दिवाळी संपूर्ण माहिती २०२४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

दिवाळी माहिती सर्व

*🪔दिवाळीचे ११ दिवस संपूर्ण माहिती🪔*

🪔दिवस १ ला अश्विन वद्य नवमी … घर-समान स्वच्छता,रंग रंगोटी प्रारंभ

🪔दिवस २ रा अश्विन वद्य दशमी … सामान लावणे,

🪔दिवस ३ रा अश्विन वद्य एकादशी … दिवाळी साहित्य खरेदी …

🪔दिवस ४ था अश्विन वद्य द्वादशी … दिवाळी फराळ तयारी.

🪔दिवस ५ वा अश्विन वद्य धनत्रयोदशी …

🪔दिवस ६ वा दिवस ६ वा नरक चतृर्दशी …

🪔दिवस ७ वा अश्विन वद्य अमावास्या लक्ष्मी पूजन …

🪔दिवस ८ वा कार्तिक शुद्ध प्रतिपदा दिवाळी पाडवा …

🪔दिवस ९ वा कार्तिक शुद्ध द्वितीय भाऊबीज …

🪔दिवस १० वा कार्तिक शुद्ध तृतीय … फराळ पाण्यासाठी आमंत्रण

🪔दिवस ११ वा कार्तिक शुद्ध चतुर्थी … माहेरवासीण लेकीची बोळवण

🪔दिवस १ ला अश्विन वद्य नवमी … घर-समान स्वच्छता, रंग रंगोटी प्रारंभ

🪔 दिवाळी हा पाच दिवसांचा उत्सव आहे जो दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रत्यक्षात दिवाळी १५ दिवस साजरी होते.

🪔 “अश्विन वद्य नवमी” या दिवसापासून दिवाळीची तयारी सुरु करतात, काही लोक नंतर आणि काही लोक अगोदर आपल्या दिवाळीच्या कामाची तयारी करतात त्याचे कारण असे आहे की ज्याचा जसा कामाचा व्याप कमी जास्त असेल तो त्याप्रमाणे तयारीला सुरुवात करत असतो.

🪔दिवाळीची मुख्य कथा काय आहे ? 🪔

उत्तर भारतात, ते मातीच्या दिव्यांच्या रांगा लावून रावणाचा पराभव केल्यानंतर राजा रामाच्या अयोध्येला परत आल्याची दिवाळी साजरी करतात. याच दिवशी एका युगाच्या फरकाने भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा पराभव केला तो दिवस दक्षिणभारतासह संपूर्ण भारत वर्ष हा दिवाळीचा सण साजरा करतो.

🪔 खरं तर दिवाळी हा एकच सण नाही तो सणांचा समूह असा आहे,  त्याची संपूर्ण सणांची शृंखला आपण माहिती पाहणार आहोत.

🪔 दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. “अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे” प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात.

🪔 या साठी अखिल जागतिक हिंदू समाज या शुभ सोहळ्यासाठी त्यांची घरे स्वच्छ करतात आणि पुन्हा ते सजवतात. यासाठी अगोदर कित्येक आठवडे नियोजन चालते, दिवाळीपर्यंतचे काही आठवडे अगोदर पारंपारिकपणे घर पुन्हा सजवण्यासाठी खर्च करतात.

तसेच हिंदू (जैन, शीख) जे मालक आहेत ते आपली कंपनी, जे व्यावसायी आहेत ते आपले  दुकाने, ते लोकसुद्धा आपल्या कंपनीची, दुकानातील. व्यवसायाची. प्रतिष्ठानाची स्वच्छता करतात या मध्ये ते स्वता: आणि आपल्या कारागिराकडून बरोबर सहभागी होतात.

🪔स्वच्छता आणि सजावट उपक्रम🪔

याच कार्यामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या मिळालेली मुले उत्साहाने त्यांचे पालक आणि घरातील इतर सदस्यांसह घराच्या साफसफाई आणि सजावटीच्या कामा मध्ये सहभागी होतात. रांगोळ्या काढणे, मुली सडा समार्जन, घर सजवणे, भेटवस्तू वाटणे, नवीन पदार्थ बनवणे, पारंपारिक आणि सांस्कृतिक उपक्रम करणे, मोठ्यांचा सन्मान करणे आणि इतर अनेक गोष्टी शिकण्याची दिवाळी मुलांसाठी भरपूर संधी घेऊन येते.

🪔मुलांसाठी मजेदार क्रियाकलाप🪔

🪔खेळ🪔

मुले त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह विविध खेळ खेळून दिवाळीच्या सणाचा आनंद घेतात. त्यांना सामान्यतः लपाछपी खेळणे, पैसे देणे, डंब चॅरेड्स, वर्ड स्क्रॅम्बलर, म्युझिकल चेअर आणि इतर अनेक इनडोअर तसेच आउटडोअर गेम्सचा आनंद मिळतो. अभ्यासेतर क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याच्या अशा प्रकारे ते या महान प्रसंगी त्यांच्या मित्रांसह अधिक सामील होतात. विविध खेळ खेळण्यासाठी ते त्यांच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवतात.

🪔फटाके🪔

दिवाळीत संध्याकाळच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसोबत फटाके फोडण्याचा आनंद लहान मुले घेतात. ते त्यांच्या पालकांच्या दृष्टीखाली फटाके लावतात कारण त्यांना इजा किंवा अपघात होऊ शकतो. फटाके जाळण्याआधी ते वडिलधाऱ्यांकडून काही सुरक्षितता टिप्स घेतात की कसे जाळायचे किंवा फटाक्यांपासून कसे रोखायचे.

🪔दिवाळीचे पदार्थ🪔

दिवाळीत विविध प्रकारचे जेवण, गोड किंवा इतर पदार्थ त्यांच्या आई घरी बनवण्याची ते वाट पाहत असतात. त्यांचे मित्र आणि कुटुंबासह, ते स्वादिष्ट आणि चवदार नाश्ता, दुपारचे जेवण तसेच रात्रीचे जेवण खातात. काही मिठाईचे पदार्थ त्यांना खूप आवडतात म्हणून त्यांनी त्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. हा सण सर्व मुलांना त्यांच्या पालकांसोबत काहीतरी शिकण्याचा अनमोल क्षण देतो.

स्वच्छता करणे म्हणजे नेमके काय तर,  अस्वच्छता कमी करणे म्हणजे घरातील अमंगल वस्तू या निगेटीव वातावरण तयार करतात.

 आपल्या बरकतीमध्ये, आपल्या यशामध्ये, आपल्या आरोग्यामध्ये, आडथला आणणाऱ्या अमंगल वस्तू घराच्या बाहेर काढणे, यामध्ये केरकचरा,  कोळ्याची जाळे, मेलेले छोटीमोठी प्राणी, अस्वच्छ झालेले, भांडे, कपडे, घराचे आणि परिसरातले कोपरे, या सर्वांमधली घाण काढून सर्व परिसर स्वच्छ केला जाते.

 स्वच्छ केल्यासवरही भागत नाही, तर ते सुंदर आणि सजवावा सुद्धा लागतो अर्थात या ठिकाणीच लक्ष्मी येते आणि लक्ष्मी अशा या स्वच्छ सुंदर ठिकाणी राहते आणि ती कायम आपल्या घरी राहिलीच म्हणजेच परिवारात यश, आरोग्य, उत्तम वैभव, सौंदर्य, उत्तम आरोग्य, हे कायम टिकून राहावं यासाठी ही स्वच्छता केली जाते. कारण अस्वच्छ जाग्यावर लक्ष्मीची बहिण जिचं नाव आहे “अवदसा” जिला “अलक्ष्मी” असं सुद्धा म्हटल्या जाते. ती त्या अमंगल ठिकाणी राहते आणि आवदसा ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी अर्थात अलक्ष्मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी लक्ष्मी स्वतः राहात नाही, कारण त्या दोन्ही बहिणींचं पटत नाही म्हणून जीथे लक्ष्मी राहते तिथे यश आरोग्य औदार्य बरकतही राहते.

 आणि जिथे अलक्ष्मी म्हणजे अवदसा राहते त्या ठिकाणी रोग, अपयश, घरात कटकटी होणे, बरकत नसणे, कितीहि पैसा येतो, परंतु न पुरणे या गोष्टी घडायला लागतात त्यासाठी स्वच्छता पूर्ण झाली की मग येतो रंगरंगोटीचा दिवस तो आपण पुढे पाहू.

🪔दिवस २ रा अश्विन वद्य दशमी … सामान लावणे,

🪔संपूर्ण स्वच्छता झाल्याच्या नंतर रंगरंगोटीची, तयारी केली जात, आपण पहिल्या भागात पहिले कि अलक्ष्मी म्हणजे अवदसा आणि स्वच्छता म्हणजे लक्ष्मीदेवी अर्थात ज्यालाच बरकत असंही म्हटला जाते तीच एकमेकांशी पटत नाही. अर्थात घरामध्ये पुष्कळ अशा प्रकारची धनधान्य, वैभव, सुख समृद्धी, यावी म्हणून माता लक्ष्मीच्या आगमनाचे निमित्त समग्र सर्व, घर अंगण परिसर हे अगोदर स्वच्छ करून मग रंगरंगोटी केल्या जाते.  सामानाची आवरावर नीटनेटकेपणा मुद्दामहून या सणाच्या निमित्तानं मोठ्याप्रमाणात करताना भारतभर आणि देशाबाहेरही निमित्ताने करतात.

🪔काही लोक उपवास देखील धरतात. ज्या घरांमध्ये विविध पदार्थ आणि मिठाई तयार केली जाते आणि पूजा (प्रार्थना) केली जाते त्या घरांमध्ये दिवाळीचा दिवस अनेक क्रिया-प्रक्रियाकलापांसह चिन्हांकित केला जातो.

दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा एक महत्वाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. “अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे” प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात.

🪔दिवाळीची काही धार्मिक तथ्ये🪔

दिवाळी हा मुख्य सात दिवसांचा उत्सव आहे जो दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रत्यक्षात दिवाळी १५ दिवस साजरी होते.

🪔दिवस १ ला अश्विन वद्य एकादशी ला घर-समान स्वच्छता, रंग रंगोटी प्रारंभ, दिवाळीच्या आकाश दिवा सुरवात करतात

🪔दिवस २ रा अश्विन वद्य द्वादशी … वसुबारस. सावत्स्था गाईची (गाय+वासरू) ची पूजा केल्या जाते.

🪔दिवस ३ रा अश्विन वद्य धनत्रयोदशी …

🪔दिवस ४ था दिवस ६ वा नरक चतृर्दशी …

🪔दिवस ५ वा अश्विन वद्य अमावास्या लक्ष्मी पूजन …

🪔दिवस ६ वा कार्तिक शुद्ध प्रतिपदा दिवाळी पाडवा …

🪔दिवस ७ वा कार्तिक शुद्ध द्वितीय भाऊबीज …

🪔दिवस येथून पुढे मग शेजारी, आप्तेष्टांना, प्रेमाचे, (लोभाचे) इतर काही लोकांना फराळ पाण्यासाठी आमंत्रण करतात. काही माहेरवासीण लेकीची बोळवण करतात. (म्हणजे तिला सासरी पाठवतात.)

🪔दिवाळीच्या सणात मातीचे दिवे तेलाने पेटवण्याची परंपरा आहे.

या वर्षी मुख्य दिवाळी 3 नोव्हेंबरला साजरी होत आहे.

समृद्धीचे मनापासून स्वागत करण्यासाठी रात्रभर दिवे, मेणबत्त्या किंवा इतर विद्युत दिवे लावणे हा हिंदू विधी आहे.

दिवाळी आपल्या जीवनातील अंधार दूर करणे आणि दिवे आणि आशीर्वादांचे शोषण दर्शवते.

पावसाळ्यानंतर नवा ऋतू येण्याचे संकेतही ते देतात.

लोक त्यांच्या दारात अनेक रंग वापरून रांगोळ्या काढतात, नवीन कपडे घालतात, दार आणि खिडक्या उघडतात आणि समृद्धी आणि संपत्तीचे स्वागत करण्यासाठी रात्रभर दिवे लावतात.

🪔दिवस ३ रा अश्विन वद्य एकदशी … दिवाळी साहित्य खरेदी …

🪔नवीन कपडे आणि दागिने खरेदी करण्यासाठी आणि मिठाई, सुकामेवा आणि काजू यांसारख्या भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याचा काळ असतो

🪔दिवाळी आणि लहान मुल आणि त्यांची सुट्टी🪔

असे म्हणतात की शिवाजी महाराज तरुण असताना ते आपल्या खेळाडुंसोबत मातीचे किल्ले बनवायचे आणि युद्धाचे दृश्य पुन्हा तयार करायचे. त्याची आठवण म्हणून मुलं दिवाळीत किल्ले बनवतात. हे एक प्रकारे मुलांना त्यांचे इतिहासाचे ज्ञान मजेदार मार्गाने समृद्ध करण्यास देखील मदत करते.

🪔मुले त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह विविध खेळ खेळून दिवाळीच्या सणाचा आनंद घेतात. त्यांना सामान्यतः लपाछपी खेळणे, पैसे देणे, मुका मारणे, वर्ड स्क्रॅम्बलर, म्युझिकल चेअर आणि इतर अनेक इनडोअर तसेच आउटडोअर गेम्सचा आनंद मिळतो.

🪔दिवस ४ था अश्विन वद्य द्वादशी … दिवाळी फराळ तयारी.

🪔तिथी :- अश्विन वद्य द्वादशी :-

सणांचे नांव :- वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी,

कसा साजरा करावा :- सकाळी अभ्यंग स्नान करावे, सायंकाळी दारात दिवे लावण्यास सुरवात.

महत्व :- वासुबारसेचे…

🪔१ वसुबारस

🪔आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, 🪔

वसुबारस

🪔वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

या दिवशी संध्याकाळी गाईची वासरासह पूजा करतात.

घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

🪔ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात.

घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.

ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.

ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.

🪔स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.

🪔दिवस ५ वा अश्विन वद्य धनत्रयोदशी …

🪔तिथी :- अश्विन वद्य त्रयोदशी

सणांचे नांव :- धनत्रयोदशी, (धन्वंतरी जयंती)

कसा साजरा करावा :- सकाळी अभ्यंग स्नान करावे,

महत्व :-

🪔२ धनत्रयोदशी🪔

आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे.

🪔कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्‍नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे.

🪔 म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.

🪔धनत्रयोदशीबद्दल अजून एक कथा आहे.
इंद्रदेवाने महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेआहे.

🪔आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात.

🪔या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.

हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.

🪔धनतेरस :
साजरी होणारी धनत्रयोदशी, संपत्ती आणि कल्याण यावर जोर देऊन दिवाळी सणांची सुरुवात करते. भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीचे पूजन करणारी, कुटुंबे स्वच्छतेच्या, सजावटीच्या आणि सोन्या-चांदीच्या खरेदीच्या विधींमध्ये गुंततात, शुभ सुरुवातीचे आणि दुर्दैवापासून संरक्षणाचे प्रतीक आहे, समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.

धनतेरसला धनत्रयोदशी म्हणतात, भारतातील बहुतांश भागात या दिवसाला दिवाळी सणाचा हा पहिला दिवस समजतात. 2024 मध्ये, तो 29 ऑक्टोबर रोजी येतो. हा सण प्रामुख्याने हिंदूंच्या परंपरांशी संबंधित आहे आणि तो संपत्ती, आरोग्य आणि समृद्धीचे चित्रण करतो.

🪔संबंधित कथा

महत्त्व आणि पालन

धनत्रयोदशी ही आरोग्य आणि आयुर्वेदाची देवता भगवान धन्वंतरीची पूजा आहे. समुद्रमंथनातून (समुद्र मंथना) अमृताचे भांडे (अमृततेचे अमृत) आणि पवित्र आयुर्वेदिक ग्रंथ घेऊन प्रगट झाले अशी कथा पुराणामध्ये आहे..

लक्ष्मी पूजा: धनत्रयोदशीची संध्याकाळ समृद्धी आणि संपत्तीची देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. तिचे आशीर्वाद त्यांच्या घरी आमंत्रण देण्यासाठी कुटुंबे मिठाई आणि दिवे (तेल दिवे) देतात.

धनत्रयोदशीपूर्वी घरे स्वच्छ करून विविध रंगांच्या रांगोळ्यांनी सजवली जातात. दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी दिवे लावले जातात आणि तांदळाच्या पिठाचा वापर लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक असलेल्या लहान पावलांचे ठसे बनवण्यासाठी केला जातो.

खरेदीची परंपरा: नवीन व्यापार, सोने, चांदी आणि घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशी चांगली वेळ आहे. याला आवारात शुभ भाग्य आणणे असेही म्हटले जाते. नशिबाची साथ मिळेल या आशेने या सणावर मोठ्या प्रमाणात रोख खर्च केला जातो.

🪔धनत्रयोदशीशी संबंधित कथा🪔

धनत्रयोदशीच्या या सणामागे एक महत्त्वाची कथा आहे, ती म्हणजे एका  तरुण राजपुत्राची, ज्याला लग्नाच्या चौथ्या दिवशी साप चावला गेला होता. पत्नीने त्याला दिवे लावून आणि दागिने प्रवेशद्वारावर दाखवून झोपू दिले नाही. यम, मृत्यूचा देव असल्याने, नागाच्या वेशात, चमकाने चकित झाला आणि खोलीत प्रवेश करू शकला नाही. अशाप्रकारे, राजकुमार वाचला आणि यामुळे धनत्रयोदशीचा दिवस दुर्दैवापासून संरक्षणाचे प्रतीक म्हणून साजरा केला गेला.

सोने-चांदी खरेदीसाठी धनत्रयोदशीला शुभ दिवस का मानला जातो?

🪔हिंदू परंपरांमध्ये खोलवर रुजलेल्या विविध सांस्कृतिक आणि धार्मिक विश्वासांमुळे हा दिवस सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी अनुकूल दिवस मानला जातो. अशा खरेदीसाठी हा दिवस विशेषतः महत्त्वाचा का मानला जातो याची काही प्रमुख कारणे येथे आहेत.

हा सण सोने, चांदी आणि इतर विविध उपयुक्त वस्तूंच्या खरेदीसाठी आहे. बहुतेक लोक धनत्रयोदशीच्या शुभ सणावर सोने खरेदी करतात कारण गोल स्थिरता, समृद्धी आणि सौभाग्य दर्शवते.

🪔देवी लक्ष्मीशी संबंध: धनत्रयोदशी ही देवी लक्ष्मीची पूजा आहे, जी संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे. तिचा जन्म दुधाच्या (समुद्र मंथना) समुद्रमंथनातून झाला होता, त्या वेळी ती सोन्याने भरलेले भांडे घेऊन बाहेर पडली. सोने खरेदी करणे ही संपत्ती आणि भरपूर पैसा आकर्षित करण्यासाठी तिला घरात आमंत्रित करण्याचा एक मार्ग आहे.

समृद्धीचे प्रतीक: भारतीय संस्कृतीत सोने हे समृद्धीचे, सुरक्षिततेचे आणि नशीबाचे प्रतीक आहे. धनत्रयोदशी हा दिवस सोने खरेदीचा दिवस मानला जातो जोपर्यंत कुटुंबात येणारा पैसा वर्षभर जातो. अशाप्रकारे, सोने खरेदी करण्यामागे एक अतिरिक्त सांस्कृतिक अर्थ आहे तसेच सोन्याचा अर्थ केवळ मालमत्ता किंवा कमोडिटी असा होत नाही, तर असे काहीतरी आहे ज्याद्वारे सकारात्मक ऊर्जा किंवा समृद्धीचे संकेत देखील आहेत.

वाईट शगुनांपासून संरक्षण: हे वाईट आत्मे किंवा नकारात्मक शक्तींपासून संरक्षणात्मक शक्ती प्रदान करते असे म्हटले जाते. लोक धनत्रयोदशीला प्रत्येक संभाव्य अशुभपासून स्वतःला वाचवण्यासाठी सोने आणतात जे त्यांना एक समृद्ध भविष्य देखील देतात. काही लोककथा ही कथा एका सम्राटाच्या राजपुत्राची म्हणून सांगतात ज्याच्या विधवेने त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मदतीसाठी चतुराईने सोन्याच्या दागिन्यांचा वापर करून त्याला मृत्यूच्या तावडीतून वाचवले.

🪔शुभ वेळ: धनत्रयोदशी हा हिंदूंमध्ये सर्व प्रमुख खरेदीसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असल्याचे मानले जाते, जे लोकांना नशीब आणि समृद्धीचे आश्वासन देते. अनेकांना वाटते की या दिवशी केलेल्या गुंतवणुकीवर कोणत्याही मंदीच्या काळात आर्थिक परिणाम होत नाही.

🪔सांस्कृतिक वारसा: धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे ही एक परंपरा आहे जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे, ज्यामुळे कुटुंबांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे बंधन होते. परंपरा केवळ जुन्या चालीरीतींचा आदर करत नाही तर असे प्रसंग साजरे करताना कुटुंबांना एकत्र जोडते.

धनत्रयोदशी हे हिंदू संस्कृतीत आरोग्य आणि समृद्धीच्या गुंफलेल्या थीमचे एक शक्तिशाली स्मरण म्हणून काम करते. देवतांचा सन्मान करून आणि काल-सन्मानित परंपरेत सहभागी होऊन, कुटुंबे त्यांचे बंध दृढ करतात आणि त्यांच्या जीवनात विपुलतेला आमंत्रित करतात, ज्यामुळे ते दिवाळी उत्सवातील महत्त्वपूर्ण कोनशिला बनतात.

🪔दिवस ६ वा दिवस ६ वा नरक चतृर्दशी …

तिथी :- अश्विन वद्य चतुर्दशी

सणांचे नांव :- नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान.

कसा साजरा करावा :- सकाळी अभ्यंग स्नान करावे,

महत्व :-

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाचे चरित्र प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा – म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.

नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे.

या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे.

वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी. नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात.

या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे.

वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी. नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात.

🪔दिवस ७ वा अश्विन वद्य अमावास्या लक्ष्मी पूजन …

तिथी :- अश्विन वद्य अमावास्या

सणांचे नांव :-

कसा साजरा करावा :-

महत्व :-

 दिवाळी-दीपावली :- सकाळी अभ्यंग स्नान करावे, देवी लक्ष्मी, कुबेर, गणेश यांचे वेळ मुहूर्त पाहून पूजन करावे.

अमावस्या तिथीचे महत्त्व काय आहे?

दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला येते. हा पाच दिवस (2022 calendar diwali date) साजरा केला जाणारा सण आहे ज्यामध्ये अमावस्येला दिवाळी साजरी करण्याला विशेष महत्त्व आहे. तसे, कार्तिक महिन्यातील प्रत्येक दिवस आणि सणाला काही ना काही विशेष महत्त्व आहे.

पण दिवाळीचा सण हिंदू कॅलेंडरमध्ये diwali नवीन चंद्र वर्षाची सुरुवात देखील करतो. या दिवशी, सूर्य आणि चंद्र एकमेकांशी परिपूर्ण संरेखित असल्यामुळे ग्रहांची स्थिती अतिशय अनुकूल असल्याचे म्हटले जाते.

इतर अमावास्येच्या विपरीत, कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नवीन मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस अधिक शुभ मानला जातो. दिवाळीच्या वेळी सूर्य आणि चंद्र तूळ नक्षत्रात प्रवेश करतात जे अत्यंत लाभदायक आहे.

तूळ रास दिवाळीसाठी एक अतिशय शुभ चिन्ह आहे जे व्यवसाय आणि व्यावसायिक जीवन नियंत्रित करते. नवीन चंद्र तारीख, व्यवसायांसाठी दिवाळी खूप शुभ बनते. त्यामुळे कार्तिक महिन्यात येणारी अमावस्या दुसऱ्या महिन्यात येते.

अमावस्या तिथीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळेच दिवे लावून आणि अंधार दूर करून ही तिथी मोठ्या थाटामाटात दिवाळी म्हणून साजरी करण्याचा कायदा आहे.

दिवाळीत लक्ष्मीची पूजा केली जाते

सामान्यतः अमावस्या तिथी अशुभ मानली जाते, परंतु धर्मग्रंथ आणि हिंदू धर्मानुसार दीपावलीच्या काळात येणारी अमावस्या उदार आणि समृद्धी-उत्तम मानली जाते. दीपावलीच्या काळात श्री महालक्ष्मीची पूजा करण्याचा कायदा आहे.

असे मानले जाते की दीपावलीच्या रात्री म्हणजेच अमावस्या तिथीच्या मध्यरात्री श्री लक्ष्मी सज्जनांच्या घरी येते. सर्व दुर्गुणांपासून मुक्तीचा मार्ग असलेल्या श्री गणेश भगवान सोबत श्री लक्ष्मीजींची विशेष पूजा केली जाते.

🪔आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.

लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे.

🪔 अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.

🪔 महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.

🪔 या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.

🪔 प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.

🪔दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे आणि कुबेरा बरोबरच लक्ष्मीचीही पूजा केली जाते. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. लक्ष्मी आणि कुबेर याशिवाय गणपतीची पूजा हि केली जाते.

अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हणले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत.

🪔लक्ष्मीपूजन🪔

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.

बलिप्रतिपदा

🪔कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात,

🪔 या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात.

🪔 साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

🪔 शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात.

🪔काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.

🪔शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला “शुभा” असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस.

🪔 या दिवशी विक्रम संवत सुरू होतो.

🪔 पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.

🪔 आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात.

🪔 लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात.

🪔 घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो.

🪔 नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

🪔 दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी – बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात.

🪔पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.

बलीची पूजा

🪔गोवर्धन पूजा🪔

🪔 मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात.

🪔 अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे.

🪔…….. इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.

🪔दिवस ८ वा कार्तिक शुद्ध प्रतिपदा दिवाळी पाडवा …

तिथी :- कार्तिक शुद्ध प्रतिपदा

सणांचे नांव :-  दिवाळी पाडवा-दीपावली पाडवा.

कसा साजरा करावा :- सकाळी अभ्यंग स्नान करावे, पत्नीने पतीला ओवाळावे.

महत्व :- बलिप्रतिपदेचे …

बलिप्रतिपदा

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा म्हणतात.

काय आहे बलिप्रतिपदेची कथा ?

🕉️ बलिप्रतिपदा 🕉️

दिवाळी हा सर्व सणांचा राजा असून याला दीपोत्सव असे सुद्धा म्हटले जाते. या दीपोत्सवाची सुरुवातच गोमातेच्या पूजनाने होते व सांगता ही बहिण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या भाऊबीजेने होत असते. या दिवाळीच्या उत्सवामध्येच धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन व त्याचप्रमाणे दीपावलीतील पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा यांसारखे महत्त्वाचे सण येत असतात.

दिवाळीतील पाडवा अर्थात बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त. या दिवशी लक्ष्मी व कुबेराचे पूजन करून व्यापारी लोक वहीचे पूजन करतात.

शुभ मुहूर्त : वही पूजनासाठी मुहूर्त पाहून वहीपूजन करता येईल. ज्यांना सायंकाळी वही पूजन करायचे आहे अशा व्यापाऱ्यांसाठी वहीपूजन करता येईल.

बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा केली जाते. राजा बळीला भगवान विष्णूकडून अमर होण्याचे वरदान मिळाले होते. या दिवशी त्यांची पूजा केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी लाभते. तुम्हाला माहिती आहे का राजा बळी कोण होता?

अशी एक आख्यायिका बोलली जाते की एकदा भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे तीन पायरी जमीन मागितली होती. राजा बळीने पहिली पायरी ब्रह्मांड आणि दुसरी पायरी पृथ्वी दिली होती. यानंतर वामनाने जेव्हा बळीला तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे विचारले तेव्हाबळीने त्याचे डोके पुढे केले.

वामनाने बळीच्या मस्तकावर पाय ठेवताच राजा बळी अधोलोकात पोहोचला. या वेळी विष्णू भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन प्रतिपदेला तुझी पूजा होईल, असा त्याला आशीर्वाद दिला. तेव्हापासून राजा बळीची बलिप्रतिपदाला पूजा केली जाते.

पाडवा पूजा विधी

🪔 या दिवशी सुरवातीला बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करावे.

🪔 जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी.

🪔 या दिवशी पक्वान्नांचे भोजन करावे.

🪔 बळीला नैवेद्य दाखवावा.

🪔 यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे.

🪔 बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करावे.

🪔 या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रियांनी पतीला ओवाळावे.

🪔 व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते.

🪔 व्यापरी या दिवशी नव्या वह्यांचे पूजन केलं जातं. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात.

हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात.

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला “शुभा” असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस.

या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.

व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात.

घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

गोवर्धन पूजा

मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले.

विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.

🪔दिवस ९ वा कार्तिक शुद्ध द्वितीय भाऊबीज …

तिथी :- कार्तिक शुद्ध द्वितीया

सणांचे नांव :- भाऊबीज

कसा साजरा करावा :- सकाळी अभ्यंग स्नान करावे,

महत्व :- भाऊबीज

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो. भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.

भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.

 भाऊबीज

भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.

🪔दिवस १० वा कार्तिक शुद्ध तृतीय … फराळ पाण्यासाठी आमंत्रण

भाऊबीज या दुसऱ्या दिवशी पासून आप्तेष्ट, जवळचे नातलग, पै पाहुणे, शेजारी, आपल्या घरी काम करणारी कामगार असोत, वा इतर कोणी असो या सर्वांना आदराने आणि प्रेमाने फराळ पाण्यासाठी बोलावले जाते. काही ठिकाणी आगोदरही आमंत्रण दिल्या जाते परंतु भाऊबीजेपर्यंत प्रत्येकाच्या स्वतःच्या घरी कार्यक्रम असल्याकारणाने लोक घरी या दरम्यान जात नाहीत म्हणून भाऊबीजीची यानंतर फराळाला बोलावण्याची प्रथा चालू आहे.

🪔दिवस ११ वा कार्तिक शुद्ध चतुर्थी … माहेरवासीण लेकीची बोळवण

दिवाळी प्रश्न उत्तरे


दिवाळीच्या पूजेत काय करू नये?

काहींमध्ये दारू पिणे टाळणे, लोखंडी भांडी न वापरणे आणि कुटुंबातील सदस्यांचा अनादर न करणे यांचा समावेश नाही. काळे कपडे घालणे आणि पैसे देणे यालाही परावृत्त केले जाते. लक्ष्मी पूजा 2023: दिवाळी हा दिव्यांचा आणि उत्सवांचा सण आहे.

कुटुंबात मृत्यू झाला तर दिवाळी साजरी करता येईल का ?

जर तुम्ही परंपरांचे पालन करत असाल, तर नाही. तुमच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तुम्ही दिवाळी साजरी करू नये . आपली व्यथा मांडण्याचे आणि आपल्याला त्या व्यक्तीची उणीव भासते हे दाखवण्याचे हे एक प्रकारचे माध्यम आहे. (परंपरेनुसार येथे आणखी काही तथ्ये आहेत, ते येथे मांडणे शक्य नाही.)

तिथी :- कार्तिक शुद्ध चतुर्दशी

कार्तिक शु. १४ हा दिवस वैकुंठ चतुर्दशी या नांवानें प्रसिद्ध आहे. या दिवशीं श्रीविष्णु आणि श्रीशंकर यांची भेट झाल्याचें पुराणग्रंथांत नमूद आहे.

सण आणि उत्सव

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading