दशावतार ३ ( वारह ) भाग ३, (६ ते ७)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

मास्याला नदीत सोडल्यावर तो मासा नदीत देखील तीव्र वेगाने वाढू लागला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला. नदीकाठचे गावे वाहून जाऊ लागले. द्रविड राज्यात हाकार माजला. जे लोक वाचले…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!!  दशावतार ( मत्स्यावतार ) !!! 

                 भाग – ६.

                 ब्रह्मदेवांनी आपल्या मानसपुत्रांच्या रूपात सनकादीमुनींची उत्पत्ती केली. ते सर्व अबोध बालकांसारखे सर्व भावबंध मुक्त होऊन निरलस पणे तिन्ही लोकांमध्ये संचार करीत असत.

               फिरत फिरत एके दिवशी ते वैंकुठलोकात पोहोचले. ते श्रीहरीच्या दर्शनाला उत्सुक आत जाऊ लागताच, दारावरचा द्वारपाल जय विजयने त्यांना अडवले. तरीसुद्धा बालसुलभ भावनेने त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न करताच, जय विजयने त्यांना बेताने मारले. नाराज होऊन त्यांनी जय विजयला शाप दिला. दोघेही भयभीत होत क्षमा मागत मुनींच्या पायावर पडले.

       इतक्यात अंतर्यामी दृष्टीने बाहेरच्या कोल्हाहलाचे कारण जाणून स्वतः  विष्णू बाहेर आले. सर्व मुनी बालकासारखे त्यांना बिलगलेत. जय विजय मात्र वैकुंठ सोडून जावे लागणार म्हणून थरथर कापू लागले. श्रीहरी त्या सर्व मुनींना स्नेहपूर्वक आत घेऊन गेले व आदरपूर्वक स्थानापन्न व्हायला सांगितले.

           सर्व मुनीवर बसल्यावर जय विजयला वैकुंठ सोडून जाण्याच्या शिक्षेने त्यांचे आक्रंदन पाहून मुनीवर यांना दुःख झाले. त्यांनी देवांना विनंती केली, हे परमेश्वरा, आतापर्यंत तुमच्या चरण आश्रयात असलेल्या या दोघांना तुम्हाला सोडून जाणे किती कष्ट कर होईल? आपण कृपाळू होऊन सात जन्माची दिलेली शिक्षा कमी करावी. श्रीहरीने त्यांची विनंती मान्य करून जय विजयला म्हणाले, तुम्हाला पृथ्वीवर जाऊन मानव जन्म घ्यावा लागेल. प्रत्येक जन्मात मी स्वतः तुमचा वध करीन. अशा प्रकारे जय विजय सत्य युगात हिरण्याक्ष व हिरणकश्यपू, त्रेता युगात रावण व कुंभकर्ण आणि द्वापार युगात शिशुपाल व दंतवक्राच्या रूपात जन्म घ्यावा लागला. आणि प्रत्येक वेळेस श्रीहरीने त्यांचा स्वतः वध केला.

         महर्षी कश्यपांच्या दिती आणि अदिती नावाच्या दोन पत्नी होत्या. आदिती पासून आदित्य म्हणजेच देवाने आणि दितीपासून दैत्यांचा जन्म झाला. दितीचा स्वभाव चांगला नव्हता. तिला हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपु असे जुळे मुलं झाले होते. हे दोघेही बालपणापासूनच अतिशय खोडकर होते. दोघेही अत्यंत क्रोधी व झगडाळू होते. त्यांचे शरीर लोखंडा प्रमाणे कठोर होते. हत्तीचे बळ होते. शुल्लक गोष्टीवरून खून खराब करणे त्यांच्यासाठी शुल्क गोष्ट असायची. जसे जसे मोठे होत गेले तसे तसे ते भयंकर होत गेले. कोणाचा जीव घेणे त्यांचे नित्य कर्म झाले होते. आपले राज्य सोडून बाहेरच्या देशातील राज्यातही ते अत्याचार करीत फिरू लागले. राज्यातील सर्व गुंड बदनाश त्यांना येऊन मिळाल्या मुळे त्यांचा चांगला दरारा निर्माण झाला. इतर राजांचे राज्य हिसकावून यांनी एक स्वतःचे मोठे राज्य स्थापन केले. आणि मनमाणी राज्यकारभार चालवू लागले.

             अमरत्व मिळवण्यासाठी हिरण्याक्षाने ब्रह्माची आराधना करत कठोर तपस्या करू लागला. त्याच्या उग्र तपस्येने ब्रह्म प्रसन्न झाले. आणि वर मागण्यास सांगितल्यावर, हिरण्यक्षांनी अमरत्वाचा वर मागितला. ब्रह्मदेव म्हणाले, शरीर पंच भूताने बनलेले असल्यामुळे अमरत्व तर शक्य नाही पण तुला कोणत्याही अस्त्र शस्त्राने मृत्यू येणार नाही.  हिरण्याक्षाला हा वर प्रापात झाल्याने त्याला अतिशय आनंद झाला.

               हिरण्यकश्यपू आपल्या राज्यकारभारात व्यस्त असायचा. आणि हिरण्याक्ष भयानक गुंडागर्दी करत फिरत असे. त्याच्याशी कोणीच सामना करू शकत नव्हते. मिळालेल्या वराने उन्मत होऊन हिरण्याक्षाने मानव लोकांवर विजय प्राप्त केल्यावर, एक लोखंडाची भयानक गदा घेऊन देवलोकी जाऊन पोहोचला. परंतु देवतांनी आधीच त्याच्या पुढे शरणागती पत्करली.

                युध्दाशिवाय हिरण्याक्षची तगमग होऊ लागली. कुणीतरी त्याला हिमालयाशी युद्ध करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तो हिमालयावर आपल्या लोखंडी गदेचे प्रहार करू लागला. ते पाहून हिमालय म्हणाले, माझ्याशी युद्ध करण्यापेक्षा समुद्रातील वरूण देवतांशी युद्ध केल्यास तुझी युद्धाची खुमखुमी मिटेल. हिरण्याक्ष हिमालयाला सोडून सागराकडे गेला. तिथे जाऊन त्याने वरूण देवाला ललकारल्यावर वरूण देव म्हणाले, तुला खरोखरच युद्ध करण्याची एवढीच तीव्रता झाली तर, पाताळात जाऊन वराह रुपात श्रीहरी आहेत. त्यांच्याशी जाऊन युद्ध कर. श्रीहरीचे नाव ऐकताच हिरण्याक्ष क्रोधित झाला. त्याला श्रीहरी बद्दल आधीच इर्षा होती. पण भेट होत नव्हती. आता त्यांचा ठाव ठिकाणा लागल्याबरोबर उन्मादी अवस्थेत तो पातळ्यात पोहोचला. आणि  श्रीहरीला आव्हान केले. पण त्यावेळी ते ध्यानस्थ असल्यामुळे त्याचे आव्हान त्यांना ऐकू आले नाही. ते काहीच प्रतिक्रिया देत नाही, पाहून त्याला भयंकर क्रोध आला आणि चिडून म्हणाला, ज्या पृथ्वीचे तू पालन करतो, ती पृथ्वीच मी समुद्रात फेकून देतो. तरीही विष्णूंच्या दुर्लक्षतेने संताप अनावर होऊन त्याने खरोखरच पृथ्वी खोल विश्व सागरात फेकून दिली. पृथ्वीमाता खोल खोल बुडू लागल्याने आर्त स्वरात ती श्रीविष्णूचा धावा करत म्हणाली, हे भगवंता! हे विष्णू देवता, माझे रक्षण कर! मी बुडाली तर साऱ्या प्राणिमात्रांचा विनाश होईल. पृथ्वी मातेचा धावा, विनवणी ऐकून, श्रीहरी समाधीतून बाहेर आले आणि मोठा उःश्वास टाकला…

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
              दि. १७-१०-२०२३.


!!!  दशावतार  !!!

                 भाग – ७.

              श्री विष्णू समाधीतून बाहेर आले. त्यांनी दीर्घ उछवास टाकल्याबरोबर त्यातून एक मोठा प्राणी बाहेर आला. पाहता पाहता त्याचा आकार पहाडा एवढा झाला. तो प्राणी वराह होता. त्याचे सुळे बाहेर आले होते. तो अतिशय संतप्त होऊन  त्याच्या नाकातून उष्ण हवेचे लोट बाहेर पडत होते. डोळ्यात अंगार धगधगत होता प्रत्यक्ष श्री विष्णूंनी वराह अवतार धारण केला होता. विष्णुनी क्षणाचा ही विलंब न लावता विश्वसागरात उडी टाकली. पोहोत जाऊन बुडणाऱ्या पृथ्वीला आपल्या सुळ्यांवर उचलून सागरा बाहेर आणले, व ब्रह्मदेवाला पृथ्वी देऊन टाकली.

            वराहाचा पराक्रम पाहून, अंतर्यामी हिरण्याक्ष घाबरला.. पण तसे न दाखवता गर्वोक्तीने म्हणाला, मी ओळखले.  तू वराह रूपातील महाविष्णू आहेस. म्हणून त्याने वराहावर शस्त्रमारा करू लागला. हिरण्याक्षच्या शस्त्र माराने संपूर्ण पृथ्वी कंपायमान झाली. हिराण्याक्ष वराहाला अपशब्द बोलून अपमान करू लागल्याचे बघून वराहाचे डोळे आग ओकू लागले. दोघांमध्ये धनघोर युद्ध सुरू झाले. रक्ताचे पाट वाहू लागले. अंतरिक्षातील देवगण भयभीत झाले. संध्या होत आली तरी युद्ध थांबण्याची चिन्ह दिसेना. ब्रह्मदेव ओरडून म्हणाले, प्रभू! संध्याकाळ होऊ लागली. संध्याकाळीच्यावेळी असुरांची शक्ती वाढते. त्याचा ताबडतोब संहार करा. विष्णूंनी आपल्या तीक्ष्ण सुळ्यांनी हिरण्याक्षचे ह्रदय विदिर्ण केले. त्याने वराहाला बगलेत पकडण्याचा प्रयत्न केलेला पाहून वराहने त्याच्या तोंडावर एवढा जोरदार मुष्टी प्रहार केला की, तो खाली कोसळून जागीच तात्काळ मृत्युमुखी पडला.

           वराहाने पृथ्वीला सुरक्षित तिच्या जागी नेऊन ठेवले. या वराह रूपातील विष्णूच्या चौथ्या अवतारांचे सर्व देवांनी स्वर्गातून फुले उधळून जय जयकार करून त्यांचे स्वागत केले.

                 विना अस्रशस्राने हिरण्याक्षाचा वध झाला. वराह रूपातील विष्णू लोकालोक पर्वतावर जाऊन एक वराहणी बरोबर राहू लागले. तिथे त्यांना पुष्कळ लेकरे झाले. मोठा परिवार तयार झाला. विष्णू रूपातील वराह त्यांचे बरोबर राहू लागले.

        इकडे विश्वपती विष्णूंच्या गैरहजरमुळे सर्व कामे ठप्प झाले. ब्रम्हाजी त्यांना शोधत शोधत लोकपर्वता वर येऊन पोहोचले. तिथला प्रकार पाहून ते आवाक् झाले. मोठ्या कष्टाने आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवून ते विष्णूची स्तुती करू लागले. परंतु त्यांची चतुर्भुज हंस वाहान बघून श्रीहरी रूपातील वराह आपल्या परिवारांसह पळू लागले. ब्रह्मदेव शिवशंकराकडे जाऊन सर्व हकीगत कथन केली. शिव म्हणाले, हे तुमच्या आवाक्यातील गोष्ट नाही. चला… शिवांनी हत्तीचे सोंड, मोठे मोठे दात, आठ पायांचा मोठ्या प्राण्याचे रूप घेऊन लोकालोक पर्वतावर आले. व गर्जना करू लागले. ते बघून चिडलेला वराहाने  त्यांच्यावर आक्रमण केले. दोघांमध्ये घनासाम युद्ध झाले शेवटी अष्टपदी शिवांची शिवरुपी प्राण्याने वऱ्हाच्या शरीरात आपले दात घुसवून त्याचे दोन तुकडे केले. श्रीहरीने तो मृतदेह त्यागून शिवा बरोबर स्वर्गात आले.

          आता सुद्धा विष्णू पितृ पुरुषांच्या श्राद्धाच्या वेळी घरोघरी त्या आधी वराहाच्या रूपात श्रीहरीची पूजा केली जाते.

               इकडे हिरण्यकश्यपू आपल्या अपराजय भावाच्या हत्येमुळे सूडबुद्धीने पेटून उठला. या घटने पूर्वीही तो विष्णूचा द्वेष करीत होताच. पण आता तो तर विष्णू नामक नाव काट्यासारखे सलत होते.

          त्याने आपल्या सेनापती इल्वल व नमुचीला बोलावून जास्तीत जास्त विष्णू भक्तांना ठार करण्याचे आदेश दिले. आज्ञेनुसार सेनापतींनी वेचून वेचून सगळ्या भक्तगणांना त्रास द्यायला सुरुवात केली. देव- भक्तांची घरे नगरे उध्वस्त करून भस्मासात केली. मंदिरे जमीनदस्त केली. राक्षसांच्या असुरी अत्याचाराने, अनन्वित छळाने सर्व भक्तगण त्रस्त झाले.

             हिरण्याक्षाच्या वधा नंतर त्याला राक्षसराज्य प्राप्त झाले. विष्णू देवांनी आपल्या भावाला ठार केले त्याचा सूड कसा घ्यायचा याचाच विचार रात्रंदिवस करूनही काही सुचत नव्हते. शेवटी त्याने ब्रह्मदेवांना प्रसन्न करून अमरत्व प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्याचे ठरविले. मंदार पर्वतावर जाऊन घोर तपश्चर्य सुरू केली. एका पायाच्या अंगठ्यावर उभे राहून दोन्ही हात नमस्कार कृतीत जोडून दृष्टी आकाशाकडे अशा स्थितीत, उन्हाळ्याच्या कडकडीत उन्हात, विजांच्या घनगर्जना, वादळ, वारा, पाऊस हिवाळ्यातील तीव्र हीम वर्षात देखील तो तसुभरही न हलता त्याच स्थितीत राहिला. त्याच्या तपश्चर्याच्या दरम्यान अनेक विघ्न आलीत. पण ॐ ब्रह्माय नमः हा अखंड जप चालूच होता. या बारा वर्षात असंख्य संकटे अडचणी येऊनही न डगमगता हिरण्यकश्यपूने आपले तप तटस्थपणे चालूच ठेवले.

                      अखेर बारा वर्षांनी हिरण्यकश्यपूच्या तपसाधनेने प्रसन्न होऊन, त्याच्यासमोर  ब्रह्मदेव प्रकट होऊन विचारले, तुझ्या तपश्चर्याने प्रसन्न झालो. सांग कोणचा वर हवा? तो म्हणाला मला अमरत्व हवे. ब्रह्मदेव म्हणाले, अशक्य आहे.

       या जगात जन्माला येतो त्याला मरण कधी चुकत नाही. दुसरे काहीही माग. मग मला असा वर द्या की, कोणत्याही शास्त्राने दिवसा किंवा रात्री मरण येऊ नये तसेच दानव, देव, मनुष्य किंवा प्राणी यापैकी कोणीही मारू शकणार नाही.ना घरात ना बाहेर, ना धरतीवर, ना आकाशात कुठेही मारू शकणार नाही. असा वर द्यावा. तथास्तु ! म्हणून ब्रह्मदेव अंतर्धान पावले.

            क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
                दि. १७-१०-२०२३.

दशावतार ( मत्स्यावतार ) संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading