आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199
2, दत्त जन्माचे अभंग, दत्त मानस पूजा अभंग
दत्तमानसपूजा – अभंग १०५६ ते १०७०
१०५६केले आवाहन१०५६
केले आवाहन । जेथे नाही विसर्जन ॥१॥
भरला ओतप्रोत । स्वामी माझा देव दत्त ॥२॥
गाता येत नाही । पूर्ण सुलीनता पाही ॥३॥
एका जनार्दनी खुण । विश्वी भरला परिपुर्ण ॥४॥
१०५७सहज सुखासनी अनुसुयानंदन१०५७
सहज सुखासनी अनुसुयानंदन । पाहता हे ध्यान वृत्ती निवे ॥१॥
बालोन्मत्त पिशाच्च त्रिविध अवस्था धरी । आपण निराकारी सोहंभावे ॥२॥
कारण प्रकाऋती न घेचि तो माथा । चिदानंद सत्ता विलसतसे ॥३॥
एका जनार्दनी हृदयी आसन । अखंडीत ध्यान निजतत्त्वी ॥४॥
१०५८अनन्य आवरी उदक निर्मळ१०५८
अनन्य आवरी उदक निर्मळ । वासना सोज्वळ नम्रपणे ॥१॥
प्रक्षाळिले पाय वाही एक माथा । हृदयी प्रीति धरिता प्रेमलाभ ॥२॥
घेऊनिया तीर्थ इंद्रिये तो धांली । सकळ निवाली जनार्दनी ॥३॥
१०५९चोहे देहांची क्रिया१०५९
चोहे देहांची क्रिया । अघ्ये दिले दत्तात्रेय ॥१॥
जे जे कर्म धर्म । शुद्ध सबळ अनुक्रम ॥२॥
इंद्रिय क्रियाजात । काही उचित अनुचित ॥३॥
आत्मा माझा देव दत्त । एका जनार्दनी स्वस्थ ॥४॥
१०६०संचित क्रियामाण१०६०
संचित क्रियामाण । केले सर्वाचे आचमनक ॥१॥
प्रारब्ध शेष उरले यथा । तेथे ध्याऊ सदगुरुदत्त ॥२॥
झाले सकळ मंगळ । एका जनार्दनी फळ ॥३॥
१०६१साती भागीरथी सत्रावीची धार१०६१
साती भागीरथी सत्रावीची धार । सुभाक्ति ते मकर समर्पिली ॥१॥
अर्पियले स्नान झाले समाधान । मनाचे उन्मन होऊनिया ॥२॥
चित्त हे शीतळ गेली तळमळ । पाहिले निढळ अमूर्तासी ॥३॥
एका जनार्दनी केला जयजयकार । अत्रीवरद थोर तिन्ही लोकी ॥४॥
१०६२वर्णावर्ण नाहीं१०६२
वर्णावर्ण नाही । हेचि प्रावराण त्याचे ठायी ॥१॥
परभक्तिईच्या पालवी । जिवो अज्ञाना मालवी ॥२॥
करा करा जन्मोद्धार । हरिभक्तीचा बडीवार ॥३॥
एका जनार्दनी बोध । दत्तापायी तो स्वानंद ॥४॥
१०६३गंध ग्रहण घ्राणता१०६३
गंध ग्रहण घ्राणता । त्रिपुटी मांडिली सर्वथा ॥१॥
सुबुद्धि सुगंध चंदन । केले दत्तात्रया अर्पण ॥२॥
शांति क्षमा अक्षता । तिलक रेखिला तत्त्वता ॥३॥
एका जनार्दनी । करुनि साष्टांगे नमन ॥४॥
१०६४सहस्त्रदल कमलाकर१०६४
सहस्त्रदल कमलाकर । कंठी अर्पिले हार ॥१॥
सोळा बार अठरा चार । मांथा वाहुंक पुष्पभार ॥२॥
एका जनार्दनी अलिकुळु । दत्त चरणाब्ज निर्मळू ॥३॥
१०६५आत्मज्ञान वैश्वानरीं१०६५
आत्मज्ञान वैश्वानरी । धूप जाळिला सरोभरी ॥१॥
तेणे मातला परिमळ । पिंडब्रह्मांडी सकळ ॥२॥
वासाचा निजवास । एका जनार्दनी सुवास ॥३॥
१०६६ज्ञानदीपिका उजळी१०६६
ज्ञानदीपिका उजळी । नाही चितेची काजळी ॥१॥
ओवाळिला देवदत्त । प्रेमे आनंद भरित ॥२॥
उष्ण चांदणे अतीत । तेज कोंदले अद्भुत ॥३॥
भेदाभेद मावळले । सर्व विकार गळाले ॥४॥
एका मिळाली जनार्दनी । तेजी मिळाला आपण ॥५॥
१०६७अहंममता घारीपुरी१०६७
अहंममता घारीपुरी । समुळ साधली दुरी ॥१॥
चतुर्विध केली ताटे । मानी शरण गोमटे ॥२॥
मन पवन समर्पिले । भोग्य भोक्तृत्व हारपले ॥३॥
एका जनार्दनी भोजन । तृप्त झाले त्रिभुवन ॥४॥
१०६८नाम मंगळा मंगळ१०६८
नाम मंगळा मंगळ । झाले जन्माचे सफळ ॥१॥
दत्त जीवीचे जीवन । दत्त कारणा कारण ॥२॥
अनुसूयात्मजा पाही । देहभाव उरला नाही ॥३॥
एका जनार्दनी दर्शन । चित्त झाले समाधान ॥४॥
१०६९दत्त सबाह्म अंतरीं१०६९
दत्त सबाह्म अंतरी । दत्तात्रय चराचरी ॥१॥
दत्तात्रय माझे मन । हरोनि नेले मीतूंपण ॥२॥
मुळी सिंहाद्री पर्वती । दत्तात्रये केली वस्ती ॥३॥
भक्ता मनी केला वास । एका जनार्दनी विश्वास ॥४॥
१०७०नाम निजभावेसमर्थ१०७०
नाम निजभावेसमर्थ । जेथे नाम तेथे दत्त ॥१॥
वाचे म्हणता देवदत्त । दत्त करी गुणातीत ॥२॥
दत्तनामाचा सोहळा । धाक पडे कळिकाळा ॥३॥
दत्तनामाचा निजछंद । नामी प्रगटे परमानंद ॥४॥
एका जनार्दनी दत्त । सबाह्म स्वानंदे भरीत ॥५॥




