शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय १ ला अर्जुनविषादयोगः

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

सूची :- शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी

शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 1: Arjuna Vishada Yoga:

Sartha Dnyaneshwari Adhyay 1 Arjunvishadyog
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः
एकून श्लोक : 47 धृतराष्ट्राचे श्लोक : 1 संजयाचे, श्लोक
अर्जुनाचे श्लोक: भ. श्रीकृष्णाचे श्लोक
एकून ओव्या : 275
अध्याय पहिला
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय १ ला अर्जुनविषादयोगः

1-1
ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥1.1॥
आद्या,=जेथून सर्व जगत उत्पत्ती झाली ते तत्व. वेद प्रतिपाद्या = वेदांनी प्रतिपादन केलेले. स्वसंवेद्या,=स्वत: स्वत;ला जाणणारे.
(आत्मरूप-वंदन) अनादीसिद्ध वेदांनी वर्णन केलेल्या, ज्याच्या त्याच्या स्वतः प्रत्येयास येणाऱ्या, विश्वस्वरूप निर्गुण आत्मरूपा, तुझा जयजयकार करून तुला नमस्कार करत आहे. ॥1-1॥
2-1
देवा तूचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥1.2॥
सकालार्थमतिप्रकाशु= सकल अर्थ आपल्या मतीत (बुद्धीत) प्रकाशित करणारे. अवधारिजो=ऐका
(ओंकार रूप गणेश वंदन) हे देवा! सर्व विश्वाच्या बुद्धीला प्रकाश देणारा जो गणेश, तो तूच आहेस. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात, तो गणेश कसा आहे ते अवधानपूर्वक ऐक. ॥1-2॥
3-1
हे शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥1.3॥
शब्दब्रह्म=वेद. अशेष=संपूर्ण. सुवेष=सुंदर. वर्णवपु=वर्ण(शब्द)रुपी देह.
संपूर्ण वेद हीच जणू काही पोषाख केलेली गणेशाची मूर्ती होय आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून दिसते आहे. ॥1-3॥
4-1
स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥1.4॥
मन्वादिकांच्या स्मुर्ती हे त्याचे अवयव आहते. ते अवयव या स्मुर्तीतील अर्थ-सौंदर्याने जणू लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. ॥1-4॥
5-1
अष्टादश पुराणे । तीचि मणिभूषणे । पदपद्धति खेवणे । प्रमेयरत्‍नांची ॥1.5॥
अठरा पुराणे हे गणपतीच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यामध्ये सांगितलेली ही रत्ने; आणि शब्दांची छंदयुक्त रचना ही त्यांची कोंदणे आहेत ॥1-5॥
6-1
पदबंध नागर । तेचि रंगाथिले अंबर । जेथ साहित्य वाणे सपूर । उजाळाचे ॥1.6॥
लालित्यपूर्ण पदरचना हेच उत्कृष्ट रंगाने रंगविलेले वस्त्र आहे. शब्द-अलंकार आणि अर्थ-अलंकार हे त्या वस्रवरील तेज:पुंज दिसणारे जरीचे तलम तंतू आहेत. ॥1-6॥
7-1
देखा काव्य नाटका । जे निर्धारिता सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥1.7॥
काव्य आणि नाटक यांचा कौतुकाने विचार केला आसता, त्या गणपतीच्या पायातील रूणझुंणाऱ्या छोट्या-छोटया घागऱ्या आहेत अर्थ हा त्या घागऱ्यांना बसविलेल्या घुंगराचा मंजूळ असा ध्वनी आहे. ॥1-7॥
8-1
नाना प्रमेयांची परी । निपुणपणे पाहता कुसरी । दिसती उचित पदे माझारी । रत्‍ने भली ॥1.8॥
व्यास,वाल्मिकी,भरतमुनी यांच्या काव्य नाटकातील विविध सिद्धांताच्या शब्दांचा एकाग्रतेने अभ्यास केला, तर त्यात कवीचे अलौकिक कौशल्य दिसून येते. अशी ही अनमोल शब्द-घागऱ्यातील उत्तमोत्तम रत्ने आहेत ॥1-8॥
9-1
तेथ व्यासादिकांच्या मती । तेचि मेखळा मिरवती । चोखाळपणे झळकती । पल्लवसडका ॥1.9॥
महर्षी व्यासादिकांची बुद्धी ही गणपतीची मेखला म्हणजे कटिभूषण होय. त्याला लोंबत असलेल्या मोत्यांच्या पदरातील घोष हे त्या बुद्धीतील शुद्धत्व सात्विकपणे झळकत आहे. ॥1-9 ॥
10-1
देखा षड्दर्शने म्हणिपती । तेची भुजांची आकृति । म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधे हाती ॥1.10॥
गणपतीचे सहा हात ही सहा शास्त्रे होत; म्हणून त्यातील विविध प्रकारचा अभिप्राय ही त्या त्या हातातील वेगवेगळी शस्त्रे होत. ॥1-10 ॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सूची

11-1
तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥1.11॥
न्याय दर्शनातील सोळा पदार्थांचे विश्लेषण करणारा तर्क म्हणजे गणपतीच्या हातातील परशू होय. वैशेषिक दर्शनातील सात पदार्थांचा सिद्धांतभेद हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे आणि उत्तरमीमांसा दर्शनातील ब्रम्हस्वरूप सिद्धांत हा गणपतीच्या हातातील अमृतमधुर मोदक होय. ॥1-11॥
12-1
एके हाती दंतु । जो स्वभावता खंडितु । तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकाचा ॥1.12॥
वार्तिककरांनी सांगितलेले आणि स्वभावतःच खंडीत झालेले जी बौद्ध मत आहे, ते एका हातात असणाऱ्या खंडित दाताच्या ठिकाणी शोभते. ॥1-12॥
13-1
मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥1.13॥
सत्कारवाद हा गणपतीचा वर देणारा कामलासमान हात होय. हा धर्माची सिद्धी करतो आणि हा अभय देणारा हात आहे. ॥1-13॥
14-1
देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥1.14॥
गणपतीच्या ठिकाणी ब्रम्हानंद ही सरळ, निर्मळ आणि चांगले व वाईट याची निवड करण्यास समर्थ अशी सोंड आहे. ॥1-14॥
15-1
तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु । देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥1.15॥
गुरू-शिष्याचा हा सुखसवांद म्हणजे गणपतीच्या मुखतील दात असून ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्माण होणारी समता हा त्या दातांचा पांढरा रंग होय. ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म असे नेत्र होत. ॥1-15॥
16-1
मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानी । बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥1.16॥
पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हाच त्या गणपतीच्या कानांच्या ठिकाणी असून बोध हे त्याचे मदरूपी अमृत मुनिरूपी भ्रमर सेवन करतात, असे मला वाटते. ॥1-16॥
17-1
प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसेपणे एकवटत इभ- । मस्तकावरी ॥1.17॥
वेदशास्त्र पुराणात सिद्धांतरुपाने संगतलेली तत्वे ही गणपतीच्या अंगावरील तेजयुक्त पोवळी होत. द्वैत आणि अद्वैत मते ही मस्तकावरील गंडस्थळे असून सारखे पणाने ती तेथे एकत्र झाली आहेत. ॥
18-1
उपरि दशोपनिषदे । जिये उदारे ज्ञानमकरंदे । तिये कुसुमे मुगुटी सुगंधे । शोभती भली ॥1.18॥
ज्ञानरूपी मकरंद ज्या मध्ये परिपूर्ण भरलेला आहे, अशी ईशावास्य इत्यादी दहा उपनिषदे ही जणू सुगंधी फुले असून ती गणपतीच्या मुकुटावर उत्तम तऱ्हेने शोभून दिसत आहेत. ॥
19-1
अकार चरण युगल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारे ॥1.19॥
ओंकाराची पहिली अकारमात्रा हे गणपतीचे दोन्ही पाय आहेत. दुसरी उकरमात्रा हे त्याचे मोठे पोट आहे. तिसरीमात्रा हा त्याचा मोठ्या वाटोळ्या मस्तकाच्या आकार आहे. ॥
20-1
हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळले । ते मिया श्रीगुरुकृपा नमिले । आदिबीज ॥1.20॥
अकार, उकार, मकार या तिन्ही मात्रा एकत्रित झाल्या, म्हणजे त्या ओंकारात संपूर्ण वेद संक्षेपाने समाविष्ट होत असतो. त्या बिजरूप ओंकाररूप गणपती देवरायास मी सद्गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने नमस्कार करतो. ॥

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-1
आता अभिनव वाग्विलासिनी । ते चातुर्यार्थकलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मिया ॥1.21॥
(सरस्वती-वंदन) या नंतर नित्यनूतन प्रतिभा आणि वाणीच्या रुपाने क्रीडा करणारे चातुर्य, अर्थ व कला यांची कामिनी, विविध रस आणि अलंकार युक्त मधुर भाषेद्वारा संपूर्ण विश्वाला मोहित करणारी अशी जी शारदा, तिला मी विनम्र भावाने नमस्कार करतो. ॥1-21॥
22-1
मज हृदयी सद्‍गुरु । जेणे तारिलो हा संसारपूरु । म्हणौनि विशेषे अत्यादरु । विवेकावरी ॥1.22॥
(सद्गुरु-स्तवन) श्री सद्गुरूंनी सांगितलेले ज्ञान मी माझ्या हृदयामध्ये साठविले; त्या मुळे मला भवसागर तरुण जाता आला. म्हणून अंतःकरणातील विवेकावर माझे आत्यंतिक प्रेम आहे. ॥1-22॥
23-1
जैसे डोळ्या अंजन भेटे । ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे । मग वास पाहिजे तेथ । प्रगटे महानिधी ॥1.23॥
ज्या प्रमाणे पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातले असता त्याची दृष्टी सर्वत्र पसरते आणि त्याला भूमीमध्ये असणाऱ्या संपत्तीचा ठसा दिसू लागतो. ॥1-23॥
24-1
का चिंतामणी जालिया हाती । सदा विजयवृत्ति मनोरथी । तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेवो म्हणे ॥1.24॥
मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात, त्या प्रमाणे सद्गुरु निवृत्तीनाथांच्या मूळे मी पूर्णकाम झालो आहे. माझ्या सर्व सदिच्छा पूर्ण झाल्या आहेत, असे ज्ञानदेव म्हणतात. ॥1-24॥
25-1
म्हणोनि जाणतेने गुरु भजिजे । तेणे कृतकार्य होईजे । जैसे मुळसिंचने सहजे । शाखापल्लव संतोषती ॥1-25॥
या साठी जाणकारांनी सद्गुरुवर परम श्रद्धा ठेवून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे, म्हणजे जीवन कृतकृत्य होईल. जसे, झाडाच्या मुळाला पाणी घातले असता फांद्या व पाने सहजच विकसित होतात. ॥1-25॥
26-1
का तीर्थे जिये त्रिभुवनी । तिये घडती समुद्रावगाहनी । ना तरी अमृतरसास्वादनी । रस सकळ ॥1.26॥
एका समुद्र स्नानामुळे त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत, त्या सर्वाचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते; किंवा एका अमृत रसाच्या सेवनाने जगातील सर्व रस सेवन केल्या प्रमाणे होते. ॥1-26॥
27-1
तैसा पुढतपुढती तोचि । मिया अभिवंदिला श्रीगुरुचि । जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥1.27॥
तसे एका सद्गुरूंना वंदन केले असता, सर्वाना वंदन केल्याचे पुण्य प्राप्त होते; म्हणून मी वारंवार सद्गुरूंना वंदन करतो, जे सद्गुरु मनातील सर्व सदिच्छा पूर्ण करतात. ॥1-27॥
28-1
आता अवधारा कथा गहन । जे सकळा कौतुका जन्मस्थान । की अभिनव उद्यान । विवेकतरूचे ॥1.28॥
आता सखोल विचारांची कथा श्रवण करा. ही कथा सर्वाच्या मनात कौतुक उत्पन्न करणारी आहे अथवा विवेकरूपी वृक्षाचे नाविन्यपूर्ण उद्यान आहे. ॥1-28॥
29-1
ना तरी सर्व सुखाचि आदि । जे प्रमेयमहानिधि । नाना नवरससुधाब्धि । परिपुर्ण हे ॥1.29॥
ही महाभारतातील गीता रुपी कथा सर्व मूळ कारण आहे. हे सर्व प्रमुख सिद्धांताचे भांडार आहे किंवा नवरसांनी परिपूर्ण भरलेला अमृताचा सागर आहे. ॥1-29॥
30-1
की परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ । शास्त्रजाता वसौट । अशेषांचे ॥1.30॥
किंवा महाभारताच्या रुपाने मोक्षच प्रगटलेला आहे. हे सर्व विद्यांचे मूळपीठ आहे. जगातील सर्व ज्ञानाचे आश्रयस्थान आहे. ॥1-30॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

31-1
ना तरी सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार । लावण्यरत्‍नभांडार । शारदेचे ॥1.31॥
महाभारत हे सर्व धर्माचे माहेर आहे, सज्जनांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा विषय आहे; आणि सरस्वतीच्या सौंदर्यरूपी रत्नांचे भांडार आहे. ॥1-31॥
32-1
नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती । आविष्करोनि महामती । व्यासाचिये ॥1.32॥
सरस्वती महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रगट होऊन विविध कथेच्या त्रैलोक्यात प्रसारित झाली.॥
33-1
म्हणौनि हा काव्यारावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो । एथूनि रसा झाला आवो । रसाळपणाचा ॥1.33॥
हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी महानतेची परिसीमा झाली आहे. या ग्रंथा पासून काव्यातील रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. ॥1-33॥
34-1
तेवीचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक । आणि महाबोधी कोवळीक । दुणावली ॥1.34॥
तसेच, या ग्रंथाचे आणखी महत्व श्रवण करा. महाभारतापासून शब्दरूप संपत्तीला शास्त्रीयता प्राप्त झाली आणि ब्रम्हज्ञानाच्या ठिकाणी कोवळिकता अधिकच वाढली. ॥1-34
35-1
एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले । आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ ॥1.35॥
या महाभारतात चातुर्य शहाणे झाले, सिद्धांताना अमृतमय गोडी प्राप्त झाली आणि सुखाचे ऐश्वर्य अधिकच पुष्ट झाले. ॥1-35
36-1
माधुर्यी मधुरता । श्रुंगारी सुरेखता । रूढपण उचिता । दिसे भले ॥1.36॥
माधुर्याला मधुरता, शृंगाराला सुरेखपणा आणि योग्य वस्तुंना श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम रीतीने शोभून दिसू लागल्या. ॥1-36
37-1
एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा । म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥1.37॥
यातील कथेपासून कलांना विशेष कौशल्य प्राप्त झाले. पुण्याचा प्रताप वाढू लागला. महाभारताच्या श्रावणाने जनमेजयाचे ब्रम्हहत्येचे दोष नाहीसे झाले. ॥1-37
38-1
आणि पाहता नावेक । रंगी सुरंगतेची आगळीक । गुणा सगुणपणाचे बिक । बहुवस एथ ॥1.38॥
सुक्षमबुद्धीने महाभारताचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की, विविध कलांतील गुण त्याने वाढले. या कथेमुळे सद्गुणांचे सामर्थ्य प्रगट झाले. ॥
39-1
भानुचेनि तेजे धवळले । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले । तैसे व्यासमति कवळिले । मिरवे विश्व ॥1.39॥
सूर्याच्या तेजाने त्रैलोक्य जसे उजळून निघते, त्या प्रमाणे महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीतून निर्माण झालेल्या या कथेमुळे सर्व जगावर ज्ञानाचा प्रकाश पसरला आणि ते शोभून दिसू लागले. ॥
40-1
का सुक्षेत्री बीज घातले । ते आपुलियापरी विस्तारले । तैसे भारती सुरवाडले । अर्थजात ॥1.40॥
उत्तम जमिनीत बी पेरले असता जसा त्याचा सहज विस्तार होत जातो, त्या प्रमाणे महाभारतात सर्व विषय शोभायमान झाले आहेत. ॥1-40
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सूची

41-1
ना तरी नगरांतरी वसिजे । तरी नागराचि होईजे । तैसे व्यासोक्तितेजे । धवळत सकळ ॥1.41॥
ज्याप्रमाणेनगरात राहिल्यावर मानवास शहाणपण प्राप्त होते, त्या प्रमाणे व्यासांच्या सात्विक वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानसंपन्न झाले. ॥1-41
42-1
की प्रथम वयसाकाळी । लावण्याची नव्हाळी । प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगी ॥1.42॥
तारुण्यात पदार्पण केल्यानंतर मुलीच्या अंगी सौंदर्याचा नवा बहर आलेला असतो आणि तो स्पष्टपणे दिसू लागतो. ॥1-42
ना तरी उद्यानी माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे । आदिलापासौनि अपाडे । जियापरी ॥1.43॥
43-1
वसंत ऋतूचे आगमन झाले, की बागेतील वनशोभा पूर्वी पेक्षा अधिकच बहरून येते; जणू काही सौंदर्याची खाणच उघडते. ॥1-43
44-1
नानाघनीभूत सुवर्ण । जैसे न्याहाळिता साधारण । मग अलंकारी बरवेपण । निवाडु दावी ॥1.44॥
लगडीच्या रुपात सोने पाहीले, तर त्याचे सौंदर्य सर्वसाधारण वाटते; परंतु त्या सोन्याच्या विविध कलाकुसरीचे दागिने बनविले, तर त्या सोन्याचे सौंदर्य विशेष रुपाने खुलून दिसते. ॥1-44
45-1
तैसे व्यासोक्ति अळंकारिले । आवडे ते बरवेपण पातले । ते जाणोनि काय आश्रयिले । इतिहासी ॥1.45॥
महर्षी व्यासांच्या तेजस्वी बुद्धीतून प्रगटलेल्या विषयामध्ये सत्य, शिव आणि सुंदरतेचे दर्शन होते, हे पाहून जगातील अनेक इतिहासकारांनी महाभारताचा आश्रय केला आहे. ॥1-45
46-1
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागी । सानीव धरूनि आंगी । पुराणे आख्यानरूपे जगी । भारता आली ॥1.46॥
आपणास मोठी प्रतिष्ठा लाभावी म्हणून स्वतःच्या अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यानरुपाने महाभारतात येऊन जगामध्ये प्रसिद्ध पावली. ॥1-46
47-1
म्हणौनि महाभारती नाही । ते नोहेचि लोकी तिही । येणे कारणे म्हणिपे पाही । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥1.47॥
म्हणूनच महाभारतामध्ये जे नाही, ते तिन्ही लोकांमध्ये नाही. महर्षी व्यासांच्या नंतर त्रैलोक्यात जे भाष्यकार झाले, त्यांनी महाभारतातील सिद्धांताचा अभ्यास केला. ‘व्यासोंच्छिष्ट जगतत्रय’ असे म्हणतात. ॥1-47
48-1
ऐसी जगी सुरस कथा । जे जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥1.48॥
अशी ही जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली आणि परमार्थाची जन्मभूमी असलेली महाभारताची कथा आहे. ही कथा जनमेजय राजाला वैंशपायन ऋषींनी सांगितली. ॥1-48
49-1
जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम । परम मंगलधाम । अवधारिजो ॥1.49॥
श्रोते हो ! ही कथा एकाग्रतेने श्रवण करा. हे महाभारत अद्वितीय,उत्तम,अतिपवित्र निरुपम आणि सर्व मांगल्याचे परम स्थान आहे. ॥1-49
50-1
आता भारती कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु । जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥1.50॥
महाभारत हे जणू काही कमळ असून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सुखसंवादाच्या रुपाने सांगितलेली गीता जणू काही त्यातील सुगंधी पराग आहे. ॥1-50

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

51-1
ना तरी शब्दब्रह्माब्धि । मथियेला व्यासबुद्धि । निवडिले निरवधि । नवनीत हे ॥1.51॥
महर्षी व्यासांनी आपल्या प्रखर बुध्दीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून महाभारतरूपी अनुपमेय नवनीत काढले॥1-51॥
52-1
मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलेंनि विवेके । पद आले परिपाके । आमोदासी ॥1.52॥
मग ते नवनीत ज्ञानरुप अग्नीच्या संबंधाने विवेकपूर्वक घडविले; आणि त्याचा उत्तम परिपाक होऊन त्या लोण्याचे सुगंधी साजूक तूप झाले, ते म्हणजे गीता होय. ॥1-52
53-1
जे अपेक्षिजे विरक्ती । सदा अनुभविजे संती । सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ ॥1.53॥
वैराग्यवान देखील या गीतेची इच्छा करतात. संतदेखील नेहमी या गीतेचा अनुभव घेतात. ‘तो परमात्मा मी आहे’ अशा अभेद भावात असणारे ब्रम्हनिष्टदेखील या गीतेत रममाण होतात. ॥1-53
54-1
जे आकर्णिजे भक्ती । जे आदिवंद्य त्रिजगती । ते भीष्मपर्वी संगती । म्हणितली कथा ॥1.54॥
भक्त जिचे परम श्रद्धेने श्रवण करतात, जी त्रैलोक्यात प्रथम वंदनीय आहे, जी भीष्मपर्वात प्रसंगाच्या अनुरोधाने सांगितली आहे. ॥1-54
55-1
जे भगवद्गीता म्हणिजे । जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे । जे सनकादिकी सेविजे । आदरेसी ॥1.55॥
ती ” भगवतगीता ” होय. ब्रम्हदेव आणि महादेव तिची स्तुती करतात, सनकादिक परम श्रद्धेने तिचे श्रवण, मनन, पठण करतात. ॥1-55
56-1
जैसे शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोवळे । ते वेचिती मने मवाळे । चकोरतलगे ॥1.56॥
शरद ऋतूतील चंद्रकलेत असलेले कोवळे अमृतकण चकोर पक्षांची पिल्ले जसे अतिशय मृदू मनाने वेचतात. ॥1-56
57-1
तियापरी श्रोता । अनुभवावी हे कथा । अतिहळुवारपण चित्ता । आणूनिया ॥1.57॥
त्या प्रमाणे श्रोत्यांने चित्त शुद्ध करून एकाग्रतेने, अत्यन्त हळुवार पणे भगवदगीतेचा अनुभव घ्यावा. ॥1-57
58-1
हे शब्देवीण संवादिजे । इंद्रिया नेणता भोगिजे । बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥1.58॥
शब्दांशिवाय या गीतेच्या अर्थाची मनातल्या मनात चर्चा करावी. इंद्रियांना नकळत याच्या अर्थाचा अनुभव घ्यावा. वक्ताच्या मुखातून शब्द प्रकट होण्यापूर्वीच त्यातील सिद्धांताशी एकरूप होऊन राहावे. ॥1-58
59-1
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये॥1.59॥
ज्या प्रमाणे भ्रमर कमलदलाला समजू न देता त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे. ॥1-59
60-1
का आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटता । हा अनुरागु भोगिता । कुमुदिनी जाणे ॥1.60॥
नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्रविकासी कुमुदनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला अलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. ॥1-60

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

61-1
ऐसेनि गंभीरपणे । स्थिरावलोनि अंतःकरणे । आथिला तोचि जाणे । मानू इये ॥1-61
त्या प्रमाणे शुद्ध, सात्विक आणि स्थिर चित्ताने जो संपन्न आहे, तोच गीतेतील अर्थ जाणू शकतो. असे आम्ही समजतो. ॥1-61
62-1
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिही कृपा करूनि संती । अवधान द्यावे ॥1.62॥
श्रोतेहो ! अर्जुनाच्या पंक्तीला बसून गीतेचा अर्थ श्रवण करण्यास जे योग्य आहेत, त्या संतांनी कृपा करून इकडे पूर्ण लक्ष द्यावे. ॥1-62
63-1
हे सलगी म्या म्हणितले । चरणा लागोनि विनविले । प्रभू सखोल हृदय आपुले । म्हणौनिया ॥1.63॥
महाराज ! आपले हृदय सखोल आहे; म्हणून मी लडिवाळपणे आपणास लक्ष द्या, अस म्हंटल. खरोखर ही माझी आज्ञा नाही; आपल्या चरणांना स्पर्श करून विनंती केली आहे. ॥1-63॥
64-1
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥1.64॥
ज्याप्रमाणे आपले मुल बोबडे बोलले, तरी त्याचा स्वभावतः अधिक संतोष आईवडिलांना होत असतो. ॥1-64॥
65-1
तैसा तुम्ही मी अंगिकारिला । सज्जनी आपुला म्हणितला । तरी उणे सहजे उपसाहला । प्रार्थू कायी ॥1.65॥
त्याप्रमाणे तुम्ही सज्जनांनी माझा अंगीकार करून मला आपले म्हंटले आहे. त्यामुळे माझ्यातील उणीवा सहन कराल. त्यासाठी मी स्वतंत्र प्रार्थना करावयास पाहिजे, असे नाही. ॥1-65॥
66-1
परी अपराधु तो आणिक आहे । जे मी गीतार्थु कवळु पाहे । ते अवधारा विनवू लाहे । म्हणौनिया ॥1.66॥
परंतु माझ्याकडून एक अपराध घडत आहे. मी गीतेचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे; म्हणून सांगितलेला अर्थ बरोबर आहे की नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती केली. ॥1-66॥
67-1
हे अनावर न विचारिता । वायाचि धिंवसा उपनला चित्ता । येर्‍हवी भानुतेजी काय खद्योता । शोभा आथी ॥1.67॥
गीतेचा अर्थ सांगणे फार कठीण कार्य आहे. याचा विचार न करता तो अर्थ स्पष्ट करण्यासाठी माझ्या चित्तात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले; परंतु सूर्याच्या प्रकाशात काजव्याची शोभा असते काय? ॥1-67॥
68-1
की टिटिभू चांचुवरी । माप सूये सागरी । मी नेणतु त्यापरी । प्रवर्ते येथ ॥1-68॥
एखाद्या टिटवीने समुद्राची अथांग खोली मोजण्याकरता चोच बुडेपर्यंत त्यात माप घालावे, त्याप्रमाणे मी जाणकार नसताना गीतेचा अर्थ प्रकट करण्यास प्रवृत्त झालो आहे. ॥1-68॥
69-1
आइका आकाश गिवसावे । तरी आणीक त्याहूनि थोर होआवे । म्हणौनि अपाडू हे आघवे । निर्धारिता ॥1-69॥
आकाशाला कवटाळायचे असेल, तर त्यापेक्षा विशाल व्हावे लागते. गीतेवर भाष्य करण्यासाठी प्रकांड पांडित्य हवे; म्हणून मी तर गीतेवर भाष्य करण्यास योग्य नाही, असे दिसते. ॥1-69॥
70-1
या गीतार्थाची थोरी । स्वये शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारौनि ॥1-70॥
(गीतेची थोरवी) एकदा भगवान शंकरांनी गीतेची थोरवी सांगितली. ते शब्द ऐकून पार्वतीला आश्चर्य वाटले व ती म्हणाली, आपण गीतेची विस्तारपूर्वक सांगा. ॥1-70॥

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

71-1
तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसे का स्वरूप तुझे । तैसे हे नित्य नूतन देखिजे । गीतातत्व ॥1.71॥
भगवान शंकर म्हणाले, गीतेचे महत्व मी पूर्णपणे जाणू शकत नाही. पार्वती ! तुझे स्वरूप जसे नित्यनूतन आहे, तसे गीतार्थ हा नित्यनूतन आहे. ॥1-71॥
72-1
हा वेदार्थ सागरु । जया निद्रिताचा घोरु । तो स्वये सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥1-72॥
ज्या सर्वेश्वराच्या योगनिद्रेतील घोरण्यापासून समुद्राप्रमाणे अगाध वेद निर्माण झाले, त्या जगदीश्वर श्रीकृष्णाने स्वतः जागृतीत गीतेच्या रुपाने वेदार्थाचे सार सांगितले. ॥1-72॥
73-1
ऐसे जे अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ अल्प मी मतिमंद । काई होये ॥1.73॥
असे हे गीताशास्त्र अगाध, गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होऊन जाते. मी तर लहान आहे, माझी बुद्धी अल्प आहे मी तरी कसे सांगणार?? ॥1-73॥
74-1
हे अपार कैसेनि कवळावे । महातेज कवणे धवळावे । गगन मुठी सुवावे । मशके केवी? ॥1.74॥
हे अमर्याद गीताशास्त्र मला कसे बरे आकलन होणार? महातेजाला कशाने बरे उजळावे? छोट्याश्या चिलटाने आकाश आपल्या मुठीत कसे बरे ठेवावे? ॥1-74॥
75-1
परी एथ असे एकु आधारु । तेणेचि बोले मी सधरु । जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥1.75॥
परंतु मला सद्गुरु निवृत्तीनाथांचा मोठा आधार आहे. ते मला अनुकूल आहेत; म्हणून मी हे धैर्य करत आहे, असे ज्ञानदेव म्हणतात. ॥1-75॥
76-1
येर्‍हवी तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु । तर्‍ही संतकृपादीपकु । सोज्वळु असे ॥1.76॥
एरव्ही तरी मी अज्ञानी आहे, माझ्याकडून भाष्य लिहिताना अविवेक होत आहे. तरीपण संतकृपेचा प्रकाशमान दीप प्रज्वलित आहे. ॥1-76॥
77-1
लोहाचे कनक होये । हे सामर्थ्य परिसीच आहे । की मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ॥1.77॥
लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य परिसात आहे. किंवा अमृताची प्राप्ती झाली की, मृतसुद्धा जिवंत होतो. ॥1-77॥
78-1
जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकयाहि आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कयी ॥1-78॥
सरस्वती देवता प्रसन्न झाली, तर मुक्यालाही भावमधुर वाचा फुटते. असा बदल होण्याविषयी वस्तूचे सामर्थ्य किंवा शक्ती कारण आहे, यात आश्यर्य ते काय आहे? ॥1-78॥
79-1
जयाते कामधेनु माये । तयासी अप्राप्य काही आहे । म्हणौनि मी प्रवर्तो लाहे । ग्रंथी इये ॥1-79॥
ज्याची आई कामधेनू आहे, त्याला या जगात दुर्लभ असे काही नाही; म्हणून मी या गीता ग्रंथावर भाष्य करण्यास प्रवृत्त झालो. ॥1-79॥
80-1
तरी न्यून ते पुरते । अधिक ते सरते । करूनि घेयावे हे तुमते । विनवितु असे ॥1-80॥
माझ्या या भाष्यामध्ये काही कमतरता असेल, तर ती पूर्ण करून घ्या आणि अधिक असेल, तर समजून घ्या, अशी तुम्हाला मी नम्र विनंती करत आहे. ॥1-80॥

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

81-1
आता देईजो अवधान । तुम्ही बोलविल्या मी बोलेन । जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥1-81॥
आता आपण भाष्या कडे लक्ष द्या. तुम्ही जसे मला बोलवाल, त्या प्रमाणे मी बोलेन. सूत्रधार ज्या प्रमाणे दोरी हलवीत असतो, तशी दोरीच्या आधीन असलेली कळसूत्री बाहुली नाचत असते. ॥1-81॥
82-1
तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरूपितु । ते आपुलियापरी अलंकारितु । भलतयापरी ॥1-82॥
त्याप्रमाणे मी साधूंच्या अनुग्रहित असून साधूंचा निरोप सांगणार आहे. त्यामुळे त्यांनी मला भाष्य करताना हवे तेवढे अलंकृत करावे. ॥1-82॥
83-1
तव श्रीगुरु म्हणती राही । हे तुज बोलावे नलगे काही । आता ग्रंथा चित्त देई । झडकरी वेगा ॥1-83॥
तेंव्हा सद्गुरु निवृत्तीनाथ म्हणले, ज्ञानदेवा ! आता विनवणीचे बोलणे थांबवावे आणि गीतेवर भाष्य करण्यास प्रारंभ करावा. ॥1-83॥
84-1
या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु । म्हणे परियसा मना अवकाशु । देऊनिया ॥1-84॥
सद्गुरूंची आज्ञा ऐकून निवृत्तीदास ज्ञानदेव यांना परम उल्हास झाला आणि ते म्हणाले, माझ्या मुखातून प्रकट होणारे शब्द आपण शांत मनाने श्रवण करावेत. ॥1-84॥

धृतराष्ट्र उवाच । 1.1
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥1.1॥

संदर्भित अन्वयार्थ
धृतराष्ट्र = धृतराष्ट्र, उवाच = म्हणाले, सञ्जय = हे संजया, धर्मक्षेत्रे = धर्मभूमी असणाऱ्या, कुरुक्षेत्रे = कुरुक्षेत्रावर, समवेताः = एकत्र जमलेल्या, युयुत्सवः = युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाः = माझ्या मुलांनी, च= आणि, एव = तसेच, पाण्डवाः = पांडूच्या मुलांनी, किम्‌ = काय, अकुर्वत = केले ॥1-1॥
अर्थ
धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? ॥1-1॥
85-1
तरी पुत्रस्नेहे मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु । म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रीची ॥1-85॥
पुत्रांच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र राजा हा संजयास म्हणाला, ” हे संजय ! कुरुक्षेत्रांवर काय घडत आहे, ती हकीकत मला सांग. ॥1-85॥
86-1
जे धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजे । जुंझाचेनि ॥1-86॥
ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे स्थान म्हणतात, तेथे पंडुचे पुत्र आणि माझे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले आहेत. ॥1-86॥
87-1
तरी तेचि येतुला अवसरी । काय किजत असे येरयेरी । ते झडकरी कथन करी । मजप्रती ॥1-87॥
तरी ते परस्परात एवढा वेळ काय करीत आहेत, हे मला लवकर सांग. ॥1-87॥
संजय उवाच ॥
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत ॥1.2॥
पश्यैता पाण्डुपुत्राणामाचार्य महती चमूम ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥1.3॥

संदर्भित अन्वयार्थ
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तदा = त्यावेळी, व्यूढम्‌ = व्यूहरचनेने युक्त, पाण्डवानीकम्‌ = पांडवाचे सैन्य, दृष्ट्वा = पाहून, तु = आणि, आचार्यम्‌ = द्रोणाचार्यांच्या, उपसङ्गम्य = जवळ जाऊन, राजा = राजा, दुर्योधनः = दुर्योधन, वचनम्‌ = असे वचन, अब्रवीत = बोलला ॥1-2॥
अर्थ
संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवाचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥1-2॥
88-1
तिये वेळी तो संजय बोले । म्हणे पांडव सैन्य उचलले । जैसे महाप्रळयी पसरले । कृतांतमुख ॥1-88॥
संजय म्हणाला तेव्हा संजय म्हणाला, ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळाने आपले विशाल तोंड उघडलेले असते, त्याप्रमाणे पांडवाचे सैन्य युद्धासाठी प्रक्षुब्ध झाले आहे. ॥1-88॥
89-1
तैसे ते घनदाट । उठावले एकवाट । जैसे उसळले काळकूट । धरी कवण ॥1-89॥
त्याप्रमाणे त्या घनदाट सैन्याने एकत्रितपणाने उठाव केला आहे. काळकूट नावाचे विष उचळले, तर त्याला कोण बरे शांत करू शकणार? ॥1-89॥
90-1
नातरी वडवानळु सादुकला । प्रळयवाते पोखला । सागरु शोषूनि उधवला । अंबरासी ॥1-90॥
किंवा वडवानल पेटून प्रज्वलित होऊन वाऱ्याच्या साहाय्याने वाढत चालला, तर तो जसा सागरालाही शोषून आकाशापर्यंत धडकतो, ॥1-90॥

91-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तैसे दळ दुर्धर । नानाव्यूही परीकर । अवगमले भयासुर । तिये काळी ॥1-91॥
त्याप्रमाणे विविध प्रकारच्या व्युहांची रचना करून युद्धासाठी सज्ज झालेले सैन्य महाभयंकर दिसत आहे. ॥1-91॥
92-1
ते देखोनिया दुर्योधने । अव्हेरिले कवणे माने । जैसे न गणिजे पंचानने । गजघटांते ॥1-92॥
ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या कळपाळा मोजत नाही, त्याप्रमाणे ते विशाल सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची काहीच पर्वा केली नाही. ॥1-92॥
93-1
मग द्रोणापासी आला । तयाते म्हणे हा देखिला । कैसा दळभारू उचलला । पांडवांचा ॥1-93॥
नंतर दुर्योधन द्रोणाचर्याजवळ जवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवाचे हे सैन्य युद्धासाठी कसे उसळले आहे, ते पहिले का? ॥1-93॥
94-1
गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह सभंवते । रचिले आथी बुद्धिमंते । द्रुपदकुमरे ॥1-94॥
बुद्धिवंत असा जो द्रुपदपुत्र धृष्टदुउम त्याने विविध प्रकारचे विशाल व्यूह सभोवार रचले आहेत. ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहेत. ॥1-94॥
95-1
जो हा तुम्ही शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला । तेणे हा सैन्यसिंहु पाखरिला । देख देख ॥1-95॥
ज्याला तुम्ही शिकविले, विद्या देऊन शहाणे केले, त्या धृष्टदुउमनाने हा सेनासागर सर्वत्र पसरविला आहे, तो आपण पाहा. ॥1-95॥

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः॥1.4॥


भावार्थ :- तेथे युद्धात महाधनुर्धारी भीम व अर्जुन यासारखे अनेक शूरवीर आहेत, युयुधान आणि विराट, त्याप्रमाणे महापराक्रमी द्रुपद राजा आहे. ॥4॥
96-1
आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्री प्रवीण । क्षात्रधर्मी निपुण । वीर आहाती ॥1-96॥
आणखी जे शस्त्रात्रांत अतिप्रवीन आणि शस्त्रधर्मामध्ये निपुण असे महान योद्धे आहेत, ॥1-96॥
97-1
जे बळे प्रौढी पौरुषे । भीमार्जुनांसारिखे । ते सांगेन कौतुके । प्रसंगेची ॥1-97॥
हे शक्तीने, महाधैर्याने आणि पराक्रमाने भीम व अर्जुन यासारखे आहेत. त्यांची नावे प्रसंग आला म्हणून कौतुकाने म्हणून सांगतो. ॥1-97॥
98-1
एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु । महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥1-98॥
या रणांगणामध्ये महायोद्धा युयुधान, विराट राजा आणि महारथ्यात श्रेष्ठ असा द्रुपद राजा आले आहेत. ॥1-98॥

धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः॥1.5॥
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः॥1.6॥

भावार्थ :- चेकितान, धृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराज, पुरुजित, कुंतीभोज नरश्रेष्ठ, शैब्य, ॥5॥
पराक्रमी युधामन्यु, शक्तिशाली उत्तमौजा, सुभाद्रपुत्र अभिमन्यु आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत. ॥6॥
99-1
चेकितान धृष्टकेतु । काशिराज वीर विक्रांतु । उत्तमौजा नृपनाथु । शैब्य देख ॥1-99॥
चेकितान, धृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराज, नृपश्रेष्ठ उत्तमौजा व शैब्य राजा पाहा. ॥1-99॥
100-1
हा कुंतिभोज पाहे । एथ युधामन्यु आला आहे । आणि पुरुजितादि राय हे । सकळ देख॥1-100॥
हा कुंतीभोज पाहा, येथे युधामन्यु आलेला आहे. आणखी हे पुरुजित वगैरे सर्वच राजे आलेले आहेत, ते पाहा. ॥1-100॥

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-1
हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवार्जुनु । तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखे द्रोणा ॥1-101॥
दुर्योधन पुन्हा म्हणाला, हे द्रोणाचार्य ! सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा तिचा मुलगा प्रतिअर्जुन असा अभिमन्यू पाहा. ॥101॥
102-1
आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर । मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ॥1-102॥
शिवाय, द्रौपदीचे पुत्रही रणांगणात आले आहेत. हे सर्वही योद्धे महारथी आणि शूरवीर आहेत. पांडवांच्या सेनेत आणखी किती वीर आहेत हे मला माहित नाही; परंतु असंख्य अपरिचित पराक्रमी वीर येथे जमले आहेत. ॥102॥
103-1

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते॥1.7॥
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च॥1.8॥


भावार्थ :-
हे द्विजश्रेष्ठा ! आता आपल्या सैन्यातील जे प्रमुख सेनापती आहेत, त्यांची नावे आपल्या माहिती साठी सांगतो, तरी श्रवण करावे. ॥7॥
स्वतः पितामह भीष्मांचार्य,कर्ण, सदैव विजयी असे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, आणि युद्धजेता सोमदत्ताचा पुत्र भुरिश्रवा हे आहेत. ॥8॥
आता आमुच्या दळी नायक । जे रूढवीर सैनिक । ते प्रसंगे आइक । सांगिजती ॥1-103॥
आता आमच्या सैन्यातील प्रसिद्ध असे शूर सैनिक, सेनाप्रमुख जे आहेत त्यांचीही नावे प्रसंगाच्या अनुरोधाने सांगतो, ते आपण ऐकावे. ॥103॥
104-1
उद्देशे एक दोनी । जायिजती बोलोनी । तुम्ही आदिकरूनी । मुख्य जे जे ॥104॥
तुम्ही आदी करून जे प्रमुख वीर आहात, त्यापैकी एक-दोन नावे थोडक्यात सांगतो. ॥104॥
105-1
हा भीष्म गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु । रिपुगजपंचाननु । कर्णवीरु ॥1-105॥
पराक्रमाने सूर्यासारखा तेजस्वी असणारा असा हा गंगेचा पुत्र म्हणजे भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला जणू काही सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण आपल्या सेनेमध्ये आहे. ॥105॥
106-1
या एकेकाचेनी मनोव्यापारे । हे विश्व होय संहरे । हा कृपाचार्यु न पुरे । एकलाचि ॥1-106॥
या एकाच्याही फक्त मनात आले, तर या विश्वाचा संहार होऊन जाईल. एवढेच काय, एकटे कृपाचार्यदेखील हे कृत्य करू शकतील. ॥106॥
107-1
एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहे । याचा आडदरु सदां वाहे । कृतांतु मनी ॥1-107॥
येथे विकर्ण महावीर आहे. तो पाहा, पलीकडे अश्वत्थामा आहे. काळाला देखील सदैव याची भीती वाटत असते. ॥107॥
108-1
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः॥1.9॥

भावार्थ:- याशिवाय अनेक महावीर आहेत, जे माझ्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देण्यास तयार आहेत. त्यांच्याजवळ विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आहेत आणि ते सर्व युद्धकलेमध्ये निपुण आहेत. ॥9॥
समितिंजयो सौमदत्ती । ऐसे आणीकही बहुत आहाती । जयांचिया बळा मिती । धाताही नेणे ॥1-108॥
त्याचप्रमाणे विजयश्री प्राप्त करणारा सोमदत्ताचा पुत्र भुरिश्रवा व त्यासारखे असे आणखीन खूप महावीर आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रम्हदेवालाही समजू शकत नाही. ॥108॥
109-1
जे शास्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त । हो का जे अस्त्रजात । एथूनि रूढ ॥109॥
हे अस्त्रविद्येमध्ये तरबेज आहेत, जणू काही मंत्रविद्येचे प्रत्येक्ष अवतारच आहेत. यांच्यापासूनच अस्त्रविद्देचा प्रसार होऊन ती रूढ झाली आहेत. ॥109॥
110-1
हे अप्रतिमल्ल जगी । पुरता प्रतापु अंगी । हे अप्रतिमल्ल जगी । पुरता प्रतापु अंगी । परी सर्व प्राणे मजलागी । आरायिले असती ॥1-110॥
या जगात हे अप्रतिम योद्धे आहेत. त्यांच्या अंगी पुरेपुर बळ, सामर्थ्य आहे. असे हे सर्व वीर असूनही ते जिवावरती उदार होऊन माझ्या बाजूला येऊन मिळालेले आहेत. ॥110॥

111-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
पतिव्रतेचे हृदय जैसे । पतिवाचूनि न स्पर्शे । मी सर्वस्व या तैसे । सुभटांसी ॥1-111॥
ज्याप्रमाणे पतिव्रतेचे हृदय शुद्ध असते, ते मनाने देखील पतीशिवाय कोणाला स्पर्श करत नाही, त्याप्रमाणे या शूरवीरांना मीच सर्वस्व आहे. ॥111॥
112-1
आमुचिया काजाचेनि पाडे । देखती आपुले जीवित थोकडे । ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त ॥1-112॥
आमच्या या कार्यापुढे यांना आपल्या जीवाचेदेखील काही वाटत नाही. ते प्राणाची पर्वा करत नाहीत. ते निस्सीम स्वामिभक्त आहेत. ॥112॥
113-1
झुंजती कुळकणी जाणती । कळे किर्तीसी जिती । हे बहु असो क्षात्रनीति । एथोनिया ॥113॥
हे सर्व युद्धकलेत कुशल आहेत; त्यामुळे जय मिळवून कीर्ती निर्माण करणारे आहेत. क्षात्रधर्म मुळात त्यांच्यापासूनच निर्माण झाला आहे. ॥113॥
114-1
ऐसे सर्वापरि पुरते । वीर दळी आमुते । आतं काय गणू याते । अपार हे ॥1-114॥
याप्रमाणे युद्धकलेत परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. ते अपार असल्यामुळे त्यांची गणना करता येत नाही ॥114॥
115-1
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्॥1.10॥

भावार्थ:-आमचे सैन्य अमर्यादित असून तिचे भीष्मांनी रक्षण केले आहे आणि पांडवाचे सैन्य मर्यादित असून तिचे रक्षण भीमाने केले आहे. ॥10॥
शिवाय, क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगात प्रसिद्ध असलेले असे योद्धे जे भीष्माचार्य आहेत, त्यांना सैन्याचे आधिपत्य दिले आहे. ॥115॥
वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु । जो जगजेठी जगी सुभटु । तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासि पै ॥1-115॥
शिवाय, क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगात प्रसिद्ध असलेले असे योद्धे जे भीष्माचार्य आहेत, त्यांना सैन्याचे आधिपत्य दिले आहे. ॥115॥
116-1
आता याचेनि बळे गवसले । हे दुग जैसे पन्नासिले । येणे पाडे थेकुले । लोकत्रय ॥1-116॥
भीष्माचार्यांनी या सैन्याची अशी काही रचना केली आहे की, सुरक्षिततेसाठी जणू काही मजबुत असे किल्लेच उभारले आहेत. यांच्यासमोर त्रैलोक्यदेखील तोकडे वाटते. ॥116॥
117-1
आधींच समुद्र पाही । तेथ दुवाडपण कवणा नाही । मग वडवानळु तैसे याही । विरजा जैसा ॥1-117॥
समुद्र हा मुळातच सर्वाना भीतिदायक आहे आणि त्या समुद्राला जर वडवानळाने साहाय्य केले, तर तो अधिकच भयानक होणार. ॥117॥
118-1
ना तरी प्रळयवन्ही महावातु । या दोघां जैसा सांधातु । तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥1-118॥
प्रलयकाळचा महान अग्नी आणि प्रलयकाळचा महाभयंकर वारा या दोघांचा जसा संयोग घडावा, त्याप्रमाणे हा गंगापुत्र आहे; आणि त्याला सेनापतिपद मिळालेले आहे. ॥118॥
119-1
आता येणेसि कवण भिडे । हे पांडवसैन्य कीर थोकडे । परि वरचिलेनि पाडे । दिसत असे ॥1-119॥
तरी आमच्या सैन्याबरोबर कोण बरे लढू शकेल? आम्ही वर्णन केलेल्या सैन्यापुढे पांडवाचे सैन्य अपुरे दिसत आहे. ॥119॥
120-1
वरी भीमसेनु बेथु । तो जाहला असे सेनानाथु । ऐसे बोलोनिया मातु । सांडिली तेणे ॥1-120॥
शिवाय युद्धातील कैशल्य न जाणणारा भीम हा पांडव-सैन्याचा अधिपती झाला आहे. दुर्योधनाने एवढे बोलून सैन्याचे वर्णन थांबविले. ॥120॥

121-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥1.11॥
भावार्थ :- म्हणून सर्व प्रवेश मार्गावर आपापल्या नेमलेल्या जगी उभ्या असलेल्या आपण सर्वानी पितामह भीष्माचार्याचे रक्षण करावे. ॥11॥
मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांते म्हणितले । आता दळभार आपुलाले । सरसे करा ॥1-121॥
मग पुन्हा दुर्योधन सर्व सेनांप्रमुखाना म्हणाला, आता आपापल्या सैन्याला सज्य करा. ॥121॥
122-1
जया जिया अक्षौहिणी । तेणे तिया आरणी । वरगण कवणकवणी । महारथीया ॥1-122॥
ज्या प्रमुख सेनापतीँच्या सत्तेखाली ज्या अक्षौहिणी सेना आहेत, त्यांनी आपल्या सेनेवर युद्ध संपेपर्यँत पूर्ण नियंत्रण ठेवावे. विशेष सेनापती म्हणून जे महारथी आहेत. ॥122॥
123-1
तेणे तिया आवरिजे । भीष्मातळी राहिजे । द्रोणाते म्हणे पाहिजे । तुम्ही सकळ ॥1-123॥
त्यांनी सर्व सैन्यावर देखरेख करावी. तसेच प्रमुख सैनिकांनी भीष्म सांगतील, त्याप्रमाणे वागावे. दुर्योधन एवढे बोलून द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वावर लक्ष ठेवावे. ॥123॥
124-1
हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा । येणे दळभारु आघवा । साचु आमुचा ॥1-124॥
भीष्माचार्याचे सर्वानी मिळून रक्षण करावे. माझ्याप्रमाणे त्याना रक्षणीय मानावे. त्यांच्यामूळे आमची सर्व सेना विजय प्राप्त करण्यास समर्थ आहे. ॥124॥
125-1
तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥1.12॥

भावार्थ:- दुर्योधनाच्या मनात हर्ष निर्माण करणारे, कौरवांत वडील असलेले आणि महापराक्रमी आजोबा भीष्म यांनी मोठ्याने सिंहासमान गर्जना केली आणि शंखनिनाद केला. ॥12॥
या राजयाचिया बोला । सेनापति संतोषला । मग तेणे केला । सिंहनादु ॥125॥
दुर्योधन राजाचे बोलणे ऐकून सेनापती भीष्माचार्याना संतोष झाला आणि त्यांनी सिहंनादासमान गर्जना केली. ॥125॥
126-1
तो गाजत असे अद्‍भुतु । दोन्ही सैन्याआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥1-126॥
तो प्रचंड नाद दोन्ही सैन्यात दुमदुमून गेला. त्या नादाचा प्रतिध्वनी आकाशात देखील मावेना; आणि आकाशातून पुनः पुन्हा नवीन नाद निर्माण होऊ लागले. ॥126॥
127-1
तयाचि तुलगासवे । वीरवृत्तीचेनि थावे । दिव्य शंख भीष्मदेवे । आस्फुरिला ॥1-127॥
भीष्माचार्यानी आपल्या वीर वृत्तीप्रमाणे त्या पहिल्या नादाबरोबर आपला दिव्य शंख वाजविला. ॥127॥
128-1
ते दोन्ही नाद मीनले । तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहले । जैसे आकाश का पडिले । तुटोनिया ॥1-128॥
ते दोन्ही महानाद एकत्र झाले, त्या वेळी त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. त्या वेळी आता जणू काय आकाश तुटून पडते की काय, असे वाटू लागले. ॥128॥
129-1
घडघडीत अंबर । उचंबळत सागर । क्षोभले चराचर । कांपत असे ॥1-129॥
त्या प्रचंड नादामुळे आकाश भीतीने थडथडू लागले, समुद्रातील लाटा उसळल्या; आणि सर्व चराचर भीतीने कापू लागले. ॥129॥
130-1
तेणे महाघोषगजरे । दुमदुमिताती गिरिकंदरे । तव दळामाजी रणतुरे । आस्फुरिली ॥1-130॥
त्या प्रचंड नादाने डोंगर-दऱ्यातून प्रतिध्वनी निर्माण होऊ लागले. त्याच वेळी सैन्यात रणवाद्ये वाजू लागली. ॥130॥

131-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

ततः शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥1.13॥


भावार्थ:-
त्यानंतर इतर शूरवीरांनी शंख, नगारे, ढोल, मृदूंग,गोमुख ही रणवाद्ये एकदम वाजवली. त्यांचा अतिशय भयानक असा नाद उत्पन्न झाला. ॥13॥

उदंड सैंघ वाजते । भयानखे खाखाते । महाप्रळयो जेथे । धाकडांसी ॥1-131॥
जिकडे तिकडे रणवाद्ये कर्कश व भयानक स्वरूपात वाजू लागली. बलशाही लोकांना देखील तो महाप्रलय वाटला. ॥131॥
132-1
भेरी निशाण मांदळ । शंख काहळ भोंगळ । आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥1-132॥
नौबती, डंके, ढोल, शंख, मोठं-मोठया झान्जा, कर्णे इत्यादी रणवाद्यांचा गजर सुरु झाला; आणि त्यात वीरांच्या भयानक रनगर्जना मिसळून गेल्या. ॥132॥
133-1
आवेशे भुजा त्राहाटिती । विसणेले हाका देती । जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥1-133॥
कोणी युद्धातील विरश्रीच्या आवेशाने दंड ठोकू लागले आणि अतिशय त्वेषाने युद्धासाठी एकमेकांना हाका मारू लागले. त्यामुळे हत्तीदेखील बेफाम झाले आणि त्यांना आवरणे अशक्य झाले. ॥133॥
134-1
तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु । जेणे दचकला कृतांतु । आंग नेघे ॥1-134॥
तेथील भित्रा माणसाचे तर काय सांगावे? ते कस्पटासारखे दूर गेले. यमालादेखील दहशत बसली आणि तो इकडे पाहण्यास तयार होईना. ॥134॥
135-1
एका उभयाचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले । बिरुदाचे दादुले । हिंवताती ॥1-135॥
कित्येकांचे तिथेच प्राण गेले. जे धैर्यवान होते, त्यांची दातखिळी बसली. जे नामवंत वीर होते, ते थरथर कापू लागले. ॥135॥
136-1
ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु । देव म्हणती प्रळयकाळु । वोढवला आजी ॥1-136॥
अशा प्रकारचा महाभयंकर वाद्यनाद ऐकून ब्राम्हदेवदेखील व्याकुळ झाले. आपला प्रलयकाळ जवळ आला आहे, असे देव म्हणू लागले. ॥136॥
137-1
ततः श्वेतैहयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः॥1.14॥
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः॥1.15॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ॥1.16॥

भावार्थ:- त्यानंतर पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम मोठ्या रथात बसलेले ” भगवान श्रीकृष्ण ” आणि ” अर्जुन ” यांनी दिव्य शंख वाजविले. ॥14॥
ऐसी स्वर्गी मातु । देखोनि तो आकांतु । तव पांडवदळाआंतु । वर्तले कायी ॥1-137॥
तो आकांत पाहून स्वर्गलोकामध्ये प्रलयकालाची साशंकता निर्माण झाली. त्या वेळी इकडे पांडवसैन्यामध्ये काय घडले, ते श्रवण करा. ॥137॥
138-1
हो का निजसार विजयाचे । की ते भांडार महातेजाचे । जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चार्‍ही ॥1-138॥
जे का विजयाचे केवळ सार, महातेजाचे भांडार आणि जे वेगाच्या बाबतीत गरुडाची बरोबरी करू शकतील, असे चार घोडे जुंपले असून, ॥138॥
139-1
की पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा । तेजे कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥1-139॥
पंख असलेला मेरू पर्वत जसा असावा, त्याप्रमाणे ज्याच्या दिव्य तेजाने सर्व दिशा भरून गेल्या आहेत, असा तो अतिवेगवान रथ त्या सैन्यात शोभत होता. ॥139॥
140-1
जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा जाण । तया रथाचे गुण । काय वर्णू ॥1-140॥
अशा त्या रथावर वैकुंठाचा राजा (अधिपती) भगवान श्रीकृष्ण घोडे हाकीत होता, त्या रथाचे गुण काय बरे वर्णन करावेत?? ॥140॥

141-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ध्वजस्तंभावरी वानरु । तो मुर्तिमंत शंकरु । सारथी शारङ्गधरु । अर्जुनेसी ॥1-141॥
त्या रथाच्या ध्वजस्तंभावर प्रत्येक्ष शंकराचा अवतार मारुती होता. अर्जुनासह रथावर बसलेले श्रीकृष्ण रथाचे सारथी होते. ॥141॥
142-1
देखा नवल तया प्रभूचे । अद्‍भुत प्रेम भक्ताचे । जे सारथ्यपण पार्थाचे । करितु असे ॥1-142॥
त्या विश्वचालक प्रभूंचे नवल पाहा. प्रभूच्या मनात भक्तांविषयी अतिविलक्षण असे प्रेम आहे; म्हणून तो विश्वनियंता असूनदेखील अर्जुनाचे सारथ्य करत होता. ॥142॥
143-1
पाइकु पाठीसी घातला । आपण पुढा राहिला । तेणे पाञ्चजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ॥1-143॥
त्याने आपल्या भक्ताला पाठीशी घातले आणि सर्व संकटाचे निवारण करण्यासाठी आपण पुढे बसला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख सहज लीलेने वाजविला. ॥143॥
144-1
परि तो महाघोषु थोरु । गर्जतु असे गंहिरु । जैसा उदेला लोपी दिनकरु । नक्षत्रांते ॥1-144॥
ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला की नक्षत्रे लोप पावतात, त्याप्रमाणे शंखांचा ध्वनी सर्वत्र घुमत राहिला. ॥144॥
145-1
तैसे तुरबंबाळु भंवते । कौरवदळी गाजत होते । ते हारपोनि नेणो केउते । गेले तेथ ॥1-145॥
त्यामुळे कौरवांचा सैन्यामध्ये जे वाद्यांचे गजर होत होते, ते कोठे नाहीसे झाले, ते कळाले नाही. ॥145॥
146-1
तैसाचि देखे येरे । निनादे अति गहिरे । देवदत्त धनुर्धरे । आस्फुरिला ॥1-146॥
त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर आवाज करणारा शंख वाजविला. ॥146॥
147-1
ते दोन्ही शब्द अचाट । मिनले एकवट । तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हो पाहत असे ॥1-147॥
ह्या दोन शंखांचा अद्भुत नाद जेंव्हा एकत्र झाला, त्या वेळी ब्रह्मांडाचे शेकडो तुकडे होतात की काय, असे सर्वाना वाटू लागले. ॥147॥
148-1
तव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला । तेणे पौण्ड्र आस्फुरिला । महाशंखु ॥1-148॥
त्यावेळी भीमाला आवेश आला आणि तो महाकाळाप्रमाणे खवळला. त्याने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. ॥148॥
149-1
तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गहिंरु । तव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥1-149॥
त्या शंखांचा ध्वनी प्रलयकालचा मेघ गर्जावा, त्याप्रमाणे अतिगंभीर पणाने सर्वत्र पसरला. इतक्यात धर्मराजने ‘अनंतविजय’ नावाचा शंख वाजविला. ॥149॥
150-1
नकुळे सुघोषु । सहदेवे मणिपुष्पकु । जेणे नादे अंतकु । गजबजला ठाके ॥1-150॥
नकुलाने ‘सुघोष’ आणि सहदेवाने ‘मणीपुष्पक’ शंख वाजविला. त्या महाभयंकर नादाने यमदेखील गोंधळून आश्चर्यचकित झाला. ॥150॥


151-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः॥1.17॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शंखान्दध्मुः पृथक् पृथक्॥1.18॥
स घोषो धार्तराष्ट्राणा हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवी चैव तुमुलो व्यनुनादयन्॥1.19॥


भावार्थ :- हे राजा ! महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टदुमनं तसेच विराट राजा, अजिंक्य असा सात्यकी ॥17॥
द्रुपद राजा आणि द्रौपदीचे पाच पुत्र, सुभद्रेचा महाशक्तिशाली पुत्र अभिमन्यू या सर्वानी आपले वेगवेगळे शँख वाजविले. ॥18॥
त्या भयंकर अश्या तुंबळ ध्वनीने आकाश व पृथ्वी दणाणून गेली. त्यामुळे धृतराष्टराच्या पुत्राची हृदये विदीर्ण झाली. ॥19॥
तेथ भूपति होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक । हा काशीपति देख । महाबाहु ॥1-151॥
त्या पांडवसैन्यात द्रुपद राजा, द्रौपदीचे पाच पुत्र इत्यादी अनेक वीर, महाशक्तिशाली काशीराज होते. ॥151॥
152-1
तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु । धृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥1-152॥
त्याप्रमाणे अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, पराजित न होणारा सात्यकी, नृपश्रेष्ठ दृष्टदुम, शिखंडी, ॥152॥
153-1
विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर । तिही नानाशंख निरंतर । आस्फुरिले ॥1-153॥
तसेच विराट आणि इतर जे जे सेनापती होते, त्यांनी आपापली शंख वाजविण्यास प्रारंभ केला. ॥153॥
154-1
तेणे महाघोषनिर्घाते । शेष कूर्म अवचिते । गजबजोनि भूभाराते । सांडू पाहती ॥1-154॥
त्या शंखांचा महाध्वनी ऐकून शेष व कुर्मदेखील दचकून गेले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास ते प्रवृत्त झाले ॥154॥
155-1
तेथ तीन्ही लोक डळमळित । मेरु मांदार आंदोळित । समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ॥1-155॥
या महान नादामुळे सर्व त्रैलोक्य डलमळू लागले. मेरू व मांदार पर्वत पुढे-मागे हलू लागले आणि समुद्रातील पाण्याच्या लाटा कैलासापर्यंत उसळू लागल्या. ॥155॥
156-1
पृथ्वीतळ उलथो पहात । आकाश असे आसुडत । तेथ सडा होत । नक्षत्रांचा ॥1-156॥
पृथ्वी उलथू पाहत होती. आकाशाला मोठंमोठे धक्के बसत असल्याने नक्षत्रांचा सडा पडतो की काय, असे वाटू लागले. ॥156॥
157-1
सृष्टी गेली रे गेली । देवा मोकळवादी जाहली । ऐशी एक टाळी पिटली । सत्यलोकी ॥1-157॥
सृष्टी गेली रे गेली, देव आता निराधार झाले, अशी सत्यलोकामध्ये एकच आरोळी उठली. ॥157॥
158-1
दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला । तैसा हाहाकारु जाहला । तिन्ही लोकी ॥1-158॥
दिवसाच सूर्य स्तब्ध झाला. प्रलयकाळाप्रमाणे तिन्ही लोकात मोठा हाहा:कार झाला. ॥158॥
159-1
ते देखोनि आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणे होय पा अंतु । मग लोपिला अद्‍भुतु । संभ्रमु तो ॥1-159॥
ही परिस्तिथी पाहून श्रीकृष्ण विस्मित झाले, कदाचित सर्व सृष्टीचा नाश होईल, हे जाणून त्यांनी विलक्षण ध्वनी शांत केला. ॥159॥
160-1
म्हणौनि विश्व सांवरले । एर्‍हवी युगांत होते वोडवले । जै महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकी ॥160॥
त्यामुळे जग सावरले गेले; नाही तर श्रीकृष्णादिकांनी जेव्हा मोठे शंख वाजविले, त्याच वेळी महाप्रलंय होण्याची वेळ आली होती. ॥160॥

161-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तो घोष तरी उपसंहरला । परी पडसाद होता राहिला । तेणे दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥161॥
तो महानाद शांत झाला; परंतु त्याचा प्रतिध्वनी जो मागे राहिला होता, त्यामुळे कौरव सैन्याची दाणादाण उडाली. ॥161॥
162-1
जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु । तैसा हृदयाते भेदितु । कौरवांचिया ॥162॥
सिहं हत्तीच्या कळपात गेला, तर त्यांच्या समुदायाचे विदारण करतो, त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरव सैनेची हृदये विदीर्ण झाली. ॥62॥
163-1
तो गाजत जव आइकती । तव उभेचि हिये घालिती । एकमेकांते म्हणती । सावध रे सावध ॥163॥
तो प्रचंड प्रतिध्वनी ऐकून कौरवांनी उभ्या-उभ्याने धैर्य सोडले, तरी पण एकमेकांना सावध रे सावध असे म्हणू लागले. ॥63॥
164-1

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥1.20॥


भावार्थ :- धृतराष्टराचे पुत्र युद्धासाठी सज्ज झालेले पाहून एकमेकांवर शस्त्र चालविण्याचा प्रसंग प्राप्त झाला. त्या वेळी ज्याच्या ध्वजावरती मारुती आहे, अशा अर्जुनाने युद्धासाठी आपले धनुष्य हाती घेतले. ॥20॥
तेथ बळे प्रौढीपुरते । महारथी वीर होते । तिही पुनरपि दळाते । आवरिले ॥164॥
त्या रणांगणावर बलाढ्य व धैर्ययुक्त महावीर होते. त्यांनी धीर देऊन पुनः सैन्याला सावरले. ॥64॥

165-1
मग सरिसेपणे उठावले । दुणवटोनि उचलले । तया दंडी क्षोभले । लोकत्रय ॥165॥
त्यावेळी ते सैन्य युद्ध करण्यासाठी एकदम तयार झाले आणि दुप्पट आवेशाने क्षुब्ध झाले. त्यामुळे त्रैलोक्य देखील क्षुब्ध झालेले दिसून आले. ॥65॥
166-1
तेथ बाणवरी धर्नुधर । वर्षताती निरंतर । जैसे प्रळयात जलधर । अनिवार का ॥166॥
प्रलयकालाच्या वेळी ज्याप्रमाणे मेघ अखंड वर्षाव करीत असतात, त्याप्रमाणे धनुर्विद्येतील प्रवीण योद्धे बाणांचा अखंड वर्षाव करू लागतात. ॥66॥
167-1
ते देखलिया अर्जुने । संतोष घेऊनि मने । मग संभ्रमे दिठी सेने । घालीतसे ॥167॥
हे दृश्य पाहून अर्जुनाच्या मनात संतोष झाला आणि त्याने उत्सुकतेने कौरवांच्या सैन्याकडे पहिले. ॥67॥
168-1
तव संग्रामी सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले । तव लीलाधनुष्य उचलले । पंडुकुमरे ॥168॥
त्यावेळी युद्धासाठी सज्ज झालेले कौरव त्याला दिसले. अर्जुनाने सहज लीलेने आपले धनुष्य उचलले. ॥68॥
169-1

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच ।
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥1.21॥
यावदेतान्निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे॥1.22॥
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः॥1.23॥


भावार्थ :- हे राजा ! त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. ॥21॥
युद्ध करण्यासाठी उभे असलेल्यांचे मी निरीक्षण करतो आणि मला कोणाबरोबर युद्ध करायचे आहे, ते पाहतो. ॥
22॥
दुर्बुद्धी असणाऱ्या दुर्योधनाला यश मिळावे, या हेतूने जे योद्धे आले आहेत, त्यांना मी पाहतो. ॥23॥

ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा । आता झडकरी रथु पेलावा । नेऊनि मध्ये घालावा । दोही दळा ॥169॥
त्यावेळी अर्जुन म्हणाला, ” हे देवा ! रथ लवकर हाक आणि दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर ॥69॥
170-1
जव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक । न्याहाळीन अशेख । झुंजते ते ॥170॥
येथे युद्धासाठी जे आलेले आहेत, त्या वीर सैनिकांना मी थोडा वेळ पाहणार आहे, तोपर्यँत तू रथ येथे उभा कर. ॥170॥

171-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
एथ आले असती आघवे । परी कवणेसी म्या झुंजावे । हे रणी लागे पहावे । म्हणौनिया ॥171॥
येथे सर्व आले आहेत; पण मी या रणांगणात कोणाबरोबर लढावे, याचा विचार करणे जरूर आहे. म्हणून (मी पाहतो) ॥171॥
172-1
बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव । वांटिवेवीण हांव । बांधिती झुंजी ॥172॥
फार करून कौरव हे उतावळे व दुष्ट बुद्धीचे असून त्यांच्या राज्यात सुबत्ता असूनही ते निष्कारण युद्धाची हाव धरतात. ॥172॥
173-1
झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामी धीर नव्हती । हे सांगोनि रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥173॥
हे लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाहीत. इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे म्हणाला — ॥173॥
174-1

सञ्जय उवाच ।
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥1.24॥
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ॥1.25॥
तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितृनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥1.26॥
श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान्॥1.27॥


भावार्थ:- संजय म्हणाला, ” हे भरतकुलोत्पना धृतराष्ट्र, अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी (तो) उत्तम रथ थांबवून. ॥24॥
भीष्म,द्रोण आणि इतर सर्व राजे त्यांच्या समोर म्हणाला, ” हे पार्था, जमलेल्या या कौरवाना पाहा. ॥25॥
त्या ठिकाणी जमलेली वडील माणसे, आजे, गुरू, मामा, बंधू, पुत्र, नातू, तसेच जिवलग मित्र,सासरे,स्नेही या सर्वाना दोन्ही सैन्यामध्ये अर्जुनाने पाहिले. पहिले. ॥26॥
येथे जमलेले आपले बांधवांच आहेत असे पाहून तो कुंतीपुत्र अत्यंत करुणेने व्याकुळ झाला आणि कष्टी होऊन असे म्हणाला, ॥27॥

आइका अर्जुन इतुके बोलिला । तव श्रीकृष्णे रथु पेलिला । दोही सैन्यांमाजी केला । उभा तेणे ॥174॥
हे राजा एका ! अर्जुन एवढे बोलला. इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्यांनी दोन्ही सैन्यामध्ये उभा केला. ॥74॥
175-1
जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख । पृथिवीपति आणिक । बहुत आहाती ॥175॥
ज्या ठिकाणी भीष्म, द्रोण इत्यादी आदिकरून आप्तसंबंधी व आणखी पुष्कळ राजे पुढे उभे होते, ॥75॥
176-1
तेथ स्थिर करूनिया रथु । अर्जुन असे पाहातु । तो दळभार समस्तु । संभ्रमेसी ॥176॥
त्या ठिकाणी रथ थांबवून, अर्जुन तो सर्व सैन्यसमुदाय उत्सुकतेने पाहू लागला. ॥76॥
177-1
मग देवा म्हणे देख देख । हे गुरुगोत्र अशेख । तव कृष्णमनी नावेक । विस्मो जाहला ॥177॥
अर्जुन म्हणाला, हे देवा ! पाहा पाहा. हे सगळे रणांगणावर जमलेले आमचेच गोत्रज, भाहुबंध व गुरू आहेत. हे ऐकून श्रीकृष्णाच्या मनात क्षणभर अचंबा वाटला. ॥77॥
178-1
तो आपणया आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे । हे मनी धरले येणे । परि काही आश्चर्य असे ॥178॥
(श्रीकृष्ण ) विचार करू लागले, अर्जुनाच्या मनात काय आले, कोण जाणे; हे काहीतरी विलक्षणच असावे, ॥78॥
179-1
ऐसी पुढील से घेतु । तो सहजे जाणे हृदयस्थु । परि उगा असे निवांतु । तिये वेळी ॥179॥
(श्रीकृष्ण) ते सर्वाच्या हृदयामध्ये विराजमान असल्यामुळे त्यांनी ते सहज जाणले; परंतु त्यावेळी ते (काही न बोलता) स्तब्ध राहिले. ॥79॥
180-1
तव तेथ पार्थु सकळ । पितृ पितामह केवळ । गुरु बंधु मातुळ । देखता जाहला ॥180॥
त्यावेळी अर्जुनाने रणांगणावर आपले चुलते,, आजोबा, गुरू, बंधू, मामा यांना पहिले. ॥180॥

181-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
इष्ट मित्र आपुले । कुमरजन देखिले । हे सकळ असती आले । तयांमाजी ॥181॥
आपले इष्टमित्र, मुलेबाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत, असे त्याने पहिले. ॥181॥
182-1
सुहृज्जन सासरे । आणीकही सखे सोइरे । कुमर पौत्र धर्नुर्धरे । देखिले तेथ॥182॥
आपले जिवलग मित्र, सासरे,नातेवाईक आणि नातूदेखील त्या रणांगणात आलेले अर्जुनाने पहिले. ॥82॥
183-1
जया उपकार होते केले । की आपदी जे रक्षिले । हे असो वडील धाकुले । आदिकरूनि ॥183॥
ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते आणि संकटकाळात ज्याचे रक्षण केले होते, त्या लहान मोठ्या सर्वानाच अर्जुनाने पहिले. ॥83॥
184-1
ऐसे गोत्रचि दोही दळी । उदित जाले असे कळी । हे अर्जुने तिये वेळी । अवलोकिले ॥184॥
असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे, त्यावेळी अर्जुनाने पहिले. ॥84॥
185-1
कृपया परयाऽऽविष्टो विषीदन्नमब्रवीत
त्या सर्वाना पाहून तो करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि दुःखी-कष्टी होऊन तो असे बोलू लागला.
तेथ मनी गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली । तेणे अपमाने निघाली । वीरवृत्ति ॥185॥
त्या प्रसंगी (अर्जुनाच्या) मनात गडबड उडाली आणि (त्यामुळे त्याच्या मनात) सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. ॥85॥
186-1
जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी । तिया आणिकीते न साहती । सुतेजपणें॥186॥
ज्या (स्त्रिया) उत्तम कुळातील असतात आणि गुणाने व रुपाने संपन्न असतात, त्यांना आपल्या स्वाभिमानामुळे दुसऱ्या कोणत्याही स्त्रियांचे वर्चस्व सहन होत नाही; ॥86॥
187-1
नविये आवडीचेनि भरे । कामुक निजवनिता विसरे । मग पाडेवीण अनुसरे । भ्रमला जैसा ॥187॥
ज्या प्रमाणे कामाने आसक्त झालेला पुरुष आपल्या स्व-पत्नीला विसरून दुसऱ्या स्त्रीची योग्यता न पाहता वेडा होऊन तिच्या नादी लागतो, ॥87॥
188-1
की तपोबळे ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी । मग तया विरक्तता सिद्धी । आठवेना ॥188॥
किंवा तपोबलाने रिद्धी म्हणजेच (ऐश्वर्य) प्राप्त झाले असता (वैराग्यशाली पुरुषाची) बुद्धी भ्रम पावते; आणि मग त्याला वैराग्य (मोक्ष) सिद्धीची आठवणही राहत नाही. ॥88॥
189-1
तैसे अर्जुना तेथ जाहले । असते पुरुषत्व गेले । जे अंतःकरण दिधले । कारुण्यासी ॥189॥
त्याप्रमाणे अर्जुनाची त्या वेळी स्थिती झाली व त्याच्या हृदयात करुणा निर्माण झाली आणि त्याची वीरवृत्ती गेली. ॥89॥
190-1
देखा मंत्रज्ञु बरळु जाय । मग तेथ का जैसा संचारु होय । तैसा तो धनुर्धर महामोहे । आकळिला ॥190॥
ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक मंत्राचा उच्चार करताना चुकला म्हणजे तो जसा भ्रमिष्ट होतो, त्याप्रमाणे अर्जुन अतिमोहामुळे व्याकुळ झाला. ॥190॥

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-1
म्हणौनि असता धीरु गेला । हृदया द्रावो आला । जैसा चंद्रकळी शिवतला । सोमकांतु ॥191॥
म्हणून अर्जुनाच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्यांचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चांद्रकिरणांचे शिंपण झाल्याने चांद्रकांतमाणि पाझरू लागतो, ॥191॥
192-1
तयापरी पार्थु । अतिस्नेहे मोहितु । मग सखेद असे बोलतु । श्रीअच्युतेसी ॥192॥
त्याप्रमाणे पार्थ महाकरूणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन श्रीकृष्णाबरोबर बोलू लागला. ॥192॥
अर्जुन उवाच ।

दृष्ट्वेमम् स्वजनं कृष्ण युयुत्सुम् समुपस्थितम् ॥1.28॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते॥1.29॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः॥1.30॥


भावार्थ :-
अर्जुन म्हणाला, ” हे श्रीकृष्णा ! युद्ध करण्यासाठी एकत्र जमलेल्या या स्वजनांना पाहून ॥28॥
माझी सर्व गात्रे शिथिल पडू लागली आहेत. तसेच, तोंडाला कोरड पडू लागली आहे. माझ्या शरीराला कंप सुटून शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. ॥29॥
माझ्या हातातील गांडीव धनुष्य गळून पडत आहे. माझ्या शरीराचा दाह होत आहे. माझे मन भ्रमित झाले आहे. त्यामुळे मी येथे उभा राहण्यासदेखील समर्थ नाही. ॥30॥

193-1
तो म्हणे अवधारी देवा । म्या पाहिला हा मेळावा । तव गोत्र वर्गु आघवा । देखिला एथ ॥193॥
अर्जुन म्हणाला, हे देवा ! माझे ऐका. मी हा सर्व समुदाय पहिला येथे मला माझे सर्व गोत्रज दिसत आहेत. ॥193॥
194-1
हे संग्रामी उदित । जहाले असती कीर समस्त । पण आपणपेया उचित । केवी होय ॥194॥
हे सर्व जण लढाईला उत्सुक झाले आहेत, हे खरे; पण ते (यांच्याशी लढणे) आपल्याला कसे योग्य होईल? ॥194॥
195-1
येणे नांवेचि नेणो कायी । मज आपणपे सर्वथा नाही । मन बुद्धि ठायी । स्थिर नोहे ॥195॥
यांच्याशी युद्ध करण्याच्या विचाराने मला काही सुचत नाही. काय होते आहे, हे कळत नाही. माझे मलाच भान नाही. माझे मन आणि बुद्धी स्थिर नाही. ॥95॥
196-1
देखे देह कांपत । तोंड असे कोरडे होत । विकळता उपजत । गात्रांसीही ॥196॥
पाहा, माझा देह कापत आहे. तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आलेली आहे. ॥96॥
197-1
सर्वागा कांटाळा आला । अति संतापु उपनला । तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ॥197॥
माझ्या सर्वागावर रोमांच (काटा) उभा राहिला आहे, माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरवयाचा हात लुळा होऊन गेला आहे. ॥97॥
198-1
ते न धरतचि निष्टले । परि नेणेचि हातोनि पडिले । ऐसे हृदय असे व्यापिले । मोहे येणे ॥198॥
हे धनुष्य हाती न धरल्याने गळून पडले; परंतु हातातून केंव्हा गळून पडून गेले, हेदेखील मला कळाले नाही, या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. ॥98॥
199-1
जे वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण । तयाहून असाधारण । हे स्नेह नवल ॥199॥
खरोखर माझे अंतःकरण वज्रापेक्षा कठीण आहे, कोणाला दाद न देणारे अतिखंबीर असे आहे; परंतु काय आश्चर्य, त्यापेक्षाही या आप्तेष्टांचा मोह आश्चर्यकारक आहे. ॥199॥
200-1
जेणे संग्रामी हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । तो अर्जुन मोहे कवळिला । क्षणामाजी ॥200॥
ज्याने युद्धामध्ये शंकरांनाही जिंकले आणि निवातकवच नावाच्या राक्षसांचा ठावठिकानाही नाहीस केला, तो अर्जुन आप्तेष्ठांना पाहून एका क्षणामध्ये मोहाने ग्रासला गेला. ॥200॥

201-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
जैसा भ्रमर भेदी कोडे । भलतैसे काष्ठ कोरडे । परि कळिकेमाजी सांपडे । कोंवळिये ॥201॥
भुंगा हा ज्याप्रमाणे वाटेल त्याप्रकारचे कोरडे लाकूड सहज लीलेने पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्येंच अडकून पडतो. ॥201॥
202-1
तेथ उत्तीर्ण होईल प्राणे । परि ते कमळदळ चिरू नेणे । तैसे कठिण कोवळेपणे । स्नेह देखा ॥202॥
तो त्याठिकाणी प्राणास मूकेल; परंतु कमळाविषयीच्या स्नेहामूळे तो कमळ-कळी कोरून बाहेर पडत नाही. त्याप्रमाणे आपल्या आप्त लोकांची मोह-ममता कोवळी असली, तरी त्यातून बाहेर पडणे महाकठीण आहे. ॥202॥
203-1
हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाही नयेचि आया । म्हणौनि भुलविला ऐके राया । संजयो म्हणे ॥203॥
संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र राजा ! हा स्नेह म्हणजे परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळली जात नाही; म्हणूनच या मायेने अर्जुनालाही मोहित केले आहे. ॥203॥
204-1
अवधारी मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥204॥
हे राजा ! मग तो अर्जुन (युद्धाला आलेले) सर्व आपलेच लोक आहेत असे पाहून, लढाईचा अभिमान (ईर्षा) विसरून गेला. ॥04॥
205-1
कैसी नेणो सदयता । उपनली तेथे चित्ता । मग म्हणे कृष्णा आता । नसिजे एथ ॥205॥
तेथे त्याच्या मनात कोठून दयाभाव उत्पन्न झाला कोण जाणे ! मग तो म्हणाला, हे कृष्णा, आपण येथे राहू नये, हे बरें. ॥05॥
206-1
माझे अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ । जे वधावे हे सकळ । येणे नांवे ॥206॥
ह्या सर्वास मारावयाचे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होते आणि तोंड हवे ते बरळु लागते. ॥06॥
207-1

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे॥1.31॥


भावार्थ :- हे केशवा ! मला ही सर्व लक्षणे विपरीत दिसत आहेत; आणि युद्धामध्ये स्वजनांना मारिले असता कोणतेही श्रेय (प्राप्त होईल असें) मला दिसत नाही. ॥31॥

या कौरवा जरी वधावे । तरी युधिष्ठीरादिका का न वधावे । हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे॥207॥
या कौरवाना मारणे जर योग्य असेल, तर धर्मराजादिकाचा वध करण्याला काय हरकत आहे? कारण की हे सर्व आणि आम्ही एकमेकांचे नातलग आहोत. ॥07॥
208-1
म्हणोनि जळो हे झुंज । प्रत्यया न ये मज । एणे काय काज । महापापे ॥208॥
याकरिता आग लागो या युद्धाला ! मला हे पसंत नाही. या महापापाची आम्हास काय गरज आहे? ॥08॥
209-1
देवा बहुतापरी पाहता । एथ वोखटे होईल झुंजता । वर काही चुकविता । लाभु आथी ॥209॥
हे देवा ! अनेक दृष्टीनी विचार केला असता (असे वाटते की) या वेळी युद्ध केले, तर (त्याचा परिणाम) वाईट होईल; पण ते जर टाळले तर काही लाभ होईल. ॥09॥
210-1

न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा॥1.32॥
येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च॥1.33॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा॥1.34॥


भावार्थ :-
हे श्रीकृष्णा ! मला विजयाची आकांशा नाही किंवा राज्याची आणि सुखाची आत्ता इच्छा उरलेली नाही. हे गोविंदा ! राज्य, सुखोपभोग मिळून तरी काय उपयोग? अथवा आंम्हाला जगुन तरी काय उपयोग? ॥32॥
जांच्याकरिता आम्हाला राज्याची, भोगांची अथवा सुखांची इच्छा असावयाची, ते हे स्वजन संपत्ती आणि जीवाची पर्वा न करता युद्धासाठी उभे टाकले आहेत. ॥33॥
आचार्य, वडील, पुत्र, त्याप्रमाणे आजोबा, मामा, सासरे, नातू, मेव्हणे, आणि इतर नातलग येथे युद्धासाठी जमले आहेत. ॥34॥

तया विजयवृत्ती काही । मज सर्वथा काज नाही । एथ राज्य तरी कायी । हे पाहुनिया ॥210॥
अशा प्रकारे विजय प्राप्त करण्याची मला मुळीच इच्छा नाही. गोत्रजांना ठार मारून मिळविलेले राज्य तरी काय करायचे? ॥210॥

211-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
या सकळांते वधावे । मग हे भोग भोगावे । ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥211॥
अर्जुन म्हणाला, या सर्वाना मारून जे भोग भोगावयाचे, त्या सगळ्यांना आग लागो ! ॥211॥
212-1
तेणे सुखेविण होईल । ते भलतैसे साहिजेल । वरी जीवितही वेचिजेल । याचिलागी ॥212॥
त्या भोगांपासून मिळणाऱ्या सुखांच्या अभावी, जो प्रसंग येऊन पडेल, तो वाटेल तसा बिकट असेल तरीहि सहन करता येईल. इतकेच काय? त्यांच्या करिता आमचे प्राण खर्ची पडले तरी चालेल; ॥212॥
213-1
परी यासी घातु कीजे । मग आपण राज्यसुख भोगिजे । हे स्वप्नीही मन माझे । करू न शके॥213॥
परंतु त्यांचे प्राण घ्यावे आणि आपण राज्यसुख भोगावे, ही गोष्ट स्वप्नातदेखील माझ्या मनात येणार नाही. ॥213॥
214-1
तरी आम्ही का जन्मावे । कवणलागी जियावे । जरी वडिला या चिंतावे । विरुद्ध मने ॥214॥
जर या वडील माणसांचे अहित मानाने चिंतवायचे, तर आम्ही जन्माला येऊन तरी उपयोग काय व आम्ही जगावे तरी कोणासाठी? ॥214॥
215-1
पुत्राते इच्छी कुळ । तयाचे कायि हेचि फळ । जे निर्दळिजे केवळ । गोत्र आपुले ॥215॥
कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे काय हेच फळ की, त्याने आपल्या आप्तेष्ठांचा केवळ वधच करावा? ॥215॥
216-1
हे मनीचि केवि धरिजे । आपण वज्राचेया होईजे । वरी घडे तरी कीजे । भले इया ॥216॥
यांच्या वधाचा विचार आपण मनात तरी कसा आणावा? यांच्यासाठी वज्रासारखे कठोर तरी कसे व्हावे? उलटपक्षी झाल्यास आपण त्यांचे हितचं करांवे. ॥216॥
217-1
आम्ही जे जे जोडावे । ते समस्ती इही भोगावे । हे जीवितही उपकारावे । काजी यांच्या ॥217॥
आम्ही जे जे मिळवावे, ते ते या सर्वानी (वास्तविक) भोगण्यासाठी आहे. यांच्या कामाकरिता आम्ही आपले प्राणहि खर्च करावेत. ॥217॥
218-1
आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ । मग संतोषविजे कुळ । आपुले जे ॥218॥
आम्ही देशोदेशीच्या राजांना जिंकावे आणि आपल्या कुळास संतुष्ट करावे. ॥218॥
219-1
तेचि हे समस्त । परी कैसे कर्म विपरीत । जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥219॥
परंतू कर्माची गती किती विपरीत आहे, ते पाहा. तेच आमचे सर्व गोत्रज आपसात लढावयास तयार झाले आहेत ! ॥219॥
220-1
अंतौरिया कुमरे । सांडोनिया भांडारे । शस्त्राग्री जिव्हारे । आरोपुनी ॥220॥
बायका, मुले, आपली सर्व संपत्ती या सर्वाना सोडून व तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेऊन जे युद्धासाठी तयार झाले आहेत. ॥220॥

221-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
एसियाते कैसेनि मारू ? । कवणावरी शस्त्र धरू? । निजहृदया करू । घातु केवी ? ॥221॥
अशांना मी मारू तरी कसा? मी कोणावर शास्त्रांचा प्रहार करू? (हे कौरव म्हणजे आम्हीच. आम्ही सारे एकाच कुळातील आहोत, त्यामुळे यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या दृष्टीने अर्जुन म्हणतो) आपल्या काळजाचा घात कसे करू? ॥221॥
222-1
हे नेणसी तू कवण । परी पैल भीष्म द्रोण । जयांचे उपकार असाधारण । आम्हा बहुत ॥222॥
हे श्रीकृष्णा ! युद्धासाठी आमच्यासमोर कोण उभे आहेत, तू जाणत नाहीस काय? ज्यांचे आमच्यावर अनन्यसाधारण (असामान्य) उपकार आहेत, असे पितामह भीष्म व गुरू द्रोणचार्या, ते पलीकडे आहेत पाहा. ॥222॥
223-1
एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु की हे सकळ । पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥223॥
या ठिकाणी मेव्हणे, सासरे, मामा आणि इतर सर्व बंधू, पुत्र, नातू आणि आप्तही आहेत ॥223॥
224-1
अवधारी अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणौनि दोष आथी वाचे । बोलिताचि ॥224॥
हे देवा ऐक, येथे आमचे अतिशय जवळचे असे हे आमचे सोयरे आहेत; आणि म्हणूनच यांचा वध करावा, असे वाणीने नुसते बोलणे, हे सुद्धा पाप होईल. ॥224॥
225-1

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते॥1.35॥


भावार्थ :-
हे मधुसुदना ! हे स्वजन मला ठार मारण्यासाठी येथे आले आहेत. त्रैलोक्याचे राज्य मिळालं तरीही, मी यांना ठार मारण्याची इच्छा करीत नाही. मग पृथ्वीच्या राज्याची कथा काय? ॥35॥
हे वरी भलते करितु । आताचि येथे मारितु । परि आपण मने घातु । न चिंतावा॥225॥
उलटपक्षी हे वाटेल ते करोत अथवा आम्हास मारोत; परंतु यांचा घात करण्याचा विचारदेखील मनातही आणणे बरे नाही. ॥225॥
226-1
त्रैलोक्यीचे अनकळित । जरी राज्य होईल प्राप्त । तरी हे अनुचित । नाचरे मी ॥226॥
त्रैलोक्याचे / त्रिभूवनाचे राज्य जरी मिळणार असेल, तरी हे अनुचित कृत्य मी करणार नाही. ॥226॥
227-1
जरी आजि एथ ऐसे कीजे । तरी कवणाच्या मनी उरिजे? । सांगे मुख केवी पाहिजे । तुझे कृष्णा? ॥227॥
जर असे अनुचित कृत्य आम्ही केले, तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील? अशा पापकर्मामुळे तुझे मुख तरी कसे पाहणार? ॥227॥
228-1

निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाऽऽश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः॥1.36॥


भावार्थ :- हे जनार्दना ! धृतराष्टराच्या पुत्रांचा वध करून आम्हाला कोणते बरे सुख लाभणार? ह्या आततायींना मारले असता (कुलनाशाचे) पाप मात्र लागेल. ॥36॥
जरी वधु करोनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडिलासि तु हातीचा । दूरी होसी ॥228॥
जर मी गोत्रजांना ठार केले, तर मी सर्व दोषांचा आश्रयस्थान बनेन. असे झाल्यामुळे तुझ्याशी जोडलेला संबंध मी माझ्या हातानेच दूर केल्यासारखे होईल. ॥228॥
229-1
कुळहरणी पातके । तिये आंगी जडती अशेखे । तये वेळी तु कवणे के । देखावासी? ॥229॥
कुळाचा नाश केल्यामूळे सर्व पातके लागतात. अशा प्रसंगी तुला कोणी कोठे शोधावे? ॥229॥
230-1
जैसा उद्यानामाजी अनळु । संचारला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे ॥230॥
ज्याप्रमाणे बगीचाला भयंकर आग लागलेली पाहून कोकिळा तेथे क्षणभारहि थांबत नाही; ॥230॥

231-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
का सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु । न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ॥231॥
चिखलाने भरलेले सरोवर पाहून चकोर पक्षी तेथील पाण्याचे सेवन न करता त्या सरोवराचा त्याग करून तेथून निघून जातो; ॥231॥
232-1
तयापरी तु देवा । मज झकवू न येसी मावा । जरी पुण्याचा वोलावा । नाशिजैल ॥232॥
त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या हृदयातील पुण्याचा (प्रेमाचा) ओलावा नाहीसा झाला, तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस. ॥232॥
233-1

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥1.37॥


भावार्थ :-
म्हणून हे माधव ! कौरव आमचे बांधव आहेत. त्यांना मारणे आम्हाला योग्य नाही. कारण स्वजनांनाच ठार मारून आम्ही कसे बरे सुखी होऊ? ॥37॥
म्हणोनि मी हे न करी । इये संग्रामी शस्त्र न धरी । हे किडाळ बहुती परी । दिसतसे ॥233॥
म्हणून मी हे कृत्य करणार नाही; या लढाईमध्ये शस्त्र धरणार नाही. कारण हे युद्ध अनेक प्रकारांनी निंद्य आहे, असे मला दिसत आहे. ॥233॥
234-1
तुजसी अंतराय होईल । मग सांगे आमुचे काय उरेल? । तेणे दुःखे हिये फुटेल । तुजवीण कृष्णा ॥234॥
हे श्रीकृष्णा ! युद्धाच्या पापामुळे तुझ्याशी ताटातूट होईल, तर मग तुझ्यावाचून आमचे या जगात काय राहील? त्या वियोग-दुःखानेच आमचे हृदय विदीर्ण होईल. ॥234॥
235-1
म्हणौनि कौरव हे वधिजती । मग आम्ही भोग भोगिजती । हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥235॥
ऐवढ्याकरिता या कौरवांचा वध करून आम्ही राज्याचे भोग भोगावेत, हे राहू दे; ही गोष्ट घडणे अशक्य आहे, असे अर्जुन म्हणाला. ॥235॥
236-1

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥1.38॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥1.39॥


भावार्थ :- अतिलोभामुळे अंतःकरण भ्रष्ट झालेल्या यांना (कौरावांना) कुलक्षयाने होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पातक जरी दिसत नाही, ॥38॥
तरी कुलक्षय केल्याने होणारा दोष ढळढळीत दिसत असताना आम्हालादेखील, ” हे जनार्दना ” , या पापापासून परावृत्त होण्याची जाणीव का असू नये ! ॥39॥
हे अभिमानमदे भुलले । जरी पा संग्रामा आले । तर्‍ही आम्ही हित आपुले । जाणावे लागे ॥236॥
कौरव हे अभिमानांच्या मदाने बहकून गेले आहेत, त्यामुळे ते संग्राम करण्यासाठी आले आहेत; तरी पण आम्ही आपले हित (कशांत) आहे हे पहिले पाहिजे. ॥236॥
237-1
हे ऐसे कैसे करावे? । जे आपुले आपण मारावे? । जाणत जाणताचि सेवावे । काळकूट? ॥237॥
आपलेच आप्तसंबंधी मारावे? हे असे भलतेच कसे करावे? काळकूट विष आहे, हे कळाले, तर ते कसे घ्यावे? ॥237॥
238-1
हा जी मार्गी चालता । पुढा सिंहु जाहला आवचिता । तो तव चुकविता । लाभु आथी ॥238॥
महाराज रस्त्याने चालत असता अकस्मात सिंह आडवा आला, तर त्याला चुकवून जाण्यातच हित आहे. ॥238॥
239-1
असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे? ॥239॥
प्रकाशाचा मार्ग सोडून अंधकारमय विहिरीत जाऊन बसणे, यामध्ये कोणता लाभ आहे? हे देवा ! तूच सांग बरे. ॥239॥
240-1
का समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी । तरी क्षणा एका कवळूनी । जाळू सके ॥240॥
किंवा समोर अग्निज्वाला प्रज्वलीत आहेत हे पाहून आपण बाजूने गेलो नाही, तर त्या अग्निज्वाला एका क्षणात आपणास घेरून जाळून टाकतील. ॥240॥

241-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
तैसे दोष हे मूर्त ॥ अंगी वाजो असती पाहात । हे जाणताही केवी एथ । प्रवर्तावे? ॥241॥
तसेच कुलक्षयामुळे होणारे मूर्तिमंत दोष आम्हाला लागतील, हे कळल्यावरही, आम्ही हे संहाराचे काम कसे बरे करावे? ॥241॥
242-1
ऐसे पार्थु तिये अवसरी । म्हणे देवा अवधारी । या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥242॥
त्यावेळी असे बोलून पार्थ म्हणाला, देवा ऐका. मी तुम्हाला या पापाचे भयंकर परिणाम सांगतो. ॥242॥
243-1

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत॥1.40॥


भावार्थ :- कुलक्षय झाला, की वंशपरंपरेने चालत आलेले म्हणजे सनातन कुलाचार (कुलधर्म) नाहीसे होऊन जातात. त्यामुळे अधर्म सर्व कुल व्यापून टाकतो. ॥40॥
जैसे कष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे । तेणे काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥243॥
ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता तेथे अग्नी निर्माण होतो. तो अग्नी भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो. ॥243॥
244-1
तैसा गोत्रींची परस्परे । जरी वधु घडे मत्सरे । तरी तेणे महादोषे घोरे । कुळचि नाशे ॥244॥
त्याप्रमाणे कुळातील लोकांनी मत्सराने(द्वेषाने) परस्पराचा नाश केला, तर त्या भयंकर महादोषाने कुळच नाशाला पावतें. ॥244॥
245-1
म्हणौनि येणे पापे । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजी ॥245॥
म्हणून या पापाने वंशपरंपरागत आलेल्या कुलधर्मचा लोप होतो आणि मग कूळामध्ये अधर्मच वाढत जातो. ॥245॥
246-1

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः॥1.41॥


भावार्थ :- हे कृष्णा ! अधर्म वाढला, म्हणजे कुलस्त्रिया दुराचारी बनतात. हे वृष्णिकुलोत्पन्न कृष्णा ! कुलस्त्रिया बिघडल्या, की वर्णसंकर उत्पन्न होतो. ॥41॥
एथ सारासार विचारावे । कवणे काय आचारावे । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥246॥
तेथे सारासार विचार नाहीसा होतो, कोणी कोणते आचरण करावे व कर्तव्य काय, अकर्तव्य काय, या सगळ्या गोष्टी लोप पावतात. ॥246॥
247-1
असता दीपु दवडिजे । मग अंधकारी राहाटिजे । तरी उजूचि का अडळिजे । जयापरी ॥247॥
आपल्या जवळ असलेला दिवा विझवून अंधारात चालू लागलो, तर चांगल्या जागीही माणूस अडखळतो. ॥247॥
248-1
तैसा कुळी कुळक्षयो होय । तये वेळी तो आद्यधर्मु जाय । मग आन काही आहे । पापावाचुनी? ॥248॥
त्याप्रमाणे ज्या वेळी कुलक्षय होतो त्या वेळी कुळात परंपरागत चालत असलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथे पापवाचून दुसरे काय असणार.? ॥248॥
249-1
जै यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहाटती । म्हणौनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥249॥
ज्या वेळी इंद्रिये व मन यांचा निग्रह थांबतो, त्यावेळी इंद्रिये स्वैर (व्यवहार करतात) सुटतात म्हणून कुळस्त्रियाकडून व्यभिचार घडतो. ॥249॥
250-1
उत्तम अधमी संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥250॥
उच्च वर्णाच्या स्त्रियांचा नीच वर्णाच्या लोकात संचार होतो. अशा रीतीने वर्णसंकर निर्माण होतो. त्यामुळे जातीधर्म मुळापासून उखडले जातात. ॥250॥

251-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळी । तैसी महापापे कुळी । संचरती ॥251॥
ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूनी कावळे येऊन पडतात, त्याप्रमाणे महापापे (अशा) कुळात सर्व बाजूनी प्रवेश करतात. ॥251॥
252-1

सङ्करो नरकायैव कुलघ्नाना कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः॥1.42॥


भावार्थ :-
वर्णसंकर हा कुलक्षय करणाऱ्यांना आणि सर्व कुळाला नरकात टाकण्यास कारण होतो; कारण पिंडदान आणि तर्पणादि इत्यादी क्रियांचा लोप(लुप्त) झाल्यामुळे त्यांचे पितरसुद्धा पतन पावतात ॥42॥
मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातका । येरयेरा नरका । जाणे आथी ॥252॥
मग त्या (वर्णसंकर) संपूर्ण कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्या अशा दोघांनाही नरकात जावे लागते. ॥252॥
253-1
देखे वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित । मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥253॥
पाहा या प्रमाणे वंशात वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते; आणि स्वर्गात असलेले पूर्वज सहजच पतन पावतात. ॥253॥
254-1
जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक क्रिया पारुखे । तेथ कवणा तिळोदके । कवण अर्पी? ॥254॥
ज्यावेळी रोज करावयाची धार्मिक कार्य (कृत्यें) बंद पडतात, विशेष प्रकारची करावयाची कर्मेही बंद पडतात. अशा परिस्थितीत पितरांना कोण बरे तिलोदक देणार? ॥254॥
2551
तरी पितर काय करिती? । कैसेनि स्वर्गी वसती? । म्हणौनि तेही येती । कुळापासी ॥255॥
असे झाल्यावर पितर तरी काय करणार? ते स्वर्गात कसे राहणार? म्हणून ते देखील नरकात पडलेल्या आपल्या (भ्रष्ट) कूळाजवळ येतात. ॥255॥
256-1
जैसा नखाग्री व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगे । तेवी आब्रह्म कुळ अवघे । आप्लविजे ॥256॥
ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे विष ताबडतोब (हा हा म्हणता) शेंडीपर्यंत सर्वत्र पसरते, त्याप्रमाणे एका कुळात पाप घडले, तर (ब्रम्हदेवापासूनचे पुढील सर्व) ते मूळ पुरुषापर्यंत सर्वास पापात बुडविते. ॥256॥
257-1

दोषैरेतैः कुलघ्नाना वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः॥1.43॥
उत्सन्नकुलधर्माणा मनुष्याणा जनार्दन ।
नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम॥1.44॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः॥1.45॥


भावार्थ :- कुलक्षय करणाऱ्यांच्या या वर्णसंकर करणाऱ्या दोषांनी शाश्वत अशा जातीधर्माचा आणि कुलधर्मचा नाश होतो. ॥43॥
हे जनार्दना ! ज्यांचे कुलधर्म नष्ट झाले आहे त्यांना निश्चितच नरकवास भोगावा लागतो, असे आम्ही ऐकले आहे. ॥44॥
अहो,ज्या अर्थी आम्ही राज्यसुखाच्या लोभाने स्वजनांना ठार मारण्यास तयार (उदुक्त) झालो आहोत (त्या अर्थी खरोखरच) मोठे पाप करण्यास सिद्ध (तयार) झालो आहोत. ॥45॥

देवा अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक । जे संगदोषे हा लौकिक । भ्रंशु पावे ॥257॥
हे देवा ! आणखीन एक गोष्ट ऎक, या वर्णसंकरामुळे आणखी एक महापातक घडते ते असे की, पतितांच्या संसर्गदोषाने इतर लोकांचे आचार-विचार भ्रष्ट होतात. ॥257॥
258-1
जैसा घरी आपुला । वानिवसे अग्नि लागला । तो आणिकाही प्रज्वळिला । जाळूनि घाली ॥258॥
ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नि लागला (आग लागली) म्हणजे तो भडकलेला अग्नि दुसऱ्या घरांनाही जाळून भस्म करते. ॥258॥
259-1
तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधा पावती । निमित्ते येणे ॥259॥
त्याप्रमाणे दुष्ट कुळाचा (संसर्गाने) संगतीमध्ये राहून जे जे लोक आपली कर्मे करतात, ते देखील त्या संसर्गदोषाने दूषित होऊन जातात. ॥259॥
260-1
तैसे नाना दोषे सकळ । अर्जुन म्हणे ते कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥260॥
अर्जुन म्हणतो, त्याप्रमाणे अनेक दोषामुंळे मग त्या सर्व कुळाला भयंकर अशा नरकयातना भोगावे लागतात. ॥260॥

261-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
पडिलिया तिये ठायी । मग कल्पांतीही उकलु नाही । येसणे पतन कुळक्षयी । अर्जुन म्हणे ॥261॥
अर्जुन पुढे म्हणाला, एकदा त्या नरकयातना भोगाव्या लागल्यानंतर (त्या ठिकाणी पडल्यानंतर) कल्पांतदेखील त्यांची सुटका होत नाही. इतके या कलक्षयापासून पतन होते. ॥261॥
262-1
देवा हे विविध कानी ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचे हे काय कीजे । अवधारी पा ॥262॥
हे देवा ! नानाप्रकारची बोलणी कानांने ऐकतोस, पण अजूनपर्यंत तुला काही त्रास (शिसारी येत) होत नाही. तू आपले हृदय वज्रसारखे कठोर केले आहेस काय? ॥262॥
263-1
अपेक्षिजे राज्यसुख । जयालागी ते तव क्षणिक । ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना? ॥263॥
ज्या शरीरकरिता राज्यसुखाची इच्छा करायची, ते शरीर तर क्षणभंगुर आहे, असे कळत असतांनाही, अशा या घडणाऱ्या महापातकाचा त्याग करू नये काय? ॥263॥
264-1
जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पा काय थेंकुले । घडले आम्हा? ॥264॥
हे जे समोर सर्व वाड-वडील जमले आहेत, त्यांचा वध करावा, या दृष्टीने त्यांच्या कडे पहिले, तरीसुद्धा थोडे पाप घडले काय? हे तूच सांगावे. ॥264॥
265-1

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥1.46॥


भावार्थ :- जर हातात शस्त्रे धारण करणारे कौरव प्रतिकार न करणाऱ्या आणि निःशत्र अशा मला, रणांगणावर ठार मारतील, तर माझे अधिक कल्याण होईल. ॥46॥
आता यावरी जे जियावे । तयापासूनि हे बरवे । जे शस्त्र सांडुनि साहावे । बाण यांचे ॥265॥
असे करून जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून कौरवाचे वार सहन करावेत, हे उत्तम ! ॥265॥
266-1
तयावरी होय जितुके । ते मरणही वरी निके । परी येणे कल्मषे । चाड नाही ॥266॥
असे केल्याने जितके दुःख भोगावे लागले तितके सहन करावे इतकेच काय; शेवटी मृत्यू जरी प्राप्त झाला, तरी (तथापि) तो अधिक चांगला; परंतु यांचे (तिथे जमलेल्या आप्तजनांचे) वध करून पातक करण्याची माझी इच्छा नाही. ॥266॥
267-1
ऐसे देखून सकळ । अर्जुने आपुले कुळ । मग म्हणे राज्य ते केवळ । निरयभोगु ॥267॥
याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हंटले की, यांचा नाश करून मिळविलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे. ॥267॥

सञ्जय उवाच ।
एवमुक्त्वाऽर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः॥1.47॥


भावार्थ :- संजय म्हणाला, ” रणांगणावर याप्रमाणे बोलून शोकाकुल चित्ताने धनुष्य व बाण टाकून देऊन अर्जुन रथाखाली उडी टाकून रथामागच्या भागाजवळ बसला. ॥47॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‍भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगोनाम प्रथमोऽध्यायः॥1॥
268-1
ऐसे तिये अवसरी । अर्जुन बोलिला समरी । संजयो म्हणे अवधारी । धृतराष्ट्राते ॥268॥
संजय म्हणाला, हे धृतराष्टरा ! इकडे लक्ष दे. याप्रमाणे रणांगणावर उभा असलेला अर्जुन असे बोलला. ॥268॥
269-1
मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहींवरु आला । तेथ उडी घातली खाला । रथौनिया ॥269॥
मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला गहिवर आवरता आला नाही; मग त्याने रथावरून खाली उडी घातली. ॥269!!
270-1
जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु । का रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥270॥
ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व दृष्टीने (प्रकारांनी) निस्तेज होतो किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेजरहित होतो; ॥270॥

271-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
नातरी महासिद्धिसंभ्रमे । जिंतिला तापसु भ्रमे । मग आकळूनि कामे । दीनु कीजे ॥271॥
अथवा, महासिद्धीच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भुलून जातो (भुलतो) आणि मग तप सोडून कामनेच्या तडाक्यात सापडून दीन होतो. ॥271॥
272-1
तैसा तो धर्नुधरु । अत्यंत दुःखे जर्जरु । दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणे ॥272॥
त्याप्रमाणे अर्जुनाने जेंव्हा रथाचा त्याग केला, तेंव्हा तो धनुर्धारी अर्जुन दुःखाने फार पीडलेला (व्याप्त झालेला) दिसला. ॥272॥
273-1
मग धनुष्य बाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसे ऐक राया वर्तले । संजयो म्हणे ॥273॥
संजय म्हणाला, हे राजा (धृतराष्टरास) ! ऎक. तेथे (रणांगणावर) अशी गोष्ट घडली की, अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिले त्याला रडू आवरेनासे झाले. (म्हणजेच त्याच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या) ॥273॥
274-1
आता यापरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमार्थु । निरूपील ॥274॥
आता यावर (पुढे) तो वैकुंठपती श्रीकृष्ण अर्जुनाला खिन्न, (दुःखी) झालेले पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करतील, ॥274॥
275-1
ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकता । ज्ञानदेव म्हणे आता । निवृत्तिदासु ॥275॥
ती आता पुढे येणारी सविस्तर कथा श्रवण करण्यास फार कौतुककारक आहे, असे निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात. ॥275॥

॥ इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकाया – अर्जुनविषादयोगोनाम् प्रथमोऽध्यायः॥1॥
॥ एकूण भग्वद्गीतगीता श्लोक :- 47 ॥
॥ एकूण ज्ञानेश्वरी ओव्या :- 275 ॥


-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम

सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सूची

वारकरी ग्रंथ सूची

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 887

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading