आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

पेशवाई संपुर्ण भाग ८, (३६ ते ४०)
हा ब्रह्मनाद कांही मंडळी मनाच्या स्वातंत्र्याची वाट बघू लागली.आणि पुढे यातुनच राजकर्ते जन्माला आले. या राजकर्त्यांनी भगभगत्या प्रकाशात शपथा वाहून अनेक महायुध्दांना जन्म झाला.या महायुध्दात तेव्हा अगणित कत्तली झाल्या.रक्ताचे महापूर वाहिले.भलेभले श्वास रणांगणावर गोठून …………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! पेशवाई !!!
भाग—३६
श्रीमंत माधवराव पेशवे राघोबां कडे बघत म्हणाले,काका!मरणाच्या दारात उभं असलेल्या माणसाचे सर्व अपराध क्षमा करावेत ना?राघोबांचे मन आपल्या कृश झालेल्या पुतण्याकडे पाहुन डोळे भरुन आले.बाजुला बसलेल्या नारायणरावांचा हात त्यांच्या हाती देत श्रीमंत म्हणाले,काका,नारायण रावास गादीवर बसवून आपण राज्य कारभार हाकावा.वडिल या नात्याने त्यांचा प्रतिपाळ करावा.श्रीमंत आपल्या इच्छेप्रमाणे होईल.नंतर सखाराम बापुंना जवळ बोलावून म्हणाले,बापू आतांपर्यंत जे झालं ते गंगेत सोडून मनातील किल्मिष काढून राज्यहिताचा विचार करुन कारभार चालवावा.त्यांनी श्रीमंतां च्या पायावर हात ठेवून न्यायाने राज्य चालविण्याचे अभिवचन दिले.तेवढ्यात रामचंद्रांनी कर्ज फिटल्याच्या चिठ्ठ्या श्रीमंतांच्या चरणी ठेवल्या.
श्रीमंतांनी त्यांना पालखीचा मान व वस्रे देऊन म्हणाले,मंडळी आमच्या सार्या इच्छा गजानन कृपेने पूर्ण झाल्यात.आतां महा यात्रेस निघायला मोकळे झालो.आमच्या प्रस्थानाची तयारी करा.
सभामंडपातील गजाननाच्या समोर शेणाने सारवलेल्या भूमीवर दर्भाचा सोवळा बिछाना अंथरण्यात आला.त्या वर श्रीमंतांना झोपवण्यात आले.श्रीमंतां चे डोळे पैलतिरी लागले होते.गात्र गात्र क्षीण होत चालली होती.कळज्वालांचा आगडोंब उसळला होता.हरिपंत फडके व नारायणराव श्रीमंतांच्या मुखात कदंब तीर्थ टाकत होते.पेशव्यांच्या मुखातून गजानना गजानना हा एकच मंत्र सुरु होता.रमाबाई खिन्न नजरेने चिंतामणी कडे बघत होत्या.सकाळ उजाडली आणि समईच्या शुभ्रकळ्या विझल्या त्याचक्षणी आरोळ उठला… “स्वामीss
१८ नोव्हेंबर १७७२!
महायात्रा निघाली.चित्ता चंदनाच्या लाकडाने सजली.रमाबाईंनी धार्मिक विधी पार पाडून मोठ्या धैर्याने चित्तेवर च्या माधवरावांचे डोके मांडीवर ठेवून, धैर्याने शांतपणे चित्तेवर बसल्या आणि स्वहस्ते चंदनी चित्तेला अग्नी दिला. ज्वाळा उंच उंच उठू लागल्या.मुळामुठा नद्या गळ्यात गळा घालून रडू लागल्या. राघोबादादा मात्र स्वतःशीच हसत म्हणाले,आम्ही पुन्हा डाव मांडु आणि जिंकूनच दम घेऊ.चला राघोभरारी शनिवारवाडा वाट बघतेय!संपलं एक पर्व.
श्रीमंत माधवरावांचं उत्तरकार्य थेऊरला उरकवुन सर्वमंडळी २ डिसेंबर १७७२ रोजी पुण्यास परतली.सर्व मंडळी गणेश महालात जमली होती.नाना फडणीस,हरिपंत फडके,सखाराम बापू, नारायणराव,आनंदीबाई आणि राघोबा दादा बसले होते.सर्वानुमते दुसर्या दिवशी नारायणरावांसाठी पेशवाईचे वस्रे आणण्यास साताराला जायचे ठरले. दुसर्या दिवशी सर्व मंडळी फौजफाटा घेऊन सातार्यात दाखल झाली. छत्रपती रामराजेंच्या मनी पेशव्यांविषयी रोष होता.या ब्राम्हणांनी आमचं राज्य बुडवलं छत्रपतींच्या स्वराज्यालाच पार मातीत मिसळवले.आमचा पराक्रम गोठला म्हणून यांनी मान वर काढली.छत्रपतीची गादीच नेस्तनाबूत करायचा डाव मांडला.
रविवार २३ डिसेंबर १७७२ रोजी छत्रपतींनी पेशवाईची वस्रे नारायणरावां ना दिली.रघुनाथरावांना रिजंट,सखाराम बापू बोकीलास कारभारी आणि मोरोबांना फडणीस म्हणून नेमण्यात आले.
नंतर पेशवाईची महावस्रे परिधान करुन श्रीमंत नारायणराव पेशवे पंढरपूरी विठ्ठलचरणी नतमस्तक होऊन स्वराज्य उध्दारासाठी साकडे घातले.३१ डिसेंबर १७७२ रोजी मंडळी पुण्यात परतले.पुणे शहर शनिवारवाडा सजला.सनई चौघडा वाजू लागला.शनिवारवाड्यावर भगवा झेंडा डौलाने डोलू लागला.आज पहिल्यांदाच नवीन पेशव्यांचा शाही दरबार भरणार म्हणून कारभारी सखाराम बापू आणि नाना फडणीस वाड्यावर आलेत.गणेश महल सजला.
नारायणराव पेशवाईची महावस्रे परिधान करुन दिवाणखान्यात यायला निघाले तोच गंगाबाईनी त्यांना औक्षण केले.गंगाबाई!नारायणरावांची पत्नी साठें च्या घराण्यातून आलेल्या २२ एप्रील १७६३ ला सिंहगडावर विवाह झाला होता.औक्षण झाल्यावर दोघांमधे थोडासा हास्यपरिहास झाला.आणि भालदार,चोपदारांची ललकारी घुमली.
राजदरबारात एक दिलाने,एक विचाराने सगळे मिळून राज्य चालवण्याचा संकल्प सोडून राजदरबार संपला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!!पेशवाई!!!
भाग—३७
नारायणराव पेशवे!अवघं १८ वर्षाचं कोवळं वय!स्वभाव अतिशय तापट आणि रागीट!
दूरदृष्टी,विवेकबुध्दी गुणग्राहकता,माणसं ओळखण्याचा अभाव,त्यामुळे जवळची चांगली माणसं दुरावली होती.समोर बसलेल्या हरिपंता ना म्हणाले, हरिपंत काका,राघोबाकाकां बद्दल काय विचार केला?श्रीमंत काळ सोकावला की, तो विधिलिखिताच्याही पाठीत खंजीर खुपसायला मागेपुढे पाहत नाही.त्यांच्या मनातील निखारा पानिपत च्या युध्दापासूनच धगधगतोय!नाना साहेबांनी त्यांच्या चुकांवर पांघरुण घालुन स्वार्थ साधला.पण सरळ स्वभावा च्या माधवरावांना जमले नाही.त्यांनी ते पांघरुण खेचताच धगधगत्या निखार्या वर तूप पडून वणवा पेटला.आज तोच वणवा स्वराज्याला जाळायला निघाला आहे.श्रीमंत त्यांनी जन्माच हाडवैर मांडून पेशवाईलाच नेस्तनाबूत करण्याचा डाव मांडलाय!हैदर,रोहील्यांशी संधान साधले हे पेशवाईला खूप महाग पडेल.
श्रीमंत! लहन तोंडी मोठा घास घेतो माधवरावांनी आपली जबाबदारी आमच्यावर सोपवली त्या नात्याने एक गोष्ट बोलावी म्हणतोय,हां बोला काका, ऐकतो आहोत आम्ही!
श्रीमंत!सुदैवाने स्वराज्याची धूरा आपल्या हाती आली आहे.हे पेशवाईचं दिव्य सांभाळणं सोप नाही.आपला पोरकटपणा,बालीशपणा,नादानपणा, राज्यकारभाराला शोभत नाही.
रागावर नियंत्रण ठेवा.माणसं तोडण्याऐवजी जोडण्याचा प्रयत्न करा.सद्सद् विवेक बुध्दी जागृत ठेवून चांगल्या वाईटतला फरक समजून घ्या.अंगातला आळस, धिमेपणा सोडला तरच या साम्राज्याचा नवीन डाव मांडता येईल.हरिपंताचा सल्ला पटल्याने स्वतःत बदल करण्याचे नारायणरावांनी ठरवले.
तिकडे रहाटाचा राघोबांचा बंगला, रात्रीची वेळ!राघोबादादा आणि आनंदी बाई बोलत होते.आनंदीबाई म्हणाल्या, स्वारी,निखार्याची राख झाल्यावर काय उपयोग?निखार्यावल वारा घालायला तुम्ही आहात ना पटाईत?आनंदी शत्रूला नेहमी खिंडीत पकडून मारायचे असते. आम्ही आहोत सोबतीला…
राघोबांना सल्ला मागायला नारायणराव गेले की,नीट न सांगता, कुत्सित बोलुन त्यांची बोळवण करत.
एके दिवशी कोकणांतील गुप्तहेरा ने आणलेली बातमी राघोबांच्या कानावर घातल्यावर ते म्हणाले,एवढं घाबरण्या सारखं काय आहे?तुम्ही पेशवे आहांत, लाखो सैन्य तुमच्या हातात आहे.कुणावर ही जबाबदारी सोपवा.
दुसर्या दिवशी हरिपंत फडके, नाना फडणीस,मोरोबा फडणीस आणि इतर सरदारांशी गुप्त मसलत करुन, श्रीमंत पेशव्यांनी कृष्णाजी धुळूप आणि त्रिंबक विनायकराव यांची कोकण मोहिमे वर निवड केली.स्वराज्याच्या फौजेने फिरंग्यांवर झडप घालुन पराभव केला. आणि परत एकदा स्वराज्याचा झेंडा मानाने विजयदुर्गावर डौलू लागला.
श्रीमंत नारायणराव पेशव्यांना मिळालेल्या पहिल्या विजयाप्रित्यर्थ पांच तोफांची सलामी देऊन हत्तीवरुन गावभर साखर वाटण्यात आली.
इकडे राघोबांचा मात्र तिळपापड झाला.पेशवे नारायणरावांना जर असाच विजय मिळत गेला तर,ते डोईजड होईल. आणि राघोबांनी त्याच क्षणी ठरवले, आता पेशवाईत हिस्सा न मागतां संपूर्ण पेशवाईच गिळंकृत करायचीय!
वादळाला तोंड फुटलं.सखाराम बापू सोबत त्यांच्या गुप्त मसलती,नव्या कटांची सुरुवात झाली.ही बातमी पेशव्यां ना कळताच,तात्काळ सैनिकांच्या सहाय्याने रहाटबंगल्यातील राघोबादादा आणि आनंदी बाईंना कैद केले.राघोबांनी कैद कारण विचारल्यावर,पेशवे म्हणाले, काका,वारंवार विनवण्या करुनही षंडयंत्र रचुन हैदर,निजामाशी गुप्त मसलती करता…. राघोबा मिश्कील हसत म्हणाले तुमचे थोरले बंधू माधवरावांनी जी चूक केली तीच चूक आज तुम्ही करत आहात आम्ही काळसर्प आहोत,कधी दंश करु कळाणार सुध्दा नाही.दोघांवरही कडक चौकी पहारे बसवले.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – ३८.
एके दिवशी चांद्रसेनीय कायस्थ प्रभुंचे प्रकरण समोर आल्यावर पेशवे नारायणरावांनी भरदरबारात अपमान करुन त्यांच्या विरुध्द निकाल दिल्यामुळे संतप्त झालेले,वैदिक आचरण करणारे, सात्विक मनाचे ब्राम्हणवृंदांच्या अंगाची लाही लाही झाली.त्यारात्री सर्वजण सखाराम हरि गुप्तेंना भेटले.
हे सखाराम हरि गुप्ते,प्रभु जातीचे प्रमुख होते.१७३३ मधे जंजीर्या च्या मोहिमेत गुप्तेंनी तलवार गाजवून रघुनाथरावांचे निकट सहकारी म्हणून नांव मिळवले होते.शिवाय राक्षस भुवनाच्या लढाईत अद्वितिय शौर्य गाजवुन हैदरला चांगलाच तडाखा दिला होता.त्यांची राघोबादादांवर नितांत श्रध्दा होती.ही सर्व मंडळी सखाराम हरि गुप्तें ना भेटल्यावर ते म्हणाले,एवढ्यात,पेशवे गंगापूरी मातोश्रींना भेटायला जाणार आहेत,त्या संधीचा फायदा घेऊन नजर कैदेत असलेल्या राघोबांना भेटून ठरवुया
१४ मार्च ते १० एप्रील १७७३, श्रीमंत नारायणराव पेशवे आई गोपिका बाईंना भेटण्यास गंगापूरला आले.भेटी गाठी झाल्यावर थोडं निवांत झाल्यावर,ते आईला म्हणाले,आईसाहेब!तुम्ही चला ना शनिवारवाड्यात.हल्ली तुमच्या या लेकरावर राघोबाकाका आणि आनंदी काकींची काळं सावट पडत आहे,ते केव्हा आमचा घात करती ही भिती वाटते जीव गुदमरतोय,छातीवर दडपण येतेय.
नारायणा!आमचा राजकारणांत हस्तक्षेप नको म्हणुन माधराव बोलले,त्याच दिवशी परत कधीही शनिवारवाड्यात पाऊल टाकायचा नाही ठरविले.गोपिका बाईंना लेकाची अस्वस्थता,घालमेल समजली.त्यांना जवळ घेऊन ममतेने मायेने मस्तकावर हात फिरवित म्हणाल्या,बेटा असं खचून जायचं नसतं!
नारायणा,कर्म,कर्तव्य पार पाडणे मानवी जिवनाचे आद्य कर्तव्य आहे, म्हणूनच संघर्षाचा दिवा तुफानात विझू दिला नाही तरच सुखाचा मार्ग सांपडतो. पुण्याला गेल्याबरोबर सखाराम बापू बोकीलाला काढून त्या जागेवर नाना फडणीसांची नेमणूक करा.आणि राघोबा दादांपासुन नेहमी सावध रहा.
माधवरावांनी नागपूरकर साबाजी भोसलेंना दत्तक घेण्याचे जवळ जवळ नक्की ठरवले होते,पण ऐनवेळी निर्णय बदलून नारायणरावांनाच पेशवाई देण्याचा निर्णय घेतला होता.सध्या साबाजी भोसले व मुधोजी भोसले याच्यांत दत्तकावरुन भाऊबंदकी जुंपली. साबाजी भोसलेची बाजू सावरायला नारायणराव पेशवेंनी जायचे ठरवले.दोघांत युती झाली तर,नारायणराव आणि साबाजी भोसलेची ताकद एक होईल. ती ताकद आपण कधीच तोडू शकणार नाही हे जाणून, सखाराम बापू,सदाशिवराव शेणवी,सखाराम हरि गुप्ते,तुळाजी पवार आनंदीबाई या सर्वांबरोबर राघोबांची मसलत होऊन,नारायणरावांना पुण्यातच अडवण्यासाठी,आपल्या फौजेनिशी त्यांना कैद करावे,परंतु त्यासाठी प्रथम नजर कैदेतुन सुटणे आवश्यक आहे, त्यासाठी गारद्यांची मदत घ्यावी लागेल.
सखाराम बापूंनी सुचवले,पेशवे माधवरावांनी मरतेवेळी सर्वांची कर्जे चुकती केल्यामुळे खजिना रिकामा झाला गारद्यांचे पगार थकल्यामुळे त्यांच्यात असंतोष निर्माण होऊन,पगाराच्या मागणीच्या निमित्याने नारायणरावांना भेटण्यास गेले की,त्यांना अटक करायला वेळ लागणार नाही,पण त्यासाठी १५ लाख रुपये गारद्यांना द्यावे लागतील.हा सौदा नऊ लाखापर्यंत तुटू शकतो,पण त्यासाठी गारद्यांना साष्टी,नगर आणि पुरंदरचे किल्ले द्यावे लागतील.यावर सर्वांनी सहमती दर्शवल्यावर सर्वजण निघून गेल्यावर दुसर्या दिवशीचा हुकुम नामा नेण्यासाठी तुळाजीला जांभळी दरवाज्याने यायला सांगीतल्यावर तोही निघुन गेला.राघोबांच्या भिडस्त स्वभावा मुळे खात्री नसल्यामुळे आनंदीबाईंनी स्वतःच कांही निर्णय घ्यायचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे दुसर्या दिवशी तुळोजी पवार आल्यावर,सावधपणे हुकुमनामा देत सुमेररसिंग गारदीकडे पोहचविण्यास सांगुन राघोबा म्हणाले,
कामात चुक झाली तर पहिला बळी तुझा जाईल.तुळोजी पवार हुकुमनामा घेऊन खाली येताच आनंदीबाई त्याच्या जवळचा हुकुमनामा घेऊन आपल्या खोलीत आल्या.हुकुमनाम्यात लिहिले होते, “श्रीमंत नारायण पेशव्यांना धरावे”! म्हणजे आमचा कार्यभाग साधता येईल.सही… रघुनाथराव पेशवे.आनंदी बाईंनी त्यात एका अक्षराचा बदल केला. “ध” च्या ऐवजी “मा” केला.धरावे ऐवजी मारावे असा बदल करुन हुकुम नामा तुळोजी पवाराकडे दिला.अप्रत्यक्ष पणे आनंदीबाईंनी पेशवाईच्या काळजात खंजिर खुपसण्याचा अट्टाहास पुरवला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – ३९.
गंगापूरहुन नारायणराव पेशवे पत्नी गंगाबाईसह पुण्याला परतल्या बरोबर,कारभारी पदावरुन सखाराम बापूंना काढून त्या जागी नाना फडणीसां ची नेमणूक केली.एव्हाना गुप्तहेराकडुन राघोबादांदाचे कटकारस्थान कळल्यावर, नाना फडणीस व हरिपंत फडकेंशी चर्चा केली.त्या दिवसांपासुन श्रीमंत पेशव्यां च्या सुरक्षतेत प्रचंड वाढ करण्यात आली
३० ऑगस्ट १७७३ सकाळी नारायणराव पर्वतीवर देवदेवेश्वरांच्या दर्शनाला निघाले असतां,गंगाबाईंना त्यांचा चेहरा ओढवल्या सारखा,चैतन्य हरवल्यासारखं,डोळ्यांत वेगळेच भाव पाहून गंगाबाईंच्या सर्वांगावरुन सर्रकन काटा ऊठला.कसल्या तरी अनामिक भितीचा भास झाला.आज पर्वतीवर गेला नाही तर चालणार नाही का?कां भिती वाटते,आम्हाला कुणी… गंगाबाईंनी तात्काळ त्यांच्या ओठावर हात ठेवला. हसून पेशवे म्हणाले,गंगा!तुम्ही आम्हाला सारी सुखं दिलीत,त्यात नवा पेशवा देत असल्याने आमच्या आनंदात भर पडून द्विगुनीत झालाय.तेवढ्यात कुलाब्यावरुन रावसाहेब राघोजी आंग्रे आल्याचा निरोप दासीने दिला.
नारायणरावांनी अतितीगृहात बसलेल्या राघोजी आंग्रेची भेट घेतली. आंग्रे मुजरा घालुन म्हणाले!श्रीमंत चाचां च्या कटकटींना खुप ऊत आलेला आहे. आपण आमच्यावर घातलेले निर्बंध थोडे शिथिल केले तर आम्हाला कांही पाऊल उचलता येईल.श्रीमंत गंभीर झाले. कोकण भागाविषयी जास्त माहिती नसल्यामुळे,एकदम निर्णय घेण्यापेक्षा, नाना फडणीसांशी मसलत करुन संध्याकाळी बोलूया!असे म्हणुन ते पर्वती वर देवदर्शनास निघाले.दिल्ली दरवाजा समोर हरिपंत फडके दोनशे घोडेस्वार श्रीमंतांचे रक्षणकर्तेसह वाट बघत उभे होते.सदरेच्या पायर्या उतरुन शुभ्र घोड्यावर मांंड टाकुन पर्वतीकडे निघाले.
पर्वतीची उंच टेकडी पार करुन श्रीमंत हरिपंतासह देवदेवश्वराचे दर्शन घेऊन बाहेर पाऊस सुरु असल्यामुळे समोरच्या वाड्यात दाखल झाले.तिथे राघोबादादांचा विषय निघाल्यावर श्रीमंत म्हणाले,हरिपंतकाका! राघोबाकाकांचा कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.मारेकर्यांमा खंडणी देण्यापर्यंत त्यांची मजल जावी? कां? कशासाठी एवढा अट्टाहास?पेशवाईसाठीच ना? श्रीमंत उगीच विषाद करुं नका.आज रात्री आपण सगळे बसून यावर कांही तरी तोडगा काढू या!
पाऊस थांबल्यावर दुसर्या प्रहरी श्रीमंत वाड्यावर परतले.गंगाबाईं नी पाटाभोवती छान रांगोळी घातली. आज पानांत विविध पदार्थ होते.त्या सारख्या पतीच्या चेहर्याकडे पाहत असलेले पाहुन एक घास गंगाबाईच्या मुखाजवळ नेत म्हणाले,घ्या हा प्रेमाचा घास!अहो पण!आज नाही म्हणू नका. बळेच त्यांच्या प्रेमाखातर घास खाल्ला, परंतु का कोण जाणे घास कडू लागला. आपल्यालाच कसा लागला.स्वारींना लागला असता तर ते जेवलेच नसते. जेवन झाल्यावर म्हणाले,आज पानाचा विडा तुम्ही भरवणार आहांत.गंगाबाईने विडा बनवुन अलगद श्रीमंतांच्या मुखात घातला.
आतां थोडी वामकुक्षी घेतो.उन्ह उतरल्यावर उठवा आम्हाला.असे म्हणून ते आपल्या महाली आले.पलंगावर अंग टाकताच त्यांना गाढ झोप लागली.
इकडे तुळाजी पवारने दुपारच्या वेळी सुमेरसिंगच्या वाड्यात येऊन बसले असलेल्या सुमेरसिंग,खडकसिंग,अब्दुल पठाण ही गारदी मंडळी बसलेली पाहून म्हणाले,सुमेरसिंगजी तुमची फितूरी पेशव्यांना कळली आहे.त्यांनी पाऊल उचलण्याआधी तुम्ही झडप घाला.नाही तर उद्या तुम्हालाच फासावर लटकायची वेळ येईल.
सध्या श्रीमंत त्यांच्या महालात आराम करताहेत.दरवारजावरचा पहारा एकदम शिथिल आहे.लवकर चला. सुमेरसिंगने आतुन तीन नंग्या तलवारी आणुन खडखसिंग,युसुफ व स्वतःकडे घेऊन म्हणाला,खडकसिंग तुम दो हजार फौजका इंतजाम करो।फौरन।हम शनिवारवाडा घेर लेंगे।युसुफ तुम अपनी फौज लेके पुना शहरमे दंगा मचावो।जो भी सामने आयेगा उसे काट दो।चलोss
कांही वेळातच दिन दिनsss ओरडत दोन हजार फौज शनिवारवाड्या समोर दाखल झाली.प्रत्येकाच्या हातात नंग्या तलवारी चमकत होत्या.सुमेरसिंग, अब्दुल युसुफ,खरकसिंग व तुळाजी पवारासह बंद असलेल्या दिल्ली दरवाजा समोर येऊन दरवाजा उघडण्यासाठी ओरडु लागला.रागरंग पाहुन दरवाजा उघडत नाहीसे पाहुन त्याने बुलंद दिल्ली दरवाजा तोडण्याचा आपल्या लोकांना आदेश दिला.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! पेशवाई !!!
भाग – ४०.
दिन दिनss ओरडत गारदी सैन्याने भला मोठा बुलंद दिल्ली दरवाजा तुटता च सारे गारदी भराभर नंग्या तलवारी फिरवत आंत घुसले.वाचवाss वाचवाss चा एकच आरोळ उठला.सुमेरसिंग गारद्यांना भराभर आदेश देत होता. इतक्यात इच्छारामपंतांनी येऊन हा काय गोंधळ आहे,असे सुमेरसिंगला विचारतां च तुळाजी ओरडुन म्हणाला,याची खांडोळी कराss.इच्छारामपंत जीव वाचवण्यासाठी गोशाळेत धावले व गायी ला मारणार नाही असे वाटून ते बांड्या गायीच्या मागे लपले.गारद्यांनी गायीसह इच्छारामपंतांची खांडोळी केली.गोशाळे त रक्ताचा महापूर वाहू लागला.
इकडे वारा प्यालेला सुमेरसिंग पायर्या चढून वाड्यात शिरताच आबाजी पंतांनी अडवण्याचा प्रयत्न करतांच त्यांच्या शरीराचे पार तुकडे केले. तिकडे पुणे शहरांत जो दिसेल त्याच्यावर वार करुं लागले.लोक सैरावैरा पळूं लागले.दुकानदारांनी पटापट दुकाने बंद केली.बायकापोरं वाट फुटेल तिकडे पळू लागली.सगळा गदारोळ उठला.जो तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करुं लागला.
इकडे शनिवारवाड्यात श्रीमंतांचा खिदमतदार चापाजी टिकेकरने नारायणरावांना उठवुन घाबर्या घाबर्या म्हणाला,उठा श्रीमंत!जीव वाचवाsss! गारद्यांनी शनिवारवाड्याला गराडा घातलाय!नारायणराव खाडकन उठुन चापाडी टिकेकर आणि नारोबा फाटक यांना सोबत घेऊन गणपती महालातुन कोठीच्या जिन्याने वर येऊन राघोबांना म्हणाले,काकाss आम्हाला वाचवाss गारद्यांनी वाड्यात मोठा गोंधळ घातला. त्यांना थांबवा.काकाss वाटल्यास आम्हाला कैद करुन तुम्ही पेशवे व्हा,पण आम्हाला वाचवा ss काकाss
राघोबा मात्र एखाद्या शिळेसारखे स्तब्ध!चेहर्यावर दयेचा लवलेश नव्हता, मात्र आसुरी महाशक्तीचा महामंत्र तांडव करत होता.नारायणरावांंच्या आकांता कडे तठस्थपणे नुसते बघत होते.पेशव्यां नी राघोबांच्या पायाला विळखा घालुन ढसा ढसा रडू लागले.गारद्यांच्या डोळ्यांत खून उतरला होता.समजावले असते तरी ते ऐकण्यातले नव्हते.काकाss काकाss बोला ना काकाss ,सांगा ना या गारद्यांना इतक्यात सुमेरसिंग,खरकसिंग आणि अब्दुल युसुफ आलेले पाहताच नारायणरावाचे अवसान गळाले.छाती जडावली.शेवटी पेशवे उठुन काकांना मिठी मारुन हंबरडा फोडला.राघोबांनी हातांच्या मुठी आवळून गच्च डोळे मिटले
सुमेरसिंग जळजळीत नजर रोखत पेशव्यांकडे येत असलेला पाहून चापाजी टिकेकर आडवा येऊन नारायणांच्या दयेची भिक मागू लागला.वारं प्यालेल्या सुमेरसिंगने तलवारीचे सपासप वार करुन चापाजी टिकेकरच्या शरीराचे तुकडे केले.नारोबा फाटक नारायणरावां ना वाचवायला येत गयावया करीत म्हणाला,नका हो मारुं यांना!या कोवळ्या वयाच्या लेकरानं तुमचं काय बिघडवल? लागलीच खरकसिंग वेगाने पुढे येऊन त्यांचे शीर धडावेगळे केले.
मृत्युचा नंगा नाच सुरु होता. श्रीमंत पेशवे राघोबांना घट्ट पकडून आर्त नाद करत काकाss मला वाचवा नाss ! काकाss काका,तसे सुमेरसिंग, अब्दुल युसुफ,खरकसिंग सैतान पुढे येऊन राघोबांपासुन नारायनरावांना खेचण्याचा प्रयत्न केला,तरीही ते सोडेनात,तेव्हा लाथा घालून दात खात तिघा गारद्यांनी मिळून त्यांची मिठी सोडवली.राघोबांचा अंगरखा टरटर फाटला आणि त्याच क्षणी पिसाळलेल्या सुमेरसिंगाने तळपती तलवार नारायणरावांच्या पोटात खुपसली.काss काss शेवटचा चित्कार शनिवारवाड्यात घुमला.
रक्ताच्या चिरकांड्या राघोबांच्या सर्वांगावर उडाल्या.श्रीमंत नारायणराव पेशवे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. कोथळा फुटुन बाहेर आला.कितीतरी वेळ नारायणरावांचे शरीर कापलेल्या बोकड्यासारखे उडत राहिले.
शनिवारवाड्याला लागलेला शाप नियतीने खदाखदा हसत असा पूर्ण केला ज्या हाताने राघोबांनी नारायणरावांची मुंज लावली होती,ज्या तळहातावर त्यांना खेळवले होते,त्याच हातांनी त्यांच्या वधाचा हुकुमनामा पाठवला होता कां?कशासाठी?मराठेशाहीच्या इतिहासात खुद्द तख्ततशीन राजकर्त्याचा त्याच्याच राजवाड्यात भर दिवसाच्या तिसर्या प्रहरी त्याच्याच स्वकीयांकडून खून झाला.पुणे शहराचे वातावरण अतिशय गंभीर झाले.
बुधवार चावडीवर मोठमोठे सरदार,आपाजीराव पाटणकर,खंडोजी जगताप,बजाबा पुरंदरे,नाना फडणीस, हरिपंत फडके,सखाराम बापू,पानशे सरदार,राघोजी आंग्रे,बाळाजीपंत दामले मालोजी घोरपडे,आनंदराव रास्ते,मामा त्रिंबकराव,गोविंदराव गायकवाड आणि इतर थोर मंडळी जमा झाली.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.











