सारदामाता चरित्र भाग ८, (३६ ते ३९)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

रामदास स्वामींच्या शिष्यांना माताजी म्हणाल्या, रामदास स्वामी बद्दल जाणण्याची उत्सुकता आहे  शिष्य म्हणाला, ज्या कार्याचा रामकृष्ण परहंसांनी ध्यास घेतला होता, तेच कार्य माझे स्वामी करीत होते  मीही समाज प्रबोधन करण्यासाठी हिंडतोय  शिष्य निघून गेला  नावेतून माताजी…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! सारदामाता !!!  

भाग -३६

                 सारदानंदाने सर्व कागदपत्रे तयार केले  सब रजिस्टरच्या सह्या घेतल्या  माताजी म्हणाल्या, हे कागद बेलूर मठाकडे पाठवून दे  ठाकूर सांभाळतील

 दुसऱ्या दिवशी माताजी सारदानंदासह कलकत्त्याला आल्या  त्या आल्याचे कळताच दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली

             बांधकामाला वेग आला  जगध्दात्रीचा पूजा मंडप, भक्तांसाठी बैठक, देवघर, माताजींसाठी प्रशस्त खोली तयार झाल्याचे माताजींना कळल्यावर अत्यंत आनंदाने म्हणाल्या, योगिन, आपलं घर तयार झालं  यावर्षी जगध्दात्रीची पूजा आणि दुर्गापूजा तिथेच करूया  तयारी करण्यासाठी लवकर जायला हवंय  दोन दिवसांनी मंडळी जयरामवाटीकडे निघाली

         नवीन घराची  पूजा झाल्यावर, बांधकाम करणाऱ्या मुसलमानांना जेवण दिले  ते सर्व डाकू होते  त्यांचा नायक जेवायला दिसला नाही म्हणून, माताजींनी त्याला निरोप देऊन निमंत्रित केले  त्याला पडवीत बसवून नलिनीला जेवायला वाढायला सांगितले  ती दुरून त्याच्या पानात पदार्थ वाढत असलेले पाहून, माताजींना खूप राग आला  कठोर स्वरात म्हणाल्या, तुला वाढायचं नसेल तर माझ्याकडे दे  त्यांनी स्वतः त्याला पोटभर वाढवून जेऊ घातले  जेवण झाल्यावर, तो पत्रावळ उचलायला लागला तर  माताजींनी मनाई केली  त्याची ते डाकूगिरी तेव्हाच  सुटली  त्या त्याची पत्रावर उचलताना पाहून नलिनी ओरडली    आत्याऽऽ, हे काय? मुसलमानाची पत्रावळ उचलतेस? तुझा धर्म, जात सर्व बुडालं  तुझा हा अधर्म मी सर्व भक्तांना ओरडून सांगणार आहे  जा आत्ताच जाऊन सांग  त्यागाच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला प्रेमांकित सेवाधर्म हा एकच धर्म मी मानते  जसा माझा शरद, बाबुराव तसाच हा अमजद! नलिनी खाली मान घालून निघून गेली

            माताजींना कळले की, बॅनर्जी कुटुंबातील एक विधवा स्त्री, वेदनेने तडफडत असून, तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही  तिला फक्त एका लहान मुला शिवाय  दुसरं कोणीही नाही  औषधाअभावी कानात पू होऊन दुर्गंधी येऊ लागली  किडेही झाले  त्यामुळे जवळ कोणी जात नाही  माताजींना फार वाईट वाटले  त्यांनी कडूलिंबाच्या पाला ऊकडून, पाणी बाटलीत भरून तिच्या घरी आल्या  त्यांनी पिचकारीने कानाची जखम धुवून, कान कापसाने पुसून काढला  आणलेले तेल कानात घातले  ती स्री हमसून हसून रडू लागली  माताजींनी तिचे सांत्वन केले  दुपारी घरी आल्या, तेव्हा कोआलपाडा आश्रमातील एक ब्रम्हचारी त्यांच्याकडे आला होता  त्याला पाहताच, त्यांच्या मनात  विचार येऊन गेला  त्या म्हणाल्या,  बेटा या आश्रमात असाह्य निर्धर रोग्यांना प्रवेश देऊन, सुश्रुषा करता ना? होय माताजी! ते आमचे कर्तव्यच आहे  मग, स्वामी केशवानंदाना सांगून या विधेला प्रवेश द्या  बिचारीचा कान सडला  उठण्या बसण्याची ताकदही तिच्यात नाही  ठीक आहे माताजी

              दुसऱ्या दिवशी तो ब्रह्मचारी बैलगाडी घेऊन आला  माताजींनी तिचा कान धुवून जेवायला घातले  जाताना त्या स्त्रीच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले   

              काही दिवसांनी कोआलपाड्याहून एक भक्त येऊन सांगू लागला, माताजी, आम्ही आठ दिवस खूप प्रयत्न केले  पण उपयोग झाला नाही  काल रात्री त्या विधवा स्त्रीचा आत्मा अनंतात विलीन झाला  तिचा मुलगा आश्रमात ठेवून घेतला  तिची उत्तरक्रीया उरकली व तुम्हाला सांगायला आलो  बेटा, फार चांगले काम केले  इथे ती तडफडून बिना इलाजाने मेली असती  निरोप देऊन तो निघून गेला

            एके सकाळी बेलूर मठातून एक ब्रम्हचारी आला   नमस्कार करून म्हणाला, माताजी, शरत् महाराज तुमचा वाढदिवस बेलूर मठात करायचा म्हणतात  ठीक आहे  जेवण करून तो निघून गेला  बेलूरमठात माताजींच्या वाढदिवसाची तयारी सुरू झाली  सारदानंद त्यांना घ्यायला आले  दुसऱ्या दिवशी पालखी, बैलगाडीतून मंडळी निघाली  माताजी मठात आल्या तेव्हा संध्याकाळ झाली होती  शरत् ने खूपच सुंदर व्यवस्था केली होती

              माताजींना दिलेल्या खोलीत त्या प्रवेशल्या  थोड्यावेळाने मंदिरात नेण्यासाठी गोलप आली  त्या निघत असतानाच राघूची तब्येत बिघडल्याचे कळले  त्या तशाच तिच्याकडे गेल्या  ती ओकाऱ्यांनी हैराण झाली होती  माताजींनी काय ते ओळखले  राधूच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला  व मंदिराकडे निघाल्या  

             मंदिरात प्रवेश करताच, समोर रामकृष्ण आणि विवेकानंदाच्या भव्य प्रतिमा होत्या  नमस्कार करून माताजी थोडा वेळ तिथेच बसल्या

              माताजींसाठी अतिशय सुंदर, आकर्षक आसन तयार केले होते  नवी साडी नेसून माताजी त्यावर स्थानापन्न झाल्या  रामकृष्णांची पूजा झाल्यावर, भक्तांनी माताजींना भक्ती अर्ध्य देऊन पृष्पमाला त्यांच्या गळ्यात घातल्या  चरणी पुष्पांजली अर्पण केली  एक भक्त सुवर्ण फुलाची माळ घेऊन येताना पाहताच, माताजी म्हणाल्या, बेटा,किमती माला मला अर्पण करून कष्ट देऊ नकोस  भक्ती भवाने एक फुल दे  तो शरमला  स्वतःचे महत्त्व वाढण्यासाठी चोरून आणलेली माला माताजींना देत होता  परंतु माताजींनी त्याच्यात परिवर्तन घडवले  त्याने पुष्प माताजींच्या पायावर ठेवून नेत्राश्रूंनी त्यांच्या पायावर अभिषेक घातला

       कार्यक्रम आटोपल्यावर, ठाकुरांची, पूजा, नैवेद्य झाले  सारे भक्त म्हणाले! माताजी, आज तुम्ही  जेवल्यावरच आम्ही प्रसाद घेऊ

          क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख

!!!  सारदामाता  !!!

                भाग ३७

                   चार दिवस आनंदात घालवून माताजी परिवारासह बाग बाजारातल्या घरी आल्या राधू सारखी आजारी राहू लागली  उठण्या बसण्याचीही ताकद राहिली नाही  तिला आवाज सहन होत नव्हता  उद्बोधन मठात तर सतत गडबड असायची  माताजींची बेचैन अवस्था पाहून, गोलप म्हणाली, निवेदिता विद्यालयाचे वस्तीगृह अगदी निर्जन स्थानी आहे  तिथेही माताजींच्या दर्शनाला मंडळी येतच होती  शेवटी कोआलपाड्याला जगदंबा आश्रमापासून जवळच असलेल्या निर्जन घरात राहू लागल्या  राधूला ते ठिकाण फारच आवडलं  ती शांत झोपू लागली

       एकदा पाऊस पडत होता  ढगाळ वातावरणामुळे दुपार असूनही अंधारून आले होते  एक माणूस अंगणात येऊन अर्वाच्च बडबडू लागल्याचे पाहून माताजींनी बाहेर येऊन पाहिले तर, तो वेडा असल्याचे जाणून, स्वगत  हसत म्हणाल्या, मी इथे असल्याचे जाणून जगातले सारे वेडे येत आहेत की काय? राधू, सुरबाला आणि आता हा तिसरा वेडा  

             रामकृष्णांची राहिलेली कामे पूर्ण करण्यात माताजी व्यग्र होत्या  अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्यांना आधार देऊन त्यांना प्रकाश दाखवित  त्यामुळे जयरामवाटीला तीर्थाच्या स्वरूप प्राप्त झाले होते  दर्शनाला बरीच मंडळी येऊ लागली

          एका भक्ताने विचारले, माताजी ठाकूर भक्तांचा आजार बरा करतात,  मग त्यांनी स्वतःचा आजार का नाही बरा केला? एवढ्या असह्य वेदना का सहन केल्या?  बेटा, घशाच्या वेदना त्यांना जरूर दूर करता आल्या असत्या  परंतु भोग भोगण्यासाठी  पुनर्जन्म घ्यावा लागला असता  म्हणून त्यांनी त्यांचे भोग याच जन्मात भोगून टाकले  त्याला जीवनाचे तत्त्वज्ञान समजलं  समाधानाने तो निघून गेला

         अलीकडे माताजींना वारंवार ताप येऊ लागला  खरे म्हणजे त्यांना विश्रांतीची खूपच आवश्यकता होती  पण त्या दुर्लक्ष करून काम करीतच असत  जयरामवाटीतल्या वैद्याच्या औषधाने त्यांना गुण येईना  प्रकृती खूपच खालावली  तेजस्वी वर्ण फिका पडला  डोळ्याभोवती काळी वर्तुळ उमटली  काम करण्याची ताकद नसल्यामुळे, त्या पडून पडून राहू लागल्या  त्यांना त्रास होऊ नये म्हणून, त्यांचे शिष्य दीक्षा घेण्यास आलेल्यांना परत पाठवू लागले  त्यांना कळताच, त्या कठोर स्वरात म्हणाल्या,मला विचारल्या शिवाय कोणीही परस्पर निर्णय घ्यायचा नाही  माझ्या देहात प्राण असेपर्यंत मी दीक्षा देणारच  पुन्हा असं केलेलं मला खपणार नाही

          दिवसेंदिवस दुर्बल होणारी त्यांची प्रकृती पाहून ब्रह्मचारी घाबरले  सारदानंद काशीला गेले होते  आल्या आल्याच त्यांना माताजींच्या तब्येतीबद्दल कळल्यावर ते वेड्यागत झाले  तेवढ्यात तिथे आलेल्या योगिनला म्हणाले, तुम्ही ताबडतोब जाऊन माताजींना घेऊन या  जयरामवाटीला येऊन, दोन दिवस योगिनने त्यांची सुश्रुषा केली  व कलकत्त्याला जाण्याची तयारी केली  आता परत जयरामवाटीला येणे होणार नाही, हा विचार मनात आल्याने, माताजी सिंहवाहिनीच्या मंदिरात योगिनच्या आधाराने गेल्या  देवीला नमस्कार करून, देवीच्या मुखावरचे स्मित पाहून, त्या समजल्या, आपल्याला सिंहवाहिनीने निरोप दिला  थोडा वेळ तिथे थांबून योगिनच्या आधाराने घरी आल्या  योगिनने त्यांना बिछान्यावर झोपवले

         क्रमशः
       संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख

!!!  सारदामाता  !!!

                   भाग -३८

                  एकदा योगिनने विचारले, माताजी ही तुमची जवळची माणसे तुम्हाला इतका त्रास देतात तरी एवढे कसे सहन करता? ही माणसं तुमच्या सानिध्यात असूनही सामान्याहून अति सामान्य कशी?

            योगिन ही माणसे अशी असल्यामुळेच, मी मायेच्या जाळ्यात अडकून, ठाकूरांचे अधुरे राहिलेले काम पूर्ण करते आहे  नाहीतर, ते गेल्यावर माझं जगणच असंभव होतं

             माताजींची जयरामवाटीहून निघण्याची तयारी झाली  गावातील लहान-मोठी सर्व मंडळी त्यांना भेटायला आली  काही स्त्रिया अश्रू भरल्या नेत्राने म्हणाल्या, “लवकर दुरुस्त होऊन या  आम्ही तुमची वाट बघतोय  विसरू नका आम्हाला “

माताजी म्हणाल्या, “सारं काही ठाकुरांच्या इच्छेनुसार घडेल “

         माताजींनी  नित्य पूजेतील ठाकुरांची मूर्ती व्यवस्थित पेटीत ठेवली  अंगणात आल्या  तिथली माती कपाळाला लावली  चिमूटभर पदरात बांधून घेतली  एक वार  घराकडे पाहून निघाल्या  पालखी रवाना झाली  बाकीची मंडळी बैलगाडीने निघाली    कोआलपाड्यात त्यांचे स्वागत झाले  माताजींना थकवा आल्याने, त्यांनी त्या रात्री तिथे मुक्काम केला  बरीच मंडळी रात्री दर्शनाला आली  सर्वांची चौकशी करून आशीर्वाद दिले  सकाळी पूजा करून ठाकूरांना  नमस्कार केला  त्यांचा फोटो कपड्यात गुंडाळून सामानात ठेवला  सर्वांचे नमस्कार स्वीकारून त्यांनी निरोप घेतला  त्या बाग बाजारातल्या उदबोधन निवास स्थानी आल्या  त्यांची अवस्था बघून गोलपच्या डोळ्यात पाणी आले  म्हणाली, माताजींची अशी अवस्था होईपर्यंत कळवले का नाही? माताजींना पाहून सारदानंदाला अश्रू आवरता आले नाही  त्याने ऍलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद या तिन्ही प्रकारांनी ही त्यांची प्रकृती तपासण्याची व्यवस्था केली  नामवंत डॉक्टरांचे औषध सुरू केले  योगिन, गोलप त्यांची सुश्रुषा करीत होत्या  त्यांना थोडं बरं वाटलेलं पाहून सर्वांना आनंद झाला  त्या दोन-तीन दिवसात अनेकांना दर्शन आणि आशीर्वाद दिले  योगिन आणि गोलपचा विरोध असूनही, त्यांनी तिघा चौघांना दीक्षा दिलीच

              हळूहळू माताजींनी सर्व व्यवहारातून मन काढून घेतले  त्यांचा नुसता हाडांचा सापळा राहिलेला पाहून, एक शिष्य दुःखी स्वरात म्हणाला, “माताजी, तुमची ही रक्तहीन अवस्था माझ्याने पाहवली जात नाही  तुमचा आजार मला द्या “

” बेटा, काय बोलतोस? सदैव आपल्या मुलांचं कल्याण चिंतनारी, आपलं जीवनही पुत्राला देऊ इच्छिणारी माता आपलं दुखणं मुलांना कशी देऊ शकते? बेटा, तुझं मन मी जाणलं  ठाकुरांच्या मनात असेल तर, मी पुन्हा उभी राहीन “

           माताजींचा ताप वाढतच होता  बोलण्याचीही ताकद राहिली नव्हती  श्वास चालू असल्यामुळे अस्तित्व जाणवत होतं इतकच! दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना थोडं बरं वाटलं  त्यांनी सारदानंदाला बोलावणे पाठवले  तो तात्काळ हजर झाला   शरतच्या हातावर हात ठेवत माताजी म्हणाल्या, “शरत, ही सगळी मुले आता तुला सांभाळायची आहे  त्यांच्याकडे नीट लक्ष दे ” त्यांच्या बोलण्यातला अर्थ त्याच्या लक्षात आला  त्याचे हृदय भरून आले  उदास होऊन त्यांच्याकडे बघत बाहेर आला  आता माताजींचा भरोसा नसल्याचे त्याला तीव्रतेने जाणवलं  ठाकूरांनी त्यांच्याकडून कार्य करून घेतले  तेच पुढे चालू ठेवण्याचा संदेश माताजींनी दिला

           माताजींना भेटायला आलेले ब्रम्हचारी, शिष्य बाजूच्या खोलीत थांबले होते  नेत्रात अश्रू होते  त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, सर्वांच्या पापाचा, दुर्गुणांचा त्रास माताजींना भोगावा लागतो, म्हणून दीक्षा देणे बंद करायला हवंय  माताजी झोपल्या आहेत असं समजून तो बोलत होता   पटकन डोळे उघडून माताजी म्हणाल्या, “ठाकूरांचे अवतरण रसगुल्ले खाण्यासाठी झालं होतं का? बाळांनो, मी जीवणोध्दाराचं कार्य सुरू केलं  त्यात आप परभाव ठेवला नाही  त्यामुळे सगळ्यांची पाप, दुष्कर्म मला चिकटली आहे  अंगाची आग आग होते  पण मनाला शांती मिळते “

      ब्रह्मानंद, शिवानंद माताजींना पाहण्यासाठी आले  योगिन त्यांना लापशी भरवत असल्यामुळे, ते बाजूच्या खोलीत बसले होते  ब्रह्मानंद म्हणाले, “शिवशंकरांनी विष प्राशन करून नीलकंठ झाले  रामकृष्णांनी अनेक लोकांची पापं आपल्या माथी घेतल्यामुळे, कंठ रोगाचे शिकार झाले  शारदा मातेने  सर्वांना प्रेम देऊन पाप पचवली  परिणामतः अंगाची लाही लाही होऊन त्या बिछान्यावर तडफडत आहेत  तरी त्या जगन्मातेचा स्नेहसिध्द प्रकाश अवरितपणे अलौकित करीत आहे  हा चमत्कार ठाकूरांचाच आहे “

             योगिनने त्यांना बोलावल्यावर, दोघांनी माताजींना नमस्कार केला  त्यांची अवस्था पाहून, दोघांनाही कसे तरी झाले  म्हणाले, “माताजी, तुम्ही लवकर बर्‍या व्हा   “

           क्रमशः
संकलन व लेखन- मिनाक्षी देशमुख

!!!  सारदामाता  !!!

                 अंतिम भाग – ३९

                माताजी म्हणाल्या, “राखाल बेटा, मी “त्याच्या”  इच्छेनुसार जाणार आहे  तुम्ही ठाकूरांचे कार्य व्यवस्थित पुढे न्या  ब्रह्मानंद  असेच म्हणाले होते  मी त्यांचीच छाया  माझ्या मुखातून तेच बोलवत आहेत ” आणखी काही बोलून दोघेही निघून गेले

         माताजींना पूर्वीचे लागेबंधे काहीच नको होते  सुरबाला, राधू, नलिनी कोणीही आपल्यासमोर येऊ नये असे वाटत होते  ठाकूरांनी आपले कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना मायाजालात अडकवले होते  आता त्यांच्याच आदेशानुसार निरवानिरव करीत होत्या

          एका दुपारी त्यांच्या अंगाची खूपच आग होत होती  दाह खूप वाढला होता  वरद वारा घालत होता  मस्तकावर ओला हात ठेवीत होता  त्याचं व्याकूळ मन पाहून, त्याच्या पाठीवर हात फिरवित म्हणाल्या, “मला माहित आहे, मी देह ठेवल्यावर तुम्हाला खूपच दुःख होईल  परंतु बेटा, नियमानुसार घटना घडत असतात “

 कसा बसा वरदा म्हणाला, “माताजी, असं नका ना बोलू   तुम्हाला औषधांचा उपयोग होत नसेल तर, ठाकूरांना सांगा    त्यांच्या कृपेने तुम्ही निश्चित हिंडू फिरू शकाल “

             “ताप तर माझा सखा आहे  पूर्वी ताप आला आणि ठाकूरांचे स्मरण केले की, ते येत असत  आता दर्शन होतच नाही  हे शरीर फार दिवस राहावे अशी त्यांची इच्छा दिसत नाही “

अतिव दुःखाने वरदाला रडू आवरत नव्हते  रडत रडत म्हणाला, “ठाकूर गेले, तरी तुमचा प्रेमळ सहवास, मार्गदर्शन मिळत होते  पण तुमचं अस्तित्व   “

” अरे काळजी नको करूस  माझी उणीव शरत भरून काढेल,”माताजी म्हणाल्या  

        सरदानंद  कामाचा व्याप सांभाळून माताजींना भेटायला येतच असे  पण कधी कधी माताजींना झोप लागलेली किंवा गुंगीत असल्यामुळे भेट होत नसे  त्याने कलकत्त्यातील प्रसिद्ध डॉक्टर नील रतन सरकारला आणले  पूर्ण तपासणी करून म्हणाले, “आजार गंभीर आहे  औषधे देतो  पण   “

हे ऐकून सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले  औषध सुरू होते  पण ताप हटत नव्हता  शरीरात आग पेटल्यासारखी वाटत होती  बर्फ आणून, त्यावर त्यांचे पाय ठेवले   थोडे बरे वाटले  म्हणाल्या, “मला बर्फाच्या लादीवर ठेवा  दाह कमी होईल “

 कुणाच्या तरी तोंडून अद्भुतानंद म्हणजे लाटू आजारी असल्याचे ऐकले  क्षीणपणे म्हणाल्या, माझा लाटू  मला आता कधीच दिसणार नाही

            डॉक्टर नील रतनच्याही औषधाने फरक पडत नव्हता  त्यांनी सारदानंदांना कल्पना दिली  भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी हात उचलण्याचीही ताकद त्यांच्या हातात नव्हती  म्हणून भक्तांना दर्शनाची बंदी केली  तरी त्यांचे अंतरंग सेवक, सेविका, शिष्य नेमाने येत होते

              नेहमीप्रमाणे ठाकुरांची शिष्या, माताजींची अंतरंग सेविका गौरीमा आली की त्यांना बरे वाटायचे  दोघी बराच वेळ बोलत असत  त्या दिवशी आली असता माताजी कठोरपणे म्हणाल्या, “उद्यापासून माझ्याजवळ येऊ नकोस ” तिचे अनावर रडणे पाहून हळूच म्हणाल्या, “उंबरठ्या बाहेर उभी राहून मला पाहू शकतेस ” गौरीमा रडतच बाहेर आलेली पाहून, गोलपने  काय झाले म्हणून विचारले  गौरीमाने सांगितल्यावर, गोलप म्हणाली, “त्या सर्व माया पाशातून स्वतःला मुक्त करीत आहेत  तुमच्यावर त्यांचे फार प्रेम आहे  म्हणून तुम्हाला दूर केले  तुम्ही वाईट वाटून घेऊ नका “

           एका संध्याकाळी शरतला म्हणाल्या, “या सर्वांना जयरामवाटीला पाठवून दे ” राधूवरचे प्रेम त्याला माहीत होतं  तो म्हणाला, “माताजी, त्यांच्याशिवाय तुम्हाला राहावेल?”

 “नक्कीच राहीन ” माताजींनी या आधीही एक दोन वेळा सूचित केले होते  पण इतक्या निर्वाणीचे त्या बोलल्या नव्हत्या  “भविष्यात त्यांना तिथेच राहावे लागणार आहे  मी त्यांच्यातून मन काढून घेतले आहे  आता मला कोणीच नको  सगळे मोहपाश तोडले  त्यासंबंधी काही बोलू नकोस “

      योगिनने सर्व हकीगत सारदानंदाना सांगितल्यावर ते थोडे विचारमग्न झाले  एक उपाय आहे  राधू वरून त्यांचे उडालेले मन पुन्हा गुंतवणे  मी प्रयत्न करते  पण शक्यता कमी आहे  ती माताजी जवळ आल्याबरोबर ती बोलायच्या आधीच म्हणाल्या, “तुझा हेतू साध्य होणार नाही  ठाकूर, नरेन, योगेन, शशी माझ्या प्रतिक्षेत आहेत “

           त्यांच्या इच्छेनुसार जमिनीवर बिछाना घातला  शौचादी सर्व तिथेच होत असल्याने ठाकुरांची प्रतिमा दुसऱ्या खोलीत न्यायला सांगितली  राधू, नलिनी अजून जयरामवाटीला गेले नसल्याचे समजल्यावर, त्यांना माझ्याजवळ येऊ देऊ नका म्हणून सांगितले

             रात्री त्यांनी शरतच्या हातानेच खायचा हट्ट धरला  त्याने थोडे थोडे खाऊ घातले  दूध पाजले  ठाकूरांचे शब्द आठवले  तुम्हाला मी असा अलौकिक पुत्र देईन की त्याची तुलना कोणाशीच होणार नाही  खरेच सारदानंदाच्या रूपात त्यांना अलौकिक पुत्र मिळाला  तो बरोबर त्यांच्या कलाकलाने घेत होता

           दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले, “माताजी या दुखण्यातून उठणार नाहीत  काहीच दिवसांच्या सोबती आहेत ” मातेच्या वियोगाच्या कल्पनेने तो व्यथीत झाला  पण तो सामान्य नव्हता  रामकृष्णांचा शिष्य, सारदानंद होता  दोन दिवसापासून माताजी स्तब्ध होत्या  निस्तब्ध शांतता पसरली होती  रात्रीचे भोजन कोणीच केले नव्हते  रात्रीचा शिव योग साधून माताजी अनंतात विलीन झाल्या  जगन्माता, मंगलमयी सारदामाता ठाकूरांना आपल्या पतीला भेटण्यास निघून गेल्या  काली मातेच्या रूपाने  शिवस्वरूपी विलीन झाल्या

           माताजींची निधन वार्ता वाऱ्याच्या वेगाने पसरली  सारदानंदांनी मातृवियोगाचे दुःख पचवून, पुष्पहारांनी सजवलेल्या तिरडीवर त्यांचा अचेतन  देह ठेवला  रामनामाच्या गजरात सारदानंद, वरदा आणि इतरांनी तिरडी खांद्यावर घेतली  रस्त्यात स्त्री पुरुष फुले उधळीत नमस्कार करीत होते  उद्बोधन मधून निघालेली शवयात्रा बेलूर मठात आली  स्त्रियांनी पवित्र गंगाजलाने त्यांना स्नान घातले  नवीन वस्त्र नेसवले  चंदनाच्या चितेवर शव ठेवून अग्नी दिला  त्यावेळी गंगेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पाऊस पडत असलेला पाहून, सगळ्यांची मने भयग्रस्त झाली  पण तसं काही झालं नाही

         दोन तासांनी अग्निशांत करण्यासाठी सारदानंद गंगाजल आणायच्या विचारात असताना, एकाएकी पाऊस सुरू झाला  आणि दुसऱ्या किनाऱ्यावर चक्क ऊन पडले होते

       सारदानंद म्हणाले, “माताजींचे मंदिर इथेच बांधून त्यांची मूर्ती पश्चिमाभिमुख बसवावी म्हणजे त्यांच्या आवडत्या गंगामैयाचं रोज दर्शन होईल ” जड अंतःकरणाने सर्वजण परतले  

       अशा या महान तपस्वी, त्यागी, कर्तुत्वान, जगन्मातेला कोटी कोटी प्रणाम !!

           !!  समाप्त !!
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख

       

सारदामाता चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading