आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

सारदामाता चरित्र भाग ५, (२१ ते २५)
शामा देवींनी जगध्दात्रीची पूजा केल्यानंतर सारदा देवीच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली त्यांना दक्षिणेश्वरी जायची ओढ लागली तोच दुसऱ्या दिवशी त्यांची सासू चंद्रमणीच्या निधनाची बातमी आली त्या लगेच दक्षिणेश्वरी पोहोचल्या रामकृष्णांची कृश झालेली तब्येत बघून…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! सारदामाता !!!
भाग -२१
रामदास स्वामींच्या शिष्यांना माताजी म्हणाल्या, रामदास स्वामी बद्दल जाणण्याची उत्सुकता आहे शिष्य म्हणाला, ज्या कार्याचा रामकृष्ण परहंसांनी ध्यास घेतला होता, तेच कार्य माझे स्वामी करीत होते मीही समाज प्रबोधन करण्यासाठी हिंडतोय शिष्य निघून गेला नावेतून माताजी तिन्ही नद्याच्या संगमावर गेल्या त्या तिन्ही बहिणींचे मिलन पाहून आपल्या स्वर्गस्थ बहिण कादंबिनीच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले
स्वतःला सावरून, रामकृष्णांचे केस, ओंजळीत घेऊन अर्पण करण्यासाठी त्या पाण्यात उभ्या असताना एक लाट त्यांच्या ओंजळीवरून गेली जणू ठाकूरांचे केस न्यायलाच आली होती माताजींना काही समजले नाही त्या पाहतच राहिल्या सगळ्यांनी गंगास्नान करून अननुभुत आनंद प्राप्त केला
अलाहाबाद मधील मंदिरं पाहून मंडळी अयोध्याला आली शरयूची पूजा केली रात्रीच्या गाडीने मंडळी निघाली वृंदावन भगवान श्रीकृष्णाची भूमी तिथे येताच माताजींच्या कानात बासरीचे सूर निनादू लागले वेशी जवळ असलेल्या काळाबाबूच्या उपवनात मंडळी राहू लागली व्रजकन्या कृष्णाला हाका मारत चहूकडे फिरत असल्याचे दृश्य त्यांच्या नजरेसमोर साकार झाले सर्वच कृष्णमय झाले योगिंद्र मोहिनीचे माताजीवर फार प्रेम होते रामकृष्णांच्या वियोगामुळे माताजी व्यथित असल्याचे लक्षात येताच, योगिनी त्यांच्याजवळ आली दोघीही खूप रडल्या अश्रुंनी धुसर झालेल्या नजरेसमोर रामकृष्ण अवतरित होऊन म्हणाले, “तुम्ही रडलेलं मला आवडत नाही मी इथेच आहे फक्त या खोलीतून त्या खोलीत गेलो इतकच!” त्यांचे बोल ऐकून दोघींनीही आपले अश्रू पुसले ते पुन्हा रडायचे नाही असा निश्चय करूनच
वृंदावनात माताजी आल्यापासून त्यांना तीव्रतेने जाणवत होते, आपण राधा आणि ठाकूर कृष्ण! त्या तिथं राधेच्या स्वरूपातच वावरत होत्या एका सकाळी यमुनेत स्नान करून पूजा करीत असता, त्या ध्यानस्थ झाल्या बराच वेळ त्यांची समाधी उतरली नाही म्हणून, योगिनीने त्यांच्या कानात ठाकूरांच्या नावाचा उच्चार सुरू केला तरी त्यांची समाधी उतरत नसल्याचे पाहून, स्वामी योगानंदानी तोच प्रयोग केला माताजींची समाधी उतरली आणि माताजी अगदी रामकृष्णां सारख्या खाऊ, बोलू लागल्या त्या समाधीत असताना, स्वामी योगानंदाने त्यांना बरेच प्रश्न विचारले आणि माताजींनी अगदी अचूक उत्तरे दिली सर्वांची खात्री पटली की, त्यांच्यात ठाकूर संचारले
वृंदावनात मंडळी एक वर्ष राहिली एक दिवस माताजी राधा कृष्णाच्या मूर्तीकडे बघत असतानाच, त्या भाव समाधीत गेल्या जागृत झाल्यावर म्हणाल्या, आपण वृंदावन प्रदक्षिणा पूर्ण करायची सर्वांनी अनुमती दिल्यावर, त्या सर्वांना घेऊन प्रदक्षिणा करीत होत्या त्यांचे सांधे धरले, पाय पुढे टाकताना वेदना होत होत्या तरी त्यांनी लंगडत लंगडत प्रदक्षिणा पूर्ण केल्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर, त्या राधारमणच्या मंदिरात गेल्या डोळे मिटून नमस्कार करत म्हणाल्या, भगवंता, माझ्यात दोष असेल तर दूर कर उदारता येऊ दे म्हणजे मला दुसऱ्याचे दोष दिसणार नाही
एकदा दुपारचे जेवण झाल्यावर, त्या आराम करीत असताना, त्यांच्यासमोर रामकृष्ण येऊन म्हणाले, योगेनला दीक्षा द्या हा भास असेल म्हणून दुर्लक्ष केले दुसऱ्या दिवशी त्यांनी येऊन तेच सांगितले तिसऱ्या दिवशी रामकृष्णानी पुन्हा तेच सांगितल्यावर, त्या म्हणाल्या, मी त्यांच्याशी कधी बोलली नाही मग दीक्षा कशी देणार?
तुम्ही योगेनला जवळ बसवून त्याला दीक्षा द्या योगेनला बोलावून त्यांनी सर्व हकीकत सांगितली त्याप्रमाणे सर्व तयारी केली आणि एका सकाळी योगेन त्यांच्या समोर दीक्षा घ्यायला आला योगेनने रामकृष्णाचे छायाचित्र आणि अस्थी कलश आणून ठेवला छायाचित्राला व माताजींना नमस्कार केला माताजी पूजा करीत असतानाच भाव समाधीत गेल्या समाधीतच त्यांनी मंत्रोच्चार सुरू केले काही वेळानंतर स्वामी योगानंद होऊन माताजींना नमस्कार केला
माताजी वृंदावनात आल्यापासून आपले दुःख विसरल्या त्या आनंदी राहू लागल्या स्वतः राधा असल्याचं त्यांना जाणवत होते यमुनेशी तर त्या कितीतरी वेळ हितगुज गोष्टी करीत असत तरीही त्यांना गंगेबद्दल विलक्षण ओढ होती तिच्या सानिध्यात राहण्याच्या इराद्याने, रेल्वेने हरिद्वारला निघाल्या स्वामी योगानंदांना गाडीतच ताप भरला ते डोळे मिटून पडले होते योगिनी विकत घेतलेल्या डाळिंबाचे दाणे काढून त्यांना भरवीत होती स्वामी योगानंदासमोर एक भयानक माणूस येऊन ओरडला, तुला चांगलाच पाहून घेतले असते, परंतु रामकृष्ण परमहंसाच्या आदेशानुसार जावे लागत आहे तो गेल्यावर, एक तेजस्वी लाल साडी नेसलेली स्त्री समोर येऊन म्हणाली, मला रसगुल्ला दे आणि अंतर्धान पावली त्यांचा ताप एकदम उतरला माताजींना सर्व हकीगत सांगितल्यावर, माताजी म्हणाल्या, ठाकूर स्वतः तुम्हाला दाणे भरवताना मी पाहिलं आश्चर्याने योगिनी म्हणाली, म्हणजे? तुम्हाला माझ्या ठिकाणी ठाकूर दिसले?
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – २२
गाडी हरिद्वारला पोहोचली नियोजित ठिकाणी सामान ठेवून, मंडळी स्नानासाठी गंगाकिनारी आले पंड्याना दक्षिणा द्यायला पैसे नसल्यामुळे, या मंडळींनी फुल,पानं वाहून नमस्कार केला ब्रह्मकुंडात स्नान करून मंदिरात दर्शनाला गेले
दुसऱ्या दिवशी माताजींनी ठाकुरांचे केस, नखं गंगाजलाला अर्पण केले नावेतून मंडळी दुसऱ्या किनाऱ्यावर उतरले माताजीनी चंडी पर्वतावर जाण्याची इच्छा व्यक्त केली पाय दुखत असतानाही सर्वांबरोबर त्या चंडी पर्वतावर चढल्या चंडीच्या मंदिरात जाऊन, भक्ती भावाने नमस्कार केला या दगदगीने माताजींना फार थकवा आला त्यांना विश्रांतीची आवश्यकता असल्याचे जाणून मंडळी निवासस्थानाकडे परतली
दुसऱ्या दिवशी सर्वजण जयपुरला आले सर्वांना जयपूर शहर फार आवडले गोविंदजींचं दर्शन घेतल्यावर ते एका मंदिरात गेले तिथली देवी पाहून योगानंद आश्चर्याने म्हणाले, माताजी, मला हीच देवी दिसली होती देवीला नमस्कार झाल्यावर, योगिनीने त्यांना रसगुल्ले मागितल्याची आठवण करून दिली योगानंदाने बाहेर जाऊन रसगुल्ले आणले, देवी समोर ठेवून नमस्कार केला
नंतर पुष्करला आले तिथली सावित्री टेकडी चढले तिथले निसर्ग सौंदर्य पाहून माताजी सुखावल्या वर्षापेक्षा जास्त दिवस तीर्थाटन केल्यामुळे माताजी आपले दुःख विसरल्या मन शांत झाले मंडळी कलकत्त्याकडे निघाली
सर्वजण बलराम बाबूच्या घरी आले त्यांनी सर्वांचे मनापासून स्वागत केले बलरामबाबू म्हणाले, माताजी, प्रवासाचा थकवा जाईपर्यंत संकोच न करता तुमचेच घर समजून इथेच राहा माताजी म्हणाल्या, ठाकूरांचा पुत्र म्हणजे, तू माझाही पुत्र आहेस राहीन मी
आठ दहा दिवसानंतर दक्षिणेश्वराला जाऊन मातेचे दर्शन घेऊन कामारपुकूरला जाऊन राहणार असल्याचे माताजीने सांगितले
तेवढ्यात गोलप येऊन म्हणाली, माताजी, त्रिलोकनाथ विश्वासकडून मिळत असलेले सात रुपये बंद झाले मयूर बाबूचा पुत्र नवीन असल्यामुळे, रामलाल व खजिनदार दिनूच्या सांगण्यावरून त्याने बंद केले विवेकानंद, सारदानंदाने बरेच सुनावले पण त्यांनी ऐकले नाही माताजी म्हणाल्या, करु दे बंद केले तर आपलेच लोक सामील असल्यावर काय बोलणार? आणि आता पैसे घेऊन तरी मी काय करणार?
परंतु माताजी तिथे कशा राहणार? त्या म्हणाल्या, ठाकूरांनी सांगितले होते, तुम्ही कामारपुकुरला रहा भाजीपाला लावा भात भाजी खाऊन परमेश्वराचे नामजप करीत जीवन व्यतीत करा कोणाकडे काही मागू नका मागणे म्हणजे आपलं मस्तक विकल्यासारखे आहे त्यांच्या आदेशानुसार मी कामारपुकुरला राहणार
माताजी, तुम्ही आम्हा सर्वांच्या आई आहात आम्ही काहीतरी तुमच्यासाठी करू माताजी काहीच बोलल्या नाहीत
दुसऱ्या दिवशी मंडळी दक्षिणेश्वरला पोहोचली सर्व जण काली मातेचे दर्शन घेऊन ठाकूरांच्या खोलीत प्रवेशले ठाकूरांच्या प्रतिमेला सर्वांनी अतिशय श्रध्देने नमस्कार केला माताजींच्या गालावर अश्रू ओघळू लागले त्याचवेळी त्यांच्या कानात ठाकुरांचे शब्द ऐकू आले डोळ्यात पाणी आणू नका मी तुमच्यातच आहे त्यांनी चटकन आपले डोळे पुसले बाहेर आल्यावर त्यांनी लक्ष्मीला विचारले, तू कामारपुकुरला येतेस ना? नाही मी रामलाल कडे राहणार आहे त्यांना वाईट वाटले तिला इतकं प्रेम देऊन, प्रेमाने वागवून अखेर मला एकटं सोडलं यामागे रामलालचा हात असल्याची खात्री झाली त्या तिथे असेपर्यंत रामलाल एकदाही भेटायला आला नाही याचे त्यांना अतिशय वैशम्य वाटले कोणी कोणाचे नाही हेच खरं
गोलप येऊन म्हणाली, पैशाअभावी बरद्वान पर्यंतचीच तिकीट काढावी लागली असू दे पुढे चालत जाऊ सर्वजण परत बरद्वानला पोहोचले तिथून पायी १६ मैलाच अंतर चालून उच्चलला पोहोचले माताजींना पुढे एक पाऊल टाकण्याचीही ताकद उरली नाही सर्वजण झाडाखाली बसले थकले तर सर्वच होते त्यात भूकही लागली होती
गोलपने खिचडी करून सर्वांना वाढली दुपार टळल्यावर सर्वजण कामारपुकुरला पोहोचले गाव खूपच बदलले होते पूर्वीची गरीबी जाऊन, समृद्धी दिसत होती मात्र लोकांचे बुरसटलेले विचार तसेच होते शिष्यांबरोबर माताजींना पाहून काही कुत्सित मंडळी आपसात इशारे करत म्हणाली, ही त्या गदाधरची विधवा आहे बघा कशी नटून-थटून आलीऽऽ
ते कुजके बोलणे ऐकून, माताजींना अतिशय वाईट वाटले तिथून निघून जाण्याची त्यांना तीव्र इच्छा झाली त्याचवेळी ठाकूरांचे शब्द आले मनुष्याने सुख दुःखाशी सामना करीत जगायला हवे आलेल्या अडचणीतून मार्ग काढत पुढे चला मनाची ताकद वाढवा
माताजींनी मन घट्ट केले पति विरहित घरात प्रवेशल्या शिष्यांच्या मदतीने साफसफाई केली आठ दिवसांनी शिष्यांनी निरोप घेतला
आतापर्यंत माताजी भोवती माणसं होती ठाकूरांचा बलदंड आधार होता आता सोबत होती दारिद्र्याची भाजी डाळ आणायलाही पैसे नव्हते मिठाबरोबर भात खाऊ लागल्या सर्वात स्वस्त असलेलं मीठ आणायलाही त्यांच्याजवळ पैसे नव्हते पुढे काय करावे या चिंतेत त्या बसल्या असता, एक ब्राम्हण स्री आली तिचे स्वागत करून, तिच्या समोर पाण्याचे फुलपात्र ठेवल्यावर, ती स्त्री म्हणाली, सकेशीच्या हातचे पाणी पिण्याची धर्माज्ञा नाही ती गेल्यावर माताजी रडू लागल्या तेवढ्यात
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – २३
तेवढ्यात रामकृष्ण समोर येऊन म्हणाले, तुम्ही विधवा नाही वपन करायचं नाही अलंकार उतरवायचे नाही पण टीका करणाऱ्यांना करू देत काही दिवस सहन करा काही दिवस टीका करून नक्की माघार घेतील माताजींनी स्वतःला खंबीर बनवायचे ठरवले
घरात काहीच नव्हतं तीन दिवस माताजींनी नुसत्या पाण्यावर काढले चौथ्या दिवशी गोलप, योगानंद आणि दोन शिष्य पैसे घेऊन आले नरेंद्रांनी पाठवले त्यांचे प्रेम पाहून माताजींचे डोळे भरून आले
“माताजी तुमची अशी दशा का झाली?”
“पैसा नसल्यामुळे साधं मीठही आणता आलं नाही “
‘आम्हाला का नाही कळवलं?”
“ठाकुरांचा आदेश आहे की कुणाला काही मागायचे नाही दान करा पण याचना करू नका म्हणून उपवास घडल्याचे काही वाटले नाही “
भक्तांनी आवश्यक असलेले सर्व सामान आणले स्वयंपाक केला नैवेद्य दाखवल्यावर सर्वांनी भोजन केले आठ दिवस राहून शिष्य परत गेले माताजींनी भाजीपाला लावण्याचा प्रयत्न केला पण विघ्न संतोषी लोक काहीच टिकू देत नव्हते त्यांनी केलेली नासधूस पाहून, माताजी फार निराश झाल्या त्याचवेळी त्यांच्या आईचा जयरामवाटीला येण्याचा निरोप आला जावे की नाही या संभ्रमात असतानाच, काही शिष्य येत असल्याचा निरोप आला आणि जाण्याचा विचार रद्द केला
तेवढात रामकृष्ण समोर येऊन म्हणाले, “तुम्ही कंकण का उतरवलेत?”
” लोकांची टीका बंद करण्यासाठी “
” पुन्हा न काढण्यासाठी कंकण हातात घाला तुम्हाला वैष्णव तंत्र माहित नाही का?”
“नाही “
“गौरदासी येणार आहे तिला विचारा “
गौरदासीने येऊन माताजींना नमस्कार केला माताजींची स्थिती पाहून तिला फार वाईट वाटले तिची समजूत घालून माताजींनी विचारले, “वैष्णव मंत्र म्हणजे काय?”
ती म्हणाली
” माताजी, मनुष्य केवळ अन्नावर जगू शकत नाही त्याला वस्त्र, निवारा, मनोरंजन इत्यादींची गरज असते तुमचे पती चिन्मय आहेत तुमच्यापाशी वैधव्य कधीच येणार नाही माताजी तुम्ही साक्षात लक्ष्मी आहात तुम्ही अलंकार विरहित झाला तर, हे जग दारिद्र्यात पिचून जाईल ठाकूरांनी दिलेले अलंकार कधीच काढू नका “
त्यानंतर मात्र माताजींनी बारीक लाल किनारीची साडी व हातातले कंगन कधीच काढले नाही कामारपुकुरातलं जीवन अतिशय कष्टमय होते आपल्या लेकीचे होत असलेले हाल पाहून, त्यांनी मुलगा कालीकुमारला घ्यायला पाठवला माताजींना आपल्या भाऊ आल्याचा मनस्वी आनंद झाला पण त्याला जेवण देणे अशक्य असल्यामुळे एका बाजूला जाऊन खूप रडल्या त्यांना मातेचा निरोप सांगितल्यावर, त्या म्हणाल्या, मी कामारपुकुरलाच रहावे अशी इच्छा अशी ठाकुरांची इच्छा आहे त्यामुळे मी येऊ शकत नाही बहिनीचा निश्चय ऐकूण तो निघून गेला
माताजींचे दिवस अतिशय कष्टात जात होते मधून मधून ठाकूरांचे होणारे दर्शन हाच त्यांचा मोठा आधार, व विरंगुळा होता एक दिवस फाटलेल्या साडीला ठिगळ लावत बसल्या असताना, रामकृष्ण समोर येऊन म्हणाले, “गरीबाचे दुःख जाणून घेऊन तुम्ही काहीतरी करावं, म्हणून मातेने ही परिस्थिती निर्माण केली आहे यातूनही तुम्ही स्वाभिमानानं तरून जाणार, यात शंका नाही “
जगध्दात्रीच्या पूजेच्या वेळी माताजी जयरामवाटीला गेल्या आपल्या लाडक्या कन्येची अवस्था पाहून, त्यांच्या मातेला अश्रू आवरेनात
“माॅं, रडू नकोस मातेने दिलेले भोग भोगायलाच हवे यातून काहीतरी चांगलंच निघेल “
श्यामसुंदरीने अश्रू पुसले भुकेल्या कन्येला जेऊ घातले तेलाविना केसाच्या झालेल्या जटा तेल लावून हलक्या हाताने सोडवल्या न्हाऊ घातले आपली साडी नेसायला दिली
जगध्दात्रीच्या पूजेचा समारंभ झाला आठ-दहा दिवस आनंदात घालवल्यावर, त्या जायला निघाल्या मातेने राहण्याचा आग्रह केला म्हणाल्या, “आई, आग्रह करू नकोस ठाकूरांच्या आदेशानुसार मला तिथेच राहायला हवंय “
आईला नमस्कार करून त्या कामारपुकुरात पोहोचल्या
कामारपुकुरातल्या घरात माताजींचे स्वास्थ हरवलं रामलाल मधून मधून काही मंडळींना घेऊन येऊ लागला त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा लागायचा लक्ष्मी पूर्वीसारखी त्यांना काहीच मदत करीत नसे कधी कलकत्त्याहून शिष्य येत त्यांचही माताजींना करावं लागायचं कित्येकदा त्यांना उपवास घडत त्या अतिशय दुर्बल झाल्या थोडेही श्रम त्यांना सहन होत नसत पण करणार काय?
रामकृष्णांच्या जीवनाचा मूलमंत्र आत्मसात केलेला हरीश रामकृष्णाच्या देहावसानंतर आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात होता त्याची संसारातली उदासीनता पाहून, त्याच्या बायकोने त्याला वश करण्याकरता मंत्रविधीचा उपयोग केला परिणामी तो विकृत होऊन, वेडे चाळे करू लागला तशातच तो कामारपुकुकरला आला तेव्हा तो वेडा झाला होता पण ठाकूरांचा निष्ठावान भक्त म्हणून माताजींनी ठेवून घेतले इथे तो सुधारेल असे वाटले पण त्याचे वेड वाढतच असल्याचे पाहून, त्याला नेण्याबद्दल मठाला पत्र पाठवले
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – २४
माताजीची दयनीय अवस्था सांगितल्यावर, गोलप म्हणाली, “माताजींना इथे कलकत्त्याला आणणेच योग्य राहील ”
“ठीक आहे तुम्हीच माताजींना घेऊन या “
“होय, पण त्यांच्यासाठी दोन साड्या घ्यायच्यात “
तेवढ्यात तिथे आलेल्या बलरामबापू ने पैसे दिले व म्हणाला, “माताजी इथे आल्यावर माझ्या घरी राहतील मला ठाकूरांची तेवढीच सेवा घडेल यानंतर त्यांना कामारपुकुरला पाठवायचे नाही तिथे त्यांचे फार हाल होतात “
गोलप आलेली पाहून माताजींना फार आनंद झाला पाणी वगैरे पिऊन झाल्यावर, गोलपने तेलाची बाटली काढली माताजींच्या केसांना लावून हलक्या हाताने जटा झालेल्या केसांचा गुंता काढला नंतर आणलेल्या साड्यांपैकी एक साडी जबरदस्तीने नेसायला लागली दोघीही रामकृष्णांच्या फोटो समोर नतमस्तक झाल्या गोलपने छोटा आरसा त्यांना दाखवला व म्हणाली, पहा केवढा फरक पडला
ठाकूर नेहमी म्हणायचे, “दुःख दारिद्र्याचे प्रदर्शन करू नये ते निर्माण करून जगन्माता तुमची परीक्षा घेत असते लोक कल्याणार्थ जीवन व्यतीत करणाऱ्यांनी तर नेहमी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून, प्रसन्नतेने वावरले पाहिजे “
दुसऱ्या दिवशी सकाळी घराला नमस्कार करून गोलप व माताजी दोघी कलकत्त्याकडे निघाल्या एक वर्षानंतर माताजी बलराम भवनात आल्या होत्या काही दिवस आनंदात राहिल्या पण त्यांची गंगामैयाची ओढ पाहून, शिष्यांनी बेलूर गावात निलांबर मुखर्जीचे उद्यानभवन भाड्याने घेतले हे घर गंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर होते गोलप, योगींनीसह माताजींनी या नव्या घरी प्रवेश केला समोरच वाहणाऱ्या गंगौघाला बघून, माताजी खूपच सुखावल्या इथली व्यवस्था पाहण्यासाठी योगानंदही आले होते बेलूरच्या या शांत निसर्गरम्य परिसरात माताजींचा बराचसा वेळ भावावेशातच जात होता
घर भाड्याचा करार संपल्यावर मंडळी पुन्हा बलराम बाबूच्या घरी आली काही दिवसांनी जगन्नाथाच्या दर्शनाला जाण्याची माताजीनी इच्छा प्रगट केली सर्व शिष्यांनी खर्चाची जुळवणी केली तयारी करून एका शुभदिनी मंडळी निघाली माताजी सोबत होते स्वामी ब्रह्मानंद, स्वामी योगानंद, शारदानंद व इतर भक्त शिवाय योगीन, गोलप, गौरी आणि काही सेविका
त्यावेळी रेल्वे सुविधा नसल्यामुळे, मंडळी जहाजातून चांदबालीला आली नंतर आगबोटीने कटक पर्यंत आले नंतरचा प्रवास बैलगाडीने करून मंडळी जगन्नाथ पुरीला पोहोचले
दुसऱ्या दिवशी लवकर स्नान करून, माताजींनी जगन्नाथाचे दर्शन घेतल्यावर त्यांचं मन शांत झालं त्या रोज येऊन देवासमोर बसून नामस्मरण करीत असत कधी एखादं भजन म्हणत म्हणत एके संध्याकाळी सर्व स्त्रिया समुद्रकिनारी आल्या माताजी समुद्राकडे एकाग्रतेने पाहत होत्या त्याचवेळी त्यांना सागरातून वर येत असलेले ठाकूर दिसले माताजींनी त्यांना हात जोडले नंतर सर्वजण मुक्कामावर आले
माताजी रोज ठाकूरांच्या छायाचित्राला नमस्कार करून झोपी जात त्या नेहमीच त्यांचा फोटो जवळ ठेवीत असत आज त्यांच्या मनात आले, ठाकूर इथे कधीच आले नाही आपण त्यांच्या छायाचित्राला दर्शन घडवू दोघेही एकरूप असल्यामुळे जगन्नाथाचे दर्शन घडल्याचे समाधान मिळेल
सकाळी त्या जगन्नाथांच्या दर्शनाला गेल्या तेव्हा पदरात ठाकूरांच्या लपवलेल्या फोटोला जगन्नाथाचे दर्शन घडवले हात जोडून डोळे मिटले क्षणात त्या भावाविष्ट झाल्या प्रत्यक्ष जगन्नाथ रत्नजडित वेदीवर विराजमान असून, त्या स्वतः राधा होऊन त्यांची चरण सेवा करीत असलेल्या त्यांना दिसल्या आतापर्यंत जे भास होत होते, ते सत्यरूप जगन्नाथांनी दाखवले त्या भावावेशातून बाहेर आल्या
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख
!!! सारदामाता !!!
भाग – २५
माताजींना लक्ष्मीमंदिर खूपच आवडले तिथे त्या अनेकदा भावाविष्ट होत असत एकदा एका भक्ताने उत्सुकतेने विचारले, माताजी, तुम्ही काली माता पूजक असून, जगन्नाथा समोर भावलीन कशा होता? अहोऽ! परमात्मा एकच आहे त्या जगन्नाथाच्या गाभाऱ्यात मला शिवमूर्ती दिसते एक लक्ष शालिग्रामच्या बेदीवर जगन्नाथ शिव विराजमान असून, विमलादेवीही दिसल्या अष्टमीच्या रात्री बलिदान होत असल्याचे दृश्य पाहिले विमलादेवी म्हणजेच दुर्गा काली माता
जगन्नाथ पुरीत असताना माताजींना रामकृष्णांचे दर्शन वारंवार होत असे त्या त्यांच्याशी एकरूप असल्यामुळे त्या ठाकूरमय झाल्या होत्या त्या भक्तांशी ठाकूर सारख्याच बोलत म्हणजेच रामकृष्णांशी त्यांचं चिरमिलन झालं होतं म्हणूनच त्या पवित्र प्रेम, सहज दया आणि अपार सौजन्याची मूर्ती बनून उभ्या राहिल्या कलकत्त्याला जायचे दिवशी त्या गाभाऱ्याजवळ थोड्या वेळ स्थिरावल्या मंडळी कलकत्त्याला परतली
दोन-तीन दिवस कलकत्त्याला राहिल्यावर, माताजी कामारपुकुरला गोलपसह आल्या गोलपने बरेच दिवस बंद असलेले घर स्वच्छ केलं गोलपने खिचडी बनवली दोघी जेवण करून स्वस्थ् झोपल्या भक्त माताजींना कामारपुकुरला एकटे ठेवायला तयार नव्हते त्यांनी प्रयत्न करून माताजींना कलकत्त्याला आणले त्यांच्या आगमनामुळे सर्वांना आनंद झाला
रात्रीचे जेवणं झाल्यावर, माताजींनी अंथरुणावर अंग टाकले तोच त्यांना एका गोष्टीची आठवण झाली ठाकुरांची आई चंद्रमणीचा मृत्यू झाल्यावर, ते म्हणाले होते, विष्णू पादपदी जाऊन तुमच्या सासूमांच पिंडदान करा नंतर त्यांनी गयेला जाऊन पिंडदान करण्याचे कबूल केले होते पण अद्याप करायचं राहून गेले गयेला जाण्याचा निश्चय करून त्या निद्रेच्या कुशीत शिरल्या
गोलप, योगिन, गोपालदा, शारदानंद सोबत माताजी गयेला निघाल्या रस्त्यात योगिनीने विचारले, “माताजी, तुम्हाला माहित आहे का ? वराहनगर मठात तुमच्या शिष्यांनी दीक्षा घेतली “
” कोणी दिली दीक्षा?”
” स्वतः ठाकूरांनी “
“कसे शक्य आहे?”
” त्यांनी ठाकूरांच्या प्रतिमेसमोर विरजाहोम सर्वांनी मिळून केला नरेंद्रनी आहूती दिल्या सर्वांनी भगवी वस्त्र धारण केले ठाकूरांनीच त्या सर्वांना भगवी वस्त्र व नावही दिलीत शशी म्हणजे रामकृष्णानंद, राखल- ब्रह्मानंद, गोपालदा- अद्वैतानंद, निरंजन- स्वामी निरजानंद, बाबुराम- प्रेमानंद, काली प्रसाद- अभेदानंद, आणि नरेन- विवेकानंद अगदी समर्पक नाव आहेत सर्वांची पण ही नाव लक्षात राहणे कठीण आहे मग तुम्ही आधीच्याच नावाने त्यांना बोलवत जा “
माताजी गयेतील विष्णू मंदिरात गेल्या तेव्हा तिथे चार-पाच वर्षाच्या तीन चार मुलींचे विवाह होत असलेले दिसल्यावर, त्यांना स्वतःचा विवाह आठवला त्या म्हणाल्या, गोलप, या अबोध बालिकांना सासरी भयंकर जाच होतो यांच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे त्यासाठी शिक्षण प्रसार हा एकच मार्ग आहे देवाला नमस्कार करून त्या बाहेर आल्या
गोपालदाच्या मदतीने माताजींनी ठाकुरांच्या मातेचे, त्यांच्या सासूमांच, विधीपूर्वक पिंडदान केलं नंतर ते सर्वजण बुद्धगयेला गेले तो बोधी वृक्ष, बुद्धाचा भव्य पुतळा आणि मठातील श्रीमंती पाहून त्यांना तीव्रतेने आपल्या शिष्य पुत्रांची दयनीय अवस्था जाणवली त्या बिचार्याना ना राहायला जागा, ना वस्त्र, त्यांनी जगायचं कसं? जप, अभ्यास, अध्ययन कसे होणार? रात्री झोपताना नेहमीप्रमाणे ठाकूरांच्या प्रतिमेला नमस्कार केल्यावर म्हणाल्या, “ठाकूर! तुम्ही गेलात तुमच्या जाण्याने सगळं संपलं की काय? तुमच्या नावावर घरदार आईबाप सोडून आलेल्या मुलांना राहायला जागा नाही खायला अन्न नाही त्यांना ह्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय तुमचे कार्य ते पुढे कसे नेणार? “
ठाकुरांचा विशिष्ट आवाज ऐकताच त्यांना समाधान वाटले
गया वरून माताजी कलकत्त्याला पोहोचल्या त्यावेळी बलरामचा आजार विकोपाला गेला होता हे कळताच त्या सरळ बलराम भवनातच राहायला आल्या ८-१० दिवसांनी बलरामबाबूचे निधन झाले सर्वांच्या दुःखाचे सांत्वन करण्याकरता आणखी काही दिवस माताजी तिथे थांबल्या
बरेच प्रयत्न करून शिष्यांनी भुसुंडीत घर घेतले घर स्मशानाजवळ होते माताजी, योगिनी, गोलप तिथे राहायला आल्या सोबत योगानंद व ब्रह्मानंदही होते रात्री योगिनीला कसले तरी आवाज येत असल्यामुळे झोप येत नसे एक दिवस माताजींनी तिचा कोमेजला चेहरा पाहून, काय होते म्हणून विचारल्यावर, योगिन म्हणाली, माताजी, रात्री रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज ऐकू येत असल्यामुळे, रात्रीची झोपच येत नाही
माताजी म्हणाल्या, बेटी, स्मशान या शब्दांनी तुझं मन भयभीत झाले, म्हणून तुला आवाज येत असतात आज पासून झोपताना ठाकूरांचे नाव घेत जा दोन दिवसांनी योगिनी माताजींना म्हणाली की आता मला स्वस्थ आणि चांगली झोप येते मन आता शांत शांत झाले
स्वामी विवेकानंद आणि ब्रह्मानंदाने माताजींच्या खोलीत प्रवेश केला विवेकानंद म्हणाले, माताजी, मी पारिव्राजक जीवन स्वीकारले परंतु दूरवरून कोणीतरी मला बोलावतय तो शोध घेण्यासाठी जात आहो तुमचा आशीर्वाद घेण्यास आलोय खऱ्या अर्थाने मी मनुष्य बनू शकलो तर, परत येईल नाहीतर हे माझं
क्रमशः
संकलन व लेखन – मिनाक्षी देशमुख








