आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

वाराचे अभंग प्रारंभ
वाराचे अभंग प्रारंभ
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा
१ सोमवार चे अभंग, २ मंगळवार चे अभंग, ३ बुधवार चे अभंग, ४ गुरुवार चे अभंग, ५ शुक्रवार चे अभंग, ६ शनिवार चे अभंग, ७ रविवार चे अभंग
सोमवार अभंग
१ ॐ नमो शिवा आदि
२ स्वर्ग जयाची साळों
३ आम्ही कापडी रे आ
४ तुम्ही विश्वनाथ
५ भस्म उटी रुंडमाळा
६ शिव भोळां चक्रवर्ती
७ कैलासीचा देव
८ हरिहर सांडूनी देव ।
९ आदि आत्मज्योति
१० भजन करी महादेव
११ आहा आहा रे भाईप्रथम
१२ आहा रे भाई गंगा नव्हे जळ
१३ सत्य ज्योतिर्लिंग बारा
१४ होऊनी वैष्णव । जो कां
१५ हरिहरां भेद । नाहीं करूं
सोमवार चे अभंग
- ॐ नमो शिवा आदि
ॐ नमो शिवा आदि । कावडी घेतली खांदी । मिळाली संत मांदी । त्याचे चरणरेणु वंदी रे ॥१॥ शिवनाम शीतळ मुखी । सेवी पा कापडिया रे । दड दड दड दड दुडु दुडु दुडु दुडु । पळ सुटला कळीकाळा बापुडिया रे ॥२॥ गुरुलिंग जंगम । तेणे दाविला आगम । आधी व्याधि झाली सम । तेणे पावलो विश्राम रे ॥३॥ जवळी असता जगज्जीवन । का धांडोळीसी वन । एकाग्र करी मन । तेणे होईल समाधान रे ॥४॥ देहभाव तेथे विरे । ते साधने दिधले पुरे । बापरखुमादेवी वरे । विठ्ठलुरे विठ्ठलुरे विठ्ठलुरे ॥५॥ - स्वर्ग जयाची साळोंखा
स्वर्ग जयाची साळोंखा । समुद्रपाळी पिंड देखा । शेषासारखी बैसका । जो आधार तीही लोका ॥१॥ लिंग देखिले देखिले । त्रिभुवनी तीही लोकी विस्तारिले ॥२॥ मेघधारी स्नपन केले । तारापुष्पी वरी पूजिले । चंद्रफळ ज्या वाहिले । ओवाळिले रविदिपे ॥३॥ आत्म नैवेद्य समर्पिले । ब्रम्हानंदी मग वंदिले । ज्योतिर्लिंग मग ध्याईले । ज्ञानदेवे हृदयी ॥४॥ - आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे
आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे । बारा वाटा पळती बापडी रे ॥१॥ पंढरपुरीचें आम्ही कापडी रे । उत्तर पंथीचे आम्ही कापडी रे ॥२॥ आजी पाहले रे आजी पाहाले रे । संतसंगीत सुख झाले रे ॥३॥ समता कवडी रे समता कावडी रे । माजी नामामृत भरिले आवडी रे ॥४॥ येणे न घेणे रे जाणे न घडे रे । निजमुख कोंदले पाहतं चहूंकडे रे ॥५॥ नलगे दंडणे रे नलगे मुंडणे रे । नाम म्हणोनि कर्माकर्म खंडणे रे ॥६॥ दु : ख फिटले रे दु : ख फिटले रे । बापरखुमादेविवरू विठ्ठले रे ॥७॥ - तुम्ही विश्वनाथ
तुम्ही विश्वनाथ । दीन रंक मी अनाथ ॥१॥ कृपा कराल ते थोडा । पाया पडिलो बराडी ॥२॥ काय उणे तुम्हापासिं । मी तो अल्पाची संतोषी ॥३॥ तुका म्हणे देवा । काही भातुकें पाठवा ॥४॥ - भस्म उटी रुंडमाळा
भस्म उटी रुंडमाळा । हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा ॥१॥ गजचर्म व्याघ्रांबर । कंठी शोभे वासुकी हार ॥२॥ भुते वेताळे नाचती । हर्ष युक्त उमापती ॥३॥ सर्व सुखाचे आगर । म्हणे नरहरी सोनार ॥४॥ - शिव भोळां चक्रवर्ती
शिव भोळां चक्रवर्ती । त्याचे पाय माझे चित्ती ॥१॥ वाचे वदता शिवनाम । तया न बाधी क्रोध काम ॥२॥ धर्म अर्थ काम मोक्ष । शिवा देखता प्रत्यक्ष ॥३॥ एका जनार्दनी शिव । निवारी कळी काळाचा भेव ॥४॥ - कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती
कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती । पार्वतीचा पती योगीराज ॥१॥ तयाचिये पायी माझे दंडवत । घडो आणि चित्त जडो नामी ॥२॥ जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळी । तिजा नेत्रज्वाळी जातवेद ॥३॥ कंठी काळकुट डौर त्रिशूळ हाती । सर्वांगी विभूती शोभतसे ॥४॥ गळा रुंडमाळा खापर हस्तकी । रामनाम मुखी सर्वकाळ ॥५॥ गजचर्मधारी स्मशानी राहिला । संगे भूतमेळा विराजित ॥६॥ नामा म्हणे नामे नासोनिया पाप । करी सुखरूप भक्तालागी ॥७॥ - हरिहर सांडूनी देव । धरती भाव
हरिहर सांडूनी देव । धरिती भाव क्षुल्लकी ॥१॥ ऐका त्याची विटंबना । देवपणा भक्तांची ॥२॥ अंगी कवडे घाली गळा । परडी कळाहीन हाती ॥३॥ गळा गांठा हिंडे व्दारी । मनुष्य परी कुतरी ती ॥४॥ माथा सेंदूर दांत खाती । जेंगट हाती सटवीचे ॥५॥ पूजिती विकट दोंद । पशु सोंड गजाची ॥६॥ ऐशा छेंदे चुकली वाटा । भाव खोटा भजन ॥७॥ तुका म्हणे विष्णू शिवा । वांचूनी देवा भजती ते ॥८॥ - आदि आत्मज्योतिर्लिंगा लांबियेला
आदि आत्मा जोतिलिंगा लांबियेला घटु । स्थाविरिले मायावस्त्र । लिंगावरी प्रविष्ट ॥ तपन नाम ध्वनी । इंद्रिया केलें सपाटु ॥१॥ हळुहळु गळती गळे । गळों लागली सकळें ॥ उच्चारितां कृष्णनाम । भेणें पळिजे कळिकाळें ॥ त्रिगुण सुटल्या गांठी घटु विराला सघन । पंचतत्त्वें एके ठाई आत्मा नांदे परिपूर्ण ॥ जिवशिव हारपले एक दिसे चैतन्य । आत्माराम विदेहिया ॥ श्रीगुरुनें सांगीतली खुण ॥२॥ नरदेह अवचितें । जो साधकु होय नारायण । परमानंदें गळति गळे । पांचहि तत्त्वें हरपोन ॥३॥ निवृत्ति सखा माझा दीनदयाळ श्रीगुरु । आळंकापुरीं स्थापियेलें ॥ दिधला विठ्ठल उच्चारु । समाधि जीवन माझें वरी अजानवृक्षतरु ॥ जोंवरी चंद्रसूर्य तोंवरी कीर्तिघट स्थिरु ॥४॥ गाति वाति साधु मुनी छंद घट मठीं चित्त । विरेल देह बुध्दि ज्ञानदाता देईल उचित ॥ विज्ञानेंसी गोष्टी सांगे ऐसें पद पावत । बापरखुमादेविवरीं लांबविला घटु ज्ञानदेव सांगत ॥५॥ - भजन करी महादेव
भजन करी महादेव । राम पूजी सदाशिव ॥१॥
दोघ देव एक पाही । तया ऐक्य दुजे नाही ॥२॥ शिवारामा नाही भेद । ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥
जनी म्हणी आत्मा एक । सर्व घटी तो व्यापक ॥४॥ - आहा आहा रे भाई प्रथम
आहा आहा रे भाई प्रथम नमू तो विनायक । ठेवूनि गुरुचरणी मस्तक । वदेल प्रासादिक । वाणी हरीहरांचे पवाडे ॥१॥ माझी ऐसी ब्रीदावळी । दासे दासात्वे आगळी । पान्हेरीन मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडी हो ॥२॥ जे सीतळाहूनी सीतळ । पातळाहूनी पातळ प्रेमामृत रसाळ ते आधी सेवा हो भाग्याचे नु ॥३॥ जिंकाल तरी जिंका अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आधी मान । धराल ते धरा शंभूचे ध्यान । दावाल पण ऐसा दावा तो ॥४॥ काळ घेऊ नेदी वाव । आला तो घाव डाव । शुध्द सत्वी राखोनि भाव । म्हणा महादेव हरहर वाणी गर्जो घ्य ॥५॥ पराविया नारी माऊलीसमान । परधनी बाटो नेदी मन । जीवित्व ते तृनासामान । स्वामीकाजी जाण शूर म्हणो तया आम्ही ॥६॥ शक्ती वेचाविया परउपकारा । खोटे खोट्याचा पसारा । सत्य ते भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे आले हो सांगतो ॥७॥ व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर । पुण्य ते असे गाता नाचता फार । पुन्हा बोलीला संसार नाही नाही सत्यत्वे ॥८॥ संग संतांचा करिता बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा । पंथ तो सुपंथे चालावा । उगवा वासना लिगाड ॥९॥ तुका चालवितो कावडी । प्रवृत्ती निवृत्ती चोखडी । पुढती पुढती अधिक गोडी । भरुनी कळस भजन आवडी । केशवदास नटतसे ॥१०॥ - आहा रे भाई । गंगा नव्हे जळ
आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥ समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा । संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥ काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सांतु । राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥३॥ चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान । शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥४॥ गरुड नव्हे पाखरूं । ढोर नव्हे नंदिकेश्वरू । झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥५॥ कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह । ब्रम्हा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥६॥ गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥७॥ सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाहीं नाहीं चर्मांतु । कृष्णजिन व्याघ्रांबर ॥८॥ मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेनें ॥९॥ गांव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥१०॥ कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी । तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥११॥ - सत्य ज्योतिर्लिंग बारा
सत्य ज्योतिर्लिंग बारा । प्रात:काळी स्मरण करा । कोटी कुळे उद्धारा । भव तरा बापहो ॥१॥ वाराणशी विश्वनाथ । मोक्ष दाता तो समर्थ । पुरवील अंतरीचे आर्त । सोमनाथ सोरटी ॥२॥ ॐकार ममलेश्वर । श्वेतबंध रामेश्वर । भीमा उगमी भीमाशंकर । घृष्णेश्वर वेराळी ॥३॥ नागनाथ अमृतोदकी । विश्वजन केले सुखी । परळी वैजनाथ सुखी । सुकृत जन्माचे ॥४॥ त्र्यंबक हा तीर्थराज । पुरवील अंतरीचे काज । त्याही तेजामाजी तेज महाकाळ उज्जनी ॥५॥ दुजे कैलास भुवन श्रीशैल्य मल्लकार्जुन । वाचे स्मरता धन्य धन्य । अनुपम्य क्षेत्र ते ॥६॥ ब्रदिकेदार उत्तरे । ज्याचे स्मरणे भाव हा तरे । ध्यान धरिता वृत्ती नुरे । निज निश्चळ दासाची ॥७॥ नरहरी म्हणे जन्मा यावे । शुध्द सत्व प्रेम भावे । वाचे हरी गुण गावे । मालो लपे सर्वदा ॥८॥ - होऊनी वैष्णव । जो कां
होऊनी वैष्णव । जो कां निंदी सदाशिव ॥१॥ त्याचें न पहावें वदन । मुर्खाहुनी मुर्ख पूर्ण ॥२॥ भक्तीचा सोहळा । शिवें दाविला सकळां ॥३॥ एका जनार्दनीं वैष्णव । शिरोमणी महादेव ॥४॥ - हरिहरां भेद । नाहीं करूं नये
हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥ एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ ध्रु ॥ भेदकासी नाड । एक वेलांटी च आड ॥२॥ उजवें वाम भाग । तुका म्हणे एकचि अंग ॥३॥
सोमवार चे अभंग समाप्त
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा
मंगळवार अभंग प्रारंभ
1) चौक भरियेला आसनीं पाचारिली
2) रंगा येई वो ये रंगा येई वो ये
3) कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही
4) अनादी निर्गुण प्रगटली भवानी
5) अनादि अंबिका भगवती
6) ६ माझे कुळीची कुळस्वामिनी
7) ७ कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही ।
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा
- चौक भरियेला आसनीं पाचारिली
चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥ रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥धृ.॥ रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥२॥ मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी । भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥३॥ डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे । आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥४॥ - रंगा येई वो ये रंगा येई वो
रंगा येई वो ये रंगा येई वो ये । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥ वैकुंठवासिनी, विठाई जगत्र जननी । तुझा वेधु माझे मनी, रंगा येई वो ये ॥२॥ कटी कर विराजित । मुगूट रत्न जडित । पीतांबरु कासिला, तैसा येई का धांवत ॥३॥ विश्र्वरुप विश्र्वंभरे । कमळ नयनें कमळाकरे । वो तुझे ध्यान लागो । बाप रखुमादेवीवरे वो ॥४॥ - कनवाळू कृपाळू भक्तांलागीं
कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाइऩ ॥१॥ पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥धृ.॥ भक्तांच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दाहा घेतले ॥२॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥ उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥४॥ कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी जाली माउली ॥५॥ दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखादेठ घेऊनि ॥६॥ कृपाळू माउली भक्तीमुक्तिभांडार । करीं माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥७॥ - अनादी निर्गुण प्रगटली भवानी ।
अनादी निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर मर्दना लागोनी । त्रिविध तापांची करावया झाडणी । भक्तांलागी तूं पावसी निर्वाणीं ॥१॥ आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारुनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेद रहित वारीसी जाईन ॥२॥ नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा । करुनि पोटीं मागेन ज्ञानपुत्रा । धरीन सद्भाव अंतरींच्या मित्रा । दंभ सासऱया सांडिन कुपात्रा ॥३॥ पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी । मनोविकार करीन कुर्वंडी । अमृत रसाची भरीन दुरडी ॥४॥ आतां साजणी झाले मी निःसंग । विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग । काम क्रोध हे झोडियेले मांग । केला मोकळा मारग सुरंग ॥५॥ ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाउनि नवस महाद्वारी फेडिला । एकपणे जनार्दनीं देखियेला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥
आज नाथांनी जोगवा मागीतलाय आई भवानी कड़े …आणि तो ही सर्वांसाठी. ते म्हणतात की..हे आई भवानी विठाइ …तुझा गोंधळ घातला आई..तू प्रसन्न झालिस आई. तू प्रकट झालिस आई. आता तू ह्या भक्तांना पाव आई…आणि तू अशीच पावली स तर ना… आई तुझा नियमित जोगवा मागेन आई.तुझा जोगवा मागेन
या भक्तांचा मोह रूपी महिषासुर मारून टाक आई.. त्यांच्यातील तीन ताप ( रज तम सत्व)या गुणांची झाड़नी करून टाक आई आणि तुझ्या नगरात जाण्यासाठी जे योग्य आहे तेव्हडेच ठेव आई अस जर् केलस् ना आई तुझा नियमित जोगवा मागेन आई.तुझा जोगवा मागेन
त्या साठी आई मी भेदा भेद करणार नाही.द्वयेत् करणार नाही ते सांडून टाकिन आई… त्यासाठी समर्थ सद्गुरु कडून तुझ्या नामाच्या बोधाचा झेंडा हाती घेइन्. आणि तुझी वारी करीन आई. तुझी नवविध् भक्ती करीन. आणि माझ्या पोटी ज्ञानवान संतान मागेन आई .ज्ञान मिळाल तरी उतून मातून नाही जानार आई…हृदयात नेहमी सद्भाव ठेवीन. दंभ अहंकारा चा वाराही लागून घेणार नाही.त्रास देणाऱ्या सासऱ्या सारखा त्याचा नाश करीन आई अस जर् तू केलस् ना आई… तर आई तुझा नियमित जोगवा मागेन आई.तुझा जोगवा मागेन
तुझ्या नामाची समर्थ सद्गुरु कडून पूर्ण बोधाची परडीच् मागून घेइन्..आशा तृष्णा इच्छया यांना खोल दरडीत ढ़कलुन देईन आई.. मनाला भरकटवुन देणाऱ्या विकारांची कुरवण्डी करीन आई.. आणि यासाठी तू मदत केलिस् ना आई……. तर आई तुझा नियमित जोगवा मागेन आई.तुझा जोगवा मागेन
हे आई तू आता पावलिस् आई.. तुझ्या गोड नामानी हृदयात हृद्यतामृत (भातुक) पाझरणार आहे आई त्याच्या दुरडया च्या दुरडया भरून घेइन् आता मी निसंग झालीय आई.. विकल्प नावाचा नवरा मी सोडून दिलाय आई तो की नाही खुप वेग वेगळे विकल्प तैयार करून मनाला भरकटुन टाकत असे म्हणून त्याला सोडून दील आई.. काम क्रोध ह्यांना तर झोडून मारून टाकल आई आणि अशारीतीन आई मार्ग तूच मोकळा केलायस म्हणून आई तुझा नियमित जोगवा मागेन आई.तुझा जोगवा मागेन
शेवटी नाथ बाबा म्हणतात की… अरे बाबानो असा मार्ग शोधून ठेवलाय. की ज्याच्यात जन्म मृत्यु च्या पलीकडे नेणारा मार्ग मिळतो की जो मार्ग चालल्यावर जन्म मरणा चा फेरा चुकवता येतो तो मी चुकवलाय आणि त्याचाच नवस फेडायला आलोय म्हणून हे आई तुझा नियमित जोगवा मागेन आई.तुझा जोगवा मागेन
- अनादि अंबिका भगवती
अनादि अंबिका भगवती । बोध परडी घेउनी हातीं । पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती ॥१॥ गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ अंबे ॥धृ०॥ व्यास वसिष्ठ शुक गोंधळी । नाचताती सोहंमेळीं । द्वैतभाव विसरूनी बळी । खेळती अंबे तुझे गोंधळी ॥२॥ मुगुटमणी पुंडलीक । तेहतीस कोटी देव नायक । गोंधळ घालतील कौतुक । एका जनार्दनीं नाचे देख ॥३॥ - माझे कुळीची कुळस्वामिनी
माझे कुळीची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी । येई वो पंढरपूरवासिनि । ठेवीले दोन्ही कर जघनी । उभी सखी सजनी ॥१॥ येई पुंडलिक वरदायिनी । विश्वजननी रंगा येई वो ॥ धृ ॥ मध्ये सिंहासन घातले । प्रमाण चौक हे साधिले । ज्ञान कळस वर ठेविले । पूर्ण भरियले । धूप दाविले । सुवासे करूनि ॥२॥ सभामंडप शोभला । भक्ती चांदवा दिधला । उदो उदो शब्द गाजला । रंग माजला । वेद बोलिला । मूळची ध्वनि ॥३॥ शुक सनकादिक गोंधळी । जीव शीव घेऊनी संबळी । गाती हरीची नामावळी मातले बळी । प्रेमकल्लोळी । सुखाचे सदनी ॥४॥ ऐसा गोंधळ घातिला । भला परमार्थ लुटिला । एका जनार्दनी भला । ऐक्य साधिला । ठाव आपुला । लाभ त्रिभुवनी ॥५॥ - कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही ।
कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥१॥ पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥ ध्रु ॥ भक्तांच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दहा घेतले ॥२॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥ उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥४॥ कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी झाली माउली ॥५॥ दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखादेठ घेऊनि ॥६॥ कृपाळू माउली भुक्तिमुक्तिभांडार । करीं माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥ ७ ॥
मंगळवार चे अभंग समाप्त
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा
बुधवार चे अभंग
अनुक्रमणिका २१ अभंग
विठ्ठलु नाहीं जये शरीरीं
विठ्ठल नाम नुच्चारिसी
भ्रम धरिसी या देहाचा
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
भवसागर तरतां
काय नव्हे केले
एक गाउ आम्ही विठोबाचे
विठ्ठल हा चित्तीं
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
आनंद अद्वय नित्य निरामय
न कळे ते कळों येईल उगले
जैं (जरी) आकाश वर पडों
काही नेणोनिया आण । एकला
सार सार सार विठोबा नाम
अनंत तीर्थाचे माहेर॥ अनंत
नेणो ब्रम्ह मार्ग चुकले।उघडे
सखी पुसे सखीयेसी । युगे
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा।करी
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी ।
विठ्ठल विठ्ठल येणें छंदें।ब्रह्मानंदें
दोन्ही हात ठेवुनि कटीं उभा
बुधवार चे अभंग प्रारंभ
- विठ्ठलु नाहीं जये शरीरीं
विठ्ठलु नाहीं जये शरीरीं । वाया कांगा जन्मले संसारी । विठ्ठलु नाहीं जये नगरीं तें अरण्य जाणावें ॥१॥ विठ्ठलु नाहीं जये देशीं । स्मशान भूमि ते परियेसी । रविशशिवीण दिशा जैसी । रसना तैसी विठ्ठलेंविण ॥२॥ विठ्ठला वेगळें जितुकें कर्म । विठ्ठला वेगळा जितुका धर्म । विठ्ठला वेगळें बोलती ब्रह्म । तितुकाही श्रम जाणावा ॥३॥ सच्चिदानंदघन । पंढरिये परिपूर्ण । कर ठेवोनियां जघन । वाट पाहे भक्ताची ॥४॥ विठ्ठलेंविण देवो ह्मणती । ते संसार पुढती । विठ्ठलाविण तृप्ती । नाहीं प्रतीति विठ्ठलेंविण ॥५॥ श्रीगुरुनिवृत्तीनें दिधलें । तें प्रेम कोणे भाग्यें लाधलें । बापरखुमादेविवर विठ्ठलें । ऐसें केलें ज्ञानदेवा ॥६॥ - विठ्ठल नाम नुच्चारिसी
विठ्ठल नाम नुच्चारिसी । तरी रवरव कुंडी पडसी ॥१॥ विठ्ठल नाम उच्चारी । आळसु न करी क्षणभरी ॥२॥ विठ्ठल नाम तीन अक्षरें । अमृतपान केलें शंकरें ॥३॥ रखुमादेविवरा विठ्ठलें । महापातकी उध्दरिले ॥४॥ - भ्रम धरिसी या देहाचा
भ्रम धरिसी या देहाचा । विठ्ठलम्हणे कारे वाचा ॥१॥ पडोन जाईल हें कलेवर । विठ्ठल उच्चारी पा सार ॥२॥ रखुमादेविवरु अभयकारु । मस्तकीं ठेविला हा निर्धारु ॥३॥ - बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ॥२॥ बंधनापासूनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥३॥ तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥ - भवसागर तरतां । कां रे करीतसां
भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥१॥ त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥धृ.॥ सुखें करावा संसार । परि न संडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥२॥ भुक्ति-मुक्तिची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥३॥
अर्थ :- हे जनाहो, हां भवसागर तरुण जाण्याची चिंता तुम्ही निष्कारण का करता ? तुम्हाला पार करणारा तो सर्वशक्तिमान विठ्ठल पैलतीरावर हात कटावर ठेऊन तत्परतेने उभा आहे । १ ॥ त्यासाठी त्याला कोणतेही मोल द्यावे लागत नाही, फक्त भक्तिभावाने त्याच्या पाई मीठी घाला, तो तुम्हाला विनामोबादला आपल्या खांद्यावर घेईल ॥ धृ ॥ त्याला फक्त तुम्ही भक्तिभावाने चित्त अर्पण केले की मग खुशाल संसार सिखाने करा, दोन वार (वारि) चुकवु नका. मग दया क्षमा चालात तुमच्या घरी येतील ॥२॥ तुकोबा म्हणतात, या पांडुरंगाची जर तुम्ही भक्ती कराल तर दारिद्र्य येणार नाही, मुक्तिची चिंता तुम्हाला त्रास देणार नाही
- काय नव्हे केले । एका चिंतिता
काय नव्हे केले । एका चिंतिता विठ्ठले ॥१॥ सर्वसाधनांचे सार । भवसिंधु उतरी पार २॥ योग याग तपे । केली तयाने अनुपे ॥३॥ तुका म्हणे जपा । मंत्र त्रिअक्षरी सोपा ॥४॥ - एक गावे आम्ही विठोबाचे नाम
एक गावे आम्ही विठोबाचे नाम । आणिकांचे काम नाही आता ॥१॥ मोडूनियां वाटा सूक्ष्म दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥२॥ लावूनि मृदंग श्रुतिटाळघोष । सेवूं ब्रह्मरस आवडीने ॥३॥ तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रें ॥४॥
तुकाराम महाराज म्हणतात फक्त एका त्या हरीचे नाम गावे, त्याच्या नामाचा जयघोष करावा हेच काय ते आता आमचे काम आणि हेच काय ते आम्ही जाणतो, बाकी इतर कसलेही काम आम्ही जाणत नाही म्हणजेच इतर कोणत्याही कठीण अशा साधनांकडे आम्ही वळत नाही ना त्यांचे आमच्याकडे काही चालत. ते म्हणतात कर्माच्या, संसाराच्या तसेच योग साधनांच्या सूक्ष्म आणि दुस्तर अशा वाटा आम्ही सोडून दिल्या आहेत आणि नामाने जी वाट आम्हांला दिसत आहे त्या वाटेवरूनच आम्ही परमार्थाचा राज्यकारभार पुढे रेटू. तसेच हाथी टाळ, मृदंग घेऊन नामाचा जयघोष करत आम्ही हरिकिर्तनाचा ब्रह्मरस आवडीने सेवत राहू. तुकोबाराय म्हणतात अशा या नामाच्या गजराने, नामसंकीर्तनाने जे महापातकी आहेत, मोठमोठे जे पतित आहेत त्यांचे कल्याण होऊन त्वरित त्यांचे हित साधले गेले आहे.
- विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे
विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गितीं ॥१॥ आह्मां विठ्ठल जीवन । टाळ चिपुळिया धन ॥२॥ विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजिवनी ॥३॥ रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥ - पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती । रत्नकीळ फांकती प्रभा । अगणित लावण्य जःपुंजाळले । न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥ कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणें मज लावियला वेधु । खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी । आळविल्या नेदी सादु ॥२॥ शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु । हें तंव कैसेंनि गमे । परेहि परतें बोलणें खुंटलें । वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥ पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे । उभाचि स्वयंभु असे । समोर कीं पाठिमोरा न कळे । ठकचि पडिलें कैसें ॥४॥ क्षेमालागी जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो । क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली । आसावला जीव राहो ॥५॥ बाप रखुमादेविवरु हृदयींचा जाणुनी । अनुभवु सौरसु केला । दृष्टीचां डोळां पाहों गेलें तंव । भीतरीं पालटु झाला ॥६॥ - आनंद अद्वय नित्य निरामय
आनंद अद्वय नित्य निरामय । जें कां निजध्येय योगियांचें ॥१॥ तें हें समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरीं विठ्ठलरुप ॥२॥ पुराणासी वाड श्रुति नेणती पार । तें झालें साकार पुंडलीका ॥३॥ तुका म्हणे ज्यातें सनकादिक ध्यान । तें आमुचें कुळदैवत पांडुरंग ॥४॥ - न कळे ते कळों येईल उगले
न कळे ते कळों येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥१॥ न दिसे ते दिसो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥२॥ न बोलो ते बोलो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥३॥ न भेटे ते भेटो येईल आपण । करिता चिंतन विठोबाचे ॥४॥ अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणता वाचे ॥५॥ तुका म्हणे जीव आसक्त सर्वभावे । तरतील नावे विठोबाच्या ॥६॥
अर्थ
तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाच्या नामस्मरणाने या संसारातल्या ज्या अशा अनेक गोष्टी आकलना पलीकडल्या आहेत, ज्या सहज ग्राह्य न करता येण्याजोग्या आहेत त्या बुद्धीला सहज कळू लागतील. तसेच मायेच्या भ्रमामुळे जे डोळ्यांस दिसत नव्हते ते सहज बघता येऊ शकेल, जिव्हेला जे बोलण्यास जड जात होते किंवा अवघड वाटत होते ते सहज वाचेवर येईल. तसेच त्या विठोबाच्या चिंतनाने जो भेटण्यास कठीण आहे तो नारायण देखील सहज भेटी देईल. ते म्हणतात विठ्ठलाच्या निरंतर नामचिंतनाने अलभ्य असा लाभ देखील अपार पदरात पडेल. तुकोबाराय म्हणतात एवढेच काय जे जीव आजतागायत या संसारात आसक्तीने अडकलेले आहेत ते देखील या विठोबाच्या नामाने सहज तरून जातील.
- जैं (जरी) आकाश वर पडों पाहे
जैं (जरी) आकाश वर पडों पाहे । ब्रह्मागोळ भंगा जाये । वडवानळ त्रिभुवन खाये । तरी तुझीच वाट पाहें गा विठोबा ॥१॥ न करी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥धृ०॥ सप्त सागर एकवट होती । जैं हे विरुनी जाय क्षिती । पंचमहाभुतें प्रलय पावती । परि मी तुझाचि सांगातीं गा विठोबा ॥२॥ भलतैसें वरपडों भारी । नाम न संडों टळों निर्धारी । जैसी पतिव्रता प्राणेश्वरी । विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा ॥३॥
- काही नेणोनिया आण । एकला
काही नेणोनिया आण । एकला विठ्ठलुचि जाण ॥१॥ पुढति पुढति मन । एकला विठ्ठलुचि जाण ॥२॥ हेचि गुरुगम्याची खूण । एक विठ्ठलुचि जाण ॥३॥ बुझसि तरि तूंचि निर्वाण । एकला विठ्ठलुचि जाण ॥४॥ हेंचि भक्ति हेंचि ज्ञान । एकला विठ्ठलुचि जाण ॥५॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण । एकला विठ्ठलुचि जाण ॥६॥ - सार सार सार विठोबा नाम
सार सार सार विठोबा नाम तुझें सार । म्हणोनि शूळपाणी जपताहे वारंवार ॥१॥ आदि मध्य अंती निजबीज ओंकार । ध्रुव प्रल्हाद अंबऋषी मानिला निर्धार ॥२॥ भुक्तिमुक्तिसुखदायक साचार । पतीत अज्ञान जीव तरले अपार ॥३॥ दिवसें दिवस व्यर्थ जात संसार । बापरखुमादेविवर विठ्ठलाचा आधार ॥४॥ - अनंत तीर्थाचे माहेर ॥ अनंत रुपांचे
अनंत तीर्थाचे माहेर ॥ अनंत रुपांचे हे सार ॥ अनंता अनंत अपार ॥ तो हा कटी कर ठेवूनि उभा ॥१॥ धन्य धन्य पांडुरंग ॥ सकळ दोषा होय भंग ॥ पूर्वज उध्दरती सांग ॥ पंढरपूर देखिलिया ॥ धृ० ॥ निराभिवरा पडतां दृष्टी ॥ स्नान करितां शुध्द सृष्टि ॥ अंती तो वैकुंठ प्राप्ती ॥ ऐसें परमेष्ठि बोलिला ॥२॥ तेथे एक शीत दिधल्या अन्न ॥ कोटी कुळाचे होय उद्भरण ॥ कोटि याग केलें पूर्ण ॥ ऐसे महिमान ये तीर्थीचें ॥३॥ नामा ह्मणे धन्य जन्म ॥ जे धरिती पंढरीचा नेम ॥ तया अंती पुरुषोत्तम ॥ जीवें भावें न विसंबे ॥४॥ - नेणो ब्रम्ह मार्ग चुकले । उघडे
नेणो ब्रम्ह मार्ग चुकले । उघडे पंढरपुरा आला । भक्तें पुंडलिकें देखिले । उभे केला विटेवरी ॥१॥ तो हा विठोबा निधान । ज्याचें ब्रह्मादिकां ध्यान । पाउलें समान । विटेवरी शोभती ॥२॥ रुप पाहतां तरी डोळसु । सुंदर पाहतां गोपवेषु । महिमा वर्णितां महेशु । जेणें मस्तकीं वंदिला ॥३॥ भक्ति देखोनी लांचावला । जाऊं नेदी उभा केला । निवृत्तिदास म्हणे विठ्ठला । जन्मोजन्मीं न विसंबे ॥४॥ - सखी पुसे सखीयेसी । युगे
सखी पुसे सखीयेसी । युगे झाली अठ्ठावीसी । उभा ऐकिला संतांमुखी । अद्यापी वर । कटावरी कर । भीवरा तीर वाळुवंटी संत सभा सभा ॥१॥ देव कांहो विटेवरी उभा उभा ॥ धृ ॥ पुसू नका बाई । वेदासी काई । कळलेंचि नाहीं । शेष शिणला जाहल्या द्विसहस्र जिभा जिभा ॥२॥ जेथें करिताती गोपाळ काला । हरिनामीं तयांचा गलबला । देव भावाचा भुकेला । मिळालें संत । मदनारी । तो हरि आला । तयांचिया लोभा लोभा ॥३॥ हरि वैकुंठांहूनि । आला पुंडलिकालागुनी । उभा राहिला अझुनी । युगानुयुगें । भक्तासंगें । एका जनार्दनीं संत शोभा ॥४॥ - विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥१॥ भाग्यवंता छंद मनीं । कोडें कानीं ऐकती ॥ ध्रु ॥ विठ्ठल हें दैवत भोळें । चाड काळें न धरावी ॥२॥ तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्तीं तो धन्य ॥३॥ - विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ ध्रु ॥ विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥ विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥३॥ - विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें
विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें गर्जावें ॥१॥ वाजे टाळ टाळ्याटाळी । होइल होळी विघ्नांची ॥ ध्रु ॥ विठ्ठल आदी अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥२॥ तुका म्हणे विठ्ठलवाणी । वदा कानीं आईका ॥३॥ - दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा
दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासीसाठी । भक्तीकाजे विठ्ठला ॥१॥ भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आह्मालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ध्रु॥ होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । ह्मणोनियां घरीं । गौळीयांचे अवतार ॥२॥ केला पुंडलिकें गोवा । तुज पंढरीसि देवा । तुका ह्मणे भावा । साटीं हातीं सांपडसी ॥३॥
बुधवार चे अभंग समाप्त
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा
गुरुवार चे अभंग-सूची
अभंग संख्या : ३५
ॐ नमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा
अजानवृक्षांची पाने जाण । जो
अहो सखीये साजणी । ज्ञानाबाई
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव
उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं
उभारिला ध्वज तिही लोकावरी
काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया
कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा
गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या
जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील
ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी
ज्ञानदेव म्हणता माया । गेलि
ज्ञानराज माझी योग्यांची माउली
ज्ञानाचा सागर । सखा माझा
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
ज्ञानोबाचा हात । प्रेमें धरी विश्वनाथ
तिन्ही देव जैसे परब्रम्हीचे ठसे
तीन अक्षरे निवृत्ति । जो जप करी
धन्य महाराज अलंकापुरवासी । साष्टांग
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
पशुमुखें वेदाच्या श्रुति । पढवा
भाव अक्षराची गाठी । ब्रह्मज्ञानाने
माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव
म्हैसी पुत्रामुखें बोलावणे श्रुती
यात्रे अलंकापुरा येती । ते
विश्रांतीचे स्थान संतांचे माहे । तें या
शिव तो निवृती विष्णू ज्ञानदेव
श्रीज्ञानदेवा चरणीं । मस्तक असो
संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष
संदेह गमला । रेडा कैसा बोलविला
सदाशिवाचा अवतार । स्वामी
सर्व सुखाची लहरी
सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा
गुरुवार चे अभंग प्रारंभ
- उभारिला ध्वज तिही लोकावरी
उभारिला ध्वज तिही लोकावरी । ऐसी चराचरी किर्ति ज्यांची ॥१॥ ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञानदीप्तिकळा ॥२॥ धरुनी सगुणरुपे केली बाळक्रीडा । बोलविला रेडा निगमवाचे ॥३॥ बैसुनिया वरी चालविली भिंती । चांगदेवाप्रति दीली भेटी ॥४॥ मग वास केला अलंकापुरासी । पिंपळ द्वाराशी कनकाचा ॥५॥ नीळा म्हणे ज्यांच्या नामे करीता घोष । नातळती दोष कळिकाळाचे ॥६॥ - नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ती उदारा सोपान देवा ॥१॥ नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी । आदित्रय जननी देवाचिये ॥ धृ ॥ जगदोध्दारालागी केला अवतार । मिरविला बडिवार सिद्धाईचा ॥३॥ निळा शरणागत म्हणवी आपुला । संती मिरविला देऊनि हाती ॥४॥
- ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥ मज पामरा हे काय थोरपण । पायीची वाहाण पायीं बरी ॥२॥ ब्रह्मंदिक जेथें तुम्हां ओळंगणे । इतर तुळणें कायं पुरे ॥३॥ तुका म्हणे नेणें युक्तीची ते खोली । म्हणोनि ठेविली पायीं डोई ॥४॥ - कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा
कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा । चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ॥१॥ ज्ञानियाचा शिरोमणी । वंद्य जो का पूज्यस्थानीं । सकळांसी शिरोमणी । ज्ञानोबा माझा ॥२॥ चालविली जड भिंती । हारली चांग्याची भ्रांती । मोक्षमार्गाचा सांगाती । ज्ञानोबा माझा ॥३॥ रेड्यामुखीं वेद बोलविला । गर्व द्विजांचा हरविला । शांतिबिंब प्रगटला । ज्ञानोबा माझा ॥४॥ गुरुसेवेलागीं जाण । शरण एका जनार्दन । चैतन्याचें जीवन । ज्ञानोबा माझा ॥५॥ - म्हैसी पुत्रामुखें बोलावणे श्रुती
म्हैसी पुत्रामुखें बोलावणे श्रुती । चालवणे भिंती बैसोनिया ॥१॥ नव्हे हा सामान्य महिमा संतांचा । नैवेद्य हातीचा मूर्ति जेवीं ॥२॥ उदकामाजी वह्या ठेऊनि कोरड्या । दाखवणे रोकड्या विश्वजनां ॥३॥ निळा म्हणे तिहीं संगेचि तारणे । दीनें उद्धरणे नवल कोण ॥४॥ - तिन्ही देव जैसे परब्रम्हीचे ठसे
तिन्ही देव जैसे परब्रम्हीचे ठसे । जगी सुर्य जैसे प्रकाशले ॥१॥ धन्य तो निवृत्ति धन्य तो सोपान । धन्य हा निधान ज्ञानदेव ॥२॥ उपजतांचि ज्ञानी हें वर्म जाणोनी । आले लोटांगणी चांगदेव ॥३॥ प्रत्यक्ष पैठणी भेटी केला वाद । बोलविला वेद म्हैशीपुत्रा ॥४॥ संस्कृताची गांठी उकलोनि ज्ञानदृष्टि । केलीसे मराठी गीता देवी ॥५॥ नामा म्हणे सर्व सुकृत लाहिजे । एकवेळा जाइजे अलंकापुरा ॥६॥ - जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ
जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐंसें बळ रेडा बोले ॥१॥ करील ते काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुध्द अंगी ॥२॥ जयाने घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥३॥ तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया ॥४॥
अर्थ:
संतशिरोमणी जगदगुरू तुकोबारायांनी, सर्व वारकऱ्यांची माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती, शक्ती आणि महती सांगण्यासाठी या अभंगाची रचना केली आहे. तुकोबा म्हणतात, माऊलींची शक्ती, कीर्ती काय वर्णावी? माऊलींच्या दारात उभा राहिल्याने ते पिंपळाचे झाड सोनियाचे झाले आहे. कारण सातत्याने माऊलींच्या मुखातून होणारा जप, नामघोष ऐकून तो पिंपळ इतका पवित्र झाला आहे की त्याला सोन्यापेक्षाही महत्व प्राप्त झाले आहे. वारकरी संप्रदाय या पिंपळाची पाने शिरी लावून भक्तिभावाने जपून ठेवतात. ही त्या पिंपळाची एक प्रकारची भक्तीच आहे. भक्तीच्या नऊ प्रकारापैकी ही श्रवण भक्ती. जर सामान्य माणसाने भजन, कीर्तन, प्रवचन, इ. श्रवण केले तर त्याचे आयुष्यही असेच या पिंपळासारखे सोन्याचे होईल. माऊलींच्या अंगी इतके बळ होते की त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले. काही लोक सांगतात कि माऊलींनी रेड्याच्या मुस्काटात मारली आणि रेडा वेद बोलू लागला. हे असे नाही तर माऊलींनी रेड्याच्या माथ्यावर हात ठेवताच रेडा वेद बोलू लागला. हे कसले बळ माऊलींच्या अंगी होते? तर हे आत्मिक बळ होते जे जप, तप, भक्ती याद्वारे माऊलींनी प्राप्त केले होते. एकप्रकारे माऊलींनी भक्तीची शक्ती याद्वारे दाखवून दिली आहे. या भक्तीच्या शक्तीनेच माऊलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतले. जर माऊलींच्या कृपेने रेडा वेद बोलू लागतो, तर तुम्हा आम्हा माणसांवर माऊलींची कृपा झाली तर निश्चितच त्या परमेश्वराचे ध्यान आणि ज्ञान आम्हाला प्राप्त होईल.
आणि हे काही कुण्या राजा महाराजाला शक्य आहे असे नाही . त्यांनी त्यांची कोणतीही शक्ती वापरली तरी त्यांना हे शक्य नाही. त्यासाठी अंगी शुद्ध बीज असायला हवे. तुकोबाराय म्हणतात, ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ‘ । हे शुद्ध बीज यावे कुठून? तर भक्ती, जप, तप आणि साधनेने षड्रिपूंवर विजय मिळविल्यानंतर ही शुद्ध सात्विक बीजे निर्माण होतात आणि या बीजांपासून जी संतती निर्माण होते त्या संततीच्या अंगी असे बळ निर्माण होते. त्यालाच अशी शक्ती प्राप्त होते जी माऊलींच्या अंगी होती. अशी माणसेच तप आणि साधनेने ही शक्ती प्राप्त करू शकतात.
अशा या महात्म्याने मुक्तीची एक पायवाट बनविली आहे. आणि या वाटेवर तो एकटा चालत नाही तर लाखो करोडो भक्तांची मांदियाळी गोळा करून त्यांना ही भक्तीची, मुक्तीची वाट दाखवतो आहे. संत जनाबाई म्हणतात, ‘ महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर । ‘ असा हा अवतारपुरुष सर्व भक्तजनांना सवे घेऊन या मुक्तीच्या वाटेवर चालतो. या वाटेवर चालून पाप-पुण्य आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या फेऱ्यातून आम्ही स्वत:ला वाचवू शकतो.
तुकोबाराय म्हणतात, अशा या भक्तीच्या महामार्गावर आपण चाललो तर आपले चित्त शुद्ध राहील. आपल्या चित्तात समाधान नांदेल आणि असे समाधान ज्याच्या चित्ती आहे अशा मानवाला सुखाची काय कमी आहे? माणूस आज सुखाच्या मागे धाव धाव धावतो आहे. पण खरे सुख त्याला प्राप्त होत नाही. जर हे परमार्थिक सुख प्राप्त करावयाचे असेल तर या भक्तीच्या वाटेवर संपूर्ण श्रद्धेने चालायला हवे. मनाचे समाधान हेच खरे सुख. इथे माझ्याच एका कवितेच्या काही ओळी द्याव्याशा वाटतात.
सुखा अरे सुखा
तुला शोधले मी फुका
तू तर राहतो माझ्या
मनाच्या कोपऱ्यात एका
अशा प्रकारे तुकोबारायांनी या अभंगातून माऊलींच्या भक्ती आणि शक्तीचे गुणगान गाइले आहे. अशा सर्व शक्तिमान अवतार पुरुषाला माझे साष्टांग दंडवत । - सर्व सुखाची लहरी
सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥१॥ शिवपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥ वेदशास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानबाई आई ॥३॥ ज्ञानाबाईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥ - सदाशिवाचा अवतार स्वामी
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१॥ महा विष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥२॥ ब्रम्हा सोपान तो झाला । भक्तां आनंद वर्तला ॥३॥ आदि शक्ति मुक्ताबाई । दासी जनी लागे पायीं ॥४॥ - शिव तो निवृती विष्णू ज्ञानदेव पाही
शिव तो निवृती विष्णू ज्ञानदेव पाही । ब्रम्हा तो सोपान मुळ माया मुक्ताई ॥१॥ धन्य धन्य धन्य निवृती राया । धन्य ज्ञानदेव सोपान सखया ॥२॥ प्रत्यक्ष पैठनी भटा दावीली प्रचिती । रेङियाच्या मुखी बोलविली वेद श्रुती ॥३॥ चोदासे वरूषाचे तप्तीतीर रहीवासी । गर्व हरावया चालविले भितीसी ॥४॥ धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची । भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणोनिया ॥५॥
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा - ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा
ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा । ज्ञानाज्ञान विरहिता ब्रह्म प्राप्तीची संज्ञा । ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा । ज्ञानाग्निने पापे जळती ही ज्याची आज्ञा ॥१॥ ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो । वासुदेवचि होतो अखंड वदनी वदे तो ॥धृ.॥ नररुपे विष्णु अवतरला हा भगवान । नदि नद वापी कूप पाहता उदक नोहे भिन्न । नवल हेचि पशु म्हैसा करितो वेदाध्यन । नमन करुनि सद्भावे जपता होय विज्ञान ॥२॥ देवाधिदेव भगवान भक्तांप्रती वर दे । देता वर ब्रह्मांडीँ ब्रह्मानंद कोँदे । देशिकराज दयानिधी अलंकापुरी जो नांदे । देशभाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे ॥३॥ वक्ते श्रोते ग्रंथपठणेँ पावती समभाव । वर्णू जाता अघटित महिमा होतो जीव शीव । वंदूनि अनन्य एका जनार्दनी धरी दृढ भाव । वर्षती निर्झर ज्ञानदेव नामे पुष्पांचा वर्षाव ॥४॥
- यात्रे अलंकापुरा येती । ते आवडी
यात्रे अलंकापुरा येती । ते आवडी विठ्ठला ॥१॥ पांडुरंगे प्रसन्नपणे । दिधले देणे हे ज्ञाना ॥२॥ भुवैकंठ पंढरपुर । त्याहुनी थोर महिमा या ॥३॥ निळा म्हणे जाणोनि संत । धावत येती प्रतिवर्षी ॥४॥ - आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ॥ दैवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥ चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा ॥ तो सुख सोहळा काय वानू ॥२॥ विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव ॥ स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥ नामा म्हणे देवा चला तया ठाया ॥ विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥ - माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव
माझी ऐकावी विनंती । ज्ञानदेव श्रेष्ठमूर्ती ॥१॥ तुम्ही बैसोनि अंतरी । मज जागवा निर्धारीं ॥२॥ तुम्ही सत्ताधारी । प्रपंच करावा बाहेरी ॥३॥ श्रेष्ठा ज्ञानदेवा । एका जनार्दनीं आठवा ॥४॥ - ज्ञानराज माझी योग्यांची माउली
ज्ञानराज माझी योग्यांची माउली । जेणें निगमवल्लि प्रगट केली ॥१॥ गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥ अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रुप । चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥ छपन्न भाषेचा केलासे गौरव । भवार्णवीं नाव उभारिली ॥४॥ श्रवनाचे मिषें बैसावें येउनी । साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥ नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥ - काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती
काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविलें ॥१॥ कोठवरी वानूं याची स्वरूपस्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥ अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्धारा बोलविलें ॥३॥ नामा ह्मणे यांनीं तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥ - ज्ञानोबाचा हात । प्रेमें धरी विश्वनाथ
ज्ञानोबाचा हात । प्रेमें धरी विश्वनाथ ॥१॥ ऐसें बोलत चालत । दोघे आले गंगे आंत ॥२॥ ज्ञानोबाचें पायीं । मिठी घाली गंगाबाई ॥३॥ नामा म्हणे सोडा बाई । ज्ञानदेव सर्वांठायीं ॥४॥ - गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या
गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥१॥ वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानीं । आतां ऐसें कोणी होणें नाहीं ॥२॥ सांगतील ज्ञान म्हणतील खूण । नयेचि साधन निवृत्तीचें ॥३॥ परब्रह्म डोळां दावूं ऐसें म्हणती । कोणा नये युक्ति ज्ञानोबाची ॥४॥ करतील अर्थ सांगतील परमार्थ । नये पां एकांत सोपानाचा ॥५॥ नामा म्हणे देवा सांगूनियां कांहीं । नये मुक्ताबाई गुह्य तुझें ॥६॥ - ज्ञानदेव म्हणता माया । गेलि
ज्ञानदेव म्हणता माया । गेलि समूळ विलया ॥१॥ संत महिमा वर्णू किती । निर्जीव चालवली भिंती ॥२॥ जड मूढ उद्धरीले । रेङ्यामुखी वेद बोलवीले ॥३॥ म्हणे नामयाचा नारा । नमन माझे ज्ञानेश्वरा ॥४॥ - ज्ञानाचा सागर । सखा माझा
ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥ मरोनियां जावें । बा माझ्या पोटा यावें ॥२॥ ऐसें करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥ जावें वोवाळुनी । जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥ - अहो सखीये-साजणी । ज्ञानाबाई
अहो सखीये साजणी । ज्ञानाबाई हो हरणी ॥१॥ मज पाडसाची माय । भक्तिवत्साची ते गाय ॥२॥ का गा उशीर लाविला । तुजविण शिण झाला ॥३॥ अहो बैसले दळणी । धाव घाली म्हणे जनी ॥४॥ - भाव अक्षराची गाठी । ब्रह्मज्ञानाने
भाव अक्षराची गाठी । ब्रह्मज्ञानाने गोमटी ॥१॥ ते हे माय ज्ञानेश्वरी । संतजनां माहेश्वरी ॥२॥ ज्ञानेश्वर मंगलमुनी । सेवा करी दासी जनी ॥३॥ - सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष
सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलंकाभुवनी नांदतसे ॥१॥ तो हा महाराज ज्ञानेश्वर माउली । जेणें निगमवल्ली प्रगट केली ॥२॥ संसारी आसक्त मायामोह रत । ऐसे जे पतीत तारावया ॥३॥ चोखा ह्मणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥ - धन्य महाराज अलंकापुरवासी । साष्टांग
धन्य महाराज अलंकापुरवासी । साष्टांग तयासी नमन माझें ॥१॥ या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचें । उद्धरती तयाचें सकळ कुळें ॥२॥ इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा । तुटती यातना सकळ त्याच्या ॥३॥ सेना म्हणे त्याचें धन्य झालें जिणें । ज्ञानदेव दरुशनें मुक्त होती ॥४॥ - ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥ ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥ ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जिवलग निर्धारे ज्ञानदेव ॥३॥ सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान । दाविली निजखूण ज्ञानदेवे ॥४॥ - ॐ नमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा
ॐ नमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥ तुमचा अनुग्रह लाधलों । पावन झालों चराचरीं ॥२॥ मी कळाकुसरी काहींच नेणें । बोलतों वचनें भाविका ॥३॥ एका जनार्दनीं तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥ - विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर । तें या
विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर । तें या भूमीवर अलंकापुर ॥१॥ तये स्थळी माझा जीवाचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनियां ॥२॥ सिद्धेश्वर स्थान दरुशनें मुक्ति । ब्रह्मज्ञान प्राप्ति वटेश्वर ॥३॥ चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा । प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष ॥४॥ तयासी नित्यतां घडता प्रदक्षणा । नाहीं पार पुण्या वास स्वर्गी ॥५॥ अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी । भागीरथी आदिकरुनी तीर्थराज ॥६॥ ऐशिया स्थळी समाधि ज्ञानदेव । एका जनार्दनीं ठाव अलंकापुर ॥ ७ ॥ - कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥ न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥ भलतिया भावें शरण जातां भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥ ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे ॥४॥ - अजानवृक्षांची पाने जाण । जो
अजानवृक्षांची पाने जाण । जो भक्षून करील अनुष्ठान । त्यासी साध्य होईल ज्ञान । येथे संशय नाहीं ॥१॥ ज्ञानेश्वरी तीन सप्तकें । जो श्रवण करील विवेके ॥ तो होय ज्ञानी अधिकें । येथे संशय नाहीं ॥२॥ मनकर्णिका भागीरथीं । इंद्रायणीचें स्नान करिती । तें मोक्षपदासी जाती । येथे संशय नाहीं ॥३॥ अश्वत्थ सिद्धेश्वर । समाधीसी करी नमस्कार । तो पावे मोक्ष पैं सार । येथे संशय नाही ॥४॥ येथीचें वृक्षपाषाण । तें अवघे देव जाण । म्हणे एका जनार्दन । येथे संशय नाहीं ॥५॥ - संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष
संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥ अर्जुना संकट पडतां जडभारीं । गीता सांगे हरी कुरुक्षेत्रीं ॥२॥ तोचि अवतार धरी अलंकापुरी । ज्ञानाबाई सुंदरी तारावया ॥३॥ गीता शोधोनियां अर्थ तो काढिला । ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ॥४॥ जगाचा उध्दार ज्ञानाबाई नामें । साधन हें आणिक नेणें न करीं कांहीं ॥५॥ एका जनार्दनीं ज्ञानाबाई नाम । पावेन निजधाम संतांचें तें ॥६॥ - श्रीज्ञानदेवा चरणीं । मस्तक असो
श्रीज्ञानदेवा चरणीं । मस्तक असो दिवसरजनीं ॥१॥ केला जगासी उपकार । तारियेले नारीनर ॥२॥ पातकी दुर्जन हीन याती । चार अक्षरें तयां मुक्ती ॥३॥ संस्कृताची भाषा । मर्हाठी नि:शेष अर्थ केला ॥४॥ ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । अनुभव दावी भाविकां ॥५॥ एका जनार्दनीं अनुभव । समाधि ठाव अलंकापुरीं ॥६॥ - उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं
उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकीं मात जयाची ॥१॥ केला भगवद्गीते अर्थ । ऐसे समर्थ तिहीं लोकीं ॥२॥ बोलविला रेडा चालविली भिंती । चांगदेवातें उपदेशिती ॥३॥ एका जनार्दनीं समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥ - तीन अक्षरे निवृत्ति । जो जप करी
तीन अक्षरे निवृत्ति । जो जप करी अहोरात्रीं । तया सायुज्यता मुक्ति । ब्रह्मस्थिती सर्वकाळ ॥१॥ चार अक्षरे ज्ञानदेव । जो जप करी धरील भाव । तया ब्रह्मपदी ठाव । ऐसें शिवादिदेव बोलिले ॥२॥ सोपान ही तीन अक्षरें । जो जप करील निर्धारें । तयास ब्रह्म साक्षात्कारें । होय सत्वर जाणिजे ॥३॥ मुक्ताबाई चतुर्विधा । जो जप करील सदा । तो जाईल मोक्षपदा । सायुज्य संपदा पावेल ॥४॥ ऐसी ही चौदा अक्षरें । जो ऐके कर्ण विवरें । की उच्चारी मुखद्वारें । तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे ॥५॥ एका जनार्दनीं प्रेम । जो जप करील धरील नेम । तयास पुन्हा नाहीं जन्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिले ॥६॥ - पशुमुखें वेदाच्या श्रुति । पढवा
पशुमुखें वेदाच्या श्रुति । पढवा कीर्ती हे तुमची ॥१॥ अचेतन भिंती चालवणे । हेहीं करणें विचित्र ॥२॥ तेरा दिवस उदकीं ठेवा । कागद देवा कोरडे ॥३॥ निळा म्हणे नारायण । ब्राम्हणजन तुम्हा घरी ॥४॥ - संदेह गमला । रेडा कैसा बोलविला
संदेह गमला । रेडा कैसा बोलविला ॥१॥ सांगा देव कां न होती । निर्जीव चालविली भिंती ॥२॥ कोरडे कागद । उदकी लागों नेदी बुंद ॥३॥ निळा म्हणे बरा । द्यावा संतांपायीं थारा ॥४॥
गुरुवार चे अभंग समाप्त
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा
शुक्रवार चे अभंग
अभंग संख्या : ०९
१ तूं विटेवरी सखये बाई हो करीं कृपा
२ पति जन्मला माझे उदरीं
३ निर्गुण निराकार दादा माहूर माझें
४ सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला
५ सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो
६ सुंदर मुख साजिरें कुंडलें
७ फुगडी फूगे बाई फू । निजब्रम्ह तूं गे बाई*
८ पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा
९ स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातिला
आमचे सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा
शुक्रवार चे अभंग प्रारंभ
- तूं विटेवरी सखये बाई हो करीं कृपा
तूं विटेवरी सखये बाई हो करीं कृपा । माझे मन लागों तुझ्या पायीं हो करीं कृपा । तुं सावळे सुंदरी हो करीं कृपा । लावण्य मनोहरी हो करीं कृपा । निजभक्तां करुणा करी हो करीं कृपा । पंढरपुरीं राहिली । डोळां पाहिली । संतीं देखिली । वरुनि विठाई वरुनि विठाई ॥१॥ सच्चिदानंद अंबाबाई हो करीं कृपा । उजळ कुळदीपा । बोध करीं सोपा । येऊनी लवलाही येऊनी लवलाही ॥२॥ तुझा देव्हारा मांडिला हो करीं कृपा । चौक आसनीं कळस ठेविला हो करीं कृपा । प्रेमचांदवा वर दिधला हो करीं कृपा । ज्ञानगादी दिली बैसावया हो करीं कृपा । वरी बैसविली आदिमाया हो करीं कृपा । काम क्रोध मद मत्सर । दंभ अहंकार । त्यांचें बळ फार । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥३॥ शुक सनकादिक गोंधळी हो करीं कृपा । नाचताती प्रेमकल्लोळीं हो करीं कृपा । उदो उदो शब्द आरोळी हो करीं कृपा । पुढे पुंडलिक दिवटा हो करीं कृपा । त्याने मार्ग दाविला निटे हो करीं कृपा । आई दाविली मूळपीठा हो करीं कृपा । बापरखमादेविवरु । सुखसागरु । त्याला नमस्कारू । सर्व सुख देई ॥४॥ - पति जन्मला माझे उदरीं
पति जन्मला माझे उदरीं । मी झालें तयाची नोंवरी ॥१॥ पतिव्रता धर्म पाहा हो माझा । सर्वापरी पति भोगिजे वोजा ॥२॥ निर्गुण पति आवडे मज । आधीं माय पाठीं झालिये भाज ॥३॥ मी मायराणी पतिव्रता शिरोमणी । ज्ञानदेवो निरंजनीं क्रिडा करी ॥४॥ - निर्गुण निराकार दादा माहूर माझें
निर्गुण निराकार दादा माहूर माझें गांव । शंकुन सांगावया आले यमाई माझें नाव । तये नगरीं वस्ती केली मी तरी आलें एकभावें । ऐसा माझा शकुन दादा चित्त देऊन ऐकावें॥१॥ कैकाय कैकाय बाबा दुरील माझा देश । शकुन सांगावया मी आलें कलियुगास । ब्रह्याविष्णु महेश पुसती शकुन आम्हांस । ऐसें निदान आम्हीं सांगितलें त्यास ॥२॥ धरित्री आकाश मज देखतां उप्तत्ती । चंद्र सुर्य दादा मज देखतां होतीं । ब्रह्याविष्णुमहेश मज देखतां उपजती । जेथें आहे शिव तेथें आदि शक्ती ॥३॥ दाही अवतार मज देखतां झाले । अकराही रुद्र दादा होऊनियां गेले । अठ्ठयाशीं सहस्त्र ऋषी मज देखतां जन्मले । ब्रह्मादि तेहतीस कोटी खेळविले ॥४॥अठ्ठावीस युगें झाली चक्रवर्ती । कौरव पांडव गेले दादा नेणों किती । छ्प्पन्न कोटी यादव गेले दादा कोणी पंथीं । आम्ही तुम्ही जाऊं मागें कोणी न राहाती ॥५॥ पृथ्वीमध्यें दादा एका विपरीत होईल । बहीण भावां दोघाजणांचा विवाह लागेल । पांचा वरुषांची बाळा भ्रतार मागेल । सहा वरुषांची नारी गर्भिण होईल॥६॥ आणिक एक दादा माझा ऐकावा बोल । पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल । थोर थोर दादा पर्वत उडोनि जातील । अठराही जाती एके ठिकाणीं जेवतील ॥७॥ कलियुगाची दादा ऐकावी थोर । पुत्र तो होईल पित्याचा वैरी । भ्रतारा सोडोनी घरोघरीं फिरतील नारी । ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी ॥८॥ आणिक एक दादा माझे ऐका उत्तर । आकार जाईल अवघा होईल निराकार । जाती चंद्र सूर्य मग पडेल अंध:कार । धरित्री आकाश जाईल मग कैंचा दिनकर ॥९॥ आणिक एक शकुन माझा ऐकावा संतीं । तुम्ही मूळ पिठीं राहणें नाव माझें आदिशक्ती । अबेंचा व्यवहार त्राहे त्राहे आदिमूर्ति । एका जनार्दनीं प्रसन्न झाली आदिशक्ती ॥१०॥ - सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला
सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो । ज्ञानवैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो । चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत जळिला वो । घालुनि सिंहासन वरुते घट स्थापियेला वो ॥१॥ उदो बोला उदो सदगुरु माऊलीचा वो ॥धृ.॥ प्रवृत्तीचें आणि निवृत्तीचें घालुनि शुध्द आसन वो । ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिलें चरण वो । कायावाचामनें एकाविध केलें अर्चन वो । व्दैतअव्दैतभावें दिलें आचमन वो ॥२॥ भक्ति वैराग्य ज्ञान यांहीं पूजियेली अंबा वो सद्रूप चिद्रूप पाहूनी प्रसन्न जगदंबा वो । एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो । त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो ॥३॥ - सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो
सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो । पंचप्राण दिवटे दोन्ही नेत्रांचे हिल्लाळ वो ॥१॥ पंढरपुरनिवासे तुझे रंगी नाचत असे वो । नवस पुरवी माझ्या मनींची जाणोनियां इच्छा वो ॥२॥ मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवनामाझारी वो । चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥३॥ बैसली देवता पुढें वैष्णवांचे गाणें वो । उद्गारें गर्जती कंठीं तुळशीचीं भूषणें वो ॥४॥ स्वानंदाचे ताटीं धूप दीप पंचारती वो । ओवाळली माता विठोबाई पंचभूतीं वो ॥५॥ तुझें तुज पावलें आतां नवस पुरवीं माझा वो । तुका म्हणे राखे आपुलिया शरणागता वो ॥६॥ - सुंदर मुख साजिरें कुंडलें
सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नागखोपा केशर कस्तुरी मळवटीं वो । विशाळ व्यंकटनेत्र वैजयंती तळपे कंठीं वो । कांस पीतांबराची चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥ अति वरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा वो । राजस तेजोराशी मिरवे शिरोमणी वेल्हाळा वो । कोटी रविशशीप्रभा तेजें लोपल्या सकळा वो । नकळे ब्रम्हादिकां अनुपम्य हिची लीला वो ॥२॥ सांवळी सकुमार गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ सुढाळ पदक झळके वरी वो ।
कटीं क्षुद्र घंटिका शध्द करिताती माधुरी वो । गर्जती चरणीं वाकी अभिनव संगीत नृत्य करी वो ॥३॥ अष्टांगीं मंडित काय वर्णावी रुप ठेवणी वो । सोलीव शुद्ध रसाची ओतील लावाण्याची खाणी वो । सर्वकाळसंपन्न मंजुळ बोले हास्यवदनी वो । बहु रूपें नटली आदिशक्ति नारायणी वो ॥४॥ घटस्थापना गेली पंढरपुर महानगरीं वो । अस्मानी मंडप दिला तिन्ही तळांवरी वो । आंरभिला गोंधळ हिनें चंद्रभागेतीरीं वो । आली भक्तीकाजा कृष्णाबाई योगेश्वरी वो॥५॥ तेहतीस कोटी देव चांमुडा अष्ट कोटी भैरव वो । आरत्या कुरवंड्या करिती पुष्पांचा वरुषाव वो । नारद तुंबर गायन ब्रम्हानंदें करिती गंधर्व वो । वंदी चरणरज तेथें तुकयाचा बांधव वो ॥६॥ - फुगडी फूगे बाई फू । निजब्रम्ह
फुगडी फूगे बाई फू । निजब्रम्ह तूं गे बाई परब्रम्ह तूं गे ॥धृ॥ मनचित्त धू । विषयावरी थू ॥१॥ एक नाम मांडी । दुजाभाव सांडी ॥२॥ हरि आला रंगीं । सज्जनांचे संगीं ॥३॥ सकळ पाहे हरि । तोचि चित्तीं धरीं ॥४॥ नमन लल्लाटीं । संसारेसी साटी ॥५॥ वामदक्षिण । चहूं भुजीं आलिंगन ॥६॥ ज्ञानदेवे गोडी । गेली संसारा फुगडी ॥७॥ - पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला ते साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा जयजयकार हरि ह्रदयीं धरा । आळस नका करुं सांगतों लहाना थोरां ॥१॥ याहो याहो बाईयांनो निघाले हरी । सिलंगणा वेगीं घेउनी आरत्या करी । ओवाळूं श्रीमुख वंदूं पाउलें शिरीं । आम्हां दैव आलें येथें घरींच्या घरीं ॥२॥ अक्षय मुहूर्त औटामध्यें साधतें । मग येरी गर्जे जैसें तैसें होत जाते । म्हणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें । सांडा परते काम जाऊं हरी सांगातें ॥३॥ बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हें मनीं । नका गई करुं आईकाल ज्या कानीं । मग हें सुख तुम्ही कधी न देखाल स्वप्नीं । उरेल हाय हाय मागें होईल कहाणी ॥४॥ ऐसियास वंचता त्याच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार । मग ही वेळ घटिका न ये अजरामर । कळलें असो द्या मग पडतील विचार ॥५॥ जयासाठीं ब्रम्हादिक झाले ते पिसे । उच्छिष्टाकारणें देव जळीं झाले मासे । अर्धांगीं विश्वमाता लक्ष्मी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आलें अनायासे ॥६॥ - स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातिला
स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातिला वो । चारी वेदांचा फुलवरा बांधिला वो । शास्त्रें पुराणें अनुवादती तुझा गोंधळ मांडिला वो ॥१॥ उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो ॥धृ.॥ जीवशिव संबळ घेऊनी आनंदे नाचती वो । अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषी दिवटे तिष्ठती वो । तेहतीस कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती वो ॥२॥ आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो । पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो । एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटीं वो ॥३॥
शुक्रवार चे अभंग समाप्त
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा
शनिवार चे अभंग
अनुक्रमणिका – अभंग संख्या १३.
१ शरण शरण हनुमंता । तुज आलों रामदूता
२ काम घातला बांदोडीं
३ हनुमंत महाबळी । रावणाची
४ केली सीताशुद्धि । मूळ रामायणा
५ मी तों अल्पमती हीन । काय वर्णुं तुमचे गुण ।
६ पैल आला राम रावणासी सांगती
७ पैल आला रामराणा । लंका
८ जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री
९ मन हें राम झालें मन हें राम झालें
१० राम म्हणतां रामचि होइजे । पदिं बैसोनि पदवी
११ रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी
१२ झालें रामराज्य काय उणें आम्हासीं
१३ काम बांदवडी । काळ
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा
शनिवार चे अभंग प्रारंभ
- शरण शरण हनुमंता । तुज
शरण शरण हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥ काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥२॥ शूर आणि धीर । स्वामीकाजीं तूं सादर ॥३॥ तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा॥४॥ - काम घातला बांदोडीं
काम घातला बांदोडीं । काळ केला देशोधडी ॥१॥ तया माझे दंडवत । कपिकुळीं हनुमंत ॥२॥ शरीर वज्रा ऐसे । कवळी ब्रह्यांड जो पुच्छें ॥३॥ रामरायाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका॥४॥ - हनुमंत महाबळी । रावणाची
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर॥२॥ करोनि उड्डाण । केलें लंकेचे शोधन ॥३॥ जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका॥४॥ - केली सीताशुद्धि । मूळ रामायणा
केली सीताशुद्धि । मूळ रामायणा आधीं ॥१॥ ऐसा प्रतापी गहन । सकळ भक्तांचे भूषण ॥२॥ जाऊनि पाताळा । केली देवीची अवकळा ॥३॥ रामलक्षुमण । नेले आणिले चोरुन ॥४॥ जोडुनियां कर । उभा सन्मुख समोर ॥५॥ तुका म्हणे जपें । वायुसुता जातीं पापें॥६॥ - मी तों अल्पमती हीन । काय
मी तों अल्पमती हीन । काय वर्णुं तुमचे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामांचे ॥१॥ नाम चांगले माझे कंठी राहो भलें । कपिकुळ उध्दरिलें । मुक्त केलें राक्षसा ॥२॥ द्रोणागिरी कपीहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याती । भरतभेटी समयीं ॥३॥ शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ति वाखणिली । लंका दहन केली । हनुमंते काशानें ॥४॥ राम जानकी जीवन । योगियांचें निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥५॥ - पैल आला राम रावणासी सांगती
पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपती ॥१॥ अवघे लंकेमाजी झाले रामाचे दूत । व्यापले सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥२॥ अवघे अंगलग तुझे वधियले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥३॥ तुका म्हणे ऐक्याभावें रामासी भेटी । करुनि घेई आतां या संबंधेंसी तुटी ॥४॥ - पैल आला रामराणा । लंका
पैल आला रामराणा । लंका दिधली बिभीषणा ॥१॥ नळ नीळ जांबुवंत । मध्यें चाले रघुनाथ ॥२॥ भोंवते वानरांचे थाट । पुढें गर्जताती भाट ॥३॥ केला अयोध्याप्रवेश । म्हणे नामा विष्णुदास ॥४॥ - जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री
जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री । तरीच नाम जिव्हाग्रीं येईल श्रीरामाचें ॥१॥ धन्य कुळ तयाचें रामनाम हेंचि वाचें । दोष जातील जन्माचे श्रीराम म्हणताचि ॥२॥ कोटी कुळांचें उद्धरण मुखीं राम नारायण । रामकृष्णस्मरण धन्य जन्म तयाचें ॥३॥ नाम तारक सांगडी नाम न विसंबे अर्धघडी । तप केलें असेल कोडी तरीचे नाम येईल ॥४॥ ज्ञानदेवीं अभ्यास मोठा नामस्मरण मुखावाटा । पूर्वज गेले वैकुंठा हरि हरि स्मरतां ॥५॥ - मन हें राम झालें मन हें राम झालें
मन हें राम झालें मन हें राम झालें । प्रवृत्ति ग्रासूनि कैसें निवृत्तीसी आलें ॥१॥ श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें । अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले ॥२॥ यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले । ध्यान धारणा आसन मुद्रा कैसें समाधीसी आले॥३॥ बोधी बोधिलें बोधितां नये ऐसें झालें । बापरखुमा-देवीवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें॥४॥ - राम म्हणतां रामचि होइजे । पदि
राम म्हणतां रामचि होइजे । पदिं बैसोनि पदवी घेइजे ॥१॥ ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहे ॥२॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवी ॥३॥ तुका म्हणे चाखोनि सांगे । मज अनुभव आहे अंगें ॥४॥ - रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी
रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी । ह्रदयमंदिरीं । स्मरा कां रे ॥१॥ आपुली आपण करा सोडवण । संसारबंधन तोडा वेगी ॥२॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण माळा । ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्ति रया ॥३॥ - झालें रामराज्य काय उणें आम्हासीं
झालें रामराज्य काय उणें आम्हासीं । धरणी धरी पीक गाई वोळल्या म्हैसी ॥१॥ राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये । दळितां कांडितां जेवितां गे बाईये ॥२॥ स्वप्नींही दु:ख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें काळा ॥३॥ तुका म्हणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासा येणें जाणें खुंटलें ॥४॥ - काम बांदवडी । काळ
काम बांदवडी । काळ घातला तोडरी ॥१॥ तया माझे दंडवत । कपिकुळीं हनुमंत ॥२॥ शरीर वज्रा ऐसें । कवळी ब्रम्हांड जो पुच्छें ॥३॥ रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥४॥
शनिवार चे अभंग समाप्त
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा
- रविवार चे अभंग
अनुक्रमणिका – अभंग संख्या : ११.
१ खेळ मंडियेला वाळवंटीं घाई
२ भीमातीरीं एक वसविलें नगर ।
३ नव्हे तेंचि कैसें झालें रे खेळिया
४ एके घाई खेळतां न पडसी डाई
५ बाराहि सोळा गडियांचा मेळा
६ अहंवाघा सोहंवाघ्या प्रेमनगरा वारी
७ अनंत जुगाचा देव्हारा
८ पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा ।
९ वारी वो वारी । देई कां गा मल्हारी
१० वडाच्या पानीं एक उभविलें देऊळ आधीं
११ खंडेराया तुज करितें नवसू
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा
रविवार चे अभंग प्रारंभ
- खेळ मंडियेला वाळवंटीं घाई
खेळ मंडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एकएकां लागती पायीं रे ॥१॥ नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणे नामावळी रे । कळिकाळावरी घातली कास । एक एकाहून बळी रे ॥२॥ गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां रे । टाळा मृदंग घाई पुष्पाचा वरुषाव । अनुपम्य सुखसोहळा रे ॥३॥ लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां रे । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिध्दसाधकां रे॥४॥ वर्णाभिमान विसरली याती । एकएकां लोटांगणीं जाती रे । निर्मळ चित्तें झालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥५॥ होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले वैष्णववीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ॥६॥ - भीमातीरीं एक वसविलें नगर ।
भीमातीरीं एक वसविलें नगर । त्याचें नांव पंढरपूर रे । तेथील मोकाशी चार भुजा त्यासीं । बाईला सोळा हजार रे ॥१॥ नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसांवा रे । पुढें गेले ते निधाई झाले । वानितील त्यांची सीमा रे ॥२॥ बळियां आगळा पाळी लोकपाळा । रिघ नाहीं कळिकाळा रे । पुंडलीक पाटील केली कुळवाडी । तो झाला भवदु:खवेगळा रे ॥३॥ संत सज्जनीं मांडलीं दुकानें । जें जया पाहिजे तें आहे रे । भुक्ति मुक्ति फुकाचसाठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥४॥ दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे । नवजों म्हणती आम्ही वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥५॥ बहुत दीवस होती मज आस । आजीं घडलें सायासीं रे । तुका म्हणे होय तुमचेनी पुण्य । भेटी तया पायांसी रे ॥६॥
- नव्हे तेंचि कैसें झालें रे खेळिया
नव्हे तेंचि कैसें झालें रे खेळिया । नाही तेंचि दिसूं लागलें रे । अरूप होतें तें रूपासी आलें । जीव शिव नाम पावलें रे ॥१॥ आपुलीच आवडी धरूनि खेळिया । आप आपणातें व्यालें रे । जोपनाकारणें केली बायको । तिनें एवढें वाढविलें रे ॥२॥ ऐक खेळिया तुज सांगितलें । ऐसें जाणुनि खेळ खेळे रे ॥धृ॥ ब्राम्हणाचें पोर एक खेळासी भ्यालें । तें बारा वर्षे लपालें रे । कांपत कांपत बाहेर आलें । तें नागवेंचि पळून गेलें रे ॥३॥ सहातोंड्या एक संभूचें बाळ । त्यानें बहुतचि बळ आथियेलें रे । खेळ खेळतां दगदगी व्यालें । तें कपाट फोडुनि गेलें रे ॥४॥ चहुंतोड्याचा पोर एक नार्याही जाण । तो खेळियांमाजी आगळा रे । कुचाळी करूनि पोरें भांडवी । आपण राहे वेगळा रे ॥५॥ गंगा गौरी दोघी भांडवी । संभ्यासी धाडिलें वना रे । खेळ खेळे परि डायीं न सांपडे । तो एक खेळिया शहाणा रे ॥६॥ खेळियामाजी हनुम्या शहाणा । न पडे कामव्यसनीं रे । कामचि नाहीं तेथें क्रोधचि कैंचा । तेथें कैंचें भांडण रे । रामा गड्याची आवडी मोठी । म्हणूनि लंके पेणें रे॥७॥ यादवांचा पोर एक गोप्या भला । तो बहुतचि खेळ खेळला रे । लहान थोर अवघीं मारिलीं । खेळचि मोडुनि गेला रे ॥८॥ ऐसे खेळिया कोट्यानुकोटी । गणीत नाहीं त्याला रे । विष्णुदास नामा म्हणे वडील हो । पाहा देहीं शोधूनि रे ॥९॥
- एके घाई खेळतां न पडसी डाई
एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्यानें ठकसील भाई रे । त्रिगुणांचे फेरीं थोर कष्टी होसी । या चौघांची तरी धरी सोई रे ॥१॥ खेळ खेळोनियां निराळाची राही । सांडी या विषयाची घाई रे । येणेंचि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाण माझ्या भाई रे ॥२॥ शिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या सवंगडियां शिकवूनी घाई । तेणें सतत फड जागविला रे । एके घाई खेळतां न चुकेचि कोठें । तया संतजन मानवले रे ॥३॥ ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला । आपण भोंवतीं नाचती रे । सकळिकां मिळोनि एकचि घाई । त्याच्या ब्रम्हादिक लागती पायीं रे ॥४॥ रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे । पाचां संवगडियां एकचि घाई । तेथें नाद बरवा उमटला रे । ब्रम्हादिक सुरवर मिळोनियां त्यानीं । तोहि खेळिया निवडिला रे ॥५॥ ब्राम्हणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे । जनार्दन बसवंत करुनियां तेणें । वैष्णवांचा मेळ मिळविला रे । एकचि घाई खेळतां खेळतां । आपणचि बसवंत झाला रे ॥६॥ आणिक खेळिये होऊनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे । तुका म्हणे गडे हो हुशारूनी खेळा । पुढीलांची धरूनियां सोई रे । एकचि घाई खेळता जो चुकला । तो पडे संसार डाई रे ॥७॥ - बाराहि सोळा गडियांचा मेळा
बाराहि सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे । जतिस्पद राखो जाणें टिपरिया घाई । अनुहत वाय मांदळा रे ॥१॥ नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहुं रे ॥२॥ सा चहुं वेगळा अठरा निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे । विसरती पक्षी चारा नेघे पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥३॥ आनंद तेथींचा मुकियासी वाचा । बहिरे ऐकती कानीं रे । आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय । तुका म्हणे वृध्द होती तरणे रे ॥४॥ - अहंवाघा सोहंवाघ्या प्रेमनगरा वारी
अहंवाघा सोहंवाघ्या प्रेमनगरा वारी । सावध होऊनि भजनीं लागा देव करा कैवारी ॥१॥ मल्हारीची वारी । माझ्या मल्हारीची वारी ॥२॥ इच्छा मुरळीस पाहूं नका पडाल नर्कव्दारीं । बोधबुधली ज्ञानदिवटी उजळा महाद्वारी॥३॥ आत्मनिवेदन भरित रोडगा निवतिल हारोहारीं । एक जनार्दनीं धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी॥४॥ - अनंत जुगाचा देव्हारा
अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधाचा घुमारा । अवचित भरला वारा । या मल्हारी देवाचा ॥१॥ शुद्ध सत्वाचा कवडा मोठा । बोध बिरडे बांधला गांठा । गळा वैराग्याचा पट्टा । वाटा दाऊं भक्तीच्या ॥२॥ ह्रदय कोटंबा सागातें । घोळ वाजवूं अनुहातें । ज्ञानभांडाराचें पोतें । रितें नव्हे कल्पातीं ॥३॥ लक्ष चौर्यांशी घरें चारी । या जन्माची केली वारी । प्रसन्न झाला देव मल्हारी । सोहंभावीं राहिलों ॥४॥ या देवाचें भरतां वारे । अंगीं प्रेमाचें फेपरें । गुरु गुरु करी वेडेचारें । पाहा तुके भुंकविलें ॥५॥ - पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा
पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा । डौर फिरवितो डुगडुग ऐका ॥धृ॥ वरल्या आळीला तुम्ही सावद राहावे । पाटीलबुवाला मग लावून सवें । चिठी येईल बा मग पडेल ठावे ॥१॥ मधल्या आळीला एक बायको फीरे । तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे । नाहीं तरी पाटलोबा तिची पळतील गुरें ॥२॥ आणिक एक बारे सुटेल तांतडी । पाटीलबुवाची मग पडेल माडी । तिचीं पांच पोरें लागतील देशोधडी ॥३॥ आणिक एक ऐका कैंचे नवल झालें । गांवच्या पांड्यांनीं पाटलास नागविलें । सार्या कागदाचें शून्य एकचि केलें ॥४॥ हिंडतां फिरतांना एक शकुन सांगे । त्याच्या सत्तेनें ह्या आळीस वागे । संतांघरचा बा एक तुकडा मागे ॥५॥ हें जरी न ऐकाल तरी दुसरा येईल । सरते शेवटीं बा काळ बांधून नेईल । एका जनार्दनीं बा आमुचें काय जाईल ॥६॥ - वारी वो वारी । देई कां गा मल्हारी
वारी वो वारी । देई कां गा मल्हारी । त्रिपुरारी हरी । तुझे वारीचा मी भिकारी ॥१॥ वाहन तुझें घोड्यावरी । वरी बैसली म्हाळसा सुंदरी । वाघ्या मुरळी नाचती परोपरी । आवडी एसी पाहीन जेजुरी ॥२॥ ज्ञान कोटंबा घेऊनी आलों व्दारी । बोध भंडार लाविन परोपरी । एका जनार्दनीं विनवी श्रीहरी । वारी देऊनी प्रसन्न मल्हारी ॥३॥ - वडाच्या पानीं एक उभविलें देऊळ
वडाच्या पानीं एक उभविलें देऊळ आधीं कळसु मग पाया हो । देव पुजू गेलो तंव देऊळ उडालें पान नाहीं तेथें वडु रे ॥१॥ चेत जाणा तुम्ही चेत जाणा । टिपरी वडाच्या साई हो ॥२॥ पाषाणाचा देवो पाषाणाचा भत्कु पोहती मृगजळ डोहीं हो । वांझेचा पुत्र एक पोहों लागला तो तारी देव भत्का हो ॥३॥ भवाब्धिसागर नुतरवे ते पडिले रोहिणी डोहीं हो । न सापडे आत्मा बुडाले संदेहीं ते गुंतले मायाजळीं हो ॥४॥ विरुळा जाणें पोहते खुणें केला मायेसी उपावो हो । बापरखुमादेविवरु विठ्ठल विसावा तेणें नेलें पैल थडी वो ॥५॥ - खंडेराया तुज करितें नवसू
खंडेराया तुज करितें नवसू । मरूं देरे सासू खंडेराया ॥१॥ सासू मेल्यावरी तुटेल आसरा । मरुं दे सासरा खंडेराया ॥२॥ सासरा मेलिया होईल आनंद । मरूं दे नणंद खंडेराया ॥३॥ नणंद मरतां होईन मोकळी । गळां घालीन झोळी भंडाराची ॥४॥ जनी म्हणे खंडे अवघे मरुं दे । एकटी राहूं दे पायापशीं ॥५॥
रविवार चे अभंग समाप्त
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
सर्व संतांचे हरिपाठ वाराचे अभंग अभंग-गाथा










