आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

सती सावित्री चरीत्र भाग ६, (२६ते ३०)
नेने, दुःखाने मोठ्याने ओरडला….. “सावित्रीsssss सावित्री sssss !आणि कसाबसा चालत तिच्या जवळ आला. ती सावध पण अत्यंत दुःखी झाली. तीला कळुन चुकले… आला…. तो घात क्षण आला… तो दुःखद क्षण आला…. माते सावित्रीsssत्राही माम sss त्राही मामsss ! सावित्री! सावित्री! अत्यंत शोकाकुल आवाजांत सत्यवानाने हाक मारली.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! सती सावित्री चरित्र !!!
!! सावित्री !!
भाग – २६.
सत्यवान त्या वृक्षाच्या शाखेवर परशुने घाव घालत असतांनाच एकाएकी त्याच्या उरात व मस्तकात तीव्र वेदना,कळ्या येऊ लागल्या, यात
नेने, दुःखाने मोठ्याने ओरडला….. “सावित्रीsssss सावित्री sssss !आणि कसाबसा चालत तिच्या जवळ आला. ती सावध पण अत्यंत दुःखी झाली. तीला कळुन चुकले… आला…. तो घात क्षण आला… तो दुःखद क्षण आला…. माते सावित्रीsssत्राही माम sss त्राही मामsss ! सावित्री! सावित्री! अत्यंत शोकाकुल आवाजांत सत्यवानाने हाक मारली. धैर्याचा मेरुमणी असलेल्या सावित्रीची स्थिरबुध्दी कांही क्षण विचलीत झाली, तिचे टपोरे डोळे अश्रुंनी भरुन आले, पण क्षणभरच! “स्वामी! नाथ! नाथ! म्हणत सत्यवानाला धरुन खाली बसवले.
सत्यवानाचे सर्वांग घामाने स्नान केल्यासारखे चिंब भिजले. अत्यंत वेदने ने तो विव्हळत होता. सावित्री! छातीत जळल्यासारखे होत असुन सर्व शक्ती नष्टप्राय झाली. मला निजावेसे वाटते, तिने त्याचे मस्तक मांडीवर घेतले. तीचा आश्वासक स्पर्श होताच त्याची पीडा, वेदना कमी झाल्यासारख्या वाटल्या. हळुहळु त्याची बोलती बंद होऊन पुर्ण शुध्द हरवली.
सुन्न झालेली सावित्री त्याच्या मुखावरुन, मस्तकावरुन, छातीवरुन हात फिरवत राहिली. काय करावे तीला कळेना! तीला केवळ नारदमुनींचे बोलणे आठवत होते. अशी अवस्था तीची पुर्वी कधीच झाली नव्हती. विमनस्क मनस्थीतीत, विव्हल चिंतामग्न अवस्थेत सत्यवानाचे डोके मांडीवर घेऊन बसली असतांनाच एक दिव्य पुरुष समोर प्रकट झाला. तो शामल पण तेजस्वी असुन सूर्यासमान भासत होता. त्याच्या अंगावरची लाल वस्रे, मस्तकावरील मुकुट आणि नेत्रही लाल दिसत होते. त्याच्या हातात पाश असुन एकटक सत्यवानाकडे पाहत होता.
इतिहासात एका दिव्य घटनेचा प्रारंभ झाला. युगानुयुगे स्मरणात राहणारी आणि स्रीशक्तीचे दर्शन घडविणारी ही घटना भारतवर्षाच्या इतिहासात नोंदवली जाणार होती. त्या विलक्षण दिव्य पुरुषाला पाहुन तीने सत्यवानाचे डोके मांडीवरुन बाजुला ठेवुन, त्या विलक्षण पुरुषाला वंदन करुन थरकाप उडालेल्या दुःखी वाणीने, आपण कोण? कोणत्या हेतुने व इच्छेने इथे आला आहात? असे तीने विचारल्या वर तो दिव्य पुरुष म्हणाला, सावित्री! तु महानपतिव्रता व तपस्विनी असल्यामुळे च मी प्रत्यक्ष तुझ्याशी भाषण करतोय! मी यमराज असुन सत्यवानाचे आयुष्य सरले असल्यामुळे त्याला पाशात बध्द करुन, त्याला नेण्यासाठी आलेला आहो
यमधर्माशी बोलणे सुरु असतांनाच ती मनाने स्थिर होत, तीचे तपोबल आणि पावित्र्य जागृत झाले. धैर्ययुक्त वाणीने ती म्हणाली, हे भगवान! माझ्या असे ऐकीवात आहे की मानवांना नेण्यासाठी अपले दूत येतात! मग आपण स्वतः कां आलात?
यमधर्म म्हणाले, ” सावित्री! सत्यवान हा ज्ञानसंपन्न धर्मात्मा पुण्यात्मा, रुपगुणांचा जणुं सागर असुन पुर्ण आयुष्यात त्याने एकही पाप वा वाईट कृत्य केले नाहीच, उलट माता-पितांची, गुरुजनांची सेवाच केली. सर्वांना वेळोवेळी सहाय्यच केले. असे बोलत असतांनाच यमपाशाने सत्यवाचा
अंगुष्ठमात्र देह पाशबध्द करुन दक्षिणेकडे निघाला.
पुर्ण सावध सावित्रीने प्रथम सत्यवानाच्या देहाभोवती गोलाकार मंत्रभारीत रेखा आखुन भूमी व त्याची काया सुरक्षीत केली. नियमपुर्वक आचरण व व्रताने तीला सिध्दी प्राप्त झाली होती, शिवाय समाधी-अवस्था प्राप्त केल्याने जे सामर्थ्य मिळाले होते त्यायोगे तीने सुक्ष्मदेह धारण करुन ती पतीव्रता यमधर्माच्या मागोमाग चालु लागली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
……………………………………………………………………………………………………………………
!! सावित्री !!
भाग – २७.
सावित्री मागे येतांना पाहुन यमधर्म म्हणाले, ” सावित्री! तु आतां परत जाऊन सत्यवानाचे और्ध्वदेहिक कर! तु त्याच्या त्रृणांतुन मुक्त झाली आहेस! परत फीर! पुर्ण सक्षम असले ली व प्राप्त केलेले ज्ञान! आचारलेले पातिव्रत्य, व्रतसिध्दी आणि आत्मज्ञान यामुळे ती सावध आणि निर्भयपणे यमामागोमाग चालत म्हणाली, हे धर्मराजा! प्रभो! धर्मशास्रातील तत्वप्रणाली प्रमाणे सप्तपदी केल्यावर ज्याठीकाणी पती तेथे पत्नी, हा सनातन धर्म आहे. सावित्रीचे तर्कशुध्द, धर्मयुक्त आणि शास्रशुध्द बोलणे ऐकुन मनोमन ते आनंदी झाले, पण मुखावर प्रकट होऊ दिले नाही. पुढे ती म्हणाली, हे धर्मराजा! ज्ञानसंपन्न लोक ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम किंवा सन्याश्रम यातील उचित अशा एका अश्रमधर्माचे पालन, आचरण केल्यास इतर आश्रमांतील धर्म आपोआप प्राप्त होतात. माझ्या पतीने ही सज्जनांना मान्य होईल अश्या प्रकारे गृहस्थाश्रम धर्माचे पालन करीत असतां त्यांच्या धर्माचा आपण विध्वंश करु नये
सावित्रीचे ज्ञानपुर्ण बोलणे ऐकुन यमधर्म प्रसन्नं होऊन म्हणाले, हे अनिंदिते! तुझ्या वाणीतील स्वर, अक्षर, व्यंजन देखील निर्दोश सहेतुक आहे. तुझ्या या तर्कशुध्द व धर्मपुर्ण बोलण्याने मी संंतुष्ट झालो तरी सत्यवानाच्या जीविताखेरीज कोणताही ‘वर’ माग! यमधर्म संतुष्ट झालेले पाहुन तीचे धैर्य वाढले. त्यांची स्तुती करत म्हणाली, माझे धर्मनिष्ठ स्वसुर नेत्रहिन आहेत. त्यांना नेत्रप्राप्ती होऊन ते अग्निप्रमाणे बलवान आणि सुर्याप्रमाणे तेजस्वी व्हावेत.तीची ‘वर’ मागण्याच्या पध्दतीने यम प्रसन्न होऊन तथास्तु! म्हणुन तीला परत फिरण्यास सांगीतल्यावर ती म्हणाली, जिथे माझे पती, तिथे माझी गती नित्य आहे.
नंतर तीने सज्जनाच्या समागम घडल्याने मैत्री कशी होते, सज्जनाचा सहवास कधी निष्फळ होत नाही असे चातुर्यपुर्ण भाषण करुन यमाचे मन तीने जिंकले. यमाचे मन प्रसन्न झाले. यमाने मनांत विचार केला, प्रथम हिने मैत्री, मग सज्जन म्हणुन गौरव आणि सत्संगाचा महिमा सांगीतला. तीने वाक्चातुर्याने सत्यवानाच्या प्राणदानाचा उल्लेखही न करतां युक्तीने सज्जनाचरणाचा महिमा सांगत जणुं अप्रत्यक्षपणे मागणी केली.प्रसन्न होऊन म्हणाले, सावित्री! तु सत्संगाची सर्वांच्या हिताची बुध्दीवंतांच्या बुध्दीला वाढविणारी गोष्ट सांगीतल्यामुळे मी प्रसन्न झालो,सत्यवानाच्या जीवीताखेरीज इतर कोणताही ‘वर’ मागुन घे!
सावित्री मनोमन उमजली की, आपण यशमार्गावर दोन पावले पुढे गेलो. तीने संयमपुर्वक व विचारपुर्वक ‘वर’ मागीतला, माझ्या बुध्दीमान श्वसुरांना स्वराज्य मिळावे, त्यांनी कधीही स्वधर्म सोडू नये, स्वधर्माचा त्याग घडु नये. तथास्तु! आतां तु परत जा! सावित्रीला श्वसुरांसंबंधीचे वरदान ऐकुन अतीव आनंद झाला, तीचे मनोधर्य अधिकच वाढले, त्याभरात ती म्हणाली, समस्त प्राण्यांच्या काळाची नोंद ठेवणार्या कालपुरुषा! प्रजेला तुम्ही नियमाने बध्द करतां आणि नियमन करुन भिन्न लोकांत घेऊन जातां म्हणुन आपणांस “यम” म्हणतात. मन,वाणी,कृतीद्वारे कोणाचाही द्वेष न करतां, उलट सर्वांवर अनुग्रहच करतां.
आपणांसारखी महान व सज्जन तर शत्रुवर देखील दयाच करतात. सावित्रीच्या चातुर्यपुर्ण भाषणाने यम प्रसन्न होऊन म्हणाले, सत्यवानाच्या जीवितावाचुन कोणताही ‘वर’ मागुन घे! त्यावर ती तात्काळ म्हणाली, माझे पिता अश्वपती पुत्रहिन आहेत. त्यांना औरस कुलाची अभिरुध्दी करणारे शंभर पुत्र व्हावेत, यावर प्रसन्नपणे यम म्हणाले! तुझ्या मनाप्रमाणे होईल. खुप दुरवर तु आली आहेस, आतां परत जा! सावित्रीचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला. नम्रतेने म्हणाली,पतीसानिध्य असल्यावल हे स्थान मला दूर नाही.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
……………………………………………………………………………………………………………………
!!! सावित्री !!!
भाग – २८.
सावित्रीने अत्यंत नम्रपुर्वक विनयाने म्हणाली, विवस्वानाचे प्रतापी पुत्र आहांत म्हणुन लोक आपल्याला ‘वैवस्वत’ म्हणतात. आपण सर्वांशी धर्माने, समतापुर्वक आचरण करीत असतां म्हणुन आपणांस ‘धर्मराज’ संबोधतात, म्हणजे सावित्रीने अपरोक्ष पणे सांगीतले की, आपण अंतःकरणाने कठोर नसुन प्रेमळ सज्जन आहात, म्हणुनच मला पुर्ण खात्री आहे की, आपण माझी इच्छापुर्ती नक्कीच कराल धर्मराजांना आतांपर्यंत सर्वचजण अंतःकरणाने कठोर असुन प्रेमळ नाही असेच समजत आले पण सत्य मात्र सावित्रीनेच जाणले, या विचाराने प्रेरीत व प्रसन्न होऊन यमधर्म म्हणाले, हे कल्याणी! आतांपर्यत माझेबाबतीतील सत्य कोणाच्याही तोंडुन ऐकले नव्हते. मी संतुष्ट झालो,सत्यवानाच्या जीवीता शिवाय ‘वर’ मागुन घे!
बुध्दीमान, चाणाक्ष सावित्रीला यमधर्म अत्यंत प्रसन्न झाल्याचा पुर्ण विश्वास निर्माण झाल्याने ती त्वरीत म्हणाली, मला माझ्या पतीच्या संयोगाने, कुळाची अभिरुध्दी करणारे, बळ आणि पराक्रम संपन्न असे शंभर ओरस पुत्र व्हावेत! प्रसन्नतेच्या भावनावेगात व सत्यवानाच्या प्राणा शिवाय वर मागीतला या आनंदात यमधर्म म्हणाले, हे भद्रे! तुझी इच्छा पुर्ण होईल! आतां मात्र तु परत जा….
सावित्रीच्या मनांत आले, आपण जवळ जवळ लढाई जिंकलीच आहे. ती म्हणाली, हे ब्रम्हनिष्ठ ज्ञानवंता! ब्रम्हतेजाने नेहमी प्रज्वलीत राहणार्या तेजोमया! परब्रम्हाचे अखंड ध्यान करणार्या ‘इश’ नामक भगवंता! आपण नेहमी धर्माचरण करतांना दुःखीत व्यथीत न होता कधीही पाय मागे घेत नाही. सज्जन सत्याच्या योगाने सूर्याचे संरक्षण आणि तपोबलाने भूमीचे पोषण भूत,भविष्य,वर्तमान यांचा आधार असल्यामुळे ते कधीही दुःखी होत नाही. सज्जन नेहमी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता सतत परोपकार करीत असतात. धर्माचरणाला प्राधाण्य देऊन निस्वार्थ भावनेने, मानसन्मान कायम ठेवुन ते संरक्षक असतात म्हणुनच सत्पुरुषाचे वचन कधीही निष्फळ होत नाही.
सावित्रीची ही ज्ञानवचने ऐकुन यमधर्म इतके प्रसन्न झाले की, उत्साहाने म्हणाले! “हे पतीव्रते! तु माझ्या मनाला व अंतःकरणाला अनुकुल, सुंदर अर्थाचे धर्मासंबंधी भाषण ऐकुन तुझ्यावर माझी भक्ती जडली, तरी तु अप्रतिम “वर” मागुन घे! क्षणाचाही विलंब न करतां, सावित्री म्हणाली, हे प्रभो! आतांपर्यंतच्या वरांमधे सत्यवानाच्या जीवीतावाचुन हे वाक्य होते. ते वाक्य या वरात नाही म्हणुन अप्रतिम वर मागते की, माझे पती सत्यवान जिवंत व्हावेत, आणि यापुर्वी पतीपासुन म्हणजेच सत्यवानापासुन १०० पुत्रें होतील असा “वर” दिला होता. हे दोन्ही “वर” सिध्द होण्यासाठी सत्यवान जिवंत व्हावे अशी नम्र प्रार्थना आहे.
यमधर्म प्रसन्नतेने म्हणाले, सावित्री! तु अपल्या बुध्दीमत्तेने, तपश्चर्येने, वाक्चातुर्याने आणि धर्मज्ञानाने प्रभावित केलेस. तथास्तु!” म्हणत सुर्यपुत्र यमराजांनी सत्यवानाला पाशमुक्त केले.” हे सावित्री! तु युक्तीप्रद वचनाने ज्ञानपुर्ण वाक्चातुर्याने मला प्रसन्न करीत गेलीस. तु खरोखरच “वागीश्वरी” आहेस. हे शुध्दज्ञानमयी! व्रताचरणाने, शुध्द परमात्मज्ञानाने आणि आत्मानूभव शक्तीमुळेच तु माझ्यामागे येऊ शकलीस, जे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही. प्रसन्नचित्त यमराज म्हणाले, हे कूलनंदिनी, हे भद्रे! घे हा तुझा पती! दिला मी सोडुन! हे साध्वी! तुझे मनोरथ पुर्ण करण्यासाठी तो निरोगी राहुन तुझ्यासमवेत ४०० वर्षे राहिल.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
……………………………………………………………………………………………………………………
!!! सावित्री !!!
भाग -२९.
यमधर्म पुढे म्हणाले, सत्यवान यज्ञयागाने आणि धर्माचरणाने प्रसिध्द होईल, त्याची अमर्याद गुणसंपदा, समस्त पुरुषवर्गाला आदर्श, मार्गदर्शक आणि आचारणीय ठरेल. तुझे पुत्र, पौत्र समृध्द होऊन तुझ्या नांवाने प्रसिध्द होतील,
हे धर्माभिमानी! तुझे धर्मासंबंधीचे अगाध ज्ञान, धर्माचरण अद्वितीय, अववर्णनीय आहे. हे गुणवती तुझे संस्कारक्षम आचरण, आदर्श वर्तन, ज्ञानासह नम्र, विनयशील वागणे हे समाजधारणेसाठी आचारणीय ठरेल. म्हणुनच हे प्रतिव्रते! या विश्वात तु युगानुयुगे पुजनीय होऊन प्रतिवर्षी आजच्या दिवशी स्रीया तुझे पुजन करतील. हे साध्वी! हा विजय तु कोणाचेही सहाय्य न घेता किंवा विचारविमर्श न करतां, स्वतः मिळवलेल्या धर्मज्ञानाच्या आचरणाने प्राप्त केलेस, संकट समयी अश्रु गाळत न बसतां, दुःख करत निष्र्कीय न होता, विवेकाने संकटावर कशी मात करावी, हा शिक्षणपाठ म्हणजेच तुझे आदर्श चरित्र! तुझ्या पुजनाने आणि चरित्रपठनाने विश्वाचे कल्याण होईल,” असा आशिर्वाद देत यमराज अंतर्धान पावले.
कांही क्षणांतच आपल्या योगशक्तीच्या बळाने सत्यवानाचा जिथे देह होता तिथे सावित्री उपस्थीत होऊन त्याचे मस्तक मांडीवर घेऊन स्निग्धपणे एकटक त्याच्याकडे बघत बसली, तोच सत्यवानाला चैतन्य प्राप्त होऊन उठुन बसला. सत्यवान जीवीत झालेला पाहुन अतिशय आनंदाने, स्वामीsss स्वामीsss नाथ म्हणत आपली बाहुमाला सत्यवानाच्या गळ्यात घातली तीच्या मुखावर पतीप्रेम, तेज हर्ष ओसांडुन वाहत होते. सत्यवान तीचे रुप व प्रेमावेग अनिमीष नेत्रांनी पाहत तीला कटीबध्द केले, तिने आपले मस्तक त्याच्या बलदंड बाहुत व विशाल वक्षावर प्रेमाने विसावले……
सावित्रीने स्वतःला सावरुन त्याच्या बहुपाशातुन मुक्त केले. सत्यवानाची दृष्टी आजुबाजुला भिरभिरत होती. त्याच्या लक्षात आले की, आंधार दाटला असुन रात्र झालेली आहे. कांही अंतरावर एक वृक्ष जळत असुन त्याचा प्रकाश पसरला होता.
सत्यवान म्हणाला, एवढा वेळ झोपुन असतांना कां बरं उठवले नाही? आणि तो श्यामवर्ण पुरुष कुठे आहे? ती समजावत म्हणाली, नाथ! हे नरश्रेष्ठा मी सध्या एवढेच सांगते की, तो शामल पुरुष प्रजेचे सयंमन करणारे भगवान “यम” होते. सत्यवानाचा गोंधळ उडाला, तो म्हणाला, डोक्यात, छातीत कळ्या आल्याने उभा राहण्यास असमर्थ झालो होतो, तुझ्या मांडीवर झोपल्यावर मनाने मी झोपेत हरवलो वअंधार दाटुन येऊन सावळा पुरुष जवळ येत असलेला दिसला, पण अर्थ लागत नाही. हे शुभे! ते सत्य की, स्वप्न होते हे तुला माहित असेल तर सांग!
हे राजपुत्रा! रात्र खुप झाली. सर्व सविस्तर उद्या सांगेन. घरी माता पिता चिंतेत असतील, शिवाय वनचरे हिंडु लागलीत. स्वामी समोर झाड पेटले आहे लवकरच वणवा पेटेल, तरी सुध्दा अशक्तपणामुळे जर चालवत नसेल तर आपण इथेच रात्र काढु या! त्यावर घाईने म्हणाला, मी जर माता पितांना दिसलो नाही तर ते जिवंत राहणार नाही व रडु लागला. त्याचे अश्रु पुसुन म्हणाली, मी तुम्हाला आश्वासन देते, असे म्हणुन उभी राहत दोन्ही हात वर करुन निश्चयाने अश्वासक स्वरात म्हणाली ” मी कांही तपश्चर्या, कांही दान केले असेल, विनोदातही असत्य बोलले नसेल तर त्या सत्याच्या प्रभावाने माझे सासु सासरे सुखरुप राहोत. हे ऐकुन सत्यवानाला उत्साव व धीर येऊन लगेच दोघेही आश्रमाकडे निघालेत.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
……………………………………………………………………………………………………………………
!! सावित्री !!
भाग – ३०.
फळांचा करंडा तिथेच ठेवुन स्वरक्षणाकरितां केवळ हाती परशू घेऊन दोघेही आश्रमाकडे निघालेत. सकाळी वनांत येतांना सावित्री सत्यवानाकडे लक्षपुर्वक पहात होती परततांना सत्यवान तीच्याकडे बघत तीला सांभाळात मार्गक्रमण करीत होता
इकडे आश्रमातील कुटीमधे दुपारनंर सत्यवानाचे माता पिता अत्यंत चिंतीत होऊन अस्वस्थ झाले होते. सकाळी गेलेले सावित्री-सत्यवान मध्यानह टळली तरी परतले नाही. सत्यवानाने सुग्रास भोजन करण्यास सांगीतलेले सिध्द होते, सावित्री तर तीन दिवसांपासुन कडकडीत उपाशी होती. सत्यवान सुध्दा नेहमीसारखा जेवत नव्हता. त्यांची मने अगदी स्वैरभैर झाले होते. द्युमत्सेन तर अतीव चिंतातुर दुःखाने व्याकुळ झाले होते. जप करत बसुन होते. शैब्यादेवी घरात बाहेर सारख्या येरझार्या घालीत होत्या. दोघेही एकमेकांना दुःख दिसु नये म्हणुन प्रयत्नशील होते सावरत होते,
आतां मात्र द्युमत्सेनची सहनशक्ती संपली. ऊभे राहत पत्नीला म्हणाले, चल आपण वनांत फिरत त्यांना हाकारु असे म्हणत दोघेही वनाकडे निघाले, दार बंद करण्याचे भानही त्यांना राहिले नाही. वनांत जाऊन सत्यवान-सावित्री च्या नांवाने हाका मारुं लागले. अचानक द्युमत्सेनला प्रथम अस्पष्ट व नंतर लख्ख दिसुं लागले. निर्बल असलेल्या त्यांच्या देहात सामर्थ्य जाणवु लागले. अती आनंदाने ओरडून त्यांच्यात झालेले स्थित्यंतर पत्नी शैब्यादेवीला सांगीतले.
दोघेहु आणखी जोमाने दगड धोंडे काट्याकुट्यांची, उन्हातान्हाची पर्वा न करता हाकारत रानोमाळ हिंडु लागले. त्यांची काटात अडकुन फाटले ल्या वस्रांकडे सुध्दा लक्ष नव्हते. द्युमत्सेनची रिकामी कुटी पाहुन त्रृषी मुनी सुध्दा वनाकडे निघाले.थकुन एका तरुखाली दोघेही श्रांत क्लांत होऊन बसलेले दिसल्यावर सर्वजन त्यांच्या जवळ पोहोचले. द्युमत्सेनला दृष्टी आली असल्यामुळे प्रत्येक त्रृषीच्या आवाजा वरुन त्यांना नांवासहित ओळखल्याचे पाहुन सर्वजन खुपच हर्षित झाले.आणि हा शुभ शकुन आहे असे सांगुन,सावित्री सत्यवानासोबत असल्यामूळे ते सुखरुप असावेत असं सांगुन त्यांचे सांत्वन केले. थोड्या वेळांत रात्र होऊन अंधार पडेल म्हणून सर्वजन आश्रमाकडे परतले.
आर्य द्युमत्सेन देवघरांत जाऊन देवा पुढे हात जोडुन त्यांनी अश्रुला वाट मोकळी करुन दिली.द्युमत्सेन व शैब्यादेवी सत्यवानाच्या बालपणीच्या आणि सावित्रीच्या आठवणीने दुःख करु लागले. त्यांना शांत करीत मुनी सुवर्चा भारद्वाज! दाल्भ्य, आयस्तंबत्रृषी,तेथील शिष्य, आश्रमकुमार या सर्वांनी आपआपल्या परीने धीर देत म्हणाले की सावित्री व्रतस्थ, इंद्रियदमनमुक्त, सदाचारी, कडक व्रते, तपश्चर्या केलेली आणि ज्याअर्थी आर्य द्युमत्सेनला दृष्टी प्राप्त झाली, आणि सावित्री व्रत पुर्ण झाल्यावर व्रताची सांगता न करतां सावित्री गेली, शिवाय गौतममुनी म्हणाले, “मी सर्व वेदांचे अध्ययन, मोठे तप, ब्रम्हश्चर्य पालन करुन अग्निला आणि गुरुजनांना संतुष्ट केले असेल, एकाग्रतेने अनेक व्रते व वायुभक्षण करुन केलेली तपश्चर्या या सर्व प्रभावाने दुसर्यांच्या हालचाली जाणुं शकतो, त्यानुसार सांगतो की, सत्यवान जीवंत आहे.
अशा रितीने सर्वांची आश्वासनयुक्त भाषणे ऐकुन दोघांना जरा धीर आला. थोड्याच वेळांत सत्यवान-सावित्रीने आनंदाने कुटीत प्रवेश केला. ते दिसल्याबरोबर धावत जात द्युमत्सेनने सत्यवानाला कवटाळले, डोळ्यांतुन अश्रुधारा वाहु लागल्या पण आनंदाच्या,अतिव हर्षाच्या
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे
–







