आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199
6, दत्त आरती संग्रह, दत्ताच्या आरत्या
दत्ताच्या आरत्या
भगवान दत्तात्रय आरती संग्रह
दत्ताची आरती श्रीगुरुदत्त राजमुर्ती . 3
श्रीगुरुदत्त राजमुर्ती, ओवाळीतो प्रेमे आरती ॥ धृ ॥
ब्रह्मा विष्णू शंकराचा । असे अवतार श्री गुरूचा ॥
कराया उद्धार जगताचा । जाहला बाळ अत्री ऋषीचा ॥
धरीला वेश असे यतीचा । मस्तकी मुकुट शोभे जटीचा ॥
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी हातामध्ये आयुध बहुत वरुनी तेणे भक्तांचे क्लेश हरूनि त्यासी करुनी नमन, अधशमन, होईल रिपुदमन, गमन असे त्रैलोक्यावरती ॥१॥
गांणगापुरी वस्ती ज्याची प्रीती औदुंबर छायेची ।
भीमा अमरजा संगमाची भक्ती असे बहुत सुशिष्यांची ।
वाट दावूनिया योगाची । ठेव देतसे निजभक्तीची ॥
काशी क्षेत्री स्नान करितो, करवीर भिक्षेला जातो, माहूर निद्रेला वरितो ॥
तरतरतरित छाती धर धरित नेत्र गरगरित शोभतो त्रिशूल जया हाती ॥ वाळीतो ॥२॥
अवधूत स्वामी सुखानंदा । ओवाळीतो सौख्य कंदा
तारी हा दास न रजकंदा
सोडवी विषय मोहछंदा
आलो शरण अत्रीनंदा
दावी सदगुरू ब्रम्हानंदा ॥
चुकवी चौर्यान्शीचा फेरा ।
घालिती षडरिपू मज घेरा,
गांजिती पुत्रपौत्रदारा
वदवी भजन मुखी तव पूजन करीत हे सुजन जयाचे बलवन्तावरती ओवाळीतो…
।। श्री गुरुदेव दत्त ।।
दत्ताची आरती त्रिगुणात्मक त्रैमूर्ती 1
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्दे न ये अनुमाना । सुरवरमुनिजनयोगिसमाधि न ये ध्याना ॥१॥
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता । आरती ओंवाळिता हरली भवचिंता ॥धृ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त । अभाग्यासी कैची कळेल ही मात ।
पराहि परतलि तेथे कैचा हा हेत । जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥
दत्त येऊनिया उभा ठाकला । सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशिर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥
‘दत्त दत्त’ ऐसे लागले ध्यान । हारपले मन झाले उन्मन
मीतुंपणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥४॥
जयदेव जयदेव जय, श्रीमान अवधूता. 2
जयदेव जयदेव जय, श्रीमान अवधूता । आरती ओवाळी तुजला, बाळ उमासुता ॥१॥
माहूरगड असे तुझे, पावन जन्मस्थान । दर्शनास येती भक्त, गात तुझे गुणगान ।
घेऊन दर्शन तुझे, मिटवती ते तहान । कृपा करसी त्यावर, आहेस फार महान ।
गाणगापूर असे तुझे, एक वसती स्थान । येती भक्त तुझे, करती भावे तीर्थ स्नान ।
स्नान करुनी भक्त, घेतात तुझे दर्शन भिक्षा मागुनी गावात, करती ते भोजन ।
भूतबाधा, चिंता, खूप घेऊन येती भक्तगण । पीडा आपुल्या मिटवती, येती तुला शरण ।
भक्ताच्या हृदयात असे, सदा तुझा वास । नृसिंहवाडीस येती, त्याना लाभे सहवास ।
अनुष्ठान करे वाडीस, घेती तुझे जपनाम । समाधान पावती जेंव्हा, होई पूर्ण ते काम ।
पावन स्थानापैकी एक, असते हो औदुंबर । चुकवत नसे दर्शन, तुझे ते भक्त दिगंबर ।
हजार पायऱ्या चढून, येती भक्त गिरनारास । विसरती कष्ट देहाचे, घेताच तव दर्शनास ।
कृपा तुझी आम्हावर, राहो देवा दत्तात्रया । विसरणार नाही तुला, या तिन्ही कालत्रया ।




