दीपोत्सव ओव्या, दिपोत्सव ओवी, ज्ञानेश्वरी पारायण

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

Dnyaneshwari Parayan Dipostsav ovya,

सूची :- शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

दिपोत्सव ओवी, ज्ञानेश्वरी पारायण दीपोत्सव ओव्या
Dipostsav ovi, Dnyaneshwari Parayan

येर्‍हवी तरी मी मुर्खु ।🪔
जरी जाहला अविवेकु ।🪔
तर्‍ही संतकृपादीपकु ।🪔
सोज्वळु असे 🪔
॥ ओवी 76 – अध्याय 1 ॥🪔

जैसे मार्गेचि चालता ।🪔
अपावो न पवे सर्वथा ।🪔
का दीपाधारे वर्तता ।🪔
नाडळिजे🪔
॥ ओवी 187- अध्याय 2 ॥🪔

जैसी दीपकळिका धाकुटी ।🪔
परी बहु तेजाते प्रगटी ।🪔
तरी सद्बुद्धि हे थेकुटी ।🪔
म्हणो नये🪔
॥ ओवी 238 – अध्याय 2 ॥🪔

जैसा निर्वातीचा दीपु ।🪔
सर्वथा नेणे कंपु ।🪔
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु ।🪔
योगयुक्तु🪔
॥ ओवी 341- अध्याय 2 ॥🪔

मी अविवेकाची काजळी ।🪔
फेडूनी विवेकदीप उजळी ।🪔
तै योगिया पाहे दिवाळी ।🪔
निरंतर🪔
॥ ओवी 54 – अध्याय 4 ॥🪔

ऐसे सर्वज्ञानाचा बापु ।🪔
जो कृष्ण ज्ञानदीपु ।🪔
तो म्हणतसे सकृपु ।🪔
ऐके राया🪔
॥ ओवी 210 – अध्याय 4 ॥🪔

जैशी पूर्वदिशेच्या राउळी ।🪔
उदयाचि सूर्ये दिवाळी ।🪔
की येरीही दिशा तियेचि काळी ।🪔
काळिमा नाही🪔
॥ ओवी 86 – अध्याय 5 ॥🪔

परि तो रसातिशयो मुकुळी ।🪔
मग ग्रंथार्थदीपु उजळी ।🪔
करी साधुहृदयराउळी ।🪔
मंगळ उखा🪔
॥ ओवी 142 – अध्याय 5 ॥🪔

ते बुध्दीही आकळिता सांकडे ।🪔
म्हणऊनि बोली विपाये सापडे ।🪔
परि निवृत्तिकृपादीपउजियेडे ।🪔
देखेन मी🪔
॥ ओवी 32 – अध्याय 6 ॥🪔

दीपा आणि प्रकाशा ।🪔
एकवंकीचा पाडु जैसा ।🪔
तो माझ्या ठायी तैसा ।🪔
मी तयामाजी🪔
॥ ओवी 396 – अध्याय 6 ॥🪔

तया चक्रवाकांचे मिथुन ।🪔
सामरस्याचे समाधान ।🪔
भोगवी जो चिद्गगन ।🪔
भुवनदिवा🪔
॥ ओवी 16 – अध्याय 6 ॥🪔

जो सवर्ज्ञतेचा वोलावा ।🪔
जो यादवकुळीचा कुळदिवा ।🪔
तो श्रीकृष्णजी पांडवा- ।🪔
प्रति बोलिला🪔
॥ ओवी 270 – अध्याय 8 ॥🪔


दीपु ठेविला परिवरी ।🪔
कवणाते नियमी ना निवारी ।🪔
आणि कवण कवणिये व्यापारी ।🪔
राहाटे तेहि नेणे🪔
॥ ओवी 128 – अध्याय 9 ॥🪔

जैसा दीपे दीपु लाविजे ।🪔
तेथ आदील कोण हे नोळखिजे ।🪔
तैसा सर्वस्वे जो मज भजे ।🪔
तो मी होऊनि ठाके🪔
॥ ओवी 428 – अध्याय 9 ॥🪔

तया तत्त्वज्ञा चोखटा ।🪔
दिवी पोतासाची सुभटा ।🪔
मग मीचि होऊनि दिवटा ।🪔
पुढा पुढा चाले🪔
॥ ओवी 142 – अध्याय 10 ॥🪔

ती अक्षरे नव्हती देखा ।🪔
ब्रह्मसाम्राज्यदीपिका ।🪔
अर्जुनालागी चित्कळिका ।🪔
उजळलिया श्रीकृष्णे🪔
॥ ओवी 178 – अध्याय 11 ॥🪔

का घरीचिया उजियेडु करावा ।🪔
पारखिया आंधारु पाडावा ।🪔
हे नेणेचि गा पांडवा ।🪔
दीपु जैसा🪔
॥ ओवी 198 – अध्याय 12॥🪔

का स्नेहसूत्रवन्ही ।🪔
मेळु एकिचि स्थानी ।🪔
धरिजे तो जनी ।🪔
दीपु होय🪔
॥ ओवी 154- अध्याय 13 ॥🪔

नातरी केळी कापूर जाहला ।🪔
जेवी परिमळे जाणो आला ।🪔
का भिंगारी दीपु ठेविला ।🪔
बाहेरी फांके🪔
॥ ओवी 183 – अध्याय 13 ॥🪔

काळशुद्धी त्रिकाळी ।🪔
जीवदशा धूप जाळी ।🪔
न्यानदीपे वोवाळी ।🪔
निरंतर🪔
॥ ओवी 389 – अध्याय 13 ॥🪔

श्रीगुरु वोवाळिजती ।🪔
का भुवनीजे उजळिजती ।🪔
तया दीपांचिया दीप्ती ।🪔
ठेवीन तेज🪔
॥ ओवी 434 – अध्याय 13 ॥🪔

म्हणौनि सद्भाव जीवगत ।🪔
बाहेरी दिसती फांकत ।🪔
जे स्फटिकगृहीचे डोलत ।🪔
दीप जैसे🪔
॥ ओवी 476 – अध्याय 13 ॥🪔

उदक होऊनि उदकी ।🪔
रसु जैसा अवलोकी ।🪔
दीपपणे दीपकी ।🪔
तेज जैसे🪔
॥ ओवी 893 – अध्याय 13 ॥🪔

दीपांचिया कोडी जैसे ।🪔
एकचि तेज सरिसे ।🪔
तैसा जो असतुचि असे ।🪔
सर्वत्र ईशु🪔
॥ ओवी 1077 – अध्याय 13 ॥🪔

दीपकाची अर्ची ।🪔
राहाटी वाहे घरीची ।🪔
परी वेगळीक कोडीची ।🪔
दीपा आणि घरा🪔
॥ ओवी 1124 – अध्याय 13 ॥🪔

नातरी दीपमूळकी ।🪔
दीपशिखा अनेकी ।🪔
मीनलिया अवलोकी ।🪔
होय जैसे🪔
॥ ओवी 55- अध्याय 14 ॥🪔

नातरी येथिचा दिवा ।🪔
नेलिया सेजिया गांवा ।🪔
तो तेथे तरी पांडवा ।🪔
दीपचि की🪔
॥ ओवी 221 – अध्याय 14 ॥🪔

पै होऊनि दीपकलिका ।
येरु आगी विझो का ।🪔
का जेथ लागे तेथ असका ।🪔
तोचि आहे🪔
॥ ओवी 257 – अध्याय 14 ॥🪔

जैसा भिंगाचेनि घरे ।🪔
दीपप्रकाशु नावरे ।🪔
का न विझेचि सागरे ।🪔
वडवानळु🪔
॥ ओवी 14 – अध्याय 308 ॥🪔

सूर्यें अधिष्ठिली प्राची ।🪔
जगा राणीव दे प्रकाशाची ।🪔
तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची ।🪔
दिवाळी करी🪔
॥ ओवी 12 – अध्याय 15 ॥🪔

ज्ञानेश्वरी नमन

वक्रतुण्ड् महाकाय सूर्य कोटि समप्रभ:
निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा: ॥१॥

गणनाथ सरस्वति रवि शुक्र बृहस्पति !
पञ्चैतानि स्मरेनित्यं वेदवाणी प्रवृत्तते ॥२॥

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः !
गुरुः साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे: नमः ॥३॥

ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् .
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीं
मम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवेद्वेषिणीम् ॥१॥

नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र.
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः ॥२॥

प्रपन्नपारिजातायतोत्रवेत्रैकपाणये .
ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः ॥३॥

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् .
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥४॥

भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला
शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला .
अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी
सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तकः केशवः ॥५॥

पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं
नानाख्यानककेसरं हरिकथासम्बोधनाबोधितम् .
लोके सज्जनषट्पदैरहरहः पेपीयमानं मुदा
भूयाद्भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसि नः श्रेयसे ॥६॥

मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् .
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥७॥


        अथ गीतामाहात्म्यम् .

गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत्प्रयतः पुमान् .
विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः ॥१॥

गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च .
नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च ॥२॥

मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने .
सकृद्गीताम्भसि स्नानं संसारमलनाशनम् ॥३॥

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः .
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिःसृता : ॥४॥

भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिःसृतम् .
गीतागङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते ॥५॥

सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नन्दनः .
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥६॥

एकं शास्त्रं देवकीपुत्रगीत
       मेको देवो देवकीपुत्र एव .
एको मन्त्रस्तस्य नामानि यानि
      कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ॥७॥

अथ ध्यानम्

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् .
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥८॥

यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः
वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः .
ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो
यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः ॥९॥

               .. इति ध्यानम् ..

ग्रंथ आणि ग्रंथ कर्तां स्तुती

ॐ नमो ज्ञानेश्वरा ! करूणा करा दयाळा ॥१॥
 तुमचा अनुग्रह लाधलो ! पावन झालो चराचरी ॥२॥
 मी कळा कुसरी काहीच नेणे ! बोलतो वचने अति भाविका ॥३॥
एका जनार्दनी तुमचा दास ! त्याची आस पुरवावी ॥४॥

पाहे पा ध्वजेचे चिरगुट ! राया जतन करिता कष्ट ॥१॥
तैसा मी एक पतित ! परी तुझा मुद्रा अंकित ॥२॥
मही पत्र ते केव्हढे ! रावो चालवी आपुल्या पाडे ॥३॥
बाप रखुमादेवी वरदा !  सांभाळावे आपुल्या ब्रिदा ॥४॥

पतित पतित पतित ! मी तो त्रिवाचा पतित ॥१॥
परी तू आपुलीया सत्ते ! मज करावे सरते ॥२॥
नाही चित्त शुद्धी ! स्थिर पायापाशी बुद्धी ॥३॥
अपराधाचा केलो ! तुका म्हणे काय बोलो ॥४॥

ज्ञानदेव माझी योग्यांची माऊली । जेणे निगमवल्ली प्रकट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रकट केली ॥२॥
अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छप्पन भाषेचा केलासे गौरव । भवार्णवी नाव उभारीली ।।४॥
श्रवणाचे मिषे बैसावे येऊनी । साम्राज्य भुवनी सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव । एकतरी ओवी अनुभवावी ॥६॥

कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥
न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥
भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ।।४॥

भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ।।१॥
स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु । श्री गिता हा प्रश्नू अर्जुनेशी ।।२॥
तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे । भय कळीकाळाचे नाही तया ।।३॥
एका जनार्दनी संशय सांडोनी । दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी ।।४॥


श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा ।
जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥1॥

सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा ।
महानंदा  महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ध्रु.॥

चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा ।
सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥2॥

कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती ।
भवतारका धरित्या क्षिती  । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥3॥

अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना।
वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥4॥

तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणी ।
हे चि करीतसे विनवणी । भवबंधनी सोडवावे ॥5॥

पारायणा नंतर पसायदान म्हणावे

1794-18

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥1794॥
आता, सर्व विश्वाचा आत्मा जो परमेश्वर याने ह्या माझ्या वाग्यज्ञरूप सेवेने प्रसन्न होऊन मजवर हा प्रसाद करावा.94

1795-18
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूता परस्परे पडो । मैत्र जीवाचे ॥1795॥
खलजनांच्या दुष्ट बुद्धीला पालट पडून त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न व्हावी व सर्व भूतांच्या ठिकाणी परस्पराबद्दल मित्रभाव नांदावा. 95

1796-18
दुरिताचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥1796॥

पातकरूप अंधकाराचा नाश होऊन जगात धर्मरूप सूर्याच उदय असो व प्राणिमात्रांच्या सदिच्छा फलद्रूप होवोत. 96

1797-18
वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूता ॥1797॥
ईश्वरनिष्टांचा समुदाय भूतलावर सकल मंगलांचा अखंड वर्षाव करीत असलेला सर्व भेटो. 97

1798-18
चला कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचे गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥1798॥
ती संतमंडळी म्हणजे चालते कल्पतरूचे बाग चेतन चिंतामणीचे गाव व अमृताचे बोलते समुद्रच होत. 98

1799-18
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ॥1799॥

निष्कलंक चंद्र, अतापदायी सूर्य, असे जे सज्जन ते सर्व लोकांच्या प्रेमाचे स्थान असो. 99

1800-18
किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिही लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥1800॥
किंबहुना, त्रैलोक्य सुखी होऊन त्यांनी विश्वपालक जो आदिपुरुष त्याचे अखंड भजन करावे. 1800

1801-18
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकींये ।
दृष्टादृष्ट विजये । होआवे जी ॥1801॥

आणि विशेषत: येथे हाच ग्रंथ ज्यांनी आपले उपजीव्य मानिले आहे (सर्वाधार, तारक) त्यांना दृष्ट व अदृष्ट विजयसुखाचां लाभ घडत जावा. 1801

1802-18
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥1802॥

तेव्हा सद्गुरू निवृत्तिनाथ प्रसन्न होऊन म्हणाले, ” तथास्तु ‘; तुझी ही इच्छा सफल होईल असा तुला प्रसाद आहे; त्यायोगे ज्ञानेश्वर महाराज सुखी झाले.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading