आपल्या कुलाचा " कुळवृत्तांत " अर्थात गोत्र, विवाह-देवक, कुलदेवी-देवता, गोत्रभाऊ यादी, ध्वज, कुळाचार, निशाण ई. सचित्र फाईल प्राप्त करा. 📞 9422938199

भाग १ :- महारथी “कर्ण” संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)
महारथी कर्णः ही चरित्र लेखमाला मीनाक्षी देशमुख संकलित संपूर्ण चरित्र अर्थात (कादंबरीरुपात) या लेखमालेचे एकूण 18 भाग असून येथे वाचण्यासाठी सोपे व्हावे म्हणून मूळच्या 4 भागाचा १ भाग बनविला आहे. याची नोंद घ्यावी.
Part:-1 Maharathi Karana : Complete Biography (Novel Form), Maharathi Karana Complete Biography
महारथी कर्णः- संपूर्ण चरित्र
मिनाक्षीताई देशमुख या सेवानिवृत्त. सरकारी अधिकारी असून. त्यांनी सेवानिवृत्तीच्या नंतर. भारतातील. महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचे. चरित्र लिखाण केले सोशल मीडियावर केलेले असून आतापर्यंत. 95 व्यक्तिरेखांचे. चरित्र त्यांनी रेखाटले आहे. आणि अजूनही त्यांचे हे काम अव्याहतपणे चालू आहे. महाराष्ट्रातील. ज्यांना वाचनाची. आवड आहे. अशा लोकांना, विद्यार्थी, शिक्षक. समीक्षक या सर्वांना. कीर्तनकार, धार्मिक लोकांना या लिखाणाचा अतिशय उपयोगा आहे. त्यांच्या संपूर्ण व्यक्तिरेखांचं. संग्रह आम्ही 96 कुळी मराठा. डॉटकॉम https://96kulimaratha.com/ या वेबसाइटवर करत आहोत. शेकडो पानांचा हा त्यांचा संग्रह आम्ही विस्तृत वर्गीकरण करून. या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यातलीच एक व्यक्तिरेखा म्हणजे. महारथी कर्ण. यांचे चरित्र.
भाग-१ :- महारथी कर्ण
कर्ण ही एक *उपेक्षीत व्यक्ती* आहे. त्याच्या जीवनातील कांही घटना *आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांशी निगडीत असल्यामुळे मला तो जास्त जवळचा वाटतो.*
*काही सुचना असल्यास अपेक्षीत*
प्रत्येकाच्या मनात एक दडलेला कर्ण असतो.माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी. भावकहाणी.याची सत्यता शोधायची झाली तर महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही. कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत तर त्यात हा *कर्ण* दिसतो.
एवढा तेजपुंज! सुर्यपुञ, जन्मजात कवच कुंडले लाभलेला शौर्यात कणभरही कमी नसलेला, उदार, दानवीर अशा या कर्णाचा काय दोष होता? काय चुक होती त्याची? संपुर्ण आयुष्यभर *उपेक्षिताचे जीवन* त्याला भोगावे लागले.
जेव्हा श्रीकृष्ण गंगातीरी त्याला भेटायला जातो, व तुझे रुप मला पाहायचे होते, त्याहीपेक्षा जन्मजात कवच कुंडले. त्यावेळी कर्णाच्या मुखावर एक व्यथा तरळुन जाते, खिन्नपणे तो म्हणतो कवच कुंडले!
याची साक्ष माझ्या मातेला सहन झाली नाही. तीने मला जन्मतःच प्रवाहात सोडुन दिले. ज्याला आईने टाकले त्याला कवच कुंडलाचं बळ काय लाभणार? कृष्णा ही कवच कुंडल शापीत आहेत. जीवनभर प्रवाहावर तरंगत राहण एवढच दैवी आहे, हीच नियती आहे.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
भागः-२:- महारथी कर्ण
कर्णाच्या मनात विचार येतो की,”मी कोण? मला का टाकल्या गेलं? अशी कोणती समस्या होती माझ्या जन्मदाञीसमोर की, तीला मी जन्मतःच प्रवाहात सोडुन द्यावं लागल! *अधिरथ आणि राधाईने* स्वतःच्याही पुञांपेक्षाही प्रेम दिले परंतु *पोरकेपणाची व्यथा* माञ हा विसरु शकला नाही.
शिक्षणाच्या बाबतीतही तेच झालं,अधिररथ कर्ण व शोणला घेऊन द्रोणाचार्या समोर गेलेत, तेव्हा त्यांनी सांगीतले की राजपुञांसोबत सुतपुञांना शिकता येणार नाही. त्यांची रवानगी कृपाचार्याकडे सामान्य शिष्यगणां सोबत झाली
प्रत्यक्ष गुरुनेच असा भेदभाव कराव याचे वैषम्य वाटले. व्यथीत झाला. परीक्षा घेण्याच्या दृष्टीने पोपटाच्या डोळ्याचे लक्ष समोर ठेवल्या गेलं. गुरुदेवांनी पोपटाचा डोळा टिपण्याची आज्ञा दिली. जेव्हा याने धनुष्य सरसावुन नेम घेणार तेवढ्यात त्याला त्याच्या जातीचा उल्लेख करुन “तू राजसारथी अधिरथाचा सामान्य मुलगा आहेस” राजपुञांची बरोबरी कधीच करु शकत नाही. अपमानाने व संतापाने तो हतविर्य झाला. तिथेही त्याची मानहानी, मानखंडना अवहेलना केली गेली. त्याला गुरुकृपा कधी लाभली नाही.हे वैषम्य त्याला नेहमीसाठी त्याला होते.
द्रोणाचार्यांनी त्याला ब्रम्हास्ञ शिकवण्याचे नाकारले म्हणुन तो भगवान परशुरामाकडे गेला. विद्या ग्रहण करण्यासाठी असत्याची कास धरली. *भृगुकुलोत्पन्न ब्राम्हणपुञ* म्हणुन प्रवेश मिळवला. ब्रम्हास्ञ प्राप्त केले. पण तीथेही त्याचे दुर्दैव आडवे आले. गुरुसेवेसाठी पाळलेल्या संयमामुळे उग्र शापाला त्याला सामोरे जावे लागले.
कोरड्या विहिरीतील विटी बाणाने काढुन द्रोणाचार्यांनी कौरव राजसभेत मानाचं स्थान मिळवल असेलही, पण कर्णाच्या जीवनाची विहीर जातीच्या स्नेहाच्या ओलाव्या अभावी कोरडीच राहीली.
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख.
भागः-३:- महारथी कर्ण
अवहेलना कितीसहन करायची, अपमानाने जगने हे मरणापेक्षाही भयंकर आहे.आणी कर्ण तर शेवटच्या क्षणापर्यत हेच सहन करत आला,कराव लागल. छोट्या मोठ्या घटनांभधे.
शस्ञस्पर्धेच्या वेळी सारे युवराज स्पर्धेमधे भाग घेत होते. त्यांचवारेमाप कौतुक होत होते. अन् हा मागे उभा राहुन पाहत होता.वीरत्वाची उणीव होती म्हणुन नव्हे तर ते वीरांच रिंगण त्याला वाटत होते.आणी त्याच समजुतीने त्याने अर्जुनाला आव्हान केले.
तीथेही अर्जुनाच्या सहाय्याला कृपाचार्य धावले. आणी सर्वासमोर त्यांनी त्याला त्याच्या कुळाचा उच्चार करुन तुला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.एका युवराजाच्या प्रतिष्ठेसाठी एका शिष्याची अप्रतिष्ठा करु पाहणारे गुरु कसले?
त्याचा होत असलेला तेजोभंग पाहुन दुर्योधनाने त्याला त्याच क्षणी अंगदेशाचा अभिषेक करुन राज्य बहाल केले.
परंतु त्याने कुणाचेही दान कधी घेतल नाही. चिञगंदाच्या स्वयंवराच्यावेळी जरासंधाशी मल्लयुध्द करुन विजयी झाला. तेव्हा जरासंधाने मालीनी नगरी अर्पन केली.तीच ही चंपानगरी म्हणुन वसवली व समृध्द केली.
स्वपराक्रमाने जेव्हा मिळवल तेव्हाच त्याने अंगदेशाचे अधिपत्य स्विकारले. अशा या वीर स्वकर्तुत्ववान कर्णाला आयुष्यभर अवहेलना व अपमानच भोगावा लागला, यासारखे त्याचे दुर्दैव कोणते?
युध्द शाळेत दरवर्षी *वार्षिक यज्ञ* करायची प्रथा द्रोणाचार्यानी घालुन दिली होती. या यज्ञासाठी एक जिवंत प्राणी बळी देण्यासाठी प्रत्येकाने पकडुन आणायचा असे. कर्णाने सगळ्यांपेक्षा वेगळा प्राणी म्हणजे वाघाशी झुंज देऊन वाघाला पकडुन आणला. त्याबद्दल कौतुक तर सोडाच, पण *यज्ञशांतीसाठी वाघ निशिध्द आहे* असे म्हणुन वाघाला सोडायला लावले.
या अपेक्षाभंगाचं दुःख तर झालच
पण गुरु द्रोणाचार्यांच्या त्या पाणचट तत्वज्ञानाची चीड आली. *यज्ञात क्रुर हिंस्ञ पशु बळी द्यायचा नाही पण निरपराध बोकड देणे कितपत योग्य आहे?* असे त्याला वाटले तर काय चुकले?
क्रमशः
संकलन-मिनाक्षी देशमुख
*कर्णः-*
भागः-४:- महारथी कर्ण
दुर्दैव हे कर्णाच्या अंगोपांगी वसलेल आहे. अपमानाचे घडेच्या घडे त्याच्यासाठी नियतीने भरुन ठेवले आहेत.
द्रौपदी स्वयंवराच्पा वेळीही नियतीने त्याच्यावर क्रुर आघात केलाच. कर्णाला या स्वयंवराला जायचे नव्हते पण दर्योधनाने त्याची निर्भत्सना केली, त्याच्या क्षाञतेजाला आव्हान केले. शेवटी मिञप्रेमाला जागुन त्याने सांगीतले की, मिञा, मी नुसती द्रोणाचार्याकडुनच दुरुन संथा घेतली नाही तर परशुरामाकडे शस्ञविद्या पण शिकलोय. तू कष्टी होऊ नकोस, मी येऊन मत्सभेद करुन *”पण”* जिंकुन दाखवीन.
द्रुपदाने मत्सयंञ उभारुन महादुर्घट *”पण”* ठेवला होता.
सभास्थानाच्या मध्यभागी मत्स्याकृती यंञ फिरत होते. त्याखाली ठेवलेल्या सुवर्ण पाञातील द्रव्यात त्याचे प्रतिबिंब दिसत होते.सर्व देशोदेशीचे राजे *”पण”* जिंकण्यासाठी व पाहण्यासाठी उपस्थित होते. बर्याच राजांनी प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न निष्फळ झालेत. शेवटी कर्ण उठला. मन एकाग्र करुन मत्स्ययंञाचा वेध निश्चित करु लागला. आता बाण सोडणार तेवढ्यात त्याच्या कानात तप्तरसासारखे शब्द कानावर पडले. *”मी सुतपुञाला वरणार नाही”,* हातातले धनुष्य फेकुन घायाळ दृष्टीने ताडताड पावल टाकीत तो बाहेर निघुन गेला.
सर्व मान्यवर राजांसमक्ष त्याच्या मानी मनावर केवढी निर्दयपणे जखम केली, जी कधीच भरु शकत नाही. विशेषतः स्ञीयांनी केलेल्या जखमेचे विरुप व्रण कायमचे मागे राहतात. अशा जखमांच्या मालिकेची क्षिती न बाळगता जन्माबरोबर सुरु झालेल हे सञ अखेरच्या क्षणाबरोबरच संपेल.
*श्रेष्ठ कुल म्हणजे काय?* राज्याच्या, ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेतल्यानेच श्रेष्ठ कुलत्व प्राप्त होते का? उलट ज्या घरात सुसंस्कार, चारिञ्य, नीती व व्यवहार यांची अखंड सांगड घातल्या जाते ते कुलवंत. पुञप्राप्तीसाठी परक्याचा आधार घेऊन संतती प्राप्त करुन घेणारे श्रेष्ठ कुलाचे का?
कर्णाचे जीवन म्हणजे हीनता उपेक्षा वंचना आणी अवमान! कर्णासारख्या कणखर योध्यासाठी यापेक्षा कोणत भयानक मरण असु शकते? म्हणुनच तो अवहेलनेचे व अधिक्षेपाचे प्रसंग तो कधीच विसरु शकला नाही.
क्रमशः
संकलन- मिनाक्षी देशमुख.



















