आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

1. दत्त जन्माचे अभंग, दत्त नाम महिमा अभंग
दत्तनाममहिमा
दत्तनाममहिमा – अभंग १००८ ते १०५५
१००८धरी अवतार विश्व तारावया१००८
धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनूसुया गरोदर ॥१॥
ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनी पूर्णतिथी ॥२॥
तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सवकाळ ॥३॥
एका जनार्दनी पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारले ॥४॥
१००९अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी१००९
अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनिया ॥१॥
पीतांबर पदरे पुशिला घननीळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥
निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी । प्रेमाचे आवडी सेवी माय ॥३॥
एका जनार्दनी दत्त पाळण्यात घातिला । हालविती त्याला अनुसुया ॥४॥
१०१०जो जो जो जो रे निज आया१०१०
जो जो जो जो रे निज आया । हालविती अनुसुया ॥धृ. ॥
पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी ।
दोरी प्रेमाची लाउनी । शांती गाती गाणी ॥१॥
करिता उप्तत्ति शिणलासी । विश्रांति आलासी ।
निज रे ब्रह्माया तपलासी । कमळोद्भव जालासी ॥२॥
लक्ष्मीपति निज हो घनःश्यामा । सांडोनि वकुंठधामा ।
प्रतिपाळ करी हो जीव नामा । दर्शन दिले आम्हा ॥३॥
पार्वतीरमण शिवा निज आता । संहारक जीवजंता ।
निजरुप निगमा हो आदिनाथा । एका जनार्दनी दाता ॥४॥
१०११दत्त वसे औदुंबरी१०११
दत्त वसे औदुंबरी । त्रिशुळ डमरु जटाधारी ॥१॥
कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥
गोदातीरी नित्य वस्ती । अंगी चर्चिली तिभुती ॥३॥
काखेमाजी शोभे झोळी । अर्धचंद्रं वसे भाळी ॥४॥
एका जनार्दनी दत्त । रात्रंदिनी आठवित ॥५॥
१०१२दत्त माझा दीनानाथ१०१२
दत्त माझा दीनानाथ । भक्तालागी उभा सतत ॥१॥
त्रिशुळ घेऊनिया करी । उभा असे भक्ताद्वारी ॥२॥
भाळी चर्चिली विभुती । रुद्राक्षाची माळ कंठी ॥३॥
जवळी असे कामधेनु । तिचा महिमा काय वानुं ॥४॥
एका जनार्दनी दत्त । रुप राहिले हृदयात ॥५॥
१०१३हाती कमंडलु दंड१०१३
हाती कमंडलु दंड । दत्तमुर्ति ती अखंड ॥१॥
ध्यान लागो माझे मना । विनवितो गुरुराणा ॥२॥
अंगी चर्चिली विभुती । हृदयी वसे क्षमा शांती ॥३॥
तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥
एका जनार्दनी दत्त । तद्रुप हे झाले चित्त ॥५॥
१०१४आयुष्य जाय माझे व्यर्थ१०१४
आयुष्य जाय माझे व्यर्थ । दत्त समर्थ महाराज ॥१॥
धाव धाव लवकरी । करुणा करी गुरूराया ॥२॥
मी तव अनाथ अपराधी । हीनबुद्धि स्वामीया ॥३॥
काळ घाला पडिलावरी । धाव श्रीहरी लवलाह्मा ॥४॥
दत्ता पतित पावना । शरण एका जनार्दना ॥५॥
१०१५धावे पावे दत्तराजा१०१५
धावे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया ॥१॥
अनाथासी संभाळावे । ब्रीद पाळावे आपुले ॥२॥
तुजविण सोडविता । नाही त्राता दुसरा ॥३॥
महादोषी पतितालागी । करा वेगी उद्धार ॥४॥
एका जनार्दनी दत्ता । अवधुता माया बापा ॥५॥
१०१६दत्त माझी माता दत्त माझा पिता१०१६
दत्त माझी माता दत्त माझा पिता ।
बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥
दत्त माझा गुरु दत्त माझा तारु ।
मजशी आधारु दत्तराज ॥२॥
दत्त माझे जन दत्त माझे मन ।
सोइरा सज्जन दत्त माझा ॥३॥
एका जनार्दनी दत्त हा विसावा ।
न विचारित गावा जावे त्याच्या ॥४॥
१०१७वेधोनि गेले माझे मन१०१७
वेधोनि गेले माझे मन । हारपले दुजेंपण ॥१॥
ऐसी ब्रह्मामूर्ति दत्त । वोतलीसे आनंदभरीत ॥२॥
तयाविण ठाव । रिता कोठे आहे वाव ॥३॥
एका जनार्दनी भरला । सबाह्म अभ्यंतर व्यापिला ॥४॥
१०१८ऐसी जगाची माऊली१०१८
ऐसी जगाची माऊली । दत्तनामे व्यापुनि ठेली ॥१॥
जीवे जिकडे तिकडे दत्त । ऐशी जया मति होत ॥२॥
तया सांकडेंचि नाही । दत्त उभा सर्वा ठायी ॥३॥
घात अघात निवारी । भक्ता बाहे धरी करी ॥४॥
ऐशी कृपाळु माऊली । एका जनार्दनी देखिली ॥५॥
१०१९लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा१०१९
लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा ।
देखिलासे डोळा दत्तराव ॥१॥
चरणी घातली मिठी प्रेम दुनावे पोटी ।
पाहता हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥
मन माझे वेधले परिपुर्ण भरले ।
एका जनार्दनी सांठविले हृदयी दत्त ॥३॥
१०१९लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा१०१९
लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा ।
देखिलासे डोळा दत्तराव ॥१॥
चरणी घातली मिठी प्रेम दुणावे पोटी ।
पाहता हारपली दृष्टी दुजेपणा ॥२॥
मन माझे वेधले परिपुर्ण भरले ।
एका जनार्दनी सांठविले हृदयी दत्त ॥३॥
१०२०दत्त माझी माय१०२०
दत्त माझी माय । आम्हा अनाथांची गाय ॥१॥
प्रेमपान्हा पाजी वेगी । गुरुमाउली आम्हालागी ॥२॥
आम्हा प्रीतीची साउली । श्रीगुरु दत्तराज माउली ॥३॥
आमची जीवींची जीवलगी । आम्हालागी घे वोसंगी ॥४॥
एका जनार्दनी । दत्तराज मायबहिणी ॥५॥
१०२१दत्त माझी माय१०२१
दत्त माझी माय । आम्हा सुखा उणे काय ॥१॥
नित्य प्रीति दत्तनामी । दत्त वसे गृहरामी ॥२॥
दत्ताविण नसे दुजे । दत्त मायबाप माझे ॥३॥
दत्तात्रय दत्तात्रय । नाही कळिकाळाचे भय ॥४॥
एका जनार्दनी दत्त । नित्य देख हृदयात ॥५॥
१०२२आमुचे कुळींचे दैवत१०२२
आमुचे कुळींचे दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥
तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥
हेचि आमुचे व्रत तप । मुखी दत्तनाम जप ॥३॥
तयाविण हे सुटिका । नाही नाही आम्हा देखा ॥४॥
एका शरण जनार्दनी । दत्त वसे तनमनी ॥५॥
१०२३माझी माता दत्तगुरु१०२३
माझी माता दत्तगुरु । मज तिचाचि आधारु ॥१॥
तियेविण मजलागी । कोण रक्षील सर्वांगी ॥२॥
दत्त माझा आधार । त्यासी चिंती वारंवार ॥३॥
निर्विकार निरंजन । स्वामी माझा दत्त जाण ॥४॥
एका जनार्दनी दत्त । नित्य देखे ध्याना आत ॥५॥
१०२४आत्मज्ञाने बिंबले हृदयीं१०२४
आत्मज्ञाने बिंबले हृदयी । दत्त वोळखिला ठायी ॥१॥
पारिखेपणा दुर केला । अवघा दत्तचि गमला ॥२॥
नामे पवन चराचरे । ते दत्तनाम दोन अक्षरे ॥३॥
एका जनार्दनी छंद । दत्तनामे लागला वेधु ॥४॥
१०२५श्रीगुरुकृपे दत्त वोळखिला१०२५
श्रीगुरुकृपे दत्त वोळखिला । हृदय डोल्हार्यावरी बैसविला ।
अभेद पुर्ण चांदवा तेथे दिला । शुद्ध भक्तीने दत्त पुजियेला ॥१॥
दत्तचरणी मज लागलीसे गोडी । भवभयाची तुटोनी गेली बेडी ॥धृ. ॥
सोहं गुढी तेथे उभारिली । मंत्र उपदेशे देहबुद्धी गेली ।
पुर्ण निवृत्ति प्रवृत्तिहि धाली । सहज पुर्णनंद पूर्णता जाली ॥२॥
जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी । बोलावयाची राहिली शिराणी ।
जनी वनी एकात्मता खाणी । एका जनार्दनी रंगलीसे वाणी ॥३॥
१०२६स्वानंदे आवडी दत्त पाहुं गेलो डोळां१०२६
स्वानंदे आवडी दत्त पाहुं गेलो डोळा । तव चराचर अवघे श्रीदत्तची लीला ॥१॥
विस्मयो दाटला आता पाहुं मी कैसे । देखता देखणे अवघे दत्तचि दिसे ॥२॥
असे आणि नसे हा तव विकल्प जनांत । जनी जनार्दन निजरुपे दत्त ॥३॥
एका जनार्दनी तेथे अद्वय नित्य । सबाह्म अभ्यंतरी दत्त नांदत ॥४॥
१०२७मनासी स्थिरता नामे दत्त१०२७
मनासी स्थिरता नामे दत्त वेध । दुजा नाही छंद आणीक काही ॥१॥
म्हणोनि संकल्प दृढ झाला पायी । दत्तावाचुनी ठायी नोहे काही ॥२॥
पाहता पाहणे परतले मन । पाहण्याचे विंदान विसरले ॥३॥
एका जनार्दनी परब्रह्मा पुतळा । दत्त देखिला डोळा आत्मदृष्टी ॥४॥
१०२८माझिया मनींचा फिटलासे बिहो१०२८
माझिया मनींचा फिटलासे बिहो । पाहुनिया देवो दत्तराव ॥१॥
फिटला संकल्प तुटली वासना । आन नाही कल्पना दुजी काही ॥२॥
एका जनार्दनी दत्त वेगळा जाण । नोहे माझा प्राण क्षणभरी ॥३॥
१०२९त्रिगुणात्मक त्रिमूर्ति वेगळा१०२९
त्रिगुणात्मक त्रिमूर्ति वेगळा ।
पाहे तो सांवळा दत्तरावो ॥१॥
मन माझे वेधले दत्ताचे चरणी ।
नाही आन मनी दुजा छंद ॥२॥
परात्पर पहावा हृदयी तैसा ध्यावा ।
एका जनार्दनी सांठवावा दत्त मनी ॥३॥
१०३०माझी दत्त माऊली१०३०
माझी दत्त माऊली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥
कुर्वाळुनी लावी स्तनी । नोहे निष्ठुर क्रोध नाही मनी ॥२॥
भक्तांसी न विसंबे । सदा वाट पाहे बिंबे ॥३॥
एका जनार्दनी निश्चित । दत्तनामे पावन पतीत ॥४॥
१०३१एकाएकी एकला काशीवासा गेला१०३१
एकाएकी एकला काशीवासा गेला ।
स्वलीला श्रीदत्त स्वये प्रगटला ॥१॥
दत्त देव आला दत्त देव आला ।
स्वभाव सांडोनी भेटावया चला ॥२॥
मुक्त मंडपामाझारी निजनाम नगरी ।
दत्त प्रगटला कीर्तनामाझारी ॥३॥
भेटणे भेटी उठी दत्ता आली भेटी ।
सांगणे ऐकणे दत्त होऊनि उठी ॥४॥
कीर्तनी आतौता नाम श्रीदत्त दत्ता ।
निजकीर्ति ऐकोनि डोळे तत्त्वता ॥५॥
जळा सबाह्म आंतरी मनकर्णिका तीरी ।
दत्त स्नान करी आत्ममुद्रेवरी ॥६॥
दत्त जंगमी स्थावरी विश्वी विश्व धरी ।
तोचि दत्त घरोघरी नित्य भिक्षा करी ॥७॥
एका जनार्दनी दत्तवचने देख ।
प्रपंच परमार्थ मीच चालवी एक ॥८॥
१०३२दुर्लभ नरदेह पावला१०३२
दुर्लभ नरदेह पावला । प्राणी देवासी विसरला ॥१॥
सुख मानिले संसारी । जाऊनि पडीला अघोरी ॥२॥
संसारसिंधुसी तारक । स्वामी दत्तराज एक ॥३॥
त्याचे नाम आठविता । चुकली भवार्णवाची वार्ता ॥४॥
एका जनार्दनी दत्त । भवसिंधु तारक समर्थ ॥५॥
१०३३परमर्थी राखिता भावो नवल नव्हे पहाहो१०३३
परमर्थी राखिता भावो नवल नव्हे पहाहो ।
भक्त परिग्रहो चालवी दत्तदेवो ॥१॥
कृपाळु श्रीदत्त कृपाळु श्रीदत्त ।
अहर्निशी स्वये पाळिती निजभक्त ॥२॥
वत्सालागी जैसी व्याली धेणु धावे ।
निजभक्तांकारणे दता तैसा पावे ॥३॥
भक्त कीर्तने तोषला दत्त संतोषला ।
हरिजागरी स्वये सिद्ध प्रगटला ॥४॥
निजात्मास्थिति लीला मनी सुमनमाळा ।
एका जनार्दनी दत्त घाली गळा ॥५॥
१०३४लागूनिया पाया जना विनवीत१०३४
लागूनिया पाया जना विनवीत । मुखी बोला दत्त वारंवार ॥१॥
तेणे तुम्हा सुख होईल अपार । दत्त दयासागर आठवावा ॥२॥
स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा । तेणे तु अघोरा पावशील ॥३॥
एका जनार्दनी चित्ती दत्तपाया । दत्तरुप काया झाली त्याची ॥४॥
१०३५वेळोवेळा सांग जना । १०३५
वेळोवेळा सांग जना । मागे दाना सर्वासी ॥१॥
मंगल श्रीदत्तराज । स्मरा गुरुराज समर्थ ॥२॥
आयुष्य जाय पळ पळ । करा बळ चिंतना ॥३॥
एका जनार्दनी लोका । विसरुं नका सांगतो ॥४॥
१०३६वाचे बोला दत्त दत्त१०३६
वाचे बोला दत्त दत्त । होय सकळ परमार्थ ॥१॥
दत्तरुपी लागता दृष्टी । दत्तरुप अवघी सृष्टी ॥२॥
दत्तकथा वसे कानी । दत्तमुर्ति ध्यानी मनी ॥३॥
दत्तालागी आलिंगना । कर समर्थ हे जाणा ॥४॥
एका जनार्दनी दत्त । सदा वसे हृदयात ॥५॥
१०३७धन्य धन्य तेचि नर१०३७
धन्य धन्य तेचि नर । दत्तनामी जे तत्पर ॥१॥
त्याचे होता दरुशन । पतित होताती पावन ॥२॥
तयालागी शरण जावे । काया वाचा आणि जीवे ॥३॥
शरण एका जनार्दनी । त्याचे पाय आठवी मनी ॥४॥
१०३८उदार दयाळ गुरुदत्त१०३८
उदार दयाळ गुरुदत्त । पुरवी हेत भक्तांचा ॥१॥
त्याचे चरणी लीन व्हावे । शुद्धभावे करुनी ॥२॥
मुखी स्मरा गुरुदत्ता । नाही दाता दुसरा ॥३॥
पायी करा तीर्थयात्रा । गुरुसमर्था भजावे ॥४॥
म्हणे एका जनार्दनी । जनी वनी दत्त हा ॥५॥
१०३९कलियुगी तारक१०३९
कलियुगी तारक । स्वामी दत्तराज एक ॥१॥
त्याचे नाम नित्य गावे । भवसिंधुसि तरावे ॥२॥
दत्तमूर्ति हृदयी ध्याता । पावे मोक्ष सायुज्यता ॥३॥
दत्त वसे जया मनी । तया दत्त जनी वनी ॥४॥
एका जनार्दनी दत्त । सबाह्म स्वानंदभरित ॥५॥
१०४०त्रिगुणाविरहित नाम दत्तात्रेय१०४०
त्रिगुणाविरहित नाम दत्तात्रेय । गाता वदतांह होय आनंद चित्ता ॥१॥
पालटेल मन संसारभावना । अंती ते चरणा भेटी होय ॥२॥
योगयाग कसवटी वाउगी रहाटी । दत्त म्हणता होटी सव जोडे ॥३॥
एका जनार्दनी वदता दत्त वाचे । अनंत यागांचे पुण्य जोडे ॥४॥
१०४१आठविता दत्तात्रय१०४१
आठविता दत्तात्रय । नासताती तापत्रय ॥१॥
प्राप्त होय ऋद्धिसिद्धि । दत्तनामे ती समाधी ॥२॥
योगयागादि साधन । गुरुभक्त पावे जाण ॥३॥
विवेक वैराग्य शमादी । हस्ती व्यसे निष्कर्मसिद्धि ॥४॥
एका जनार्दनी दत्त । सदा हृदयी तिष्ठत ॥५॥
१०४२दत्तात्रेय नाम । नित्य१०४२
दत्तात्रेय नाम । नित्य जपे जो निष्कामा ॥१॥
तया नाही द्वैतभाव । दृष्टी दिसे गुरुराव ॥२॥
दत्ताविण नसे स्थान । दत्तरुप जन वन ॥३॥
ध्यानी मनी दत्तराज । दत्तविण नाही काज ॥४॥
एका जनार्दनी जपा । दत्तनाम मंत्र सोपा ॥५॥
१०४३दत्त ध्यावा दत्त गावा१०४३
दत्त ध्यावा दत्त गावा । दत्त आमुचा विसावा ॥१॥
दत्त अंतर्बाह्म आहे । दत्तविण काही नोहे ॥२॥
दत्त जनी दत्त वनी । दत्तरुप हे अवनी ॥३॥
दत्तरुपी लीन वृत्ती । एका जनार्दनी विश्रांती ॥४॥
१०४४खुंटलासे शब्द बोलता आनंद१०४४
खुंटलासे शब्द बोलता आनंद । सर्व बह्मानंद कोंदाटला ॥१॥
ते हे दत्तनाम आवडी आदरे । उच्चारी सोपारे सर्वकाळ ॥२॥
कलिमाजी सोपे दत्तनाम घेता । संसाराची वार्ता उरी नुरे ॥३॥
एका जनार्दनी लागलासे छंद । दत्तनामे आनंद सर्वकाळ ॥४॥
१०४५दत्त देता आलिंगन१०४५
दत्त देता आलिंगन । कैसे होताहे अभिन्न ॥१॥
स्वलीला स्वरुपता । तिन्ही दावी अभिन्नता ॥२॥
लाघवी श्रीदत्त । देवभक्त आपणचि होत ॥३॥
मीचि जनार्दन मीचि एका । दत्तस्वरुपी मीच मी देखा ॥४॥
एका जनार्दनी दत्त पुढे मागे । सगुन निर्गुण रुपे लागला संगे ॥५॥
१०४६दत्त नामाचा उच्चार१०४६
दत्त नामाचा उच्चार । मुखी वास निरंतर ॥१॥
तयापाशी शांति क्षमा । प्राप्त होय निजधामा ॥२॥
सर्व सुखे तयापाशी । ऋद्धिसिद्धि त्याच्या दासी ॥३॥
भुक्ति मुक्ति लोटांगणी । लागताती त्या चरनी ॥४॥
म्हणे एका जनार्दनी । मना लागलेसे ध्यान ॥५॥
१०४७दत्त दत्त म्हणता वाचे१०४७
दत्त दत्त म्हणता वाचे । तेणे सार्थक जन्मांचे ॥१॥
मने चितावा श्रीदत्त । अंतर्बाह्म पूर्ण भरित ॥२॥
दत्तरुप पाहे डोळा । तेणे भय कळिकाळा ॥३॥
एका जनार्दनी जपा । मंत्र द्वयाक्षरी हा सोपा ॥४॥
१०४८सर्व पर्वकाळ दत्त वदता वाचे१०४८
सर्व पर्वकाळ दत्त वदता वाचे । आणिक सायासाचे मुळ खुंटे ॥१॥
म्हणा दत्त दत्त म्हणा दत्त दत्त । म्हणा दत्त दत्त वेळोवेळा ॥२॥
काळ वेळ काही न लगे तत्त्वता । नाम उच्चिरिता दरुशनं ॥३॥
भोळ्या भावीकासी जप मंत्रावळी । दत्तनाम माउली सोपा जप ॥४॥
एका जनार्दनी नामाचा प्रताप । निवारे भवताप दरुशने ॥५॥
१०४९म्हणता दत्त दत्त१०४९
म्हणता दत्त दत्त । दत्त करी गुणातीत ॥१॥
दत्तनामाचा निजंछंद । नामे प्रगटे परमानंद ॥२॥
निज भाव समर्थ । जेथे नाम तेथे दत्त ॥३॥
एका जनार्दन दत्त । दत्त करी देहातीत ॥४॥
१०५०प्राणियासी मंत्र सोपा१०५०
प्राणियासी मंत्र सोपा । दत्त दत्त वाचे जपा ॥१॥
आणीक लगे साधन । दत्तनामे घडे ज्ञान ॥२॥
न लगे योगयाग पाही । दत्तावांचुन नेणे काही ॥३॥
एका जनार्दनी वेधले मन । मनचि जाले उन्मन ॥४॥
१०५१दत्त दत्त म्हणे वाचे१०५१
दत्त दत्त म्हणे वाचे । काळ पाय वंदी त्याचे ॥१॥
दत्तचरणी ठेवी वृत्ती । होय वृत्तीची निवृत्ती ॥२॥
दत्तरुप पाहे डोळा । वंद्य होय कळिकाळा ॥३॥
एका जनार्दनी दत्त । हृदयी वसे सदोदित ॥४॥
१०५२श्रीदत्त ऐसी ज्याची वाचा पढे१०५२
श्रीदत्त ऐसी ज्याची वाचा पढे । पोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऐसी प्रचीत पहा देही । व्यापुनी असे देही विदेही ॥२॥
एका जनार्दनी दत्त । सबाह्म आनंदभरीत ॥३॥
१०५३दत्त दत्त वदता वाचे१०५३
दत्त दत्त वदता वाचे । होय जन्माचे सार्थक ॥१॥
ऐसा जया नामी वेधु । परमानंदु हृदयी ॥२॥
दत्त आलिंगनी समाधान । तेणे नासे मीतूपण ॥३॥
एका जनार्दनी वेधु । दत्तनामे लागला छंदु ॥४॥
१०५४दत्तात्रय नाम ज्याचे नित्य मुखीं१०५४
दत्तात्रय नाम ज्याचे नित्य मुखी । तया समसुखी नाही दुजा ॥१॥
भावे दत्त दत्त म्हणतसे वाचे । कळिकाळ त्याचे पाय वंदी ॥२॥
दत्ताचे पै रुप ज्याचे वसे नेत्री । आहिक्य परत्री तोचि सुखी ॥३॥
गुरु दत्ताराया देई आलिंगन । तयासी वंदन करिती सर्व ॥४॥
दत्तरायाची जे करिताती यात्रा । त्याचेनी पवित्र होते तीर्थ ॥५॥
ज्याचे चित्ती वसे गुरुदत्त ध्यान । त्याचेनि पावन तिन्ही लोक ॥६॥
दत्तालागी अपी तन मन धन । परब्रह्मा पुर्ण तोचि झाला ॥७॥
दत्तचरण तीर्थ जो का नित्य सेवी । उगवितो गोवी प्रपंचाची ॥८॥
दत्तावरुनिया कुरवंडी काया । तयाचिया पाया मोक्ष लागे ॥९॥
एका जनार्दनी मुखी दत्तनाम । हरे भवश्रम क्षणामाजी ॥१०॥
१०५५आर्ते आरती दत्त वोवाळू जातां१०५५
आर्ते आरती दत्त वोवाळू जाता । आरतीचे हरण दत्ते केले तत्त्वता ॥१॥
आरती खुंटली आता वोवाळू कैसे । तरी निजभजने निरंजन होतसे ॥२॥
आरतीचे आर्त पुरवी श्रीदत्त । एका जनार्दनी सहज वोवाळीत ॥३॥



