महाराणी पद्मिनी चरित्र भाग ३ , (१० ते १३)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

नागमतीला व्यवस्थीत समजावून त्या समजल्या नाही,त्यामुळे राणा म्हणाले,लक्षात ठेवा,चितोडच्या या मान बिंदूला कुठलाही धक्का लागता कामा नये,राणी पद्मिनींचा अवमान मुळीच सहन केल्या जाणार नाही.त्यांच्यासोबत  तुमचे वर्तन स्वच्छ आणि सरळच असायला हवे…

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

10

!!! महाराणी पद्मिनी !!!

                     भाग – १०.        

         नागमतीला व्यवस्थीत समजावून त्या समजल्या नाही,त्यामुळे राणा म्हणाले,लक्षात ठेवा,चितोडच्या या मान बिंदूला कुठलाही धक्का लागता कामा नये,राणी पद्मिनींचा अवमान मुळीच सहन केल्या जाणार नाही.त्यांच्यासोबत  तुमचे वर्तन स्वच्छ आणि सरळच असायला हवे…नागमतीने अशा कांही दृष्टीने राणाजींकडे बघितले की,त्या नजरेतला विखार राणाजींना टोचला, असह्य झाल्यामुळे ते संथपणे नागमती समीप जात म्हणाले,तुम्ही खरंछ पद्मिनीं चा स्विकार करणार नाही?देवी जे घडले ते बदलणे तर शक्य नाही.पद्मिनींचे स्थान आमच्या मनांत अढळ आहे. कोणाच्याही त्राग्याने,क्रोधाने,धमकीने बदलणार नाही.आता त्या आमच्या व चितोडसाठी महाराणी आहेत.

        क्षणभर थांबून म्हणाले,एक करुं शकतो,तुमच्या दृष्टिस पडूं नये म्हणून त्यांचेसाठी नवीन राजमहाल बांधल्या जाईल.कठोर स्वरांत म्हणाले,तुम्ही जाऊं शकतां.संतापाने घुमसत,विषारी फुत्कार टाकत नागमती त्यांच्या कक्षातून बाहेर पडल्या.त्यांना पद्मिनींच्या अस्तित्वाचा जेवढा त्रास होत होता,त्याहून अधिक त्रास होता,त्यांच्या अपूर्व सौंदर्याचा,मृदल सरळ स्वभावाचा,त्यांच्या निष्पाप, निरागसपणाचा..पद्मिनी नको होती त्यांच्या आणि राणांच्या आयुष्यातही…

         परंतु घडले मात्र वेगळेच.नागमतीं नी आपल्या मनातील भाव स्पष्ट बोलून दाखवले ही फार मोठी चुक केली. राणाजींना महाराणी म्हणून संबोधले. वेगळा महाल बांधला जाणार…अस्वस्थ मनाने,सर्व दिशांनी जणूं सारे जग अंधारुन आले अशा विचित्र मनःस्थितीत जड पावलाने,उदास मनाने आपल्या महालाकडे जात असतांना,राणाजींचा जिवाभावाचा मित्र पंडित राघव चेतनला बघून तिच्या अस्वस्थ मुखावर किंचित हसू उमटले.त्याचे राजपरिवाराशी स्नेहाचे संबंध होते.माता स्वरस्वतीदेवीचे त्यांच्या वर पुत्रवत प्रेम होते.नागमतीही त्याला जेष्ठ भावाप्रमाणे मानत होत्या.होतात तरी कुठे इतके दिवस?राणाजींच्या आदेशानुसार दिल्लीच्या सलतनविषयी माहिती काढायला गेलो होतो.राणाजी परत आल्याचे कळताच त्यांच्या भेटी साठी सत्वर आलो.क्षणभर थांबून त्याने विचारले,राणाजींनी एका अलौकिक व बुध्दीमान राजकन्येशी दुसरा विवाह केला,खरच का ही राणी एवढी रुपवती आहे?

       नवी राणी?ती केवळ राणी नव्हे.. महाराणी आहे..चितोडची व महाराजांची त्यांच्या शब्दात उपहास व मत्सर याचे मिश्रण होते.पण स्वतःला सावरले.राणां च्या प्रिय मित्राकडे मनातील भाव उघड करुन आणखी चुक नकोय!त्वरेने आपल्या कक्षेकडे जात असलेल्या पाठ मोर्‍या नागमतीकडे पाहून त्याच्या भिवया संकुचित झाल्या.पुढच्याच क्षणी तो राणांजींच्या महालाकडे निघाला.

         अतिशय सुंदर व मंत्रमुग्ध करणारे गीत ऐकून पद्मिनी म्हणाल्या,मनजीत इतके सुंदर कोणी गायले ग?मला त्या गाणसम्राटाचे दर्शन घ्यावेसे वाटते.राज कुमारी,ते राघव चेतन, चितोड दरबाराती ल राजगायक आणि राणांजींचे परममित्र नुकतेच दिल्लीहून परतले आहे.त्यांनीच राणाजींना गाऊन दाखवले असावे. राणाजी करतील तुमची इच्छा पूर्ण. पद्मिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नागमती च्या प्रत्येक हालचालीवर मनजीत डोळ्या त तेल घालून लक्ष ठेवीत असे.नागमतीं च्या कांही विशेष दासींशी मनजीतने मैत्री केल्यामुळे त्यांचेकडून कांही संकेत मिळाले की,ती राजकुमारीला सांगत असल्यामुळे नकळत लहानमोठे संघर्ष टाळतां येत होते.नागमतीच्या विषारी स्वभावाची कल्पना मनजीतला आल्या मुळे तिच्याकडून आलेली कुठलीही वस्तू ची नीट पारख करुनच पद्मिनीपर्यत पोहचत असे.

         चितोडच्या दक्षिणेस रावळमहाला पासून जवळच असंख्य कमळ असलेले देखणे सरोवर होते.आजवर कुणीही कधीही आपल्या पत्नीला दिली नसेल अशी भेट आपल्या प्रिय पत्नी पद्मिनीला देण्यासाठी त्या कमल सरोवराची निवड केली.ते वास्तुज्ञ शिवदीपसिंगला म्हणाले, लागेल तेवढे धन खर्च करा.आजपर्यंत कुणी स्वप्नातही पाहिले नसेल असे देखणे वास्तुशिल्प घडायला हवे.चहुबाजुं नी जलाने वेढलेल्या सागरीबेटा सारखा हा जलमहाल असायला हवा.आपल्या कडे वेळ फार कमी आहे.अगदी लवकरा त लवकर हा महाल पुरा व्हायला हवा!

         आणि कांही दिवसांतच अतिशय आकर्षक तीन मजली पद्मिनी महल चहू बाजूंनी वेढलेल्या जलात मोठ्या ऐटीत हंसासारख्या शुभ्र रंगाचा देखणा प्रासाद उभा राहिला.अति सुंदर!शिवदीपसिंहजी तुम्ही घडवलेल्या या अजोड कलाकृतीला तोड नाही.आम्ही प्रसन्न आहोत.हे घडवणार्‍या कारागिरांना त्यांच्या इच्छे नुसार बिदागी वाटा.

               क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

               दि.  २५-१-२०२२.

11

!!! महाराणी पद्मिनी !!!

                     भाग – ११.

         जलमहाल पूर्ण झाल्यावर राणाजी  पद्मिनींना महाल दाखवायला घेऊन आले  व म्हणाले पद्मिनी,तुमच्यासारख्या सागर कन्येला या कमळसरोवरात उभा असले ला हा पद्मिनीमहाल,आमच्या प्रितिच्या  रुपात स्विकार करावा.आम्ही तुमच्या मातोश्रींना वचन दिले होते कि,तुमच्या कन्येला कांहीही कमी पडणार नाही, माहेरची आठवण येऊ देणार नाही.पसंत आहे ना?पद्मिनी पतीप्रेमाणे भारावून गेल्या.एका शुभदिनी राजमातेच्या अनुज्ञेने महाराज रतनसिंहासमवेत पद्मिनींनी जलमहालात प्रवेश केला.

          होळी पोर्णिमेला चितोडगडावर होलिकोत्सव मोठ्या थाटाने साजरा केला जाई.सर्व प्रजाजन या उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थिर राहत.राजमहाला समोर चे विशाल प्रांगण गर्दीने भरुन जाई.मध्य भागी मोठे रिंगण बनवून त्यात राळ, लाख,झाडांच्या वाळल्या साली,तूप या वस्तुंची होलिकेची प्रतिमा तयार केली जायची.मूर्तीभोवती भली मोठी लाकडां ची रास रचली जाई.सूर्य मावळल्यावर स्वतः राजमाता पेटत्या मशालीने  होलिकेच्या प्रतिमेला स्पर्श केला की, क्षणार्धात होलिका पेट घेई.राक्षसीवृत्तीचा नाश करुन,सर्वत्र सात्विकतेचा संदेश देणारा हा होळीचा सण चितोडगडात मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होत असे.विशेष म्हणजे कुठलीही बंधने न पाळतां राजपरिवार लोकांमधे मिसळत असे.रात्री उशीरापर्यत नृत्य, गायन,कलाकार आपल्या विविध कलांचे प्रदर्शन करुन सर्वांना मंत्रमुग्ध करत.राज गायक पंडित राघव चेतन यांचे गायन या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असे.

        आजच्या या कार्यक्रमासाठी राणी नागमती विशेष जामानिमा व नटून थटून आल्या होत्या.आणि राणी पद्मिनी साध्या शुभ्र वस्रातही अतिशय लावण्यवती दिसत होत्या.राणाजींची नजर त्यांचेवरुन हटत नव्हती हे बघून व त्यांच्याकडे एकदाही न पाहिल्याने नागमतीचा संताप पराकोटीला गेला.आणि तोल जाऊन जोरात ओरडल्या बंद करा हा तमाशा! होलिकोत्सवाचा प्रणयोत्सव होत असेल तर असे सण साजरे न केलेलेच बरे!पुढ च्याच क्षणी बेरंग करुन सख्यांबरोबर निघून गेल्या.गोंधळ सुरु झाल्यामुळे, महामंत्री सुजानसिंहांनी हा सोहळा संपल्याचे जाहीर केले.चितोडगडावरील होलिकोत्सव आजपर्यंत कधीही असा अर्धवट,अधूरा राहिला नव्हता…   

         काल मागमतींनी उत्सवाचा बेरंग केल्यामुळे,आपले अस्वस्थ मन शांत करण्याकरितां राणी पद्मिनी मनजीत व कांही सख्यांसोबत राजउद्यानांत आल्या.थोड्या वेळाने राघव चेतने येत नमस्कार करत स्वपरिचय देत म्हणाला, मी राणांजीचा परम मित्र,व राजमाता पुत्राच्या ठायी मानत असल्यामुळे मला   सर्वीकडे मुक्त संचार आहे.आणि पद्मिनीं ची स्तुती करु लागला,हे न आवडून पद्मिनीने त्याची कानउघाडणी केली. तिच्या नेत्रातील तिरस्काराची ठीणगी राघवचेतनचे ह्रदय जाळीत गेले.हा सौंदर्याचा की,महाराणीपदाचा अहंकार? या गर्विष्ठ राणीला धडा शिकवेन तरच नावाचा राघव चेतन…तिची उपेक्षा राघवला अधिकच बोचली.

            आजचा दरबार विशेष कारणा साठी बोलावला होता.सुवर्णसिंहासनावर राणाजी विराजमान होते.त्याच्या समीप महाराणी पद्मिनी व राणी नागमती रिध्दी  सिध्दी सारख्या शोभून दिसत होत्या. राणाजींनी बोलायला सुरुवात केली. अमरसिंहजींच्या स्वर्गवासानंतर महासेना पतीची जागा रिक्त झाली.त्या जागेवर त्यांच्याच तोडीचा बुध्दीमान व पराक्रमी वीराच्या शोधात होतो.तो आमचा शोध संपला आहे.सार्‍या नजरा राघव चेतन कडे वळल्या.राघव चेतनच्या चेहर्‍यावर अभिमान पसरला.अस्वस्थपणे तो राणां जीकडे बघू लागला.

       चितोडच्या राजा इतकेच महत्वाचे असलेले महासेनापतीचे पद अशा श्रेष्ठ व्यक्तीमत्वाला,ज्याला कुठल्याही प्रकार ची महात्वाकांक्षा नाही,पदाचे,संपत्तीचे किंचितही आकर्षण नाही.विनय आणि नम्रता ज्याच्या अंगी भिनलेली आहे, चितोडचा नवा महासेनापती अत्यंत गुण संपन्न,शौर्य,पराक्रम,राजनिष्ठा आणि तत्पर निर्णायक शक्ती ज्याच्या ठायी आहे,ज्याच्या नेतृत्वाखाली युध्द लढलो व त्या सर्व युध्दात जीतच मिळाले,जे रणसंग्रामात अत्यंत कठोर व शत्रूला कर्दनकाळ,पण आपल्या मृदु,मधुर बोलण्याने सर्वांना अति प्रिय आहेत ते काका गोरासिंगजींना महासेनापती म्हणून आज मी जाहीर करतो.सारी सभा स्तब्ध झाली.गोराकाकांच्या महासेनापती होण्याने सर्वांनाच अतिशय आनंद झाला. नाराज आणि निराश झालेला राघव चेतन या आनंदोत्साहातून कधी आणि कसा बाहेर निघून गेला,कुणाला कळलेही नाही.

                क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

              दि.  २५-१-२०२२.

12

!!! महाराणी पद्मिनी !!!

                      भाग – १२.

       वैद्यराज, तीन दिवस झाले तरी महाराणी पद्मिनीच्या ज्वराला उतार नाही सर्व औषधोपचार सुरु असून,काय कारण?ताप कां उतरत नाही?राजमाता, माझ्या अभ्यासानुसार,हा ज्वर साधा नाही.ज्वर अत्यंत तीव्र असून,वर्ण लालसर झाला आहे.कालपासून त्या पूर्ण ग्लानित आहेत.कळत न कळत महाराणीच्या खाण्यात असे कांही आले असावे….वैद्यराज,आपण काय बोलता, अर्थ ध्यानात येतो का?तीव्र स्वरात राज माता म्हणाल्या..

     क्षमा असावी,परंतु जे दिसते ते सांगणे माझं कर्तव्य आहे.कुटकवल्ली वनस्पती पोटात गेल्यावर जी लक्षणे निर्माण होतात,ती सर्व महाराणीत दिसत आहे.हे एवढ्यावरच थांबणार नाही तर,

ज्वराचे प्रमाण आणखी वाढून उद्या पासून संपूर्ण अंगावर या विषवल्लीचे परिणाम दिसूं लागतील,अंगावर लालसर पुरळ येऊन दोन दिवसांनी रंग काळसर होईल.कमीतकमी सात दिवस त्यांना सोसावे लागेल.

      अरे देवा!नेमके राणाजी इथे नसतांना हे घडावे?राणीसाहेब बर्‍या होतील ना?बर्‍या होतील पण त्वचेवर भाजल्याचे काळसर व्रण…वैद्यराज, प्रत्येक दुखण्यावर वैद्यकशास्रात उपाय असतो ना? होय राजमाता,मी प्रयत्न करतोच पण खात्री देऊ शकत नाही. नाही..नाही..मनजीतचा स्वर कठोर झाला.हे नक्कीच कुणीतरी घडवून आणलेले आहे.मनजीतऽऽ, वैद्यराज या तुम्ही…इथलं बोलणं इथेच रहायला हवय प्रणाम करुन ते निघून गेले.

         मनजीतऽऽ तूं सिंहलद्वीपच्या राज कुमारीची अत्यंत निकट सखी आहेस. तुझ्या प्रत्येक शब्दाला फार महत्व आहे. असे विसंगवाद पसरायला वेळ लागाय चा नाही.जी राजमाता!मनजीत पद्मिनी ला क्षणभरही डोळ्याआड होऊ देत नव्हती. वैद्याच्या प्रत्येक सुचनाचे ती अत्यंत तंतोतंत पालन करीत होती.हळू हळू ज्वर उतरला,अंगावरचे लालसर पुरळ काळे पडूं लागले.अंगाचा दाह असह्य होऊ लागला.धीराने घ्या राजकुमारी…होईल सर्व ठीक.वैद्याचे औषधोपचार सुरु आहेत.

       ज्या माझ्या सोनेरी कांतीचे राणीमां ना कौतुक होते,ते सौंदर्यच नाहीसे झाले आहे,त्यात राणाजीही इथे नाही हे एक प्रकारे बरेच झाले.ज्या सौंदर्यवती पद्मिनी वर त्यांनी प्रेम केले,जिच्यासाठी सात समुद्र ओलांडले,सार्‍या जगाशी लढून जिंकून आणले,त्या पद्मिनीला अशा विरुप अवस्थेत ते पाहूच शकले नसते. तेवढ्यात नागमती येऊन मानभावीपणे म्हणाली,तुमचा संसर्ग आम्हाला होऊ नये म्हणून राजमातेने भेटण्यास मनाई केली  असली तरी,न राहवून आम्ही तातडीने भेटायला आलो.आम्ही लवकरच ठीक होऊ,चिंता करुं नका.परंतु तुमच्या रुपा वर उमटलेले व्रण कायम राहतील…जे घडले त्यात ईश्वराचा कांही हेतू असेल, देवी पद्मावतीवर आमची अढळ श्रध्दा आहे.पद्मिनीचे आत्मविश्वासाचे उद्गार ऐकुन,निराश,उदार पद्मिनीला पाहण्या च्या उद्देशाने आलेल्या नागमतीचा विरस झाला.नाराजीनेच त्या परत गेल्या.

         आणि खरेच,पद्मावतीदेवीच्या कृपेने जिवावरच्या दुखण्यातून पद्मिनी पूर्ण बर्‍या होऊन त्यांची कांती पूर्वीप्रमाने तेजस्वी झाली.अंगावर एकही व्रण राहिला नाही.फक्त एक तिळाएवढा डाग हनवटीच्या डाव्या बाजूने राहिल्यामुळे त्यांच्या सौंदर्यात भरच पडली.यामुळे राणी नागमतींचा संतापाने नुसता तिळ पापड झाला.

         राजमातेबरोबर पद्मिनी भगवान एकलिंगजीच्या मंदिरात पुजा व अभिषेक घालायला आल्या.राजमाता म्हणाल्या,हे मोठे जागृत देवस्थान असल्यामुळे आम्ही तुमच्यासाठी नवस बोललो होतो.”सर्वाभीष्टअभिवृदर्धयम्”  पुजार्‍याच्या मुखातून प्रत्यक्ष भगवान एकलिंगजी बोलल्याचा भास पद्मिनींना झाला.भावविभोर होऊन राजमातेसह गाभार्‍यातून मंदिराच्या स्फटिक पायर्‍या वर दोघीही बसल्या.समोरचे नयनरम्य दृष्य पद्मिनी भान हरपून पाहत होत्या. खरच ईश्वराने ही सृष्टी बनवतांना केवढा विचार केला असेल?निश्चितच!राजमाता  म्हणाल्या,केवळ सृष्टी बनवून तो थांबला नाही.तर त्याने मानवही निर्माण केला. केवळ मानव नव्हे राजमाताऽऽ!प्रथम ईश्वराने “सा” म्हणजे सागरी प्राणी, “रे” म्हणजे रेतीवर जगणारे प्राणी,”ग” म्हणजे गगनात उडणारे प्राणी,”म” म्हणजे मानव

ज्याला तो घडवूनच थांबला नाही तर, “प” म्हणजे पराक्रमी,पराक्रमाने सारे जग जिंकून प्राणीमात्रांवर सत्ता गाजवेल, काळजी घेईल असा मनुष्य, “ध” म्हणजे धर्म जाणणे,ज्या धर्माभ्यासकाने स्वतःच स्वतःमधे प्रगती केली,आणी “नि” म्हणजे

निर्वाणाची जाण असणारा अत्यंत बुध्दी मान मानवाची निर्मिती झाली.ईश्वराने घडवलेली ही कलाकृती म्हणजे रुणझुणणारे सप्तसुरांचे संगीत म्हणजे हे जग!राजमाताऽ, सारेगमपधनि या सप्त सुरांवर जग डोलते ते उगाच नाही.हे सूर म्हणजे जगाची निर्मिती आणि प्रगतीचे मुळ आहे.सूर नेहमीच जुळवावे लागतात मग ते मनाचे असोत वा संगीताचे!मैत्रीचे असो वा ईश्वरभक्तीचे…किती सुंदर बोलतेस ग पद्मिनी,अगदी ऐकत राहावेसे वाटते.कांहीतरीच! संकोचाचे भाव उमटले पद्मिनींच्या मुखावर!थोड्या वेळाने प्रासादाकडे परतल्या..

              क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

              दि.  २५-१-२०२२.

13

!!! महाराणी पद्मिनी !!!

                    भाग  – १३.

          राणी नागमती अत्यंत अस्वस्थ झाल्या.त्यांची योजना विफल झाली.देऊ केलेले धन नाकारुन वैद्यराजांनी योग्य उपचार करुन महाराणी पद्मिनींना पूर्ण बरे केले.प्रिय दासी कुंजरीला म्हणाल्या, कुंजरीऽ,त्या पद्मिनींचे अस्तित्व मला सहन होत नाहीय,महाराजांचे तिच्या वरील प्रेम,तिचे अपरिमित लावण्य मला सारं सहन करणं कठीण जात आहे.बरं ती सारं समजूनही माझेशी प्रेमाने वागते, तिची सावलीने देखील माझा दाह होतो.

            पण राणीसाहेब,पद्मिनींच्या वागण्यात कृत्रिमता,खोटेपणा नाही. तुम्हाला वचन दिल्यापासून त्या व्रतस्थ आहे.महाराजांसमवेत एकांत… कुंजरी तू माझी प्रिय सेविका आहेस,विसरुं नकोस कुंजरी,आपण टाकलेला हा पहिला डाव जरी पूर्णपणे फसला,तरी प्रत्येकवेळी दैव साथ देईलच असे नाही.पण राणीसाहेब, त्यांची ती दासी मनजीत अत्यंत चतूर आहे.तिला मजविषयी संशय..मी तुझ्या पाठीशी असतांना भीती कसली? माझ्या आयुष्यात घुसलेला काटा कायमचा काढण्यास तू मदत केलीस तर,तुझ्या सात पिढ्यांचे कोटकल्याण होईल एवढे धन देईन.तीला फक्त विरुप करायचेय, महाराजांना आकृष्ट करणारे तिचे सौंदर्य नाहीसे करायचे,ज्यामुळे तिचे जीणे सामान्य सेविकेपेक्षाही…

        राणीसाहेब,यासाठी पंडित राघव चेतनची मदत घेतली तर?त्यांना महासेना पतीचे पद न दिल्यामुळे ते महाराजांवर नाराज आहे.नागमतींच्या डोळ्यात वेगळीच चमक उमटली.अगऽ मग एकांतात,कुणालाही कळणार नाही अशी त्यांच्याशी भेटण्याची व्यवस्था कर ना..तूं फक्त त्यांना मी बोलावल्याचे सांग,माझा शब्द ते टाळू शकत नाही.कारण एके काळी माझ्या शब्दामुळे महाराज समर सिंगच्या कोपातून त्यांची सुटका केली होती.ते ऋण आहे त्यांचेवर.

           त्या रात्री हवेत जास्तच उष्मामुळे  राणाजींना तहान लागल्याने जाग आली. ते सज्जात आले.बाहेरचे शांत वातावरण पाहून,पद्मिनीही अशीच झोपली असेल की,आपल्यासारखीच एकांतभेटीत तळमळत असेल?तिच्याशिवाय व्यतीत करावा लागणारा एकएक क्षण त्यांना कठीण वाटू लागला.परंतु स्री केवळ प्रितिचे रुपच नव्हे तर साक्षात संयम! म्हणूनच पद्मावतीदेवीच्या दृष्टांतानुसार ती अजूनही व्रतस्थ आहे.ती आपल्या व चितोडगडाच्या कल्याणास्तव हे व्रत करीत आहे. आपण साथ द्यायला हवी!

            तेवढ्यात राजउद्यानाच्या कुंपणा वरुन काळे वस्र लपेटलेली एक व्यक्ती  राजप्रासादाच्या द्वाराकडे लपत छपत जातांना राणांना दिसली. कोण आहे? राणाजींचा आवाज वातावरणात घुमल्या बरोबर द्वाररक्षकं त्या व्यक्तीच्या मागे धावले.पण काळे वस्र फेकून ती व्यक्ती दिसेनासी झाली.महाराज, कोण होतं ते नाही कळले,निराशेने रक्षक येऊन म्हणाला.तो चोर नक्कीच नसावा,त्याची चाल परिचित वाटली.नक्कीच तो राजप्रासादातल्या कुणातरी व्यक्तीला गुप्तपणे भेटायला आली असावी.कोण असेल?कोणाला भेटायला गुप्तपणे आणि कोणत्या हेतूने आला असेल?

राणांजीच्या मनाला बोचणारा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला.

           दुसर्‍या दिवशी राणाजी आणि महाराणी पद्मिनी पुष्पकुंजात बसले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर, गंभीर स्वरात राणाजी म्हणाले, कांही गोष्टी तुमच्या कानावर असाव्यात म्हणून इथे आणले,काल रात्री घडलेल्या घटने बद्दल सांगून म्हणाले,तुमच्या सुरक्षितते विषयी मन चिंतित झाले.महाराज, माझी चिंता करुं नका.मी अगदी निद्रेतही बेसावध नसते.माझी तलवार नेहमी माझ्याजवळ असते.शिवाय माझ्या स्री सेनेमधील माझ्या शस्रसज्ज सख्या आसपास असतात.

          पद्मिनी मला राघव चेतनवर संशय आहे. महासेनापतीपद न मिळाल्यामुळे तो फार दुखावल्या गेला आहे.तो माझ्या जवळचा मित्र असल्या मुळे मी त्याचा स्वभाव चांगल्याप्रकारे परिचित आहे.तो अत्यंत तापट,तीव्र संतापी,मनचंचल,बुध्दी अस्थिर,धन आणि सन्मानाचा त्याला अनावर लोभ आहे.त्याच्यात असलेल्या कलागुणां बरोबर तलवार बहाद्दर देखील आहे. युध्दनीतीचे त्याला उत्तम ज्ञान आहे.कांही युध्दात त्याच्या पराक्रमाने व धाडसी निर्णयाने विजय सुध्दा प्राप्त झाला होता. पण त्याच्यातील गुणांपेक्षा दोष अधिक तीव्र आहेत.तो महासेनापती पदासाठी कधीच योग्य नव्हता. पद न मिळाल्याने तो नाराज आहे.मला भय वाटते की, त्याच्या या अस्थिर मनःस्थितीत कुणी शत्रू त्याला हाताशी धरुन कांही अनर्थ घडवून आणेल…,!

      तेवढ्यात नखशिखांत काळी वस्रे घातलली व्यक्ती तलवार उपसून राणांजी कडे येतांना पद्मिनींना दिसल्याबरोबर सरोवराकडे बघत असलेल्या राणाजींना सावध करायलाही अवधी नव्हता.त्यांनी क्षणही न गमावता,तिथेच पडलेला दगड उचलून त्या व्यक्तीच्या मस्तकाचा नेम  धरुन भिरकावला,मस्तकावर अचूक झालेल्या प्रहाराने हातातील तलवार निसटली व तोल जाऊन,मस्तक धरुन खालीच बसला.धावत आलेल्या रक्षकांनी त्याच्या चेहर्‍यावरचा बुरखा काढला.राणाजींचे भय खरे ठरले.व्यथित स्वरात राणा म्हणाले, राघव चेतन तुम्ही असे करायला नको होते….

             क्रमशः
संकलन व ©®  मिनाक्षी देशमुख.

          दि.  २५-१-२२.

             

 

महाराणी पद्मिनी चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading