आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

38. दशावतार १ ( मत्स्य ) भाग १, (१ ते २)
मास्याला नदीत सोडल्यावर तो मासा नदीत देखील तीव्र वेगाने वाढू लागला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला. नदीकाठचे गावे वाहून जाऊ लागले. द्रविड राज्यात हाकार माजला. जे लोक वाचले…………
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!! दशावतार ( मत्स्यावतार ) !!!
भाग – १.
आतांपर्यत आपल्या समोर अनेक वेगवेगळ्या विषयांवरिल व्यक्तिचरित्रें प्रस्तुत केलेली आहेत. आपल्या मिळालेल्या भरभरुन प्रोत्साहनामुळेच मी लिहित गेले. लिहित आहे…
आज आपल्या समोर घेऊन येत आहे… ७३ वे पुष्प ” दशावतार “! आपल्याला आवडेल ही अपेक्षा!
नेहमी प्रमाणे आपल्या क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!
सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टीची रचना केल्यानंतर शेवटी त्यांनी आदी पुरुष मनुची रचना केली. मनुची लेकरे म्हणजेच आपण मानव. आणि विश्वातील सर्वश्रेष्ठ जीव मानवच आहे.
संतान उत्पत्तीसाठी मनुने कठोर तपश्चर्या केली. तपस्याचे फलित म्हणजे अनेक तेजस्वी पुरुषांचा जन्म झाला. त्या पुत्रांनी विविध विद्या आत्मसात करून आपल्या तपस्याद्वारे महाशक्ती प्राप्त केली. आणि ते जीव जगाचे स्वामी होऊन प्रकृती राज्याचे सर्व प्रकारचे सुख, सुविधा अत्यंत आनंदाने भोगू लागले.
हे पाहून निश्चिंत झालेले मनु घोर तपस्येत लीन झाले. ध्यान योग्य द्वारे त्यांनी भूत, भविष्य, वर्तमान बघितल्यावर काहीच दिवसात संपूर्ण पृथ्वी जलमय होऊन सर्व जीवांचा विध्वंस होईल. आपल्या इतक्या घोर तपस्येचाही नाश होईल. हे जाणून मनु अतिशय दुःखी झाले.
त्यांनी विचार केला, जगचे रक्षण करायचे तर, आणखी घोर तपस्या करणेच भाग आहे. त्यांनी पहाडातील एका गुफेतील शिळेवर पद्मासनात बसून बाह्य चेतना लुप्त करून ब्रम्हाच्या उपासनेत लीन झाले. त्यांच्या उग्र तपस्येनी प्रसन्न झालेल्या ब्रम्हांनी विचारले, वत्सा, तू निर्माण केलेले पुत्र-पौत्र आनंदपूर्वक सर्व भोग भोगत असताना तू एवढी कठोर तपस्या करून देहक्लेश का करून घेत आहेस?
मनुने आपल्याला झालेला साक्षात्कार सांगितल्यावर, ब्रह्म म्हणाले, ज्या नारायणाच्या इच्छेने मी ही सृष्टीची निर्मिती केली, तिच्या सुरक्षतेचीही त्यांनी व्यवस्था केलेली आहे. असे म्हणून मनुसमोर भविष्यातील घडणाऱ्या घटनेचे समग्र चित्र साकार केले. मनु भाव विभोर होऊन त्यांच्या चरणी लीन झाले. ब्रह्मा अंतर्धान पावले.
अनेक परिवर्तन होत होत जगाचे रहाट गाडगे चालू होते. पृथ्वी धन धान्याने परिपूर्ण होती. रूप,गुण, यवन, स्वास्थ्य, वार्धक्य, रोग, मृत्यू असे सर्व प्रकारचे व्यवहार चालू होते. मानव जीवनाचे चक्रात भांडण झगडे, एकमेकांविषयी प्रेम माया, दुसऱ्यासाठी आत्मत्याग अशा विविध भावनांचे प्रगटीकरण होत होते.
मनुष्य भोगामुळे उन्मत्त झाला. निंदा, कलह, हिंसाचाऱ्याला प्रवृत्त झाला. अत्याचार, रक्तपात, हत्या करू लागला. मानव कपटकारस्थानाच्या आहारी गेला. साधुसंतांना छळू लागला. या सर्व आक्रंदनाने श्री हरीचे आसन डगमगले.
आणि त्यांनी क्रोधीत होऊन सृष्टीत सर्व उलथा पालथ केली. महामारी, दुष्काळामुळे लोक अतिशय हवालदील झाले. सुरक्षितेचा उपायच उरला नाही.
त्यावेळी पृथ्वीवर एक द्रविड नावाचे राज्य होते. राजा सत्यव्रत धर्मपरायण, सत्यवती होता. त्याच्या मनी प्रजेच्या कल्याणाचे विचार चालू असे. राजाचा राज्यकारभारा व्यतिरिक्त सगळा वेळ ध्यानधारणा, जपतपात जात असे. मानवाच्या दुःखाने व्यतीत होऊन तो दिवस-रात्र त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करीत असत.
एक दिवस राजा सत्यव्रत नदीवर हातात जल घेऊन आपल्या पितरांचे तर्पण करीत असताना त्यांच्या ओंजळीत एक छोटा मासा आला. त्याला पाण्यात सोडणार तोच, तो ती मासा मनुष्य वाणीत म्हणाला, माझे रक्षण करा… रक्षण करा… राजाने विस्मित होऊन त्या मस्याकडे बघितले. तो म्हणाला, माझे मोठ मोठ्या मास्यांपासून रक्षण करा. मी फार भयभीत झाले आहे. राजाने तर्पण आटोपून जवळच्या कंमडलूत त्या मत्स्याला टाकून आपल्या महालात आणले व एका बाजूला ठेवले. आणि आपल्या कार्यात व्यस्त झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मास्याला पाहायला कंमडलू जवळ गेले तर त्यांना काय दिसले? त्या मास्याने संपूर्ण कमंडलू व्यापला होता. राजाला बघून तो म्हणाला, राजा मी मोठा झाल्याने या कंमडलूतून काढून माझी दुसरीकडे व्यवस्था कर. राजाने तिला एका मोठ्या हौदात ठेवले.
दुसऱ्या दिवशी राजाला दिसले तो मासा हौदातही मावेनासा झाला. राजांनी हौद्यातून काढून आपल्या उद्यानातील विशाल सरोवरात ठेवले व राजा निश्चिंत झाला. परंतु आश्चर्य म्हणजे, दुसऱ्या दिवशी तो मासा संपूर्ण तलावभर फैलावला. वार्ता सगळीकडे पसरली. त्यात त्याचा आवाजही मोठा झाल्यामुळे ती राजाशी बोलत होती, हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्याने पुन्हा आपली व्यवस्था दुसरीकडे करण्यास सांगितले.
राजाने सेनापतीला आदेश दिला, मास्याला काही कष्ट न होता नदीत सोडून द्या. एवढ्या भव्य मास्याला हजारो लोक, अनेक हत्तीच्या सहाय्याने दोरखंडात लपेटून बैलगाड्यांवर चढवून मोठ्या प्रयत्न पुर्वक नदीवर आणले. ही घटना हजारोंच्या मुखातून अतिरंजीत होऊन भारतभर पसरली.
त्या दिवसात पृथ्वीवर महामारी, रोगराई, दुष्काळ, भूकंप, उल्कापात अशा गोष्टीने लोक आधीच मरणासन्न झाले होते. जे मूठभर लोक या आपत्तीतून वाचले होते तेही घटना ऐकून भयभीत झाले. परंतु राजा सत्यव्रत मात्र ईश्वर चिंतनात मग्न होते.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १७-१०-२०२३.
*आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी:* _*या तिथीला भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता,भगवान विष्णूंच्या “दशावतार” पैकी पहिला अवतार*_
_*मत्स्य अवतारबद्दल जाणून👇घेऊया.*_
*🐟मस्यावतार:🐟*
_*एक दिवस राजा सत्यव्रत नदीवर हातात जल घेऊन आपल्या पितरांचे तर्पण करीत असताना त्यांच्या ओंजळीत एक छोटा मासा आला.त्याला पाण्यात सोडणार तोच,तो/ती मासा मनुष्य वाणीत म्हणाला,माझे रक्षण करा!रक्षण करा!!राजाने विस्मित होऊन त्या मस्याकडे बघितले.तो म्हणाला,माझे मोठ मोठ्या मास्यांपासून रक्षण करा.!*_
मी फार भयभीत झाले आहे. राजाने तर्पण आटोपून जवळच्या कंमडलूत त्या मत्स्याला टाकून आपल्या महालात आणले व एका बाजूला ठेवले,आणि आपल्या कार्यात व्यस्त झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मास्याला पाहायला कंमडलू जवळ गेले तर त्यांना काय दिसले?त्या मास्याने संपूर्ण कमंडलू व्यापला होता.राजाला बघून तो म्हणाला,राजा मी मोठा झाल्याने या कंमडलूतून काढून माझी दुसरीकडे व्यवस्था कर.राजाने तिला एका मोठ्या हौदात ठेवले.
दुसऱ्या दिवशी राजाला दिसले तो मासा हौदातही मावेनासा झाला. राजांनी हौद्यातून काढून आपल्या उद्यानातील विशाल सरोवरात ठेवले व राजा निश्चिंत झाला.परंतु आश्चर्य म्हणजे,दुसऱ्या दिवशी तो मासा संपूर्ण तलावभर फैलावला.वार्ता सगळीकडे पसरली.त्यात त्याचा आवाजही मोठा झाल्यामुळे ती राजाशी बोलत होती,हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले.त्याने पुन्हा आपली व्यवस्था दुसरीकडे करण्यास सांगितले.
राजाने सेनापतीला आदेश दिला,मास्याला काही कष्ट न होता नदीत सोडून द्या.एवढ्या भव्य मास्याला हजारो लोक,अनेक हत्तीच्या सहाय्याने दोरखंडात लपेटून बैलगाड्यांवर चढवून मोठ्या प्रयत्न पुर्वक नदीवर आणले. ही घटना हजारोंच्या मुखातून अतिरंजीत होऊन भारतभर पसरली.त्या दिवसात पृथ्वीवर महामारी,रोगराई,दुष्काळ,
भूकंप,उल्कापात अशा गोष्टीने लोक आधीच मरणासन्न झाले होते.जे मूठभर लोक या आपत्तीतून वाचले होते तेही घटना ऐकून भयभीत झाले. परंतु राजा सत्यव्रत मात्र ईश्वर चिंतनात मग्न होते.
मास्याला नदीत सोडल्यावर तो मासा नदीत देखील तीव्र वेगाने वाढू लागला.त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला. नदीकाठचे गावे वाहून जाऊ लागले.द्रविड राज्यात हाकार माजला.जे लोक वाचले होते,त्यांनी मृत्यू भयाने महाप्रयासाने मास्याला समुद्रात नेले. मासा समुद्रात पोहोचल्यावर त्याने इतका मोठा आकार केला की,एक महाद्वीप तयार झाले.
हे पाहून राजा मास्याची स्तुती स्तवन करत म्हणाला, हे परमेश्वरा, नारायणा! तुझ्याशिवाय दुसरा कोण अशी लीला करू शकेल? भोग विलासात लिप्त झालेला मानव तुला विसरून अहंकाराने उन्मत झाला म्हणून तू हे लिला नाट्य केले.त्यांना पर्याप्त सजा मिळाली.आता तू प्रसन्न हो! तू मास्त्याचे रुप घेऊन मनुष्याचे गर्वहरण केले. आता शांत हो! प्रसन्न हो!
आणि चमत्कार घडाला. चारही दिशां अलौकिक तेजाने उजळून निघाल्या. मास्याच्या जागी चारही हातात शंख,चक्र,गदा,पद्म घेऊन नारायण प्रगट झाले.ते अद्भुत रूप पाहून राजा आनंदविभोर झाला. नेत्रातून अश्रू गळू लागले. अंग थरथरायला लागले. त्याची अवस्था पाहून नारायणाने राजाच्या सर्वांगावरून हात फिरवून शांत करत म्हणाले, वत्सा,सत्यव्रता.तुझा पूर्वजन्म आठव.तू मानवाचा आदी पुरुष मनु आहेस.तू मोठी कठोर तपस्या करून मनुष्य जातीच्या रक्षणासाठी प्रलय रोखला होतास. ब्रह्माच्या वरा नुसार तुझ्या द्वारे मानवासह सर्व जीव जंतूंची रक्षा होईल. आणि राजाच्या मनात पूर्वजन्माच्या साऱ्या आठवणी जागृत होऊ लागल्या.
श्रीहरी म्हणाले,आजपासून सात दिवसांनी प्रलयाला सुरुवात होईल.तत्पूर्वी तू मानवांसह सर्व प्राण्यांच्या नरमादी असा जोडा व सर्व प्रकारच्या वनस्पती बीज एकत्रित कर. सात दिवसानंतर देवनिर्मित एक नौका तुमच्या नदीच्या घाटावर येईल.त्यात तू एकत्र केलेले जीव,वनस्पती बीजासह स्वार होऊन समुद्र प्रलयात पृथ्वी जेव्हा विलीन होईल तेव्हा मी सिंगधारी स्वर्ण माशांच्या रूपात पुन्हा अवितर्ण होईल.त्यावेळी तुझी नाव माझ्या सिंगाला बांध. इतके सांगून नारायण मस्य अंतर्धान पावले.
सात दिवसानंतर खरोखरच घाटावर सुवर्णनौका येऊन पोहोचली.श्रीहरीच्या आदेशानुसार राजा सर्व प्राण्यांच्या जोड्या व वनस्पती बिजासह नौकेत स्वार झाले. आणि नौका आपोआप समुद्रात पोहोचली.
इकडे पृथ्वीवर भयंकर उथल पुथल माजली.सूर्याचे तेज बारा पटीने वाढले. तलाव,सरोवर,नदी,नाले कोरडे पडलेत. झाडे, झुडपे,लता काहीही वाचले नाही.आधी पक्षी नंतर जीवजंतु समाप्त झाले. मानवाने अनेक प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु व्यर्थ.जे दुर्देवी लोक वाचले ते भूक तहानेने व्याकुळ होऊन गिधाडासारखे घृणित कृत्य करून सडलेल्या प्रेतावर तुटून पडले. रक्तपिपासू होऊन एक दुसऱ्यांची हत्या करू लागले.कित्येक लोक एखाद्या व्यक्तीवर तुटून पडून त्याला मारून त्याचे रक्तमास भक्षण करू लागले.अशाप्रकारे मानव जात विनाशाच्या गर्तेत जाऊ लागली.शहरे,गाव ओस पडले.सर्वीकडे निरवता व स्तब्धता पसरली. जीवनाचे कोणतेही चिन्ह उरले नाही. असंख्य जीव जंतूंच्या वाळलेल्या लाश व वाळलेली झाडे लताने जणू पृथ्वी भरून गेली होती. त्यातच एक दिवस सगळ्या पृथ्वीवर वणवा पसरला. पृथ्वी राखेने आच्छादित झाली.नदी नाले सरोवरातील पाण्याची वाफ होऊन मेघात परिवर्तीत होऊन सर्व पृथ्वी जलमय झाली.
दिवस रात्रीचा फरक समजेनासा झाला. अनेक स्तरांवर मेघांच्या भीषण गरजेने पर्वत प्रतिध्वनित होऊन भूकंप होऊ लागला. पहाड तुटून पडू लागले. समुद्र मरुभूमीत परिवर्तित झाले.मुसळधार पाऊस,शिलापात मुळे पर्वतचे पर्वत तुटून जलप्रवाहात वाहू लागले.मूर्तिमंत प्रलय पृथ्वीवर नंगानाच करू लागले.
राजा सत्यव्रतची सुवर्णनौका पाण्याच्या उलथापालथा मुळे डगमगू लागली. तेव्हा भयभीत राजाने नारायणाचा आर्ततेने धावा सुरू केला. त्यावेळी नारायण कित्येक योजने दूर सुवर्णसिंगधारी मस्याच्या रूपात सागराच्या आत अविभुत होते. त्यांच्या अंगातून निघालेल्या ज्योतींनी चारही दिशा उजळून निघाल्या.राजांनी निर्भयता पूर्वक आपली सुवर्णनौका श्रीहरीच्या सिंगाला बांधली. त्यामुळे त्यांना फिकर नव्हती.
भरपूर पाऊस पडल्यामुळे मेघ नाहिशे झाले.सूर्योदय झाला.पृथ्वीवर पाण्याशिवाय काहीच दिसत नव्हते.मनुच्या या सुवर्णनौकात असलेले जीव निश्चिंत होते.
मत्स्य रुपी नारायणाने राजा सत्यव्रताला मानवाच्या भविष्यातील धर्म विषयावर अनेक वर्ष शिक्षण दिले.अधर्माचा विनाश झाल्यावर,पुन्हा धर्माच्या स्थापनेसाठी भगवान विविध रूपे धारण करीत असतात.
हळूहळू पृथ्वीवरील पाणी समाप्त झाले.राजा सत्यव्रताने धरतीवर आणलेले बिजांचे रोपण केले. लवकरच पृथ्वी फळा फुलांनी बहरली. सगळ्या जीवां सहित मनु भूमीवर उतरले.पाहता पाहता पृथ्वी पुन्हा जीव जंतूंनी परिपूर्ण झाली.
*〰️〰️〰️〰️〰️〰️〰️cds/*
_*भगवान विष्णूची आराधना केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व दु:ख दूर होतात,अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच जीवनात सुख-समृद्धीचे आगमन होते.*_
_*मत्स्य जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते. हा दिवस जगाचा निर्माता भगवान विष्णू यांना समर्पित आहे.या दिवशी भगवान विष्णूने वेदांचे रक्षण करण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता. नंतर भगवान विष्णूने माशाच्या रूपात वेद चोरणाऱ्या राक्षसाचा वध केला.*_
_*भगवान विष्णूची आराधना केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व दु:ख दूर होतात,अशी धार्मिक श्रद्धा आहे.तसेच जीवनात सुख-समृद्धीचे आगमन होते. तुम्हालाही अपेक्षित परिणाम मिळवायचे असतील तर मत्स्य जयंतीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करा.तसेच पूजेच्या वेळी तुमच्या राशीनुसार या मंत्रांचा जप करा.*_
!!! दशावतार !!!
भाग – २.
मास्याला नदीत सोडल्यावर तो मासा नदीत देखील तीव्र वेगाने वाढू लागला. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला गेला. नदीकाठचे गावे वाहून जाऊ लागले. द्रविड राज्यात हाकार माजला. जे लोक वाचले होते, त्यांनी मृत्यू भयाने महाप्रयासाने मास्याला समुद्रात नेले. मासा समुद्रात पोहोचल्यावर त्याने इतका मोठा आकार केला की, एक महाद्वीप तयार झाले.
हे पाहून राजा मास्याची स्तुती स्तवन करत म्हणाला, हे परमेश्वरा, नारायणा! तुझ्याशिवाय दुसरा कोण अशी लीला करू शकेल? भोग विलासात लिप्त झालेला मानव तुला विसरून अहंकाराने उन्मत झाला म्हणून तू हे लिला नाट्य केले. त्यांना पर्याप्त सजा मिळाली. आता तू प्रसन्न हो! तू मास्त्याचे रुप घेऊन मनुष्याचे गर्वहरण केले. आता शांत हो! प्रसन्न हो!
आणि चमत्कार घडाला. चारही दिशां अलौकिक तेजाने उजळून निघाल्या. मास्याच्या जागी चारही हातात शंख ,चक्र, गदा, पद्म घेऊन नारायण प्रगट झाले. ते अद्भुत रूप पाहून राजा आनंदविभोर झाला. नेत्रातून अश्रू गळू लागले. अंग थरथरायला लागले. त्याची अवस्था पाहून नारायणाने राजाच्या सर्वांगावरून हात फिरवून शांत करत म्हणाले, वत्सा, सत्यव्रता. तुझा पूर्वजन्म आठव. तू मानवाचा आदी पुरुष मनु आहेस. तू मोठी कठोर तपस्या करून मनुष्य जातीच्या रक्षणासाठी प्रलय रोखला होतास. ब्रह्माच्या वरा नुसार तुझ्या द्वारे मानवासह सर्व जीव जंतूंची रक्षा होईल. आणि राजाच्या मनात पूर्वजन्माच्या साऱ्या आठवणी जागृत होऊ लागल्या.
श्रीहरी म्हणाले, आजपासून सात दिवसांनी प्रलयाला सुरुवात होईल. तत्पूर्वी तू मानवांसह सर्व प्राण्यांच्या नरमादी असा जोडा व सर्व प्रकारच्या वनस्पती बीज एकत्रित कर. सात दिवसानंतर देवनिर्मित एक नौका तुमच्या नदीच्या घाटावर येईल. त्यात तू एकत्र केलेले जीव, वनस्पती बीजासह स्वार होऊन समुद्र प्रलयात पृथ्वी जेव्हा विलीन होईल तेव्हा मी सिंगधारी स्वर्ण माशांच्या रूपात पुन्हा अवितर्ण होईल. त्यावेळी तुझी नाव माझ्या सिंगाला बांध. इतके सांगून नारायण मस्य अंतर्धान पावले.
सात दिवसानंतर खरोखरच घाटावर सुवर्णनौका येऊन पोहोचली. श्रीहरीच्या आदेशानुसार राजा सर्व प्राण्यांच्या जोड्या व वनस्पती बिजासह नौकेत स्वार झाले. आणि नौका आपोआप समुद्रात पोहोचली.
इकडे पृथ्वीवर भयंकर उथल पुथल माजली. सूर्याचे तेज बारा पटीने वाढले. तलाव, सरोवर, नदी, नाले कोरडे पडलेत. झाडे, झुडपे, लता काहीही वाचले नाही. आधी पक्षी नंतर जीवजंतु समाप्त झाले. मानवाने अनेक प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु व्यर्थ. जे दुर्देवी लोक वाचले ते भूक तहानेने व्याकुळ होऊन गिधाडासारखे घृणित कृत्य करून सडलेल्या प्रेतावर तुटून पडले. रक्तपिपासू होऊन एक दुसऱ्यांची हत्या करू लागले. कित्येक लोक एखाद्या व्यक्तीवर तुटून पडून त्याला मारून त्याचे रक्तमास भक्षण करू लागले. अशाप्रकारे मानव जात विनाशाच्या गर्तेत जाऊ लागली. शहरे, गाव ओस पडले. सर्वीकडे निरवता व स्तब्धता पसरली. जीवनाचे कोणतेही चिन्ह उरले नाही. असंख्य जीव जंतूंच्या वाळलेल्या लाश व वाळलेली झाडे लताने जणू पृथ्वी भरून गेली होती. त्यातच एक दिवस सगळ्या पृथ्वीवर वणवा पसरला. पृथ्वी राखेने आच्छादित झाली. नदी नाले सरोवरातील पाण्याची वाफ होऊन मेघात परिवर्तीत होऊन सर्व पृथ्वी जलमय झाली.
दिवस रात्रीचा फरक समजेनासा झाला. अनेक स्तरांवर मेघांच्या भीषण गरजेने पर्वत प्रतिध्वनित होऊन भूकंप होऊ लागला. पहाड तुटून पडू लागले. समुद्र मरुभूमीत परिवर्तित झाले.
मुसळधार पाऊस, शिलापात मुळे पर्वतचे पर्वत तुटून जलप्रवाहात वाहू लागले. मूर्तिमंत प्रलय पृथ्वीवर नंगानाच करू लागले.
राजा सत्यव्रतची सुवर्णनौका पाण्याच्या उलथापालथा मुळे डगमगू लागली. तेव्हा भयभीत राजाने नारायणाचा आर्ततेने धावा सुरू केला. त्यावेळी नारायण कित्येक योजने दूर सुवर्णसिंगधारी मस्याच्या रूपात सागराच्या आत अविभुत होते. त्यांच्या अंगातून निघालेल्या ज्योतींनी चारही दिशा उजळून निघाल्या. राजांनी निर्भयता पूर्वक आपली सुवर्णनौका श्रीहरीच्या सिंगाला बांधली. त्यामुळे त्यांना फिकर नव्हती.
भरपूर पाऊस पडल्यामुळे मेघ नाहिशे झाले. सूर्योदय झाला. पृथ्वीवर पाण्याशिवाय काहीच दिसत नव्हते. मनुच्या या सुवर्णनौकात असलेले जीव निश्चिंत होते.
मत्स्य रुपी नारायणाने राजा सत्यव्रताला मानवाच्या भविष्यातील धर्म विषयावर अनेक वर्ष शिक्षण दिले. अधर्माचा विनाश झाल्यावर, पुन्हा धर्माच्या स्थापनेसाठी भगवान विविध रूपे धारण करीत असतात.
हळूहळू पृथ्वीवरील पाणी समाप्त झाले. राजा सत्यव्रताने धरतीवर आणलेले बिजांचे रोपण केले. लवकरच पृथ्वी फळा फुलांनी बहरली. सगळ्या जीवां सहित मनु भूमीवर उतरले. पाहता पाहता पृथ्वी पुन्हा जीव जंतूंनी परिपूर्ण झाली.
क्रमशः
संकलन,लेखन व ©® मिनाक्षी देशमुख.
दि. १७-१०-२०२३.



















