आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

सती सावित्री चरीत्र भाग ७, (३१ ते ३४)
आर्य द्युमत्सेनांचा आवेग ओसरल्यावर थोडे शांत होऊन सत्यवानाला हाताला धरुन जवळ बसवत म्हणाले, तु किती रुपवान व बलवान दिसत आहेस! पित्याला दृष्टी आलेली पाहुन सत्यवानाला अतिशय आश्चर्य वाटले. सावित्रीला सर्व ज्ञात असल्यामुळे हळुच गालात हसत होती
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! सती सावित्री चरित्र !!!
!! सावित्री !!
भाग – ३१.
आर्य द्युमत्सेनांचा आवेग ओसरल्यावर थोडे शांत होऊन सत्यवानाला हाताला धरुन जवळ बसवत म्हणाले, तु किती रुपवान व बलवान दिसत आहेस! पित्याला दृष्टी आलेली पाहुन सत्यवानाला अतिशय आश्चर्य वाटले. सावित्रीला सर्व ज्ञात असल्यामुळे हळुच गालात हसत होती.गौतमत्रृषींनी विचारले, तुम्ही दोघे सकाळी वनांत गेलात तर परतायला एवढा उशीर कां? सत्यवानाने त्याच्या बाबतीत घडलली घटना सांगीतल्यावर गौतममुनी सावित्रीला म्हणाले, सावित्री! तुला भूत भविष्याचे ज्ञान असल्याने व तेजाच्या योगाने साक्षात तु सावित्रीदेवताच आहेस. गुप्तता ठेवण्यासारखे काही नसेल तर काय घडले हे ऐकण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत, कारण आजच अचानक आर्य द्युमत्सेनला दृष्टी पण प्राप्त झाली..
यावर विनयाने सावित्री म्हणाली,”मुनिश्वरांनो! यांत लपवण्या सारखे कांहीच नाही. विवाहापुर्वीच देवर्षी नारदांनी माझ्या पतीच्या मृत्युची वार्ता सांगीतली होती. तो दिवस आजचाच होता. म्हणुनच मी व्रतस्थ राहुन सतत यांच्या सानिध्यात राहिली. हे ऐकताच त्रृषीवर्य आणि द्युमत्सेन सोडून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, मी हे मुद्दाम हेतुपुरस्पर सांगीतलं नाही, त्यामुळेच आपण सर्व गेल्या वर्षभर आनंद उपभोगु शकलो.
यानंतर प्रथमपासुन घडलेली घटना, सर्व वृतांत आणि यमराजांशी झालेला संवाद, त्यांनी दिलेले पांच ‘वर’ सर्व सविस्तरपणे कथन केले. आणि विश्वात घडलेल्या एका अघटीत घटनेचे वर्णन स्वतः सावित्री करत असल्याची नोंद इतिहास करीत होता. ती पुढे म्हणाली, सायंकाळपर्यंत यमधर्माशी संवाद आणि प्रवास चालु होता. मी केलेल्या सर्व व्रताचरण व तपस्येचे फळ प्राप्त होऊम मनोरथ पुर्ण झाले व शेवटी पतीदेवांना प्राणदान मिळाले. हे कथन करतांना तीच्यामधे किंचीतही आत्मगौरव, मीपणा अभिमान तर नव्हताच उलट यमधर्माचे महात्म्यच वर्णन करुन सांगीतले, शेवटी धर्मप्रेमी, कर्तव्यकठोर पण प्रेमळ यमराजाकडुन आशिर्वाद मिळवलाच! गौतममुनी म्हणाले! हे पतीव्रते! तु काहीतरी लपवित आहेस. हे साध्वी कथन कर! तेवढ्यात नारायण! नारायण! म्हणत प्रत्यक्ष देवर्षी नारदमुनींनी प्रवेश केला.
सावित्री सत्यवानाला आपल्या दोन्ही बाजुंना उभे करीत ते म्हणाले, ही स्वतःच्या मनाने कांहीच सांगणार नाही यमधर्माने सावित्रीची जी स्तुती केली, तिच्याबद्दल त्यांनी जे उद्गार काढले ते सर्व नारदांच्या तोंडुन ऐकुन सर्वजन परामावधीचे आनंदीत होऊन नकळत टाळ्यांचा गजर गगनाला भिडला.सर्वाचे च हात जोडल्या गेलेत, नारदांनी आशिर्वाद देऊन ते अंतर्धान झाले.
गौतमत्रृषी म्हणाले, हे पतिव्रते! तुझ्यासारख्या सुशील, व्रतपारायण, पवित्र आचरण असलेल्या कुलशीलवान वधूने येऊन राजा द्युमत्सेनाचे जे कुळ दुःखाने भरलेल्या डोहात बुडले होते त्या कुळाचा उध्दार केलास. हे भद्रे! तु सासर-माहेर दोन्ही कुळांचे कल्याण केलेस. धन्य आहेस तू!
गौतमांच्या आग्रहावरुन सर्वांनी अन्न ग्रहण करुन सावित्रीच्या व्रताची सांगता झाली. सर्वांच्या मुखी धन्य पतीव्रते! धन्य! धन्य! धन्य हेच शब्द होते. दुसर्या दिवशी सकाळीच सावित्रीने माफक व नेटका श्रृंगार करुन हर्षित मनाने देवाधरणा करुन आरती केली. तेवढ्यात सहपत्नि चारही त्रृषी प्रवेशले. सर्वांनी अल्पोहार करत सावित्रीवर स्तुतीसुमनांची उधळण सुरु असतांनाच शाल्वदेशाधिपती द्युमत्सेन महाराजांचा जयजयकार करीत सनई चौघड्याच्या मंगल वाद्यात मंत्री शशी वर्मा, रविशर्मा, शरद वर्मा आणि विश्वासु सेवक श्रीपती व श्रीधर यांनी येऊन महाराज आणि त्रृषिवर्यांना वंदन केले. द्युमत्सेनांना दृष्टी आलेली पाहुन सर्वांना अतिशय आनंद झाला. महाराज म्हणाले प्रथम आपल्या येण्याचे प्रयोजन कथन करावे.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
……………………………………………………………………………………………………………………
!!! सावित्री !!!
भाग – ३२.
मंत्री शरदवर्मा म्हणाले, कलिंग व वारिंग नरेश दोघेही अत्यंत अन्यायी,कठोर, अत्याचारी, अविवेकी होते. त्यांनी प्रजेचा अत्यंत छळ,अन्याय केला. शाल्वदेश दरीद्री होऊन प्रजा भयभीत झाली. स्रीयांना घराबाहेर पडणे अशक्य झाले. तेव्हा प्रजेतील कांही धाडशी, शूर युवकांना आम्ही हाताशी धरुन अत्यंत गुप्त रितीने सर्व प्रजा संघटीत झाली. मगध नरेश आणि मद्राधिपतींनी आम्हाला भरपुर सहाय्य केले. या लहरी अत्याचारी राजांना सैनिकही कंटाळले असल्याने तेही आमच्यात सामील झाले.
पोर्णिमेला सैनिक, प्रजा एकदम द्रोह करुन त्या राजांच्या विरोधात उठाव करुन उमे राहिले. शेवटी त्या दोन्ही राजांचा व त्यांच्या कुळातील सर्वांनाचा वध केला व त्यांच्या जाचातुन मुक्ती मिळाली. महाराज आपण तर शक्तीवान,सामर्थ्यशाली असुन आतां तर दृष्टीही प्राप्त झाली. प्रजा व आम्हा सर्वांची इच्छा आहे की, आपण परत सिंहासनाधिष्ठ व्हावेत. युवराज सत्यवान तर इंद्रासारखे भासत असुन साक्षात क्षत्रियमुर्तीच दिसत आहे. पण आपल्याला दृष्टी कशी प्राप्त झाली हे कळले तर आमची जिज्ञासा तृप्त होईल.
यावर दाल्भ्य त्रृषींनी सांगायला सुरुवात केली. नारदमुनींनी सत्यवानाबद्दलचे केलेले भाकीत, जेष्ठ पोर्णिमेला वनातील सावित्रीचे कर्तुत्व, महिमा, यमधर्माकडुन तीला मिळालेले पांच “वर” द्युमत्सेनांनी केलेली साधना, तपाचरण याचे सविस्तर वर्णन ऐकुन ते सर्वजन इतके अचंबीत झालेत की, त्यांना हर्षोन्माद होईलसे वाटु लागले. गौतमत्रृषींनी मंत्रीजनांना एक महत्वाची सुचना करीत म्हणाले, मद्रदेशाधिपती अश्वपती आणि महाराणी मालवी अत्यंत चिंतेत, अस्वस्थ असतील. वेळ न दवडतां त्यांना येथील सर्व घटना, सावित्रीचा शब्दातीत अवर्णीय असा काळावरील विजय, यमधर्माकडुन मिळालेले अप्रतिम पांच वरदानें, आणि आतां सर्वांनी शाल्वदेशी द्युमत्सेनांना परत नेण्यास आला आहांत, या शुभ वार्ता, जो अतिशय हुशार व चाणाक्ष, तेज असलेला अश्वारुढ सैनिक, त्यांच्याबरोबर दोन आश्रमकुमार आणि मुनी पवनकुमार या सर्वांनी जाऊन त्यांना सर्व क्षेम समाचार सविस्तरपणे कळवल्यास त्यांची चिंता दूर होईल. सावित्री सत्यवानाच्या चिंतेने त्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच करवत नाही. ठरल्याप्रमाणे ते सर्व रवाना झाल्यावर अत्यंत आनंदी वातावरणांत भोजनसभारंभ सपन्न झाला.
मंत्र्यांनी आणलेले वस्राभूषण परिधान करुन सनई-चौघड्याच्या गजरांत सज्ज असलेल्या रथारुढ होऊन दर्शनाला देवीमंदिरात गेले. नंतर सत्यवानाच्या लाडक्या गायी गौतमत्रृषीं च्या सुपुर्द केल्यात. चौघांनीही आश्रमा ला प्रदक्षिणा घालुन कुटीत सर्वीकडे, जीथे गेल्या २२ वर्षांच्या कितीतरी आठवणीं विखुरल्या होत्या, त्या प्रेममय कुटीचा जड अंतःकरणाने निरोप घेतांना कोणालाच दुःख आवरल्या जात नव्हते, एवढे धैर्यमेरु त्रृषीजनांचेही नेत्र भरुन आले. द्युमत्सेन महाराजांनी सर्वांनी राजधानीत आमंत्रीत केले व आपणही सवड मिळेल तसं आश्रमांत येऊ असे आश्वासन देऊन चौघही रथारुढ होऊन
शंखनाद, तुतारीच्या गगनभेदी जयजयकारांत, पुढे रथ, मागे व आजु बाजुला अश्वारुढ सैनिक व असंख्य प्रजाजन अशी भव्य शोभायात्रा निघाली
तपोनिधी गौतमत्रृषी आश्वासक स्वरांत सर्व संकुलवासीयांना म्हणाले, इथे या कुटुंबासंबंधी ज्या घटना घडल्यात त्या आर्यावर्पाच्या इतीहासात युगानुयुगे स्मरण राहतील व सुवर्णाक्षरां त लिहिल्या जातील. आणि विशेष म्हणजे या सर्वांना आपण साक्षीदार आहोत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हे सर्वजन येतांना दुःखात आले होते पण जातांना मात्र आनंदात जात आहे.आपल्याला त्यांची कमतरता तर जाणवल परंतु त्यांच्या व प्रजाजनांच्या हिताच्या दृष्टीने त्यांचा विरह आनंंदाने स्विकार करु या!
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!! सावित्री !!
भाग – ३३.
गौतमत्रृषी पुढे म्हणाले, ऊद्यापासुन स्रीयांच्या शिक्षणासाठी “सावित्री विद्याममंदिर सुरु करु या! हेच सावित्रीचे खरे स्वप्न, स्मरण ठरेल! तेव्हा सर्वांनी मन घट्ट करुन सावित्रीच्या स्मृती ह्रदयांत साठवत आपआपल्या आश्रम कुटीत जाऊन कार्यास सुरुवात करुयात
इकडे शोभायात्रा राजधानीकडे जात असतांना लहानपणापासुन ज्या परिसरात सत्यवान लहानाचा मोठा झाला तो परिसर डोळ्यांत साठवत, खिन्न मनाने न्याहाळीत होता. दिवस मावळतीच्या सुमारास शोभायात्रा राजधानीजवळ पोहोचली. सीमेवरील भव्य प्रवेशद्वार दिपमाला लावुन सुंदरते ने सजवले होते. शोभायात्रेच्या दोन्ही बाजुंनी असंख्य प्रजाजन स्वागत जयजयकार, पुष्पवृष्टी करीत राजपथा वरुन जात होते. थोड्याच वेळांत ही शोभायात्रा राजप्रसादाजवळ आली. राजपुरोहिताच्या सांगण्यावरुन मंत्रघोषात उंबरठ्याचे पुजन महाराज आणि महाराणीच्या हस्ते झाल्यावर द्युमत्सेन सावित्रीला म्हणाले, हे कुलानंदिते! कुलगौरवकर्ती स्नुष्ने! हा दिवस तुझ्यामुळे प्राप्त झाल्यामुळे,प्रथम तुझ्या भाग्यशाली लक्ष्मीच्या पावलांनी तुझा प्रवेश होऊ देत! तीने मनोमन ईश्वरस्मरण करुन, प्रथम उजवे पाऊल उंबरठ्याच्या आंत ठेवुन राजभवनांत प्रवेश केला. नंतर तिघांनी प्रवेश केला.
जनतेच्या उत्साहाचा व आनंदाचा सागर उफाळून आला. सनई चौघड्यांचे मंगल ध्वनी लहरींनी आसमांत दुमदुमून या चौघांच्या जयजयकाराने भरुन गेला.
इकडे महाराज अश्वपती, महाराणी मालवीदेवी व महामंत्री विवेकमणी अतिशय चिंतेत होते. काल जेष्ठ पोर्णिमा! देवर्षी नारदाने सत्यवाना चे अत्यंत क्लेशकारक दुःखद भाकित सांगीतलेला दिवस! कालचा पुर्ण दिवस, अख्खी रात्र सरली,आज मध्यान्ह झाला तरी काहीच समाचार न कळल्या मुळे त्यांचा धीर सुटला.
माझी सावित्री…… सावित्री…. सावित्रीsssss म्हणत मालवीदेवी आक्रोश करत जमीनीवर अंग टाकले. महाराज अश्वपतीही पुर्ण निराश व दुःखी झाले. पत्निचा शोक बघुन त्यांचाही धीर सुटला, त्यांनाही अश्रू आवरेनासे झाले. मंत्री विवेकमणींनी आपले दुःख बाजुला सारुन अश्रु पुसुन कसेतरी त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करुं लागले.
तेवढ्यात शुभसुचक शंखध्वनीचा आवाज व पाठोपाठ मंगलतिलक लावलेले दोन आश्रमकुमार व मुनी पवनकुमार सुहास्यवदनाने प्रवेश करते झाले. आणि खड्या व भारदस्त स्वरात मुनी पवनकुमार म्हणाले,”सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःखमाप्नुयात्।” महाराज आणि महाराणी आश्चर्याने स्तब्ध, निश्चल होऊन पाहतच राहिले, समाचार ऐकण्यास आतुर झालेले दोघे ही आसनस्थ झालेत.
या सुवार्तेच्या दिव्य क्षणी दास दासींपासून, लहान थोरांपर्यंत देहभान हरपुन महालात एकत्र जमून रोमरोमाचे कान करुन ऐकण्यास उतावीळ झालेत.
पवनमुनी सांगु लागले! ” गेल्या द्वादशीपासुन म्हणजे जेष्ठी पोर्णिमेच्या तीन दिवस आधी महाप्रतीव्रता, सती, साध्वी, बुध्दीमती, किर्तीवंत सावित्रीने त्रिरात्र व्रताची सुरुवात केली. पोर्णिमेला व्रताची सांगता न करतां व पाण्याचा एक थेंबही न घेता सत्यवानासोबत सासुसासर्यांच्या अनूमतीने वनांत निघाली. नंतर वनांत घडलेली सर्व हकीकत, यमधर्माशी झालेला संवाद, त्यांनी दिलेले दिव्य पांच वरदानें, शेवटी सती सावित्रीने तपाचरणाच्या सामर्थ्याने यमधर्माची स्तुती करुन प्रसन्न केले. आणि सासर माहेर दोन्ही कुळांचा उध्दार करुन पतीचे प्राणही परत मिळविले. त्यांच्या आनंदात आणखी भर टाकत शाल्वदेशाधिपतींना दृष्टी प्राप्त झाल्याचे व राज्य मिळाल्याची वार्ता सांगीतली सर्वत्र महासती सावित्री चा जयजयकार होऊं लागला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!! सावित्री !!
भाग – ३४,
महाराज द्युमत्सेन आणि महाराणी शैब्यादेवी बावीस वर्षानंतर राजभवनात चौफेर दृष्टी टाकत मागील अनेक प्रसंगांची त्यांना आठवण येत होती. सत्यवान सर्व वैभव नेत्रात साठवत होता महाराजांनी तंतोतंत वर्णन ऐकवल होते. सावित्रीला राजभवन नवीन असले तरी तीला नवीन वाटत नव्हते. संपुर्ण राजवाडा पुष्पमाला वगैरेंनी मनोहर सजावट केली होती. सर्वांनी स्नान करुन माफक दागीने अंगावर चढविले. नंतर चौघेही भोजनकक्षाकडे निघाले. सर्व आटोपल्यावर आज २२ वर्षानंतर हा राजप्रसाद प्रेमळ, निर्मळ आनंद पाहत होता. ती वास्तु प्रसन्नतेने तथास्तु तथास्तु! म्हणत होती.
सत्यवान-सावित्री शयनकक्षात आल्यावर त्याने आवेगाने तीला मिठीत घेतले. विवाहानंतर आज खर्या अर्थाने दोघांचे मिलन झाले. निष्कटंक, हर्षभरे, प्रेममय मीलन! अविदितगतयामा रात्रीरेव व्यरंतित्।।
इतक्या वर्षाची राज्याची विस्कटले ली घडी नीट बसवण्यासाठी, रिक्त जागी नियुक्त्या, प्रजाजनांचे हित, त्यांच्या गरजा, अडचणी, त्यांच्यावर अतोनात झालेला अन्याय! त्यांचे क्लेशकारक दुःख निवारण करण्याकरितां महाराजां चे२२ वर्षे भ्रष्ट होते,त्यामुळे त्यांचा पुनराभिषेक, ज्यांनी अतीशय कौशल्याने निरनिराळे वेश परिधान करुन विविध व्यक्तिमत्वे हुबेहुब साकार करुन हरहुन्नरीने शत्रुगटा तील अतंस्थ वार्ता मिळवुन हे राज्य परत मिळविण्यास ज्यांचा सहभाग होता त्या सर्वांचा सत्कार करणे, युवराज्याभिषेक करणे इत्यादी अनेक अश्या गोष्टींसाठी आज विशेष सभेचे आयोजन केले होते. युवराज्ञी सावित्री व महाराणी शैब्यादेवी महालाच्या अंतर्भागातुन हा सोहळा पाहुन दोघेही तृप्त, समाधानी, आनंदित झाल्या होत्या. सर्वत्र आनंदी आनंद पसरला. यानंतर सभा विसर्जित झाली.
लवकरच द्युमत्सेन महाराजांचा पुनराभिषेक होणार,त्यासाठी मित्रदेशां च्या राजे महाराजांना, विशेष म्हणजे मद्राधिपती अश्वपती व महाराणी मालवीदेवी यांना अगत्याने सन्मान पुर्वक आमंत्रीत करण्याची जबाबदारी सत्यवानावर सोपवल्यावर त्याचा पाणीदार चेहरा आणि निश्चयाने सर्वांचा उत्साह द्विगुणीत झाला. श्रावणातील अष्टमीच्या मुहुर्तावर महाराज द्युमत्सेन चा पुनराभिषेक सोहळा निश्चित झाला.
आज सावित्री नित्यकर्मे करीत होती पण माता पितांची भेट होणार या विचाराने ती आपल्याच आनंदात गुंग होती. आयुष्यात प्रथमच ती पुरा एक वर्ष आपल्या प्रिय माता पित्यांपासुन दूर राहिली होती. त्यांना आमंत्रीत करण्यासाठी वस्रालंकार, तीने खास बनवलेले मोदक आणि सत्यवानाने संस्कृत श्र्लोकबध्द लिहिलेले पत्र घेऊन स्वतः महाअमात्य रविवर्मा भार्या उषादेवीसह सुवर्ण रथातुन निघाले.
सर्व राजधानी इंद्राच्या अमरावतीसारखी सजली होती. श्रावण त्रयोदशीला महाराज अश्वपती व मालवी देवी राजपरिवारासह शाल्व राजधानीत आगमण झाले. आता मात्र संयमी सावित्रीचा धीर सुटला. धावतच ती शिष्टाचाराचे भान विसरुन मातापितांना अलिंगन दिले. हे करुणामय, आनंदी दृष्य सर्वजन डोळे भरुन पाहत होते. शेवटी शैब्यादेविने सावित्रीला समजावुन तीच्या मातापित्यांना हाताला धरुन अगत्यपुर्वक राजभवनांत घेऊन आले.
श्रावण सप्तमीला देशोदेशीचे राजे महाराजे गौतमत्रृषींच्या संकुलातील सर्व त्रृषीवर, सत्यवानाचे मित्र,त्यांचा परिवार आल्याने जीथे आणि ज्यांच्या समवेत बालपणापासुन ते तारुण्यापर्यंतचा काळ व्यतीत झाला, त्या सर्वांना पाहुन सत्यवानाचे ह्रदय आत्मीयतेने व आनंदाने भरुन आले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे
–







