सती सावित्री चरीत्र भाग ४, (१६ ते २०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️


           स्रीशक्ती सामर्थ्यवान होऊन तीच्या ज्ञानाचा लाभ कुटुंब, समाज व राष्र्टाला व्हावा या दृष्टीने युवराज्ञी सावित्रीने समाजाला एक वेगळाच आदर्श व ज्ञानमार्ग मोकळा करुन दिला.टाळ्यांच्या गजरात  सावित्रीने सर्वांना नम्र अभिवादन करुन म्हणाली, “यत्र नार्यस्तु पूज्यते, रमन्ते तत्र देवतः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते, सर्वाः तत्र अफलाः कियाः

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!! सती सावित्री चरित्र !!!

!! सावित्री  !!

भाग  –  १६.

         स्रीशक्ती सामर्थ्यवान होऊन तीच्या ज्ञानाचा लाभ कुटुंब, समाज व राष्र्टाला व्हावा या दृष्टीने युवराज्ञी सावित्रीने समाजाला एक वेगळाच आदर्श व ज्ञानमार्ग मोकळा करुन दिला.टाळ्यांच्या गजरात  सावित्रीने सर्वांना नम्र अभिवादन करुन म्हणाली, “यत्र नार्यस्तु पूज्यते, रमन्ते तत्र देवतः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते, सर्वाः तत्र अफलाः कियाः।। असा गौरव ज्ञानीजनांनी केला आहे. स्री ही अत्यंंत प्रेमळ, संवेदनशील, व कर्तुत्ववान असते, पण कठीण संकटसमयी शील रक्षणार्थ सिंहवाहिनी दुर्गा, कालीचे रुप घेऊन समय सुचकतेने मार्ग काढुन स्वतःचे व कुटुंबाचे रक्षण तर करतेच पण जर परचक्र संकट आल्यास तेजस्विता, स्वाभीमान आणि राष्र्टप्रेमाणे प्रेरीत होऊन शत्रुशी दोन हात करण्यास तयार  सुध्दा असते.

          सावित्री १३-१४ वर्षाची असतांनाच तीच्या सेवेसाठी महाराणींनी दूरदृष्टी ठेवुन शालीनी, मालीनी व नलीनी या समवयस्क तीन दासींची नियुक्ती केली होती. दासीपेक्षा त्या सावित्रीच्या मैत्रिणीच जास्त होत्या. त्या सोळा वर्षांच्या असतांनाच त्यांची लग्ने झाली होती. अठरा वर्षाच्या सावित्रीत व त्यांच्या वयात जास्त अंतर नसल्यामुळे, त्यांच्यात हास-परिहास होत होता. त्यांच्या कौटुंबिक समस्या सावित्री आपल्या बुध्दी चातुर्याने सोडवित असे,

          एकदा मैत्रीणींसोबत आई-वडीलांची अनुमती  व  सर्व व्यवस्था करुन मालीनी, शालीनी व नलीनीसह वन विहाराला राजरस्त्यावरुन रथातुन जात असतांना,

एक अत्यंत दरीद्री गृहस्थ कावरा बावरा होऊन इकडे तिकडे फिरत असलेला पाहुन सेनिकांनी त्याला बाजुला ढकलल्यामुळे तोल जाऊन पडला. हे पाहुन सावित्री रथातुन ऊतरली व त्याची विचारपुस केल्यावर कळले की,  तो अंध असल्याचे समजले. तीने त्याची व्यवस्था धर्मशाळेत केली व वनविहार रद्द करुन राजभवनाकडे परतली. ती परत आलेली पाहुन महाराजांनी कारण विचारल्यावर त्या अंध गृहस्थाची हकीकत सांगुन म्हणाली, प्रजेची आपण सर्वतोपरी काळजी घेताच, पण अशा निराधार, अपंग, अंध, पोरकी बालके, वृध्द यांच्यासाठी कांहीतरी व्यवस्था व्हावी ना! हे ऐकुन विलक्षण गंभीरपणे महाराजांनी घोषणा केली.येत्या कांही दिवसांतच सर्व नियोजन व कार्यवाही करुन प्रत्येक गावात अश्या निराधारांसाठी व्यवस्था केल्या जाईल. अनाथ बालकांची शिक्षणाची सोय होईल. दवंडी पिटवुन सर्व निराधरांसाथी “देवाश्रय” ची सोय केली.

       अलीकडे सावित्रीची अस्वस्थ, अबोल चिंतामग्न अवस्था पाहुन तीच्या मातेने राजगूरुला बोलावले सावित्रीची अवस्था कथन केली. राजगुरु सावित्रीच्या कक्षात जाऊन तीला अस्वस्थेचे कारण विचारल्यावर, सावित्री म्हणाली, गुरुवर्य! सध्या मला एक दिव्य आकर्षित करीत आहे, त्या महाशक्ती, परमतत्वांच्या अनुभुतीवाचुन शांती मिळणार नाही. राजगुरु म्हणाले, इतर उपासनेत कालव्यय न करतां, देविमाता सावित्रीची जी परब्रम्हस्वरुपिणी, शुध्दज्ञानरीपिणी आहे, तीचे ध्यान केल्यास तीच योग्य दिशा दाखवेल.

         दुसर्‍या दिवशीपासुन कडक ध्यानधारणेला सावित्रीने सुरुवात केली. त्याचे फळ लवकरच तीला मिळाले. देवीच्या मस्तकावरील एक सुंदर टपोरे फुल तीच्या ओंजळीत पडले. तीला ब्रम्हानंदाचा, आत्मसाक्षात्काराचा अनुभव प्राप्त झाला. सर्व आनंदीत झालेत, परंतु महाराजांना वेगळीच चिंता सतावु लागली. तीची वैराग्यशील व मौनवृत्ती पाहुन विवाहास ती तयार होईलसे वाटत नव्हते. राजगुरुंना त्यांनी आपल्या मनातले शल्य, व्यथा कथन केल्यावर राजगुरुंनी त्यांना निश्चिंत राहण्यास सांगुन ते सावित्रीमहालाकडे निघाले.

                    क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

……………………………………………………………………………………………………………………

!!!   सावित्री   !!!

भाग  –  १७.

         राजगुरु सावित्रीच्या कक्षात पधारले, आणि म्हणाले, सावित्री! तु जे मिळवलेस त्याने मानवजन्माचे तर सार्थक करुन घेतलेस, जे अलौकीक व दुर्मिळ आहे, या आनंदापुढे जगातील कोणतेही भौतिक आनंद तुच्छ आहे. परंतु मानव देह मिळाला तर कांही कर्तव्येसुध्दा पार करुन दुसर्‍यांनाही अनंद देणे आपले कर्तव्य आहे, ती तुला पार पाडावी लागतील. हेच आचरण जगाला आदर्श, वंदनीय, पुजनीय होईल. तु अंतर्यामी जरी आनंदी असलीस तरी बाह्य जगी इतरांसाठी कमलपत्रासमान अनासक्त जीवन जगायला हवे. पुढील जीवनांत पती, त्याचे आत्मजन या सर्वांचे कर्तव्यपालन, प्रेम, आदर, नम्रता आणि सेवाभावीवृत्तीने आनंदीत करण्याचा उद्देश ठेवुन आदर्शभूत व्हावे हाच देवीसावित्रीचा आदेश आहे. सावित्रीने त्यांना वंदन करुन म्हणाली, मी आपल्या आज्ञेबाहेर नाही.

         महाराज अश्वपती चिंतीत होते, कारण अजुनपर्यंत कोणत्याही  राजाकडून मागणी घातली नव्हती. तसं पाहिले तर इतर कन्यापेक्षा तीचे वय जरा अधिकच म्हणजे १९-२० वर्षाचे झाले होते. पण अभिमानी पुरुषाला आपल्यापेक्षा वरचढ, श्रेष्ठ पत्नि नको  असते. अशा या रुपगुणसंपन्न कन्येला तिच्याच तोडीचा गुणसंपन्न “वर” हवा म्हणुन महाराज सावित्रीला म्हणाले, तुला साजेसा पती तुच शोधुन आम्हाला सांग, असे करतां येते का? हे विद्वांनाना विचारल्यावर धर्मपठन करुन सम्मती दर्शवल्यावर, लाजुन सावित्रीने कबुल केले. पण तीने अट घातली की, कोणताही गाजावाजा न करतां गुप्तपणे, हुशार, चाणाक्ष व मनुष्याची उत्तम पारख असलेली फक्त दोन व्यक्तीच सोबत असेल. ती म्हणाली, राजपद, वैभव, सौंदर्याचे आकर्षण मला नाही. जो युवक चारित्र्यसंपन्न, उत्तम आचारविचार गुणसंपन्न असा साधारण असला तरी चालेल.

           या प्रमाणे विचार विमर्श होऊन दानाच्या निमित्याने पर्यटन करायचे ठरले. दुसर्‍या दिवशी सावित्रीचा सुवर्णरथ महामंत्री विवेकमणीसह निघाला. सावित्री देशोदेश, नगरांनगरांतुन फिरत होती. पण मनासारखा “वर” कांही दिसेना! शेवटी तिचा रथ गौतमत्रृषीच्या तपोवनाकडे निघाला. आज द्युमत्सेन राजाला सारखे शुभशकुन होत होते. आज सत्यवानाचे शरसंधान सराव खुपच अप्रतीम व मनासारखा झाल्याने आनंदीत व प्रफुल्लीत होऊन तो वनातुन घराकडे निघाला असतां, एक घाबरलेली, भेदरलेली गर्भिणी हरिणी जीवाच्या आकांताने धावत होती व तीचा पाठलाग एक राजा रथावरुन करीत हरिणीला लक्ष करुन धनुष्याची प्रत्यंचा ओढली, आतां तो बाण तीला लागणारच, एवढ्यात  सूं…..सूं….सूं अवाज करत एका बाणाने राजाच्या बाणाचे तुकडे तुकडे केले.

          पाठोपाठ भारदस्त आवाज आला, चपला! हा सत्यवान असतांना तुला कोणीच मारु शकणार नाही, असे म्हणुन तिच्याभोवती शरांचा सुरक्षातट उभा केला.

        तोच उन्मत्त राजा, सत्यवानाच्या समोर येऊन अत्यंत उध्दट, ऊर्मटपणे म्हणाला, ही हरिणी माझी शिकार असुन मृगया हा क्षात्रधर्म आहे, तेव्हा धर्माच्या आड येऊन प्रतिबंध करणारा तु कोण रे रानटी? त्याचा उध्दटपणा दुर्लक्षीत करुन सत्यवान मूदु व नम्र स्वरात राजाला  सांगीतले, हा गौतमत्रृषी, भारद्वाजत्रृषी, मुनी दालभ्य यांचे हे तपोवन असुन “आश्रमर्मृगीय न हन्तव्यः इथे मृगयेला प्रतिबंध आहे हे आपण समजुन घ्यावे.

         हा सर्व प्रकार नुकतेच पोहोचलेली सावित्री व महामंत्री झाडाच्या आडुन लक्षपुर्वक पाहत होते. तोच राजा गरजला! हे, वनवास्या! तुला क्षत्रीय व इतर कशाचेच ज्ञान दिसत नाही. चल, हो बाजुला! या हरिणीची शिकार करायची आहे. आतां मात्र सत्यवानाचा संयम सपुष्टात येऊन कृध्दपणे म्हणाला, तु फक्त एका राज्याचा राजा असशील, पण मी या संपुर्ण वनाचा नृप असुन इथे वास्तव्यास असलेल्या सर्वांचे रक्षण करणे माझे कर्तव्य व धर्म आहे.

                           क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

……………………………………………………………………………………………………………………

!!  सावित्री  !!

भाग  –  १८.

     सत्यवानाचे बोलणे ऐकुन राजाने मल्लयुध्दाचे आव्हान केले.सावित्री त्याच्याकडे देहभान हरपुन पाहतच राहिली. तेजस्वी मुद्रा, नेत्रातील विलक्षण चमक, बोलण्यातील नम्रता, त्रृषीमुनी व प्राणीमात्रांविषयीच्या आदरभाव, जिव्हाळा, पीळदार बाहु, सुंदर रुप, पहाडासारखे स्थीर व बलवान पाय! रोमारोमांतुन शक्तीदर्शन! तेज सामर्थ्य, मधूर पण निर्णायक वाणी, संयमी, मर्यादशील वर्तन पाहुन सावित्री प्रभावित, अचंभीत, अंतर्मुख झाली.

          तोच राजाने  सत्यवानाशी मल्लयुध्द करण्याची सैनिकांना आज्ञा दिली. सैनिक अंगावर येतसे पाहुन सत्यवान  राजाला म्हणाला, वाद आपल्या दोघांत असल्यामुळे लढाईही आपण दोघेच लढु या! चपलेला (हरणीला) कुटीत जायला सांगतो आहे तोच कांही सैनिक सत्यवानावर धावुन आलेत. सत्यवानाने त्यांचे वार त्यांच्यावरच उलटवुन क्षणार्धात सर्वांना घायाळ करीत भूमीवर लोळवले.

         सत्यवानाचा पराक्रम पाहुन राजा समजुन चुकला, हा युवक अत्यंत शूर असुन याच्यासमोर टिकाव लागुं शकत नाही. घाबरलेल्या व पोकळ आवाजात, सैनिकांना मागे फिरण्याचा आदेश देऊन , अश्वारुढ होऊन दौडत निघून गेलेत.

     सावित्री अनिमिष नेत्रांनी हे सर्व बघत होती. तीच्या मनामधे एकच नांव गूंजु लागले, सत्यवान…. सत्यवान…. सत्यवान, तीची अशी हर्षयुक्त हुरहुर लावणारी माणसिक अवस्था कधीच झाली नव्हती. एका गोड शिरशिरीने तीची काया थरारुन गेली. लाल कमळासारखे मुखकमल लालबुंद झाले. तीची ही अवस्था पाहुन महामंत्री काय ते उमजले. मनांत म्हणाले, बहुदा आपण योग्य स्थळी पोहोचलो. मिष्कीलपणे ते सावित्रीला म्हणाले, चलावे युवराज्ञी! समोर आतां कोणीच नाही!

          थोड्याच वेळांत त्यांचा रथ गौतमत्रृषींच्या आश्रमाजवळ पोहोचला. त्यांच्या आगममाची वार्ता आधीच गेल्यामुळे स्वतः गौतमत्रृषी, भारद्वाज, दालभ्यमुनी व इतर त्रृषीकुमार, त्रृषीपत्न्या, त्रृषीकन्या हे सर्वजण स्वागतासाठी उपस्थीत होते, पण सावित्रीचे लक्ष कुठेच नव्हते, तीच्या मनांत सत्यवान, सत्यवान व नेत्रांत त्याचे तेजस्वी, सामर्थ्यसंपन्न रुप व कानांत धर्माचरणयुक्त शब्द व अन्याया विरुधदची ठाम निर्धाराची वाणी घुमत होती. सर्वांना आश्रमांत आणुन सावित्री चा आदरसत्कार व प्रशंसा सर्व गुरुपत्नीं नी केला.

          आश्रमाबाहेरील पडवीत मंत्री व त्रृषीजन आसनस्थ झाले. दुग्धपान झाल्यावर गौतमत्रृषींनी महामंत्रींनी पृच्छा केली. तेही सावित्रीसह येथे येण्याचे काय प्रयोजन? नम्रपणे महामंत्रींनी वरसंशोधनाविषयी सर्व घटना, आलेले अनुभव कथन करुन म्हणाले, सावित्रीच्या गुणांना साजेसा पती शोधण्याच्या मोहिमेवर गुप्तपणे महाराज अश्वपतींच्या इच्छेनुसार निघालो आहे. पुढे मंत्री म्हणाले, इथे येत असतांना आश्रम दोन-तीन कोस अंरावर घडलेली घटना कथन करुन म्हणाले, सत्यवान नामक एका तेजस्वी, शूर, ज्ञानी पण नम्र, सदाचारसंपन्न,  गुणसंपन्न रुपवान युवकाचे दर्शन घडले.

       आतांपर्यत कोणाही पुरुषाकडे सावित्री आकर्षित झाली नव्हती, पण त्याचे आचार, शौर्ययुक्त वर्तन अत्यंत सामर्थ्यसंपन्न, अनुपम रुप त्याचे विचार, धर्मनिष्ठा पाहुन सावित्री लुब्ध झाली असे वाटते आणि मीही! तरी त्याच्याबद्दलची माहिती असेल तर सांगावी

         यावर प्रसन्न हसत गौतमत्रृषी म्हणाले, होय! तो सत्यवानच! क्षत्रिय राजकुमार आहे तो. त्याचे पिता आर्य द्युमत्सेन हे शाल्वदेशाचे राजा होते. त्यांनी केलेल्या यज्ञानंतर बारा वर्षांनी जो पुत्र झाला, तोच हा सत्यवान! चारच वर्षांनी त्यांची दृष्टी गेली. अमात्य व मंत्र्यांच्या राजद्रोहामुळे त्यांचे राज्य गमवावं लागलं, वेश पालटुन रातोरात महाराज द्युमत्सेन व महाराणी शैब्यादेवी या तपोवनांत आलेत, आणि आम्ही त्यांचे मनोभावे स्वागत करुन त्यांची सर्व व्यवस्था केली. हे राजकुटुंब आमच्यातील एक झाले आहे.

                          क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख

……………………………………………………………………………………………………………………

!!!  सावित्री  !!!

भाग  –  १९.

          गौतमत्रृषी पुढे सांगु लागले, सत्यवान राजमहालात जन्मला पण वाढला मात्र आश्रमातच! तो सर्व विद्या, कला, शस्रशास्र सर्व विद्यापारंगत आहे.त्याच्यासारखा रुपवान, गुणवान, सदाचरणी विद्यावंत क्षत्रिय युवक दुसरा असुच शकत नाही. अशाप्रकारची समग्र माहिती मिळाल्यावर महामंत्री अत्यंत आनंदी व प्रसन्न झालेत. सावित्री सुध्दा सत्यवानाच्या विचारात हरवुन गेली. तिचे कशातच लक्ष लागेना!

          एवढयांत त्या उन्मत्त राजाचा गर्व हरण करुन पराजय करुन सत्यवान आपल्या कुटीत परतला व येतांनाची घडलेली घटना माता-पितांना त्याने कथन करीत विचारले, तात! मी त्या गर्विष्ठ राजाला पुनः पुनः विनयाने, हे तपोवन असुन इथे मृगया निशिध्द आहे हे सांगुनसुध्दा तो ऐकत नाहीसे पाहुन त्याला दंडीत करावे लागले, यांत माझे कांही चुकले का? स्थैर्यबुध्दी, संयम विचलीत झाला का? अहंकार जागृत झाला का? द्युमत्सेन म्हणाले, नाही बाळा, तु योग्य तेच केलेस. आज आपल्या आश्रमात सर्वविद्यापारंगत, सर्वकलामंडीत, बुध्दीचे तेज, तरीही नम्र, आदरयुक्त भाव, त्रिभुवनांत सुंदर असलेली अश्वपती कन्या सावित्री व महामंत्रींचे आगमन झालेले आहे.

            सावित्रीचे वर्णन ऐकुन कधी तीला बघेन असे सत्यवानाला झाले.सावित्रीमय झाला तो. गौतमत्रृषी, भारद्वाज व इतर मंडळींनी सत्यवान सावित्री एकमेकांना अनुरुप असुन त्यांच्या विवाहाचा प्रस्ताव द्युमत्सेन व शैब्यादेवी समोर ठेवण्याचा विचार पक्का झाला. इकडे महामंत्रींनी  सावित्रीला एकाबाजुस नेऊन सत्यवानाची माहिती सागीतली, त्याचे पिता शाल्वदेशाचे महाराज असुन त्यांचेवर बितलेली हकीकत सांगुन,, सत्यवानाविषयीचे तीचे मत विचारल्यावर सलज्जपणे तीने होकार कळविला. अतिशय आनंदित होऊन महामंत्री म्हणाले, आज जरी हे कुटुंब राजभ्रष्ट झाले असले तरी, सत्यवान स्वपराक्रमाने त्याचे राज्य पुनः जिंकुन निश्चित परत मिळवेल याबद्दल खात्री आहे.

          ठरल्याप्रमाणे सर्व त्रृषींनी सत्यवान-सावित्रीच्या विवाहाचा प्रस्ताव द्युमत्सेन व शैब्यादेवी समोर ठेवल्यावर राजा द्युमत्सेन शंकाकुल स्वरात म्हणाले, मुनीवर्य! सावित्री एका बलाढ्य राजाची एकुलती एक कन्या आहे, ते या विवाहास कशी संम्मती देतील? त्यावर गौतममुनी म्हणाले, सावित्री सर्वगुणसंपन्न, सर्व विद्येत, कलेत अत्यंत श्रेष्ठ असल्यामुळे, नाकापेक्षा मोती जड नको, अशा विचाराने तीला आतांपर्यत कोणत्याही राजाकडुन मागणी न आल्यामुळे, धर्मात सांगीतल्याप्रमाणे, ती स्वतःच पित्याच्या आज्ञेवरुन आपल्या गुणांना साजेशा  वरसंशोधनास निघाली आहे.

         बर्‍याच महिण्यापासुन महामंत्रीसह देशोदेशी, राजश्रींची तपोवने पालथी घातली पण अनुरुप वर दिसला नाही, परंतु इथे येत असतांना आश्रमापासुन दोन तीन योजनांवर सत्यवानाबरोबर घडलेली घटना तीने स्वतःच्या डोळ्याने बघीतली. आणिसत्यवानाचे शूरत्व, रुप, गुण, आचार विचार पाहुन ती त्याच्यावर लुब्ध झाली. कारण ती सत्य, न्याय, धर्म यांना अग्रक्रम देणारी आहे. इतके सर्व तिच्याबद्दल ऐकल्यावर तारुण्यसुलभ सत्यवानाला तीला भेटण्याची, पाहण्या ची उत्कंठा लागली.

              थोड्याच वेळात महामंत्रीसह सावित्रीला बोलावण्यात आले. ते आसनस्थ झाल्यावर गौतमत्रृषींनी बोलायला सुरुवात केली. सत्यवान जरी राजपुत्र असला तरी सध्या तो राजभ्रष्ट असुन आश्रमीय जीवन व्यतीत करीत आहे. त्याच्या दृढनिश्चयानुसार तो माता-पित्यांना सोडुन, त्यांचा स्वाभीमान दुखावुन व स्वकर्तुत्व कधीही सोडुन कुठेही जाणार नाही. स्वकष्टार्जीत साधे अन्न ग्रहण करावे लागेल! हे सर्व राजकन्येला मान्य आहे कां? राजमहालातील सुखमय जीवन सोडुन आश्रमातील कष्टप्रद जीवन झेपेल का? यावर अतिशय नम्रपणे सर्वांना वंदन करुन म्हणाली, मला पुर्वीपासुनच भौतिकसुखाचं आकर्षण कधीच नव्हते व नाही. असंख्य शस्रधारी सैनिक सामर्थ्यापेक्षा, बुध्दीची धार, संस्कार, आचरण याचे सामर्थ्य मोठे असते यावर माझा विश्वास आहे.या माझ्या विचारांनुसार आपले शंकानिरसन झाले असावे असे वाटते.

                    क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

……………………………………………………………………………………………………………………

!!  सावित्री  !!

भाग  –  २०.

             सर्वांनी विवाहविषयक बोलणी करुन सत्यवान सावित्रीचा विवाह निश्चीत झाला. सर्वांची तोंडे गोड करण्यांत आली. शैब्यादेवीचे बरेच दिवस बंदिस्त असलेली कुलपरंपरेची जडावाची कुलभुषण रत्नकंकणे सावित्रीला हळद कुंकु लावुन सावित्री च्या हातात घातली. महामंत्रींनी सत्यवानाला एक छोटी मंजुषिका व  भरजरी शेला कुमकुम तिलक लावून अर्पन केला. सर्वजन खुप आनंदात होते  मात्र हे दोघेजन कुठेतरी हरवल्यागत झाले होते.दुसर्‍या दिवशी सावित्रीसह महामंत्र्यांनी मद्रदेश राजधानीकडे प्रस्थान केले.

         अश्वपती व मालवीदेवींना सावित्री बद्दलची चिंता सतावत होती. तिला “वर” मिळाला असेल की नाही?कशी असेल? खाणे पिणे कसे होत असेल? बराच कालावधी लोटला तरी कांहीच मंगलवार्ता मिळाली नाही म्हणुन दोघेही अस्वस्थ होते.

         इकडे सत्यवानाला सावित्री गेल्यावर अगदी रिते रिते झाल्यासारखे वाटत होते, रात्रभर  निद्रा कांही त्याला आली नाही. त्यामुळे भल्या पहाटे  बाहेर आला तर अंधारात कांही तरी चमकतांना दिसले, म्हणुन पाहतो तो काय?  सावित्रीच्या पायातील नृपुर!नियतीची इच्छा मानुन सावित्रीची आठवण म्हणुन तो नृपुर त्याने मंजुषिकामधे जपुन ठेवला, जणुं तो हवेतच तरंगत होता,  जेवणांत, मित्रांशी गप्पा मारण्यांत, कशातच त्याचे चित्त  लागेना! 

       इकडे अश्वपती व मालवीदेवी अस्वस्थपणे सोपाना जवळ आसनस्थ असतांना खणखणीत चिपळ्यांचा सुमधुर भक्ती स्वर निनादला! नारायण! नारायण!! आवाज ऐकल्याबरोबर दोघेही पती-पत्नी तत्परतेने उठुन देवर्षी नारदमुनींच्या चरणांवर भावपुर्ण नतमस्तक होऊन त्यांना आसनस्थ होण्याची विनंती केली. अत्यंत भावविभोर होऊन त्यांचा सत्कार केला. पुजन सुरु असतांनाच लगबगीने रथातुन उतरुन सावित्रीने महालात प्रवेश केला. देवर्षी नारदांनी रुपवान, सात्विक, तेजस्वी सावित्रीला निरखुन बघीतल्यावर अश्वपतीस म्हणाले, कन्या उपवर झालेली असतांना अजुन तीचा विवाह कां केला नाही? आणि आतां ही कुठुन आली?

        त्यावर अश्वपती म्हणाले, याच कार्यासाठी तीला पाठवले होते आणि हिने कुणा गुणवंत “वर” पसंत केला हे तिच्याकडुनच ऐकु या! पित्याच्या आज्ञेनुसार तीने सांगायला सुरुवात केली. देशोदेशींच्या नगरांत जाऊन अनेक राजे, राजपुत्रांची माहिती मिळवली पण मनाजोगा “वर” मिळाला नाही. फिरत फिरत गौतमत्रृषींच्या तपोवनात पोहचलो. तिथे राहत असलेल्या शाल्वदेशाचे राजा द्युमत्सेन बद्दलची, त्यांच्यावर बितलेल्या संकटा ची माहिती सांगुन, सत्यवानाचे शौर्य, पराक्रम, विनम्रता, कर्तव्यदक्षता हे सारे त्यांच्यात असलेले गुण पाहुन मनोमन मी त्यांना वरले

        हे ऐकुन नारद म्हणाले, सावित्री! हे तु काय केलेस?  नारदांचे बोलणे ऐकुन अश्वपती भयाकुल, शंकाकुल होत म्हणाले, सत्यवान सर्वगुण, सर्व विद्यासंपन्न असल्यावर आपण असे उद्गार कां काढलेत? नारदमुनी म्हणाले, सत्यवान हा अलौकीक गुणांची खान आहे. अमर्याद गुणांनी संपन्न असा मर्यादा पुरुषोत्तम आहे, रतिदेवाप्रमाणे दानशूर, उशीनर पुत्राप्रमाणे ब्राम्हणभक्त आणि सत्यवादी, ययाती प्रमाणे उदार असुन चंद्रासारखा प्रियदर्शन, रुपवान तर एवढा आहे की, जणुं अश्विनीकुमारां पैकी एक आहे.  तो जितेंद्रिय, विनयशील मृदुस्वभाव, कांतीमान व अत्यंत पराक्रमी आहे, असा “वर” सावित्रीसाठी त्रिभुवनांत शोधुन सांपडणार नाही. परंतु तो अल्यायुषी आहे. आजपासुन एक वर्षाने तो मृत्यु पावेल, हे ऐकुन सावित्री डोळे विस्फारुन पुतळ्यासारखी स्तब्ध झाली.

                        क्रमशः
संकलन – *मिनाक्षी देशमुख*

!!! सती सावित्री !!!

*जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे

सती सावित्री चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading