115.छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रमुख १५१ घटना -कालपट

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

Chronicle of Chhatrapati Shri Shivaji Maharaj’s life

छत्रपती वर्ष (कालखंड) शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील् प्रमुख घटना, आयुष्याचा कालपट मराठ्यांचे विरवैभव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्व काही एकाच वेबसाईटवर चरित्र ,गड वा किल्ले, कादंबरी, आरती, पोवाडे, महत्वाची माहिती. 96-कुळी-मराठा https://96kulimaratha.com/ हि-वेबसाईट-पहा

The glory of Marathas Everything about Chhatrapati Shivaji Maharaj in one website Biography, Forts, Novels, Aarti, Powade, Important information. 96-Kuli-Maratha https://96kulimaratha.com/ see-this-website

छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा काल पट

 छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा कालपट
 वर्ष (कालखंड) शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील् प्रमुख घटना
१९- फेब्रुवारी-१६३०छत्रपति शिवाजी महाराजांचा जन्म
१९- फेब्रुवारी-१६३० ते ३१-१२-१६३६,शिवनेरी व बालपण (सहा वर्ष)
०१-जानेवारी-१६३७ ते २८-फेब्रुवारी-१६४१,कसबे खेड बापूजी मुद्गल नहेकर यांच्या वाड्यात वास्तव्य
०१-मार्च-१६४१ ते २८- फेब्रुवारी-१६४२,बंगरूळ (कर्नाटक)
०१-मार्च-१६४२ ते ३१-मार्च-१६४७,पुणे व खेडे बारे
१६४५छ- शिवाजी महाराजांनी हिन्दवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली-
०७-मार्च-१६४७दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू झाला
०१-एप्रिल-१६४७ ते ३१-०५-१६४९,खेडेबारे कोंढवा व पुणे- छ- शिवाजी महाराज तोरणा किल्ला घेतात
०९-ऑक्टोबर-१६४८छ- शिवाजी महाराज पुरंदरचा किल्ला घेतात
११-एप्रिल-१६४९ छ-शिवाजी महाराज -स्वामी समर्थ भेट
०१-जून-१६४९ ते ३१-डिसेंबर-१६५४,पुणे व चाकण
०१-जानेवारी-१६५५ ते ३१-डिसेंबर-१६५५,पुणे व पुरंदर
०१-जानेवारी-१६५६ ते १५-सप्टेंबर-१६५६,जावळी रायरी
१५-जानेवारी-१६५६ छ-शिवाजी महाराज जावळी घेतात
६ एप्रिल १६५६रायगड सर- प्रतापगड बान्धला
मे १६५६प्रबळगड घेतला
१६-सप्टेंबर-१६५६ ते ०७-ऑक्टोबर-१६५६,सुपे घेतले
०८-ऑक्टोबर-१६५६ ते २८- फेब्रुवारी-१६५७,पुरंदर- सकवारबाई गायकवाडांशी याच काळात लग्न
०१-मार्च-१६५७ ते ३१-मार्च-१६५७,पुणे
०१-एप्रिल-१६५७ ते १५-मे-१६५७,पुणे पुरंदर
१४-मे-१६५७छ- संभाजी राजे महाराजांचा जन्म
१६-मे-१६५७ ते ३०-०६-१६५७,नौसीरखानाशी युद्ध व जुन्‍नरची लूट
०१-जुलै-१६५७ ते ३०-सप्टेंबर-१६५७,पुरंदर
०१-ऑक्टोबर-१६५७ ते १३-जानेवारी-१६५८,छ- शिवाजी महाराज कल्याण भिवंडी बाजूस गड पहाण्यास गेले
१४-जानेवारी-१६५८ ते ३०-सप्टेंबर-१६५८,प्रथम राजगड व नंतर पुरंदरवर वास्तव्य
०१-ऑक्टोबर-१६५८ ते ३१-डिसेंबर-१६५८,छ- शिवाजी महाराज कर्नाटकला मसलतीस गेले
०१-जानेवारी-१६५९ ते ०९-मार्च-१६५९,छ- शिवाजी महाराजांचे राजगडावर वास्तव्य
१०-मार्च-१६५९ ते ०९-जुलै-१६५९,शिवापट्ट्ण व राजगड
१०-जुलै-१६५९ ते ३१-ऑगस्ट-१६५९,जावळीस वास्तव्य सईबाईचा यावेळी मृत्यू
०१-सप्टेंबर-१६५९ ते १७-सप्टेंबर-१६५९,छ- शिवाजी महाराज राजगडास असावेत
१८-सप्टेंबर-१६५९ ते १०-नोव्हेंबर-१६५९,प्रतापगडास वास्तव्य-
१०-नोव्हेंबर-१६५९अफजलखानाचा वध
११-नोव्हेंबर-१६५९ ते ०१-मार्च-१६६०,पन्हाळा घेतला व विजापूरच्या बाजूस लूट
०२-मार्च-१६६०-ते १३-जुलै-१६६०,पन्हाळगडच्या सिद्दी जौहरच्या वेढ्यात
१४-जुलै-१६६० ते ३१-जुलै-१६६०,विशाळगडास पलायन- तेथून पुरंदर व नंतर राजगडास प्रयाण
०१-ऑगस्ट-१६६० ते १५-जानेवारी-१६६१,राजगडास वास्तव्य- शाहिस्तेखानाशी तहाची बोलणी
१६-जानेवारी-१६६१ ते ०५-जून-१६६१,शिवाजी महाराज कोकणच्या स्वारीवर- करतलब खानाशी युद्ध- दाभोळ प्रभावळी काबीज- राजापूर शृन्गारपुर घेऊन सन्गमेश्वर चिपळूणकडे गेले, महाड कल्याण भिवंडीला गेले व राजगडास परत
०६-जून-१६६१ ते ११-ऑक्टोबर-१६६१,राजगडावर वास्तव्य
१२-ऑक्टोबर-१६६१ ते ११-नोव्हेंबर-१६६१,श्रीवर्धनला वास्तव्य
१२-नोव्हेंबर-१६६१ ते ३१-जानेवारी-१६६२,राजगडास वास्तव्य
०१- फेब्रुवारी-१६६२ ते २८- फेब्रुवारी-१६६२,नामदार खानावर स्वारी व पेणवर हल्ला
०१-मार्च-१६६२ ते ३१-मार्च-१६६३,राजगडास वास्तव्य
०१-एप्रिल-१६६३ ते १२-एप्रिल-१६६३,शाहिस्तेखानावर हल्ला व सिन्हगडावर प्रयाण
१३-एप्रिल-१६६३ ते ३०-जून-१६६३,कुडाळ वेंगुर्ल्यावर स्वारी
०१-जुलै-१६६३ ते ३१-जुलै-१६६३,जावळी येथे मुक्काम
०१-ऑगस्ट-१६६३ ते ०५-डिसेंबर-१६६३,राजगडास वास्तव्य
०६-डिसेंबर-१६६३ ते ०४- फेब्रुवारी-१६६४,सुरतेच्या पहिल्या स्वारीवर त्या आधी कोकणात गेले
०५- फेब्रुवारी-१६६४ ते २९-मे-१६६४,राजगडास वास्तव्य
३०-मे-१६६४ ते ०६-जून-१६६४,सिन्हगड
०७-जून-१६६४ ते ३०-सप्टेंबर-१६६४,राजगडला वास्तव्य
०१-ऑक्टोबर-१६६४ ते ०७-डिसेंबर-१६६४,कुडाळला आगमन- बा़जी घोरपड्यास मारले- खवासखानाचा पराभव- खुदावन्तपूर लुटले- याच सुमारास सिन्धुदुर्ग व हर्णै किल्ले बान्धले
०८-डिसेंबर-१६६४ ते २५-डिसेंबर-१६६४,खानापुर व हुबळी ही शहरे लुटली
२६-डिसेंबर-१६६४ ते ३१-डिसेंबर-१६६४,राजगडावर वास्तव्य
०१-जानेवारी-१६६५ ते १५-जानेवारी-१६६५,महाबळेश्वरला वास्तव्य
१६-जानेवारी-१६६५ ते ३१-जानेवारी-१६६५,राजगडला वास्तव्य
०१- फेब्रुवारी-१६६५ ते २२-मार्च-१६६५,कोकणात जाऊन मग बसरूरच्या स्वारीवर-
०८- फेब्रुवारी-१६६५बसरूरवर स्वारी
२३-मार्च-१६६५ ते २५-मार्च-१६६५,पुरंदर ला वास्तव्य
२६-मार्च-१६६५ ते ०८-जून-१६६५,राजगडावर वास्तव्य
०९-जून-१६६५ ते १३-जून-१६६५,जावळिइस प्रयाण- जयसिंह व दिलेरखानाची भेट व पुरंदर चा तह
१४-जून-१६६५ ते ३१-ऑगस्ट-१६६५,राजगडावर वास्तव्य
०१-सप्टेंबर-१६६५ ते ३०-सप्टेंबर-१६६५,विजापुरला प्रयाण- फोंडा किल्ला घेण्यात अपयश
०१-ऑक्टोबर-१६६५ ते १५-नोव्हेंबर-१६६५,राजगड- जयसिंगाच्या मदतीस जाण्याची तयारी
१६-नोव्हेंबर-१६६५ ते १०-जानेवारी-१६६६,विजापूर घेण्यास शिवाजी ची मोगलास मदत
११-जानेवारी-१६६६ ते १६-जानेवारी-१६६६,पन्हाळ्यावरील अयशस्वी हल्ला
१७-जानेवारी-१६६६ ते ०४-मार्च-१६६६,राजगडावर वास्तव्य
०५-मार्च-१६६६ ते ११-सप्टेंबर-१६६६,आग्रा प्रकरण
०५-मार्च-१६६६शिवाजी महाराजांचे आग्र्यास प्रयाण
१२-मे-१६६६शिवाजी महाराज व औरंगजेब भेट
१९-ऑगस्ट-१६६६शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका
१२-सप्टेंबर-१६६६ ते १०-एप्रिल-१६६७, ९- फेब्रुवारी-१६६७पर्यंत राजगड नंतर सिन्धुदुर्ग्
११-एप्रिल-१६६७ ते १२-मे-१६६७,रान्गण्याचा वेढा शिवाजी महाराजांनी उठविला
१३-मे-१६६७ ते १५-जून-१६६७,मनोहरगडास वास्तव्य
१६-जून-१६६७ ते ३१-ऑक्टोबर-१६६७,राजगडास वास्तव्य
०१-नोव्हेंबर-१६६७ ते ३०-नोव्हेंबर-१६६७,कोकणात बारदेशची स्वारी
०१-डिसेंबर-१६६७ ते १५-ऑक्टोबर-१६६८,राजगडास वास्तव्य
१६-ऑक्टोबर-१६६८ ते ३०-नोव्हेंबर-१६६८,शिवाजी महाराज कोकणात- अष्टमी व राजापुरास मुक्काम- गुप्तपणे गोवे घेण्याचा अयशस्वी प्रयत्न
०१-डिसेंबर-१६६८ ते २०-ऑक्टोबर-१६६९,राजगडास वास्तव्य
२१-ऑक्टोबर-१६६९ ते ३१-ऑक्टोबर-१६६९,पेणच्या आसपास
०१-नोव्हेंबर-१६६९ ते ३१-जुलै-१६७०,राजगडास किल्यावर वास्तव्य-
२४- फेब्रुवारी-१६७०राजाराम महाराजान्चा जन्म-
०४- फेब्रुवारी-१६७०कोन्ढाणा सर केला- नंतर रायगडात
०१-ऑगस्ट-१६७० ते ०५-ऑगस्ट-१६७०,रायगडास वास्तव्य
०६-ऑगस्ट-१६७० ते ०४-सप्टेंबर-१६७०,जुन्‍नरला वेढा
०५-सप्टेंबर-१६७० ते २०-सप्टेंबर-१६७०,रायगडावर वास्तव्य
२१-सप्टेंबर-१६७० ते ०३-नोव्हेंबर-१६७०,सुरतेची दुसरी स्वारी
१७-ऑक्टोबर-१६७०दिंडोरीची लढाई
०४-नोव्हेंबर-१६७० ते २१-नोव्हेंबर-१६७०,नांगावला वास्तव्य
२२-नोव्हेंबर-१६७० ते २५-नोव्हेंबर-१६७०,रायगडावर वास्तव्य
२६-नोव्हेंबर-१६७० ते १५-जानेवारी-१६७१,खानदेश व बागलाणच्या स्वारीवर- कारंजे (विदर्भ) लुटले- अहिवंत रवळा जवळा किल्ले घेतले- सालेरीचा किल्ला घेतला
१६-जानेवारी-१६७१ ते ३१-१२-१६७१,रायगडास वास्तव्य
२६-जानेवारी-१६७१छ- संभाजी महाराजांकडे कारभार सोपविला
०१-जानेवारी-१६७२ ते २०-जानेवारी-१६७२,महाड येथे वास्तव्य- दिलेरखानाने चाकण व पुणे घेतल्याने शिवाजी महाराज कुडाळ वेन्गुर्ला भागातून सैन्य गोळा करीत होते
२१-जानेवारी-१६७२ ते ०८-मार्च-१६७३,रायगडास मुक्काम- उस्टिकने मे महिन्यात व अब्राहम् लेपेकरने जुलै महिन्यात शिवाजी महाराजांची भेट घेतली
०९-मार्च-१६७३ ते १५-एप्रिल-१६७३,पन्हाळ्यास वास्तव्य- १५ एप्रिल उमराणीची लढाई
१६-एप्रिल-१६७३ ते १९-मे-१६७३,रायगडास मुक्काम्
२०-मे-१६७३ ते ०२-जून-१६७३,तीर्थस्नानासाठी गेले
०३-जून-१६७३ ते ०९-ऑक्टोबर-१६७३,रायगडास वास्तव्य- ३ जून निकल्सची भेट
१०-ऑक्टोबर-१६७३ ते १५-ऑक्टोबर-१६७३,साताऱ्यास प्रयाण
१६-ऑक्टोबर-१६७३ ते १५-१२-१६७३,कानडा प्रदेशावर् स्वारी
१६-१२-१६७३ ते १४-एप्रिल-१६७४,रायगडास् वास्तव्य- ३ एप्रिल नारायण शेणव्याची भेट
१५-एप्रिल-१६७४ ते ११-मे-१६७४,चिपळूणला प्रयाण- २२ एप्रिल कारवारला प्रयाण
१२-मे-१६७४ ते १५-मे-१६७४,रायगडास वास्तव्य
१६-मे-१६७४ ते २०-मे-१६७४,प्रतापगडावर भवानी देवीच्या दर्शनास गेले
२१-मे-१६७४ ते ३०-सप्टेंबर-१६७४,रायगडावर वास्तव्य-
०६-जून-१६७४छ, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक-
१८-जून-१६७४जिजाबाईंचा मृत्यू
०१-ऑक्टोबर-१६७४ ते १५-ऑक्टोबर-१६७४,कल्याण व नंतर पाली येथे वास्तव्य
१६-ऑक्टोबर-१६७४ ते १५-१२-१६७४,२० व २५ आ-ऑक्टोंबरच्या दरम्यान सातारा बेळगाव बाजूस नंतर खानदेश व बागलाणवर स्वार्‍या- धरणगाव लुटले
१६-१२-१६७४ ते१४-मार्च-१६७५,रायगडास वास्तव्य
१५-मार्च-१६७५ ते ११-जून-१६७५,कोकणात राजापूर कुडाळ
 २२ व २३ मार्च इंग्रज व्यापार्‍यांची भेट- फोन्डा शिवेश्वर अन्कोला कारवार ही ठिकाणे घेतली
१२-जून-१६७५ ते ३०-नोव्हेंबर-१६७५,रायगडास वास्तव्य
७ व १२ जानेवारी १६७५आच्स्टिनची भेट
०१-१२-१६७५ ते २५-जानेवारी-१६७६,साताऱ्यास आजारी
२६-जानेवारी-१६७६ ते ०७- फेब्रुवारी-१६७६,कोकणात वास्तव्य
०८- फेब्रुवारी-१६७६ ते १५- फेब्रुवारी-१६७६,रायगडास वास्तव्य
१६- फेब्रुवारी-१६७६ ते २०-एप्रिल-१६७६,पन्हाळ्यास वास्तव्य
२१-एप्रिल-१६७६ ते ३०-सप्टेंबर-१६७६,रायगडावर वास्तव्य
०१-ऑक्टोबर-१६७६ ते ३०-नोव्हेंबर-१६७६,बेळगावच्या किल्ल्यास वेढा विजापूरकरांच्या मुलखात लुटालुट सातारा जिल्ह्यातील खटाव ठाणे व कोट घेतला वाईजवळचा मुलुख काबीज
०१-१२-१६७६ ते ३१-१२-१६७६,रायगडास मुक्काम
०१-जानेवारी-१६७७ ते १५-जानेवारी-१६७७,रायगडाहून बेळगावास प्रयाण
१६-जानेवारी-१६७७ ते २८- फेब्रुवारी-१६७७,भागानगरकडे
०१-मार्च-१६७७ ते ३१-मार्च-१६७७,भागानगरला मुक्काम
०१-एप्रिल-१६७७ ते ०३-एप्रिल-१६७८,कर्नाटकाची स्वारी
 १५ मे जिंजी काबीज- २३ मे वेरुळचा ___???वेषा-
 २५ जून शेरखान लोदीचा पराभव
 १२ जुलै शिवाजी व्यंकोजीभेट
०४-एप्रिल-१६७८ ते १०-मे-१६७८,विजापुरचा कब्जा घेण्यास निघाले मसौदने त्याचा ताबा घेतल्याचे समजल्याने पन्हाळ्यास परत
११-मे-१६७८ ते ०५-जून-१६७८,रायगडाला वास्तव्य
०६-जून-१६७८ ते १०-जून-१६७८,राजापुरास भेट
११-जून-१६७८ ते २८- फेब्रुवारी-१६७९,पन्हाळ्यास
०१-मार्च-१६७९ ते २२-मार्च-१६७९,विजापूरचा शाहपूरा लुटला
२३-मार्च-१६७९ ते ३१-मे-१६७९,पन्हाळ्यास वास्तव्य
०१-जून-१६७९ ते २३-ऑक्टोबर-१६७९,रायगडावर वास्तव्य
२४-ऑक्टोबर-१६७९ ते ३०-नोव्हेंबर-१६७९,विजापुरकरास मदत करण्यासाठी पन्हाळ्यास आले तेथून विजापूरकडे सेलगूरपर्यंत गेले नंतर मोगली मुलखातील जालना व इतर गावे लुटीत पट्टागडास आले
०१-१२-१६७९ ते १५- फेब्रुवारी-१६८०,पन्हाळ्यास मुक्काम सम्भाजीची भेट वाकेनवीस टिपणा प्रमाणे ३१ डिसेंबर ते ४ फेब्रुवारीपर्यंत शिवाजी महाराज सज्जनगडास होते
१६- फेब्रुवारी-१६८० ते ०२-एप्रिल-१६८०,रायगडास वास्तव्य- १४ मार्च राजाराम महाराजांचे लग्न-
०३-एप्रिल-१६८०,छ, शिवाजी महाराजांचा मृत्यू
 छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा काल पट

छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा काल पट


👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading