणला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
401-11
मागा थोडिया बहुवा उपपत्ती । येणे सांगितलिया विभूती । तैसा नसेचि मा पुढती । बैसलो पुसो ॥401॥
पूर्वी थोड्याबहुत युक्तीने भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या, त्या ऐकून तसाच मी राहिलो नाही आणि पुनः पुढे विश्वरूपदर्शनाविषयी विचारू लागलो.
402-11
म्हणौनि भोग्य ते त्रिशुद्धी न चुके । आणि बुद्धिही होणारासारिखी ठाके । माझ्या कपाळी पिटावे लोके । ते लोटेल काह्या ॥402॥
म्हणून प्रारब्धभोग चुकत नाही म्हणतात, ते त्रिवार सत्य आहे आणि प्रारब्धानुसार जे होणार असेल, त्याप्रमाणेच बुध्दि होते. लोकांनी माझ्या नावाने रडावे, असे माझ्या कपाळी होते, ते चुकले कसे ?
403-11
पूर्वी अमृतही हाता आले । परी देव नसतीचि उगले । मग काळकूट उठविले । शेवटी जैसे ॥403॥
पूर्वी समुद्रमंथन करता करता अमृत हाती लागले; पण त्यातच संतोष मानून देव मंथन सोडून उगे राहिले नाहीत, शेवटी हलाहल विष समुद्रातून निघाले.
404-11
परी ते एकबगी थोडे । केलिया प्रतिकारामाजिवडे । आणि तिये अवसरीचे ते सांकडे । निस्तरविले शंभू ॥404॥
क्षीराब्धीने केलेल्या चौदा रत्नांच्या अविष्कारामध्ये काळकूटाचा अविष्कार एका परीने थोडा होता आणि त्यावेळचे संकट भगवान शंकरांनी निवारण केले.
405-11
आता हा जळता वारा के वेटाळे ? । कोणा हे विषा भरले गगन गिळे ? । महाकाळेसि के खेळे ? । आंगवत असे ॥405॥
आताचा हा पेटलेला वारा कसा आवरला जाणार ? हे संपूर्ण विषाने भरलेले आकाश कोण गिळणार ? या महामृत्यूशी खेळण्याचे सामर्थ्य कोण अंगी वागवितो ?
406-11
ऐसा अर्जुन दुःखे शिणतु । शोचित असे जिवाआंतु । परी न देखे तो प्रस्तुतु । अभिप्राय देवाचा ॥406॥
याप्रमाणे अर्जुन, दुःखाने अत्यंत व्याकुळ होऊन, अंतःकरणात शोक करू लागला; पण भगवंताच्या विश्वरूपदर्शनाचा प्रस्तुत हेतु काय आहे, हे तो जाणत नव्हता.
407-11
जे मी मारिता हे कौरव मरते । ऐसेनि वेटाळिला होता मोहे बहुते । तो फेडावयालागी अनंते । हे दाखविले निज ॥407॥
मी मरणार व कौरव माझ्याकडून मारले जाणारे, अशा थोर अविवेकाने तो ग्रासला गेला होता. तो अविवेक नाहीसा करण्याकरिता भगवंतांनी आपले हे विश्वरूप दाखविले.
408-11
अरे कोण्ही कोणाते न मारी । एथ मीचि हो सर्व संहारी । हे विश्वरूपव्याजे हरी । प्रकटित असे ॥408॥
अरे ! कोणी कोणाचा नाश करित नाही. एक मीच सर्वाचा नाश करणारा आहे, हेच भगवंतांनी विश्वरूपाच्या मिषाने स्पष्ट दाखविले.
जगांतील प्राण्यांच्या उत्पत्तिस्थितिसंहाराचा व्यापार, जीवांच्या कर्मानुसार एक परमेश्वरच करीत असतो; उत्पत्तिस्थितिलयाशी संबंधित असलेले पदार्थ केवळ निमित्तमात्र असतात, असा वेदान्ताचा सिध्दात आहे.
409-11
परी वायाचि व्याकुलता । ते न चोजवेचि पंडुसुता । मग अहा कंपु नव्हता । वाढवित असे ॥409॥
पण अर्जुन हे न जाणता दुःखाने व्याकुळ होऊन नसताच थरकांप वाढवित होता.
वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति
दंष्ट्राकरालानि भयानकानि ।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु
संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः । 11. 27 ।
अर्थ त्वरा करणारे हे (अगोदर) भयानक व दाढांच्या येगाने (अधिक) भयानक अशा तुझ्या मुखांमधे शिरत आहेत. कोणी चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातांमधे अडकलेले दिसतात. ॥27॥
410-11
तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेसि दोन्ही दळे । वदनी गेली आभाळे । गगनी का जैसी ॥410॥
त्यावेळेला अर्जुन पुनः म्हणाला, अहो देवा ! पहा ! आकाशात जसे मेघ नाहीसे होतात, त्याप्रमाणे आंगावरील चिलखते व हातातील तलवारीसह दोन्हीकडील सैन्ये एकाचवेळी तोंडात गेली आहेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
411-11
का महाकल्पाचिया शेवटी । जै कृतांतु कोपला होय सृष्टी । तै एकविसांही स्वर्गा मिठी । पाताळासकट दे ॥411
किंवा महाकल्पाच्या शेवटी संपूर्ण सृष्टीचा नाश करण्याकरिता जेव्हा कृतांत सर्व सृष्टिवर क्रुध्द होतो, तेव्हा तो पाताळासह एकवीस स्वर्गांना ग्रासून टाकतो.
412-11
नातरी उदासीने दैवे । संचकाची वैभवे । जेथीची तेथ स्वभावे । विलया जाती ॥412॥
अथवा दैव प्रतिकूल झाले असता, धनसंचय करणार्याची संपत्ति, जशी जागच्या जागी नाहीशी होते.
413-11
तैसी सासिन्नली सैन्ये एकवटे । इये मुखी जाहली प्रविष्टे । परी एकही तोंडौनि न सुटे । कैसे कर्म देखा ॥413॥
त्याप्रमाणे युध्दाला सज्ज झालेली ही दोन्ही सैन्यै, तुझ्या मुखात एकत्र शिरली आहेत. त्यापैकी तुझ्या मुखातून एकहि सुटत नाही. कसे त्यांचे कर्म आहें, पहा.
414-11
अशोकाचे अंगवसे । चघळिले कऱ्हेनि जैसे । लोक वक्त्रामाजी तैसे । वाया गेले ॥414॥
उंटाने अशोकवृक्षाचे डहाळे जसे चघळावे, त्याप्रमाणे सर्व लोक तुझ्या तोंडात व्यर्थ गेले आहेत.
415-11
परि सिसाळे मुकुटेसी । पडिली दाढांचे सांडसी । पीठ होत कैसी । दिसत आहाती ॥415॥
राजांची मुकुटासहित शिरे दाढांच्या सांडशीत सांपडून त्यांचे कसे पीठ होतांना दिसत आहे.
416-11
तिये रत्ने दांताचिये सवडी । कूट लागले जिभेच्या बुडी । काही काही आगरडी । द्रंष्ट्रांची माखली ॥416॥
मुकुटांतील रत्ने दातांच्या संधीत असून, मस्तकांचे चूर्ण जिभेच्या बुडाशी लागले आहे व काही काही दाढांची टोकेंही माखली आहेत.
417-11
हो का जे विश्वरूपे काळे । ग्रासिली लोकांची शरीरे बळे । परि जीवित्व देहीची सिसाळे । अवश्य की राखिली ॥417॥
हो ! एक गोष्ट मात्र दिसते की, या विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बळ ग्रासून टाकली; पण त्या जीवांच्या शरीरांची मस्तके मात्र न गिळता तशींच ठेवलीं.
418-11
तैसी शरीरामाजी चोखडी । इये उत्तमांगे होती फुडी । म्हणौनि महाकाळाचियाही तोंडी । परि उरली शेखी ॥418॥
ही सुंदर मस्तके म्हणजे शरीरांतील खरोखर उत्तम अंगे असल्यामुळे, ती महाकिळाच्याही तोंडात शेवटी उरली आहेत.
419-11
मग म्हणे हे काई । जन्मलया आन मोहरचि नाही । जग आपैसेचि वदनडोही । संचारताहे ॥419॥
पुढे अर्जुन म्हणतो, अरे ! हे काय आश्चर्य ! जन्माला आलेल्या प्राण्यांला दुसरी गतिच दिसत नाही. सर्व जगत् आपण होऊन विश्वरूपाच्या मुखरूपी डोहांत शिरत आहे ना !
420-11
यया आपेआप आघविया सृष्टी । लागलिया आहाति वदनाच्या वाटी । आणि हा जेथिचिया तेथ मिठी । देतसे उगला ॥420॥
ह्या संपूर्ण सृष्टी सहजगत्या विश्वरूपाच्या मुखात जाण्याच्या मार्गास लागल्या आहेत आणि हा विश्वरूप भगवान जागच्या जागींच स्वस्थ त्यांना गिळीत आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
421-11
ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजी धावत । येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनी ॥421॥
हे सर्व ब्रह्मादिकदेव वर असलेल्या मुखा मध्ये वेगाने शिरत असून, बाकीचे सर्व सामान्य लोक हे अलीकडील मुखातच भरले जात आहेत.
422-11
आणीकही भूतजात । ते उपजलेचि ठायी ग्रासित । परि याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि काही ॥422॥
आणि कित्येक प्राणीजात उत्पन्न झाल्याबरोबर ग्रासले जात आहेत; पण याच्या मुखातून निश्चित काही सुटत नाही.
(येथे प्राण्यांच्या तीन गती दाखविल्या आहेत. ब्रह्मादिक देवांना उंचलोक म्हणजे सत्यलोक प्राप्त होतो. सामान्य म्हणजे भगवत्प्रीत्यर्थ निष्काम चित्ताने विहित कर्माचे अनुष्ठान न करता स्वर्गादी लोकांच्या प्राप्तीकरिता कर्म करणारे जे पुरुष असतात, त्यांना चंद्रलोकप्राप्ती होऊन, ते तेथे सुख भोगून परत संसारात येतात व अत्यंत पातकी लोक, सुख भोगण्याकरिता कोणत्याही लोकात न जाता जन्मानंतर मरण व मरणानंतर जन्म असे केवळ दुःखच भोगत असतात. )
यथा नदीनाम् बहवोऽम्बुवेगाः
समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।
तथा तवामी नरलोकवीरा
विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति । 11-28 ।
अर्थ ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच तोंड करून गमन करत असतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी जळत असलेल्या तुझ्या मुखामधे हे नरांमधील वीर प्रवेश करत आहेत. ॥11-28॥
423-11
जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचे आंग । तैसे आघवाचिकडूनि जग । प्रवेशत मुखी ॥423॥
जसे महानदीचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रात येऊन मिळतात, तशी सर्व बाजूंनी ही सृष्टी तुझ्या मुखात प्रविष्ट होत आहे.
424-11
आयुष्यपंथे प्राणिगणी । करोनि अहोरात्रांची मोवणी । वेगे वक्त्रामिळणी । साधिजत आहाती ॥424॥
सर्व प्राणी समुदाय, आपल्या आयुष्यरूपी मार्गाने दिवस व रात्र यांच्या पायर्या करून अत्यंत त्वरेने तुझ्या मुखात पडण्याचे साधीत आहेत.
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा
विशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।
तथैव नाशाय विशन्ति लोका-
स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः11. 29 ।
अर्थ अत्यंत वेगाने युक्त होत्साते पतंग ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नीमध्ये स्वत:च्या नाशाकरताच प्रवेश करतात, त्याप्रमाणेच हे प्राणी अत्यंत वेगाने युक्त होत्साते (स्वत:च्या) नाशासाठीच तुझ्या मुखांमधे प्रवेश करत आहेत. ॥29॥
425-11
जळतया गिरीच्या गवखा । माजी घापती पतंगाचिया झाका । तैसे समग्र लोक देखा । इये वदनी पडती ॥425॥
पेटलेल्या पर्वताच्या दरीत ज्याप्रमाणे पतंगाच्या झुंडीच्या झुंडी जाऊन पडतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक तुझ्या मुखात पडत आहेत.
426-11
परि जेतुले येथ प्रवेशले । ते तातलिया लोहे पाणीचि पा गिळिले । वहवटीहि पुसिले । नामरूप तयांचे ॥426॥
पण तुझ्या मुखात जेवढे काही गेले, तेवढे सर्व तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याप्रमाणे गिळले गेले. त्यांचे वहिवाटीपुरते देखील नामरूप राहिले नाही.
लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः । तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥11-30॥
अर्थ जळत असणार्या मुखांनी सर्व लोकांना सर्व बाजूंनी गिळीत असणारा तू (अतितृप्तीमुळे) जिभा चाटीत आहेस. हे विष्णो, आपल्या तेजाने सर्व जग व्यापून तुझी प्रखर तेजे जगाला ताप देत आहेत. ॥11-30॥
427-11
आणि येतुलाही आरोगण । करिता भुके नाही उणेपण । कैसे दीपन असाधारण । उदयले यया ॥427॥
आणि इतकेहि भक्षण करून याची भूक यत्किंचितही शांत झाली नाही. कसा याचा जठराग्नी अत्यंत प्रदिप्त झाला आहे.
428-11
जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । का भणगा दुकाळु पाहला । तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवे चाटिता ॥428॥
ज्याप्रमाणे ज्वरातून उठलेला रोगी किंवा दुष्काळात सापडलेला भिकारी खाय खाय करतो, त्याप्रमाणे ओठ चाटतांना जिभेची वळवळ दिसत आहे.
429-11
तैसे आहाराचे नांवे काही । तोंडापासूनि उरलेचि नाही । कैसी समसमीत नवाई । भुकेलेपणाची ॥429॥
तसेच तुझ्या खाण्याचा नव्हे असा कोणताच पदार्थ तुझ्या तोंडातून सुटला नाही. अत्यंत भुकेचे नवल कसे आहे !
430-11
काय सागराचा घोटु भरावा ? । की पर्वताचा घासु करावा ? । ब्रह्मकटाहो घालावा । आघवाचि दाढे ॥430॥
संपूर्ण समुद्राचा घोट घ्यावा की सगळ्या पर्वताचा एकच घास करावा अथवा हे सर्व ब्रह्मांड असेच्या असेच दाढेखाली घालावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
431-11
दिशा सगळियाचि गिळाविया । चांदिणिया चाटूनि घ्याविया । ऐसे वर्तत आहे साविया । लोलुप्य बा तुझे ॥431॥
सगळ्या दिशा गिळून टाकाव्या की चांदण्या चाटून घ्याव्या, अशा प्रकारचा खरोखर तुझा हावरेपणा दिसत आहे.
432-11
जैसा भोगी कामु वाढे । का इंधने आगीसि हाकाक चढे । तैसी खातखाताचि तोंडे । खाखांते ठेली ॥432॥
ज्याप्रमाणे भोगाने भोगवासना वाढत जाते किंवा लाकडे घातल्याने अग्नि भडकतो, त्याप्रमाणे ही सर्व तुझी मुखे खाताखाताच खाखावलेली आहेत.
433-11
कैसे एकचि केवढे पसरले । त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले । जैसे का कवीठ घातले । वडवानळी ॥433॥
तुझे एकच मुख कसे विस्तीर्ण पसरले आहे, पहा ! ज्याप्रमाणे वडवाग्नीमध्ये कवठ घालावे, त्याप्रमाणे हे संपूर्ण त्रिभुवन तुझ्या नुसत्या जिभेच्या टोकाला लागले आहे.
434-11
ऐसी अपार वदने । आता येतुली कैची त्रिभुवने । का आहारु न मिळता येणे माने । वाढविली सैंघ ॥434॥
अशी ही असंख्य मुखे आहेत. आता तितकी त्रिभुवने कोठली आणणार ?पुरेसा आहार मिळत नसतांना ज्यांचा ताप असहाय्य होतो, अशी मुखे का असंख्य वाढविलीस ?
435-11
अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळा वरपडा । जैसी वणवेयाचिया वेढा । सांपडती मृगे ॥435॥
देवा ! ज्याप्रमाणे वणव्याचा वेढा पडून, त्यात जनावरे सापडतात, त्याप्रमाणे तुझ्या मुखातील पेटलेल्या ज्वालांना बिचारे हे ब्रह्मांड बळी पडले आहे.
436-11
आता तैसे या विश्वा जाहाले । देव नव्हे हे कर्म आले । का जग चळचळा पांगिले । काळजाळे ॥436॥
आता तसेच या विश्वाला झाले. हे विश्वरूप म्हणजे देव नव्हे, हे लोकांचे दुर्दैव आहे किंवा जगरूपी जलचरांना पकडण्याकरिता काळाने आपलेच जाळे पसरले आहे.
437-11
आता इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरे । ही वक्त्रे नोहेती जोहारे । वोडवली जगा ॥437॥
आता या अंगकांतीरूप पाशातून, हे चराचर प्राणी कोणीकडून बाहेर पडतील ?ही तुझी मुखे नसून, ही जगाला लाक्षागृहे झाली आहेत.
438-11
आगी आपुलेनि दाहकपणे । कैसेनि पोळिजे ते नेणे । परी जया लागे तया प्राणे । सुटिकाची नाही ॥438॥
अग्नीला आपल्या दाहकशक्तीने दुसर्याला मी कसा जाळतो, हे समजत नाही; पण ज्याला अग्नी लागतो तो मात्र जिवंत राहात नाही.
439-11
नातरी माझेनि तिखटपणे । कैसे निवटे हे शस्त्र कायि जाणे । का आपुलिया मारा नेणे । विष जैसे ॥439॥
किंवा माझ्या तीक्ष्णपणाने पदार्थ कसा कापला जातो, हे शस्राला माहीत नसते. किंवा माझ्याने मनुष्य कसा मरतो हे विषाला ज्याप्रमाणे कळत नाही,
440-11
तैसी तुज काही । आपुलिया उग्रपणाची सेचि नाही । परी ऐलीकडिले मुखी खाई । हो सरली जगाची ॥440॥
त्याप्रमाणे तुझे हे विश्वरूप कसे उग्र व भयंकर आहे याची तुला जाणीव नाही; पण अलीकडील मुखरूपी खाईत संपूर्ण जगच नाहीसे झाले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
441-11
अगा आत्मा तू एकु । सकळ विश्वव्यापकु । तरी का आम्हा अंतकु । तैसा वोडवलासी ? 41
सर्व ब्रह्मांडाचा एक अंतरात्मा असून सर्व जगतांत भरला आहेस, मग आम्हाला का असा प्राण घेणारा मृत्यु झालास ?
442-11
तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड । आणि तुवांही न धरावी भीड । मनी आहे ते उघड । बोल पा सुखे ॥442॥
तरी मी जिवंत राहण्याची आशा सोडली आहे. आणखी तूंहि काही संकोच करू नकोस. तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्ट सांग.
443-11
किती वाढविसी या उग्ररूपा । आंगीचे भगवंतपण आठवी बापा । नाही तरी कृपा । मजपुरती पाही ॥443॥
आता या आपल्या रूपाचा भयंकरपणा किती वाढवितौस ? तुझ्या स्वतःच्या अंगी असलेल्या भगवंतपणाचे स्मरण ठेव. नाही तर माझ्यापुरती तरी कृपा कर.
(यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य असे हे लोकांना सुखच देणारे, सहा श्रेष्ठ गुण भगवंताचे ठिकानी नित्य असतात; म्हणून त्याला भगवान म्हणतात. यात संहार करण्याचा गुण नाही याची आठवण करून देण्याकरिता अर्जुनाने येथे ” आंगीचे भगवंतपण आठवी बापा ” असे म्हटले आहे. )
आख्याहि मे को भवानुग्ररूपो
नमोऽस्तु ते देववर प्रसीद ।
विज्ञातुमिच्छामिभवन्तमाद्यं
न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥11. 31॥
अर्थ हे उग्र रूप धारण केलेला तू कोण आहेस मला सांग. हे देवश्रेष्ठा मी तुला नमस्कार करतो. माझ्यावर अनुग्रह कर. अगोदर मी तुला पूर्णत्वाने जाणण्याची इच्छा करीत आहे, कारण तुझीही प्रवृत्ति मला समजत नाही31॥
444-11
तरी एक वेळ वेदवेद्या । जी त्रिभुवनैक आद्या । विनवणी विश्ववंद्या । आइके माझी ॥444॥
वेदानेच जाणला जाणार्या, त्रैलोक्याच्या मूळ कारणा व त्रैलोक्याला पूज्य अशा भगवंता ! एक वेळ माझी प्रार्थना ऐक.
445-11
ऐसे बोलोनि वीरे । चरण नमस्कारिले शिरे । मग म्हणे तरी सर्वेश्वरे । अवधारिजो ॥445॥
असे बोलून, त्या श्रेष्ठ अर्जूनाने भगवंताच्या पायावर मस्तक ठेवले व म्हणाला, हे सर्वेश्वरा ! ऐक
446-11
मिया होआवया समाधान । जी पुसिले विश्वरूपध्यान । आणि एकेचि काळे त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥446॥
माझे समाधान व्हावे म्हणून मी तुला विश्वरूप दाखविण्याची प्रार्थना केली आणि तू तात्काळ संपूर्ण ब्रह्मांड गिळितच प्रगट झालास.
447-11
तरी तू कोण का येतुली । इये भ्यासुरे मुखे का मेळविली । आघवियाचि करी परिजिली । शस्त्रे काह्या ॥447॥
तरी तू कोण आहेस ?अशी एवढीं मुखे कशाकरिता घेतलीस ?व संपूर्ण हातामध्ये परजलेली शस्रे कशाला धारण केलीस ?
448-11
जी जव तव रागीटपणे । वाढोनि गगना आणितोसि उणे । का डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥448॥
आणि देवा ! जेव्हा तेव्हा क्रुध्दपणाने वाढून आकाशाला का मागे टाकतोस आणि अत्यंत लाल डोळे वटारून आम्हाला का भीति दाखवितोस ?
449-11
एथ कृतांतेसि देवा । कासया किजतसे हेवा । हा आपुला तुवा सांगावा । अभिप्राय मज ॥449॥
देवा ! या ठिकाणी महामृत्यूशी तू कशाला स्पर्धा करीत आहेस ? असे करण्यात तुझ्या मनातील हेतु काय आहे, तो मला सांग.
450-11
या बोला म्हणे अनंतु । मी कोण हे आहासी पुसतु । आणि कायिसयालागी असे वाढतु । उग्रतेसी ॥450॥
हे अर्जुनाचे म्हणणे ऐकून, भगवंत म्हणतांत, मी कोण आहे व आपले ऐवढे उग्र स्वरूप का वाढवित आहे, हेच तू विचारित आहेस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
श्रीभगवानुवाच ।
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो
लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः॥
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे
येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥11. 32॥
अर्थ श्रीकृष्ण म्हणाले, लोकाचा संहार करणारा व त्यासाठी वृद्धि पावलेला मी काळ आहे. येथे मी लोकाचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. तुझ्याकखेरीज दोन्ही पक्षांच्या प्रत्येक समुदायामध्ये जे योद्धे आहेत ते सर्व नाहीसे होतील ॥11-32॥
451-11
तरी मी काळु गा हे फुडे । लोक संहारावयालागी वाढे । सैंघ पसरिली आहाती तोंडे । आता ग्रासीन हे आघवे ॥451॥
तर अर्जुना ! मी(खरोखर काळ) आहे, हे स्पष्ट जाण. सर्व लोकाचा संहार करण्यकरिता मी वाढत आहे. ही जिकडे तिकडे सर्वत्र माझी उग्र मुखे पसरली असून, या सर्व विश्वाला आता मी गिळून टाकींन.
452-11
एथ अर्जुन म्हणे कटकटा । उबगिलो मागिल्या संकटा । म्हणौनि आळविला तव वोखटा । उवाइला हा ॥452॥
तेव्हा अर्जुन म्हणतो, अरेरे ! अगोदर विश्वरूपाच्या मुखात होत असलेल्या सर्व लोकांच्या संहाराला पाहून मी त्रस्त झालो होतो; म्हणून भगवंताची प्रार्थना केली, तो तो अधिकच निष्ठुरपणाने प्रगट झाला.
453-11
तेवीचि कठिण बोले आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी । म्हणौनि सवेचि म्हणे किरीटी । परि आन एक असे ॥453॥
तसेच जीवाची आशा नाहीशी करणार्या निष्ठूर बोलण्याने अर्जुन अत्यंत कष्टी होईल, म्हणून भगवान लगेच म्हणाले, अर्जुना ! पण त्यात दुसरे एक आहे.
454-11
तरी आताचिये संहारवाहरे । तुम्ही पांडव असा बाहिरे । तेथ जातजाता धनुर्धरे । सांवरिले प्राण ॥454॥
तुम्ही पांडव मात्र आता होणार्या या संहाररूपी बाधेच्या बाहेर आहांत. हे ऐकताच अर्जुनाने जात असलेले प्राण सावरले
455-11
होता मरणमहामारी गेला । तो मागुता सावधु जाहला । मग लागला बोला । चित्त देऊ ॥455॥
अर्जुन मरणाच्या महामारीत सापडला होता; पण भगवंताच्या अश्वासनाने पुनः देहावर आला आणि मग भगवंताच्या बोलण्याकडे चित्त देऊ लागला.
456-11
ऐसे म्हणिजत आहे देवे । अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे । येर जाण मी आघवे । सरलो ग्रासू ॥456॥
देव असे म्हणू लागले की, अर्जुना ! तुम्ही माझे आहांत, हे लक्षात असू दे. बाकीच्या सर्वाना ग्रासण्याकरीता मी प्रवृत्त झालो आहे.
457-11
वज्रानळी प्रचंडी । जैसी घापे लोणियाची उंडी । तैसे जग हे माझिया तोंडी । तुवा देखिले जे ॥457॥
प्रलयकालाच्या अग्निमध्ये, ज्याप्रमाणे लोण्याचा गोळा घालावा, त्याप्रमाणे हे संपूर्ण जग, माझ्या तोंडात जात आहे, हे जे तू पाहिलेस
458-11
तरी तयामाझारी काही । भरवसेनि उणे नाही । इये वायाचि सैन्ये पाही । बरवते आहाती ॥458॥
त्यात तर यत्किंचितहि अन्यथा होणार नाही. दोन्हीकडील सैन्ये व्यर्थच आपल्या पराक्रमाची फुशारकी मारत आहेत.
459-11
ऐसा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेसी स्पर्धा । वांटिवेचिया मदा । वघळले जे ॥459॥
असे हे सैन्याचे मिळालेले समुदाय, पराक्रमाचे बळ आणून कुंथु लागले आहेत आणि यमापेक्षाहि आमचे गजदळ श्रेष्ठ आहे अशी त्याची प्रशंसा करतात.
460-11
हे जे मिळोनिया मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळे । यमावरी गजदळे । वाखाणिजताती ॥460॥
हे म्हणतातकी, यासृष्टीवर दुसरीसृष्टि निर्माण करू. पैजबांधून मृत्युलामारू आणि या सर्व जगाचा घोट भरू.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
461-11
म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू । आण वाहूनि मृत्यूते मारू । आणि जगाचा भरू । घोटु यया ॥461॥
सर्व पृथ्वी गिळू. वरच्यावरच आकाश जाळु. वार्याला देखील बाणाने जखडून टाकू
462-11.
पृथ्वी सगळीचि गिळू । आकाश वरिच्यावरी जाळू । का बाणवरी खिळू । वारयाते ॥462॥
पराक्रमाच्या मदाने मत्त होऊन अशा या चतुरंग सैन्यसंपत्तीच्या बळावर जे कृतांताशी स्पर्धा करीत आहेत.
463-11
बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्निपरिस दासट । मारकपणे काळकूट । महुर म्हणत ॥463॥
यांचे हे सर्व शब्द शस्रांपेक्षां तीक्ष्ण आणि अग्निपेक्षा दाहक दिसतात आणि प्राण घेण्यात यांच्यापेक्षा काळकूटही मधूरच म्हणावे लागेल.
464-11
तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळे । अगा चित्रीव फळे । वीर हे देखे ॥464॥
परंतु अर्जुना ! हे सर्व योध्दे गंधर्वनगरीचे देखावे किंवा भेंडोळे अथवा चित्रांतील पुतळे आहेत, पहा !
465-11
हा गा मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला । इया शृंगारूनिया खाला । मांडिलिया पैंजण 465
अरे ! ही सर्व सैन्ये म्हणजे मृगजळाचा पूर होय, ही सैन्ये नसून कापडाचा साप आहे किंवा कातड्यात भुसा भरून तयार केलेल्या व श्रृंगारलेल्या ह्या बाहुल्या मांडल्या आहेत.
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व
जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम् ।
मयैवैते निहताः पूर्वमेव
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥11. 33॥
अर्थ म्हणून तू युद्धाला उभा रहा. यश संपादन कर. शत्रूंना जिंकून समृद्धियुक्त अशा राज्याचा उपभोग घे. हे सर्व मी पूर्वीच मारून टाकलेले आहेत. हे सव्यसाचिन् (तू) केवल निमित्तमात्र हो. ॥11-33॥
466-11
येर चेष्टविते जे बळ । ते मागाचि मिया ग्रासिले सकळ । आता कोल्हारिचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥466॥
बाकी हालचाल करविणारे जे बळ मी पहिलेच गिळून टाकले आहे. आता हे सर्व सैन्य कुंभाराने केलेल्या मातीच्या वेताळाप्रमाणे निर्जीव आहे.
467-11
हालविती दोरी तुटली । तरी तिये खांबावरील बाहुली । भलतेणे लोटिली । उलथोनि पडती ॥467॥
बाहुलिला नाचविणारी दोरी तुडली तर, खांबावरील बाहूल्या वाटेल त्याने लोटल्या की उलथून पडतात.
468-11
तैसा सैन्याचा यया बगा । मोडता वेळू न लगेल पै गा । म्हणौनि उठी उठी वेगा । शाहाणा होई ॥468॥
त्याप्रमाणे सैन्याची ही रचना मोडण्याला, अर्जुना वेळ लागणार नाही; म्हणून एकदम उठ, शहाणा हो.
469-11
तुवा गोग्रहणाचेनि अवसरे । घातले मोहनास्त्र एकसरे मग विराटाचेनि महाभेडे उत्तरे । आसडूनि नागाविले ॥469॥
गोग्रहणाचे वेळी तू संपूर्ण सैन्यावर मोहनास्र घातलेंस व मग विराटराजाच्या अति भित्र्या उत्तराने सैन्याची वस्रे हिसकावून त्यांना नग्न केले.
470-11
आता हे त्याहूनि निपटारे जहाले । निवटी आयिते रण पडिले । घेई यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुने ॥470॥
आता हे सैन्य त्याच्याहूनहि निकृष्ट दर्जाचे झाले आहे. आधीच मरून पडलेले सैन्य नाहीसे कर व एकट्या अर्जुनाने शत्रूला जिंकले असे यश घें.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
471-11
आणि कोरडे यशचि नोहे । समग्र राज्यही आले आहे । तू निमित्तमात्रचि होये । सव्यसाची ॥471॥
नुसते यशच नाही तर संपूर्ण राज्यहि तुला प्राप्त झाले आहे. अर्जुना ! यांच्या नाशाला तू नुसता निमित्तमात्रच होणार आहे.
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णा तथान्यानपि योधवीरान् । मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥11. 34॥
अर्थ द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण तसेच इतरही युद्धातले वीर मी मारलेले आहेत. त्यांना तू ठार कर. भिऊ नको. युद्ध कर. प्रतिपक्षीयांना तू जिंकशील ॥11-34॥
472-11
द्रोणाचा पाडु न करी । भीष्माचे भय न धरी । कैसेनि कर्णावरी । परजू हे न म्हण ॥472॥
द्रोणाच्या बरोबरीचा मी नाही असे मनात आणू नकोस. भीष्माची भीति बाळगू नकोस. कर्णावर शस्र कसे चालवू असे म्हणू नकोस.
473-11
कोण उपायो जयद्रथा कीजे । हे न चिंतू चित्त तुझे । आणिकही आथि जे जे । नावाणिगे वीर ॥473॥
वजयद्रथाला मारण्याकरिता कोणता उपाय करावा, याचे चिंतन मनात करू नकोस. आणखी जे जे नांवाजलेले पराक्रमी वीर आहेत,
474-11
तेही एक एक आघवे । चित्रींचे सिंहाडे मानावे । जैसे वोलेनि हाते घ्यावे । पुसोनिया ॥474॥
ते सर्व ओल्यृ हातांनी पुसून घेण्यासारखे भिंतीवर काढलेल्या सिंहाची चित्रे आहेत असे मान.
475-11
यावरी पांडवा । काइसा युद्धाचा मेळावा ? । हा आभासु गा आघवा । येर ग्रासिले मिया ॥475॥
अशा स्थितीत अर्जुना ! हे काय युध्दाकरिता जमलेले सैन्य आहे ? हा सर्व भास असून, बाकीचे हे सर्व मी गिळून टाकले आहेत.
476-11
जेव्हा तुवा देखिले । हे माझिया वदनी पडिले । तेव्हाचि यांचे आयुष्य सरले । आता रिती सोपे ॥476॥
जेव्हा तू हे सर्व माझ्या तोंडात पाहिलेस, तेव्क्षांच त्याचे आयुष्य संपलें. ही आता रिकामी सोपटी आहे.
477-11
म्हणौनि वहिला उठी । मिया मारिले तू निवटी । न रिगे शोकसंकटी । नाथिलिया ॥477॥
म्हणून लवकर उठ. मी मारलेल्यांना तू नाहीसे कर आणि व्यर्थ शोकसंकटांत पडू नकोस.
478-11
आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुके जैसा विंधोनि पाडिजे । तैसे देखे गा तुझे । निमित्त आहे ॥478॥
आपणच एखादे निशान उभे करावे आणि कौतुकाने त्याला बाण मारून पाडावे, त्याप्रमाणे यांच्या नाशाला तुझे नुसते निमित्त आहे, पहा !
479-11
बापा विरुद्ध जे जाहले । ते उपजताचि वाघे नेले । आता राज्येशी संचले । यश तू भोगी ॥479॥
बा अर्जुना ! जे तुझे वैरी जन्मास आले, ते जन्मल्याबरोबर वाघाने नेले (असे समज) आता राज्यांसह मिळविलेल्या यशाचा तू उपभोग घे.
480-11
सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगी दुर्मद । ते वधिले विशद । सायासु न लागता ॥480॥
खरोखरच, हे तुझे भाऊबंद अत्यंत उन्मत्त, मदांध व जगामध्ये जे बलवान झाले आहेत, ते तू काही श्रम न पडता सहज मारलेस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
481-11
ऐसिया इया गोष्टी । विश्वाच्या वाक्पटी । लिहूनि घाली किरीटी । जगामाजी ॥481॥
अशा प्रकारच्या गोष्टी जगामध्ये सर्व लोकांच्या मुखरूपी पटावर, अर्जुना ! तू लिहून ठेव-म्हणजे सर्व लोकांच्या तोंडी होऊ दे व विजयी हो.
संजय उवाच
। एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य
कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी॥
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं
सगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥11. 35॥
अर्थ. संजय म्हणाला, श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून भयाने कापत असलेला व हात जोडलेला अर्जुन भयभीत होत्साता साष्टांग नमस्कार घालून पुन्हा श्रीकृष्णाला सगद्गदित वाणीने म्हणाला॥-35॥
482-11
ऐसी आघवीचि हे कथा । तया अपूर्ण मनोरथा । संजयो सांगे कुरुनाथा । ज्ञानदेवो म्हणे ॥482॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे संपूर्ण वर्तमान ज्याचे मनोरथ पूर्ण झाले नाहीत, अशा कुरुराज धृतराष्ट्राला संजय सांगू लागला.
483-11
मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलिया वाजत खळाळ । तैशी वाचा विशाळ । बोलता तया ॥483॥
मग ज्याप्रमाणे सत्यलोकापासून उगम पावलेल्या गंगाजळाचा खळाळ वाजतो, तशी अर्जुनाशी बोलतांना भगवंताची वाणी गंभीर होती.
484-11
नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एके वेळे । का घुमघुमिला मंदराचळे । क्षीराब्धी जैसा ॥484॥
किंवा आकाशांत महामेघाचे उमाळे उठले असता एकदम घडघड असा अवाज होतो किंवा क्षीरसमुद्राच्या मंथनाचे वेळी मंदराचलाच्या मंथनाचा आवाज घुमुं लागला.
485-11
तैसे गंभीरे महानादे । हे वाक्य विश्वकंदे । बोलिले अगाधे । अनंतरूपे ॥485॥
त्याप्रमाणे विश्वरूप धारण करणार्या व विश्वाचे कारण असणार्या अगाध भगवंताने गंभीर व थोर नाद करणार्या वाणीने हे वाक्य उच्चारिलें.
486-11
ते अर्जुने मोटके ऐकिले । आणि सुख की भय दुणावले । हे नेणो परि कांपिन्नले । सर्वाग तयाचे ॥486॥
ते वाक्य अर्जुनाने केवळ ऐकले मात्र आणि त्याच्या मनात सुख झाले की भीति दुप्पट वाढली. हे आम्ही जाणत नाही; पण त्याचे सर्वाग मात्र कापू लागले.
487-11
सखोलपणे वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट । वेळोवेळा ललाट । चरणी ठेवी ॥487॥
त्याचा शब्द खोल जाऊन मुरकुंडी वळली व तशा स्थितींतच त्याने हात जोडले व वारंवार चरणावर मस्तक ठेऊ लागला.
488-11
तेवीचि काही बोलो जाये । तव गळा बुजालाचि ठाये । हे सुख की भय होये । हे विचारा तुम्ही ॥488॥
त्याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करू लागता त्याचा कंठ भरून येई. हे सुखाचे लक्षण आहे की भीतिचे लक्षण होय याचा तुम्हीच विचार करा.
489-11
परि तेव्हा देवाचेनि बोले । अर्जुना हे ऐसे जाहले । मिया पदांवरूनि देखिले । श्लोकींचिया ॥489॥
पण तेव्हा देवाच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली की श्लोकातील पदांवरून मी जाणली आहे.
490-11
मग तैसाचि भेणभेण । पुढती जोहारूनि चरण । मग म्हणे जी आपण । ऐसे बोलिलेती ॥490॥
मग तसाच भीत भीत पुनः भगवंताच्या चरणांना नमस्कार करून अर्जुन म्हणतो, अहो जी भगवंता ! आपण असे बोललात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अर्जुन उवाच
। स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या
जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च॥
रक्षांसि भीतानि दिशो द्रवंति
सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ॥11. 36॥
अर्थ हे हृषीकेशा, तुझ्या महात्म्याने जग हर्ष व प्रेम पावते हे योग्यच आहे. भयभीत राक्षस दशदिशा पळत आहेत. सर्व सिद्धांचे समुदाय तुला वंदन करत आहेत. ॥11-36॥
491-11
ना तरी अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु । हा बोलु तुझा कीर अढळु । मानू आम्ही ॥491॥
नाही तरी अर्जुना ! मी काळ आहे आणि सृष्टिचा संहार करणे हा माझा खेळ आहे, असे जे भगवंता ! तू बोललास, ते निश्चयाने आम्ही खरे मानतो.
492-11
परि तुवा जी काळे । आजि स्थितीचिये वेळे । ग्रासिजे हे न मिळे । विचारासी ॥492॥
पण देवा ! तू काळ असलास तरी आज जगताचे पालन करण्याचा समय असतांना, काळरूपी त्वां सर्व जगताचा संहार करावा, हे विचार करून पाहता विसंगत दिसतें.
493-11
कैसेनि आंगीचे तारुण्य काढावे ? । कैचे नव्हे ते वार्धक्य आणावे ? । म्हणौनि करू म्हणसी ते नव्हे । बहुतकरुनी 493॥
तारूण्यपणात आंगचे तारूण्य काढून, नसलेले वार्धक्य कसे आणता येईल ? म्हणून तू जो संहार करू म्हणतोस, तो बहुतकरून होऊ नये.
494-11
हा जी चौपाहारी न भरता । कोणेही वेळे श्रीअनंता । काय माध्यान्ही सविता । मावळतु आहे ? ॥494॥
अहो जी देवा ! दिवसाचे चार प्रहर न संपतांच, कोणतेहि वेळी माध्यान्हकाळींच सूर्य मावळतो काय ?
495-11
पै तुज अखंडिता काळा । तिन्ही आहाती जी वेळा । त्या तिन्ही परी सबळा । आपुलालिया समयी ॥495॥
तू जरी अखंड काळस्वरूप असलास, तरी तुला तीन वेळा आहेत. त्या तिन्ही आपआपल्या काळी बलवान असतात.
496-11
जे वेळी हो लागे उत्पत्ती । ते वेळी स्थिति प्रळयो हारपती । आणि स्थितिकाळी न मिरविती । उत्पत्ति प्रळयो ॥496॥
जेव्हा विश्वाची उत्पत्ति होऊ लागते, तेव्हा स्थिती व प्रलय राहत नाहीत आणि स्थिती काळी उत्पत्ति प्रलय दिसत नाहीत.
467-11
पाठी प्रळयाचिये वेळे । उत्पत्ति स्थिति मावळे । हे कायसेनही न ढळे । अनादि ऐसे ॥497॥
नंतर प्रलयाचे वेळी उत्पत्ति स्थिति नसतात. हा प्रवाह अनादि असून, तो कधींहि बदलत नाही.
498-11
म्हणौनि आजि तव भरे भोगे । स्थिति वर्तिजत आहे जगे । एथ ग्रसिसी तू हे न लगे । माझ्या जीवी ॥498॥
म्हणून आज हे सर्व भोगाने संपन्न असलेले जग स्थिति अवस्थेत आहे. अशा स्थितीत तू ग्रासतोस हे म्हणणे माझ्या मनाला पटत नाही.
499-11
तव संकेते देव बोले । अगा या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरले । ते प्रत्यक्षचि तुज दाविले । येर यथाकाळे जाण ॥499॥
तेव्हा भगवान म्हणाले बा अर्जुना ! संकेतदृष्टिने पाहता या दोन्ही सैन्याचा माझा पालनकाल संपला आहे हे तुला मी प्रत्यक्षच दाखवीलें. बाकी प्रत्यक्ष संहार कालानुसारच होणार, हे जाण.
500-11
हा संकेतु जव अनंता । वेळु लागला बोलता । तव अर्जुने लोकु मागुता । देखिला यथास्थिति ॥500॥
हा संकेत सांगत असतांना जो थोडा वेळ लागला, तितक्या वेळांत, पूर्वी लोक जशा स्थितीत होते तशा स्थितींतच, अर्जुनाने सर्व लोक पाहिले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
501-11
मग म्हणतसे देवा । तू सूत्री विश्वलाघवा । जग आला मा आघवा । पूर्वस्थिति पुढती ॥501॥
तेव्हा मग अर्जुन म्हणू लागला, देवा ! विश्वरूपी मायाखेळाचा तू सूत्रधार आहेस. पुनः हे जग पूर्वस्थितीत आले ना !
502-11
परी पडिलिया दुःखसागरी । तू काढिसी का जयापरी । ते कीर्ति तुझी श्रीहरी । आठवित असे ॥502॥
परंतु दुःखसागरात पडलेल्या आपल्या भक्तांना तू बाहेर काढतोस, अशी जी तुझी कीर्ती आहे, त्या कीर्तीची माझ्या अंतःकरणात आठवण होत आहे.
503-11
कीर्ति आठविता वेळोवेळा । भोगितसे महासुखाचा सोहळा । तेथ हर्षामृतकल्लोळा । वरी लोळत आहे ॥503॥
ती कीर्ती पुनः पुनः आठवतांना मी चित्तात अत्यंत सुखाचा सोहळाही भोगत आहे आणि तेथे त्या सुखातील हर्षरूपी अमृताच्या लाटांवर मी लोळत आहे.
504-11
देवा जियालेपणे जग । धरी तुझ्या ठायी अनुराग । आणि दुष्टा तया भंग । अधिकाधिक ॥504॥
देवा ! तू दान दिल्यामुळे हे जग तुझ्या ठिकाणी प्रेम करीत आहे आणि दुष्टांचा अधिकाधिक जीव मनोभंग होत आहे.
505-11
पै त्रिभुवनींचिया राक्षसा । महाभय तू हृषीकेशा । म्हणौनि पळताती दाही दिशा । पैलीकडे ॥505॥
कारण त्रैलोक्याच्या सर्व राक्षसांना, भगवंता ! तू महाभयरूप वाटतोस; म्हणून ते दाही दिशांच्या पलीकडे पळून जात आहेत.
506-11
येथ सुर नर सिद्ध किन्नर । किंबहुना चराचर । ते तुज देखोनि हर्षनिर्भर । नमस्कारित असती ॥506॥
बाकीचे देव, मनुष्य, सिध्द, किन्नर, किंबहुना सर्व प्राणी तुला अत्यंत आनंदित पाहून तुला नमस्कार करीत आहेत.
कस्माच्च ते न नमेरन्महात्मन्
गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।
अनन्त देवेश जगन्निवास
त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥11. 37॥
अर्थ हे महात्मन्, अत्यंत महान्, महद्ब्रह्माचा देखील आदिकर्ता जो तू, त्या त्या तुला राक्षस इत्यादि का नमस्कार करत नाहीत ? हे अनंता, देवाधिदेवा, जगन्निवासा, तू अक्षर व सत् व असत् म्हणून जे आहे ते तू आहेस व त्याच्या अतीत जे आहे तेही तू आहेस ॥37॥
507-11
एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा । न लगतीचि चरणा । पळते जाहले ॥507॥
हे नारायणा ! येथे हे राक्षस कोणत्या कारणाने तुझ्या चरणाला नमस्कार न करतांच पळून जात आहेत ?
508-11
आणि हे काय तूते पुसावे । येतुले आम्हासिही जाणवे । तरी सूर्योदयी राहावे । कैसेनि तमे ॥508॥
आणि हे तुला कशाला विचारायला पाहिजे ?एवढे आम्हालाहि कळते की, सूर्योदय झाल्यावर अंधाराने कसे राहावयाचे.
509-11
जी तू प्रकाशाचा आगरु । आणि जाहला आम्हासि गोचरू । म्हणौनिया निशाचरा केरु । फिटला सहजे ॥509॥
देवा ! तूच स्वयंप्रकाशाचे अमर्याद कोठार आहेस आणि तोच तू आम्हाला प्रत्यक्ष दृष्टीस पडला आहेस; म्हणून संपूर्ण राक्षसरूपी केर कचरा सहजच नाहीसा झाला.
510-11
हे येतुले दिवस आम्हा । काही नेणवेचि श्रीरामा । आता देखतसो महिमा । गंभीर तुझा ॥510॥
इतकेदिवस हे भगवंता ! आम्ही हे काहीच जाणत नव्हतो. आता तुझा आगाध महिमा आम्हाला कळून आला आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
511-11
जेथूनि नाना सृष्टींचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली । तया महद्ब्रह्माते व्याली । दैविकी इच्छा ॥511॥
जेथून अनंत सृष्टीच्या रांगा व चतुर्विध प्राण्यांच्या वेली पसरतात, त्या अव्यक्त मायेला तुच देवाच्या इच्छेने जन्म दिला.
512-11
देवो निःसीम तत्त्व सदोदितु । देवो निःसीम गुण अनंतु । देवो निःसीम साम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥512॥
सदासर्वदा असणारी अमर्याद सत्ता देवा ! तूच आहेस. अनंत व अर्याद गुणस्वरूप तूंच आहेस. नित्य व अमर्याद अशी समब्रह्मस्थिती तूच आहेस. तू देवांचाही देव आहेस.
513-11
जी तू त्रिजगतिये वोलावा । अक्षर तू सदाशिवा । तूचि सदसत् देवा । तयाही अतीत ते तू ॥513॥
तू त्रैलोक्याचा जिव्हाळा असून, हे सदाशिवा ! तू अविनाशी आहेस. कार्यकारणरूप जगत तूच झाला असून, त्यावेगळे जे आहे, तेही तूच आहेस.
त्वमादिदेवः पुरुषः पुराण
स्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
वेत्तासि वेद्यं च परं च धाम
त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥11. 38॥
अर्थ तू आदिदेव, पुराणपुरुष आहेस. तू या विश्वाचे अखेरीचे स्थान आहेस. (म्हणजे प्रलयकाली विश्व तुझ्यामधे लीन होईल). तू सर्व जाणतोस. जाणण्याला अत्यंत योग्य तू आहेस. अत्यंत श्रेष्ठ असे आश्रयस्थान तू आहेस. हे अनंतरूपा तू हे विश्व विस्तारले आहेस. ॥11-38॥
514-11
तू प्रकृतिपुरुषांचिया आदी । जी महत्तत्वा तूचि अवधी । स्वये तू अनादि । पुरातनु ॥514॥
देवा ! तू या प्रकृतिपुरुषाचाही आदी म्हणजे कारण आहेस. जी भगवंता ! महत्वाचे शेवटही तूच आहेस. स्वतः तू अनादी पुरातन आहेस.
515-11
तू सकळ विश्वजीवन । जीवांसि तूचि निधान । भूतभविष्याचे ज्ञान । तुझ्याचि हाती ॥515॥
तू सर्व विश्वाचे जीवन असून, सर्व जीवाचे अधिष्ठान तूच आहेस आणि भूत भविष्यज्ञान तुझ्या स्वाधीन आहे.
516-11
जी श्रुतीचिया लोचना । स्वरूपसुख तूचि अभिन्ना । त्रिभुवनाचिया आयतना । आयतन तू ॥516॥
तू वेदांचे डोळे आहेस. आत्मस्वरूपाशी तू अभिन्न आहेस आणि म्हणून आत्मस्वरूपाचे सुखही तूच आहेस. तूच संपूर्ण त्रिभुवनाला आधार असणार्या विश्वरूपालाही आधार आहेस.
517-11
म्हणौनि जी परम । तूते म्हणिजे महाधाम । कल्पांती महद्ब्रह्म । तुजमाजी रिगे ॥517॥
म्हणून भगवंता ! तुला सर्वश्रेष्ठ म्हणतात व सर्वाचे अंतिम वसतिस्थान तुलाच म्हणतात. कल्पाचे शेवटी ही माया तुझ्या ठिकाणीच लीन होते.
518-11
किंबहुना तुवा देवे । विश्व विस्तारिले आहे आघवे । तरि अनंतरूपा वानावे । कवणे तूते ॥518॥
किंबहूना तूच संपूर्ण जगत्स्वरूपाने प्रगट झाला आहेस, तेव्हा हे विश्वरूपा ! तुझे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे ?
वायुर्यमोग्निर्वरुणः शशाङ्कः
प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।
नमो नमस्तेऽस्तुसहस्रकृत्वः
पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥11. 39॥
नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व । अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥11. 40॥
अर्थ वायु, यम, अग्नि, वरुण, चंद्र ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचाही पिता तू आहेस. तुला नमस्कार असो. सहस्रवधि नमस्कार असोत. पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो. ॥11-39॥हे सर्वत्र असणार्या प्रभो, पुढून, मागून, सर्व बाजूंनी तुला नमस्कार असो. सामर्थ्याला अंत नसलेला व पराक्रमाला इयत्ता नसलेला तू आहेस. तू सर्व व्यापतोस, तस्मात् सर्व तूच आहेस. ॥11-40॥
519-11
जी काय एक तू नव्हसी । कवणे ठायी नससी । हे असो जैसा आहासी । तैसिया नमो ॥519॥
देवा ! तू काय नाहीस व कोणत्या ठिकाणी नाहीस ? हे असो. जसा तू आहेस, तशाच तुला नमस्कार असो.
520-11
वायु तू अनंता । यम तू नियमिता । प्राणिगणी वसता । अग्नि तो तू ॥520॥
अनंता ! तूच वायू असून, प्राण्यांना कर्माप्रमाणे शासन करणारा यम तूच आहेस. सर्व प्राणिमात्रांच्या जठरात राहणारा अग्नि तूच आहेस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
521-11
वरुण तू सोम । स्रष्टा तू ब्रह्म । पितामहाचाही परम । आदि जनक तू ॥521॥
वरूण, सौम, सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव व ब्रह्माचाही उत्पन्नकर्ता असा परमकारण तूच आहेस.
522-11
आणिकही जे जे काही । रूप आथि अथवा नाही । तया नमो तुज तैसयाही । जगन्नाथा ॥522॥
आणिकही रूप आहे किंवा रूप नाही जे जे काही आहे, ते तूच आहेस, देवा ! तशा तुला नमस्कार असो.
523-11
ऐसे सानुरागे चित्ते । नमन केले पंडुसुते । मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥523॥
अशा रितीने प्रेमयुक्त चित्ताने भगवंताला अर्जुनाने नमन केले आणि पुनः भगवंता ! तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असेच म्हणू लागला.
524-11
पाठी तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीते । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥524॥
नंतर त्या संपूर्ण विश्वरूपाकडे पाहून पुनः भगवंता ! तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो असेच म्हणू लागला.
525-11
पाहता पाहता प्रांते । समाधान पावे चित्ते । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥525॥
एका एका अवयवाकडे पाहात पाहात, मनात परम संतोष मानून पुनः भगंवंता तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो असे म्हणू लागला
526-11
इये चराचरी जी भूते । सर्वत्र देखे तयाते । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥526॥
ही स्थावर जंगम जी भूते आहेत, ती सर्वत्र पाहू लागला व पुनः पुनः भगवंता ! तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असेच म्हणू लागला.
527-11
ऐसी रूपे तिये अद्भुते । आश्चर्ये स्फुरती अनंते । तव तव नमस्ते । नमस्तेचि म्हणे ॥527॥
भगवंताची अद्भूत आश्चर्यानेयुक्त अशी असंख्य रूपे जो जो पाहू लागला, तो तो तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असेच म्हणू लागला.
528-11
आणिक स्तुतिही नाठवे । आणि निवांतुही न बैसवे । नेणे कैसा प्रेमभावे । गाजोचि लागे ॥528॥
आणखी काय स्तुती करावी, हे त्याला आठवत नव्हते आणि मौनही धरून राहवेना. प्रेमभावाने तो कसा नमस्ते नमस्ते असा घोष करू लागला, हे मला समजत नाही.
529-11
किंबहुना इयापरी । नमन केले सहस्रवरी । की पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो ॥529॥
किंबहुना याप्रमाणे हजारो वेळा त्याने नमन केले व पुनः हे श्रीहरी ! माझ्या समोर असणार्या तुला नमस्कार असो, असे म्हणू लागला.
530-11
देवासि पाठी पोट आथि की नाही । येणे उपयोगु आम्हा काई । तरि तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी ॥530॥
देवाला पाठ व पोट आहे किंवा नाही, या विचाराचा आम्हाला काय उपयोग ?तरी पाठीमागे असणार्या तुला, भगवंता ! नमस्कार असो !
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
531-11
उभा माझिये पाठीसी । म्हणौनि पाठीमोरे म्हणावे तुम्हासी । सन्मुख विन्मुख जगेसी । न घडे तुज ॥531॥
माझ्या पाठीशी उभा आहेस, म्हणून तुला पाठमोरे म्हणायचे, एरव्ही तू जगाच्या सन्मुख किंवा विन्मुख होऊ शकत नाहीस.
532-11
आता वेगळालिया अवयवा । नेणे रूप करू देवा । म्हणौनि नमो तुज सर्वा । सर्वात्मका ॥532॥
आता तुझ्या वेगवेगळ्या अवयवाचे वर्णन मी करू शकत नाही; म्हणून सर्वरूप व सर्वात्मक असलेल्या तुला नमस्कार असो.
533-11
जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमो अमित विक्रमा । सकळकाळी समा । सर्वरूपा ॥533॥
अगाध सामर्थ्य संपन्न व अगाध पराक्रम असणार्या, सर्वकाळी, सर्व देशात एकरूप, एकसारखा असणार्या तुला, भगवंता ! नमस्कार असो.
534-11
आघविया आकाशी जैसे । अवकाशचि होऊनि आकाश असे । तू सर्वपणे तैसे । पातलासि सर्व ॥534॥
ज्याप्रमाणे सर्व आकाशात पोकळीच आकाशरूप होऊन आहे, त्याप्रमाणे सर्व नामरूपाने तू सर्व झाला आहेस.
535-11
किंबहुना केवळ । सर्व हे तूचि निखिळ । परी क्षीरार्णवी कल्लोळ । पयाचे जैसे ॥535॥
पण क्षीरसमुद्रावर जसे दुधाचे तरंग उठावेत, त्याप्रमाणे हे सर्व तूच केवळ नटला आहेस.
536-11
म्हणौनिया देवा । तू वेगळा नव्हसी सर्वा । हे आले मज सद्भावा । आता तूचि सर्व ॥536॥
म्हणून देवा ! या सर्व नामरूपाहून तू वेगळा नाहीस. आता सर्व तूच आहेस, हे माझ्या पूर्ण प्रत्ययाला आले.
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं
हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानता महिमानं तवेदं
मया प्रमादात्प्रणयेन वापि । 11. 41 ।
अर्थ तुझा हा महिमा न जाणणार्या मी प्रमादामुळे अथवा प्रेमामुळे मित्र समजून तुच्छतापूर्वक अरे कृष्णा, अरे यादवा, अरे सख्या, इत्यादी जे तुला बोललो ॥11-41॥
537-11
परि ऐसिया तूते स्वामी । कहीच नेणो जी आम्ही । म्हणौनि सोयरे संबंधधर्मी । राहाटलो तुजसी ॥537॥
पण, महाराज ! सर्व नामरूपाने तूच नटला आहेस, असे आम्ही पूर्वी कधी जाणत नव्हतो, म्हणूनच तुझ्याशी सोयरेपणाच्या नात्याने वागलो.
538-11
अहा थोर वाउर जाहले । अमृते संमार्जन म्या केले । वारिके घेऊनि दिधले । कामधेनूते ॥538॥
हाय हाय ! माझे फार अनुचित वर्तन झाले, मी अमृताने सडा संमार्जन केले. कामधेनूला देऊन तिच्याबद्दल मी शिंगरू घेतले.
539-11
परिसाचा खडवाचि जोडला । की फोडोनि आम्ही गाडोरा घातला । कल्पतरू तोडोनि केला । कूंप शेता ॥539॥
प्रत्यक्ष परिसाचा खडक प्राप्त झाला असतांना, आम्ही तो फोडून घराच्या पायर्यात घातला आणि कल्पतरूच्या डाहाळ्या तोडून शेताला कुंपण केले.
540-11
चिंतामणीची खाणी लागली । तेणे करे वोढाळे वोल्हांडिली । तैसी तुझी जवळिक धाडिली । सांगातीपणे ॥540
चिंतामणीची खाण लागली असता, ओळखता न आल्यामुळे तिची उपेक्षा केली जावी, त्याप्रमाणे तुमच्याशी अति सलगीने वागून तुमची प्राप्ती व्यर्थ दवडली.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
541-11
हे आजिचेचि पाहे पा रोकडे । कवण झुंज हे केवढे । एथ परब्रह्म तू उघडे । सारथी केलासी ॥541॥
प्रत्यक्ष आजचीच गोष्ट पहा. हे युध्द काय आहे आणि कितीसे आहे; पण तू स्पष्ट परब्रह्म असूनही तुला मी सारथी केला.
542-11
यया कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा । ऐसा वणिजेसाठी जागेश्वरा । विकलासि आम्ही ॥542॥
आणि जगन्नाथा ! या कौरवांच्या घरी तडजोड करण्याकरीता आम्ही तुला पाठविले. या प्रमाणे आम्ही आपले शुल्लक व्यवहार देखील तुझ्याकडून करविले.
543-11
तू योगियांचे समाधिसुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख । उपरोधु जी सन्मुख । तुजसी करू ॥543॥
योगी लोक तुझ्याच ठिकाणी समाधी लावून सुख भोगतात; पण मी मूर्ख, हे कसे म्हणून जाणत नव्हतो आणि तुझ्या तोंडावर तुझी थट्टा करीत असे.
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि
विहारशय्यासनभोजनेषु ।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं
तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥11. 42॥
अर्थ आणि क्रीडा, शयन, आसन, (मंडाळीमध्ये बसणे), भोजन इत्यादी प्रसंगी तू एकटा असतांना किंवा (लोकांच्या) देखत तुझा उपहास करण्याकरता जो तुझा अपमान केला त्याबद्दल हे अप्रमेया (ज्याच्या प्रभावाचे अथवा स्वरूपाचे प्रमाण करता येत नाही) अच्युता मला क्षमा कर. ॥11-42॥
544-11
तू या विश्वाची अनादि आदी । बैससी जिये सभासदी । तेथे सोयरीकीचिया संबंधी । रळी बोलो ॥544॥
तू या विश्वाचा आदिकारण असतांना, तु ज्या सभासदांमध्ये बसत होतास, त्या सभासदांच्या समोर सोयरिकीच्याच नात्याने तुझ्याशी चेष्टा करीत होतो.
545-11
विपाये राउळा येवो । तरि तुझेनि अंगे मानु पावो । न मानिसी तरी जावो । रुसोनि सलगी ॥545॥
कदाचित तुमच्या मंदिरात मी आलो तर, तुमच्याकडून सत्कार करून घेत असे. जर मानाने तसे वागविले नाही, तर अत्यंत सलगीमुळे मी तुमच्यावर रुसूनही जात होतो.
546-11
पाया लागोनि बुझावणी । तुझ्या ठायी शारङ्गपाणी । पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्ही ॥546॥
हे शार्ङ्गपाणि भगवंता ! खरोखर तुझ्या पाया पडून व क्षेमकरिता तुझी याचना करून, तुझे सांत्वन केले पाहिजे, अशा प्रकारची वागणूक माझ्याकडून फार झाली.
547-11
सजणपणाचिया वाटा । तुजपुढे बैसे उफराटा । हा पाडु काय वैकुंठा ? । परि चुकलो आम्ही ॥547॥
सोयरेपणाच्या नात्याने तुझ्याकडे पाठ करून बसत असे, भगवंता ! हे योग्य होते काय ?पण आम्ही चुकलों.
548-11
देवेसि कोलकाठी धरू । आखाडा झोंबीलोंबी करू । सारी खेळता आविष्करू । निकरेही भांडो ॥548॥
देवा ! तुमच्याबरोबर दांडपट्टा खेळलों, आखाड्यात तुमच्याशी झोंबाझोंबी केली. सोंगट्या खेळतांना खोटे दान देत असू आणि हातघाईवर येऊन, तुमच्याशी भांडतही असूं.
549-11
चांग ते उराउरी मागो । देवासि की बुद्धि सांगो । तेवीचि म्हणो काय लागो । तुझे आम्ही ॥549॥
जी चांगली वस्तु असेल, ती बळजबरीने मागत असू. सर्वज्ञ अशा तुला शहाणपण सांगत असू त्याचप्रमाणे केव्हा ‘आम्ही तुझे काय लागतो’ असेहि म्हणत असूं.
550-11
ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनी न समाये । जी नेणताचि की पाये । शिवतिले तुझे ॥550॥
असे त्रैलोक्यात मावणार नाही इतके अपराध माझ्याकडून झाले आहेत; पण देवा ! हे सर्व अज्ञानामुळे घडले आहेत, हे तुझ्या पायाला स्पर्श करून सांगतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
551-11
देवो बोनयाच्या अवसरी । लोभे कीर आठवण करी । परी माझा निसुग गर्व अवधारी । जे फुगूनचि बैसे ॥551॥
देवा ! तुम्ही जेवणाचे वेळी माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असा, पण मी फुगुनच बसत असे. हा माझा निर्लज्ज गर्व पहा !
552-11
देवाचिया भोगायतनी । खेळता आशंकेना मनी । जी रिगोनिया शयनी । सरिसा पहुडे ॥552॥
देवाच्या अंतःपुरात खेळतांना मनात शंका देखील येत नसे. देवा ! तुझ्या अंथरूणावर तुझ्याबरोबर निजत असे.
553-11
‘कृष्ण म्हणौनि हाकारिजे । यादवपणे तूते लेखिजे । आपली आण घालिजे । जाता तुज ॥553॥
‘अरे कृष्णा ! ‘म्हणून तुला हाक मारावी. तू एक यादव आमचा सोयरा आहेस, असे समजावे. तु जायला लागलास की तुला मी आपली आण वाहून ‘जाऊ नकोस’असे म्हणत असे.
554-11
मज एकासनी बैसणे । का तुझा बोलु न मानणे । हे वोतटीचेनि दाटपणे । बहुत घडले ॥554॥
तू बसलेल्या असनावर मी बसणे किंवा तुझे म्हणणेहि न ऐकणे, हे अतिपरिचयामुळे पुष्कळवेळा घडून आले आहे;
555-11
म्हणौनि काय काय आता । निवेदिजेल अनंता । मी राशि आहे समस्ता । अपराधाचि ॥555॥
म्हणून अनंता ! काय काय अपराध सांगूं ?मी सर्व अपराधाची राशीच आहे.
556-11
यालागी पुढा अथवा पाठी । जिये राहटलो बहुवे वोखटी । तिये मायेचिया परी पोटी । सामावी प्रभो ॥556॥
म्हणून प्रत्यक्ष तुमच्यासमोर किंवा तुमच्या पश्चात्, जे काही माझ्याकडून वाईट वागणे झाले, भगवंता ! ते सर्व आईप्रमाणे पोटांत घाल.
557-11
जी कोण्ही एके वेळे । सरिता घेऊन येती खडुळे । तिये सामाविजेति सिंधुजळे । आन उपायो नाही ॥557॥
देवा ! कोणे एखादे वेळी नद्या गढूळ पाण्याचे प्रवाह घेऊन समुद्राकडे येतात व दुसरा उपायच नसल्यामुळे समुद्र, त्या पाण्याला आपल्यात समावून घेतो.
558-11
तैसी प्रीती का प्रमादे । देवेसी मज विरुद्धे । बोलविली तिये मुकुंदे । उपसाहावी जी ॥558॥
त्याप्रमाणे प्रेमाने असो की प्रमादिने असो, बोलू नये असे, सलगीमुळे सवयीने जे शब्द बोलले गेले असतील, ते सर्व भगवंता पोटांत घालावे.
559-11
आणि देवाचेनि क्षमत्वे क्षमा । आधारु जाली आहे या भूतग्रामा । म्हणौनि जी पुरुषोत्तमा । विनवू ते थोडे ॥559॥
आणि देवाच्या क्षमागुणांमुळे पृथ्वी क्षमा संज्ञेला पात्र झाली, म्हणून ती सर्व भूतसृष्टीला आधार झाली आहे; म्हणून पुरुषोतातमा ! मी काय विनंति करू !
560-11
तरी आता अप्रमेया । मज शरणागता आपुलिया । क्षमा कीजो जी यया । अपराधासि ॥560॥
तरी आता प्रमाणाच्या आटोक्यात न येणार्या भगवंता ! मज आपल्या शरणगताला या सर्व अपराधाची क्षमा कर.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
पितासि लोकस्य चराचरस्य
त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् ।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो
लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः ॥11. 43॥
अर्थ या चराचर जगाचा तू पिता आहेस, अत्यंत पूज्य व आद्य असा गुरु आहेस. हे अप्रतिम प्रभावा (ज्याच्या प्रभावाशी तुलना करण्याला योग्य असा दुसर्या कोणाचाही प्रभाव नाही अशा) (स्वर्ग, मृत्यु, पाताळ, या) तिन्ही लोकांमधे देखील तुझ्य़ासारखा दुसरा कोणीही नाही. मग तुझ्याहून अधिक कोठून असणार ? ॥11-43॥
561-11
जी जाणितले मिया साचे । महिमान आता देवाचे । जे देवो होय चराचराचे । जन्मस्थान ॥561॥
अहो जी देवा ! आता मी यथार्थ महिमा जाणला आहे. तू सर्व ब्रह्मांडाचे उत्पत्तिस्थान आहेस.
562-11
हरिहरादि समस्ता । देवा तू परम देवता । वेदांतेही पढविता । आदिगुरु तू ॥562॥
हरिहरांदि सर्व देवांची तू परम पूज्य देवता असून, वेदालाहि उपदेश करणारा आद्य व परम गुरु तू आहेस.
563-11
गंभीर तू श्रीरामा । नाना भूतैकसमा । सकळगुणी अप्रतिमा । अद्वितीया ॥563॥
हे श्रीरामा तू अति गंभीर असून, सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी एकसारखा व्यापून आहेस. तुझ्या ठिकाणी सर्व ज्ञान ऐश्वर्यादि षड्गुण निरतिशय असून तुझ्यावाचून दुसरी वस्तूच नाही.
564-11
तुजसी नाही सरिसे । हे प्रतिपादनचि कायसे ? । तुवा जालेनि आकाशे । सामाविले जग ॥564॥
तुझ्या बरोबरीचे दुसरे काही नाही, हे काय बोलायचें ?आकाशरूप झालेल्या ठिकाणीच संपूर्ण त्रिभुवन सामावले आहे.
565-11
तया तुझेनि पाडे दुजे । ऐसे बोलताचि लाजिजे । तेथ अधिकाची कीजे । गोठी केवी ॥565॥
तुझ्या बरोबरीचे दुसरे आहे, हे म्हणतांच जेथे लाज वाटते, तेंथे तुझ्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ आहे हे कसे म्हणता येईल ?
566-11
म्हणौनि त्रिभुवनी तू एकु । तुजसरिखा ना अधिकु । तुझा महिमा अलौकिकु । नेणिजे वानू ॥566॥
म्हणून या संपूर्ण त्रिभुवनांत तूंच एक असून, तुझ्यासारखा किंवा तुझ्यापेक्षा अधिक दुसरा कोणी नाही. तुझा अगाध महिमा वर्णन करतांना आमची मति कुंठित होते.
तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं
प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः
प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ॥11-44॥
अर्थ यास्तव (जगताचा) स्वामी व स्तवन करण्याला योग्य अशा तुला, मी देह नमवून नमस्कार करून तुझ्याकडून अनुग्रह करवून घेतो. हे देवा, पिता ज्याप्रमाणे पुत्राचे, मित्र ज्याप्रमाणे मित्राचे, प्रियजन ज्याप्रमाणे प्रियजनांचे अपराध सहन करतो त्याप्रमाणे माझे अपराध सहन करण्याला तू योग्य आहेस. ॥11-44॥
567-11
ऐसे अर्जुने म्हणितले । मग पुढती दंडवत घातले । तेथे सात्त्विकाचे आले । भरते तया ॥567॥
अर्जुन असे बोलला व भगवंताला पुनः त्याने साष्टांग नमस्कार घातला, तेव्हा त्याला अष्टसात्विकभाव दाटून आले.
568-11
मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्गद । काढी जी अपराध । समुद्रौनि माते ॥568॥
मग अत्यंत गहिंवरून गद् गद् वाणीने भगवंताला म्हणाला, भगवंता ! कृपा कर, कृपा कर व मला या अपराध समुद्रांतून बाहेर काढ.
569-11
तुज विश्वसुहृदाते कही । सोयरेपणे न मनूंचि पाही । तुज विईश्वेश्वराचिया ठायी । ऐश्वर्य केले ॥569॥
तू सर्व ब्रह्मांडाचा अहेतुक कल्याणकर्ता असूनहि, सोयरेपणामुळे आम्ही असे मानित नव्हतो तू सर्व सृष्टीचा चालक, पण आम्हाला ते आश्चर्यकारक वाटत असे.
570-11
तू वर्णनीय परी लोभे । माते वर्णिसी पा सभे । तरि मिया वल्गिजे क्षोभे । अधिकाधिक ॥570॥
तूंच एक सर्वस्वी वर्णन करण्यास योग्य, परंतु सभेमध्ये प्रेमाने तू माझे वर्णन करावे व मी ते पाहून गर्वाने फुगून अधिकच बडबड करीत असे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
571-11
आता ऐसिया अपराधा । मर्यादा नाही मुकुंदा । म्हणौनि रक्ष रक्ष प्रमादा । पासोनिया ॥571॥
भगवंता ! आता अशा माझ्या अपराधाला मर्यादाच नाही म्हणून या अपराधाला मर्यादाच नाही म्हणून या अपराधापासून माझे रक्षण कर रक्षण कर.
572-11
जी हेचि विनवावयालागी । कैची योग्यता माझिया आंगी । परी अपत्य जैसे सलगी । बापेसी बोले ॥572॥
माझे इतके असंख्य अपराध आहेत की अपराधापासून माझे रक्षण कर अशी प्रार्थना करण्याचीहि माझ्या अंगी योग्यता राहिली नाही. पण मुलगा जसा बापाशी सलगीने बोलतो तसे मी बोलत आहे.
573-11
पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध । तरी पिता साहे निर्द्वंद्व । तैसे साहिजो जी ॥573॥
पुत्राचे असंख्य अपराध झाले तरी, पिता जसा ते सर्व अपराध दुजाभाव सोडून देऊन सहन करतो, तसे माझे सर्व अपराध, देवा ! सहन कर.
574-11
सख्याचे उद्धत । सखा साहे निवांत । तैसे तुवा समस्त । साहिजो जी ॥574॥
मित्राचा उद्दामपणा, जसा मित्र मनात काही न येऊ देता सहन करतो, त्याप्रमाणे माझे सर्व अपराध तू पोटांत घाल.
575-11
प्रियाचिया ठायी सन्मान । प्रिय न पाहे सर्वथा जाण । तेवी उच्छिष्ट काढिले आपण । ते क्षमा कीजो जी ॥575॥
प्रिय, प्रियेच्या ठिकाणी मनाची मुळींच इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे आपण राजसूय-यज्ञांत उच्छिष्ट पाने काढलीं, त्याची क्षमा करा.
576-11
नातरी प्राणाचे सोयरे भेटे । मग जीवे भूतली जिये संकटे । तिये निवेदिता न वाटे । संकोचु काही ॥576॥
किंवा अत्यंत जिवलग सोयर्यांची भेट झाली असता, मग आपण भोगलेले दुःखाचे प्रसंग, त्याला सांगतांना मनात काही संकोच वाटत नाही.
577-11
का उखिते आंगे जीवे । आपणपे दिधले जिया मनोभावे । तिया कांतु मिनलिया न राहवे । हृदय जेवी ॥577
किंवा जिने आपले एकंदर शरीर व प्राण, ज्याला मनोभावाने समर्पण केले, त्या पतीची भेट झाल्यानंतर, आपल्या मनातील गोष्ट सांगितल्यावाचून, ज्याप्रमाणे तिला राहवत नाही.
578-11
तयापरी जी मिया । हे विनविले तुमते गोसाविया । आणि काही एक म्हणावया । कारण असे ॥578॥
त्याप्रमाणे देवा ! मी तुमच्या सलगीने प्रार्थना केली आहे. तसेंच प्रार्थना करण्याचे दुसरे आणखी एक कारण आहे.
अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा
भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देव रूपं
प्रसीद देवेश जगन्निवास॥11. 45॥
अर्थ पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी हर्ष पावलो आहे आणि भायाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून देवा, मला तेच पूर्वीचे रूप दाखव. हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, माझ्यावर अनुग्रह कर. ॥11-45॥
579-11
तरी देवेसी सलगी केली । जे विश्वरूपाची आळी घेतली । ते मायबापे पुरविली । स्नेहाळाचेनि ॥579॥
देवा ! मी तुझ्याशी सलगी करून तुझे विश्वरूप पहाण्याचा हट्ट धरला आणि प्रेमळभक्ताच्या मायबापाने तुवां, तो हट्ट पुरविला.
580-11
सुरतरूंची झाडे । आंगणी लावावी कोडे । देयावे कामधेनुचे पाडे । खेळावया ॥580॥
ज्याप्रमाणे कौतुकाने अंगणात कल्पतरूची झाडे लावावीत किंवा कामधेनुचे वासरू खेळावयाला आणून द्यावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
581-11
मिया नक्षत्री डाव पाडावा । चंद्र चेंडुवालागी आणावा । हा छंदु सिद्धी नेला आघवा । माउलिये तुवा ॥581॥
नक्षत्ररूप फाश्यांनी डाव टाकावा व चेंडू खेळण्याकरिता चंद्र द्यावा इत्यादि हट्टासारखाच असलेला माझा विश्वरूप दर्शनाचा हट्ट, आई तू पूर्णपणे सिध्दिस नेला.
582-11
जिया अमृतलेशालागी सायास । तयाचा पाऊस केला चारी मास । पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणी पेरिले ॥582॥
ज्या अमृताचा एक थेंब मिळविण्याकरिता देखील अत्यंत प्रयास पडतात, त्याचा चार महिने सारखा पाऊस पडावा किंवा संपूर्ण पृथ्वीची मशागत करून वाफ्यावाफ्यामध्ये चिंतामणी पेरावेत.
583-11
ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्ही । दाविले जे हरब्रह्मी । नायकिजे कानी ॥583॥
त्याप्रमाणे भगवंता ! मला अत्यंत कृतार्थ केले. माझा तुम्ही पुष्कळ लाड पुरविला आणि जे विश्वरूप दाखविले, ते शंकर, ब्रह्मदेव यांनी कानांनी देखीले ऐकिले नाही.
584-11
मा देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाही भेटी । ते जिव्हारीची गाठी । मजलागी सोडिली ॥584॥
मग प्रत्यक्ष विश्वरूप पाहण्याची गोष्ट दूरच राहिली. ज्या विश्वरूपाची वेदालाहि भेट घेपां आली नाही, ती ह्रदयातील विश्वरूपाची गांठ, आपण माझ्याकरिता सोडली.
585-11
जी कल्पादीलागोनि । आजिची घडी धरुनी । माझी जेतुली हौनी । गेली जन्मे ॥585॥
देवा ! कल्पांच्या आरंभापासून या क्षणापर्यंत माझे जेवढे जन्म होऊन गेले,
586-11
तया आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असे पाहतु । परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना ॥586॥
या प्रत्येक जन्मांतील घराघरांचा शोध करून पाहताहि हे विश्वरूप मी पाहिले किंवा ऐकिले असे म्हणणारा कोणी सांपडत नाही.
587-11
बुद्धीचे जाणणे । कही न वचेचि याचेनि आंगणे । हे सादही अंतःकरणे । करवेचिना ॥587॥
तेथे डोळ्यांनी कोणी पाहिले असेल ही गोष्टच कशी करायची ! किंबहूना हे विश्वरूप करता येत नाही.
588-11
तेथा डोळ्या देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी । किंबहुना पूर्वी । दृष्ट ना श्रुत ॥588॥
तेथे डोळ्यंनी पाहिले असेल ही गोष्टच कशी करायची ! किंबहूना हे विश्वरूप पूर्वी कोणी पाहिले किंवा ऐकलेहि नाही.
589-11
ते हे विश्वरूप आपुले । तुम्ही मज डोळा दाविले । तरी माझे मन झाले । हृष्ट देवा ॥589॥
ते हे विश्वरूप आपण माझ्या डोळ्याला दाखविले. त्यामुळे मला अत्यंत आनंद झाला.
590-11
परि आता ऐसी चाड जीवी । जे तुजसी गोठी करावी । जवळीक हे भोगावी । आलिंगावासी ॥590॥
पण अंतःकरणात आता अशी इच्छा आहे की, तुझ्याशी चार गोष्टी कराव्या व तुला अलिंगन देण्याकरिता तुझे सांन्निध्य प्राप्त व्हावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
591-11
ते याचि रूपी करू म्हणिजे । तरि कोणे एके मुखेसी चावळिजे । आणि कवणा खेंव देईजे । तुज लेख नाही ॥591॥
ह्या सर्व गोष्टी, या विश्वरूपाशी करू म्हटल्यास, तुझ्या या विश्वरूपाला संख्याच नसल्यामुळे कोणत्या एका मुखाशी बोलावे व कोणत्या रूपाला आलिंगन द्यावे ?
592-11
म्हणौनि वारियासवे धावणे । न ठके गगना खेंव देणे । जळकेली खेळणे । समुद्री केउते ? ॥592॥
म्हणून वार्याबरोबर धावणे किंवा आकाशाला आलिंगन देणे शक्य नाही. समुद्रात जलक्रीडा कशी करायची ?
593-11
यालागी जी देवा । एथिचे भय उपजतसे जीवा । म्हणौनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हे आता ॥593॥
याकरिता हे देवा ! माझ्या मनात या विश्वरूपाचे भय वाटते; म्हणून माझा हट्ट पुरवा, आता हे विश्वदर्शन पुरे.
594-11
पै चराचर विनोदे पाहिजे । मग तेणे सुखे घरी राहिजे । तैसे चतुर्भुज रूप तुझे । तो विसावा आम्हा ॥594॥
ज्याप्रमाणे कौतुकाने सर्व पृथ्वीचा प्रवास केल्यावर प्रवासाची दगदग नाहीशी करण्याकरिता परत घरी येऊन, सुखाने विश्रांती घ्यावी, त्याप्रमाणे तुझे हे चतुर्भुजरूप आमचा सर्व शीण नाहीसा करणारे आमचे विश्रांतीस्थान आहे.
565-11
आम्ही योगजात अभ्यासावे । तेणे याचि अनुभवा यावे । शास्त्रांते आलोडावे । परि सिद्धांतु तो हाचि ॥595॥
आम्ही सर्व योगांचा अभ्यास करून शेवटी याच चतुर्भुज मूर्तीच्या सुखाचा अनुभव घ्यावा. सर्व शास्त्रांचे अध्ययन करावे, पण शेवटी एका तुझ्या चतुर्भुज मूर्तीच्या आश्रयानेच पूर्ण सुखाची प्राप्ती होते, हाच सर्व शास्त्रांचा सिध्दान्त आहे.
596-11
आम्ही यजने किजती सकळे । परि तिये फळावी येणेचि फळे । तीर्थे होतु सकळे । याचिलागी ॥596॥
आम्ही नानाप्रकारच्या, सर्व प्रकारच्या यज्ञांचे अनुष्ठान करावे, पण त्या सर्व यज्ञांच्या अनुष्ठानाचे फळ मात्र तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी, हेच असावे. या चतुर्भुज मूर्तीच्या प्राप्तीकरिता सर्व तीर्थाटन असावे.
597-11
आणीकही काही जे जे । दान पुण्य आम्ही कीजे । तया फळी फळ तुझे । चतुर्भुज रूप ॥597॥
आणिकही काही जी जी दानादिक पुण्ये आम्ही करू त्या सर्व पुण्याने तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी.
598-11
ऐसी तेथिची जीवा आवडी । म्हणौनि तेचि देखावया लवडसवडी । वर्तत असे ते सांकडी । फेडीजे वेगी ॥598॥
अशी तुझ्या चतुर्भुजमूर्तीच्या विषयी माझ्या मनात आवड असल्यामुळे, हे तुझे रूप पाहण्याची मनाला अत्यंत तळमळ लागली आहे. ती तळमळ लवकर नाहीशी कर.
599-11
अगा जीवीचे जाणतेया । सकळ विश्ववसवितेया । प्रसन्न होई पूजितया । देवांचिया देवा ॥599॥
हे सर्व अंतःकरणातील जाणणार्या, सर्व जगाला आधार असणार्या व सर्व देवांना पूज्य असणार्या देवाच्या देवा ! माझ्यावर प्रसन्न हो.
किरीटिनं गदिनं चक्रहस्त
मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन
सहस्रबाहो भव विश्वमूर्ते । 11. 46 ।
अर्थ किरीट धारण करणारा, गदा धारण करणारा, हातामधे चक्र असणारा अशाच तुला पहाण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहो, हे विश्वरूपधारिन् तू पुन्हा तेच चतुर्भुज स्वरूप धारण कर. ॥11-45॥
600-11
कैसे नीलोत्पलाते रांवित । आकाशाही रंगु लावित । तेजाची वोज दावित । इंद्रनीळा ॥600॥
भगवंताच्या अंगाच्या स्वयंभू नीलवर्णाने निळ्या कमळाला व आकाशाला कसा नीलवर्ण दिला आहे पाहा ! भगवंताच्या अंगाचे तेज इंद्रनील मण्याचे ठिकाणी कशी झांक दाखवीत आहे, पहा.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
601-11
जैसा परिमळ जाहला मरगजा । का आनंदासि निघालिया भुजा । ज्याचे जानुवरी मकरध्वजा । जोडली बरव ॥601॥
ज्याच्या अंगाचा सुगंध म्हणजे जणू काय मरगजाला प्राप्त झालेला सुगंध होय. भगवंताचे बाहू म्हणजे ब्रह्मानंदालाच निघालेल्या भुजा होत. ज्याच्या गुडघ्याचे सौंदर्य मदनाला प्राप्त झाले आहे.
602-11
मस्तकी मुकुटाते ठेविले । की मुकुटा मुकुट मस्तक झाले । शृंगारा लेणे लाधले । आंगाचेनि जया ॥602॥
मस्तकावर मुकुट ठेवल्याने मस्तकाला शोभा आली नसून, भगवंताचे मस्तकच मुकुटाला शोभा आणीत आहे. शृंगाराने भगवंताचे अंग अलंकृत केले नसून, भगवंताच्या अंगानेच शृंगाराला अलंकृत केले आहे.
603-11
इंद्रधनुष्याचिये आडणी । माजी मेघ गगनरंगणी । तैसे आवरिले शारङ्गपाणी । वैजयंतीया ॥603॥
आकाशात उठलेला मेघ, जसा इंद्रधनुष्याने वेढलेला दिसतो, तसा वैजयंतीमाळेने भगवान वेढलेला दिसतो.
604-11
आता कवणी ते उदार गदा । असुरा देत कैवल्य पदा । कैसे चक्र हन गोविंदा । सौम्यतेजे मिरवे ॥604॥
असुरांचा प्राण घेऊन त्यांना मोक्ष देणारी तुझ्या हातातील कशी ती उदार गदा आहे आणि गोविंदा ! तुझ्या हातातील सुदर्शन चक्रही, सौम्यतेजाने कसे युक्त दिसत आहे.
605-11
किंबहुना स्वामी । ते देखावया उत्कंठित पा मी । म्हणौनि आता तुम्ही । तैसया होआवे ॥605॥
किंबहुना प्रभो ते असे तुझे रूप पाहण्याकरिता मला अत्यंत उत्कंठा लागली आहे, म्हणून तू तसाच चतुर्भुज हो.
606-11
हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे । आता होताति आंधले कृष्णमूर्तीलागी ॥606॥
हा विश्वरूपाचा आनंद भोगून माझे डोळे तृप्त झाले. आता ते, तुझे पूर्वीचे श्रीकृष्णस्वरूप पाहण्याकरिता आतुर झाले आहेत.
607-11
ते साकार कृष्णरूपडे । वाचूनि पाहो नावडे । ते न देखता थोडे । मानिताती हे ॥607॥
त्या साकार श्रीकृष्णस्वरूपावाचून माझ्या डोळ्याला दुसरे काही पाहणे आवडत नाही. श्रीकृष्णस्वरूप न पाहता हे विश्वरूप देखील माझ्या डोळ्यांना कमी प्रतीचे वाटते.
608-11
आम्हा भोगमोक्षाचिया ठायी । श्रीमूर्तीवाचूनि नाही । म्हणौनि तैसाचि साकारु होई । हे सांवरी आता ॥608॥
आता तुझ्या भक्तांना भोग म्हणजे दृष्ट परमानंद व मोक्ष म्हणजे विदेहमुक्ति- या दोहोंकरिता, तुझ्या सगुण साकार मूर्तीवाचून दुसरे काही लागत नाही; म्हणूनच आता विश्वरूपाचा उपसंहार कर व सगुण श्रीकृष्णरूपाने प्रगट हो.
श्रीभगवानुवाच ।
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं
रूपं परं दर्शितमात्मयोगात् ।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं
यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्॥11. 47॥
अर्थ श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, प्रसन्न होऊन मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय, विश्वात्मक, अनंत व आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखवले. हे माझे (रूप) तुझ्याखेरीज पूर्वी कोणीही पाहिलेले नाही ॥11-47॥
609-11
या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला । म्हणे ऐसा नाही देखिला । धसाळ कोणी ॥609॥
अर्जुनाचे हे म्हणणे ऐकून, विश्वरूप भगवंताला आश्चर्य वाटले आणि भगवान म्हणाले, अर्जुना ! तुझ्यासारखा अविचारी दुसरा कोणी मी पाहिला नाही.
610-11
कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी । मा भेणे काय नेणो बोलसी । हेकाडु ऐसा ॥610॥
अरे ! केवढी ही थोर वस्तू तुला प्राप्त झाली, त्याच्या लाभाचा संतोष तुला होत नाही आणि त्या रूपाच्या दर्शनाने भयभीत होऊन, एखाद्या दुराग्रही माणसाप्रमाणे, हे काय बोलत आहेस, कळत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
611-11
आम्ही सावियाचि जै प्रसन्न होणे । तै आंगचिवरी म्हणे देणे । वाचोनि जीव असे वेचणे । कवणासि गा ॥611॥
खरोखर, आम्ही जेव्हा प्रसन्न होतो, तेव्हा सर्व आपल्या शरीरासह त्यांच्या स्वाधीन होतो. प्रसन्नतेवाचून असा जीवभाव, आम्ही कोणाकरिताच वेचत नसतो.
612-11
ते हे तुझिये चाडे । आजि जिवाचेचि दळवाडे । कामऊनिया येवढे । रचिले ध्यान ॥612॥
पण आमच्या ठिकाणी असलेले सर्व सामर्थ्य वेचन जे हे आम्ही विश्वरूपाचे ध्यान प्रगट केले, ते तुझी इच्छा पूर्ण करण्याकरिताच केले.
613-11
ऐसी काय नेणो तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी । म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगी ॥613॥
तुझे अत्यंत प्रेम लागून आमची प्रसन्नता कशी वेडी झाली हे समजत नाही; म्हणून सर्वापासून गुप्त अशा विश्वरूपाचीही जगात ध्वजा उभारिली.
614-11
ते हे अपारा अपार । स्वरूप माझे परात्पर । एथूनि ते अवतार । कृष्णादिक ॥614॥
ते हे माझे विश्वरूप, सर्व आकाशादिक अमर्याद वस्तूपेक्षाही अमर्याद असून मायेच्याही पलीकडे आहे व येथूनच हे कृष्णादिक अवतार होतात.
615-11
हे ज्ञानतेजाचे निखिळ । विश्वात्मक केवळ । अनंत हे अढळ । आद्य सकळा ॥615॥
हे विश्वरूप, संपूर्ण केवळ ज्ञानतेजाचेच विश्वात्मक झाले आहे. हे अनंत, अढळ असून सर्व ब्रह्मांडाचे मूळ होय.
616-11
हे तुजवाचोनि अर्जुना । पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना । जे जोगे नव्हे साधना । म्हणौनिया ॥616॥
अर्जुना ! तुझ्यावाचून कोणी ते पाहिले नाही व ऐकलेही नाही; कारण ते साधनेने प्राप्त होण्याजोगे नाही.
न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ।
एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर॥11. 48॥
अर्थ हे कुरुकुलश्रेष्ठा, वेदपठन, यज्त्रयागादि, शास्त्रपठन, दान, श्रौतस्मार्तादि कर्मे अथवा उग्र तपश्चर्या यांनी देखील असे हे माझे रूप मनुष्यलोकांमधे तुझ्यासशिवाय दुसर्या कोणालाही दिसणे शक्य नाही. ॥11-48॥
617-11
याची सोय पातले । आणि वेदी मौनचि घेतले । याज्ञिकी माघौते आले । स्वर्गौनिया ॥617॥
या स्वरूपापर्यंत येताच वेदांनी मौन धारण केले, यज्ञही स्वर्गापासूनच मागे फिरले.
618-11
साधकी देखिला आयासु । म्हणौनि वाळिला योगाभ्यासु । आणि अध्ययने सौरसु । नाही एथ ॥618॥
याच्या प्राप्तीकरिता कराव्या लागणार्या योगाभ्यासात अत्यंत कष्ट आहेत. असे पाहून, साधकांनी योगाभ्यासाचा मार्ग सोडला आणि वेदशास्त्राध्ययनानेही हे प्राप्त होत नाही.
619-11
सीगेची सत्कर्मे । धाविन्नली संभ्रमे । तिही बहुतेकी श्रमे । सत्यलोकु ठाकिला ॥619॥
पूर्ण झालेली सत्कर्मे देखील या स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरिता लगबगीने धावली, पण त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने कसातरी सत्यलोक गाठला.
620-11
तपी ऐश्वर्य देखिले । आणि उग्रपण उभयांचि सांडिले । एक तपसाधन जे ठेले । अपारांतरे ॥620॥
तपांनी विश्वरूपात्मक ऐश्वर्य पाहिले व या विश्वरूपाच्या दर्शनापुढे आपल्या उग्रपणाची काही मात्रा चालत नाही हे जाणून, त्याने उभ्या उभ्याच आपले उग्रपण टाकून दिले. याप्रमाणे तपरूपसाधनापासूनही हे विश्वरूप फार दूर राहिले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
621-11
ते हे तुवा अनायासे । विश्वरूप देखिले जैसे । इये मनुष्यलोकी तैसे । न फावेचि कवणा ॥621॥
तुवा अनायासे- म्हणजे केवळ माझ्या कृपेने जसे विश्वरूप पाहिलेस, तसे या मृत्यूलोकात कोणालाच प्राप्त झाले नाही.
622-11
आजि ध्यानसंपत्तीलागी । तूचि एकु आथिला जगी । हे परम भाग्य आंगी । विरंचीही नाही ॥622॥
आज या विश्वरूपाच्या ध्यानसंपत्तीकरिता तूच एक जगात भाग्यवान निघालास, हे परमभाग्य ब्रह्मदेवालाही प्राप्त झाले नाही.
मा ते व्यथा मा च विमूढभावो
दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् ।
व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं
तदेव मे रूपमिदं प्रपश्य॥11. 49॥
अर्थ हे माझे अशा प्रकारचे भयानक रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस. तू भ्रांतचित्त होऊ नकोस. गतभय व प्रीतियुक्त अंत:करण होऊन पुन: तू माझे पूर्वीचे रूप पहा. ॥11-49॥
623-11
म्हणौनि विश्वरूपलाभे श्लाघ । एथिचे भय नेघ नेघ । हे वाचूनि अन्य चांग । न मनी काही ॥623॥
म्हणून या विश्वरूपाच्या प्राप्तीने आपल्याला धन्य समज. विश्वरूपाच्या दर्शनाची भीती बाळगू नकोस व या विश्वरूपावाचून दुसरे काही चांगले आहे, असे मनातही आणू नकोस
624-11.
हा गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला । मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजैल म्हणौनि ? ॥624॥
अमृताने भरलेला समुद्र, अकस्मात प्राप्त झाला असता, त्याच्यात बुडून प्राण जाईल, कोणी त्याचा त्याग केला आहे का ?
625-11
नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरु । ऐसे म्हणौनि अव्हेरु । करणे घडे ॥625॥
किंवा सोन्याचा पर्वत दृष्टीस पडला असता, एवढा थोर पर्वत नेता येत नाही, म्हणून त्याची उपेक्षा करावी काय ?
626-11
दैवे चिंतामणी लेईजे । की हे ओझे म्हणौनि सांडिजे ? । कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणौनि ? ॥626॥
सुदैवाने चिंतामणी अंगावर घातला गेला की, त्याचे ओझे होते म्हणून जसा टाकून द्यावा किंवा कामधेनू आपल्याच्याने पोसवत नाही, म्हणून तिला हाकून द्यावे ?
627-11
चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगे करितोसि उबारा । पडिसायि पाडितोसि दिनकरा । परता सर ॥627॥
चंद्र घरी चालत आला असता, तुझ्यापासून आम्हाला उष्णता होते, म्हणून येथून जा असे म्हणावे किंवा सूर्य घरी आला असता, सावली पाडतोस, म्हणून दूर हो, असे म्हणावे काय ?
628-11
तैसे ऐश्वर्य हे महातेज । आजि हाता आले आहे सहज । की एथ तुज गजबज । होआवी का ? ॥628॥
त्याप्रमाणे अत्यंत तेजात्मक असे हे माझे विश्वरूप ऐश्वर्य आज अनायासे तुझ्या हाती आले असताना, तुझा जीव एवढा व्याकूळ का व्हावा ?
629-11
परि नेणसीच गावढिया । काय कोपो आता धनंजया । आंग सांडोनि छाया । आलिंगितोसि मा ॥629॥
हे गावंढळ अर्जुना ! पण तू हे काही जाणत नाहीस. तुझ्यावर काय रागावू ! तू शरीर सोडून शरीराच्या छायेला आलिंगन देऊ पाहतोस ना !
630-11
हे नव्हे जो मी साचे । एथ मन करूनिया काचे । प्रेम धरिसी अवगणियेचे । चतुर्भुज जे ॥630॥
हे विश्वरूप माझे खरे स्वरूप असताना तू खरे समजत नाहीस. येथे विश्वस्वरूपाचे विषयी मनात भीती बाळगतोस आणि माझे कनिष्ठ असे जे चतुर्भुज रूप, त्यावर प्रेम करतोस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
631-11
तरि अझुनिवरी पार्था । सांडी सांडी हे व्यवस्था । इयेविषयी आस्था । करिसी झणे ॥631॥
अरे अर्जुना ! अजून तरी माझ्या चतुर्भुजस्वरूपाची आस्था सोड आणि या विश्वरूपाची उपेक्षा करू नकोस.
632-11
हे रूप जरी घोर । विकृति आणि थोर । तरी कृतनिश्चयाचे घर । हेचि करी ॥632
हे माझे विश्वरूप भयंकर विक्राळ व अमर्याद असले, तरी भगवंताचे खरे स्वरूप हेच होय; असाच त्याविषयी निश्चय कर.
633-11
कृपण चित्तवृत्ति जैसी । रोवोनि घाली ठेवयापासी । मग नुसधेनि देहेसी । आपण असे ॥633॥
घो️ कृपण पुरुष, ज्याप्रमाणे आपले चित्त धनापाशी रोवून ठेवतो व मग नुसत्या देहाने आपण बाहेर असतो.
634-11
का अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळा । पक्षिणी अंतराळा- । माजी जाय ॥634॥
किंवा पंख न फुटलेल्या व घरट्यात रहाणार्या पिलापाशी जीव ठेवून, जशी पक्षिणी बाहेर फिरते,
635-11
नाना गाय चरे डोंगरी । परि चित्त बांधिले वत्से घरी । प्रेम एथिचे करी । स्थानपती ॥635॥
किंवा गाय डोंगरावर चरत असते, पण तिचे चित्त घरी असलेल्या वत्साकडे लागलेले असते त्याप्रमाणे तू आपले प्रेम या एका विश्वरूपाच्या ठिकाणीच राहू दे.
636-11
येरे वरिचिलेनि चित्ते । बाह्य सख्य सुखापुरते । भोगिजो का श्रीमूर्तींते । चतुर्भुज ॥636॥
बाकी वरवर चित्ताने, बाहेर सख्यभक्तीचे सुख भोगण्याकरिता, या माझ्या चतुर्भुज मूर्तीवर प्रेम कर.
637-11
परि पुढतपुढती पांडवा । हा एक बोलु न विसरावा । जे इये रूपीहूनि सद्भावा । नेदावे निघो ॥637॥
पण अर्जुना ! वारंवार सांगायचे हे की, या माझ्या विश्वरूपावरून आपले प्रेम निघू देऊ नकोस, हे माझे विश्वरूप विसरू नकोस.
638-11
हे कही नव्हतेचि देखिले । म्हणौनि भय जे तुज उपजले । ते सांडी एथ संचले । असो दे प्रेम ॥638॥
हे केव्हा पूर्वी पाहिलेच नव्हते, म्हणून ते पाहिल्याबरोबर तुला भीती उत्पन्न झाली. ते भय सोड आणि येथे प्रेम संचले राहू दे.
639-11
आता करू तुजयासारखे । ऐसे म्हणितले विश्वतोमुखे । तरि मागील रूप सुखे । न्याहाळी पा तू ॥639॥
विश्वरूप भगवंतांनी ‘तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. माझे मागील चतुर्भुजरूप आनंदाने पाहा. ‘ असे म्हटले.
संजय उवाच ।
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा
स्वकं रूपं दर्शयामास भूयः ।
आश्वासयामास च भीतमेनं
भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥11. 50॥
अर्थ संजय म्हणाला, असे वचन बोलून याप्रमाणे वासुदेवाने पुन्हा स्वत:चे (पूर्वीचे) रूप दाखवले. पुन: सौम्यस्वरूपधारी होऊन त्या महात्म्याने भयभीत अर्जुनाला धीर दिला. ॥50॥
श्रीकृष्णरूप पाहून अर्जुन आश्वस्त झाला.
640-11
ऐसे वाक्य बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो । हे ना परि नवलावो । आवडीचा तिये ॥640॥
असे वाक्य तोंडातून निघाल्याबरोबर, भगवान मनुष्यासारखा देहधारी झाला, हे मोठेसे आश्चर्य नव्हे. पण भगवंताला अर्जुनाचे जे प्रेम होते, त्या प्रेमाचेच आश्चर्य वाटते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
641-11
श्रीकृष्णचि कैवल्य उघडे । वरि सर्वस्व विश्वरूपायेवढे । हाती दिधले की नावडे । अर्जुनासि ॥641॥
खरोखर पाहता, भगवान श्रीकृष्ण उघडे म्हणजे डोळ्यांनी पाहता येणारे, अद्वैत पूर्णब्रह्म होय. त्यातही आणखी भगवंतांनी आपले विश्वरूपासारखे सर्वस्व अर्जुनाच्या हातात दिले; पण अर्जुनाला ते आवडले नाही.
642-11
वस्तु घेऊनि वाळिजे । जैसे रत्नासि दूषण ठेविजे । नातरी कन्या पाहूनिया म्हणिजे । मना न ये हे ॥642॥
ज्याप्रमाणे एखादी वस्तू घेऊन ती टाकून द्यावी किंवा चांगल्या रत्नास दूषण ठेवावे अथवा मुलीला पाहून ‘ही पसंत नाही’ असे म्हणावे.
643-11
तया विश्वरूपायेवढी दशा । करिता प्रीतीचा वाढू कैसा । सेल दीधलीसे उपदेशा । किरीटीसि देवे ॥643॥
(त्याप्रमाणे) आपल्या श्रीकृष्णस्वरूपाची विश्वरूपा एवढी व्यापकदशा करण्यात अर्जुनाविषयी भगवंताच्या ठिकाणी कशी प्रीतिची वाढ झाली पहा, भगवंतांनी अर्जुनाला केलेल्या उपदेशाचा शेवट – म्हणजे सर्वनामरूपासह पूर्ण ब्रह्मच आहे हा अनुभव आणून दिला.
644-11
मोडोनि भांगाराचा रवा । लेणे घडिले आपलिया सवा । मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढती ॥644॥
सोन्याचा रवा वितळवून आपल्या आवडीप्रमाणे अलंकार केल्यावर, मनाला आवडला नाही, तर तो पुनः आटवून टाकावा.
645-11
तैसे शिष्याचिये प्रीती जाहले । कृष्णत्व होते ते विश्वरूप केले । ते मना नयेचि मग आणिले । कृष्णपण मागुते ॥645॥
येथेहि शिष्याच्या प्रेमाप्रमाणे झाले. पूर्वी असलेल्या कृष्णस्वरूपाला भगवंतांनी विश्वरूप केले, पण ते अर्जुनाच्या मनाला आवडले नाही; म्हणून पुनः पूर्वीचेच श्रीकृष्णरूप धारण केले.
646-11
हा ठाववरी शिष्याची निकसी । सहाते गुरु आहाती कवणे देशी ? । परि नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे ॥646॥
संजय म्हणतो, शिष्याने दिलेला त्रास येथपर्यंत सहन करणारे गुरु कोणत्या स्थळी आहेत ? पण भगवंताला अर्जुनाविषयी कसे विलक्षण प्रेम आहे, हे सांगता येत नाही.
647-11
मग विश्वरूप व्यापुनि भोवते । जे दिव्य तेज प्रगटले होते । तेचि सामावले मागुते । कृष्णरूपी तये ॥647॥
मग संपूर्ण नामरूपात्मक जगताला व्यापून सभोवार जे दिव्य तेज पसरले होते, ते संपूर्ण पुनश्च श्रीकृष्णस्वरूपाचे ठिकाणी साठवले गेले.
(वर सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप व विश्वरूप या दोघांचा येथे बीजवृक्षाप्रमाणे संबंध दाखवून, बीज व वृक्ष दोन्हीही, ज्याप्रमाणे एकरूप व सत्य असतात, त्याप्रमाणे विश्वरूप व श्रीकृष्णरूप ही दोन्हीही एकरूप व सत्य म्हणजे अनध्यस्तविवर्तरूप किंवा मायारहितविवर्तरूप आहेत हेच येथे दाखविले आहे. )
648-11
जैसे त्वंपद हे आघवे । तत्पदी सामावे । अथवा द्रुमाकारु साठवे । बीजकणिके जेवी ॥648॥
ज्याप्रमाणे त्वंपद तत्पदार्थाचे ठिकाणी ऐक्य पावते अथवा संपूर्ण वृक् छोट्याशा बीजात साठविला जातो,
649-11
नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा । श्रीकृष्णे योगु हा तैसा । संहारिला तो ॥649॥
किंवा ज्याप्रमाणे स्वप्नातील कल्पित पसारा, जीवाची जागृतदशा गिळून घेते, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या स्वरूपाचे ठिकाणी आपल्या योग ऐश्वर्याचा उपसंहार केला.
650-11
जैसी प्रभा हारपली बिंबी । की जळदसंपत्ती नभी । नाना भरते सिंधुगर्भी । रिगाले राया ॥650॥
ज्याप्रमाणे सूर्यादिकांचे तेज, सूर्यादिक बिंबाचे ठिकाणीच लोप पावते किंवा पाण्याने भरलेले मेघ, आकाशांत नाहीसे होतात किंवा संपूर्ण भरती समुद्रातच नाहीशी होती.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
651-11
हो का जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी । ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥651॥
असे वाटते की, मर्यादित श्रीकृष्णस्वरूपाच्या आकारात जी व्यापक विश्ववस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या प्रेमाकरिता उकलून दाखविली.
652-11
तव परिमाणा रंगु । तेणे देखिले साविया चांगु । तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणौनि घडी केली पुढती ॥652॥
तेव्हा अर्जुनाने तिचा विस्तार व रंग चांगले लक्ष देऊन पाहिले, पण गिर्हाईकीचा संबंध झाला नाही – ग्राहकाला आवडले नाही – म्हणून परत त्याची भगवंताने घडी केली.
653-11
तैसे वाढीचेनि बहुवसपणे । रूपे विश्व जिंतिले जेणे । ते सौम्य कोडिसवाणे । साकार जाहले ॥653॥
त्याप्रमाणे ज्या विश्वरूपाच्या अपार विस्तारामुळे, संपूर्ण विश्व व्यापिले गेले, तेच सौम्य व गोजिरवाणे असे मर्यादित साकार झाले.
(विश्वरूप व श्रीकृष्णस्वरूप हे दोन्ही खरोखर एकरूपच आहेत; म्हणून त्यांचा दोनपणा किंवा भिन्नपणा मानणे, हा भ्रम होय. हेच तत्व माउलींनी वरील ओव्यात निरनिराळे दृष्टांत देऊन प्रतिपादिले आहे. )
654-11
किंबहुना अनंते । धरिले धाकुटपण मागुते । परि आश्वासिले पार्थाते । बिहालियासी ॥654॥
किंबहुना भगवान श्रीकृष्णांनी पुनः लहानसे रूप घेतले, पण विश्वरूपाला पाहून भ्यालेल्या अर्जुनाला धीर दिला.
655-11
जो स्वप्नी स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला । तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ॥655॥
तेव्हा स्वप्नांत ” मी स्वर्गाला गेलो ” असे पाहणारा पुरुष, जसा अकस्मात जागा होऊन आश्चर्यचकित व्हावा, त्याप्रमाणे अर्जुन आश्चर्यचकित झाला.
656-11
नातरी गुरुकृपेसवे । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवे । स्फुरे तत्त्व तेवी पांडवे । श्रीमूर्ति देखिली ॥656॥
किंवा गुरुची कृपा झाल्याबरोबर, ज्याप्रमाणे संपूर्ण प्रपंचज्ञान मावळून आत्मतत्व अनुभवाला येते, त्याप्रमाणे अर्जुनाने विश्वरूपानंतर भगवंताची सगुण साकार श्रीकृष्णमूर्ती पाहिली.
657-11
तया पांडवा ऐसे चित्ती । आड विश्वरूपाची जवनिका होती । ते फिटोनि गेली परौती । हे भले जाहले ॥657॥
ती श्रीकृष्णमूर्ती पाहिल्यावर, अर्जुनाच्या मनात असे वाटले की, श्रीकृष्ण व माझ्यामध्ये जो विश्वरूपाचा पडदा आड होता, तो बाजूला सारला गेला, हे फार बरे झाले.
658-11
काय काळाते जिणोनि आला । की महावातु मागा सांडिला । आपुलिया बाही उतरला । सातही सिंधु ॥658॥
जणू काय काळाला जिंकून परत आला किंवा भयंकर सोसाट्याच्या वार्याला मागे हटविले अथवा सातही समुद्र आपल्या हाताने तरून जाऊन काठास लागला.
659-11
ऐसा संतोष बहु चित्ते । घेइजत असे पंडुसुते । विश्वरूपापाठी कृष्णाते । देखोनिया ॥659॥
अशा प्रकारचा अत्यंत संतोष, विश्वरूपानंतर श्रीकृष्णमूर्तीला पाहून अर्जुनाच्या मनाला वाटला.
660-11
मग सूर्याचिया अस्तमानी । मागुती तारा उगवती गगनी । तैसी देखो लागला अवनी । लोकासहित ॥660॥
मग सूर्य अस्तास गेला असता, ज्याप्रमाणे आकाशांत नक्षत्रे चमकू लागतात, त्याप्रमाणे श्रीकृष्णमूर्तीबरोबर अर्जुन व सर्व भूतसृष्टीसहित पृथ्वी पाहू लागला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
661-11
पाहे तव तेचि कुरुक्षेत्र । तैसेचि देखे दोही भागी गोत्र । वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवरी ॥661॥
अर्जुन पाहतो तो तेच पूर्वीचे कुरुक्षेत्र, तसेच दोन्ही दळांना गोत्रज उभे असून, दळांतील वीर परस्परावर शस्त्रास्त्रांच्या समुदायांचा वर्षाव करीत आहेत.
662-11
तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु देखे निवांतु । धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळी ॥662॥
आणि त्या बाणांच्या मांडवात रथ स्थिर असून, रथाच्या धुरेवर भगवान श्रीकृष्ण बसले आहेत आणि आपण त्याच्या खाली बसलो आहोत, असे तो पाहू लागला.
अर्जुन उवाच ।
दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन ।
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृउतिं गतः॥11. 51॥
अर्थ अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे तुझे सौम्य मानवरूप पाहून आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत् सावध झालो आहे. ॥11-51॥
663-11
एवं मागील जैसे तैसे । तेणे देखिले वीरविलासे । मग म्हणे जियालो ऐसे । जाहले आता ॥663॥
याप्रमाणे पराक्रमाचा खेळ करणार्या अर्जुनाने जसे मागितले, तसे पाहिले व मग मनात म्हणाला आता माझ्या कुडीत प्राण आला असे वाटते.
664-11
बुद्धीते सांडोनि ज्ञान । भेणे वळघले रान । अहंकारेसी मन । देशोधडी जाहले ॥664॥
आतापर्यंत माझे ज्ञान बुध्दीला सोडून विश्वरूपाच्या भीतीने जंगलात पळाले होते व अहंकारासहित मन देशोधडीस लागले होते.
665-11
इंद्रिये प्रवृत्ती भुलली । वाचा प्राणा चुकली । ऐसे आपांपरी होती जाली । शरीरग्रामी ॥665॥
इंद्रियांना कर्म करण्याचे भान राहिले नाही, वाचेचे ठिकाणी शब्द उच्चारण्याची शक्ती राहिली नाही, अशी शरीराचे ठिकाणी सर्वाची दुर्दशा झाली होती.
666-11
तिये आघवीचि मागुती । जिवंत भेटली प्रकृती । आता जिताणे श्रीमूर्ती । जाहले मिया ॥666॥
अर्जुन मनात म्हणतो, या श्रीमूर्तीच्या योगाने ही संपूर्ण इंद्रिये पुनः जिवंत प्रकृतीला भेटली म्हणजे सजीव झाली आणि या मूर्तीमुळेच आता मी वांचलो असे मला वाटत आहे.
667-11
ऐसे सुख जीवी घेतले । मग श्रीकृष्णाते म्हणितले । मिया तुमचे रूप देखिले । मानुष हे ॥667॥
याप्रमाणे अर्जुन मनात अत्यंत समाधान पावून, मग श्रीकृष्णाला म्हणाला, मी तुमचे मनुष्यासारखे असलेले हे रूप पाहिले.
668-11
हे रूप दाखवणे देवराया । की मज अपत्या चुकलिया । बुझावोनि तुवा माया । स्तनपान दिधले ॥668 ।
देवराया ! मला तुम्ही हे रूप दाखविणे म्हणजे आईशी चुकामूक झालेल्या मज लेकराचे सांत्वन करून आईने स्तनपानच दिले आहे.
669-11
जी विश्वरूपाचिया सागरी । होतो तरंग मवित वांवेवरी । तो इये निजमूर्तीच्या तीरी । निगालो आता ॥669॥
जी देवा ! जो मी या विश्वरूप सागरात दोन हातांनी लाटा मोजीत होतो, तो आता मी श्रीकृष्णमूर्तीरूपी तीरास लागलो आहे.
670-11
आइके द्वारकापुरसुहाडा । मज सुकतिया जी झाडा । हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला ॥670॥
हे द्वारकापुरातील मित्रा ! ऐक. मला तू या रूपाने पुनः भेट दिलीस, ती भेट नसून, सुकू लागलेल्या मज झाडावर मेघांचा वर्षाव केलास.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
671-11
जी सावियाची तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला । आता जिणयाचा जाहला । भरवसा मज । 671॥
खरोखर तृषेने पीडलेल्या मला, कृष्णमूर्तीचे दर्शन झाले म्हणजे जणू अमृताच्या समुद्राचीच प्राप्ती झाली आहे. आणि आता जगण्याचा भरवसा वाटू लागला आहे.
672-11
माझिया हृदयरंगणी । होताहे हरिखलतांची लावणी । सुखेसी बुझावणी । जाहली मज ॥672॥
माझ्या ह्रदयदेशात हर्षरूपी वेली लावल्या जात असून आता माझी व सुखाची फारकत नाहीशी होऊन ऐक्य झाले आहे. (ज्याप्रमाणे झाडाची फांदी वाकविता वाकविता काही कालाने ती, स्वाभाविक वाकल्याप्रमाणे होऊन राहते किंवा संसारात सर्व प्राण्यांचे, आपल्या अपत्याविषयी जसे स्वाभाविक प्रेम असते, तेथे प्रेमकरणरूप क्रिया करावी लागत नाही, त्याप्रमाणेच, प्रेमळ भक्तांचे, आपल्या सगुण भगवंताचे ठिकाणीही असलेले प्रेम स्वाभाविक होऊन जाते. तेथेही प्रेम करण्याची क्रिया राहत नाही, असा भक्तांचा अनुभव असतो, हेच या ओव्यातून दाखविले आहे. श्रीज्ञानेश्वर माऊलींनी पुढे अठराव्या अध्यायात ” तैसी क्रिया किर न साहे । परी अद्वैती भक्ति आहे । हे अनुभवाचि जोगे नोहे । बोला ऐसे ॥या ओवीने हाच भाव दाखविला आहे. ” )
श्रीभगवानुवाच
। सुदुदर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम ।
देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शकाङ्क्षिणः॥11-52॥
अर्थ श्रीकृष्ण म्हणाले, महत्प्रयासाने दिसण्याला कठिण असे जे माझे हे रूप तू पाहिलेस, त्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी देव देखील उत्सुक आहेत. ॥11-52॥
विश्वरूप दुर्लभ
673-11
यया पार्थाचिया बोलासवे । हे काय म्हणितले देवे । तुवा प्रेम ठेवूनि यावे । विश्वरूपी की ॥673॥
याप्रमाणे अर्जुन बोलला असता, देव म्हणाले, बा अर्जुना ! हे काय बोलतोस ? तू माझ्या विश्वरूपाचे ठिकाणी प्रेम ठेवून ये.
674-11
मग इये श्रीमूर्ती । भेटावे सडिया आयती । ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि मा ॥674॥
आणि मग तू एकट्याने म्हणजे नुसत्या देहाने या माझ्या श्रीकृष्णमूर्तीला भेटावे, ही जी मी तुला शिकवण दिली, ती तू सुभद्रापती अर्जुना ! विसरलास ना.
675-11
अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरूही होय साना । ऐसा आथी मना । चुकीचा भावो ॥675॥
हे आंधळ्या अर्जुना ! अनायासे प्राप्त झालेल्या सुवर्णमेरूचाही विशेष आदर वाटत नाही, असा हा मनाचा विपरीत स्वभाव आहे.
676-11
तरी विश्वात्मक रूपडे । जे दाविले आम्ही तुजपुढे । ते शंभूही परि न जोडे । तपे करिता ॥676॥
पण आम्ही तुझ्यापुढे आपले जे विश्वव्यापकरूप दाखविले, ते कितीही तप करून शंकराला देखील प्राप्त होत नाही
677-11
आणि अष्टांगादिसंकटी । योगी शिणताति किरीटी । परिअवसरु नाही भेटी । जयाचिये ॥677॥
आणि अत्यंत श्रमदायक अशा योगाच्या यमनियमादि अष्टांगाचा अभ्यास करताना योगी शिणतात; पण त्यांनाही ज्या विश्वरूपाच्या भेटीचा योग येत नाही.
678-11
ते विश्वरूप एकादे वेळ । कैसेनि देखो अळुमाळ । ऐसे स्मरता काळ । जातसे देवा ॥678॥
ते विश्वरूप एखादे वेळी एवढेसे तरी कसे दिसेल, असे चिंतन करिता करिताच देवांचेही आयुष्य जाते.
679-11
आशेचिये अंजुळी । ठेऊनि हृदयाचिया निडळी । चातक निराळी । लागले जैसे ॥679॥
जसे ह्रदयाच्या कपाळावर आशेची अंजुली ठेऊन, चातक पक्षी आकाशाकडे सारखी दृष्टी देऊन राहतात,
680-11
तैसे उत्कंठा निर्भर । होऊनिया सुरवर । घोकीत आठही पाहार । भेटी जयाची ॥680॥
त्याप्रमाणे अत्यंत उत्कंठतेने देव, ज्याची भेट व्हावी म्हणून आठही प्रहर चिंतन करीत असतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
681-11
परि विश्वरूपासारिखे । स्वप्नीही कोण्ही न देखे । ते प्रत्यक्ष तुवा सुखे । देखिले हे ॥681॥
पण विश्वरूपासारखे कोणाच्या स्वप्नातही पाहण्यात येत नाही. ते विश्वरूप तू अनायासे प्रत्यक्ष पाहिलेस.
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।
शक्यं एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥11-53॥
अर्थ ज्याप्रकारे तू मला पाहिलेस, त्या प्रकारे वेदपठनाने, तपाने, दानाने अथवा यज्ञाने देखील मी कोणाला दिसणे शक्य नाही
682-11
पै उपायासि वाटा । न वाहती एथ सुभटा । साहीसहित वोहटा । वाहिला वेदी ॥682॥
हे उत्तम योद्ध्या ! येथे येण्याकरिता कर्मरूप साधनांना मार्ग नाही, सहाही शास्त्रांसह वेदांनी माघार घेतली.
683-11
मज विश्वरूपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा । तपांचियाही संभारा । नव्हेचि लागु ॥683॥
हे धनुर्धारी अर्जुना ! माझ्या विश्वरूपाकडे येण्याकरिता नानाप्रकारच्या तपांच्या समुदायांचाही लाग नाही.
684-11
आणि दानादि कीर कानडे । मी यज्ञीही तैसा न सांपडे । जैसेनि का सुरवाडे । देखिला तुवा ॥684॥
आणि ज्याप्रमाणे तू विश्वरूपाला उत्तम रीतीने पाहिलेस, तसे ते विश्वरूप दानादिकांनी खरोखर प्राप्त होणे कठीण असून, तसा मी यज्ञादिकांनीही प्राप्त होत नाही.
685-11
तैसा मी एकीचि परि । आंतुडे गा अवधारी । जरी भक्ति येऊनि वरी । चित्ताते गा ॥685॥
माझ्या प्रेमभक्तीने चित्ताला वरले – म्हणजे माझी प्रेमभक्ती चित्ताला उत्पन्न झाली – तर मात्र या एकाच गोष्टीने माझ्या या रूपाची प्राप्ती होते.
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥11. 54॥
अर्थ पण हे शत्रुनाशना अर्जुना, अशा स्वरूपाचा जो मी त्या मला अनन्य भक्तियोगाने जाणणे, पहाणे आणि मत्स्वरूपाने माझ्यामधे लीन होणे शक्य आहे. ॥11-54
686-11
परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी । धरावाचूनि अनारिसी । गतीचि नेणे ॥686॥
पण ती भक्ती अशी आहे, ज्याप्रमाणे पावसाच्या वर्षावाला पृथ्वीवाचून दुसरी गतीच ठाऊक नसते.
687-11
का सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्राते गिंवसिती । गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ॥687॥
ज्याप्रमाणे जलसंपत्ती घेऊन, गंगा अनन्यगतिक होऊन समुद्राला मिळते व मिळाल्यानंतरही मिळतच राहते.
688-11
तैसे सर्वभावसंभारे । न धरत प्रेम एकसरे । मजमाजी संचरे । मीचि होऊनि ॥688॥
त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावून व सर्व प्रेमसंबंधाचा समुदाय घेऊन, खंड न पडता, माझे ठिकाणी एकसारखे प्रेम होत राहते.
689-11
आणि तेवीचि मी ऐसा । थडिये माझारी सरिसा । क्षीराब्धि का जैसा । क्षीराचाचि ॥689॥
आणि त्याचप्रमाणे मीही असा आहे की, जसा क्षीरसागर काठाशी व मध्ये एकसारखा दुधाचाच असतो.
690-11
तैसे मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरी । भजनासि का दुसरी । परीचि नाही ॥690॥
तसेच मजपासून मुंगीपर्यंत किंबहुना संपूर्ण चराचर विश्वात, भजण्याकरिता – म्हणजे प्रेम करण्याकरिता माझ्यावाचून निराळी वस्तूच नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
691-11
तयाचि क्षणासवे । एवंविध मी जाणवे । जाणितला तरी स्वभावे । दृष्टही होय ॥691॥
ज्याक्षणी, असे माझे प्रेम जडते, त्याक्षणीच मी याप्रमाणे विश्वव्यापक आहे, असा जाणला जातो आणि जाणला गेलो की, सहजच विश्वरूपाने प्रत्यक्ष होतो.
692-11
मग इंधनी अग्नि उद्दीपे । आणि इंधन हे भाष हारपे । ते अग्निचि होऊनि आरोपे । मूर्त जेवी ॥692॥
मग लाकडाचे ठिकाणी अग्नी प्रगट झाला असता, ‘लाकूड’ हा शब्द नाहीसा होतो व ते लाकूड मूर्तिमंत अग्नीच होते.
693-11
का उदय न कीजे तेजाकारे । तव गगनचि होऊनि असे आंधारे । मग उदईलिया एकसरे । प्रकाशु होय ॥693॥
किंवा जोपर्यंत सूर्यच प्रकाशरूपाने आपला उदय करीत नाही, तोपर्यंत आकाशच काळोखरुप होऊन राहते आणि सूर्य प्रकाशल्याबरोबर, मग ते आकाश एकसारखे प्रकाशच होऊन राहते.
694-11
तैसे माझिये साक्षात्कारी । सरे अहंकाराची वारी । अहंकारलोपी अवधारी । द्वैत जाय ॥694॥
त्याप्रमाणे (माझ्या प्रेमभक्तीने) माझ्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार झाला असता, अहंकारावर येणे समूळ नाहीसे होते आणि अहंकार नाहीसा झाला की, द्वैत मुळीच भासत नाही.
695-11
मग मी तो हे आघवे । एक मीचि आथी स्वभावे । किंबहुना सामावे । समरसे तो ॥695॥
मग ‘मी’ व ‘तो’ हे सर्व स्वभावतः मीच एक होऊन राहतो. इतकेच नव्हे तर, तो माझे ठिकाणी समरस ऐक्य पावतो.
मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः॥
निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥11. 55॥
अर्थ हे पांडवा, मत्प्रीत्यर्थ कर्म करणारा, मीच ज्याचे प्राप्तव्य आहे असा माझा भक्त संसारसंगररहित, सर्व भूतांचे ठिकाणी मित्रभाव असलेला, असा जो पुरुष असेल तो मजप्रत येतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नामैकादशोऽध्यायः ॥11॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विश्वरूपदर्शनयोग नावाचा हा अकरावा अध्याय समाप्त झाला. ॥11॥
696-11
जो मजचि एकालागी । कर्मे वाहातसे आंगी । जया मीवाचोनि जगी । गोमटे नाही ॥696॥
जो केवळ एका माझ्याकरिताच शरीरादिकांनी होणारी कर्मे करीत असतो, ज्याला माझ्यावाचून जगात काहीच गोड वाटत नाही किंवा आवडत नाही.
697-11
दृष्टादृष्ट सकळ । जयाचे मीचि केवळ । जेणे जिणयाचे फळ । मजचि नाम ठेविले ॥697॥
ज्याचे जिवंतपणीचे व मरणानंतरचे प्राप्तव्य केवळ मीच एक आहे आणि माझी प्राप्ती होणे, हेच ज्याला जीविताचे फळ आहे असे वाटते. ]
698-11
मग भूते हे भा ष विसरला । जे दिठी मीचि आहे सूदला । म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥698॥
अशा माझ्या प्रेमामुळे जो माझ्याहून दुसरे प्राणी आहेत ही भाषाच विसरला, आपल्या दृष्टीत ज्याने मलाच भरून ठेवले, म्हणून ज्याला कोणी वैरीच उरला नाही आणि जो सर्वत्र माझेच भजन करतो.
699-11
ऐसा जो भक्तु होये । तयाचे त्रिधातुक हे जै जाये । तै मीचि हौनि ठाये । पांडवा गा ॥699॥
असा जो माझा भक्त आहे, त्याचे हे वातपित्तकफात्मक शरीर नाहीसे झाले असता, बा अर्जुना ! तो मीच होऊन राहतो. (पंचभौतिक देह हा भ्रांतिजन्य असून, दृष्टिसृष्टिवादानुसार त्याचे ज्ञान होते तोपर्यंतच त्याचे अस्तित्व असते आणि त्याचा विसर पडला की त्याचे अस्तित्व नाहीसे होते. भगवंताच्या निःसीम प्रेमामुळे भक्तांना देहाचा विसर पडतो व ते भगवंताशी पूर्ण ऐक्य पावतात; पण अज्ञानी लोकांना त्यांचा देह दिसतो तोपर्यंत, त्यांच्या ठिकाणी देव व भक्त असा भेद दिसून येतो, तोही त्याचे शरीर पडल्यानंतर नाहीसा होऊन ते केवळ भगवत्स्वरूपच होऊन राहतात. )
700-11
ऐसे जगदुदरदोंदिले । तेणे करुणारसरसाळे । संजयो म्हणे बोलिले । श्रीकृष्णदेवे ॥700॥
जगत् साठविल्यामुळे पोट मोठे असलेले व करुणारसाने रसाळ असलेले श्रीकृष्णदेव याप्रमाणे बोलले, असे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
701-11
ययावरी तो पंडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु । आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगी ॥701॥
यानंतर तो पांडूचा कुमार अर्जुन आनंदसंपदेने संपन्न झाला व तोच एकटा जगामध्ये श्रीकृष्णचरणाची थोरवी जाणणारा चतुर होता. (जगाचे उत्पत्तिस्थितीलयरूप तटस्थलक्षणात्मक भगवान श्रीकृष्ण असून, ज्ञानरूप स्वरूपलक्षणात्मकही श्रीकृष्णरूपच आहे; म्हणून श्रीकृष्णाची दोन्ही रुपे पूर्णब्रह्मच आहेत आणि बीजवृक्षाप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप व विश्वरूप यांचा संबंध असून, दोघात, स्वरूपाचे दृष्टीने काही फरक नसला तरी, बाहेर स्वाभाविक व निःसीम आत्मप्रेमसुखाचा लाभ, एका श्रीकृष्ण स्वरूपाचे ठिकाणीच होतो; विश्वरूपाचे ठिकाणी होत नाही. अर्थात विश्वरूपापेक्षा तेच अधिक प्रिय होय, असा श्रीकृष्णाच्या चरणाचा महिमा, प्रत्यक्ष अनुभविण्याचे चातुर्य, अर्जुनाचे ठिकाणीच माऊलींना दिसले; म्हणून माऊलींनी अर्जुनाला ” श्रीकृष्णचरणचतुर ” हे विशेषण दिले. )
702-11
तेणे देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्ती । तव विश्वरूपाहूनि कृष्णाकृती । देखिला लाभु ॥702॥
त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तात चांगल्या न्याहाळून पाहिल्या तेव्हा त्याला विश्वरूपापेक्षा सगुण श्रीकृष्णमूर्तीचेच ठिकाणी सुखाचा विशेष लाभ दिसून आला.
703-11
परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवे । जे व्यापकाहूनि नव्हे । एकदेशी ॥703॥
पण व्यापक विश्वरूपाहून एकदेशी श्रीकृष्णस्वरूप अधिक लाभदायक किंवा श्रेष्ठ असू शकत नाही, असे म्हणून भगवंतांनी त्याच्या या अनुभवाला मान्यता दिली नाही.
704-11
हेचि समर्थावयालागी । एक दोन चांगी । उपपत्ती शारङ्गी । दाविता जाहला ॥704॥
आणि आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ भगवंतांनी एक दोन उपपत्ती किंवा दृष्टान्तही अर्जुनाला सांगितले.
705-11
तिया ऐकोनि सुभद्राकांतु । चित्ती आहे म्हणतु । तरि होय बरवे दोन्ही आंतु । ते पुढती पुसो ॥705॥
सुभद्रापती अर्जुन, त्या उपपत्ती ऐकून मनात म्हणू लागला की, दोन्ही मूर्तीमध्ये चांगली लाभदायक कोणती, हे आपण भगवंताला पुढे विचारू.
706-11
ऐसा आलोचु करूनि जीवी । आता पुसती वोज बरवी । आदरील ते परिसावी । पुढे कथा ॥706॥
असा मनात विचार करून आता तो श्रीगुरुला प्रश्न विचारण्याची जी सुंदर पध्दती स्विकारील, ती कथा पुढे ऐका.
707-11
प्रांजळ ओवीप्रबंधे । गोष्टी सांगिजेल विनोदे । ते परिसा आनंदे । ज्ञानदेवो म्हणे ॥707॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीनिवृत्तिनाथांच्या चरणप्रसादाने, सरळ ओवीप्रबंधांत ती गोष्ट मी सहज लीलेने सांगणार आहे, ती ऐका.
708-11
भरोनि सद्भावाची अंजुळी । मिया वोंवियाफुले मोकळी । अर्पिली अंघ्रियुगुली । विश्वरूपाच्या ॥708॥
ओवीरूपी मोकळी फुले, मी प्रेमभावाच्या ओंजळीमध्ये भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायावर अर्पण केली.
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विश्वरूपदर्शनयोगोनाम एकदशोऽध्यायः ॥11॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 55 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 708 ॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम
सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक


















