आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

श्रीकृष्ण जन्माचे 21 अभंग
Shrikrushna Janmache Abhang
५५. कृष्ण जन्माचे अभंग आणि आरती
१ पापी जे अभक्त दैत्य ते
२ वासुदेव ह्रुषिकेशा माधवा
३ आकाशीची वाणी सांगे
४ शेषाप्रती बोले लक्ष्मीचा
५ पूर्वी तूं अनुज झालासी
६ वसुदेवा देत देवकी बहीण
७ सातवा जो गर्भ योगमाया
८ देवकीचें तेज दिसे
९ विमानांची दाटी अंतरिक्षी
१० मयूरादि पक्षी नृत्य
११ दशरथें मारिला तोचि
१२ फिराविली दोनी
१३ कृष्ण गोकुळीं जन्मला
१४ गोकुळींच्या सुखा
१५ अनंत ब्रह्मांडे उदारीं
आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
निवडक अभंग हरिपाठ वाराचे अभंग गाथा
कृष्ण जन्माचे अभंग प्रारंभ
१ पापी जे अभक्त दैत्य ते माजले
पापी जे अभक्त दैत्य ते माजले । धरणीसीं झाले ओझें त्यांचे ॥१॥ दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वां । न पूजिती देवा कोणी एक ॥२॥ राहियेले यज्ञ मोडिलें कीर्तन । पळाले ब्राम्हण दैत्यां भेणे ॥३॥ वत्सरुपी पृथ्वी ब्रम्हयापाशीं जाय । नेत्रीं वाहे तोय सांगतसे ॥४॥ बुडविला धर्म अधर्म झाला फ़ार । सोसवेना भार मज आतां॥५॥ ब्रम्हा इंद्र आणि बरोबरी शीव । चालियेले सर्व क्षीराब्धीशी ॥६॥ नामा म्हणे आतां करितील स्तुती । सावधान चित्तीं परिसावें ॥७॥
२ वासुदेव ह्रुषिकेशा माधवा
वासुदेव ह्रुषिकेशा माधवा मधुसूदना । करितातीं स्तवना पुरुषसूक्तें ॥१॥ पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषशायी । आम्हां कोणी नाहीं तुजवीण ॥२॥ जनार्दना हरि श्रीवत्सला गरुडध्वजा । पाव अधोक्षजा आतां आम्हां ॥३॥ वराहा पुंडरीका नृसिंहा नरांतका । वैकुंठनायका देवराया ॥४॥ अच्युता शाश्वता अनंता अज अव्यया । कृपेच्या अभया देई आम्हां ॥५॥ नारायणा देवाध्यक्षा कैठभभंजना । करी रे मर्दना दृष्टाचिया ॥६॥ चक्रगदा शंखपाणि नरोत्तमा । पाव पुरुषोत्तमा दासा तुझ्या ॥७॥ रामा हयग्रीवा भीमा रौद्रोभ्दवा । आश्रय भूतां सर्वा तुझा असे ॥८॥ श्रीधरा श्रीपति चतुर्बाहो मेघ :शामा । लेकुंरे आम्हां पाव त्वरें ॥९॥नामा म्हणे ऎसें करितां स्तवन । तोषला भगवान क्षीराब्धींत ॥१०॥
३ आकाशीची वाणी सांगे सकळांसी
आकाशीची वाणी सांगे सकळांसी । तळमळ मानसीं करु नका ॥१॥ देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राम्हण गाई भक्त ॥२॥ उतरील भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वांसी करील तो ॥३॥ रोहिणी उदरीं शेष बळिभद्र । यादव समग्र व्हा रे तुम्ही ॥४॥ ऎकोनियां ऎसें आनंद मानसीं । येती स्वस्थळासी नामा म्हणे ॥५॥
४ शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आतां ॥१॥ पृथ्वीवरी दैत्य माजले ते फ़ार । गार्हाणें सुरवर सांगुं आले॥२॥ शेष म्हणे मज श्रम झाले फ़ार । यालागीं अवतार मी ग घेचि ॥३॥ राम अवतारीं झालें लक्षुमण । सेविलें अरण्य तुम्हांसवे ॥४॥ चौदा वर्षावरी केलें उपोषण । जाणातां आपण प्रत्यक्ष हें ॥५॥ नामा म्हणे ऎसें वदे धरणीधर । हासोनी श्रीधर काय बोले ॥६॥
५ पूर्वी तूं अनुज झालासी कनिष्ठ
पूर्वी तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोसियेले कष्ट मजसवें ॥१॥ आतां तूं वडील होई गा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बा रे ॥२॥ देवकी उदरीं राहावें जावोनी । मायेसी मागुनी पाठवितों ॥३॥
योगमाया तुज काढील तेथुन । घालीन नेऊन गोकुळासी ॥३॥ लक्ष्मीसी सांगे तेव्हांह्र्षीकेषी । कौडण्यपुरासी जावें तुम्हीं ॥५॥ नामा म्हणे ऎसा करुनि विचार । घ्यावया अवतार सिद्ध असे ॥६॥
६ वसुदेवा देत देवकी बहीण
वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामध्ये विघ्न झालें ऎका ॥१॥ आकाशीची वाणी सांगतसे कंसा । मानी भरवंसा हा बोलण्याचा ॥२॥ आठवा इचा पुत्र वधील तुजसी । ऎकोनी मानसीं क्रोधावला ॥३॥ घेऊनियां खडग माराया धांवला । हात तो धरीला वासुदेवें ॥४॥ देईन मी पुत्र सत्य माझें मानी । ठेवा बंदीखानीं दूता सांगें ॥५॥ पुण्य सारावया भेटे देवऋषी । वधी बाळकांसी ठेवूं नको ॥६॥ होतांची प्रसूत नेऊनियां देत । सहाही मारीत दुराचारी ॥७॥ धन्य त्याचें ज्ञान न करीच शोक । वधितां बाळक नामा म्हणॆ ॥८॥
७ सातवा जो गर्भ योगमाया नेत
सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्र्चर्य करीत मनामाजी ॥१॥ रोहीणी उदरीं नेवोनी घातला । न कळे कोणाला देवावीण ॥२॥ कंसाचिया भेणें यादव पळाले । ब्राम्हण राहिले अरण्यांत ॥३॥ नाही कोणा सुख तळमळ मानसीं । वधील दुष्टासी कोण आतां ॥४॥ विश्वाचा जो आत्मा कळलें तयाल । दावितसे लीला संभूतीची ॥५॥ अहर्निशीं ध्यान भक्तांचे मानसीं । स्थापिल धर्मासी नामा म्हणे ॥६॥
८ देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य
देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचे ह्र्दय जळतसे ॥१॥ हरणें पळती देखोनियां व्याघ्र । कांपे थरथर तयापरी ॥२॥ अजासर्पन्यानें कीटकभ्रमर । दिसती नारीनर कृष्णरुप ॥३॥ जेवितां बोलतां शेजेसी तो निजे । आला आला मज मारावया ॥४॥ नाशील हा आतां दैत्यांचे तें बंड । फ़ाटलीसे गांड तेव्हां त्याची ॥५॥ नामा म्हणे भय़ें लागलेंसे ध्यान । चराचरीं कृष्ण दिसतसे ॥६॥
९ विमानांची दाटी अंतरिक्षी देव
विमानांची दाटी अंतरिक्षी देव । करिताती सर्व गर्भस्तुति ॥१॥ सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ती । यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥२॥ सहाजणीं भांडती नवजणीं स्थापिती । न कळे कोणाप्रती अंत तुझा ॥३॥ आठराजणें तुझी वर्णिताती कीर्ति । गुणातीत श्रीपति नमो तुज ॥४॥ चौघां जणां तुझा न कळेचि पार । श्रमसी वारंवार आम्हांसाठीं ॥५॥ आठ्यांशी सहस्त्र वर्णिताती तुज । ब्रह्माडांचे बीज तुज नमो ॥६॥ जन्म मरणानें नाहीं तया भय । आठविती पाय तुझेजे कां ॥७॥ नवजणी तुझ्या पायीं लोळतांतीं । परब्रम्हा मूर्ति तुज नमो ॥८॥ नामाम्हणे ऎसी करिताती स्तुती । पुष्पें वाहूनि जाती स्वस्थळासीं ॥९॥
१० मयूरादि पक्षी नृत्य करीताती
मयूरादि पक्षी नृत्य करीताती । नद्या वाहताती दोहीं थड्या ॥१॥ भुमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरीं सकळांच्या ॥२॥ विमानांची दाटी सुरवर येती । गंधर्व गाताती सप्तस्वरे ॥३॥ मंद मंद मेघ गर्जना करिती । वाद्यें वाजताती नानापरी ॥४॥ नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती । अप्सरा नाचती आनंदाने ॥५॥
११ दशरथें मारिला तोचि होता मास
दशरथें मारिला तोचि होता मास । वर्षा ऋतु असे कृष्णपक्ष ॥१॥ वसुनाम तिथी बुधवार असे। शुक सांगतसे परीक्षिती ॥२॥ रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र । माया घाली अस्त्र रक्षपाळां ॥३॥ नवग्रह अनुकूल सर्वांचे जें मूळ । वसुदेव कपाळ धन्य धन्य ॥४॥ जयाचा हा वंश तयासी आनंद । माझा कुळीं गोविंद अवतरला ॥५॥ अयोनीसम्भव नोहे कांही श्रमी । नामयाचा स्वामी प्रगतला ॥६॥
१२ सोडा सोडा मीठि । लपवा
सोडा सोडा मीठि । लपवा लपवा जगजेठी ॥१॥ झणीं कंसासी कळेल । माझ्या बाळासी मारील ॥२॥ वसुदेवा चिंता मनीं । तेज न माये गगनीं ॥३॥ नामा म्हणे आलें हांसे । देव तेव्हां सांगतसे ॥४॥
१३ नंदाच्या घराला । मज
नंदाच्या घराला । मज नेई गोकुळाला ॥१॥ माया उपजली तेथें । ठेवी मज आणि येथें ॥२॥ म्हणसीं असे रक्षपाळ । तें म्या मोहिले सकळ ॥३॥ आच्छादित रूप । नामा म्हणे माझा बाप ॥४॥
१४ उचलिला कमळापती । पायीचीं
उचलिला कमळापती । पायीचीं बंधने गळतीं ॥१॥ त्रैलोक्यांत जो न माय । त्यासी बंधन करील काय ॥२॥ कवाडें उघडतीं । देखतांची देवाप्रती ॥३॥ मंद मंद पडे पाऊस । शिरी छाया करी शेष ॥४॥ पूर चढला अचाट । त्यासी लाविला अंगुष्ठ ॥५॥ त्वरें आला नंदाघरी । निद्रिस्त त्या नरनारी ॥६॥ ठेवी तेथें कृष्णजीला । माया घेऊनि निघाला ॥ ७ ॥ रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत ॥८॥
१५ पूर्णब्रम्ह मानी कंसाच्या भयासी
पूर्णब्रम्ह मानी कंसाच्या भयासी । वाटेल मानसीं कोणाचिया ॥१॥ इच्छामात्रें करी सुष्टीचा प्रलय । त्यासी भय असे कवणाचें ॥२॥ नंदाचे सुकृत झालें अगणित । म्हणोनि भगवंत आला तेथें ॥३॥ सर्वा होय सुख तरतील लोक । नामा म्हणे शुक सांगतसे ॥४॥
१६ तांतडीने जाती । कंसा सेवक
तांतडीने जाती । कंसा सेवक सांगती ॥१॥ उपजला वैरी । त्यासी तूं रे त्वरें मारी ॥२॥ त्वरें धांव घाली । पाहे कन्या उपजली ॥३॥ ज्याचा धाक तुज । नव्हे कन्या द्यावी मज ॥४॥ मारायासी खड्ग घाली । हातीची निष्टूनिया गेली ॥५॥ तुजलागीं वधी । उपजला मज आधीं ॥६॥ सांगे ब्रह्मज्ञान । देवकीचें समाधान ॥ ७ ॥ नामा म्हणे तयेवेळीं । त्यांची बंधनें काढिलीं ॥८॥
१७ शुक म्हणे राया ऐक परीक्षिती
शुक म्हणे राया ऐक परीक्षिती । श्रवन करितां तृप्ती नाहीं तुज ॥१॥ माया जातां मथुरे सावध निद्रिस्त । देखिला भगवतं यशोदेनें ॥२॥ ब्रह्माडें उदरीं न कळे कोणाला । वाजविती थाळा जन्मकाळीं ॥३॥ यज्ञभोक्ता कृष्ण त्यासी देती बोळा । ध्यानीं ध्याय भोळा सदाशिव ॥४॥ गौळणी बहाती नंदालागीं तेंव्हा । पुत्रमुख पाहा नामा म्हणे ॥५॥
१८ फिराविली दोनी
फिराविली दोनी । कन्या आणि चक्रपाणि ॥१॥ झाला आनंदि आनंद । अवतरले गोविंद ॥२॥ तुटली बंधनें । वसुदेव देवकीचीं दर्शनें ॥३॥ गोकुळासी आलें । ब्रम्हा अव्यक्त चांगंलें ॥४॥ नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपति ॥५॥ निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥६॥ आनंदली मही । भार गेला सकळही ॥७॥ तुका म्हणे कंसा । आट भोविला वोळसा ॥८॥
१९ कृष्ण गोकुळीं जन्मला
कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥१॥ होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥२॥ सदा नाम वाचे गातीं । प्रेमे आनंदे नाचती ॥३॥ तुका म्हणे हरती दोष । आनंदाने करिती घोष ॥४॥
२० गोकुळींच्या सुखा
गोकुळींच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥ बाळकृष्ण नंदाघरीं । आनंदल्या नरनारी ॥२॥ गुढिया तोरणें । करिती कथा गातीं गाणें ॥३॥ तुका म्हणे छंदे । येणॆं वेधिलीं गोविंदें ॥४॥
२१ अनंत ब्रह्मांडे उदारीं
अनंत ब्रह्मांडे उदारीं । हरि हा बाळक नंदाघरीं ॥१॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडे ॥२॥ पृथ्वी जेणें तृत्प केली । त्यासी यशोदा भोजन घाली ॥३॥ विश्वव्यापक कमळापती । त्यासी गौळणी कडिये घेती ॥४॥ तुका म्हणे नटधारी । भोग भोगुनी ब्रह्माचारी ॥५॥
कृष्ण जन्माचे अभंग समाप्त
भगवान श्रीकृष्ण आरती
अवतार गोकुळी हो। जन तारावयासी
अवतार गोकुळी हो। जन तारावयासी ।
लावण्य रुपडे हो । तेज:पुंजाळ राशी ।
उगवले कोटिबिंब। रवि लोपला शशी ।
उत्साह सुरवरां । महाथोर मानसी ।।१।।
जय देवा कृष्णनाथा । जय रखुमाई कांता ।
आरती ओवाळीन। तुम्हा देवकीसुता ।।धृ।।
कौतुक पहावया। माव ब्रह्मयाने केली ।
वत्सेही चोरूनिया। सत्यलोकासी नेलीं ।
गोपाळ गाईवत्सें। दोन्ही ठाई रक्षिली ।
सुखाचा प्रेमसिंधु। अनाथांची माऊली ।।२।। जय देवा….
चोरितां गोधनें हो। इन्द्र कोपलाभारी ।
मेघ कडाडिला। शिला वर्षलल्या धारी ।
रक्षिले गोकुळ हो। नखीं धरिला गिरी ।
निर्भय लोकपाळ। अवतरले हरी ।।३।। जय देवा….
वसुदेव देवकीचे। बंद फोडिली शाळ ।
होऊनिया विश्वजनिता। तया पोटिंचा बाळ ।
दैत्य हे त्रासियेले । समुळ कंसासी काळ ।
राज्य हें उग्रसेना । केला मथुरापाळ ।।४।। जय देवा….
तारिले भक्तजन । दैत्य सर्व निर्दाळूनि ।
पांडवा साहाकारी । अडलिया निर्वाणी ।
गुण मी काय वर्णु। मति केवढी वाणी ।
विनवितो दास तुका। ठाव मागे चरणी ।।५।। जय देवा….














