आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

गांधारी चरित्र संपूर्ण भाग ५, (१७ ते २०)
गांधार देशीच्या सुबल राजाला एक सुलक्षणी,अद्वितीयरुप,चारित्र्य संपन्न अशी गांधारी नांवाची राजकन्या होती. ती बालपणापासुनच श्रध्दाळु, धार्मिक असुन भगवान महादेवावर नितांत श्रध्दा होती.महादेवांची भजन पुजन,उपासना करणे हे तिचे नित्याचेच काम! कडक व्रतसाधना केल्याने………………………….
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! गांधारी !!!
!!! गांधारी !!!
भाग १७.
दुर्योधन धुसफुसत ढीम्म तिच्या समोर उभा होता.ती पुढे म्हणाली! बेटा! तू, तुझे भाऊ,कर्ण, शकुनी द्वेषाने पेटलेले… तुमच्या निचतेने पांडवांना भिषण वनवास व अज्ञातवास भोगावा लागला.एवढा भयंकर अपराध केल्यावर किमान आतां तरी सर्व वैरभाव मिटवून सलोखा कर, संधी कर!पांडवांचे राज्य हडपणे तुझ्या सामर्थ्याबाहेर आहे.अरे!भीष्म,द्रोणाचार्य कृपाचार्य हे महारथी राजधर्माला बांधील असल्यामुळे जरी तुझ्या बाजुने लढले तरी ते पुर्ण शक्तीनीशी तुझ्यातर्फे लढणार नाही, कारण त्यांच्या मनांत पांडवांबद्दल नितांत प्रेम आहे.हे सर्वजन राजकर्त्या पेक्षा धर्माला,न्यायाला,नीतीला,तत्वाला मानतात.हे महारथी तुटुन पडतील पण पांडवांचे वाईट चिंतणार नाही.यांत तुझा घात आहे.
दुष्ट दुर्यौधनावर गांधारीच्या कळकळीच्या उपदेशाचा कांहीही परिणाम झाला नाही.त्याने आपला हट्ट जिद्द सोडली नाही.दुर्योधनाने आईच्या बोलण्याचा पूर्णपणे अनादर करुन दाण दाण पाय आपटत निघुन गेला.त्याने आपला हट्ट व जिद्द सोडला नाही परिणामी महायुध्दाचा निर्णय घेतल्या गेला.
गांधारीचे खरे धन म्हणजे विचारा धन!पण तिच्या मुलांना मातीमोलाचे वाटते हेच तिचे सर्वात मोठे दुर्भाग्य!गांधारीला हे युध्द,हा नरसंहार नको होतं शेवती मनाविरुध्द घडणार्या घटना शांतपणे पाहण्याचे बंधन तिने मनावर लादुन घेतले.आणि तपस्विनी व्रतस्थ होऊन बसली.वास्तविक गांधारीचे पुर्ण जीवन म्हणजेच एक कठोर तपस्या होती.पती अंध म्हणुन नेत्रसुखाचे दान केलेली ही सती,साध्वी पतीव्रता नवर्या ला व मुलाला अन्यायाच्या,अधर्माच्या अनितीच्या मार्गावरुन मागे खेचु पाहणारी मानस्विनी पत्नी व माता, स्वतःचे मन निर्धाराने धर्माच्या मार्गावर ठेवणारी संयमी स्रीने ही सर्व मानसिक तपोसाधना साधली होती.
या अलौकिक साधनेतुन,तपस्येतुन गांधारीने जे विलक्षण सामर्थ्य प्राप्त केले होते,ज्याची जाणीव अनेकांना होती.दुर्योधनाला मातेच्या या विलक्षण योगसामर्थ्याची पुर्ण जाणीव होती.आप ल्या आईच्या एका शब्दाच्या आशिर्वादा त आपला विजय नक्की होऊ शकतो हा आत्मविश्वास त्याला होता,म्हणुनच युध्दाच्या पहिल्या दिवशी दुर्योधनाने तपस्विनी आईचे पाय धरुन विजयाचा आशिर्वाद मागीतल्यावर,एक क्षण…. निस्तब्धतेत….निर्धाराने कठोर ह्रदयाने गांधारी म्हणाली,”जेथे धर्म,तेथे विजय”! विजय हवा असेल तर अधर्माचा त्याग करुन धर्माचा आश्रय घे!पांडवांशी संधी कर! अर्थातच दुर्योधनाला पटने शक्य नव्हतेच.मन चरकले,चेहरा खर्रकन उतरला.धन्य ती गांधारी व तीची तत्वनिष्ठा!युध्दवेळी सुध्दा मुलाला आशिर्वाद न देता अविचल राहिली. गांधारीचा उपदेश किती मार्मिक व हितकारी होता.ती श्रीकृष्ण,अर्जुनाचा महिमा जाणुन होती. पण….
अठरा दिवस कुरुत्रावर फार मोठा संहार झाला.युध्द सुरु असतांना दुर्योधन युध्दावर जाण्यापुर्वी रोज आशीर्वादा साठी आईला प्रार्थना करायचा,पण ह्रदयावर दगड ठेवुन ती स्तब्ध असायची कारण तिला तिच्यातील सामर्थ्याची, तेजाची पुर्ण जाणीव होती,दिलेला आशिर्वाद विफल ठरणार नाही.पण अन्यायी,अत्याचारी असल्याने मुलगा म्हणुनही गय न करतां आपल्या कठोर निर्धारावर ठाम राहिली.आशिर्वाद दिला नाही.अठरा दिवस संपले.शंभर कौरव वीर, सैन्य, रथी महारथी युध्दात कामी आलेत.पांडव विजयी झाले.अठराव्या दिवशी दुर्योधन भीमाचे गदायुध्द होऊन, केलेल्या प्रतीज्ञेप्रमाणे सूड घेऊन भीमाने त्याचा वध केला.एवढा भिषण हत्याकांड झाल्यावर,शेवटी तीही एक स्रीच होती ना? आतां फक्त गांधारी… पुत्रहीन माता! पुत्र दुष्ट अन्यायी,अविचा री असले तरी आईचे पुत्रच होते ना?त्यांची झालेली हत्या… आईचे ह्रदय आर्त टाहो फोडतो, मन आक्रंदते,शोक, दुःखाने विदिर्ण होते.हळुहळु तिच्यातील सयंमीत शांतता नष्ट होऊन त्याची जागा दुःखाच्या जोडीला अंतःकरणांत संताप! क्रोधाचा भडाग्नी मनात धुमसु लागतो.
क्रमशः
संकलन- मिनाक्षी देशमुख.
!!! गांधारी !!!
भाग – १८.
गांधारी ही एक तपस्विनी स्री होती.अतिव पुत्रशोकाच्या दुःखाने बेभान अवस्थेत शापाच्या रुपाने पांडवां सह सर्वांना भस्म करण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे ही गोष्ट श्रीकृष्ण व युधीष्ठीर जाणत होते,त्यामुळे एवढा पांडवांचा विजय,आनंदाचा क्षण,परंतु श्रीकृष्ण व युधीष्ठीर अस्वस्थ होते. श्रीकृष्णाला जणुं भविष्याचा वेध लागला होता.म्हणुनच तो स्वत,पांच पांडव,सात्यकीसह ओघवती नदीकाठी तंबु ठोकुन राहु लागले. गांधारी शोका तिशयाने क्रोधित होऊन शाप देण्याच्या विचारांत असललेली,व्यासांना अंतर्ज्ञाने कळल्याबरोबर ते सत्वर येऊन तिचे सांत्वन करुं लागले.
अस्वस्थ युधीष्ठीर,गांधारीच्या मनां तील धगधगत्या संतापाचा अंगार जाणत होता,कारण गांधारीच्या सर्व पुत्रांचा वध,दुर्योधन,दुःशासनास गदेन मारुन भीमाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केलेली,अशा अनेक गोष्टींमुळे शोक संतप्त गांधारी जर अनावर झाली तर ती त्रैलोक्यालाही जाळुन खाक करेल!या भयानक विचाराने श्रीकृष्णासह पांडव तिचे सांत्वन करण्यासाठी तिच्याकडे गेलेत.
तोपर्यंत व्यासांनी तिला असत् संकल्पा पासुन वाचविले होते.तिच्या मनांतील क्षोम कमी करण्याच्या दृष्टीने युधीष्ठीर तिच्या जवळ जाऊन स्वतःचा धिक्कार करुन तिच्या पाया पडु लागला तेव्हा गांधारीची क्रोध दृष्टी पट्टीमधुन युधीष्ठीराच्या पायाच्या नखांवर पडल्या बरोबर त्याची नखे काळे ठिक्कर पडली या घटनेवरुन गांधारीच्या पावित्र्याच्या सामर्थ्याची कल्पना येते.अखेर तिने आपला क्रोध श्रीकृष्णावर काढला.खरं तर असं म्हणने जास्त संयुक्तीक होईल की,श्रीकृष्णाने तिची बुध्दी फिरवुन पांड वांना तिच्या क्रोधापासुन वाचविले. श्रीकृष्ण गांधारीला म्हणाला, देवी!तुझ्यासारखी तपोबलसंपन्न स्री आज या जगात नाही.कौरवपांडवांचा समझौता होण्यासाठी माझ्यासमोर भरसभेत धृतराष्र्टाची केलेली कानउघाडणी केवढी प्रभावी होते,धर्मयुक्त, अर्थपुर्ण विचार!महायुध्दाच्या १ ल्या दिवसां पासुन दुर्योधन विजयाच्या आशेने रोज आशिर्वाद मागण्यासाठी येत होता,पण तूं त्याला कधीच आशिर्वाद दिला नाही.उलट कठोरपणे रोज म्हणायचीस “जेथे धर्म,तेथे जय”! तुझे शब्द खरे ठरले पांडवांच्यामागे धर्माचे प्रतिष्ठान होते. देवी! शोक नको करुस!तूं आपल्या तपस्येच्या बलावर क्रोधाय संहारक शक्तीने चराचरातील प्राण्यांसह संपुर्ण सृष्टी भस्मसात करुं शकतेस.म्हणुन देवी! क्रोध आवर!शांत हो!पांडवांच्या विनाशाची इच्छा देखील मनांत आणु नकोस.प्रक्षुब्ध मनाच्या अवस्थेतुन गांधारी हळुहळु शांत झाली.
थरथरत्या आवाजात गांधारी कृष्णाला म्हणाली,पुत्रशोकामुळे मनांत विलक्षण व्यथा होत होत्या.वेदनेच्या आगीत जळत असल्यामुळे बुध्दी विचलित होऊन सूडाचा विचार शापाचा उद्रेक मनांत डोकावत होता.क्रोधाचे अग्निकुंड भडकण्याच्या आंतच एक क्रुध्द तपस्विनी शांत झाली,पण दुसर्या दिवशी सकाळीच,द्रोणपुत्र अश्वत्थामाने रात्री पांडवांच्या शिबिरात घुसुन सर्व पांडवपुत्र वीर, व सैनिकांची हत्या करुन पळुन गेला.पण अर्जुनाने त्याला शोधुन काढले.पण गुरुबंधुची हत्या नको,शिक्षा म्हणुन त्याच्या मस्तकावरचा मणी कापुन व श्रीकृष्ण त्याला शाप देऊन सोडुन दिल्या जाते.
या घटनेने पांडवांना महायुध्दात जय मिळुनही,सर्व पुत्रांची हत्या झाल्या मुळे ‘जय’ हा पराजयात परिवर्तीत झाला.गांधारीला ऐकुन फार दुःख झाले. अंत्यविधी करण्यासाठी सुनांसह गांधारी बाहेर पडणार,तेवढ्यात पांच पांडवांसह श्रीकृष्ण भेटीस येत असल्याचे समज ल्यावर,गांधारीच्या डोक्यात परत कीडा वळवळु लागला.याच पांच भावांनी माझ्या शंभर पुत्रांना ठार केले,या विचारांबरोबर मनातील तिव्र संताप उफाळुन आला,व पांडवांना शाप देऊन त्यांना नष्ट करण्याचा संकल्प येऊ लागला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! गांधारी !!
भाग – १९.
श्रीकृष्ण पांच पांडवांसह धृतराष्र्टा च्या भेटीस गेले असतां, धृतराष्र्ट् भीमाला कवेत घेण्यास पुढे आल्यावर त्याच्यासमोर लोखंडी पुतळा समोर केला असतां त्या लोखंडी पुतळ्याचा चुरा चुरा झाला.पापी अंधाच्या सूड कृत्यात केवढी प्रंचड शक्ती दडलेली होती.गांधारी सारख्या कठोर तपस्वीनी च्या शापाला रोखुन धरणारी इतकीच कठोर शक्ती अवतीर्ण होणे आवश्यक होते.पांडवांच्या पुर्वपुण्याईमुळेच दिव्य शक्तीच्या रुपाने महर्षी व्यासंना गांधारी च्या मनांतील पाप संकल्पनाची जाणीव झाल्याने ते मनोवेगाने येऊन पोहोचले.
व्यासांनी आपल्या दिव्य दृष्टीने व आंतरिक प्रेरणेने गांधारीच्या मनातील दुष्ट भाव जाणल्यामुळे,आपल्या तपस्येच्या प्रभावाने शापाचा काळ हरवला.सुनेला ते म्हणाले,गांधारी! शांत हो!पांडवकुमारांवर क्रोधाच्या आहारी जाऊन जी शापवाणी उच्चारणार होती ती मागे घे! त्रस्त गांधारीला म्हणाले, १८ दिवस दुर्योधन विजयाच्या आशेने तुझ्या आशिर्वादाकरितां येत होता,पण तू “जेथे धर्म,तेथे जय” हे वाक्य रोज म्हणत होती गांधारी! साध्या बोलण्यांतुन देखील कधी खोटे बोलली नाहीस.तूं सत्य वादिनी आहेस.पांडवांच्या बाजुने धर्माचे बळ,कवच असल्यामुळेच त्यांना विजय मिळाला.
गांधारी तूं धर्मज्ञा असुन धर्माचे तत्वज्ञान जाणतेस.त्या अनुषंगाने वेळो वेळी तू मौलिक विचार मांडलेले आहेस. देवी तू मनस्वीनी,क्षमाशील आहेस. नेहमी सर्वांच्या कल्याणासाठी तत्पर राहलेली आहेस.मग आजच पांडव कुमारांना पापमयी अधर्माचा शाप देण्याचा मार्ग का? असे वर्तन तुझ्या कडुन अपेक्षित नाही.व्यासांच्या स्पष्ट कानउघाडणीने गांधारीचे डोळे उघडले. त्यांचे म्हणने पटल्यामुळे ती शांत होत म्हणाली,आजपर्यंत पांडवांबद्दल कधीच वाईट चिंतले नाही.वाईट भावना,आकस मनात धरुन त्यांच्या विनाशाची इच्छा कधीच केली नाही व नव्हती.पण काय करुं मी? पुत्रशोकाने अगदी व्याकुळ, स्वैरभैर झाले होते.वास्तविक कुंतीपुत्रां चे रक्षण माझ्या पतीने करायला पाहिजे होते,वेळीच मुलांना आवरायला हवे होते पण पुत्रमोहाने अंध होऊन कुरुकुळाचा संपुर्ण संहार घडला.यांत पांडुपुत्रांचा कांहीच दोष नाही.क्षणभर थांबुन रोष पुर्ण स्वरांत म्हणाली, श्रीकृष्णासमोर, गदायुध्दाचा नियम धाब्यावर ठेवुन अधर्माने दुर्योधनाच्या डाव्या मांडीवर भीमाने गदाप्रहार करुन त्याला ठार केले व युध्द जिंकला याचाच मला संताप आला. हे कसले धर्मयुध्द?
खंबीरपणे उत्तर देण्यास भीमसेन पुढे येऊन गांधारीला म्हणाला,माते!तुझा पुत्र दुर्योधन महाबली होता.धर्मा नुसार त्याच्याशी समोरासमोर युध्द करुन कोणीच जिंकु शकत नव्हतं. माझे प्राण वाचवण्यासाठीच मला अधर्माचा मार्ग पत्करावा लागला.आई क्षमा कर! पण आमच्या यातना,वारणावनातील लाक्षागृहात अग्निगृहाच्या आगीत लोटुन जाळुन मारण्याचे कपट कारस्था न,वैभवशाली इंद्रप्रस्थाचे राज्य द्यूतक्रीडे त कपटाने जिंकुन आम्हाला खडतख यातनामय वनवास भोगावा लागला.एकवस्रा रजस्वला द्रौपदीला भरसभेत फरफरट आणवली.तीला ऊघडी करुन डावी मांडी दाखवली. तिची विटंबना केली,अचकट विचकट बोलला,त्यावेळी,तशा परिस्थीतीत त्याची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली तर माझे चुकले का?माते तुझ्याच मुलां नी जन्मभर वैराची आग प्रज्वलीत ठेवली.ती आग रणभूमीवर शांत झाली.वैर संपले.गांधारी म्हणाली,तू दुर्योधनाची केलेल्या प्रशंसाने त्याचा वध होऊनही यशस्वी झाला.पण भीमसेना! तूं दुःशासनाला मारुन त्याचे रक्त प्यालास हे नीच आणि क्रुरकर्म कितपत योग्य आहे? भीम म्हणाला,आई! मी मानव आहे, कुणाचेही रक्त पिऊ शकत नाही,मग हा तर माझा भाऊच होता. माझे आणी त्याचे रक्त एक असल्यावर मी त्याचे रक्त पिऊ कसा शकेन?पण द्यूतक्रीडेत द्रौपदीचे केस धरुन दुःशा सनाने भर सभेत ओढत आणले.तिच्या निरीला हात घातला,त्यावेळी त्यांचे हात खंडुन काढायची केलेली प्रतिज्ञा फक्त मी पुर्ण केली.त्याच्या रक्ताने हात माखले.क्षात्रधर्माला जागुन प्रतिज्ञा पुर्ण केली.आई ! काय चुकले माझे?तुझ्या मुलांनी असंख्यवेळा घोर अन्याय केला. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तूं आवरुं शकली नाहीस आणि आतां दोषारोप करतेस?
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! गांधारी !!!
भाग – २०.
गांधारी थोडी शांत होऊन म्हणाली, भीमा! तूं अपराजित वीर आहेस.पण शंभर पुत्रांपैकी एखादा पुत्र जरी जिवंत सोडला असतास तर,आम्हा आंधळ्यांना काठीचा आधार झाला असतांं, तर मी इतकी व्याकुळ झाले नसते.पण तूं तर शंभर पुत्रांचा साक्षात यमराजच ठरलास की रे ! गांधारी शोकसंतप्त होऊन युधीष्ठिराच्या नखांवर दृष्टी पडल्याबरोबर त्याची नखे काळी ठिक्कर पडली.धर्मराज युधीष्ठिर हात जोडुन म्हणाला माते! मीच तो क्रुरकर्मा!सर्वांच्या नाशास कारक ठरलेला!सर्वांचा वध झाल्यावर माझे हे जीवन,राज्य,धन यांत मला मुळीच सारस्य उरले नाही..तूं मला शाप देऊन भस्म कर!
युधीष्ठिराचे बोलणे ऐकुन ती स्फुंदुन स्फुंदुन रडु लागली.गहिवरुन तिचा शोक…. संताप अश्रुवाटे वाहुन गेला.शांत होऊन प्रेमाने पांडवांना जवळ घेऊन त्यांचे सांत्वन केले.पांडव, द्रौपदीसह वनवासात गेल्यानंतर जी शेवटची भेट झाली त्यानंतर महाभारत घडले.द्रौपदीचे पांच पुत्र, लाडका अभिमन्यु,सर्वजण ठार झाल्याने त्यांचा ही शोक अनावर झाला होता.त्यानंतर प्रथमच कुंती, द्रौपदीसह सर्वजण भेटीस आलेत.गांधारीने द्रौपदीला जवळ घेतले, कुंतीचे सांत्वन करीत म्हणाली!नको होऊस व्याकुळ? आपण दोघीही सम दुःखी आहोत.ही सर्व काळाची प्रेरणा! हे कांड होणारच होते.सार्या जगाचा विनाशाचे विधिलिखित टळणारे नव्हते सारे वीर महासंग्रामात मारले गेलेत. वास्तविक आमच्या अपराधामुळे या श्रेष्ठ कुळाचा भीषण संहार घडला.
गांधारीने आपल्याच मुखाने अपराध कबुल केला खरा!पण अजुन तिचे दुःख,त्यातुन निर्माण होणारा संताप….संतापाच्या अवस्थेत मनाची होणारी विपरीत विदिर्ण स्थिती, अशा भीषण अवस्थेमुळे मनातुन उठणारी संहारक सूडाची भावना,वासना त्यातुन होणारा शापाचा उद्रेक…. ही मनाची उलघाल गांधारी अडवु शकत नव्हती. शेवटी या शापाला वाट मोकळी मिळालीच…..
धृतराष्र्ट सर्व पांडवांना व सर्व स्रियांना घेऊन रणभूमीवर आला.तेथील विदारक दृष्य,गिधाडे व वन्य प्राण्यांचा आहार बनलेली जिकडे तिकडे विचित्र अवस्थेत विखुरलेली प्रेते,आपल्या बंधु भावांना,नवर्यांला कवटाळुन आक्रोश, विलाप करणार्या स्रीया… डोळ्यांना न पाहवणारे, कानांनी न ऐकवणारे, मन सुन्न करणारे ते रणभूमीवरचे दृष्य…. गांधारी कृष्णाशी बोलत रणभूमीवर फिरत होती.कृष्णा इथेच दुर्योधन असेल ना? जो युध्दापुर्वी आशिर्वाद मागत होता,दुःशासनाने मोठ्या भावाला खुश करण्यासाठी द्रौपधीला केस धरुन भर सभेत ओढत आणले,शकुनीनेच माझ्या सर्व मुलांच्या नाशासाठी द्यूतविद्या वापरली,तोच खरा कलहप्रिय व खोट्या बुध्दीचा… गांधारी असे बोलत बोलत रणभूमीत फिरत,कौरव पांडवांचे मृतवीर,स्रीयांचा करुन रुदन,आक्रोश ऐकला आणि अकस्मात अक्रित घडले.
गांधारीला दुःखाचे कढ अनावर झालेत.उग्र रुपात संताप प्रगट झाला आज पर्यंत दबुन असलेला,पण वारंवार उसळणार्या शापाचा उद्रेक शब्दरुपाने मुखावाटे आगीच्या लोळाप्रमाणे कडाडला…ती श्रीकृष्णाला म्हणाली, कृष्णा! ह्या सर्व घटना सामर्थ्याने टाळु शकला असतास.आपल्या वाक् चातुर्या ने समजावुं शकला असतास पण जाणुन बुजुन कौरवांची उपेक्षा केलीस! भोग आता फळ!मी पतीसेवेने जे तपो बल,तपसंचय मिळवला त्या बलाने तुला शाप देते की,आजपासुन ३६ वर्षांनी तुझे यादवकुळ असेच आपसात लढुन मारले जातील.एकटाच वनात फिरत निंदित उपायाने मृत्यु येईल.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख,
–






