“८ डिसेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 8 December
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ८ डिसेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
८ डिसेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १२९१ ते १३१०,
1291-18
म्हणौनिया तिही गुणी । बांधिलासि तू कोदंडपाणी । त्रिशुद्धी निघसी वाहणी । क्षात्राचिया ॥1291॥
अर्जुना, त्या गुणांनी तू जन्मतः बांधलेला आहेस. अखेर ते तुला क्षात्र वळणावर नेणारच. 91
1292-18
ना हे आपुले जन्ममूळ । न विचारीतचि केवळ । न झुंजे ऐसे अढळ । व्रत जरी घेसी ॥1292॥
अथवा आपला जन्म कोणत्या कुलांत आहे. ह्याचा काहींएक विचार न करिता नुसता लढणार नाही असा निश्चय करून बसशील. 92
1293-18
तरी बांधोनि हात पाये । जो रथी घातला होये । तो न चाले तरी जाये । दिगंता जेवी ॥1293॥
तरी, हातपाय बांधून रथीत घातलेला मनष्य स्वतः न चालतांही जसा रथाबरोबर देशांतराला पोचतो 93
1294-18
तैसा तू आपुलियाकडुनी । मी काहीच न करी म्हणौनि । ठासी परी भरवसेनि । तूचि करिसी ॥1294॥
त्याप्रमाणे आपण काही करणार नाही अशा निश्चयाने तू जरी असलास तरी, खात्रीने तूच ते करणार. 94
1295-18
उत्तरु वैराटीचा राजा । पळता तू का निघालासी झुंजा ? । हा क्षात्रस्वभावो तुझा । झुंजवील तुज ॥1295॥
विराट नगराचा राज उत्तर, युद्धांतून पळू लागला, तेव्हा तू रे का ते युद्ध केलेस ? हा तुझा क्षात्रस्वभाव तुला युद्ध करू लावणारच. 95
1296-18
महावीर अकरा अक्षौहिणी । तुवा येके नागविले रणांगणी । तो स्वभावो कोदंडपाणी । झुंजवील तूते ॥1296॥
अर्जुना, त्या युद्धांत अकरा अक्षौहिणी महावीर तू एकटयानं पराजित करून त्यांची वस्त्रे हिराऊन घेतलीस, तो तुझा क्षत्रियाचा स्वभाव तुला झुंजविणारच. 96
1297-18
हा गा रोगु कायी रोगिया । आवडे दरिद्र दरिद्रिया ? । परी भोगविजे बळिया । अदृष्टे जेणे ॥1297॥
अरे, रोग्याला रोगाची किंवा निर्धनाला निर्धनत्वाची काय आवड असते ? पण बलवान अदृष्ट तसे भोग देतेच. 97
1298-18
ते अदृष्ट अनारिसे । न करील ईश्वरवशे । तो ईश्वरुही असे । हृदयी तुझ्या ॥1298॥
ईश्वराधीन असलेले ते अदृष्ट अन्यथा काहीही करू शकत नाही; व तो ईश्वरही तुझ्याच हृदयाच्या ठिकाण आहे, 98
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥18. 61॥
1299-18
सर्व भूतांच्या अंतरी । हृदय महाअंबरी । चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरी । उदयला असे जो ॥1299॥
भूतमात्रांच्या अंतःकरणरूपी महाकाशांत, जो ज्ञानवृत्तिरूप अनंत किरणांनी उदय पावला आहे 99
1300-18
अवस्थात्रय तिन्ही लोक । प्रकाशूनि अशेख । अन्यथादृष्टि पांथिक । चेवविले ॥1300॥
व जो जीवांच्या जागृति, स्वप्न व सुषुप्ति ह्या तिन्ही अवस्थारूप लोकास प्रकाशून, देहात्मबुद्धीच्या विपरीत ज्ञानाने सन्मार्गच्युत झालेल्या त्या जीवरूपी पांथिकांना ( वाटसरूंना जागे करितो. 1300
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1301-18
वेद्योदकाच्या सरोवरी । फांकता विषयकल्हारी । इंद्रियषट्पदा चारी । जीवभ्रमराते ॥1301॥
व जो दृश्यपदार्थ हेच आहे उदक ज्यात, अशा सरोवरांत पंचविषयरूप कमले प्रफुल्लीतझाली असता, पंचज्ञानेंद्रिये व मन हे आहेत सहा पाय ज्या जीवभ्रमरांना, त्यांजकडून तो कमलगंध सेवन करवितो. 1301
1302-18
असो रूपक हे तो ईश्वरु । सकल भूतांचा अहंकारु । पांघरोनि निरंतरु । उल्हासत असे ॥1302॥
हे रूपक असो; असा समष्टिभूतांच्या अहंकाराचा अभिमान निरंतरधारण करून जो मिरवत असतो. तो ईश्वर होय. 1302
1303-18
स्वमायेचे आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र । बाहेरी नटी छायाचित्र । चौऱ्यांशी लक्ष ॥1303॥
आपल्या शुद्ध स्वरूपाच्या आपल्याच मायेचा पडदा लावून, एकटा सर्व दोरी हलवून, बाहेर चौऱ्यांंशी लक्ष विचित्र छायाचित्रे नाचवितो. 1303
1304-18
तया ब्रह्मादिकीटांता । अशेषांही भूतजाता । देहाकार योग्यता । पाहोनि दावी ॥1304॥
तो, ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत अशेष भूतमात्रांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार देह देतो. 1304
1305-18
तेथ जे देह जयापुढे । अनुरूपपणे मांडे । ते भूत तया आरूढे । हे मी म्हणौनि ॥1305॥
त्यावेळी, ज्या भूतापुढे जो देह त्याला योग्य किंवा अनरूप म्हणून मांडवा, त्या देहांत ते भूत, ‘ हा मी ” अशा बुद्धीने प्रवेश करिते. 1305
1306-18
सूत सूते गुंतले । तृण तृणचि बांधले । का आत्मबिंबा घेतले । बाळके जळी ॥1306॥
सुताने सूत गुंतवावे, गवतानेच गवत बांधावे, किंवा बालकाने पाण्यातील आपले प्रतिबिंब घेऊ पहावे. 1306
1307-18
तयापरी देहाकारे । पापियाचा आपणपेचि दुसरे । देखोनि जीव आविष्करे । आत्मबुद्धि ॥1307॥
त्याप्रमाणे पुढे दिसणारी देहाकृति ही आपणच आहो असे भ्रमाने मानून जीव तेथे आत्मबुद्धीने आविर्भूत होतो. 1307
1308-18
ऐसेनि शरीराकारी । यंत्री भूते अवधारी । वाहूनि हालवी दोरी । प्राचीनाची ॥1308॥
ह्याप्रमाणे देहाकार यंत्रांवर भूतांना घालून, त्यांच्या प्रारब्धकर्मानुसार ईश्वर सूत्र चाळवतो. 1308
1309-18
तेथ जया जे कर्मसूत्र । मांडूनि ठेविले स्वतंत्र । ते तिये गती पात्र । होचि लागे ॥1309॥
तेथे ज्या ज्या भूताचे (जीवाचे) जे जे स्वतंत्र (निराळे) प्रारब्धसूत्र मांडलेले असते त्या त्या गतीला ते ते भूत प्राप्त होऊ लागले. 1309
1310-18
किंबहुना धनुर्धरा । भूतांते स्वर्गसंसारा । -माजी भोवंडी तृणे वारा । आकाशी जैसा ॥1310॥
किंबहुना अर्जुना, वारा गवताच्या काड्या जशा आकाशात इतस्ततः उडवितो, तसे हे जीवाचे प्रारब्धकर्म त्यांना स्वर्गा पासून मृत्युलोकापर्यंत इतस्ततः फिरविते. 1310
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
क्षेपक अभंग
दिवस ३४२ वा. ८, डिसेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४०९३ ते ४१०४
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम महाराजांचे क्षेपक अभंग ऐकूण 402 आहेत, आणि मूळ अभंग 4092 असे सर्व 4502 अभंग सापडतात, त्यापैकी आतापर्यंत आपण संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथ्यात्यातली एकूण 4092 अभंगाचे पारायण केलेले आहे, आता ४०२ क्षेपक अभंग टाकून दिलेले जे अभंग महाराजांच्या नावावर इतरांनी रचलेली आहेत, किंवा त्यांना शिक्का तुकाराम महाराज लावला आहे, परंतु महाराजांनी स्वतः रचलेले नाहीत, अशी शंका अभंग संशोधन करणार् यांना निर्माण झाली, त्या भागात संशोधन केले असता ती त्यांच्यानिकासास अर्थात त्यांच्या कसोटीला खरे उतरले नसल्याने, त्यांना “क्षेपक अभंग” म्हणून बाजूला सरले, ‘क्षेपक’ शब्द मूळचा संस्कृतमध्ये धातू आहे, त्याचा अर्थ टाकून देणे, म्हणून क्षेपक असं नाव देण्यात आलेले आहे, हे क्षेपक अभंग वारकरी फडांच्या अनेक कार्यक्रमात अभंग गाताना दिसत नाहीत, तरीही त्यांना इतर जनमाणसांच्या मोठी गातांना सापडतात. त्यातील काही प्रसिद्ध आहेत.
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

