Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

४ डिसेंबर, दिवस ३३८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १२११ ते १२३० सार्थ तुकाराम गाथा अभंग ४०४५ ते ४०५६

4 DECEMBER NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

4 DECEMBER NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“४ डिसेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 4 December
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ४ डिसेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
४ डिसेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १२११ ते १२३०,

1211-18
जेव्हा कापुर जळो सरे । तयाचि नाम अग्नि पुरी । मग उभयतातीत उरे । आकाश जेवी ॥1211॥
कापुराच्या जळण्याची समाप्ति तीच अग्नीची समाप्ति होय. मग तेथे कापूरही नसतो व अग्नीही नसतो; केवळ आकाश असते. 1211
1212-18
का धाडलिया एका एकु । वाढे तो शून्य विशेखु । तैसा आहे नाहीचा शेखु । मीचि मग आथी ॥1212॥
एकांतून एक वजा केला की खाली शून्य उरते, तसे “आहे नाही ” ह्या व्यवहार लोपानंतरही तद्व्यवहार सिद्धि ज्यावर होते असे जे शेष (अवधिभूत ) वस्तु ते मीच होय. 1212
1213-18
तेथ ब्रह्मा आत्मा ईशु । यया बोला मोडे सौरसु । न बोलणे याही पैसु । नाही तेथ ॥1213॥
अशा स्थितीत ब्रह्म, आत्मा, ईश, अशी भाषा बोलण्याने तिचे स्वारस्य किंवा महत्त्व नष्ट झाल्यासारखे होते; व तद्विषयक मौनाचा निश्चयही अयुक्तच होय (अशी बोलाबोलातीत ती वस्तु आहे) 1213
1214-14
न बोलणेही न बोलोनी । ते बोलिजे तोंड भरुनी । जाणिव नेणिव नेणोनी । जाणिजे ते ॥1214॥
म्हणून, न बोलण्याचाही निश्चय सोडून त्याजबद्दल तोंड भरून चर्चा करावी; पण ते जाणले जाते किंवा जाणले जात नाही असा निश्चय न करिता या दोन्ही कल्पनाहून अतीत ( स्वसंवेद्य ) आहे असे जाण. 14
1215-18
तेथ बुझिजे बोधु बोधे । आनंदु घेपे आनंदे । सुखावरी नुसधे । सुखचि भोगिजे ॥1215॥
त्या स्थितीत बोधरुपालाच बोध होतो, आनंदालाच आनंद व सुखालाच सुखाचा भोग घडत असतो. 15


1216-18
तेथ लाभु जोडला लाभा । प्रभा आलिंगिली प्रभा । विस्मयो बुडाला उभा । विस्मयामाजी ॥1216॥
तेथे लाभालाच लाभ; प्रभेलाच प्रभेची भेट, अशी स्थिति असून, विस्मय विस्मयातच समूळ बुडतो. 16
1217-18
शमु तेथ सामावला । विश्रामु विश्रांति आला । अनुभवु वेडावला । अनुभूतिपणे ॥1217॥
तेथे समत्व साम्याला आले, विश्राम विश्रांतीला आला व अनुभवालाच अनुभूतित्वरूप येऊन तोही वेडावला ! (नाहीसा झाला) 17
1218-18
किंबहुना ऐसे निखळ । मीपण जोडे तया फळ । सेवूनि वेली वेल्हाळ । क्रमयोगाची ते ॥1218॥
क्रमयोगरूप वेलीचे पाणिग्रहण करणाऱ्या त्या योग्याला असे जे माझे निखळ (असंग) स्वरूप त्याची प्राप्ति होते. 18
1219-18
पै क्रमयोगिया किरीटी । चक्रवर्तीच्या मुकुटी । मी चिद्रत्न ते साटोवाटी । होय तो माझा ॥1219॥
अर्जुना, ह्या सार्वभौम क्रमयोग्याने माझी आपल्या मुकुटावर चिद्रत्न म्हणून योजना केली आहे, तो व्यवहार मोबदल्याचा आहे. (बदला मी त्याला माझ्या हृदयात आत्मत्वाने स्थान दिले आहे) 19
1220-18
की क्रमयोगप्रासादाचा । कळसु जो हा मोक्षाचा । तयावरील अवकाशाचा । उवावो जाला तो ॥1220॥
किंवा, त्या क्रमयोगरूपी मंदिरावर जो हा मोक्षरूपी कळस बसविला जाणार त्या कलशाची बैठक किंवा आतील (घुमटीतील) पोकळी हा होतो. 1220
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


1221-18
नाना संसार आडवी । क्रमयोग वाट बरवी । जोडिली ते मदैक्यगावी । पैठी जालीसे ॥1221॥
अथवा ह्या भवारण्यातील क्रमयोग हा राजरस्ताच होय; ह्याने गेले असता मद्पता ” हा जो सीमाप्रांत त्याला योगी मोजका येतो 21
1222-18
हे असो क्रमयोगबोधे । तेणे भक्तिचिद्गांगे । मी स्वानंदोदधी वेगे । ठाकिला की गा ॥1222॥
अथवा हेही असो; ह्या क्रमयोगरूपी ओघांतून वाहणारी ही भक्तिचिद्गंगा, वेगाने, निजानंदसागर जो मी, त्या मला येऊन गांठते व मद्रुप होते. 22
1223-18
हा ठायवरी सुवर्मा । क्रमयोगी आहे महिमा । म्हणौनि वेळोवेळा तुम्हा । सांगतो आम्ही ॥1223॥
अर्जुना, हा क्रमयोग अखेरपर्यंत पोंचविणारा आहे, असा ह्याचा महिमा आहे; व म्हणूनच आम्ही त्याचे वारंवार वर्णन केले. 23
1224-18
पै देशे काळे पदार्थे । साधूनि घेइजे माते । तैसा नव्हे मी आयते । सर्वाचे सर्वही ॥1224॥
कारण, देशविशेषांत, कालविशेषांत अथवा साधनविशेषाने होणारी अशी माझी प्राप्ति नसून, मी सर्वाचा आत्माच असल्याने सर्वाना सर्वदा सहजच प्राप्त आहे. 24
1225-18
म्हणौनि माझ्या ठायी । जाचावे न लगे काही । मी लाभे इये उपायी । साचचि गा ॥1225॥
म्हणून, माझ्या प्राप्त्यर्थे कोणतेही सायास करावे लागत नाहीत. ह्या वरील क्रमयोगाने मी निश्चयाने सहज प्राप्त होतो 25


1226-18
एक शिष्य एक गुरु । हा रूढला साच व्यवहारु । तो मत्प्राप्तिप्रकारु । जाणावया ॥1226॥
एक गुरु, एक शिष्य, असा जो संप्रदाय लोकात रूढ आहे, तो मत्प्राप्तीचे योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून होय 26
1227-18
अगा वसुधेच्या पोटी । निधान सिद्ध किरीटी । वन्हि सिद्ध काष्ठी । वोहा दूध ॥1227॥
अरे, पूर्वीच्या पोटात अनंत ठेवे, काष्ठांत अग्नि व कासेंत दुध, नित्य सिद्ध आहेतच. 27
1228-18
परी लाभे ते असते । तया कीजे उपायाते । येर सिद्धचि तैसा तेथे । उपायी मी ॥1228॥
परंतु, ते सिद्ध असलेले पदार्थच प्राप्त करून घेण्यास काही उपाय करावे लागतात; त्याप्रमाणे नित्यसिद्ध असलेल्या माझ्या प्राप्तीचेही उपाय करावे लागतात. 28
1229-18
हा फळहीवरी उपावो । का पा प्रस्तावीतसे देवो । हे पुसता परी अभिप्रावो । येथिचा ऐसा ॥1229॥
स्वतःच्या प्राप्तीचे उपाय मागे सांगितले असता, पुन्हा त्याच विषयाची देव प्रस्तावना का करीत आहेत असे कोणास वाटल्यास येथे देवांच्या मनातील अभिप्राय असा आहे, 29
1230-18
जे गीतार्थाचे चांगावे । मोक्षोपायपर आघवे । आन शास्त्रोपाय की नव्हे । प्रमाणसिद्ध ॥1230॥
की, सर्व गीताशास्त्र, हे स्वतःप्रमाण वेदांचे सार असून मोक्षोपायदर्शक आहे; अन्यशास्त्रोपाय असले तरी, ते प्रमाण सिद्ध असतीलच असे सांगता येत नाही. 1230
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस ३३८ वा. ४, डिसेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४०४५ ते ४०५६
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. ४०४५
बरवे झाले लागलो कारणी । तुमचे राहिलो चरणी । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणी वैखरी ॥१॥
न वंचे शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसी । झालो संताची अंदणी दासी । केला येविशी निर्धार ॥धृपद॥
जीवनी राखिला जिव्हाळा । झालो मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥२॥
जयाचे जया होईल ठावे । लाहो या साधियेला भावे । ऐसे होते राखियले जीवे । येथूनि देवे भोवंडुनी ॥३॥
आस निरसली ये खेपे । अवघे पंथ झाले सोपे । तुमचे दीनबंधु कृपे । दुसरे कापे सत्ताधाके ॥४॥
अंकिले पणे आनंदरूप । आतळो नये पुण्यपाप । सारूनि ठेविले संकल्प । तुका म्हणे आपे आप एकाएकी ॥५॥
अर्थ
बरे झाले देवा तुमची सेवा करण्याच्या निमित्ताने तुमच्या पायाजवळ मी राहिलो आहे. आता संतसंगतीमध्ये राहून तुमचे गुणगान माझ्या वाणीने वर्णन करण्याची आणि हरीनामाचा जयघोष करण्याची माझी इच्छा तृप्ती होईपर्यंत करुन घेईन. मी माझ्या शरीराला तुमच्या सेवेवाचून वंचित राहू देणार नाही. कायावाचा मनाने मी तुमची सेवा करीन. दासीला ज्याप्रमाणे आंदन दयावे त्याप्रमाणे मी संतांची आंदन दासी झालो आहे आणि त्याविषयी मी पूर्णपणे निर्धार केला आहे. देवा तुम्ही जगाचे जीवन आहात त्याच जीवनाशी मी माझा जिव्हाळा राखला आहे. आणि मी माझ्यापासून म्हणजे या देहापासून व देहसंबंधीपासून निराळा होऊन राहिलो आहे. आता पंचमहाभूतांचा हा पुतळा म्हणजे देह या जगामध्ये सहजच वावरत आहे. ज्या देवाने हा देह दिला आहे त्या देवालाच या देहाची काळजी आहे त्यामुळे मी तर केवळ आता भक्तिभाव करण्याचे ठरविलेले आहे. अशा स्थितीतून बाहेर काढून ��
26/12/22, 10:27 Sdm:
अभंग क्र. ४०४६
अवघ्या दशा येणे साधती । मुख्य उपासना सगुणभक्ती । प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुद्धी जाणोनिया ॥१॥
बीज आणि फळ हरींचे नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळा काळाचे हे वर्म । निवारी श्रम सकळ ही ॥धृपद॥
जेथे कीर्तन हे नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥२॥
येती अंगा वसती लक्षणे । अंतरी देवे धरिले ठाणे । आपणचि येती तयांचे गुण । जाणे येणे खुंटे वस्तीचे ॥३॥
न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळीचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचे ॥४॥
वेदपुरुष नारायण । योगियांचे ब्रम्ह शून्य । मुक्ता आत्मा परिपूर्ण । तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा ॥५॥
अर्थ
हरीची सगुण भक्ती करणे हीच मुख्य उपासना असून यानेच सर्व काही साध्य होते. आणि भक्तांचा शुध्द भक्तिभाव जाणून हरीची मूर्ती ह्दयामध्ये प्रगट होते. हरीचे नाम हेच सर्व फळ, सर्व पुण्य व सर्व धर्माचे मुख्य बीज आहे. सर्व ज्ञानपणाचे वर्म देखील हरीचेनाम आहे आणि सर्व संसारातील श्रम निवारण करण्याचे साधन बीज नामच आहे. जेथे हरीचे दास निर्लज्ज होऊन हरी कीर्तन व हरीनामाचा घोष करत असतात, अश्या हरीनामाच्या ठिकाणी सर्वची सर्व म्हणजे नऊ रस येऊन आश्रयाला राहातात आणि हरीनामाने सर्व भवबंधनाचे पाश तुटतात. ज्याच्या अंत:करणात देवाने ठाण मांडून ठेवले आहे म्हणजे वास केला आहे त्याच्या अंगी शुध्द भक्तीची लक्षणे ज्ञानाची लक्षणे लगेच वास्तव्याला येतात. आपणच आपले येऊन ते गुण त्याच्या ठिकाणी राहातात आणि जन्ममरणरुपी येणे जाणे खुंटित होते. हरीची सगुण भक्ती करण्यासाठी आपला आश्रम टाकावा लागत नाही कि��
26/12/22, 10:28 Sdm:
अभंग क्र. ४०४७
श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥१॥
सकळ देवाधिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महानंदा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥धृपद॥
चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥२॥
कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥३॥
अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना । वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥४॥
तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणी । हेचि करीतसे विनवणी । भवबंधनी सोडवावे ॥५॥
अर्थ
हे श्री अनंता मधुसूदना तुझी नाभी कमलासारखी असलेल्या नारायणा. संपूर्ण जगामध्ये तू व्यापक असणा-या जनार्दना, आनंदघना, अविनाशा, हे जी केशवा महाराज तुम्ही सर्व देवाचे आदिदेव आहात तुम्ही कृपाळू आहात, देवा तू भक्तांना तुझा अपरोक्ष अनुभव आणून देणारा आहेस आणि भक्तांना आनंद देणारा आहेस त्यामुळे तू सर्वात मोठा आहेस तू सर्व काळ शुध्द असून सहजस्वरुप धारण करणारा आहेस. हातामध्ये सुदर्शन चक्र धारण करणा-या विश्वामध्ये भरुन उरणा-या तुझ्या ध्वजेवर गरुडाचे चिन्ह असून तू करुण करणारा आहेस. देवा तुला सहस्त्र हात आणि सहस्त्र पाय आहेत क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर तू शयन करतोस. हे कमलासारखे नयन असणा-या लक्ष्मीपते कामिनीला देखील मोहीत करण्यासारखी तुझी मदनमूर्ती आहे. हे भवसमुद्र तारुन नेणा-या शेष किंवा वामनाच्या अवतारामध्ये पृथ्वी मस्तकावर धारण करणा-या तीनही भुवन जिंकणा-या देवा भक्तांसाठी तू छोटासी वामन अवतार धारण केलास, हे सगुणरुपा निर्गु
26/12/22, 10:28 Sdm:
अभंग क्र. ४०४८
माझा तव खुंटला उपाव । जेणे तुझे आतुडती पाव । करू भक्ती तरि नाही भाव । नाही हाती जीव कवणेविशी ॥१॥
धर्म करू तरि नाही चित्त । दान देऊ तरि नाही वित्त । नेणे पुजो ब्राम्हण अतीत । नाही भूतदया पोटा हाती ॥२॥
नेणे गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंद्रियांसी ॥३॥
तीर्थ करू तरि मन नये सवे । व्रत करू तरि विधि नेणे स्वभावे । देव जवळी आहे म्हणो मजसवे । तरि आपपरावे न वंचे ॥४॥
म्हणोनि झालो शरणागत । तुझा दास मी अंकित । यास काही न लगे संचित । झालो निश्चिंत तुका म्हणे ॥५॥
अर्थ
देवा मला तुझी प्राप्ती होईल असे जे साधन आहे ते साधनच करण्याविषयी माझे उपाय खुंटले आहेत. कारण देवा तुझी भक्ती करण्यास जावा तर माझ्यामध्ये शुध्द भक्तिभाव नाही आणि माझा जीवही माझ्या स्वाधीन नाही. धर्म करु पाहावे तर माझे चित्त स्थिर नाही आणि दान देऊ पाहावे तर माझ्याकडे वित्त म्हणजे धन नाही. देवा माझ्या हाताने कधी ब्राम्हण आणि अतिथींची पूजा घडत नाही माझ्या अंत:करणामध्ये भूतदया म्हणजे सर्व प्राणिमात्रांवर दया करण्याचे येत नाही आणि माझ्या हातून भूतदया घडतही नाही. गुरुचे दास्यत्व कसे करावे, संतसेवा कशी करावी, संतसंगती कशी घडेल आणि जप, तप, अनुष्ठान हे काहीही मी जाणत नाही. माझ्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न होत नाही आणि एकातामध्ये वनात जाऊन हरीची सेवा देखील माझ्याच्याने घडत नाही इंद्रियांचे दमन देखील माझ्याच्याने होत नाही. तीर्थयात्रा करावी तर मन बरोबर येत नाही आणि व्रताचरण करावे तर त्याचा विधी शास्त्रोक्त विधी मला माहित नाही. देव माझ्याजवळच ��
26/12/22, 10:29 Sdm:
अभंग क्र. ४०४९
तरि म्या आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना । तुजवाचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते ॥१॥
आपुला न विचारी सिण । न धरी अंगसंगे भिन्न । अंगीकारिले राखे दीन । देई जीवदान आवडीचे ॥धृपद॥
माझिया मनासि हे आस । नित्य सेवावा ब्रम्हरस । अखंड चरणींचा वास । पुरवी आस याचकाची ॥२॥
माझिया संचिताचा ठेवा । तेणे हे वाट दाविली देवा । एवढा आदराचा हेवा । मागे सेवादान आवडींचे ॥३॥
आळवीन करुणावचनी । आणीक गोड न लगे मनी । निद्रा जागृती आणि स्वप्नी । धरिले ध्यानी मनी रूप ॥४॥
आता भेट न भेटता आहे । किंवा नाही ऐसे विचारूनि पाहे । लागला झरा अखंड आहे । तुका म्हणे साहे केले अंतरी ॥५॥
अर्थ
हे नारायणा मी तुझ्यावाचून कोणाला आळवावे तुझ्यावाचून माझी वासना कोण पूर्ण करणार आहे ? हे कृपावंते माझी आई तुझ्यावाचून मला प्रेमरुपी स्तनपान दुसरे कोण देणार आहे ? देवा माझ्या लेकरापासून तुला त्रास होतो याच्याविषयी तू विचार करु नकोस मला तुझ्या अंग संगतीपासून भिन्न धरु नकोस. देवा माझ्या सारख्या दीनाचा तू अंगीकार केला आहेस तर माझे रक्षणही तुम्हीच करा एवढे माझ्या जीवाच्या आवडीचे दान तुम्ही मला दयावे. नित्य ब्रम्हरसाचा सेवन करावे हीच माझ्या मनाची अपेक्षा आहे. आणि देवा मी अखंड तुमच्या चरणाजवळच राहावे अशी माझ्या याचकाची इच्छा तुम्ही पूर्ण करा. देवा माझ्या संचित कर्माचा जो ठेवा होता त्यानेच मला ही वाट दाखविली आहे. आणि देवा एवढाच एक मला आदराचा हव्यास आहे आणि तेच तुमची सेवा करण्याचे दान मी आवडीने मागत आहे. तुला करुणा वचनाने आळवावे देवा हेच मला आवडते यावाचून दुसरे काहीही मला गोड वाटत नाह
26/12/22, 10:29 Sdm:
अभंग क्र. ४०५०
हेचि भवरोगाचे औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक काही नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥१॥
सांवळे रूप ल्यावे डोळा । सहा चौ अठरांचा मेळा । पदर लागो नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥धृपद॥
भोजना न द्यावे अन्न । जेणे चुके अनुपान । तरीच घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥२॥
नये निघो आपुलिया घरा । बाहेर लागो नये वारा । बहु बोलणे ते सारा । संग दुसरा वर्जावा ॥३॥
पासी ते एक द्यावे वरी । नवनीताची होईल परी । होईल घुसळिले ते निवारी । सार भीतरी नाही तया ॥४॥
न्हाये अनुतापी पाघरे दिशा । स्वेद निघो दे अवघी आशा । होसिल आधिं होतासि तैसा । तुका म्हणे दशा भोगी वैराग्य ॥५॥
अर्थ
जन्म, जरा, व्याधी तोडण्याचे आणि भवरोगाचे क्षमन करण्याचे हेच खरे औषध आहे, या औषधाने इतर कोणतीही बाधा होत नाही आणि षडविकाराचा नाश देखील हे करते. ते औषध म्हणजे तुम्ही सावळया हरीचे रुप डोळयामधे धारण करा. ते सहा शास्त्र, चार वेद आणि अठरा पुराणांचा मेळा आहे. दुष्ट लोकाचा स्पर्श देखील स्वत:ला होऊ देऊ नको आणि विष्णू सहस्त्र नाममंत्राचे सतत जप करत राहा. जेणेकरुन अनुपानात चूक होईल असे अन्न भोजनास देऊ नये. असे जर तुम्ही वागलात तरच उपयोग आहे आणि मी तुम्हाला वरती सांगितलेल्या औषधाचा गुण असे वागल्यानेच येईल हे तुम्ही सत्यभावनेने जाणून घ्यावे. आपल्या नीजस्वरुपरुपी घरातून बाहेर येऊ नये आणि बाहेर येऊन देहभाव देहअहंकार याचा वारा लागू देऊ नये. फार जास्त बोलू नये हे मुख्य सार आहे आणि हरीवाचून दुसरा कोणाचाही संग करु नये दुस-याची संगती वर्ज्य करावी. आपल्याजवळ जे चित्त आहे ते हरीला दयावे म्हणजे त्या��
26/12/22, 10:30 Sdm:
अभंग क्र. ४०५१
मागुता हाचि जन्म पावसी । भोगिले सुख दुःख जाणसी । हे तो न घडे रे सायासी । का रे अंध होसी जाणोनिया ॥१॥
लक्ष चौर्‍†यांशी न चुके फेरा । गर्भवासी यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा । वोळसा थोर मायाजाळी ॥२॥
पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । काही एक उपजता मरती । बहिरी अंध होती पागुळ मुकी ॥३॥
नरदेह निधान लागले हाती । उत्तम सार उत्तम गती । देवचि होइन म्हणती ते होती । तरि का चित्ती न धरावे ॥४॥
क्षण एक मन स्थिर करूनी । सावध होई डोळे उघडोनी । पाहे वेद बोलिले पुराणी । तुका विनवणी करीतसे ॥५॥
अर्थ
अरे मनुष्या तुला वाटत असेल की पुढचा जन्म तुला पुन्हा मनुष्याचाच प्राप्त होईल आणि या जन्मी जसे सुख भोगले तसेच पुढेही भोगशील अशी जर तुझी समजूत असेल तर, कितीही प्रयत्न केले तरी तसे घडणार नाही सर्व काही माहित असून देखील अंध का होत आहेस ? चौ-याऐंशी लक्ष योनीचा फेरा कधीही चूकत नाही तेथे मोठया गर्भवासाच्या यातना भोगाव्या लागतात. मग तू पुन्हा जन्म घेऊन संशयाच्या पुरामध्ये पडशील आणि मायाजाळरुपी मोठया भोव-यात तू पुन्हा सापडशील. पशूंना पाप आणि पुण्य काय माहिती, उत्तम मध्यम हे भोग त्यांना भोगता येतात काय ? काही तर जन्म झाल्या झाल्याच मरतात आणि काही तर बहिरे अंध पागळे मुके होतात. नरदेहासारखे उत्तम निदान हाती लागले आहे ते उत्तम सार आणि उत्तम गती देणारे आहे. जर एखादयाने खर्‍या श्रध्दापूर्वक भक्तिभावाने म्हटले की मी देव होईल तर तो खरोखर देवाच्या पदवीला प्राप्त होतो, असे आहे तर मग चित्तामध्ये हरीला का न धारण करावे ? तुकाराम महाराज म्हणतात, “अरे मनुष्या तू एक
26/12/22, 10:30 Sdm:
अभंग क्र. ४०५२
उभा देखिला भीमातीरी । कर मिरवले कटावरी । पाउले तरी समचि साजिरी । नाम तरी अनंत अतिगोड ॥१॥
शंख चक्रांकित भूषणे । जडितमेखळा चिद्रत्ने । पितांबर उटी शोभे गोरेपणे । लोपली तेणे रवितेज ॥२॥
श्रवणी कुंडले देती डाळ । दशांगुळी मुद्रिका माळ । दंत ओळी हिरे झल्लाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥३॥
कटी कडदोरा वांकी वेळा । बाही बाहुवटे पदक गळा । मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळा विद्युल्लता ॥४॥
सुंदरपणाची साम्यता । काय वर्णु ते पावे आता । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । धन्य ते माता पिता प्रसवली ॥५॥
अर्थ
मी देवाला भीमेच्या तीरावर आपले दोन्ही ही कर कटावर ठेवुन उभे असलेले पाहिले आहे. हरीचे पाऊले समान व साजिरे आहेत त्याचे नाम अनंत व अतिगोड आहे. शंख, चक्र, पद्म, गदा ही आयुधे शस्त्रे त्याच्याकडे आहेत आणि त्याच्या कमरेला रत्नजडित शेला बांधलेला आहे. हरीने पितांबर नेसला असून हरीच्या अंगाला चंदनाची उटी लावलेली आहे आणि त्या तेजापुढे सूर्यतेज देखील लोपले आहे. कानामध्ये मत्स्य कुंडले झळकत असून दहा ही बोटांमध्ये अंगठया आहेत व गळयात वैजयंती माळा झळकत आहे. हरीच्या दातांची ओळ म्हणजे हि-याप्रमाणेच झळकत आहे आणि हरीचे मुख अतिशय हे निर्मळ असून सुखाचीच राशी आहे. कमरेला करदोरा बाहूच्या दंडामध्ये वाक्या आणि गळयामध्ये पदके अशा प्रकारची खूप भूषणे देवाने परिधान केलेली आहे. हरणाच्या नाभीमध्ये असलेल्या कस्तुरीचा टिळा देवाने लावला असून देवाचे डोळे अतिशय विजेप्रमाणे झळाळत आहेत. तुकाराम महाराजांचे बंधू म्हणतात, “हरीच्या सौंदर्यपणाचे वर्णन इतके अप्रतिम आहे की त्याची साम्यता कशाबरोबर
26/12/22, 10:30 Sdm:
अभंग क्र. ४०५३
दास्य करी दासांचे । उणे न साहे तयांचे । वाढिले ठायीचे । भाणे टाकोनिया धावे ॥१॥
ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटी कर । सर्वस्वे उदार । भक्तांलागी प्रगटे ॥धृपद॥
हृदयी श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचे भूषण । नाही तयाचा सीण । सुख धरिले लातेचे ॥२॥
सत्यभामा दान करी । उजुर नाही अंगीकारी । सेवकाच्या शिरी । धरूनि चाले पादुका ॥३॥
राखे दारवंटा बळीचा । सारथी झाला अर्जुनाचा । दास सेवकाचा । होय साचा अंकित ॥४॥
भिडा न बोले पुंडलिकाशी । उभा मर्यादा पाठीशी । तुका म्हणे ऐसी । का रे न भजा माउली ॥५॥
अर्थ
देव त्याच्या दासांचेही दास्यत्व करतो त्यांना काही कमी पडले तर देवाला सहन होत नाही. देव त्याच्या दासांचा इतका आधीन झालेला आहे की, त्याला जर जेवणासाठी ताट वाढले आणि त्याच्या दासाचे काही कार्य निघाले तर त्याला जेवणाचे देखील भान राहात नाही तो जेवणाचे ताट तसेच टाकून दासाचे काम करण्याकरता धाव घेतो. असा तो देव कृपेचा सागर आहे त्याने आपले दोनही कर कटेवर ठेवून विटेवर तो उभा आहे. अशा प्रकारचा सर्वस्वी उदार असणारा देव भक्तांसाठी प्रगट होतो. हरीच्या ह्दयावर भृगुऋषींनी लाथ मारली त्यावेळी त्यांच्या ह्दयावर भृगुऋषींच्या पावलांची चिन्ह उमटली अशा प्रकारचे भूषण आपल्या ह्दयावर हरी अभिमानाने मिरवतो. भृगुऋषींनी हरीच्या वक्षस्थळावर लाथेचा प्रहार केला त्यावेळी हरीला त्याचा त्रास झाला नसून उलट सुख झाले. सत्यभामेने श्रीकृष्ण भगवंताचे दान नारदाला ज्यावेळी दिले त्यावेळी भगवंताने सत्यभामेला थोडा देखील विरोध केला नाही. देवाने ते मान्य केले आणि आपल्या सेवकाच्या पाद��
26/12/22, 10:36 Sdm:
अभंग क्र. ४०५४
हरी तैसे हरीचे दास । नाही तया भय मोह चिंता आस । होउनि राहाती उदास । बळकट कास भक्तीची ॥१॥
धरूनि पाय त्यजिले जन । न लगे मान मृत्तिकाधन । कंठी नाममृत पान । न लागे आन ऐसे झाले ॥धृपद॥
वाव तरी उदंडची पोटी । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । गिर्‍†हे तरी वेटी राबवीती ॥२॥
बळ तरि नांगविती काळा । लीन तरि सकळांच्या तळा । उदार तरी देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥३॥
संसार तो तयांचा दास । मोक्ष तो पाहातसे वास । रिद्धीसिद्धी देशवटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥४॥
जन्ममृत्युस्वप्नांसारिखे । आप त्या न दिसे पारखे । तुका म्हणे अखंडित सुखे । वाणी वदे मुखे प्रेमामृताची ॥५॥
अर्थ
जसा हरी आहे अगदी तसेच हरीचे दास आहेत हरीप्रमाणेच हरीच्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे भय, मोह, चिंता व इच्छा नाहीत. हरीचे दास सर्व प्रकारे उदास होऊन भक्तीची कास बळकट धरतात. त्यांनी हरीचे पाय दृढ चित्तात धारण केले आहे व लोकाचा त्याग त्यांनी केला आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा मान सन्मान लागत नाही धन पैसा हा तर त्यांना अगदी मातीप्रमाणे आहे. नामामृताचे सेवन ते आपल्या कंठाव्दारे करत असून त्यावाचून दुसरे काहीही त्यांना नकोसे झाले आहे. ज्याचे ह्दय अतिशय उदंड असून इतरांचे अनेक अपराध सहन जो करतो आणि सिंधूप्रमाणे ज्याचे धैय आहे, त्यांनी हरीचे चरणांना घट्ट मिठी दिलेली असते. मग ती मिठी कामक्रोधादीकांना देखील सुटणे शक्य नाही ते जरी बिकट ग्रहाप्रमाणे असले तरी काम क्रोधांना हे वेठबिगारीप्रमाणे राबवितात. हरीच्या दासांच्या अंगी बळ किती आहे म्हणून सांगावे तर ते काळाला देखील नाग
26/12/22, 10:36 Sdm:
अभंग क्र. ४०५५
बहुत जाचलो संसारी । वसे गर्भी मातेच्या उदरी । लक्ष चौर्‍†यांशी योनिद्वारी । झालो भिकारी याचक ॥१॥
जिणे पराधीन आणिका हाती । दृढ पाशी बहु बांधलो संचिती । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥धृपद॥
न भरे पोट नाही विसावा । नाही नेम एक ठाव गावा । नाही सत्ता न फिरे ऐसी देवा । लाहे जीवा खापरी तडफडी ॥२॥
काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढेंही नेणो किती । खंडणा नाही पुनरावृत्ती । मज कल्पांती तरी वेगळे ॥३॥
ऐसे दुःख कोण हरील माझे । कोणा भार घालू आपुले ओझे । भवसिंधुतारक नाम तुझे । धावसि काजे आडलिया ॥४॥
आता धाव घाली नारायणा । मजकारणे रंका दीना । गुण न विचारी अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥५॥
अर्थ
मी संसारामध्ये खूप त्रासलो असून मातेच्या गर्भामध्ये राहिलो आहे. चौ-यांशी योनीच्या गर्भामधून मी बाहेर पडलो आणि भिकारी व याचक झालो. संचित कर्माच्या बलाढ्य पाशाने मी बांधलो गेलो आणि जगणे पराधीन झाले दुस-याच्या हातात मी गेलो. प्रारब्ध आणि क्रियामान हे माझ्याबरोबरच आहेत ते आपल्या सत्तेने मला फिरवित आहेत. कुठेही गेले तरी पोट भरत नाही विश्रांती मिळत नाही आणि एकाच गावाला जाऊन राहू असा नियम नाही. माझ्या सत्तेने देखील मी कोठे फिरु शकत नाही देवा तापलेल्या खापरामध्ये जशी लाहि तडफडते ना देवा तशी माझी स्थिती झाली आहे अशा पध्दतीने आतापर्यंत खूप काळ गेला आणि पुढे किती आहे हे देखील माहित नाही. माझ्या जन्ममरणाच्या पुनरावृत्तीला खंडनाच नाही कल्पांत झाल्यानंतर मी यावाचून वेगळे होईल कि नाहि हे देखील मला कळत नाही. देवा अशा प्रकारचे माझे द�
26/12/22, 10:37 Sdm:
अभंग क्र. ४०५६
जव हे सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाय । तव तू आपुले स्वहित पाहे । तीर्थयात्रे जाये चुको नको ॥१॥
जव काळ असे दुरी ठेला । तव तू हरी गुण गाय आइक वहिला । मनी भाव धरूनि भला । न वंचे त्याला चुको नको ॥२॥
जोडोनि धन न घली माती । ब्रम्हवृंदे पूजन यति । सत्य आचरण दया भूती । करी सांगाती चुको नको ॥३॥
दशा यौवन बाणली अंगी । पागिला नव्हे विषयसंगी । काम क्रोध लोभ मोह त्यागी । राहे संतसंगी चुको नको ॥५॥
मग तेथे न चले काही । सत्ता संपदा राहेल ठायीच्या ठायी । पुढे संचित जाईल ग्वाही । तुका म्हणे तई यमआज्ञा ॥५॥
अर्थ
अहो जोपर्यंत तुमचे सर्व इंद्रिय सुदृढ आहेत, चांगले आहेत चालण्यास हातपाय अजूनही चांगले आहेत, तोपर्यंतच तुम्ही आपले स्वहित करुन घ्या तीर्थयात्रेस जाण्यास चुकू नका. अहो जोपर्यंत काळ तुमच्यापासून दूर आहे तोपर्यंतच तुम्ही हरीचे गुणगान गा व ऐका. मनामध्ये खरा भक्तिभाव धरुन आपले स्वहित करण्याविषयी चुकू नका व अंगचोरपणा करु नका. तू प्राप्त केलेल्या धनाला तू मातीमध्ये खड्डा खणून पुरुन ठेवू नको त्याच्यावर माती टाकू नको तर त्याचा उपयोग ब्रम्हवृंद म्हणजे योग्य ब्राम्हणांच्या व संन्यासांच्या पूजेसाठी त्या धनाचा वापर कर. तू नेहमी आपले आचरण स्वच्छ ठेव भूतमात्रांवर दया कर व त्यांनाच आपला सोबती कर असे करण्यास तू चुकू नको. जोपर्यंत तुमच्या अंगी तारुण्यअवस्था आहे तोपर्यंत तुम्ही विषयांच्या संगतीत राहून त्यांचे अंकित होऊ नका. काम क्रोध लोभ मोह यांचा त्याग कर आणि संतसंगतीमध्ये राहण्याचे चुकू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, “एकदा की यमदूत तुम्हाला ��

डिसेंबर नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version