4, दत्त जन्म कथा, श्रीगुरुचरित्रात ग्रंथ तीन उपासना पद्धती

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

दत्त भगवान संपूर्ण माहिती

श्री दत्तात्रेयांच्या स्वरूपांची बाबतची माहिती

(दक्षिणांग) आदिगुरू
1 सुदर्शनचक्र – ज्ञानशास्त्र
2 डमरु – शब्दशास्त्र
3 माला – मंत्रशास्त्र.
( वामांग ) ईश्वर
1 शंख – धर्मशास्त्र
2 त्रिशूळ – आचारव्यवहार प्रायश्चित्त शास्त्र
3 कमंडलु – जीवनकर्म जीवन.
एवमीश्वरभागो यं जगत्स्थित्यै परेशितु:  |
तथान्य गुरुभागश्च माया भ्रमनिवर्तक:  ||

अर्थ – श्री दत्तात्रेयांच्या एकाच शरीरात दोन स्वरूपांची कल्पना केलेली आहे. त्यांचे उजवे अंग हे आदिगुरुस्वरूप असून,  ते मायाभ्रमाचे निवर्तक आहे  व डावे अंग हे जगाची सुस्थिति चालवणारे ईश्वरस्वरूप आहे.  श्रीगुरू टेंबे स्वामी महाराज हा असा खुलासा करतात,  स्वभक्तांवर अनुग्रह करण्याकरिता प्रभूंनी यथानुक्रम चक्रादिक आयुधे धारण केली आहेत.
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

श्री दत्तात्रय दैवत आगळे, दत्तजन्म कथा

दत्तात्रय हा शब्द ‘दत्त’ व ‘आत्रेय’ अशा दोन शब्दांनी बनला आहे. ‘दत्त’ या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि ‘अत्रेय’ म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.

अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. 9अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.
श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.

सिद्ध व नामधारक याच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’ व नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की, गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन:शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला, तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा-अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली, ही घटना शके १४९०मध्ये घडली. याचा अर्थ असा की, तब्बल ११० वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले.

भीमा-अमरजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले.

श्रीगुरुचरित्रात ग्रंथ तीन उपासना पद्धती

श्रीगुरुचरित्रात ग्रंथात ही उपासना तीन प्रकारे करता येईल, असे चरित्रकार सरस्वती गंगाधर यांनी नमूद केले आहे.
‘अंत:करण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र । सौख्य होम इहपरम।

दुसरा प्रकार सांगेन
॥ सप्ताह वाचावयाची पद्धती । तुज सांगो यथा स्थिती । शूचिर्भूत होवोनी शास्त्ररीती । सप्ताह करीता बहूपुण्य ॥ दिनशुद्धी बरवी पाहून । आवश्यक स्नान संध्यादिक करुन । पुस्तक वाचावयाचे स्थान । रंगविल्याही शोभा करावी ॥ देशकालाही संकल्प करुन । पुस्तकरूपी श्रीगुरूचे पूजन । यथोपचारे करुन । ब्राह्मणासही पूजावे ॥ प्रथमदिवसापासोन । बैसावया असावे एकस्थान । अतत्वार्थ भाषणी धरावे मौन । कामादि नियम राखावे दीप असावे शोभायमान । देव ब्राह्मण वडिल वंदून पूर्वोत्तर मुख करुन । वाचती प्रारंभ करावा ॥ नव संख्या अध्याय प्रथमदिनी । एकविशती पर्यंत द्वितीयदिनी । एकोनत्रिशंत तृतीयदिनी । चतुर्थीदिनी पंचतीस ॥ अडतीसपर्यंत पांचवेदिन । त्रेचाळीसवरी सहावेदिनी । सप्तमी बावन्न वाचोनी । अवतराणिका वाचावी ॥
अशी सप्ताहपद्धती ते सांगतात. नंतर उत्तरपूजा करून उपहार करावा. रात्री भूमीवर झोपावे, ब्राह्मण सुवासिनीस भोजन-दक्षिणा द्यावी, त्यांना संतुष्ट करावे असेही प्रतिपाद दिले आहे.

तिसरा प्रकार,
‘धर्म अर्थ पुस्तक लिहिता सर्वसिद्ध । म्हणजेच लेखनस्वरूपात सेवा करावी.’
‘सदा वाचावे गुरुचरित्र’ या ओवीचे दोन अर्थ आहेत. सदा म्हणजे नित्याने वा दररोज आणि सदा म्हणजे सप्ताह पद्धतीने सदैव । दररोज वाचताना एक फायदा होतो.

गुरुचरित्र कथा प्रसंग- अध्याय २२, ओवी ४८

पारायणाची फलश्रुती

कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे, अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते, असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच. तुम्ही-आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हटला की, सुख-दु:ख आलेच! मग सुखप्राप्ती व्हावी आणि दु:खनिवृत्ती व्हावी ही सर्वाचीच अपेक्षा असते. तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशीही मनिषा असते. आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ-आनंद देणारी असावी असेही प्रत्येकास वाटत असते. या सर्व गोष्टी ग्रंथपठण-पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात. दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथाच्या पारायण सेवेने भक्तांना त्यायोगे फलप्राप्ती होतच असते. श्रीगुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे. तर ती अशी (१) त्रिपदा गायत्रीमंत्राचे पठण (१०८ मण्यांची माळ किंवा त्यापर्यंत जप) करावे, तसेच गुरुचरित्र वाचावे. त्रिपदा गायत्रीमंत्र असा,

‘ॐ भू:ॐ भुव:ॐ स्व: मह:ॐ जन ॐतप: ॐसत्यम ॥१॥
ॐ तत्सवितुर्व रेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियोयोन: प्रचोदयात ॐ ॥२॥,
ॐ आपोज्योती रसोमृतम ब्रह्मभूर्भव: स्वरौम ॐ विष्णवे नम: ॥३॥

मनोकामना तर पूर्ण होताच पण दत्तदर्शन घडून व्यक्ती वा वास्तू यांतील बाधाही नाहीशी होते. दर्शन कसे घडते? तर सप्ताह काळात वा सप्ताहाचे शेवटी, तसेच ग्रंथ पठण-श्रवण-लेखन याद्वारेही पारायण पूर्ण झाले की, बहुधा नैवेद्याचे वेळी किंवा समाप्ती समयी दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात. चाहूल वा सुगंध या स्वरूपातही त्यांचे अस्तित्त्व (उपस्थित) कळून येते. त्यामुळे आपण मन-बुद्धी-शरीर यासहित अपार श्रद्धेने व उत्कट भावाने त्यांचे ध्यान-अनुसंधान करावे. तसेच बाधानिरसनही होते. ग्रंथकाराने म्हटले आहे की,
जे जे जन भक्ती करिती । त्यासी येईल आमुची प्रचिती । मन कामना पावती त्वरिती । निश्र्चयवाक्य असे आमुचे । ऐसेसप्ताह अनुष्ठान । करिता होय श्रीगुरुदर्शन । भूतपप्रेतादि बाधा निरसन । होवोनि सौख्य होतसे ॥

ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले अहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे

दत्त भगवान संपूर्ण माहिती

सप्ताह पद्धती

१ ला दिवस :- १ ते ९ अध्याय
२ रा दिवस :- १० ते २१ अध्याय
३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय
४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय
५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय
६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय
७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय

श्री गुरुचरित्र पारायण असे करावे.

श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला अहे. ईसवी सनाच्या १४व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अदभूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला.

श्री गुरूंच्या चारीत्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलाला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून अल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले अहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र -वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरु चरित्र कार म्हणतात.

“अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।”

अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्मा ग्रंथाचे वाचन करावे वैविध्य पूर्ण अशा संकल्प पूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते , असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे अहेत.

अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम

वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे.वाचनासाठी नेहमी पूर्वा भिमुख वा उत्तरा भिमुखच बसावे.वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्मात बदल होऊ देऊ नये.श्रीदत्तात्रायांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे.सप्ताहकालात ब्र्म्ह्चर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत पणाने व सोवळ्या नेच करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.)रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव अहे.वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती

★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
★अध्याय ४:- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
★अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
★अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
★अध्याय ८:- बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
★अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
★अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
★अध्याय ११:- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.
★अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
★अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
★अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
★अध्याय १५:- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
★अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
★अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
★अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
★अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.
★अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
★अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .
★अध्याय २२:- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
★अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
★अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
★अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
★अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
★अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
★अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
★अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
★अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
★अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
★अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
★अध्याय ३३:- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
★अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
★अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
★अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
★अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
★अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
★अध्याय ३९:- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
★अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
★अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
★अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
★अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
★अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
★अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
★अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
★अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
★अध्याय ४८:- गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
★अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
★अध्याय ५०:- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
★अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
★अध्याय ५२ :- श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

भक्ती, मुक्ती परमार्थ । जे जे वांछि मनी आर्त ।। त्वरित होय साद्यंत । गुरुचरित्र ऐकता ।।

दत्तभक्तीची पुण्याई…!

दत्तात्रेय हे उपास्य दैवत असणे ही भाग्याची गोष्ट आहे, मात्र त्यांच्या पूजनात पावित्र्याचे पालन हि गोष्ट अत्यावश्यक ठरते. त्या पालनात काही त्रुटी राहिल्यास दंड ठरलेलाच. त्यात काही सूट नाही, पण ह्या पावित्र्याच्या कक्षा रुंदावत जर तुम्ही ह्या उपासनेत यशस्वी झालात तर मात्र तुमच्या एवढा भाग्यवान कोणी नाही.

उपास्य दैवत असणं म्हणजे तुम्हाला दत्त महाराज प्रिय असणं आणि ह्या उपासनेत यशस्वी होणं म्हणजे दत्त महाराजांना तुम्ही प्रिय होणं हा फरक आहे.

दत्त महाराजांची काय प्रतिज्ञा आहे ? माझा जो भक्त आहे त्याचा उद्धार मी करणारच, सत्यसंध म्हटलं आहे त्यांना. नाना रुपधर असे ते आहेत. कधी कोणत्या रूपात तुम्हाला सामोरे येतील ते कळणारही नाही, पण भेट देऊन जातील हे निश्चित.

भक्तांसाठी अत्यंत कनवाळू आणि अभक्तांसाठी कठोर असे ते आहेत. इतक सगळं असताना दत्त भक्तांची संख्या फार मर्यादित दिसते याचे काय कारण असावे ? तर दत्तभक्तीचे दुर्लभत्व, म्हणून आपण सगळे पाहत असतो की बऱ्याच मंडळींना सांगून सुद्धा दत्त दत्त म्हणावेसे वाटत नाही. हे योग प्रारब्धात असावे लागतात. अनंत जन्मांची पुण्याई असली तरच दत्त भक्ती वाट्याला येते अन्यथा नाही.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

दत्त भगवान संपूर्ण माहिती

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading