“३ डिसेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 3 December
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३ डिसेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
३ डिसेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ११९१ ते १२१०,
1191-18
नातरी स्वप्नविकारा समस्ता । चेऊनिया उमाणे घेता । तो आपणयापरौता । न दिसे जैसा ॥1191॥
किंवा जागा झाल्यावर सकलस्वप्नव्यवहाराची मोजदाद करू पहाणाराला आपल्या शिवाय जसे दुसरे तेथे काहीच आळत नाहीं, 91
1192-18
तैसे जे काही आथी नाथी । येणे होय ज्ञेयस्फुर्ती । ते ज्ञाताचि मी हे प्रतीती । होऊनि भोगी ॥1192॥
तसा जगात ” “आहे, नाही, ” असा जो काही ज्ञानाचा व्यवहार चालतो, तो सर्व माझ्याच ज्ञानस्वरूपाचा विलास होय, असा त्याचा अपरोक्षानुभव असतो. 92
1193-18
जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु । अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥1193॥
मी जन्मरहित, वार्धक्यरहित, नाशरहित, व्ययहित, अपूर्व आणि अनंत व आनंदरूप असे जो जागतो. 93
1194-18
अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु । आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥1194॥
मी. अचल, अच्युत, अनंत, अद्वैत, आद्य, निराकार, व साकारही आहे असे जो समजतो. 94
1195-18
ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु । अभय मी आधारु । आधेय मी ॥1195॥
नियम्य मी, नियामक मी, अनादि, अमर, अभय, आधार व आधारावर असलेला मी आहे. 95
1196-18
स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु । सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥1196॥
मी नित्य स्वामी (धनी) आहे; सहज व सतत आहे; मी सर्व व सर्वव्यापक आहे व मी. सर्वात न सापडणारा असा त्यांच्या पलीकडील स्वरूपाचा आहे. 96
1197-18
नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु । स्थुलु मी अणु । जे काही ते मी ॥1197॥
मी, नवा, जुना, शून्य, संपूर्ण, स्थूल, सूक्ष्म, जे काही दिसते ते मी आहे. 97
1198-18
अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु । व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥1198॥
अक्रिय, एक, असंग, अशोक, व्याप्य, व्यापक, पुरुषोत्तम मी आहे. 98
1199-18
अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु । समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥1199॥
अशब्द (शब्दरहित), श्रोत्ररहित, अरूप, अगोत्र, सम, स्वतंत्र व परब्रम्ह्स्वरूप आहे. 99
1200-18
ऐसे आत्मत्वे मज एकाते । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुते । आणि याही बोधा जाणते । तेही मीचि जाणे ॥1200॥
याप्रमाणे, मला एकाला या अद्वैयभक्तीने योग्यरीतीने जाणतो व याही बोधाचे अधिष्ठान जे शुद्ध परमात्मतत्व तेच माझे स्वरूप होय असाही त्याचा स्पष्ट बोध असतो. 1200
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1201-18
पै चेइलेयानंतरे । आपुले एकपण उरे । तेही तोवरी स्फुरे । तयाशीचि जैसे ॥1201॥
किंवा जागे झाल्यावर आपण एकटेच असतो, व हे एकटेपणाचे स्फुरणही जो वर असते तो वर ते त्याला एकट्यालाच असते. 1201
1202-18
का प्रकाशता अर्कु । तोचि होय प्रकाशकु । तयाही अभेदा द्योतकु । तोचि जैसा ॥1202॥
सूर्य प्रकाशु लागला म्हणजे आपला प्रकाशकही तोच असतो व आपण व आपला प्रकाश (प्रकाश्य प्रकाशक ) यातील अभेदही त्याच्याच मुळे समजतो 1202
1203-18
तैसा वेद्यांच्या विलयी । केवळ वेदकु उरे पाही । तेणे जाणवे तया तेही । हेही जो जाणे ॥1203॥
त्याप्रमाणे वेद्य वस्तुच्या लोपानंतर केवळ त्यांचा वेदकमात्र उरतो; तो आपण आपल्याला जाणीत असतो ह्याची व ते ज्यायोगे (सत्तेवर) जाणतो त्याचीही ह्याला जाणीव असते. 1203
1204-18
तया अद्वयपणा आपुलिया । जाणती ज्ञप्ती जे धनंजया । ते ईश्वरचि मी हे तया । बोधासि ये ॥1204॥
ते आपले आपल्या ठिकाणी ते स्फुरद्रूप असणारे आपले अद्वयपण ज्या ज्ञप्तिमात्र स्वरूपाच्या सत्तेवर प्रत्ययाला येते, ते जे ज्ञप्तिस्वरूप, तोच ईश्वर व मीही तोच, असे त्याला कळून येते. 1204
1205-18
मग द्वैताद्वैतातीत । मीचि आत्मा एकु निभ्रांत । हे जाणोनि जाणणे जेथ । अनुभवी रिघे ॥1205॥
मग, द्वैताद्वैतातीत, नि:संदेह मीच एक आत्मा सगळीकडे भरलेला आहे असे सर्वात्मज्ञान होऊन तेही जाणणे स्वरूपानुभवांत लीन होते. 1205
1206-18
तेथ चेइलिया येकपण । दिसे जे आपुलया आपण । तेही जाता नेणो कोण । होईजे जेवी ॥1206॥
स्वप्नातून जागे झाल्यावर काही काळ, स्वप्नातील द्वैतव्यवहाराच्या स्मृतिमुळे, आपले एकपण आपल्यास स्फुरत असते, पण पूर्ण जागृति आल्यावर आपण कोण असतो ह्याचे जसे भान नसते. 1206
1207-18
का डोळा देखतिये क्षणी । सुवर्णपण सुवर्णी । नाटिता होय आटणी । अळंकाराचीही ॥1207॥
सुवर्णालंकार डोळयांनी पहातांच, “जर” हे सर्व सुवर्ण आहे ” अशा दृष्टीचा उदय झाला, तर न आटतांच अलंकाराचे अलंकारपण संपले. 1207
1208-18
नाना लवण तोय होये । मग क्षारता तोयत्वे राहे । तेही जिरता जेवी जाये । जालेपण ते ॥1208॥
किंवा मिठाचे पाणी झाले तर क्षारता जलरूपाने असते, पण ते पाणी झालेले मीठही जेव्हा पृथ्वींत समरस होते, तेव्हा “ हे मीठ” असा मिठाचा वेगळेपणा उरत नाही किंवा भासतही नाही. 1208
1209-18
तैसा मी तो हे जे असे । ते स्वानंदानुभवसमरसे । कालवूनिया प्रवेशे । मजचिमाजी ॥1209॥
त्याप्रमाणे ” मी ” “ तो ” हा जो व्यवहार असतो तो आत्मानंदानुभवांत एकत्र करून, तो, तेच आनंदरूप, जे माझे स्वरूप, त्यामध्ये प्रवेश करितो. 1209
1210-18
आणि तो हे भाष जेथ जाये । तेथे मी हे कोण्हासी आहे । ऐसा मी ना तो तिये सामाये । माझ्याचि रूपी ॥1210॥
मग, ” तो ” ही भाषा संपल्यावर, त्याच्या अपेक्षेनी नांदणारे जे ” मी ” ते तरी कोणावर स्थापावयाचे ? असा ‘तू व मी ” विवर्जित जे माझे स्वरूप त्याच्याशी तो ऐक्य पावतो. 1210
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३३७ वा. ३, डिसेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४०३३ ते ४०४४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ४०३३
कोण सुख धरोनि संसारी । राहो सांग मज बा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥१॥
प्रथम केला गर्भीवास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिले नव ही मास । आलो जन्मास येथवरी ॥२॥
बाळपण गेले नेणता । तारुण्यदशे विषयव्यथा । वृद्धपणी प्रवर्तली चिंता । मरे मागुता जन्म धरी ॥३॥
क्षण एक तो ही नाही विसावा । लक्ष चौयाशी घेतल्या धावा ।
भोवंडिती पाठी लागल्या हावा । लागो आगी नावा माझ्या मीपणा ॥४॥
आता पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारी । तुझा दास मी दीन कामारी । तुका म्हणे करी कृपा आता ॥५॥
अर्थ
हे हरी संसारामध्ये कोणत्या प्रकारचे सुख धरुन मी राहू ते तू मला सांग. येथील सर्व नाशवंतासाठी, जवळ तू सत्य आहेस त्यामुळे यांच्या नादी लागलो तर तू देखील अंतरला जातोस. प्रथम मातेच्या गर्भामध्ये वास केला आणि तेथील कष्ट तर तुला काय सांगावे ? तेथील नऊ महिने दु:ख भोगले आणि येथे जन्माला आलो. बालपण हे अज्ञानपणातच गेले आणि तारुण्यदशेत असतांना विषय व्यथेमध्येच मी गुंतलो. वृध्दपणी संसाराची मुलाबाळांची, नातवंडाची, व्यवसायाची चिंता उत्पन्न झाली नंतर मेलो आणि मेलो त्यानंतर पुन्हा जन्माला आलो. अशा प्रकारे एक क्षणदेखील विसावा मिळाला नाही परंतू चौ-यांशी लक्ष योनीच्या धावा घेतच राहीलो. विषयाची हाव माझ्या पाठीमागेच लागलेली आहे ती मला सारखी फिरविते आहे माझ्या देहाभिमानाला आणि मीपणाला आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आता ही उठाठेव खूप झाली मी तुझ्या दारामध्ये रंक होऊन दरीद्री होऊन राहीन. देवा मी तुझा काम करणारा दीन दास आहे त्यामुळे तू आता माझ्यावर कृपा करावी. ”
26/12/22, 10:22 Sdm:
अभंग क्र. ४०३४
सुख या संतसमागमे । नित्य दुनावे तुझिया नामे । दहन होती सकळ कर्मे । सर्वकाळ प्रेमे डुल्लतसो ॥१॥
म्हणोनि नाही काही चिंता । तूचि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिका गोता सर्वाठायी ॥२॥
ऐसा हा कळला निर्धार । मा माझा तुज न पडे विसर । अससी देऊनिया धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळी ॥३॥
दुःख ते कैसे नये स्वप्नासी । भुक्तीमुक्ती झाल्या कामारी दासी । त्यांचे वर्म तू आम्हापाशी । सुखे राहिलासी प्रेमाचिया ॥४॥
जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापे पळती दोष । काय ते उणे आम्हा आनंदास । सेवू ब्रम्हरस तुका म्हणे ॥५॥
अर्थ
संतसंगतीत राहिल्यानंतर जे सुख प्राप्त होते तेच सुख तुझे नाम घेतल्याने दुप्पट वाढते. आणि त्यामुळे सर्व कर्मे जळून जातात व सर्व काळ आम्ही प्रेम आनंदात डुल्लत राहतो. देवा आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता नाही कारण तूच आमचा मातापिता, तूच आमची बहिण भाऊ आणि चुलता व इतर सर्व गोत्रज आणि सर्व ठिकाणी तूच आम्हाला आहेस. देवा आता मला पूर्णपणे निश्चय झाला आहे की, तुला माझा विसरच पडत नाही. देवा आता मला याही गोष्टीचा निर्धार झाला आहे की, तू मला धीर देतोस आणि माझ्या आतर बाह्यदेखील वास्तव्य करुन माझ्याजवळ नेहमी तू असतोस. दु:ख म्हणजे काय आहे ते माझ्या स्वप्नात देखील येत नाही ते कसे आहे मला माहितही नाही भोग आणि चारही मुक्ती माझ्या हाताखाली काम करणा-या दासीप्रमाणेच आहे. याचे मुख्य वर्म म्हणजे तू सर्वाचा मालक आहेस, धनी आहेस आणि तूच आमच्याजवळ प्रेमाने राहिला आहेस त्यामुळे त्यांनाही आमच्याजवळच राहावे लागते आहे हे निश्चिंत आहे. तुकाराम महाराज ��
26/12/22, 10:23 Sdm:
अभंग क्र. ४०३५
न पवे सन्निध वाटते चिंता । वरी या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सापडलो ॥१॥
बहु भार पडियेला शिरी । मी हे माझे मजवरी । उघड्या नागविलो चोरी । घरिंच्याघरी जाणजाणता ॥धृपद॥
तुज मागणे इतुले आता । मज या निरवावे संता । झाला कंठस्फोट आळविता । उदास आता न करावे ॥२॥
अति हा निकट समय । मग म्या करावे ते काय । दिवस गेलिया ठाकईल छाय । उरईल हाय रातिकाळी ॥३॥
होईल संचिताची सत्ता । अंगा येईल पराधीनता । ठाव तो न दिसे लपता । बहुत चिंता प्रवर्तली ॥४॥
ऐसी या संकटाची संधी । धाव घालावी कृपानिधी । तुका म्हणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥५॥
अर्थ
देवा मला तुझे सान्निध्य घडत नाही त्यामुळे मला खूप चिंता वाटते देवा माझ्यावर खूप जनांची सत्ता आहे देवा त्याचे तू निवारण करावे. देवा मी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे परंतू उलटच होते मी आणखी त्याच्यात गुंतला जात आहे अशा प्रकारे मी बलवंत अशा कर्माच्या बंधनात सापडलो आहे. देवा माझ्या माथ्यावर “मी आणि माझे” अशा प्रकारचा मोठा भार पडलेला आहे. देवा हे सर्व मला उघड उघड माहित आहे तरी देखील मी घरच्या माणसांकडूनच नागवला गेलो म्हणजे घरच्या माणसांनीच माझी चोरी केली, मला लुटले. देवा आता माझे तुला इतकेच मागणे आहे की, तू मला संतांच्या स्वाधीन करावे. देवा आता तुला आळविता आळविता माझा कंठ फुटला आहे त्यामुळे तू आता मला उदास करु नकोस. देवा ही अगदी शेवटची वेळ आहे अशा वेळी तू जर माझे ऐकले नाही तर मग मी काय करावे ? देवा एकदा की आयुष्य भानू अस्ताला गेला तर अज्ञानाचा अंधार सर्वत्र पसरेल आणि माझ्या हाती केवळ हाय
26/12/22, 10:23 Sdm:
अभंग क्र. ४०३६
देवा तू आमचा कृपाळ । भक्तीप्रतिपाळ दीनवत्सल । माय तू माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥
तुज लागली सकळ चिंता । राखणे लागे वाकडे जाता । पुढती निरविसी संता । नव्हे विसंबता धीर तुज ॥२॥
आम्हा भय चिंता नाही धाक । जन्म मरण काही एक । जाला इहलोकी परलोक । आले सकळैकवैकुंठ ॥३॥
न कळे दिवस की राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वर्णू मी किती तया सुखा ॥४॥
तुझिया नामाची भूषणे । तो ये मज लेवविली लेणे । तुका म्हणे तुझिया गुणे । काय ते उणे एक आम्हा ॥५॥
अर्थ
देवा तू आमच्या विषयी कृपाळू आहेस भक्तांचे प्रतिपालन करणारा आहेस आणि दीनवत्सल आहे. तू आमची माय आणि प्रेमळ माऊली आहेस तूच आमचे सर्व योगक्षेमाचे भार चालवितेस. तुला आमची सर्व चिंता लागलेली असते आणि आम्ही वाकड्या मार्गाने चालू लागलो की, आमचे रक्षणही तुलाच करावे लागते. देवा तू पुढे आम्हाला संतांच्या स्वाधीन करतोस आणि आम्हाला विसरण्याचे धैर्य देखील तुला होत नाही. देवा आम्हाला कोणत्याही प्रकारचे भय, धाक चिंता तर नाहीच आणि जन्ममरणाविषयी आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंताच नाही. आम्ही इहलोकात राहून देखील आम्हाला इहलोक परलोकासारखा झाला आहे सगळे वैकुंठच आमच्यासाठी जमिनीवर आले आहे. माझी अखंड आत्मज्योत प्रकट झाली आहे त्यामुळे मला दिवस आहे की रात्र आहे हे काहीही कळत नाही आनंदलहरींची गती आणि त्या सुखाचे वर्णन मी किती म्हणून करु ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू तुझ्या नामाचेच अलंकार माझ्या अंगावर घातलेली आहेत. तुझ्या गुणामुळे तुझ्या कार्यामुळे आम्हाला काय एक कमी आहे ? ”
26/12/22, 10:24 Sdm:
अभंग क्र. ४०३७
आता धर्माधर्मी काही उचित । माझे विचारावे हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि झालो ॥१॥
येथे राया रंका एकी सरी । नाही भिन्नाभिन्न तुमच्या घरी । पावलो पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावे ॥धृपद॥
ऐसे हे चालत आले मागे । नाही मी बोलत वाउगे । आपुलिया पडिल्या प्रसंगे । कीर्ती हे जगे वाणिजेते ॥२॥
घालोनिया माथा बैसलो भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधी हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसे ॥३॥
येथे एक वर्म पाहिजे धीर । परि म्या लेखिले असार । देह हा नाशिवंत जाणार । धरिले सार नाम तुझे ॥४॥
केली आराणुक सकळा हाती । धरावे धरिले ते चित्ती । तुका म्हणे सांगितले संती । देई अंती ठाव मज देवा ॥५॥
अर्थ
देवा आता काही तरी धर्माधर्म आणि उचित पाहून माझ्या हिताचा तुम्ही विचार करा. देवा तुला माहित आहे की, मी पतित आहे त्यामुळे तर मी तुला शरण आलो आहे. देवा तुमच्या घरी राजा आणि रंक हे सर्व सारखेच आहे आणि भिन्न भिन्न हे प्रकार तुमच्याकडे नाहीत. आता मी कसा तरी देवा तुझ्या घरामध्ये पोहोचलो आहे त्यामुळे तू आता मला बाहेर घालवू नकोस माझ्यासारख्या पतितांचा उध्दार करण्याची रीत ही तुमची मागेपासून चालत आलेली आहे त्यामुळे मी काही वावगे बोलतो आहे असे देखील नाही. देवा तुम्ही पतितांचा उध्दार करता असे तुमची किर्ती सर्व जग वर्णन करते आहे. देवा मी तुमच्या माथ्यावर माझ्या योगक्षेमाचा भार घालून निश्चिंत बसलो आहे आणि सर्व लौकिक व्यवहाराचा मी त्याग केला आहे. देवा आपले पद हे अविनाश आहे या गोष्टीचाही विचार मी आधी केला आहे. देवा तुझ्या प्राप्तीसाठी एकच वर्म पाहिजे ते म्हणज��
26/12/22, 10:24 Sdm:
अभंग क्र. ४०३८
बरवे झाले आलो जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणे सुखासी पात्र होइजे ॥१॥
दिली इंद्रिये हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणे तू जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥धृपद॥
तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हे बहुता जन्मी जोडे । नाम तुझे वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥२॥
ऐसिये पावविलो ठायी । आता मी कांई होऊ उतराई । येवढा जीव ठेवीन पायी । तू माझे आई पांडुरंगे ॥३॥
फेडिला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषाचा मळ । लावूनि स्तनी केलो सीतळ । निजविलो बाळ निजस्थानी ॥४॥
नाही या आनंदासी जोडा । सांगता गोष्टी लागती गोडा । आलासी आकारा आमुच्या चाडा । तुका म्हणे भिडा भक्तीचिया ॥५॥
अर्थ
मी मनुष्य देहात जन्माला आलो आणि मनुष्य देहासारख्या महालाभाची प्राप्ती झाली हे फार बरे झाले. मनुष्य देहासारखा महालाभ म्हणजे उत्तम सुखाची रासच मनुष्य देहानेच मी परमात्याची प्राप्ती करुन घेईन आणि सर्व सुखाला पात्र होईन. देवा तू मला हात, पाय, कान, डोळे आणि चांगले बोलण्यासाठी मुख दिले आहे इत्यादी सर्व इंद्रिये तू मला दिले आहेत. त्यामुळे हे नारायणा तू मला प्राप्त होशील आणि माझा जीव पण आणि भवरोग नाहीसा होईल. देवा तीळ तीळ करुन पुण्याईचा साचा होतो आणि खूप जन्माचे पुण्य साचले की, तुझ्या नामाचा लाभ होतो. त्यामुळेच तुझ्या नामाची आवड वाणीला उत्पन्न होते आणि संतसमागम घडतो. देवा अशा प्रकारे तू मला या मनुष्य देहात आणले आहेस त्यामुळे आता मी तुझ्या उपकारातून उतराई कसा होऊ ? हे पाडूरंगे आई माझा एवढा जीव तुझ्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी मी तुझ्या �
26/12/22, 10:25 Sdm:
अभंग क्र. ४०३९
अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाही हाती । अपराधाची वोळिलो मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥१॥
किती दोषा देऊ परिहार । गुणदोषे मळिले अंतर । आदि वर्तमान भविष्याकार । लागे अंतपार ऐसे नाही ॥धृपद॥
विविध कर्म चौऱ्याशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पाजरा । जन्म जरा मरण साठवण ॥२॥
जीवा नाही कुडीचे लाहाते । ये भिन्नभिन्न पंच भूते । रचते खचते संचिते । असार रिते फलकट ॥३॥
पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मिळती काष्ठे लोटता पूर । आदळे दूर होती खल्लाळी ॥४॥
म्हणोनि नासावे अज्ञान । इतुले करी कृपादान । कृपाळु तू जनार्दन । धरूनि चरण तुका विनवी ॥५॥
अर्थ
अहो वेदमूर्ती माझा भक्तिभावही थोडा आहे, माझी बुध्दीही थोडी आहे, माझे आयुष्यही थोडे असून तेही माझ्या हाती नाही. माझी मूर्ती म्हणजे पूर्ण अपराधाचीच आहे त्यामुळे तुम्ही माझे म्हणणे ऐका. देवा माझे अंतरंग अनेक गुणदोषानी मलिन झाले आहे किती दोषाचा म्हणून तुम्हाला मी परिहार देऊ ? देवा माझ्या आधीचे वर्तमानातील आणि भविष्यातील संचित कर्माचा विचार केला तर त्याचा अंत:पारच लागणार नाही. विविध प्रकारच्या संचित कर्मामुळे चौ-याऐंशी लक्ष योनीच्या फे-या घ्याव्या लागतात व त्यामुळे आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक असे त्रिविध भोग भोगावे लागतात. असे शरीराचे कर्म कोठार असते व त्यामध्ये जन्म, जरा आणि मरणच साठवलेले असते. तसे पाहिलेस तर जीवात्माचा आणि देहाचा काहीही संबंध नसून पंचभूते ही वेगवेगळी आहेत. या शरीराचे काही दिवस पालनपोषण होते ते वाढते व काही दिवसाने पुन्हा ते बिघडते असे हे शरीर असा�
26/12/22, 10:25 Sdm:
अभंग क्र. ४०४०
ऐसी हे गर्जवू वैखरी । केशवा मुकुंदा मुरारी । राम कृष्ण नामे बरी । हरी हरी दोष सकळ ॥१॥
जनार्दना जगजीवना । विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥धृपद॥
चक्रपाणी गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥२॥
मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाटयकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणे ॥३॥
गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा । करोनि अकर्ता आपणा । नेदी अभिमाना आतळो ॥४॥
कासयाने घडे याची सेवा । काय एक समर्पावे या देवा । वश्य तो नव्हे वाचुनि भावा । पाय वेगळेजीवा न करी तुका ॥५॥
अर्थ
देवा आम्ही आमच्या वैखरी वाणीने तुझे नाम केशवा, मुकुंदा, मुरारी, राम कृष्ण हरी ही तुझी नामे आम्ही आमच्या वाणीने घेऊ. कारण ती चांगली आहेत व हे तुझे नाम सर्व दोषाचे हरण करतात. हे जनार्दना जगजीवना, विराटस्वरुपवामना, हे महदत्त्वादी मधुसूदना, भवबंधन तोडणा-या देवा, हे चक्रपाणी गदाधरा, असूरमर्दना, सर्व वीरांमध्ये श्रेष्ठ वीरा, सर्व शूरामध्ये मुकूटमणी असणा-या, अहो जगाला दान देणा-या दातारा, देवा तू मदनमूर्ती मनमोहन आहेस गोपाळ व गोपीकांना रमविणा-या, अहो कान्होबा तुम्ही नटनाट्य करण्यामध्ये अतिशय कुशल असून सर्वगुणसंपन्न आहात हे गुणवंता आणि निर्गुणा, सर्वामध्ये साक्षी राहून सर्व जाणणा-या, सर्व जगाची लय, उत्पत्ती, स्थिती करुन देखील हा अकर्ता राहतो कर्तेपणाचा अभिमान कधीही तो अंगाला लागू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “या देवाची सेवा कोणत्या पध्दतीने कोणत्या प्रकाराने करावी याला काय समर्पण करावे हा एक मोठा प्रश्न आह
26/12/22, 10:25 Sdm:
अभंग क्र. ४०४१
होतो ते चिंतीत मानसी । नवस फळले नवसी । जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाही ॥१॥
धरिले जीवे न सोडी पाय । आले या जीवित्वाचे काय । कै हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचिताने ॥धृपद॥
मज तो पडियेली होती भुली । चित्ताची अपसव्य चाली । होती मृगजळे गोवी केली । दृष्टि उघडली बरे झाले ॥२॥
आता हा सिद्धी पावो भाव । मध्ये चांचल्ये न व्हावा जीव । ऐसी तुम्हा भाकीतसे कीव । कृपाळुवा जगदानिया ॥३॥
कळो येते आपुले बुद्धी । ऐसे तो न घडे कधी । येवढे आघात ते मधी । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥४॥
कृपा या केली संतजनी । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनी । तुका चरणी लोळतसे ॥५॥
अर्थ
आजपर्यंत मनामध्ये मी ज्याच्याविषयी चिंतन करीत होतो आणि जो नवस केला होता ते दोन्हीही फलद्रुप झाले आहेत. त्या दोन्हीची प्राप्ती मला झाली आहे. अविट व ज्याचा कधीही नाश होणार नाही अशा नारायणाची प्राप्ती मला झाली आहे. या नारायणाचे पाय मी माझ्या जीवाशी दृढ धरले आहे ते मी कधीही सोडणार नाही मग त्याच्यापुढे माझ्या जीवित्वाचे तरी काय आले, त्याची देखील मी पर्वा करणार नाही. मला नारायणाच्या स्थळाची प्राप्ती कधी झाली असती, परंतू माझे पूर्व संचित हे अतिशय चांगले होते त्यामुळे तर मला त्याने या मार्गाला लावले आहे. मला तर खरोखर भूल पडली होती त्यामुळे तर माझ्या चित्ताची देखील उफराटी चाल म्हणजे वागणूक झाली होती. मला प्रपंचरुपी मृगजळाने त्यामध्ये फार गुंतून टाकले होते परंतू आज माझी ज्ञानदृष्टी पुन्हा उघडली त्यामुळे हे फार बरे झाले. देवा आता माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी जो भक्तिभा��
26/12/22, 10:26 Sdm:
अभंग क्र. ४०४२
मज ते हासतील संत । जीही देखियेली मूर्तीमंत । म्हणोनि उद्वेगले चित्त । आहाच भक्त ऐसे दिसे ॥१॥
ध्यानी म्या वर्णावेति कैसे । पुढे एकी स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आसे लागलोंसे ॥धृपद॥
कासया पाडिला जी धडा । उगाचि वेडा आणि वांकडा । आम्हा लेकरांसि पीडा । एक मागे जोडा दुसर्याचा ॥२॥
सांगा कोणाचा अन्याय । ऐसे मी धरीतसे पाय । तू तव समचि सकळा माय । काय अन्याय एक माझा ॥३॥
नये हा जरी कारणा । तरी का व्यालेति नारायणा । वचन द्यावे जी वचना । मज अज्ञाना समजावी ॥४॥
बहुत दिवस केला बोभाट । पाहाता श्रमलो वाट । तुका म्हणे विस्तारले ताट । काय वीट आला नेणो स्वामीया ॥५॥
अर्थ
ज्या संतांनी तुला प्रत्यक्ष पाहिले देवा ते संत मला म्हणतील की, तू इतके दिवस भक्ति करुनही तुला अजूनही देवाचे दर्शन कसे झाले नाही व मला असे म्हणून ते हसतील. म्हणून तर देवा माझ्या चित्ताला उद्वेग आला आहे कंटाळा आला आहे आणि तुझा भक्त वाया गेला असेच मला दिसत आहे. देवा आजपर्यंत मी तुला प्रत्यक्ष पाहिले नाही त्यामुळे तुझे ध्यान कसे करावे आणि तुझ्या स्वरुपाचे वर्णन कसे करावे हे मला समजत नाही परंतू मागे तर संतांनी तुला प्रत्यक्ष पाहिले आहे व त्यांनी तुझी स्तुतीही केलेली आहे. देवा तुझी स्तुती संतांनी केली आहे त्यामुळे तर माझा जीव येथून निघत नाही केव्हा तरी तुझे दर्शन मला होईल या अपेक्षेला मी लागलेलो आहे. अहो देवा तुम्ही अशी वेडीवाकडी पध्दत उगाचच का निर्माण केली आहे ? देवा तुम्ही एकाला दर्शन देऊन मुक्त करता तर एकाला संसारामध्ये बध्द करता. आम्हा लेकरांना तुम्ही उगाचच त्रास पीड
26/12/22, 10:26 Sdm:
अभंग क्र. ४०४३
बरे झाले आजिवरी । नाही पडिलो मृत्युचे आहारी । वांचोन आलो येथवरी । उरले ते हरी तुम्हा समर्पण ॥१॥
दिला या काळे अवकाश । नाही पावले आयुष्य नाश । कार्या कारण उरले शेष । गेले ते भूस जावो परते ॥धृपद॥
बुडणे खोटे पावता थडी । स्वप्नी जाली ओढाओढी । नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटी गोड घास ॥२॥
तुह्मा पावविली हाक । तेणे निरसला धाक । तुमचे भाते हे कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥३॥
रवीच्या नावे निशीचा नाश । उदय होताचि प्रकाश । आता कैचा आम्हा दोष । तू जगदीश कैवारी ॥४॥
आता जळो देह सुख दंभ मान । न करी तयाचे साधन । तू जगदादि नारायण । आलो शरण तुका म्हणे ॥५॥
अर्थ
हे देवा मी आतापर्यंत मृत्यूच्या आहारी पडलो नाही हे फार बरे झाले. हे हरी आतापर्यंत वाचून म्हणजे जिवंत राहुन मी इथपर्यंत आलो आहे आता उरलेले आयुष्य तुम्हाला समर्पित आहे. काळाने आतापर्यंत मला अवकाश दिला त्यामुळे माझ्या आतापर्यंतच्या आयुष्याचा नाश झाला नाही. व्यर्थ भूश्याप्रमाणे आतापर्यंत माझे आयुष्य जे व्यर्थ गेले ते जावो परते परंतू आता माझे सच्चिदानंद पदवी प्राप्त करुन घेण्याचे कार्य मी माझ्या आयुष्याच्या साधनेने प्राप्त करुन घेणार आहे. एखादा मनुष्य पाण्यात पडल्यानंतर बुडायला लागल्यावर थोडया वेळाने नदीच्या कडेला पोहोचला की त्याचे बुडणे जसे व्यर्थ ठरते किंवा एखादया मनुष्याची स्वप्नामध्ये खूप हालअपेष्टा झाली, परंतू एकदा की तो जागा झाला तर त्याचे हाल हे व्यर्थ ठरतात. किंवा जेवण झाल्यानंतर शेवटी गोड घास खाण्यास मिळावा त्यावेळी जसा आनंद होतो त्याप्रमाणे हे हरी शेवटी तुम��
26/12/22, 10:27 Sdm:
अभंग क्र. ४०४४
आता माझा नेणो परतो भाव । विसावोनि ठायी ठेविला जीव । सकळा लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला चित्ताठायी ॥१॥
भांडवल गाठी तरि विश्वास । झालो तो झालो निश्चय दास । न पाहे मागील ते वास । पुढती सोस सेवेचाची ॥धृपद॥
आहे ते निवेदिले सर्व । मी हे माझे मोडियला गर्व । अकाळी काळ अवघे पर्व । झाला भरवसा कृपेलाभाचा ॥२॥
वेव्हारी वेव्हारा अनंत । नाही यावाचुनी जाणत । तरी हे समाधान चित्त । लाभहानी नाही येत अंतरा ॥३॥
करूनि नातळो संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनी खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥४॥
बहु मतापासूनि निराळा । होऊनि राहिलो सोवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका म्हणे डोळा लेइलो ते ॥५॥
अर्थ
आता माझा देवाविषयी जो दृढ भक्तिभाव आहे तो पुन्हा कधीही माघारी फिरणे शक्य नाही कारण माझा जीव देवाच्याच ठिकाणी विश्रांत पावला आहे आणि तेथेच मी माझा जीव ठेवला आहे. कारण देवाचे ठिकाण म्हणजे सर्व लाभ प्राप्तीचे एकच तेवढेच ठिकाण आहे असा दृढनिश्चय माझ्या चित्ताच्या ठिकाणी झाला आहे. माझ्या पदरात विश्वास हेच एक भांडवल आहे त्यामुळे मी निश्चयाने देवाचा दास झालो आहे. आता मागे संसाराचे प्रपंचाचे काय होईल याविषयी मी काहीच विचार करणार नाही तर पुढे हरीची सेवा करण्याचाच हव्यास, निश्चय केला आहे. माझ्या मनात जे काही होते ते सर्व काही निवेदन केले आहे आता सर्व प्रकारचा गर्व मोडून टाकला आहे. काळ चांगला असो किंवा अकाळ म्हणजे वाईट असो सर्व काळ मला चांगल्या पर्वाप्रमाणेच म्हणजे चांगला आहे कारण मला देवाच्या कृपेचा लाभ झाला याविषयी पूर्णपणे भरवसा आला आहे. कोणताही व्��
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

